Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अजूनही हक्कांची पायमल्लीच

$
0
0

Vandana.Ghodekar@timesgroup.com

पुणे : लोकांना कायद्याने संरक्षण दिले आहे. मात्र, तरीही अनेक प्रकारच्या केसेसमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली झाल्याचे दिसून येते. राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या खटल्यांमध्ये डिसेंबर २०१३ अखेरपर्यंत १४ हजार १६२ खटले प्रलंबित होते.

मानव हक्क संरक्षण कायद्यानुसार मानवी हक्कांचे संरक्षण करण्यात येते. अनेक गुन्ह्यांमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते. मात्र, त्याची दखल सरकारी यंत्रणांकडून घेतोो जात नाही. पोलिसांकडून गुन्हा दाखल करतानाही याबाबत काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते. मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यामुळे लोकांना मानवी हक्क आयोगाकडे दाद मागावी लागते. मात्र, तिथेही पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्याने न्यायास विलंब लागतो.

या आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारी लवकर निकाली काढण्यात याव्यात यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे, अशी मागणी मानवाधिकार कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

राज्य मानवी हक्क आयोगाकडे २००९-१० या वर्षी ६,०३४ केसेस दाखल करण्यात आल्या होत्या. २०१०-११ या वर्षी ५,६३४, सन २०११-१२ मध्ये ५,६१०, २०१२-१३ मध्ये ५,६८० आणि २०१३-१४ या वर्षी डिसेंबर २०१३ अखेरपर्यंत ३,९४१ केसेस दाखल करण्यात आल्या होत्या. आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या केसेसमध्ये डिसेंबर २०१३ अखेरपर्यंत ४०६ केसेस निकाली काढण्यात आल्या होत्या, तर १४ हजार १६२ केसेस प्रलंबित होत्या.

विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते. मात्र, आपल्याकडे या संदर्भात कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. सरकारी यंत्रणांकडून गोळा करण्यात येत असलेली माहिती तांत्रिक स्वरुपातील आहे.

मानवी हक्कांसंदर्भातील माहिती गोळा करताना सामाजिक विभाग, महिला व बालकल्याण, विधी व न्याय विभाग आणि पोलिसांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया मानवी हक्क विश्लेषक अॅड. असीम सरोदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एमसॅक्स’च्या निधीला ‘नॅको’ने लावली कात्री

$
0
0

Mustafa.Attar@timesgroup.com

पुणे : राष्ट्रीय एड्स नियंत्रणाची जबाबदारी राज्य सरकारने उचलावी, या केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे यंदा महाराष्ट्राला दिल्या जाणाऱ्या निधीपैकी २० टक्के निधीला राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने (नॅको) कात्री लावली आहे. परिणामी, महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटीला (एमसॅक्स) आता ८० टक्केच निधी उपलब्ध होणार आहे.

निधीला लागलेली कात्री आणि निधी हस्तांतराच्या नव्या पद्धतीमुळे राज्यातील 'एचआयव्ही'च्या चाचण्या रखडल्याचे स्पष्ट झाले आहे.

'राज्य एड्स सोसायटीला वेळेवर निधी उपलब्ध न झाल्याने राज्यातील 'एचआयव्ही' चाचणी निदान, समुपदेशन (आयसीटीसी) यासारख्या कार्यक्रमांना खो बसला आहे. त्यामुळे यंदा 'एचआयव्ही'च्या चाचण्या मोठ्या प्रमाणात झाल्या नाहीत. निधीअभावी स्वयंसेवी संस्थांच्या कर्मचाऱ्यांनादेखील घरी बसावे लागले. दरवर्षी 'एमसॅक्स'ला १३० कोटींचा निधी दिला जात होता. राज्य सरकारने वीस टक्के खर्चाचा वाटा उचलावा, असे केंद्राने ठरविले. त्यामुळे निधीत कपात होऊन राज्याला ८० टक्के निधी मिळणार आहे. म्हणजेच 'एमसॅक्स'ला १०४ कोटी ९ लाख रुपये उपलब्ध होतील,' अशी माहिती 'एमसॅक्स'मधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.

'एमसॅक्स'ला १०४ कोटी ९ लाखांपैकी आतापर्यंत ११ कोटी ९० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आणखी ३० कोटी १४ लाख रुपयांचा निधी राज्य सरकारकडे 'नॅको'ने वितरित केला आहे. पूर्वी केंद्र सरकारकडून 'नॅको'मार्फत 'एमसॅक्स'ला निधी वर्ग होत असे. आता 'नॅको'कडून राज्य सरकारला निधी वर्ग करण्यात येतो. त्यानंतर सरकारच्या मंजुरीनंतर एमसॅक्सला मिळतो. वेळखाऊ प्रक्रियेमुळे निधी मिळण्यास विलंब झाला आहे. निधी मिळाला की जिल्हा एड्स संस्थांना पाठविला जाईल,असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, 'एचआयव्ही'चे प्रमाण कमी झाल्याचे एकीकडे जाहीर केले जात आहे; परंतु, निधीच मिळाला नाही तर कर्मचाऱ्यांचा पगार कसा होणार? स्वयंसेवी संस्थांच्या मदतीला येणाऱ्या सहकाऱ्यांचेदेखील पगार देता येत नाहीत. कंडोम, चाचणीचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी निधी नाही. एप्रिल ते डिसेंबर महिन्यापर्यंतचा निधी रखडला आहे. पैसे मिळण्याची एमसॅक्सकडून शाश्वती मिळत नाही. त्यामुळे संस्थांवर आर्थिक बोजा पडत आहे,' अशी तक्रार 'कायाकल्प' संस्थेच्या सीमा वाघमोडे यांनी केली.

जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंटचे समन्वयक जॉर्ज स्वामी यांनी निधी उशिरा मिळत असल्याची कबुली दिली. 'दरवर्षी ५० ते ६० लाख रुपयांचा निधी उशिराच मिळतो. निधी उशिरा मिळत असल्याने खिशातून पैसे टाकावे लागते,' असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पादचाऱ्यांसाठी नवे धोरण

$
0
0

पालिकेच्या विशेष समितीकडून मसुदा आयुक्तांकडे सादर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील जास्त रहदारीच्या किंवा पादचाऱ्यांची संख्या जास्त असलेल्या रस्त्यांवर कमाल २०० मीटर अंतरावर आवश्यक तेथे रस्ता ओलांडण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची शिफारस महापालिकेने नव्याने तयार केलेल्या पादचारी धोरणात करण्यात आली आहे. तसेच त्यानुसारच
शहरातील रस्त्यांची रचना करण्यात यावी, असेही त्या धोरणात नमूद करण्यात आले आहे.

पदपथ नसल्याने वाहनांच्या गर्दीतून वाट काढणारे पादचारी, चौकांमध्ये पादचारी सिग्नलचे पालन न करणाऱ्या वाहनांमुळे रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना करावी लागणारी कसरत, रस्ता ओलांडणे म्हणजे दिव्यच पार करणे, अशी ज्येष्ठ नागरिकांची भावना असते. ही परिस्थिती आता बदलण्याची शक्यता आहे. रस्त्यावरील महत्त्वाचा घटक असलेल्या, परंतु कायमच दुर्लक्षित राहिलेल्या पादचाऱ्यांसाठी अखेर महापालिकेने 'पादचारी धोरण' तयार केले आहे.

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी जानेवारी २०१५मध्ये अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्यामध्ये वाहतूक पोलिस शाखेचे उपायुक्त सारंग आवाड, नगरअभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, 'पेडेस्ट्रियन फर्स्ट'चे प्रशांत इनामदार, 'परिसर'चे रणजित गाडगीळ यांचा समावेश करण्यात आला होता. त्या समितीने हे प्रस्तावित पादचारी धोरण तयार केले असून, त्याचा मसुदा आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

या धोरणावर महापालिकेच्या सभागृहात चर्चा होऊन त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. येत्या काळात पादचारी धोरणाला सभागृहाची मान्यता मिळाल्यानंतरही त्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी झाली, तरच पादचाऱ्यांना सुरक्षित व सोयीस्कर सुविधा उपलब्ध होतील, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

सध्या, पुण्यातील गर्दीच्या अनेक रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी पदपथ उपलब्ध नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुले यांना वाहनांच्या गर्दीतून वाट काढत चालावे लागते किंवा अनेकदा मागून येणारी वाहने दिसत नसल्याने छोटे-मोठे अपघातही होतात. तसेच मोठ्या चौकांत रस्ते ओलांडण्यासाठी कार्यान्वित असलेल्या पादचारी सिग्नलचे काटेकोरपणे पालन केले जात नसल्यानेही पादचाऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.
.............................

सध्या पादचाऱ्यांसाठी धोकादायक परिस्थिती का?

सुरक्षित व वापरायोग्य पदपथांचा अभाव

रस्ता ओलांडण्यासाठी असुरक्षित मार्ग

वाहनांची वाढलेली संख्या व वाहनांचा जास्त वेग

सिग्नलविरहित रस्ते

बेशिस्त वाहनचालक
.............................................
समितीने पादचाऱ्यांसाठी सुचवलेली मार्गदर्शक तत्त्वे

रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित व सोयीस्कर मार्ग

रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना कमाल २०० मीटरपेक्षा जास्त वळसा पडणार नाही याची दक्षता घ्यावी

बस स्टॉपच्या ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी ५० मीटरपेक्षा जास्त वळसा नको
...................................

रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांना खूप वळसा पडत असेल, तर नागरिक रस्ता दुभाजकावरून उडी मारून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी कमीत कमी अंतर चालावे लागेल, या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

- प्रशांत इनामदार, समन्वयक, पेडेस्ट्रियन फर्स्ट


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचे नियोजन नागरिकांनीच करावे

$
0
0

आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पाण्याचे नियोजन सरकार करू शकत नाही. ते नागरिकांनीच केले पाहिजे. फ्रान्समध्ये पाण्याच्या नियोजनासंबंधीचे कायदे सरकारकडून घेतले जात नाहीत. तेथे पाणी नियोजनासाठी नदीसंसद निर्माण करण्यात आली आहे. ही संकल्पना आपल्या देशात रुजवण्याची गरज आहे. त्यासाठी लोकसंघटनेची आवश्यकता आहे,' असे मत आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी सोमवारी मांडले.

समन्यायी हक्क पाणी परिषदेतर्फे 'चिकोत्रा उपखोरे प्रकल्प : एक पथदर्शी प्रयोग' या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी, 'सिंचन सहयोग'चे अध्यक्ष दि. मा. मोरे, सिंचन कायद्याचे अभ्यासक प्रा. प्रदीप पुरंदरे, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, परिषदेचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील चिकोत्रा उपखोरे येथे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाण्याच्या समन्यायी वाटपाचा प्रयोग राबवण्यात येत आहे. हा प्रयोग राज्यासाठी पथदर्शी ठरू शकतो का, याबाबत तज्ज्ञांनी विचारविनिमय केला.

'पाण्याशी संबंधित गोष्टींच्या विकासासाठी नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. तांत्रिक आणि कायद्याच्या बाबींचा अभ्यास करावा लागतो. तसेच सामाजिक एकात्मतेकडेही लक्ष द्यावे लागते. चिकोत्रा उपखोऱ्यात पाणीवाटप करताना ते मोजून देण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना पाण्याचे अत्यंत काटकसरीने नियोजन करावे लागणार आहे,' असे डॉ. चितळे यांनी सांगितले. 'पाणी मोजून देण्याची व्यवस्था तयार होईपर्यंत समन्यायी पाणीवाटपाला अर्थ नाही. पाणी मोजून देण्याची मानसिकता तयार होणे गरजेचे आहे,' असे मोरे म्हणाले. पाणी सर्वांना समान मिळाले पाहिजे, अशी भूमिका माधव भांडारी यांनी मांडली. चिकोत्रा उपखोऱ्यातील केवळ सहा नव्हे, तर सर्व ५२ गावांच्या समावेशासाठी मुख्यमंत्र्यांमार्फत पाठपुरावा करण्याचे आश्वासन भांडारी यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कात्रज डेअरी एक्स्पो पुढील आठवड्यात

$
0
0

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांना या व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत 'कात्रज डेअरी एक्स्पो २०१५'चे आयोजन करण्यात आले आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कात्रज डेअरीच्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पवार यांच्या वाढदिवशी १२ डिसेंबर रोजी वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर होणार आहे. १३ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कात्रज डेअरी एक्स्पोचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य चित्रपट महोत्सव ११पासून

$
0
0

पुणे : पी. एम. शहा फाउंडेशनतर्फे पाचवा आरोग्य चित्रपट महोत्सव ११ आणि १२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवातून बालकांच्या आरोग्याच्या आणि हक्कांच्या विषयांवर भाष्य करणारे चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे हा महोत्सव होणार असून, महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे, राष्ट्रीय ​चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आणि विशेष कार्यकारी अधिकारी संतोष अजमेरा उपस्थित राहणार असल्याचे फाउंडेशनचे संचालक अॅड. चेतन गांधी यांनी सांगितले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरदार महिलांसाठी बांधणार वसतिगृह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी समाजकल्याण खात्याच्या पुणे विभागातर्फे वसतिगृह बांधण्यात येणार आहे. हे वसतिगृह अनुसूचित जातीतील महिलांसाठी असणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने नऊ ऑक्टोबर रोजी घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी 'कार्यक्रम आराखडा' तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरव राव यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, अनुसूचित जातीतील नोकरी करणाऱ्या महिलांसाठी समाजकल्याण खात्याच्या पुणे विभागाकडून वसतिगृह बांधण्याची योजना असल्याचे निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितले.

डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाजकल्याण विभाग, पुणे जिल्हा परिषद, उपविभागीय कार्यालये, तहसील कार्यालये आणि अन्य विभागांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्याही सूचना आहेत. त्यामध्ये समता, सामाजिक न्याय, वैज्ञानिक जाणीव-जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन आदी विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. ​जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्येही या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकांचे वाटप आणि वाचन करून उद्देशिका फ्रेम करून बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

डॉ. आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी केलेले कार्य, तसेच समता अणि सामाजिक न्याय या विषयांच्या अनुषंगाने चित्ररथ तयार करण्याचेही संबंधित विभागांना सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे ते रत्नागिरी सायक्लोथॉन

$
0
0

पुणे : समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने मुकुल माधव फाउंडेशन (एमएमएफ) आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या सहकार्याने पुणे ते रत्नागिरी सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही सायक्लोथॉन आठ ते १२ डिसेंबरदरम्यान चालणार आहे.

उपक्रमात 'बायसिकल्स एंजल्स'चा सहभाग आहे. पाच दिवसांच्या सायकल प्रवासादरम्यान 'बायसिकल एंजल्स'च्यावतीने गरजू व्यक्तींना उपजीविकेसाठी सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने शिरवळ, उंब्रज, कोकरुड, आणि पाली या चार जिल्हा परिषद शाळांमध्ये वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. 'बायसिकल एंजल्स'चे संस्थापक, चित्रपट निर्माते राकेश बक्षी आणि इंग्लंडमधील प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ प्रा. राम धिल्ला हे दोन व्यावसायिक सायकलपटू आणि 'एमएमएफ'ची टीम हा प्रवास करणार आहे, अशी माहिती 'एमएमएफ'च्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया यांनी दिली.

गेल्या वर्षीच्या सायक्लोथॉनमध्ये दोन हजार ३१३ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती, तर २७ विद्यार्थ्यांना चष्मे वाटण्यात आले होते. सेरेब्रल पाल्सीच्या मुलांसाठी येत्या जानेवारी २०१६पर्यंत बसण्याच्या विशेष खुर्च्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रदूषणाविरोधात सायकलवर जनजागृती

$
0
0

ध्येयवेड्याची काश्मीर ते कन्याकुमारी जनजागृती फेरी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रदूषणाच्या मुद्द्यावरून ऐन थंडीत दिल्लीचे वातावरण तापले आहे. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालावा? यासाठी प्रत्येकजण शक्कल लढवतोय. मात्र, बारामतीच्या एका धडपडी व्यक्तीने केवळ चर्चा करत न बसता, 'सायकल चालवा पर्यावरण वाचवा,' असा संदेश देण्यासाठी थेट काश्मीर ते कन्याकुमारी, अशी सायकल फेरी सुरू केली आहे. धैर्यशील पवार असे या ध्येयवेड्याचे नाव आहे.

पवार बारामती तालुक्यातील माळेगावचे. तेथील एका डिप्लोमा इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये पर्यवेक्षक म्हणून ते काम करतात. वयाची पंचेचाळीशी गाठलेल्या पवार यांना सायकल चालविण्याचा छंद आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी सायकल चालविणे हा उत्तम पर्याय असल्याचे पवार मानतात आणि म्हणूनच सायकलचा वापर वाढविण्याचा संदेश घेऊन त्यांनी काश्मीरमध्ये श्रीनगर येथील लाल चौकापासून आपली संदेश यात्रा सुरू केली आहे.

श्रीनगर ते कोल्हापूर हा सुमारे २७०० किलोमीटरचा टप्पा त्यांनी नुकताच पार केला. वाटेत काही थरारक, तर काही गमतीशीर अनुभव आल्याचे पवार यांनी सांगितले.

अगदी सायकल पंक्चर होणे, टप्प्या-टप्प्यांवर होणारा तापमानातील बदल आणि अचानक आलेली पावसाची सर, यामुळे हा अनुभव अनोखा होता. तसेच या प्रवासाच्या टप्प्यात जयपूर ते उदयपूर हा प्रवास लक्षात राहणारा होता, असे पवार यांनी सांगितले. रोज किमान दीडशे किलोमीटर अंतर पार करण्याचे नियोजन असल्याची माहिती पवार यांनी दिली.

श्रीनगर ते कन्याकुमारी असा एकूण प्रवास सुमारे ३६०० किलोमीटरचा आहे. पवार यांच्या या जनजागृती मोहिमेला कोणताही प्रयोजक नाही. पवार यांनी स्वखर्चातून मोहिमेची आखणी केली आहे. पवार यांची जनजागृती मोहीम पुण्यापर्यंत आल्यानंतर अजिंक्य पोळेकर हा बावीस वर्षीय तरुण त्यांच्या मोहिमेत सहभागी झाला. पुणे ते कन्याकुमारी या प्रवासात तो पवार यांनी साथ देणार आहे.

येथील जायंट ग्रुपचे विलास शेटे (मिरज), प्रभाकर पाटील, इंद्रजित महादार, विनोद कांबोज, तसेच वाइल्ड क्राफ्टचे सुचित हिरेमठ आणि सुनील शिर्के यांनी पवार यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

स्वागत अन् कौतुकही

'सायकल चालवा, पर्यावरण वाचवा,'...'इंधन वाचवा, पर्यावरण वाचवा,' आणि 'सायकल है जहाँ, तंदुरुस्ती है वहाँ,' असा संदेश देणारे फलक घेऊन पवार यांनी मोहीम सुरू केली आहे. या प्रवास भेटलेल्या अनेकांनी त्यांच्या या मोहिमेचे कौतुक केले. त्यांचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

​तरुणांनी फेसबुक आणि व्हॉट्स अॅपमधून बाहेर पडून सायकलिंग संदर्भात जनजागृतीसाठी पुढे यावे. किमान आठवड्याच्या सुटीदिवशी सायकल चालवून पर्यावरण रक्षणाला हातभार लावावा.

- धैर्यशील पवार, पर्यावरणप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉल, हॉटेलचालकांवर ‘कृपा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी-निगडी या पट्ट्यात नव्याने मॉल आणि मल्टिप्लेक्स थिएटर उभे राहिले आहेत. पण, यातील अनेकांकडे पुरेसे पार्किंग नसल्याने येथे येणारी वाहने रस्त्यावर उभी केली जातात. मात्र, या वाहनांवर अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने पोलिस मॉलचालकांवर चांगलेच मेहेरबान झाल्याचे दिसून येते.

निगडी-दापोडी-निगडी पट्ट्यातील नियोजित बीआरटी प्रकल्प रेंगाळला आहे. काही महिन्यांपूर्वी याठिकाणी आवश्यक रेलिंग लावून एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे.

दापोडी, मोरवाडी, चिंचवड स्टेशन, काळभोरनगर, निगडी, पिंपळे सौदागर रस्ता आदी ठिकाणी मोठे मॉल आणि मल्टिप्लेक्स आहेत; तर चिंचवडगाव, प्राधिकरण, अजमेरा, कासारवाडी, पिंपळे सौदागर, वाकड-हिंजवडी येथे अनेक चेन मार्केटिंगची शोरूम आहेत. यातील काही मोजकी ठिकाणे वगळता अनेकांकडे पुरेसे पार्किंग नाही.

मॉल, मल्टिप्लेक्स सुरू करताना त्यांना पुरेसे पार्किंग आहे का, हे पाहण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची असते. मात्र, अनेकांकडे पुरेसे पार्किंग नसताना देखील ना-हरकत प्रमाणपत्र दिल्याचे प्रकार घडले आहेत.

शहरात वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांना नोकरी-कामधंद्यासाठी जाण्या-येण्यासाठी घरातून काही तास आधी निघावे लागते. पण, कोंडी मोडून काढण्यात आणि बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पुणे आयुक्तालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीकडे दुर्लक्ष होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांकडून चिरीमिरी गोळा करून वाहतूक कोंडीकडे सध्या कोणाचेच लक्ष नसल्याचे चित्र आहे.

पार्किंगच्या जागेत हॉटेल

पिंपरी-चिंचवडमधील बहुतांश हॉटेल पार्किंगच्या जागेतच थाटण्यात आली आहेत. त्यामुळे या हॉटेलना पार्किंग आहे का, असा प्रश्न पडतो. तसेच, अनेक हॉटेलना पार्किंग नाहीत; पण याकडे देखील वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष केले जाते. दापोडीपासून ते निगडी आणि हिंजवडीपासून ते मोशीपर्यंत अशा प्रकारची ४५९ हॉटेल आहेत. विशेष म्हणजे या हॉटेलवर अद्याप एकदाही कारवाई झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत एक वेळ पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पाऊस कमी झाल्याने पिंपरी-चिंचवडकरांना उन्हाळ्याच्या काही महिने आधीपासूनच पाणीकपातीला समोरे जावे लागणार आहे. उद्या, गुरुवारपासून शहराला एक वेळ पाणीपुरठा करण्यात येणार असून, सध्या १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. पाणीकपातीचे धोरण अवलंबविले असले सर्वांना पुरेशा दाबाने पाणीपुरठा केला जाणार असल्याचे महानगरपालिका आयुक्त राजीव जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात अपुरा पाणीसाठा आहे. यापूर्वीच महापालिकेने शहरातील काही भागांमध्ये एकवेळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरात समान पाणीकपात लागू करण्याची मागणी होत होती. त्यातच धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने महापालिकेवर शहरातील सर्व भागात पाणीकपात करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त राजीव जाधव यांनी मंगळवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेत पाणी कपातीचे धोरण ठरविण्याचा निर्णय घेतला.

पवना धरणात अवघा ६६ टक्के पाणीसाठा असून हा साठा पुढील सात महिने पुरवावा लागणार आहे. त्यामुळे आतापासूनच पाणीकपातीचे नियोजन करावे लागणार असल्याने कपातीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, सर्व शहराला गुरुवारपासून एकवेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. ज्याठिकाणी तीन ते चार तास पाणीपुरवठा होतो अशा भागातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत किमान १५ मिनिटांची कपात केली जाणार आहे. सरसकट १० टक्के पाणीकपात या माध्यमातून होईल. ज्याठिकाणी तीन ते चार तास पाणीपुरवठा होतो, त्याठिकाणी पाणीपुरवठ्याची वेळ कमी करण्यात येणार आहे.

उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, क्रीडा समिती अध्यक्ष समीर मासुळकर, शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे, नगरसेविका शमीम पठाण, वर्षा मडिगेरी आदींसह नगरसदस्य आणि पिंपरी-चिंचवड शहर अभियंता महावीर कांबळे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता जयंत बरशेट्टी आदी उपस्थित होते.

बैठकीत नगरसदस्य आमने-सामने

पाणीकपातीचे धोरण धरविण्यासाठी आयुक्तांनी पक्षनेत्यांची बैठक घेतली. यामध्ये आयुक्त माणसे बघून सध्या निर्णय घेत असल्याचा आरोप नगरसेविका शमीम पठाण यांनी केला. 'जे जास्त आरडा-ओरड करतात त्यांना सवलती जास्त दिल्या जातात, असे धोरण आयुक्तांनी घेऊ नये,' असे सांगत मंगला कदम यांनी एलइडी दिवे बसविताना असाच प्रकार घडल्याचे सांगत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच, 'वैयक्तिक बाबींवर नंतर बोला,' असे सांगत शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे यांनी म्हटल्याने पठाण-उबाळे यांच्यात वाद झाला. दरम्यान, 'ज्या अधिकाऱ्यांना काम करायचे नसेल त्यांची बदली करा; परंतु पाणीपुरवठा व्यस्थित करा,' असे सांगत बैठक उरकती घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याला लांब ठेवण्याचा ‘जुगाड’

$
0
0

धर्मेंद्र कोरे, जुन्नर

जुन्नर-आंबेगावच्या पश्चिम भागात बिबट्याचा उपद्रव टाळण्यासाठी आणि शेताशिवारात येणाऱ्या बिबट्याला दूर ठेवण्यासाठी अनोखा फंडा वापरला जात आहे. झाडावर विशिष्ट पद्धतीने टांगलेला तेलाचा डबा आणि त्याच्या चारही बाजूला लटकवलेले लाकडी दांडू अशा हलत्या उपाययोजनेची ही आयडिया पाहायला मिळत आहे.

हातवीज, पिंपरगणी या दुर्गम भागात शेतकऱ्यांकडून हा उपाय केला जात आहे. केवळ बिबट्याच नव्हे, तर रानडुकरांना पळवून लावण्यासाठीही याचा उपयोग होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

रिकामा तेलाचा डबा घेऊन त्याच्याभोवती लाकडाचे छोटे ठोकळे लोंबतील अशा प्रकारे बांधले जातात; तर डब्याच्या खाली प्लास्टिकची पिशवी लोंबकळत सोडली जाते. हे साधन उंच झाडाच्या फांदीला ऊंचीवर लोंबकळत बांधले जाते. त्यामुळे वारा वाहतो, तशी पिशवी जोरात हालते व लाकडी ठोकळे या डब्यावर आदळतात. त्यामुळे डबा जोरात वाजायला लागतो. डब्याच्या आवाजामुळे वानर, रानडुकरे पिकांजवळ फिरकत नाहीत. बिबटेही शेतात येत नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हटले जाते. त्यामुळेच बिबट्याला दूर ठेवण्यासाठी शोधलेली ही आयडिया शेतकऱ्यांना अत्यल्प खर्चात उपयोगी ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एटीएम’मधून आली पाचशेची बनावट नोट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड

शहरातील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाशेजारील एचडीएफसी एटीएम केंद्रातून 'फेक नोट' असा शिक्का असलेली नोट ग्राहकाला मिळाली आहे. याबाबतची लेखी तक्रार वंदना पाटसकर यांनी बँकेच्या दौंड शाखेकडे व दौंड पोलिस ठाण्यात केली आहे. दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाशेजारील एचडीएफसी एटीएम केंद्रात पैसे काढण्यास गेल्या त्यांनी कार्डाद्वारे एक हजार रुपये काढले त्यात 'फेक नोट' असा शिक्का मारलेली पाचशेची नोट (६ डीसी ७३२८२३ ) आली . ती नोट पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. अशा प्रकारे न पाहता चलनातून बाद केलेली नोट एटीएम केंद्रातून कशी वितरित होते. ही नोट त्यांनी तेथे पैसे काढण्यासाठी आलेल्या दोघांना दाखवली. नंतर त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने 'एचडीएफसी' बँकेच्या दौंड शाखेत व पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. सदर एटीएम केंद्रातील 'सीसीटीव्ही'चे चित्रण पाहून मुख्य शाखेला कळवून ती नोट बदलून देण्याची मागणी त्यांनी तक्रारीद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीविषयी अपशब्द वापरल्याने खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

मित्राला व्याजाने दिलेले पैसे परत मागताना पत्नीविषयी अपशब्दाचा वापर केल्याने दोघा साथीदारांनी रागाच्या भरात मित्राचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. आरोपींनी खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकल्याची धक्कादायक घटना खराडी येथे घडली.

नाना पांडुरंग डबडे (वय ३२, रा. गल्ली क्रमांक १, राजाराम पाटील नगर, खराडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश भगवान मोरे (वय २८, रा. रेडिसन हॉटेलच्या मागे, खराडी) आणि माऊली उर्फ ज्ञानोबा रुस्तुम मेढे (वय २८, वाडेश्वरनगर, खराडी) यांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. नाना बेपत्ता झाल्याची नोंद २८ नोव्हेंबरला पोलिसांत दाखल झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश मोरे याने मयत नाना डबडेकडून ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यानुसार गणेश दर महिन्याला व्याज देत होता. २७ नोव्हेंबरला गणेश, नाना आणि माऊली असे तिघे जण कारमध्ये (एमएच १ जीए ७४८२) खराडी जवळील मैदानावर दारू पिण्यास बसले होते.

कारमध्ये बराच वेळ दारू पिल्यानंतर नाना आणि गणेश यांच्यात पैशांवरून वाद सुरू झाला. त्यावेळी गणेशच्या पत्नीविषयी अपशब्द उच्चारल्याने गणेशने माउलीच्या मदतीने नानाचा दोरीने गळा आवळून खून केला. आपल्या हातून खून झाल्याचे लक्षात दोघांनी नानाचा मृतदेह कारमधून वाघोलीतील राहू रोडवरील उसाच्या शेतात नेला. तिथे नानाच्या अंगावरील सोने, मोबाइल आणि पैसे काढून घेतल्यानंतर मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळून टाकला. त्यानंतर गणेश आणि माऊली बेंगळुरूला पळून गेले.

पोलिसी खाक्या दाखवताच खून केल्याचे दोघा आरोपींनी कबुल केले. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा दोघांना अटक करण्यात आली. पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त स्वप्ना गोरे, पोलिस निरीक्षक संजय पाटील, अनिल पात्रुडकर आणि पोलिस कर्मचारी सोमवारी रात्री उशिरापर्यंत राहू रोडवरील शेतात मृतदेह शोधण्यात गुंतले होते. मंगळवारी सकाळी मयत नानाचा मृतदेह अर्धवट जाळलेल्या अवस्थेत सापडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर

$
0
0

१ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (एसएससी/एचएससी बोर्ड) २०१६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांची सविस्तर वेळापत्रके जाहीर झाली आहेत. राज्य बोर्डाने आपल्या https://mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ही वेळापत्रके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहेत.

बोर्डाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या या वेळापत्रकांनुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १८ फेब्रुवारीपासून लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांना नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी २२ मार्च २०१६ पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. बायफोकल विषयांसाठी नोंदणी केलेल्या आणि इतर नेहमीच्या विषयांसह बारावीला बसलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा २८ मार्चला संपणार आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १ मार्च २०१६ ला सुरू होणार आहे. नेहमीच्या विषयांसह दहावी देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा २२ मार्चला संपणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात द्वितीय भाषा, तृतीय भाषा, कौशल्य विकास अभ्यासक्रम आदी विषयांच्या परीक्षा होणार आहेत. दहावीची परीक्षा २९ मार्चला संपणार असल्याचेही बोर्डाच्या वेबसाइटवर उपलब्ध वेळापत्रकावरून स्पष्ट होत आहे. 'ही वेळापत्रके संबंधित शाळा-कॉलेजांमध्ये छापील स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार असून, छापील वेळापत्रकांनुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या नियोजनाचा विचार करावा,' असे बोर्डातर्फे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शुक्रवारी होणार गारपीट?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात थंडीचा जोर वाढू लागतानाच आता ११ ते १४ डिसेंबर या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट आणि पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार ११ तारखेला (शुक्रवार) दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपीट आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. तर, आणखी दोन मॉडेलनुसार ११ ते १४ डिसेंबर या कालावधीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

दक्षिणेकडे सध्या ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय असून, उत्तरेकडील राज्यांत पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडी आणि दाट धुक्याची स्थिती आहे. येत्या आठवड्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचीही शक्यता 'आयएमडी'ने वर्तवली आहे. अशा स्थितीत या दोन भिन्न हवामानाच्या स्थितींचा संयोग होऊन महाराष्ट्रात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एल निनोच्या काळात पश्चिमेकडून येणारे थंड आणि कोरडे वारे तसेच, पूर्वेकडून येणारे बाष्पयुक्त वारे यांचा संयोग होऊन हिवाळ्यात गारपिटीच्या घटना घडल्याचे गेल्या दोन वर्षांत आढळून आले आहे. यंदाही तशीच स्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा यापूर्वीच हवामानतज्ज्ञांनी दिला होता.

'आयएमडी'च्या अंदाजानुसार ११ तारखेला दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि तेलंगण या विभागांत काही ठिकाणी गारपीट आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. अमेरिकेच्या नोआ संस्थेच्या मॉडेलनुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ११ ते १४ डिसेंबरदरम्यान अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

इंडियन इ​न्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रिओलॉजीच्या (आयआयटीएम) मॉडेलनुसार ११ ते १४ डिसेंबर दरम्यान दक्षिण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांतील गारपिटीचा अनुभव लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामानतज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनो, काळजी घ्या...

काढणीला आलेल्या पिकाची आणि तोडणीला आलेल्या भाज्यांची कामे लवकर करावीत. काढून ठेवलेल्या पिकाच्या निवाऱ्याची व्यवस्था करावी.

शक्य असल्यास फळांना आच्छादनाची सोय करावी.

ढगाळ हवामान असताना जनावरे, गाई- म्हशी, कोंबड्यांना बाहेर सोडू नये.

काळे ढग दाटून आल्यास घराबाहेर पडू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोचा अहवाल केंद्राच्या कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थानिक पातळीवरील सर्व अडथळ्यांची शर्यत पार करून अखेर पुणे मेट्रोचा सुधारित प्रकल्प अहवाल केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. अनेक वर्षे केवळ चर्चेच्या ट्रॅकवर रखडलेल्या मेट्रोला आता तरी मंजुरीचा अखेरचा धक्का लवकर मिळावा, अशी पुणेकरांची अपेक्षा आहे.

पुणे मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) २००९मध्ये सर्वप्रथम कागदावर उतरला. तेव्हापासून या अहवालावरील धूळ झटकण्याचे काम राज्यातील तत्कालीन आघाडी आणि केंद्राच्या यूपीए सरकारने अधूनमधून केले. देशातील पुण्यासारख्या इतर शहरांमध्ये मेट्रोच्या अहवालानुसार प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली असताना, पुण्यात विरोधाचे सूर वाढत गेले. त्यामुळे, मेट्रो चर्चेच्या यार्डातून बाहेरच पडू शकली नाही.

गेल्या वर्षी केंद्रात आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तरी मेट्रोच्या अहवालाला 'अच्छे दिन' येतील, अशी पुणेकरांची अपेक्षा होती. मात्र, शहराच्या खासदारांनीच हा अहवाल सदोष असल्याची टीका करून मेट्रोच्या प्रगतीत आणखी अडथळे निर्माण केले. अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने मेट्रोच्या मार्गात अंशतः बदल करण्याचा अहवाल दिला. हा अहवाल स्वीकारून केंद्राने खर्चाचा सुधारित अंदाज तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले. गेल्या आठवड्यात दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) पालिकेला ११ हजार ५२२ कोटी रुपयांचा अहवाल सादर केला असून, पालिकेने तो तातडीने राज्य सरकारकडे पाठविला.

राज्याच्या नगरविकास विभागातर्फे पुणे मेट्रोच्या सुधारित खर्चाचा अहवाल केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. या अहवालाची तपासणी करून तो केंद्राच्या अर्थविषयक समितीच्या मंजुरीसाठी (पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड-पीआयबी) पाठविण्यात येणार आहे. पीआयबीच्या मंजुरीनंतर मेट्रोवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेची अंतिम मोहोर उमटणे गरजेचे असून, ही प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी, अशी पुणेकरांची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवाब मलिक यांना पुणे कोर्टाचे समन्स

$
0
0

पुणेः पत्रकार परिषदेत आरोप केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरुद्ध राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी कोर्टात दाखल केलेल्या दाव्याप्रकरणी कोर्टाने मलिक यांना समन्स बजावले आहे. त्यानुसार त्यांना १९ डिसेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

बापट यांनी जिल्हा न्यायालयात मलिक यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. 'नवाब मलिक यांनी १९ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी बापट यांनी तूरडाळीचे निर्बंध शिथिल करून डाळ विकण्यास परवानगी देऊन दोन हजार कोटींचा घोटाळा केला. बापट हे भ्रष्टाचारी असल्याने त्यांना त्वरित मंत्रिपदावरून हटवावे,' असे आरोप केले होते. हे वृत्त विविध वृत्तवाहिन्या आणि पुण्यातील दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यामुळे आपली बदनामी झाल्याचे बापट यांनी कोर्टातील जबाबात म्हटले होते.

माल जप्त केला त्याची किंमत ५४० कोटी रुपये होती. त्यामध्ये तूरडाळ १४० कोटींची होती. बाँडवर जी डाळ पुन्हा बाजारात आणली तिची किंमत ४३ कोटी होती. त्यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. मलिक यांना मागील निवडणुकीतील पराभव पचवता आलेला नाही, असे बापट म्हणाले.

कलम ५०० नुसार गुन्हा

तक्रारदार यांनी कोर्टात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन आरोपीने तक्रारदार यांची बदनामी करणारे वक्तव्य केले असून हा प्रकार भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ५०० नुसार गुन्हा आहे. या प्रकरणी मलिक यांना समन्स बजावण्यात येत असल्याचे कोर्टाने आदेशात नमूद केले आहे. १९ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’चे भवितव्य धोक्यात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'स्मार्ट सिटी'योजनेतील सहभागातून केंद्र सरकारचे तुटपुंजे अनुदान मिळविण्यासाठी नागरिकांवर करांचा बोजा लादण्यात आणि स्वतंत्र कंपनीसाठी (स्पेशल पर्पज व्हेइकल) पालिकेची स्वायत्तता धोक्यात घालण्यावरून राजकीय पक्षांमध्ये कमालीची मतभिन्नता आहे. भाजप वगळता इतर पक्षांचा 'स्मार्ट सिटी'योजनेला पाठिंबा मिळविण्यासाठी गेले दोन दिवस पालिका आयुक्तांनी सर्व शक्ती पणाला लावली असली, तरी योजनेच्या भवितव्यावर आज, बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

'स्मार्ट सिटी'योजनेसाठी सुमारे साडेतीन ते चार हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातील पाचशे कोटी रुपये केंद्राकडून, तर अडीचशे कोटी रुपये राज्याकडून अनुदान स्वरूपात मिळणार आहेत. उर्वरित निधी उभारण्याची जबाबदारी पालिकेवर पडणार असून, 'एसपीव्ही'मार्फत योजनेची अंमलबजावणी होणार असल्याने त्यावर पालिकेचे नियंत्रणच राहणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 'स्मार्ट सिटी'अंतर्गत क्षेत्रनिहाय विकास (एरिया डेव्हलपमेंट) साधण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून वाढीव कर आकारला जाण्याची शक्यता आहे. 'एसपीव्ही'मुळे पालिकेच्या अधिकारांवर गदा येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे, भाजप वगळता इतर राजकीय पक्षांतर्फे विकासासाठी 'स्मार्ट सिटी'ला पाठिंबा असल्याचे दर्शविले जात असले, तरी पालिकेच्या अस्तित्वाला धोका पोहोचेल, अशा प्रस्तावास आणि पुणेकरांवर करांचा बोजा वाढविण्यास मान्यता दिली जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून केवळ 'स्मार्ट सिटी' प्रकल्पावरच लक्ष केंद्रित केलेल्या पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी अखेरच्या टप्प्यातही राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी मंगळवार रात्रीपर्यंत शिकस्त सुरू ठेवली होती. प्रमुख राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची थेट संवाद साधून त्यांनी स्मार्ट सिटीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

'एसपीव्ही'ला विरोध?

'स्मार्ट सिटी'च्या सविस्तर आराखड्यात औंध-बाणेर, बालेवाडीच्या क्षेत्रनिहाय विकास प्रकल्पात सर्व प्रकारचे कर आकारण्याची मुभा 'एसपीव्ही'ला देण्याची धक्कादायक अट समाविष्ट करण्यात आल्याचे समजते. पालिकेच्या अॅमेनिटी स्पेसच्या जागाही 'एसपीव्ही'ला द्याव्यात, असे बंधनही लादण्यात आले आहे. या परिसरात निर्माण होणाऱ्या सुविधांसाठी 'एसपीव्ही'ला नागरिकांकडून अतिरिक्त कर वसूल करता येणार आहे. त्यामुळे, नाशिक आणि नवी मुंबईपाठोपाठ पुणे महापालिकेतही 'एसपीव्ही'च्या स्थापनेला तीव्र विरोध होण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रिणीच्या हौसेपोटी तरुणाकडून दुचाकीचोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात दुचाकीवर बसून फिरण्याची हौस मैत्रिणीने बोलून दाखविली.. मात्र, स्वतःकडे दुचाकी नसल्याने मैत्रिणीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. चोरलेल्या गाडीतील पेट्रोल संपेपर्यंत मैत्रिणीला घेऊन फिरायचे आणि पेट्रोल संपले की दुचाकी सोडून द्यायची, अशी सवयच त्याला लागली. अखेर हा तरुण पोलिसांच्या तावडीत सापडला असून, त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

आलोक गणेश चोंदे (वय २३, रा. फ्लॅट नं. ७२, मयुरेश्वर सोसायटी श्रीधरनगर, धनकवडी) असे या तरुणाचे नाव आहे. बालाजीनगर येथे एक तरुण चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती सहकारनगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी संजय भापकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पवार हॉस्पिटलजवळ सापळा रचला आणि पाठलाग करून आलोकला पकडले. त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे आढळून आले. अधिक चौकशी केली असता, त्याच्या दुचाकी चोरीमागील रंजक कहाणी समोर आली.

आलोक अनाथ असून, त्याचे नववीपर्यंत शिक्षण झाले आहे. शिक्षण सोडल्यानंतर त्याला वाईट संगत लागली आणि साथीदारांबरोबर तो गाड्यांमधील पेट्रोलचोरी करीत असे. दरम्यान, त्याची एका तरुणीसोबत ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये झाले. त्या मैत्रिणीने आपल्याला दुचाकीवर फिरायची हौस असल्याचे सांगितले. पण, त्याच्याकडे दुचाकी नसल्यामुळे त्याने परिसरातील दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. सहकारनगर आणि भारती विद्यापीठ परिसरातून चोरलेल्या सहा दुचाकी त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीश्रक शशिकांत शिंदे, पोलिस उपनिरीक्षक एस. एम. खानविलकर, पोलिस नाईक संजय भापकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images