Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

स्कूल व्हॅनच्या धडकेत महिलेचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भरधाव स्कूल व्हॅनच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पाषाण येथील रिलायन्स फ्रेशसमोर शनिवारी सकाळी घडली. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात स्कूल व्हॅनचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

सुंदराबाई शंकर मंजावकर (वय ५१, रा. सुतारवाडी, पाषाण) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मंदार महेश सुपेकर (वय २६, रा. बावधन) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण येथील रिलायन्स फ्रेशसमोर मंजावकर या शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास रस्ता ओलांडत होत्या. त्या वेळी भरधाव स्कूल व्हॅनने त्यांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक एल. एम. नम अधिक तपास करत आहेत.

तरुणाला मारण्याचा प्रयत्न

बिबवेवाडी येथे पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. भिवा शिंदे (वय २५, रा. पवननगर चाळ, बिबवेवाडी) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर खुनी हल्ला केल्याच्या आरोपावरून आकाश सिद्धराम गवंडी (वय २२), सिद्धराम भगवान गवंडी (वय ५१) आणि विकास सिद्धराम गवंडी (वय २०, रा. पवननगर चाळ, बिबवेवाडी) अशी अटक

केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे व आरोपी एकाच परिसरात राहण्यास आहेत. त्यांच्यात यापूर्वीदेखील भांडणे झाली होती. त्या भांडणाचा आरोपींच्या मनात राग होता. शुक्रवारी रात्री शिंदे यांच्या घरातील पाणी आरोपींच्या दारासमोर गेले. या कारणावरून आरोपींनी शिंदे यांना हाताने आणि तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक सपकाळे अधिक तपास करत आहेत.

शिवाजीनगर येथे तरुणाला लुटले

हॉटेलमध्ये जेवण करून घरी निघालेल्या तरुणाला शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर लुटल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी तीन व्यक्तींविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दलपत गुजर (वय २६, रा. ताडीवाला रोड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजर शिवाजीनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. जेवण केल्यानंतर रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्रजवळ ते रिक्षाची वाट पाहत होते. त्या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांना दमदाटी व मारहाण करून त्यांच्याजवळील तीस हजार रुपये लुटून नेले. या प्रकरणी त्यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक रामेकर अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टोलनाक्याचा अहवाल आज सादर करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावरून तीन मिनिटांच्या आत वाहनचालकांना सोडण्यात येते का, याची पाहणी विशेष पथकाकडून पाच आणि सहा डिसेंबर या दोन दिवशी करण्यात आली. त्याचा अहवाल सात डिसेंबरला जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाणार असून, त्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.

या पथकाकडून सकाळी आणि सायंकाळी टोलनाक्यावर थांबून व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे. त्याचा अहवाल सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे देण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितले. खेड शिवापूर येथील टोलनाक्याबाबत वाहनचालकांच्या तक्रारी आल्यामुळे या टोलनाक्यावरून जाण्यासाठी किती अवधी लागतो, याची पाहणी करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाकडून पाच आणि सहा डिसेंबर रोजी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे. या विशेष पथकामध्ये हवेली आणि भोरचे प्रांत, रिलायन्स कंपनीच्या प्रतिनिधींचा समावेश होता. टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी तीन मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागला, तर करारानुसार संबंधित वाहनांकडून टोल घेता येत नाही. मात्र, या टोलनाक्यावर वाहनचालकांना जास्त वेळ थांबावे लागते, अशा तक्रारी वाहनचालकांकडून करण्यात आल्या आहेत. टोलनाक्यावर तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाहने थांबू नयेत, यासाठी व्यवस्था करण्याचे आदेश हा टोलनाका चालविणाऱ्या रिलायन्स कंपनीला जिल्हा​धिकारी सौरभ राव यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्री साहित्य संमेलन १२, १३ डिसेंबरला

$
0
0

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

साहित्यिक आणि सांस्कृतिक विश्वात पन्नास वर्षांहून अधिक काळ साहित्यविषयक कार्यरत असलेल्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वतीने येत्या १२ आणि १३ डिसेंबर रोजी स्त्री साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे आहेत.

या वेळी डॉ. मंदा खांडगे, डॉ. निलीमा गुंडी आणि डॉ. ज्योत्स्ना आफळे यांनी संपादित केलल्या २००१ ते २०१० या कालावधीतील स्त्री साहित्याचा मागोवा या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. द. ना. धनागरे यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. विलास खोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर्स ऑफ कॉर्मस येथील सभागृहात होणार आहे, अशी माहिती डॉ. खांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या वेळी डॉ. गुंडी, डॉ. ज्योत्स्ना आफळे, डॉ. कल्याणी दिवेकर उपस्थित होत्या.

ग्रंथाच्या चौथ्या अर्थात २००१ ते २०१० या कालावधीतील मराठीत स्त्री साहित्याच्या विविध अभ्यासकांनी परामर्श घेतला आहे. नव्या सहस्त्रकात स्त्रीच्या लेखन क्षेत्राचा झालेला विस्तार पाहायला मिळतो. त्याशिवाय कथा, कादंबरी, काव्य, नाटक, एकांकिका, ललित गद्य अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. डॉ. गुंडी यांनी ग्रंथाला प्रस्तावना लिहिली आहे. डॉ. खांडगे यांनी संपादकीय विवेचन केले आहे. पाचशे पानांचा हा ग्रंथ आहे.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी वार्षिक पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. प्रतिभा रानडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाणार आहे. त्या वेळी डॉ. विद्या देवधर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. हस्तलिखिताचे उद्‍घाटन ल. म. कडू यांच्या हस्ते होणार आहे.

स्त्री साहित्याचा मागोवा ग्रंथाचे प्रकाशन

डॉ. मंदा खांडगे, डॉ. निलीमा गुंडी आणि डॉ. ज्योत्स्ना आफळे यांनी संपादित केलल्या २००१ ते २०१० या कालावधीतील स्त्री साहित्याचा मागोवा या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. द. ना. धनागरे यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. विलास खोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सनातन’ साधकांवरील गुन्ह्यांची माहिती घ्या

$
0
0

पोलिस महासंचालकांचे राज्यभर आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सनातन संस्थेच्या साधकांवर (कार्यकर्त्यांवर) दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्यभरातील पोलिस दलांना दिले आहेत. हिवाळी ​अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर साधकांवरील गुन्ह्यांची माहिती गोळा करण्यात येत असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

देशभरात ​असहिष्णुतेच्या मुद्द्यावर चर्चा झडत आहेत. केंद्राच्या हिवाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. कोल्हापूर पोलिसांनी ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाड याला अटक केली. या अटकेवरून सनातन संस्थेवर बंदी घालण्यापासून विविध पद्धतीच्या टीका विरोधकांकडून करण्यात आल्या आहेत.

'सनातन'वर होत असलेल्या टीकांचे पडसाद ​नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उमटण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. त्यानुसार सनातनच्या साधकांविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. यामध्ये साधकाचे नाव, वय, पत्ता, त्यांच्यावरील गुन्ह्याची कलमे आणि तपासाची सद्यस्थिती अशी माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना सनातन संस्थेच्या साधकांवर गुन्हे दाखल असल्यास तशी माहिती तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती पोलिस महासंचालक कार्यालयास पाठवण्यात येणार आहे. पोलिस महासंचालक कार्यालय राज्यातील सर्व पोलिस दलांकडून आलेली माहिती एकत्रित संकलित करून ती राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करेल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. राज्य गुप्तवार्ता विभागाकडूनही ​अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सगळीकडची 'खबर' ठेवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन सख्ख्या भावांना मोक्का

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सहकारनगर परिसरातील खून झालेला गुंड प्रमोद उर्फ बैजू नवघणे याच्या टोळीतील सात गुंडांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. मोक्काअंतर्गत तीन सख्ख्या भावांवर एकाच वेळी आणि एकाच गुन्ह्यात कारवाई होण्याची ही पुण्यातील पहिलीच वेळ आहे.

अफसर उर्फ आदित्य श्रद्धा कांबळे (वय ३३), सुनील अनिल लिमन (वय २२), नीतेश विनायक साबळे (वय २३), अजय श्रद्धा कांबळे (वय २६, रा. सर्वजण- बालाजीनगर, धनकवडी), विजय उर्फ पप्पू बाळू कांबळे (वय २७, रा. राजापूर, ता. भोर), सागर विठ्ठल धर्मट्टी (वय २६) आणि सिद्धार्थ श्रद्धा कांबळे (वय २८, रा. बालाजीनगर, धनकवडी) अशी मोक्काची कारवाई केलेल्यांची नावे आहेत. या टोळीतील गुन्हेगारांवर खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, खंडणी, जबरी चोरी, दरोडा, घातक शस्त्राचा वापर अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. चार वर्षांपूर्वी बैजू नवघणे आणि दत्ता माने या दोघांच्या नवरात्र तोरण मंडळांच्या मिरवणुकांमधून झालेल्या भांडणातून नवघणेचा खून करण्यात आला होता. त्यानंतर या दोघांमध्ये भडकलेल्या टोळीयुद्धातून एकूण सलग पाच खून झाले होते. नवघणे टोळीतील गुंडांविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. यामध्ये नवघणे टोळीतील गुंडांवर मोक्काच्या कारवाईचा प्रस्ताव सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत शिंदे यांनी सहआयुक्त सुनील रामानंद यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार या टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त मिलिंद मोहिते करीत आहेत.

पुण्यातील पहिलीच वेळ

मोक्काअंतर्गत तीन सख्ख्या भावांवर एकाच वेळी आणि एकाच गुन्ह्यात कारवाई होण्याची ही पुण्यातील पहिलीच वेळ आहे. अफसर, श्रद्धा आणि अजय कांबळे हे तीन सख्खे भाऊ या गुन्ह्यात आरोपी आहेत. त्यांच्या आईवडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झालेले आहे. यातील अफसर आणि सिद्धार्थचे लग्न झालेले असून अजय अविवाहीत आहे. अफसरचा केबलचा व्यवसाय असून त्याच्या मालकीची टपरी भाड्याने दिलेली आहे. सिद्धार्थ आणि अजय बेरोजगार आहेत. लोकांना धमकावणे, खंडण्या उकळणे, दहशतीच्या जोरावर गुंडगिरी करणे अशा उद्योगांमुळे धनकवडीकर त्यांना वैतागले होते. दोन वर्षांची तडीपारी संपवून आल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने आकाश पवार (वय १९) याचा खून केला होता. धनकवडी, बालाजीनगर परिसरात दहशत माजवून वर्चस्व टिकवण्यासाठी त्यांनी एका तरुणाचा बळी घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३४ ठिकाणी शुकशुकाटच

$
0
0

kuldeep.Jadhav@timesgroup.com

पुणे : पुणे-बेंगळुरू महामार्गावरील विविध कामे गेल्या काही वर्षांपासून संथगतीने सुरू आहेत. ती तातडीने पूर्ण करण्याबाबत जनसामान्यांबरोबरच प्रशासनाकडूनही मागणी आणि सूचना केली जात आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे या मार्गाच्या सहापदरीकरणाच्या टप्प्यातील ३४ ठिकाणच्या कामांना अद्याप सुरुवातच झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्याचा कामाचा वेग पाहता, अडथळाविरहित पुणे-बेंगळुरू महामार्गासाठी आणखी बरेच वर्ष प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

पुणे-बेंगळुरू महामार्गावर पुणे (किवळे फाटा) ते सातारा या १४४ किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे सहापदरीकरण करण्याचे काम २०१० मध्ये सुरू झाले. मात्र, अद्याप ते पूर्ण झालेले नाही. काम पूर्ण करण्याबाबत अनेकदा रिलायन्स इन्फ्राला डेडलाइन देण्यात आली होती. त्या डेडलाइनचे पालन आजतागायत झालेले नाही. या महामार्गावर पुणे ते सातारादरम्यान १५ ठिकाणी पादचारी भूयारी मार्ग, पाच ठिकाणी जनावरांसाठी भूयारी मार्ग, ३० ठिकाणी वाहनांसाठी भूयारी मार्ग प्रस्तावित होते. तर, १३ ठिकाणी उड्डाणपूल व पाच ठिकाणी नदीवर पूल उभारण्याचे प्रस्तावित होते. त्यापैकी ३४ ठिकाणच्या कामांना सुरुवातच झालेली नाही. त्यामध्ये चार उड्डाणपूल, नद्यांवरील दोन पूल, नऊ पादचारी भूयारी मार्ग, एक जनावरांचा भूयारी मार्ग, नऊ वाहनांसाठीच्या भूयारी मार्गाचा समावेश आहे.

सहापदरीकरण करताना पूर्वीच्या चौपदरी रस्त्यातील पादचारी भूयारी मार्ग व जनावरांच्या भूयारी मार्गांचे प्रत्येकी १३ ठिकाणी रुंदीकरण करण्याचा निर्णय झाला होता; तसेच १२ ठिकाणी वाहनांच्या भूयारी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार होते. त्यांचे कामदेखील अपूर्णावस्थेत आहे. ही अपूर्णावस्थेतील कामे केव्हा पूर्ण होणार या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडून मिळत नाही; तसेच भूसंपादन, रुंदीकरणाच्या जागेत मंदिरांचा समावेश, जलवाहिनी, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगीला उशीर या कारणांमुळे अनेक कामे सुरूच झालेली नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले. मात्र, काही ठिकाणी कोणतीही अडचण नसताना रिलायसन्सकडून काम सुरू करण्यात आलेले नाही, असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अनेक कामे अपूर्ण

सहापदरीकरण करताना पूर्वीच्या चौपदरी रस्त्यातील पादचारी भूयारी मार्ग व जनावरांच्या भूयारी मार्गांचे प्रत्येकी १३ ठिकाणी रुंदीकरण करण्याचा निर्णय झाला होता; तसेच १२ ठिकाणी वाहनांच्या भूयारी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार होते. ही अपूर्णावस्थेतील कामे केव्हा पूर्ण होणार या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडून मिळत नाही; तसेच भूसंपादन, रुंदीकरणाच्या जागेत मंदिरांचा समावेश, जलवाहिनी, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगीला उशीर या कारणांमुळे अनेक कामे सुरूच नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागपूरच्या संत्र्यांना ‘भाव’ मिळेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नागपूरहून पुण्याच्या मार्केट यार्डात गेल्या वर्षाच्या तुलनेत संत्र्यांची मोठी आवक झाली. प्रथमच एवढी मोठी आवक झाल्याने संत्र्यांना भाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे पालेभाजीच्या जुडीच्या दरात ग्राहकांना किलोभर संत्री मिळत असल्याने ग्राहकांची चंगळ झाली.

नागपूरच्या संत्र्यांची मोठी आवक झाली असली, तरी प्रत्यक्षात संत्र्यांचे व्यापारी, आणि ग्राहकांची त्याला फारशी मागणी नाही. त्यामुळे किमतीवर परिणाम झाला असून घाऊक बाजारात नागपूरच्या संत्र्यांना कुणी भाव देत नसल्याची स्थिती आहे. कमी किमतीत ग्राहकांना संत्रे उपलब्ध होत असल्याने हंगामात सर्वांनाच संत्र्यांची चव चाखता येणार आहे. नागपूर परिसरात संत्र्याचे उत्पादन मोठे झाल्याने वाढलेली आवक आणखी काही दिवस टिकणार आहे.

गुलटेकडी येथील बाजारात संत्र्यांची ४० ते ५० टन संत्र्यांची आवक झाली. संत्र्यांच्या तीन डझनाला घाऊक बाजारात ६० ते १२० रुपये दर मिळाला आहे, तर प्रतिकिलोला १० ते २० रुपये दर मिळाला आहे. किरकोळ बाजारातही २० ते ३० रुपये किलोने संत्र्याची विक्री सुरू आहे, अशी माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

बाजारात आवक झालेले संत्रे चांगल्या प्रतीचे आहे. संत्र्यांचा रंग चांगला असून गोडी अधिक आहे. संत्रे आकाराने मोठे आहे. संत्र्यांची मोठी आवक झाल्याने दर घसरले आहेत. संत्र्यांचा हंगाम नुकताच सुरू झाला असून आणखी बराच काळ तो राहील. हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात आवक घटल्यास त्याची दरवाढ होण्याची शक्यता आहे,अशी व्यापारी बाळासाहेब मनसुख यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रमोशन करा, ऑस्कर मिळवा

$
0
0

ऑस्कर पुरस्कार समिती सदस्यांचा मराठी चित्रपटकर्त्यांना कानमंत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'श्वास'मुळे भारतीय चित्रपटांकडे आम्ही वेगळ्या नजरेने पाहू लागलो. भारतीय चित्रपटांमध्ये प्रचंड क्षमता आहे. ऑस्करसाठी भारतीय चित्रपटकर्त्यांनी आधीपासून कामाला लागावे. चित्रपटाचे प्रमोशन केले, तर ऑस्करच्या सर्व परीक्षकांना भारतीय चित्रपट पाहता येतील, त्यामुळे ऑस्करची तुमची वाट सोपी होईल,' अशा शब्दांत 'कोर्ट'च्या पार्श्वभूमीवर ऑस्कर पुरस्कार समिती सदस्यांनी मराठी चित्रपटकर्त्यांना कानमंत्र दिला.

गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) इतिहासात ऑस्करने प्रथमच त्यांचे शिष्टमंडळ महोत्सवासाठी पाठविले होते. यासाठी एसएमपीटीईचे भारत विभागाचे संचालक उज्वल निरगुडकर यांनी खूप प्रयत्न केले. या शिष्टमंडळात मिल्ट शेफ्टर (संचालक, अॅकॅडमी सायन्स अॅड टेक्नॉलॉजी कौन्सिल), मार्क म्यांजिनी, (साउंड एडिटर, डिझायनर) आणि हुम्पी डिक्सन (एडिटर, ब्रिटन) यांचा समावेश होता.

उज्ज्वल निरगुडकर यांनी या विशेष दौऱ्याविषयी खास 'मटा'ला ही माहिती दिली. ते म्हणाले, 'ऑस्करची समिती इफ्फीमध्ये यावी, ही सरकारची व इफ्फीची खूप वर्षांपासूनची इच्छा होती. त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. चित्रपटक्षेत्रात जगात काय चालू आहे, आपल्या चित्रपट व्यवसायाची भव्यता ऑस्कर समितीला दाखविणे, तसेच आपल्या चित्रपटांकडे ते कसे पाहतात व त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे हा त्यामागील हेतू होता. समितीला महोत्सव आवडला. भारतीय चित्रपटांचे त्यांनी कौतुक केले.'

'भारतीय चित्रपटाची ऑस्करसाठी निवडीची प्रक्रिया उशिरा सुरू होते. त्यामुळे चित्रपटाचे आमच्यासमोर प्रमोशन करण्यासाठी चित्रपटकर्त्यांना पुरेसा अवधी मिळत नाही. भारतीय चित्रपटांमध्ये प्रचंड ताकद आहे. चित्रपटांचे प्रमोशन व्यवस्थित झाले व सर्व परीक्षकांनी चित्रपट पाहिला, तर भारतीय चित्रपटांना ऑस्करची वाट सोपी होईल,' असा सल्ला शेफ्टर यांनी दिल्याचे निरगुडकर यांनी सांगितले.

'श्वास' अजूनही आमच्या मनात...

'श्वास'च्या निमित्ताने मराठी चित्रपटांनीच मोठा 'श्वास' घेतला आणि मराठी चित्रपटांना उर्जितावस्था प्राप्त झाली. श्वासने आणखी एक केले ते म्हणजे ऑस्करसमितीला हेलावून सोडले. त्या प्रभावातून ही मंडळी अद्यापही बाहेर आलेली नाहीत. अकरा वर्षांनंतर त्यांच्या मनात 'श्वास' आजही कायम आहे. याचा प्रत्यय श्वासच्या टीमला नुकत्याच झालेल्या इफ्फीमध्ये आला. श्वास अजूनही आमच्या मनात असल्याचे तेव्हांचे परीक्षक मिल्ट शेफ्टर यांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर परश्या होडीतून येतो या शेवटच्या प्रसंगांचे शेफ्टर यांनी रसभरीत वर्णन केले, अशी माहिती उज्ज्वल निरगुडकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एलईडी बल्बचा काळाबाजार

$
0
0

महावितरणकडे तक्रारी; किंमत शंभरच असल्याचे स्पष्टीकरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकार आणि महावितरणच्या वतीने ऊर्जाबचतीसाठी वितरीत होत असलेल्या एलइडी बल्बची अधिक दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. दरम्यान, या बल्बची किंमत फक्त शंभर रुपयेच असल्याचे 'महावितरण'ने स्पष्ट केले आहे आणि अधिक दराने विक्री होत असल्याचे समोर आल्यास 'महावितरण'ला कळविण्याचे आवाहन केले आहे.

केंद्र सरकार पुरस्कृत डोमेस्टिक इफिशियंट लायटिंग प्रोग्राम (डीइएलपी)अंतर्गत घरगुती ग्राहकांना प्रत्येकी शंभर रुपयांमध्ये एलइडी बल्बचे वितरण शहर आणि जिल्ह्यात सुरू आहे. एलइडीच्या एका बल्बची किंमत १०० रुपये असताना राजगुरुनगर येथे एका ठिकाणी चढ्या दराने बल्बची विक्री होत असल्याचा प्रकार 'महावितरण'च्या कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आला आहे. याबाबत ईईएसएल कंपनीला महावितरणने माहिती दिली असून नियमानुसार कारवाई करण्यास सांगितले आहे.

प्रत्येक घरगुती वीजग्राहकाला या योजनेतून प्रत्येकी सात वॅटचे एकूण दहा एलइडी बल्ब वितरीत करण्यात येणार आहे. प्रत्येकी १०० रुपयांचा एक बल्ब असे एकूण दहा बल्ब रोख एकाच वेळी खरेदी करता येतील. यात हप्त्यांची योजना असून वीजग्राहकांना दहापैकी कमाल चार बल्ब प्रत्येकी दहा रुपये अॅडव्हान्स भरून खरेदी करता येतील व या चार बल्बची उर्वरित रक्कम दहा हप्ते वीजबिलांतून भरावी लागणार आहे. या बल्बची तीन वर्षांची वॉरंटी असून या काळात नादुरुस्त झालेला बल्ब बदलून मिळणार आहे. एलइडी बल्बची खरेदी केल्यानंतर त्याची वीजग्राहकांनी पावती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्राहकांना महावितरणचे आवाहन

वीजग्राहकांनी प्रत्येकी १०० रुपये दरानेच एलइडी बल्बची खरेदी करावी व त्यापेक्षा अधिक किंमतीत विक्री होत असल्यास त्याची माहिती ईईएसएलचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक कोकाटे (मोबाइल क्र. ९८६७९७८१०६), सचिन शर्मा (८४५०९१३५८२) किंवा ईईएसएलच्या ७८४१९२९१०३ किंवा ९६५७८८४१९१ या कॉलसेंटरच्या क्रमांकावर माहिती देण्यात यावी, असे आवाहन मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष नव्या तूर डाळीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळीनंतर मार्केट यार्डातील भुसार विभागात ग्राहकांची कोणत्याही वस्तूला फारशी मागणी नसल्याने शांतता पसरली आहे. तर तूर डाळीचे डाळ गगनाला भिडले असल्याने आता नव्या तूर डाळीवर व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. डाळीचे दर घटण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत.

गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, हळद, पोहे, कडधान्ये, डाळी, मिरची, धने, खोबरेल तेल, गोटा खोबरे, रवा, आटा, मैदा, गूळ, साखर यांच्यात दर कोणताही बदल झाला नाही. बार्शी, लातूर, अकोला, विदर्भ, उदगीर, बेळगाव सारख्या भागातून नव्याने येत्या पंधरा दिवसांत तूर डाळीची नवी आवक बाजारात सुरू होईल. त्यामुळे तूर डाळीचे गगनाला भिडलेले भाव खाली येण्याची शक्यता आहे. सध्या क्विंटलासाठी १२,००० ते १७,००० रुपये असा दर आहे. दरात घट होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल. परंतु, तूरडाळीचे किलोचे दर शंभर रुपयांच्या आत येण्यासाठी जानेवारी महिना उजाडू शकतो, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.

गेल्या आठवड्यात नवीन बासमती तांदळाच्या ११२१ आणि १५०९ या तांदळाची आवक होऊन त्याच्या खरेदीवर शासनाने नियंत्रण नसल्याने क्विंटलमागे एक हजार रुपयांनी दरवाढ झाली होती. वाढलेले दर सध्या टिकून आहेत. त्याशिवाय, नव्याने एचएमटी कोलम आणि कालीमूछ (सुगंधी चिन्नोर) या जातीच्या नव्या तांदळाची आवक पुढील आठवड्यात होण्यास सुरुवात होईल. क्विंटलसाठी सुगंधी चिन्नोरला ३६०० ते ३८०० रुपये क्विंटलला तर एचएमटी कोलमसाठी ३८०० ते ४००० रुपये दर मिळेल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या दोन्ही प्रकारच्या तांदळाचे जुने दर कायम राहतील. तर, आंबेमोहोर आणि नवीन बासमती आवक १५ डिसेंबरनंतर होईल, असेही सांगण्यात आले.

आंतरराष्ट्रीय बाजार चांगले मिळाल्याने; तसेच डॉलरच्या किमती वाढल्याने खाद्यतेलांच्या दरात वाढ झाली. तसेच, आयात तेलाचे दरही वाढल्याने त्याचा परिणाम होऊन शेंगदाणा, रिफाइंड, सूर्यफूल पामतेल, सोयाबीन तेलाच्या डब्याच्या पंधरा किलोमागे १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. शेंगदाण्याची निर्यात सुरु झाल्याने त्याच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ झाली आहे.

हरभरा डाळ घटल्याने बेसनाच्या ५० किलोच्या पोत्यामागे ४० रुपयांची घट झाली आहे. गोटा खोबऱ्याची आवक वाढली असून त्याला मागणी कमी आहे. त्यामुळे किलोमागे पाच रुपयांची घट झाली आहे. नारळाची आवक वाढल्याने त्याचे दर क्विंटलमागे १०० रुपयांनी घट उतरले आहे. नवीन भगरची आवक येण्यास सुरुवात झाल्याने वरई भगरमध्ये क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांची घट झाली.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीचे ३० मोबाइल जप्त

$
0
0

Prashant.Aher@timesgroup.com

पुणे : मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केलेल्या तिघा चोरट्यांकडून अॅपल सिक्स, सॅमसंग, सोनी, मोटोरोला या कंपन्यांचे विविध मॉडेलचे ३० हॅन्डसेट मार्केट यार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत. या हॅन्डसेटच्या मालकांचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या मोबाइल मिसिंगच्या तक्रारींचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.

मार्केट यार्ड पोलिसांनी प्रदीप वसंत बेटगिरी (वय २०), अनिल आनंद बेटगिरी (२०) आणि मारुती यल्लप्पा बेटगेरी (३०, सर्व रा. बी. टी. कवडे रोड, मुंढवा) या मोबाइल चोरांना अटक केली होती. एका मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिस या तिघांपर्यंत पोहोचले आणि त्यांना गजाआड केले.

या चोरांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी चोरी केलेले ३० मोबाइल हॅन्डसेट मार्केट यार्ड पोलिसांच्या हवाली केले आहेत. त्यामध्ये अॅपल सिक्स, सोनी एक्सपेरिया, सॅमसंग ग्रॅँड, सॅमसंग ए७, सॅमसंग नोट थ्री, सोनी झेड यासारखे ३० हॅन्डसेट जप्त केले आहेत. शक्य तितक्या मोबाइलचे आएमईआय क्रमांक मिळवण्यात आले आहेत. ते सर्व क्रमांक आणि मोबाइलचा रंग आणि मॉडेल सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. पोलिस ठाण्यातील दाखल असलेल्या प्रॉपर्टी मिसिंगच्या तक्रारींमध्ये पडताळणी केल्यावर मार्केट यार्ड पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोलिस कर्मचारी शरद जाधव ९८२३२११६८१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

अशी करण्यात येत असे चोरी

तिघेही चोरटे गर्दीची ठिकाणे शोधत असे. शक्यतो मोबाइल शर्टच्या खिशात ठेवण्याची सवय असते. गर्दीचा फायदा घेत शर्टच्या खिशातून मोबाइल काढण्यात येत असे. अशा प्रकारे या चोरट्यांनी अनेक मोबाइलची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या काही दिवसांपासून काळात शहराच्या विविध भागांमधून दररोज सरासरी दहा मोबाइल हँडसेट चोरीला जात असल्याचे समोर आले आहे. परंतु, या चोरीला जाणाऱ्या मोबाइलची पोलिस दप्तरी मात्र सर्रास 'गहाळ' म्हणूनच नोंद होत आहे. त्यामुळे चोरीच्या हँडसेटचा काळाबाजार तेजीत आला असून यापैकी काही हँडसेट थेट बांगलादेश किंवा नेपाळमध्ये पोहोचत असल्याची माहिती मिळाली आहे.

शहरात दर वर्षी सरासरी सात हजार मोबाइल हँडसेट 'गहाळ' होत असून त्यापैकी केवळ सहाशे मोबाइल मिळवण्यात पोलिसांना यश येते. दरमहा सरासरी सहाशे हँडसेट गहाळ होत असल्याची नोंद होते. यात कमाल ५० हँडसेट खऱ्या अर्थाने गहाळ होतात, तर उर्वरित ५५० हँडसेटची चोरी होते. पोलिस ठाण्यात मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल केला, तर पोलिस दप्तरी चोरीच्या 'हेड'खाली प्रचंड वाढ होईल आणि त्यांचा तपास करण्याची वेळ येईल, या शक्यतेमुळे चोरीऐवजी गहाळ झाल्याची नोंद घेण्यात येते.

अदखलपात्र तक्रारीची प्रत मिळाल्याच्या समाधानात तक्रारदारही पोलिस ठाण्यातून बाहेर पडतो आणि पोलिसांनाही फारसा त्रास होत नाही. कधीकधी त्यासासाठीही संबंधितांना चिरीमिरी द्यावी लागल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मोबाइल चोरीचा प्रकार गांभीर्याने घेण्यात येत नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन खरेदीतील धोका टाळा

$
0
0

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com

पुणे : ग्राहकांना घरबसल्या तत्काळ हव्या त्या वस्तू मिळत असल्यामुळे ऑनलाइन शॉपिंगकडे कल वाढला आहे. तसेच, अशा खरेदीवर भरघोस डिस्काउंट मिळत असल्यामुळे तरुण वर्ग तर बहुतांश वस्तू ऑनलाइनच खरेदी करू लागला आहे. मात्र, ऑनलाइन खरेदीत फसवणुकीच्या घटना वाढत असून, अनेक गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन खरेदी करताना काळजी न घेतल्यास मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

स्नॅपडील, फ्लिपकार्ड, अॅमेझोन, येप मी, क्वीकर, ओएलक्स अशा अनेक वेबसाइट ऑनलाइन वस्तूंची विक्री करतात. या कंपन्यांनी आता मोबाइल अॅपदेखील सुरू केले आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन वस्तूंची विक्री केली जात आहे. पुण्यात तर ऑनलाइन खरेदी करणाऱ्याची संख्या मोठी वाढली असून गेल्या काही काळात या पद्धतीने खरेदी करताना अनेक फसवणुकीचे प्रकार घडल्याचे समोर आले आहेत. अनेक ग्राहकांना फोन, टॅब, लॅपटॉपऐवजी दगड, वीट, कापूस भरून वस्तू पुरविल्याच्या घटना समोर आल्या आहेत. चोरीच्या वस्तू ऑनलाइन विक्रीसाठी टाकून फसविल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. कंपन्यानीही एजंटकडून फसवणूक केल्याचे सांगून हात वर केले आहेत. तसेच, अनेक वेळा कंपन्यांना न समजू देता मध्येच फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.

तक्रार कोठे करू शकता?

ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली असून, त्यामध्ये तरुण वर्गाची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, यामध्ये ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. अशा वेळी तक्रार कशी व कोठे करायची याची माहिती ग्राहकांना नसते. त्यामुळे गोंधळ उडतो. फसवणूक झालेली व्यक्ती ग्राहक मंचाकडे तक्रार करू शकते. ग्राहक मंचात केस दाखल केल्यास वकील लावण्याची सुद्धा गरज नसते. संबंधीत व्यक्ती स्वतः केस लढू शकते. तसेच, आपण दाखल केलेल्या केसचे स्टेट्स काय आहे, याची माहिती तो घरबसल्या पाहू शकतात.

चोरीच्या वस्तू ऑनलाइन विक्रीसाठी

पुण्यात कोथरूड भागात चोरलेले टॅब आरोपीने ओएलक्सवर ऑनलाइन विक्रीसाठी टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे जुन्या ऑनलाइन वस्तू खरेदी करताना त्या चोरीच्या तर नाहीत ना याची खात्री करावी. तसेच, पुण्यात वानवडी परिसरात योगेश भोगणे या तरुणाची अशाच पद्धतीने फसवणूक झाली. ओएलएक्सवरून मोटार खरेदी करताना त्याची फसवणूक झाली. ऑनलाइन पैसे भरले पण मोटार मिळालीच नाही. बिबवेवाडी येथील एका तरुणाला मोबाइलसाठी ऑनलाइन पैसे भरण्यास सांगून पावती पाठविण्यास सांगितली. मात्र, त्याला मोबाइल मिळालाच नाही. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

आयफोनऐवजी लाकडाचे तुकडे

पुण्यातील काही महिन्यांपूर्वी दर्शन काबरा नावाच्या व्यक्तीने ऑनलाइन आयफोन मागविला होता. त्यांची ही ऑर्डर कुरियन त्यांच्याकडे पोहोचली. काबरा यांनी कॅश ऑन डिलेव्हरीचे ऑप्शन निवडले होते. त्यामुळे ऑर्डर मिळताच त्यांनी आधी बॉक्स उघडण्याची मागणी केली. बॉक्स फोडल्यानंतर त्यामध्ये आयफोनऐवजी लाकडाचे तुकडे असल्याचे पाहून त्यांनी डिलिव्हरी बॉयला पेमेंट करण्यास नकार दिला. त्यांच्या सावधगिरीमुळे त्यांची चाळीस हजार रुपयांची फसवणूक झाली नाही. तसेच, खडक पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी दोन तरुणांनी ऑनलाइन आयफोन मागविले. आयफोन आल्यानंतर डिलिव्हरी बॉयला दमबाजी करून फोन चोरून नेल्याचे समोर आले होते. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर तरुणाची शॉर्टफिल्म

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चित्रपट निर्मितीचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसताना डॉ. अजित वाडीकर या तरुणाने केलेली शॉर्टफिल्म 'नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन'चा चेहरा झाली आहे. चित्रपट चिरंतन राहू शकतो, या संकल्पनेवर आधारित या फिल्मला मिशनच्या जाहिरातीसाठी मान्यता देण्यात आली असून, या फिल्मसाठी त्याने मानधन घेतलेले नाही.

मूळच्या उदगीरच्या असलेल्या अजित वाडीकरने बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सरकारी सेवा करण्यासाठी यूपीएससीचा अभ्यास केला. मात्र, तोंडी परीक्षेत उत्तीर्ण न झाल्याने त्याने यूपीएससी सोडून दिले. दरम्यान, त्याला चित्रपटांविषयी विशेष आवड निर्माण झाली होती. इंटरनेट आणि पुस्तकांच्या साह्याने त्याने हे माध्यम समजून घेण्याचा प्रयत्न केला. आरोग्यविषयक काही शॉर्टफिल्म, युनिसेफसाठी काही माहितीपट करण्याची संधी त्याला मिळाली. एक उर्दू मालिकाही त्यांनी दिग्दर्शित केली. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या माध्यमातून फिल्म हेरिटेज मिशन राबवले जात असल्याचे त्यांच्या वाचनात आले. हा विषय त्यांना महत्त्वाचा वाटल्याने संचालक प्रकाश मगदूम व मिशनचे विशेष अधिकारी संतोष अजमेरा यांची भेट घेऊन शॉर्टफिल्म करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने दीड महिना तयारी करून 'सिनेमा कॅन बी इम्मॉर्टल' ही शॉर्टफिल्म तयार केली. त्यासाठी त्यांनी कोणतेही मानधन घेतले नाही. सरकारकडूनही या शॉर्टफिल्मला मान्यता देण्यात आल्याने आता फिल्म हेरिटेज मिशनसाठी अधिकृत फिल्म म्हणून डॉ. वाडीकर यांची शॉर्टफिल्म वापरली जाणार आहे.

शॉर्टफिल्म करण्याच्या प्रेरणेविषयी अजितने 'मटा'ला माहिती दिली. 'चित्रपटांचे संवर्धन करणे फार महत्त्वाचे आहे. हा अत्यंत दुर्लक्षित घटक आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या माध्यमातून चित्रपटांचे जतन केले जाते हे माहीत होते. त्यामुळे फिल्म हेरिटेज मिशनविषयी माहिती मिळल्यावर चित्रपटांचे जतन, संवर्धनाविषयी अभ्यास केला. त्यातून चित्रपट चिरंतन राहतो या संकल्पनेवर फिल्म करावीशी वाटली. संकल्पना विकसित करण्यात असीम त्रिभूवन आणि स्वप्नील सोज्वळ या मित्रांनीही मदत केली,' असे त्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैठक की ‘राडा’?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नियुक्तीपासूनच वादात सापडलेल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाची पहिली बैठक १८ डिसेंबर रोजी होणार आहे. नियुक्ती झाल्यानंतर सहा महिन्यांनी ही बैठक होत असून, नियामक मंडळातील पाच सदस्यांच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी विद्यार्थी बैठकी वेळी पुन्हा 'राडा' करणार का, हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.

गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या या नियामक मंडळातील पाच सदस्यांबाबत विद्यार्थ्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्या विरोधात आंदोलन, चार महिन्यांचा संप झाला. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. विद्यार्थ्यांना अटक होण्याचाही प्रकार झाला. अभिनेत्री पल्लवी जोशी, दिग्दर्शक जहानू बरुआ, संतोष सिवन यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. एवढे सगळे होऊनही, या नियुक्त्या मागे घेण्याबाबत सरकारकडून काही होत नसल्याने विद्यार्थ्यांनी संप मागे घेतला. त्यानंतर गोव्यात इफ्फीमधील निदर्शनेही केली. या पार्श्वभूमीवर हे मंडळ पदभार स्वीकारणार आहे. रिक्त झालेल्या जागी निर्माता बी. पी. सिंग, अभिनेता सतीश शहा, पत्रकार भावना सोमया यांची नियुक्ती करण्यात आली.

सरकारने केलेल्या मंडळाच्या नियुक्तीनंतर संस्थेत शिस्त आणण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व आले आहे. या बैठकीनिमित्ताने अध्यक्ष चौहान प्रथमच एफटीआयआयमध्ये येणार आहेत. अभिनेत्री विद्या बालन, दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचाही या मंडळात समावेश आहे. नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनीही १८ डिसेंबर रोजी बैठक होणार असल्याबाबत दुजोरा दिला.

'एफटीआयआयच्या प्रशासनाकडून १८ डिसेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आल्याचे पत्र मिळाले आहे. मंडळाचे सर्व सदस्य या बैठकीला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या बैठकीत कोणते विषय चर्चेत असावेत हे अद्याप ठरवलेले नाही. विद्यार्थ्यांना सोबत घेऊनच काम करणार आहे,' असे चौहान यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात रविवारी ८० हजारांची चोरी

$
0
0

पुणेः शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच असून रविवारी दिवसभरात हडपसर, खडक आणि खडकी येथे तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. यामध्ये ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले.

भवानी पेठ येथे ६० वर्षीय महिला टिंबर मार्केट येथून रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून लांबवले. हडपसर परिसरातील किर्लोस्कर कॉलनीत रविवारी दुपारी दोनच्या सुमारास २४ वर्षीय महिला पायी घरी जात होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरले. खडकीतील शेवाळे हॉस्पिटलसमोर रात्री सातच्या सुमारास सोनसाखळी चोरीची घटना घडली. ३८ वर्षीय महिला पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चेन्नईला पुणेकरांची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चेन्नईतील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुण्यातील तरुणांनी पुढाकार घेतला आहे. रोशनी या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय वस्तू, कपडे आणि धान्याचे संकलन करण्यात येत असून, आतापर्यंत काही प्रमाणात साहित्य चेन्नईला पाठवण्यात आले आहे.

गेले काही दिवस तमिळनाडूला पावसाने झोडपून काढले आहे. त्याचा मोठा फटका चेन्नई शहराला बसला आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. तसेच मोठे नुकसानही झाले आहे. चेन्नईतील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवरून मदत करण्यात येत आहे. त्याला पुण्यातील रोशनी या तरुणांच्या स्वयंसेवी संस्थेचीही जोड मिळत आहे. पुण्यातून रोशनी संस्थेचे प्रवीण निकम, मृण्मयी कोळपे, चेतन परदेशी, प्रतीक गाडे, अमित घुमके, स्वराज भोळे या विद्यार्थी मदत साहित्याचे संकलन करत आहेत. नगर येथे ऋतुजा जेके संकलनाचे काम करत आहे. कोरडे धान्य, सॅनिटरी पॅड्स, पाणी शुद्ध करण्याच्या गोळ्या, बेडशीट्स, मुलांचे कपडे, अंतर्वस्त्र आदी साहित्याचे संकलन करण्यात येत आहे.

रोशनी या संस्थेने घेतलेल्या पुढाकाराविषयी प्रवीणने मटाला माहिती दिली. 'चेन्नईतील जनजीवन अद्याप पूर्वपदावर आलेले नाही. चेन्नईतील रवीतेजा मुथू आणि दिनेश गजेंद्रन या आमच्या मित्रांच्या मदतीने चेन्नईतील गरजूंपर्यंत आम्ही मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत थोडे वैद्यकीय साहित्य पाठवले आहे. मात्र, अजून साहित्याची मागणी येत आहे. त्यात सॅनिटरी पॅड्सची मागणी सर्वाधिक आहे. पुढील पाच-सहा दिवस साहित्य संकलित करून ते मुंबईमार्गे चेन्नईला पाठवण्याची व्यवस्था केली जाणार आहे,' असे प्रवीण म्हणाला. अधिक माहितीसाठी संपर्क : ९६६५२७७०६४, ९६०४३८३८३८

सोशल मीडियातून प्रतिसाद

मदत संकलनाबाबत जागृती करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येत आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून सॅनिटरी पॅड्स, कपडे आदी साहित्य मिळत असल्याचेही प्रवीणने नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालत्या लोकलवर दगड; प्राध्यापकाचा डोळा निकामी

$
0
0

रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोकलमधून प्रवास करीत असताना बेगडेवाडीजवळ रेल्वेवर फेकलेला दगड लागून डी. वाय पाटील कॉलेजच्या प्राध्यापकाचा डोळा निकामी झाला. या प्रकरणी त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र, त्यानंतर त्यांच्याकडे साधी चौकशी सुद्धा झाली नसून, रेल्वे प्रशासनाकडून मदतीचीही विचारणा झालेली नाही. या घटनेत लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप प्राध्यापकाने केले आहे.

विक्रम रमेश राऊत (वय ३२, रा. तळेगाव दाभाडे) असे जखमी प्राध्यापकाचे नाव आहे. त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ४ नोव्हेंबर रोजी राऊत सकाळी थेरगाव येथील महाविद्यालयात परीक्षा घेण्यासाठी आले होते. परीक्षा संपल्यानंतर थेरगावहून लोकलने घरी निघाले होते. लोकलच्या जनरल डब्यात ते खिडकीजवळ बसले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बेगडेवाडी येथे लोकलवर बाहेरून कोणीतरी दगड मारला. तो दगड खिडकीवर बसून फुटला. त्याचा काही भाग राऊत यांच्या डोळ्याला लागला. राऊत यांनी नंबरचा चष्मा घातल्याल्यामुळे त्याची काच फुटून डोळ्याला जखम झाली. लोहमार्ग पोलिसांनी त्यांना तळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. या ठिकाणी उपचार करत असताना डोळ्याची जखम जास्त होऊन डोळा निकामी झाल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या बाबत राऊत यांनी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी फक्त तक्रार नोंदवून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोषींना ठोठावला १७ लाख दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने ट्रीपल सीट येत असलेल्या दुचाकीस्वाराने जोरात धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला आणि डोळ्याला मार लागल्यामुळे त्याला अंधत्व आले. निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी संबंधिताला १७ लाख २१ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश कोर्टाने दिला. अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य एस. एस. शिंदे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

या प्रकरणी अमोल विकास कांबळे (वय २५, रा. कस्तुरबा वसाहत, गणेश​खिंड रोड, औंध) यांनी दावा दाखल केला होता. त्यांनी सुगंध आनंद वायदंडे, विनोद सुगंध वायदंडे (रा. अर्मामेंट कॉलनी, गणेशखिंड रोड) यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. अर्जदार कांबळे यांच्यातर्फे अॅड. सुनीता नवले यांनी कामकाज पाहिले.

अर्जदार कांबळे​ १६ मे २०१३ रोजी सकाळी आठ वाजता गणेशखिंडहून औंधकडे त्यांच्याकडे घरी निघाले होते. केंद्रीय विद्यालय येथे ते पोहचले असता, इंदिरा वसाहत येथून ट्रीपल सीट असलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या अपघातात अर्जदार यांच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली. अर्जदार यांना औंध येथील मेडिपॉइंट हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच दिवशी त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. अर्जदाराच्या डोक्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेला साडेचार लाख रुपये खर्च करावा लागला. त्यानंतर पुन्हा उपचारासाठी काही दिवसांनी हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यासाठी त्यांना एक लाख रुपये खर्च आला होता. अर्जदार सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्याला महिन्याला ८,६०० रुपये पगार मिळत होता. अर्जदाराला अंधत्व आल्यामुळे नोकरी गमवावी लागली. या अपघातामुळे अपंगत्व आणि अंधत्व आल्यामुळे २० लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी अॅड. नवले यांनी अर्जदारातर्फे कोर्टात केली होती. अर्जदाराला भविष्यात उपचारासाठी करावा लागणारा खर्च तसेच अर्जदाराची भविष्यात कमाई हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन कोर्टाने अर्जदाराला १७ लाख २१ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, असा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारने निराशा केल्यास साथ सोडू

$
0
0

राजू शेट्टी यांची उद्विग्न भावना

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'आधीचे सरकार या सरकारपेक्षा वाईट होते, त्यामुळे ते पाडले. आत्ताचे सरकार पूर्वीच्या सरकारपेक्षाही वाईट आहे, असे जेव्हा वाटेल तेव्हा त्यांच्यासोबत राहण्याचा प्रश्नच उरणार नाही,' अशी स्पष्टोक्ती स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी पुण्यात केली. मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यातील 'स्वाभिमानी'चा सहभाग आता लांबल्याने त्या विषयी योग्य वेळ आल्यावर बघून घेऊ, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेतर्फे स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांसाठी पुण्यात आयोजित मोर्चानंतर शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि 'स्वाभिमानी'च्या भूमिकेविषयी विचारले असता, शेट्टी यांनी वरील उत्तर दिले. शेट्टी म्हणाले, 'मंत्रिमंडळ विस्ताराविषयीची चर्चा सहा महिन्यांपूर्वीच बंद केली आहे. मंत्रिमंडळातील सहभाग हा आमचा हक्क आहे. त्या विषयी सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, तर योग्य वेळ आल्यावर बघून घेऊ. आधीचे सरकार या सरकारपेक्षा वाईट होते, म्हणून ते पाडले. आत्ताचे सरकार त्यांच्यापेक्षा वाईट आहे, असे जेव्हा वाटेल, तेव्हा यांच्यासोबत राहण्याचा प्रश्नच उरणार नाही.'उसाच्या किमान हमी भावाबाबत सरकार कारखानदारांविरोधात बघ्याची भूमिका घेत असल्याची टीकाही त्यांनी केली.

शेट्टी म्हणाले, 'उसाचा किमान हमी भाव एकरकमी मिळायला हवा, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. मात्र, सरकार कारखानदारांच्या विरोधात बघ्याची भूमिका घेत आहे. एकरकमी हमी भावासाठीची पावले उचलली न गेल्यास, आम्ही सरकारला आंदोलनाचा इशारा यापूर्वीच दिला आहे. शेतकऱ्यांचे जे हाल सुरू आहेत, त्याची जबाबदारी केवळ भाजपची नाही, तर घटक पक्षांची आहे.' या विरोधात येत्या १३ डिसेंबरला राज्यभरात ऊसतोड बंद आणि चक्काजाम आंदोलन छेडणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. कांद्याचे निर्यातमूल्य ७०० डॉलरवरून शून्यावर आणण्याची मागणीही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत संस्थांबाबत ‘डीटीई’चा इशारा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे

'विद्यार्थ्यांनी कोणत्याही अनधिकृत संस्थेच्या अथवा विद्यापीठाच्या भूलथापांना बळी न पडता अभ्यासक्रमाच्या अधिकृततेची खात्री करून नंतरच त्या संस्थेत प्रवेश घ्यावा,' असे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) केले आहे.

पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर, 'डीटीई'ने विद्यार्थी आणि पालकांना हे आवाहन केले आहे. 'सक्षम प्राधिकरणांची मान्यता नसलेली विद्यापीठे, अनधिकृत संस्था प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांना खोटी आमिषे दाखवून अथवा संस्था मान्यताप्राप्त आहे, असे भासवून प्रवेश घेण्यास प्रवृत्त करतात आणि नंतर विद्यार्थ्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येते. अशा प्रकारच्या तक्रारी संचालनालयाकडेही येत असतात. या पार्श्वभूमीवर, सर्व प्रवेशेच्छुक विद्यार्थी आणि पालकांना सतर्क करण्यात येत आहे,' असे 'डीटीई'ने या संदर्भात जारी केलेल्या सूचनेत नमूद करण्यात आले आहे.

'विद्यार्थी आणि पालकांनी एखाद्या संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी अभ्यासक्रमाची संलग्नता तपासून घ्यावी; तसेच संचालनालयाच्या किंवा सक्षम प्राधिकरणांच्या वेबसाइटवर संबंधित संस्थेचे नाव व अभ्यासक्रम असल्याची खात्री करावी आणि नंतरच प्रवेश घ्यावा,' अशीही सूचना करण्यात आली आहे.

'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर, विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आदी सक्षम प्राधिकरणांची मान्यता नसल्यास त्या संस्थांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये,' असे सांगण्यात आले आहे. राज्यातील इंजिनीअरिंग/ टेक्नॉलॉजी, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या शिक्षणक्रमांचे पदवी आणि पदविका अभ्यासक्रम, तसेच एमबीए/एमएमएस, एमसीए, एमफार्मसी, एमई/एमटेक हे पदव्युत्तर अभ्यासक्रम या सर्वांची प्रवेशप्रक्रिया प्रवेश नियंत्रण व शिक्षण शुल्क नियमन प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images