Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पर्यायी रस्ता नागरिकांना अमान्य

$
0
0

पिंपळे सौदागरचे नागरिक शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच ठेवणार

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

लष्कराने बंद केलेला पिंपळे सौदागर येथील रक्षक चौक ते कुंजीर वस्ती या जुन्या रस्त्याऐवजी पर्यायी रस्ता वापरण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. 'जुना रस्ताच वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा,' अशी येथील नागरिकांची मागणी आहे. त्यासाठी लढा उभारला असून, रविवारी (२२ नोव्हेंबर) परिसरातील सोसायटींमधील नागरिक एकत्र झाले होते. रक्षक रोड बचाव समितीने आयोजित केलेल्या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे हे देखील उपस्थित होते. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जुना रस्ता खुला होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे बारणे यानी या वेळी सांगितले. मात्र, पर्यायी रस्त्यासाठी अन्य पर्याय शोधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते या वेळी म्हणाले.

स्थानिकांनी बैठक आयोजित केल्याचे समजल्यावर खासदार बारणे यांच्यासह माजी नगरसेवक नाना काटे, संदीप काटे, कल्याण काटे हे बैठकीला आर्वजून उपस्थित राहिले. रक्षक रोड बचाव समितीचे संतोष गंभीरे, मिलिंद महाजन, दीपक गांगुर्डे, राजू शेलार, अतुल कुंटेकर, कैलास कुलकर्णी, दिलीप दलाल, दिलीप ठाकूर, बलविंदर सिंग, अमोल केवटे, विकास कुमार, अरूण कोकाटे, कांचण पेत, अंकित मारू व विविध सोसायट्यांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी रक्षक रोड बचाव समितीचे गंभीरे म्हणाले, 'संरक्षण विभागाने येथील नागरिकांना वापरण्यासाठी देऊ केलेल्या जिंजर सोसायटी ते साई चौक या पर्यायी रस्त्याचा येथील नागरिकांना काहीच फायदा होणार नाही. या रस्त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शाळेत जायला एक तास उशीर होत आहे. त्यामुळे कुंजीर वस्ती ते रक्षक चौक हा जुना रस्ताच खुला करण्यात यावा. हा रस्ता मिळेपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच ठेवणार आहे.' खासदार बारणे यांनी सरंक्षण विभागाने बंद केलेला कुंजीर वस्ती ते रक्षक चौक हा रस्ता चालू होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. लोकांच्या समस्यांची जाणीव आहे. लोकांच्या सुविधांसाठी निश्चितच योग्य पर्यायी रस्ता काढू.

ग्रेडसेप्रेटर, सब-वे व अन्य पर्यायही सुचवला जाईल. तसेच, पंधरा दिवसांच्या आत महापालिका आयुक्तांशी बोलून काही उपाय नक्की काढू असेही ते म्हणाले. काही ठरावीक लोक कोर्टात गेल्याने हा रस्ता बंद करावा लागत असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केल्याचे बारणे यांनी सांगितले. माजी नगरसेवक नाना काटे यांनी या रस्ता बंद झाल्याबाबत नाराजी व्यक्त केली. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी कोर्टात जाण्यामागची कारणे आरोप करणाऱ्यांनी समजून घ्यावीत, असे 'मटा'शी बोलताना सांगितले. तत्कालीन महानगरपालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सूचित केल्यामुळेच कोर्टात गेल्याचे काटे म्हणाले.

'किमान स्कूल बस, अॅम्ब्युलन्स तरी सोडा'

जुना रस्ता खुला होऊ शकणार नसल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितल्यानंतर नागरिकांनी किमान स्कूल बस आणि अॅम्ब्युलन्स, अग्निशामनदलाची गाडी तरी येथून सोडावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकीस्वाराने मंगळसूत्र हिसकावले

$
0
0

हडपसर : हडपसर महालक्ष्मी माता मंदिर येथे निर्जन स्थळी जेष्ठ महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोराने हिसकावून पळवून नेले. ही घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास झाली. याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात अज्ञात दोन चोरांविरोधात सोनसाखळीचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

जया ज्ञानोबा शिंदे (वय ५५, रा. माळवाडी, हडपसर) या ज्येष्ठ महिलेचे अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र चोराने पळवले. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास माळवाडी येथून शिंदे हा आपली मुलगी सपना व मुलगा अजय यांच्याबरोबर हडपसर गाव येथे जात होते. महालक्ष्मी माता मंदिर येथे आले असता पाठीमागून दुचाकीवरून दोघे जण आले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोराने शिंदे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका देऊन चोरून नेले. या वेळी शिंदे व त्यांच्या मुलांनी पकडा पकडा म्हणून आरडा ओरडा केला. मात्र, चोरटे वेगात माळवाडी रोड मार्गे पुणे-सोलापूर रोड मार्गे पसार झाले.

जोशीवाडीत घरफोडी

शिरूर : शहरातील जोशीवाडी परिसरात बंद घराचा दरवाजा फोडून घरातील दहा हजार रुपयेची रोख रक्कम, दोन मोबाईल, चांदीची गणेशमूर्ती व इतर वस्तू अज्ञात चोरांनी चोरून नेले.याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात विजय कांतीलाल सावंत रा. जोशीवाडी शिरूर यांनी तक्रार दिली आहे. सावंत हे आपल्या गावी गेले होते. २० नोव्हेंबर रोजी त्यांचा बंद घराच्या कडी कोयंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश करुन घरातील रोख रक्कम व इतर वस्तू चोरून नेल्या. पोलिस हवालदार व्ही. पी. मोरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या चोरीकडे डोळेझाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

रामवाडी चौकातील हातगाडी आणि टपरीवाले भुयारी मार्गाच्या वरील बाजूला असणाऱ्या सार्वजनिक मीटरमधून चोरून वीज वापरत असल्याने महावितरणला लाखोंचा फटका बसत आहे. तीन वर्षांहून अधिक काळ हा प्रकार सुरू आहे.

नगर रोडवरील रामवाडी पोलिस चौकीजवळ व्यवसाय करणारे हातगाडी, टपरी आणि गॅरेज व्यावसायिक तीन वर्षांहून अधिक काळापासून चोरून वीज वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार एका सजग नागरिकाच्या धाडसामुळे समोर आला आहे. त्यामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. नगर रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही वर्षांपूर्वी रामवाडी चौकात भुयारी मार्ग बनविण्यात आला. रस्त्याची कामे करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने जवळील डीपीमधून मीटर बसविला होते. काही वर्षानंतर भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले. पण, त्यावेळी रस्त्याच्या कामासाठी बसविलेले तात्पुरते वीज मीटर काढण्यात आले नाहीत. मीटर चालू अवस्थेत असल्याची माहिती शेजारील टपरी चालकांना मिळाल्यानंतर त्यांनी चोरून वीज वापरायला सुरुवात केली. फुकट वीज मिळत असल्याने अनेक हातगाडी, टपरी आणि गॅरेजचालकांनी मोठ्या प्रमाणावर विजेची उधळपट्टी करण्यास सुरुवात केली. अशी माहिती एका स्थानिक नागरिकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापेक्षा हा वीज वापर सुरू आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत महावितरणच्या एकाही कर्मचाऱ्याला वीजचोरीची माहिती नसल्याचे समोर आले आहे.

चोरून वीज वापरणाऱ्या टपरी चालकांवर तातडीने कारवाई करून भुयारी मार्गावरील मीटर काढून टाकण्यात येईल.

-गिरीश भगत, अतिरिक्त अधीक्षक अभियंता, नगर रोड उपविभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यावरून शिवसेना-भाजप आक्रमक

$
0
0

रास्ता रोको, कुलूपबंद आंदोलनाने संताप

राजगुरूनगर : भामा आसखेड धरणाचे पाणी उजनीसाठी सोडण्यात येऊ नये, यासाठी शिवसेना व भाजपच्या वतीने रविवारी दोन स्वतंत्र आंदोलने करण्यात आली. शिवसेनेने चाकण येथील आंबेठाण चौकात 'रास्ता रोको' केले, तर भाजपने धरणस्थळावरील सहाय्यक अभियंता गणेश हासे यांच्या कार्यालयाला कुलूप लावून आंदोलन केले.

खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून चार टीएमसी, तर चासकमान धरणातून तीन टीएमसी इतके पाणी उजनी धरणात सोडले जाणार आहे. या वर्षी दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाही. धरणात कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले, तर तालुक्याच्या लाभक्षेत्रातील व पाणलोट क्षेत्रातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. तालुक्याच्या पश्चिम भागात तर पिण्याची समस्या अतिशय जटिल होऊ शकते. त्यामुळे या धरणांमधून उजनीसाठी पाणी सोडण्यास सेना व भाजपकडून विरोध केला जात आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, महिला प्रमुख विजया शिंदे, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, जि. प. सदस्य किरण मांजरे, राजगुरूनगरच्या उपनगराध्यक्ष सारिका घुमटकर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी 'रास्ता रोको' करण्यात आले, तर भामा आसखेड धरणावर भाजपचे शरद बुट्टे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, आमदार सुरेश गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात पाणी सोडण्याच्या जल आयोगाच्या आदेशाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. परंतु, उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती न दिल्यामुळे या धरणांमधून कधीही पाणी सोडले जाईल, अशी भीती तालुक्यातील शेतकऱ्यांना सतावत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘५०९ चौका’चे रुंदीकरण

$
0
0

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

लोहगाव विमानतळाकडे प्रवाशांना विनाअडथळा जाण्यासाठी बर्माशेल चौक (५०९) ते विमानतळापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणास मान्यता देणार असल्याचे आश्वासन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी दिले. त्यामुळे पुढील काळात विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे.

विमानतळ सल्लागार समितीचे उपाध्यक्ष जगदीश मुळीक, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि विमानतळ संचालक अजय कुमार यांची नुकतीच लोहगाव विमानतळावर बैठक पार पडली. विमानतळाबाहेरील रस्त्यावर प्रवाशांना विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी ५०९ चौकात सतत वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे वाहनांना विमानतळापर्यंत पोहोचण्यास विलंब होतो. परिणामी अनेकदा प्रवाशांना सामान हातात घेऊन विमानतळापर्यंत चालत जाण्याची वेळ येते. त्यामुळे आमदार मुळीक यांनी ५०९ चौक ते विमानतळ पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी केली होती.

संरक्षणमंत्री पर्रीकर रविवारी लोहगाव विमानतळाच्या भेटीवर आले असता मुळीक यांनी त्यांची भेट घेऊन विविध समस्यांवर चर्चा केली. या वेळी मुळीक यांनी ५०९ चौक ते विमानतळ या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी संरक्षण विभागाने परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली. त्यावर पर्रीकरांनी प्रस्तावास मान्यता देणार असल्याचे सांगितले. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी नेहमी वाहतूक कोंडी होते. पुणे शहरात येणाऱ्या राजकीय व शासकीय आणि परदेशी पाहुण्यांसाठी शहरात येण्यासाठी एकच मार्ग आहे. पुणे शहरात येणाऱ्या पाहुण्यांना प्रवेशद्वाराच्या काही अंतरावरच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने ५०९ चौकाचे लवकर रुंदीकरण होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.

जागा उपलब्ध करून द्या

विश्रांतवाडी-धानोरी रस्त्यावरील दगडी खाणीलगत अरुंद रस्ता रुंदीकरणासाठी 'आरअँडडीई' विभागाने तीन मीटर रुंदीची जागा मिळावी, संजय पार्क येथील हाय कपॅसिटी मास ट्रान्सपोर्ट रस्ता नागरिकांच्या राहत्या घरावरून दर्शविला आहे, तसेच ५०९ चौक ते ब्रर्माशेल झोपडपट्टी वरून धानोरीकडे जाणारा नियोजित डीपी रस्ता मंजूर झाला असल्याने दोन्ही ठिकाणी अनेक नागरिकांची घरे बाधित होणार आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांसाठी संरक्षण विभागाने मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुळीक यांनी पर्रीकरांकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकरांचे हिंदुत्वच धर्मनिरपेक्षः प्रा. मोरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी धर्माची समाजकारण, राजकारण, अर्थकारण आणि नीतीमूल्ये यापासून फारकत केली होती. हिंदूंचे एकत्रीकरण व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष हे स्वातंत्र्यवीर सावकरांचे हिंदुत्व आहे.

ते सर्व धर्म, धर्मग्रंथ कालबाह्य झाले, असे म्हणणारे बुद्धीनिष्ठ होते. धर्मभेद न करणारे सावरकरांचे हिंदुत्व हेच खरे धर्मनिरपेक्ष हिंदुत्व आहे,' असे मत प्रसिद्ध विचारवंत आणि विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे यांनी व्यक्त केले. जन्मदा प्रतिष्ठानतर्फे कार्तिक शुद्ध नवमी हा 'वंदे मातरम' गीताचा जयंतीदिन आणि सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त 'स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सेक्युलर हिंदुत्व' या विषयावर व्याख्यान झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद सबनीस, कार्यवाह मकरंद केळकर उपस्थित होते.

'सावरकर यांचा धर्मनिरपेक्षतेचा विचार भारताच्या घटनेच्या २५ व्या कलमात समाविष्ट आहे. सावरकरांना प्रखर बुद्धीवादी म्हणताना दुसरीकडे आपण त्यांना जाज्वल्य हिंदुत्ववादी मानतो. अनुयायांनी सावरकरांचा बुद्धीवाद समोर आणला नाही. किंबहुना तो त्यांना समजलाच नाही. विरोधकांना सावरकरांचा हिंदुत्ववादच मान्य नव्हता त्यामुळे त्यांना बुद्धिवादही पटला नाही. हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ असे सावरकरांनी कधीही म्हटलेले नाही. धर्मग्रंथ कालबाह्य झाले, हे मानणारे बुद्धीनिष्ठच होते', असे प्रा. मोरे यांनी स्पष्ट केले.

... तोच खरा भारतीय

आपला धर्मग्रंथ आणि राज्यघटना यामध्ये विरोध आला तर राज्यघटना मानतो व आचरतो तो खरा भारतीय अशी व्याख्या करायला काय हरकत आहे. सारे धर्म आणि धर्मग्रंथ कालबाह्य झाले आहेत, असे सांगणारे सावरकर नव्या युगातही झाले पाहिजेत, असेही प्रा. मोरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपक्षांना सोन्याचा भाव

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, राजगुरूनगर

चाकण नगर परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्ष नगरसेवकांच्या मताला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले असून त्यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी होणार आहे.

चाकण नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. परंतु, या लढाईत कोणत्याच एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. त्यामुळे नगर परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्ष नगरसेवकांच्या मताला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी (दि. २४) होत असून नगराध्यक्षपद खुल्या गटातील महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे अपक्ष नगरसेवक कुणाच्या बाजूला झुकतात, यावरच सत्तेचे गणित अवलंबून आहे. दरम्यान, अपक्ष नगरसेवक आमच्याच पाठीशी असल्याचा दावा या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केलेला आहे.

भाजपच्या एकमेव नगरसेवकाची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. आमदार सुरेश गोरे व स्थानिक भाजप कार्यकर्ते यांचे आपापसात पटत नसल्यामुळे भाजप सेनेला कितपत सहकार्य करतो, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीला मदत करू शकतो, अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे अपक्ष नगरसेवकांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून पैशांच्या थैल्या खुल्या ठेवण्यात आल्या असल्याची जोरदार चर्चा चाकणमध्ये रंगलेली आहे. तेवीस सदस्यसंख्या असलेल्या या नगर परिषदेत शिवसेनेचे आठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे सात, भाजपचा एक, तर सहा जागी अपक्ष नगरसेवक निवडून आलेले आहेत.

एका प्रभागातील उमेदवाराचे निधन झाल्यामुळे या प्रभागात येत्या २९ तारखेला मतदान होणार आहे. चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे व राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. दोघांनीही विजयाचे दावे केले होते. परंतु, मतदारांनी या दोन्ही पक्षांना बहुमतापासून वंचित ठेवले. त्या तुलनेत अपक्षांना मतदारांनी चांगली संधी देऊन त्यांना निवडून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरा हजारांचा गुटखा जप्त

$
0
0

पुणेः मार्केट यार्ड गंगाधाम रस्त्यावरील एका पान टपरीवर धाड टाकून त्यातील अकरा हजार ४० रुपयांचा गुटखा, पानमसाल्याचा साठा जप्त करण्याची कारवाई केली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना उमेश गुलाबचंद उपाध्याय यांच्या पान टपरीत गुटख्याचा साठा केला आहे, अशी माहिती मिळाली होती. त्याद्वारे विक्री करण्यात येते. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी नीलेश खोसे, विजय उनवणे, अविनाश दाभाडे यांच्या पथकाने धाड टाकून टपरीतील गुटखा जप्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोण होणार संचालक?

$
0
0

उद्याच्या मुख्य सभेकडे राजकीय पक्षांचे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) संचालकपदावर कोणाला संधी मिळणार, याचा फैसला उद्या (मंगळवारी) होणार आहे. गेल्या वेळी या पदाच्या निवडणुकीत झालेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या मुख्य सभेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आहे.

पीएमपीचे यापूर्वीचे संचालक आणि शिवसेनेचे नगरसेवक विजय देशमुख यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने ही निवडणूक होत आहे. मूळ नगरसेवक पद रद्द होण्याच्या निर्णयाविरोधात देशमुख यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे तेथे त्यांचे नगरसेवकपद तात्पुरते टिकले, तर त्याद्वारे मिळणारे पीएमपीचे संचालकपदही कायम राहू शकते, अशी स्थिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या संधीचा फायदा घेत निर्णय येण्याआधीच पीएमपीच्या संचालकपदासाठी खास सभेचे आयोजन केले असून, त्यामध्ये संचालकपदाची निवडणूक होणार आहे. हे पद सत्ताधारी राष्ट्रवादीकडे असले, तरी काँग्रेसने स्वत:कडील विरोधी पक्षनेतेपद वाचविण्यासाठी आयत्यावेळी शिवसेनेला मतदान केले होते. त्यामुळे संचालकपद सेनेला मिळाले होते. मात्र, कोंढव्यातील पालिकेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला मदत केल्याने संचालकपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून राष्ट्रवादीलाच मदत मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीत या पदासाठी जेष्ठ नगरसेवक सुभाष जगताप, विशाल तांबे, महेंद्र पठारे, सुनील गोगले व आनंद आलकुंटे इच्छुक आहेत. गतवेळेस या पदासाठी जगताप यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली होती. त्यामुळे आताही त्यांनाच संधी मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गोगले, आलकुंटे हे ज्येष्ठ नगरसेवक असताना त्यांना महत्त्वाच्या पदावर संधी मिळू शकलेली नाही. त्यामुळे त्यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेतीन वर्षांपूर्वीच्या खुनाला

$
0
0

पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बेकरीत काम करणाऱ्या व्यक्तीचा खून करणाऱ्या तरुणाला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) अटक केली आहे. साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या खुनाला खबऱ्यामुळे वाचा फुटली.

प्रदीप ऊर्फ पप्पू शिवाजी बलकवडे (२९, रा. दारवली, ता. मुळशी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत मोहनसिंग रामविशाल यादव (३२, रा. करमोळी, ता. मुळशी) यांचा खून झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव व बलकवडे यांच्यात पूर्वी वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून आरोपींनी २७ मार्च २०१२ रोजी यादव यांना पौड येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलसमोर बांबूने जबर मारहाण केली होती. यादव यांच्या पायावर, पोटावर आणि डोक्यात गंभीर जखमा झाल्या होत्या. या प्रकरणी यादव यांचा उपचारादरम्यान दोन दिवसांनी ससून रुग्णालयात मृत्यू झाला. आरोपी बलकवडे आणि त्याच्या साथीदारांनी पूर्ववैमनस्यातून बेकरीत काम करणाऱ्या यादव यांचा खून केल्याची माहिती खबऱ्याकडून वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांना मिळाली. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी बलकवडेला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्या वेळी त्याने यादवचा साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे कबूल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेड-शिवापूरला आणखी एक नाका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खेड-शिवापूर येथील टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सध्याच्या टोल नाक्यापासून तीनशे मीटर अंतरावर आणखी एक टोल नाका उभारण्याचे काम सुरू आहे. या टोल नाक्याचे काम पूर्ण झाल्यानंतर एका टोल नाक्यांवर साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांचा व दुसऱ्यावर पुण्याकडे येणाऱ्या वाहनांचा टोल वसूल केला जाणार आहे.

वीकेंड व सुट्टीच्या दिवशी एका वेळी अनेक वाहने रस्त्यावर उतरल्याने बहुतांश ठिकाणच्या टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. त्या वाढत जाऊन त्याचे पर्यवसान वाहतुकीच्या कोंडीत होते आणि काही तास त्यामध्ये अडकून राहण्याची वेळ येते. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी 'एनएचएआय'ने दोन वर्षांपूर्वी खेड-शिवापूर जवळच आणखी एक टोलनाका उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी दिल्ली येथील वरिष्ठ कार्यालयाला पाठविला होता. त्याला मान्यता मिळून गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तेथे काम सुरू करण्यात आले आहे. लवकर या टोल नाक्याचे काम पूर्ण करण्याचे 'एनएचएआय'चे ध्येय आहे.

सध्या टोल नाक्यावर नऊ लेनमध्ये टोल वसुली केली जाते. त्यापैकी साताऱ्याकडे जाताना चार लेन व पुण्याकडे येताना पाच लेन आहेत. आता नवीन टोल नाक्याचे काम पूर्ण होऊन तो कार्यरत झाल्यास, सध्याच्या टोल नाक्यातील अधिकाधिक लेनमध्ये साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांकडून टोलवसुली केली जाईल. परिणामी, वाहनांच्या रांगा लागणार नाहीत आणि वाहने लवकर पुढे जातील. त्याचप्रमाणे नवीन टोल नाक्यावर पुण्याकडे येणाऱ्या वाहनांकडून टोलवसुली केली जाईल.

प्रतीक्षा कालावधीची अट

पुणे-बेंगळुरू महामार्गावरील टोल नाक्यांवर टोल वसुलीसाठी वाहन चालकांसाठी प्रतीक्षा कालावधी तीन मिनिटांचा असावा, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केली आहे; तसेच या सूचनेचे पालन करावेच लागेल, असेही राव यांनी बजावले आहे, तर 'प्राधिकरण आणि रिलायन्स कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार सहापदरी रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतरच प्रतीक्षा कालावधीची अट लागू करणे शक्य आहे, असे प्राधिकरणाने जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता ऑनलाइन विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातून अयोग्य इतिहास मांडला जात असल्याचा आरोप करून या चित्रपटाला सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारे 'बॅन द मुव्ही बाजीराव मस्तानी' हे पेज फेसबुकवर तयार करण्यात आले असून, इतिहासप्रेमी चित्रपटाविरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.

'बाजीराव मस्तानी' या चित्रपटातील पिंगा या गाण्यावरून वाद सुरू आहे. बाजीराव पेशवे यांचे वंशज उदयसिंह पेशवे यांनीही या गाण्याबाबत नाराजी व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. या गाण्याने इतिहासप्रेमीही नाराज झाले आहे. त्याचे पडसाद सोशल मीडियात उमटत आहेत. पुण्यातील इतिहासप्रेमी श्रद्धा मेहता यांनी या चित्रपटाला विरोध करण्यासाठी फेसबुकवर 'बॅन द मुव्ही बाजीराव मस्तानी' हे पेज तयार केले आहे. त्याला बाराशेहून अधिक नेटकरांनी लाइक केले आहे. अनेक इतिहासप्रेमींनी या पेजला पाठिंबा दिला असल्याचे मेहता यांनी 'मटा'ला सांगितले.

'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील पिंगा हे गाणे पाहिले. त्यात काशीबाई आणि मस्तानीची वेशभूषा अयोग्य आहे. तसेच, या गाण्यातील नृत्य हे कोणत्याही पद्धतीने मंगळागौरीचे वाटत नाही. त्याला तमाशातील जुगलबंदीचेच स्वरूप आहे. भन्साळी यांनी इतिहासाची योग्य पद्धतीने मांडणी केल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही दिसून येत नाही. त्यांनी बाजीरावांचा पराक्रम न दाखवता केवळ प्रेमकथा दाखवणे हा केवळ मूर्खपणा आहे. या चित्रपटातून जगभरात चुकीचा इतिहास जाऊ नये यासाठी पेज तयार केले आहे. त्याला चांगला प्रतिसादही लाभत आहे,' असेही मेहता यांनी स्पष्ट केले.

'चित्रपटात इतिहासाची अयोग्य मांडणी होत असल्याने त्या विरोधात कोर्टात जाण्याचा विचार सुरू आहे. त्या दृष्टीने काही वकिलांशी बोलणी सुरू आहेत. लवकरच त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल,' असेही त्या म्हणाल्या.

ऑनलाइन याचिका

बाजीराव मस्तानी प्रदर्शित न होण्याबाबत काही इतिहासप्रेमींनी 'चेंज डॉट ओआरजी' या वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन याचिकाही दाखल केली आहे. आतापर्यंत दोन हजारहून अधिक लोकांनी त्याला अनुमोदन दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात आजपासून ‘पेंटावॅलंट’ लस सुरू

$
0
0

एका वर्षाच्या आतील २१ लाख बालकांना लाभ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लहान वयातील बालकांना होणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी पाच रोग प्रतिबंधकांचा समावेश असलेली पेंटावॅलंट लस देण्यास राज्यात आजपासून प्रारंभ झाला. ही लस मोफत देण्यात येणार आहे. घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात (डीपीटी), हिपॅटायटिस-बी या पूर्वीच्या लसींबरोबर आता नव्याने 'हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाइप-बी' या आजाराच्या लशीचा समावेश केला आहे.

पाच आजारांना प्रतिबंध करणारी ही पेंटावॅलंट लस राज्यात नोव्हेंबरपासून देण्यात येणार असल्याची 'गूड न्यूज' 'मटा'ने सर्वप्रथम दिली होती. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते उस्मानाबाद येथे पेंटावॅलंट लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. 'पेटावॅलंट' ही पाच आजारांना रोखणारी लस आहे. राज्यातील २१ लाख बालकांना ही लस मोफत दिली जाईल. पूर्वी घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात (डीपीटी) या आजारासह 'हिपॅटायटिस बी' अशा चार आजारांना रोखणारी लस दिली जात होती. त्यात नव्याने 'हिमोफिलस इन्फ्लूएंझा टाइप-बी' या लशींचा समावेश झाल्याने तिला 'पेंटावॅलंट' लस म्हटले जाते. पूर्वी चार आजारांपासून रक्षण करणाऱ्या दोन लशींचे तीनदा डोस द्यावे लागत होते. त्यासाठी सहा वेळा सुई टोचली जात होती. आता पाच आजारांसाठी एकदाच सुई टोचावी लागणार आहे', अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी 'मटा'ला दिली. राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा हॉस्पिटल; तसेच महापालिकेच्या हॉस्पिटलमध्येही लस मोफत उपलब्ध होणार आहे. केंद्राकडून २१ लाख डोसेस उपलब्ध करण्यात आले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

'पेंटावॅलंट' लस ही दीड महिना, अडीच आणि साडेचार महिन्याच्या बालकांना वर्षातून तीनदा दिली जाईल. लहान मुलांमध्ये न्यूमोनिया, मेंदूज्वर ही मृत्यूची कारणे समजली जातात. मुलांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी 'पेंटावॅलंट' लस उपयुक्त ठरणार आहे. न्यूमोनिया; तसेच मेंदूज्वराचा आजार तसेच मृत्यू रोखण्यासाठी 'हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाइप' ही लस अंत्यत फायदेशीर आहे,' अशी माहिती आरोग्य परिमंडळाच्या पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. एच. एच. चव्हाण यांनी दिली.

घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात (डीपीटी), हिपॅटायटिस-बी या पूर्वीच्या लसींबरोबर आता नव्याने 'हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाइप-बी' या आजाराच्या लशीचा समावेश केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोटीची फसवणूक करणाऱ्यास कोठडी

$
0
0

पुणेः डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून एम. एस. ऑर्थोपेडिक्ससाठी अॅडमिशन मिळवून देतो, असे सांगून वेळोवेळी पैसे घेऊन एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. निमसे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

सौरभ शिवाजी येडूरकर (रा. अंकुर रेसिडेन्सी, माळी कॉलनी, कोल्हापूर) याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. या प्रकरणी राजिंदर गोविंदराम शर्मा (५६, रा. गुडगाव, हरियाणा) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्रामसिंह श्रीकांत घाटगे, पल्लवी घाटगे, उदय घाटगे, श्रीकांत घाटगे, राजीवकुमार सुरेंद्र रॉय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचा मुलगा प्रद्युम्न शर्मा याला डी. वाय. पाटील कॉलेज पुणे या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून एम. एस. ऑर्थोपेडिक्ससाठी अॅडमिशन मिळवून देतो, असे आरोपींनी फिर्यादीला सांगितले. कोरेगाव पार्क येथे फिर्यादीकडून वेळोवेळी एक कोटी रुपये घेतले.

या प्रकरणी आरोपी येडूरकरला अटक करण्यात आली आहे. त्याला शनिवारी कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सरकारी वकील ए. के. पाचारणे यांनी कामकाज पाहिले. येडूरकरला जामीन मिळावा, म्हणून त्याच्यातर्फे अॅड. बी. ए. आलूर यांनी कोर्टात अर्ज दाखल केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…पण दखल कोण घेतो?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हरी नारायण आपटे यांनी १८९०मध्ये लिहिलेली मराठीतील पहिली स्वतंत्र कथा यंदा १२५वे वर्ष साजरे करीत आहे. मात्र, मराठी साहित्यविश्वाला या घटनेचा विसर पडला असल्याचे चित्र आहे. आताच्या काळात स्वतंत्र ओळख असलेल्या मराठी कथेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाची दखल मराठी साहित्य घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मराठी कथेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाची दखल घेणारा लेख 'प्रपंच' दिवाळी अंकामध्ये लेखक व माजी साहित्य संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांनी लिहिला आहे. अंकाचे संपादक महेंद्र कानिटकर यांनी त्याविषयी माहिती दिली.

लेखक हरी नारायण आपटे यांनी ऑक्टोबर १८९०मध्ये ' करमणूक' हे नियतकालिक सुरू केले. त्या अंकात त्यांनी लिहिलेली मराठीतील पहिली स्फुटकथा प्रसिद्ध झाली. त्यामुळे हरी नारायण आपटे हेच मराठी कथेचे जनक आहेत, असे मानावे लागते. त्यापूर्वीही कथा हा प्रकार मराठी साहित्यात होता. मात्र, त्यात अद्भुतरम्य कथा, पौराणिक कथा, अनुवादित कथांचा समावेश होता. आपटे यांनी लिहिलेली स्वतंत्र कथा मैलाचा दगड ठरली. त्यानंतर स्वतंत्रपणे कथा लिहिल्या जाऊ लागल्या,' असे कानिटकर यांनी सांगितले. आपटे यांच्यानंतर मनोरंजन मासिकातून वि. सी. गुर्जर, दिवाकर कृष्ण कथा लिहू लागले. त्यांच्या कथा अधिक सविस्तर, कथानकातील गुंतागुंत मांडणाऱ्या होत्या. त्यानंतर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चि. विं. जोशी यांनी विनोदी कथा लिहिल्या. विभावरी शिरूरकरांचे कथाप्रकारातील योगदान महत्त्वाचे आहे. त्यानंतर ना. सी. फडके, वि. स. खांडेकर यांनी कथेचा चेहरामोहरा बदलला. मात्र, अरविंद गोखले, पु. भा. भावे, व्यंकटेश माडगूळकर, गंगाधर गाडगीळ यांची मराठी नवकथा उदयाला आली. ग्रामीण कथा, कौटुंबिक कथाही लिहिल्या जाऊ लागल्या.

'मराठीमध्ये कथा हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा साहित्यप्रकार आहे. लघुकथेपासून लघुत्तम कथेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने कथेची मांडणी केली जाते. नव्या पिढीतही उत्तम पद्धतीने कथा लेखन केले जात आहे. वेगवेगळी वळणे घेत मराठी कथेने स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. त्याची दखल साहित्य विश्वानेही घेतली पाहिजे,' असे कानिटकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्यात गारपिटीची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ऐन थंडीच्या दिवसात राज्यात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. रविवारी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. पुढील दोन दिवस पावसाचा हजेरी कायम राहणार असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

मध्यपूर्व अरबी समुद्र व लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याच भागात वातावरणाच्या वरच्या थरात हवेची चक्राकार स्थिती आहे. तसेच अरबी समुद्राचा आग्नेय भाग ते गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे बाष्पाचे प्रमाण वाढून पाऊस होत आहे. गेल्या काही दिवसातील थंडीमुळे वाढलेला गारवा आणि हवेतील वाढते बाष्पाचे प्रमाण यामुळे गारपिटीची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले.

पुढील दोन दिवसांत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे; तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौटुंबिक कलह वाढतोय

$
0
0

Prashant.Aher@timesgroup.com

पुणे : जन्मोजन्मी एकत्र राहण्याच्या आणाभाका घेत विवाहबंधनात अडकेली अनेक दाम्पत्ये काही काळातच फारकत घेण्याच्या निर्णयापर्यंत येण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. परस्परांतील विश्वास कमी होऊन त्यांच्यातील कलह गेल्या वर्षीपेक्षा दुपटीने वाढल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. कोर्ट-पोलिस यामध्ये न अडकता 'म्युच्युुअली' घटस्फोट घेऊन वेगळा रस्ता स्वीकारण्याची उदाहरणेही वाढली आहेत.

पुणे पोलिस आयुक्तालयातील महिला सहाय्य कक्षात कौटुंबिक प्रश्नांबाबत समुपदेशन करण्यात येते. गेल्यावर्षी कौटुंबिक कलहाच्या तक्रारींच्या तुलनेत यावर्षी तक्रारांची संख्या दुपटीने वाढली आहे. परस्परांमधील विश्वास कमी होत असल्याने हे प्रकार घडतात, तर ३० ते ३५ वर्ष वयाच्या दाम्पत्यांच्या तक्रारी सर्वाधिक आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिली. एकमेकांपासून वेगळे होण्यासाठीची कारणे ही गेल्या काही वर्षांतील तीच आहेत. मात्र, यंदा तक्रारींची संख्या सर्वाधिक आहे. दिवाळीनंतर तक्रारींचा ओघ अचानक वाढला. समुपदेशन करून पती-पत्नीस एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी १०१९ तक्रारी अर्जांपैकी ४८० दाम्पत्यांमध्ये समझोता घडवून आणण्यात आम्हाला यश आले. पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी ४१४ अर्ज पाठवण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवारीच्या धाकाने चोरली चंदनाची झाडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सुरक्षारक्षकाला तलवारीचा धाक दाखवून दहा जणाच्या टोळक्याने कोरेगाव पार्क येथील एका बंगल्यातील दोन चंदनाची झाडे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुंडलिक भांगले (२२, रा. संतनगर, लोहगांव) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार दहा व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क परिसरातील साउथ मेन रोडवर ५२ क्रमांकाचा बंगला आहे. या ठिकाणी भांगले व चैनसिंग, अनिल कुमार हे तिघेजण सुरक्षारक आहेत. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास तिघे सुरक्षारक्षक बसले असताना बंगल्याच्या भिंतीवरून दहा जण आत शिरले. त्यांनी भंगले व इतर दोघांना तलवारीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. बंगल्यात असलेली सहा फूट लांब व सात इंच रुंदीची वीस हजार रुपये किंमतीची दोन चंदनाची झाडे त्यांनी कापली आणि मोटारीतून घेऊन पळ काढला. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनिल ताकवले अधिक तपास करत आहेत.

चाकूच्या धाकाने बॅग पळवली

पायी निघालेल्या एका व्यवसायिकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडे असलेली ७० हजार रुपयांच्या रोकडची बॅग पळवून नेल्याची घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास हडपसर परिसरात घडली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काही तासांतच दोघांना अटक केली आहे.

दाऊद सय्यद जमादार (२३) व असलम इब्राहिम शेख (२२, दोघेही रा. सैय्यदनगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत निलेश सुरवसे (२४, रा. शिवाजी आर्केड, मांजरी-बुद्रुक) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरवसे यांचा टुर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून पद्मावती येथे त्यांचे ऑफिस आहे. ऑफिसमध्ये जमलेली रोख रक्कम ७० हजार बॅगमध्ये ठेवून घरी जात होते. त्या वेळी पुणे-सोलापूर रोडवरील मांजरी फार्म येथे रस्ता ओलांडत असताना रिक्षामधून आलेल्या आरोपी जमादार व शेख यानी त्यांना अडविले. त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या हातातील बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून काही तासातच दोघांना अटक केली.

कोटींचा गंडा घालणाऱ्याला एक वर्षानंतर अटक

प्रिन्सिपल ग्रोथ म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करण्यास भाग पाडून सात जणांची दोन कोटी ४४ लाखांची फसवणूक करणाऱ्यास व्यक्तीला डेक्कन पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. गेल्या एक वर्षापासून पोलिस या आरोपीच्या मागावर होते.

सचिन अशोक प्रधान (रा. दीनदयाळ हाउसिंग सोसायटी, भारती विद्यापीठाच्या मागे, कात्रज) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या वडील अशोक महादेव प्रधान यांच्यावरही गुन्हा दाखल असून, त्यांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे. याबाबत निलेश काशिनाथ पेंढारकर (५०, रा. आपटे रोड, शिवाजीनगर) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन प्रधान आणि त्याचे वडील अशोक प्रधान या दोघांनी 'प्रिन्सिपल ग्रोथ फंड' या नावाची म्युच्युअल फंड ही योजना सुरू केली. या नावाने त्यांनी बँकेत बोगस खाते उघडले. गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने पेंढारकर यांच्यासह सात जणांकडून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी घेतल्या. पेंढारकर यांनी ३४ लाख पन्नास हजार रुपये भरले. मात्र, आरोपींनी त्यांना कोणताही परतावा दिला नाही. सदनिका खरेदीच्या व्यवहारामध्ये देखील पेंढारकर यांच्याकडून साडेपाच लाख रुपये घेऊन फसवणूक केली. फसवणूक केल्यानंतर गेल्या एक वर्षापासून प्रधान फरारी होता. त्याला डेक्कन परिसरातील एका हॉटेलमधून पोलिसांनी अटक केली. प्रधान याला बुधवारी दुपारी कोर्टात हजर करण्यात आले. तपास करण्यासाठी सरकारी वकील अनिल कुंभार यांनी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. कोर्टाने त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता निरीक्षकांना कारवाईचा केआरए

$
0
0

Suneet.Bhave@timesgroup.com

पुणेः रस्त्यावर आणि चौका-चौकांत दिसणारी अतिक्रमणे, मोकळ्या जागेवर उभी राहणारी बांधकामे... अन् कच्च्या-पक्क्या स्वरूपातील अनधिकृत शेड्स, इमारती... यावर आता दर आठवड्याला हमखास कारवाईचा बडगा उगारला जाणार असून, शहरातील अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांवर तशी बंधनेच लादण्यात आली आहेत. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने प्रथमच अधिकाऱ्यांसाठी साप्ताहिक कारवाईचा 'केआरए' निश्चित केला असून, त्यानुसार कार्यवाही करण्यात टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक अतिक्रमणमुक्त करण्याचे पालिकेने ठरविले असले, तरी ही मोहीम अद्याप यशस्वी झालेली नाही. काही प्रमुख रस्त्यांवर पालिकेतर्फे कारवाई केली जात असली, तरी त्यात सातत्य राहत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे, अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांसह क्षेत्रीय स्तरावरील अतिक्रमण निरीक्षकांना चाप बसविण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्याचे काम केले गेले आहे. त्यानुसार, प्रायोगिक स्वरूपात प्रत्येक अधिकाऱ्याने आठवड्याभरात किती अतिक्रमणांवर कारवाई केली, हे निश्चित करून देण्यात आले असून, त्याचा साप्ताहिक अहवाल अतिक्रमण विभागाकडे पाठविण्याचे बंधन घालण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार, अतिक्रमण विभागाकडे योग्य स्वरूपात माहिती देण्यात टाळाटाळ केली गेल्यास संबंधितांना नोटीस बजावली जात असल्याची माहिती अतिक्रमण विभागप्रमुख माधव जगताप यांनी दिली.

अतिक्रमण विभागातर्फे होणारी कारवाई ही तात्पुरत्या स्वरूपाची असते, एक-दोन दिवस केल्यानंतर पुन्हा संबंधित रस्त्याकडे दुर्लक्षच केले जाते किंवा अतिक्रमण कारवाई केल्यानंतर थोड्याच वेळात पुन्हा तिथे व्यवसाय सुरू होतात, यासारख्या अनेक तक्रारी नागरिकांकडून नेहमी केल्या जातात. कारवाई होण्यापूर्वीच अनेकदा व्यावसायिकांना त्याची माहिती समजते. त्यामुळे, पालिकेच्या कारवाईचा बार फुसका ठरतो, असेही सांगितले जाते. त्यामुळे, या सर्व गोष्टींना आळा बसावा; तसेच प्रत्येक अधिकाऱ्याकडून कारवाईचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार शहरातील सर्व पथारी व्यावसायिक आणि फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक स्वरूपात सर्वेक्षण आणि नोंदणी करून घेण्यात महापालिकेने आघाडी घेतली होती. राज्य सरकारतर्फेही आता फेरीवाला अधिनियमांची निश्चिती केली जाणार आहे. त्यानंतर, त्याचा अधिक फायदा होऊ शकेल, असा दावा केला जात आहे.

जबाबदारीची निश्चिती

अतिक्रमण कारवाईची जबाबदारी निश्चित करताना काही मूलभूत निकष निश्चित करण्यात आले आहेत. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात कारवाई, माल जप्त करण्यावर भर दिला जात असल्याने त्याऐवजी संपूर्ण आठवड्यात किमान ५० हातगाड्या/व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्याशिवाय, कच्च्या आणि पक्क्या स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचेही नियोजन करण्यात आले असून, दर आठवड्याला किमान ठराविक क्षेत्रावर कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळकतींना वाढीव कर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थानिक संस्था कराचे (एलबीटी) उत्पन्न घटल्याने पालिकेच्या महसुलात भर घालण्यासाठी आता मिळकतकरातून मिळणारे उत्पन्न वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. त्यासाठी, नव्या वर्षापासून कर आकारणी केल्या जाणाऱ्या मिळकतींना वाढीव दराने कर लावण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. तसेच, हा वाढीव कर टाळण्यासाठी अद्याप आकारणी न झालेल्या मिळकतींनी ३१ डिसेंबरपूर्वी मिळकतकर विभागाकडे अर्ज दाखल केल्यास त्यांना जुन्या दराने आकारणी करण्याची सवलत देण्यात आली आहे.

महापालिका हद्दीतील मिळकतींच्या करआकारणीसाठी प्रति चौरस फुटाचे वाजवी भाड्याचे दर निश्चित केले जातात. निवासी, बिगरनिवासी, मोकळ्या जागा, पार्किंग अशा वेगवेगळ्या मिळकतींसाठी दर दोन वर्षांनी दर निश्चित करण्याची पद्धत आहे. २००८, २०१० आणि २०१२ मध्ये या प्रकारे दर निश्चित केले गेले. परंतु, गेल्यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे ही दर निश्चिती लांबणीवर टाकली गेली. त्यामुळे, एक जानेवारी २०१६ पासून मिळकतींसाठी नव्याने दर निश्चित करण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. नव्या वर्षापासून करआकारणीस पात्र ठरणाऱ्या मिळकतींना वाढीव दर लागू होतील, असे मिळकतकर विभागाने स्पष्ट केले आहे.

नव्या दरांनुसार आकारणी केली जाणार असल्याचे सांगतानाच, ३१ डिसेंबरपूर्वी करआकारणी करून घेत त्यापासून सवलत मिळविण्याचे आवाहनही पालिकेने केले आहे. अद्याप मिळकतींची कर आकारणीच केलेली नाही, वापरातील बदलांनुसार कर आकारणी केलेली नाही; तसेच वाढीव बांधकाम आणि मोकळ्या प्लॉटची कर आकारणी केली नसल्यास अशा सर्वांनी डिसेंबर अखेरपर्यंत मिळकतकर विभागाकडे अर्ज सादर करण्याच्या सूचना मिळकतकर विभागाने केल्या आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल झालेल्या सर्व मिळकतींना वाढीव दराऐवजी २०१४-१५ च्या दरांनुसार कर आकारणी केली जाईल, अशी माहिती मिळकतकरप्रमुख सुहास मापारी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images