Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मंत्रिपदावर कार्यकर्त्यांनाच संधी

0
0

कुटुंबापैकी कोणाचेही नाव नसल्याचा आठवलेंचा खुलासा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राज्यात मंत्रिपदासाठी आपण आपली पत्नी किंवा कुटुंबीयांपैकी कोणाचेही नाव पुढे केले नाही. राज्यात आमचा आमदार नसला तरी एखाद्या कार्यकर्त्यालाच संधी देऊ. राज्यासह केंद्रात आम्हाला मंत्रिपद हवे आहे. परंतु, राज्यात राहण्यापेक्षा आम्हांला केंद्रात मंत्रिपद हवे आहे,' अशी अपेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी बोलून दाखविली.

पुण्यात सिम्बायोसिसच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या उद‍्घाटन समारंभानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्या वेळी त्यांनी केंद्रात मंत्रिपद हवे असल्याचे सांगितले.

राज्यात मंत्रिपदासाठी आठवले त्यांच्या पत्नीचे नाव पुढे करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात विचारले असता त्यांनी या वृत्ताचा इन्कार केला. 'राज्यात एक तसेच केंद्रात एक मंत्रिपदाची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांची आपण राज्यात यावे, अशी इच्छा आहे. पण, आंबेडकरी चळवळ देशभरात पोहोचविण्यासाठी आपल्याला केंद्रात मंत्रिपद हवे आहे. त्यासाठी आपण मोदींच्या ऑफरची वाट पाहत आहोत,' असे आठवले म्हणाले.

'राज्यात मंत्रिपदासाठी आपण पत्नी किंवा कुटुंबीयातील सदस्याचे नाव पुढे केले नाही. आमच्याकडे सध्या आमदार नाही. तरीही कार्यकर्त्यालाच संधी दिली जाईल. राज्यासह केंद्रात मंत्रिपदाबरोबर महामंडळातही सत्तेचा पाच टक्के वाटा मिळावा,' अशीही अपेक्षा रामदास आठवले यांनी या वेळी व्यक्त केली.

आठवले 'स्टाइल आयकॉन'

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडन येथे राहत असलेल्या घराचा लोकार्पण सोहळा नुकताच झाला. त्या वेळी रामदास आठवले यांनी घातलेल्या कपड्यांपासून ते हातात घेतलेल्या छत्रीपर्यंतच्या गोष्टींचा व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियांमधून अनेक चर्चा रंगली आहे. त्याबाबत विचारले असता, 'आपण आपल्याला ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या मी करतो. त्यामुळे माझ्या कपड्यांवरून कुणी वाईट चर्चा करण्यापेक्षा चांगली चर्चा करावी. आपल्या स्टाइलबाबत कोणत्याही कंपनीने आपल्याला ऑफर दिली नाही. मात्र, नरेंद्र मोदींच्या ऑफऱची वाट पाहत आहोत,' अशी मिश्कील प्रतिक्रिया आठवले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रंथालयास मदत करू

0
0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सिम्बायोसिस संस्थेने उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकार योगदान देईल,' असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सिम्बायोसिस संस्थेने उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे उद्‍घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी खासदार रामदास आठवले, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार तसेच संस्थेच्या प्रधान संचालिका विद्या येरवडेकर या वेळी उपस्थित होत्या.

'जगातील उत्कृष्ट संविधानात भारताची घटना उत्तम आहे. जगाला विकसित करण्याची प्रत्येक गोष्ट संविधनात आहे. समता, एकतेचे तत्त्व संविधानाने दिले असून देशाच्या प्रगती, विकासात संविधानाचे महत्त्व अधिक आहे. जागतिक अर्थव्यवस्थेबाबत डॉ. आंबेडकर यांचे विचार, लेख सुसंगत आहेत. त्यांच्यावर संशोधन करण्याची खरी गरज आहे. ग्रंथालयातून संशोधन, अभ्यास झाल्यास आंबेडकर यांच्या विचारांचा ठेवा आपल्याला मिळेल. त्यासाठी ग्रंथालयाच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकार निश्चित योगदान देईल,' असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

'राज्यघटनेमुळे निर्बळांना बळ मिळाले आहे. राजकीय असामानता दूर होऊन समानता प्रस्थापित झाली आहे. राजतीय समानतेबरोबर कायद्याचे राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळे मिळाले आहे,' असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केले.

मनोगतात स्मार्ट कॅम्पस, स्मार्ट मुख्यमंत्री असा उल्लेख डॉ. मुजुमदारांनी केला. त्या वक्तव्याचा संदर्भ देत 'मुख्यमंत्री स्मार्ट आहे, तर मी देखील स्मार्ट खासदार आहे,' अशी टिपण्णी रामदास आठवले यांनी करताच उपस्थितांत चांगलाच हशा पिकला. आंबेडकर ग्रंथालयाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त जमीन हवी, निधी हवा असल्यास सिम्बायोसिसने सरकारकडे प्रस्ताव द्यावा. त्यासाठी आपण देखील प्रयत्न करू. सरकार निश्चित मदत करेल, अशी ग्वाही दिली. त्या वेळी लंडनमधील कार्यक्रमात हातात छत्री घेतल्याने घडलेला किस्सा सध्या व्हॉट्सअॅपवरून फिरत आहे. त्याबाबतचे स्पष्टीकरणही द्यायला ते विसरले नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या संचालिका संजीवनी मुजुमदार यांनी स्वागत व प्रास्तविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नौकाविहारा’चे ‘मनसे’त पडसाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पूर्ण पाठिंबा असतानाही, महापालिकेतील आंदोलनात पक्षाच्या माजी गटनेत्यांच्या नौकाविहाराच्या आग्रहाचे तीव्र पडसाद पक्षात उमटले आहेत. पक्षाच्याच काही नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी थेट राज ठाकरे यांच्याकडेच त्याबाबत तक्रारी केल्या असल्याचे समजते.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पुरंदरे यांच्या सत्काराचा ठराव दफ्तरी दाखल केल्याने शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत भाजप-सेनेने त्याविरोधात आंदोलन केले. या आंदोलनाला मनसेचाही पाठिंबा असेल, असे गृहित धरण्यात आले होते. किंबहुना, मनसेतर्फेच पुरंदरे यांच्या सत्कार रद्द करण्याचा फेरविचार प्रस्तावही मांडण्यात येणार होता. त्यामुळे, सर्वसाधारण सभेत मनसे आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात, भाजप-सेनेचे आंदोलन सुरू असताना, मनसेने कात्रज येथील तलावात नौकाविहार (बोटिंग) सुरू करावे, याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केले. पालिकेतील माजी गटनेते वसंत मोरे यांनी तर सभागृहातच प्रतिकात्मक बोट आणली. मनसेचे काही नगरसेवक भाजप-सेना नगरसेवकांच्या पाठीमागे होते, तर काही जण मोरे यांच्या गटात होते. त्यामुळे, विरोधी पक्षांमध्ये आंदोलनावरून पडलेल्या फुटीचा फायदा उठवित सत्ताधाऱ्यांनी सभाच तहकूब केली.

दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांच्या केसाला जरी धक्का लागला, तरी याद राखा, असा सज्जड इशारा ठाकरे यांनी दिला होता. असे असतानाही, पुरंदरे यांच्या समर्थनार्थ केल्या जाणाऱ्या आंदोलनातून मनसेने अंग काढून घेतल्याची भूमिका अनेक नगरसेवकांना रुचलेली नाही. माजी गटनेत्यांच्या पवित्र्यामुळे मनसेतील असंतोष पुन्हा उफाळून आला असून, त्यांच्याविरुद्ध थेट पक्षनेतृत्वाकडेच तक्रारी करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीप्रकरणी पोलिस कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गोदामाचे शटर उचकटून ९६ हजार रुपयांची सिगारेटची पाकिटे चोरुन नेल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला २४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. नलगे-केस्तीकर यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

याप्रकरणी सुरेंद्र आसारामजी चौधरी (२२ रा. साईनगर, वडगाव शेरी) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन वसंतलाल कर्णावत (३८ रा. वाघोली) यांनी ​फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी कर्णावत यांच्या प्रथमेश एंटरप्रायजेस गोदामाचे आरोपींनी शटर पट्टी कट करुन उचकटले. गोदामामधील ९६,०४४ रुपयांची ​सिगारेटची पाकिटे चोरून नेली. याप्रकरणी आरोपी चौधरीला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याच्याकडे अधिक तपास करण्यासाठी त्याची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील ज्योती लक्का यांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपास सीआयडीकडे देण्याची मागणी

0
0

पिंपरीः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या खूनप्रकरणी कटात सामिल असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या बाबू ऊर्फ सूर्योदय शेट्टी याच्यातर्फे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. 'गुन्ह्यात अडकवण्यात आले असून, योग्य तपासासाठी हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात यावा,' अशी मागणी याचिकेव्दारे करण्यात आली आहे.

राहत्या घराच्या इमारतीत जिन्यामध्ये डोळ्यात मिरचीपूड टाकत चाकूने भोसकून टेकवडे यांचा ३ सप्टेंबरला खून करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमोल वहिले याच्यासह काही आरोपींना अटक करण्यात आली होती. त्या वेळी गोठा हलविणे आणि केबल वॉर यावरून टेकवडे यांचा खून करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. केवळ राजकीय हेतूपोटी शेट्टी याला अटक करण्यात आल्याचे त्याच्या वकिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा तपासच सीआयडीकडे द्यावा अशी मागणी याचिकेव्दारे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘FTII’चे विद्यार्थी गोव्यात अटकेत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळावरील नियुक्त्यांबाबत गोव्यात सुरू असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये (इफ्फी) विद्यार्थ्यांची 'अॅक्शन' सुरू आहे. महोत्सवात निदर्शने केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अटक केलेल्या दोन माजी विद्यार्थ्यांची शनिवारी कोर्टात जामिनावर सुटका करण्यात आली. तर, एका विद्यार्थ्याची चौकशी करण्यात आली.

'एफटीआयआय'च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेले गजेंद्र चौहान व इतर चार सदस्यांच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी १३९ दिवसांचा संप केला होता. मात्र, सरकारशी चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही त्या बाबतीत काहीच मार्ग निघाला नव्हता. इफ्फी हा भारताचा आंतरराष्ट्रीय महोत्सव असल्याने सरकारविरोधातील आंदोलनाचे पडसाद इफ्फीमध्येही उमटणार असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार विद्यार्थी 'इफ्फी'मध्ये एफटीआयआयच्या नियामक मंडळावरील नियुक्त्यांबाबत निदर्शने करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

महोत्सवाच्या उद् घाटनाच्या कार्यक्रमात निदर्शने केलेल्या किसलय आणि शुभम या दोन माजी विद्यार्थ्यांना गोवा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. तसेच एफटीआयआय लिहिलेला शर्ट घातलेल्या आशुतोष या सिनेमॅटोग्राफी विभागाच्या विद्यार्थ्याला शनिवारी ताब्यात घेण्यात आले होते. किसलय व शुभमला पोलिसांनी शनिवारी कोर्टासमोर हजर केले.

सरकारविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली असली, तरी आम्ही दबून जाणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने महोत्सवात सरकारचा निषेध करणार आहोत.

- विकास अर्स, विद्यार्थी प्रतिनिधी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संषर्घ यात्रेद्वारा सरकारचा निषेध

0
0

पुरोगामी विचारवंतांच्या मारेकऱ्यांना पकडण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एन. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांची नावे पोलिसांना माहिती असून देखील काहीच कारवाई केली जात नाही. पोलिसांवर सरकारचा किंवा मंत्र्याचा दबाव असेल तर त्यांनी तसे जाहीर करावे,' असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पुण्यात केले. या तिघांचे मारेकरी पकडले जात नाहीत, तोपर्यंत लढा थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांचे मारेकरी पकडण्यात यावे व इतर मागणीसाठी महाराष्ट्र लोकशाही आघाडी आणि डावी आघाडी यांच्या वतीने पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून संघर्ष यात्रेला शनिवारी सुरुवात करण्यात आली. त्या वेळी आंबेडकर बोलत होते. या वेळी श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर, मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे नरसय्या आडम, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे भालचंद्र कानगो, भीमराव बनसोडे, मुक्ता मनोहर, धनाजी गुरव, प्रतिमा परदेशी आदी उपस्थित होते. दाभोलकर यांची हत्या झालेल्या ठिकाणापासून सुरू झालेल्या या यात्रेचा २४ नोव्हेंबरला कोल्हापुरात समारोप होणार आहे.

आंबेडकर म्हणाले, 'दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांचे मारेकरी पकडून त्यांच्या मागील व्यक्ती कोण आहेत, हे जनतेसमोर लवकर आणावे. पोलिसांवर मंत्र्याचा किंवा नेत्याचा दबाव असेल तर त्यांनी त्याची नोंद पोलिस ठाण्यात करावी. पुण्यातील पोलिस हुशार आहेत. त्यामुळे त्यांनी या आरोपींना पकडण्याचे काम करावे. डॉ. पाटणकर म्हणाले, 'जातीयवादी शक्तीकडून अशी किती माणसे मारली जाणार आहेत. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येमागे जातीवादी शक्तीचा हात असून त्याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. या हत्येच्या तपासाबाबत पोलिस खात्यावर शासनाचा दबाव आहे. पण, आता या पुढे जातीवादी शक्तीकडून पुरोगामी विचारांच्या व्यक्तींच्या अंगावर एक जखम झाली तरी चालणार नाही. या तीन खूनातील आरोपींची माहिती २४ तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी द्यावी, अन्यथा जनतेला शोध मोहीम हाती घ्यावी लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्याला ‘अमृता’ची ‘तृष्णा’ कायम

0
0

Suneet.Bhave@timesgroup.com

पुणे : केंद्र सरकारच्या 'अमृत' योजनेतून राज्यातील ४२ शहरांना निधी मिळणार असला, तरी त्यासाठीचा सविस्तर वार्षिक आराखडाच (सॅप) राज्य सरकारने अद्याप सादर केलेला नाही. गुजरात, आंध प्रदेश, मध्य प्रदेश यासारख्या शेजारी राज्यांपासून ते झारखंड, मिझोरम, ओडिशा या राज्यांसाठी 'अमृत' योजनेतून निधी मंजूर होऊन त्याचा पहिला हप्ताही केंद्राने वितरित केला आहे. त्यामुळे, 'कुठे नेऊन ठेवलाय अहवाल महाराष्ट्राचा' असे विचारण्याची वेळ आली आहे.

स्मार्ट सिटी योजनेसह राज्यातील एक लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने ही योजना सुरू केली. त्या अंतर्गत, प्रत्येक राज्याने वार्षिक आराखडा (सॅप) केंद्र सरकारला सादर करणे अपेक्षित आहे. 'सर्वांत पुढे महाराष्ट्र माझा' असे म्हणले जात असले, तरी इतर शेजारी राज्यांनी महाराष्ट्राच्या आधीच या सॅपला मंजुरी घेण्यात यश मिळविले आहे. अमृत योजनेत राज्याने एक लाख लोकसंख्या असणाऱ्या ४२ शहरांचा समावेश केला आहे. राज्याचा सविस्तर आराखड्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू असून, पुढील आठवड्यात तो केंद्र सरकारला सादर करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास विभागाच्या सूत्रांनी दिली.

या आराखड्याला केंद्राने मान्यता दिल्यानंतर त्याअंतर्गत विविध शहरांत राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांना पुन्हा केंद्राची मान्यता घेण्याची गरज नाही. गेल्या महिन्याभरात गुजरात, राजस्थान, आंधप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, तमिळनाडू, ओडिशा, झारखंड आणि मिझोरम अशा आठ राज्यांनी ही मान्यता घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

निधी केव्हा मिळणार?

यूपीए सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेत (जेएनएनयूआरएम) मंजूर झालेल्या काही प्रकल्पांना 'अमृत' योजनेतून निधी देण्यात येईल, असे मोदी सरकारने जाहीर केले होते. पुण्यातील भामा आसखेड पाणीपुरवठा योजना आणि वडगाव जलशुद्धीकरण केंद्राला त्याद्वारे उर्वरित निधी मिळू शकणार आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी केंद्राचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर या दोन्ही योजनांना सरकारी अनुदानातून एक रुपयाही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे, दोन्ही योजनांवर केल्या जाणाऱ्या खर्चाचा सर्व भार पालिकेवरच पडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एलबीटी’च्या उत्पन्नात वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारने स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) उलाढालीची मर्यादा वाढवल्याने पालिकेच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असताना, आर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यांमध्ये पालिकेच्या तिजोरीत 'एलबीटी'पोटी ८३३ कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 'एलबीटी'चा महसूल १२० कोटी रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे.

पालिका हद्दीत एक एप्रिल २०१३ पासून एलबीटी लागू झाला होता. एलबीटी मुक्तीचे आश्वासन दिलेल्या फडणवीस सरकारने गेल्या एक ऑगस्टपासून 'एलबीटी'च्या उलाढालीची रक्कम ५० कोटी करून बहुसंख्य व्यापाऱ्यांना त्यातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, पालिकांच्या उत्पन्नात झालेली घट भरून काढण्यासाठी सरकारतर्फे अनुदान स्वरूपात निधी दिला जाऊ लागला. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या पालिकेच्या हिश्श्याच्या सुमारे ८० कोटी रुपयांसह ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांकडूनही दरमहा ३५ ते ४० कोटी रुपये पालिकेला प्राप्त होत आहेत. त्यामुळे, एलबीटी सुरू असतानाही, जेमतेम शंभर कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविणाऱ्या पालिकेला आता ऑगस्टपासून सव्वाशे कोटी रुपये प्राप्त होत आहेत.

एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यानच्या सात महिन्यांमध्ये 'एलबीटी'तून पालिकेला ८३३ कोटी ६८ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील एलबीटीचे उत्पन्न ७१२ कोटी ५२ लाख रुपये होते. त्यामुळे, चालू आर्थिक वर्षात पहिल्या सात महिन्यांमध्ये १२१ कोटी रुपयांची पालिकेचे उत्पन्न वाढले आहे.

राज्य सरकारने एक ऑक्टोबरपासून पेट्रोल व डिझेलवरील एलबीटी रद्द केला आहे. त्यामुळे, दरमहा मिळणारे साडेसहा ते सात कोटींचे उत्पन्न कमी झाले असून, त्याचेही अनुदान प्राप्त व्हावे, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.

- विलास कानडे, एलबीटीप्रमुख, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतवणुकीसाठी चिनी कंपन्या उत्सुक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ब्रिटनच्या सहकार्याने पुण्याचा 'स्मार्ट सिटी' म्हणून विकास होणार असतानाच, शहर आणि परिसरात गुंतवणूक करण्यासाठी चिनी कंपन्यांनीही उत्सुकता दाखविली आहे. बांधकाम व्यवसायापासून ते सॉफ्टवेअरपर्यंतच्या अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी पालिकेला भेट देत, विविध प्रकल्पांच्या उभारणीविषयी चर्चा केली.

आयसीवाय कॅपिटल, सीवायएमसी, अॅकॅडमी ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्स, बोहाई बायलॉजी, बोबो फायरवर्क यासारख्या १८ कंपन्यांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालिकेला भेट दिली. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सर्वांचे स्वागत केले. शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यावेळी उपस्थित होते. गेल्या आठवड्यातच ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरोन यांनी पुण्याला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली होती. आता ब्रिटनच्या पाठोपाठ चीनतर्फेही शहरात गुंतवणूक करण्यासाठी चाचपणी केली जात असून, त्याअंतर्गत विविध कंपन्यांच्या शिष्टमंडळाने त्याविषयी माहिती करून घेतली.

शहर आणि परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प उभारण्यासाठीची गुंतवणूक, त्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया, विविध संस्था-सरकारी मान्यता अशा विविध गोष्टींबाबत त्यांनी विचारणा केली. त्याबाबतची, सविस्तर माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांतर्फे त्यांना देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात पावसाची हजेरी

0
0

पुढील दोन दिवसांत गारपिटीची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यात केवळ हवामान ढगाळ झाले असले, तरी राज्यात मात्र, अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाबरोबरच गारपिटीचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आग्नेय व पूर्वमध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. याच भागात वातावरणाच्या मधल्या थरात हवेची चक्राकार स्थिती आहे. त्यातच अरबी समुद्राचा वायव्य भाग आणि गुजरातच्या दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन पाऊस होत आहे. किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक आहे. त्याचबरोबर उत्तरेकडील राज्यातून वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात हवामान थंड आहे. त्यातच हवेतील बाष्पही वाढल्यामुळे काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी मुंबईचा काही भाग, नवी मुंबई, रायगड, कल्याण, अहमदनगर, जामखेड, पाथर्डी या भागात पावसाने हजेरी लावली. सायंकाळी इगतपुरी, नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाला. सायंकाळी साडेपाचपर्यंत रत्नागिरी येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ढगाळ हवामानामुळे अनेक ठिकाणी तापमानातही मोठी वाढ झाली. पुण्यात शुक्रवारी १२.९ अंशांपर्यंत उतरलेले किमान तापमान शनिवारी थेट २०.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले. हे तापमान सरासरीपेक्षा सुमारे सहा अंशांनी अधिक होते. त्यामुळे शहरातील थंडी जणू गायब झाली आहे.

दरम्यान, पुढील दोन दिवसात कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीवनसाथी’ शोधत झाली बेघर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'जीवनसाथी डॉटकॉम' या वेबसाइटवरून ओळख झालेल्या परदेशी व्यक्तीने एका उच्चशिक्षीत तरुणीची २७ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. परदेशी व्यक्तींनी पाठविलेली महागडी गिफ्ट सोडवून घेण्यासाठी विविध कारणाने तरुणीकडून पैसे उकळण्यात आले आहेत. तसेच, काळा पैसा मागविल्याने दहशतवादी ठरविण्याची भीती दाखविल्यामुळे या तरुणीने स्वतःचे घर विकून पैसे दिल्याचे समोर आले आहे.

हडपसर येथील ३१ वर्षीय तरुणीने हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यावरून जेरी ब्रंच (रा. ब्रिटन) व निवा कार्गोज कुरिअर सर्व्हिसेस (ब्रिटन) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तरुणी मगरपट्टा येथील एका नामांकित कंपनीत उच्चपदावर नोकरीला आहे. तिने विवाहासाठी या वेबसाइटवर नोंदणी केली होती. गेल्या महिन्यात तिला जेरी ब्रंच नावाच्या व्यक्तीने विवाहासाठी इच्छुक असल्याचा संदेश पाठविला. तिने तो स्वीकारला. आरोपीने व्हॉटस्अॅपवरून तरुणीशी चॅटिंग सुरू केले. त्यावेळी त्याने त्याचे नाव जेरी ब्रंच असे सांगून तरुणीला दोन ब्लॅकबेरी व एक सॅमसंग मोबाइल, डिजिटल कॅमेरा, डायमंड ज्वलेरी, इम्पोर्टेड घड्याळ, डॉलर असे गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. मलेशियात असून लवकरच भारतात येऊन भेटतो, असे सांगून त्याने तरुणीच्या घराचा पत्ता देखील घेतला आणि गिफ्ट पाठविलेल्या कुरिअरच्या पावत्या मेल केल्या. त्यानंतर गिफ्ट भारतात आले असून ते कस्टमच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे. ते सोडवून घेण्यासाठी ९५ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर तरुणीस कुरीयर कंपनीचा फोन आला. गिफ्ट घेण्यासाठी साडेपाच लाख रुपये भरण्यास सांगितले. ब्रंच याने पैसे भरण्यास सांगून भारतात आलो की सर्व पैसे देतो असे सांगितले. तरुणीने वडिलांच्या खात्यावरून पैसे भरले. त्यांनी पुन्हा पैसे मागितल्याने संशय आला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक ए. बी. जोंधळे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे-सातारा महामार्गावर गॅस गळती

0
0

मटा प्रतिनिधी । पुणे

पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर फाट्याजवळ आज (रविवार) पहाटे चार वाजता गॅस टँकर उलटल्यामुळे बंद करण्यात आलेली वाहतूक टँकर हटविल्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास पूर्ववत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे नसरापूर फाट्याजवळ गॅस टँकर पलटी झाला. या टँकरमधून गॅस गळती होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी वाहतूक नीरामार्गे वळविली. यामुळं काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. अग्निशामन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून, गॅस गळती रोखली आणि टँकर हटविला. यानंतर काही वेळाने वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

दुसरीकडे खंबाटकी घाटातही साताऱ्याहून पुण्याकडे येत असताना बोगद्यात दोन बसचा अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे: मस्तानी तलावात बुडून दोघांचा मृत्यू

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यातील हडपसर वडकीनाला येथील मस्तानी तलावात बुडून आज सकाळी दोन तरुणांचा मृत्यू झाला. बुडालेल्या तरुणांच्या मृतदेहाचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बॅचलर्स पार्टीसाठी पाच तरुणांचा एक ग्रुप काल रात्री तलावाकाठी आला होता. रात्रभर पार्टी केल्यानंतर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हे सगळेजण पोहण्यासाठी मस्तानी तलावात उतरले. थट्टामस्करी करण्याच्या नादात त्यांना तरुणांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळं पोहता न येणारे दोघे पाण्याच्या प्रवाहाबरोबर आत ओढले गेले आणि बुडाले, तर पोहू शकणारे तिघे पाण्याबाहेर आले. हे पाचही तरुण दारूच्या नशेत होते, असे सांगितले जाते.

बुडालेल्या तरुणांचे मृतदेह शोधण्यासाठी अग्निशमन दलाने तलावात बोट उतरवली आहे. मृतांपैकी एकाचं नाव सुनील गायकवाड असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लौकिकात टॉप; सेवेत फ्लॉप

0
0

Rohit.Athavale@timesgroup.com

पिंपरी : वेळ पहाटे साडेतीनची...सायरन वाजत अॅम्ब्युलन्सचा हॉस्पिटलमध्ये प्रवेश...अत्यवस्थ पेशंट तातडी सेवा विभागात दाखल...प्राथमिक उपचारानंतर पेशंटला आयसीयूची गरज असल्याचे निदान... आणि आयसीयूमध्ये जागा उपलब्ध नसल्याचेही डॉक्टरांनी नातेवाइकांना सांगितले. हा सर्व प्रकार आहे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमधील.

स्वच्छता आणि बिनचुक निदान, क्लिष्ट ऑपरेशन आदींमुळे हॉस्पिटलचा नावलौकिक सर्वदूर पसरला आहे. मात्र, येथील गलथान कारभार, तप्तर सेवेचा अभाव, नेहमीच औषधांचा आणि डॉक्टरांचा तुटवडा, राजकीय वरदहस्तावर चालणारे कामकाज यामुळे हॉस्पिटल सेवेत मात्र पुरते फ्लॉप ठरत आहे.

ढिसाळ नियोजन, राजकारणात अडकलेली पदोन्नती, राजकीय व्यक्तींच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे डॉक्टरांची हॉस्पिटलकडे पाठ अशा असंख्य घटनांनी वायसीएमची पुरती दैना झाली आहे. या ठिकाणी 'मटा'ने सलग दोन दिवस पहाटे पाहणी केली. तेव्हाचे चित्र अत्यंत विदारक असे होते. भरदिवसा येथे पेशंटचे अतोनात हाल होत असतानाच रात्री तर दाद मागायला देखील कोणी येथे उपस्थित नसते. येथील सुरक्षा रक्षक आणि अॅम्ब्युलन्स चालक सोडले तर कोणालाच कोणाचा ताळमेळ नाही. नव्याने भरती झालेल्या डॉक्टरांशी जुळवून घेताना येथील परिचारिकांची दमछाक होत असते.

शहरासह राज्यभरातून यापूर्वी पेशंट उपचारासाठी वायसीएम हॉस्पिटलमध्ये येत होते. पण येथील केवळ नावलौकिक आता उरला असून, सेवा देण्यात सध्याचे प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. रात्री एखादा बाका प्रसंग शहरात घडल्यास खासगी हॉस्पिटलच्या सेवेवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही, अशी वायसीएमची स्थिती झाली आहे. रात्री दहापैकी किमान एका तरी पेशंटला बाहेरून औषध खरेदी करून आणण्यास सांगितले जाते. त्यासाठी रात्री मेडिकल शोधण्यात नातेवाइकांचा खूप वेळ जातो.

वास्तविक कोट्यवधी रुपयांची औषध खरेदी केली जाते; पण तरी सुद्धा दिवसा आणि रात्रीदेखील महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्यांना बाहेरून औषध का आणण्यास सांगितले जाते याकडे कोणाचेच लक्ष नाही. हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये भरती होणे म्हणजे सरकारी नोकरी मिळविण्यासाठी धडपड करण्यासारखे झाले आहे. नगरसेवक, आमदार-खासदारांचा वशिला आणल्या शिवाय आयसीयूमध्ये सामान्यांना जागा मिळत नाही. पण, हेच नगरसेवक, आमदार-खासदार वायसीएमचा कारभार कसा चालला याकडे दुर्लक्ष का करतात असा सवाल खुद्द डॉक्टर विचारू लागले आहेत.

हॉस्पिटलमध्ये रात्रभर चालणाऱ्या कॅन्टीनला पेशंटपेक्षा टवाळखोरांचीच जास्त गर्दी असते. चहा-बिस्कीटसह नाष्टा उपलब्ध असल्याने दारू प्यायल्यानंतर अनेकजण येथे गर्दी करतात. शहरात हाणामारीच्या घटना घडल्यानंतर जखमी आणि आरोपींना तपासणीसाठी येथे आणले जाते. पूर्वी येथील चौकीत दोन पोलिस कर्मचारी तैनात असायचे. पण, आता एकच कर्मचारी येथे नियुक्त केलेला असतो. त्यामुळे सुरक्षा रक्षकांवरच हॉस्पिटलची सुरक्षा अवलंबून आहे. साडे तीनला आलेली अॅम्ब्युलन्स पेशंटला सोडून निघून गेली. त्यानंतर दर अर्ध्या तासाने एक तरी अॅम्ब्युलन्सल पेशंटला घेऊन येत होती. पण, सेवा देण्यात हॉस्पिटल कमी पडत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बनावट कागदपत्रांद्वारे जमीन घोटाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

बनावट स्वाक्षऱ्या करून कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर; तसेच इतर कागदपत्रांवर खाडाखोड करून २८ गुंठे जमिनीचा दस्तऐवज नोंद करून फसवणूक केल्याप्रकरणी पाचजणांविरुद्ध कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खरेदीदारांसह सह-दुय्यम निबंधक कासारवाडी आणि देहूरोड कामगार तलाठी आदींचा समावेश आहे.

देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी निर्मला विष्णू भोंडवे यांनी फिर्याद दिली आहे. शब्बीर इब्राहिम पटेल (रा. दिघी रोड, भोसरी), आयुब उस्मान सैय्यद (रा. राहुलनगर, प्राधिकरण), विजय यशवंत महाजन (रा. मोशी, प्राधिकरण), सह-दुय्यम निबंधक कासारवाडी आणि तलाठी एम.ए. पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव कोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निर्मला भोंडवे यांच्या रावेत येथील जमिनीच्या व्यवहारात पटेल यांनी भोंडवे यांचा विश्वास संपादन करून घेतला. त्यानंतर अटी व शर्थींचे न्यायालयीन कामकाजासाठीचे कुलमुखत्यारपत्र पटेल यांना लिहून देण्यात आले. त्यानंतर पटेल यांनी वीस रुपयांच्या मुद्रांकावर खोटी स्वाक्षरी, अंगठे करून ताबे साठेखताची नोंद करून घेतली; तसेच आर्थिक व्यवहार दाखवून कासारवाडी येथे मूळ जमीन मालकांच्या स्वाक्षऱ्या व अंगठा न घेता खरेदीखत करून घेतले.

दस्तऐवज नोंद करताना सह-दुय्यम निबंधक यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले; तसेच रावेत गाव तलाठी यांनी खोटा पत्ता, स्वाक्षऱ्या व अंगठे याची खात्री न करता फेरफार व सातबाराला नोंद करून घेतली. या कारणास्तव त्यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. याविषयीची निर्मला भोंडवे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन देखील माहिती दिली. या वेळी बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब गायकवाड, संदीप घोगजे, संतोष भोंडवे, काशीनाथ भोंडवे आदी उपस्थित होते. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटल स्वच्छतागृहात आढळे मृत अर्भक

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

खासगी हॉस्पिटलचे स्वच्छतागृह तुंबल्याने साफसफाई करताना चेंबरमध्ये मृत अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यमुनानगर येथे हा प्रकार उघडकीस आला असून, एका संशयित महिलेविरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुनानगर येथील एका खासगी हॉस्पिटलचे स्वच्छतागृह तुंबल्याने रुग्णालयातील सफाई कामगारांनी स्वच्छतागृहाची सफाई केली असता त्यांना तेथे सहा ते सात महिन्यांचे वाढ झालेले स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले. याचा तपास करीत असताना, एका संशयित महिलेचे नाव पुढे आले आहे.

संबंधित महिला पोट दुखत असल्यामुळे १८ नोव्हेंबरला अॅडमिट झाली. त्यानंतर तिची प्राथमिक तपासणी करण्यासाठी डॉक्टर येण्यापूर्वीच ती स्वच्छतागृहात गेली. तेथेच तिने त्या मृत अर्भकाला जन्म दिला आणि अर्भक तेथेच टाकून रुग्णालयातून पळ काढला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. संशयित महिला काही दिवसांपूर्वी वायसीएम रुग्णालयात दाखल होती. मात्र, ती तेथून निघून गेली होती. त्यानंतर ती यमुनानगर हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. या प्रकरणी फौजदार मदन कांबळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात जणांविरोधात आत्महत्येप्रकरणी गुन्हा

0
0

पिंपरी : आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील सात जणांच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित विशाल राजाराम सोनवणे (वय २१, रा. वाल्हेकरवाडी, मूळ रा. नाशिक) या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या खोलीत (१६ नोव्हेंबर) सकाळी साडेदहा ते एकच्या सुमारास आत्महत्या केली होती. या प्रकरणी विशालचे वडील राजाराम सोनवणे (वय ४८, रा. नाशिक) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैशाली ठाकरे, योगीता ठाकरे, हनुमान ठाकरे, मंगेश ठाकरे, जितेंद्र ठाकरे, सोमनाथ देवरे, जितु खताळ (सर्व रा. साळसाणे, नाशिक) यांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपींनी विशाल याला त्यांच्या गावी बोलवून घेतले होते. तेथे त्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. हा अपमान सहन न झाल्याने विशालने महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या खोलीमध्ये आत्महत्या केली. त्याच्या खिशामध्ये चिठ्ठी सापडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अँटी गुंडा स्क्वॅाड’कडे तपास

0
0

वाढता राजकीय हस्तक्षेपामुळे अधिकारी बदलले

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकवडे खून प्रकरणाच्या तपासाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे. पिंपरी पोलिसांकडून आता टेकवडे खुनाचा तपास रविवारी (२२ नोव्हेंबर) गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाकडे (अँटी गुंडा स्क्वाड) वर्ग करण्यात आला आहे. मात्र, यातील वाढता राजकीय हस्तक्षेप लक्षात घेऊनच पोलिसांकडून तपास काढून घेत तो अँटी गुंडा स्कॉडकडे सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

अडीच महिन्यांपूर्वी, तीन सप्टेंबर रोजी टेकवडे यांचा त्यांच्या राहत्या घराच्या इमारतीत जिन्यामध्ये डोळ्यात मिरचीपूड टाकून चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. तेव्हा पिस्तुल लॉक झाल्याने आरोपींना टेकवडेंवर गोळीबार करता आला नसल्याचे तपासात पुढे आले होते. घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी या मास्टर माइंड म्हणून अमोल वहिले याच्यासह चार मारेकरी व पिस्तुल पुरविणारा या सर्वांना अटक करण्यात आली होती.

वहिले याचा अनधिकृत गोठा टेकवडे यांना महापालिकेला हटविण्यास सांगितल्याने आणि केबल वॉर मधून टेकवडे यांचा खून करण्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर मंगळवारी (१७ नोव्हेंबर) ला प्रकाश चव्हाण याचा भाऊ रमेश चव्हाण), चव्हाण याच्या माथाडीचे काम पाहणारा इंद्रास पाटील, तसेच बाबू ऊर्फ सुर्योदय शेखर शेट्टी व आकाश अनिल पोटगन यांना अटक करण्यात आली होती.

डिसेंबर २०१४ ला प्रकाश चव्हाण याचा टेकवडे यांच्या प्रमाणेच खून करण्यात आला होता. त्याचा बदला घेण्यासाठी टेकवडे यांचा खून झाल्याचे तपासात पुढे आल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले होते. त्यामुळे वरील चौघांना अटक झाली. रमेश, इंद्रास यांनी शनिवारी (२१ नोव्हेंबर) अटक करण्यात आलेला गुन्हेगार सुशांत ऊर्फ सुश्या गायकवाड याच्या मार्फत वहिले याला टेकवडे यांच्या खुनाची सुपारी दिल्याचे तपासात पुढे आले; तर बाबू शेट्टी याला हा सर्व प्रकार माहित होता असेही तपासात पुढे आल्याचे पिंपरी पोलिसांचे म्हणणे आहे. शेट्टी याने काही वर्षांपूर्वी चव्हाण याच्यावर गोळीबार केला होता

काहींनी आरोपीला वाचविण्यासाठी; तर काहींनी विनाकारण गोवण्यासाठी राजकीय खेळी केल्याचा आरोप होत होता. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी हा तपास गुन्हेशाखेकडे वर्ग केला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बाबू शेट्टी यांनी गुन्ह्यात गोवण्यात आल्याचे सांगत हायकोर्टात याप्रकरणी याचिका दाखल करून सीआयडी तपासाची मागणी केली होती. या प्रकरणी अँटी गुंडा स्कॉडचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड तपास करीत आहेत.

पोलिसांमध्ये वाद

टेकवडे यांच्या खूनानंतर अमोल वहिले याला पुणे विमानतळावर अटक करण्यात आली होती. मात्र, या वेळी गुन्हे शाखा आणि पिंपरी पोलिसांमध्ये चांगलीच तू-तू मैं-मैं झाली होती. वहिले याला कोणी अटक करायची यावरून पुणे पोलिसांच्याच दोन विभागांमध्ये चांगलेच नाट्य रंगले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पक्षाला मंत्रिपदे मिळत नाहीत’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'राज्यात मंत्रिपद मिळाले नाही; पण केंद्रात मिळते का बघू? कार्यकर्त्यांच्या विश्वासामुळेच आज मी नेता झालो. कार्यकर्ता म्हणूनच मी काम करत राहिलो आणि जनतेचा माझ्यावर विश्वास निर्माण झाला. आपण कोणत्याही राजकीय पक्षाकडे जात नसून, राजकीय पक्षच मतासाठी आपल्याकडे येतात. परंतु, आपणाला कोणतीही मंत्रिपदे मिळत नाही,' अशी खंत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पिंपरीत रविवारी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मैदानात राज्यस्तरीय महिला अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अविनाश महातेकर, राष्ट्रीय कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे, नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, पश्चिम महाराष्ट्राच्या युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, वाहतूक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अजिझ शेख, युवा आघाडीचे पप्पू कागदे, बाळासाहेब भागवत आदी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, 'सावित्रीबाई फुले यांच्यामुळे सर्व महिलांना शिक्षण मिळाले. त्यामुळेच दलित चळवळीत महिलांचा मोठा सहभाग दिसून येतो. सर्व जाती-धर्माच्या महिलांना पक्ष सामावून घेणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पक्ष पोहोचला आहे. राज्यातील दलित व मागासवर्गीय महिलांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. आयोग स्थापन होण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत.'

महिला अधिवेशनातील ठराव...

लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करा.

राज्यात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना करावी.

मागासवर्गीय महिला आयोगाची स्थापना राज्य पातळीवर करण्यात यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images