Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खुर्शीद यांच्या राजीनामा मागणीसाठी आंदोलन

$
0
0
केंद्रीय कायदेमंत्री सलमान खुर्शीद यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी इंडिया अगेन्स्ट करप्शनतर्फे पुणे रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन करण्यात आले. संस्थेच्या कार्यकर्त्यांबरोबरच काही अपंग व्यक्ती आणि स्टेशनवरील रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकही या आंदोलनात सहभागी झाले होते.

रंगराजन समितीवर कृषिमंत्र्यांचे तोंडावर बोट

$
0
0
‘रंगराजन समितीच्या अहवालामध्ये काही दीर्घकालीन उपाय सुचविण्यात आले आहेत. मात्र, हा विषय सरकारच्या धोरणात्मक बाबींशी संबंधित असल्याने त्यावर योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल’, असे सांगत त्याबाबत अधिक काही भाष्य करणे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी टाळले.

‘डॉक्टर-पेशंट विश्वासाचा मानवी चेहरा कायम ठेवा’

$
0
0
‘वैद्यकीय क्षेत्रात संशोधन, आधुनिकता याचे स्थान अपरिहार्य असले, तरी डॉक्टर-पेशंट यांच्यातील परस्पर विश्वासाचा, सुसंवादाचा मानवी चेहरा कायम राहावा’, अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केली.

यंदाचा हंगाम गेला, आता पुढच्या वर्षावर नजर

$
0
0
पावसाने मारलेल्या दडीचा फटका पुढील वर्षी ऊस उत्पादक शेतक-यांना बसू नये, यासाठी सध्या उभ्या असलेल्या उसाच्या पिकाचे सर्व्हेक्षण करून पुढील वर्षाच्या ऊस लागवडीसाठी उपयुक्त असे बियाणे तयार करावे, अशी सूचना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली.

नगरसेवक म्हणतात

$
0
0
प्रभागात प्रामुख्याने वाहतूक आणि पाण्याची समस्या असून ती सोडविण्यावर सध्या भर आहे. नवीन कामांच्या टेंडरची प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रभागातील होम कॉलनीकडे गेल्या १५ वर्षांत फारसे लक्ष देण्यात आले नव्हते. या कॉलनीचा पुढील पाच वर्षांत कायापालट करण्याचा प्रयत्न करणार आहे. कचरामुक्त वॉर्ड संकल्पना राबविण्यास सुरूवात केली असून कचराकुंड्या हलविण्यात आल्या आहेत.

प्रभाग अध्यक्ष म्हणतात

$
0
0
वारजे - कर्वेनगर परिसरातील विकासकामांचे काही प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. तर मंजूर झालेली कामे काही ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहेत. झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतागृहांची कामे सुरु करण्यात आली आहेत. झोपडपट्ट्यांमधील अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू करण्यात आलेली आहे. प्रभागांमध्ये कचरामुक्त वॉर्ड ही योजना सुरू करण्यात आली आहे.

प्रभाग अध्यक्ष म्हणतात

$
0
0
प्रभागात पाण्याचा प्रश्न गंभीर होता. सुमारे ६० टक्क्यांपर्यंत हा प्रश्न सोडविण्यात यश आले आहे. प्रभाग अध्यक्ष म्हणून काम करताना सगळेच नगरसेवक उत्तम साथ देत आहेत. प्रभागाची सभा घेताना पहिल्या महिन्यात काहीसे दडपण होते. कारण, महापालिकेत निवडून येण्याची माझी पहिलीच वेळ आहे.

पहिली सहामाही प्रश्नांची

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी अनधिकृत बांधकांमे दंड आकारून नियमित केली जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र, कारवाईला सामोरे जावे लागल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. या समस्येवर तोडगा शोधण्याऐवजी प्रश्नच निर्माण झाल्यामुळे नगरसेवकही अडचणीत सापडले आहेत.

धमकावून पैसे लुटणा-यास अटक

$
0
0
दोघा तरुणांना धमकावून त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल पळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाला अटक केली असून, तिघेजण फरार आहेत. येरवड्यातील अलंकार चौकात शुक्रवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली.

मंगळसूत्र हिसकावले

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) बस स्टॉपवर बसची वाट पाहत असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चंदननगरमधील टाटा गार्डन येथील बस स्टॉपवर ही घटना घडली.

ट्रक चालकाला लुबाडणारे गजाआड

$
0
0
कोयत्याचा धाक दाखवून ट्रकचालकाला लुटणा-या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. खडकी स्टेशन येथे शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली.

कार अपघातात तीन ठार

$
0
0
वेगावर नियंत्रण न राहिल्याने एका मोटारकारने रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणा-या कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले. सांगवी फाटा येथील राजीव गांधी पुलावर रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात दुसऱ्या कारमधील विवाहित जोडपे किरकोळ जखमी झाले.

खुनी पतीस चिंचवड येथून अटक

$
0
0
आठ वर्षापूर्वी पहिल्या पत्नीच्या मदतीने दुस-या पत्नीला जिवे मारून तिचे प्रेत आपल्या नातेवाईकांच्या गावात पुरणा-या पतीस गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने चिंचवडच्या चापेकर चौकातून शनिवारी अटक केली.

IT कंपनीतील तरुणीची आत्महत्या

$
0
0
हिंजवडीतील विप्रो कंपनीत नोकरी करणा-या एका तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पिंपरीत रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

नवरात्रामुळे भाज्या कडाडणार

$
0
0
आठवडाभरापूर्वी झालेल्या जोरदार पावसानंतरही भाज्यांची घटली असली तरीही त्यांचे भाव स्थिर आहेत. मात्र, आवक मोठी झाल्याने बटाट्याच्या भावात घट झाली आहे. पितृपंधरावड्यामुळे भाज्यांना मागणी आहे. मात्र, घेवडा, भेंडी, गवार, कोबी, फ्लॉवर आणि टोमॅटोचे भाव टिकून आहेत. तर, पालेभाज्यांच्या भावात कोणतीही वाढ झालेली नाही. नवरात्रौत्सवात काही भाज्या महाग होण्याची शक्यता आहे.

‘देऊळ’गेले अबुधाबीत, देव प्रकटला हिव-यात

$
0
0
एकीकडे देवाच्या नावाने श्रद्धेचा बाजार मांडण्याच्या मानसिकतेवर प्रहार करणारा ‘देऊळ’ चित्रपट अबुधाबी फिल्म फेस्टीवलसाठी गेला असताना, दुसरीकडे जुन्नरमधील हिव-यात मात्र दृष्टांतामुळे शिवलिंग प्रकट झाल्याच्या बातमी पसरून श्रद्धेचे भांडवल करत आहेत. त्यासाठी त्यांनी या परिसरातील झाडे तोडून चारचाकी वाहने येतील असा रस्ता तयार करण्याचे उद्योगही सुरू केले आहेत.

शहराच्या पाण्याचा वाद राज्य सरकारच्या कोर्टात

$
0
0
पुणे शहराला पिण्यासाठी जादा पाणी देण्याचा निर्णय आता राज्य सरकारच्या कोर्टात ढकलण्यात आला आहे. महापालिकेच्या मागणीनुसार शहराला पिण्यासाठी १५ टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव जलसंपदा खाते सरकारकडे पाठविणार असून, त्यासाठी शेतीचे पाणी कमी करावे लागणार असल्याची वस्तुस्थिती मांडण्यात येणार आहे.

गुरुवारी पूर्व भागात पाणी नाही

$
0
0
ठाकरसी टाकीच्या व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम असल्याने येत्या गुरुवारी काही भागात पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.

पेट्रोल पंप १ शिफ्टला शहरात थंड प्रतिसाद

$
0
0
पेट्रोल डिझेलच्या कमिशनमध्ये वाढ करण्यासाठी दिवसातील केवळ आठ तास पेट्रोल पंप सुरू ठेवण्याच्या ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोल डिझेल असोसिएशन’ भूमिकेला मुंबई, गुजरात सह केरळमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मात्र, शहरात या संघटनेचे प्रतिनिधी नसल्याने शहरातील पेट्रोल पंपावर याचा कोणताही परिणाम झाला नाही.

नवरात्रोत्सवासाठी PMP च्या जादा गाड्या

$
0
0
नवरात्र उत्सवानिमित्त १६ ते २४ ऑक्टोबर दरम्यान चतुःश्रृंगी, तळजाई, सच्चाईमाता याठिकाणी जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. मंडई ते चतुःश्रृंगी, मंडई ते तळजाईमाता मंदिर याठिकाणी सोडण्यात येणा-या जादा बसची सेवा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images