Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आजची बैठक शिक्षकांच्या प्रश्नांनी गाजणार

0
0
पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची शनिवारी (१३ ऑक्टोबर) होऊ घातलेली बैठक शिक्षकांच्या प्रश्नांवर गाजणार, अशी चिन्हे आहेत. शिक्षक संघटनांनी शुक्रवारीच त्याची झलक दाखवून कुलगुरू कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी उपोषण केले. हे आंदोलन शनिवारीही सुरू राहणार असून, या मागण्यांबाबत अधिसभेतही स्थगन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

औषध विक्रेत्यांचा राज्यव्यापी संप

0
0
गर्भनिरोधक गोळ्यांच्या (एमटीपी) विक्रीची तपासणी, त्यावरून विक्रेत्यांवर दाखल केलेले खटले, टीबीच्या पेशंटची नोंदणी आणि रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्याची केलेली सक्ती यासारख्या जाचक अटींमुळे अन्न व औषध प्रशासनाबरोबर (एफडीए) शीतयुद्ध करणा-या महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने (एमएससीडीए) आता थेट बंडाचा झेंडा उगारत तीन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

परीक्षा सुरू झाल्यानंतरही विद्यापीठ ‘कॅप’विनाच!

0
0
कॉलजांऐवजी विद्यापीठाच्याच कॅम्पसवर केंद्रीय मूल्यमापन प्रक्रिया (कॅप) राबविण्याचा घेतलेला निर्णय पहिल्या फेरीत ‘नापास’ ठरला आहे. पुणे विद्यापीठाच्या आर्ट‍स, कॉमर्स आणि सायन्स शाखेच्या परीक्षा सुरू होऊन आठवडा उलटून गेला तरी ‘कॅप’ सुरू झालेली नाही.

व्यवहार सुरळीत, पण भीतीचे सावट

0
0
फिरोज सय्यद पोलिसांच्या ताब्यात असल्याचे जाहीर झाल्याच्या ‌दुसऱ्या दिवशी कॅम्पातील कुरेशी मशीद चौकातील व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र, दहशतवादी आपल्या शेजारी राहत होता, या विचाराने अनेकांच्या चेह-यावर भीतीचे सावट होते. खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील त्याच्या तीनही दुकानांपुढे पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

ZP च्या शाळांमध्ये ‘ई शिक्षा प्रकल्प’

0
0
जिल्हा परिषदेच्या हजार शाळांमध्ये वेदांत फाऊंडेशनच्या वतीने मोफत ‘ई शिक्षा प्रकल्प’ राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम राबविण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासन आणि वेदांत फाऊंडेशन यांच्यामध्ये सामंजस्य करार (एमओयु) नुकताच करण्यात आला.

पोलिस बंदोबस्त चोख; अंतर्गत सुरक्षेचे तीनतेरा

0
0
शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात निरूद्देश भटकणा-यांवर कोर्टातील साध्या वेशातील पोलिसांची करडी नजर आहे. या पार्श्वभूमीवर वर्षभरात संशयास्पद वाटणा-या साधारणतः ११००हून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसव्यवस्था चोख असली, तरी अंतर्गत सुरक्षायंत्रणेचे मात्र बारा वाजले आहेत.

‘बॉम्बच्या फॅक्टरी’बाबत पोलिस अजूनही अंधारात

0
0
पुण्यात साखळी स्फोट घडविण्यासाठीच्या बॉम्बची जुळणी तब्बल दोन आठवडे कासारवाडीत सुरू असल्याची धक्कादायक माहिती उजेडात येऊनही पुणे पोलिस मात्र अजून अंधारातच आहेत. दहशतवादी कोणता फ्लॅट भाड्याने घेऊन राहिले होते, याचा भोसरी पोलिसांना थांगपत्ता नसून दिल्लीहून माहिती प्राप्त झाली नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.

कॉलेजांत मतदार नोंदणी मोहीम

0
0
शहरातील विविध कॉलेजांत मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार असून, नागरिकांच्या सोयीसाठी नागरी सुविधा केंद्रातही मतदान नोंदणीचे फॉर्म उपलब्ध केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी शुक्रवारी दिली.

१५ वर्षीय नारंग कराचीहून येणार कसे?

0
0
लोकमान्य टिळक यांच्या आवाजाच्या ध्वनिमुद्रणाचे दाखलेही ‘सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स’ या संस्थेने खोडून काढले आहेत.

माजी राष्ट्रपतींच्या कन्येचा सरकारी भूखंड अडचणीत

0
0
राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याशी संबंधित कासेगाव एज्युकेशन संस्था व माजी राष्ट्रपतींच्या कन्या ज्योती राठोड यांच्या महिला उद्यम ट्रस्टसह बारा संस्थांना देण्यात आलेली पुण्यातील सरकारी जमीन शर्तभंग झाल्यामुळे पुन्हा सरकारजमा करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी राज्य सरकारला पाठविला आहे.

वनरक्षक भरतीची यादी प्रसिद्ध

0
0
वनरक्षक भरती २०१२-१३साठी अर्ज केलेल्या अर्जदारांची पात्र आणि अपात्र करण्यात आलेली यादी पुणे वनवृत्ताच्या www.ccfpune.org आणि www.mahaforest.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली आहे.

‘यंग चेंजमेकर्स’ची चळवळ ओडिशातही

0
0
बदल घडविण्याची ताकद युवाशक्तीत असते, या मूळ संकल्पनेतून पुण्यात सुरू झालेली ‘यंग चेंजमेकर्स’ ही चळवळ आता ओडिशातही पोचणार आहे. विशेष म्हणजे याच उपक्रमात चमकलेले दोन विद्यार्थीच या उपक्रमाची माहिती ओडिशातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणार आहेत.

प्रतीक खून : मुख्य आरोपी खैरे अटकेत

0
0
प्रतीक कुलकर्णी खून प्रकरणातील प्रमुख आरोपी, अट्टल गुन्हेगार देवेंद्र खैरे हा आठ महिन्यानंतर अखेर कोथरूड पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी (१२ ऑक्टोबर) सकाळी ताब्यात घेतले आहे.

‘सोशल नेटवर्किंग’द्वारेच स्फोटाचे कट

0
0
‘लष्कर ए तय्यबा’कडून दहशतवादाच्या ‘नेटवर्क’मध्ये धर्मांधांना ओढण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइटचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत असल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. पुण्यातील स्फोट घडवून आणणारे फिरोज, असद आणि इम्रान यांनाही ‘सोशल नेटवर्किंग’द्वारे जाळ्यात ओढण्यात आले होते. या साइट्सवर बनविलेल्या वेगवेगळ्या ग्रुप्सच्या माध्यमातून या दहशतवाद्यांनी पुणे स्फोटाचे कारस्थान रचल्याचे समोर आले आहे.

MPSC प्रश्नांच्या उत्तरांवर प्रश्नचिन्ह

0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील काही प्रश्नांची उत्तरे चुकीची असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. तब्बल पाच प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार केली असून या प्रश्नांचे सर्व गुण देण्यात यावेत, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.

अपयश लपविण्यासाठीच भावाला गोवले

0
0
‘जंगली महाराज रस्त्यावरील स्फोटाला आता अडीच महिने होत असतानाच, पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. त्यांचे हे अपयश लपविण्यासाठीच दिल्ली पोलिसांनी माझ्या भावाला या घटनेत गोवले,’ असा आरोप फिरोजचा सख्खा धाकटा भाऊ फैय्याज सय्यद याने शुक्रवारी केला. तसेच, फिरोजच्या अटकेविरोधात कोर्टात न्याय मागणार असून, दिल्लीतील वकिलाशी मोबाईलवरून चर्चा सुरू असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

ब्लॅकआउटचे सक्तीचे मध्यंतर

0
0
‘झोपी गेलेला जागा झाला’चा रंगलेला नाट्यप्रयोग... अचानक लाइट जातात आणि नाटक थांबते... काही काळ नाट्यगृह अंधारात बुडते... ‘पुन्हा सही रे सही’ नाटकाचा प्रयोग चालू असताना बंद एसी आणि सदोष ध्वनियंत्रणेला कंटाळलेल्या प्रेक्षकांच्या गोंधळामुळे नाट्यप्रयोग थांबतो...

दुपारी चटका, रात्री गारवा

0
0
मान्सून माघारी परतल्यानंतर शहर आणि परिसरात दुपारच्या उन्हाचा चटका वाढला असून, रात्रीच्या गारव्यातही वाढ झाली आहे. शहरात शुक्रवारी ३३.१ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली असली तरी किमान तापमान १७.५ अंशांवर स्थिरावले आहे.

दोन किचनना दोन कनेक्शन ‘ओके’

0
0
एकाच पत्यावर घेण्यात आलेल्या दोन गॅस कनेक्शन पैकी एक कनेक्शन गॅस कंपनीला परत करण्याची मुदत येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे. मात्र असे असले तरी एकाच घरात जर दोन किचन असतील; तसेच एकच व्यक्ती दोन वेगवेगळ्या पत्यावर राहत असेल, अशा ग्राहकांना गॅसचे दोन कनेक्शन ठेवता येणार आहेत.

PMPच्या 'हेल्पलाइन'लाच हवी मदत

0
0
प्रवाशांच्या तक्रारी काय आहेत, यासाठी पीएमपी प्रशासनाने ऑगस्ट २०१० मध्ये हेल्पलाइनची सुविधा सुरू केली असली, तरी दुस-या बाजूला या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन उदासीन असल्याचे समोर आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images