Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

संग्रामनगरला किरकोळ दगडफेक

$
0
0
स्पाइन रोडच्या कामासाठी त्रिवेणीनगरजवळील झोपडपट्ट्यांवर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी (१५ ऑक्टोबर) केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ नागरिकांनी सायंकाळी रास्ता रोको करीत पोलिसांवर किरकोळ दगडफेक केली.

महालक्ष्मीचे दुर्मिळ छायाचित्र आढळले

$
0
0
विविध कलाकुसरीचे अलंकार आणि भरजरी साडी नेसलेल्या श्री महालक्ष्मीचे लोभस रूप छायाचित्रात टिपण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असतेच. पण, सोन्या-चांदीचे कोणतेही दागिने परिधान न करतादेखील महालक्ष्मीचे तेज किती विलक्षण आहे, हे पाहण्याचा योग इतिहास अभ्यासक मंदार लवाटे आणि भास्वती सोमण यांना मिळाला आहे.

दागिन्यांच्या लिलावावर स्टे

$
0
0
शिर्डी येथील साईबाबा मंदिराला दान म्हणून मिळालेले सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या लिलावाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज, मंगळवारी स्थगिती दिली. कोर्टाची परवानगी न घेता संस्थानने लिलावाची घोषणा केल्याने याविरुद्ध कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू

$
0
0
मुंढवा केशवनगर येथील सतेंद्र प्रसाद जगदीश (वय ४२) यांचा ह़डपसरच्या नोबल हॉस्पिटलमध्ये रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. शहरात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून पंधरा जणांना नव्याने लागण झाली आहे. त्यापैकी चार जण व्हेंटिलेटरवर आहेत.

वाहतूक पोलिसाला मारहाण : तरुणाला सक्तमजुरी

$
0
0
भर चौकात वाहतूक शाखेतील पोलिसाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी एका तरुणाला दोन वर्षे सक्तमजुरी आणि ३६०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमितसिंह मोहणे यांनी हा निकाल दिला. या प्रकरणी तुषार पंढरीनाथ ढमाले (वय १९, रा. गंधर्व सोसायटी) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हवामान ढगाळ; वातावरणात गारवा

$
0
0
शहर आणि परिसरात सोमवारी गारठ्यात वाढ झाली असतानाच, मंगळवारी दिवसभर पुन्हा ढगाळ हवा पसरली होती. पुढच्या दोन दिवसांतही दुपानंतर हवामान ढगाळ राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

समृद्ध वारशाची चालती-बोलती सफर सुरू

$
0
0
शहरातून जाताना नेहमीच दृष्टीस पडणा-या वास्तूंच्या इतिहासाची उलगडलेली पाने..., नेहमीचीच तरीही रंजकतेने मांडली गेलेली त्याविषयीची माहिती..., शहराच्या जुन्या हद्दीतून फिरताना दिसणारी सकाळच्या वेळेची लगबग... अन् स्वयंचलित वाहनांऐवजी चालता-बोलता घेतलेला शहराच्या समृद्ध, ऐतिहासिक वारशाचा धांडोळा... अशा वातावरणात मंगळवारपासून ‘हेरिटेज वॉक’चा प्रारंभ झाला.

फेरपरीक्षा दिलेल्या उमेदवारांची यादी मिळाली

$
0
0
परीक्षेला डमी विद्यार्थी बसवण्याच्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींकडून लष्कर पोलिसांना फेरपरीक्षा दिलेल्या २१ उमेदवारांची यादी मिळाली आहे. ही यादी पडताळणीसाठी पुणे विद्यापीठाकडे पाठविण्यात येणार असल्याचे लष्कर पोलिसांनी सांगितले.

इंजिनीअरिंग कॉलेज? नको रे बाबा!

$
0
0
राज्यात जागा रिक्त राहत असतानाही नवी इंजिनीअरिंग कॉलेज स्थापण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) परवानगी देत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन कॉलेजना परवानगी देऊ नये, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांना पत्र पाठवले आहे.

पाणीकपातीचे सावट दूर करा

$
0
0
पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात येत्या दोन दिवसांत मुंबईत बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी दिले. गेले आठ महिने पुणेकरांना सोसाव्या लागणा-या पाणीकपातीचे सावट दूर करावे, असे साकडे शहरातील काँग्रेसजनांनी थेट मुख्यमंत्र्यांना घातले.

वाहतुकीसाठी नेमणार आंतरराष्ट्रीय सल्लागार

$
0
0
‘हिंजवडीमध्ये वाहतुकीचा प्रश्न गंभीर असून, पुढील दहा वर्षांचे नियोजन करून तो अग्रक्रमाने सोडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागारांची नियुक्ती केली जाईल’, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी जाहीर केले. हिंजवडीतील इतर समस्या सोडविण्यासाठीदेखील सर्व संबंधित घटकांची एकत्रित बैठक बोलाविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोणावळा लोकलचे नवे वेळापत्रक गैरसोयीचे

$
0
0
‘पुणे-लोणावळा लोकलसाठी करण्यात आलेले नवीन वेळापत्रक गैरसोयीचे असून प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने लोकलचे जुने वेळापत्रक लागू करावे,’ अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आली.

उत्फुल्ल वातावरणात आदिशक्तीचे स्वागत

$
0
0
पारंपरिक रूपात सजलेली ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी, श्री भवानीआई, तळजाई, पद्मावती अन् चतुःशृंगी माता, सोन्याच्या साजात झळाळून उठलेली सारसबाग येथील महालक्ष्मी, कात्रजची आश्वासक सच्चाई माता अशा आदिशक्तीच्या विविध रूपांना डोळ्यांत साठविणा-या भाविकांच्या अलोट गर्दीत शारदीय नवरात्रौत्सवास मंगळवारी प्रारंभ झाला. सुख-समृद्धी अन् शांतीसह जगण्यातील संकटांना धीराने सामोरे जाण्याचा जोगवा आबालवृद्धांनी मातेकडे मागितला.

मीडिएशनसाठी अपात्र केसचे प्रमाण वाढले

$
0
0
मीडिएशनद्वारे निकाली निघाव्यात म्हणून न्यायाधीशांकडून विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठविल्या जाणा-या केसमध्ये मीडीएशनसाठी अपात्र ठरण्याचे प्रमाण वाढते आहे. या वर्षी राज्यातील कोर्टांमध्ये तब्बल २१ हजार ९७५ केस मीडिएशनसाठी अपात्र ठरल्या. अपात्र केसचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी प्रत्येक न्यायाधीशाने प्रत्येक महिन्याला किमान दोन केस मीडिएशनद्वारे सोडवाव्यात, असे नवे निर्देश मुंबई हायकोर्टाकडून लागू करण्यात येणार आहेत.

कॅन्टोन्मेंटचे जन्मदाखले पासपोर्टसाठी स्वीकारणार

$
0
0
कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवाशांचे जन्मदाखले ग्राह्य धरले पाहिजेत, असे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्रालयाने दिल्यामुळे हजारो नागरिकांना पासपोर्ट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यामध्ये पुणे, खडकी आणि देहूरोड असे तीन कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत.

अमनोरातील कार्यक्रमात खुल्या मद्य विक्रीला विरोध

$
0
0
अमनोरा टाउनशिप येथे मुंबईतील ‘ओन्ली मच लाऊडर’ या कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एनरिक या पाश्चात्य गायकाच्या कार्यक्रमात होणा-या खुल्या मद्य विक्रीला साडेसतरा नळी ग्रामपंचायत आणि आनंदवन बहुउद्देशीय संस्थेने विरोध केला आहे. या कार्यक्रमातील मद्यविक्रीला मनाई करण्यासाठी हायकोर्टात याचिकाही दाखल केली आहे.

विमाननगर भागात पालिकेची कारवाई

$
0
0
पुणे महापलिकेच्यावतीने बेकायदा बांधकामांबरोबरच रस्त्यांवर इमारती बांधून केलेल्या अतिक्रमणांवर हातोडा घालण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी विमाननगर भागात कारवाई करण्यात आली. विमाननगर येथे इमारतींसमोर नियमाप्रमाणे जागा न सोडता केलेली बांधकामे तोडण्यात आली. तसेच हय्यात हॉटेलजवळ बांधण्यात येत असलेली टपरी आणि शेड काढण्यात आल्याचे महापालिकेचे प्रभारी कार्यकारी अभियंता साहेबराव दांडगे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनांची जंत्री

$
0
0
व्हॅटबाबत सर्वसहमतीने निर्णय घेतला जाईल..., एसईझेडच्या इंडस्ट्रियल पार्कमधील रूपांतराबाबत लवकरच अंतिम निर्णय होईल..., विमानतळासाठी बजेटमध्ये तरतूद असेल..., एमआयडीसी परिसरातील गुंडगिरी रोखण्यावर भर राहील... अशा आश्वासनांची जंत्री जाहीर करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारने उद्योगांकडे दुर्लक्ष केले नसल्याचे सूचित केले.

नियोजित नगर वसाहतींना पाणी मंजूर

$
0
0
शहरातलगतच्या भूगाव, उरवडे, वाघोली, आंबोली व म्हाळुंगे गावात प्रस्तावित असलेल्या नगर वसाहतींना लगतच्या लघु पाटबंधारे तलाव व मुळा-मुठा नदीतून घरगुती दराने पाणी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सिंचनाचे पाणी असे बिगर सिंचनाला वळविण्यापोटी त्यांच्याकडून ४ कोटी ५० लाख रुपये आकारण्यात येणार आहेत.

होर्डिंगचा संशयास्पद निर्णय रद्द करा

$
0
0
होर्डिंग धोरण गुंडाळून ठेवून अत्यल्प दरात होर्डिंगचालकांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याच्या स्थायी समितीच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी मंगळवारी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे धाव घेतली. प्रस्तावित होर्डिंग धोरण तातडीने मंजूर करावे, अशी मागणी त्यांनी केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images