Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चांद्रयान- २ स्वबळावर राबविणार

0
0
चंद्राचा अभ्यास करण्यासाठी स्वबळावर चंद्रावर बग्गी उतरवण्याबरोबरच उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी पुन्हा पुन्हा वापरता येतील असा प्रक्षेपक बनविणे आणि मंगळावर यान पाठविण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) सध्या काम करत आहे. चंद्रावर पाठवण्यात येणारी बग्गी सध्या बेंगळुरू आणि त्रिवेंद्रम येथे बनविण्यात येत आहे.

२५ लाखांमध्ये असदची परदेशवारी?

0
0
दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या तिघा दहशतवाद्यांपैकी औरंगाबादमधील असद खान याने सौदी अरेबियातील ‘लष्कर ए तोयबा’च्या फैय्याज कागझीला भेटण्यासाठी सुमारे २५ लाखांहून अधिक पैसा खर्च केल्याची पोलिस वर्तुळात चर्चा आहे. ‘दहशतवाद विरोधी पथका’ने (एटीएस) असदच्या बँक खात्यांची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. असदला हा पैसा कोणी पुरविला? आणि का? या बाबतही दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

'तो' आवाज लोकमान्यांचा नाही

0
0
लोकमान्य टिळक यांच्या आवाजाचे ध्वनिमुद्रण सापडल्याचे सांगितले जात असले, तरी तो आवाज टिळकांचा नाही, हे उपलब्ध कागदपत्रांवरून सिद्ध होत असल्याचा दावा 'सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स' यांच्यातर्फे शुक्रवारी करण्यात आला. त्यामुळे आता हा आवाज कोणाचा याचे संशोधन होणार आहे.

मध्यावधीबाबत बोललोच नाहीः पवार

0
0
देशात मध्यावधी निवडणुका होतील किंवा नाही, याबाबत मी कुठलेही भाकित वर्तवले नव्हते, मीडियानंच माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतला, अशी पलटी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारली आहे. अजित पवार यांच्या तापाशी राजकीय संदर्भ जोडू नका, असंही त्यांनी आवर्जून सांगितलंय.

विद्यार्थ्यांच्या समस्याही चर्चेत

0
0
रिफेक्टरी, मेस आणि होस्टेलमधील समस्या आदी विद्यार्थिकेंद्रित प्रश्नांभोवती शनिवारी सिनेटच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. प्राध्यापकांच्या जिव्हाळ्याचा ‘लीव्ह एन्कॅशमेंट’चा प्रश्न, इंजिनीअरिंग कॉलेजांतील रिक्त जागा, व्यवस्थापन विद्याशाखेला नियमित करण्याबाबत पाठपुरावा आदी विषयही चर्चेला आले.

परीक्षेच्या 'परीक्षे'त विद्यापीठ पास!

0
0
पुणे विद्यापीठाच्या शनिवारी झालेल्या सिनेट बैठकीत परीक्षा विभागाच्या ‘ऑटोमेशन’वर प्रारंभी टीकेचा सूर आणि कुलगुरूंच्या स्पष्टीकरणानंतर माघार असे चित्र पाहायला मिळाले.

‘लिव्ह इन’मधून झाला ‘त्या’ तरुणीचा खून

0
0
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर (सीएसटी) सूटकेसमध्ये सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे गूढ उलगडले. तिच्याबरोबर तब्बल दहा वर्षे 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहत असलेल्या प्रवीण ठाकरेने दुस-या तरुणीशी संबंध जुळल्यामुळे गळा दाबून हा खून केला होता.

वाहतूक समस्या मार्गी लावण्यासाठी मानवी साख‍ळी

0
0
सिंहगड रोडसाठीचे पर्यारी रस्त्यांचे काम लवकरात लवकर करून ते सुरू करावेत, वाहतूक पोलिसांच्या नेमणुका वाढवाव्यात, रोडवरील अतिक्रमणे तातडीने हटवावीत तसेच उड्डाणपूल करावा अशा विविध मागण्या हिंगणे खुर्द, आनंदनगर, माणिकबाग येथील नागरिकांनी मानवी साखळीच्या माध्यमातून मांडल्या.

मोबाईल टॉवर दुरुस्तीच्या बहाण्याने आसरा

0
0
‘आम्ही मोबाइल टॉवर दुरुस्तीचे कामे करतो,’ असे कारण सांगून पुणे साखळी बॉम्बस्फोटाच्या दहशदवाद्यांनी कासारवाडी येथे भाडेतत्वावर घर मिळविले. तसेच, मोबाइल टॉवर दुरूस्तीच्या बहाण्यामुळे त्यांना इलेक्ट्रॉनिक्स व बॉम्ब बनविण्याचे साहित्यही बिनबोभाट फ्लॅटमध्ये हाताळता आले.

स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू

0
0
‘स्वाइन फ्लू’च्या संसर्गाने प्रल्हाद नारायण पाटील (वय ४६, रा. जळगाव) यांचा खासगी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे आतापर्यंतच्या मृतांची संख्या २१ झाली आहे.

शॉकने चिमुकल्याचा मृत्यू

0
0
हौसिंग सोसायटीमधील बागेत खेळत असताना तेथील एका वीज प्रवाह चालू असलेल्या खांबाला स्पर्श केल्यामुळे विजेचा धक्का बसून शुक्रवारी एका सव्वा वर्षाच्या चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागला.

अंधांसाठी ऑडिओ रुपात 'सचिन'

0
0
पुणे अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक अंध दिन (१५ ऑक्टोबर) वेगळ्या पद्धतीने साजरा करायचे ठरविले असून, या दिवशी संजय दुधाने लिखित ‘ध्रुवतारा’ या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पुस्तकाचे या उत्साही क्रिकेटवेड्या नेत्रहीन विद्यार्थ्यांनी चक्क ऑडिओ बुक तयार केले आहे.

अमिताभ FBवर अधिक लोकप्रिय

0
0
फेसबुकवर सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस लगेच समजतो. पण, गुरू गोविंदसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला क्लिक केले जात नाही, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी युवा पिढीच्या मानसिकतेवर शनिवारी पुण्यात भाष्य केले.

कासारवाडीची दारे बंद झाली!

0
0
पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी कासारवाडी येथे वास्तव्यास असल्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ पसरताच त्या परिसरामध्ये कमालीची शांतता पसरली. हे दहशतवादी आपल्या भागात महिनाभर राहत होते आणि आपल्याला कळालेही नाही, असा सवाल नागरिकांच्या चेह-यावर होता.

२५ औषधांवर बंदी

0
0
प्रतिजैविके, पचनक्रिया, जळजळ होणे, तसेच टॉनिकसारख्या २५ औषधांच्या काही ठराविक बॅचेसमध्ये कमी प्रतीची औषधे आढळल्याने त्यावर ‘अन्न व औषध प्रशासना’ने (एफडीए) बंदी घातली आहे. बंदी घातलेली औषधे विक्री न करता बाजारातून मागविण्याचे आदेश कंपन्यांना देण्यात आले आहेत.

अत्यावश्यक औषधांसाठी हेल्पलाइन

0
0
राज्यातील साठ हजारांहून औषध विक्रेते आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (एफडीए) यांच्या शीतयुद्धानंतर औषध विक्रेत्यांनी आता थेट संपाचे शस्त्र उगारले आहे. मात्र, अत्यावश्यक औषधांअभावी पेशंटची गैरसोय होऊ नये यासाठी शहर व जिल्ह्यांत औषधांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे.

शाळा कोल्हापुरात... वीकेंडचा क्लास पुण्यात!

0
0
पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्नशील असलेल्या पालकवर्गामुळे शाळा ‘कोल्हापुरात, वीकेंडचा क्लास मात्र पुण्यात,’ असा नवीन ट्रेंड शिक्षणविश्वात रूजतो आहे!

'त्या' कुटुंबांना संरक्षण नाही

0
0
‘इंडियन मुजाहिदीन’चा सदस्य कातिल सिद्दीकीचा येरवडा कारागृहातील अंडासेलमध्ये खून करणाऱ्या गुंड शरद मोहोळ आणि अशोक भालेराव या दोघांच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण देणार नसल्याचे पोलिसांनी शनिवारी स्पष्ट केले.

ध्येयनिष्ठ डॉक्टरांमुळे वैद्यकीय व्यवसाय टिकून

0
0
‘पैसे मिळविणे हा वैद्यकीय व्यवसायाचा मूलभूत हेतू नाही. तर त्याग हा या व्यवसायातील महत्त्वाचा गुण आहे. सध्या वैद्यकीय व्यवसायात कॉर्पोरेट कल्चर वाढले आहे. अशा परिस्थितीत व्यवसाय नव्हे तर ध्येय म्हणून काम करणाऱ्या डॉ. अशोक कुकडे यांच्यासारख्या डॉक्टरांमुळेच हा व्यवसाय टिकून आहे,’ असे मत ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांनी रविवारी व्यक्त केले.

‘सुवर्णरत्न’ चा ‘स्वच्छ’ साठी मदतीचा हात

0
0
घरातले जुने कपडे, रद्दीपासून विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू आणि सायकलींपर्यंतच्या टेंपोभर वस्तू कर्वेनगरमधील एका सोसायटीने गरिबांसाठी दिल्या. कर्वेनगरमधील ‘सुवर्णरत्न गार्डन’ सोसायटीतील रहिवाशांनी ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून गरिबांसाठी ही मदत दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images