Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कॅनाल रस्ता हवा; मात्र टीडीआर नको

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यास (डीपी) शहर सुधारणा समितीच्या बैठकीत येत्या दोन दिवसांत मान्यतेचा मुहूर्त लागेल, असे महापालिकेतून सांगण्यात येत आहे. दरम्यान, डीपीच्या मान्यतेत एक अडचण ठरलेल्या कॅनॉल रोडला पाठिंबा; मात्र त्याच्या मोबदल्यापोटी टीडीआर देण्यास विरोध, अशी भूमिका काँग्रेसने लावून धरली आहे.

ई-सेवा केंद्रात नागरिकांची लूट

$
0
0
अन्नधान्य वितरण कार्यालयात कामासाठी गेलेल्या नागरिकांची एजंटांकडून होणारी लूट थांबावी म्हणून शहरातील विविध भागात जिल्हाप्रशासनाने ‘महा ई-सेवा’ केंद्रे सुरू केली. परंतु, याच केंद्रातूनच नागरिकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

प्रत्येकाने शोधावे स्वतःचे गाणे

$
0
0
व्यवसायाने इंजिनीअर असूनही संगीत साधनेत अखंड रमलेल्या पं. विनायकराव केळकर यांचा अमृतमहोत्सवी समारंभ येत्या रविवारी (२१ ऑक्टोबर) होणार आहे. राग संगीत आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावनांबद्दल भरभरून बोलणाऱ्या केळकर यांच्याशी झालेला हा संवाद...

पोलिस चौकशीच्या नावाखाली नाहक त्रास

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामधील गैरप्रकारांबाबत सुरू असलेल्या पोलिस चौकशीविषयी पुणे विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीकडून बुधवारी आक्षेप घेण्यात आला.

संतप्त नातेवाइकांकडून हॉस्पिटलची मोडतोड

$
0
0
कर्वेरोडवरील रसशाळेजवळ असलेल्या गॅलेक्सी हॉस्पिटलची पेशंटच्या नातेवाईकांनी मोडतोड केल्याबद्दल डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विनोद विठ्ठलराव चिपा (वय ३९, रा. महात्मा फुले, गंजपेठ) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पीएमपीतील गर्दीने एकाचा घेतला बळी

$
0
0
पीएमपीच्या बसमधील गर्दीमुळे दरवाजात उभे राहणे एकाच्या जिवावार बेतले. सातारा रोडवरील व्होल्गा चौकात 'बीआरटी' ट्रकच्या संरक्षक कठाड्याचा लोखंडी पाइप बसच्या दरवाजात उभ्या असलेल्या दोघा प्रवाशांना लागून एकाचा बळी गेला.

डेंगीच्या साथीचे घरोघरी सर्वेक्षण

$
0
0
पाणीकपातीमुळेच डेंगीची साथ शहरात पसरल्याचा ‘जावईशोध’ लावलेल्या पालिकेच्या आरोग्य विभागाला आता घरोघरी जाऊन डेंगीच्या पेशंटचे सर्वेक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी बुधवारी दिले.

अनधिकृत बांधकामांचा विळखा सिंहगडालाही

$
0
0
गडकोटांच्या संवर्धनाबाबत उदासिन असणाऱ्या प्रशासनाने आता गडांवर होणाऱ्या अनधिकृत बांधकांमांकडेही डोळेझाक सुरू केली आहे. टोलच्या माध्यमातून शासकीय तिजोरी भरणाऱ्या सिंहगडावरील अनधिकृत बांधकामाबाबत पुरातत्त्व खात्यासह, वनविभागानेही हात झटकले आहेत.

'फार्मसी क्षेत्रात संशोधनाची गरज'

$
0
0
फार्मसी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संशोधनाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फार्मसी अभ्यासक्रमानंतर संशोधनाकडे वळावे. तसेच या क्षेत्रात उद्योजक म्हणूनही मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. विद्यार्थ्यांनी या पर्यायाचा जरूर विचार करावा, अशी अपेक्षा उच्च व तंत्रशिक्षण आणि उर्जा मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी व्यक्त केली.

ज्वेलरी डिझायनिंग कोर्सला 'झळाळी' कधी?

$
0
0
ज्वेलरी डिझायनिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी सुसज्ज हॉल तयार, त्यासाठीची अद्ययावत मशिनरी पालिकेत दाखल; परंतु आर्थिक दुर्बल घटकांना प्रशिक्षण देण्यासाठी पालिकेसमवेत काम करण्यास प्रशिक्षण संस्था उत्सुक नसल्याने या प्रकल्पाला अद्याप ‘झळाळी’ प्राप्त झालेली नाही.

विकासकामे... अजूनही बाल्यावस्थेत!

$
0
0
अनधिकृत बांधकामांची 'पंढरी' असलेल्या तळजाई पठार, आंबेगाव पठाराने गेल्या महिन्यात संपूर्ण शहराला हादरवले. तळजाई पठारावर माजी नगरसेवक संजय नांदेची अनधिकृत इमारत कोसळून ११ निष्पापांचा बळी गेला. या धक्कादायक घटनेने जागे झालेल्या पालिका प्रशासनाने हातोडा उगारण्यास सुरुवात केली आहे.

झोपडपट्ट्यांमधील गुन्हेगारी अन् वाहतूक समस्यांचा तिढा

$
0
0
सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या कक्षात प्रेमनगर, आदिनाथ, डीसके, सुयोग, सहकारनगर नं.१ मधील सारंग सोसायटी, अरण्येश्वर भागातील सोसायट्या, वाळवेकर नगर, शिवदर्शन, तावरे कॉलनी, पद्मावती वसाहत, अण्णाभाऊ साठे नगर नं.१ झोपडपट्टी, लक्ष्मीनगर वसाहत, स्वारगेट, तळजाई झोपडपट्टी, इंदिरानगर औद्योगिक वसाहत, मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी या भागांचा समावेश होतो.

गाडीखाली जनावरे आल्याने चेन्नई एक्स्प्रेस अडकली

$
0
0
चेन्नई-मुंबई एक्स्प्रेसच्या धडकेने त्याच रेल्वेखाली अडकून दोन गाई आणि एक म्हैस मृत्युमुखी पडण्याची घटना मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे बुधवारी रेल्वेसेवा विस्कळित होऊन पुणे-मुंबई लोहमार्गावरील लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावत होत्या.

अपघातात महिलेचा मृत्यू

$
0
0
भरधाव दुचाकीची धडक बसल्यामुळे एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला. निगडी प्राधिकरणातील म्हाळसाकांत चौकात सोमवारी (१५ ऑक्टोबर) सकाळी सव्वानऊ वाजता ही घटना घडली. विमल चंद्रकांत जगताप (वय ६२, रा. जगताप चाळ, आकुर्डी निगडी) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

स्थायीत महिला सदस्यांचा रुद्रावतार

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील महिला सदस्यांनी मंगळवारी (१७ ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत रुद्रावतार धारण करीत अध्यक्ष जगदीश शेट्टी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तसेच अधिकारी विश्वासात घेऊन कामे करीत नसल्याचा आरोप केला.

ब प्रभागाची सभा पाणी प्रश्नावरून तहकूब

$
0
0
अपुरा पाणीपुरवठा आणि अस्वच्छतेच्या प्रश्नावरून सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाल्याने ब प्रभाग समितीची सभा बुधवारी (१७ ऑक्टोबर) तहकूब करण्यात आली.

दुर्घटना टाळण्यासाठी सणांमध्ये तलाव बंद

$
0
0
दसरा, दिवाळी या सणांच्या काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जलतरण तलावांवरील दुर्घटना टाळण्यासाठी तलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागांतर्गत एकूण दहा जलतरण तलाव आहेत.

राष्ट्रवादीच्या अधिवेशनाचा खर्च भारी

$
0
0
अतिथी देवो भवः या भावनेने आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करा, आदरातिथ्यात कसलीही कमतरता भासू नये या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी अपेक्षित मोठ्या खर्चाची जबाबदारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांनी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उच्चशिक्षणाचा आराखडा लवकरच कॅबिनेटसमोर

$
0
0
उच्च आणि तंत्रशिक्षणासाठीचा तयार करण्यात येणारा बृहत् आराखडा लवकरच कॅबिनेट मंत्रीमंडळासमोर येईल, त्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राज्याचे उच्च तंत्रशिक्षण आणि उर्जामंत्री राजेश टोपे यांनी मोशी येथे दिले.

मराठी स्टार, लिफ्टमध्ये बेजार

$
0
0
मकरंद अनासपुरे, विजय केंकरे, आनंद इंगळे, सुहास परांजपे, सुनील गोडबोले ही कलाकार मंडळी लिफ्टमधून येत असताना अचानक लिफ्ट बंद पडून ते आत अडकतात.. त्यांचा आरडओरडा आणि सुमारे तासभर आत राहिल्यानंतर त्यांची सुटका होते... हा कोणत्या चित्रपटातील क्लायमॅक्सचा प्रसंग नाही.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images