Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हडपसर पोटनिवडणुकीला मुंबई हायकोर्टाची स्थगिती

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हडपसर येथील शिवसेनेचे नगरसेवक विजय देशमुख यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने त्या जागी पोटनिवडणूक घेण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली असताना, मुंबई हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली. त्यामुळे येथील पोटनिवडणुकीची सर्व प्रक्रिया किमान महिनाभर तरी पुढे जाणार आहे.

पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी विजय देशमुख यांचे नगरसेवकपद नुकतेच रद्द केले. महापालिकेच्या निर्णयाविरोधात देशमुख यांनी कोर्टात धाव घेतली होती. तरीही, पालिकेने हडपसर येथील देशमुख यांच्या जागेवर नव्या सदस्याची नेमणूक करण्यासाठी पोटनिवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार, प्राथमिक मतदार यादी आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक पालिकेने जाहीर केले होते. पालिकेच्या प्राथमिक अंदाजानुसार या प्रभागात ३४ हजार सातशे मतदार आहेत. पुढील आठवड्यामध्ये मतदारयादीला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर, नेमका आकडा समोर येऊ शकला असता. देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान एम. सोनक यांनी अंतिम निर्णयापर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले. पालिकेचे विधी सल्लागार रवींद्र थोरात यांनी देशमुख यांचे नगरसेवकपद रद्द करण्यास स्थगिती दिली नसून, केवळ निवडणूक प्रक्रिया थांबविण्यास सांगितले आहे, असे स्पष्ट केले.

याबाबतची, पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार असून, तोपर्यंत पालिकेला निवडणुकीची प्रक्रिया राबविता येणार नाही. परिणामी, हडपसरच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम महिनाभराने लांबणीवर पडला आहे.

देशमुख यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालकपदी निवड झाली असल्याने त्यांचे ते पदही रद्द करण्यात आले. त्यामुळे, कोर्टात दावा दाखल असताना, पीएमपीच्या संचालकपदाची नेमणूक केली जाऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केली होती. मात्र, कोर्टाचे कोणतेही स्थगिती आदेश नसल्याचे सांगत, पीएमपीच्या संचालकपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद आलकुंटे यांना संधी देण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विजेत्या खेळाडूंचा गौरव

0
0

पुणेः राज्य सरकारच्या शिवछत्रपती पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शहरातील खेळाडूंचा आता महापालिकेतर्फे विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पालिकेतर्फे एक लाख रुपयांचा निधी देऊन, पुरस्कारप्राप्त खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी शनिवारी जाहीर केले.

महापौर चषक स्पर्धांबाबतचे नियोजन करण्यासाठी धनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्येच शहरातील खेळाडूंच्या गौरवार्थ हा विशेष सन्मान सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभागृहनेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, मनसेचे गटनेते बाबू वागसकर, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र पठारे आणि क्रीडा अधिकारी या वेळी उपस्थित होते.

राज्य सरकारतर्फे नुकत्याच केल्या गेलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यापासून पुण्यातील खेळाडूंचा गौरव करण्यास प्रारंभ केला जाणार आहे. २०१२-१३ आणि २०१३-१४ च्या शिवछत्रपती आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंपासून पालिकेची ही योजना लागू होणार आहे. यापुढे पुणे शहरातील शिवछत्रपती आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या सर्व खेळाडूंना त्याचा लाभ मिळेल, असे धनकवडे यांनी सांगितले.

महापौर चषक स्पर्धा

शहराच्या विविध भागांमध्ये २८ खेळांच्या महापौर चषक स्पर्धा घेण्यावरही शनिवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या सर्व स्पर्धा फेब्रुवारी अखेरपर्यंत घेण्यात येतील, असे धनकवडे यांनी सांगितले. गेल्या वर्षी महापौर चषक स्पर्धांमध्ये एक कोटी रुपयांची बचत केल्याचा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुस्ती स्पर्धेवरून ‘आखाडा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या कुस्ती स्पर्धेवरून दर वर्षी होणाऱ्या मानापमान नाट्याचा पुढील अंक शनिवारी पक्षनेत्यांच्या बैठकीत घडला. कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणावरून सत्ताधाऱ्यांमध्येच फूट पडल्याने अखेर कोणत्याही निर्णयाविना हा 'डाव' अर्धवट सोडण्यात आला. त्यामुळे, यंदाही कुस्ती स्पर्धांपेक्षा त्याचा 'आखाडा'च अधिक गाजण्याची चिन्हे आहेत.

महापौर चषक स्पर्धांबाबत महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षनेत्यांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरून पक्षनेत्यांमध्येच वादाची ठिणगी पडली. शहराच्या मध्य वस्तीमध्ये मंगळवार पेठेत महापालिकेचे छत्रपती शिवाजी कुस्ती मैदान आहे. महापालिकेने काही वर्षांपूर्वीच त्याची दुरुस्ती केली असून, तेथे स्पर्धा व्हाव्या, यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती केली आहे. त्यामुळे, महापौर चषक स्पर्धा याच ठिकाणी आयोजित कराव्यात, असा आग्रह काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी धरला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते बाबू वागसकर यांनीही शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा देत, कुस्तीच्या स्पर्धा शिवाजी आखाड्यामध्येच घेण्याची मागणी लावून धरली.

महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मात्र कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलातच या स्पर्धा घेण्यात याव्या, अशी भूमिका मांडली. शहराच्या इतर भागांतील नागरिकांनाही स्पर्धा पाहता याव्या, यासाठी कात्रज येथे स्पर्धा घेण्याच्या प्रस्तावाचे महापौरांनी जोरदार समर्थन केले. तर, कुस्ती स्पर्धा आयोजनामध्ये राष्ट्रवादीतर्फे नेहमीच वेगळी भूमिका घेतली जात असल्याबद्दल इतर पक्षनेत्यांनी आक्षेप घेतला. पालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्येच आणि त्यातही राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येच फाटाफूट झाल्याने अखेर कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे, इतर विषयांवर निर्णय घेत, ही बैठक आटोपती घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरुषी मानसिकता बदलली नाही

0
0

लेखिका विनया खडपेकर यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'स्रियांच्या विकासासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात पुरुषांनी पुढाकार घेतला होता. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्त्री विकासाची चळवळ म्हणजे स्त्रियांनीच त्यासाठी लढा दिला पाहिजे, असा मतप्रवाह झाला आहे. प्रगल्भ आणि बुद्धिवान झालेल्या स्रियांना कसे स्वीकारायचे याची पुरुषी मानसिकता बदलली गेली नाही. स्त्री विकासाच्या चळवळीमध्ये पुरुषप्रधान संस्कृतीनेही योगदान द्यायला हवे,' असे मत अभ्यासक आणि लेखिका विनया खडपेकर यांनी व्यक्त केले.

भारतीय स्त्री शक्ती जागरण संस्थेतर्फे उद्यान प्रसाद हॉल येथे शनिवारी 'स्त्री सुरक्षेच्या जागराचे सोळा दिवस' या अभियानाअंतर्गत 'स्त्री सुरक्षेसाठी पुरुषांचे योगदान' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

अभ्यासक आणि लेखिका विनया खडपेकर, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुनील देवधर यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. या वेळी भारतीय स्त्री शक्ती जागरण संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी बर्वे, सचिव संध्या देशपांडे, संघटनप्रमुख मृणालिनी दातार व्यासपीठावर उपस्थित होत्या. 'महाराष्ट्र टाइम्स' या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर होता.

'स्त्री विकासाचा प्रवास हा स्त्री आणि पुरुषांनी हातात हात घालून करायचा आहे. त्यासाठी सतत सहकार्याची गरज आहे. विविध क्षेत्रात स्त्रिया आपला ठसा उमटवू लागल्या आहेत. मात्र, प्रगल्भ होणाऱ्या स्रियांना स्वीकारण्याची मानसिकता पुरुषांमध्ये निर्माण झालेली नाही,' असे खडपेकर म्हणाल्या.

'समाजाच्या विरुद्ध उभे राहायचे तर त्याचे परिणाम काय होतील हे पाहणे गरजेचे होते. निर्भय झालेल्या स्त्रीला स्वीकारण्याची मशागत पुरुषी मानसिकतेमध्ये केली गेली नाही. जी स्त्री आजवर सेवेला होती, दासी होती ती स्वतंत्र होते हे स्वीकारले गेले पाहिजे. स्त्रीचा बौ​द्धिक सहवास आनंद देणारा असतो हे पुरुषांना कळायला हवे. स्त्री चळवळ भक्कम करण्यासाठी पुरुष कार्यकर्ते पुढे यायला हवेत,' असे खडपेकर यांनी सांगितले.

'स्त्री-पुरुष समानता हवी असे म्हणताना त्याचे परिणाम काय असणार आहेत याचा विचार केला पाहिजे, तरच खऱ्या अर्थात समानता येण्यास मदत होऊ शकेल. मात्र त्यासाठी वेळ लागले. तसेच, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील स्रियांची स्थिती चांगली आहे,' असे सुनील देवधर या वेळी बोलताना म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेचारशे सोनोग्राफी सेंटर बंद राहणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गर्भलिंग निदान करण्यास कायद्यानुसार विरोध आहे. गर्भलिंग निदान आणि एफ फॉर्ममधील त्रुटींसाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षा एकच असल्याने त्याला विरोध दर्शविण्यासाठी आणि उद्यापासून (दि. ७) तीन दिवस शहरासह जिल्ह्यातील रेडिओलॉजिस्टनी संप करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील विविध हॉस्पिटल, सेंटर तसेच स्वतंत्र क्लिनिक चालविणारे रेडिओलॉजिस्ट या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे शहरातील साडेचारशे सोनोग्राफी सेंटर बंद राहणार आहेत, अशी माहिती इंडियन रेडिओलॉजिकल अॅन्ड इमेजिंग असोसिएशनच्या (आयरआयए) पुणे शाखेचे डॉ. विरेन कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

'गर्भलिंग प्रसूतिपूर्व व निदानतंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार गर्भलिंग निदान करणे चुकीचे आहे. त्या व्यक्ती शिक्षेस निश्चित पात्र आहेत. त्या व्यक्तींना अधिक शिक्षा दिली पाहिजे. मात्र केवळ एफ फॉर्ममधील त्रुटी दिसल्यान दोन्ही गुन्ह्यासाठी एकच शिक्षा देणे चुकीचे आहे. यापूर्वीही पीसीपीएनडीटी कायद्यात दुरुस्ती करण्याची आम्ही वारंवार मागणी केली आहे. त्यामुळे विनाकारण दोषी नसलेल्या डॉक्टरांवर खटले दाखल होऊन त्यांना शिक्षा होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे आम्ही त्याचा निषेध नोंदविण्यासाठी पुणे शहर जिल्ह्यातील साडेचारशे पेक्षा अधिक सोनोग्राफी सेंटर बंद ठेवणार आहोत,' अशी माहिती डॉ. विरेन कुलकर्णी यांनी दिली. सात डिसेंबरला सकाळी अकरा वाजता टिळक रस्त्यावरील आयएमए येथून पुणे महापालिकेच्या आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनो... लॅपटॉप सांभाळा

0
0

भारती विद्यापीठ परिसरात चोरट्यास अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरणाऱ्या गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दहा लॅपटॉप आणि आठ मोबाइल असा साडेतीन लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. आपला मित्र हॉस्टेलमध्ये राहण्यास असल्याचे सांगून आतमध्ये शिरून घाईगडबडीत असलेल्या विद्यार्थ्यांचे लॅपटॉप, मोबाइल चोरत असल्याचे समोर आले आहे.

नीलेश प्रफुल्लचंद कर्णावत (वय २८, रा. रोझ गार्डन, जळगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दिवसा होणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यास प्रतिबंध करण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अमोल देवधर त्यांच्या पथकासह फिरत होते. त्या वेळी त्रिमूर्ती चौकाजवळ आल्यानंतर पथकाला जवळच्या एका विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये घरफोडीच्या उद्देशाने एक व्यक्ती शिरल्याची माहिती समजली. त्यानुसार देवकर यांच्या पथकाने त्रिमूर्ती चौकाजवळील हॉस्टेलमध्ये गेले. त्या व्यक्तीकडे चौकशी केली असता तो घरफोडीच्या उद्देशाने शिरल्याचे समोर आले. शहरातील विद्यार्थ्यांची हॉस्टेल हेरून त्या ठिकाणी जात लॅपटॉप, मोबाइल चोरी करीत असल्याचे तपासात समोर आले. त्याच्याकडून पोलिसांना दहा लॅपटॉप आणि आठ मोबाइल मिळाले आहेत.

वानवडी पोलिसांनी २०१० साली कर्णावत याला मोबाइल व लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. या गुन्ह्यात सुटल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हे करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत त्याने अशा पद्धतीने अनेक लॅपटॉप व मोबाइल चोरले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याच्याकडे सहायक निरीक्षक अमोल देवधर अधिक तपास करत आहे.

संपर्क साधण्याचे आवाहन

भारती विद्यापीठ परिसरात मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहत आहेत. नीलेश कर्णावत याने भारती विद्यापीठ परिसरातील हॉस्टेलमधून लॅपटॉप, मोबाइल लांबविले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे लॅपटॉप, मोबाइल चोरीला गेले आहेत. त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रो ‘स्वप्नात’ ; तिकीट दर सुसाट

0
0

Suneet.Bhave@timesgroup.com

पुणे : सर्वाधिक काळ चर्चेच्या फेऱ्यांमध्ये गुंतल्याने पुणे मेट्रोच्या अंतिम मान्यतेवर अद्याप शिक्कामोर्तब होणे बाकी असताना, मेट्रोच्या तिकीट दरांनी मात्र मोठी झेप घेतली आहे. पुण्यातील दोन्ही मेट्रो मार्ग १५-१६ किमीचे असल्याने पूर्वीच्या तिकीट दरांपेक्षा तब्बल तिप्पट दर देण्याची तयारी नागरिकांना ठेवावी लागणार आहे.

पुण्याच्या मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर आराखडा सादर करणाऱ्या दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) नुकताच खर्चाचा सुधारित अहवाल सादर केला आहे. आठ हजार कोटी रुपयांचा मेट्रोचा खर्च आता ११ हजार ५२२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. खर्चाच्या वाढत्या आकड्यांचा परिणाम तिकिटाच्या दरांवरही झाला असल्याचे स्पष्ट दिसत असून, मेट्रो प्रकल्प पूर्णत्त्वास जाईपर्यंत कदाचित त्यात आणखी वाढ होण्याची भीती आहे.

मेट्रोचा सर्वाधिक वापर करणारे प्रवासी चार ते १८ किमीच्या दरम्यान प्रवास करणारे असतात, असे निरीक्षण मेट्रोच्या अहवालातच नोंदविण्यात आले आहे. डीएमआरसीने २००९ मध्ये दिलेल्या मेट्रोच्या मूळ अहवालानुसार पुण्यात मेट्रो २०१३-१४ मध्ये धावू शकली असती, तर पुणेकरांना जेमतेम १० ते १२ रुपयेच मोजावे लागले असते. परंतु, मेट्रोबाबत अंतिम निर्णय घेण्यात सर्वच राजकीय पक्षांचा वेळकाढूपणा अखेर पुणेकरांच्या खिशालाच हात घालणारा ठरणार आहे. आता, याच मेट्रोच्या याच प्रवासासाठी ३० ते ४० रुपये मोजण्याची तयारी नागरिकांना ठेवावी लागणार आहे. अर्थात, २०१५ च्या अखेरीस अपेक्षित धरण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार मेट्रो पुण्यात खरोखरच २०२०-२१ मध्ये कार्यान्वित झाली, तर नागरिकांना या दराने प्रवास करता येईल. त्याला आणखी विलंब झाल्यास, मेट्रोच्या तिकीट दरांत वाढ होण्याचा धोका कायमच राहणार आहे.

गेल्या काही दिवसांत बदललेल्या परिस्थितीनुसार मेट्रोनेही दरांचे सुसूत्रीकरण केले असून, यापुढे सर्व दर १० रुपयांच्या पटीत असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मेट्रोच्या यापूर्वीच्या अहवालात १३, १७, २७, ३२ असे तिकीट दर होते. हे सर्व दर आता १० रुपयांच्या पटीत असतील. त्यामुळे, काही ठिकाणी नागरिकांना मेट्रो तिकिटांसाठी पूर्वीपेक्षा अधिक दर मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंदमानातील पर्यटकांना चेन्नईतील पुराचा फटका

0
0

दीडशे जणांना कोलकातामार्गे मुंबईत आणणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चेन्नईतील पुराचा फटका अंदमानात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनाही बसला आहे. चेन्नई विमानतळ बंद असल्यामुळे राज्यातील दीडशेच्या आसपास पर्यटक गेल्या आठवडाभरापासून अंदमान येथेच अडकून पडले आहेत. त्यांना आता कोलकातामार्गे मुंबईत आणण्यात येणार असून, यातील पहिली तुकडी आज (सोमवारी) अंदमानहून कोलकाताला रवाना होईल.

अंदमान येथील पोर्ट ब्लेअर विमानतळासाठी चेन्नई आणि कोलकाता येथून विमानसेवा उपलब्ध आहे. त्यापैकी चेन्नईहून सर्वाधिक, तर कोलकातावरून केवळ दोनच उड्डाणे होतात; परंतु चेन्नईत गेल्या आठवड्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे चेन्नई विमानतळ बंद असल्याने अंदमानमधील पर्यटक चेन्नईला परत येऊ शकलेले नाहीत.

'अंदमानहून कोलकात्यासाठी दोनच उड्डाणे होतात; परंतु त्यासाठी आधीच अनेक आरक्षणे केली गेली असल्याने आयत्या वेळी आता अगदी मोजक्याच जागा उपलब्ध होत आहेत. त्यामध्ये अंदमानहून पुण्याला परतणाऱ्या काही पर्यटकांना जागा करून दिली जात आहे. आमच्याकडील पर्यटकांना सात, आठ आणि नऊ डिसेंबरच्या विमानांमध्ये जागा करून देण्यात आली आहे. पहिली तुकडी सात तारखेला रवाना होईल. कोलकाताहून या पर्यटकांना विमानाद्वारे मुंबईपर्यंत आणण्यात येईल. त्यानंतर ते आपापल्या गावी रवाना होतील,' अशी माहिती शिवसंघ प्रतिष्ठानचे कॅप्टन नीलेश गायकवाड यांनी 'मटा'ला दिली.

ते म्हणाले, 'सध्या हे पर्यटक अंदमान येथेच अडकून पडले असले, तरी त्यांची गैरसोय झालेली नाही. चेन्नई विमानतळ बंद पडल्यानंतर अंदमानमध्ये नव्याने विमाने उतरू शकलेली नाहीत. नवीन पर्यटक न आल्याने याच पर्यटकांना हॉटेलच्या रूम्स वापरासाठी मिळत आहेत. त्यांना सर्व सुविधाही उपलब्ध आहेत.'

'चेन्नई विमानतळ बंद असल्याने अंदमानच्या काही टूर्स निघण्याआधीच रद्द करण्यात आल्या, तर काही चेन्नईपासून रद्द करण्यात आल्या. या पर्यटकांना बस व अन्य मार्गे सुखरूप त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले असून, त्यांना आगामी अंदमान टूरमध्ये सामावून घेण्यात येईल,' असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांचे प्राधान्य रिटेलमधील नोकरीला

0
0

पुणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) आयोजित केलेल्या कौशल्य विकास मार्गदर्शन मेळाव्यात सहभागी झालेल्या तरुणांचे नोकरीसाठी रिटेल क्षेत्राला प्राधान्य असल्याचे निदर्शनास आले. त्या पाठोपाठ टेलिकॉम, मीडिया व मनोरंजन या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा तरुणांनी व्यक्त केली.

'बार्टी'तर्फे राज्याच्या विविध भागांत अनुसूचित जातीच्या बेरोजगार युवक व युवतींना कौशल्य विकासातून नोकरी व स्वावलंबनाची संधी मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. पुण्यात झालेल्या मेळाव्यासाठी राज्यातून अडीच हजार तरुण-तरुणी सहभागी झाले. मेळाव्यात १८ क्षेत्रांतील १६३ प्रशिक्षण कोर्सेसची माहिती देण्यात आली; तसेच करिअरविषयक कल चाचणी घेण्यात आली. यामध्ये रिटेल, टेलिकॉम, मीडिया, हेल्थ केअर या क्षेत्रांना सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून आले. मेळाव्यात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी ३२ प्रशिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. 'अॅप्टिट्युड टेस्ट व मुलाखतीद्वारे काही उमेदवारांची निवड केली असून, त्यांना आवडीच्या संस्थेतून संबंधित विषयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे,' अशी माहिती 'बार्टी'चे महासंचालक डी. आर. परिहार यांनी दिली.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमली पदार्थ बाळगणाऱ्यांना अटक

0
0

पुणे

विक्रीसाठी मेफेड्रॉन आणि गांजा बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी विश्रांतवाडी परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून गांजा, मेफेड्रॉन आणि माला असा एकूण ७३ हजार २७० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

या दोघांना कोर्टाने ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सुबोध अरविंद जाधव (वय २५, रा. विश्रांतवाडी), सुमित संजय कांबळे (वय २५, रा. नागपूर चाळ, येरवडा) अशी पोलिस कोठडी सुनावलेल्या दोघांची नावे आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाला या आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या पथकाने दोघांना शनिवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास टिंगरेनगर येथून अटक केली. आरोपींना कोर्टात हजर केले असता, सरकारी वकिलांनी पोलिस कोठडी देण्याची विनंती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा, टोमॅटो, मटार स्वस्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

थंडीमुळे फळभाज्यांची वाढलेली आवक रविवारी मार्केट यार्डात कायम राहिली. आवक वाढल्याने कांद्यासह टोमॅटो, फ्लॉवर, मटार, शेवगा या फळभाज्यांची दरात घसरण झाली आहे. सामान्यांच्या आवाक्यात डाळी नसल्याने आता ग्राहकांना भाज्याकडे मोर्चा वळवायला हरकत नसल्याने दिलासा मिळणार आहे.

मार्केट यार्डात रविवारी १७० ते १८० ट्रक शेतमालाची आवक झाली. काही दिवसांपासून थंडीसह उकाडाही जाणवत आहे. त्यामुळे फळभाज्यांची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात रविवारी नवीन कांद्याचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत खाली आले आहेत. मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक वाढल्याने दर घसरत आहेत. जुन्या कांद्याची आवक कमी असल्याने भाव वाढलेले आहेत. टोमॅटोची स्थानिक भागातून साडेचार हजार ते पाच हजार पेटींची आवक झाली आहे. मागणीच्या तुलनेत टोमॅटोची आवक वाढली.

मागील आठवड्यात तेजीत असलेल्या टोमॅटोचे दरही खाली उतरले आहेत. रविवारी टोमॅटोला दहा किलोसाठी १६० ते २२० रुपये असा दर मिळाला आहे. आवक वाढल्याने फ्लॉवर, मटारच्या दरातही १० ते २० टक्क्यांनी घट झाली आहे.

मध्य प्रदेशातून १३ ते १४ टेम्पो मटारची, कर्नाटकातून ३ टेम्पो कोबी, मध्य प्रदेश व कर्नाटकातून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, राजस्थानातून ८ ट्रक गाजर, आंध्रप्रदेश व तामिळनाडूतून ५ ते ६ टेम्पो शेवग्याची तर मध्यप्रदेशातून सुमारे तीन हजार गोणी लसणाची आवक झाली आहे. आग्राहून २८ ते ३० ट्रक, तर तळेगावाहून ७ ते ८ ट्रक बटाट्याची आवक झाली. कार्तिकी एकादशी सोमवारी असल्याने उपवासासाठी रविवारी बाजारात रताळ्याची आवक झाली. रताळ्यास सध्या मागणी वाढली आहे.

स्थानिक भागातून ५०० ते ५५० गोणी सातारी आल्याची तर साडेचार हजार पेटी टोमॅटोची आवक झाली. २० टेम्पो फ्लॉवर, २०० ते २२५ गोणी रताळी, १४ ते १५ टेम्पो कोबीची आवक झाली. नवीन कांद्याची १०० ट्रक तर जुन्या कांद्याची २ते ३ ट्रक कांद्याची आवक झाली. तळेगाव येथून ७ ते ८ हजार गोणी बटाट्याची आवक झाली आहे.

कोथिंबीरची जुडी रुपयाला

भाजीपाला विभागात रविवारी कोथिंबीरची सुमारे ३ लाख जुडी आवक झाल्याने कमी भाव मिळाला. अनेक शेतकऱ्यांना जुडीमागे एक रुपयाचा भाव मिळाला. काही शेतकरी कमी भाव मिळाल्याने माल टाकून निघून गेले. अनेकांना वाहतुकीचा खर्चही मिळाला नाही. बाजारात मेथीची सुमारे ७५ हजार जुडी आवक झाली. मेथीसह अन्य पालेभाज्यांचे भाव स्थिर राहिले.

सजावटीच्या फुलांना मागणी

फुलबाजारात रविवारी बहुतेक फुलांचे भाव स्थिर राहिले. लग्नसराईमुळे सजावटीच्या फुलांना मागणी कायम असून भावही मागील आठवड्याप्रमाणे तेजीत राहिले. थंडीमुळे गुलछडी व लिलीची आवक घटली आहे.

झेंडूची आवक जास्त होत असली तरी चांगल्या प्रतीच्या फुलांना अधिक मागणी आहे. सजावटीच्या फुलांना मागणी कायम राहिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद‍्घाटनांचा डबलबार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कात्रज-कोंढवा रोडच्या रुंदीकरणाच्या श्रेयावरून शिवसेना - भारतीय जनता पक्षातच जुंपली आहे. दोन्ही पक्षांच्या आजी-माजी आमदारांनी रविवारी वेगवेगळया ठिकाणी रुंदीकरणाच्या कामाचे उद्घाटन केले. 'हे काम आमच्या पाठपुराव्यामुळेच होत असून, काही लोक श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत,' असा आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आला.

सोलापूर महामार्ग व पुणे-बेंगळुरू महामार्गाला जोडणारा कात्रज-कोंढवा रोड हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या रोडवरून कायमच जड वाहनांची वाहतूक होत असते; तसेच या भागातील नागरीकरण वाढल्याने खासगी वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेला रोड वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी ८४ फुटी रोड प्रस्तावित होता. पुणे महापालिकेने या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अखेर एप्रिल २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली. हा निधी उपलब्ध झाल्यानंतर या भागातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर व शिवसेनेच्या नगरसेवक संगीता ठोसर यांच्यात त्याच्या श्रेयावरून जुंपली आहे. त्यामुळे रविवारी टिळेकर यांनी गोकुळनगर चौक येथे रुंदीकरणाच्या कामाचे उद्घाटन केले, तर ठोसर यांनी खडी मशिन चौक येथे उद्घाटन केले.

शिवसेनेकडून माजी आमदार महादेव बाबर यांच्या हस्ते, तर भाजपच्या वतीने कोंढवा बुद्रुक ग्रामस्थांनी कामाचे उद्घाटन केले.

या वेळी झालेल्या भाषणबाजीत, दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. 'कामाला मंजुरी मिळून, वृत्तपत्रात त्याच्या निविदेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर श्रेय लाटण्यासाठी आंदोलन करण्याची टिळेकर यांची सवय आहे,' असा आरोप बाबर यांनी केला, तर 'या पूर्वी पाच वर्षे शिवसेनेचा आमदार असताना त्यांना हे रुंदीकरणाचे काम जमले नाही. आता मी हे काम केल्यानंतर ते श्रेय घेत आहेत,' असे टोला टिळेकर यांनी हाणला.

रस्ता रुंदीकरणासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केल्याचा दावा शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवक संगीता ठोसर यांनी केला आहे, तर तीन महिन्यांपूर्वी केलेल्या आंदोलनामुळे महापालिकेला जाग येऊन त्यांनी कामासाठी तातडीने निधी मंजूर केल्याचे टिळेकर यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझ्याला पालकांचा ‘हात’

0
0

म. टा. वृत्तसेवा,जुन्नर

दप्तराच्या जड झालेल्या ओझ्याला पालकांची बेफिकीरी कशी कारणीभूत असू शकते, याचे वास्तव दप्तर तपासणी मोहिमेत निदर्शनास आले. मुलांच्या दप्तरात अनेक पेन्सिली, वह्या, मुलांची खेळणी, मोठ्या पाण्याच्या बाटल्या आणि छोट्या मुलांनाही भरगच्च असे खाण्याचे डबे आढळले. एवढेच नव्हे, तर पॅड, रंगपेटी, क्राफ्टबुक, वर्कबुक असे अनावश्यक साहित्य दप्तरात आढळल्याने या वस्तूंनीच विद्यार्थ्यांना दप्तराचे 'जड झाले ओझे' म्हणण्याची वेळ आली.

पथकातील शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना विचारणा केली असता पालक ऐकत नाहीत, सांगितले तरी अनावश्यक गोष्टी दप्तरात घालून पाठवतात, अशा भावना त्यांच्याकडून व्यक्त होत होत्या. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रश्नांबाबत पालक शाळेत येण्यात टाळाटाळ करतात. त्यामुळे पालक आणि शिक्षक यांच्या मधील संवाद होत नसल्याने पालकांच्या बेफिकीरीला आळा कसा घालायचा, हा प्रश्न अनुत्तरित रहात आहे. दप्तराचे ओझे कमी व्हावे, हे कोर्टाचे निर्देश आहेत. त्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर टाकण्यात आली असली, तरी घरून मुलांना शाळेत पाठविणारे पालक बेफिकीर करत दप्तराचे ओझे मुलांवर लादत असतील, तर यासाठी दाद शिक्षण विभागाने मागायची, की मुख्याध्यापकांनी हा प्रश्न उपस्थित होत आहे.

जुन्नर तालुक्यातील शाळांतील विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी करण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी के. डी. भुजबळ, अशोक लांडे, नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी डामसे पथकात सहभागी होते. दरम्यान, दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी फाइल फोल्डरचा एक पर्याय करता येतो का, याची चाचपणी आम्ही करत आहोत. त्यातून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे जुन्नरचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामानवाला पुणेकरांचे अभिवादन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी शहरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले. विविध पक्ष, संघटना, सामाजिक आणि सेवाभावी संस्थांद्वारे आयोजित कार्यक्रमांतून महामानवाच्या कार्याला उजाळा देण्यात आला.

भाजपतर्फे अभिवादन सभा

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाजप पुणे शहराध्यक्ष आणि खासदार अनिल शिरोळे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मोर्चाचे अध्यक्ष सुखदेव अडागळे, संदीप खर्डेकर, सरचिटणीस दीपक शिंदे, भिमराव साठे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश जौंजाळ, संजय कांबळे, सुखदेव वाघमारे, संदीप सांगळे, संग्राम चंदनशिवे, माणिक पितळे आदी या वेळी उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टीतर्फे अभिवादन सभा

रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या पुणे शहर संघटनेतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशन परिसरातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात अभिवादन सभेचे आयोजन केले होते. पुणे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पक्षाचे पुणे व पिंपरी चिंचवड निरीक्षक एम. डी. शेवाळे आणि पक्षाचे पुणे महापालिका गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक असे नाव देण्याची मागणी करण्यात आली. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ कांबळे, परशुराम वाडेकर, असित गांगुर्डे या वेळी उपस्थित होते.

बहुजन महासंघातर्फे गरिबांना फळेवाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुजन महासंघातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जोगदंड, पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा नंदा यादव यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संघटनेतर्फे डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. या निमित्त संघटनेने बोपोडी येथील अनाथाश्रमामध्ये गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना फळे आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास जोगदंड, शहराध्यक्ष विनोद सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र यादव यांच्यासह इतर कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

संघर्ष दलातर्फे पुष्पहार

रिपब्लिकन संघर्ष दलातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय भिमाले यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. डॉ. आंबेडकर यांनी केलेल्या कार्यापासून प्रेरणा घेत संघटनेचे सामाजिक कार्य वाढविण्याचे आवाहन भिमाले यांनी या वेळी उपस्थितांना केले.

शहर जिल्हा काँग्रेस

पुणे शहर जिल्हा काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पुण्याचे निरीक्षक प्रकाश सातपुते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राजेंद्र भुतडा, सचिन आडेकर, मुकेश धिवार, अमर परदेशी, उत्तम भूमकर, दिलीप लोळगे आदी या वेळी उपस्थित होते. पुणे शहर काँग्रेस मानवाधिकार विभागातर्फेही महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. विभागाचे अध्यक्ष रामदास मारणे, रमेश अय्यर, राहुल जगताप, सचिन सावंत, प्रमोद पवार, राहुल जगताप आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मागासवर्गीय विभागाने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विभागाचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

राजकीय पक्षांचेही अभिवादन

शहर शिवसेनेतर्फे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहरप्रमुख विनायक निम्हण, शहर संघटक अजय भोसले व संजय मोरे, विभाग संघटक उत्तम भुजबळ, विभाग प्रमुख सुनील धोत्रे, डॉ. अमोल देवळेकर, सुधीर ढवळे, सपना ढवळे, रोहित कदम, अमृत पठारे आदी या वेळी उपस्थित होते.

भारिपतर्फे गीते

भारिप बहुजन महासंघातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'सलग २४ तास आंबेडकरी गीतांचा व विचारांचा जागर' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महासंघाच्या युवक आघाडीतर्फे या वेळी 'एक वही, एक पेन' हा खास विद्यार्थ्यांसाठीचा उपक्रमही आयोजित करण्यात आला. महासंघाच्या अॅड. वैशाली चांदणे आणि युवक शहराध्यक्ष उमेश चव्हाण यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांच्या कार्याला आणि विचारांना उजाळा देण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागातर्फे डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. विभागाचे पुणे शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे आणि प्रा. मयूर गायकवाड या वेळी उपस्थित होते. सोनू काळे, संदीप थोरात, हर्षद शेख, सचिन पारधे, हनुमंत मनोहरे, महेंद्र कांबळे यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीतर्फे डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. पक्षाच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

फुले- साठे- आंबेडकर विचार फाउंडेशन मागासवर्गीय संघटना, शिव-शक्ती लहु-शक्ती विचार मंच आणि लहु गर्जना ग्रुपतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या निमित्ताने संघटनांच्या एकत्रित प्रयत्नांमधून व्यसनमुक्ती अभियान हाती घेण्यात आले आहे. अभियानाच्या निमित्ताने नागरिकांना मी स्वतः व्यसन करणार नाही आणि इतरांना व्यसन करू देणार नाही, अशी शपथ देण्यात आली. औंध, वाघोली, खडकवासला, धायरी आदी शाखांमधून हा कार्यक्रम घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन फार्मसीला हवे नियमांचे बंधन

0
0

औषधांची विक्री दुकानातून की ऑनलाइनद्वारे व्हावी या संदर्भात व्यावसायिकांमध्ये मतभेद आहेत. या संदर्भात केंद्र सरकारने समिती स्थापन केली आहे. फार्मसीच्या शिक्षणावर नियंत्रण ठेवणाऱ्या फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. बी. सुरेश यांच्याशी या संदर्भात आमचे प्रतिनिधी मुस्तफा आतार यांनी साधलेला हा संवाद.

ऑनलाइन फार्मसीचा सध्या सर्वत्र वापर सुरू आहे. त्याबाबत फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची नेमकी भूमिका काय आहे?

ऑनलाइन' फार्मसीला समजून घेतले पाहिजे. केंद्र सरकारने या संदर्भात एक आढावा घेण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्या समितीमार्फत ऑनलाइन फार्मसीचा फायदा आहे की तोटा आहे, त्याची अंमलबजावणी कशी करता येईल याबाबत अभ्यास चालू आहे. ऑनलाइन' फार्मसीचा वैद्यक तज्ज्ञ, औषध व्यवसाय, फार्मसी औषध उत्पादक यांच्यापेक्षा पेशंटला अधिक फायदा झाला पाहिजे हे विसरता कामा नये. पेशंटना ऑनलाइन' फार्मसीमुळे सेवा मिळेल. पण औषधे देताना पेशंटच्या आरोग्य सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये, अशी माझी अपेक्षा आहे. त्यानुसार यंत्रणा काम करणे अपेक्षित आहे.

ऑनलाइन' फार्मसीला तुम्हा विरोध करता की पाठिंबा देता?

ऑनलाइन' फार्मसीकडे मी निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्हपेक्षा मी खुल्या मनाने त्याचा विचार करतो. प्रत्येक औषधाची गोळी ही औषध दुकानातून मिळणे अपेक्षित आहे. ती फार्मसिस्टने द्यायला हवी. औषधे कोणत्या मार्गाने मिळतात यापेक्षा औषधे कोण देते हे महत्त्वाचे आहे. फार्मसिस्टच्या उपस्थितीतच औषधे मिळणे महत्त्वाचे आहे. एका पेशंटला डॉक्टरने महिन्याची औषधे लिहून दिली असतील आणि त्याच्याकडे आठवड्याचे औषधे घेण्याचे पैसे असेल तर तो तेवढे घेऊ शकतो. पण दुसऱ्या आठवड्यात त्याने पुन्हा प्रिस्क्रिप्शन दाखवून औषधे घेतली तर ते प्रिस्क्रिप्शन फार्मसिस्टच्या रेकॉर्डला असावे. त्यामुळे ऑनलाइन फार्मसीमधून पेशंट कधीही औषधे घेऊ शकतो. परंतु, ती औषधे फार्मसिस्टकडून मिळणे गरजेचे आहे. ऑनलाइन फार्मसीद्वारे औषधे देताना पेशंटशी संवाद साधल्याशिवाय फार्मसिस्टने त्याच्या आजारावरील औषधे देऊ नये. सध्या अनेक ठिकाणी पेशंटना जाणे अशक्य असते. वृद्ध व्यक्ती अथवा घरात आजारी असलेल्या व्यक्ती औषध दुकानात जाऊन रांगेत उभे राहू शकत नाही. त्या व्यक्तीने ऑनलाइन फार्मसीद्वारे औषधे खरेदी केल्यास ते सोपे ठरू शकते. एका फोनवर पेशंटना चांगले औषधे सहज हातात मिळत असेल त्यासाठी ऑनलाइन फार्मसी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे ऑनलाइन' फार्मसीला माझा विरोध नसून उलट पाठिंबाच आहे. परंतु, ऑनलाइन फार्मसीची यंत्रणा राबविण्यासाठी योग्य ती नियमावली असावी. कोणीही उठसूठ औषधे खरेदी करता कामा नये किंवा त्याला सहज औषधे उपलब्ध होता कामा नये.

फार्मसी क्षेत्रापुढे कोणती आव्हाने आहेत?

औषध उत्पादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कच्चा माल उपलब्ध होण्याचे मोठे आव्हान सध्या आपल्या देशातील फार्मसी क्षेत्रापुढे आहे. सध्या भारतातील औषध उत्पादन क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात चीनमधून कच्चा माल आणला जातो. चीनमधून येणारा कच्चा माल स्वस्तात मिळत असल्याने औषध उत्पादकांनादेखील स्वस्तात औषधे उपलब्ध करणे शक्य आहे. परंतु, कच्चा माल जर उपलब्ध झाला नाही तर देशातील औषध उद्योगापुढे मोठे संकट निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळेच देशातील कच्चा माल निर्मितीला प्रोत्साहन द्यायला हवे. चीनच्या किमती तसेच अन्य देशाच्या तुलनेत केंद्र सरकार कशाप्रकारे सवलत देऊ शकते याचा विचार केला पाहिजे. त्याशिवाय सध्या देशात नव्याने मोठ्या प्रमाणात बायोलॉजिकल ड्रग्ज, लस, (रक्तापासून तयार करण्यात आलेली औषधे) महागडी औषधे बाजारात येत आहेत. कॅन्सरवरील औषधे चार ते पाच लाखांना मिळत आहेत. प्रत्येक पेशंट महागडी औषधे खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे अनेकांची आयुष्ये उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे आता व्यावसायिक 'क्लिनिकल फार्मासिस्ट' उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे.

प्रोफेशनल फार्मसिस्टची आवश्यकता का आहे ?

सध्या महागडी औषधे बाजारात येत आहेत. त्यामुळे ही औषधे देताना फिजिशियन आणि पेशंट दोघांना तो मार्गदर्शक ठरेल असा प्रोफेशनल क्लिनिकल फार्मसिसस्ट असण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. योग्य आजाराला योग्य औषधे योग्य प्रमाणात देऊ शकतो. स्पेशालिस्ट फार्मसिस्टला देखील नव्या औषधांची माहिती असावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अडीच कोटींचे दागिने चालकाने लांबवले

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

अडीच कोटी रुपयांचे दहा किलो वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन येणाऱ्या सराफाची नजर चुकवून हे दागिने घेऊन कार चालक फरार झाला आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किवळेजवळ ही घटना घडली. चालक विक्रमसिंग परमार (मूळचा राजस्थान) याच्याविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण कुमार ओसवाल (वय ३९, रा. गंगाधाम मार्केट, पुणे) यांचे पुण्यात रविवार पेठेत पलक ज्वेलर्स या नावाने दुकान आहे.

ओसवाल यांनी नेहमीप्रमाणे मुंबईच्या सराफ बाजारपेठेतून १०० ग्रॅम सोन्याचे ८० नग, पन्नस ग्रॅम सोन्याचे ४० नग, असे सुमारे अडीच कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी करून पुण्याकडे येत होते. चारच महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला असलेला विक्रमसिंगला बरोबर घेतले होते.

मुंबईवरून पुण्याला येताना ते किवळे येथे लघुशंकेसाठी गाडीतून खाली उतरले. त्यासंधीचा फायदा घेत विक्रमसिंगने परमार यांना रस्त्यातच सोडून मुद्देमालासह गाडी पळवून नेली. दागिने, मोबाइल, तसेच मोटार असा एकूण दोन कोटी ५७ लाख ५५ हजार किमतीचा ऐवज घेऊन चालक पसार झाला आहे, अशी तक्रार प्रवीण कुमार ओसवाल यांनी देहूरोड पोलिसांकडे दाखल केली आहे. विक्रमसिंग परमार सध्या पुण्यात बालाजीनगर येथे राहत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरी-चिंचवडसाठी पासपोर्ट कार्यालय हवे

0
0

खासदार बारणे यांची परराष्ट्रमंत्र्यांकडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय निर्माण करावे, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली आहे. दिल्ली येथील प्रत्यक्ष भेटीत बारणे यांनी स्वराज यांच्याकडे लेखी निवेदन दिले तसेच चर्चा केली.

खासदार बारणे म्हणाले, 'पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र महापालिका आहे. त्यामध्ये पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, मोशी, सांगवी अशा उपनगरांचा समावेश होतो. पासपोर्ट कार्यालयास आवश्यक सर्व बाबींची पिंपरी-चिंचवड शहर करते. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी येथे स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय असणे आवश्यक आहे.'

आशिया खंडातील मोठ्या औद्योगिक शहरांमद्ये पिंपरी-चिंचवडचे नाव अग्रस्थानी आहे. हिंजवडी आणि तळवडेमद्ये आयटी पार्क आहेत. लोणावळा, खंडाळा पर्यटनस्थळे आहेत. सध्या या शहरापासून ३० किलोमीटर अंतरावरील पासपोर्ट कार्यालयात जावे लागते. या प्रश्नावर योग्य सहकार्य करण्याचे आश्वासन स्वराज यांनी दिल्याचे बारणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांचे नागपूर बनले गुंडापूर : पवार

0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

'मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात सध्या गुंडगिरीचा धुमाकूळ सुरू असल्याने आता नागपूर न म्हणता गुंडापूर म्हणायला पाहिजे. भाजप सरकारच्या काळात राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार आहे,' अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ येथे आयोजित जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी प्रदेश युवाध्यक्ष उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष जालींदर कामठे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राजेंद्र कारेकर, वैशाली नागकडे, बापूसाहेब भेगडे, तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, बाळासाहेब नेवाळे, गणेश खांडगे, गणेश काकडे, राजू बोराटी, माया भेगडे, अर्चना घारे, अतिष परदेशी बबनराव भेगडे, विठ्ठलराव शिंदे उपस्थितीत होते.

'नागपूरसह सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली गुन्हेगारी हे भाजप सरकारचे अपयश आहे. भाजपा सरकारमध्ये आपापसात ताळमेळ नाही. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. आघाडी सरकार हे सर्व सामान्य नागरिकांचा विचार करत होते. परंतु, भाजप सरकार आल्यापासून ते केवळ स्वतःचाच विचार करत आहे,' अशी टीका अजित पवार यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रेयवादात आरोपी निसटला

0
0

वाल्हेकरवाडी प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

असह्य जाच, मारझोड आणि संशयी वृत्तीच्या पतीला कंटाळलेल्या पत्नीने मुलीच्या प्रियकराच्या मदतीने दरोड्याचा बनाव रचल्याचे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी उघड केले. वाल्हेकरवाडी येथील कथित दरोडा प्रकरणावरून पिंपरी-चिंचवड मध्ये एकच खळबळ उडाली होती. पण गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस यांच्यातील श्रेयवादाचा फायदा उठवत मुख्य आरोपीने चिंचवड पोलिस ठाण्यातून धूम ठोकल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

वाल्हेकरवाडी येथील रजनीगंधा सोसायटीमध्ये राहणारे मधुकर पाटील यांच्या घरावर ३० नोव्हेंबर रोजी रात्री साडेआकराच्या सुमारास दरोडा पडला. पाच दरोडेखोरांनी घरात घुसून, हत्याराचा धाक दाखवून १८ तोळे सोन्याचे दागिने लुटून नेल्याचा बनाव पतीच्या जाचाला कंटाळेलेल्या पत्नीने रचला होता, तर सेकंड शिफ्ट वरून घरी परतलेल्या पतीवर दरोडेखोरांनी हल्ला चढविला होता. वास्तविक हा दरोडा नसून बनाव असल्याचे तीन दिवसांच्या तपासात पुढे आले.

कथित दरोडा प्रकरणात पती, पत्नी व मुलांच्या जबाबात असलेल्या विसंगतीवरून पोलिसांचा संशय बळावला होता. त्याच्या चौकशीसाठी मनिषा, मुली आणि अल्पवयीन मुलीचा प्रियकर निलेश भराडिया यांना चौकशीसाठी चिंचवड पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. याच वेळेस गुन्हे शाखेचे अधिकारी-कर्मचारी पोलिस ठाण्यातच होते. सर्वांना वेगवेगळे बसवून चौकशी सुरू होती. पण प्रकरणात निलेश व मनिषा यांचाच हात आहे हे निश्चित झाले नव्हते.

दरम्यान, चौकशी सुरू असतानाच भूक लागल्याने काही तरी खाऊ येतो असे सांगत निलेश पोलिस ठाण्यातून निसटला. यापूर्वी त्याचा ताबा कोणाकडे द्यायचा यावरून पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यासह गुन्हे शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये वादंग सुरू होता. याचाच फायदा घेत निलेश तेथून निसटल्याची माहिती समोर येत आहे. त्याला लवकर पकडू असा दावा दोन्ही विभागांकडून आता होत आहे. चिंचवड प्रकरणात दोन विभागांमध्ये वाद उफाळल्याने आयुक्तालयात बसणाऱ्या एका अतिउच्चपदस्थ अधिकाऱ्याने मध्यस्ती करत पत्रकार परिषद घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार लाखांची पर्स कार्यक्रमातून लंपास

0
0

पुणे : हळदीच्या कार्यक्रमातून दोन महिलांनी सव्वा चार लाख रुपयांचा ऐवज असलेली पर्स चोरून नेल्याची घटना शुक्रवारी भारती विद्यापीठ परिसरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी करणाऱ्या महिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्या असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सचिन बडदे (वय ३१, रा. नवी मुंबई) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यावरून दोन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडदे हे मुळचे मुंबईचे असून ते कुटुंबासह त्यांच्या साडूच्या मुलीच्या लग्नासाठी पुण्यात आले होते. शुक्रवारी भारती विद्यापीठ परिसरातील राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे हळदी समारंभ होता. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हळदी समारंभ सुरू झाला. त्या वेळी बडदे यांच्या आई स्टेजच्या समोरील खुर्चीवर गप्पा मारत बसल्या होत्या. त्या वेळी त्यांना नातेवाइकांनी स्टेजवर बोलवले. त्या पर्स खुर्चीवर ठेवून स्टेजवर गेल्या. त्या वेळी दोन महिलांनी एक मोबाइल, २० हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स चोरून नेली. बडदे यांच्या आई पाच मिनिटांत खाली आल्या असता पर्स जागेवर नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी पर्सची शोधाशोध केला. मात्र, ती सापडली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images