Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कंडक्टर पदासाठी २१ रोजी परीक्षा

$
0
0
एसटीमध्ये भरती करण्यात येणा-या कंडक्टर पदासाठीची लेखी परीक्षा येत्या २१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. १०० गुणांची असणारी ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल.

नव्या तंत्रज्ञानाची सहकारी कारखान्यांना गरज

$
0
0
‘खासगी साखर निर्मिती करणा-या कारखान्यांनी सहकारी साखर कारखान्यांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे भविष्यात सहकारी कारखान्यांनी ज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यांचा योग्य वापर करून उत्पादनात भरीव वाढ करणे आवश्यक आहे,’ असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी (१६ ऑक्टोबर) सांगितले.

पतसंस्थेच्या मॅनेजर आणि एजंटनी केला घोटाळा

$
0
0
खडकीतील श्री अग्रसेन महाराज पतसंस्थेमध्ये या वर्षी अंदाजे दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हा घोटाळा पतसंस्थेचे मॅनेजर आणि पाच ते सहा डेलीकलेक्शन करणारे एजंट यांनी मिळून संगनमताने केला असल्याचा खुलासा पतसंस्थेच्या संचालकमंडळाने प्रथमच केला. या सर्वांवर लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

१३ वर्षाचा मुलगा करतोय PMTचा अभ्यास

$
0
0
वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षीच पीएमटीच्या विविध रुटचा प्रवास तो महिन्याचा पास काढून करतोय. हा प्रवास नुसताच न करता यादरम्यान इतर प्रवाशांसाठी आणि खुद्द पीएमपीलाही उपयुक्त ठरतील, अशा सूचना त्याने पीएमपी प्रशासनाला क‍ळविल्या. एरवी प्रवाशांच्या तक्रारी अन सूचनांना अमलात आणणे म्हणजे तारेवरची कसरत समजणा-या पीएमपीने त्या चक्क मान्यही केल्या.

राज ठाकरे यांचे सपत्नीक दर्शन

$
0
0
मावळात मंगळवारी धार्मिक व पारंपरिक पद्धतीने शारदीय नवरात्रौउत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सपत्नीक कार्ला-वेहरगाव येथील एकविरादेवीचे दर्शन घेतले आहे.

दारूसाठी सोनसाखळी चोरणा-यास अटक

$
0
0
दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे गळ्यातील सोन्याची साखळी चोरणाऱ्यास पोलिसांनी पाठलाग करून पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजरत्न अजबराव कोंगरे (वय २५, रा. वडगाव बुद्रुक) हा सोमवारी (१५ ऑक्टोबर) रात्री साडेअकराच्या सुमारास खराळवाडी येथील अल्फान्सो हॉटेलसमोर त्याच्या मित्राबरोबर पायी चालला होता.

नांदेचा साथीदार लहू सावंत गजाआड

$
0
0
तळजाई पठारावर अनधिकृत इमारत पडून ११ जण ठार झालेच्या घटनेला जबाबदार असणारा लहू उर्फ धिरेंद्र बापू सावंत (वय २९) याला सहकारनगर पोलिसांनी अखेर मंगळवारी अटक केली. तब्बल तीन आठवड्यांहून अधिक काळ पळ काढणाऱ्या सावंतला साता-यातून अटक करण्यात आली आहे. सावंत हा माजी नगरसेवक संजय नांदेचा साथीदार आहे.

बसचालकांना मोबाइल वापरण्यास बंदी

$
0
0
एसटी बसचालवताना अनेकदा ड्रायव्हर मोबाइलवर बोलत असतात, त्यामधून छोटामोठा अपघात घडण्याची शक्यता असते. भविष्यकाळात अशा प्रकारांना कायमस्वरुपी आळा बसावा, म्हणून एसटीच्या ड्रायव्हरना बस चालवताना कंडक्टरकडे मोबाइल जमा करावा लागणार आहे, महामंडळाकडून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

दगड डोक्यात घालून मित्राचा खून

$
0
0
दारू पिताना झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका मजुराने त्याच्या मित्राचा डोक्यात दगड घालून खून केला. नवी सांगवी येथे गणेश घाटाजवळ मंगळवारी (१६ ऑक्टोबर) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नितीन त्रिंबक घुगे (वय ३२, रा. जुनी सांगवी) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. या प्रकरणी सुनील कात्रे (३२ रा. जुनी सांगवी) याच्यावर खुनाचा संशय असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दप्तराने लहान मुलांना पाठदुखी

$
0
0
मानसिक ओझ्याखाली दबलेल्या शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षा दप्तराच्या वजनानेच पाठदुखीसह मानदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याची माहिती तज्ज्ञांच्या निदानातून पुढे आली आहे.

उत्तरेतील दोघे बॉम्ब प्लॅन्टर?

$
0
0
इंडियन मुजाहिदीनचे संशयित दहशतवादी असद खान आणि इम्रान खान यांनी पुण्यात बॉम्बस्फोट करण्यास नकार दिल्याने भटकळ बंधूनी उत्तरेतील दोघा तरुणांना ‘प्लॅन्टर’ म्हणून वापरल्याचे तपासात उघड झाले आहे. स्फोटांपूर्वी एक दिवस दोघेही औरंगाबादला परतल्याचा दावाही त्यांनी तपासादरम्यान केला आहे.

कागझी उभारतोय 'जिहादी फौज'

$
0
0
जर्मन बेकरीसह जंगली महाराज रोडवरील साखळी बॉम्बस्फोट घडवून आणलेला ‘लष्कर-ए-तय्यबा’चा दहशतवादी फैयाज कागझी याने ‘जिहाद फौज’ उभारली असून, मराठवाड्यातील शंभरहून अधिक तरुण त्याच्या संपर्कात आहेत.

सुरेश जैन यांना हजर करा!

$
0
0
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यात आमदार सुरेश जैन यांना हजर करण्याची मागणी अॅड. मिलिंद पवार यांनी कोर्टाला केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. बोस यांच्या कोर्टात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. हजारे यांनी २००३ मध्ये जैन यांच्यावर हा दावा दाखल केला आहे.

कॉलेज बंद करण्याविरोधात एनएसयुआयचे आंदोलन

$
0
0
कोणतीही पूर्वसूचना न देता डीएड कॉलेज बंद करणाऱ्या श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियातर्फे (एनएसयुआय) बुधवारी आंदोलन करण्यात आले. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सोसायटीतर्फे आंदोलकांना देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन पुण्यात

$
0
0
आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची व्यूहरचना आखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय अधिवेशन २० आणि २१ ऑक्टोबर रोजी पुण्यात बालेवाडी स्टेडिअममध्ये होणार आहे.

इतिहास संशोधक सुरेश जोशी निवर्तले

$
0
0
तब्बल चार दशके अहमदनगर येथील ऐतिहासीक वस्तुसंग्रहालयाच्या कार्यकारी विश्वस्तपदाची धुरा सांभाळणारे इतिहास संशोधक सुरेश जोशी यांचे वृध्दापकाळाने पुण्यात निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्यावर नगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

आशा फक्त साहित्यिकांकडूनच

$
0
0
आजच्या काळात संघर्ष तीव्र स्वरुपाचा झाला असून बदलांचा झंझावात समोर आला आहे. नव्या काळात नवी आव्हाने येत आहेत. त्यावर तोडगा काढण्याचे काम साहित्याच्या माध्यामातून होऊ शकेल. राज्यकर्ते, राजकारणी, सरकार यांच्याकडून समाजाला नवीन काही मिळेल, असे दिसत नाही.

पुणे स्फोटप्रकरणी आणखी एक अटक

$
0
0
पुण्यात जंगली महाराज रोडवर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाशी संबंधित 'इंडियन मुजाहिदीन'च्या आणखी एका दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी जयपूर येथून अटक केली आहे. इरफान लंगडे (वय ३०) असे त्याचे नाव असून, तो मूळचा नगरचा आहे.

बेकायदा मजले पाडण्यास सुरुवात

$
0
0
महापालिकेने बेकायदा इमारतींवर हातोडा घातल्यानंतर आता बिल्डरांनी शहरात बांधलेले विनापरवाना मजले तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार बालेवाडीतील १७ मजली इमारतीबरोबरच कोरेगाव पार्क आणि डहाणूकर कॉलनीतील बेकायदा मजले पाडण्यात आले.

स्वाइन फ्लूने गर्भवतीचा मृत्यू

$
0
0
जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथील एका पंचवीस वर्षाच्या गर्भवती महिलेचा स्वाइन फ्लूच्या संसर्गाने केईएम हॉस्पिटलमध्ये सव्वाचार वाजण्याच्या सुमारास बुधवारी मृत्यू झाला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images