Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हॉटेलमध्ये ३३ लाखांची वीजचोरी

$
0
0

वडगाव शेरीतील हॉटेल डी पॅलेसमधील दोघांवर गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वीजमीटरमधील वीजवापराची नोंद रिमोट कंट्रोलद्वारे रोखून वीजचोरी करण्याचा प्रकार वडगाव शेरीमध्ये उघडकीस आला आहे. येथील हॉटेल डी पॅलेसमध्ये अशाप्रकारे सुरू असलेली सुमारे दीड लाख युनिट्स, म्हणजे ३३ लाख रुपयांची वीजचोरी उजेडात आली आहे.

याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या हॉटेलमध्ये अक्रम एम. देवडा यांच्या नावे व्यावसायिक वीज कनेक्शन आहे, तर परेश खंडेलवाल वीज वापरकर्ते आहेत. या हॉटेलमधील वीजवापराबाबत अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केलेल्या विश्लेषणातून संशयास्पद माहिती मिळाली. त्यानुसार हॉटेलमधील वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली. प्रथमदर्शनी वीजमीटरची गती संथ असल्याचे दिसले. पुढील तपासणीत या हॉटेलमधील वीजमीटरच्या आतील पीटी (पोटॅन्शियल ट्रान्सफॉर्मर) सर्कीटकडे जाणाऱ्या वायर्स ब्रेक करून त्यामध्ये रिमोट कंट्रोलचे सर्कीट समाविष्ट केल्याचे आढळले. या सर्कीटच्या सहाय्याने वीजप्रवाह सुरू असतानाही रिमोट कंट्रोलद्वारे मीटरमधील वीज वापराची नोंद सोयीनुसार थांबविता येत असल्याचे दिसले. रिमोट कंट्रोलचे सर्कीट छुप्या पद्धतीने लावल्यानंतरही महावितरणच्या अभियंता व कर्मचार्यांनी या वीजचोरीचा छडा लावला. डी-पॅलेस हॉटेलमध्ये एकूण एक लाख ५६ हजार युनिट्स, म्हणजे ३३ लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले. सहायक अभियंता कैलास कांबळे, जे. पी. मालोकर, विजय जाधव, अनघा जोशी, माधुरी वैद्य, व्ही. ए. पगारे, तंत्रज्ञ नंदकिशोर गायकवाड, साईनाथ दांगडे आदींनी कारवाईत भाग घेतला. या प्रकरणी अक्रम एम. देवडा व परेश खंडेलवाल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘इन्फोनेट बीपीओ’मध्ये ३७ लाखांची वीजचोरी

$
0
0

पुणेः महावितरणने विमाननगर येथील 'इन्फोनेट बीपीओ सर्व्हिसेस लिमिटेड' या बीपीओ कंपनीतील सुमारे ३७ लाख ८१ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली. वीजमीटरची मूळ कार्यप्रणाली बंद करून त्याद्वारे ही वीजचोरी करण्यात आली आहे. संचालक मंडळासह कंपनीचे प्रशासकीय अधिकारी संग्राम तोमर, वीजजोडणीधारक जितेंद्र कपिलदेव गुप्ता यांच्याविरुद्ध महावितरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विमाननगर येथील गंगा इम्पोरिया बिल्डिंगमध्ये ही कंपनी आहे. या कंपनीच्या जागेसाठी महावितरणने कमर्शिअल वीजजोडणी दिलेली आहे. कंपनीमधील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्याने महावितरणच्या अभियंत्यांनी वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी केली. त्या वेळी वीजमीटरला लावण्यात आलेले सील तुटलेले आढळले; तसेच वीजमीटरची गती संथ झाल्याचेही दिसले. त्यामुळे वीजमीटर जप्त करण्यात आला होता. मीटरची अधिक तपासणी केल्यानंतर त्यामध्ये फेरफार करून मूळ कार्यप्रणाली बंद केल्याचे आणि त्याद्वारे वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोसायटीत शिरून साखळी चोरली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या काही दिवसांपासून साखळी चोरटे सोसायटीच्या आवारात घुसून दागिने हिसकावू लागले आहेत. विशेषत: ज्येष्ठ महिलांना साखळी चोरटे लक्ष करत असून बिबवेवाडीत शनिवारी सकाळी सोसायटीच्या आवारातून निघालेल्या ज्येष्ठ महिलेला ढकलून चोरट्याने २५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले, तर डेक्कन परिसरातील प्रभात रस्त्यावर ज्येष्ठ महिलेला सोसायटीसमोर धडक देऊन खाली पाडल्यानंतर मंगळसूत्र हिसका मारून नेले. या प्रकरणी बिबवेवाडी व डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपेश काशीनाथ यादव (वय ३६, रा. चौतन्य अपार्टमेंट, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश यांची आई गणूबाई (वय ६५) या रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातात. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास गणूबाई मॉर्निंगवॉकवरून घरी निघाल्या होत्या. त्या वेळी त्यांच्या पाठोपाठ चोरटा सोसायटीच्या आवारात घुसला. गणूबाईंच्या गळ्यातील २५ हजारांचे मंगळूसत्र चोरट्याने हिसकावले व त्यांना ढकलून चोरटा पसार झाला. गणूबाईंना दुखापत झाली नाही. सोसायटीच्या आवारात घुसून चोरट्याने दागिने हिसकावण्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट उडाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पाटील अधिक तपास करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शहरात साखळी चोरटे सक्रिय झाले आहेत. साखळी चोरीचे किमान एक ते दोन गुन्हे शहरात घडतात. डेक्कन परिसरातील प्रभात रस्त्यावरील लेन क्रमांक नऊ येथे रविवारी सकाळी दुसरी घटना घडली. ७५ वर्षीय महिला या सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉक करून घरी जात होत्या. त्या वेळी प्रभात रस्त्यावरील घराजवळ पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील सोनसाखळी चोराने त्यांना जोरात धडक देऊन खाली पाडले. त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडले. मात्र, मंगळसूत्र तुटल्याने पाच ग्रॅम सोने चोरट्याच्या हाती लागले आणि चोरटा या ठिकाणावरून पसार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसऱ्या आघाडीशिवाय पवारांना पर्यायच नाही

$
0
0

डॉ. पतंगराव कदम यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शरद पवार काँग्रेस सोडून गेले नसते, तर काँग्रेसमध्ये तेच सर्वात मोठे 'मास लीडर' ठरले असते,' असे खळबळजनक वक्तव्य करीत 'ते' पद सोडले, तर पवारांना आता मिळविण्यासारखे काही राहिलेले नाही. त्या पदासाठी पवारांनी पुन्हा तिसऱ्या आघाडीची जुळवाजुळव करावी. त्याशिवाय आता पर्याय नाही,' असा सल्ला देत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. तिसऱ्या आघाडीचा सल्ला देत पवारांना काँग्रेसमधून किंवा काँग्रेसच्या सहाय्याने पंतप्रधान होता येणार नाही, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचविले.

रयत शिक्षण संस्थेतर्फे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. 'लोकनेते शरदरावजी पवार' पुस्तकाच्या इंग्रजी भाषेतील अनुवादित ग्रंथाचे प्रकाशन याप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार, विजय कोलते, लेखक अॅड. राम कांडगे व संस्थेचे संचालक डॉ. अनिल पाटील उपस्थित होते.

राज्य संकटात असताना पवार पुन्हा राज्याच्या राजकारणात आले, याकडे लक्ष वेधून डॉ. कदम म्हणाले, 'पवारांनी आता तिसऱ्या आघाडीची मोट बांधावी. हा प्रयोग त्यांनी पूर्वीही केला आहे. या माध्यमातूनच ते पंतप्रधान होऊ शकतील. यशवंतरावांनी पंतप्रधान व्हावे, ही इच्छा पूर्ण झाली नसली तरी शरदरावांच्या रुपाने ती टिकून आहे,' अशी भावनाही त्यांनी या वेळी बोलून दाखवली. नरसिंहराव आपले सामान घेऊन गावी परत गेले होते, पण राजीव गांधींची हत्या झाली आणि नरसिंहराव देशाचे पंतप्रधान झाले. राजकारण अनिश्चित असते,' असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

'मी शास्त्रज्ञ असलो, तरी पवारांनी मला शास्त्र शिकविले. ते आमचे गुरू असून पक्षातीत नेतृत्व आहे. आज सर्वत्र डिजिटल इंडियाचा बोलबाला असला, तरी पवारांनी वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच हे काम करून ठेवले आहे. क्रिकेटचे चाहते असलेले पवार पंचाहत्तरवर नॉट आऊट असून ते शतक नक्की गाठतील,' असे गौरवोद्गार डॉ. माशेलकर यांनी काढले.

'आजही लोक येतात'

'आमचे सरकार चुका आणि आपापसातील मतभेदांमुळे गेले. सत्ता असली की लोक जवळ येतात. सत्ता नसली की कोणी फिरकत नाही. मात्र आपले तसे नाही. लोकांची कामे केल्यामुळे आजही लोक येतात,' असे सांगत डॉ. पतंगराव कदम यांनी आपण राजकारणात सक्रिय असल्याचेच संकेत दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोडफोडीतील आरोपी फरारीच

$
0
0

पिंपरीः चिंचवडमधील आनंदनगर परिसरात गुडांनी केलेल्या तोडफोडीच्या प्रकरणात शनिवारी (२८ नोव्हेंबर) रात्री उशिरा तिघांना अटक करण्यात आली. मात्र, यातील मुख्य आरोपी अद्याप पोलिसांना गुंगारा देत आहे.

सूरज दिलीप जगताप (वय २१), उमेश गौतम बनसोडे (वय २३) आणि अनिकेत विजय कांबळे (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर तडिपार गुंड व तोडफोडीचा मुख्य आरोपी अविनाश पवार हा पसार झाला आहे. चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदनगर झोपडपट्टीत गुरुवारी (२५ नोव्हेंबर) वाहनांची तोडफोड झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिलजमाईसाठी कारवाई मागे

$
0
0

भोईर आणि नढे यांच्यावरील निलंबन रद्द

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रसने पक्षांतर्गत वाद मिटविण्याच्या दृष्टीने माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते विनोद नढे यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज आहे, असा दावा केला जात आहे.

अंतर्गत दुफळीमुळे शहर काँग्रेसची स्थिती कमकुवत झाली होती. त्यातच माजी शहराध्यक्ष भोईर आणि विरोधी पक्षनेते नढे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये व्यूहरचनेला प्राधान्य दिले जात होते. त्या तुलनेत काँग्रेसची स्थिती अधिकच केविलवाणी होती. महापालिका निवडणुका आल्या की स्वतंत्र अस्तित्वाचा मुद्दा पुढे करीत वेगळी चूल मांडायची आणि सत्तेत सहभागी होण्यासाठी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करायची. एखादे दुसरे पद पदरात पाडून पाच वर्षे सत्ताधारी पक्षाच्या सूरात सूर मिसळायचा, असे सूत्र काँग्रेसने अवलंबले आहे. हेच सूत्र फेब्रुवारी २०१२ पासून आजपर्यंत कायम राहिले आहे.

तत्कालिन शहराध्यक्ष भोईर यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रभारी शहराध्यक्षपदाची जबाबदारी सचिन साठे यांच्याकडे सोपविण्यात आली. त्याच वेळी पक्षांतर्गत संघर्षाला प्रारंभ झाला. विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरून दोन गट निर्माण झाले. विरोधी पक्षनेतेपदासाठी कैलास कदम यांचे नाव निश्चित झाल्यानंतर भोईर गटाने विरोध दर्शवित नढे यांना पाठिंबा दिला. पक्षाच्या १३ पैकी दहा नगरसेवकांनी भोईर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत महापालिकेत काँग्रेसचा कारभार केला.

पदवाटपाच्या मुद्यावरून साठे यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार भोईर आणि नढे यांना फेब्रुवारी २०१५ मध्ये पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी अहवाल मागविला. कारणांचा ऊहापोह केला. पक्षाची शहरातील नाजूक परिस्थिती लक्षात घेऊन भोईर आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई महागात पडेल, याची जाणीवही त्यांना झाली.

त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशावरून भोईर आणि नढे यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेत असल्याचे पत्र प्रदेश सरचिटणीस अँड. गणेश पाटील यांनी यांनी दिले आहे. तसेच स्थानिक पदाधिकारी आणि नेते यांच्याशी चर्चा करून विरोधी पक्षनेतेपदासाठी नवीन तीन नावांची शिफारस करावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे तूर्तास तरी पक्षांतर्गत वादावर पडदा पडल्याचा दावा केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत मेडिकल्स २४ तास सज्ज

$
0
0

Rohit.Athavale@timesgroup.com

पिंपरी : पिंपरी - वेळ पहाटे दोनची. कुटुंबातील व्यक्तीची तब्येत बिघडली आणि घरात औषधच शिल्लक नसल्याचे लक्षात आले. आता मेडिकल शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. फॅमिली डॉक्टरांचे क्लिनिक बंद. त्यामुळे सुरू झाला प्रवास मेडिकल शॉप शोधण्याचा. पिंपरी चौकातून अवघ्या दीड किलोमीटरवर एक दोन नव्हे तर चक्क तीन मेडिकल शॉप उपलब्ध झाली आणि हायसे वाटले. अशाच प्रकारे शहरातील विविध ठिकाणच्या मेडिकल शॉपचा ठावठिकाणा शोधायचे ठरले आणि मध्यरात्री गरज पडल्यास ती उपलब्ध होऊ शकतात, याची प्रचीती आली.

पिंपरी-चिंचवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा मुख्य चौक. येथून पुण्या-मुंबईकडे जाण्यासाठी रात्री-अपरात्री वाहने सहज उपलब्ध होतात. पण अशातच जर एखाद्याला औषधाची गरज भासली तर करायचे काय, असा यक्ष प्रश्न स्थानिकांसह अनेकांसमोर उभा ठाकतो. प्रत्येक वेळेस घरात फर्स्ट एड असेलच असे नाही. त्यामुळे गरज भासल्यास या चौकापासून अवघ्या दीड किलोमीटरवर संत तुकारामनगर येथे डॉ. डी. वाय. पाटील आणि चिंचवड स्टेशन येथे निरायम व लोकमान्य हॉस्पिटलमधील मेडिकल २४ तास खुले असल्याचे दिसून आले.

रात्रीअपरात्री खाण्यापिण्याची सोय होईल का, हे पाहणाऱ्यांबरोबरच औषध कुठे मिळेल, याचा शोध घेणारी अनेक मंडळी चौका-चौकांत चाचपडत होती. पिंपरी-चिंचवडजवळ असलेल्या वरील तीन मेडिकलसह निगडी परिसरातील लोकमान्य हॉस्पिटलमध्येदेखील औषधे उपलब्ध होती. 'रात्री किमान सात-आठजण तरी खूप शोधल्यावर हे मेडिकल उघडे मिळाल्याचे सांगतात,' असे येथील फार्मासिस्ट ने सांगितले.

धकाधकीच्या जीवनात आज मेडिकल शॉपमध्ये दिवसा गर्दी ही पाहायला मिळतेच. पण जर रात्री औषधांची गरज भासल्यास काय करायचे या भीतीनेच अनेकांची भंबेरी उडालेली असते. आयटीयन्सच्या शिफ्टच्या जॉबमुळे कायमच वर्दळ असलेल्या पिंपळे सौदागर आणि वाकड परिसरात असाच मेडिकलचा शोध घेतल्यावर येथेदेखील तीन मेडिकल शॉप उघडी मिळाली.

पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाकड येथे लाईफ पॉइंट हॉस्पिटल व वाकडमधील सूर्या हॉस्पिटलमध्ये २४ तास मेडिकल असा बोर्ड दिसत होता. या व्यतिरिक्त सांगवीमधील माकन हॉस्पिटलच्या तळमजल्यावरच श्रीराम मेडिकल सेवेसाठी सज्ज असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळावरून निघा पाच मिनिटांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विमानतळाच्या आवारात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विमानतळ प्रशासनाने उपाययोजना सुरू केली आहे. विमान प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्यांची वाहने जास्त काळ आवारात रेंगाळू नयेत, यासाठी विमानतळाच्या आवारात पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ थांबणाऱ्या वाहनांकडून प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.

विमानांच्या उड्डाणांच्या काही वेळ आधीपासून या परिसरात वाहतूक कोंडी होत असते. प्रवासाला जाणाऱ्या व्यक्तींना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांमुळे टर्मिनल बाहेर वाहनांची गर्दी असते. गाडी टर्मिलनच्या समोर उभी करून प्रवासी व्यक्ती गाडीतून सामान काढेपर्यंत मागे वाहनांची रांग लागते. पर्यायाने येथील मुख्य रस्त्यावरही वाहनांच्या अर्धा ते एक किलोमीटरच्या रांगा लागतात. यावर उपाययोजना म्हणून विमानतळ प्रशासनाने जास्त वेळ थांबणाऱ्या वाहनांकडून शुल्क आकारण्यास सुरुवात केली. विमानतळाच्या आवारात प्रवेश करताना संबंधित वाहनचालकाकडे पावती दिली जाते. तेथून बाहेर पडताना त्या पावतीद्वारे येण्याच्या व जाण्याच्या वेळा तपासल्या जातात. पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागल्यास कारसाठी ८५ रुपये आणि 'एसयूव्ही' गाड्यांकडून १०० रुपये शुल्क आकारण्यात येते.

विमानतळाच्या टर्मिनल बाहेरील आवार लहान आहे. त्यामध्ये रिक्षा, टुरिस्ट कॅब यांना थांबा देण्यात आला आहे. टर्मिनलमधून बाहेर पडण्यासाठी असलेल्या गेटच्या समोर कॅफेटेरिया आहे. टर्मिनलचा आवार मोठा नसल्याने प्रवास करून बाहेर आलेले बहुतांश प्रवासी टर्मिनलच्या प्रवेशद्वारादजवळच थांबतात. त्यामुळे त्यांना घेण्यासाठी आलेल्या गाड्यांची रांग लागते.

विमानतळाच्या आवारात प्रवेश केल्यानंतर बाहेर जाताना कर्मचारी पावती तपासणी करतात. त्यांचे काम संथगतीने सुरू असते. त्यामुळे रांग धीम्यागतीने पुढे सरकते. त्यातही वेळ वाया जातो. त्यामुळे अनेक वाहनांना पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो, असे मत विमानतळाचे नियमित प्रवासी विंग कमांडर (निवृत्त) अनिल होशांगाबाधे यांनी व्यक्त केले; तसेच विमानतळ प्रशासनाने ही शुल्क आकारणी रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली.

पाच किंवा पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ एअरपोर्टमध्ये थांबणाऱ्या वाहनचालकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, खूप वेळ थांबणाऱ्या वाहनांमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी कमीत कमी वेळात वाहने तेथून जावीत, या उद्देशाने पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबणाऱ्या वाहनांकडून शुल्क वसूल केले जात आहे.

- अजय कुमार, संचालक, पुणे विमानतळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकाच व्यक्तीला दोन लायसन्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे चारचाकी व दुचाकीच्या लायसन्स नूतनीकरणासाठी अर्ज केल्यानंतर साडेतीन महिन्यांनी संबंधित व्यक्तीला एक नव्हे, तर दोन लायसन्स मिळाली आहेत. अर्ज केल्यानंतर १५ दिवसांत लायसन्स मिळत असताना, त्यासाठी साडेतीन महिने हेलपाटे घालण्याची वेळ आली आणि त्यानंतर दोन वेगळी लायसन्स दिल्याने आरटीओच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुण्यातील कोथरूड परिसरातील हनुमाननगर येथे राहणाऱ्या योगेश चिथडे यांनी साई मोटर्स ड्रायव्हिंग स्कूलमार्फत 'आरटीओ'कडे चारचाकी व दुचाकी लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी तीन ऑगस्ट २०१५ रोजी अर्ज केला आणि त्याचे शुल्कही जमा केले. मात्र, त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत लायसन्स मिळाले नव्हते. याबाबत 'मटा'ने वृत्त प्रसिद्ध करून हा प्रकार समोर आणला होता. त्यानंतर १० दिवसांतच चिखडे यांना त्यांच्या घरच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे दोन लायसन्स मिळाली आहेत. या एका लायसन्सची नूतनीकरणाची तारीख पाच नोव्हेंबर आहे, तर दुसऱ्या लायसन्सची २३ नोव्हेंबर आहे. यावरून लायसन्स प्रक्रियेला आरटीओकडूनच विलंब झाल्याचे स्पष्ट होते.

दरम्यान, या दोन्ही लायसन्सवर चिथडे यांची स्वाक्षरी वेगवेगळी आहे. त्यामुळे दोन्ही लायसन्ससाठी स्वतंत्र प्रक्रिया केली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिथडे यांच्या अनुपस्थितीत अन्य एखाद्या व्यक्तीने त्यांच्या नावे लायसन्सकरीता अर्ज केला होता का, असा प्रश्न उपस्थित होतो.

एकाच व्यक्तीच्या दोन लायसन्सवर भिन्न स्वाक्षरी कशी? अर्जदाराचे लायसन्स पोस्टाद्वारे घरी पाठविण्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाते. मग, नागरिकांना आरटीओ व पोस्टाच्या फेऱ्या मारायची वेळ का येते? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवत्ता हीच खरी जात : बापट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'बदलत्या काळानुसार ब्राह्मण समाजाने विचार व आचारात बदल करण्याची वेळ आली आहे. गुणवत्ता हीच खरी जात आहे. वेळ पडल्यास ब्राह्मण समाजाने नेतृत्व करावे. मात्र, इतिहासातील चुका सुधारून भविष्यकाळ चांगला करण्याचा विचार केला पाहिजे,' असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी रविवारी व्यक्त केले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महाअधिवेशनात बापट यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार मेधा कुलकर्णी, महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, उपाध्यक्ष सुभाष तिवारी, प्रदेशाध्यक्ष श्याम जोशी, पं. वसंत गाडगीळ, मोहन महाराज कठाळे, कोल्हापूर येथील पुगावच्या सरपंच मालूबाई बर्गे, उपसरपंच लक्ष्मण कुलकर्णी उपस्थित होते. बापट यांच्यासह सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, मनीष कुलकर्णी, ऋत्विक हातगावकर यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. मुजुमदार यांच्या कन्या स्वाती यांनी, तर मनीष व ऋत्विक यांच्या पालकांनी पुरस्कार स्वीकारला. पाटील यांच्या हस्ते पुगावच्या सरपंचांना गाव दत्तक घेतल्याचे पत्र देण्यात आले. सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी केले.

'समाजाने संघटित होण्यात चुकीचे काही नाही. पूर्वीपासूनच अशी रचना आहे. या संघटनात पर्यायाने हिंदू समाजाचाच विचार होता. मात्र, काही आक्रमणांमुळे समाजांमध्ये अपप्रवृत्ती आल्या, त्याचे परिणामही झाले. ब्राह्मण व मराठा समाज आपापल्या समाजाच्या हितासाठी कार्यरत आहेत. विविध समाजांनी एकत्रित येऊन कार्य करणे हेही समाजाचेच कार्य ठरेल,' असे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कठोर तरतुदींची आवश्यकता

$
0
0

बहिष्कार प्रतिबंधक कायद्याबद्दल अंनिसची भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राज्य सरकारने 'महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियम २०१५' या कायद्याचा मसुदा जाहीर केला असला, तरी हा प्रस्तावित कायदा जामीनपात्र असल्याने तो अजामीनपात्र करण्यात यावा; तसेच जादूटोणा विरोधी कायद्याप्रमाणे नव्या कायद्याच्या मसुद्यात कडक धोरणांचा समावेश करावा,' अशी मागणी मुंबई हायकोर्टात जातपंचायतींच्या अन्यायाविरोधात कायदेशीर लढा देणारे अॅड. असीम सरोदे व अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

एखाद्या कुटुंबावर किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचे प्रकार राज्यात वाढत आहेत. त्यामुळे जात पंचातयतींच्या अन्यायाविरोधातील लढ्याला कायद्याच्या चौकटीत बसविण्याची मागणी करण्यात येत होती. सरकारने या प्रकारांची दखल घेत कायदा बनविण्याचे धोरणात्मक ठरवले असले, तरी हा कायदा कठोर असावा, अशी मागणी केली जात आहे.

www.maharashtra.gov.in या वेबसाइटवरून हा मसुदा नागरिकांसाठी उपलब्ध असून, त्या विषयी हरकती आणि सूचना नोंदविता येतील. त्यानंतरच्या टप्प्यात त्याचे कायद्यात रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. विशिष्ट कुटुंब वा कुटुंबीयांना वाळीत टाकण्याचे प्रकार, विविध समाजांमधील अनिष्ट प्रथांचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी सध्याचे प्रचलित कायदे अपुरे पडत होते. अशा अनिष्ट प्रथांचे प्रभावीपणे उच्चाटन होऊन राज्यातील नागरिकांना एकोप्याने राहता यावे, यासाठी या मसुद्यात विविध बाबी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मात्र कायदा जामीनपात्र असल्याने त्याच्या उपयुक्ततेविषयी जाणकारांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

अॅड. सरोदे यांनी याबाबतीत 'मटा'ला सांगितले की, 'आम्ही सुचविलेल्या सूचनांचा सरकारने स्वीकार केला असून कायदा कठोर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. हा कायदा अजामीनपात्र करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.' अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, 'बहिष्कार प्रथेला मूठमाती देण्याची गरज आहे. सरकारच्या मसुद्यात काही त्रुटी आहेत. कडक शिक्षेची या मसुद्यात तरतूद नाही. जादूटोणा विरोधी कायद्याप्रमाणे नव्या कायद्याच्या मसुद्यात कडक धोरणांचा समावेश करण्यात यावा. कायदा अजामीनपात्र करण्यासाठी शासनाला बदल सुचविले आहेत.'

सरकारच्या मसुद्यात काही त्रुटी आहेत. कडक शिक्षेची या मसुद्यात तरतूद नाही. जादूटोणा विरोधी कायद्याप्रमाणे नव्या कायद्याच्या मसुद्यात कडक धोरणांचा समावेश करण्यात यावा. कायदा अजामीनपात्र करण्यासाठी शासनाला बदल सुचविले आहेत. - डॉ. हमीद दाभोलकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यायाम करा... मधुमेहाला दूर ठेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'​बाहेरील खाद्य पदार्थ ​जास्त खाऊ नका. आईच्या हातची झुणका-भाकर खा. भरपूर खेळा आणि व्यायाम करा. दारू सिगारेटच्या व्यसनांपासून दूर राहा आणि मधुमेहाला दूर ठेवा,' असा मंत्र अभिनेते जॅकी श्रॉफ व चंकी पांडे यांनी दिला.

डायबेट‌िस केअर अँड रिसर्च फाउंडेशनच्यावतीने आयोजित मधुमेह जनजागृतीवर एका कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ के. एच. संचेती, चंद्रहास शेट्टी, फाउंडेशनचे अध्यक्ष मधुमेह तज्ज्ञ डॉ. अभय मुथा, तसेच मुख्य विश्वस्त अमृतलाल मुथा, 'एमक्युअर'चे अरुण खन्ना उपस्थित होते. संस्थेच्यावतीने बालमधुमेहींसाठी दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार अहमदाबाद येथील मैत्री पांचोली हिला देण्यात आला. जॅकी श्रॉफ यांनी संस्थेला एक लाखांची देणगी दिली. कार्यक्रमापूर्वी जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान, मधुमेह माहितीपर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

'पास्ता, पिझ्झा या पदार्थांसारखे बाहेरचे खाणे टाळा. आठवड्यातून एखाद्यावेळी बाहेरचे खाण्यास हरकत नाही. परंतु, आईने घरी बनविलेले जेवण घ्या. हल्ली कब्बडी, खो-खो यासारखे मैदानी खेळ खेळले जात नाहीत. त्यामुळे चालत राहा. व्यायाम व योग करा. त्यामुळे मधुमेह दूर राहू शकतो,' असे जॅकी श्रॉफ यांनी सांगितले. डॉ. अभय मुथा यांच्या कार्याबाबत त्यांनी गौरवोद्गार काढले.

'बदललेल्या जीवनशैलीमुळे, अनुवंशिकतेमुळे, व्यायामाच्या अभावामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे. या आजाराची योग्यवेळी काळजी घेणे आवश्यक आहे. माझे आई-वडील डॉक्टर असून कुटुंबात मधुमेहाची अनुवंशिकता आहे. त्यामुळे मी स्वत: व्यायाम करतो. दर सहा महिन्यांनी सर्व चाचण्या करतो असे,' चंकी पांडे म्हणाले.

मधुमेही असताना ग्रीसमधील सर्वांत उंच शिखर चढणे हा माझ्यासाठी जीवनातील अविस्मरणीय क्षण होता. मधुमेह असला तरी काहीही करू शकतो. लहान वयात मधुमेह झाल्याने घाबरू नका. वेळेवर इन्सुलिन घ्या, योग्य व वेळेवर आहार घ्या. - मैत्री पांचोली, पुरस्कार विजेती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञान क्षेत्रातील हिंसा संपवावी : डॉ. तांबे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'काम एकाने करायचे आणि संशोधन पेपर इतरांनी लिहायचे ही ज्ञानाच्या क्षेत्रातली हिंसा आपण आता मोडून काढली पाहिजे. ज्ञानाचे एक नवे राजकारण उभारण्याची वेळ आता आली आहे. महिलांवर होणाऱ्या हिंसेचा प्रश्न हा प्रत्येक जबाबदार व्यक्तीचा आहे, तसा दबाव आपण तयार केला पाहिजे,' असे मत डॉ. श्रुती तांबे यांनी मांडले.

महिलांना सहन कराव्या लागणाऱ्या हिंसेच्या अनेक पैलूंवर मांडणी आणि चर्चा करण्यासाठी 'महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम) आणि स्त्री मुक्ती संघटना यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र महिला हिंसामुक्ती शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. 'कागदावर कायदा आणि योजना दिल्या जात आहेत. पण स्त्रियांना निर्णयक्षमता मिळते आहे का, असा सवाल उपस्थित करत हे तपासून पाहण्याची ही वेळ आली आहे,' असे डॉ. तांबे यांनी नमूद केले.

'स्त्रियांच्या प्रश्नांचा अभ्यास आणि विचार सूक्ष्मतेकडे चालला आहे,' असे निरीक्षण ज्येष्ठ स्त्रीवादी अभ्यासक छाया दातार यांनी नोंदविले. 'ग्रामीण, अल्पशिक्षित कार्यकर्त्यांकडे अनुभवाचे ज्ञान असते आणि त्यांना संस्थेचे पाठबळ मिळाले, तर त्यांची समज अधिक वाढवता येते,' असे मत 'मासूम'च्या जया नलगे यांनी मांडले.

'महिलांच्या हिंसेचे व चिंतेचे विषय कालानुरूप बदलत आहेत, त्याचा स्वीकार किंवा विरोध करण्यापूर्वी या विषयाचे सगळे पैलू समजून घेणे आणि चर्चा करणे आवश्यक आहे. आजच्या जगात हिंसेच्या बदलत्या स्वरूपाची नव्याने व्याख्या केली पाहिजे,' असे स्त्री मुक्ती संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या शारदा साठे यांनी सांगितले.

'महिलांवरील हिंसेचा प्रश्न सोडवल्याशिवाय आपण स्त्री-पुरुष समानतेविषयी बोलू शकत नाही,' असे अरुणा बुरटे म्हणाल्या. 'महिलांना त्यांच्या राहत्या परिसरात पाठिंबा देणाऱ्या यंत्रणा उपलब्ध नाहीत. समुपदेशन केंद्र, आधार गृह, पोलीस चौकी, विधी सल्ला या कळीच्या वेळी पाठिंबा देणाऱ्या यंत्रणा बहुतांश वेळा महिलांना मदत करण्याऐवजी त्यांच्यावर दबाव आणतात असा अनुभव आहे,' असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, महिला हिंसाचाराच्या प्रश्नावर काम करणाऱ्या ४५ संस्थांचे प्रतिनिधी या शिबिरात सामील झाले होते. हिंसेविरोधातील नवीन कायदे व अंमलबजावणीतील आव्हानांची मांडणी या वेळी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्यांसाठी ‘तुरुंग’वाणी

$
0
0

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com

पुणे : राज्यातील सर्व तुरुंगातील कैद्यांना आता तुरुंगातच संगीत व इतर कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. येरवडा तुरुंगात सुरू करण्यात आलेल्या 'वायसीपी रेडिओ' केंद्राचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो आता राज्यातील सर्व जेलमध्ये सुरू होणार आहे. त्यासाठी राज्यातील काही जेलच्या अधिकाऱ्यांनी येरवड्यातील रेडिओ केंद्राला भेटी देऊन त्यांच्याकडून माहिती घेतली आहे. नाशिक व इतर जेलमध्येही रेडिओ केंद्र सुरू करण्यात आले आहे.

येरवडा जेलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 'वायसीपी रेडिओ' नावाने रेडिओ केंद्र सुरू करण्यात आले आहे. जेलमध्ये रेडिओ केंद्र चालविणारे येरवडा हे राज्यातील पहिले जेल ठरले होते. या रेडिओ केंद्रावर रेडिओ जॉकी हे कैदीच असून स्क्रीप्टही देखील त्यांनीच तयार केली आहेत. या प्रयोगामुळे येरवडा जेलमधील कैद्यांचे दुपारी एक तास मनोरंजन होऊ लागले आहे. या रेडिओ केंद्राला मिळणारा प्रतिसाद पाहून जेल विभागाने राज्यातील इतर जेलमध्ये अशा स्वरूपाचे रेडिओ केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार राज्यातील जेलप्रमुखांना येरवडा जेलमधील रेडिओ केंद्राची माहिती घेऊन कशा पद्धतीने रेडिओ केंद्र सुरू करता येईल, याची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यातील इतर जेलच्या अधिकाऱ्यांनी येऊन येरवडा जेलमधील वायसीपी रेडिओ केंद्राची पाहणी केली. त्यानंतर काही जेलनी देखील त्यांच्याकडे रोडिओ केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. तर, काही ठिकाणी रेडिओ केंद्र सुरू झाले आहे.

याबाबत राज्याच्या जेलचे प्रमुख व अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सांगितले, की 'येरवडा जेलमधील रेडिओ केंद्रानंतर आता राज्यातील इतर जेलमध्ये रेडिओ केंद्र सुरू करत आहोत. नाशिक मध्यवर्ती जेलमध्ये रेडिओ केंद्र सुरू झाले आहे. तर, इतर तुरुंगानी त्याची तयारी सुरू केली आहे.'

जेलमध्ये तासभर मनोरंजन

येरवडा जेलमध्ये एका बराकीत रेडिओचा स्टुडिओ उभाण्यात आला आहे. या ठिकाणी एक तासाचा कार्यक्रम रेकॉर्डिंग करून दुपारी बारा ते एक या दरम्यान कैद्यांना ऐकविला जातो. या तासभरात मनोरंजनाचे कार्यक्रम, भजन, विनोदी किस्से, संगीत, प्रबोधनपर माहिती कैद्यांना ऐकवली जाते. रविवारी दोन तास रेडिओ केंद्र सुरू असते. रेडिओ केंद्र चालविणारे रेडिओ जॉकी हे कैदीच असून स्क्रीप्ट देखील त्यांनीच तयार केल्या आहेत. मनोरंजनाबरोबरच कैद्यांना कायदेशीर माहिती, प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती, कैद्यांचे प्रश्न पत्राद्वारे मागून नाव न घेता ते सोडविले जातात. मराठी, हिंदी भाषेत हा एक तास कार्यक्रम चालतो. येरवडा रेडिओ केंद्राचा प्रयोग आता राज्याच्या इतर जेलमध्ये लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती जेलच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनाला यंदा ‘गुलजार’ स्पर्श

$
0
0

उद्‍घाटन ज्येष्ठ कवी गुलजार यांच्या हस्ते होण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 'गुलजार' स्पर्श होणार आहे. ज्येष्ठ कवी गुलजार यांनी साहित्य संमेलनाचे निमंत्रण स्वीकारले असून, त्यांच्याच हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन होण्याची शक्यता आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे साहित्य संमेलन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी आयोजित करत आहे. १५ ते १८ जानेवारीदरम्यान हे संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या उद्‍घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, त्यांच्यापैकी कोणाला येणे शक्य होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी गुलजार यांची भेट घेऊन त्यांना संमेलनासाठी निमंत्रित केले. हे निमंत्रण गुलजार यांनी स्वीकारले आहे. या पूर्वी १९९७मध्ये नगर येथे झालेल्या साहित्य संमेलनाला गुलजार उपस्थित राहिले होते. त्यात त्यांची मुलाखतही झाली होती.

'गुलजार यांनी संमेलनात एक दिवस सहभागी होण्याचे मान्य केले आहे. उद्‍घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत त्यांना विनंती करण्यात आली आहे. त्याबाबत त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे,' असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

संमेलनाची साहित्यिक उंची वाढणार

साहित्य संमेलनासाठी चौदा ज्ञानपीठप्राप्त साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यातील आठ ते दहा साहित्यिक संमेलनाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. या साहित्यिकांशी चर्चेचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे संमेलनाची साहित्यिक उंची वाढणार आहे; तसेच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या मुलाखती होणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्तम ‘साउंड’साठी हवामानही महत्त्वाचे

$
0
0

स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे संस्थेच्या ४५व्या वर्धापनदिनी आज (दि. १) यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात गायन- वादनासह 'स्वरांजली' संस्थेचे प्रदीप माळी यांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे. ध्वनी संयोजन क्षेत्रातील त्यांचा रौप्य महोत्सव आणि या सत्काराविषयी त्यांच्याशी आसावरी चिपळूणकर यांनी केलेली बातचीत.

ध्वनी संयोजन क्षेत्रातील वाटचाल कधी आणि कशी सुरू झाली?

माळी : आणीबाणीच्या काळात वीजकपात झाली होती, तेव्हा मला कंपनीतील कामावरून कमी करण्यात आले. मग सुरुवातीला नानासाहेब आपटे यांच्या 'ललकार' संस्थेत दोन- तीन वर्षे काम करून थिएटर अॅकॅडमीमध्ये लाइट आणि साउंडचे काम केले. त्यानंतर १९७८ साली मी घरातच स्वतःचा साउंड सिस्टीमचा व्यवसाय सुरू केला. काही काळ आम्ही 'युवोन्मेष' हा फक्त तरुण कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा कार्यक्रमही केला. त्यात गणपती भट, देवकी पंडित यांसारखे कलाकार गायले आहेत.

सुरुवातीला कार्यक्रम मिळवताना अडचणी आल्या का?

माळी : सुदैवाने 'युवोन्मेष'मुळे 'साउंड'मधला माणूस अशी ओळख निर्माण झाली होती आणि मला एक दुसरी नोकरीसुद्धा मिळाली होती. ध्वनी संयोजनात मला कुणाशीही स्पर्धा करायची नव्हती. मात्र, सुरुवातीला शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना बोलावणे यायचे नाही. एकदा विचारणा झाल्यावर मी रोलांड कंपनीचा ऑडिओ मिक्श्चर वापरला. फक्त अॅम्प्लिफायर वापरून होणाऱ्या मैफलीपेक्षा या सिस्टीममुळे साउंड अगदीच वेगळा ऐकू आला. त्यातच अधिक सुधारणा म्हणून मी अमेरिकेतील बोस कंपनीचे स्पीकर मागवले. ते कार्यक्रमांतून वापरू लागलो. माझ्याआधी फक्त अशोक सराफ त्यांच्या ऑर्केस्ट्राला मिक्श्चर वापरायचे. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांमध्ये माझ्या या नव्या सिस्टीममुळे उत्तम दर्जाचा 'साउंड' मिळू लागला आणि मला अधिकाधिक विचारणा होऊ लागली.

कार्यक्रमाआधी साउंड सिस्टीमसंदर्भात नेमक्या कुठल्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात?

माळी : सवाई गंधर्व महोत्सवात गेली अनेक वर्षे मी ध्वनी संयोजन करतो. तिथे रविवारी सकाळी आणि संध्याकाळी ऐकू येणाऱ्या 'साउंड'मध्ये फरक असतो; कारण दिवसा ऊन असते. हवा कोरडी असते. मात्र, रात्रीच्या ओलसर हवेत साउंड जास्त चांगल्या दर्जाचा मिळतो. म्हणजेच दिवस- रात्रीप्रमाणेच कार्यक्रम सभागृहात होणार, की खुल्या पटांगणात हेसुद्धा लक्षात घ्यावे लागते. हवामानाप्रमाणेच अॅकॉस्टिकही (ध्वनीशास्त्र) महत्त्वाचे ठरते. परदेशात ध्वनीशास्त्रतज्ज्ञ किंवा इंजिनीअर असतो. तिथली माणसे आपसांत हळू बोलतात, रस्त्यांवर फार वेळा हॉर्नही वाजवत नाहीत. आपल्या लोकांची ऐकण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे 'साउंड' ऐकण्याची सवय नाही. उदाहरणच द्यायचे, तर सुरुवातीला गणेश कला क्रीडा मंच येथे अॅकॉस्टिकचे कार्यक्रम व्हायचे नाहीत. अनिरुद्ध भावे यांनी तिथे सुधारणा करून दिल्यानंतर अॅकॉस्टिकचेही कार्यक्रम व्हायला लागले.

एखाद्या कलाकाराविषयीची विशेष आठवण...

माळी : आतापर्यंत मी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना सर्वाधिक ध्वनी संयोजन केले आहे. त्यामुळे किशोरी अमोणकर, मालिनी राजुरकर, डॉ. प्रभा अत्रे, पं. अजय पोहनकर, मोहनवीणा वादक विश्वमोहन भट, सरोद वादक बिस्वजित रॉय- चौधरी, हार्मोनियम वादक सुयोग कुंडलकर, गायिका प्रियदर्शिनी कुलकर्णी, गायक आनंद भाटे, तबला वादक विजय घाटे, कथक नृत्य कलाकार प्रताप पवार, तबला वादक भरत कामत, यांसारख्या शास्त्रीय संगीत क्षेत्रातील कलाकारांसह शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे व्याख्यान, 'करुणोपनिषद'च्या निमित्ताने सोनाली कुलकर्णी, चंद्रकांत काळे आणि सचिन खेडेकर या सर्वच कलाकारांचा मला फार छान अनुभव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानेश्वर, तुकारामांचे साहित्य अभ्यासक्रमात नाही : भटकर

$
0
0

पुणे : 'संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांचे अमृतमय साहित्य शालेय अभ्यासक्रमात नाही. आजची पिढी तंत्रज्ञान शिकते; पण अर्धवट शिक्षणव्यवस्थेमुळे या पिढीला हे संत, आपली संस्कृती माहीत नाही,' अशी टीका ज्येष्ठ कम्प्युटरज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केली.

विश्वशांती केंद्र व एमआयटी यांच्या वतीने युनेस्को अध्यासनांतर्गत आयोजित '२० व्या संत श्री ज्ञानेश्वर व संत श्री तुकारामस्मृती व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश कराड, विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये, प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, डॉ. मिलिंद पांडे व ललिता सबनीस याप्रसंगी उपस्थित होते. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस अध्यक्षस्थानी होते. संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. सबनीस यांचा या वेळी सपत्नीक सत्कार करण्यात आला.

आजच्या पिढीला इतिहास, संस्कृती माहीत नाही, तर ही पिढी काय शिकणार, असा सवाल उपस्थित करून डॉ. भटकर म्हणाले, 'शिक्षणात भाषा अत्यंत महत्त्वाची असून, त्याशिवाय ज्ञानाचे ग्रहण करता येणार नाही. चैतन्य असेल तिथे भाषा असतेच. मधमाशा, मुंग्या कोणत्या भाषेत संवाद साधत असतील, हे एक कुतुहलच आहे. सत्याचे दर्शन ज्ञानेश्वरी, गीता या ग्रंथातूनच होते, त्याशिवाय ज्ञान अपूर्ण आहे.' 'भारताचा एकात्मिक वारसा, भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ आहे. भारतीय अध्यात्म जागतिक शांततेसाठी आकार देईल,' असे मत डॉ. सबनीस यांनी मांडले. सूत्रसंचालन प्रा. सुधीर राणे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागदी कलाकृतींचा रंगला अनोखा तास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

टिश्यू पेपरच्या आकर्षक बाहुलीपासून कागदाच्या आकर्षक कीचेन्सपर्यंत वैविध्यपूर्ण कलाकृती शिकण्याची संधी कलाप्रेमींना मिळाली. निमित्त होते 'महाराष्ट्र टाइम्स' कल्चर क्लबतर्फे आयोजित 'पेपर प्रॉडक्ट वर्कशॉप'चे. मटाच्या वाचकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मोकळ्या वेळात जोपासता येण्यासारख्या छंदाला व्यासपीठ मिळावे, कलाप्रेमींना त्याचे सोप्या पद्धतीने प्रशिक्षण मिळावे, घरच्या-घरी आकर्षक कलाकृती कशा साकारायच्या हे जाणून घेण्याची संधी मिळावी, या हेतूने वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. या वर्कशॉपमध्ये या विषयातल्या तज्ज्ञ ऐश्वर्या करंदीकर यांनी सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन केले. भांडारकर रोडवरील नर्मदा हॉलमध्ये हे वर्कशॉप झाले.

या गोष्टी शिकण्यासाठी लागणारे साहित्य सहभागी झालेल्यांना संयोजकांतर्फे देण्यात आले. विविध वयोगटातील व्यक्तींना अतिशय सोप्या पद्धतीने पेपर डॉल, फ्लॉवर वाझ, पेपर क्विलिंगमध्ये केलेली कीचेन्स या गोष्टी करंदीकर यांनी शिकवल्या. या वस्तू साकारताना कागद निवडण्यापासून ते रंगसंगतीपर्यंत विविध गोष्टींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. विविध वयोगटातील कलाप्रेमींनी या वर्कशॉपमध्ये सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅलेक पदमसी यांना तन्वीर सन्मान जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नाट्यक्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी रुपवेध प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा तन्वीर सन्मान यंदा ज्येष्ठ रंगकर्मी अॅलेक पदमसी यांना जाहीर झाला. ज्येष्ठ नेपथ्य-प्रकाशयोजनाकार प्रदीप मुळ्ये यांना नाट्यधर्मी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. बुधवारी (९ डिसेंबर) यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

प्रतिष्ठानच्या कार्यवाह दीपा लागू यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पुरस्कार वितरणावेळी फारुक मेहता आणि चंद्रकांत कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. तन्वीर पुरस्कारासाठी एक लाख रुपये, स्मृतीचिन्ह आणि नाट्यधर्मी पुरस्कारासाठी तीस हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असे स्वरूप आहे.

अॅलेक पदमसी थिएटर ग्रुप ऑफ मुंबई या नाट्यसंस्थेचे प्रमुख आहेत. सातव्या वर्षी 'मर्चंट ऑफ व्हेनिस' या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. आतापर्यंत त्यांनी सत्तर नाटके केली आहेत. त्यात इंग्रजी व हिंदी नाटकांचा समावेश आहे. त्याशिवाय जाहिरात आणि सिने क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. 'गांधी' या सिनेमात त्यांनी बॅ. जिना यांची भूमिका साकारली होती. शेक्सपिअर आर्थर मिलर, प्रताप शर्मा, गिरीश कार्नाड, विजय तेंडुलकर, इस्मत चुगताई अशा नाटककारांची नाटकेही त्यांनी केली आहेत.

प्रदीप मुळ्ये हे मराठी रंगभूमीवरील महत्त्वाचे नाव आहे. नेपथ्य, प्रकाशयोजनेत यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रायोगिक आणि व्यावसायिक या दोन्ही नाट्यप्रवाहांमध्ये ते दीर्घकाळापासून कार्यरत आहेत. सारे प्रवासी घडीचे, इंदू काळे-सरला भोळे, ड्राय डे, राजा भोळे आदी नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा महाराष्ट्राचा ‘चित्ररथ’ नाही

$
0
0

Chinmay.Patankar@timesgroup.com

पुणे : दिल्लीतील राजपथावर येत्या प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) होणाऱ्या संचलनादरम्यान या वेळी महाराष्ट्राचा दिमाखदार चित्ररथ दिसणार नाही. चित्ररथासाठी राज्याकडून गोंधळ आणि जागरण सादर करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र, संचलनात सर्व राज्यांना आलटून पालटून संधी देण्याच्या धोरणामुळे महाराष्ट्राची संधी हुकली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राज्याराज्यांतील संस्कृती चित्ररथांद्वारे दाखवली जाते. त्यातून भारताच्या विविधतेचे दर्शन घडते. त्यामुळे या संचलनाकडे जगाचेही लक्ष असते. आगामी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना निमंत्रण देण्यात आले; तसेच ते महाराष्ट्र सरकारलाही मिळाले. त्यानुसार संरक्षण मंत्रालयाची समितीपुढे राज्य सरकारने सहा विषय मांडले. त्या संदर्भात चार बैठका झाल्या. राज्य सरकारने सुचवलेल्या जागरण आणि गोंधळ या विषयाला संरक्षण मंत्रालयाच्या समितीने मान्यताही दिली होती. मात्र, संरक्षण मंत्रालयाने तयार केलेल्या अंतिम यादीत महाराष्ट्राच्या रथाचा समावेश झाला नसल्याचे समजते. सांस्कृतिक कार्य संचालनालयातील उच्चपदस्थ सूत्रांनीही याला दुजोरा दिला.

'प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी वेळ मर्यादित असते. संचलनासाठी देशभरातून सोळा किंवा सतरा चित्ररथांची निवड करण्यात येते. सर्व राज्यांना दरवर्षी संधी मिळणे शक्य नसल्याने ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आलटून पालटून संधी देण्याचे धोरण आहे. त्यामुळेच यंदा महाराष्ट्राला संधी मिळाली नाही,' असे सूत्रांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या चित्ररथाचा बोलबाला

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाचा नेहमीच बोलबाला राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, बैलपोळा, भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे स्थान, हापूस आंबा, बापू स्मृती, धनगर आदी विषयावरील चित्ररथ सादर करण्यात आले होते. १९९३, १९९४, १९९५ अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम पारितोषिक पटकावले होते. महाराष्ट्राच्या चित्ररथाने आतापर्यंत सहावेळा प्रथम पारितोषिक, तीन वेळा द्वितीय पारितोषिक आणि एकदा तृतीय पारितोषिक पटकावले आहे.

दर तीन-चार वर्षांनी चित्ररथ नाही

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाचा समावेश झाला नसल्याची घटना दर तीन-चार वर्षांनी घडली आहे. यापूर्वी १९८९, १९९६, २०००, २००५, २००८, २०१३ या वर्षीही महाराष्ट्राच्या चित्ररथाचा समावेश करण्यात आला नव्हता.

वारकरी परंपरेचे कौतुक

गतवर्षी वारकरी परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने लक्ष वेधून घेतले होते. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेले 'माऊली माऊली' हे गाणे या रथाचे वैशिष्ट्य ठरले होते. या रथाला प्रथम पारितोषिकाने गौरवण्यात आले होते. त्यामुळे यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाकडे देशाचे लक्ष लागले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images