Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अंमली पदार्थ विक्रेत्याला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रास्ता पेठेत मेफोड्रोन (एमडी) व गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक लाख रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

अहमद खुर्शीद अहमद शेख (वय ३०, रा. गंजपेठ, मोमीनपुरा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. रास्ता पेठेतील मारुती मंदिराजवळ एक व्यक्ती अंमली पदर्थांची विक्री करण्यासाठी दुचाकीवर येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांना बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या पथकाने सापळा रचून शेखला अटक केली. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम एमडी, १३ हजार रुपये किंमतीचा १ किलो १५० ग्रॅम गांजा आणि दुचाकी असा एकूण ९४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीज वाचवा; सोने मिळवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जगाच्या पाठीवर कुठेही जा.. महिलांना सोन्याचे आकर्षण असते. हाच धागा पकडून तुर्कीमध्ये दोन वर्षांपूर्वी 'एनर्जी इफिशियन्सी असोसिएशन'ने 'एनर्जी हनीम' नामक चळवळ सुरू केली. त्याअंतर्गत राबविण्यात आलेली 'विजेची बचत करा आणि सोने मिळवा' ही संकल्पना महिलांनी उचलून धरली अन् बघता बघता ३४ हजार महिला उपक्रमात सहभागी झाल्या. एकीकडे वीज वाचवून त्या दर चार महिन्यांनी सोनेखरेदी करीत आहेत.

'विकसित आणि श्रीमंत देशांमध्ये घराघरांत इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी अतिक्रमण केले आहे. या वस्तूंवर आपण पूर्णपणे अवलंबून आहोत, अशा मानसिकतेतून अनेकदा त्यांचा अतिवापरही केला जातो. विजेच्या उपकरणांचा मर्यादित वापर झाल्यास नक्कीच वीज बचत आणि पर्यायने कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण मर्यादित ठेवणे शक्य आहे. याबद्दल जनजागृती करण्यासाठी आम्ही तुर्कीमध्ये एनर्जी हनीम (एनर्जी लेडी) ही चळवळ सुरू केली,' असे 'एनर्जी इफिशियन्सी असोसिएशन'च्या उपाध्यक्षा सफाक मर्डिरिसगील यांनी सांगितले.

घराच्या देखभालीवर सर्वाधिक लक्ष महिलांचे असते, त्यामुळे त्यांनाच वीज बचतीचे दूत बनविण्याचे आमही ठरवले. विजेच्या बिलावर हजारो रुपये घालविण्याऐवजी, हक्काच्या बचतीतून सोन्याची खरेदी करता येईल, असे आम्ही त्यांना पटवून दिले. सोने हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्यांनी ही कल्पना उचलून धरली. आज या चळवळीत तुर्कीच्या २१ शहरांमधील ३४ हजार महिला सहभागी झाल्या आहेत. दर काही महिन्यांनी त्या वीज बचतीसाठी केलेल्या उपाययोजना आणि सोन्याची लहान नाणी खरेदी केल्याची माहिती आमच्याकडे नोंदवतात, असेही श्रीमती मर्डिरिसगील म्हणाल्या. 'विजेचा काटकसरीने वापर झाल्यास आपण निश्चितच किमान एक चतुर्थांश विजेची बचत करू शकतो, हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. या उपक्रमात अनेक महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पुढील काही वर्षात आम्ही इतर देशांमध्येही या चळवळीची व्याप्ती वाढविणार आहोत. आगामी आठ वर्षांत आम्ही एक कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय निश्चित केले आहे,' असेही मर्डिरिसगील यांनी सांगितले.

पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक हवामान परिषदेमध्ये तेर पॉलिसी सेंटरने आयोजित केलेल्या 'वुमन, जेंडर इक्वॅलिटी अँड क्लायमेट चेंज' या कार्यक्रमामध्ये त्यांनी उपक्रमाची माहिती दिली. भारतातदेखील घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढला असून, येथील संस्थांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमती मर्डिरिसगील यांनी केले.

..

वीजबचतीवरील लघुपट निर्मिती

वीज बचतीचे धडे घरोघर पोहोचविण्यासाठी संस्थेतर्फे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा नियोजनबद्ध वापर कसा करावा, हे सांगणाऱ्या कार्यशाळा, परिसंवाद आणि महिला क्लबच्या बैठका आयोजिण्यात येतात. बचतीचे फंडे सांगणाऱ्या शंभर नियमांची यादी आणि लघुपटही आम्ही तयार केले आहेत. हेअर ड्रायर, इलेक्ट्रिक हिटर (वॉटर हिटर, ब्रॉयलर), घराच्या रचनेनुसार दिव्यांचे आकार आणि प्रकार, व्हॅक्युम क्लिनर, टीव्हीचा वापर, कूलर, रेफ्रिजरेटर, डिश वॉशर, ओव्हन, मायक्रोवेव्ह अशा बहुतांश घरांमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकऱणांच्या वापराबद्दल त्यात सोप्या शब्दात माहिती देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मजबूत साथ हाच खरा सत्कार : पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'लोकांनी दिलेली मजबुतीची साथ हाच माझा खरा सत्कार आहे,' अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती संघटना मुंबईतर्फे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर आणि अशोक पत्की, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नियोजित संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर, ज्येष्ठ नाट्य अभिनेते जयंत सावरकर, भारताचे माजी कसोटीपटू चंदू बोर्डे, ज्येष्ठ लोककलावंत कलाबाई काळे-नगरकर, पिंपरी-चिंचवडचे प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगे, ज्येष्ठ कलाकार लता नार्वेकर, बाळ कर्वे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी सत्कार होत आहेत, असे नमूद करून पवार म्हणाले, 'कधी कधी विचार करतो. कशासाठी हे सत्कार चाललेत? लोकांनी मला कुठे नेऊन ठेवले? आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. परंतु, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मला मजबुतीने दिलेली साथ होय. कर्तृत्त्ववान व्यक्तींना मदत करता आली, हे भाग्य समजतो.'

'देशाची लोकसभा अनेक वर्षे पाहतो. येथे १९८४मध्ये प्रवेशाची पहिली मुहुर्तमेढ पिंपरी-चिंचवडपासून झाली. आजही पुण्याला जात असताना पिंपरी-चिंचवडमधील झालेला बदल उल्लेखनीय वाटतो. त्यामध्ये अण्णासाहेब मगर, प्रा. रामकृष्ण मोरे आणि अजित पवार यांचा मोलाचा वाटा आहे. इतके चांगले काम कदाचित मलाही जमले नसते,' असे पवार म्हणाले.

'अनंत अमुची ध्येयासक्ती' या काव्यपंक्तीप्रमाणे पवार जगले असे हृदयनाथ मंगेशकर म्हणाले. आयपीएल क्रिकेटचे शिल्पकार म्हणून बोर्डे यांनी पवारांचा गौरव केला. 'पाहुनिया चंद्रवदन, मला साहिना मदन' या ओळी म्हणत कलाबाईंनी ठसठशीत स्वरांची झलक व्यक्त केली. तर, शरद पवार यांचे पुस्तक म्हणजे धर्मग्रंथ असल्याचे गवाणकर यांनी नमूद केले. 'साहेब पंतप्रधान होऊ शकले नाहीत, हे आपले आणि देशाचे दुर्दैव आहे,' अशी खंत मोहन जोशी यांनी व्यक्त केली.

सोनियांच्या आठवणीचे आश्चर्य

दिल्लीतील सत्काराच्या वेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेल्या कौतुकाचा धागा पकडून शरद पवार म्हणाले, 'माझे सासरे सदू शिंदे लेगस्पीनर होते. त्यांची मुलगी माझी पत्नी. त्यामुळे मी कितीही चांगला बॅटिंग करणारा असलो तरी विकेट जाणारच, हे नक्की आहे. सोनियांजीनी करून दिलेल्या आठवणीचे मलाही आश्चर्य वाटले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हृदय प्रत्यारोपणाचा आंतरराज्य सेतू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुण्या-मुंबईत हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट ट्रान्सप्लांट) होणे आता नावीन्यपूर्ण गोष्ट राहिलेली नाही. तरीही गुजरातमधील एका हॉस्पिटलमधील 'ब्रेनडेड' पेशंटचे हृदय काढून मुंबईच्या पेशंटला त्याचे ट्रान्सप्लांट करण्याची किमया पुण्यातील हार्ट ट्रान्सप्लांट सर्जनने करून दाखविली. पश्चिम भारतासह गुजरात, महाराष्ट्र या आंतरराज्यातील हे पहिलेच हृदय प्रत्यारोपण ठरले. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये 'हृदयनाते' संबंध निर्माण झाल्याने विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.

सूरत ते मुंबईच्या फोर्टिस हॉस्पिटलपर्यंतचा दोनशे किलोमीटरचा प्रवास ग्रीन कॉरिडॉर आणि चार्टर विमानाच्या मदतीने अवघ्या चाळीस मिनिटांत पूर्ण करण्यात आला. त्यामुळे शनिवारी पहाटेपर्यंत पुण्यातील डॉक्टरांनी मुंबईच्या पेशंटला हार्ट ट्रान्सप्लांट करून जीवदान दिले.

संपूर्ण गुजरात आणि मुंबई झोपेच्या अधीन झाली असताना मुंबईचे फोर्टिस हॉस्पिटल आणि गुजरातच्या सूरतमधील महावीर हॉस्पिटलमधील डॉक्टरांची धावपळ सुरू होती. एका चाळीस वर्षाच्या व्यक्तीचा अपघात झाल्याने तो 'ब्रेनडेड' झाला आणि त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. लिव्हर, किडनी, डोळ्यांसह हृदयाचे दान करण्यात आले. गुजरातमधील हॉस्पिटलच्या प्रत्यारोपण समितीने मुंबईतील प्रत्यारोपण समितीशी संपर्क साधला आणि त्यानंतर सूत्रे हालली.

'फोर्टिस हॉस्पिटलमध्ये एका पेशंटला हार्ट ट्रान्सप्लांट करण्याचा निरोप मिळाला आणि मी पुण्यातून थेट मुंबईचे फोर्टिस हॉस्पिटल गाठले. तर मूळचे पुणेकर आणि सध्या मुंबईत असलेले डॉ. अन्वय मुळे यांनी सूरत गाठले. सूरतमधील चाळीस वर्षांच्या एका व्यक्तीचे हृदय काढून मुंबईत पाठवायचे होते. डॉ. मुळे यांनी सूरतच्या महावीर हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या पेशंटचे हृदय काढण्याचे ऑपरेशन केले. तेथून ते हृदय 'कार्डिओ प्लॅजिक सोल्युशन'मध्ये ठेऊन ग्रीन कॉरिडरच्या माध्यमातून सूरतच्या विमानतळापर्यंत नेले. तेथून डॉ. मुळे यांनी चार्टर विमानाद्वारे रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास मुंबई गाठली,' अशी माहिती जहांगीर हॉस्पिटलचे हार्ट ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. संजीव जाधव यांनी दिली.

सूरतचे महावीर हॉस्पिटल ते विमानतळ आणि तेथून मुंबई, नंतर मुंबई विमानतळ ते फोर्टिस हॉस्पिटलपर्यंतचा प्रवास ग्रीनकॉरिडर, चार्टर विमानाने केला. त्यावेळी फोर्टिस हॉस्पिटलमधील पेशंटचे हृदय काढण्याची प्रक्रिया सुरू होती. दात्याचे हृदय पोहोचताच मुंबईतील पेशंटला त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५७० ग्रॅम वजनाच्या बालकाला जीवदान

$
0
0

पुणे : गर्भधारणेनंतर केवळ २६ आठवड्यांत अर्थात प्रसूतीच्या कालावधीच्या तीन महिन्यांपूर्वी जन्माला आलेल्या, तसेच अवघे ५७० ग्रॅम वजन असलेल्या बालकाला कोलंबिया एशिया हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सातत्याने गेले शंभर दिवस केलेल्या उपचारांमुळे जीवदान मिळाले आहे. जन्माच्या वेळी प्रौढ व्यक्तीच्या तळहाताच्या आकाराऐवढ्या असलेल्या या बालकाची प्रकृती आता सुखरूप आहे.

बाळाची ३५ वर्षीय आई मनिषा (नाव बदलले आहे) यांचा पहिला गर्भ असफल झाल्याने त्यावेळी मृत बालकाचा जन्म झाला होता. दुसऱ्या गर्भधारणेवेळी उच्च रक्तदाब व आरोग्यविषयक अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले होते. रक्तदाब वाढल्याने बाळाला आवश्यक रक्तपुरवठा मिळत नसल्याने त्याचा जीव धोक्यात आला होता. गर्भधारणेमुळे आईच्या जीवालाही धोका निर्माण होण्याची भीती असल्याने डॉक्टरांनी गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता.

'मुलाचे वजन खूपच कमी होते. त्याचे फुफ्फुसदेखील योग्य प्रकारे काम करीत नव्हते. ५७० ग्रॅम वजनाचे जन्माला आलेले बाळ आता तीन किलो ग्रॅम वजनाचे झाले असल्याने त्याची प्रकृती सुधारत आहे,' अशी माहिती डॉ. पारीख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांनो वीज वाचवा; सोने मिळवा

$
0
0

तुर्कीतील योजनेला गृहिणींचा अभूतपूर्व प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जगाच्या पाठीवर कुठेही जा.. महिलांना सोन्याचे आकर्षण असते. हाच धागा पकडून तुर्कीमध्ये दोन वर्षांपूर्वी 'एनर्जी इफिशियन्सी असोसिएशन'ने 'एनर्जी हनीम' नामक चळवळ सुरू केली. त्याअंतर्गत राबविण्यात आलेली 'विजेची बचत करा आणि सोने मिळवा' ही संकल्पना महिलांनी उचलून धरली अन् बघता बघता ३४ हजार महिला उपक्रमात सहभागी झाल्या. एकीकडे वीज वाचवून त्या दर चार महिन्यांनी सोनेखरेदी करीत आहेत.

'विकसित आणि श्रीमंत देशांमध्ये घराघरांत इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी अतिक्रमण केले आहे. या वस्तूंवर आपण पूर्णपणे अवलंबून आहोत, अशा मानसिकतेतून अनेकदा त्यांचा अतिवापरही केला जातो. विजेच्या उपकरणांचा मर्यादित वापर झाल्यास नक्कीच वीज बचत आणि पर्यायने कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण मर्यादित ठेवणे शक्य आहे. याबद्दल जनजागृती करण्यासाठी आम्ही तुर्कीमध्ये एनर्जी हनीम (एनर्जी लेडी) ही चळवळ सुरू केली,' असे 'एनर्जी इफिशियन्सी असोसिएशन'च्या उपाध्यक्षा सफाक मर्डिरिसगील यांनी सांगितले.

घराच्या देखभालीवर सर्वाधिक लक्ष महिलांचे असते, त्यामुळे त्यांनाच वीज बचतीचे दूत बनविण्याचे आमही ठरवले. विजेच्या बिलावर हजारो रुपये घालविण्याऐवजी, हक्काच्या बचतीतून सोन्याची खरेदी करता येईल, असे आम्ही त्यांना पटवून दिले. सोने हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्यांनी ही कल्पना उचलून धरली. आज या चळवळीत तुर्कीच्या २१ शहरांमधील ३४ हजार महिला सहभागी झाल्या आहेत. दर काही महिन्यांनी त्या वीज बचतीसाठी केलेल्या उपाययोजना आणि सोन्याची लहान नाणी खरेदी केल्याची माहिती आमच्याकडे नोंदवतात, असेही श्रीमती मर्डिरिसगील म्हणाल्या. 'विजेचा काटकसरीने वापर झाल्यास आपण निश्चितच किमान एक चतुर्थांश विजेची बचत करू शकतो, हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. या उपक्रमात महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पुढील काही वर्षात आम्ही इतर देशांमध्येही या चळवळीची व्याप्ती वाढविणार आहोत,' असेही मर्डिरिसगील यांनी सांगितले.

पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक हवामान परिषदेमध्ये तेर पॉलिसी सेंटरने आयोजित केलेल्या 'वुमन, जेंडर इक्वॅलिटी अँड क्लायमेट चेंज' या कार्यक्रमामध्ये त्यांनी उपक्रमाची माहिती दिली.

वीजबचतीवरील लघुपट निर्मिती

वीज बचतीचे धडे घरोघर पोहोचविण्यासाठी संस्थेतर्फे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा नियोजनबद्ध वापर कसा करावा, हे सांगणाऱ्या कार्यशाळा, परिसंवाद आणि महिला क्लबच्या बैठका आयोजिण्यात येतात. बचतीचे फंडे सांगणाऱ्या शंभर नियमांची यादी आणि लघुपटही आम्ही तयार केले आहेत. हेअर ड्रायर, इलेक्ट्रिक हिटर (वॉटर हिटर, ब्रॉयलर), घराच्या रचनेनुसार दिव्यांचे आकार आणि प्रकार, व्हॅक्युम क्लिनर, टीव्हीचा वापर, कूलर, रेफ्रिजरेटर, डिश वॉशर, ओव्हन, मायक्रोवेव्ह अशा बहुतांश घरांमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकऱणांच्या वापराबद्दल त्यात सोप्या शब्दात माहिती देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधीविना अपंग लाभांपासून वंचित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अपंगांसाठी जिल्हास्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी अपंग कल्याण आयुक्तालयाकडून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला सातत्याने अपुरा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे अपंगांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अंपगांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांसाठी अपंग कल्याण आयुक्तालयाकडून लाभार्थ्यांच्या तुलनेत अपुरा निधी मिळत आहे. याबाबत परिषदेने अपंग कल्याण आयुक्तांना पत्र पाठवून पुरेसा निधी देण्याची मागणी दोन महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत काही बदल झालेला नाही.

परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून अपंग विद्यार्थ्यांना शालांतपूर्व परीक्षेत्तर स्कॉलरशिप दिली जाते. या दोन्ही योजनांसाठी गेल्या तीन वर्षांत चार हजार ३८२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. या स्कॉलरशिपसाठी परिषदेने पाच कोटी २६ लाख ५४ हजार निधीची मागणी केली होती. त्यापैकी ४४ लाख ४८ हजार रुपये निधीच परिषदेला प्राप्त झाला. त्या निधीतून केवळ १०३१ अर्ज धारकांना स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली आहे. अपंगांना लघुउद्योगासाठी वित्तीय सहाय्य करणाऱ्या बीजभांडवल योजनेसाठी १२ लाख ६० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी केवळ पाच लाख ५८ हजार रुपये निधी मिळाला. एकूण ३९ लाभार्थ्यांनी यासाठी अर्ज केले होते. त्यातील १९ जणांना या योजनेचा लाभ मिळाला.

अपंगांच्या पुनर्वसनाकरीता राबविण्यात येणाऱ्या योजनांमधील काही योजना कालबाह्य झाल्या आहेत. तर, अनेक योजनांसाठी पुरेसा निधी मिळत नाही. त्यामुळे अपंग लाभापासून वंचित राहत आहेत. शासकीय पातळीवर याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

- हरिदास शिंदे, अध्यक्ष, संयुक्त अपंग हक्क समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळाबाजार करणारे अटकेत

$
0
0

२४८ क्विंटल धान्य, हजार लिटर रॉकेल जप्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेशनवर वितरणासाठी दिलेल्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या बालाजीनगर आणि जनता वसाहत येथील दोन दुकानांवर छापे मारून शहर पुरवठा कार्यालयाने २४८ क्विंटल धान्य आणि एक हजार लिटर रॉकेल जप्त केले. या दोन्ही दुकानदारांवर दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेशनवर वितरणासाठी दिलेले स्वस्त दरातील धान्य बालाजीनगरमधील रेशन दुकानदार खुल्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याची माहिती शहर पुरवठा कार्यालयाला मिळाली. पुरवठा खात्याच्या पथकाने रात्री साडेअकराच्या सुमारास या दुकानावर छापा मारला. तेव्हा शासकीय पोत्यामधील धान्य हे खासगी पोत्यांमध्ये भरल्याचे पथकाला आढळले. या दुकानात असलेल्या एम. एल. नवघणे याच्याकडे पथकाने स्टॉक रजिस्टर व ​बिल बुकाची मागणी केली. मात्र, ते नवघणे याने उपलब्ध करून दिले नाही.

धान्याचा काळाबाजार होत असलेले दुकान आपले नसून खिमसिंग राजपुरोहित यांचे असल्याचे नवघणे याने पथकाला चौकशीत सांगितले. दरम्यान, या दुकानात ५२ क्विंटल तांदूळ आणि १३३ क्विंटल गहू सापडला. त्याचे स्टॉक रजिस्टर नसल्याने हे धान्य जप्त करण्यात आले. या कारवाईपाठोपाठच जनता वसाहतीमधील गल्ली नंबर ७४ येथील रेशन दुकानावर पुरवठा खात्याच्या पथकाने छापा मारला. या छाप्यामध्ये ३४ क्विंटल गहू व २९ क्विंटल तांदूळ सापडला. त्याचे स्टॉक रजिस्टर व बिल नसल्याने हा मालही जप्त करण्यात आला. जनता वसाहतमधील हे दुकान खिमसिंग राजपूतच चालवत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पुरवठा अधिकारी नीलिमा धायगुडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गटारांची झाकणे धोकादायक स्थितीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील सुमारे ९० टक्क्यांहून अधिक गटारांची झाकणे (मॅनहोल) किंवा तत्सम स्वरूपात बसविण्यात येणाऱ्या जाळ्या रस्त्याच्या पातळीत नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. शहराच्या काही भागांतील पाहणीतूनच हे चित्र स्पष्ट झाले आहे. संपूर्ण शहरात अशाप्रकारे सर्वेक्षण करून पालिकेने त्याची माहिती वेबसाइटवर जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

'नागरिक चेतना मंच'तर्फे प्रायोगिक तत्वावर केलेल्या पाहणीतून रस्त्याच्या पातळीपेक्षा खाली अथवा त्यापेक्षा वर असलेल्या मॅनहोल्स आणि इतर प्रकारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या महिन्यात यामुळे झालेल्या अपघातांत नागरिकांचा दुर्दैवी अंत झाला होता. तरीही, पालिकेच्या पथ, ड्रेनेज आणि इतर विभागांतर्फे जबाबदारी झटकण्याचेच काम केले जात असून, एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे. या बाबतची नेमकी वस्तुस्थिती समोर यावी, यासाठी नागरिक चेतना मंचच्या कनीझ सुखराणी यांनी शहराच्या पूर्व भागांतील बहुतांश रस्त्यांची पाहणी केली.

महापालिकेच्या पथ विभागाच्या संबंधित भागांतील उपअभियंत्यांनी रस्त्यांच्या परिस्थितीकडे सातत्याने लक्ष देण्याची गरज आहे. पालिकेच्या किंवा इतर खासगी कंपन्यांनी रस्त्यावर विविध स्वरूपाचे काम केले असले, तरी त्यानंतर रस्त्याची पातळी कायम राखली आहे का, याची तपासणी पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे. त्यामुळे, १५ जानेवारीपर्यंत शहरातील सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रकारिता परंपरेची जपणूक करा

$
0
0

शरद पवार यांचा माध्यमांना सल्ला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'जनमानसावर परिणाम करणाऱ्या नागरी जीवनातील समस्यांचा शोध घेऊन त्यावर सखोल मांडणी करण्याच्या श्रमिक पत्रकारांच्या भूमिकेमुळे सरकारलाही धोरणात बदल करावे लागतात. मराठी पत्रकारितेच्या या परंपरेचे जपणूक करण्याचे काम यापुढेही अखंड सुरू ठेवा', असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी दिला.

पत्रकार भवन येथील कमिन्स सभागृहाच्या नूतनीकरणाचे उद‍्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोंगडे, विश्वस्त कार्यवाह श्याम दौंडकर या वेळी उपस्थित होते. 'प्रस्थापित सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करून त्यांना जाब विचारण्याचे कार्य पुण्यातच लोकमान्य टिळकांनी केले होते. कालानुरूप पत्रकारितेच्या क्षेत्रात बदल होत गेला आहे. अग्रलेख आणि पहिल्या पानावरच्या बातम्यांकडे आमचे बारकाईने लक्ष असायचे. परंतु, सध्याच्या काळात पहिल्या पानावर काय वाचायचे असा प्रश्न पडतो', अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.

पत्रकार भवनमधील नूतनीकरण केलेल्या वातानुकूलित सभागृहाचे कौतुक करून पत्रकारांना माहिती मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आधुनिक सेवा-सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाव्या, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पत्रकार प्रतिष्ठानतर्फे पवार यांना त्यांच्या छायाचित्रांचे संकलन असलेला अल्बम भेट देण्यात आला. घोंगडे यांनी प्रास्ताविक केले. अष्टेकर यांनी आभार मानले. योगेश कुटे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेश्या व्यवसायावर छापा; चौघींची सुटका

$
0
0

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निगडी आणि भोसरी परिसरात मुलींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या तिघांना सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चार मुलींची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी निगडी आणि भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पायल नितराम चौधरी (वय ३२, रा. गणेशनगर, भोसरी), किरण नवनाथ कुमकर (वय ३६, रा. काळभैरव सोसायटी, निगडी प्राधिकरण) आणि अभिमान माणिक शिंदे (वय ४०, रा. थेरगाव, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पायल ही परराज्यातील मुलींकडून भोसरी परिसरात वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी संदीप होळकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षर राजकुमार वाघचवरे यांच्या पथकाने भोसरी येथील छापा टाकून पायलला ताब्यात घेतले. तिच्या ताब्यात असलेल्या मुलीची सुटका करण्यात आली आहे.

आरोपी किरण साथीदार अभिमान याच्या मदतीने आकुर्डी आणि निगडी परिसरात वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार निगडी येथील किरण हिच्या फ्लॅटवर छापा टाकला. त्यावेळी त्या ठिकाणी तीन मुली आढळून आल्या. पोलिसांनी त्यांचीही सुटका केली आहे. आरोपी किरण आणि अभिमान यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याविरूध्द निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीआरटी २६ जानेवारीपासून?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नगर रोडवरील जलद बस वाहतूक सेवेसाठी (बीआरटी) नागरिकांना महिन्याभराहून अधिक प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. नव्या वर्षात २६ जानेवारीपासून नगर रोड बीआरटी मार्ग प्रवाशांसाठी खुला होईल, असे आयुक्तांनी जाहीर केले.

पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी नगर रोड बीआरटी सेवेचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत नगर रोडवरील प्रलंबित कामे पुढील महिन्याभरात पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच, नगर रोडवरील बीआरटीसाठी वाघोली येथे टर्मिनल उभारण्यासाठी तातडीने नियोजन केले जावे, अशा सूचना देण्यात आल्या.

महापालिका आणि पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) संगमवाडी-विश्रांतवाडी (आळंदी रोड) रस्त्यावर ३० ऑगस्टपासून बीआरटी सेवा सुरू झाली. त्याचवेळी नगर रोडवरही महिन्याभरात बीआरटी सुरू होईल, अशी ग्वाही देण्यात आली होती. आळंदी रोड बीआरटीवर तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या टर्मिनलमुळे होणाऱ्या अडचणींमुळे नगर रोडवर टर्मिनल उभारल्याशिवाय बीआरटी सेवा सुरू करता येणार नाही, अशी ठाम भूमिका पीएमपीने घेतली आहे.

नगर रोडवर टर्मिनलसाठी आवश्यक असणारी मोठी जागा पालिकेच्या ताब्यात नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून त्यावर कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेने दोन बीआरटी मार्ग सुरू केले असून, त्याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे, नगर रोडवरही तातडीने बीआरटी सुरू केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे, वाघोली येथे टर्मिनल उभारण्याच्या दृष्टीने पालिकेतर्फे चाचपणी केली जात आहे. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पीएमपीच्या सीईओ मयुरा शिंदेकर, सह-महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, अधीक्षक अभियंता नामदेव बारापात्रे, वाहतूक विभागाचे निरीक्षक राजकुमार शेरे उपस्थित होते.

अनेक कामे अद्याप अपूर्ण

नगर रोडवरील पर्णकुटी चौक ते खराडी दरम्यानच्या बीआरटी मार्गावर नऊ बसथांबे असून, या बसथांब्याच्या दुरुस्तीचे कामही रखडले आहे. हे काम पुढील महिन्याभरात पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. बसथांब्यांच्या दुरुस्तीनंतर पीएमपीतर्फे आयटीएमएस यंत्रणा बसविण्यात येणार असून, त्यानंतर बीआरटीचा ट्रायल रन घेण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असले, तरी २६ जानेवारीच्या डेडलाइनमध्ये नगर रोड बीआरटी सुरू होणार का, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर अधिकाऱ्याला चार वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भोर तालुक्यातील जोगवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला वैद्यकीय रजेवरून पुन्हा कामावर हजर करून घेण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा हिवताप विभागाच्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता परदेशी यांना चार वर्षे सक्तमजुरी आणि आरोग्य सहायकाला तीन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश एस. जी. गिमेकर यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

या प्रकरणी डॉ. सुजाता परदेशी (वैद्यकीय अधिकारी, जिल्हा हिवताप विभाग) आणि भाऊ पर्वती जाधव (आरोग्य सहायक) या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. या केसचे कामकाज सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी पाहिले.

जोगवडीच्या करंदी खुर्द येथील आरोग्य उपकेंद्रात तक्रारदार हा आरोग्यसेवक पदावर कार्यरत आहे. तक्रारदार हा पाठदुखीमुळे आजारी होता. त्याच्यावर दौंड येथे उपचार करण्यात आले. वैद्यकीय रजेवर असताना पुन्हा कामावर रूजू करून घेण्यासाठी तत्कालीन हिवताप विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता परदेशी यांनी वीस हजार रुपयांची लाच मागितली. लाचेची रक्कम जाधव याच्यामार्फत स्वीकारताना पुणे लाचलुचपत विभागाने दोघांना रंगेहाथ पकडले. या दोघांविरुद्ध येरवडा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांना कोर्टाने लाच घेतल्याप्रकरणी शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हृदय प्रत्यारोपणाचा आंतरराज्य सेतू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्या-मुंबईत हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट ट्रान्सप्लांट) होणे आता नावीन्यपूर्ण गोष्ट राहिलेली नाही. तरीही गुजरातमधील एका हॉस्पिटलमधील 'ब्रेनडेड' पेशंटचे हृदय काढून मुंबईच्या पेशंटला त्याचे ट्रान्सप्लांट करण्याची किमया पुण्यातील हार्ट ट्रान्सप्लांट सर्जनने करून दाखविली. पश्चिम भारतासह गुजरात, महाराष्ट्र या आंतरराज्यातील हे पहिलेच हृदय प्रत्यारोपण ठरले. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये 'हृदयनाते' संबंध निर्माण झाल्याने विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.

सूरत ते मुंबईच्या फोर्टिस हॉस्पिटलपर्यंतचा दोनशे किलोमीटरचा प्रवास ग्रीन कॉरिडॉर आणि चार्टर विमानाच्या मदतीने अवघ्या चाळीस मिनिटांत पूर्ण करण्यात आला. त्यामुळे शनिवारी पहाटेपर्यंत पुण्यातील डॉक्टरांनी मुंबईच्या पेशंटला हार्ट ट्रान्सप्लांट करून जीवदान दिले.

संपूर्ण गुजरात आणि मुंबई झोपेच्या अधीन झाली असताना मुंबईचे फोर्टिस हॉस्पिटल आणि गुजरातच्या सूरतमधील महावीर हॉस्पिटलमधील डॉक्टरांची धावपळ सुरू होती. एका चाळीस वर्षाच्या व्यक्तीचा अपघात झाल्याने तो 'ब्रेनडेड' झाला आणि त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. लिव्हर, किडनी, डोळ्यांसह हृदयाचे दान करण्यात आले. गुजरातमधील हॉस्पिटलच्या प्रत्यारोपण समितीने मुंबईतील प्रत्यारोपण समितीशी संपर्क साधला आणि त्यानंतर सूत्रे हालली.

'फोर्टिस हॉस्पिटलमध्ये एका पेशंटला हार्ट ट्रान्सप्लांट करण्याचा निरोप मिळाला आणि मी पुण्यातून थेट मुंबईचे फोर्टिस हॉस्पिटल गाठले. तर मूळचे पुणेकर आणि सध्या मुंबईत असलेले डॉ. अन्वय मुळे यांनी सूरत गाठले. सूरतमधील चाळीस वर्षांच्या एका व्यक्तीचे हृदय काढून मुंबईत पाठवायचे होते. डॉ. मुळे यांनी सूरतच्या महावीर हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या पेशंटचे हृदय काढण्याचे ऑपरेशन केले. तेथून ते हृदय 'कार्डिओ प्लॅजिक सोल्युशन'मध्ये ठेऊन ग्रीन कॉरिडरच्या माध्यमातून सूरतच्या विमानतळापर्यंत नेले. तेथून डॉ. मुळे यांनी चार्टर विमानाद्वारे रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास मुंबई गाठली,' अशी माहिती जहांगीर हॉस्पिटलचे हार्ट ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. संजीव जाधव यांनी दिली.

सूरतचे महावीर हॉस्पिटल ते विमानतळ आणि तेथून मुंबई, नंतर मुंबई विमानतळ ते फोर्टिस हॉस्पिटलपर्यंतचा प्रवास ग्रीनकॉरिडर, चार्टर विमानाने केला. त्यावेळी फोर्टिस हॉस्पिटलमधील पेशंटचे हृदय काढण्याची प्रक्रिया सुरू होती. दात्याचे हृदय पोहोचताच मुंबईतील पेशंटला त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले.

ऑफिसमधून हॉस्पिटलमध्ये

मुंबईत हार्टसाठी वेंटिगवर असलेल्या पेशंटच्या यादीत अनेकांची नावे होती. परंतु, दाता व्यक्तीचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह असल्याने ५७ वर्षांच्या एका सरकारी कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यालाच हार्ट मिळाले. त्या व्यक्तीला तातडीने फोर्टिस हॉस्पिटलमध्ये बोलविण्यात आले. त्यावेळी ही व्यक्ती स्वतःच्या सरकारी कार्यालयात काम करीत होती.

प. भारतात दोन हार्ट ट्रान्सप्लांट

पुण्या-मुंबईत सोयी सुविधांची कमतरता नाही. त्यामुळे लिव्हर, किडनी, पॅनक्रियाजबरोबर आता हार्ट ट्रान्सप्लांट करण्याची किमया देखील साधली जात आहे. तीन ऑगस्ट रोजी राज्यातील पहिले हार्ट ट्रान्सप्लांट झाले. त्यानंतर त्याच महिन्यात तीन, नोव्हेंबरमध्ये एक आणि डिसेंबर एक असे पाच महिन्यांत पाच हार्ट ट्रान्सप्लांट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डॉ. आंबेडकरांनी राष्ट्रहित समोर ठेवले’

$
0
0

पुणे : 'राज्यघटना समितीवर नसतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना कशी असावी, याचे प्रारूप घटना समितीला दिले होते. त्यानंतर या समितीवर काम करताना त्यांनी तडजोड न करता राष्ट्राचेच हित डोळ्यासमोर ठेवले. कोणताही धर्म, जात न मानता सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवत घटनेचा मसुदा तयार केला,' असे मत डॉ. रावसाहेब कसबे यांनी शनिवारी व्यक्त केले.

सम्यक साहित्य संमेलनात 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेतील भाषणे' या विषयावर संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कसबे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) प्रकल्प संचालक व्ही. जी. रामटेके, संमेलनाचे स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर, माजी आमदार उल्हास पवार, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, डॉ. विजय खरे, दीपक म्हस्के आदी उपस्थित होते.

'राज्यघटनेच्या मसुदा समितीमधील बहुतेक इतर सदस्य भांडवलदार व जमीनदारांचे हस्तक होते. ते समितीच्या बैठकांना उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे बाबासाहेबांनी एकट्यानेच घटनेचा मसुदा तयार केला, म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच घटनेचे शिल्पकार आहेत, असे टी. टी. कृष्णमाचारी यांनी संसदेत स्पष्ट केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राज्यघटना समितीतील शेवटचे भाषण देशाला दिशा देणारे निर्णायक भाषण होते. त्यातून त्यांच्या विद्वत्तेची प्रचिती येते,' असे डॉ. कसबे म्हणाले.

'डॉ. आंबेडकरांचे जातीनिर्मूलनाचे काम महात्मा गांधींनी मनापासून स्वीकारले होते. डॉ. आंबेडकरांच्या हातून घटना लिहिली जावी, असा गांधीजींचा आग्रह होता. महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांचे मित्रत्त्वाचे संबंध होते. त्यांचे ऋणानुबंध दोघांमधील पत्रव्यवहारातून समोर येतात.हा एका कादंबरीचा विषय होऊ शकतो,' असे डॉ. रावसाहेब कसबे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात थंडी परतली; तापमान १४ अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काही दिवसांनंतर शहरात पुन्हा थंडी परतली आहे. किमान तापमान तापमान १४ अंशांपर्यंत खाली उतरल्याने शहरात थंडी जाणवू लागली आहे. ही कडाक्याच्या थंडीची चाहूल असून, आगामी चार दिवसांत तापमानात आणखी घट होऊन किमान तापमान १० अंशांच्याही खाली जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेले दोन-अडीच आठवडे ढगाळ किंवा अंशतः ढगाळ हवामानामुळे शहरातील तापमानात वाढ झाली होती. परिणामी, थंडीने काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र, आता हे ढगाळ हवामान दूर होऊन आकाश निरभ्र झाले आहे. त्यातच उत्तरेकडील राज्यातून थंड व कोरडे वारे राज्याकडे वाहत असल्याने राज्यातील तापमानात घट होऊन हवेतील गारवा वाढू लागला आहे. येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्या व्यतिरिक्त संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. परिणामी, थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शनिवारी पुण्यात ३१.१ अंश सेल्सिअस इतके कमाल, तर १४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदले गेले. राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद विदर्भात गोंदिया येथे (१० अंश सेल्सियस) झाली. पुढील दोन दिवसात विदर्भ वगळता राज्यात अन्य ठिकाणी तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

$
0
0

पुणे : बी. टी. कवडे रोडवरील सीसिलिया बिल्डींगच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून एका ज्येष्ठ व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला. या व्यक्तीने नैराश्यातून ही आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

निर्मल लालचंद मीरपुरी (वय ६१, रा. बी. टी. कवडे रोड) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मल यांची मनस्थिती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. ते नेहमी मित्रांसोबत बाहेर फिरायला जात होते. सीसिलिया बिल्डींगमध्ये मित्राकडे आले आले होते. रात्री साडेसातच्या सुमारास त्यांनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट आढळून आलेली नाही. मात्र, त्यांनी नैराश्यातून ही आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मजबूत साथ हाच खरा सत्कारः पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'लोकांनी दिलेली मजबुतीची साथ हाच माझा खरा सत्कार आहे,' अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती संघटना मुंबईतर्फे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर आणि अशोक पत्की, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नियोजित संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर, ज्येष्ठ नाट्य अभिनेते जयंत सावरकर, भारताचे माजी कसोटीपटू चंदू बोर्डे, ज्येष्ठ लोककलावंत कलाबाई काळे-नगरकर, पिंपरी-चिंचवडचे प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगे, ज्येष्ठ कलाकार लता नार्वेकर, बाळ कर्वे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी सत्कार होत आहेत, असे नमूद करून पवार म्हणाले, 'कधी कधी विचार करतो. कशासाठी हे सत्कार चाललेत? लोकांनी मला कुठे नेऊन ठेवले? आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. परंतु, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मला मजबुतीने दिलेली साथ होय. कर्तृत्त्ववान व्यक्तींना मदत करता आली, हे भाग्य समजतो.'

'देशाची लोकसभा अनेक वर्षे पाहतो. येथे १९८४मध्ये प्रवेशाची पहिली मुहुर्तमेढ पिंपरी-चिंचवडपासून झाली. आजही पुण्याला जात असताना पिंपरी-चिंचवडमधील झालेला बदल उल्लेखनीय वाटतो. त्यामध्ये अण्णासाहेब मगर, प्रा. रामकृष्ण मोरे आणि अजित पवार यांचा मोलाचा वाटा आहे. इतके चांगले काम कदाचित मलाही जमले नसते,' असे पवार म्हणाले.

'अनंत अमुची ध्येयासक्ती' या काव्यपंक्तीप्रमाणे पवार जगले असे हृदयनाथ मंगेशकर म्हणाले. आयपीएल क्रिकेटचे शिल्पकार म्हणून बोर्डे यांनी पवारांचा गौरव केला. 'पाहुनिया चंद्रवदन, मला साहिना मदन' या ओळी म्हणत कलाबाईंनी ठसठशीत स्वरांची झलक व्यक्त केली. तर, शरद पवार यांचे पुस्तक म्हणजे धर्मग्रंथ असल्याचे गवाणकर यांनी नमूद केले. 'साहेब पंतप्रधान होऊ शकले नाहीत, हे आपले आणि देशाचे दुर्दैव आहे,' अशी खंत मोहन जोशी यांनी व्यक्त केली.

सोनियांच्या आठवणीचे आश्चर्य

दिल्लीतील माझ्या सत्काराच्या वेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेल्या कौतुकाचा धागा पकडून शरद पवार म्हणाले, 'माझे सासरे सदू शिंदे लेगस्पीनर होते. त्यांची मुलगी माझी पत्नी. त्यामुळे मी कितीही चांगला बॅटिंग करणारा असलो तरी विकेट जाणारच, हे नक्की आहे. सोनियांजीनी करून दिलेल्या आठवणीचे मलाही आश्चर्य वाटले.'

हास्याचे फवारे

संगीत, नाट्य, कला, क्रीडा, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा हा हृद्य सत्कार सोहळा लक्षात राहिला तो ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितलेल्या स्वतःविषयीच्या आणि सत्कारार्थींविषयीच्या आठवणींमुळे. उपस्थितांना या अष्टपैलू व्यक्तीमत्त्वाकडून शब्दांचे षटकार, हास्याचे फवारे, कलेविषयीचे प्रेम अन् कृतज्ञतेचे संस्मरणीय क्षण अनुभवायस मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुलंमुळे विनोद कळू लागला’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'हसायला कधी लागलो माहीत नाही पण, पुलंच्या पुस्तकांमुळे विनोद कळू लागला. त्यांचा प्रभाव आजही कायम आहे. पुल माझ्या आयुष्याचा एक भाग बनून राहिले आहेत,' अशी भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी शनिवारी व्यक्त केली.

आशय सांस्कृतिक व स्क्वेअर वन इव्हेंट्स मीडियातर्फे आयोजित पुलोत्सव तपपूर्ती सोहळ्यात शनिवारी प्रभावळकर यांना ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते 'पु.ल. स्मृती सन्मान' प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध उद्योजक राजेश गोयल, 'आशय'चे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, स्क्वेअर वनचे नयनीश देशपांडे, मयूर वैद्य आदी या वेळी उपस्थित होते.

प्रसिद्ध निवेदक अरुण नूलकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून प्रभावळकरांचा प्रवास सर्वांसमोर जिवंत झाला. 'चिमणराव या व्यक्तिरेखेने चेहरा, ओळख दिली. प्रायोगिक रंगभूमी ते बालनाट्य असा प्रवास केला. माझ्यावर माझ्यापेक्षा दिग्दर्शकांचा जास्त विश्वास आहे. एका भूमिकेत अडकून पडलो नाही. ठरावीक ओळख पुसण्यासाठी विविध भूमिका केल्या. मुन्नाभाईमधील गांधीजी म्हणून मला प्रेक्षक स्वीकारतील का, अशी शंका होती. पण, लोकांनी ही भूमिका उचलून धरली,' अशी भावना प्रभावळकर यांनी व्यक्त केली.

पु.ल. देशपांडे, मल्लिकार्जून मन्सूर, कुमार गंधर्व, ना.सी. बेंद्रे यांसारख्या मातब्बरांनी समाजाला देण दिली आहे. कलांचा हा माहोल चिरंतन टिकला पाहिजे. समाज सर्व कलांमध्ये समरस होतोय, असे वातावरण निर्माण व्हायला हवे, अशी अपेक्षा परांजपे यांनी व्यक्त केली. उत्तरार्धात ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत काळे, अभिनेते सचिन खेडेकर आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा 'करुणोपनिषदे' हा कार्यक्रम रंगला. सूत्रसंचालन सुप्रिया चित्राव यांनी केले.

डोक्याचे माप कळाले

चिमणरावमुळे पुणेरी पगडीची सवय झाली. त्यामुळे डोक्याचे 'माप' कळाले, असे दिलीप प्रभावळकर यांनी उच्चारताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पगडी डोक्यावर बसेल की नाही, याची चिंता असायची. पुढे चिमणराव व्यक्तिरेखेचा प्रभाव पुसला; पण पगडीचे महत्व आजही कायम आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त करताच पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडीपीचा निर्णय अधिवेशनानंतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या समाविष्ट गावांमधील टेकड्यांवर टाकण्यात आलेल्या जैवविविधता उद्यान (बीडीपी) आरक्षणाच्या मोबदल्यात जागामालकांना अडीचपट टीडीआर देण्याची शिफारस नगर रचना विभागाने केली असून त्यावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. हा निर्णय झाल्यास बीडीपीचा गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागणार आहे.

महापालिकेच्या समाविष्ट गावांमधील ९७६ हेक्टर जमिनीवर बीडीपीच आरक्षण टाकण्यात आले आहे. या आरक्षणावरून महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बराच वादंग झाला. या आरक्षणाला पक्षाच्या एका गटाने विरोध करीत भाजपच्या मदतीने बीडीपी आरक्षणामध्ये दहा टक्के बांधकाम करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेतला. त्यानंतर बीडीपीच्या आरक्षणाबाबत अंतिम निर्णयाचा चेंडू राज्य सरकारकडे गेला. राज्य सरकारने टेकड्यांवर बीडीपी आरक्षणाला मंजुरी दिली. तसेच या टेकड्यांवर मार्च २००५पूर्वी मंजुरी दिलेल्या (कमिटेड डेव्हलपमेंट) बांधकामांना आरक्षणातून वगळले. त्यानंतरची बांधकामे मात्र अनधिकृत ठरविण्यात आली.

बीडीपीच्या आरक्षणाच्या मोबदल्यात संबंधित जमीनमालकांना 'ग्रीन टीडीआर' देण्याचा निर्णय मात्र लांबणीवर टाकण्यात आला आणि हा टीडीआर किती असावा, यासंबंधी नगर विकास विभागाला अहवाल देण्यासंबंधी सूचना करण्यात आली. त्यानुषंगाने नगर रचना संचालकांनी आपला अहवाल तयार करून राज्य सरकारकडे सादर केला आहे. बीडीपी हा झोन नव्हे, तर आरक्षण म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आराखड्यातील उद्यान, पार्किंग अशा अन्य आरक्षणांप्रमाणे याही आरक्षणाचा मोबदला द्यावा, अशी शिफारस नगर रचना संचालकांच्या अहवालात करण्यात आली असल्याचे समजते. ही शिफारस मान्य झाल्यास बीडीपी आरक्षणाच्या जागामालकांना अडीच टीडीआर मिळू शकणार आहे. अडीच टीडीआरची शिफारस करताना केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या भूसंपादन कायद्याचा आधार घेण्यात आल्याचेही समजते. दरम्यान, हा अहवाल अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच निर्णय घेण्यात येणार असल्याचे या सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images