Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बांगलादेशी मुलीला कुंटणखान्यात विकले

$
0
0

पुणे : काम मिळवून देण्याच्या आमिषाने एका बांगलादेशी मुलीस पुण्यात आणून बुधवार पेठेतील कुंटणखान्यात विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या महिलेला सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. तिच्या ताब्यातून या मुलीची सुटका करून तिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

मीना रहिम शेख (३५, सध्या रा. सपना बिल्डींग, बुधवार पेठ. मूळ रा. पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या माहिलेचे नाव आहे. आरोपी शेख हिने एका बांगलादेशी मुलीला विकत घेतले असून ती तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या पथकाने शेख हिच्या सपना बिल्डींगमधील कुंटणखान्यावर छापा टाकला. या वेळी या ठिकाणी एक बांगलादेशी मुलगी आढळून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तूरडाळीच्या नावाखाली ‘लखोडी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या काही महिन्यांत तुरडाळीच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. सरकारी पातळीवर तूरडाळीच्या किमती कमी करण्याचे प्रयत्नही फोल ठरले. मात्र, पुण्यातील गुरुवार पेठेत ९० रुपये किलो दराने तुरडाळीची विक्री केली जात असल्याचे शुक्रवारी निदर्शनास आले. प्रत्यक्षात ती तूरडाळ नसून तूरडाळीसारखीच दिसणारी विदर्भातील 'लखोडी' डाळ आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात तूरडाळीच्या नावाखाली लखोडी डाळीची विक्री करून ग्राहकांची फसवणूक तर केली जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गुरुवार पेठेतील गौरी आळी येथील बाजारात एक विक्रेता ९० रुपये दराने तूरडाळीची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. किरकोळ बाजारात १८० रुपये किलो दराने तूरडाळ असताना, येथे ९० रुपये किलो दराने तूरडाळ मिळत असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्या विक्रेत्याकडे याबाबत चौकशी केली असता, ही डाळ त्यांने गुलटेकडी मार्केट यार्डातून ६० रुपये किलो दराने खरेदी केल्याचे सांगितले. त्या बिलावर 'लखडाळ' असे नमूद करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून तो विक्रेता या डाळीची विक्री करत आहे. दिवसाला तीस किलो डाळीची विक्री केल्याचे त्याने सांगितले.

लखडाळ किंवा लखोडी डाळ ही प्रामुख्याने विदर्भात पिकवली जाते. ही डाळीला विदर्भात आणखी काही नावांनी ओळखली जाते. तूरडाळ आणि या डाळीमधील फरक सामान्य नागरिकांना कळणारही नाही. दोन्ही डाळींच्या चवीतही फारसा फरक नाही. मात्र, १९६१च्या सुमारास केंद्र सरकारने लखोडी डाळीच्या उत्पादनावर व विक्रीवर बंदी घातली होती. मात्र, ही डाळ तूरडाळीपेक्षा स्वस्त आणि पौष्टीक असल्याचे सिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यातील बंदी उठविण्यात आली आहे.

फसवणुकीची शक्यता

गुरुवार पेठेतील विक्रेत्याने तूरडाळ म्हणून लाखोडी डाळीची विक्री केली असेल, तरीही त्याने ग्राहकांकडून किंमती कमी आकारली आहे. मात्र, शहराच्या इतर भागात किंवा ग्रामीण भागात या डाळीची विक्री तूरडाळीच्या सध्याच्या चढ्या दराने केली जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यूएलसी’ प्रकरणात जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बनावट यूएलसी दाखला (नागरी जमीन कमाल धारणा कायद्यानुसार आवश्यक दाखला) प्रकरणातील आरोपीने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्ह्यातील काही जागांचे बनावट यूएलसी दाखला घेण्यात आल्याचा प्रकार जानेवारी २००५मध्ये उघडकीस आला होता. या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे.

पोलिसांनी या प्रकरणी ३५हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. वाकड येथील वादग्रस्त जागेच्या बनावट यूएलसी दाखला प्रकरणी प्रकाश मनोहर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आला. पाटील यांनी या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून कोर्टात अर्ज दाखल केला होता. कोर्टाने त्यांचा जामीन फेटळाला. अतिरीक्त सरकारी वकील मच्छिंद्र गटे यांनी या जामीन अर्जाला विरोध केला होता.

वाकड येथील ही वादग्रस्त जागा तुकाराम निवृत्ती विनोदे यांच्या मालकीची आहे. त्यांनी उत्कर्ष शेल्टर्स अँड इस्टेट प्रा. लि. या कंपनीबरोबर जागेचा २००४साली व्यवहार केला होता. पाटील हे त्याच काळात कंपनीचे संचालक होते. त्यांनी विनोदे यांना ५२ लाख ६५ हजार रुपयांचा धनादेश दिलेला आहे. ही जागा पाटील यांनी भरत देवकीनंदन अगरवाल यांना २००७ साली दोन कोटी ७३ लाख रुपयांनी विकली आहे. यातून आरोपीचा आर्थिक फायदा झाला असल्याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकील गटे यांनी कोर्टात सांगितले.

पाटील यांच्याविरुद्ध नोंदविला गेलेला गुन्हा वेगळा असून त्या गुन्ह्यात त्यांना मिळालेल्या अटकपूर्व जामीनाचा या गुन्ह्याशी संबंध लावता येणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडे तपास करायचा आहे. या गुन्ह्यातील आरोपी सुरेश पंडित बोरोले यांनी तापी सहकारी पतपेढी गैरव्यवहार करून त्यातील रक्कम पाटील यांच्या कंपनीकडे वळवली आहे. बनावट यूएलसी घेण्यामागे कारण काय, याचा शोध घेण्यासाठी अटक करणे आवश्यक असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना-भाजप युती तुटेल

$
0
0

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मुंबईवर सत्ता गाजविणाराच पक्षच महाराष्ट्रात सत्ता गाजवू शकतो, याची जाणीव भारतीय जनता पक्षाला असल्याने राज्यात असलेली भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी संपुष्टात येईल,' असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. भाजप सेनेमध्ये सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षात एक 'त्रिकोण' आहे. या त्रिकोनाच्या भूमिकेवरच भाजप सरकारचे भवितव्य ठरणार असल्याचे सांगत भाजप राष्ट्रवादीच्या संबधांवर चव्हाण यांनी टीका केली.

देशातील वाढत्या असहिष्णुतेबाबत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली. मोदी सरकारच्या काळात निर्माण झालेले असहिष्णुतेचे वातावरण, त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याची माहिती देण्यासाठी चव्हाण यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत डाळींचे वाढलेले भाव आणि सरकारने शेतकऱ्यांची चालवलेली थट्टा यावरून चव्हाण यांनी सरकारवर हल्ला चढविला. काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, माजी आमदार मोहन जोशी, संजय बालगुडे, गोपाळ तिवारी या वेळी उपस्थित होते.

भाजप, शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाच वर्षे सरकार टिकेल का? याबाबत चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, 'मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजप, सेनेमधील युती संपुष्टात येईल. राज्यात सत्ता गाजवायची असेल, तर मुंबईत सत्ता असली पाहिजे ही गोष्ट भाजपला माहीत असल्याने मुंबई पालिकेच्या निवडणुकीत भाजप पूर्ण ताकद लावणार असल्याने या दोघांमधील युती तुटेल. सेना-भाजप युतीमागे त्रिकोणाचे अस्तित्त्व आहे. कोण कसे कोणाला मिळणार यावरच सर्व काही अवलंबून राहणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेतली तर परिस्थिती वेगळी दिसेल,' असे सूचक विधानही त्यांनी केले.

राज्यात सत्ता गाजवायची असेल, तर मुंबईत सत्ता असली पाहिजे ही गोष्ट भाजपला माहीत असल्याने मुंबई पालिकेच्या निवडणुकीत भाजप पूर्ण ताकद लावणार असल्याने भाजप-सेना युती तुटेल.

- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनी पाणीप्रकरणी फेरविचार याचिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्ह्यातील धरणांमधून उजनी धरणात दहा टीएमसी पाणी सोडण्याच्या जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्णयाचा पुनर्विचार होण्यासाठी शिरुरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी प्राधिकरणाकडे पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, पाटबंधारे विभागाकडून उजनी धरणात पाणी सोडण्यासाठी भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे ढापे काढण्याचे काम येत्या तीन दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर या परिसरातील नागरिकांना पूर्वकल्पना देऊन धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

प्राधिकरणाचा निर्णय एकतर्फी असून शिरूरसारख्या तालुक्यावर अन्याय करणारा आहे. प्राधिकरणापुढील याचिकेच्या सुनावणीवेळी उपलब्ध पाणी आणि सोलापूरला पिण्यासाठी लागणारे पाणी याची आकडेवारी दिली होती. या निर्णयाचा पुनर्विचार होण्यासाठी याचिका दाखल केली आहे. पुनर्विलोकन याचिका प्राधिकरणाने स्वीकारली असल्याचे आमदार पाचर्णे यांनी सांगितले.

ढापे काढण्याचे सुमारे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या तीन दिवसांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर उजनी धरणातून पाणी सोडले जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी स्पष्ट केले.

ढापे काढण्याचे काम बळजबरीने केले जाणार नाही. लोकांना विश्वासात घेऊनच हे काम करण्यात येत आहे. आवश्यक त्या ठिकाणी पोलिस संरक्षण घेण्यात येत असल्याचे कपोले म्हणाले.

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने चासकमान धरणातून तीन टीएमसी, भामा आसखेडमधून चार टीएमसी, आंद्रा धरणातून दोन टीएमसी आणि मुळशी धरणातून एक टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे. चासकमान धरणातून तीन टीएमसी पाणी सोडण्यावरून वाद निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीत दररोज पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिध‌ी, पुणे

सणासुदीच्या काळात पुणेकरांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी दिवाळीच्या काळात ९ ते १४ नोव्हेंबर दरम्यानच्या संपूर्ण आठवड्यात शहरात दररोज एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला खडकवासला धरण साखळीतून अडीच हजार एमएलडी अतिरिक्त पाणी घ्यावे लागणार आहे.

महापालिकेतील पक्षनेत्यांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली. पावसाने यंदा दडी मारल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये केवळ १६ टीएमसी पाणी शिल्लक होते. पुढील वर्षी जुलैपर्यंत हे पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे, यासाठी कालवा समितीच्या बैठकीत शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ७ सप्टेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी सुरू झाली. सणासुदीच्या काळात पाणीपुरवठ्यात काही प्रमाणात बदल करण्याचा अधिकार पालिकेला देण्यात आले आहेत. त्यानुसार पक्षनेत्यांच्या बैठकीत दिवाळीनिमित्त ९ ते १४ नोव्हेंबर दरम्यान, शहरात दररोज पाणीपुरवठा करण्याचा ठराव मांडण्यात आला. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. त्याचे आदेशही महापालिका प्रशासनाला देण्यात आल्याचे महापौर धनकवडे यांनी सांगितले.

या बैठकीला सभागृह नेते शंकर केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, भाजपचे गटनेते गणेश बीडकर, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, मनसेचे गटनेते बाबू वागस्कर, आरपीआयचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पाणीपुरवठा विभागप्रमुख व्ही. जी. कुलकर्णी उपस्थित होते. सणासुदीच्या काळात नागरिकांना नियमित पाणी मिळावे, यासाठी दररोज पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी या काळात नागरिकांनी जपून पाणी वापरावे, असे आवाहन महापौर धनकवडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर रुपयांचा वायदा खोटाच!

$
0
0

पुणेः दिवाळीपूर्वी शंभर रुपये किलो दराने तूरडाळ उपलब्ध करून देण्याची अन्न व नागरी पुरवठामंत्र्यांची घोषणा हवेतच विरली आहे. पुण्यामध्ये शुक्रवारी किरकोळ बाजारात तूरडाळ १८० रुपये किलो दरानेच उपलब्ध होती.

राज्यात तूरडाळ कमी दराने उपलब्ध करून देण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आग्रह धरला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १२० रुपये किलो दराने विक्री करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व बापट यांनी तूरडाळ शंभर रुपये किलो दराने उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. मात्र, पुण्यात किरकोळ बाजारात किंमत कमी झालेली नाही. राज्यातील व्यापाऱ्यांकडून डाळीचा साठा जप्त करण्यात आला. मात्र पुण्यात असा कोणताही साठा सापडला नव्हता. त्यामुळे किंमत कमी झालेेली नाही, असा दावा करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीमध्ये मुख्यमंत्री

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, बारामती

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शुक्रवारी बारामतीमध्ये शरद पवारांच्या दरबारात हजेरी लावली. त्यामुळे शिवसेना दूर गेली, तर पर्याय म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसचा विचार भारतीय जनता पक्षातर्फे केला जात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालेच; पण पवारांच्या विरोधात गेल्या वर्षभरामध्ये लढलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना मात्र तोंड कोठे दाखवायचे असा प्रश्न पडला आहे.

गेल्या वर्षी 'व्हॅलेंटाईन डे'लाच नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावून पवारांची मुक्तकंठाने स्तुती केली होती. इतकेच नव्हे; तर पवारांचा सल्लाही अधूनमधून घेत असतो असेही ते म्हणाले होते. त्याही वेळेस शरद पवार यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढलेल्या; तसेच अजित पवार यांच्या विरोधात लढलेल्या भाजपच्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना आता धरणी पोटात घेईल, तर बरे होईल असे वाटले होते. भाजपच्या पुणे जिल्ह्यातीलच नव्हे; तर शहरातील अनेक कार्यकर्त्यांनीही जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्या पाठोपाठ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गेल्या महिन्यात पवारांच्या निवासस्थानी रात्रभर मुक्काम करून देशामध्ये बारामतीसारखी शंभर शहरे तयार व्हायला हवीत असे जाहीर वक्तव्य केले होते. त्याचा उपयोग करून उद्धव ठाकरे यांच्यापासून अशोक चव्हाण यांच्यापर्यंत सगळ्यांनीच टीकेची झोड उठविली होती.

हे वातावरण शांत होते ना होते तोच आज मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसे व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह बारामतीमध्ये हजेरी लावली. वास्तविक मुख्यमंत्र्यांची शुक्रवारची दिल्लीवारी निश्चित होती. तरीही त्यांनी वेळ काढला. त्यानंतर पवार यांच्या मेहमाननवाजीचा आनंद घेताना मुख्यमंत्री आणि खडसे सगळ्यांनाच दिसले. इतकेच नव्हे; तर पाटबंधारे खात्याच्या गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचे थेट सारथ्य केल्याने भाजपबरोबरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्याही भुवया उंचावल्या. अर्थात हे सगळे खरे असले, तरीही भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रसंगी पक्षासाठी त्याग करण्याची सवय असते. आता भाजपचे नेते त्यागाची सवय मतदारांनाही लावत असल्याचीच चर्चा दिवसभर सुरू होती.

निवडणुकीनंतर भाजपला सत्तास्थापनेसाठी दिलेला समर्थनाचा प्रस्ताव राष्ट्रवादीने मागे घेतलेला नाही. पंतप्रधान, अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री बारामतीला भेट देऊन कौतुक करतात. याचा अर्थ प्रत्येकाने आपल्या पद्धतीने काढावा.

- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. श्रीपाल सबनीस संमेलनाध्यक्ष

$
0
0

८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आगामी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांची शुक्रवारी निवड झाली. पिंपरी-चिंचवड येथे 'डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी' या संमेलनाचे आयोजन करणार आहे.

अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ कवी प्रा. विठ्ठल वाघ, लेखक शरणकुमार लिंबाळे, लेखक-प्रकाशक अरुण जाखडे, श्रीनिवास वारुंजीकर आणि समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस असे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदानाची मोजणी पूर्ण झाल्यानंतर निर्वाचन अधिकारी अॅड. प्रमोद आडकर यांनी निकाल जाहीर केला. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

महामंडळाच्या कार्यालयात सकाळी साडेनऊ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ५०७ मतांचा कोटा निर्धारित करण्यात आला होता. या मतांचा कोटा कुणालाच पूर्ण करता आला नाही. डॉ. सबनीस यांना ४८५, विठ्ठल वाघ यांना ३७३, अरुण जाखडे यांना २३०, शरणकुमार लिंबाळे यांना २५ आणि श्रीनिवास वारुंजीकर यांना २ मते मिळाली. १०७५ मतदारांपैकी १०३३ मतदारांनी मतदान केले होते. त्यातील २० मते अवैध ठरली. १०१३ मतांची मोजणी करण्यात आली.

निवडणुकीच्या प्रक्रियेवर माझा विश्वास नाही. ६५० मते मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, मतदारांवर माझा पूर्ण विश्वास आहे. निकालाविरोधात तक्रार करणार नाही.

- विठ्ठल वाघ, ज्येष्ठ कवी

साहित्यात आता धर्मनिरपेक्ष वाङ्मयीन प्रवाह निर्माण व्हायला हवा.

- डॉ. श्रीपाल सबनीस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठीतून डीपीसाठी हायकोर्टात याचिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील विकास योजना, आराखड्यांची (डीपी) प्रक्रिया केवळ इंग्रजीतूनच होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचे अवलोकन होत नाही. म्हणून, ही सर्व प्रक्रिया मराठी भाषेतून करावी, या मागणीसाठी योगेश खैरे आणि संतोष पाटील यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर, महिनाअखेरीस म्हणणे मांडण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.
डीपीची सर्व प्रक्रिया आणि प्रसिद्धी इंग्रजीतून केली जाते. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिक त्यापासून दूर जात असून, यामध्ये केलेल्या विविध तरतुदी आणि त्याचा वापर कसा करावा, याची माहिती समजण्यासाठी मराठीतूनही ही प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हायकोर्टात झालेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारला त्याबाबतची भूमिका मांडण्याचे आदेश कोर्टाने दिल्याची माहिती खैरे व पाटील यांनी दिली. दरम्यान, पुण्याच्या विकास आराखड्यातील विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल्स) लवकरच जाहीर केली जाणार असून, त्याची सर्व माहिती मराठीतून दिली जावी, असे पत्र त्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीडीपी’त १४ टक्के बांधकाम ठराव मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिका हद्दीत समाविष्ट गावातील जैववैविध्य उद्यान (बीडीपी) झोनमध्ये १४ टक्के बांधकाम करण्यास परवानगी देण्यात यावी, असा ठराव शुक्रवारी महापालिकेच्या शहर सुधारणा समितीत मंजूर करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन दोडके यांनी समिती‌च्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला होता. त्याला बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आल्याचे समितीच्या अध्यक्षा रुपाली पाटील यांनी सांगितले.
महापालिका हद्दीत समावेश करण्यात आलेल्या गावांमधील बीडीपीची जागा ताब्यात घेताना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. याबरोबरच जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यातील (डीपी) हिलटॉप हिलस्लोपमधील आरक्षित जमीन ताब्यात घेण्याची नियमावलीही सरकारच्या समितीने तयार केलेली नाही. जुन्या हद्दीची विकास नियंत्रण नियमावली आणि समाविष्ट गावाची विकास नियंत्रण नियमावली एकसारखीच करण्याचे शासन समितीचे प्रयत्न आहेत.
महापालिकेतील भाजप सरकारने बीडीपीत दहा टक्के बांधकामाला परवानगी द्यावी, अशी मागणी लावून धरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांचा बीडीपीमधील बांधकामांना विरोध आहे, तर पर्यावरण हितासाठी बीडीपीमध्ये बांधकामाला विरोधाची भूमिका काँग्रेस आणि शिवसेनेने फार पूर्वीपासून घेतली आहे. बीडीपीमध्ये जागा असलेल्या जागा मालकांना काही प्रमाणात बांधकाम करता यावे, यासाठी दोडके यांनी हा १४ टक्के बांधकामाचा प्रस्ताव मांडला होता. समितीने त्याला मंजुरी दिली असून मुख्य सभेमार्फत हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून १४ टक्के बांधकामाला परवानगी द्यावी, अशी विनंती केली जाणार असल्याचे समितीच्या अध्यक्षा पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारी अर्ज ऑनलाइन

$
0
0

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी यंत्रणेची तयारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह जिल्हा परिषद व नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी संगणकीय पद्धतीने वॉर्ड रचना करण्याबरोबरच इच्छुक उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज 'ऑनलाइन' स्वीकारण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यासाठी महापालिका व नगर परिषदांमध्ये प्रत्येकी दोन नोडल अधिकारी नेमण्याची सूचना आयोगाने केली आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी पंचवार्षिक निवडणूक मार्च२०१७मध्ये होत आहे. तसेच जुन्नर, तळेगाव दाभाडे आणि लोणावळा नगर परिषदेची निवडणूक डिसेंबर २०१६मध्ये होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकही मार्च २०१७मध्ये नियोजित आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पूर्वतयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.

राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा व नगर परिषदांच्या निवडणुकीसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्याचे त्यांनी सूचित केले. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका, जिल्हा परिषद व नगर परिषदांच्या वॉर्ड रचना या संगणकीय पद्धतीने तयार करण्याची सूचना त्यांनी केली. २०११च्या जनगणनेच्या आधारे ही वॉर्ड रचना करण्यात यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात यावी. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज ऑनलाइन घेण्याचा प्रयोग करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आता महापालिका, जिल्हा परिषद व नगर परिषदांमध्ये ऑनलाइन पद्धत सुरू करावी, असे सहारिया यांनी सांगितले. या निवडणुकांसाठी अद्याप पुरेसा कालावधी आहे. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद व नगर परिषदांमध्ये प्रत्येकी दोन नोडल अधिकारी नेमण्यात यावेत. हे अधिकारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील. आगामी सहा महिन्यांमध्ये हे प्रशिक्षणाचे काम पूर्ण करण्यात येईल आणि १ जुलैपासून प्रत्यक्ष वॉर्ड रचनेसह अन्य कामे सुरू करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जनगणना, गुगल मॅपिंगद्वारे वॉर्ड रचना

महापालिकांची नव्याने वॉर्ड रचना करताना २०११ची जनगणना विचारात घेण्यात यावी. लोकसंख्या तसेच भौगोलिक रचनेसाठी गुगल मॅपिंगचा आधार घेण्याची सूचनाही राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी केली आहे. वॉर्ड रचना तयार करताना अनेकदा राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून दबाव येतो. संगणकीय पद्धतीने वॉर्ड रचना केल्यामुळे त्यात कोणाच्याही हस्तक्षेपाला वाव राहणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खिळ‌खिळ्या पीएमपीवर पुणेकर ‘समाधानी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महत्त्वाच्या वेळी बंद पडणाऱ्या बस... गर्दीच्या ठिकाणी बसथांबाच नाही... बसमधील अंतर्गत आसनव्यवस्था खिळखिळी... बसथांबे आणि बस मार्गांची अपुरी आणि त्रोटक माहिती...यासारख्या असंख्य तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात असल्या, तरी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) 'प्रवासी दिना'त चक्क एकही तक्रार प्राप्त झालेली नाही. त्यामुळे, पीएमपी खिळखिळी झाल्याचा दावा साफ चुकीचा असून, शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच सक्षम पर्याय असल्याचे समोर येत आहे.

प्रवाशांच्या तक्रारी दूर करण्यासाठी; तसेच त्यांच्या अपेक्षांनुसार अधिक कार्यक्षम सेवा देण्याकरिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी 'पीएमपी'तर्फे 'प्रवासी दिन' घेतला जातो. पीएमपीची सर्व बसस्थानके आणि आगारांवर प्रवाशांना त्यांच्या तक्रारी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची संधी या निमित्ताने मिळत असली, तरी त्याचा पुरेसा वापर होत नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. शनिवारच्या प्रवासी दिनामध्ये पीएमपीच्या १२ बसस्थानकांवर एकही तक्रार प्राप्त झालेली नाही. तर, १० डेपोंपैकी मार्केटयार्डला दोन, तर स्वारगेट येथे एक, अशा अवघ्या तीन तक्रारी/सूचना प्राप्त झाल्या आहेत.

पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे असताना, त्यांनी 'प्रवासी दिना'ला विशेष महत्त्व दिले होते. प्रवाशांना थेट तक्रारी मांडता याव्या, त्यांच्या अपेक्षा समजाव्या, यासाठी सर्व प्रमुख बसस्थानकांची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती. बस स्थानकांसह आगारांमध्येही त्याबद्दल माहिती दिली जात होती. त्यामुळे, प्रवाशांच्या तक्रारी, सूचनांच्या संख्येत वाढ झाली होती. त्यांच्या सूचनांनुसार करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहितीही प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात येत होती. परंतु, गेल्या चार-सहा महिन्यांमध्ये प्रवासी दिनाकडे पुरेसे लक्ष दिले जात नसून, केवळ उपचार म्हणून त्याचे नियोजन केले जात आहे.

'अॅप' विकसित करण्याची मागणी

प्रवासी दिनाच्या माध्यमातून प्रवाशांच्या तक्रारी, समस्या दूर करण्याचा पीएमपीचा प्रयत्न असला, तरी त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे, प्रवाशांशी संपर्क वाढविण्यासाठी 'अॅप' किंवा ट्विटरसारख्या आधुनिक माध्यमाचा वापर करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पीएमपीतर्फे मोबाइल अॅप विकसित केले जाणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले गेले होते. दिल्ली मेट्रोसह मुंबईत धावणाऱ्या उपनगरी सेवेची सर्व माहिती अॅपद्वारे प्रवाशांना मिळत असताना, पुण्यात सार्वजनिक वाहतुकीचे प्रमुख साधन असलेली पीएमपी अद्याप त्यापासून दूरच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील धरणे आली निम्म्यावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या काही महिन्यांत झालेल्या पाणीवापरामुळे राज्यातील प्रमुख धरणांमध्ये सद्यस्थितीत फक्त ५१ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून, पुढील आठ महिने या धरणांतील पाणी वापरासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. मराठवाड्यासह पुणे व नाशिक विभागातील शेतीचे पाणी बंद करण्यावरही निर्बंध येण्याची शक्यता आहे.

अपुऱ्या पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होऊ शकलेला नाही. मोठ्या, मध्यम व लघू धरण प्रकल्पांमध्ये जेमतेम ५६ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा होऊ शकला. पावसाळा संपल्यानंतर शेती व पिण्यासाठी धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात धरणांचा पाणीसाठा कमी होऊन ५१ टक्क्यांवर आला आहे. काही धरणांमधून खरीपासाठी पाण्याचे आवर्तन देण्यात आले. रब्बी पिकांसाठीही काही आवर्तनांचे नियोजन करण्यात येत आहे.

मराठवाड्यातील धरणांमध्ये १६ टक्के पाणीसाठा झाला होता. हा पाणीसाठा आता १४ टक्क्यांवर आला आहे. मराठवाड्यात शेती व पिण्यासाठी पाण्याची गरज असल्याने पुणे जिल्ह्यातून पाणी सोडण्याचे आदेश जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिले आहेत. तसेच जायकवाडी धरणांतही पाणी सोडण्याचे आदेश आहेत. तुटीच्या खोऱ्यातील धरणांमध्ये अन्य खोऱ्यांमधून पाणी देण्याचे निर्णय झाल्यास जलसंपदा विभागाला पाण्याच्या नियोजनासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे दिसते.

मराठवाड्यातील जायकवाडी धरणात फक्त ६ टक्के, पूर्णा सिद्धेश्वर धरणात २ टक्के, मनारमध्ये एक टक्का, येलदरी धरणात १५ टक्के, पेनगंगा धरणात ३४ टक्के पाणीसाठा आहे. हे पाणी मराठवाड्याची तहान वर्षभर भागवू शकणार नाही.

पुण्यातील पानशेत धरणात ६९ टक्के, वरसगावमध्ये ४४ टक्के, टेमघर धरणात ४३ टक्के व खडकवासला धरणामध्ये ४१ टक्के पाणीसाठा आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी ही चार धरणे यंदा पूर्ण भरू शकली नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकरांनाही स्वस्त तूरडाळ

$
0
0

दहा टनांचा साठा दाखल; मर्चंट्स चेंबरद्वारे वितरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राजकीय विरोधकांसह पुणेकरांमधून नाराजी व्यक्त होऊ लागल्यानंतर राज्य सरकारने पुणेकरांनाही स्वस्त तूरडाळ उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. मुंबईतील एका व्यापाऱ्याकडून दहा डाळ घेऊन ती आजपासून (रविवार) पुणे मर्चंट्स चेंबरच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे.

सेना भाजपाच्या नेत्यांनी कमी किंमतीत तूरडाळ उपलब्ध करण्याच्या घोषणा केल्या असल्या तरी प्रत्यक्षात पुणेकरांच्या हातीच काहीच आले नाही. या पार्श्वभूमीवर, पुण्यातील राजकीय विरोधकांनी आवाज उठविण्यास सुरुवात केल्याने अखेर पुणेकरांना रविवारी १०० रुपये दराने तूरडाळ उपलब्ध होणार आहे.

विभागीय आयुक्तांशी झालेल्या बैठकीत सरकारने डाळ उपलब्ध केल्यास विक्रीची व्यवस्था करू, असे व्यापाऱ्यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर सरकारने मुंबईतील एका व्यापाऱ्यामार्फत १० टन तूरडाळ उपलब्ध करून दिली असून रविवारी सकाळी तूरडाळ घेऊन येणारा ट्रक पुण्यात पोहोचणार आहे. दि पूना मर्चंट्स चेंबरच्या कार्यालयाबाहेरील लाडू चिवडा विक्री केंद्रात १०० रुपये दराने विक्री सुरू केली जाईल, अशी माहिती दि पूना मर्चंटचे चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी दिली.

डाळ आवाक्याबाहेरच

दोन दिवसांत तूरडाळीच्या दरात क्विंटलमागे एक हजार रुपयांनी घट झाल्याने घाऊक बाजारात किलोसाठी १५५रुपये दर मोजावे लागणार आहेत. तर किरकोळीत १७० ते १८० रुपये दर आहे. परिणामी, सामान्य पुणेकरांना तूरडाळ खरेदी करणे अशक्यच आहे. दोन दिवसांत तूरडाळीच्या दरात क्विंटलमागे एक हजार रुपयांची घट होऊन हे दर १२ हजार ते १५ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साहिलचा घरगुती 'डेली सोप'

$
0
0

श्रीपाद ब्रम्हे

बारा वर्षांचा मुलगा छंद म्हणून काय करू शकेल? व्हिडिओ गेममध्ये प्रावीण्य मिळवू शकेल किंवा चांगलं सायकलिंग करू शकेल. फार तर कथा-कविताही लिहू शकेल; पण बारा वर्षांचा मुलगा घरी उत्तम दर्जाचे साबण बनवू शकेल, असं कुणी सांगितलं तर? नक्कीच आपला लवकर विश्वास बसणार नाही. साहिल आशुतोष गुप्ता या पोराचं सगळंच और आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांत या मुलानं स्वतः सर्व मिश्रण तयार करून एक हजारच्या वर साबण बनवले आहेत आणि त्याच्याकडून दिवाळीसाठी हे साबण विकत घेणाऱ्यांची संख्या रोज वाढते आहे.

गुटगुटीत, गोंडस साहिलला भेटल्यावर एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे हा मुलगा प्रचंड सर्जनशील आहे. त्याच्या डोक्यात अखंड काही ना काही सुरू असतं. म्हणून तर मग मास्टरशेफ स्पर्धेच्या ज्युनिअर राउंडला तो चौथ्या फेरीपर्यंत गेला होता. डावखुरा नसतानाही उजव्या हाताला लागल्यानंतर शाळेच्या चित्रकला स्पर्धेत डाव्या हातानं चित्र काढून त्यानं पहिला नंबर मिळविला होता. या गोष्टी कपोलकल्पित न वाटता खऱ्याच आहेत यावर विश्वास ठेवणं सहज शक्य होतं. वयाच्या सातव्या वर्षी त्यानं आणि बहिणीनं चहा बनवण्याचा प्रयोग केला. तेव्हापासून आज सर्व घराचा पोळी, भात-भाजी असा सगळा स्वयंपाक करू शकण्यापर्यंत साहिलनं मजल मारली आहे.

हे साबणाचं वेडही असंच एका हॉटेलातला साबण न आवडण्यातून आलं. मग साहिलनं त्याचे प्रयोग सुरू केले. सुरुवात फसली; पण एका वर्कशॉपमध्ये भाग घेतल्यावर त्याला साबण कसा बनवतात हे व्यवस्थित कळलं. मग त्यानं तिथून मागं वळून पाहिलंच नाही. गेल्या तीन-चार महिन्यांत त्याला फक्त साबण तयार करण्याचा छंद जडला आहे. अनेकविध आकारांचे आणि सुगंधाचे साबण त्यानं तयार केले आहेत. उद्योजक असलेल्या त्याच्या वडिलांचं - आशुतोष गुप्तांचं - आणि माहेरच्या सरदेसाई असलेल्या आईचं - वृषाली गुप्तांचं प्रोत्साहन तर त्याला आहेच. गुप्ता आणि सरदेसाई दोन्हीकडच्या सगळ्या नातेवाइकांना आपल्या घरातल्या या चिमुकल्या 'आंत्रप्रेन्युअर'चं प्रचंड कौतुक आहे. मिटकॉनसारख्या संस्थेनं मग खास साहिलसाठी त्यांच्या वर्कशॉपसाठीची वयाची अट शिथिल केली, हेही स्वाभाविकच वाटू लागतं.

साहिलला आईच्या इच्छेनुसार पुढं डॉक्टर व्हायचंय. आता तो काहीही होऊ शकतो, असं त्याच्या पालकांना वाटतंय. लॉयला हायस्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या साहिलला न आवडणारी फक्त एकच गोष्ट आहे - शाळेमुळं करावा लागणारा मिलिटरी हेअरकट. बाकी साहिलचा 'डेली सोप' जोरात सुरू आहे.

मोठे परीक्षार्थी अन् चिमुकला परीक्षक

साहिल गुप्ताला मास्टरशेफ स्पर्धेतील यशानंतर राजगुरुनगर येथे एका रेसिपी स्पर्धेत चक्क परीक्षक म्हणून बोलावणं आलं. इतर परीक्षकांपेक्षा हा चिमुकला परीक्षक पाहून परीक्षार्थींना आश्चर्यच वाटलं. मात्र, साहिलला पदार्थांमधल्या घटकांची आणि त्यांच्या प्रमाणाची असलेली जाणीव पाहून ते थक्क झाले. लहानपणापासून कुठलाही पॅकबंद पदार्थ घेतला, की त्यातले घटक पदार्थ वाचण्याची त्याची सवय इथं उपयोगाला आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासी गर्दीचा रविवार

$
0
0

दिवाळीमुळे रेल्वे, एसटी, टुरिस्ट कॅब फुल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दिवाळ सणासाठी गा‍वी जाणाऱ्यांनी रविवारच्या सुटीचा मुहूर्त साधल्याने शहरातील सर्व एसटी स्टँड, पुणे रेल्वे स्टेशन आणि खासगी वाहतूकदारांच्या विविध ठिकाणच्या थांब्यांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म एकवर गर्दीचा महापूर असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.

नोकरी किंवा शिक्षणासाठी मूळ गाव व शहर सोडून पुण्यात स्थायिक झालेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा नागरिकांचे प्रत्येक महत्त्वाच्या सणवाराला गावी जाण्याचे प्रमाण अधिक असते. यंदा दिवाळीला शनिवारपासूनच सुरुवात झाली असली, तरीही रविवारच्या सुटीच्या दिवशी प्रवासाला अनेकांनी पसंती दिल्याचे निदर्शनास आले. शहरातील एसटी स्टँडमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी जागा अपुरी पडत होती. त्यामुळे अनेकांना ताटकळत उभे राहावे लागले. त्यातच शिवाजीनगर व स्वारगेट स्टँडवर अस्वच्छता असल्याचे पाहायला मिळाले. प्रवाशांना बसण्यासाठी उपलब्ध असलेल्या खुर्च्यांखाली कचरा पडला होता. अनेक ठिकाणी भिकारी झोपले होते. स्वच्छतागृहांची दुर्गंधी बाहेरपर्यंत पसरली होती. स्वारगेट स्टँडमध्ये स्वच्छतागृहाबाहेर पाणी साचले होते.

पुणे रेल्वे स्टेशनबाहेर पुणे-मुंबई दरम्यान चालणाऱ्या टुरिस्ट कॅब ऑपरेट केल्या जातात. या कॅबलाही प्रवाशांचा नेहमीपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. येथेही प्रवाशांची गर्दी होती. अनेकांना कॅब मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली.

रविवारी पुणे स्टेशनहून सुटलेल्या किंवा पुणे मार्गे गेलेल्या प्रत्येक गाडीला गर्दी होती. काही गाड्यांमध्ये आरक्षित डब्यांनाही जनरल डब्याचे स्वरूप आले होते. जनरल डब्यात बसण्यासाठी प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या रांगेत क्रमांकावरून प्रवाशांमध्ये वादावादीही झाल्याचे पाहायला मिळाले. गाड्यांना प्रचंड गर्दी असूनही करंट तिकीट काढण्यासाठीही काउंटरवर गर्दी होती.

एसटी स्टँडमध्ये एखादी गाडी कोणत्या फलाटावर थांबेल, याची माहिती देण्यासाठी ध्वनीवर्धकाबरोबरच एलईडी स्क्रीनचा वापर करण्यात आला. यापूर्वी त्या स्क्रीनवर जाहिराती प्रसारित केल्या जात होत्या. ध्वनीवर्धकावर दिल्या जाणाऱ्या सूचना कधीकधी खराब आवाजामुळे समजत नव्हत्या. मात्र, या स्क्रीनमुळे प्रवाशांची चांगली सोय झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांच्या सेवेतच दीपोत्सवाचा आनंद

$
0
0

पुणे : दिवाळीच्या काळात प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सर्व ड्रायव्हर, कंडक्टरांच्या सुट्या रद्द केल्या जातात. त्यामुळे कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करताच येत नाही. आमची दिवाळी धावपळीतच असते, अशा भावना एसटीच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.

देशभरात दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात असताना, एसटीच्या कर्मचाऱ्यांना मात्र त्यापासून वंचित राहावे लागते. दिवाळीत एसटीकडून जादा गाड्या सोडल्या जातात. त्यामुळे जास्तीत जास्त मनुष्यबळ कामावर उपलब्ध ठेवले जाते. त्यामुळे त्यांच्या हक्काच्या सुट्याही त्यांना दिल्या जात नाही. या सर्वांत ड्रायव्हर, कंडक्टर व अन्य कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीच्या काळात कामावर जावे लागते. कामाचा एक भाग व त्या पदाचे कर्तव्य म्हणून ते कामावर हजर राहतातही, मात्र प्रत्येकच सणासुदीला कुटुंबीयांसोबत नसल्याची खंतही व्यक्त करतात.

'एसटीमध्ये कामाला लागून चार वर्षे झाली. या चार वर्षांत केवळ एकदाच दिवाळीला घरी गेलो आहे. उर्वरित तीन वर्षांत माझा दिवाळ सण हा इतरांनी दिवाळी सुरू होण्यापूर्वी किंवा सर्वांची दिवाळी संपल्यानंतर साजरा केला गेला. याही वर्षी तीच परिस्थिती आहे,' असे कंडक्टर एस. बी. सानप यांनी सांगितले. तर, 'मी दिवाळीला माझ्या कुटुंबीयांसोबत नसल्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे यंदा चुकल्या चुकल्या सारखे वाटत आहे,' असे कंडक्टर जी. एस. बऱ्हाळे यांनी सांगितले. ड्रायव्हर व्ही. डी. देशपांडे म्हणाले, 'गेल्या सहा वर्षांच्या सर्व्हिसमध्ये एकदाही दिवाळीला घरी गेलो नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता हीच आमची ‘लक्ष्मी’

$
0
0

Chaitanya.Machale@timesgroup.com

पुणे : दिवाळी असो अथवा अन्य कोणताही सण सकाळी उशिरा उठायचे, कुटुंबाबरोबर न्याहरी करायची, गप्पा मारायच्या किंवा बाहेर फिरायला जायचे या सर्व गोष्टी सणाच्या काळात कधीही शक्य होत नाहीत. दिवाळी सुरू होते सकाळी पण आम्ही साजरी करतो दुपारनंतरच! काय करणार कामाचाच भाग आहे ना. कामाकडे दुर्लक्ष कसे करणार. रस्त्यांवर 'साफसफाई' करणे हीच आमची 'ड्युटी' असल्याने यावर आमचा संसार चालतो.

रस्ते सफाई काम करणाऱ्या शैला वामन क्षीरसागर भरभरून बोलत होत्या. गेली अनेक वर्षे क्षीरसागर यांच्यासारखे अनेक कर्मचारी महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्याच मनातील ही प्रातिनिधिक भावना आहे. पालिकेच्या विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत क्षीरसागर झाडणकाम करतात. सफाई कामगार म्हणून काम करण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे सणाला सुट्टी मिळावी, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. प्रत्येकानेच सणाला सुट्टी मिळावी, अशी इच्छा ठेवली तर शहर स्वच्छ कसे राहणार! शहरातील रस्त्यावर साठलेला कचरा उचलून रस्ते स्वच्छ करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. हीच जबाबदारी पार पाडण्यासाठीच आमची नियुक्ती असल्याने सणांचे दिवस असो अथवा इतर दिवस आमचे काम तर पूर्ण करावेच लागते, असे क्षीरसागर सांगतात.

दिवाळीचा सण असो इतर कुठलाही सण. लवकर उठायचे आवरून सहा वाजेपर्यंत ड्युटीच्या ठिकाणी हजर राहायचे. दिलेल्या वेळेत ठरवून दिलेले रस्ते झाडून स्वच्छ करायचे. त्यावरील कचरा गोळा करायचा, तो एका बकेटमध्ये भरून पालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या गाडीत द्यायचा. त्यानंतर एखाद्या सहकारी कामगाराने सुट्टी घेतली असल्यास त्याला नेमून दिलेला रस्ता स्वच्छ करायचा. प्रत्येकाला वाटून दिलेल्या कामानुसार आठवड्यातील एक सुट्टी मिळते. मात्र सुट्टीच्या दिवशीच सण आला तर सुट्टी रद्द करून कामाला जावे लागते, याची जाणीव असल्याने फारशा अडचणी येत नसल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

स्वच्छतेचा वसा घेतल्याने कुटुंबाबरोबर सकाळी फराळ खाता येत नाही, तसेच कोणत्याही नातेवाईकांकडे जाता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण कामाचा भाग असल्याने आता कुटुंबातील व्यक्तींनाही याची सवयच झाली आहे. दिवाळीच्या सणाला कुटुंबाबरोबर सुट्टीसाठी बाहेर गेलो आहे, असे कधी घडत नाही. आनंदाने सण साजरा करणाऱ्या लाखो पुणेकरांचे आरोग्य चांगले राहावे, सणाला बाहेर पडणाऱ्या नागरिकांना रस्ते स्वच्छ दिसावेत, हेच आपले काम असल्याने ही जबाबदारी पार पाडावीच लागते, असे वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरक्षक दीपक ढेलवाण यांनी स्पष्ट केले. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात दीडशे ते पावणेदोनशे कर्मचारी दररोज स्वच्छतेची जबाबदारी पार पाडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेशी गैरवर्तनाप्रकरणी रिक्षाचालकाला शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सुट्ट्या पैशांच्या वादातून भर रस्त्यात एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी रिक्षाचालकाला कोर्ट उठेपर्यंत उभे राहण्याची, तसेच दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच दंड न भरल्यास एक​ दिवसाची साध्या कैदेची ​शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुनयना पिंगळे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

रामचंद्र हरिभाऊ नलावडे असे रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली होती. नलावडे रिक्षाचालक असून, संबंधित महिला १२ डिसेंबर २०१२ रोजी या रिक्षातून प्रवास करत होती. सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास त्या सूर्या हॉस्पिटलच्या समोरील बसथांब्याजवळ रिक्षातून उतरल्या. त्यांचे रिक्षाभाडे ११ रुपये एवढे झाले होते. त्यासाठी त्यांनी ५० रुपये दिले; पण सुट्टे पैसे नसल्याचे सांगून त्याने २० घेतले तर चालतील का, असे महिलेला विचारले. महिलेने परिसरातील ओळखीच्या लोकांकडून सुट्टे ११ रुपये मिळवून रिक्षाचालकाला दिले. त्यानंतर रिक्षावाल्याने महिलेला शिवीगाळ करून असभ्य वर्तन केले. या केसमध्ये सरकारी वकील गौरी लकडे यांनी फिर्यादीसह तीन साक्षीदार तपासले. पोलिस हवालदार सरावते आणि महिला पोलिस हवालदार झगडे यांनी तपासकामी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images