Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कोथरूडमध्ये तीन ठिकाणी आग

0
0

चोवीस तासांतील घटना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोथरूड परिसरातील बिग बाजार मॉलमधील तिसऱ्या मजल्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली. फायर ब्रिगेडच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत काही मिनिटांतच आग आटोक्यात आणली. या आगीत गाद्या आणि फर्निचर जळाले असून सुदैवाने कोणताही जीवितहानी झालेली नाही.

मॉलमधील तिसऱ्या मजल्यावर फर्निचर अपार्टमेंट आहे. त्याला मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती तत्काळ फायर ब्रिगेडला दिल्यानंतर जवानांनी अवघ्या २० मिनिटांत आग आटोक्यात आणली. या अपार्टमेंटमधील गाद्या आणि फर्निचरचे साहित्य आगीत जळून खाक झाले. आगीमुळे संपूर्ण मॉलमध्ये धुराचे साम्राज्य पसरले होते. फायर ब्रिगेडच्या जवानांना धुराचा आग विझवताना अडथळा येत होता. शिडीच्या साहाय्याने जवानांनी मॉलचे दरवाजे, खिडक्या उघडले, त्यानंतर धूर कमी झाला. 'खबरदारी म्हणून एरंडवणा, सिंहगड रोड तसेच कात्रज फायरब्रिगेड स्टेशनमधील गाड्या बोलवण्यात आल्या होत्या. फायर ब्रिगेडचे तीन अधिकारी आणि ३५ जवानांनी ही आग आटोक्यात आणली, अशी माहिती कोथरूड फायरब्रिगेडचे फायरमन गजानन पाथरुडकर यांनी दिली.

दुसरी आगीची घटना कोथरूडमध्ये सागर कॉलनीतील एका सोसायटीत बुधवारी पहाटे घडली. या सोसायटीच्या पार्किंगमध्ये वाहनांना आग लागल्याचे कळाल्यानंतर फायर ब्रिगेडने काही वेळात पोहचून आग विझवली. यामध्ये चार दुचाकी आणि एक टेम्पोचे नुकसान झाले; तर तिसरी घटना डावी भुसारी कॉलनीत बुधवारी सायंकाळी घडली. यामध्ये चार नागरिकांचा मृत्यू झाला.

दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृह नेते बंडू केमसे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, नगरसेवक किशोर शिंदे, पुष्पा कनोजिया आदींनी यावेळी घटनास्थळी पाहणी केली.

पत्र्याचे हे शेड अनधिकृत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे याबाबत चौकशी केली जाईल; तसेच नागरी वस्तीमध्ये नियमाप्रमाणे कोणत्या प्रकारच्या कारखान्यांना परवानगी दिली जाते, त्याची माहिती घेऊन नियमांत बदल करण्याची गरज असल्यास त्याबाबत विचार केला जाईल.

- दत्तात्रय धनकवडे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाराजवळच आग लागल्याने होरपळले

0
0

पुणे : डावी भुसारी कॉलनीतील मयुरेश डायनिंग हॉलच्या पाठीमागे असलेल्या शेडमध्ये गादी कारखाना, फॅब्रिकेशन आणि मंगल कार्यालयातील साहित्य होते. या शेडच्या दरवाजाजवळ रॅकच्या वेल्डिंगचे काम सुरू होते. त्यामुळे वेल्डिंगची ठिणगी उडून साहित्यावर गेली आणि आग भडकली. बाहेर पडण्यास एकच रस्ता होता. आग दरवाजाजवळच लागल्यामुळे शेडमधील कामगार आतमध्ये पळाले व आगीत होरपळले, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.

या शेडमध्ये गादी कारखाना, त्याबरोबरच फॅब्रिकेशनचे आणि मंगल कार्यालयातील साहित्य ठेवण्यात आले होते. त्यामुळे आगीने तत्काळ रौद्ररुप धारण केले. तिसऱ्या ते चौथ्या मजल्यापर्यंत आगीच्या ज्वाळा जात होत्या. त्यामुळे शेजारीस हर्षल कॉर्नर सोसायटी रिकामी करण्यात आली. आगीचे स्वरूप एवढे मोठे होते की शेडचे सर्व अँगल गरम होऊन वाकले होते.

आग विझवण्यास मदत करणाऱ्या नरेंद्र पायगुडे या तरुणाने सांगितले, 'सायंकाळच्या सुमारास शेजारी दुचाकी दुरुस्तीसाठी आलो होतो. आग लागल्याचे दिसताच मी स्वतः फायर ब्रिगेडला फोन केला; तसेच मेसमधील काही मुलांसोबत आग विझवण्यास सुरुवात केली. काही व्यक्ती आतमध्ये अडकल्याचे बोलले जात होते. पण, आग विझवताना स्फोट झाल्यामुळे आम्ही सगळे दूर पळाले. आग विझवण्यास कोणीही पुढे झाले नाही. दहा मिनिटांत फायर ब्रिगेडने आग विझवली. शेडच्या शेजारच्या हर्षल कॉर्नर सोसायटीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लोकशाहीर रामजोशी’ पिफमध्ये

0
0

Chintamani.Patki@timesgroup.com

पुणे : 'लोकशाहीर रामजोशी' हा मराठी चित्रपट आजच्या पिढीला कदाचित माहित नसेल, पण 'सुंदरा मनामध्ये भरली' ही लावणी अनेकदा कानावर पडली असेल. आजच्या पिढीच्या काहींच्या तोंडी ही लावणी असते, तर काहींच्या मोबाइल फोनची कॉलर ट्यून. ही प्रसिद्ध लावणी आहे, 'लोकशाहीर रामजोशी' या चित्रपटातील. या ७० वर्षांपूर्वीच्या चित्रपटाच्या रसास्वादाची अनुभूती चित्रपटप्रेमींना येत्या वर्षाच्या सुरुवातीला घेता येणार आहे.

राज्य सरकारचा अधिकृत चित्रपट महोत्सव असलेल्या 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' (पिफ) 'लोकशाहीर रामजोशी' या चित्रपटाचा विशेष खेळ होणार आहे. 'संगीत रंगभूमीवरचे ज्येष्ठ अभिनेते 'गंधर्वभूषण' जयराम शिलेदार यांच्या जन्मशताब्दीला सहा डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. जन्मशताब्दीनिमित्त गंधर्वभूषणांना अनोखी मानवंदना देण्यासाठी त्यांची प्रमुख भूमिका असलेला 'लोकशाहीर रामजोशी' हा चित्रपट 'पिफ'मध्ये दाखविला जाणार असून, हा दुर्मिळ चित्रपट पाहण्याची संधी ज्येष्ठ; तसेच तरुण चित्रपटप्रेमींना मिळणार आहे,' अशी माहिती 'पिफ'चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी 'मटा'ला दिली.

देश स्वतंत्र झाला, त्या वर्षी म्हणजे सन १९४७ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मूळचे सोलापूरचे असलेले 'लोकशाहीर रामजोशी' यांच्या जीवनावरील हा चित्रपट अजरामर कलाकृती बनून राहिला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही. शांताराम व बाबूराव पेंटर यांनी केले होते, तर कथा व संवाद ग. दि. माडगूळकर यांचे होते. रामजोशी यांच्या पदांना वसंत देसाई यांनी संगीत दिले होते. जयराम शिलेदार यांच्यासह हंसा, शकुंतला, परशुराम, सुधा आपटे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

उत्तर पेशवाईत उत्तमोत्तम शाहीर होऊन गेले. त्यापैकी एक शाहीर म्हणजे रामजोशी. या प्रतिभावंत शाहिराचा भरभराटीचा काळ आणि नंतरची परवड व्ही. शांताराम आणि बाबूराव पेंटर यांनी या चित्रपटातून सुंदररीत्या मांडली आहे. स्वातंत्र्यापूर्वीचा हा चित्रपट सर्व आघाड्यांवरील कामगिरीमुळे खिळवून ठेवणारा आहे. त्यामुळे रामजोशी हे यंदाच्या 'पिफ'चे आकर्षण ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडी रेकनरमध्ये ५ टक्के वाढ?

0
0

मुद्रांक विभाग फेरविचार करणार; एक तारखेपासून अंमलबजावणी

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे

बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट असताना नव्या वर्षातील रेडी रेकनरच्या दरात तेरा टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या प्रस्तावावर मुद्रांक व नोंदणी विभागाकडून फेरविचार करण्यात येत आहे. फेरविचाराअंती रेडी रेकनरमध्ये पाच टक्क्यांपर्यंत वाढ करण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

जमीन वा सदनिकांच्या खरेदी-विक्रीचे वार्षिक मूल्यदर (रेडी रेकनर) दर वर्षी डिसेंबर महिन्यात निश्चित केले जातात. या नव्या रेडी रेकनरची अंमलबजावणी एक जानेवारीपासून करण्यात येते. नव्या वर्षातील (२०१६) रेडी रेकनरचे दर निश्चित करण्याचे काम मुद्रांक आणि नोंदणी विभागामार्फत करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारांशी तुलना करून नव्या वर्षात रेडी रेकनरमध्ये सुमारे १३ टक्क्यांपर्यंत वाढ सूचविण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात यासंबंधी झालेल्या बैठकीत मुद्रांक व नोंदणी विभागाने तसे सादरीकरण केले होते.

रेडी रेकनरमधील या भरमसाठ वाढीसंदर्भात 'मटा'ने वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तानंतर रेडी रेकनरच्या वाढीबाबत सार्वसामान्य नागरिक तसेच व्यावसायिकांकडून संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या. उद्योगक्षेत्रामध्ये मंदीचे वारे वाहत असल्याने खरेदी-विक्री व्यवहार कमी झाले आहेत. बांधकाम व्यवसाय तर आर्थिक अडचणीत सापडला आहे. असे असताना रेडी रेकनरमधील मोठी वाढ संयुक्तिक ठरणार नाही, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. बांधकाम व्यवसायिकांच्या 'क्रेडाई' संघटनेनेही या वाढीला विरोध केला. पुण्यातील लोकप्रतिनिधींनीही रेडी रेकनरला विरोध करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे रेडी रेकनरमध्ये यापूर्वी सुचविलेली वाढ पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या निर्णयाप्रत मुद्रांक व नोंदणी विभाग आल्याचे सांगण्यात आले.

शहराच्या काही भागांमध्ये बाजारभावापेक्षा रेडी रेकनरचे दर अधिक असल्याच्या तक्रारी येतात. दर वास्तववादी पद्धतीने ठरविले जात नसल्याने नागरिकांना विनाकारण जादा मुद्रांक शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागतो. रेडी रेकनर ठरविण्याच्या सध्याच्या पद्धतीवर त्यामुळे आक्षेप घेण्यात येत आहेत. रेडी रेकनर ठरविताना महापालिका हद्दीतील एका ठिकाणी झालेला व्यवहार हा लगतच्या जागांनाही लागू केला जातो.

मात्र, तेथील नेमकी परिस्थिती मुद्रांक विभागाकडून तपासली जात नाही. विशिष्ट भागात झालेले खरेदी-विक्री व्यवहार हे लगतच्या सर्वच परिसराला लागू होत नाहीत. त्यामुळे रेडी रेकनर तयार करण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगीचे रौद्ररूप दिसले...

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'खिडकीतून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसल्यानंतर तातडीने खाली उतरण्याचा विचार मनात आला, पण दरवाजा उघडताच जिन्यातही धूर दिसला. त्यामुळे टेरेसवर गेलो. बाहेर गेल्यानंतर आगीचे रौद्ररूप दिसले. त्यामुळे इमारतीच्या अलीकडील बाजूस असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील एका टेरेसवर उतरलो. त्या टेरेसवरून पहिल्या मजल्यावर असलेल्या लोखंडी ग्रीलच्या पत्र्यावर अर्धा ते पाऊण तास थांबलो. नंतर फायर ब्रिगेडच्या जवानांनी शिडी लावून खाली उतरवले...' कोथरूड येथील डावी भुसारी कॉलनीतील शेडला लागलेल्या आगीमुळे शेजारील इमारतीत तिसऱ्या मजल्यावर अडकलेले संजीव पाध्ये 'मटा'ला सांगत होते.

डावी भुसारी कॉलनीतील मयुरेश डायनिंग हॉलपाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास लागलेल्या आगीत चार जण जळून खाक झाले. त्या शेडच्या अगदी शेजारी असलेल्या हर्षल कॉर्नर सहकारी गृहसंस्थेच्या इमारतीलाही या आगीचा फटका बसला. या इमारतीत वरच्या मजल्यांवर फ्लॅट आहेत, तर तळमजल्याला दुकाने आहेत. पाध्ये तिसऱ्या मजल्यावर कुटुंबीयांसह राहतात. बुधवारी सायंकाळी आगीची घटना घडली तेव्हा ते घरात एकटेच होते. पावणेसहा ते सहा वाजण्याच्या सुमारास बाहेर आवाज आल्याने त्यांनी खिडकी उघडून पाहिले, तर समोर मोठ्या प्रमाणावर धूर दिसत होता. अवघ्या काही मिनिटांतच आगीच्या ज्वाळाही वरपर्यंत पोहोचल्या. त्यामुळे पाध्येंनी खिडक्या बंद केल्या. दार उघडून पाहिले, तर जिन्यातही जास्त धूर होता. खिडकीत आगीच्या ज्वाळा व जिन्यात धुराचे साम्राज्य यामुळे आग नेमकी कोठे लागली आहे, याबाबत त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. जीव वाचविण्यासाठी त्यांनी त्यांच्या टेरेसवरून ते दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या टेरेसवर गेले. आणि तेथूनही ते पहिल्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीला असलेल्या लोखंडी ग्रीलच्या पत्र्यावर थांबले. त्यानंतर फायर ब्रिगेडच्या जवानांनी त्यांना शिडी लावून खाली आणले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोथरूडमध्ये अग्निकांड

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डावी भुसारी कॉलनीतील मयुरेश डायनिंग हॉल पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास लागलेल्या आगीत चौघांचा भाजून मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. आगीच्या प्रचंड तीव्रतेमुळे मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले होते. वेल्डिंगच्या कामामुळे ठिणगी पडून आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मयुरेश डायनिंग हॉल या खाणावळीचे मालक मयुरेश ओझा यांच्या मालकीच्या जागेवर एक शेड उभारण्यात आली आहे. या शेडमधील काही भागात गादी कारखाना होता. या शेडमध्ये लेथ मशिन; तसेच लग्न समारंभात लागणारे साहित्यही ठेवण्यात आले आहे. ओझा यांनी ही जागा नारायण गेहलोत या व्यक्तीला गादी कारखाना सुरू करण्यासाठी दिली होती.

महंमद आझाद (वय २२), महंमद एजाज (वय २२, दोघेही रा. बिहार) आणि रवी ठाकूर (वय ३५, रा. मारवाड, राजस्थान) अशी आगीत होरपळलेल्यांची नावे आहेत. चौथ्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी नारायण गेहलोत याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मृत्यूप्रकरणी संबंधितांवर निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल होणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

'छोटासा दरवाजा वगळता संपूर्ण शेड पत्र्याने बंद करण्यात आली होती. शेडचे काम पूर्ण झाले होते, तर काही रॅक तयार करण्यात येत होत्या. हे काम सुरू असताना ठिणगी पडून गाद्यांना आग लागली आणि आगीने रौद्र रूप धारण केले. शेडच्या दरवाज्यातच आग पसरली होती. त्यामुळे आतमध्ये अडकलेल्यांना बाहेर पडता आले नाही. शेड पत्र्यांनी बंदिस्त केल्यामुळे ते आतच अडकले आणि जळून खाक झाले. आगीमुळे लोखंडी अँगल वितळले आहेत,' अशी माहिती पोलिस उपायुक्त तुषार दोशी यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल टॉवरची संख्या अपुरी

0
0

कॉल ड्रॉप समस्येवर कंपन्यांच्या संघटनेचे स्पष्टीकरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मोबाइल फोनधारकांना त्रस्त करणाऱ्या कॉल ड्रॉपच्या समस्येसाठी मोबाइल टॉवर्सची अपुरी संख्या जबाबदार असल्याचे निरीक्षण सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सीओएआय) नोंदवले आहे.
'पुण्यासह सर्वच शहरांत मोबाइलधारकांना कॉल ड्रॉपची समस्या भेडसावत आहे. मोबाइल टॉवर्सची अपुरी संख्या, मोबाइल टॉवर्सच्या उभारणीला नागरिकांचा असलेला विरोध आणि मोबाइलधारकांची वाढती संख्या यामुळे ही समस्या भेडसावत आहे. पुण्यात नेटवर्क सुधारण्यासाठी आणखी ५००-६०० टॉवर्स गरजेचे आहेत,' अशी माहिती 'सीओएआय'चे महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
'भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात 'ट्राय'ने काही महिन्यांपूर्वी पुण्यात मोबाइल नेटवर्कची चाचणी केली होती. त्यामध्ये कँटोन्मेंट बोर्ड, डहाणूकर कॉलनी, मगरपट्टा सिटी, सोपानबाग, रेंजहिल्स आदी भागात कॉल ड्रॉपची समस्या अधिक असल्याचे समोर आले आहे,' असे त्यांनी सांगितले.

'एखाद्या परिसरातील लोकसंख्येची घनता, त्या ठिकाणी असलेला स्पेक्ट्रम आदी बाबींवर त्या ठिकाणी किती टॉवर्स असावेत, हे अवलंबून असते. महाराष्ट्रात एकूण ९१,८५० मोबाइल टॉवर्स आणि ७ कोटी ९० लाख मोबाइल फोनधारक आहेत. पुण्यात सुमारे १९ हजार २९७ मोबाइल टॉवर्स आहेत. आम्ही केलेल्या पाहणीनुसार पुण्यातील मोबाइल फोन नेटवर्क आणखी सुधारण्यासाठी किमान ५०० ते ६०० टॉवर्स उभारण्याची आवश्यकता आहे. दक्षिण मुंबईतील नागरिकांनी त्यांच्या इमारतीवरील टॉवर्स काढल्याने त्या भागात नेटवर्कला विविध समस्या येत आहेत. या भागात घनता जास्त असल्याने किमान १५०० हून अधिक टॉवर्स उभारणे गरजेचे आहे,' असे मॅथ्यूज यांनी नमूद केले.

'नवीन टॉवर्स उभारण्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे आम्ही सरकारशी चर्चा करून सरकारी इमारतींवरच टॉवर्स उभारण्यास सुरुवात केली आहे. दूरसंचार मंत्रालयाने संरक्षण मंत्रालयालाही ठिकठिकाणी मोबाइल टॉवर्स उभारण्याला मान्यता देण्यास सांगितले आहे. दिल्लीमध्ये ल्यूटन्स झोनमधील राष्ट्रपती भवन, संसद भवन, नॉर्थ ब्लॉकमधील संरक्षण विभागाच्या इमारतींवरही टॉवर्स उभारण्यात आले आहेत. पुण्यामध्येही मोठ्या प्रमाणावर लष्करी संस्था असल्याने पुण्यातही लष्करी हद्दीत टॉवर उभारण्याला मान्यता मिळेल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नुकसानभरपाईमुळे तोटा

'कॉल ड्रॉपसाठी मोबाइल कंपन्यांनी ग्राहकांना प्रतिदिन तीन रुपयांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी,' असे आदेश 'ट्राय'ने दिले आहेत. हा नियम एक जानेवारीपासून लागू होणार आहे. या विरोधात 'सीओएआय'ने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. 'कॉल ड्रॉपसाठी मोबाइल टॉवर्सची अपुरी संख्या कारणीभूत आहे. त्यासाठी परवानगी न मिळल्यास त्याला ऑपरेटर जबाबदार नसून, ग्राहकांना नुकसानभरपाई द्यावी लागल्यास कंपन्याना तोटा होईल,' असे मॅथ्यूज म्हणाले.

'टॉवर'वरची कसरत

- एका टॉवरसाठी १३ परवाने आवश्यक - परवान्यासाठी किमान सहा महिन्याचा कालवधी - एक टॉवरवरून एका वेळी अडीच हजार कॉल्सची क्षमता - एका टॉवरचा दोन व कमाल चार कंपन्यांकडून वापर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएफ’ची रक्कम देण्याचे आदेश

0
0

पुणे : कर्मचाऱ्याला भविष्य निर्वाह निधीची रक्कम वेळेत न देणाऱ्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला ग्राहक न्याय मंचाने फटकारले आहे. या कायद्यानुसार बंधनकारक तरतुदींचे पालन कार्यालयाने केले नाही, तसेच तक्रारदाराच्या निधीची रक्कम किती आहे हे ठरविण्यात कार्यालयाने वेळ घालविला, असे निकालात नमूद करून कार्यालयाला मंचाने फटकारले आहे.

तक्रारदाराला भविष्य निर्वाह निधीचे ७२ हजार ९५२ रुपये नऊ टक्के व्याजदराने देण्यात यावेत. तसेच, नुकसानभरपाई म्हणून वीस हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये देण्यात यावेत, असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे. अतिरिक्त पुणे जिल्हा तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षा अंजली देशमुख, सदस्य एस. के. पाचरणे, शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला.

अशितकुमार घोष (रा. विद्यानगर) यांनी या प्रकरणी ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला होता. त्यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाविरुद्ध दावा दाखल केला होता. घोष यांना या प्रकरणात भारतीय मजदूर संघाने मदत केली. घोष यांच्यातर्फे संघाचे उमेश विश्वाद यांनी कामकाज पाहिले.

भविष्य निर्वाह निधीचे सदस्य असलेले घोष हे दौंड तालुक्यातील बॅब ऍग्रो लि. या कंपनीत नोकरी करत होते. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाविष्य निर्वाह निधी मिळण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे अर्ज दाखल केला होता. २००३पासून त्यांनी कार्यालयाकडे रक्कम मिळविण्यासाठी पाठपुरावा केला. संबंधित कंपनीने १९९९पासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अंशदान रक्कम जमा केली नसल्याची माहिती त्यांना समजली.

कंपनीने जेवढी रक्कम जमा केली होती, त्यापैकी काही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने घोष यांना दिली. उर्वरित रक्कम मिळविण्यासाठी घोष यांनी २०१०मध्ये पुन्हा संबंधित कार्यालयाकडे अर्ज दाखल केला होता. तेव्हा त्यांना तेथे उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच, कागदपत्रे हरवली असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी त्यांनी ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोबाइल कंपनीविरुद्ध लढा

0
0

>> राजेश शेंडे

सध्याच्या काळात मोबाइल कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे ग्राहक म्हणून आपण अधिक सजग होणे आवश्यक आहे...

मोबाइल कंपनीकडून होणारा त्रास आणि फसवणूक याकडे अनेकदा आपण किरकोळ बाब म्हणून दुर्लक्ष करतो. मोबाइल कंपनीच्या सेंटरमध्ये वारंवार चकरा मारून तक्रारीचा पाठपुरावा करणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे होणारा त्रास आणि त्यासाठी द्यावा लागणारा वेळ आणि मनस्ताप यामुळे अनेकजण तक्रार करणेच सोडून देतात. ग्राहक म्हणून आपण आपल्या तक्रारीचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. तरच आपली होणारी फसवणूक रोखणे शक्य होईल. एअरटेल कंपनीकडून मी सिमकार्ड घेतले होते. वैयक्तिक आणि व्यावसायिक कामासाठी एअरटेलच्या नंबरचा मी वापर करत होते. मात्र अचानक काही दिवसांनी माझ्या फोनवर मिसकॉल येण्याचे प्रमाण वाढले. याबाबत कंपनीकडे तक्रार केली. मात्र त्याची योग्य दखल घेतली गेली नाही. याप्रकरणी मी ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला होता. सप्टेंबर २००९मध्ये दाखल केलेल्या दाव्याचा नोव्हेंबर २०१५मध्ये निकाल लागला. तब्बल सहा वर्षांनी मी दाखल केलेल्या दाव्याचा निकाल लागला. मोबाइल कंपनीने नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश ग्राहक मंचाने दिला.

पुणे जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य मोहन पाटणकर, क्षितीजा कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. मी सप्टेंबर २००९मध्ये दावा दाखल केला होता. भारती एअरटेल लि. एअरटेल सेल्युलर सर्व्हिस, नोंदणीकृत कार्यालय नवी दिल्ली, सर्कल कार्यालय वेगा सेंटर, शंकरशेठ रोड यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता.

मी एअरटेल कंपनीकडून नोव्हेंबर २००६मध्ये स्वतःच्या कामासाठी आणि व्यवसायासाठी सिमकार्ड घेतले होते. कंपनीने ८०० रुपयांपर्यंतचे क्रेडिट लिमिट दिले होते. १५ एप्रिल २००८ रोजी अचानक मला वेगवेगळ्या नंबर वरून फोन कॉल येऊ लागले. डायलर टोन अॅक्टिव्हेट करा अशा स्वरूपाच्या सूचना येऊ लागल्या. माझ्या फोनचा नंबर वैयक्तिक असताना त्याची प्रसिद्धी कंपनीने केल्यामुळे मला निरनिराळ्या समस्यांना सामोरे जावे लागले.

कंपनीच्या शंकरशेठ रोडवरील कार्यालयात मी याप्रकरणी तक्रार दिली. त्यानंतर २३ एप्रिल २००८पर्यंत तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे डेक्कन पोलिस चौकीत कंपनीविरुद्ध तक्रार केली. २३ एप्रिल २००८ रोजी दुपारी तीनपर्यंत समस्या सोडविली जाईल, असे आश्वासन कंपनीकडून देण्यात आले होते. मात्र त्यांनी दखल घेतली नाही.

प्रसारमाध्यांमाकडेही मी याबाबत तक्रार केली होती. आठ मे २००८ रोजी कंपनीने कोणतीही नोटीस न देता माझ्या मोबाइलची सेवा बंद केली. त्यामुळे मला आर्थिक नुकसान सहन करावे लागले. सुमारे तीन हजार लोकांना बदललेला नंबर त्यांना कळवावा लागला.

व्हिजिटिंग कार्ड आणि इतर स्टेशनरीवर नंबर छापला होता. ती स्टेशनरी आणि व्हिजिटिंग कार्ड वाया गेली. नवीन कार्ड छापण्यासाठी खर्च करावा लागला. त्यामुळे मी ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला होता.

कंपनीतर्फे इंडियन टेलिग्राफ अॅक्ट १८८५च्या कलम सात नुसार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाला तक्रार चालविण्याचे अधिकार नाही, असा बचाव करण्यात आला. मंचाने ३० डिसेंबर २०११ रोजी तक्रार फेटाळली. त्यानंतर मी राज्य ग्राहक आयोगाकडे याप्रकरणी अपील केले होते. टेलिफोन खात्यासंबंधी तक्रार चालविण्याचे अधिकार ग्राहक मंचाला आहेत, असे वरिष्ठ न्यायालयाचे निवाडे दाखल आयोगापुढे दाखल केले. राज्य आयोगाने ही तक्रार जिल्हा ग्राहक मंचाकडे फेरचौकशीसाठी पाठविली. मंचापुढे कंपनीतर्फे कोणी हजर राहिले नाही.

मी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावे यांचा विचार करून तक्रार मंजूर करण्यात आली. ग्राहक मंचाने एसएमएस पाठविण्यासाठी आलेला खर्च १५०० रुपये, त्यांच्या स्टेशनरीच्या झालेल्या नुकसानीपोटी २२ हजार ६२५, नवीन नंबर घ्यावा लागला म्हणून झालेल्या खर्चापोटी ५०० रुपये मागण्यास तक्रारदार पात्र आहे, असा निकाल दिला.

तसेच मानसिक आणि शारिरीक त्रासापोटी दहा हजार देण्यात यावेत असा आदेश दिला. एअरटेल कंपनीने मला ३४,६२५ रुपये सहा आठवड्याच्या आत देण्यात यावेत, असा आदेश दिला.

मोबाइल कंपनीकडून सेवा देताना त्रुटी ठेवण्यात आली होती. कंपनीकडून करण्यात आलेल्या जाहिरातीसाठी माझा नंबर वापरण्यात आला होता. त्यामुळे कंपनीच्या ग्राहकांचे फोन मला येत होते. कंपनीविरुद्ध तक्रार केल्यानंतर माझा मोबाइल नंबरच बंद करण्यात आला होता. मोबाइल कंपन्यांकडून ग्राहकांची विविध प्रकारे फसवणूक केली जाते. त्यामुळे मोबाइल कंपन्यांची सेवा घेताना ग्राहक म्हणून आपण सजग राहिले पाहिजे.

मोबाइल कंपनीकडून येणारी बिले बारकाईने वाचली पाहिजेत. आपण मोबाइल सेवेचा किती वापर केला. त्यासाठी किती पैसे आकारण्यात आले, आपण घेतलेल्या सुविधांसाठी किती चार्ज आकारण्यात आला याची माहिती आपल्याला हवी. त्यामुळे कंपनीकडून होणाऱ्या चुकीचा आपण जाब विचारू शकता. अनेक ग्राहकांना मोबाइल सेंटरच्या वाऱ्या कराव्या लागतात. मात्र त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही असा अनुभव येतो. आपल्याला जी तक्रार करायची आहे ती शक्यतो लेखी स्वरूपात करावी. त्यावर संबंधितांकडून सही आणि शिक्का घ्यावा. लेखी तक्रार केली त्याची कागदपत्रे जपून ठेवावीत. तक्रार अर्जावर शिक्का देणाऱ्याचे पूर्ण नाव नोंदवून घ्यावे. कॉलसेंटरकडे तक्रार करावी. आपल्या तक्रारीचा नंबर काय आहे याची माहिती घ्यावी.

आपण प्रत्यक्ष मोबाइल कंपनीच्या सेंटरमध्ये गेल्यानंतर तेथील कर्मचारी नावापुरते ऐकून घेतो, आश्वासन देतो की दोन दिवसांत समस्या सोडून देतो. मात्र तक्रारीची फारशी काही दखल घेतली जात नाही. त्यामुळे तक्रार करण्यासाठी गेले असता अ​धिकृत व्यक्तीबरोबर बोलण्याचा आग्रह धरा. शक्यतो तक्रार करण्यासाठी कंपनीच्या मुख्य कार्यालयात जावे. त्यांकडून आपल्याला शक्यतो लेखी दिले जात नाही. मात्र आपली तक्रार लेखी द्यावी. सही आणि शिक्का त्याचे नाव घ्यावे. संबंधित मोबाइल कंपनीच्या विरोधात दावा दाखल करायची वेळ आली, तर या कागदपत्रांचा फायदा होतो.

जर केस दाखल करण्याची वेळ आली तर केस दाखल करण्यापूर्वी ट्रायला (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) ई-मेल किंवा पत्र लिहावे त्यामुळे आपली बाजू भक्कम होते. ट्रायकडे गेल्यास त्याचा फायदा होतो. कोर्टाला यासंदर्भात कळविता येत, की हा विषय ट्रायलाही कळविण्यात आला आहे. ग्राहक मंचाकडे दावा दाखल केल्यावर याचा आपल्याला फायदा होतो. तसेच न्याय मिळणे शक्य होते. त्यामुळे ग्राहक म्हणून आपण अधिक सजग होणे आवश्यक आहे.

(लेखक जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, शिरूर

पाबळजवळील फुटाणवाडी आणि फणसेवस्ती येथे दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एका महिलेचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. दरोड्याच्या निषेधार्थ पाबळ ग्रामस्थांनी गुरुवारी गाव बंद आंदोलन करून चोरट्यांच्या अटकेची मागणी केली आहे.

या बाबत पोलिसांनी आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार फुटाणवाडीतील बगाटे आणि फणसे वस्तीतील पिंगळे कुटुंबीयांच्या घरावर बुधवारी रात्री दरोडा पडला. ठकाजी नारायण बगाटे (वय ५५) यांच्या घराची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. बगाटे आणि त्यांच्या पत्नी रखमाबाई ठकाजी बगाटे (वय ५०) यांना मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने रखमाबाई मरण पावल्या. चोरट्यांनी घरातील पेटी आणि इतर साहित्य घेऊन पोबारा केला. बगाटे यांचा मुलगा कंपनीत कामाला असल्याने तो मारहाणीतून बचावला. त्यानंतर चोरटे फणसे वस्तीतील दिनेश अनिल पिंगळे यांच्या घरी गेले. त्यांच्याही घराची कडी उचकटून प्रवेश केला. चोरट्यांच्या मारहाणीत दिनेश (वय ३३), पत्नी वैशाली (वय २५) आणि चार वर्षांचा मुलगा वेदांत गंभीर जखमी झाले. चोरीचा प्रकार घडत असताना पिंगळे यांची भावजय जागी झाली. चोरट्यांनी घरातील सोने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. दिनेश यांचे वडील अनिल पिंगळे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात या ​विषयी फिर्याद दाखल केली आहे. जखमींवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट मान्यता रद्द करण्याची शिफारस

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चुकीच्या पद्धतीने वैयक्तिक मान्यता मिळविणाऱ्या ३२ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता रद्द करण्याची शिफारस पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गुरुवारी शिक्षण आयुक्तांकडे केली. तसेच, या ३२ व्यक्तींनी आतापर्यंत घेतलेल्या पगाराची वसुली लावण्याची परवानगीही आयुक्तांकडे मागितली आहे.

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी मान्यता नसतानाही जिल्हा परिषदेने भरती केल्याची ओरड गेल्या काही काळापासून सुरू होती. या विषयी पुढे आलेल्या तक्रारींचा विचार करत शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी अशा सर्वच प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी हरूण आत्तार यांनी या प्रकरणांची चौकशी करून सुनावणी लावली होती. संबंधित शिक्षक- शिक्षकेतरांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर आत्तार यांनी आपला अहवाल गुरुवारी शिक्षण आयुक्तांकडे सादर केला. त्यामध्ये ३२ शिक्षकांची मान्यता रद्द करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती आत्तार यांनी दिली.

आत्तार म्हणाले, की 'गेल्या तीन महिन्यांपासून या प्रकरणांची चौकशी सुरू होती. एकूण ४१ प्रकरणांपैकी ३२ प्रकरणांची सुनावणी गुरुवारी झाली. या सर्वांच्या मान्यता रद्द करण्याची शिफारस केली आहे. उर्वरीत प्रकरणांचा निर्णय येत्या आठवडाभरात होईल. या सर्व प्रकरणांचा निर्णय आयुक्त घेतील.' सरकारी नियमांनुसार या सर्वांकडून आत्तापर्यंत घेतलेल्या पगारांची वसुली लावली जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमृतमहोत्सव कार्यक्रमाची तयारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कृतज्ञता सोहळ्याची जय्यत तयारी शहर राष्ट्रवादीकडून सुरू आहे. येत्या रविवारी (२० डिसेंबर) रेसकोर्स मैदानावर हा सोहळा होणार आहे.

पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शहर राष्ट्रवादीकडून हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून सुमारे दोन लाख कार्यकर्ते येणार असल्याने या कार्यक्रमाची जोरदार तयारी शहरातील पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकतीच या ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. पक्षाचे शहर कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार यांनी कार्यक्रमाचा स्टेज उभारण्यात येणारी जागा, सुरक्षाव्यवस्था, पार्किंग व्यवस्था याबाबतची सविस्तर माहिती घेऊन काही सूचना केल्या.

१०० ते १२५ व्यक्त‌ी बसू शकतील, असा भव्य स्टेज या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणार आहे. नगरसेवक प्रशांत जगताप, फारुख इनामदार, सुनील बनकर यांच्यासह अन्य पदाधिकारी हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीएमपी’चे दोन मार्ग फायद्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) ३६९ मार्गांपैकी केवळ दोन मार्गच शंभर टक्के फायद्यात चालत असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी एक मार्ग गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असतानाही हा मार्ग शंभर टक्के फायदेशीर असल्याचे 'पीएमपी' प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत खराब असल्याची टीका वारंवार केली जाते. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, चुकीच्या पद्धतीने घेतले जाणारे निर्णय, प्रवाशांची घटती संख्या यामुळे 'पीएमपीएमएल'चा कारभार चव्हाट्यावर आला आहे. बसची संख्या, बस धावत असलेले मार्ग, त्यापैकी फायद्यातील आणि तोट्यातील मार्गांची सविस्तर माहिती नगरसेविका विजया वाडकर यांनी प्रश्नोत्तराद्वारे मुख्य सभेत विचारली होती. त्याला उत्तर देताना 'पीएमपी'ने दिलेल्या आकडेवारीतून केवळ दोन मार्ग शंभर टक्के फायद्यात असल्याची माहिती समोर आली.

शहरात 'पीएमपी'चे ३६९ मार्ग आहेत. त्यापैकी कात्रज-शिवाजीनगर-स्टेशन या मार्गावर पीएमपीला शंभर टक्के उत्पन्न मिळत आहे, तर याच मार्गावर महिलांसाठी सोडण्यात येणाऱ्या बसमधून 'पीएमपी'ला फायदा होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मा‌‌त्र हा मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेला आहे. तोट्यातील तब्बल बारा मार्ग असून त्यामधून चाळीस टक्क्यांपेक्षाही कमी उत्पन्न 'पीएमपी'ला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने विश्रांतवाडी-मनपा भवन, हडपसर-लोणीकाळभोर, घरकुल बस्ती-पिंपळे गुरव, किवळे-आदर्शनगर या काही मार्गांचा समावेश आहे. 'पीएमपी'ने दिलेल्या माहितीनुसार तीन मार्गांवर ३३ टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न मिळत असून ७५ मार्गांवर चाळीस टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न मिळते. 'पीएमपी'च्या ३६९ मार्गांपैकी १६९ मार्गांतून अवघे निम्मे उत्पन्न मिळत असल्याचे समोर आले आहे.

उत्पन्नाचे प्रमाण - मार्ग

१०० टक्क्यांपेक्षा कमी २०

९० टक्क्यांपेक्षा कमी ४३

८० टक्क्यांपेक्षा कमी ७२

७० टक्क्यांपेक्षा कमी ११५

६० टक्क्यांपेक्षा कमी ७५

५० टक्क्यांपेक्षा कमी ३०

४० टक्क्यांपेक्षा कमी १२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अघोषित आणीबाणीला देशात सुरुवात : वागळे

0
0

पुणे : देशात आणीबाणी येईल असे वाटत नाही, मात्र अघोषित आणीबाणीला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी पत्रकार आणि नागरिकांनी एकत्र येऊन लढा द्यावा लागणार असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून वागळे बोलत होते. संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, पुणे श्रमिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोंगडे, संघाचे खजिनदार नितीन पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम दौंडकर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. पत्रकारितेच्या क्षेत्रातील बदलती परिस्थिती, पत्रकारांसमोरील आव्हाने, सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेतील पत्रकारांची भूमिका आदी बाबींवर वागळे यांनी या वेळी उपस्थितांशी संवाद साधला.

या वेळी वेगवेगळ्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, विविध पुरस्कार मिळविणाऱ्या पत्रकारांचाही वागळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अष्टेकर यांनी प्रास्ताविक केले. पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जानेवारीत धावणार नगर रोड ‘बीआरटी’?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नगररोडवरील वाहतूक ‌कोंडी सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या नगररोड बीआरटी मार्गाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जानेवारी महिन्यात या मार्गावरील सर्व अडचणी दूर करून हा मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वतीने केला जाणार आहे.

वाहतुकीची कोंडी सोडविण्याबरोबरच पीएमपीएमएलने प्रवास करणाऱ्यांना कमी वेळेत एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी पोहचता यावे, या साठी महापालिका प्रशासनाने केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून बीआरटी मार्ग उभारले आहेत. नगररोड तसेच संगमवाडी ते विश्रांतवाडी या दोन रस्त्यांवर हे मार्ग उभारण्यात आले आहेत. यापैकी संगमवाडी ते विश्रांतवाडी बीआरटी मार्गाचे उद्घाटन काही महिन्यांपूर्वी करण्यात आले असून, त्यामधून बीआरटीच्या बस धावत आहेत. मात्र नगररोडवरून धावणाऱ्या बस वळण्यासाठी आवश्यक असलेल्या टर्मिनलचे काम रखडल्याने गेल्या काही महिन्यांपासून हा रस्ता तयार असतानाही त्यावरून बीआरटीच्या बस धावत नाहीत. विश्रांतवाडी येथे कायमस्वरूपी टर्मिनल नसल्याने येणाऱ्या अडचणींपासून धडा घेऊन नगर रोडवर टर्मिनलशिवाय बीआरटी सुरू होणार नाही, असा पवित्रा पीएमपीने घेतला होता.

टर्मिनलसाठी खराडी तसेच वाघोली येथील जागांची चाचपणी केली जात असली, तरी तेथे प्रवाशांना आवश्यक सुविधा निर्माण केल्याखेरीज बीआरटी धावणे शक्य नाही, असे स्पष्ट करून महापालिकेने त्यादृष्टीने जागा शोधावी, असे पीएमपीएमएलने कळविले होते. पीएमपी प्रशासनाने कळविलेल्या माहितीनंतर पालिका आयुक्तांसह पालिकेतील प्रमुख अधिकाऱ्यांनी नगररोड बीआरटी मार्गाला भेट देऊन पाहणी करावी. टर्मिनलसाठीची जागा निश्चित करावी, अशा सूचना महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पातून सध्या सर्वच अधिकारी मोकळे झाल्याने गुरुवारी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी नगर रोड बीआरटीची पाहणी केली. टर्मिनलसाठीची जागा अंतिम करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जानेवारी महिन्यात या मार्गाचेही उद्घाटन केले जाणार असल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले. टर्मिनलची जागा मिळत नसल्याने हा मार्ग सुरू झाला नव्हता, मात्र आता यातील सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या असून जानेवारी महिन्यात हा बीआरटी मार्गही खुला केला जाईल, असे धनकवडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नृत्य माझे पहिले प्रेम: आशा काळे

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असले, तरी या क्षेत्रात पदार्पण करताना मी नृत्य कलावंत म्हणून प्रवेश केला आहे. त्यामुळे नृत्य हे माझे पहिले प्रेम आहे,' अशी भावना ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी व्यक्त केली.

पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळातर्फे आशा काळे यांना शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी लावणी कलावंत अप्सरा जळगावकर यांना डॉ. भास्करराव खांडगे पुरस्कार आणि शाहीर बाळासाहेब काळजे यांना बापुसाहेब जिंतीकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर, माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, प्रतिभा शाहू मोडक, मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जयप्रकाश वाघमारे, शहाजीराव पाटील, श्रीधर जिंतीकर, मधुकर शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.

'माझे पहिले प्रेम ज्या नृत्यावर आहे, त्या कलेमध्ये पठ्ठे बापूरांचे योगदान मोठे आहे. मी लहानपणी नृत्य करत असे, शास्त्रीय आणि कथ्थक नृत्यप्रकार लहानपणीच शिकले,' असे सांगून काळे यांनी, 'नाटकात किंवा चित्रपटात भूमिका करेन असे, मला कधी वाटले नव्हते. माझे नृत्य पाहून मला नाटकात आणि चित्रपटात संधी मिळाली. पुढे माझी नृत्यकलाकार म्हणून ओळख कमी होऊन अभिनेत्री अशीच ओळख झाली. मात्र, माझे आजही नृत्यकलेवर प्रेम आहे. नृत्य पाहिल्यावर आजही माझे पाय ठेका धरतात,' अशी भावना व्यक्त केली.

'आशा काळे कलाकार म्हणून मोठ्या आहेतच; त्यापेक्षाही त्या एक माणूस म्हणून मोठ्या आहेत. मैत्री कशी टिकवायची हे मी त्यांच्याकडून शिकले,' असे कांबीकर यांनी सांगितले. यानिमित्ताने आयोजित केलेल्या लावणी महोत्सवात वैशाली वाफळेकर कला केंद्र, ही दौलत महाराष्ट्राची, या रावजी बसा भावजी या संघांनी कला सादर करून रसिकांची मने जिंकली. प्रास्ताविक दीपक वाघमारे यांनी केले, तर सूत्रसंचालन बच्चू पांडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हत्येचा तपास थांबविण्यासाठी धमकी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणारे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) पोलिस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना तपास थांबवण्यासाठी धमकीचा मेसेज आला आहे. तपास नाही थांबवला, तर जीवे मारण्यात येईल, या धमकीबरोबरच २५ लाखांची मागणीही करण्यात आली आहे.

या प्रकरणी घोडके यांनी खडकी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणी, ​अश्लील शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. घोडके यांच्या मोबाइलवर हा मेसेज आला. त्या नंबरच्या आधारे संशयिताचा शोध सुरू करण्यात आला आहे.

घोडके राज्य पोलिस दलातील अधिकारी आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार त्यांना 'सीबीआय'कडे दाभोलकर हत्येच्या तपासासाठी देण्यात आले आहे. खडकी पोलिस ठाण्याच्या आवारात 'सीबीआय'चे ऑफिस आहे. त्यानुसार खडकी पोलिस ठाण्यातच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडके यांना दोन डिसेंबर रोजी पहिला मेसेज आला. त्यावेळी त्यांनी तो फारसा काही गांभिर्याने घेतला नाही. मात्र, पुन्हा नऊ डिसेंबर रोजी त्यांना मेसेज आला. त्यानंतर या घटनेची माहिती 'सीबीआय'मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. सीबीआयमधील वरिष्ठांच्या सूचनेनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संविधान रॅली’तून प्रबोधन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शिक्षण मिळालेच पाहिजे', 'संविधानाचे संरक्षण, अल्पसंख्याकांचे संरक्षण झाले पाहिजे,' अशा मागण्यांचे फलक... संविधान रथ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जागवणारी तरुणाई अशा वातावरणात निघालेल्या 'संविधान रॅली'ने गुरुवारी प्रबोधन केले. निमित्त होते सम्यक साहित्य संमेलनाचे...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्रातर्फे आज, शुक्रवारपासून पाचव्या 'सम्यक साहित्य संमेलना'ला सुरुवात होत आहे. त्या निमित्त महापालिका भवन ते भिडेवाडा दरम्यान संविधान फेरी काढण्यात आली. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यावर फेरीला सुरवात झाली. समारोपप्रसंगी भिडेवाडा येथे सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर; तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, डॉ. विजय खरे, विलास वाघ, प्रकाश पवार, सुनील महाजन, दीपक म्हस्के, धर्मराज निमसरकर आदी या फेरीमध्ये सहभागी झाले होते. भिडेवाडा येथील सावित्रीबाई फुले यांच्या नामफलकाला संमेलनाध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून संविधान फेरीचा समारोप झाला. 'संविधान रॅली'मध्ये महात्मा फुले यांची वेशभूषा केलेले कुमार आहेर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा केलेले गुलाब ओव्हाळ आणि संत गाडगेबाबांच्या वेशभूषेतील संभाजी पालवे यांनी लक्ष वेधून घेतले.

..

चौकट

'साहित्यिकांच्या हत्येबरोबरच मूलतत्त्ववाद्यांकडून लेखकांच्या लेखण्या बंद पाडल्या जात आहेत. देशातील असहिष्णुतेला दीर्घकालीन परंपरा असून, स्त्रियांना ज्ञानाची बंदी करणारा देश सहिष्णू कसा,' असा प्रश्न संमेलनाध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी या प्रसंगी उपस्थित केला. 'एक स्त्री असूनही पंकजा मुंडे यांनी शनी मंदिराच्या चौथऱ्यावरील स्त्री प्रवेशासंबंधी केलेले वक्तव्य योग्य नाही. परंपरावादी असतील, तर त्यांनी साडी नेसून डोक्यावर पदर, नाकात नथ घालून विधानसभेत भाषण करावे. गोपीनाथ मुंडे असते, तर त्यांनी असे वक्तव्य केले नसते,' अशी टीकाही डॉ. कसबे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्यूआर कोड’ देणार जीवदान

0
0

पुणे : अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार सुरू करता येण्यासाठी साह्यभूत ठरेल, अशा 'हेल्थ स्कॅन कार्ड'ची संकल्पना पुण्यातील प्रसाद सेठ या विद्यार्थ्याने मांडली असून, 'क्यूआर कोड'च्या मदतीने प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय माहिती छोट्या कार्डवर साठवता येईल, अशा प्रकारचे सॉफ्टवेअर त्याने विकसित केले आहे.

प्रसाद सेठ पुण्यातील 'विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'मध्ये कम्प्युटर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. आपल्या तंत्रज्ञानविषयक ज्ञानाचा उपयोग समाजाला होण्याच्या दृष्टीने त्याने वेगवेगळी अॅप विकसित केली असून, त्यांना चांगला प्रतिसादही मिळतो आहे. 'हेल्थ स्कॅन कार्ड' हा त्यापैकीच एक प्रयोग. रस्ते अपघातांत २०१४मध्ये देशभरात सुमारे दीड लाख मृत्यू झाले. अपघातांत मृत्यू होत असल्याच्या घटनांच्या बातम्या रोज वाचून प्रसाद अस्वस्थ झाला. त्यातील अनेक मृत्यू वेळेवर उपचार न मिळाल्याने होत असल्याचेही त्याने वाचले. अपघातग्रस्त व्यक्तीला आजूबाजूचे नागरिक तातडीने हॉस्पिटलमध्ये आणतात; पण ती व्यक्ती बेशुद्ध असेल, तर तिला कोणत्या औषधांची अॅलर्जी आहे, कोणता मोठा आजार आहे का, अशी कोणतीच माहिती डॉक्टरांना मिळत नाही.

'अपघातग्रस्त व्यक्तीची वैद्यकीय माहिती डॉक्टरांना तातडीने उपलब्ध झाल्यास उपचारांना लगेच सुरुवात करता येऊ शकते, असा विचार करून, तंत्रज्ञानाच्या साह्याने त्यावर उपाय काढता येईल का, या दृष्टीने मी डोके लढवू लागलो. 'क्यूआर (क्विक रिस्पॉन्स) कोड'च्या साह्याने हे काम होऊ शकते, अशी कल्पना सुचली. त्यानुसार मी काम सुरू केले आणि 'क्यूआर कोड' तयार करण्यासाठीचे सॉफ्टवेअर विकसित केले. हे करताना डॉक्टर शिशिर जोशी यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांच्या सूचनेनुसार काही सुधारणाही केल्या,' असे प्रसादने सांगितले.



या सॉफ्टवेअरमध्ये व्यक्तीचे नाव, पत्ता, जवळच्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक, फॅमिली डॉक्टरची माहिती, व्यक्तीला असलेले आजार, सुरू असलेले औषधोपचार, अॅलर्जी असलेली औषधे, मेडिकल इन्शुरन्स अशी माहिती भरली, की त्याचा 'क्यूआर कोड' तयार करता येतो. हा कोड छोट्या कार्डावर छापून शेजारी त्या व्यक्तीचा फोटो, नाव, ई-मेल, ब्लड ग्रुप, मोबाइल नंबर अशी माहिती लिहिता येते. (प्रयोग म्हणून प्रसादने तयार केलेले स्वतःचे 'हेल्थ स्कॅन कार्ड' शेजारी दिले आहे.) वैधता न संपणारे 'क्यूआर कोड' तयार होतील, असे सॉफ्टवेअर प्रसादने विकसित केले आहे. कोडमधील माहितीत गरजेनुसार बदलही करता येतात.


उपयोग कसा करायचा?
अपघातग्रस्त व्यक्तीच्या खिशात 'हेल्थ स्कॅन कार्ड' असल्यास स्मार्टफोनच्या साह्याने त्यावरील क्यूआर कोड स्कॅन केला, की त्या व्यक्तीची वैद्यकीय माहिती मोबाइलच्या स्क्रीनवर उमटते. त्या माहितीच्या आधारे उपचारांना सुरुवात करता येऊ शकते. नातेवाइकांशी संपर्कही साधता येऊ शकतो. यासाठी स्मार्टफोनमध्ये 'क्यूआर कोड रीडर अॅप' असणे गरजेचे आहे. हे अॅप्लिकेशन मोफत उपलब्ध असते. या स्कॅनिंगसाठी इंटरनेटची आवश्यकता नाही, हे महत्त्वाचे.


किफायतशीर तंत्रज्ञान

मोठी हॉस्पिटल, सामाजिक संस्था किंवा अन्य कोणत्याही यंत्रणेने हे तंत्रज्ञान राबवण्यासाठी पुढाकार घेतला, तर तांत्रिक साह्य किफायतशीर दरांत उपलब्ध करून देण्याची प्रसाद सेठची तयारी आहे. या तंत्रज्ञानाचे पेटंट आणि कॉपीराइटसाठी त्याने अर्ज केला आहे.

असेही उपयोग शक्य

- अंध व्यक्ती, ऑटिस्टिक (स्वमग्न) मुले, वृद्ध व्यक्ती यांच्या खिशात 'हेल्थ स्कॅन कार्ड' असेल, तर आणीबाणीच्या प्रसंगी उपयुक्त ठरू शकते.

- आधार कार्डसारख्या सरकारी यंत्रणेलाही ही यंत्रणा जोडता येऊ शकते.

- गाडीच्या नंबर प्लेटवर, शाळकरी मुलांच्या दप्तरांवर, मोठ्या कंपन्यांच्या एम्प्लॉयी कार्डवर अशा माहितीचे क्यूआर कोड छापता येऊ शकतात.

- मोबाइलच्या स्क्रीनवर हा कोड स्क्रीनसेव्हर म्हणून सेव्ह करता येऊ शकतो.

'ही संकल्पना सर्वच मुलांसाठी उपयुक्त आहे; पण ऑटिस्टिक मुलांसाठी ती नक्कीच खूप उपयुक्त आहे. ५० टक्के ऑटिस्टिक मुले बोलू शकत नाहीत, बोलली तरी त्यात स्पष्टता नसते. अशा वेळी हे कार्ड त्यांच्या खिशात असले, तर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरू शकते. या कल्पनेबद्दल प्रसादचे कौतुक वाटते.'-साधना गोडबोले, प्रसन्न ऑटिझम सेंटर


'एकट्याने प्रवास करणाऱ्या वृद्ध व्यक्ती किंवा मधुमेह, हृदयरोग असे विकार असलेल्या पेशंटना, औषधांची अॅलर्जी असलेल्या व्यक्तींना असे कार्ड सोबत असणे अत्यंत मदतीचे ठरेल.'-डॉ. शिशिर जोशी, फिजिशयन, सह्याद्री हॉस्पिटल


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनजीटी’ने मागवली अतिक्रमणांची माहिती

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ताम्हिणी वन्यजीव संरक्षण विभागाची हद्द कायम करून त्यातील अतिक्रमणांची माहिती देण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) वन विभागाला दिले आहेत. ताम्हिणी वन्यजीव संरक्षण विभागाच्या दहा किलोमीटर परिघात सुरू असलेल्या बांधकामांवर त्यामुळे टांगती तलवार आहे.

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील (इको सेन्सिटिव्ह झोन) असलेल्या ताम्हिणी परिसरात अभयारण्य जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या भागापासून दहा किलोमीटरच्या परिघात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यात येऊ नये, असे आदेश हरित न्यायाधिकरणाने दिले आहेत.

ताम्हिणी घाट परिसर हा जानेवारी २०१३ मध्ये जैवविविधता व पर्यावरण संवेदनशील विभाग म्हणून जाहीर करण्यात आला. या वन्यजीव संरक्षण विभागात येणाऱ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. त्याविरोधात हरित न्यायाधिकरणाने याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवरील सुनावणीमध्ये न्यायाधिकरणाने वन्यजीव संरक्षण विभागाची हद्द निश्चित करण्याची सूचना वन विभागाला केली आहे. तसेच या संरक्षण विभागाच्या दहा किलोमीटरच्या परिघातील अतिक्रमणे व बांधकामांची माहिती मागविली आहे.

ताम्हिणी वन्यजीव संरक्षण विभागामध्ये यशराज डेव्हलपर्स यांनी वनघरे बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र, हा भाग पर्यावरण संवेदनशील विभागात समाविष्ट असल्यामुळे त्यावर बांधकाम करण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असते. तशी परवानगी यशराज डेव्हपर्सने घेतली नसल्याचे हरित न्यायाधिकरणाच्या सुनावणीमध्ये स्पष्ट झाले आहे. या याचिकेमध्ये प्रतिवादी असलेल्या आणखी एका बांधकाम व्यावसायिकाने आपले कोणतेही बांधकाम या वन्यजीव संरक्षण वा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात येत नसल्याचे कळविले आहे. त्या पार्श्वभूमीवर अभयारण्याची हद्द निश्चित करण्याचे आदेश हरित न्यायाधिकरणाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images