Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ट्रान्सपोर्ट वाहनांचे पासिंग देशभरात कोठेही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ट्रान्सपोर्ट वाहनांचे देशभरातील कोणत्याही परिवहन कार्यालयात पासिंग करून घेता येणार आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक परिवहन मंत्रालयाने नुकतेच त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे.

सध्याच्या नियमाप्रमाणे एखाद्या वाहनाची नोंदणी झालेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातच पासिंग करून घ्यावे लागत होते. 'ट्रान्स्पोर्ट'ची वाहने संपूर्ण देशभरात कोठेही फिरतात. या वाहनांचे दर वर्षी पासिंग करावे लागते. प्रवासात असताना त्या वाहनांची मुदत संपल्यास त्यांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. त्यामुळे देशभरातील कोणत्याही आरटीओ कार्यालयात वाहनांना पासिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी 'ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस'ने केली होती, असे संघटनेच्या कार्यकारिणीचे सदस्य बाबा शिंदे यांनी सांगितले.

केंद्रीय परिवहन मंत्रालयाने परिपत्रकावर सूचना व हरकती मागवल्या असून, ३० दिवसांनंतर याबाबतचा अंतिम आदेश काढला जाणार आहे. वाहनचालकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवाळीच्या काळात फायरब्रिगेड दक्ष

$
0
0

Kuldeep.Jadhav@timesgroup.com

आपत्कालीन परिस्थितीत मदतीला धावून जाणे, ही आमची जबाबदारी आहे. दिवाळीच्या काळात फायरब्रिगेडला खूप दक्ष रहावे लागते. त्यामुळे जवानांच्या साप्ताहिक सुट्याही रद्द केल्या जातात. समाजात दिवाळ सणाचे उत्साहाचे वातावरण असते, पण आम्हाला त्याचा यथेच्छ आनंद उपभोगता येत नाही. या काळात हमखास आगीच्या घटनांमध्ये वाढ होते. त्यामुळे आमची दिवाळी म्हणजे आमचे मदतकार्यच, अशी भावना शहर फायरब्रिगेडच्या जवानांची आहे.

सर्व सरकारी कर्मचारी सुट्या काढून दिवाळीला गावी जातात. तर, मूळ पुण्यातील नागरिक असलेले कर्मचारीही सुटी घेऊन घरी थांबणे पसंत करतात. मात्र, आमच्या साप्ताहिक सुट्याही रद्द केल्या जातात. आमचा विभाग हा नागरिकांच्या सेवेसाठी असल्याने या काळात नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर असते. त्यामुळे शहराच्या विविध भागात असलेल्या फायरब्रिगेड केंद्रावर मनुष्यबळाची कमतरता न भासू देणे, हे सर्वांत महत्त्वाचे असते. त्यामुळे कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यावर मर्यादा येत असल्या. तरीही सर्व जवान शरीराने व मनाने कामात गुंतलेले असतात,' अशा प्रतिक्रिया जवानांनी व्यक्त केल्या.

'गेल्या १४ वर्षांच्या नोकरीत एकदाही दिवाळीत किंवा अन्य सणांना सुटी मिळालेली नाही. माझे कुटुंब पुण्यातच राहत असल्याने ड्युटी संपल्यावर कुटुंबीयांसोबत दिवाळ सण साजरा करतो. मात्र, त्यामध्ये अनेकदा कोणती शिफ्ट मिळते, यावर अवलंबून राहावे लागते. तसेच, अनेकदा आगीची घटना घडल्यास वेळेचे बंधन राहत नाही,' असे संजय गायकवाड यांनी सांगितले. तर, चाकणहून पुण्यात येणारे जवान ज्ञानेश्वर गायकवाड म्हणाले, 'गणपती असो किंवा दिवाळी असो सुट्टी नसते. या सर्व सणांचा आनंद आम्ही कामातच अनुभवतो.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांची दिवाळी सुरक्षेच्या बंदोबस्तात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात दिसला की समजावे कुठला न कुठला सण आला आहे... मग त्याला दिवाळीही कशी अपवाद असेल. सर्वसामान्य आपल्या कुटुंबकबिल्यासमवेत सण साजरा करत असतात तेव्हा पोलिस बंदोबस्तात मग्न असतात. न चिडचिडता 'पोलिसमामा' आपले कर्तव्य पार पाडत असतो.

पुणे पोलिस दलात उत्तरकर हे एक कुटुंब आहे. राहुल हा विशेष शाखेत, तर त्याची पत्नी श्रध्दा स्वारगेट पोलिस ठाण्यात आपले कर्तव्य बजावतात. त्यांना दोन चिमुरडी आहेत. राहुलचे आई-वडील गावी असतात. ऐरवी श्रद्धा आपल्या चिमुरड्यांना आपल्या आई-वडिलांच्या घरी ठेवतात आणि ड्युटी बजवत असतात. दोघेही पोलिस असल्याने दिवाळी सणाच्या काळात घरात दिवा लावायलाही कोणी नसते.

याबाबत राहुल म्हणतो, 'दिवाळीला रस्त्यांवर खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडालेली असते. सोन्या-चांदीची दुकाने ओसांडून वाहत असतात. सर्वसामान्य आपल्या कुटुंबींयासमवेत बागडताना दिसतात. सगळीकडे आनंददायी वातारवण असते. रस्त्यांवर गर्दी असल्याने आमची सुट्टी रद्द करण्यात येते आणि बंदोबस्त तैनात असतो. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना तुलनेने पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांपेक्षा जादा काम असते. मात्र, पोलिस हा सर्वसामान्यांच्या आनंदालाच आपला आनंद मानत असतो. पोलिसाला एकवेळ सगळे मिळेल. मात्र कौटुंबिक सुख किती मिळेल, याची शाश्वती नाही.

'सणासुदीच्या काळात बंदोबस्त असला तरी कायदा सुव्यस्थेची स्थिती तणावपूर्वक नसते. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते हीच ती काय जमेची बाजू. 'व्हीआयपी' मुव्हमेंट जरा त्रासदायक असतात. गणपती, ईद, दिवाळी यासारख्या सणांमध्ये आपण सर्वसामान्यांसाठी बंदोबस्त करत असतो, याचे समाधान अधिक असते,' असे राहूल म्हणतो.

काही पोलिस अधिकारी सणांच्या काळात पोलिस कर्मचाऱ्यांना धाडसाने सुट्ट्या देतात. मात्र, सुट्टी मिळाली नाही, तर लक्ष्मीपूजनाच्या काळात खूपच धावपळ होत असते. पोलिसांसाठी सायंकाळ ही त्यांच्यासाठी नाही की काय, अशी म्हणण्यासारखी स्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेशंटना जीवदान देण्याचा आनंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हॉस्पिटलची पायरी कोणी चढू नये असे म्हटले जाते. पण आजारपण कधी कोणाला सांगून येत नसते. त्यामुळेच कधी कोणावर ऑपरेशन करून घेण्याची वेळ येते अथवा कोणाला मृत्युशी झुंज द्यावी लागते. त्यावेळी घरात दसरा, दिवाळी असो की कोणती पार्टी, सगळे बाजूला ठेऊन डॉक्टर, नर्सना हॉस्पिटलचा 'कॉल' अटेंड करावा लागतो...

एक वडील, पती, मुलगा या भूमिकेतून बाजूला राहून केवळ डॉक्टर म्हणून हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये उभे राहावे लागते. ऐन दिवाळीत सोसायट्यांमध्ये भलेही आनंदाचे फटाके फुटत असतील, पण हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांची लढाई सुरू असते आणि बाहेर नातेवाईक चिंतेने ग्रासलेले असतात. पेशंटला जीवदान मिळाल्यावर डॉक्टरांसह नातेवाईकांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने 'दिवाळी' साजरी झाल्याचा आनंद तरळताना पाहायला मिळतो. असेच अनुभव डॉक्टर, नर्सनी 'मट'कडे शेअर केले.

'डॉक्टरकीचे प्रशिक्षण घेताना ३६ तास काम करावे लागते. रात्री अपरात्री सर्जरी देखील कराव्या लागतात. फॅमिलीबरोबर दसरा, दिवाळी किंवा कोणती पार्टी असताना हॉस्पिटलचा 'कॉल' घ्यावा लागतो. आमच्यासाठी दिवाळी असा वेगळा सण ठरत नाही. माझी बायकोसुद्धा डॉक्टर असून तिला प्रोफेशनची माहिती आहे. त्यामुळे फारसा फरक पडत नाही. कधी मी घरी असतो आणि ती हॉस्पिटलमध्ये असते. सण, उत्सव असला, तरी आम्ही पेशंटलाच प्राधान्य देतो. पेशंटचा जीव वाचल्यानंतर त्याच्यासह नातेवाईकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा कोणत्याही सणापेक्षा मोठा ठरतो,' अशा भावना जहांगीर हॉस्पिटलमधील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. संजीव जाधव व्यक्त करतात.

डॉक्टरांपेक्षा हॉस्पिटलमध्ये २४ तास पेशंटवर लक्ष ठेवणाऱ्या अतिदक्षता विभागातील अथवा वॉर्डातील परिचारिकांची भूमिका मोलाची ठरते. सह्याद्री हॉस्पिटलमधील छाया केखलेकर म्हणाल्या, 'डॉक्टरांच्या सूचनेनुसार पेशंटच्या प्रकृतीतील बदल टिपणे महत्त्वाचे असते. त्यावेळी आम्हाला सण, उत्सव आहे म्हणून सुट्टी घेता येत नाही. ड्युटी म्हणजे ड्युटी. परिचारिकेचे प्रशिक्षण घेतो त्यावेळी ही सेवाभावी वृत्ती आमच्यात आलेली असते. परिणामी, आम्ही सर्वच परिचारिका एकावेळी सुट्टीवर जाऊ शकत नाही. आम्हाला घर, कुटुंब, मुले याबरोबर हॉस्पिटलकडे लक्ष द्यावे लागते. कौटुंबिक जबाबदारीबरोबर पेशंट बरा व्हावा यासाठी आमची धडपड सुरू असते. दिवाळी सणामुळे आम्हाला चार दिवस सुट्टीचा आग्रह धरता येत नाही. सुट्टी मिळाली आणि 'कॉल' आला तर धावत पळत हॉस्पिटलला यावेच लागते. शेवटी पेशंटसेवा हेच आमचे व्रत आहे.'

'घरातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असो की घरात कोणी आजारी असले तरीही हॉस्पिटलला पेशंटसाठी जावेच लागते. डॉक्टरांपेक्षा पेशंटची दिवाळी माझ्या दृष्टीने महत्त्वाची वाटते. उपचार करणे आमच्यासाठी सोपे. पण उपचार घेण्यासाठी ऐन दिवाळीत पेशंटला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे लागते हे त्यासाठी किती दुर्देव असते. पेशंट बरा झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला बरे वाटते. त्यातच आमचे समाधान असते. पण समाजाने याची जाणीव ठेवावी,' अशी अपेक्षा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील न्यूरोजसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑनलाइन’च्या जमान्यात चोपड्यांची मागणी घटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इंटरनेट, संगणक युगात 'ऑनलाइन' व्यवहार होत असल्याने पारंपरिक चोपड्या, वह्यांना असलेली मागणी सुमारे २५ टक्क्यांनी घटली आहे. मागणी घटली असली, तरी मुहूर्तावर दोन ते तीन वह्या खरेदी करण्यास व्यापारी आग्रही असल्याने बोहरी व्यापाऱ्यांकडे त्यासाठी 'बुकिंग' करण्यात आले आहे. किरकोळ ग्राहकांकडून चोपड्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.

एखादा व्यापारी चोपड्यांच्या खरेदीसाठी दुकानात आला, तर त्याच्या हातात लाल रंगाच्या कापडी व विशिष्ट पद्धतीच्या दोऱ्यांनी शिवलेल्या चोपड्या, रोजमेळ, खतावणीचे गाठोडे दिले जाते. त्या वेळी चोपड्यांवर लक्ष्मीचे कॅलेंडर, पूजेचे पान ठेवले जाते. त्यावर हळद-कुंकू वाहून त्यांची पूजा केल्यानंतर त्या चोपड्या व्यापाऱ्याकडे देण्याची ही प्रथा आहे. त्या वेळी रविवार पेठेतील कुरबानहुसेन चांदाभाई दुकानाचे मालक तय्यबभाई चोपडावाला 'लखलख लाभो' असे म्हणतात. आजही बोहरा समाजातील चोपड्यांचे व्यापारी ही प्रथा पाळताना दिसत आहेत. चोपड्या घेताना समोरचा व्यापारीदेखील तेवढ्याच आदराने त्यांच्याकडून चोपड्या घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

'दीडशे वर्षांपासून आमचे दुकान चोपड्यांचा व्यवहार करत आहे. आम्ही स्वतःच चोपड्या तयार करतो. रोजमेळ, खतावणी, व्यापाऱ्यांना हव्या तशा स्वरूपातील वह्या तयार करून देतो. आमच्या काही पिढ्या याच व्यवसायात काम करत आहेत. वर्षभरात लागणाऱ्या हिशेबाच्या जमा-खर्चाच्या वह्या एकाच वेळी मुहूर्तावर खरेदी करण्याची प्रथा हिंदू व्यापाऱ्यांमध्ये आहे. हिंदू व्यापारी आला, तर 'लखलख लाभो' आणि मुस्लिम व्यापारी आला, तर 'बिस्मिल्लाहीनिर्रहमानिर्रहीम' असे म्हणून आम्ही चोपड्या देतो. व्यापारी वह्या-चोपड्यांची खरेदी करतात. खरे तर दसऱ्यापासूनच चोपड्या-वह्या खरेदीसाठी 'बुकिंग' सुरू होते,' असे तय्यबभाई सांगत होते.

दसरा, पुष्य नक्षत्र, धनत्रयोदशी, दिवाळी यांसारख्या मुहूर्तावर वह्या खरेदी करून त्यांचे दुकानात पूजन केले जाते. 'ऑनलाइन' व्यवहार होत असले, तरी डायऱ्या चोपड्या, वह्या खरेदीला ग्राहकांची आजही पसंती आहे; मात्र खरेदी २५ टक्क्यांनी घटली आहे, याकडे दाऊदभाई अब्दुलअली दुकानाचे अल्ताफभाई चोपडावाला लक्ष वेधतात. 'सध्या 'ऑनलाइन' व्यवहार केले जातात; मात्र 'ऑनलाइन' व्यवहारामुळे मोठ्या कंपन्यांकडून चोपड्यांची मागणी होत नाही. मार्केट यार्डातील घाऊक, किरकोळ विक्रेते, फर्निचर, पालेभाज्या, फूलविक्रेते, मारवाडी, गुजराती, पूजेकरिता खतावणी खरेदी करतात. परंतु, मोठ्या आकाराच्या अर्थात एक हजार पानांपेक्षा मोठ्या वह्या खरेदी केल्या जात नाहीत. आता केवळ ८०० पानांच्या वह्या खरेदी केल्या जात आहेत,' असेही अल्ताफभाई यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य सरकारवर मेनका गांधी नाराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पशुसंवर्धनाबाबत अन्य राज्यांतून सकारात्मक प्रतिसाद असताना महाराष्ट्र सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करते आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंडळ स्थापन करणे आणि गोशाळा बांधण्याबद्दल वारंवार पाठपुरावा करूनही याची दखल घेण्यात आली नाही, अशा शब्दांत केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी शनिवारी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

'देशभरातील पशुधनाच्या संवर्धनाबद्दल गेल्या काही वर्षांत अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. 'पीपल फॉर अॅनिमल'च्या माध्यमातून आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीमुळे मी या प्राण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते आहे. पण सरकारी पातळीवर याबद्दल निराशा दिसते. केंद्रीय अर्थसंकल्पातील अवघा एक कोटी रुपये देशभरातील प्राण्यांच्या संवर्धनासाठी दिले जातात. वेगवेगेळ्या राज्य सरकारकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे छत्तीसगड, झारखंड, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये काही चांगले उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार या राज्यांनी लहान मोठ्या प्रमाणात अधिकृत गोशाळा देखील बांधल्या असून प्रत्येक गायीमागे ठराविक निधी शेतकऱ्यांना दिला जातो आहे. पण महाराष्ट्राकडून अद्याप मला प्रतिसाद मिळालेला नाही. गोशाळा बांधणे तर दूरच महाराष्ट्र पशूसंवर्धन मंडळ स्थापनेसह टाळाटाळ केली जाते आहे,' असे गांधी यांनी सांगितले.

गायींबरोबरच माणसाच्या आरोग्यास सर्वाधिक घातक ठरलेले ऑक्सिटोसिन हे औषध अनधिकृतरित्या संपूर्ण भारतात विकले जाते आहे. गायी जास्त दूध येण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या औषधामुळे गायीच्या गर्भाशयाची कार्यक्षमता कमी होत असून ते दूध घेऊन आपणला कर्करोगासह अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देत आहोत. चीनमधून बेकायदा येणाऱ्या औषधाची छुपी विक्री थांबवावी, अशी मागणी गेल्या दहा वर्षांपासून मी करते आहे, मात्र आजपर्यंत ठाण्यातील या कंपनीच्या विरोधात करावाई झालेली नाही, असे सांगून महाराष्ट्रातील कामकाजाविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेबिट कार्ड नंबरद्वारे लाखाची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डेबिट कार्डचा नंबर घेऊन ऑनलाइन बँकिंगद्वारे परस्पर एक लाख रुपये काढून एकाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विनय ओमप्रकाश मुंदडा (३३, रा. गुरुवार पेठ) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. त्यांच्या डेबिट कार्डचा क्रमांक अज्ञात व्यक्तीने मिळवला. त्यानंतर त्याने ३० ते ३१ जुलै २०१५ रोजीच्या कालवधीत मध्यरात्री ऑनलाइन बँकिंगद्वारे एक लाख रुपये काढून घेऊन फसवणूक केली. दरम्यान, विनय यांच्या मोबाइलवर पहिल्यांदा दहा हजार रुपये काढल्याचा संदेश आला. त्या प्रमाणे आरोपीने दहा-दहा हजारांच्या टप्प्यात एकूण एक लाख रुपये काढून घेतले असून, याबाबत त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी चौकशी करून शनिवारी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक (गुन्हे) विवेक मुगळीकर अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनाध्यक्षपदाचा अवमान सहन करणार नाही

$
0
0

नवनिर्वाचित साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'प्रत्येक व्यक्ती गुणात कमी-अधिक असू शकते. व्यक्ती म्हणून श्रीपाल सबनीस काही चुकत असल्यास त्याविषयी चर्चा झाली पाहिजे; मात्र संमेलनाध्यक्षपदाचा अवमान खपवून घेणार नाही. संमेलनाध्यक्ष हा मराठी भाषा व संस्कृतीचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे मराठी भाषा व संस्कृतीचा अवमान सहन करण्याचे पाप करणार नाही,' अशी स्पष्ट भूमिका नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी मांडली.

पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते डॉ. सबनीस यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष भालचंद्र शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.

'संमेलनाध्यक्षाचा सन्मान हा एका व्यक्तीचा आहे असे मानत नाही. संस्कृतीच्या संचिताचा सारांश म्हणजे अध्यक्षपद आहे. मला जातीचा, विद्वत्तेचा अहंकार नाही. माझ्यावर कोणताही गुन्हा नाही. मी बदमाशी, लबाडी, नीचपणा व भ्रष्टाचार केलेला नाही हे ११ कोटी जनतेची शपथ घेऊन सांगतो. निवडणुकीच्या कालखंडात पुणेकरांच्या मनात संशय निर्माण करण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली. यापूर्वीचे संमेलनाध्यक्ष निवडणुकीच्या याच प्रक्रियेनुसार निवडून आले आहेत. निवडणूक प्रक्रियेत गौडबंगाल आहे या कारणास्तव विठ्ठल वाघ कोर्टात जाणार असल्यास त्या अर्जावर मी पहिली सही करीन,' असेही सबनीस यांनी सांगितले.

'सबनीस अध्यक्ष झाल्यामुळे संमेलनाच्या भाषणात 'कोटेशन्स'ऐवजी स्वतंत्र विचार ऐकायला मिळतील,' अशी अपेक्षा डॉ. मोरे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हॉस्पिटलमध्ये हवेत सुरक्षारक्षक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

डॉक्‍टरांवरील हल्ले रोखण्यासाठी आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी पोलिस आणि डॉक्टर यांच्यात शनिवारी चंदनगर पोलिस ठाण्यात बैठक झाली. हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि परवानाधारक एजन्सीच्या सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी, अशा सूचना पोलिसांनी डॉक्टरांना दिल्या आहेत. संबंधित हॉस्पिटलच्या हद्दीत गस्तीवर असलेले पोलिस कर्मचारी तत्काळ हॉस्पिटलला भेट देतील, असे आश्‍वासनही पोलिसांनी डॉक्‍टरांना दिले.

राज्यात डॉक्‍टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढत असून, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे आदेश पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सर्व पोलिसांना दिले आहेत. त्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्‍टरांची बैठक घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार खडकी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त स्वप्ना गोरे यांनी शनिवारी चंदननगर, खराडी, वडगावशेरी या भागातील डॉक्‍टरांची बैठक चंदननगर पोलिस ठाण्यात घेतली. या बैठकीला ३२ डॉक्‍टर, पोलिस निरीक्षक अनिल पात्रुडकर आदी उपस्थित होते. या वेळी गोरे यांनी डॉक्‍टरांवरील हल्ले रोखणे आणि हॉस्पिटलचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना सुचवल्या.

* हॉस्पिटलनी काय करावे?

>> हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर पेशंट किंवा त्यांच्या नातेवाइकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

>> हॉस्पिटलमध्ये वाद निर्माण होईल असा प्रसंग उद्‌भवल्यास सुरक्षा कर्मचाऱ्याच्या उपस्थितीतच नातेवाइकांशी संवाद साधावा.

>> आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलमधून बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र सोय असावी.

>> हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध या कायद्यातील तरतुदीची माहिती हॉस्पिटलमध्ये दर्शनी भागात लावावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिकीट रद्द केल्यास आता दुप्पट भुर्दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेल्वे प्रवासाच्या ४८ तास आधी तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना यापुढे अधिक भुर्दंड बसणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या नवीन नियमानुसार, प्रवासाच्या ४८ तास आधी आरक्षित तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांकडून आताच्या शुल्कापेक्षा दुप्पट शुल्क आकारले जाणार आहे. प्रवासाच्या चार तास आधी तिकीट रद्द केल्यास कोणताही परतावा दिला जाणार नाही. हा नियम १२ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.

सध्या आरक्षित तिकीट रद्द करण्यासाठी आकारण्यात येणारी रक्कम अल्प होती. एजंट त्याचा गैरफायदा घेत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे एजंटांना चाप लावण्यासाठी शुल्क दुपटीने आकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. मात्र, काही कारणास्तव सामान्य नागरिकांना तिकीट रद्द करण्याची वेळ आल्यास त्यांना मात्र या निर्णयाचा चांगलाच फटका बसणार आहे.

प्रवासाच्या आधी ४८ तास ते १२ तास या कालावधीत तिकीट रद्द केल्यास, तिकिटाच्या रकमेतून २५ टक्के रक्कम वजा करून प्रवाशाला परतावा दिला जाणार आहे; तसेच प्रत्यक्ष प्रवासाच्या १२ तास ते ४ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास ५० टक्के रक्कम वजा केली जाणार आहे. 'आरएसी' किंवा वेटिंग असलेले तिकीट प्रवासाच्या अर्धा तास आधीपर्यंत रद्द केल्यास त्याचा परतावा मिळेल.

तिकीट कॅन्सलेशन शुल्क

क्लास - पूर्वी - आता
सेकंड क्लास - रु. ३० - रु. ६०
एसी तिकीट - रु. ९० - रु. १८०
सेकंड स्लीपर - रु. ६० - रु. १२०
सेकंड एसी - रु. १०० - रु. २००
फर्स्ट क्लास एसी - रु. १२० - रु. २४०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोडीन’ची अवैध विक्री

$
0
0

बनावट बिले केल्याने घाऊक, किरकोळ विक्रेत्यासह पाच जणांविरोधात गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोडीन या नशेचा घटक असलेल्या 'अॅस्कोरिल सी' नावाच्या औषधांची बनावट बिलांच्या आधारे सदाशिव पेटेतील घाऊक विक्रेत्याकडून विक्री होत असल्याचे उघडकीस आले. या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) औषध विभागाच्या तक्रारीनुसार विश्रामबाग पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला. सदाशिव पेठेतील शहा मेडिको यांना परवाना रद्द करण्याबाबत, तसेच कोंढव्यातील कीर्ती मेडिकलच्या विक्रेत्याला 'कारणे दाखवा' नोटीस पाठविण्यात आली आहे.

या संदर्भात औषध विभागाचे सहआयुक्त व्ही. ए. जावडेकर, सहायक आयुक्त सुहास मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक विवेक खेडकर, एस. व्ही. प्रतापवार, सचिन कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्याबाबत शहा मेडिको प्रा. लि. या फर्मसह फर्मचे संचालक स्वप्नील राजेश शहा, एका कंपनीचे वैद्यकीय प्रतिनिधी अलाऊद्दीन इनामदार, किर्ती मेडिकलचे मालक ओमप्रकाश तेजाराम चौधरी, तसेच राजुदास जगदीशदास वैष्णव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेडकर यांनी तक्रार दाखल केली.

'कोडीनयुक्त औषधाची बेकायदा विक्री होत असल्याने शहा मेडिको यांच्याकडे 'अॅस्कोरिल सी' औषधांच्या विक्रीबाबत चौकशी केली. त्यांनी बिलानुसार तीन विविध औषध विक्रेत्यांना कोडीनयुक्त औषधाच्या १२० बाटल्यांची विक्री केल्याचे उघडकीस आले. त्याबाबत संबंधित विक्रेत्यांकडे चौकशी करता घाऊक विक्रेत्यांकडून औषध घेतले नसल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात विक्रेत्यांऐवजी ती औषधे 'अॅस्कोरिल सी' कंपनीच्या वैद्यकीय प्रतिनिधीला दिली होती. त्या प्रतिनिधीने संबंधित तीन विक्रेत्यांच्या नावाच्या बिलांवर खाडाखोड करून त्यावर किर्ती मेडिकलच्या नावे बिल तयार केले. त्यामुळे बिलांसह औषधे दिल्याचे आढळले,' अशी माहिती सहआयुक्त व्ही. ए. जावडेकर यांनी दिली.

'कोडीनयुक्त औषधे वैद्यकीय प्रतिनिधी इनामदार याच्याकडून खरेदी केल्याचे कीर्ती मेडिकलच्या विक्रेत्याने सांगितले. तपासणीवेळी औषधांचा साठा शिल्लक नसल्याचे आढळले. त्यावरून कोडीनच्या औषधांची विक्री झाल्याचा संशय वाढला. त्यानंतर २० ऑगस्टला शहा मेडिको यांच्याकडे चौकशी केली असता १८० बाटल्यांची खरेदी कीर्ती मेडिकलने केल्याचे बिल दाखविण्यात आले. मात्र, विक्रेत्याने औषधे खरेदी केली नसल्याचे सांगितले. त्या वेळी कीर्ती मेडिकलच्या नावे बनावट बिले तयार करून औषधांचा गैरवापर होत असल्याचे तपासात उघडकीस आले,' असे सहायक आयुक्त मोहिते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राज्य नाट्य’ पुन्हा ‘हिट’

$
0
0

सर्वच स्पर्धांचा प्रतिसाद वाढल्याचे चित्र

Chinmay.Patankar@timesgroup.com

गेल्या काही वर्षांत 'फ्लॉप' झालेली राज्य नाट्य स्पर्धा आता पुन्हा 'हिट' होण्याच्या मार्गावर आहे. राज्यभरातून या स्पर्धेला मिळत असलेल्या प्रतिसादात लक्षणीय वाढ झाली असून, स्पर्धेचा सुवर्णकाळ परत येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ४७, तर बालनाट्य स्पर्धेत २६ प्रवेशिका वाढल्या आहेत.

राज्यभरातील नाट्य चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. राज्यभरातील १९ केंद्रांपैकी बहुतेक केंद्रांवर १७ नोव्हेंबरपासून स्पर्धेची नांदी होणार आहे. दर्जेदार नाटकांचा सुवर्णकाळ पाहिलेल्या या स्पर्धेचा प्रतिसाद आणि गुणवत्ता कमी होत असल्याने मरगळ आल्याचे चित्र होते. मात्र, या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याचे चित्र आहे.

हौशी मराठी नाट्य स्पर्धेत गेल्या वर्षी असलेल्या २८९ प्रवेशिकांची संख्या यंदा ३३६वर पोहोचली आहे; तसेच बालनाट्य स्पर्धेत गत वर्षी १९० नाटके होती. यंदा या स्पर्धेसाठी २१६ प्रवेशिका आल्या आहेत. हौशी आणि बालनाट्य स्पर्धेसह संस्कृत, हिंदी, बालनाट्य आणि संगीत नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिकांमध्येही मोठी वाढ झाली आहे. संस्कृत नाट्य स्पर्धेसाठी यंदा २२ प्रवेशिका आहेत. हिंदी नाट्य स्पर्धेत सुमारे ३५ नाटके असतात. यंदा या स्पर्धेसाठी ५२ प्रवेशिका दाखल झाल्या आहेत; तसेच संगीत नाट्य स्पर्धेसाठी ३५ प्रवेशिका आहेत.

'राज्यभरातील जवळपास सर्वच केंद्रांवर प्रवेशिकांची संख्या वाढली आहे. ही संख्या कशी वाढली, याचे नेमके कारण सांगता येणार नाही. मात्र, स्पर्धेसाठी नवी संहिता असणे बंधनकारक असल्याचा नियम काढून टाकल्याचा हा परिणाम असू शकतो. नियम बदलल्यानंतरही स्पर्धेतील जुन्या आणि नव्या नाटकांचे प्रमाणही समाधानकारक आहे,' असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून सांगण्यात आले.

हौशी नाट्य स्पर्धा

वर्ष - प्रवेशिका
२०१२ - २६२
२०१३ - २७८
२०१४ - २८९
२०१५ - ३३६

बालनाट्य

वर्ष - प्रवेशिका
२०१२ - १७०
२०१३ - १८५
२०१४ - १९०
२०१५ - २१६

स्पर्धेची रचना बदलणार?

एकीकडे संख्यात्मक वाढ होत असताना गुणवत्ता वाढवण्यासाठीही सांस्कृतिक कार्य विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या दृष्टीने स्पर्धेच्या रचनेत काही मूलभूत बदल करण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने काही प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळीला सुरुवात झाली असताना शहरात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. मात्र, कडाक्याच्या थंडीसाठी अजूनही प्रतीक्षाच करावी लागणार असून, हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऐन दिवाळीत पावसाची शक्यता आहे.

गेले काही दिवस शहरात सायंकाळनंतर हवेत चांगलाच गारवा जाणवतो आहे. शनिवारी रात्री तर चांगली थंडी जाणवत होती. शहराचे रविवारचे कमाल तापमान ३३.१ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले, तर किमान तापमानाचा पारा १७ अंश सेल्सियसवर होता. पुढील दोन दिवस मात्र, हवामान अंशतः ढगाळ राहून तापमानात एक ते दोन अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मध्य-पूर्व अरबी समुद्रात असलेल्या 'मेघ' या चक्रीवादळाची तीव्रता वाढून ते अधिक तीव्र झाले आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागातील कमी दाबाच्या क्षेत्राचीही तीव्रता वाढली असून, ते कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले आहे. त्यामुळे तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्यात मंगळवारी आणि बुधवारी काही ठिकाणी तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे; तसेच यामुळे बाष्पाचे प्रमाण वाढून पुण्यासह राज्याच्या काही भागांत हवामान ढगाळ होऊन तापमानात काहीशी वाढ होण्याचीही शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओला कॅबमध्ये शिक्षिकेचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कॅबमधून प्रवास करणाऱ्या शिक्षिकेची छेड काढून तिला बलात्काराची धमकी दिल्याबद्दल ओला कॅब्जच्या एका ड्रायव्हरवर कोंढवा पोलिस चौकीत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने बुधवारीच तक्रार दिल्यानंतरही तब्बल २८ तासांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवा भागातील ३८ वर्षीय शिक्षिका बुधवारी ओला कॅबमधून प्रवास करत असताना कॅबचालक अभिमान म्हस्के याने तिची छेडछाड करून तिला बलात्काराची धमकी दिली होती. त्यानंतर संबंधित महिलेने बुधवारीच पोलिसांकडे तक्रार केली होती. परंतु, या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात दिरंगाई झाल्यामुळे आम आदमी पार्टीच्या राजेश चौधरी, पुनम बोत्रे, असगर बेग, केतन बोत्रे, आशुतोष शिपलकर, आरिफ पटेल आदींनी सहपोलिस आयुक्त सुनील रामानंद यांच्याकडे निवेदन दिले. कंपन्यांची विश्वासर्हता लक्षात घेऊन नागरिक या कॅबजा वापर करतात. त्यामुळे या कंपन्यांनी त्यांना योग्य सुरक्षा पुरवली पाहिजे, असे 'आप'ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याबाबत ओला कॅब्जशी संपर्क साधला असता, 'आम्ही या प्रकरणात संबंधित महिलेला संपूर्ण सहकार्य करत आहोत. यापुढेही त्यांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल. तक्रार देऊ नये, यासाठी महिलेवर दबाव आणण्यात आला नव्हता,' असे कंपनीच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन दिवाळीत वीज दरवाढीचा शॉक

$
0
0

अडीच कोटी वीजग्राहकांना फटका; किमान ६८ रुपयांनी बिल वाढणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मेक इन महाराष्ट्र'... उद्योगांना पायघड्या... अशा अनेक घोषणांना वाकुल्या दाखवीत सरकारी वीज कंपन्यांनी राज्यातील अडीच कोटी घरगुती आणि औद्योगिक वीजग्राहकांना ऐन दिवाळीत वीज दरवाढीचा 'शॉक' दिला आहे. महावितरणने महागडी वीज खरेदी केल्याने इंधन समायोजन आकाराचा (एफएसी) फटका बसून, दरमहा शंभर युनिट वीज वापरणारया ग्राहकांचे वीजबिल दरमहा ६८ रुपयांनी वाढणार आहे. येत्या डिसेंबरअखेरपर्यंत ग्राहकांना हा भुर्दंड बसणार आहे.

गेल्या सोळा वर्षांत असा प्रकार प्रथमच घडला आहे. विशेषतः नियमित वीज दरवाढीसंदर्भात राज्य वीज नियामक आयोगाने आदेश दिल्यानंतर लगेचच हा दरवाढीचा फटका ग्राहकांना बसला आहे. वीजबिलांमध्ये एफएसी चार्जेस हे इंधनाच्या दरावर ठरतात. यामध्ये एका मर्यादेपेक्षा अधिक एफएसी असलेल्या उत्पादकांकडून वीज घेण्यावर बंधने आणण्यात येतात. मात्र, यंदा महावितरणने या नियमांचे बंधन न पाळता महानिर्मिती कंपनीकडून महाग दराने वीजखरेदी केल्याचे समोर आले आहे. त्याचा फटका राज्यातील घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांना बसला असून, येत्या डिसेंबरपर्यंत दरमहा या एफएसीपोटी प्रतियुनिट ६८ पैशांची वसुली करण्यात येणार आहे. दरमहा साडेपाचशे कोटी, म्हणजे एकूण साडेसोळाशे कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा त्यामुळे ग्राहकांवर पडणार आहे.

दरम्यान, नियमित वीज दरवाढीच्या आदेशानंतर लगेचच इतक्या मोठ्या प्रमाणात दरवाढ होणे, हा तांत्रिक भाषेत 'टेरिफ शॉक' आहे. त्यामुळे राज्य सरकार आण राज्य वीज नियामक आयोगाने यामध्ये हस्तक्षेप करावा आणि योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केली आहे.

दरमहा सरासरी शंभर युनिट वीजवापर असलेल्या ग्राहकांच्या वीजबिलात यामुळे ६८ रुपयांची वाढ होणार आहे. तसेच आधीच मंदीचा सामना करीत असलेल्या उद्योगक्षेत्रालाही या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. आधीच इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात विजेचे दर अधिक असल्याची उद्योगक्षेत्राची पूर्वीपासून तक्रार होती आणि या मुद्द्यावरून प्रमुख उद्योगांनी राज्याबाहेर जाण्याचा इशारा दिला होता. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून घरगुती ग्राहक आणि उद्योगांना इलेक्ट्रिसिटी ड्युटीतील वाढीचा मोठा फटक बसला आहे. एकीकडे राज्य सरकार 'मेक इन महाराष्ट्र' च्या घोषणा करून उद्योगांना सुलभ ठरतील, अशी धोरणे आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे सातत्याने वीज दरवाढ होत असल्याने ही धोरणेही निरुपयोगी ठरू लागली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखेर पुणेकरांना ‘इंपोर्टेड’ तूर डाळ

$
0
0

व्यापाऱ्यांच्या साह्याने स्वस्तात वितरण

पहिल्याच दिवशी सहा टनांची विक्री

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देऊन पालकमंत्री गिरीश बापट यांनी अखेर पुणेकरांना 'आयात' केलेली तूर डाळ रविवारी शंभर रुपये किलो दराने उपलब्ध करून दिली. पहिल्याच दिवशी दहा टनांपैकी सहा टन तूर डाळीची विक्री झाली. पुण्यातील तीन ठिकाणी तूर डाळ उपलब्ध होणार आहे. परंतु, दररोज पुणेकरांना चाळीस टन डाळीची आवश्यकता असताना एवढ्या कमी प्रमाणात तूर डाळ कशी पुरणार असा सवाल केला जात आहे.

तूर डाळीचे दर गगनाला भिडल्याने नागरिकांत नाराजी निर्माण झाल्याने छाप्यांमध्ये जप्त केलेली डाळ स्वस्तात उपलब्ध करून देण्याची घोषणा राज्य सरकारने केली; मात्र पुण्यातून डाळच जप्त झालेली नसल्याने या घोषणेतून पुणेकरांना काहीच मिळाले नाही. पुण्याचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी 'शंभर रुपयांत तूरडाळ देऊ' अशी भूमिका जाहीर केली; मात्र पुणेकरांच्या हाती शंभर रुपयांची तूर डाळ न आल्याने राजकीय विरोधकांनी टीकेची झोड उठवली. त्या पार्श्वभूमीवर बापट यांनी अखेर तूर डाळ उपलब्ध केली. दी पूना मर्चंट्स चेंबर येथे तूर डाळीची विक्री सुरू करण्यात आली. सकाळीच ग्राहकांनी गर्दी केली होती. विभागीय उपायुक्त प्रकाश कदम, चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, माजी अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, वालचंद संचेती आदी या वेळी उपस्थित होते.

'शहरात तूरडाळ उपलब्ध होत नसल्याने पालकमंत्री गिरीश बापट यांनी शंभर रुपयांतील तूर डाळीच्या विक्रीची जबाबदारी 'दी पूना मर्चंट्स चेंबर'वर सोपवली. रविवारी सकाळी तूर डाळीची विक्री सुरू केली. पहिल्या दिवशी दहा टनांपैकी सहा टन तूर डाळीची विक्री झाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत विक्री सुरू होती. तूरडाळ स्वस्तात उपलब्ध झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले,' असे चोरबेले यांनी सांगितले. दरम्यान, पुणेकरांच्या मागणीमुळे आणखी दहा टन तूर डाळ आज (सोमवारी) उपलब्ध होणार आहे, असेही सांगण्यात आले.
.......

मार्केट यार्डासह रविवारी सायंकाळी कसबा पेठेतही स्वस्त डाळीच्या विक्रीस प्रारंभ झाला. आजपासून ग्राहक पेठेतही तूर डाळ उपलब्ध होईल. पुण्याच्या डाळ मिल्समधील डाळ हमीपत्रावर सोडवून त्याची विक्री केली जाईल. सणासुदीच्या काळात पुणेकरांना डाळ उपलब्ध केल्याचे समाधान आहे.
गिरीश बापट, अन्न व नागरी पुरवठामंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेटरहेड, व्हिजिटिंग कार्डांचे बिल ‘फक्त’ ४९ हजार

$
0
0

शिक्षण मंडळ अध्यक्षांच्या 'उधळपट्टी'वर पडसाद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या मालकीचा प्रिंटिंग प्रेस असतानाही बाहेरील प्रिंटिंग प्रेसमधून व्हिजिटिंग कार्ड आणि लेटरहेड छापून त्याचे ४९ हजार रुपयांचे बिल महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे यांनी मंजुरीसाठी सादर केले आहे. अध्यक्षांनी ‌व्हिजिटिंग कार्ड, लेटरहेडवर केलेल्या उधळपट्टीचे पडसाद शिक्षण मंडळ सदस्यांच्या सभेत उमटले. येत्या १६ नोव्हेंबरला होणाऱ्या मंडळाच्या सभेत हा विषय ठेवण्यात येणार आहे.

महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर काकडे यांनी व्हिजिटिंग कार्ड, लेटरहेड छपाईच्या ४९ हजार रुपयांच्या बिलाचा विषय सभासदांच्या बैठकीत मांडला. एवढे बिल कसे आले, असा प्रश्न उपस्थित करून काही सभासदांनी याला आक्षेप घेतला. बिल मंजूर करण्यावरून या बैठकीत जोरदार वाद झाले. यावर काकडे यांना समाधानकारक उत्तर देता न आल्याने हा विषय मागे ठेवण्यात आला. मंडळाच्या १६ नोव्हेंबरला होणाऱ्या बैठकीत हे बिल सादर होण्याची शक्यता आहे. पालिकेच्या मालकीचा प्रिंटिंग प्रेस असल्याने महापौर, उपमहापौर, नगरसेवक यांची लेटरहेड तेथेच छापून घेतली जातात; मग मंडळाच्या अध्यक्षांनी बाहेरून कार्ड कशाला छापून घेतली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
.........

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर लेटरहेड, तसेच व्हिजिटिंग कार्ड छापण्यासाठी टेंडर मागवण्यात आले होते. ठेकेदाराने बिल दिल्यानंतर बाजारभावापेक्षा अधिक दर लावल्याचे लक्षात आल्यावर हे बिल देण्यास मी स्वत:, तसेच सर्व सदस्यांनी विरोध केला. त्यामुळे सभासदांच्या बैठकीत वाद निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. ठेकेदाराने नियमाप्रमाणे बिल कमी केल्यानंतरच त्याला ते दिले जाणार आहे.
- वासंती काकडे, शिक्षण मंडळ अध्यक्षा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भेसळीच्या संशयावरून आठशे किलो तेल जप्त

$
0
0

'एफडीए'ची देहूतील कंपनीवर कारवाई

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भेसळीच्या संशयावरून देहूगाव येथील संत तुकाराम ऑइल कंपनीतील सोयाबीन आणि पामोलिव्ह तेलाचा ८०६ किलो तेलाचा साठा जप्त करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली. सुमारे ६९ हजार ३२८ रुपयांचा साठा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जप्त करण्यात आला आहे.

दिवाळीत बर्फी, मिठाईसाठी लागणाऱ्या खव्यावर 'एफडीए'ने करडी नजर ठेवली आहे. त्या मोहिमेचाच एक भाग म्हणून तेलाची तपासणी करण्यात आली. त्या तपासणीदरम्यान साठा जप्त करण्यात आला. सहआयुक्त शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त शिवकुमार कोडगिरे, अन्न सुरक्षा अधिकारी नीलेश खोसे, सचिन आढाव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

'दिवाळीत तेलातदेखील भेसळ होण्याची शक्यता गृहीत धरून तपासणी करण्यात आली. हवेली तालुक्यातील देहू गावातील संत तुकाराम ऑइल कंपनीत तेलात भेसळ होत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कंपनीत छापा टाकला. त्या छाप्यात भेसळीच्या संशयावरून सोयाबीन ऑइलच्या ५०८ किलो वजनाचे ४५ हजार ४५६ रुपयांचा, तर पामोलिव्ह तेलाचे २९८ किलो वजनाचे तसेच २३ हजार ८७२ रुपयांचा तेलाचा साठा जप्त करण्यात आला. तेलाचे नमुने राज्य आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले,' अशी माहिती सहायक आयुक्त शिवराम कोडगिरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ विस्तारीकरणात अडथळे

$
0
0

लोहगाव विमानतळाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी संरक्षण खात्याने पंधरा एकर जमीन देण्याची तयारी दर्शवली असली, तरी या विस्तारीकरणाच्या कामाला अडथळ्यांची मालिका पार करावी लागणार असल्याचे दिसते. या विस्तारीकरणामध्ये विमानतळापर्यंतच्या वाहतुकीसाठी नवीन रस्ता, रस्त्यात येणाऱ्या तीनशेहून अधिक खासगी मालमत्ता आणि वाहनतळाचा अडसर येत आहे.

लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न अनेक वर्षे रखडला आहे. हा विमानतळ संरक्षण खात्याच्या अखत्यारीत असल्याने विमानोड्डाणांवरही निर्बंध येत आहेत. त्यामुळे या विमानतळाच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. या विस्तारीकरणात मुख्यत्वे जादा जमिनीचा अडसर होता. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात नुकतीच बैठक घेतली आणि विस्तारीकरणासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे जाहीर केले. या विस्तारीकरणासाठी संरक्षण खात्याने त्यांच्याकडील पंधरा एकर जमीन 'एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया'ला तीस वर्षांच्या कराने देण्यास संमती दिली.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सौरव राव, तसेच हवेलीच्या उपविभागीय अधिकारी स्नेहल बर्गे, तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांमध्ये विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीची पाहणी केली. संरक्षण दलाने विस्तारीकरणासाठी दिलेल्या जमिनीतून सध्याचा विमानतळाकडे जाणारा रस्ता जातो. विस्तारीकरणाच्या कामात हा रस्ता बंद होणार आहे. त्यासाठी नवा पर्यायी रस्ता करावा लागणार आहे. हा पर्यायी रस्ता करायचा झाल्यास त्यात किमान तीनशे घरांचे संपादन करावे लागणार आहे. सद्यस्थितीत हे संपादन करणे शक्य दिसत नाही.

या अडथळ्यांतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या रस्त्याला पर्याय म्हणून विमानतळापर्यंत भुयारी मार्ग तयार करण्याचा विचार होऊ शकतो. भुयारी मार्गातून थेट विमानतळापर्यंत वाहने नेण्याची सोय, तेथेच बहुमजली पार्किंग, तसेच शॉपिंग मॉल करण्याच्या पर्याय विचारही विचार होऊ शकतो. या संदर्भात जिल्हाधिकारी व संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ सुरक्षेसाठी नवीन कक्ष स्थापणार

$
0
0

स्वतंत्र संचालकांची नियुक्तीही करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी आता विद्यापीठामध्ये एक स्वतंत्र कक्षच सुरू होणार आहे. एक संचालक आणि दोन उपसंचालकांच्या माध्यमातून चालणाऱ्या या प्रस्तावित कक्षाच्या निगराणीखाली विद्यापीठाचा सर्व कँपस सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.

पुणे विद्यापीठाच्या आवारात गेल्या काही काळात घडलेल्या घटनांमुळे विद्यापीठाच्या सुरक्षिततेविषयी वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. सुरक्षिततेची परिस्थिती सुधारण्यासाठी नुकत्याच झालेल्या भरती प्रक्रियेद्वारे विद्यापीठामध्ये सुरक्षारक्षकांचीही भरती करण्यात आली होती. त्यानंतरही विद्यापीठाच्या आवारातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम राहिला होता. या कक्षाच्या माध्यमातून विद्यापीठाच्या सुरक्षिततेविषयीचे हे सारे प्रश्न दूर होण्याचा विश्वास कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी व्यक्त केला.

डॉ. गाडे म्हणाले, 'या कक्षाच्या माध्यमातून अत्यंत कुशल व्यक्तींकडे विद्यापीठाच्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपविली जाणार आहे. संरक्षण दल वा पोलिस दलामधून नुकत्याच निवृत्त झालेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची या कक्षाच्या संचालक आणि उपसंचालकपदी नेमणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या अधिकाऱ्यांच्या अनुभवातून विद्यापीठाच्या सुरक्षा यंत्रणेची योग्य पद्धतीने रचना केली जाईल. या रचनेच्या तितक्याच काटेकोर अंमलबजावणीद्वारे विद्यापीठाचे आवार सुरक्षित करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील आहोत.'

एक पाऊल पुढे..

विद्यापीठांच्या परीक्षा पद्धतींमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यभरातील विद्यापीठांमध्ये एक्झाम सिस्टीम ऑटोमेशन करण्याच्या सूचना अगरवाल समितीने आपल्या अहवालातून केल्या होत्या. पुणे विद्यापीठाने यापूर्वीच या सूचनांसाठी पूरक ठरणाऱ्या बाबींची अंमलबजावणी सुरू केल्याचे डॉ. गाडे यांनी सांगितले. या पुढील टप्प्यात विद्यापीठाचा परीक्षा विभाग, वित्त विभाग आणि शैक्षणिक प्रशासन विभाग एकमेकांशी जोडला जाणार आहे. तसेच, या पूर्वीच सुरू केलेल्या ऑनस्क्रीन पेपर तपासणीची व्याप्ती वाढवून, यंदा एमई, एम एड आणि एम फार्मच्या वर्गांसाठीही त्याची अंमलबजावणी होणार असल्याचेही डॉ. गाडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images