Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘बाजीराव-मस्तानी’ बंद पाडण्याचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इतिहासाची मोडतोड करून 'बाजीराव मस्तानी' चित्रपटात श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाची विटंबना केली आहे. 'पिंगा' व 'मल्हारी'या गाण्यांद्वारे चुकीचा इतिहास मांडण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी पेशव्यांचे वंशज आणि इतिहास संशोधकांना दाखवावा, अन्यथा चित्रपटगृहातील खेळ बंद पाडण्यात येतील, असा इशारा थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवारी देण्यात आला.

प्रतिष्ठानतर्फे शनिवारवाडा येथे चित्रपटाची निषेध सभा आयोजिण्यात आली होती. या वेळी या चित्रपटाचे दिर्ग्दशक संजय लीला भन्साळी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून तो जाळण्यात आला. पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवे, महेंद्रसिंह पेशवे, सत्यशील दाभाडे, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे, मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज संदीप पोतनीस, आमदार मेधा कुलकर्णी, अनुराधा सहस्रबुद्धे, देवव्रत बापट, अंकित काणे, विलास तुपे, नगरसेवक मिलिंद काची, मंदार लवाटे, पराग गोखले, सुनील चौधरी, सुनील माने या वेळी उपस्थित होते.

चित्रपटात मस्तानी आणि काशीबाई एका गाण्यावर थिरकत असल्याचे दाखवले आहे. त्या काळातील राज घराण्यातील स्त्रिया अशा प्रकारे नाचणे शक्य नाही. याबरोबरच संपूर्ण चित्रपटात मोठ्या प्रमाणात इतिहासाची आणि संस्कृतीची मोडतोड झालेली असू शकते. त्यामुळे हा चित्रपट इतिहासतज्ज्ञांना दाखवावा आणि त्यांनी सांगितलेल्या सुधारणा कराव्यात, अशी सूचना उदयसिंह पेशवे यांनी केली.

'काशीबाई आणि मस्तानी यांचे एकत्रित नाचणे मराठी जनता सहन करेल, अशा भ्रमात भन्साळींनी राहू नये. बाजीरावांच्या पराक्रमाचा इतिहास बाजूला ठेवून भलताच इतिहास लोकांच्या गळी उतरविण्याचा हा प्रयत्न आहे,' अशी टीका मोघेंनी केली. 'ही इतिहासाच्या अस्मितेची लढाई आहे. श्रद्धास्थानांची विटंबना करण्याच्या प्रथांना वेळीच आळा घातला नाही, तर असे प्रकार अन्य महापुरुषांच्या संदर्भातही होऊ शकतील,' असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 'चित्रपटाची कथा लिहिण्यापूर्वी भन्साळींनी पेशव्यांच्या वंशजांशी संपर्क साधणे गरजेचे होते. काशीबाई आणि मस्तानी एकत्र नाचल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे या चित्रपटाला आमचा विरोध राहणार आहे,' असे महेंद्रसिंह पेशवे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रस्तावांचे घोडे अडले

$
0
0

Chaitanya.Machale@timesgroup.com

पुणे : स्मार्ट सिटी योजनेत सहभागाचे प्रस्ताव सादर करण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक असताना महाराष्ट्रातील दहापैकी पाच शहरांचे प्रस्ताव अद्याप मान्यसुद्धा झालेले नाहीत. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. अखेर उरलेल्या शहरांमध्ये लोकप्रतिनधींची मते बाजूला ठेवून महापालिका आयुक्तांच्या अधिकारात प्रस्ताव पाठविण्याचा सरकारचा इरादा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या स्मार्ट सिटी योजनेच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येत्या मंगळवारपर्यंत (१५ डिसेंबर) राज्य सरकारमार्फत स्मार्ट सिटीमध्ये निवड झालेल्या दहा महापालिकांनी मुख्य सभेची मान्यता घेऊन हे प्रस्ताव पाठविणे गरजेचे होते. मात्र, यापैकी निम्म्या, म्हणजे पाच शहरांनी प्रस्ताव सादर केलेले नाहीत. त्यामध्ये नवी मुंबईने हा प्रस्तावच फेटाळला, तर नाशिकने एसपीव्हीची तरतूद वगळून त्याला अर्धवट मान्यता दिली आहे. अमरावतीने पर्यावरणवादी संघटनांच्या विरोधाने अद्याप प्रस्ताव पाठविलेला नाही. तर, पुणे आणि सोलापूरमधील प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. उरलेल्या नागपूर, मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद शहरांचे प्रस्ताव मान्य झाले, तर कल्याण-डोंबिवलीमध्ये निवडणुकीनंतर सर्वसाधारण सभाच न झाल्याने आयुक्तांच्या अधिकारात प्रस्ताव मान्य झाला आहे. नागपूर महापालिकेनेही स्मार्ट सिटीचा अंतिम आराखडा पाठविला असून त्यामध्ये स्पष्ट माहिती नाही. ठाणे पालिकेने साडेपाच हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. मात्र स्मार्ट सिटीचा उर्वरित निध‌ी कसा उभ करायचा असा प्रश्न आहे.

मुंबई पालिकेचे बजेट ३५ हजार कोटींचे असल्याने केंद्राच्या स्मार्ट सिटीमधून मिळणाऱ्या शंभर कोटी रुपयांनी काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोअर परळ भागाचा विकास करण्यासाठी मुंबई पालिकेने १०६८ कोटींचा आराखडा राज्य सरकारकडे पाठविला आहे. स्मार्ट सिटीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून १००० कोटी रुपये मिळणार असल्याने औरंगाबादने प्रस्ताव पाठविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वळसे-पाटील यांना ह्रदयविकाराचा झटका

$
0
0

मटा प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांना ह्रदयविकाराचा झटका आला. कात्रजमध्ये दूधसंघाच्या कार्यक्रमात ही घटना घडली. यानंतर वळसे-पाटील यांना जवळच असलेल्या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. वळसे-पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय. वळसे-पाटील यांना पुढील उपचारासाठी पुण्यात जहांगिर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. पक्षाचे नेते अजित पवार आणि पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे हे वळसे-पाटील यांच्यासोबत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणीचे मूळ कारण राजकारण

$
0
0

Sunil.Landge@timesgroup.com

पिंपरी : रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी, शिवीगाळ करून धक्काबुक्की, एवढेच नव्हे तर भर क्षेत्रीय सभेतच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती गीता मंचरकर यांना बेदम मारहाण झाली. याविषयी पोलिसांकडे परस्परविरोधी तक्रारी नोंदवण्यात आल्या. याचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न केल्यास राजकारण हेच उत्तर येत असल्याचे स्पष्ट होते.

प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महापालिकेच्या वतीने खराळवाडीतील बालभवन येथे दहा डिसेंबरला क्षेत्रीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी स्थानिक नगरसेविका मंचरकर, कैलास कदम यांच्यासह अमिना पानसरे, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य हमीद शेख उपस्थित होते. या बैठकीचे रूपांतर चक्क आखाड्यात झाले. अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. कदम आणि मंचरकर यांच्या समर्थकांनी एकमेकांविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या. हा वाद मिटवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न झाले. परंतु यश आले नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंकडील आरोपींना पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.

या सभेमध्ये दत्ता इंगळे यांनी प्रश्न विचारला होता, की प्रभाग क्रमांक ४० आणि ४१ परिसरात मोठी बांधकामे चालू आहेत. तेथील धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अपघाताच्या समस्या वाढल्या आहेत. परंतु स्थानिक नगरसेवक त्यांच्या कार्यालयात कमी आणि संबंधित बांधकाम साइटवर जास्त दिसतात. तरीही प्रश्न सुटत नाही. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि नगरसेवक यांच्यात साटेलोटे असण्याची शंका आहे. ते पदाचा दुरुपयोग करत आहेत. या वक्तव्यामुळे वादाला सुरुवात झाली आणि गोंधळ सुरू झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत तर गेलेच, शिवाय सभापती मंचरकर यांना बेदम मारहाण झाली, तीही महिलांकडूनच. त्यामुळे वाद विकोपाला गेला. मंचरकर आणि नगरसेवक कदम बंधूंची ही शोभा मतदारराजाने पाहिली.

वास्तविक फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मंचरकर आणि कदम काँग्रेसच्या तिकिटावर एकाच पॅनेलमधून निवडून आले आहेत. त्या वेळी दोघांमध्ये कमालीचे सख्य होते. परंतु कालांतराने विविध मुद्द्यांवरून त्यांच्यात राजकीय वैर निर्माण झाले. शहर काँग्रेसच्या गटातटाच्या राजकारणात स्थानिक पातळीवर कदम विरुद्ध मंचरकर संघर्ष वाढला. मारहाणीच्या प्रकरणात तर कदम विरोधक एकत्र येऊन त्यांनीही मंचरकर यांना खंबीर साथ दिली. एकमेकांवर कुरघोडी करण्याची प्रत्येक संधी दोघांनीही सोडली नाही. त्यामुळे दोघेही दुखावले आहेत. २०१७मधील निवडणुका एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याचे तूर्तास तरी दिसून येत असल्यामुळे त्याची बीजेही पेरली गेली आहेत, असे म्हटल्यास चुकीचे नाही.

खराळवाडी येथे चव्हाट्यावर आलेला प्रकार हा फक्त नमुना आहे. शहरातील द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीत बहुतांशी ठिकाणी दोन सदस्यांमध्ये पटत नसल्याचे दिसून येते. त्याचे जाहीर प्रदर्शन होत नाही एवढाच फरक आहे. शहरातील ६४ प्रभागांमध्ये अनेक ठिकाणी दोन वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचे पटत नाही. शिवाय गटातटाच्या राजकारणामुळे सम पक्षाच्या नगरसेवकांचे पटत नाही. अशा परिस्थितीत समस्या घेऊन कोणाकडे जावे, हे नागरिकांना समजत नाही. आता तर आगामी निवडणुकांना जेमतेम सव्वा वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे हेवेदावे वाढत आहेत. राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी 'समोरचा नालायक आणि मीच कसा योग्य,' अशी वृत्ती बळावू लागली आहे. शिवाय मतदारांच्या समस्या मीच सोडवू शकतो, हा अहंभाव कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होत आहे. त्यातून असे प्रकार घडणार असतील, तर राजकीय पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांवर वेळीच अंकुश ठेवण्याची गरज आहे. मतदार सुज्ञ आहेत. परंतु त्यापूर्वी मारामारीचे आखाडे निर्माण करून आपण काय आदर्श ठेवणार आहोत, याचे भान राखण्याची गरज आहे.

'लक्ष्य २०१७'चे पेव

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७मधील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून इच्छुकांनी आतापासूनच फ्लेक्सद्वारे (बहुतांशी बेकायदेशीरच) चमकोगिरी करायला प्रारंभ केला आहे. फ्लेक्सवर 'लक्ष्य २०१७' असा उल्लेख करून विद्यमान नगरसेवकांना आव्हान देण्याचा प्रयत्न चालवला आहे. दीपावलीपासून फुटलेले हे पेव ख्रिसमस, नववर्ष, संक्रांतीच्या आणि वाढदिवसाच्या निमित्ताने अधिकच पसरू लागले आहे. त्यातूनही विसंवाद होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार-ट्रक अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

$
0
0

जुन्नर ः कल्याण-मुंबई महामार्गावर पिंपरी पेंढार येथे भरघाव आयशर ट्रक समोरून येणाऱ्या आय ट्वेंटी कारला धडकल्याने कारमधील दोघे जागीच ठार झाले, तर एक जण जखमी झाला. या अपघातानंतर आयशर पलटून त्याला पाठीमागून येणारी इंडिका कार धडकली. त्यात इंडिका चालकही जखमी झाला आहे.

ओतूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिलेल्या माहीतीनुसार, बटाटे भरलेला आयशर ट्रक वेगात चालला होता. त्यावेळी चालकाचा ताबा सुटून तो समोरून येणाऱ्या आय ट्वेंटी कारला (एमएच ०५ बीएल १२२६) धडकला. यामध्ये सिद्दिक सरुद्दीन देवानी (वय ५३, रा. झेंडीगेट, अहमदनगर) आणि नंदलाल सुंदरलाल आहुजा (वय ५२, रा. प्रोफेसर कॉलनी, विनायक पार्क, सावेडी, अहमदनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. या कारमधील श्रीचंद गुलाबभाई हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर आयशर ट्रक उलटला. ट्रकचालक विशाल दिलीप उकीर्डे (वय २४ रा. डिंगोरे, ता. जुन्नर) हा जखमी झाला आहे. अपघातानंतर उलटलेल्या ट्रकला मागून येणारी इंडिका कार धडकली. इंडिकाचा चालकही यात जखमी झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोवीस तासांत तीन सोनसाखळी चोऱ्या

$
0
0

गस्त वाढविण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच आहे. गेल्या २४ तासांत शहरात कर्वेनगर, कोरेगाव पार्क, समर्थ अशा तीन ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये एक लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. त्यामुळे सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना त्यांच्या हद्दीत गस्त वाढविण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत.

कर्वेनगर परिसरातील कृशांती इमारतीसमोरून ८१ वर्षांच्या महिला शुक्रवारी सायंकाळी घरी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि बॅग असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज हिसका मारून चोरून नेला. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव पार्क आणि समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी दोन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. नवीन सर्कीट हाऊस जवळून ४० वर्षांची महिला भाच्यासोबत दुचाकीवर बसून जात होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दहा हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले. याच दरम्यान समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतही एक सोनसाखळीचोरीची घटना घडली.

शहरात सोसयटीमध्ये शिरून अॅक्टिव्हावरील सोनसाखळी चोर चोऱ्या करीत आहेत. त्याचा शोध घेण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. तसेच, शहरात सोनसाखळी चोरीच्या दररोज एक दोन घटना सुरूच आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी सर्व पोलिस ठाण्याच्या प्रमुखांना हद्दीमध्ये पेट्रोलिंग वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. सकाळ-संध्याकाळ स्वतः प्रमुखांनी या पेट्रोलिंगवर लक्ष ठेवावे, असे आदेश दिले आहेत.

सोनसाखळी चोरी करणाऱ्यास अटक

पुणे ः श्रीरामपूर येथून पुण्यात दुचाकीवर येत सोनसाखळी चोऱ्या करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सोनसाखळी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणत दोन लाख २८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

जाकीर ऊर्फ जग्गू युसूफ खान-इराणी (वय २१, रा. इराणी वस्ती, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार कंबर नूरअली इराणी (रा. श्रीरामपूर) याचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलिस कर्मचारी जावेद पठाण यांना खबऱ्याकडून जाकीर हा त्याच्या साथीदारासह पुण्यात येऊन सोनसाखळी चोरीचे गुन्हे करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुनील पवार, फौजदार प्रकाश अवघडे यांच्या पथकाने त्याला श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने खडकी, कोरेगाव पार्क, वानवडी आणि अलंकार या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पाच सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

घरात शिरून मंगळसूत्र चोरणाऱ्यास अटक

पुणे ः कोथरूड येथील मौर्य विहार सोसायटीमध्ये गॅस पाइपचे काम करण्यासाठी आलेल्या कामगाराने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात येऊन ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकाविण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडा-ओरडा केल्यानंतर या कामगाराला नागरिकांनी पकडून कोथरूड पोलिसांच्या ताब्यात दिले.

रबींद्र मनगोबिंदा लंका (वय २९, रा. साईनाथ वसाहत, कोथरूड) असे अटक केलेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी कोथरूड येथील ८२ वर्षांच्या महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड येथील मौर्य विहार सोसायटीमध्ये घराच्या टेरेसवरील गॅस पाइपच्या कामासाठी आोरोपी लंका हा शुक्रवारी दुपारी आला होता. त्याने तक्रादार या घरात एकट्या असल्याचे पाहिले. त्यानंतर पाणी पिण्याचा बहाणा करून गरम पाणी देण्याची मागणी केली.

तक्रारदार या स्वयंपाक घरात पाणी आणण्यासाठी गेल्या असता त्यांच्या पाठीमागे जात त्याने मंगळसूत्र हिसकाविले. तो पळून जाऊ लागला असता महिलेने आरडा-ओरडा केला. त्यावेळी सोसायटीतील नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक (गुन्हे) डी. के. कुलकर्णी हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरकोळ वादातून तरुणाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

हॉटेलमध्ये दारू पीत असताना किरकोळ वादातून मारहाण केली म्हणून दारूच्या नशेत एका रिक्षा चालकाने दोन साथीदारांसह पिस्तुलाने दोघांवर दोन गोळ्या झाडल्या. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी मध्यरात्री दीड वाजता हडपसर-सासवड रोड उरळी देवाची येथील गंगोत्री हॉटेलमध्ये ही घडना घडली.

दत्तात्रय बाळासाहेब आंबेकर (वय ३०, रा. वडकी, ता. हवेली) असे मयत तरुणाचे नाव आहे, तर दादासाहेब बबन मोडक (वय ४० रा. वडकी, ता. हवेली) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी आंबेकरच्या सोबत असलेला विश्वास पुनाजी मोडक (वय ३४, रा. वडकी) याने फिर्याद दिली आहे. गोळीबार करणारा अजय बाबुराव शिंदे (वय ३०, रा. उरळीदेवाची) फरार असून त्याचे इतर दोन साथीदार मुक्तार शेख (वय ३३, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी), नितीन भालेकर (वय २५, रा. उरळीदेवाची) यांना लोणी पोलिसांनी अटक केली आहे.

उरळीदेवाची येथील गंगोत्री हॉटेलमध्ये मयत आंबेकर, दादासाहेब मोडक व विश्वास मोडक हे तिघे शनिवारी रात्री दहा वाजल्यापासून दारू पीत बसले होते. त्यांच्या शेजारी अजय शिंदे, मुक्तार शेख, नितीन भालेकर हे तिघे रिक्षाचालक दारू पीत होते. रात्री दीड वाजता दारू पीत असताना स्टूल दिला नाही म्हणून दोन गटांत हाणामारी झाली.

तेथून अजय व त्याचे दोन साथीदार निघून गेले. काही वेळातच तिथे अजय पिस्तूल घेऊन आला सुरवातीला त्याने दादासाहेब मोडक याच्यावर गोळी झाडली. त्याच वेळेस आंबेकर, अजयच्या अंगावर आला असता अजयने दुसरी गोळी आंबेकरच्या छातीवर झाडली. आंबेकरच्या छातीतून गोळी आरपार झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मोडक यालाही छातीला गोळी लागल्याने त्याला तातडीने हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मोडकच्या छातीतून गोळी काढली असून तो सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषणात ‘एसटी’ची भर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

देशात वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. बारामतीमध्ये 'एसटी' बसच्या काळ्या धुरामुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, या बसवर कारवाई कारवाई कशी करू? आमचेच खाते आहे, असे सरकारी उत्तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नागरिकांना मिळत आहे.

बारामती बस आगारामध्ये ११३ बस असून त्यामध्ये १५ यशवंती बसचा (हिरवी बस) समावेश आहे. बारामती-एमआयडीसी व अन्य ग्रामीण भागासाठी या गाड्यांचा सर्वांधिक वापर होतो. मात्र या गाड्या बारामतीकरांसाठी प्रदूषणाचे दान देत आहेत. या गाड्या पुढे गेल्यास पाठीमागून गाडी आहे का? नाही असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. उपप्रादेशिक कार्यालयाजवळून याच गाड्यांची वाहतूक सुरू असते. मात्र सर्वसामान्यांना कायदा शिकवत कारवाई करणारे खाते, याच बसवर कारवाई करण्याएवजी बघ्याची भूमिका घेत आहेत. नागरिकांनी तक्रार केल्यास, 'आमचेच खाते आहे. कारवाई कशी करू,' असा प्रश्न थेट उपप्रादेशिक अधिकारी अमर पाटील यांनी अनेक वेळा उपस्थित करत कारवाई करण्यास नकार दिला आहे.

खासगी वाहनाचा पीयूसी जास्त असल्यास एक हजार रुपये दंड तत्काळ केला जातो. मात्र, खासगी वाहनांना एक न्याय व 'एसटी' बसला वेगळा न्याय, अशी परिस्थिती बारामती येथील कार्यालयात दिसत आहे. महसूल वाढवण्यासाठी नागरिकांच्या गाड्यावर कारवाई करताना परिवहन अधिकारी मागे पुढे पाहत नाही. मात्र शासकीय, निमशासकीय, गाड्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

'एसटी'च्या संबधित अधिकाऱ्यांना या प्रश्नावर सांगून कंटाळा आला आहे. आता कठोर कारवाई करणार आहे.

- अमर पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिग्नलचा होणार सर्व्हे

$
0
0

शहरातील वाहतुकीच्या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न

Kuldeep.Jadhav@timesgroup.com

पुणे : शहरातील वाहतुकीची बदलती परिस्थिती आणि चौकांत नव्याने निर्माण होणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा पथ विभाग आणि वाहतूक पोलिस विभागाच्यावतीने शहरातील सर्व सिग्नलचा सर्व्हे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सर्व्हेमध्ये आढळणाऱ्या त्रुटींवर उपाययोजना केल्या जाणार आहेत. यामध्ये वाहन नियंत्रक व पादचारी सिग्नल या प्रकारच्या सिग्नलची पाहणी केली जाणार आहे.

शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यापासून नित्याच्या वाहतूक कोंडीपर्यंत समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. शहरातील गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या झपाट्याने वाढली. या वाढलेल्या संख्येमुळे वाहतुकीमध्ये आमूलाग्र बदल झाले. दुचाकी-चारचाकी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यामुळे रस्त्यांवरील कोंडीचे प्रमाणही वाढले. या बदलामुळे सिग्नल यंत्रणेमध्येही काही आवश्यक बदल करण्याची गरज जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने शहरातील सिग्नल यंत्रणेतील त्रुटी शोधण्यासाठी सर्व्हेचा मार्ग स्वीकारला आहे.

महापालिकेचा पथ विभाग व वाहतूक पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये याबाबत बैठकही झाली. पथ विभागाच्या सूचनेनुसार वाहतूक पोलिसांकडून हा सर्व्हे युद्ध पातळीवर केला जात आहे. त्यामध्ये वाहतूक विभागाने विभागनिहाय संबंधित अधिकाऱ्यांना पाहणी करण्यास सांगितले आहे. रस्ते वाहतूक आणि पादचारी सुरक्षिततेच्या दृष्टिने सिग्नलचा खांब हा झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडे असायला हवा. तसे असल्यास वाहन चालकही झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडे वाहने उभी करतील. मात्र, शहरातील अनेक चौकात सिग्नलचे खांब हे झेब्रा क्रॉसिंगच्याही पलिकडे लावलेले असतात; तसेच गेल्या काही वर्षांत वाहनांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे अनेक चौकातील वेळेचे गणित बदलेले आहे. आवश्यकतेनुसार सिग्नलच्या जागेत बदल करण्यासारखे उपाय या सर्व्हेमध्ये शोधले जाणार आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिस शाखेचे निरीक्षक (नियोजन) राजकुमार शेरे यांनी 'मटा'ला दिली. कर्वे रोड, बाजीराव रोड, बंडगार्डन रोड या मार्गांवरील

सिग्नल सिंक्रोनायझेशनचा आढावा घेतला जाणार आहे. या मार्गांवर सिग्नल सिंक्रोनायझेशन करून दोन वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात बाजीराव रोडचा आढावा घेतला जाणार आहे. या रोडवर सिंक्रोनायझेशन असूनही गर्दीच्या वेळेत शनिपार चौक व लिंबराज महाराज चौकात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे हा आढावा घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फर्ग्युसन रस्त्यावरील मोबाइल शॉपी फोडली

$
0
0

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील मोबाइल शॉपी फोडून तीस लाख रुपयांचे १५० मोबाइल चोरीला गेल्याची घटना रविवारी पहाटे घडली. मोबाइल शॉपी फोडणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, शहरात विविध तीन ठिकाणी घरफोडीचे गुन्हे घडल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत धनेश सुरेश वर्मा (वय ४२, रा. निलगिरी अपार्टमेंट, शिवाजी हाउसिंग सोसायटी, सेनापती बापट रस्ता) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्मा यांचे ज्ञानेश्वर पादुका चौकामध्ये सॅमसंग गॅलेक्सी नावाचे मोबाइल दुकान आहे. रविवारी पहाटेच्या पाचच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वळसे-पाटील यांना भोवळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कात्रज दूध संघातर्फे आयोजित कार्यक्रमात मनोगत व्यक्त करत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या 'पेसमेकर'मध्ये बिघाड झाल्याने हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊन भोवळ आली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वळसे-पाटील यांना तातडीने भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथून त्यांना रुबी हॉल क्लिनिकला हलविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुणे जिल्हा दूध संघातर्फे 'कात्रज डेअरी एक्स्पो'चे आयोजन करण्यात आले होते. एक्स्पोच्या उद‍्घाटनाच्या कार्यक्रमात वळसे-पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. उद‍‍्घाटनाच्या कार्यक्रमापूर्वी वळसे-पाटील यांनी कात्रज दूध डेअरीच्या आवारात भरविलेल्या प्रदर्शनाची पाहणी केली होती. त्यानंतर व्यासपीठावर गेल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. मनोगतास सुरुवात केल्यानंतर पाच ते सात मिनिटांनी त्यांना उचकी लागली आणि त्यांनी 'पोडियम'वरील हात झटकले. त्यामुळे त्यांना शॉक बसला, असे कार्यकर्त्यांना वाटले. कार्यकर्त्यांनी व्यासपीठाकडे धाव घेतली आणि त्यांना पाणी पिण्यास दिले. पाणी प्यायल्यावर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली आणि शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन भाषणाची सांगता केली. भाषण संपवून ते त्यांच्या आसनापर्यंत गेले व त्यांना भोवळ आली. त्यानंतर कार्यकर्ते व निकटवर्तीयांची धावाधाव सुरू झाली. त्यानंतर अॅम्ब्युलन्समधून त्यांना भारती हॉस्पिटलला नेण्यात आले. तेव्हा त्यांच्यासोबत अॅम्ब्युलन्समध्ये अजित पवारही होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची विचारपूस केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस निरीक्षकांचा वाद चौकीत

$
0
0

पुणे ः औंध परिसरात शेजारी राहणाऱ्या दोन पोलिस निरीक्षकांचा किरकोळ वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. दाराला लावलेली दुधाची पिशवी मांजराने फोडल्याने सांडलेले दूध शेजारी राहणाऱ्या निरीक्षकाच्या दारात आले. दारात सांडलेले दूध पुसून काढण्यावरून निरीक्षकांचे दुसऱ्या निरीक्षकाच्या बायकोशी कडाक्याचे भांडण झाले. किरकोळ कारणावरून सुरू झालेले भांडण थेट पोलिस चौकीपर्यंत पोहोचले. त्यामुळे हे कसे मिटवायचे, यावरून गोंधळ निर्माण झाला. शेवटी पोलिस निरीक्षकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

औंधमधील गायकवाडनगर येथील लक्ष्मी रेसिडेन्सी येथे पुणे ग्रामीणमध्ये पोलिस निरीक्षक आणि नागपूर येथे बदली झालेले निरीक्षक शेजारी राहतात. रविवारी सकाळी नागपूरच्या पोलिस निरीक्षकाच्या फ्लॅटला लावलेली दुधाची पिशवी मांजराने फोडली. त्यामुळे दुधाचे ओघळ पुणे ग्रामीणच्या निरीक्षकाच्या दारापुढे आले. यावरून दोन्ही निरीक्षकांच्या बायकांमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली. त्यानंतर नागपूरच्या निरीक्षकाच्या पत्नीने थेट औंध पोलिस चौकी गाठली. पोलिस अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची भांडणे थेट पोलिस चौकीमध्ये आल्याने पोलिस ठाण्यामध्ये गोंधळ उडाला. शेवटी दोघांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरूण सावंत यांनीही या घटनेला दुजोरा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मला वकील व्हायचे आहे...

$
0
0

रोहिणी सांगवीकरची जिद्द

Chintamani.Patki@timesgroup.com

पुणे : परीक्षा जवळ आली की सामान्यपणे विद्यार्थ्यांची कृती अभ्यास करणे हीच असते. या सर्वात 'ती' मात्र कुठेच नाही. परीक्षेच्या काळात जगण्याची लढाई तर ती लढतेच आहे आणि कलेची परंपराही वाहते आहे. स्वत:ची संगीत पार्टी चालवते. तिला पदवी घेऊन वकील व्हायचे आहे.

रोहिणी सांगवीकर तिचे नाव. श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी हे तिचे गाव. रोहिणी सध्या बीएच्या पहिल्या वर्षाला असून परीक्षा सुरू होत असताना नुकतीच तिने पुण्यात आपली लावणी कला पेश केली. यानिमित्त तिने 'मटा'शी संवाद साधत आपला जीवनपट उलगडला.

रोहिणीला बारावीत ८५, तर दहावीत ६५ टक्के गुण मिळाले आहेत. नगर जिल्ह्यातील रुइछत्तीशी येथे मराठा विद्यामंदिरमध्ये ती बीएचे शिक्षण घेत आहे. दहाव्या वर्षापासून ती लावणीचे धडे गिरवते. विशेष म्हणजे ऎन विशीच्या आत तिच्या नावाने संगीत पार्टी असून, ही कला सांभाळत वकील व्हायचे आहे, असा ध्यास ती व्यक्त करते.

नगर परिसरात पूर्वी हिरा-मीरा-कल्पना सांगवीकर या नावाने संगीत पार्टी प्रसिद्ध होती. यातील मीरा यांची रोहिणी ही मुलगी. त्यांचाच वारसा रोहिणी पुढे चालवत असून, कल्पना-रोहिणी सांगवीकर या नावाने ती संगीत पार्टी चालवत आहे.

सात वर्षांपासून लावणीचे धडे गिरवत असून, मावशीच्या साह्याने ही कला जोपासत आहे. अकलूजनंतर बालगंधर्व रंगमंदिरात कला सादर करायला मिळणे हे खूप मोठे यश वाटते. आमची पार्टी पारंपरिक लावणी जपते. पारंपरिक कला सादर करते. बैठकीची लावणी, मुजरा, गवळण, छक्कड असे पारंपरिक प्रकार आम्ही जोपासले आहेत, असे ती अभिमानाने सांगते.

बीएची पदवी पूर्ण करून पुढे एलएलबीचे शिक्षण घ्यायचे आहे. वकील व्हायचे आहे. त्याचवेळी ही कलाही जोपासायची आहे, असा ध्यास व्यक्त करत मनासारखे उत्पन्न मिळत नसले तरी आम्ही ही कला जिवंत ठेवली आहे. पैसे कमी मिळतात, पण कलेचे सुख आहे. वाईट अनुभव येत नाहीत, यातच सारे समाधान आहे.

- रोहिणी सांगवीकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दस्त ‘डिजिलॉकर’मध्ये

$
0
0

Sujit.Tambade@timesgroup.com

पुणे : नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडे नोंदवलेले दस्त 'डिजिटल लॉकर'मध्ये ठेवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आगामी २०१६ या वर्षापासून सुरू होणार आहे. त्यामुळे ओळखीचा पुरावा किंवा कोणत्याही व्हेरिफिकेशनसाठी नागरिकांना जमीन किंवा फ्लॅटच्या दस्त नोंदीच्या झेरॉक्स किंवा मूळ कागदपत्रे द्यावी लागणार नसून, 'डिजिटल लॉकर्स'द्वारे तपासणी होऊ शकणार आहे. हा प्रकल्प सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

पासपोर्ट, पॅन कार्ड यांसह शैक्षणिक कामकाज, नोकरी आदींशी संबंधित कागदपत्रे नागरिकांना त्यांची ओळख पटवण्यासाठी ​अनेक ठिकाणी द्यावी लागतात. ही मूळ कागदपत्रे आणि त्याच्या छायांकित प्रतीही द्याव्या लागतात; मात्र नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडे नोंदवलेले दस्त 'डिजिटल लॉकर'मध्ये टाकल्यानंतर मूळ कागदपत्रे न दाखवता 'युनिफॉर्म रिसोर्स आयडेंटिफिकेशन' नंबर देण्याची व्यवस्था असणार आहे. त्यावरून संबंधित सरकारी कार्यालयांना नागरिकांची कागदपत्रे पाहता येणार आहेत. हा प्रकल्प सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार असल्याचे राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक एन. रामास्वामी यांनी 'मटा'ला सां​गितले.

'एनआयआयटी' या कंपनीच्या सहकार्याने हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतीच कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात आली. सध्या या प्रकल्पाची चाचणी घेण्याचे काम सुरू असून, डिसेंबरअखेर ते पूर्ण होईल. ूजानेवारी २०१६पासून या प्रकल्पाला सुरुवात होऊ शकेल, असे रामास्वामी यांनी स्पष्ट केले.

देशातील प्रत्येक नागरिकाला डिजिटल लॉकर मिळू शकणार आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांना नागरिकांची कागदपत्रे पाहता येणार आहेत. या व्यवस्थेमुळे नागरिकांना कागदपत्रे जवळ बाळगण्याची किंवा प्रत्यक्ष सादर करण्याची आवश्यकता नाही. अनेक ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून नोंदणी आणि मुद्रांक विभागात नोंदवण्यात आलेले दस्त सादर केले जातात, असेही रामास्वामी यांनी नमूद केले.

डिजिटल लॉकरसाठी काय करावे लागेल?

'डिजिटल लॉकर' मिळण्यासाठी https://digitallocker.gov.in या वेबसाइटवर नागरिकांना नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक असणे अत्यावश्यक आहे. माहिती भरल्यानंतर 'ओटीपी' (वन टाइम पासवर्ड) वापरून लॉगिन करता येणार आहे. मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करण्यात आलेला नसल्यास थंब पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. त्याद्वारे युजर नेम आणि पासवर्ड मिळू शकणार आहे. त्यानंतर स्कॅन केलेली कागदपत्रे डिजिटल लॉकरमध्ये ठेवता येणार आहेत. कागदपत्रे स्कॅन करून लॉकरमध्ये ठेवल्यानंतर एक लिंक मिळेल. संबंधित लिंक त्या विभागाला पाठवल्यास नागरिकांचे व्हेरिफिकेशन ​किंवा कागदपत्रे पाहता येण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वळसेंसाठी केला ‘ग्रीन कॉरिडॉर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांना उपचारांसाठी भारती हॉस्पिटलमधून रुबी हॉल क्लिनिकला हलविण्याचा निर्णय झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या दोन्ही हॉस्पिटलमधील अंतर कमीतकमी वेळेत पार करण्यासाठी वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांनी नियोजन करून भारती हॉस्पिटल ते रुबी हॉल क्लिनिक मार्गावर 'ग्रीन कॉरिडॉर' तयार केला. त्यामुळे हे १० किलोमीटरचे अंतर १४ मिनिट १४ सेकंदात पार करण्यात आले.

दिलीप वळसे-पाटील यांच्या पेसमेकरमध्ये बिघाड होऊन त्यांना भोवळ आल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकाऱ्यांनी भारती हॉस्पिटलमध्ये भरती केल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षास दीड वाजता मिळाली. त्यांना पुढील उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिकला हलविण्यात येणार असल्यामुळे कमीत कमी वेळेत दहा किमीचा प्रवास करण्याचे आव्हान होते. वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांच्या सूचनेने संबंधित मार्गावर ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. प्रत्येक चौकात वाहतूक कर्मचारी आणि अधिकारी हजर होते. नियंत्रण कक्षातून त्यांना सूचना देण्यात येत होत्या. वळसे-पाटील यांना घेऊन निघालेली अॅम्ब्युलन्स सातारा रोड, मार्केटयार्ड, नेहरू रोड, समर्थ पोलिस स्टेशन, पोलिस आयुक्तालय, साधू वासवानी चौक आणि रूबी हॉल क्लिनिक या मार्गे गेली. तीन वाजून १० मिनिटांनी निघालेली अॅम्ब्युलन्स दुपारी तीन वाजून २४ मिनिट १४ सेकंदात पोचल्याचे आवाड यांनी सांगितले. अॅम्ब्युलन्ससोबत 'एस्कॉर्ट' पुरविण्यात आला होता.

दिलीप वळसे पाटील यांचे यापूर्वी ऑपरेशन करण्यात आले, तेव्हा त्यांच्या हृदयात 'पेसमेकर' बसविण्यात आले आहे. पेसमेकर हे हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यास मदत करते. आज, कार्यक्रमादरम्यान हृदयाचे ठोके कमी-जास्त झाल्याने वळसे-पाटील यांना हा त्रास झाला. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना पुढील ४८ तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे, असे रूबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक संजय पठारे यांनी स्पष्ट केले. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी रुबी हॉल क्लिनीकमध्ये जाऊन दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिका आयुक्त लक्ष्य?

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीत पुण्याचा समावेश व्हावा, यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी होणार आहे. या बैठकीमध्ये हा प्रस्ताव विविध उपसूचनांसह मंजूर होणार अशी चिन्हे दिसत असली, तरीही महापालिका आयुक्त कुणाल कुमार उद्याच्या बैठकीत सर्वच पक्षांचे टीकेचे लक्ष्य राहणार हेही आज स्पष्ट झाले. आतापर्यंत काहीसा बॅकफूटवर असलेला राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षही आक्रमक झाला असून, महापालिका आयुक्तांवर शरसंधान करण्याचे धोरण हा पक्ष घेणार हे निश्चित झाले आहे.

गेल्या आठवड्यात या बाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने चार जानेवारीपर्यंत पुढे ढकलला होता. मात्र, या योजनेत सहभागी होण्यासाठी पंधरा डिसेंबरपर्यंत हा प्रस्ताव पाठविणे आवश्यक असल्याने कुणाल कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले होते. मुख्यमंत्र्यांनीही त्याची दखल घेऊन 'नगरविकास सचिवांच्या माध्यमातून पालिकेने १४ डिसेंबरला विशेष सर्वसाधारण सभा घेऊन या बाबतचा निश्चित निर्णय घ्यावा,' असे आदेश दिले होते. या सगळ्यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष काही माध्यमांच्या टीकेचे लक्ष्य ठरला होता. या पक्षाच्या शहराध्यक्षा आणि खासदार वंदना चव्हाण पॅरिस परिषदेवरून शनिवारी परतल्या. रविवारी त्यांनी सर्व नगरसेवकांशी संवाद साधून महापालिका आयुक्तांच्या प्रस्तावातील अनेक विसंगती पुढे आणल्या. 'आम्ही अभ्यासासाठी वेळ मागितला नसता, तर या विसंगती अशाच राहिल्या असत्या. त्यामुळे आमची भूमिका शहराच्या हिताचीच होती,' असा दावा आज त्यांनी केला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांना व पदाधिकाऱ्यांना एक निश्चित दिशा मिळाली आहे.

सत्तेतील दुसरा भागीदार असलेल्या कॉँग्रेसने या प्रस्तावातील अनेक बाबींना असलेला आपला विरोध या पूर्वीच जाहीर केला आहे. स्मार्ट सिटी योजनेला विरोध नसला, तरीही आयुक्त मागत असलेल्या 'स्पेशल पर्पज व्हेइकल'ला मात्र कॉँग्रेस विरोध करणार आहे. या पक्षाच्या वतीने उद्या सभागृहामध्ये उपसूचना मांडण्यात येणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रस्तावाला पूर्ण विरोध करण्याचे ठरविले आहे.

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचे सूतोवाच केले होते. त्यामध्ये भाजप आपल्या भूमिकेवर ठाम आहे. शिवसेनेने मात्र आपली बांधिलकी पुण्याशी असून, पुण्याच्या हिताचा निर्णय घेणार असल्याची भूमिका घेतली आहे. साहजिकच शिवसेनेची उद्याची सभागृहातील भूमिका निर्णायक ठरणार आहे. शिवसेनेने या प्रस्तावाच्या विरोधात भूमिका घेतली, तर कॉँग्रेस, मनसे आणि शिवसेना मिळून सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप यांच्या नाकी नऊ आणू शकतात.

नायक कोण आणि खलनायक कोण?

स्मार्ट सिटी योजनेतून शहरामध्ये फारशी विकासकामे होणार नसल्याचे सगळेच राजकीय पक्ष मान्य करीत आहेत; पण त्याला विरोध केला, तर जनभावनेच्या क्षोभाला सामोरे जावे लागण्याची भीती सगळ्यांनाच वाटते आहे. त्यामुळे उपसूचना देऊन प्रस्ताव मंजूर करण्याची योजना राष्ट्रवादी कॉँग्रेसने आखली आहे. या उपसूचनांसह प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेला, तर तो मंजूर होणार नाही. मुख्यमंत्री हस्तक्षेप करून आयुक्तांचा प्रस्तावच केंद्राकडे पाठवू शकतात; पण पुन्हा एकदा सर्वसाधारण सभेचा निर्णय डावलण्याचा धोका ते पत्करणार का हाच प्रश्न आहे! त्या उलट राष्ट्रवादी कॉँग्रेसने स्मार्ट सिटी होऊन दिली नाही, असे सांगून येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अधिक पुणेकरांचा पाठिंबा मिळविण्याची भाजपची योजना असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची पुण्यात आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या एका तरुणीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. तपस्या भास्कर असे या तरुणीचे नाव असून ती मूळची राजस्थानमधील जयपूरची रहिवाशी आहे. ती सध्या पुण्यातील जगताप डेअरी येथील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहात होती.

पुण्यातील एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या तपस्या भास्कर ही हिरमेश नांदगुडे यांच्या जगताप डेअरी येथील फ्लॅटमध्ये भाड्याने राहात होती. शुक्रवारपासून तिच्या फ्लॅटचा दरवाजा बंद होता. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास नांदगुडे घराचे भाडे घेण्यासाठी तपस्या भास्कर हिच्याकडे गेले असता तिने बराचवेळानंतरही दरवाजा उघडला नाही. दरवाजा उघडण्याला काहीच प्रतिसाद मिळत नाही आणि घराच्या आतून दुर्गंधी येत असल्याने नांदगुडे यांनी तात्काळ याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा उघडला असता आतमध्ये तपस्या मृत अवस्थेत आढळली. तिच्या नाकातून व तोंडातून रक्त येत असल्याने तिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच तपस्या भास्कर हिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ठ होईल, असे पोलिसांनी सांगितले. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात महिलेवर घरात घुसून गोळीबार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात आज सकाळी एका महिलेवर अज्ञात व्यक्तीने घरात घुसून गोळीबार केल्याची घटना घडली. गोळीबारात महिला जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजश्री बेगडे (वय २५) असे या गोळीबारात जखमी झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

राजश्री हिचा पती सकाळी आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेला असताना, अज्ञात व्यक्ती घरात घुसला आणि त्याने घरात असलेल्या राजश्रीवर बंदूकीतून गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी राजश्रीच्या दंडाला चाटून गेली. आवाज ऐकून बाहेर आलेल्या पतीला पत्नी जखमी अवस्थेत दिसली. पतीने तात्काळ जखमी झालेल्या राजश्रीला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. राजश्रीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टराने दिली. कोंढवा पोलिसाने घटनास्थळी धाव घेऊन याप्रकरणाची चौकशी सुरू केली. महिलेवर कोणी व का? गोळीबार केला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनकवींचा प्रवास पुस्तकात

$
0
0


लेखक मधू पोतदार उलगडणार 'जनकवी पी. सावळाराम' यांचे चरित्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देव जरी मज कधी भेटला,' 'घट डोईवर घट कमरेवर,' 'जिथे सागरा धरणी मिळते' अशा अजरामर गीतरचना करणारे प्रतिभावान गीतकार पी. सावळाराम तथा निवृत्तीनाथ रावजी पाटील यांचा काव्यप्रवास चरित्रात्मक पुस्तकातून रसिकांपुढे येणार आहे. लेखक मधू पोतदार यांनी 'जनकवी पी. सावळाराम' हे चरित्र लिहिले असून, सावळाराम यांच्यावरील हे पहिलेच पुस्तक ठरणार आहे.

उद्वेली प्रकाशनातर्फे २० डिसेंबर रोजी ठाणे येथे या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मूळच्या येडेनिपाणी येथील सावळारामांचे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण झाले. त्यानंतर १९४४ मध्ये ते ठाणे येथे स्थायिक झाले. भावगीते मराठीत रुजवण्यात ग. दि. माडगूळकर, शांता शेळके यांच्यासह सावळाराम यांचेही नाव घेतले जाते. मराठी गीतांना सुवर्णकाळ आणण्यात त्यांचाही मोठा वाटा होता. १९९७मध्ये त्यांचे निधन झाले. साध्या सोप्या रचनांमुळे सावळाराम यांना कुसुमाग्रजांनी 'जनकवी' ही उपाधी बहाल केली होती. सावळारामांची अनेक गीते रसिकांच्या ओठावर असूनही ते काहीसे दुर्लक्षित राहिले. २०१४मध्ये सावळाराम यांची जन्मशताब्दी होती. मात्र, सावळाराम यांची सरकारदरबारी दखल घेण्यात आली नाही. चित्रपट, कवितेच्या अभ्यासकांसाठी महत्त्वाचा दस्तावेज ठरणाऱ्या या पुस्तकाविषयी लेखक मधू पोतदार यांनी 'मटा'ला माहिती दिली. 'अनेक दर्जेदार गीतरचना केलेल्या सावळाराम यांच्याबद्दल मराठी साहित्यात फारसे काही उपलब्ध नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी हे चरित्र लिहिण्याचे ठरवले. गेली दोन वर्षे संशोधन आणि लेखनाचे काम सुरू होते. सावळारामांच्या गावी, शाळा, कॉलेज, मित्रमंडळी, नातेवाइक यांच्याकडून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू मिळवले. त्यातून हे पुस्तक साकारले. सावळाराम यांचे व्यक्तिगत जीवन आणि काव्यप्रवासाचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे,' असे पोतदार यांनी सांगितले. पोतदार यांनी यापूर्वी गदिमा, वसंत प्रभू, वसंत देसाई आदींची चरित्रे लिहिली आहेत.

रेल्वे स्टेशनवर 'गंगा जमुना'

सावळाराम यांचे 'गंगा जमुना डोळ्यात उभ्या का' हे गाणे विशेष गाजले. इतक्या वर्षांनंतरही हे गाणे प्रत्येक विवाह सोहळ्याचा अविभाज्य भाग आहे. मात्र, हे गाणे सावळाराम यांनी पुणे स्टेशनवर लिहिले होते, अशी रंजक माहिती पोतदार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेळ कमी पडल्याने डॉ. प्रभा अत्रे नाराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वार : रविवार... ठिकाण : रमणबाग प्रशालेच्या मैदानावर सुरू असलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव... वेळ : रात्री बारा... किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे रंगलेले गायन... त्याच वेळी ध्वनिक्षेपकाची वेळमर्यादा उलटल्यामुळे आयोजकांची चलबिचल सुरू होते. 'गायन कसे थांबवायचे,' या विवंचनेत आयोजक असतात. खाणाखुणा करून, 'वेळ संपली, मैफल थांबवा,' असे सांगण्यात येते. मात्र, त्यानंतर खऱ्या 'रागा'ला सुरुवात होते.
'नेहमी असेच होते. शेवटची १५ मिनिटे मिळतात. आता दोनच मिनिटे गाते; पण पुढच्या वर्षी किमान एक तास मिळणार असेल, तरच गायला येईन,' अशी भूमिका डॉ. अत्रे भरमंडपात रसिकांच्या साक्षीने जाहीरपणे मांडतात.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात रविवारी रात्री हे नाट्य घडले. 'आयोजक प्रयत्न करतात; पण आधीच्या कलाकारांनी वेळ पाळून पुढील कलाकाराचा सन्मान ठेवायला हवा. रसिकांनीही या बाबतीत सजग असायला हवे. आधीचे कलाकार खूप वेळ घेतात, मग बारा वाजत आले, की पोलिस येऊन थांबतात. आम्ही रसिकांसाठी जी तयारी करून येतो, ती मांडायची संधीच मिळत नाही.
एक कलाकार म्हणून मन नक्कीच नाराज होते. एखाद्या वर्षी वेळ नाही मिळाला, तर समजून घेता येईल; पण दर वर्षीच असे घडते. या वयात मला काही मिळवायचे नाही; पण सर्व कलाकार समान असतात. सर्वांनाच संगीताची सेवा करायची असते. ती संधी सर्वांना समान मिळायला हवी. आयोजकांचा दोष नाही; पण त्यांनी सर्वांच्याच बाबतीत कठोर व्हावे,' असेही त्यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images