Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पिता व पुत्राचा संशयास्पद मृत्यू

$
0
0
देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहाराजवळील फुटबॉल मैदानावर शुक्रवारी चार वर्षीय मुलासह पित्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मुलाचा खुन करून पित्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. रॉयस रेनॉल्डो (वय ४) आणि रेनॉल्डो मनोहर फर्नांडो (वय ३०, रा, शाहूनगर, चिखली) अशी या पिता-पुत्राची नावे आहेत.

धनकवडी जळीतकांड : २ अटकेत

$
0
0
धनकवडी जळीतकांड प्रकरणी हवेली येथील खूनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन शनिवारी कोर्टात हजर केले. त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला.

पुण्यनगरी झाली 'कमिशननगरी'- राज

$
0
0
जमिनींच्या व्यवहारामुळे पुण्यनगरी 'कमिशन'नगरी बनली असल्याची टीका 'मनसे' अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केली. वर्षानुवर्षे राज्य सरकार यांच्याच हातात आहे, तरी शहरांसाठीच्या योजना रेंगाळत ठेवणा-यांना आता पालिकेची एकहाती सत्ता कशाला द्यायची, असा सवाल उपस्थित करून त्यांनी अजित पवार यांच्यावरही तोफ डागली.

युवा धोरणासाठी चळवळ हवी

$
0
0
देश आणि समाज युवा वर्गाला आपले मानत नाही, यापुढे चळवळींनी हा विषय हाती घ्यायला हवा, असे मत सामाजिक कार्यर्कत्या रजिया पटेल यांनी व्यक्त केले.

'कूहू'चे गुंजन 'मल्टिमिडिया'मधून

$
0
0
पुस्तक वाचताना जोडीला भरपूर फोटो, अॅनिमेशन, कॅलिग्राफी आणि व्हीडिओची जोड असली तर...टीव्ही किंवा कम्प्युटरवर पुस्तक ऐकता आले; तर पुस्तक वाचायला किती मजा येईल ना! अशीच मजा प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांची 'कूहू' ही नवी कादंबरी वाचताना येणार आहे...कारण ही मराठीतली पहिली मल्टिमीडिया कादंबरी आहे!

भारतीय मसाल्यांचा तडका फिका

$
0
0
विकसित देशांनी केवळ भारतावर लादलेल्या तिखट बंधनांमुळे पारंपरिक मसाल्यांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मसाल्यांवर ही बंधने लादली असून, निर्यातीच्या किंमतीत वाढ होत असली, तरी वजनात मात्र गेल्या काही वर्षात दहा टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजकडून 'नो पार्किंग'मध्ये पार्किंग!

$
0
0
प्रत्येक वेळी नियमांवर बोट ठेवून आपल्या विरोधकांची कोंडी करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात आपलीच गाडी 'नो पार्किंग'मध्ये 'पार्क' केली आणि मग पोलीस हवालदारानंही, अगदी त्यांच्यासारखंच नियमावर बोट ठेवत 'कायदे से' शंभर रुपयांची पावती फाडली.

लोणावळ्यात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

$
0
0
लोणावळा येथे एका तरुणाने स्वत:ला जाळून घेतल्याची घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. ही आत्माहत्या का घातपात, या विषयी संशय व्यक्त होत असून, पोलिस मृत्यूच्या कारणाचा शोध घेत आहे.

द्राक्ष बागायतदारांसाठी आणखी १२ हवामान केंद्रे

$
0
0
शेतक-यांना मोबाइलवरून हवामानाची स्थिती कळविणाऱ्या हवामान केंद्रांचे अंदाज ९० टक्के अचूक येत असल्याचे आढळून आल्याने अशी आणखी १२ हवामान केंद्रे उभारण्याचा निर्णय द्राक्ष बागायतदार संघाने घेतला आहे.

'एचआव्ही'ग्रस्त पुन्हा सहजीवनाकडे

$
0
0
एचआयव्ही संसर्गितांचे पुनर्विवाह जुळवून आणण्याचा स्तुत्य उपक्रम सातारा येथील 'एनएसपीप्लस' या स्वयंसेवी हाती घेतला असून, या संस्थेने नुकत्याच भरवलेल्या वधू-वर सूचक मेळाव्याच्या माध्यमातून अशा ११ जोड्या जुळून आल्या आहेत.

खंडाळा, फलटण दुष्काळाच्या छायेत

$
0
0
पश्चिम महाराष्ट्रातील माण, खटाव, खंडाळा, फलटण तालुक्यांना कडक उन्हाळा सुरू होण्याआधीच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून या परिसरातील सुमारे ५८ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

निवडणुक रणधुमाळीत 'व्हॅलेंटाइन डे'

$
0
0
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगल्याने यंदाचा 'व्हॅलेंटाइन डे' पुण्यात धुमधडाक्यात सेलिब्रेट होणार आहे. वैविध्यपूर्ण गिफ्टबरोबरच रंगीबेरंगी फुले विशेषत: गुलाब आकषिर्त करीत आहेत. कॉलेजच्या परिसरातील फुलांचे स्टॉल गुलाबांनी बहरले असून, त्यांच्या खरेदीसाठी सोमवारी प्रेमीयुगुलांची झुंबड उडाली होती.

आयटीतील संधींविषयी १४ तारखेला सेमिनार

$
0
0
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात असलेल्या संधींची दारे आपल्यासाठीही किलकिली व्हावी, असे वाटत असेल, तर १४ फेब्रुवारीचा सेमिनार चुकवू नका.

एसटी चालकांची आरोग्य तपासणी

$
0
0
एसटी चालकांने मद्यपान केले आहे का, याची तपासणी करण्यासाठी पुणे विभागातील सर्व डेपोंमध्ये ब्रेथ अॅनलायझर ठेवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्यात येणारे तीन अॅनलायझर शिवाजीनगर, स्वारगेट आणि शिवाजीनगर बसस्थानकावर ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

'वेब कास्ट'द्वारे मेडिकल कॉलेजेस होणार कनेक्ट

$
0
0
होमिओपॅथी, डेंटल, आयुर्वेदाच्या राज्यातील ३११ मेडिकल कॉलजेच्या हजारो विद्यार्थ्यांना एकाचवेळी वैद्यकीय विद्याशाखांच्या तज्ज्ञांकडून ज्ञानाचे धडे घेता यावेत, यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे 'वेब कास्ट'चा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे मेडिकल कॉलेजेस एकमेकांशी कनेक्ट होणार आहेत.

आज धम्माल

$
0
0
'व्हॅलेंटाइन डे'ला होणारा राजकीय विरोध यंदा निवडणुकीच्या प्रचारामुळे मावळल्याने उद्या तरुणाई फुल्टू धम्माल करण्यास सज्ज आहे.

पक्षीप्रेमी उडाले भुर्र...र्र

$
0
0
हौस म्हणून भारीतले कॅमेरे घेऊन पक्ष्यांची छायाचित्रे काढणा-या अनेक दिग्गज तसेच हौशी पक्षी प्रेमींची पुण्यात कमतरता नाही, मात्र पक्ष्यांच्या संवर्धनासाठी राज्यात सुरू असलेल्या महापक्षी गणनेदरम्यान ही मंडळी भूर्रकन उडून गेली. विदर्भ मराठवाडा भागातून गणेनेला उत्तम प्रतिसाद मिळाला असला तरी पुण्यातील पक्षीमित्रांनी उपक्रमाकडे पाठ फिरवली आहे.

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

$
0
0
चारित्र्याच्या संशयावरून चाकुने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना सांगवी येथे सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

'त्या' कोदरा वरईत विषारी घटक नाहीत

$
0
0
पाचशेहून अधिक जणांना 'कोदरा' जातीच्या वरईमुळेच विषबाधा झाल्याचे राज्य प्रयोगशाळेने स्पष्ट केले असले, तरी म्हैसूरच्या प्रयोगशाळेच्या तपासणीत 'कोदरा' जातीच्या वरईत विषाचे घटकच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे केवळ तांत्रिकतेत फसल्याने 'एफडीए'ने सुरू केलेली संबंधित उत्पादकाविरोधाची 'फाईल बंद' होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नियम मोडणा-याकडून बारा लाख वसूल

$
0
0
रेल्वे नियमांचे उल्लंघन करणा-यांकडून रेल्वे पोलिसांनी वसूल केलेल्या दंडाचा आकडा १२ लाखांच्या पुढे गेला आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत रेल्वे नियम तोडणा-यांच्या विरोधात सात हजार २९७ केसेसची नोंद करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने कळवले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images