Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नाचण्यास नकार दिल्यामुळे पोलिस शिपायाला मारहाण

$
0
0

पुणेः वाढदिवसाच्या पार्टीत नाचण्यास नकार दिल्यामुळे पोलिस शिपायाला घरी जाऊन हॉकी स्टीकने बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

श्रीपाद अरुण सोनवणे (वय २५), बाळ लक्ष्मण गोडांबे (वय २९), तुषार काशीनाथ गुलमजोर (वय २४), विजय मधुकर आठवले (वय २४), देवराम विलास काकडे (वय २४), सचिन कैलास पासलकर (वय २५), रियाज सय्यद शेख (वय २९, रा. गणेशखिंड रोड, खैरेवाडी पिंपळेश्वर मंदिराजवळ. चतुश्रृंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या घटनेत जखमी पोलिस शिपाई कैलास महामुलकर (वय २५) यांनी तक्रार दिली आहे.

शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात महामुलकर नेमणुकीस आहेत. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ड्युटी करून ते घरी आले होते. त्यानंतर सरकारी दुचाकी असल्याने ती जमा करण्यासाठी परत होते. त्या वेळी गणेशखिंड रोडवरील खैरेवाडी पिंपळेश्वरजवळ आरोपी त्यांचा मित्र सचिन पासलकर याच्या वाढदिवसानिमित्त स्पीकर लाऊन नाचत होते. श्रीपाद सोनवणे याने कैलास महामुलकर यांची दुचाकी अडवत त्यांना तुम्ही वाढदिवसाच्या पार्टीत नाचायला पाहिजे असे सांगितले. मात्र, महामुलकर यांनी नाचण्यास नकार दिला. त्याचा राग येवून २० ते २५ जणांच्या जमावाने महामुलकर यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. महामुलकर या ठिकाणावरून निघून घरी आले. पण, आरोपींनी त्यांच्या मागे जात घरात घुसून त्यांना हॉकी स्टीकने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले; तसेच आरोपींनी दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. या प्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सौर ऊर्जेची होणार चाचपणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रायोगिक स्वरुपात महापालिकेच्या इमारतींवर सौर ऊर्जेचा वापर करता येऊ शकतो का, याची चाचपणी केली जाणार असून, त्यासाठी पहिल्या टप्प्यात २४ इमारतींचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. केंद्र सरकारला सादर करण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटीच्या अहवालात त्यातील काही इमारतींचा समावेश होण्याची शक्यता आहे.

महापालिकेतर्फे सध्या स्मार्ट सिटी योजनेसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण शहरासाठी (पॅन सिटी); तसेच क्षेत्रनिहाय विकासांतर्गत औंध-बाणेर, बालेवाडी (एरिया डेव्हलपमेंट) या परिसराच्या विकासाकरिता स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये पर्यावरणपूरक साधनांचा उपयोग करण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जेचा वापर वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याची सुरुवात महापालिकेच्या इमारतींपासूनच केली जाणार असून, शाळा-हॉस्पिटल यांच्यासह पालिकेच्या मालकीच्या अन्य इमारतींवर सौर ऊर्जेचा वापर करता येऊ शकतो का, याची तपासणी केली जात आहे. त्यासाठी पालिकेच्या २४ इमारती निश्चित करण्यात आल्या आहेत. येथे सौर ऊर्जेचा वापर करायचा झाल्यास, किती खर्च करावा लागेल, त्यातून किती ऊर्जेची बचत होऊ शकेल, याचा सविस्तर अभ्यास केला जात आहे. या सर्वेक्षणाअंती पालिकेच्या काही इमारतींवर सौर ऊर्जेचा वापर फायदेशीर ठरू शकतो, हे स्पष्ट झाल्यास 'स्मार्ट सिटी' अहवालात त्याचा समावेश केला जाण्याची दाट शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडिमेड तिखटामुळे मिरची उद्योगाला ठसका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भाजी, रस्सा अथवा फोडणीसाठी तिखटाशिवाय पर्याय नाही. पण मिरची कांडपात जाऊन तिखट तयार करण्याची संस्कृती आता हद्दपार होऊ लागली आहे. त्यामुळे तयार तिखट खरेदीकडे गृहिणींकडे कल वाढल्याने मिरची खरेदी कमी झाली आहे. परिणामी, मिरची व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

सध्याची फ्लॅटसंस्कृती, वाढत्या महागाईचा खर्च भागविण्यासाठी जोडप्याला नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे घरातील अन्य कामे करायला वेळच मिळत नसल्याने तिखट तयार करण्यासाठी बाजारातून मिरची खरेदी करणे, मिरचीचे देठ काढणे, मसाल्याचे पदार्थ भाजणे, त्यानंतर मिरची कांडपात जाऊन तिखट तयार करून आणणे यासारखी कामे आता पूर्वीसारखी होताना दिसत नाहीत. पूर्वी उन्हाळ्यात पापड, कुरडया, लोणच्याबरोबर तिखट तयार करण्याची घरोघरी लगबग असायची. परंतु, या सर्व गोष्टींमध्ये कालांतराने बदल होत असल्याचे दिसून येत आहेत. शहरी संस्कृतीत वाढलेल्या महिलांना या गोष्टी करण्यात फारसा रस नाही. तसेच वेळही नसल्याने तयार तिखट खरेदीकडे त्यांचा ओढा वाढला आहे.

'आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांसह कोल्हापूर, गडहिंग्लजमधून पुण्यात दर वर्षी अडीच ते तीन हजार ट्रक मिरचीची आवक होत असे. पूर्वी नाशिक, घोटी, इगतपुरी, धुळे, सातारा, सांगलीसह विविध भागात पुण्यातून मिरची जात असे. परंतु, दळणवळणाच्या व्यवस्था निर्माण झाल्याने या भागात थेट उत्पादन होणाऱ्या राज्यांतून मिरचीची आवक होत आहे. त्यामुळे पुण्यात ग्राहकांअभावी किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी घटली आहे. सध्या वर्षाला ७०० ते ८०० ट्रक मिरचीची आवक होत आहे.

त्यामुळे एकूणच पूर्वीच्या आवकेच्या तुलनेत एक तृतीयांशी मागणी घटली आहे. परिणामी मिरची व्यवसाय अडचणीत आला आहे,' अशी माहिती मिरचीचे व्यापारी राजेंद्र गुगळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिनेमातून ‘पिंगा’ काढा

$
0
0

उदयसिंह पेशवा यांची मागणी; इतिहासाला धरून नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'बाजीराव-मस्तानी' या आगामी चित्रपटातील 'पिंगा' नृत्य इतिहासाला धरून नसल्याने ते काढून टाकावे, अशी मागणी पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा यांनी केली आहे. चित्रपटातील नृत्य लावणी पद्धतीने चित्रित करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांच्या 'पिंगा' नृत्यावर सध्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रियांकाने या चित्रपटात थोरल्या बाजीरावांची पत्नी काशीबाई यांची; तर दीपिकाने मस्तानीची भूमिका साकारली आहे. या दोघींवर चित्रित करण्यात आलेले 'पिंगा' नृत्य इतिहासाला धरून नाही; तसेच ते लावणी ढंगाने चित्रित करण्यात आल्याची भावना पेशवा यांनी व्यक्त केली. पिंगा नृत्य आणि त्यावरून सुरू झालेल्या वादाविषयी बोलताना पेशवा म्हणाले, की 'पेशवे हे मराठी राज्याच्या छत्रपतींचे पंतप्रधान होते. अशा पंतप्रधानांची पत्नी असणारी कुलीन स्त्री अशा पद्धतीने नृत्य करणे अशक्य होते. तसे संदर्भही मिळत नाहीत. त्या काळच्या स्त्रिया घराबाहेर पडतानाही अंगभर

वस्त्र लपेटून बाहेर पडत. लोकांमध्ये जाऊन नृत्य करणे, ही तर शक्यताही नव्हती. पिंगा गाण्यात पारंपरिक नृत्य नसून, ते लावणीसारखे चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यामुळे कुलीन मराठी स्त्रिया अशा प्रकारची नृत्ये करत असल्याचा गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे गाणे सिनेमातून काढून टाकावे, अशी आमची मागणी आहे.'

चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याची मागणी

बाजीराव-मस्तानी चित्रपटातील 'पिंगा' या गीतामधून चुकीचा इतिहास मांडला जात असून, चित्रपट प्रदर्शित झाल्यास त्याविरोधात असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे, या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी 'ऑनलाइन' याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांकडे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयितांचे जुनेच फोटो पुन्हा प्रसिद्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी शोधण्यास केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) अद्याप यश आलेले नाही. 'सीबीआय'ने शुक्रवारी पुन्हा एकदा आरोपींची जुनीच स्केच प्रसिद्ध करून संशयितांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी डॉ. दाभोलकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला. त्यावेळीही सीबीआयने दोन संशयितांची स्केचेस जारी केली होती. सीबीआयकडे तपास देऊन दीड वर्ष उलटले, तरी त्यांना आरोपींबाबत काहीच ठोस माहिती मिळालेली नाही. पुणे शहर पोलिसांचे तीन अधिकारी सीबीआयला तपासकामात मदत करण्यासाठी सरकारने देऊ केले आहेत. स्केचमधील संशयित आरोपींची माहिती मिळाल्यास ०२२-२७५६५८१५ किंवा पोलिस निरीक्षक सतीश देवरे ८६९८९१०००१, चंद्रकांत घोडके ८८०६९१९७७७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सीबीआयने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोटींची फसवणूक करणाऱ्यास कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून एम. एस. ऑर्थोपेडीक्ससाठी अॅडमिशन मिळवून देतो, असे सांगून वेळोवेळी पैसे घेऊन एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. निमसे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

सौरभ शिवाजी येडूरकर (रा. अंकुर रेसिडेन्सी, माळी कॉलनी, कोल्हापूर) याला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले होते. या प्रकरणी राजींदर गोविंदराम शर्मा (५६, रा. गुडगाव, हरियाणा) यांनी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्रामसिंह श्रीकांत घाटगे, पल्लवी घाटगे, उदय घाटगे, श्रीकांत घाटगे, राजीवकुमार सुरेंद्र रॉय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीचा मुलगा प्रदुयम्ना शर्मा याला डी. वाय. पाटील कॉलेज पुणे या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून एम. एस. ऑर्थोपेडीक्ससाठी अॅडमिशन मिळवून देतो, असे आरोपींनी फिर्यादीला सांगितले. कोरेगाव पार्क येथे फिर्यादीकडून वेळोवेळी एक कोटी रुपये घेतले. मात्र, त्यांच्या मुलाला कोणत्याही प्रकारचे अॅडमिशन दिले नाही. या प्रकरणी सौरभ येडूरकरला अटक करण्यात आली आहे. डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेज अॅण्ड रिसर्च सेंटर येथे अॅडमिशन मिळवून देतो असे सांगून १५ लाख रुपये रोख संग्रामसिंह घाटगे याने स्वतः स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी सौरभचा यात सहभाग आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यूपीएससी’साठी मते घेणार

$
0
0

Yogesh.Borate@timesgroup.com

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षांचे स्वरूप आणि इतर सर्वच मुद्द्यांविषयी फेरविचार होत असताना आता सर्वसामान्य नागरिकांच्या मतांनाही तितकेच महत्त्व दिले जाणार आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांची मानसिकता नेमकी कशी हवी, या विषयीची सर्वसामान्य नागरिकांची मते ही या पुढील काळात अधिकाऱ्यांच्या जडण घडणीसाठीही महत्त्वाची ठरू शकतात. त्याच्याशी निगडीत विविध बाबींचा यूपीएससीच्या अभ्यासक्रमामध्येही समावेश होण्याची शक्यता आहे.

'यूपीएससीच्या परीक्षांचे स्वरूप आणि या परीक्षांशी निगडीत इतर सर्वच मुद्द्यांबाबत पुनर्विचार करण्यासाठी केंद्राने तज्ज्ञांची एक समिती नेमली आहे. या माध्यमातून सर्वच विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांना परीक्षेत समान संधी मिळवून देत, सर्वोत्तम उमेदवारांना अधिकारी म्हणून पुढे आणण्यासाठीचे प्रयत्न केंद्र सरकारने सुरू केले आहेत. माजी सनदी अधिकारी बी. एस. बासवान यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या समितीच्या माध्यमातून परीक्षेसाठीची वयाची अट, पात्रतेचे निकष, अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप, पद्धत अशा सर्वच मुद्द्यांबाबतचा पुनर्विचार होणार आहे. या समितीचे सदस्य आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्याशी 'मटा'ने शुक्रवारी संवाद साधला. त्या वेळी या बाबी स्पष्ट झाल्या.

समितीच्या कार्याविषयी डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, 'यूपीएससीच्या परीक्षांच्या धोरणांचा फेरविचार हे खूपच मोठे काम आहे. समितीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये झालेल्या तीन- चार बैठकांमधून आम्ही कार्याची रूपरेषा निश्चित केली असून, त्यानुसार कामालाही सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आलेल्या अंदाजानुसार, समितीला आपले काम पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. सध्या आम्ही यूपीएससीशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा करून त्यांची मते मागवित आहोत.'

अशा घटकांकडून यूपीएससीच्या परीक्षा धोरणांविषयीची मते घेताना, एका प्रश्नावलीच्या माध्यमातून समितीने आपले काम सुरू केले आहे. मते नोंदविणाऱ्या घटकांमध्ये यापूर्वी यूपीएससीच्या परीक्षा देऊन अधिकारी झालेले लोक, यूपीएससीच्या माध्यमातून अधिकारी

होण्याची इच्छा असणारे विद्यार्थी, यूपीएससीसाठी काम पाहिलेले उच्चपदस्थ अधिकारी आणि सचिव, यूपीएससीच्या परीक्षांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या विविध संस्था आणि सर्वसामान्य नागरिक यांचा समावेश आहे, असेही डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले.

यूपीएससीच्या माध्यमातून अधिकारी झाल्यानंतर ज्यांना सेवा द्यायची आहे, अशा सर्वच घटकांच्या मतांचा ही समिती विचार करणार असणार आहे.

- डॉ. अनिल सहस्रबुद्धे, अध्यक्ष, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरंदरेंना पूर्वीच मानपत्र दिल्याने प्रस्ताव दफ्तरी

$
0
0

पुणेः शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महापालिकेने १९७८ मध्येच मानपत्र देऊन गौरविले आहे. एकाच व्यक्तीला पालिकेच्या वतीने दोनदा मानपत्र देण्याची पालिकेची प्रथा नाही, त्यामुळेच शिवशाहीर पुरंदरे यांचा प्रस्ताव पक्षनेत्यांच्या बैठकीत दफ्तरी दाखल करण्यात आल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी शुक्रवारी सांगितले. पुरंदरे यांना देण्यात आलेल्या मानपत्राची आणि त्याच्या ठरावाची फोटोकॉपी धनकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविले आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांना महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन त्यांचा जाहीर सत्कार करावा, असा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी दिला होता. गेल्या आठवड्यात झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत शिवसेना, भाजप, मनसेचे गटनेते हजर नसल्याने पालिकेत सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीने हा प्रस्ताव थेट दफ्तरी दाखल केला. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यामध्ये जोरदार आरोप- प्रत्यारोप केले जात होते. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत सेना, भाजप युतीच्या नगरसेवकांनी आंदोलन करून सत्ताधाऱ्यांच्या धिक्काराच्या घोषणाही दिल्या.

सर्वसाधारण सभा तहकुब झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महापौर धनकवडे यांनी पालिकेने यापूर्वीच १२ मे १९७८ ला पुरंदरे यांना मानपत्र देऊन सन्मानित केले असल्याचे सांगितले. १९८९ साली देखील पुरंदरे यांना मानपत्र देण्याचा ठराव त्यावेळच्या सभासदांनी केला होता. परंतु यापूर्वीच त्यांना मानपत्र देण्यात आल्याने त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. पालिकेने एकदा मानपत्र दिल्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीला दुसऱ्यांदा मानपत्र देण्याची प्रथा नाही, त्यामुळे हा विषय दफ्तरी दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा विषय दफ्तरी दाखल करताना यापूर्वी करण्यात आलेल्या सत्काराचा ठराव मिळाला होता; मात्र त्यांना देण्यात आलेल्या मानपत्राची फोटोकॉपी सापडली नसल्याने स्पष्ट कारण दिले नसल्याची कबुली महापौर धनकवडे यांनी‌ दिली.

शिवशाहीर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर शहराचा प्रथम नागरिक म्हणून त्यांना पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केल्याचेही महापौर धनकवडे यांनी सांगितले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल आमच्या मनात नेहमी आदरच आहे. मात्र, काही राजकीय पक्ष केवळ स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी पुरंदरे यांच्या नावाचा वापर करीत आहेत. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे.

दत्तात्रय धनकवडे, महापौर, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरस्कारावरून गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सत्काराचा प्रस्ताव दफ्तरी दाखल करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध व्यक्त करत पुरंदरे यांचा सत्कार करावा, यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या व‌तीने पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सुरू असतानाच कात्रज तलावातील बोटिंगची सुविधा सुरू झालीच पाहिजे, अशी मागणी करत मनसेनेही सभागृहात घोषणाबाजी केल्याने काही काळ गोंधळ उडाला. अतिरेक्यांच्या हल्यात शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांना श्रद्धांजली वाहून सभेचे कामकाज तहकुब करावे, अशी तहकुबी मांडून सभा तहकुब करण्यात आली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे. पुरंदरे हे पुणेकर असल्याने महापालिकेच्या वतीने त्यांना मानपत्र देऊन सत्कार करावा, असा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी पक्षनेत्यांकडे भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी दिला होता. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून हा विषय पुढे ढकलला जात होता. गेल्या आठवड्यात‌ झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत भाजप, शिवसेना, मनसेचे गटनेते गैरहजर असल्याची संधी साधत पालिकेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हा प्रस्त‌ाव थेट दफ्तरी दाखल करण्याचा निर्णय घेतला. सत्ताधारी पक्षाने घेतलेल्या निर्णयाचे पडसाद शुक्रवारी सर्वसाधारण सभेत उमटले. सभेला सुरुवात होताच भाजप, सेनेच्या नगरसेवकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात धिक्काराच्या घोषणा देत आंदोलन केले. पुणेकरांची मान शरमेने खाली घालायला लावणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध असो, काँग्रेस, राष्ट्रवादी हे जातीयवादाचे प्रदुषण असे फलकही सेना, भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात आणले होते.

भाजप, सेनेचे आंदोलन सुरू असतानाच कात्रज येथील तलावातील बोटिंग सुरू करा, या मागणीसाठी मनसेच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली. या सभासदांनीही सत्ताधाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. थर्माकॉलची बोट सभागृहात आणून महापौरांच्या आसनासमोर मनसेने हे आंदोलन केले. या दोन्ही आंदोलनामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, शहीद कर्नल महाडिक यांना श्रद्धांजली वाहून सभा तहकुब करण्याची तहकुबी मांडून सभा तहकुब करण्यात आली.

फेरविचार न केल्यास आंदोलन करणार

पुरंदरे यांच्या सत्काराचा प्रस्ताव दफ्तरी दाखल केल्यानंतर मनसेच्या गटनेत्यांनी सत्ताधाऱ्यांच्या वागणुकीवर कडक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मनसेचे नगरसेवक बोटिंग सुरू करण्यासाठी आंदोलन करत होते. यामुळे मनसेचे नगरसेवक पुरंदरे प्रकरणापासून अंतर राखून असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सभागृहात घडलेल्या प्रकाराची सारवासारव करत आम्हीही या आंदोलनात होतो, असे पक्षाचे नगरसेवक रवींद्र धंगेकर आणि बाळा शेडगे यांनी सांगितले. पुरंदरेंच्या मानपत्र ठरावाचा फेरविचार न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा या दोघांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येत्या दोन दिवसांत पुण्यात पावसाची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेले काही दिवस थंडीचा कडाका अनुभवल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस पावसाचे ठरण्याची शक्यता आहे. लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुण्यातही पावसाच्या काही सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात मध्य व उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे. त्यातच आता लक्षद्वीप व लगतच्या परिसरात समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्याच भागात वातावरणाच्या वरच्या थरात हवेची चक्राकार स्थिती आहे. त्याचबरोबर तिथपासून अरबी समुद्राच्या ईशान्य भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाले आहे. त्यामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढून राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

पुढील दोन दिवसांत म्हणजेच शनिवारी व रविवारी कोकण किनारपट्टी, दक्षिण व मध्य महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, पुण्यासह राज्यातील थंडीचा कडाका कायम आहे. शुक्रवारी पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी १२.९ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. हे यंदाच्या हंगामातील सर्वांत नीचांकी तापमान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रद्द तिकिटाचा परतावा नाहीच

$
0
0

एसटीच्या कारभाराने प्रवाशांना मनस्ताप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य परिवहन महामंडळाच्या दिवाळीच्या काळातील रद्द झालेल्या काही जादा गाड्यांच्या तिकिटाचा (ऑनलाइन) परतावा १० ते १५ दिवस उलटल्यानंतरही प्रवाशांना झालेला नाही. त्यामुळे ऐन वेळी गाडी रद्द झाल्याने प्रवाशांना सहन कराव्या लागलेल्या त्रासाबरोबरच आता तिकिटाचे पैसे परत मिळवितानाही त्यांच्यावर मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे.

दिवाळीच्या काळात एसटीच्या पुणे विभागात २१५० जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या; तसेच नियमित धावणाऱ्या गाड्याही प्रवाशांच्या सेवेत होत्या. त्यापैकी एक हजारापेक्षा अधिक गाड्यांना ऑनलाइन तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. दिवाळीच्या काळात प्रवासी संख्या जास्त असल्याने बहुतांश सर्व गाड्यांचे बुकिंग फुल झाले होते.

'नऊ ऑक्टोबरला रात्री अकरा वाजता स्वारगेट एसटी स्टँड येथून लातूरला जाणाऱ्या बसचे तिकीट बुक केले होते. मात्र, ती गाडी रद्द झाली. माझ्यासह अन्य ४० प्रवाशांनी गाडी रद्द झाल्याने त्याच ठिकाणी एसटीकडे तिकीट जमा केले. एसटी प्रशासनाने चार ते पाच दिवसांत पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, असे सांगितले होते. मात्र, ११ दिवस उलटले तरी अद्याप पैसै जमा झालेले नाहीत,' असे रद्द झालेल्या बसचे प्रवासी प्रशांत गोडसे यांनी सांगितले. दरम्यान, ऑनलाइन तिकीट यंत्रणा मुंबईतून कार्यान्वित आहे. त्यामुळे राज्यात कोणत्याही आगाराची गाडी रद्द झाल्यास, संबंधित गाडीच्या प्रवाशांचे तिकिटाचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जातात. ही सर्व प्रक्रिया मुंबई येथील संबंधित कार्यालयातून केली जाते, असे एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

रद्द झालेल्या गाडीच्या तिकिटाच्या पैशांच्या परताव्यासाठी एसटी स्टँडमध्ये सोय करण्यात आली आहे. साधारणपणे प्रवाशाने ई-तिकीट जमा केल्यानंतर त्या पुढील चार-पाच दिवसांत, त्यांच्या खात्यात पैसै जमा होतात. मात्र, सध्या दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे; तसेच बँकांनाही सुट्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना पैसे परत करण्यास उशीर होत असेल.

- एम. एम. शेख (आगार प्रमुख, स्वारगेट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदणी चौकात दुमजली पूल

$
0
0

Kuldeep.Jadhav@timesgroup.com

पुणे : दोन वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या चांदणी चौकातील दुमजली पुलाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) माध्यमातून करण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. या पुलासाठी येणाऱ्या खर्चाचा भार देखील केंद्र सरकार उचलणार आहे. दरम्यान, 'एनएचएआय'मार्फत हे काम केले जाणार असल्याने या चौकात महामार्गाची प्रस्तावित असलेली तिसरी लेन आणि सर्व्हिस रोडचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चांदणी चौकातील वाहतुकीची आणि अपघातांची समस्या सोडविण्यासाठी दुमजली उड्डाणपूल उभारण्याच्या प्रस्तावाला महापालिकेने मान्यता दिली होती. त्यासाठी विविध कंपन्यांकडून पुलाचे डिझाइन मागविण्यात आले होते. त्यातून महापालिकेने 'एक्ससीसी इंजिनिअर्स व प्लॅनर्स' कंपनीने बनविलेल्या डिझाइनचे व प्रतिकृतीचे सादरीकरण तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर तत्कालीन आयुक्त महेश पाठक यांनी केले होते. आणि त्यानंतर दुमजली उड्डाणपूल उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, त्यानंतर महापालिकेने तो प्रस्ताव 'एनएचएआय'कडे पाठविला होता. दरम्यान, त्यावर कोणताही निर्णय झाला नव्हता.

दरम्यान, दिल्ली येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत त्यांना या पुलाला हिरवा कंदील दाखविला. आणि पुलाचे काम 'एनएचएआय'कडूनच केले जाईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर 'एनएचएआय'च्या पुण्यातील अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली आहे. या पुलासाठी नव्याने डिझाइन तयार करायचे का, महापालिकेने तयार केलेल्या डिझाइनमध्येच

आवश्यक बदल करून तो स्वीकारायचा किंवा एनएचएआय, महापालिकेच्या सल्लागारामार्फत डिझाइन तयार करावे, या साठी नव्याने टेंडर प्रक्रिया राबवावी की या महामार्गावर सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटदार कंपनीकडूनच ते काम करून घ्यावे, अशा विविध गोष्टींबाबत 'एनएचएआय'च्या पुण्यातील अधिकाऱ्यांनी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अभिप्राय मागविला आहे. त्यांच्याकडून याबाबत खुलासा प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

'सर्व्हिस रोडचा अंतर्भाव करणार'

महापालिकेने तयार केलेला पुलाचा प्लॅन हा शहराच्या वाहतुकीच्या दृष्टिने होता. मात्र, 'एनएचएआय'ला त्यामध्ये महामार्गाचाही विचार करावा लागणार आहे. सद्य परिस्थितीत जागा उपलब्ध नसल्याने चांदणी चौकात प्रस्तावित लेन वाढविणे आणि सर्व्हिस रोड करणे शक्य नाही. त्यामुळे या चौकात उड्डाणपुलाचे काम करताना अतिरिक्त लेन व सर्व्हिस रोडचा अंतर्भाव करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे, अशी माहिती 'एनएचएआय'चे प्रकल्प व्यवस्थापक प्रफुल्ल दिवाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंबाटकीचे वळण सरळ करणार

$
0
0

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या काही वर्षांत अनेकांच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेले सातारा जिल्ह्यातील खंबाटकी बोगद्याच्या परिसरातील धोकादायक वळण सरळ करण्याचा करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव 'एनएचएआय'ने दिल्लीच्या वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे.

पुणे-बेंगळुरू महामार्गावर सातारा जिल्ह्याच्या हद्दीत खंबाटकी घाट हे अपघातप्रवण क्षेत्र आहे. पूर्वी या घाटातून दोन्ही बाजूची वाहतूक केली जात होती. मात्र, येथे वारंवार होणारे प्राणघातक अपघात रोखण्यासाठी व वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी प्रशासनाने साताऱ्याहून पुण्याला येणाऱ्यांसाठी बोगदा बनविला. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटली. मात्र, प्राणघातक अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही. बोगद्यातून बाहेर आल्यानंतर पुढे तीन ते चार किलोमीटरचा घाट रस्ता आहे; तसेच बोगद्यातून बाहेर पडल्यावर लगेच तीव्र उताराचे एस आकारातील वळण आहे. या वळणावर गेल्या काही वर्षांत अपघातात शेकडोंचे बळी गेले आहेत. त्यामुळे हा वळणावळणाचा रस्ता सरळ करण्याचा निर्णय 'एनएचएआय'ने घेतला.

महामार्गावरील बोगदा ओलांडल्यानंतर तीव्र उताराचा रस्ता आहे. त्यामुळे वाहनांचा वेग सांभाळणे चालकांना कठीण जाते. त्याचबरोबर बोगदा ते खंबाटकी जुना टोलनाका या दरम्यान तीन ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. जानेवारी २०१४ मध्ये प्रवासी जीपवर कंटेनर कोसळून ११ जण ठार व तीन जण जखमी झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच महिन्यात झालेल्या एका अपघातात १० जण ठार व ३९ जण जखमी झाले होते. या परिसरात दर महिन्याला किमान तीन ते चार अपघात होत असल्याची स्थानिकांची माहिती आहे. दरम्यान, बोगद्यातून येणाऱ्या वाहनांचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. बोगद्यातून बाहेर आल्यानंतर उतार आणि वळण असल्याने वाहनचालकाला गाडी नियंत्रणात ठेवता येत नाही. त्यामुळे या परिसरात वेगमर्यादेचे पालन केल्यास अपघात टाळता येतील; मात्र, प्रवाशांच्या जिवाचे महत्त्व अधिक असल्याने वळणाचा रस्ता सरळ करण्याचा निर्णय घेतल्याचे 'एनएचएआय'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

एस (s) आकारामुळे शेकडो बळी गेले

प्राणघातक अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही. बोगद्यातून बाहेर आल्यानंतर पुढे तीन ते चार किलोमीटरचा घाट रस्ता आहे; तसेच बोगद्यातून बाहेर पडल्यावर लगेच तीव्र उताराचे एस आकारातील वळण आहे. या वळणावर गेल्या काही वर्षांत अपघातात शेकडोंचे बळी गेले आहेत. त्यामुळे हा वळणावळणाचा रस्ता सरळ करण्याचा निर्णय 'एनएचएआय'ने घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गुळाचा गणपती’चे हस्तलिखित उजेडात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'गुळाचा गणपती' या चित्रपटाच्या कथेची हस्तलिखित प्रत उजेडात आली असून, एका कलाप्रेमीने ती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द केली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, संवाद, संगीत व अभिनय असे सारे काही 'सबकुछ पु. ल.' आहेत. या चित्रपटाची हस्तलिखित प्रतही खुद्द महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व आनंदयात्री पु. ल. देशपांडे यांच्या हस्ताक्षरातील असल्याने त्यामुळे एक मोठा ठेवा आता जतन होणार आहे.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे सध्या चित्रपट वारसा अभियान सुरू असून त्यामाध्यमातूनच हे दुर्मिळ हस्तलिखित संग्रहालयाला मिळाले आहे, अशी माहिती संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिली. गुळाचा गणपती हा चित्रपट १९५३ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यामुळे हे हस्तलिखित साहजिकच त्या आधीचे आहे.

या चित्रपटाची निर्मिती विनायक राजगुरू यांनी केली होती. त्यांच्याच कुटुंबातील डॉ. सरोजिनी राजगुरू यांच्याकडे या चित्रपटाच्या हस्तलिखिताची प्रत होती. चित्रपटप्रेमी व आशय फिल्म क्लबचे सचिव सतीश जकातदार यांच्या माध्यमातून डॉ. राजगुरू यांनी ही दुर्मिळ प्रत संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे नुकतीच सुपूर्द केली.

याविषयी मगदूम यांनी सांगितले, की चित्रपटविषयक जुन्या गोष्टी मग त्यात जुणी गाणी, छायाचित्रे, फिल्म, कथा असे साहित्य असल्यास ते संग्रहालयाकडे देण्यात यावे. संग्रहालयाच्या माध्यमातून हा ठेवा जतन केला जाईल, असे आवाहन आम्ही करत आहोत. त्यामुळे चित्रपट वारसा अभियानाला यश येताना दिसत आहे. डॉ. सरोजिनी राजगुरू यांनी पु. ल. देशपांडे यांच्या हस्ताक्षरातील गुळाचा गणपती या चित्रपटाच्या कथेची प्रत संग्रहालयाकडे दिली आहे. 'पुलं'चे हस्तलिखित मिळणे हा मोठा ठेवा आहे. हा चित्रपट १९५३ मध्ये प्रदर्शित झाला होता, त्यामुळे ही प्रत त्याआधीची आहे. हे हस्तलिखित चांगल्या अवस्थेत असून त्याचे डिजिटायजेशन करण्यात येईल. यामध्ये 'पुलं'नी काही सूचना लिहून ठेवल्या आहेत, त्याचाही अभ्यास करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांच्या सहमतीसाठी ‘आटापिटा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटीमध्ये नेमक्या कोणत्या प्रकल्पांचा समावेश आहे..., क्षेत्रनिहाय विकासामध्ये कोणत्या योजनांना प्राधान्य दिले जाईल..., स्मार्ट सिटीमुळे नागरिकांच्या जीवनमानात कोणत्या सुधारणा अपेक्षित आहेत... याचा प्रा-रूप आराखडा अद्याप तयार होणे बाकी असतानाच, स्मार्ट सिटीच्या पाठिंब्यासाठी नागरिकांकडून स्वाक्षरी मोहीम राबविण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.

स्मार्ट सिटीच्या आराखड्याची कोणतीही माहिती न देताच, आमचा स्मार्ट सिटीला पाठिंबा असल्याचे प्रतिज्ञापत्र नागरिकांकडून भरून घेण्यासाठी पुढील १५ दिवस ही स्वाक्षरी मोहीम राबविण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. परंतु, नागरिकांकडून पाठिंबा मिळविण्यापूर्वी किमान त्यांना स्मार्ट सिटी योजनेतील विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पात देशभरातील ९८ शहरांमध्ये पुण्याची निवड झाली. दुसऱ्या टप्प्यात मोजक्या शहरांची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी स्मार्ट सिटीचा प्रकल्प अहवाल केंद्राकडे १५ डिसेंबरपूर्वी सादर करणे आवश्यक आहे. संपूर्ण शहरासाठी (पॅन सिटी) आणि क्षेत्रनिहाय विकास (एरिया डेव्हलपमेंट) अशा दोन स्वरूपात हा प्रकल्प सादर करण्याचे बंधन पालिकेवर आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी पालिकेने सुरुवातीपासून नागरिकांच्या सहभागावर भर दिला आहे. त्याअंतर्गतच, आता अंतिम अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यापूर्वी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना सहभागी करून घेण्याची पालिकेची इच्छा आहे.

'स्मार्ट सिटी योजनेस आमचा संपूर्ण पाठिंबा असून, महापालिकेसोबत शहरात उत्तम पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. संपूर्ण देशात राहण्यासाठी सर्वांत योग्य शहर बनविण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. या प्रवासामध्ये शहराला आमच्याकडून हाती घेणे आवश्यक वाटत असलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची प्रतिज्ञा करतो,' अशा आशयाचा अर्ज पालिकेने मराठी आणि इंग्रजीमध्ये तयार केला आहे. त्यावर, नागरिकांची/कुटुंबातील सदस्यांची स्वाक्षरी घेण्यात येणार असून, अधिकाधिक नागरिकांच्या स्वाक्षरीने हा प्रकल्प केंद्राला सादर करण्याचा मानस आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (विशेष) अनिल पवार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुण्यात गुंतवणूक करण्यास ब्रिटन, चीन उत्सुक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ब्रिटनच्या सहकार्याने पुण्याचा 'स्मार्ट सिटी' म्हणून विकास होणार असतानाच, शहर आणि परिसरात गुंतवणूक करण्यासाठी चिनी कंपन्यांनीही उत्सुकता दाखविली आहे. बांधकाम व्यवसायापासून ते सॉफ्टवेअरपर्यंतच्या अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी पालिकेला भेट देत, विविध प्रकल्पांच्या उभारणीविषयी चर्चा केली.

आयसीवाय कॅपिटल, सीवायएमसी, अॅकॅडमी ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्स, बोहाई बायलॉजी, बोबो फायरवर्क यासारख्या १८ कंपन्यांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालिकेला भेट दिली. महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सर्वांचे स्वागत केले. शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यावेळी उपस्थित होते. गेल्या आठवड्यातच ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरोन यांनी पुण्याला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली होती. आता ब्रिटनच्या पाठोपाठ चीनतर्फेही शहरात गुंतवणूक करण्यासाठी चाचपणी केली जात असून, त्याअंतर्गत विविध कंपन्यांच्या शिष्टमंडळाने त्याविषयी माहिती करून घेतली.

शहर आणि परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प उभारण्यासाठीची गुंतवणूक, त्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया, विविध संस्था-सरकारी मान्यता अशा विविध गोष्टींबाबत त्यांनी विचारणा केली. त्याबाबतची, सविस्तर माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांतर्फे त्यांना देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तरीही रखडला पुणेकरांसाठी महत्त्वाचा असलेला रस्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कात्रज-देहू रोड बायपासवर मृत्यूचा सापळा बनलेल्या डुक्कर खिंडीत वन विभागाच्या परवानगी अभावी गेल्या काही वर्षांपासून रखडलेले रस्ता रुंदीकरणाचे काम, आता परवानगी मिळाल्यानंतरही सुरू करणे अशक्य झाले आहे. डुक्कर खिंडीत वन विभागाच्या जागेत खोदाई केल्यानंतर त्याचा राडारोडा टाकण्यासाठी वनविभागाकडून पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जात नाहीये. त्यामुळे पर्यायी जागा उपलब्ध झाल्याशिवाय रिलायन्स इन्फ्राकडून काम सुरू केले जाणार नसल्याचे सांगण्यात आले.

गेल्या रविवारी डुक्कर खिंडीजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा एकदा कात्रज-देहू रोड बायपासवर रखडलेल्या कामांचा प्रश्न पुढे आला. डुक्कर खिंड परिसरात गेल्या काही वर्षात छोटे-मोठे अपघात सातत्याने होत आहेत. त्यामुळे येथूल रुंदीकरण कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेरीस वन विभागाने डुक्कर खिंडीत रस्ता रुंदीकरणास परवानगी दिल्याने हा प्रश्न मार्गी लागल्याची भावना व्यक्त केली गेली होती. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळीच असल्याचे आता निदर्शनास येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या पत्नीचा खून करणाऱ्यास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुसऱ्या पत्नीला देवदर्शनासाठी नेवून अक्कलकोटजवळ निर्जनस्थळी खून करून पेटवून देणाऱ्या पतीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ही महिला बऱ्याच दिवसांपासून गायब असल्यामुळे नागरिकांना संशय आला त्यांनी तक्रार दिल्यानंतर सहा महिन्यांनी या खुनाला वाचा फुटली. याप्रकरणी अटक केलेल्या दोघांना सोलापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नारायण बबन काळभोर (वय ४५, रा. बाजारभळा, लोणीकाळभोर) व संतोष जर्नादन घोडके (वय ३०, रा. तरवडे वस्ती, महमंदवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेत ताराबाई नागू काळे यांचा खून झाला होता. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात ताराबाई बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. गुन्हे शाखा युनिट पाच पोलिस समांतर तपास करत होते. निरीक्षक सुनील यादव व पोलिस हवालदार शिवाजी घुले यांना माहिती मिळाली, की काळभोर ताराबाई यांना एका कारमध्ये देवदर्शनासाठी घेऊन गेला होता. काळभोरकडे चौकशी केली असता, प्रथम त्याने ताराबाई यांना पाण्यात ढकल्याचे सांगितले. मात्र, पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. काळभोर व मोटारचालक संतोष घोडके देवदर्शनासाठी म्हणून त्यांना मोटारीतून अक्कलकोटला घेऊन गेले. अक्कलकोट येथे रात्री उशिरा पोहचल्याने मंदिर बंद झाले असल्याच्या कारणावरून तिघांनीही बाहेरूनच दर्शन घेतले. त्यानंतर तिघेही तुळजापूरच्या दिशेने निघाले. रस्त्यात निर्जनस्थळी मोटार थांबवून पत्नीवर चाकूने वार केले. तसेच, पाइप चिटकवण्यासाठीचे सोल्यूशन टाकून पेटविले.

ताराबाई यांचा बोलका स्वभाव असल्यामुळे परिसरातील नागरिकांची त्यांचा चांगला जनसंपर्क होता. त्यांना देवदर्शनाची खूप आवड होती. त्या दररोज मंदिरात जाऊन दर्शन, पूजा करायच्या. नवरात्रीच्या काळातही त्या परिसरातील नागरिकांना दिसल्या नसल्यामुळे एकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनडीएमध्ये ई-लर्निंगचा वापर वाढविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या नौदलाच्या छात्रांना आता बीएस्सी ऐवजी बॅचलर ऑफ टेक्नोलॉजी (बी. टेक) पदवी मिळणार आहे. त्याचबरोबर एनडीएमध्ये ई-लर्निंगचा वापर वाढविण्यात येणार असून स्मार्ट क्लासरूमची संख्याही वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती एनडीएचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल जी. अशोककुमार यांनी शनिवारी दिली.

एनडीएच्या १२९ व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत अशोककुमार यांनी ही माहिती दिली. या वेळी एनडीएमधील तिन्ही दलांच्या छात्रांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

नव्या प्रस्तावानुसार एनडीएच्या नौदल छात्रांना बी टेक इन अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग ही पदवी मिळू शकणार आहे. आधुनिक काळात युद्धाचे बदलते स्वरूप लक्षात घेता या छात्रांचे प्रशिक्षण अधिक सुसंगत असावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

एनडीएमध्ये बारावीनंतर दाखल झालेले छात्र तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण घेतात. त्यानंतर त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची बीए अथवा बीएस्सी पदवी मिळते. त्यानंतर नौदलाचे छात्र पुढील प्रशिक्षणासाठी एझिमला येथील इंडियन नेव्हल अॅकॅडमीमध्ये जातात. तेथील प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांना एमएस्सी पदवी देण्यात येते.

बारावीनंतर थेट इंडियन नेव्हल अॅकॅडमीत दाखल होणारे छात्र मात्र, चार वर्षांचा इंजिनीअरिंग अभ्यासक्रम पूर्ण करतात. त्यांच्याकडे बीटेकची पदवी असल्याने सेवेदरम्यान सहाजिकच ते एमएस्सी झालेल्या छात्रांच्या पुढे जातात. त्यामुळे नव्याने देण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, नौदलाचे छात्र एनडीएमध्ये बीटेक अभ्यासक्रमाची तीन वर्षे पू्र्ण करतील. त्यानंतर उर्वरित एक वर्षाचा अभ्यासक्रम ते एझिमला येथील इंडियन नेव्हल अॅकॅडमीमधील प्रशिक्षणादरम्यान पूर्ण करतील. ही पदवीदेखील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडूनच दिली जाणार आहे. त्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची मान्यता घेण्यात येणार आहे, असे अशोककुमार यांनी स्पष्ट केले. नौदलाच्या छात्रांसाठी नवीन सिम्युलेटरही बसविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

पदवीप्रदान शुक्रवारी, संचलन शनिवारी

एनडीएचा १२९ व्या तुकडीचा दिमाखदार दीक्षांत संचलन सोहळा येत्या शनिवारी (२९ नोव्हेंबर) होणार आहे. या संचलनाची मानवंदना नौदलप्रमुख अॅडमिरल आर. के. धोवन स्वीकारणार आहेत. तर याच तुकडीचा पदवीप्रदान सोहळा शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझ्या नावाचा दुरुपयोग : अण्णा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'आपण आजवर अनेक आंदोलने केली, त्यातून समाजाला उपयोगी अनेक कायदे आले. मात्र, सध्या माझ्या नावाचा दुरुपयोग होत आहे,' अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. आता राज्यातील सर्व भ्रष्टाचार निर्मूलन समित्या बरखास्त करून लढा सुरू ठेवण्यासाठी नवी यंत्रणा उभारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

धोर्डे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चंद्रभागा झांबरे यांना 'आदर्श माता जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. विश्वास पाटील, जॅकी भगमानी, राजेंद्र धोर्डे, रमेश धोर्डे आदी उपस्थित होते. शंकरराव आढाव, प्रभाकर शेट्टी, डॉ. नितीन उनकुले, निवृत्त कर्नल सुरेश पाटील, सोनिया मायर यांना विविध पुरस्कार देण्यात आले. 'गेली १८ वर्षे सर्व राज्यात फिरून २२ जिल्ह्यामधील ३५२ तालुक्यांमध्ये समित्या स्थापन केल्या. माहितीचा अधिकार, ग्रामसभा, दफ्तरदिरंगाई असे सात कायदे लागू झाले. मात्र, हल्ली माझ्या नावाचा दुरुपयोग होत आहे, असे कानावर आले,' असे हजारे म्हणाले.

'सर्व भ्रष्टाचार निर्मूलन समित्या बरखास्त करुन आंदोलनाची एक नवी यंत्रणा उभारण्यात येईल, आंदोलनात सहभागी व्हायचे असेल, तर 'मी चारित्रहनन होऊ देणार नाही, चुकीचा वागणार नाही' असे अॅफिडेव्हिट करून देणाऱ्यांनाच आंदोनात सहभागी होता येणार आहे,' असे अण्णांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images