Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्यात सम्यक साहित्य संमेलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्रातर्फे येत्या १७ ते २०डिसेंबरदरम्यान पुण्यात पाचव्या सम्यक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या निमित्ताने ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत या संमेलनाची माहिती देण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि प्रमुख संयोजक परशुराम वाडेकर यांनी ही माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, डॉ. अनिल सपकाळ, प्रा. किरण सुरवसे, प्रा. प्रकाश पवार, प्रसिद्धीप्रमुख धर्मराज निमसरकर, रमेश होलबोले आदी या वेळी उपस्थित होते.

संविधान रॅली काढणार

संमेलनाच्या निमित्ताने १७ डिसेंबरला पुणे महापालिकेपासून भिडे वाड्यापर्यंत संविधान रॅली काढण्यात येणार आहे. भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यासाठी या वेळी धरणे धरण्यात येईल. बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या संविधान नगरीमध्ये दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हस्ते या संमेलनाचे उद‍्घाटन होणार आहे. विद्यापीठात शिक्षण घेणारे परदेशी विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. संमेलनाध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, 'बार्टी'चे महासंचालक डॉ. डी. आर. परिहार आदी मान्यवर या वेळी उपस्थित राहणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

भारतीय संविधानापुढील आव्हाने आणि लेखकांची भूमिका, साहित्य पुरस्कारांचे राजकारण, साहित्यातील बदलता गावगाडा आणि विचारप्रणाली, सांस्कृतिक राजकारणातील असहिष्णुतेचे बदलते संदर्भ आदी विषयांवर परिसंवादांचे आयोजन या संमेलनात करण्यात आले आहे, अशी माहिती या वेळी परशुराम वाडेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतमतांच्या गलबल्यात घालवू नका शहरविकास

$
0
0

गेल्या अनेक दिवसांपासून शहरात गवगवा सुरू असलेल्या स्मार्ट सिटी योजनेच्या प्रस्तावाला मान्यता देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेने पुढे ढकलला. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. यामागे राजकीय पक्षांवर दोषारोप सुरू झाले असले, तरी इतक्या महत्त्वाच्या आणि काही हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या योजनेबाबत माहिती मिळाली पाहिजे, यावर सर्वांचेच एकमत आहे. त्याच हेतूने शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी 'मटा'च्या राउंड टेबलमध्ये आपल्या भूमिका स्पष्ट केल्या.

स्मार्ट सिटीला शिवसेनेचा तत्त्वतः पाठिंबा आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानुसार आमची बांधिलकी सत्तेशी नाही, तर जनतेशी आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत कोणत्या समस्या सोडवण्याची गरज आहे, याचा प्राधान्यक्रम निश्चित केला होता. त्यानुसार, पालिका आयुक्तांनी तयार केलेल्या अहवालात शहरात विविध प्रकल्प उभे राहणार होते. तसेच, आजवरच्या प्रमुख समस्यांवर काही ठोस उपाययोजना झाल्या असत्या. त्यामुळे, स्मार्ट सिटीमुळे शहराचा चेहरा बदलण्यास सुरुवात झाली असती.

स्मार्ट सिटीमधील काही तरतुदींबद्दल आमच्याही मनात शंका आहेत. स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी स्थापन केल्या जाणाऱ्या स्वतंत्र कंपनीला (स्पेशल पर्पज व्हेईकल - एसपीव्ही) आणि त्यांना अधिकार देण्याबाबत शिवसेनेचा विरोधच आहे. मात्र, या कंपनीची रचना ठरविण्याची आणि त्यांना अधिकार प्रदान करण्याची जबाबदारी पालिकेच्या हातात ठेवण्यासाठी काही उपसूचना देऊन, त्यात बदल करता येणे शक्य होते. त्यानुसार, शिवसेनेनेही काही उपसूचना तयार केल्या होत्या. दुर्दैवाने, ही सभाच तहकूब झाल्याने त्यावरही कोणता निर्णय होऊ शकला नाही.

स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे नागरिकांवर करांचा बोजा वाढणार असेल, तर अशा कोणत्याही प्रकल्पांनाही शिवसेनेचा ठाम विरोध असेल. पुणेकरांवर कोणतीही करवाढ न लादता हा प्रकल्प झाला पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे.

स्मार्ट सिटीवरून बुधवारच्या सर्वसाधारण सभेत घडलेला सर्व प्रकार म्हणजे फक्त राजकारण आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला पुणेकरांची खरेच एवढी काळजी होती, तर मग गेल्या १५-२० वर्षांत पुण्याचे प्रमुख प्रश्न का सुटले नाहीत?

योजना नव्हे... धूळफेक

मुळात स्मार्ट सिटी या कल्पनेला आमचाच नव्हे, तर कोणाचाही विरोध नाही. परंतु, ज्या पद्धतीने ही योजना राबविण्यात येत आहे, त्या पद्धतीला राज ठाकरे यांनी विरोध केला आहे आणि चुकीच्या पद्धतीने पुढे जात राहिले, तर यापुढेही आम्ही त्याला विरोध करणारच. लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था बळकट व्हाव्यात, या उद्देशाने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी घटनादुरुस्ती करून या संस्थांना अधिकार दिले. मात्र, या संस्थाच कमकुवत करण्याचा प्रयत्न सध्या सुरू झाला आहे.

स्मार्ट सिटी योजनेतून केंद्र सरकारचे ५०० कोटी रुपये आणि राज्य सरकारचे २५० कोटी असे एकूण केवळ ७५० कोटी रुपयेच उपलब्ध होणार आहेत. पुणे महापालिकेचे एकाच वर्षाचे बजेट साडेचार हजार कोटी रुपयांचे आहे. त्यामुळे केवळ ७५० कोटी रुपयांनी विशेष भर पडणार नाही. या योजनेमध्ये काही तरतुदी अशा आहेत, की पाणीपुरवठा-कचरा अशी कामे नियोजित विशेष कंपनीकडे (एसपीव्ही) सोपविण्यात येणार आहे. परंतु, प्रत्यक्षात कामे महापालिकेच्याच यंत्रणेस करावी लागणार आहे. म्हणजे काम महापालिका करणार आणि श्रेय विशेष कंपनी घेणार, हे योग्य नाही. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानाअंतर्गत (जेएनएनयूआरएम) शहरात दोन हजार ३०० कोटी रुपयांची कामे झाली आहेत.

महापालिकेच्या आयुक्तांनी नगरसेवकांना या विषयावर अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची गरज होती. खरे तर ही कल्पना फसवी आहे आणि ही योजना म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. हे प्रस्ताव पाठविण्यासाठी १५ डिसेंबरची अंतिम मुदत आहे; पण फक्त पुणेच नव्हे, तर महाराष्ट्रातील एकाही महापालिकेचा प्रस्ताव अद्यापही सादर झालेला नाही. या योजनेतून नेमके काय पदरात पडणार, याबाबत स्पष्टता नाही. उलटपक्षी महापालिकेचे आयुक्तच या स्पर्धेत काही गुण मिळविण्यासाठी काम करीत आहेत की काय, हे कळायला मार्ग नाही.

नागरिकांवर अतिरिक्त कर नाही

स्मार्ट सिटीचा संपूर्ण प्रकल्प साडेतीन हजार कोटी रुपयांचा असला, तरी त्याचे वित्तीय स्वरूप कसे असेल, याबाबत सातत्याने आक्षेप नोंदविले जात आहेत. हा संपूर्ण खर्च पाच वर्षांत करायचा असून, त्यासाठी केंद्र-राज्य आणि महापालिका यांच्यामार्फत एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये केंद्र सरकारच्या इतर योजनांमधूनही निधी मिळविता येऊ शकतो. तशी स्पष्ट तरतूदच स्मार्ट सिटीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आहे. त्यानुसार, ऊर्जा मंत्रालय, स्वच्छ भारत योजना, सौर ऊर्जा प्रकल्प अशा विविध स्वरूपात सुमारे सातशे कोटी रुपयांचा निधी महापालिकेला उपलब्ध होऊ शकेल.

महापालिकेच्या मालकीच्या काही जमिनींच्या माध्यमातूनही मोठा निधी उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे. क्षेत्रनिहाय विकास प्रकल्पामध्ये महापालिकेच्या जागेवर 'ट्रान्झिट हब' निर्माण करण्याचे प्रस्तावित केले गेले आहे. त्याचा व्यावसायिक वापर करून स्मार्ट सिटीसाठी निधी उभा राहू शकतो. या दोन प्रकल्पांमधून साधारणतः सातशे ते आठशे कोटी रुपये मिळू शकतील, अशी शक्यता आहे. ७० एकर जागेवर टीपी स्कीम राबविण्याचा उद्देश असून, त्या माध्यमातूनही किमान दोनशे कोटी रुपये प्राप्त होण्याचा अंदाज आहे. उर्वरित, चारशे ते पाचशे कोटी रुपयांच्या निधीसाठी वित्तीय संस्थांकडून अर्थसाह्य घेता येऊ शकेल.

स्मार्ट सिटीसाठी एसपीव्हीतर्फे नागरिकांवर अतिरिक्त कर लादण्याचा कोणताही प्रस्ताव नसून, महापालिकेच्या मान्यतेविना कोणताही कर लावता येणार नाही. तसेच, कर्ज घेण्यापूर्वीही महापालिकेची मान्यता आवश्यकच आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्याची जबाबदारी केवळ एसपीव्हीवर असेल. त्यामुळे, पालिकेच्या स्थायी समिती आणि मुख्य सभेचे महत्त्व कमी होण्याची शक्यता नाही. कारण, शहरासाठी सर्व धोरणात्मक निर्णय घेण्याची जबाबदारी पालिकेवरच असेल.

विरोध नाही; पण त्रुटी दूर करा

स्मार्ट सिटीची हा शब्द ऐकायला चांगला वाटतो; पण याऐवजी पूर्वीच्या योजनेतील त्रुटी दूर करून तशी योजना राबविली असती, तर अधिक चांगले झाले असते. या स्मार्ट सिटी योजनेला राष्ट्रवादीने पहिल्यापासून पाठिंबा दिला होता. पण सध्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण आवश्यक आहे. आयुक्तांनी ते दिले, तर आमचा पाठिंबाच राहील आणि हे स्पष्टीकरण व्हावे, ही आमची रास्त मागणी आहे.

खरे तर पुण्यात ही योजना एका व्यक्तीभोवती केंद्रित झाली. या स्पर्धेसाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला, जनसहभागही घेतला; पण ते करताना महापालिकेतील महत्त्वाचे पक्ष, पदाधिकारी आणि नगरसेवकांची मतेही घेतली नाहीत आणि त्यांचा सहभागही घेतला नाही. आमची काही रिझर्व्हेशन्स निश्चित आहेत. यापूर्वी काही नगरसेवकांनी आयुक्तांकडे तपशील विचारला, तेव्हा 'आपला डेटा अन्य शहरांपर्यंत जाईल,' अशी भीती दाखवून माहिती मिळू दिली नाही, त्यांचा हा मुद्दा पटणारा नाही. त्यामुळे पुण्यात सकृतदर्शनी ही योजना म्हणजे आयुक्तांची योजना ठरली. काही दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आयुक्तांनी सादरीकरण केले आणि पवार यांनीही शहरासाठी आत्मीयतेने काही सूचना केल्या होत्या. मात्र, आयुक्तांनीही सर्वसाधारण सभेपुढे माहिती देण्यासाठी इतके दिवस वाट पाहायला नको होती.

महापालिकेला अंधारात ठेवून कारभार चालविणे योग्य नाही. त्यामुळे या मुद्द्यांवर स्पष्टीकरण आवश्यक आहे. ते झाले, तर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपची योजना, म्हणून आमचा याला विरोध नाही.

'दुटप्पी भूमिकेतूनच विरोध'

केंद्र-राज्य सरकारकडून अनुदानासाठी पात्र प्रकल्पांमध्ये आत्तापर्यंत संबंधित शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न कधीच झाला नव्हता. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नागरिकांच्या आशा-अपेक्षा, आकांक्षा काय आहेत, त्यांना शहरात नेमक्या कोणत्या सुविधा हव्यात, हे प्रथमच समोर आले होते. परंतु, राजकीय पक्षांच्या दुटप्पी भूमिकेमुळेच त्याला विरोध केला गेला.

पालिकेकडे उपलब्ध असलेली साधनसामग्री आणि नागरीकरणाचा वाढता रेटा याचे व्यस्त प्रमाण यामुळे अगदी मूलभूत सुविधांसाठीदेखील नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे, पालिकेवरचा हा ताण हलका करण्यासाठीच स्पेशल पर्पज व्हेईकलची (एसपीव्ही) स्थापना करण्याचा उद्देश आहे. यामध्ये, काही भागांतील नागरिकांच्या लहान-सहान तक्रारी सोडविण्याचे काम एसपीव्हीतर्फे करण्यात येणार असून, केवळ मोठ्या प्रकल्पांसाठीच पालिकेला खर्च करावा लागणार आहे. ई-गव्हर्नन्स आणि स्मार्ट उपाययोजना करून नागरिकांच्या तक्रारी एका दिवसांत सोडविण्याचे उद्दिष्ट एसपीव्हीला दिले गेले आहे. नागरिकांना सोयी-सुविधा पुरविताना, त्यासाठी जादा कर अथवा शुल्क आकारण्याची मुभा एसपीव्हीला असेल, असा अपप्रचार केला जात आहे. वास्तविक, पालिकेच्या परवानगीशिवाय नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क एसपीव्हीला आकारता येणार नाही, असे स्पष्ट केले गेले आहे. त्यामुळे, एसपीव्ही महापालिकेला पूरकच ठरणार असून, पालिकेच्या अधिकारांवर मर्यादा येणार असल्याची केली जाणारी ओरड पूर्णतः फसवी आहे.

एसपीव्हीचा आणि महापालिकेचा काहीही संबंध राहणार नसल्याच्या चर्चेमध्येही अजिबात तथ्य नाही. पालिकेचे महापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समितीचे अध्यक्ष यांच्यासह आणखी तीन सदस्य कंपनीच्या संचालक मंडळावर असतील. त्यांच्यासह, पालिकेचे आयुक्त हे या कंपनीचे पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत. त्यामुळे, पालिकेला अपेक्षित असे निर्णय एसपीव्हीमध्ये सहज घेता येऊ शकतात. परंतु, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. एसपीव्हीच्या प्रस्तावामध्येही काही त्रुटी असू शकतील; पण त्यावर चर्चा करून तोडगा काढण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्याऐवजी, केवळ भाजप सरकारने हा प्रकल्प मांडला म्हणून त्याला विरोध करण्याचा प्रकार राजकीय प्रतिष्ठेसाठीच रेटला जात आहे.

पारदर्शकता जपणे महत्त्वाचे

स्मार्ट सिटीमध्ये जेव्हा पुण्याची पिंपरी-चिंचवडसह निवड झाली, त्यावेळी पुण्याची स्वतंत्र निवड व्हावी, यासाठी काँग्रेसने आंदोलन केले होते, याची सर्वप्रथम मी आठवण करून देऊ इच्छितो. त्यामुळे, स्मार्ट सिटी योजनेला आमचा विरोध आहे, हा प्रचार चुकीचा आहे. शहर विकासाच्या कोणत्याही योजनेला, स्मार्ट सिटीसारख्या शहराच्या ब्रँडिगसाठी आवश्यक ठरणाऱ्या योजनेला काँग्रेसचा पाठिंबाच आहे. परंतु त्यासाठी पारदर्शकता जपली जाणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने पालिका आयुक्तांनी मांडलेल्या स्मार्ट सिटीच्या आराखड्यात त्याचीच कमतरता आहे. त्यामुळे पक्षाने सर्वसाधारण सभेत विरोधाची भूमिका घेतली.

स्मार्ट सिटीचा संपूर्ण आराखडा तब्बल साडेतीन हजार कोटींचा आहे. त्यामध्ये, संपूर्ण शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या पॅन सिटी प्रकल्पासाठी अंदाजे ९००-९५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, तर औंध-बाणेर, बालेवाडी या क्षेत्रनिहाय विकास प्रकल्पाकरिता ११५० कोटी रुपये अपेक्षित धरले गेले आहेत. तर, उर्वरित खर्च देखभाल-दुरुस्तीवर (ऑपरेशन अँड मेंटेनन्स) होईल, असे गृहीत धरले आहे. केंद्र, राज्य आणि महापालिका यांच्यातर्फे पाच वर्षांत हजार कोटी रुपयेच उभे राहू शकणार असल्याने, उर्वरित अडीच हजार कोटी रुपये, कसे उभे राहणार, याचा कोणतेही स्पष्टीकरण यामध्ये नाही. हजार कोटींच्या पुढे फार तर दोनशे-अडीचशे कोटी रुपये उभे

राहू शकतात. त्यामुळे, उर्वरित निधी उभा राहिला नाही, तर महापालिकेलाच त्याची झळ बसण्याची भीती आहे. त्यामुळे, साडेतीन हजार कोटींऐवजी पाच वर्षांत अपेक्षित असलेल्या एक हजार कोटी रुपयांमध्ये स्मार्ट सिटीचा आराखडा तयार करा, आम्ही मान्यता देतो, अशी सूचनाही आयुक्तांना केली.

केंद्र सरकार स्वतंत्र कंपनीच्या (एसपीव्ही) माध्यमातून पालिकेच्या अधिकारांवर नियंत्रण आणू पाहत आहे. या कंपनीतील अधिकारी प्रकल्प राबवू शकतात, मग हेच काम पालिकेचे अधिकारीही करू शकतीलच ना? त्यासाठी, वेगळी कंपनी कशाला हवी? त्यामुळे, एसपीव्हीबाबत केंद्र सरकारने फेरविचारच करायला हवा.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहारदार गायकीने आळवला राग ‘सवाई’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सनईचे मंगलमय सूर, बहारदार गायकीची पेशकश आणि व्हायोलिन-बासरीची रंगलेली अफलातून जुगलबंदी याद्वारे अभिजात भारतीय संगीताच्या परमोच्च आनंदाची श्राव्यमय अनुभूती देणाऱ्या ६३ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला गुरुवारी दिमाखात सुरुवात झाली. पहिल्या दिवशीच्या संगीताविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध झाले. सुरांचा हा नजराणा निव्वळ अप्रतिम होता.आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा श्रीगणेशा नम्रता गायकवाड यांया सनई वादनातून प्रकटलेल्या सुरेल सुरांनी झाला. नम्रताने राग मधुवंतीने वादनाला सुरुवात केली. मंजुळ स्वरात रंगलेल्या सनई वादनात तिने विलंबित आणि द्रुत तीन तालात सुरांची मुक्त उधळण केली. सूर शहनाईला तिला सीमा आणि प्रेरणा गायकवाड यांनी, तर तबल्यावर हरदीपसिंग दिडे यांनी साथसंगंत केली.

सनईच्या मंगलमय सुरांनंतर पं. भास्करबुवा बखले यांच्या पणती शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी दातार-कुलकर्णी यांचे बहारदार गायन रंगले. राग मुलतानीमध्ये त्यांनी विलंबितमध्ये 'आरी तेरो' या बंदिशीतून विस्तार केला. मुलतानीमध्ये 'सुंदर सृजन' या त्यांच्या तीन तालातील द्रुत बंदिशीला रसिकांची दाद मिळाली. एकतालात सादर केलेल्या तराण्याने रसिक मंत्रमुग्ध झाले. मारवा रागातील 'हो गुणीजन' ही बंदिशही रंगली. 'स्वर रंगवावा' या रामदास स्वामींच्या संगीतकार श्रीधर फड़के यांनी संगीतबद्ध केलेल्या भजनात रसिक अक्षरशः तल्लीन झाले. संगीत स्वयंवर नाटकाने गुरुवारी शताब्दीत पदार्पण केल्यानिमित्त 'एकला नयनाला' हे भास्करबुवा बखले यांनी संगीतबद्ध केलेले नाट्यगीत त्यांच्या पणतींनी खासकरून सादर केले. हार्मोनियमवर चैतन्य कुंटे, तबल्यावर समीर पुणतांबेकर, बासरीवर संदीप कुलकर्णी, पखवाजवर राजेंद्र दूरकर, तंबोऱ्यावर मनाली तुंगे आणि वर्षा सोरवडीकर तसेच

टाळसाठी माउली टाकळकर यांनी समर्पक साथ केली.

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. विश्वनाथ यांच्या गायनाला 'मंगलम भगवान विष्णू' या गीताने सुरुवात झाली. 'लागी रे मनवा मै चोर' या त्यांच्या ठुमरीने मैफलीत रंग भरले. 'कोई जाने ना जाने हे' भजन काव्यरसाची अनुभूती देऊन गेले. त्यांना हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी, तबल्यावर पांडुरंग पवार तर तानपुऱ्यावर वैष्णवी अवधानी आणि मोहसिन मिरजकर यांनी सुरेख साथ केली. पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे पहिले गंडाबंद शिष्य पं. रूपक कुलकर्णी आणि व्हायोलिन वादक प्रवीण शेवलीकर यांच्या बासरी-व्हायोलिन जुगलबंदीने सवाईची सायंकाळ रम्य झाली. आलाप , जोड सादर करून त्यांनी अनोखे रंग भरले. कुलकर्णी यांच्या ध्रुपद अंगाच्या बासरीवादनाने, तर शेवलीकर यांनी

ख्यालगायकीच्या अंगाने केलेल्या व्हायोलिनवादनाने सप्तसुरांची उधळण केली. मध्यतीन तालात ही जुगलबंदी रंगली. बासरीच्या कोमल तर, व्हायोलिनच्या अवीट गोडीच्या स्वरांनी रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. अखिलेश गुंदेचा यांची पखवाजवरील थाप विशेष दाद मिळवून गेली. तबल्यावर राजेंद्रसिंग सोळंकी, तर तानपुऱ्यावर अपर्णा सबनीस आणि विनय चित्राव यांनी साथ केली. कुलकर्णी आणि शेवलीकर यांच्या प्रथमच झालेल्या सहवादनाने रसिकांना अमृतस्वरांची अनुभूती मिळाली. आनंद देशमुख यांनी निवेदन केले.

पहिल्या दिवसाची सांगता झाली ती बनारस घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. राजन-साजन मिश्रा यांच्या सदाबहार गायनाने. नंद रागात त्यांनी विलंबित एकतालातून 'सैंय्या तोहे' ही रचना खुलवली. 'जा रे जा जा रे' या मध्य तीन तालातील बंदिशीने रसिकांना श्राव्यानुभव दिला. 'अब कृपा करो श्रीराम' या भजनाने स्वरयात्रेच्या पहिल्या दिवसाची सुरेल सांगता झाली. हार्मोनियमवर डॉ. अरविंद थत्ते, तबल्यावर पं. अरविंदकुमार आझाद, तानपुऱ्यावर सुहास गोटे आणि पंडित मोहन दरेकर यांनी सुरेल साथ दिली. दिग्गजांना वाहिली श्रध्दांजली सवाई गंधर्व महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दिवंगत शास्त्रीय गायक, वादक तसेच विविध क्षेत्रातील दिग्गजांना श्रध्दांजली वाहण्यात आली. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, तबला वादक हनीफ मिरजकर, राम माटे, लोककलावंत शाहीर साबळे, गायक-अभिनेते भालचंद्र पेंढारकर, रवींद्र जैन, आदेश श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

'तेव्हा आणि आता'

शिल्पकार चारुचंद्र भिडे यांच्या 'पत्थर की लकेर' या पाषाणचित्रांचे प्रदर्शन तसेच प्रसिद्ध छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांनी टिपलेल्या कलाकारांच्या पूर्वीच्या आणि आताच्या छायाचित्रांचे 'तेव्हा आणि आता' हे प्रदर्शन महोत्सवात भरविण्यात आले असून, ६८ कलाकारांच्या १३६ भावमुद्रा त्यात आहेत. या भावमुद्रा रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

कलाकारांच्या भावना झाल्या अनावर

या मोठ्या मंचावर कला सादर करण्याची ही पहिलीच वेळ होती. सवाईमध्ये सेवा घडली, अशी भावना व्यक्त करतानाच पं. विश्वनाथ यांना अश्रू अनावर झाले. 'कोई गलती हो गई हो, तो माफ कर देना', अशी विनम्र भावना व्यक्त करताच रसिकांनी टाळ्यांमधून त्यांना दाद दिली. शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी दातार-कुलकर्णी यांनीही अशीच भावना व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या इतिहासात प्रथमच ‘४४८’चा वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एखाद्या विषयावर सुस्पष्ट निर्णय घ्यावा, असे निर्देश महापालिकेला देण्यासाठी राज्य सरकारने महापालिका कायद्याच्या कलम ४४८चा वापर करण्याची घटना पुण्यात प्रथमच घडली आहे. त्यामुळे आता राजकीय चढाओढीबरोबरच शहरात तांत्रिक मुद्द्यांवरही लढाई सुरू झाली असून, कायद्यातील तरतुदींचे आधार घेऊन शह-काटशहाचे राजकारण रंगले आहे.

महापालिकेने केलेला एखादा ठराव विखंडित करावा, या साठी राज्य सरकारला असलेल्या अधिकारांचा वापर यापूर्वीही वेळोवेळी करण्यात आला आहे. महापालिका कायद्यातील कलम ४५१चा आधार त्यासाठी घेण्यात आला होता. मात्र, एखाद्या बाबीवर 'सुस्पष्ट' निर्णय घ्यावा, अशा प्रकारचे कलम ४४८नुसार निर्देश पुणे महापालिकेला प्रथमच प्राप्त झाले आहेत. स्मार्ट सिटीचा ठराव लांबणीवर टाकल्याने आयुक्त विरूद्ध सर्वसाधारण सभा यांच्यात रंगलेल्या संघर्षात आयुक्त आणि भाजपजनांच्या मागणीनंतर नगरविकास विभागाचे उपसचिव डॉ. सुधाकर शिंदे यांनी गुरुवारी हा आदेश काढला.

पालिकेच्या मुख्य सभेने पुढे ढकललेल्या स्मार्ट सिटीच्या प्रस्तावामध्ये राज्य सरकारने हस्तक्षेप करून तातडीने निर्णय घेण्याचे आदेश द्यावेत, या साठी आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी सकाळी नागपूर गाठले. सायंकाळपर्यंत ते नागपुरातच ठाण मांडून होते. तसेच, भाजपचे गटनेते गणेश बीडकर, नगरसेवक अशोक येनपुरे यांनीही सकाळी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीच्या कामाबाबत हवी पारदर्शकता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या विकासासाठी स्मार्ट सिटी प्रकल्प महत्वाची भूमिका बजाविणार असला तरी, या प्रकल्पाची संपूर्ण माहिती पुणेकरांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या मार्गानेच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करणे गरजेचे असून, स्मार्ट सिटीच्या कामात पारदर्शकता असली पाहिजे, असे मत शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.

स्मार्ट सिटीचा प्रस्ताव अभ्यासासाठी ४ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताच्या जोरावर घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्मार्ट सिटी स्पर्धेतून शहर बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाले आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेने लोकशाही पद्धतीने स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर हा केंद्राकडे पाठविण्याची गरज असल्याचे परिसर संस्थेचे सुजीत पटवर्धन यांनी सांगितले. स्मार्ट सिटी नक्की कोणत्या पद्धतीने राबविणार याबाबत महापालिका प्रशासनाने नागरिकांना सविस्तर माहिती दिली नाही. स्मार्ट सिटीच्या विकासाची कामे एसपीव्हीच्या माध्यमातून करणे ही लोकशाही पध्दत नसल्याची टीकाही त्यांनी केली. स्मार्ट सिटीमध्ये शहरात सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. या योजनेचा आराखडा नक्की कसा राबविणार याचा अभ्यास पालिकेतील नगरसेवक आणि नागरिकांनी करणे गरजेचे

असल्याचे पादचारी प्रथम संस्थेचे प्रशांत इनामदार यांनी सांगितले. केंद्राकडे हा प्रस्ताव गेल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही, त्यामुळे याचे मायक्रोप्लॅनिंग करण्याची

गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालिका आयुक्तांनी सर्वांना विश्वासात घेऊन हे काम केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी मध्ये नागरिकांचा सहभाग व पारदर्शकता या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. पालिका आयुक्त कुणाल कुमार स्मार्ट सिटीबाबत पालिकेच्या विशेष सभेत जो मसुदा आणि सादरीकरण करणार होते. त्याची माहिती पालिकेच्या वेबसाइटवर टाकावी, यामुळे या योजनेची सविस्तर माहिती पुणेकरांना होइल, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर,

विश्वास सहस्त्रबुद्धे, पीएमपीएमएल प्रवाशी मंचाचे जुगल राठी यांनी केली. शहरात अमुलाग्र बदल होण्यासाठी स्मार्ट सिटी महत्वाची भूमिका बजाविणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन यावर निर्णय घ्यावा, असे आवाहन क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांविरोधात नगरसेवक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने बहुमताने स्मार्ट सिटीचा प्रस्ताव जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने पालिका आयुक्तांनी थेट राज्य सरकारकडे धाव घेतल्याने आता आयुक्त विरुद्ध सर्वसाधारण सभा असा संघर्ष उभा ठाकला आहे. राज्य सरकारने महापालिकेला यावर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिल्याने नाराज झालेल्या सभासदांनी आयुक्तांवर थेट अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

पालिका आयुक्त सभासदांवर दबाब आणत असतील तर सभागृहानेही त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून त्यांना शासनाच्या सेवेत पुन्हा पाठविण्याचा निर्णय घ्यावा, या साठी पालिकेतील सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिका आयुक्तांवर अविश्वास ठराव आणायचा झाल्यास एकूण सभासदांच्या पाच अष्टमांश सभासदांचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभाग घेण्यासाठीचा अंतिम प्रस्ताव पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ४ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. या योजनेसाठी महापालिका आयुक्तांनी साडेतीन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. या योजनेसाठी केंद्राकडून प्रत्येक वर्षासाठी १०० कोटी याप्रमाणे पाच वर्षासाठी ५०० कोटी रुपये मिळणार आहेत. राज्य सरकारकडून २५० कोटी रुपये मिळणार असून, पालिकेला २५० कोटींचा निधी द्यावा लागणार आहे. उर्वरित निधी मिळविण्यासाठी पालिकेला पब्लिक प्रायव्हेट पाटर्नशीपची (पीपीपी) मदत घ्यावी​ लागणार आहे. ही रक्कम पालिका नक्की कुठून उभी करणार असा प्रश्न बहुतांश सभासदांना पडल्याने अभ्यासासाठी हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला होता. पालिकेतील भाजप, सेनेच्या सभासदांचा विरोध असतानाही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मान्य केला.

सर्वसाधारण सभेने प्रस्ताव पुढे ढकलल्याने आयुक्त कुणाल कुमार यांनी थेट पालिका कायद्यातील ४४८ कलमाचा आधार घेऊन राज्य सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. शासनाने यावर आदेश द्यावेत, या साठी नागपूर येथे जाऊन आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेटही घेतली. शहरातील भाजपचे दाधिकारी तसेच भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पालिकेला आदेश देण्याची मागणी केली होती.

याची दखल घेऊन राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने १४ डिसेंबरपूर्वी निर्णय घेण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे सभागृहाचा अपमान झाल्याने त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली पालिकेत सुरु झाल्या आहेत.

पुणेकर आमदारांचे 'सीएम'ना साकडे

पुणे

स्मार्ट सिटीचा प्रस्ताव लांबणीवर टाकण्याच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या निर्णयाविरोधात शहरातील भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुरुवारी धाव घेतली. पुणेकरांची फसवणूक होऊ देऊ नये, अशा मागणीचे निवेदन या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

शहरातील चार लाखाहून अधिक नागरिकांनी उचलून धरलेला हा प्रकल्प फक्त 'राजकीय इगो' जपण्याकरता बासनात गुंडाळणे ही पुणेकरांची फसवणूक आहे. प्रशासनानेही ह्याबाबत सकारात्मक पुढाकार घेऊन अभ्यासपूर्ण नियोजन केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे घटनात्मक अधिकार अबधित ठेऊन स्मार्ट सिटी योजनेपासून वंचित ठेवू नये, यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी आमदारांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सर्वसाधारण सभेने अभ्यासासाठी स्मार्ट सिटीचा प्रस्ताव पुढे ढकललेला असताना राज्य सरकारने १४ डिसेंबरपूर्वी त्यावर स्पष्ट निर्णय घ्या, असे आदेश महापालिकेला देणे याचा अर्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकशाही मान्य नाही, असा आहे. राज्य सरकारला स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पुणे शहरात कंपनीराज स्थापन करायचे असून विविध सुविधा पुरविण्यासाठी नागरिकांकडून वेगवेगळ्या माध्यमातून पुणेकरांकडून कर वसूल करण्यासाठीच हे आदेश शासनाने दिले आहेत.

- अरविंद शिंदे, विरोधी पक्षनेते

पालिकेच्या सभागृहाने बहुमताने हा विषय पुढे ढकलला असताना राज्य सरकारने अशा पद्धतीने आदेश देणे हा महापौर, पुणेकरांचा अपमान आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशामुळे लोकशाहीच्या तत्वांची पायमल्ली झाली आहे. सर्वसाधारण सभेचा आदेश डावलून आयुक्तांनी थेट राज्य सरकारकडे धाव घेतल्याने आयुक्त राजकीय क्षेत्रात उतरले आहेत का असा प्रश्न पडतो.

- आबा बागूल, उपमहापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाठिंबा आहेच; पण पारदर्शकता हवी

$
0
0

पुणे

स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला कोणताही राजकीय विरोध नसून, पुणेकरांच्या हितासाठीच आराखड्यातील तरतुदींबाबत सविस्तर आणि सुस्पष्ट खुलासा होणे आवश्यक असल्याची भूमिका राजकीय पक्षांनी गुरुवारी मांडली.

केंद्राच्या स्मार्ट सिटी प्रकल्पावरून राजकीय पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याने पुण्याचा प्रस्ताव बारगळण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांची नेमकी भूमिका समजून घेण्यासाठी; तसेच स्मार्ट सिटी हे केवळ स्वप्नरंजन ठरू नये, यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने गुरुवारी राउंड टेबल आयोजित केले होते. यामध्ये, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने स्मार्ट सिटीला तत्त्वतः पाठिंबा असला, तरी वित्तीय सहभागाची माहिती पारदर्शक स्वरूपात मांडली जाणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली. एसपीव्हीच्या स्थापनेबाबत भाजप-सेना वगळता सर्वांनीच आक्षेप नोंदविले. हजार कोटी रुपये मिळणार असताना, साडेतीन हजार कोटींचे सोंग आणण्याची गरज काय, असा सवाल काँग्रेस-राष्ट्रवादीने उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड, मनसेचे गटनेते बाबू वागस्कर, भाजपच्या माजी गटनेत्या मुक्ता टिळक आणि शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटी: स्पष्ट निर्णय घ्या

$
0
0

राज्य सरकारची पालिकेला तंबी;

सोमवारी पुन्हा सभा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटीच्या प्रस्तावावर कोणताच निर्णय न घेता, तो बहुमताने पुढे रेटणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेस आणि मनसेला राज्य सरकारने बुधवारी झटका दिला. स्मार्ट सिटीवर १४ डिसेंबरपूर्वी सुस्पष्ट निर्णय घेण्याचे आदेश नगरविकास विभागाने पालिकेला दिले असून, त्यानुसार येत्या सोमवारी पुन्हा पालिकेची खास सभा बोलाविण्यात आली आहे. तसेच, या सभेमध्येही निर्णय घेण्यास टाळाटाळ केली, तर सरकार योग्य ती कार्यवाही करेल, अशी तंबीच देण्यात आली असल्याने आता पुण्याचे कारभारी काय निर्णय घेणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या आराखड्याला मंजुरी देण्याचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला होता. या आराखड्यातील स्वतंत्र कंपनीच्या (एसपीव्ही) तरतुदींना आक्षेप घेऊन, अभ्यास करण्यासाठी हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकारच्या १५ डिसेंबरच्या मुदतीमध्ये पुण्याचा प्रस्ताव दाखल होणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली. पालिका आयुक्तांनी कलम ४४८ चा आधार घेऊन, राज्य सरकारनेच यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह आमदार आणि भाजपच्या इतर नेत्यांनीही गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पालिका आयुक्त कुणाल कुमारही नागपूरमध्येच ठाण मांडून होते. अखेर, नगरविकास विभागाने गुरुवारी सायंकाळी स्मार्ट सिटीच्या प्रस्तावावर १४ डिसेंबरपूर्वी स्पष्ट निर्णय घेण्याचे निर्देश पालिकेला दिले. पालिकेतील नगरसचिव विभागानेही महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याशी संपर्क साधून सोमवारी सकाळी ११ वाजता पालिकेची सभा घेण्याचे निश्चित केले असून, त्यात स्मार्ट सिटीवरच चर्चा होईल, असे नमूद केले आहे.

प्यादे कोण, वजीर कोण?

महापालिकेतील कारभाऱ्यांनी स्मार्ट सिटीचा प्रस्ताव पुढे ढकलून भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारच्या हस्तक्षेपामुळे हा डाव आता उलटला असून, स्मार्ट सिटीपेक्षाही एकमेकांना शह-काटशहा देण्याच्या या स्पर्धेत प्यादे आणि वजीर कोण ठरणार, याचा निर्णय येत्या सोमवारी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सत्तर लाखांची फसवणूक

$
0
0

वैद्यकीय प्रवेशाचे दाखवले आमिष

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उत्तराखंडमधील अधिकाऱ्याच्या मुलास पुण्यातील नामांकित वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने सत्तर लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत हुकूमचंद पाल (वय ५२, रा. उत्तराखंड) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून किशोर मनोहर वाणी (रा. भोईरवाडी, बिर्ला कॉलेज रोड, कल्याण ठाणे) या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाल यांच्या मुलाचे उत्तराखंड येथे एमबीबीएसचे शिक्षण झाले आहे. त्यामुळे त्याला एमडीचे पुढील शिक्षण घ्यायचे होते. पाल यांना त्यांच्या दिल्ली येथील मित्राने पुण्यात एमडीला प्रवेश मिळवून देणारी व्यक्ती असल्याचे सांगून आरोपीची माहिती दिली.

त्यानुसार पाल यांनी वाणी याच्याशी संपर्क साधला. वाणी व पाल हे पुण्यातील शिवाजीनगर येथील एका हॉटेलमध्ये भेटले. या ठिकाणी वाणी याने पाल यांच्या मुलास एमडी या वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचे आमिष दाखवून २१ ऑगस्ट २०१२ रोजी दोन लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर उर्वरित ६८ लाख रुपये रक्कम आरटीजीएसद्वारे एप्रिल २०१३ पर्यंत आरोपीला दिले. परंतु तरीही त्याने पाल यांच्या मुलास प्रवेश दिला नाही. त्यामुळे पाल यांनी आरोपीकडे पैशांची मागणी केली.

त्यावर आरोपीने सुरूवातीला एक चेक दिला. मात्र, तो वटला नाही. त्यानंतर अनेक वेळा मागणी करूनही त्याने पैसे परत करण्यास नकार दिला. त्यामुळे उत्तराखंड पोलिसांमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन नंतर तो शिवाजीनगर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. याप्रकरणी फौजदार डी. एस. पाटील हे अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोसरीत सिलिंडरचा स्फोट; हानी टळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

हातगाडीवरील सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. भोसरी येथील भाजीमंडईमध्ये शुक्रवारी (११ डिसेंबर) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. अग्निशमनदलाने दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील लांडेवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या भाजीमंडईलगत वडपाव विक्रीची हातगाडी आहे.

या गाडीवरील सिलिंडरचा स्फोट झाला. यावेळी हातगाडी बंद असल्याने व दुपारी गर्दी असल्याने मोठी हानी टळली. या स्फोटामुळे जवळच असलेल्या कचऱ्याने पेट घेतल्याने आग पसरली. अग्निशमन केंद्रापासून हाकेच्या अंतरावरच ही घटना घडली. अर्ध्या तासात जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीत दोन हातगाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे सिलिंडर गरम होऊन हा स्फोट झाला की सिलिंडरचा स्फोट होऊन कचऱ्याला आग लागली याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

खराळवाडी प्रभागाच्या क्षेत्रीय सभेत महिला व बालकल्याण समिती सभापती गीता मंचरकर यांना झालेली मारहाण, कैलास कदम गटाला राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते यांनी केलेली हाणामारी आदी प्रकरणात दोन नगरसेवकांसह ११ जणांना गुरुवारी (१० डिसेंबर) रात्री उशिरा अटक करण्यात आली. शुक्रवारी आरोपींना पिंपरी कोर्टात हजर करण्यात आले असता, सर्वांची तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

नगरसेवक सदगुरू कदम आणि भाजप स्थानिक कार्यकर्ता दत्ता इंगळे यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नगरसेविका गीता मंचरकर, स्वीकृत सदस्य हमीद शेख, अॅड. सुशील मंचरकर, दत्ता इंगळे, सचिन जाधव, अजीज शेख, इब्बु शेख, विशाल जाधव, अनिल धोत्रे, अनिल देवकर, विशाल शिंदे, आकाश जाधव, प्रेम अलकुंटे, नितीन जाधव, डिसोजा, डेनीस स्टिव्हन, गणेश अलकुंटे, गणेश अलकुंटेचा भाऊ, हिरा जाधव, सदाशिव तळेकर, धनंजय चौधरी, संतोष ऊर्फ बाळा भागवत, दोन महिलांसह इतर १० ते १५ जणांवर खूनाचा प्रयत्न, विनयभंग, दरोडा, दंगल, मारहाण, जीवे मारण्याची धमकी, पिस्तुलाचा धाक दाखविणे आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दत्ता इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नगरसेविका कैलास कदम, सदगुरू कदम, सतीश कदम, प्रवीण कदम, सचिन कदम, संतोष आरबेकर, प्रतुल घाडगे छोटा पठाण, बाब्या कदम, संदीप ऊर्फ काळ्या कलापुरे, चार महिलांसह इतर ७ ते ८ जणांवर खुनाचा प्रयत्न, दंगल, मारहाण, पिस्तुलाचा धाक दाखविणे आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी कैलास कदम, सदगुरू कदम, सचिन कदम यांच्यासह तीन महिलांना आणि अॅड. सुशील मंचरकर, हमीद शेख, दत्ता इंगळे, सचिन जाधव, नितीन जाधव यांना अटक करण्यात आली आहे.

'सभेसाठी द्यावी पूर्वकल्पना'

शहरात अनेक संवेदनशील प्रभाग आहेत. राजकीय द्वेषातून हाणामारी आणि अन्य गंभीर घटना घडत आहेत. त्यामुळे अशा सभा घेत असताना पोलिसांना याबाबत न कळविणे घातक ठरू शकते. त्यामुळे महानगरपालिकेने यापुढे क्षेत्रीय सभा घेताना पोलिसांना पूर्व कल्पना द्यावी, असे पत्र पोलिसांकडून महानगरपालिका प्रशासनाला देण्यात येणार असल्याचे सहायक पोलिस आयुक्त मोहन विधाते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओतूरला पाच घरफोड्या; २२ तोळे सोने लांबवले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

जुन्नर तालुक्यातील ओतूरमध्ये चोरट्यांनी एका रात्रीत पाच ठिकाणी घरफोड्या करून एकाच घरातून २२ तोळे सोने लंपास केले. तीन जणांच्या टोळक्याने हे कृत्य केले असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे.

चोरटे सीसीटीव्हीत कैद असल्याने त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे ओतूर पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, या टोळक्याने सिद्धिविनायक अपार्टमेंटमधील सविता संतोष काळे यांचे बंद असलेल्या घरातून कडी कोयंडा तोडून घरफोडी केली. त्यात लाकडी कपाटात असलेले २२ तोळे सोन्याचे दागिने लांबवले. जुन्नर पंचायत समितीच्या सदस्य मनीषा डुंबरे यांच्या घरात घरफोडी करून दहा हजार रुपयांचा ऐवज लांबवला. माजी जिल्हा परिषद सदस्य तुषार थोरात यांच्या कृषी भांडारात

घरफोडी करून १२०० रुपये, अमरसेवा सहकारी पतसंस्थेतून ६६ हजार रुपये लांबवले. अन्य काही सदनिकांमधून देखील घरफोडीचा प्रयत्न करून चोरटे पळून गेले. थोरात यांच्या कृषी भांडारात असलेल्या सीसीटीव्हीत हे चोरटे दिसत आहेत. पोलिस उपनिरीक्षक बी. आर. बाडीवाले तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव ‘ग्रेड पे’साठी तहसीलदार रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नायब तहसीलदारांना हक्काचे वाढीव ग्रेड पे मिळण्याच्या मागणीसाठी राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे पाच जिल्ह्यांतील तहसील कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला.

नायब तहसीलदारांना राजपत्रित वर्ग-२ च्या अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, त्यांना ग्रेड पे ४ हजार ३०० रुपयेच दिले जाते. त्यांचे ग्रेड वेतन ४ हजार ६०० रुपये करून त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यात यावा, या मागणीसाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील दीडशेहून तहसीलदार व नायब तहसीलदार आंदोलनात सहभागी झाले होते. राज्य सरकारने या मागणी दखल घ्यावी. या ग्रेड वेतनामुळे सरकारवर फारसा बोजा पडणार नाही. या मागणीची लवकर दखल घेतली न गेल्यास १ जानेवारी २०१६ रोजी लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष डी. एस. कुंभार यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरवड्यात अनधिकृत फ्लेक्सचा बाजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

येरवड्यातील शीला साळवे भाजी मंडईमधील रस्त्यांवर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची फ्लेक्स बोर्ड लावण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मंडईत अनधिकृत फ्लेक्सचा बाजार भरू लागला आहे. या मंडईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने ठिकठिकाणी अनधिकृत फ्लेक्सची संख्या वाढू लागली.

येरवडा, विश्रांतवाडी आणि नगर रोडवरील विविध चौकात, बस थांबे, दिशादर्शक फलक, स्वच्छता गृहे आणि रस्त्यांवर जागोजागी राजकीय नेत्यांचे अनधिकृत फ्लेक्स लावल्याने शहर विद्रूप होत आहे. अनधिकृत फ्लेक्स, तसेच जाहिरातींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने हायकोर्टाने महापालिकेचे कान टोचले होते. तरीही अनधिकृत फ्लेक्सबाजीचे उधाण थांबलेले नाही.

येरवडा उपनगरातील प्रत्येक चौकात फ्लेक्स लावून वाढदिवस, सण आणि शुभेच्छा देण्याची जणू स्पर्धाच सुरू असल्याचे दिसते. काही स्थानिक नगरसेवक आणि नेत्यांचे देखील फ्लेक्स झळकत असतात. येरवड्यातील शीला साळवे भाजी मंडई, विश्रांतवाडी चौक, चंदननगरचे भाजी मार्केट अशा रहदारी आणि गर्दीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांचे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फ्लेक्स गर्दी करू लागले आहेत.

येरवडा भागात गेल्या महिन्यात वाढदिवस साजरा करणाऱ्या एका युवा नेत्याने शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या हितचिंतकांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. या वेळी कर्कश आवाजात डीजे लावण्यात आला होता. रात्री दहा नंतर स्पीकर वाजविण्यास बंदी असताना देखील रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात गाणी सुरू होती. मित्रांना गाण्यावर मनसोक्त थिरकता यावे, यासाठी परिसरातील रस्ते काही काळ बंद ठेवण्यात आले होते.

येरवडा क्षेत्रीय कार्यालय आणि अतिक्रमण विभागाला परिसरात अनधिकृत फ्लेक्स कोठे लावले आहेत याबद्दल माहिती असूनही कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप होत आहे. येरवडा आणि नगर रोड क्षेत्रीय कार्यलयात दर महिन्याला होणाऱ्या मोहल्ला कमिटीच्या बैठकीत नागरिक परिसरात अनधिकृत फ्लेक्स लागले असल्याची माहिती सहायक आयुक्त आणि अतिक्रमण विभागाला देतात. पण पालिकेकडून कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने चित्र आहे.

कारवाईत दुजाभाव

काही दिवसांपूर्वी रस्ते, फुटपाथवर बसून, हातगाडी लावणाऱ्या विश्रांतवाडीतील पथारी व्यावसायिकांवर पालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई केली होती. पथारी वाल्यांप्रमाणे अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर पालिका कारवाई का करत नाही, असा सवाल पथारी व्यावसायिक आता करू लागले आहेत.

अतिक्रमण निरीक्षकाची नुकतीच बदली झाल्याने अनधिकृत फ्लेक्सवरील कारवाई थंडावली आहे. काही दिवसांपूर्वीच नवीन निरीक्षक कामावर रुजू झाले. पण त्यांना परिसराची सखोल माहिती नाही. लवकरच अनधिकृत फ्लेक्स हटवले जातील.

- वसंत पाटील, सहायक आयुक्त, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधार’जोडणी अर्ज ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेशनकार्ड आधारकार्डला जोडण्यासाठी अर्ज भरण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने लवकरच ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. शहर अन्नधान्य वितरण विभागाकडून ही व्यवस्था करण्यात येणार असल्याने नागरिकांना अर्ज देण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.

सध्या रेशनकार्ड आधारकार्डशी जोडण्यासाठी नागरिकांचे अर्ज आपापल्या भागातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये स्वीकारण्यात येत आहेत. गुरुवारपर्यंत शहरातील ११ लाख १८ हजार ६५४ लाभार्थींची नोंदणी करण्यात आली आहे. नागरिकांना घरबसल्या अर्ज भरता यावा, या साठी ऑनलाइन सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सॉफ्टवेअरची चाचणी घेण्याचे काम सुरू असल्याचे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ​नीलिमा धायगुडे यांनी सांगितले.

पांढऱ्या आणि केशरी रेशनकार्डधारकांकडून अर्ज भरण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. हा प्रतिसाद वाढविण्यासाठी ​प्रत्येक विभागात अन्नधान्य वितरण विभागाचे कर्मचारी रिक्षांतून फिरून घोषणा करून नागरिकांना माहिती देत असल्याचे धायगुडे यांनी स्पष्ट केले. रेशनकार्ड आधारकार्डशी जोडण्यात आल्यावर स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. त्यासाठी रेशनकार्डधारकांनी आपापल्या भागातील दुकानदारांकडे भरलेले अर्ज देणे आवश्यक आहे. त्या दुकानदारांकडून अन्नधान्य वितरण विभागाकडे अर्ज सादर करण्यात येत आहेत. अर्जासोबत आधारकार्ड, रेशनकार्ड आणि बँकेच्या पासबुकच्या छायांकीत प्रती जोडणे गरजेचे असल्याचे धायगुडे यांनी नमूद केले.

..तर रेशनकार्ड होणार रद्द?

रेशनकार्ड आधारकार्डशी संलग्न करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत नागरिकांनी अर्ज भरून न दिल्यास रेशनकार्ड रद्द करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ही कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून देण्याचे आवाहन धायगुडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौदा गुंड तडीपार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जेजुरी, बारामती, शिरुर आणि लोणीकाळभोर परिसरातील १४ गुंडांना पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तर इतर तिघांवर पोलिस ठाण्याच्या परिसरातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ही कारवाई करण्यात आली. आगामी काळात देखील गुन्हेगारी टोळ्यांवर अशा स्वरूपाची कारवाई केली जाणार असल्याचे डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

बारामती शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दीपक अप्पासाहेब धर्मे (रा. झारगडवाडी), शरद बाबुराव बिबे (रा. मळद), अक्षय उर्फ छोटा बिमल कांतीलाल जमदाडे (रा. जळोची, ता. बारामती), शुभम नामदेव मोरे (रा. तांबेनगर) आणि आकाश उर्फ अक्षय बापू जाधव (रा. मळद), लोणीकाळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शुभम कैलास कामठे, अक्षय उत्तम कांबळे (दोघे रा. कदमवाक वस्ती, लोणीकाळभोर), आकाश उर्फ सनी दत्तात्रय काळभोर (रा. संभाजीनगर) आणि नाना सुदाम जवळकर (रा. म्हातोबाची आळंदी, ता. हवेली), शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राहुल सुखदेव खेडकर (रा. खंडाळे माथा), राहुल गणपत खळदकर (रा. पिंपरी दुमला), मयुर सुनील गावडे, नितीन चंद्रकांत गायकवाड आणि प्रवीण प्रकाश शिर्के (तिघे रा. निमगाव म्हाळुंगी), अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. या आरोपींच्या विरोधात जबरी चोऱ्या, खंडणी व मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या वागणुकीत फरक पडला नसल्याने त्यांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

सलीम याकूब शेख, सचिन उर्फ पप्पू संपत रोमन (दोघे रा. पांडेश्वर, ता. पुरंदर), सुनील दत्तात्रय नाझीरकर (रा. नाझरे, कडेपठार, ता. पुरंदर) अशी पोलिस ठाण्याच्या परिसरातून हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या तीन गुंडांच्या विरोधात जेजुरी पोलिस ठाण्यात चोरीचे सात गुन्हे दाखल असून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तरीदेखील त्यांच्यात सुधारणा न झाल्यामुळे त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालकामुळे सापडले मोबाइल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वारगेट एसटी स्टँडजवळ रात्री एका रिक्षामध्ये एक व्यक्ती येऊन बसते. काही वेळ बसून ती व्यक्ती उतरते; पण त्याची बॅग रिक्षामध्येच राहते. रिक्षाचालक त्या प्रवाशाचा शोध घेतो. प्रवासी काही सापडत नाही. रिक्षाचालक बॅग उघडून पाहतो, तर त्यामध्ये तब्बल ३० मोबाइल फोन असतात. रिक्षाचालक प्रमाणिकपणाने ती बॅग पोलिसांच्या ताब्यात देतो. पोलिस मोबाइल फोनच्या मालकाचा शोध घेतात. शोध घेतल्यानंतर लक्षात येते, की मोबाइल फोनची बॅग रिक्षात विसरलेली व्यक्ती ही त्या फोनची मालक नाही, तर मोबाइल फोन चोर आहे!

अंबाजी रघुनाथ सूर्यवंशी असे प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी या रिक्षाचालकाचा सत्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सूर्यवंशी हे मूळचे उस्मानबादचे रहिवासी असून, घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे ते रोजगारासाठी तीन वर्षांपूर्वी पुण्यात आले. पर्वती पयथ्याजवळील जनता वसाहत येथे ते राहतात. दररोज ते स्वारगेट परिसरात रिक्षा चालवतात.'

गेल्या १२ नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बस स्टँडजवळ ते प्रवाशांची वाट पाहत होते. त्या वेळी त्यांच्याजवळ तीन व्यक्ती आल्या. त्यापैकी एक व्यक्ती रिक्षात बसली. इतर दोघे परत येतो म्हणून निघून गेले. त्या दोन व्यक्ती न आल्यामुळे रिक्षात बसलेली व्यक्तीही उतरून गेली. बराच वेळ कोणीही न आल्यामुळे सूर्यवंशी घरी आले. त्या वेळी त्यांना रिक्षात एक बॅग आढळली. ही बॅग रिक्षातून उतरलेल्या व्यक्तीची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी गावी गेल्याने त्यांनी बॅग उघडली नाही. त्यानंतर सूर्यवंशी २५ नोव्हेंबरला परत आले. त्यांनी बॅगची चौकशी करण्यासाठी कोण येते का, याची वाट पाहिली. मात्र, कोणी आले नाही. त्यांनी ही बॅग उघडून पाहिली असता, त्यामध्ये मोबाइल फोन असल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ ही माहिती पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांना दिली. त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी दरोडा प्रतिबंधक पथकाकडे ही बॅग दिली. या पथकाने मोबाइल फोनचा तपास केला असता, हे मोबाइल फोन मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेले असल्याचे समोर आले.

पावणेपाच लाखांचे मोबाइल फोन

अंबाजी सूर्यवंशी यांनी परत केलेले एकूण ३० मोबाइल फोन हे विविध ब्रँडचे असून, त्यांची एकूण किंमत ४ लाख ७६ हजार ८०० रुपये आहे. हे मोबाइल फोन १२ नोव्हेंबरपूर्वी चोरलेले आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांचे मोबाइल फोन चोरीला गेले आहेत, त्यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वरण-भात मोर्चा धुंदी उतरवण्यासाठीच

$
0
0

काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपवरही शिवसेनेची टीका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'भाजप मित्रपक्ष असला, तरी त्यांची सत्तेची धुंदी उतरवण्यासाठी 'वरण-भात' मोर्चा काढण्यात आला. पुणे महापालिकेची ​निवडणूक होईपर्यंत आगामी वर्षभर भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुका दाखविण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल,' असा ‌‌इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी शुक्रवारी दिला.

शिवसेनेच्या वतीने महागाईच्या विरोधात 'वरण भात' मोर्चा काढण्यात आला. ससून रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथून विधानभवन येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला. या वेळी सभा घेण्यात आली. त्यात निम्हण बोलत होते.

या मोर्चात माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि महादेव बाबर, शाम देशपांडे, रमेश बोडके, अशोक हरणावळ, सचिन तावरे, प्रशांत बधे, गजानन थरकुडे, गजानन पंडीत, सुनिल टिंगरे, अजय भोसले आदी सहभागी झाले होते. मोर्चानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना मागणीचे निवेदन आणि वरण भात देण्यात आला.

'राज्यात शिवसेना सत्तेत असतानाही भाजपच्या विरोधात का आंदोलन करण्यात येत आहे, असे बोलले जात आहे. भाजप हा मित्रपक्ष आहे आणि खरा मित्रच मित्राच्या चुका दाखवित असतो. राज्यात सत्तेत असल्याने भाजपाला त्यांच्या चुका दाखवणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे या मोर्चातून भाजपची कानउघडणी करण्यात आली,' असे निम्हण यांनी स्पष्ट केले.

आगामी काळात पुणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे वर्षभर भाजपसह महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुका दाखविण्यासाठी आंदोलने केली जाणार असल्याचे निम्हण यांनी सांगितले.

जप्त केलेली तूरडाळ व्यापाऱ्यांनाच परत करण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांनी केला. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबईतील ग्राहक पंचायतीने केला आहे. याची चौकशी झाली पाहिजे, असेही निम्हण म्हणाले. जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना आगामी काळात आंदोलने करणार असल्याचे सुतार यांनी सांगितले.

उद्योजकांना 'अच्छे दिन'

सर्वसामान्य जनतेला 'अच्छे दिन' दाखविण्याचे आश्वासन देऊन देशात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाला निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. सामान्य जनतेपेक्षा उद्योजकांना 'अच्छे दिन' आले आहेत, अशी टीका निम्हण यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पत्नीचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पत्नीचा दारूच्या नशेत पतीने डोक्यात लाकडी दांडके मारून खून केल्याची घटना गंगाधाम रोडवरील राठी प्लॉट येथे गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्षी गोविंद जगताप (वय २०, रा. अप्पर इंदिरानगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती गोविंद बाबुराव जगताप (वय २२, रा. अप्पर इंदिरानगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्षीची आई सरिता अनिल जाधव (वय ३५, रा. गंगाधाम रोड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद मूळचा माढा येथील असून पुण्यात तो टेंपो चालविण्याचे काम करतो. दोन वर्षांपूर्वी त्याचे साक्षीसोबत लग्न झाले होते. त्यांना एक वर्षाची मुलगी आहे. साक्षीचे आईवडील पुण्यातच गंगाधाम परिसरातील राठी प्लॉट येथे राहतात.

गोविंदचे लग्नापूर्वीपासून नात्यातील एका मुलीशी अनैतिक संबंध आहेत. त्याची माहिती साक्षीला मिळाली. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते. त्याचा आरोपीला राग होता. गोविंदने शुक्रवारी रात्री साक्षीला कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने बाहेर नेले. पण, कपडे खरेदी करण्यासाठी न घेऊन जाता तो तिच्या आईच्या घरी घेऊन गेला. त्या ठिकाणी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. दारूच्या नशेत असलेल्या गोविंदने भांडणात लाकडी दांडके पत्नीच्या डोक्यात मारले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पाटील अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायतीने केला अनधिकृत रस्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कात्रज-देहूरोड महामार्गालगत आंबेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीनेच अनधिकृत सिमेंट रस्ता केल्याचे स्पष्ट झाले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) ग्रामपंचायतीला नोटीस बजावली आहे. या नोटीशीद्वारे ग्रामपंचायतीकडून दहा दिवसांत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.

कात्रज-देहूरोड महामार्गाला जोडणारा कोणताही रस्ता; तसेच वीजवाहिन्या, जलवाहिन्या, अन्य कामे करायची असल्यास महामार्ग प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आहे. द कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवे (लँड अॅण्ड ट्रॅफीक) अॅक्ट २००२ च्या कलम ३८ (१) अन्वये ही बंधने घालण्यात आली आहेत. तथापि आंबेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीने कात्रज-देहूरस्ता महामार्गाला जोडणारा रस्ता कोणतीही परवानगी वा ना-हरकत पत्र न घेता केल्याची बाब उघडकीस आली आहे.

कात्रजलगत अभिनव कॉलेज ते सौरभ हॉटेलदरम्यानचा साधारणतः पाऊण किलोमीटरचा रस्ता आंबेगाव बुद्रक ग्रामपंचायतीने तयार केला आहे. हा रस्ता थेट महामार्गाला जोडण्यात आल्यामुळे अपघातांचा मोठा धोका संभवतो. या जोडरस्त्यामुळे तेथे यापूर्वी मोठे अपघात होण्याचे प्रकारही घडले आहेत. ही बाब सामाजिक कार्यकर्ते संदीप बेलदरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निदर्शनास आणली. त्यामुळे जागे झालेल्या महामार्ग प्राधिकरणाने आंबेगाव ग्रामपंचायत व सरपंचांना नोटीस बजावून येत्या दहा दिवसांत त्याचे स्पष्टीकरण मागविले आहे.

या सिमेंट रस्त्यावर ग्रामपंचायतीने किमान दीड कोटी रुपये खर्च केले आहेत. या रस्त्याचा दर्जाही चांगला नाही. या रस्त्यावर खड्डे पडल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी पुन्हा खर्च केला जात आहे. या संदर्भात तातडीने कारवाई करण्याची मागणीही बेलदरे यांनी केली आहे.

परवानगी घेतली नाही

महामार्गाला जोडणाऱ्या या सिमेंट रस्त्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने कोणतीही परवानगी दिली नाही. रस्ता महामार्गाला जोडण्यापूर्वी त्याची परवानगी घेणे आवश्यक होते. हा रस्ता करून ग्रामपंचायतीने कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवे अॅक्ट भंग केल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images