Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चांदणी चौकाजवळ अपघात, ३ जणांचा मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुणे-बेंगळुरू महामार्गावरील चांदनी चौक ते डुक्कर खिंडीच्यामध्ये कात्रज देहूरोड बायपासवर रविवारी सकाळी एका बसने दुचाकीला उडवले. या अपघातात तीन जण ठार तर एक जण जखमी आहे.

कोल्हापूरहून मुंबईकडे भरधाव वेगाने जात असलेली खासगी बस डिव्हायडर तोडून बाजूच्या रस्त्यावर असलेल्या दुचाकींना धडकली. रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास चांदणी चौक व डुक्कर खिंड दरम्यान हा अपघात झाला. वेगात असल्याने धडक बसल्यावर बस पलटी झाली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात एक जण गंभीर जखमी असून, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या मार्गावरील वाहने हटविण्यात आली असून, वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लुटारू महिलांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पीएमपी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवशांना लुटणाऱ्या दोन महिलांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दोन महिला पळून जाण्यात यशस्वी झाल्या असून, या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नागरिकांनी पकडलेल्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. ज्योती मंजुनाथ काडमाची (वय ३०, रा. ठाणे), लक्ष्मी रमेश काडमाची (वय ३५, रा. ठाणे) अशी अटक केलेल्या दोघींची नावे आहेत. या प्रकरणी धोंडिबा सुरवसे (वय ३०, रा. रायकर चाळ, वाकड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोंडिबा सुरवसे हे डॉ. नंदकिशोर सोमवंशी यांच्याकडे कामाला आहेत. ते १४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास वाकड बसस्टॉप येथे पीएमपीमध्ये बसले.

निगडी-कात्रज बसने प्रवास करताना दोन महिलांनी सुरवसे यांच्याकडील १० हजार रुपये, सोमवंशी यांच्याकडील ५ हजार रुपये चोरून ते त्यांच्या दोन महिला साथीदारांकडे दिले. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या मदतीने दोन महिलांना पकडले. मात्र, पैसे घेतलेल्या दोन महिला पळून गेल्या. नागरिकांनी घटनेची माहिती हिंजवडी पोलिसांना दिली. त्यांनी ज्योती आणि लक्ष्मी यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या दोन साथीदार महिलांना अटक करायची आहे; तसेच त्यांनी अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील ए. के. पाचरणे यांनी त्यांना पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. कोर्टाने त्यांना १७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा विमानतळाला विरोध

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर

खेड तालुक्यात प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प जागेची नुकतीच प्रत्यक्ष पाहणी करण्यात आल्यामुळे या भागातील शेतकरी पुन्हा एकदा अस्वस्थ झाले असून ते संघर्षाच्या पवित्र्यात आहेत.

यापूर्वी २०१२ मध्ये नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विरोध होऊ नये, म्हणून या जागेची हवाई पाहणी केली होती. दरम्यान शासनाने कितीही दबाव आणला तरी कोणत्याही परिस्थितीत विमानतळाला एक इंचही जागा देणार नाही, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. शेती व शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा हा प्रकल्प दडपशाहीने आमच्यावर लादू नका. कारण हा राक्षसी प्रकल्प आम्हाला नको आहे, अशी मागणी प्रस्तावित गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.

पाईट-कोये-रौंधळवाडी-धामणे-आसखेड या गावांच्या हद्दीतील जागा सपाट व सलग असून, ही जागा या प्रकल्पास योग्य असल्यामुळे हीच जागा या प्रकल्पासाठी जवळपास निश्चित करण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या विमानतळाला विरोध म्हणून संबंधित गावांतील शेतकऱ्यांनी सह्यांची जोरदार मोहीम राबवून अडीच हजार सह्यांचे निवेदन तयार केले आहे. त्याची प्रत मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना देऊन ते आपला निषेध व्यक्त करणार आहेत.

दुसरीकडे ज्या ठिकाणी हा विमानतळ प्रस्तावित करण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी यापूर्वीच काही बडे राजकारणी व उद्योजकांनी अतिशय कमी किमतीत मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे संबंधित जमिनी संपादन करताना फारशी अडचण येणार नाही, अशीही चर्चा ऐकू येते. लोहगाव येथील हवाई खात्याच्या विमानतळाचा नागरी विमान वाहतुकीच्या वापरास मर्यादा येत असल्यामुळे पुणे शहराला स्वतंत्र विमानतळ असावा, या हेतूने शहराच्या आजूबाजूच्या तालुक्यातील काही जागांचा शोध घेण्यात आला होता.

नुकसान

सध्या पाईट-कोयेची जी जागा विमानतळास प्रस्तावित केली जात आहे, ती जागा भामा नदी आणि भामा आसखेड धरणाच्या खेटूनच आहे. त्यामुळे पाण्याची मुबलकता असल्यामुळे कोये-धामणे-आसखेड तसेच पाईटच्या पापळवाडी, गवारवाडी, लोढुंगवाडी मधील बहुतांश शेतकऱ्यांनी कोट्यावधी रुपये खर्चून थेट नदी व धरणावरून उपसा सिंचन योजना राबविल्यामुळे या गावांतील मोठ्या प्रमाणात जमिनी बागायती झालेल्या आहेत.

रखडलेले पुनर्वसन

भामा आसखेड धरणासाठी पापळवाडी, गवारवाडी, लोढुंगवाडी मधील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या होत्या. अनेक वर्षानंतरही या वाड्यांतील धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडलेले आहे. अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही. पर्यायी जमिनींसाठी या धरणग्रस्तांनी अनेकवेळा हेलपाटे घालून शासनाचे उंबरठे झिजविले. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी साहित्य संमेलनाला येणार सुषमा स्वराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा राजकीय नेत्यांच्या सोयीनुसारच जुळवण्यात येत आहेत. केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज संमेलनाच्या उद्घाटनाला येणार असून, १६ ते १८ जानेवारी या तारखा जवळपास निश्चित झाल्या आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी या संस्थेकडे पिंपरी-चिंचवड येथील साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर डॉ. श्रीपाल सबनीस यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाली. तरीही साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या सोयीनुसारच संमेलनाच्या तारखांची जुळवाजुळव करण्यात येत आहे का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

'केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास मान्यता दिली आहे. संमेलनासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे; तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे,' असे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी स्पष्ट केले. साहित्य महामंडळाकडून संमेलनाच्या तारखा आणि कार्यक्रमाची अंतिम रुपरेषा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

असहिष्णुतेवर काय बोलणार?

असहिष्णुतेच्या मुद्द्यावर बऱ्याच साहित्यिकांनी पुरस्कार परत केले होते. मात्र, त्याबाबत सरकारने काहीच भूमिका स्पष्ट केली नाही. आता साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येत असलेल्या सुषमा स्वराज सरकारच्या वतीने असहिष्णुतेच्या मुद्द्यावर काही बोलणार का, याचीच उत्सुकता निर्माण होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंडसाठी पाणी सोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, दौंड शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी खडकवासला धरणातून रविवारी पाणी सोडण्यात आले. दुपारपासून बाराशे क्युसेक इतक्या वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून, येत्या सहा दिवसांत कॅनॉलमधून अर्धा टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.

उद्यापर्यंत (मंगळवार) हे पाणी दौंडमध्ये पोहोचणार आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही. सध्याचे पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवून वापरण्याचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे पुण्यात दिवसाआड पाणी पुरवले जात असून, शेतीला पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे; मात्र पिण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. दौंडला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावामध्ये फक्त ५५ ते ६० एमएलडी इतकेच पाणी शिल्लक होते. त्यामुळे दौंडमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर दौंडसाठी तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून कॅनॉलमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. पाटस, केडगाव, कळस, अकोले या मार्गाने उद्यापर्यंत हे पाणी दौंडच्या तलावात पोहोचणार आहे.

दौंडमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करण्याची वेळ आली आहे. शहराबाहेरून काही किलोमीटर अंतरावरून दुचाकी, मोटारींमधून पाणी आणावे लागत आहे. कॅनॉलमधील पाणी तलावात पोहोचल्यानंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यासाठी पाणी सोडण्याची मागणी दौंडच्या नागरिकांकडून सातत्याने पालकमंत्री गिरीश बापट आणि जिल्हाधिकारी सौरव राव यांच्याकडे करण्यात येत होती. दरम्यान, दौंड नगर परिषदेच्या मागणीनंतर सर्व संबंधित विभागांशी चर्चा करून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी. बी. लोहार यांनी दिली. विशेषत: उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, पाण्याचा वापर जपून वापर करावा, असे आवाहन विविध यंत्रणांमार्फत करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओचे काम,अन् दीड महिना थांब

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे चारचाकी व दुचाकीच्या लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी फॉर्म व त्यासाठीचे शुल्क भरून साडेतीन महिने उटल्यानंतरही संबंधित व्यक्तीला लायसन्स मिळालेले नाही. तसेच, त्याच व्यक्तीचे नवीन दुचाकीच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची सर्व प्रक्रिया दीड महिन्यांपूर्वी करून, ते देखील अद्याप मिळालेले नाही. राज्य सरकारने सेवा हमी कायदा लागू केला आहे. मात्र, या कायद्यातील तरतुदींच्या अगदी उलट कारभार 'आरटीओ'मध्ये सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.

'आरटीओ'मध्ये चारचाकी व दुचाकी लायसन्सचे नूतनीकरण केल्यानंतर अर्जदारास नवीन लायसन्स मिळण्यासाठी सात ते १५ दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, पुण्यातील हनुमाननगर येथे राहणाऱ्या योगेश चितळे यांना 'आरटीओ'च्या कारभाराचा फटका बसला आहे. चितळे यांनी तीन ऑगस्ट २०१५रोजी 'आरटीओ'कडे लायसन्स नूतनीकरणासाठी अर्ज केला होता, तसेच त्याचे शुल्कही जमा केले होते. मात्र, आजतागायत त्यांना लायसन्स मिळालेले नसल्याची माहिती त्यांनी 'मटा'ला दिली.

सात ते पंधरा दिवसात लायसन्स घरपोच मिळणे अपेक्षित असल्याने त्यांनी काही दिवस प्रतीक्षा केली. मात्र, १५ दिवसांनंतरही लायसन्स न आल्याने त्यांनी 'आरटीओ' व जनरल पोस्ट ऑफिसकडे (जीपीओ) चौकशी केली. त्यावेळी 'जीपीओ'तील कर्मचाऱ्यांनी त्यांना, 'आरटीओ'कडून पोस्टाचे बारकोड आणा, त्यानंतर लायसन्स देतो,' असे सांगितले. लायसन्स घरपोच पाठविले जाते, त्यासाठी 'आरटीओ' नागरिकांकडून ५० रुपये वसूल करते. त्यानंतरही नागरिकांना 'जीपीओ'त फेऱ्या का माराव्या लागतात,' असा प्रश्न चितळे यांनी उपस्थित केला. दरम्यान, याबाबत आरटीओच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यूमोनियाचे प्रमाण घटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाइप बी'' या जंतूपासून दोन वर्षाखालील बालकांना होणाऱ्या न्यूमोनियासह मेंदूला सूज येण्याचे पुण्यासह राज्यातील बालकांमधील प्रमाण ९० टक्क्यांनी घटणार आहे. 'पँटावेलंट' लस देण्यास प्रारंभ झाल्याने आता त्यातील एक भाग असलेल्या 'हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाइप बी' या लसीमुळे न्यूमोनियाचे प्रमाण घटण्यास मदत होणार आहे.

'हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाइप बी' (हिप) या जंतूपासून दोन वर्षाखालील बालकांना न्यूमोनियासह मेंदूला सूज येण्याचा आजार होतो. पाच वर्षाखालील बालकांमध्ये 'स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया' नावाच्या जंतूमुळे न्यूमोनिया होतो. पाच वर्षाखालील बालकांसह साठीच्या पुढील वृद्धांमध्ये रोग प्रतिकारकशक्ती कमी असल्याने न्यूमोनिया होतो. न्यूमोनियाचा आजार जीवाणू, तसेच विषाणूंमुळेदेखील होते. दोन वर्षाखालील बालकांमध्ये 'हिप'चा संसर्ग हा न्यूमोनिया तसेच मेंदूला सूज होण्याचा आजार होण्यास २५ टक्के कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे 'पँटावेलंट' या लसीकरणात 'हिप' या लशीचा समावेश केल्याने पुण्यासह राज्यातील दोन वर्षाखालील बालकांमध्ये जंतूमुळे होणारा न्यूमोनिया एका वर्षात ९० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे,' अशी माहिती भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय ललवाणी यांनी 'मटा'ला दिली.
पुण्यासह राज्यात गोवरची लस देण्याचे प्रमाण ७० ते ८० टक्के आहे. ३० टक्के बालकांना गोवरची लस मिळत नाही. न्यूमोनिया होण्याचे हे एक कारण समजले जाते. त्यासाठी सर्वेक्षण व्हायला हवे. देशात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, ओरिसा, मध्य प्रदेशात न्यूमोनियाचे प्रमाण अधिक आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

'जगात न्यूमोनियाने सर्वाधिक रुग्ण दगावणाऱ्या देशात भारताचा क्रमांक लागतो. २०१५मध्ये जगात ५९ लाख बालकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी सुमारे १२ लाख मृत्यू भारतात झाले आहेत. न्यूमोनिया हा श्वसन तसेच फुफ्फुसाच्या संसर्गाशी संबंधित आजार आहे. हॉस्पिटलमध्ये १५ टक्के न्यूमोनियाचे पेशंट उपचारासाठी दाखल होतात. स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील न्यूमोनियाचे प्रमाण कळण्यासाठी देशव्यापी सर्वेक्षणाची गरज आहे, असे इंडियन अॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे यांनी सांगितले.

न्यूमोनियाची लक्षणे

'स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया' जीवाणूमुळे रक्तसंसर्ग, सेप्सिस, कानामधील संसर्ग किंवा जीवाणूजन्य मेंदूताप, खोकला, छातीत वेदना, घाम येणे, दम लागणे, श्वास घेण्यास अडथळा येणे ही लक्षणे आढळून येतात.

न्यूमोनिया टाळण्यसाठी

- जन्मावेळी बाळाचे वजन तीन किलो असावे

- बाळाला सातत्याने आईचे दूध द्यावे

- बाळाचे वजन तीन-चार वर्षात समाधानकारक असावे

- पिण्याचे पाणी, शौचालय चांगले असावे

- बाळाला प्रदूषणणुक्त जागेत ठेवावे

- पालकांनी हात स्वच्छ धुतल्यास बाळांना न्यूमोनिया होण्याचे प्रमाण घटू शकते

- लसीकरण करणे आवश्यक

न्यूमोनियाच्या आजारावरील लसीमध्ये भविष्यात कोणते बदल करावेत, तसेच डॉक्टरांसह समाजात जनजागृती, तसेच संशोधन आणि धोरण निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय सर्वेक्षणाची गरज आहे. - डॉ. आनंद देशपांडे, बालरोग तज्ज्ञ व अध्यक्ष आयएपी पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोरघाटात बस उलटली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर अष्टविनायक यात्रेतील एका खासगी मिनीआराम बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस उलटून झालेल्या अपघातात आठ प्रवासी गंभीर जखमी, तर सात जण किरकोळ जखमी झाले. रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान खंडाळा (बोरघाट) घाटातील अंडाकृती पुलावरील उतारावर हा अपघात झाला.

अनिल दिवालकर (वय २२), प्रसन्न राजाराम दिवालकर (वय ४५, दोघेही रा. चिपळूण), प्राची मानगावकर (वय ३५, रा. चिंचवड), अंजली विजय निसळ (वय ३२), विद्या विजय निसळ (दोघीही रा. पिंपरी), सुधा रामचंद्र कांबळे (रा. काळेवाडी, पिंपरी), मेहबूब मझहर मुजावर (चिंचवड), रामदास कांबळे (रा. काळेवाडी, पिंपरी) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहे. या अपघातात इतर सात जण किरकोळ जखमी झाले.

विनय निसळ, योगेश निसळ, मृदुला निसळ, ओंकार निसळ, पूजा निसळ, शंकर सराफ, प्रशांत बिलवडकर, अनिल बिलवडकर (सर्व रा. चिंचवड) यांचाही जखमींमध्ये समावेश आहे. बसमध्ये एकूण २२ प्रवासी होते. बस चालक दत्तात्रय भीमराव करंडे (रा. कात्रज, पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी ट्रॅव्हल्सची मिनीआराम बस (एमएच १४ सीडब्ल्यू ८३९९) ही प्रवाशांना घेऊन पुण्याहून मुंबईच्या दिशेने चालली होती. खंडाळा (बोरघाट) येथील अंडाकृती पुलाजवळील तीव्र उतारावर बसचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस मार्गावर उलटून पुन्हा सरळ झाली. या अपघातात बसमधील सात प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर निगडीतील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती समजताच बोरघाट (दस्तुरी) महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक टी. जी. जोशी व खंडाळा महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक मोहन चाळके, तानाजी आगलावे, पी. डी. बोंबे, व्ही. पी. काटे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. आयआरबी व डेल्टाफोर्सच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढले. या घटनेचा तपास खोपोली पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दत्तमंदिराचे सुवर्णलेपन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या गाभाऱ्याच्या ​शिखराला चे शिखर चांदीच्या नक्षीदार पत्र्याने मढवून सुवर्णलेपन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दत्तजयंती म्हणजेच २४ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होणार असून या कळसावर भाविकांना आठ दिशांचे अधिपती असलेल्या अष्टदिग्पालांच्या मूर्ती बघायला मिळणार आहेत.

मंडळांच्या विश्वस्तांनी गेल्या वर्षीच्या अक्षय तृतीयेला मंदिराच्या कळसाच्या सुवर्णलेपन करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार भाविकांनी दिलेल्या देणगीच्या माध्यमातून कळसाच्या सुवर्णलेपनाचे काम प्रगतिपथावर आहे. आठ दिशांचे अधिपती असलेल्या अष्टदिग्पालांच्या मूर्ती कळसावरील चांदीच्या पत्र्यामध्ये साकारण्यात येत असून, सुवर्णलेपनही करण्यात येणार आहे.

मंदिराला ११८ वर्षांची परंपरा लाभली असून, या वैभवशाली उपक्रमाची सुरुवात अक्षयतृतीयेला झाली. त्यामुळे येत्या अक्षयतृतीयेला त्याचे औपचारिक उदघाटन होणार आहे. या संकल्पपूर्तीसाठी ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त शिरीष मोहिते यांसह विविध पदाधिकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला.

उपक्रमासाठी सुमारे दीडशे किलो चांदी आणि एक किलो सोन्याचा वापर होणार आहे. रौप्यमंडित शिखर आणि कळसाला सुवर्णलेपनाचे काम पुण्यातील पु.ना.गाडगीळ आणि सन्स यांच्या मार्फत तज्ज्ञ आणि कारागिरांच्या सहभागातून विनामूल्य करण्यात येत आहे. भाविकांकडून आलेल्या देणगीतून हे काम सुरू आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष गाडवे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिनीबसने चौघांना चिरडले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर डुक्कर खिंडीजवळ साताऱ्याच्या दिशेने चाललेल्या मिनीबसच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गंभीर अपघात झाला. मिनीबस डिव्हायडर तोडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर गेली आणि दोन दुचाकींवरील चौघांना चिरडले. ही घटना रविवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.

सारंग तानाजी काळे (वय २२, रा. कात्रज), विनोद कुबेर भारती (वय ३५, रा. पाषाण) आणि शंकर तानाजी दिडकर (वय ३५), चंद्रकांत बाळासाहेब जाधव (वय २२ दोघे रा. इचलकरंजी, कोल्हापूर) ही ठार झालेल्यांची नावे आहेत. शिंदे हा इंगवले ट्रान्सपोर्टच्या मिनीबसवर ड्रायव्हर आहे. काळे, दीडकर व जाधव हे एकाच दुचाकीवरून निघाले होते आणि भारती एकटेच होते. अपघातस्थळावरून पळून गेलेला बसचालक सहदेव ज्ञानोबा शिंदे

(वय ३०, रा. कारगिल सोसायटी, वारजे) हा वारजे पोलिस ठाण्यात हजर झाला होता. वारजे पोलिसांनी त्याला अटक केली.

बसचालक शिंदे याने वारजे, उत्तमनगर परिसरातील कामगारांना पहाटेच्या सुमारास पिंरगुट येथील कंपनीत सोडले आणि त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास तो चांदणी चौकातून वारज्याला परतत होता. या वेळी डुक्कर खिंडीजवळील वळणावर त्याचा ताबा सुटला आणि तो मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर गेला. त्यामुळे तेथून जाणाऱ्या दोन दुचाकी बसखाली चिरडल्या गेल्या. चौघांपैकी तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता आणि एका जखमीला वारजे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांच्या खिशात सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधला, अशी माहिती सहायक फौजदार धोंडीराम चव्हाण यांनी दिली.

अपघातानंतर बाह्यवळण मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. काही वेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच डेक्कन विभागाचे सहायक पोलिस आयुक्त तुकाराम गौड, वारजे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक अनुजा देशमाने, गुन्हे शाखेचे निरीक्षक कल्लप्पा पुजारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्विटरवर अपरिचित मराठी शब्दात टिवटिव

$
0
0

Chinmay.Patankar@timesgroup.com

पुणे - घोणशा, रिघाव, निष्णा या शब्दांचा अर्थ माहीत आहे का? आताच्या काळात अपरिचित झालेल्या अशा अनेक शब्दांची ट्विटरवर टिवटिव होत आहे. वापरात नसलेले मराठी शब्द पुन्हा वापरात येण्यासाठी या हँडलच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. स्वप्नील शिंगोटे या इंजिनीअर तरुणाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सोशल मीडियात मराठी भाषेचा फारसा वापर होत नसल्याची बातमी स्वप्नीलच्या वाचनात आली होती. त्यामुळे मराठीचा वापर वाढवण्यासाठी त्याने सुरुवातीला काही जुने मराठी शब्द व्हॉट्पअॅपच्या माध्यमातून वापरण्यास सुरुवात केली. मित्रमंडळींकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्याने 'आजचा शब्द' हे ट्विटर हँडल सुरू केले. गेल्या वर्षभरात त्याला साडेतीन हजारांहून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. वापरात नसलेला एक शब्द रोज या हँडलवर त्याच्या अर्थासह पोस्ट केला जातो. आतापर्यंत घोणशा (सुस्त, आळशी), मेधावी (कुशाग्र बुद्धिमत्तेचा), विहनन (हत्या), रिघाव (शिरकाव, प्रवेश, वाट), निष्पादित (निर्माण केलेले), निष्णा (धार लावण्याचा दगड), गिरिकंदर (गुहा, कपार) असे कित्येक शब्द आणि त्याचे अर्थ या हँडलवरून देण्यात आले आहेत.

'आजचा शब्द' या हँडलविषयी स्वप्नीलने 'मटा'ला माहिती दिली. 'अत्यंत अर्थपूर्ण असे कित्येक शब्द आज वापरात नाही. भाषेची शब्दसंपत्ती कायम ठेवण्यासाठी जुने शब्द वापरात येणे गरजेचे आहे. तेच काम हँडलच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. हँडलवरून देण्यात आलेल्या शब्दांव्यतिरिक्त फॉलोअर्सकडूनही काही शब्दांचे अर्थ विचारण्यात येतात ही सकारात्मक बाब आहे; तसेच इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्दही विचारले जातात. शब्दकोशातून जुने शब्द निवडून अर्थासह हँडलवर दिले जातात. ते रिट्विट होऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते,' असे स्वप्नीलने सांगितले.

केवळ जुने शब्द वापरात आणण्यापुरते मर्यादित न राहता मराठीचा वापर वाढवण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी 'हॅशटॅग हरवलेले शब्द' आणि 'हॅशटॅग नवा शब्द' या मोहिमाही राबवण्यात आल्या. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक शब्द या निमित्ताने पुढे आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोडसेचे उदात्तीकरण करणारे पुस्तक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणाचे कार्यक्रम अजूनही सुरूच आहेत. गोडसेच्या स्मृतिदिनानिमित्त त्याला संत ठरविणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन व मृत्युपत्राचे वाचन रविवारी पुण्यात पार पडले; तसेच तरुणांनी गोडसे यांच्या 'राष्ट्रवादी' विचारांचे अनुकरण करावे, असेही आवाहन या वेळी करण्यात आले.

गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात निर्माण झालेल्या असहिष्णुतेच्या वातावरणात ही घटना वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. गोडसे परिवाराच्या निवासस्थानी 'हुतात्मा पंडित नथुराम गोडसे इच्छापत्र न्यासा'तर्फे आयोजित सुमारे १५० व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास पुण्यासह अन्य राज्यांमधील काहीजणांनी हजेरी लावली. अजिंक्य गोडसे, नाना गोडसे, सात्यकी सावरकर, गजानन नेरकर व हिंदू महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते.

गोडसे याने गांधी हत्येच्या खटल्यात कोर्टात मांडलेल्या बाजूचे अंशतः विवेचन करण्यात आले. त्यानंतर त्याच्या मृत्युपत्राचे वाचन करण्यात आले. 'नथुराम-अ मर्टियर सेंट' या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी झाले. पुस्तकाच्या नावातच गोडसेला संत ठरविण्यात आले आहे. त्यानंतर 'फाळणी आणि नथुराम' या विषयावर कीर्तनकार चारूदत्त आफळे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर संपूर्ण वंदेमातरम आणि अखंड भारताचा संकल्प करण्यात आला.

'नथुराम ही एक अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रवृत्ती आहे. आपण कसाबसारख्या दहशतवाद्यालाही समजून घेतो, तर गोडसे यांचे विचार समजून घेणे आवश्यकच आहे. फाळणीच्या वेळी निर्वासितांचा छळ झाल्याने नथुराम व्यथित झाले होते. त्यांच्या कृतीमागची परिस्थिती समजून घेतली पाहिजे,' असे आफळे म्हणाले.

वेबसाइट - http://www.nathuramgodse.in./

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीचा कडाका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळीचा संपूर्ण आठवडा गुलाबी थंडीचा गेल्यानंतर आता दिवाळीनंतरही थंडीचा कडाका कायम आहे. रविवारी पुन्हा एकदा शहरात १४.३ अंश सेल्सिअस इतके हंगामातील नीचांकी तापमान नोंदले गेले. येता आठवडाही थंडीचा कडाका कायम राहणार आहे. या आठवड्यात किमान तापमान १४ ते १७ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तरेकडील राज्यांमधून वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडी वाढते. गेल्या आठवड्यात उत्तरेकडील काही राज्यात बर्फवृष्टी झाली होती. आता बर्फवृष्टी थांबली असली, तरी तेथील किमान तापमानात घट झाली आहे. तेथून राज्याकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील थंडीचा कडाकाही वाढला आहे.

पुण्यात रविवारी नोंदले गेलेले किमान तापमान (१४.३ अंश सेल्सिअस) हे यंदाच्या हंगामातील सर्वांत नीचांकी तापमान आहे. गेल्या बुधवारीही शहरात १४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. हे तापमान सरासरीपेक्षा एका अंशाने कमी आहे. शहरात दुपारी फारशी थंडी जाणवत नसली, तरी रात्री आणि पहाटे मात्र चांगलीच थंडी जाणवत आहे. त्याचबरोबर बुधवारी शहरात ३२ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. कमाल आणि किमान तापमानात तब्बल सतरा अंशांचा फरक असल्याने शहरात दिवसा व रात्री विषम हवामान अनुभवयास मिळत आहे.

पुण्याबरोबरच राज्यातही थंडीचा कडाका वाढला आहे. रविवारी राज्यातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद नाशिक येथे १३.४, तर नांदेड येथे १३.५ अंश सेल्सिअस झाली. राज्यातही पुढील दोन दिवस थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...आणि लुटमार टळली

$
0
0

Rohit.Athavale @timesgroup.com

पिंपरी : वेळ पहाटे अडीचची... 'एमआयडीसी'मधील टेल्को रस्त्यावर बालाजीनगर झोपडपट्टी येथील पथदिवे जाणीवपूर्वक बंद केलेले... आणि या अंधारात अपघात घडवून आणण्यासाठी ठिकठिकाणी टाकलेले दगड... लूटमार करण्यासाठी केलेला हा उद्योग रविवारी रात्रगस्तीवरील पोलिसांमुळे उघड झाला. दगडांच्या सापळ्यात सावज टिपण्याच्या प्रयत्नातील मुले पोलिसांची गाडी दगड बाजूला करत असल्याचे पाहून अंधारात पसार झाली.

थर्ड शिफ्टवरून घरी जाणाऱ्या कामगारांना अडवून अथवा त्यांच्या वाहनांना अपघात घडवून लूटमारीचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये 'एमआयडीसी'मध्ये घडले आहेत. या पार्श्वभूमीवर 'एमआयडीसी'मधून जाणाऱ्या टेल्को रस्त्यावर पोलिसांनी रात्रगस्त वाढविली आहे. शनिवारी वरिष्ठ निरीक्षक सैफन मुजावर हे उपायुक्त परिमंडळ तीन कार्यक्षेत्रात आणि वरीष्ठ निरीक्षक चंद्रकांत सांगळे पिंपरी सहायक आयुक्त कार्यक्षेत्रात रात्रगस्तीला होते. या वेळी बालाजीनगर झोपडपट्टीसमोर टेल्को रस्त्यावर काही ठराविक अंतरावर पथदिवे नसल्याचे निरीक्षक मुजावर यांच्या लक्षात आले. तसेच रस्त्यावर मोबाइलच्या उजेडात काही मुले संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी त्यादिशेने जीप घेण्यास कर्मचाऱ्यांना सांगितले. पोलिस वाहन येत असल्याचे पाहून आठ-दहा मुले अंधारात पसार झाली. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे दगड पसरवून ठेवल्याचे पोलिसांना आढळले. त्यामुळे मुजावर यांच्यासह कर्मचारी राहुल मिसाळ, संदीप खांबट यांनी काही दगड रस्त्यावरून बाजूला केले; तसेच 'एमआयडीसी' रात्रगस्तीचे कर्मचारी एन. ए. पाटील, ए. डी. सोनवणे यांना बोलावून घेत संपूर्ण रस्त्यावरील दगड बाजूला केले.

या गडबडीत अंधारात लपून बसलेली आठ ते दहा मुले पसार झाली. टेल्को रस्त्यावरून भोसरीकडे जाताना बालाजीनगर झोपडपट्टी समोर तीव्र उतार आणि मग चढण आहे. त्यातच जाणीवपूर्वक येथील पथदिवे घालविल्याने दगडांचा अडथळा करत अपघात घडवून आणले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उद्योगनगरीमध्ये कामगारांना कोणताही त्रास होऊ नये तसेच लुटमारीच्या घटना थोपविण्यासाठी थर्ड शिफ्टवरून रोज किती कर्मचारी घरी परततात त्याची यादी तयार करून त्यावेळी संबंधित भागात रात्रगस्तीसाठी अधिक कुमक तैनात करण्यात येणार असल्याचे उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी सांगितले.

'एमआयडीसी' व भोसरी पोलिस ठाण्याच्या रात्रगस्तीवरील कर्मचारी-अधिकाऱ्यांना सतर्क करत त्यानंतर निरीक्षक मुजावर आणि सांगळे यांच्यासह पथकाने संपूर्ण एमआयडीसी परिसरात चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सांगवी पट्ट्यात परदेशी युवकांमध्ये हाणामारी चालू असल्याचा कॉल नियंत्रण कक्षावरून आल्याने रात्रगस्तवरील अधिकारी मजुवार यांनी तिकडे धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजीकालीन पत्रांचे पुस्तक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

छत्रपती संभाजी महाराजांच्या राजवटीतील अस्सल कागदपत्रे इतिहास अभ्यासकांसाठी पुस्तकरुपाने उपलब्ध झाली आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळाने 'संभाजीकालीन पत्रसारसंग्रह' हा ग्रंथ ६६ वर्षांनी पुनर्मद्रित केला आहे.

भारत इतिहास संशोधक मंडळाने १९४९मध्ये हा ग्रंथ प्रकाशित केला. शंकर नारायण जोशी यांनी त्याचे संपादन केले होते. मात्र, गेली काही वर्षे हा ग्रंथ अनुपलब्ध होता. इतिहास अभ्यासकांकडून वारंवार या ग्रंथाची मागणी होत असल्याने मंडळाने पुन्हा हा ग्रंथ उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या पवार चॅरिटेबल ट्रस्टने या कामी आर्थिक सहकार्य केले. संभाजीकालीन पत्रसारसंग्रहाचा दुसरा खंडही तयार करण्यात येत आहे, अशी माहिती अपरांत प्रकाशनचे पराग पुरंदरे यांनी दिली.

संभाजी महाराजांच्या कारकीर्दीची माहिती एकत्रितपणे उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या चरित्राचे तपशील मिळवण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न या पत्रसारसंग्रहाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. संग्रहात संभाजीकालीन व्याजाचा दर, जकात, प्रायश्चित्त, कपडे, नाणी, शस्त्रे, लूट, वाटण्या, न्यायनिवाडे, वसुली, जमीनमोजणी अशा लोकव्यवहाराचा समावेश आहे. पत्रांच्या शकावलीही सविस्तरपणे देण्यात आल्या आहेत.

शिवचरित्र साहित्याचा १६वा खंड

संभाजीकालीन पत्रसारसंग्रहाप्रमाणेच शिवचरित्र साहित्य या ग्रंथाचा १६वा खंडही प्रकाशित करण्यात आला आहे. डॉ. अनुराधा पटवर्धन व अजित पटवर्धन यांनी या खंडाचे संपादन केले आहे. यापूर्वीही शिवकालीन पत्रे पुस्तकरुपाने प्रकाशित झाली आहेत. मात्र, या ग्रंथामुळे अजून काही कागदपत्रे समोर आली आहेत. ग्रंथातील सहा प्रकरणांमध्ये मिळून १२६ लेखांचा समावेश आहे. त्यात एक निजामाचे, दोन अंबर मलिकची, दोन शहाजी महाराजांची, दहा शिवाजी महाराजांची, एक संभाजी महाराजांचे आणि सोळा राजाराम महाराजांची पत्रे आहेत. इतिहासकालीन कागदपत्रांतील रोजनामे या प्रकाराकडे या ग्रंथातून लक्ष वेधण्यात आले आहे.

विद्वान इतिहास संशोधक शंकर नारायण जोशी यांनी संपादित केलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रामुळे अभ्यासकांची चांगली सोय झाली आहे. नव्या पिढीच्या अभ्यासकांसाठी हा ग्रंथ नक्कीच उपयुक्त ठरेल. - गजानन मेहेंदळे, इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बारामतीत नागरी सुविधांची वानवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

'बारामतीसारखी आणखी १०० विकासकेंद्रे जर देशात बनली तर देश सर्वोत्तम बनेल. इथे आल्याने मला शिकायला मिळाले. तीव्र पाणी टंचाईचा सामना करणारा हा भाग देशातील सर्वांत विकसित भाग झाला आहे, हे चित्र आशादायी आहे,' असे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बारामतीला भेट दिल्यानंतर केले होते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. नागरिकांना मूलभूत नागरी सुविधांसाठीही झगडावे लागते आहे. ग्रामीण भागात पाणी व चाऱ्यासाठी भटकंती सुरूच आहे. अशा प्रकारचे आदर्श मॉडेल देशासाठी सर्वोत्तम ठरेल का? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

शहरी आणि ग्रामीण भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावते आहे. अनेक पाणीपुरवठा योजना बंदच आहेत. चाऱ्याविना जनावरांचे हाल होत आहेत. बारामती नगर पालिकेच्या व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियोजनाअभावी साठवण तलाव अपूर्ण राहिला असल्याने पाण्यासाठी वणवण होते आहे. शहरातील अनेक प्रभागात कचऱ्याचे साम्राज्य असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये नागरिकांना वैद्यकीय सेवा नीट मिळत नाहीत. त्याबाबत विचारणा केली असता, नीट उत्तरे मिळत नाहीत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रेही अजिबात नीट काम करत नसलेली दिसून आली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या वेळी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली. मात्र, ती अद्यापही कार्यन्वित झालेली नाही. रस्त्यावरती पार्किंगची सुविधा नसल्याने वारंवार वाहतूक कोंडींचा सामना करावा लागतो. शहरातील सांडपाणी विनाप्रक्रियाच कऱ्हेत सोडण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते आहे. या समस्यांचे निराकरण होत नाही, तोवर बारामती आदर्श कशी होणार? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्य घ्या, पण शुद्ध घ्या...!

$
0
0

Mustafa.Attar@timesgroup.com । पुणे

खव्यापासून ते दुधापर्यंत, मिठाईपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत, कपड्यांपासून ते घरासह दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अथवा गरजेच्या प्रत्येक वस्तू खरेदी करताना गुणवत्तेचा आग्रह धरला जातो. पण आता व्हिस्की, रम, व्होडका, ब्रॅन्डी अशा दारूच्या प्रकारांमध्ये शिसे, पारा (मर्क्युरी), तांबे, अर्सेनिक कॅडमियम, इथिल अल्कोहोल, मिथाइल अल्कोहोल या आरोग्यास घातक घटकांच्या वापराकडे 'एफडीए'ने मोहरा वळविला आहे. केंद्र सरकारने तयार केलेले दारूच्या गुणवत्तेचे निकष पाळणे उत्पादकांना बंधनकारक ठरणार आहेत.

केंद्र सरकारच्या 'फूड सेफ्टी स्टँडर्ड अॅथॉरिटी ऑफ इंडिया' (एफएसएसएआय) अर्थात अन्न सुरक्षा कायद्यातील नव्या तरतुदींमुळे अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) दारूच्या उत्पादनावर करडी नजर राहणार आहे. मद्याचा पूर्वी अल्होकोल प्रकारात समावेश होता. अन्नपदार्थात त्याचा समावेश नव्हता. त्या वेळी अन्न भेसळ प्रतिबंधक १९५४ कायद्यांतर्गत दारूवर नियंत्रण ठेवले जात होते. परंतु, त्या कायद्यात मर्यादा असल्याने उत्पादन व विक्रीव्यवस्थेवर फारशी कारवाई करता येत नसे. दारूमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण किती असावे, हे निश्चित नव्हते. त्यामुळे विविध उत्पादनांमधील या घटकांचे प्रमाण कमीजास्त होते.

देशात अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यामुळे अन्नपदार्थाच्या व्याख्येत बीअर, वाईन, व्होडका, रम, व्हिस्की, जीन, ब्रॅन्डी यांचाही समावेश झाला. त्यामुळे दारुच्या निर्मितीत या घटकांचे प्रमाण निश्चित केले आहे. या प्रस्तावावर ३० डिसेंबरपर्यंत हरकती, सूचना मागविण्यात आल्या आहेत.

दारूमध्ये अर्सेनिक, शिश्याचा वापर

वाइन, जीन, बिअर्स, व्हिस्कीसारख्या दारुमध्ये अर्सेनिक धातू, इथिल अल्कोहोल, शिसे, पारा, कॅडमिअम, तांबे, मिथील अल्कोहोल, व्होटाइल अॅसिडसारख्या घटकांचे प्रमाण निश्चित झाले आहे. त्याकरिता दारूचे नमुने घेऊन 'एफडीए'चे अधिकारी त्यांचा दर्जा तपासणार आहेत. त्यासाठी दारूविक्रेत्यांपासून ते उत्पादकांपर्यंत सर्वानाच 'एफडीए'चा परवाना घ्यावा लागेल.

कोणत्याही प्रकारची देशी अथवा इंग्रजी दारू, ही वाईटच असते. त्याचा शरीरावर परिणाम होतो. देशी दारूचा थेट, तर इंग्रजी दारूचा हळूहळू परिणाम होतो. दारूने शरीराचे नुकसान होत असते. शरीराची शक्ती संपली तर दारूचे होत असलेले दुष्परिणाम थेट दिसून येतात.' - डॉ. अनिल अवचट, संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र

'आतड्याचा आणि लिव्हरचा कर्करोग दारूमुळे होतो. दारू आणि तंबाखूचे प्रमाण अधिक असेल तर कर्करोग अधिक प्रमाणात वाढतो. दारूमुळे हृदयरोगही होऊ शकतो.' - डॉ. विनोद गोरे, कॅन्सरतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्ले परतवणार क्यूआरटी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

शारीरिक आणि मानसिक क्षमता तपासण्यासाठी दरमहा संवेदनशील ठिकाणी मॉक ड्रिल..., दर पंधरा दिवसांनी नेमबाजीचा सराव... आणि हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी रणनीतीवर डिबेट...

पॅरिसमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या जलद प्रतिसाद दलाने (क्यूआरटी) अशा संभाव्य हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी विविध प्रकारची तयारी केली आहे. 'क्यूआरटी'च्या वतीने इस्रायल लष्कराच्या धर्तीवर 'अर्बन काउंटर टेररिझम'चा सराव नुकताच पूर्ण करण्यात आला. मुंबईतील २६/११ किंवा पंजाबमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारख्या घटना घडल्यास त्यामध्ये प्रतिकारासाठी तयारी असण्याच्या दृष्टीने हा सराव करण्यात आला. शंभराहून अधिक जवान आणि अधिकारी अत्याधुनिक शस्त्रांसह दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी शहरात तैनात करण्यात आले आहेत. पॅरिस येथे झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतरही या कमांडोनी संभाव्य हल्ल्यांचा विचार करून रणनीतीचे मार्ग (टॅक्टिज) आखण्यास सुरुवात केली आहे.

पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी गडचिरोली पोलिस दलात काम केले आहे. त्यांच्याबरोबर काम केलेले अनेक कर्मचारी आणि अधिकारी सध्या 'क्यूआरटी'मध्ये दाखल आहेत. 'क्यूआरटी'चे प्रमुख सहायक निरीक्षक संतोष सुबाळकर मुंबईतील २६/११च्या हल्ल्यात दोन दिवस 'फिल्ड'वर होते. प्रत्यक्ष लढाईचा अनुभव असलेले अधिकारी-कर्मचारी 'क्यूआरटी'मध्ये असल्याने मानसिकरीत्या ही टीम कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला तयार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

शहरामध्ये हल्ला झाला तर कसा होईल, याचा विचार करून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काही 'टॅक्टिज' निश्चित करण्यात आल्या आहेत. इमारती-बंगल्यात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा, रस्त्यांवर-मोकळ्या जागेत दहशतवाद्यांशी दोन हात करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शहरांमध्ये कारवाईसाठी आवश्यक अत्याधुनिक शस्त्रे पुरवण्यात आली आहेत. 'क्यूआरटी'तील कमांडोज मानसिकतेनेही पक्के आहेत. 'कुठलाही हल्ला तितक्याच ताकदीने परतवू,' अशी प्रतिक्रिया सहआयुक्त रामानंद यांनी व्यक्त केली.

हॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्ये लष्कराकडून करण्यात येणारे 'काउंटर अॅटॅक' दाखवण्यात येतात. यातील अनेक अॅटॅक शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्याचे आढळते. हे सीन वारंवार पाहून कमांडोज आपली रणनीती तयार करतात. कमांडोजमध्येही वारंवार याबद्दल चर्चा होते. त्यातून काही चांगल्या 'टॅक्टिज' पुढे आल्या आहेत. त्यांचाही अंतर्भाव प्रशिक्षणात करण्यात येतो.

येथे करण्यात आली मॉक ड्रिल

इस्कॉन मंदिर, चतुःश्रृंगी मंदिर, मॉल्ससह काही संवेदनशील ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात आली आहेत. दर महिन्यातून एकदा तरी मॉक ड्रिल घेण्यात येते. विविध दहशतवादी हल्ल्यांच्या शक्यता गृहीत धरून ते परतवण्यासाठी लागणाऱ्या 'टॅक्टिज'चा सराव या मॉक ड्रिलमध्ये विकरण्यात येतो. इस्रायल लष्कराकडून घेतलेल्या 'अर्बन काउंटर टेररिझम'चाही यात अंतर्भाव करण्यात येतो. मानसिक, तसेच शारीरिक पातळीवर कमांडोज् कोणत्याहीही हल्ल्याला समर्थपणे प्रत्युत्तर देतील, असे रामानंद म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावीचा ऑनलाइन निकाल उद्या जाहीर होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यभरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या (१७ नोव्हेंबर) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थी www.mahresult.nic.in या वेबसाइटवरून निकाल जाणून घेऊ शकतील. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या विषयनिहाय गुणांच्या प्रिंटआउटही घेता येतील.

मंडळाने सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, विद्यार्थ्यांना २० नोव्हेंबरला दुपारी ३ वाजल्यापासून आपापल्या कॉलेजांमधून छापील गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. गुणपडताळणी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यासाठीचे अर्ज संबंधित विभागीय मंडळांकडे सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. हे अर्ज भरण्यासाठी मूळ गुणपत्रिकेची फोटोकॉपी जोडणे सक्तीचे असेल. उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी मिळविण्यासाठी विद्यार्थी ऑनलाइन निकालानंतर आपले अर्ज सादर करू शकतील. अर्जासोबत ऑनलाइन गुणपत्रिका किंवा मूळ गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे सक्तीचे असून, त्यासाठी ७ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाची सुविधाही उपलब्ध असून, त्यासाठी उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी घेणे आवश्यक असेल. फोटोकॉपी मिळाल्यानंतर विद्यार्थी पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. सर्व विषय घेऊन ऑक्टोबरची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेंतर्गत पुन्हा परीक्षा देण्याची संधीही उपलब्ध असल्याचे मंडळाने कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकांचेही कॉलसेंटर सुरू

$
0
0



भाडे नाकारणार नसल्याची शपथ

म. टा. प्रतिनिधी ,येरवडा

'खासगी कंपन्यांमुळे रिक्षा व्यवसाय धोक्यात आल्याने येरवडा आणि परिसरातील रिक्षा चालकांनी सहकारी तत्त्वावर रिक्षाचे कॉल सेंटर सुरू करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे पुढील काळात प्रवाशांचे भाडे नाकारणार नाही, रिक्षाचालकांची प्रतिमा सुधारू, अपघातगस्तांना तत्काळ सेवा देऊ...' अशी शपथ रविवारी दुपारी रिक्षा चालकांनी घेतली. येरवड्यातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात स्मार्ट रिक्षा जनजागृती अभियान अंतर्गत रिक्षा चालक व मालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील रिक्षा चालकांनी आपल्या दैनंदिन व्यथा मांडल्या.

खासगी कंपन्यांमुळे पारंपारिक रिक्षा व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामध्ये रिक्षा चालक जवळील ठिकाणाचे भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, मीटर पेक्षा अधिक भाडे आकारणे आदी कारणांमुळे रिक्षा चालकांची प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये बिघडत चालली आहे. त्यामुळे रिक्षा व्यवसायात टिकण्यासाठी काही बदल करणे आवश्यक असल्याचे मत रिक्षा चालकांनी व्यक्त केले.

चालकांचे वर्तन सुधारण्याबरोबरच भाडे न नाकरणे, रिक्षामध्ये पिण्याचे पाणी, वृत्तपत्र उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रथमोपचार पेटी ठेवण्याचा निर्णय रिक्षाचालकांनी घेतला.

मेळाव्यात मार्गदर्शन करताना रिक्षा एकता संघटनेचे प्रमुख युवराज बनसोडे म्हणाले, 'सहकारी तत्त्वावर रिक्षा चालकांचे स्वत:चे कॉल सेंटर सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये व्यवसायात प्रत्येक रिक्षाचालक हा मालक असणार आहे. सध्या सुरू असलेल्यास स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपणही नवीन कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. कॉलसेंटर ग्राहकाला तत्काळ रिक्षा मिळणार आहे. यासह त्यांना मीटरप्रमाणे भाडे आकारण्यात येईल. त्यामुळे रिक्षाचालकाला दिवसभरात चांगले भाडे मिळण्याची शाश्वती मिळेल.'



रिक्षाचालकांना अर्थसाह्य

'मुद्रा योजनेतून कॉल सेंटर सहकारी रिक्षा सेवा व कॉल सेंटर सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेंतर्गत रिक्षा चालकांना अर्थसाह्य मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी किमान शंभर रिक्षा चालकांना प्रत्येकी पंधरा ते वीस हजार कर्ज दिले, तर सहकारी संस्था अस्तित्वात येऊ शकते. त्यासाठी प्रत्येक रिक्षाचालकाला दरमहा पाचशे ते सहाशे रुपये हप्ता पडू शकतो, त्यामुळे रिक्षाचालक ते सहज परतफेड करून शकतात,' असे युवराज बनसोडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images