Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बीआरटी ट्रॅकवर महिलेचा अपघाती मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'बीआरटी' ट्रॅकमध्ये घुसखोरी करणाऱ्या एका स्कोडा कारचालकाच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेचा बळी गेला. अपघातानंतर कार चालक पळून गेला आहे. रामटेकडी रेल्वे ओव्हर ब्रिजवर मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्विनी योगिराज देशमुख (वय २४, रा. महमंदवाडी) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी योगिराज देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्कोडा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुख दाम्पत्य महमंदवाडी येथे राहते. अश्विनी यांच्या भावाकडे ते हडपसरला जात असताना रामटेकडी येथील रेल्वे ओव्हर ब्रिजवर हा अपघात झाला.

योगिराज देशमुख शिवाजीनगर येथील एका कंपनीसाठी स्विमिंग टँकच्या मेंटेनन्सची कामे करतात. कंपनीने त्यांना दुचाकी दिली आहे. त्याच दुचाकीवरून ते महमंदवाडी येथून हडपसरकडे आपल्या पत्नीला घेऊन जात होते. देशमुख मूळचे लातूर येथील आहेत, अशी माहिती वानवडी पोलिसांनी दिली.

सोलापूर रोडवरील बीआरटी ट्रॅकवर भरधाव वेगात आलेल्या एका स्कोडा कारने दुसऱ्या कारला ओव्हरटेक केले होते. स्कोडा पुढे आली असता तिच्या कारचा धक्का देशमुख यांच्या दुचाकीला लागला होता. या धक्क्याने देशमुख यांची दुचाकीला झटका बसला आणि त्यांच्या पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी बीआरटी ट्रॅकवर पडली. या वेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या 'पीएमपी'खाली त्यांची पत्नी चिरडली गेली. त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांना ‘इस्रो’ची माहिती

$
0
0

'इस्रो'तर्फे १७ नोव्हेंबरला विशेष राष्ट्रीय परिषद

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) भविष्यातील मोहिमांची माहिती पुणेकर विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने येत्या १७ नोव्हेंबरला पुण्यात विशेष राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या एकदिवसीय परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अॅस्ट्रोसॅट मोहिमेची सखोल माहिती जाणून घेण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.

अंतराळ विज्ञानाचा प्रचार-प्रसार व्हावा, विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील संशोधन आणि करिअरच्या संधीची माहिती मिळावी या उद्देशाने विज्ञान भारती आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीतर्फे पुण्यात ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. 'इस्रो'चे अध्यक्ष डॉ. ए. एस. किरण कुमार, ज्येष्ठ अंतराळतज्ज्ञ आणि आयुकाचे माजी संचालक डॉ. अजित केंभावी, 'इस्रो'चे माजी समूह संचालक डॉ. सुरेश नाईक या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

इयत्ता नववी आणि त्या पुढील वर्गांमधील विद्यार्थी या परिषदेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यासाठी एका शाळेतून दोन शिक्षक आणि २५ विद्यार्थ्यांची माहिती vijnanbharatipune@gmail.com या ई-मेलवर २५ ऑक्टोबरपूर्वी पाठविण्याचे आवाहन विज्ञान भारतीने केले आहे. तसेच, कार्यक्रमादिवशी विद्यार्थ्यांना सकाळी ९.४५ ते १०.३० या वेळेत नावनोंदणी करणे गरजेचे आहे. परिषदेसाठी जागा मर्यादीत असल्याने, त्यानुसार विद्यार्थ्यांना सहभागाची संधी दिली जाणार असल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. रमेश कुलकर्णी यांनी गुरुवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.



प्रदर्शनाचे आयोजन

पुण्यात पहिल्यांदाच इस्रोने अंतराळविषयक प्रदर्शनाचेही आयोजन केले आहे. १७ नोव्हेंबरला दुपारी २ ते १९ नोव्हेंबरला दुपारी १ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. वॉटर रॉकेट फ्लइटचे सादरीकरण हे या प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरण्याची शक्यताही प्रा. कुलकर्णी यांनी वर्तविली. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, शाळांनी या प्रदर्शनाला भेट देण्यापूर्वी vijnanbharatipune@gmail.com या ई-मेलवर कळविण्याचे आवाहनही या निमित्ताने करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजी पूल करा दुचाकींसाठी खुला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या मध्यवर्ती भागातील संभाजी पूल (लकडी पूल) दुचाकींसाठी खुला करावा, असा ठराव गुरुवारी शहर सुधारणा समितीच्या बैठकीत करण्यात आला. कोणताही कायदेशीर आधार नसताना वाह‌तूक पोलिसांनी या पुलावरून दुचाकींना बंदी घातली असून, ती चुकीची असल्याचे सांगून हा ठराव मान्य करण्यात आला.

डेक्कन जिमखाना ते टिळक चौक (अलका टॉकीज) यांना जोडणाऱ्या लकडी पुलावरून सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत दुचाकी वाहनचालकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे डेक्कनवरून तसेच शास्त्री रोडने येणाऱ्या दुचाकीस्वारांना पुना हॉस्पिटल, गरवारे पूल, झेड ब्रिज किंवा भिडे पुलाचा वापर करावा लागतो. लकडी पूल दुचाकी वाहनांसाठी बंद असल्याचा बोर्ड वाहतूक शाखेने स्पष्टपणे दिसेल, अशा पद्धतीने लावलेला नाही. हा पूल दुचाकींना बंद करण्याबाबत महापालिका आणि वाहतूक पोलिस यांच्यात कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. याबाबतचे अधिकृत पत्र पालिकेकडे उपलब्ध नसल्याने हा पूल दुचाकींना खुला करावा, असा प्रस्ताव मनसेच्या नगरसेविका पुष्पा कनोजिया यांनी मांडला होता. यावर चर्चा होऊन प्रस्ताव मान्य करण्यात आल्याचे अध्यक्षा रुपाली पाटील यांनी सांगितले.



प्रस्तावावर विचार गरजेचा

मध्य शहरातून डेक्कनवर जाण्या येण्यासाठी दुचाकीस्वारांची होणारी कसरत लक्षात घेऊन दोन ते अडीच वर्षापूर्वी लकडी पूल दुचाकींना खुला करण्याचा विचार वाहतूक शाखेने सुरू केला होता. तत्कालीन वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा पूल दुचाकींसाठी खुला करता येइल, का याची चाचपणी सुरू केली होती. मात्र हा प्रस्ताव मागे पडला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोच्या बदलांना मान्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मेट्रो प्रकल्पावर निर्णय होत नसल्याने त्याच्या खर्चाचा भार पुणे-पिंपरीकरांना उचलावा लागणार असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करताच, शहरातील दोन्ही मेट्रो मार्ग तातडीने मार्गी लावावे, अशी विनंती राज्य सरकारने केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडे केली आहे. तसेच, गेल्या महिन्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीचे इतिवृत्तही मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने नगरविकास विभागाला पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे, पुण्याच्या मेट्रोसाठी अंतिम मान्यतेची पुढील प्रक्रिया आता वेगाने होण्याची चिन्हे आहेत.

दोनच दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराच्या एका खासदारांमुळे मेट्रोला विलंब होत असल्याची टीका केली होती. तसेच, या विलंबामुळे मेट्रोचा खर्च वाढत असून, त्याचा भार पुणे-पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनाच उचलावा लागणार असल्याकडेही लक्ष वेधले होते. त्यावरून, आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, राज्य सरकारने शहरातील दोन्ही मेट्रो मार्गांना अंतिम मंजुरी देण्यासाठी तातडीने पुढील प्रक्रिया करावी, असे पत्र केंद्रीय नगरविकास विभागाला पाठविले आहे.

भुयारी की एलिव्हेटेड या वादामुळे शहरातील मेट्रो प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेतच अडकला आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी गेल्या महिन्यात गडकरी यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यात, बापट समितीने केलेल्या सूचनांनुसार मेट्रोच्या सुधारित मार्गांना मंजुरी देण्यात आली. मेट्रोच्या प्रकल्प आराखड्यात (डीपीआर) अंशतः बदल असल्याने त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी आवश्यक होती. गडकरी यांच्या बैठकीच्या इतिवृत्ताला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.



पुढे काय ?

पुणे मेट्रोच्या आराखड्यातील प्रस्तावित बदलांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आता केंद्रीय नगरविकास मंत्रालयातर्फे सध्याच्या प्रचलित दरांनुसार मेट्रोचा खर्च निश्चित करून पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाच्या (पीआयबी) मान्यतेसाठी प्रकल्प सादर केला जाईल. पीआयबीच्या मान्यतेनंतर मेट्रोचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल. त्यानंतर, मेट्रोच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊ शकणार आहे. नागपूर मेट्रोच्या धर्तीवर सर्व प्रक्रिया वेगाने झाली, तर हा कालावधी महिन्याभरापर्यंत सीमित राहू शकतो; अन्यथा या सर्व प्रक्रियेला कदाचित तीन ते चार महिनेही लागू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अमृत’मुळे आर्थिक भुर्दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अटल नवनिर्माण आणि शहर परिवर्तन मिशन (अटल योजनेत‌ील) प्रकल्पासाठी महापालिकेला प्रकल्पाच्या तब्बल ५० टक्के निधीचा हिस्सा उचलावा लागणार आहे. आघाडी सरकारने सुरू केलेल्या जेएनएनयूआरएम योजनेच्या माध्यमातून पालिकेला प्रकल्पाच्या २० टक्के निधीचा वाटा उचलावा लागत होता. मात्र 'अमृत'मध्ये हा निधी ५० टक्क्यांवर गेल्याने अतिरिक्त ३० टक्क्यांचा भुर्दंड पालिकेला सोसावा लागणार असल्याने हा निधी उभारताना पालिकेचे अक्षरश: कंबरडे मोडणार आहे.

पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशातील पाचशे शहरांसाठी अमृत योजना सुरू केली आहे. आघाडी सरकारने यापूर्वी सुरू केलेल्या जेएनएनयूआरएम योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली आहे. जेएनएनयूआरएम योजनेमध्ये प्रकल्पांसाठी निधी देताना त्यामध्ये केंद्र शासनाचा वाटा ५० टक्के, राज्य सरकार ३० टक्के, तर पालिकेचा वाटा २० टक्के इतका होता. मात्र अमृत योजना जाहीर करताना त्यामध्ये केंद्राचा हिस्सा ३३ टक्के असेल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे केंद्राच्या ५० टक्यांच्या निधीतील उर्वरित १७ टक्के निधीचा बोजा राज्य सरकार घेणार की पालिकेला उचलावा लागणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. राज्य सरकारने अमृत योजनेचे मार्गदर्शक सूचनांचे आदेश काढले आहेत. त्यामध्ये या योजनेसाठी राज्य सरकारने केवळ १६.६७ म्हणजेच केंद्र सरकारने कमी केलेल्या निधीचा वाटा उचलला आहे. त्यामुळे प्रकल्प उभारताना महापालिकेला राज्य सरकारच्या हिश्श्याचे ३० टक्के आणि पालिकेचा २० टक्के असा प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ५० टक्क्यांचा खर्च उचलावा लागणार आहे.

केंद्राकडून प्रकल्पासाठी जो निधी मंजूर होणार आहे. त्यात राज्य प्रशासकीय खर्च व कार्यालयीन ८ टक्के व केंद्र प्रशासकीय खर्च व कार्यालयीन खर्चापोटी २ टक्के असा असा दहा टक्के निधी ठेवून घेणार आहे. त्यामुळे महापालिकांच्या हातात किती रक्कम येणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेचा एलबीटी बंद केल्याने पालिकेचे उत्पन्न घटले असतानाच राज्य सरकारनेही केवळ मोजकाच निधी उचलण्याची तयारी दाखविल्याने प्रकल्पाचा खर्च उभारताना पालिकेचे कंबरडे मोडणार आहे.

केंद्रात आणि राज्यात सत्तांतर झाल्याने महापालिकांचे कंबरडे मोडण्याचे काम सरकारने सुरू केले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून पालिकांना दिल्या जाणाऱ्या अनुदानातील वाटा कमी केल्याने नवीन प्रकल्प राबवू नयेत, अशी सरकारची इच्छा दिसत आहे.
- दत्तात्रय धनकवडे (महापौर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

$
0
0

म. टा . प्रतिनिधी, पुणे

औंध येथील 'स्पायसर अॅडवेंटिस्ट विद्यापीठा'ला अंतिम मान्यता मिळाली नसताना गेल्या दीड वर्षांपूर्वीच विद्यार्थ्यांना नियमबाह्य प्रवेश दिल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर विद्यापीठाने शुक्रवारी होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. परीक्षा रद्द करण्याचे कोणतेही कारण विद्यापीठाने दिले नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

'स्पायसर अॅडवेंटिस्ट विद्यापीठ' स्थापन करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असली, तरी राज्याच्या सचिवीय समितीने पाहणी केल्यानंतर या विद्यापीठाला अंतिम मान्यता मिळणार आहे. मात्र, समितीकडून पाहणी होण्यापूर्वीच विद्यापीठाने विद्यार्थ्यांना नियमबाह्य प्रवेश दिल्याचा धक्कादायक प्रकार 'महाराष्ट्र टाइम्स'ने उघड केला.

विविध अभ्यासक्रमांच्या अंतर्गत परीक्षा शुक्रवारी होणार होत्या. त्याचे वेळापत्रकही देण्यात आले होते. सर्व अभ्यासक्रमांच्या नियोजित परीक्षा रद्द करण्यात आल्याचे विद्यापीठाने जाहीर केले; तसेच शुक्रवारी विद्यापीठाला सुट्टीही दिली आहे. परीक्षा का रद्द करण्यात आली याबाबत विद्यार्थ्यांकडून विचारणा करण्यात आली असता, विद्यापीठाकडून ठोस कारण देण्यात आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्पायसर’ची ‘अॅशलॉक’ही अडचणीत

$
0
0

धार्मिक अल्पसंख्याक दर्जावर प्रश्नचिन्ह

Sujit.Tambade@timesgroup.com

पुणे ः 'सेव्हन्थ डे अॅडवेंटिस्ट' या संस्थेच्या औंध येथील 'स्पायसर अॅडवेंटिस्ट विद्यापीठा'ने जमीन आणि आर्थिक घोटाळे केल्याचे उघडकीस आले असताना, आता या संस्थेच्या 'अॅशलॉक एज्युकेशन सोसायटी' या शैक्षणिक संस्थेला दिलेला धार्मिक (ख्रिश्चन) अल्पसंख्याक दर्जाच अडचणीत आला आहे. राज्य सरकारने दिलेल्या धार्मिक अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्राची मुदत १२ फेब्रुवारी २०१३ रोजी संपली असून, त्याचे ​नूतनीकरण केलेले नसल्याचे उघड झाले आहे.

संस्थेच्या अल्पसंख्याक दर्जाबाबत आलेल्या तक्रारीवरील सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देऊनही संस्थेतर्फे कोणीही हजर राहत नसल्याने, राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाने संस्थेचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करण्याचा इशाराही दिला आहे.

'अॅशलॉक एज्युकेशन सोसायटी'च्या अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्राबाबत संस्थेच्या नाशिक येथील शाळेतील निवृत्त कर्मचारी दिलीप अढागळे यांनी अल्पसंख्याक विकास विभागाकडे माहितीच्या अधिकारात माहिती विचारली होती. त्यावरून मिळालेल्या माहितीवरून संस्थेचा अल्पसंख्याक दर्जा अडचणीत आल्याचे निदर्शनास आले आहे.

'सेव्हन्थ डे अॅडवेंटिस्ट' या मूळ संस्थेच्या अंतर्गत असलेल्या 'अॅशलॉक एज्युकेशन सोसायटी'चे मुख्यालय पुण्यात सॅलसबरी पार्क येथे आहे. या सोसायटीतर्फे औंध येथे चालविण्यात येत असलेल्या 'स्पायसर मेमोरियल कॉलेज'चे रुपांतर आता 'स्पायसर अॅडवेंटिस्ट विद्यापीठ' असे झाले आहे. हे राज्यातील पहिले खासगी विद्यापीठ आहे.

'अॅशलॉक एज्युकेशन सोसायटी' या संस्थेला १० जुलै २००७ रोजी पहिल्यांदा अल्पसंख्याक दर्जा मान्यतेचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर १२ फेब्रुवारी २००९ पर्यंत नूतनीकरण करण्यात आले. ही मुदत संपल्यावर १२ फेब्रुवारी २०१३ पर्यंत मुदत वाढविण्यात आली. ही मुदत संपल्यानंतर संस्थेने नूतनीकरण केलेले नाही. याबाबत केलेल्या तक्रारीवरील सुनावणीसाठीही संस्थेचे कोणीही उपस्थित राहिले नसल्याने अल्पसंख्याक विकास विभागाने संस्थेचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करण्याचा इशारा दिला आहे. या विभागाचे अवर सचिव अनिस शेख यांनी दहा जुलै २०१५ रोजी हा आदेश दिला असल्याचे अढागळे यांनी सांगितले.

राज्य सरकारने अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देताना हे प्रमाणपत्र केवळ महाराष्ट्र राज्यापुरते लागू असल्याचे म्हटले आहे. या संस्थेतर्फे अन्य राज्यांमध्येही शाळा चालविण्यात येत आहेत. संस्थेच्या ३९ शाळा असून, त्यापैकी अवघ्या १२ शाळा राज्यात आहेत. उर्वरित २७ शाळा राज्याबाहेर असल्याचे अढागळे यांनी स्पष्ट केले.

विश्वस्त समितीचे अध्यक्ष परदेशी नागरिक

अल्पसंख्याक दर्जा देताना संस्थेच्या विश्वस्त समितीमध्ये किमान ५० टक्के विश्वस्त हे राज्यातील असण्याची अट आहे. मात्र, या अटीचे पालन झालेले नाही. २००६ पूर्वी असलेल्या समितीच्या अध्यक्षपदी डेव्हिड रोनाल्ड वॉट्स हे होते. ते मूळचे कॅनडामधील होते. त्यानंतर तमिळनाडू येथील आर. जॉन यांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्या अनुपस्थित बैठक घेऊन अध्यक्ष बदल करण्यात आला. सध्याचे अध्यक्ष इझरास लकरा हे देखील महाराष्ट्राबाहेरील रहिवाशी असल्याचे अढागळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मार्ड’च्या डॉक्टरांचा संप मागे

$
0
0

ससूनमधील डॉक्टरला मारहाण करणारा पोलिस शिपाई निलंबित

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ससून हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरला पोलिस शिपायाने मारहाण केल्याप्रकरणी गुरुवार सकाळपासून 'मार्ड'च्या डॉक्टरांनी संप पुकारला. पोलिस शिपायाला निलंबित केले असून, त्याला अटकही करण्याची मागणी पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा 'मार्ड'च्या डॉक्टरांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले.

ससून हॉस्पिटलमध्ये काल रात्री वॉर्ड क्रमांक १४ मधून वॉर्ड क्रमांक तीनमधील पेशंटना पाहण्यासाठी जात असताना निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कर्मा बुथिया यांचा पोलिस शिपाई श्रीकृष्ण खोकले यांना धक्का लागला. त्या वेळी डॉ. बुथिया यांनी त्यांना 'सॉरी' असे म्हटले आणि ते पुढे निघून गेले. त्या वेळी 'तुला दिसत नाही का,' असे सांगून पोलिस शिपायाने डॉक्टरला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना पाहणारा सुरक्षारक्षक डॉक्टरांना सोडविण्यासाठी तेथे गेला. त्या वेळी त्याच्याकडील काठीनेच खोकले यांनी डॉ. बुथियांना मारहाण केली. खोकले यांना निलंबित करावे, या मागणीसाठी गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून 'मार्ड'ने पुकारलेल्या संपात ससून हॉस्पिटलमधील तीनशे डॉक्टर सहभागी झाले होते, अशी माहिती 'मार्ड'चे पुणे शाखेचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर हळनोर यांनी दिली.

संपामुळे रुग्णांचे हाल

पोलिस शिपायाला अटक करून निलंबित केल्यानंतर संप सुरू ठेवण्याची भूमिका घेतलेल्या 'मार्ड'च्या डॉक्टरांमुळे ससून हॉस्पिटलमधील रुग्णसेवा गुरुवारी कोलमडली. दिवसभरात नियोजित असलेल्या एकूण ऑपरेशनपैकी निम्मीच ऑपरेशन झाल्याने बाकीची ऑपरेशन पुढे ढकलण्याची वेळ हॉस्पिटल प्रशासनावर आली.

'मार्ड'च्या डॉक्टरांनी गुरुवारी सकाळी निवासी डॉक्टराला मारहाण केल्याने संप पुकारला. वॉर्डामध्ये उपचार देण्यासाठी निवासी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने वॉर्डात डॉक्टरांची अनुपस्थिती जाणवत होती. त्याशिवाय वॉर्डात शुकशुकाटही होता. त्यामुळे पेशंटना कोणत्या वेळी कोणते औषध घ्यायचे हे सांगण्यापासून पेशंटच्या सेवा करण्यापर्यंतची जबाबदारी परिचारिकांवर आली. डॉक्टर संपावर असल्याने औषधे लिहून देणे, तपासणी करण्यासाठी डॉक्टरच न आल्याने अनेक पेशंटसह नातेवाइकांना मनःस्ताप सहन करावा लागल्याची तक्रारी नातेवाइकांनी केल्या. जखमी पेशंटचे ड्रेसिंग करण्यापासून ते तातडीच्या विभागात पेशंटवर उपचार करण्यामध्ये अनेक अडथळे आले. त्याशिवाय विशेषतः तातडीच्या विभागात उपचारासाठी येणाऱ्या पेशंटना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत रखडावे लागले. हॉस्पिटलमध्ये दररोज ५० ते ६० ऑपरेशन होतात. त्यापैकी निम्मी ऑपरेशन संपामुळे होऊ शकले नाहीत. त्यामुळे पेशंटच्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागला.


डॉक्टर नसल्याने परिचारिका, वैद्यकीय कार्यकर्त्यांच्या मदतीने उपचार सेवा सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे संपाचा रुग्णसेवेवर परिणाम झाला नाही.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मान्सूनची अखेर राज्यातून माघार

$
0
0

पुणे ः पुण्यासह संपूर्ण राज्यातून मान्सून गुरुवारी माघारी फिरला. मान्सून विदर्भ व मध्य महाराष्ट्राचा उर्वरित भाग, कोकण, गोवा, मराठवाड्याच्या संपूर्ण भागातून माघारी फिरल्याचे हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आले. त्यामुळे पावसाचा हंगाम आता अधिकृतरीत्या संपुष्टात आला आहे.

दर वर्षी साधारणतः १५ ते १७ ऑक्टोबरच्या आसपास मान्सून संपूर्ण राज्यातून माघारी फिरतो. गेल्या वर्षी एक दिवस आधी म्हणजे १४ ऑक्टोबरला मान्सून राज्यातून परतला होता. यंदा १५ ऑक्टोबर रोजी मान्सून राज्यातून माघारी फिरला आहे. गेल्या आठवड्यापासूनच मान्सून परतण्यास सुरुवात झाली होती. विदर्भाच्या काही भागांसह जळगावपर्यंतच्या भागातून मान्सूनने माघार घेतली होती. त्यानंतर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या न्यून दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण व पश्चिम व मध्य महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली. हे क्षेत्र विरून गेल्यानंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर ओसरला. त्यानंतर संपूर्ण राज्यात एखाद्या ठिकाणीच स्थानिक तापमानवाढीमुळे पावसाने हजेरी लावली होती. परतीच्या निकषांनुसार गुरुवारी मान्सून संपूर्ण राज्यातून माघारी फिरल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

शहरात गुरुवारी ३४.४ अंश सेल्सियस इतक्या कमाल, तर १९.२ अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीप्रकरणी कुडलेवर आरोप

$
0
0

पुणे ः अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजानन मंदिरातील ४४ लाखांची आभूषणे चोरल्याप्रकरणी तानाजी कुडलेविरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. कुलकर्णी यांच्या कोर्टात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

रात्रीच्या वेळी गुन्हा करण्यासाठी मंदिरात घुसणे, चोरी करणे या कलमानुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कुडलेकडून ४४ लाख ७७ हजार ७०४ रुपये सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

या केसमध्ये तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत भट यांच्यासह २९ जणांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. आठ जुलै २०१५ रोजी पहाटे ही घटना घडली होती. घटनेच्या दुसऱ्या दिवशी शिवाजीनगर कोर्टातील कर्मचारी फिरोज पठाण यांना कोर्टात कुडले नळ चोरत असताना दिसला होता. त्यानंतर संशय आल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी बचाव पक्षातर्फे अॅड. बी. ए. आलूर काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कार्यक्रमांमध्ये ‘बुके’ नको, ‘बुक’ द्या

$
0
0

वाचन प्रेरणादिनी राज्य सरकारचा आदेश

म . टा. प्रतिनिधी, पुणे

सरकारी कार्यक्रमांमध्ये मान्यवरांना पुष्पगुच्छ देण्याचा खर्च आता करावा लागणार नाही. कारण, वाचन संस्कृती आणि वाचन प्रेरणा वाढीस लागण्याच्या दृष्टीने आता राज्य सरकारनेही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शैक्षणिक संस्थांतील कार्यक्रमांमध्ये पाहुण्यांना पुष्पगुच्छ भेट देण्याऐवजी पुस्तक भेट देण्याचा आदेश सरकारने दिला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

वाचनाची चळवळ व्यापक करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. रत्नागिरीजवळील मालगुंड या कवी केशवसूतांच्या गावी पुस्तकांचे गाव साकारणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन (१५ ऑक्टोबर) वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यास यंदापासून सुरुवात केली. पहिल्याच वेळी त्याचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. मात्र, वाचन प्रेरणा दिन साजरा करून न थांबता वेगळ्या पद्धतीने वाचन प्रेरणा रुजवण्यासाठी सरकारकडून वेगळा निर्णय पहिल्या वाचन प्रेरणा दिनीच घेण्यात आला. पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक भेट देण्यात यावीत, असा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणारी अकृषिक विद्यापीठे, महाविद्यालये, शालेय व क्रीडा विभागांतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांत पाहुण्यांना पुष्पगुच्छ देण्यापेक्षा विविध विषयांवरील पुस्तके भेट देण्यात यावीत, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत हा बदल होण्याची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बड्या नेत्यांच्या नावे फसवणूक

$
0
0

पुणे ः मोठ्या नेत्यांची नातेवाइक आणि स्टाफ सिलेक्शन कमिटीची सदस्य असल्याचे सांगत एका महिलेने नोकरीचे आमिष दाखवून पाच जणांची साडेतेरा लाखांची फसवणूक झाली आहे. कोंढव्यात हा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात महिलेसह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मच्छिंद्र व्हटकर (वय ३५, रा. कोरेगाव पार्क) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून जान्हवी भोसले उर्फ मुंडे आणि प्रशांत नंदकुमार भोसले (रा. गुलमोहर सोसायटी, साळुंके विहार रोड, कोंढवा) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणालाही नोकरी न लावता आर्थिक फसवणूक केली म्हणून व्हटकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक डी. एन. ढोले अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशी सापडली हरवलेली बॅग

$
0
0

पुण्यात आलेल्या अमेरिकी नागरिकाला रिक्षाचालकाच्या अप्रामाणिकपणाचा फटका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अमेरिकेचा नागरिक असलेल्या एका मूळ पुणेकर पायलटला पुण्यातील रिक्षाचालकाच्या अप्रामाणिकपणाचा जोरदार फटका बसला. मौल्यवान वस्तूंसह पासपोर्ट, एअरलाइन्सचे 'आयकार्ड' अशा महत्त्वाच्या कागदपत्रांची त्यांची बॅगच रिक्षात विसरली होती. गुन्हे शाखेने 'सीसीटीव्ही'च्या मदतीने बुधवारी रात्रभर शोध घेत त्या रिक्षाचालकास गजाआड केले आणि त्या पायलटचा पासपोर्ट, पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज परत मिळवून दिला.

अमेरिकेत साउथवेस्ट एअरलाइन्समधील पायलट राजीव प्रकाश बारसे (वय ४५, रा. कॅलिफोर्निया) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली होती. रिक्षाचालक नारायण कृष्णाजी रेणुसे आणि त्याचा नातेवाइक सुनील विलास रेणुसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारसे मुळचे पुण्याचे आहेत. त्यांचे वडील हयात नाहीत. दर वर्षीप्रमाणे ते त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी सॅलिसबरी पार्कमधील कब्रस्थानातून ते रिक्षाने कॅम्पमध्ये हॉटेलमध्ये गेले होते. त्या वेळी पासपोर्ट, व्हिसा, रोख एक लाख रुपये, ११७ अमेरिकीन डॉलर, सोन्याचे दागिने, मोबाइल हँडसेट, एअरलाइन्सचे आयकार्ड, ड्रायव्हिंग लायन्सस, विविध बँकांचे क्रेडिट कार्ड ठेवलेली त्यांची सॅक रिक्षात हरवली.

रिक्षाचालकाला शोधण्यात यश न आल्याने त्यांनी बुधवारी सायंकाळी पोलिस आयुक्तालय गाठले आणि आयुक्त के. के. पाठक यांची भेट घेतली. बारसे दाम्पत्याची सर्व कागदपत्रे हरवल्याने ते आयुक्तांपुढे रडकुंडीला आले होते. पाठक यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांना बॅग शोधण्याच्या सूचना केल्या. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पिंगळे, सुनील पवार, रघुनाथ फुगे आणि सुषमा चव्हाण यांच्या पथकाने रात्रभर शोध मोहीम राबवली आणि बारसे यांची बॅग त्यांना परत मिळवून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरवडा तुरुंगातील स्थिती सुधारावी

$
0
0

कैद्यांबाबत हायकोर्टाचे सरकारला निर्देश

मुंबई ः पुण्यातील येरवडा तुरुंगात क्षमतेपेक्षा अडीच पट अधिक कैद्यांना ठेवण्यात आले आहे; तसेच पुरुष कैद्यांसाठी स्नानगृहे नाहीत, महिला कैद्यांसाठी दोन स्नानगृहे व १९ शौचालये आहेत, असे न्यायिक अधिकाऱ्यांच्या अहवालातून गुरुवारी उघड झाले. त्यामुळे येरवडा तुरुंगाची स्थिती सुधारण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले.

येरवडा तुरुंगातील बंदीवान शेख इब्राहिम अब्दुल याने ब्रिटिशांच्या काळातील या तुरुंगाची दैनावस्था अर्जाद्वारे मांडली. त्याविषयी अॅड. उदय वारुंजीकर यांनी बाजू मांडल्यानंतर न्या. विद्यासागर कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने पुण्यातील प्रधान न्यायाधीशांना न्यायिक अधिकाऱ्यामार्फत पाहणी करून दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सरकारी वकिलांनी हा अहवाल गुरुवारी सादर केला.

तुरुंगाची क्षमता दोन हजार ३२३ आहे; परंतु प्रत्यक्षात या तुरुंगात शिक्षा झालेले कैदी आणि विविध खटल्यांमधील आरोपी असे मिळून सहा हजारहून अधिक बंदीवान आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंग पतीला मिळाली पोटगी

$
0
0

सॉफ्टवेअर इंजिनीअर पत्नीकडून दरमहा तीन हजार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पत्नी सॉफ्टवेअर इंजिनीअर... पती अपघातामुळे अपंगत्व आलेला... उदरनिर्वाहासाठी त्याच्याकडे कोणतेही साधन नाही... घरची परिस्थिती हलाखीची... या परिस्थितीत त्याचा सांभाळ करण्यासाठी पत्नीकडून पोटगी मिळावी म्हणून त्याने कोर्टात अर्ज दाखल केला... त्यावर त्याच्या पत्नीने त्याला दरमहा तीन हजार रुपये पोटगी द्यावी असा आदेश कोर्टाने दिला.

पत्नीने पतीला पोटगी देण्याचा हा दुर्मिळ निकाल आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड येथील एका व्यक्तीने फॅमिली कोर्टात हा दावा दाखल केला होता. फॅमिली कोर्टातील न्यायाधीश लक्ष्मण मगदूम यांनी हा निकाल दिला. संबंधित अपंग व्यक्तीने स्वतः कोर्टात आपली बाजू मांडून केस लढविली.

अशोक (नाव बदलले आहे) यांचे २१ मार्च २००० रोजी लग्न झाले होते. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या पत्नीने कोर्टात घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता. जानेवारी २००४ मध्ये झालेल्या अपघातात अशोक यांना अपंगत्व आले. त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया त्या यशस्वी झाल्या नाहीत. त्यांना परत डॉक्टरने शस्त्रक्रिया करण्यास सांगितली असून, त्यासाठी चार लाख रुपये खर्च अपे​क्षित आहे. पत्नी कमावती असल्यामुळे तिच्याकडून पोटगी मिळावी म्हणून २००४ मध्ये फॅमिली कोर्टात दावा दाखल केला होता. अशोक यांची घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना स्वतःला कोणतीही नोकरी नाही. त्यामुळे उदरनिर्वाह चालविणे शक्य होत नाही. पत्नी सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्यामुळे तिला चांगला पगार आहे. तिच्याकडून पोटगी मिळविण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. पुरावे पाहून कोर्टाने अशोक यांना ऑगस्ट २००४ पासून दरमहा तीन हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला.

पत्नीने पतीला पोटगी देण्याचा हा दुर्मिळ निकाल आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील एका व्यक्तीने फॅमिली कोर्टात हा दावा दाखल केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रात्रभर जागून पोलिसांनी शोधली अतिमहत्त्वाची बॅग

$
0
0

पुणे ः पोलिस यंत्रणा सक्रिय झाल्यानंतर काय चमत्कार घडू शकतो, याचा प्रत्यय बुधवारी आला. अमेरिकास्थित मूळ पुणेकर पायलटची रिक्षातच विसरलेली बॅग यंत्रणेच्या अहोरात्र शोधमोहिमेमुळे काही तासांतच परत मिळाली. त्यात पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, एअरलाइन्सचे 'आयकार्ड' आणि इतरही अनेक महत्त्वाची कागदपत्रेही होती. गुन्हे शाखेने त्या रिक्षाचालकास गजाआड केले आणि त्या पालयटचा पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज परत मिळवून दिला.'सीसीटीव्ही'च्या आधारे पोलिसांनी रिक्षा शोधून काढली. मात्र, तिचा क्रमांक दिसत नव्हता. त्या रिक्षावर असलेली जाहिरात, संबंधित जाहिरात बनविणाऱ्या कंपन्या आणि कंपन्यांशी संपर्क साधून काढलेला माग, अशी अत्यंत रंजक पद्धतीने तपास पुढे सरकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळी जोगेश्वरी

$
0
0

>> मंदार लवाटे

पुण्यामध्ये जोगेश्वरीची तीन मंदिरे आहेत. त्यातील एक बुधवार पेठेत आहे. प्रसिद्ध दत्त मंदिराच्या उजव्या बाजूने जो रस्ता जातो तेथे डाव्या बाजूस लगेचच हे मंदिर आहे. हे मंदिर छोटे आहे व हे काळी जोगेश्वरी या नावाने ओळखले जाते.

दोनशे वर्षांपूर्वीही या देवीची नोंद काळी जोगेश्वरी अशीच आढळते. येथील मूर्ती काळ्या पाषाणातील असल्याने हे नाव पडले असावे. ही मूर्ती अडीच ते तीन फूट उंच, बसलेली आहे. मूर्तीला चार हात असून चेहऱ्यावरील भाव प्रसन्न आहेत. हातामध्ये चक्र, पद्म, शंख ही आयुधे आहेत. चौथा हात अभयमुद्रेत आहे. मागे प्रभावळ आहे व नाकास वेज आहे म्हणजे मूर्तिकाराने नथ घालता यावी म्हणून मूर्तीचे नाक टोचलेले आहे.

मटा नवरंग... येथे क्लिक करा, फोटो अपलोड करा आणि जिंका भरघोस बक्षिसं!

वैशिष्ट म्हणजे देवीला तीन नेत्र आहेत. तिसरा नेत्र कपाळावर आहे व तो उभा नसून आडवा आहे. ही मूर्ती १९५५ साली जयपूरहून घडवून आणली आहे. याआधी अशीच मूर्ती होती. परंतु, ती भंगल्याने नवीन मूर्तीची स्थापना करण्यात आली. गाभाऱ्यासमोर लाकडी सभामंडप आहे. येथे देवीसमोर गणपतीचे छोटे मंदिर आहे. हा गणपतीही दोनशे वर्षांपेक्षा जास्त जुना आहे. गणपतीच्या डाव्या बाजूस छोटी शिवलिंगे आहेत व उजव्या बाजूस कालभैरवाची छोटी मूर्ती आहे. येथे एकादशी, अष्टमी, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी स्नानपूजा असते. इतर दिवशी पाद्यपूजा केली जाते. नवरात्रामध्ये उत्सव साजरा केला जातो. नऊ दिवस रोज वेगवेगळ्या वाहनांची आरास असते. गेली काही दशके भिडे कुटुंबीय येथील व्यवस्था बघतात. हे मंदिर फारसे प्रसिद्ध नसल्याने नवरात्रातही येथे काहीसे निवांत दर्शन घडते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानांमध्ये स्पीकरला बंदी

$
0
0

हरित प्राधिकरणाचा निर्णय, 'दिवाळी पहाट'ना फटका?

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सार्वजनिक उद्यानांमध्ये स्पीकर लावण्याला राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने (एनजीटी) गुरुवारी निर्बंध लागू केले. त्याचा पहिला फटका या बागांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दिवाळी पहाट कार्यक्रमांना बसणार आहे. पुण्यात दर वर्षी असे सुमारे शंभर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

कमला नेहरू पार्कमधील कार्यक्रमांसंदर्भात गोंगाट विरोधी मंचाच्या वतीने डॉ. कल्याणी मांडके यांनी एनजीटीकडे धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीमध्ये एनजीटीचे न्या. विकास किनगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांनी हा आदेश दिल्याची माहिती अर्जदारांचे वकील असीम सरोदे यांनी दिली.

'शहरातील अनेक उद्याने ही जनतेची असून विश्वस्त या नात्याने महापालिका त्यांचे व्यवस्थापन करते; परंतु अनेक ठिकाणी या उद्यानांची शांतता भंग होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, असे या अर्जात म्हटले होते; तसेच काही काळापूर्वी कोर्टाने प्रत्येक शहरात शांतता क्षेत्रे (सायलेन्स झोन) निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार देवस्थान, शिक्षणसंस्था, हॉस्पिटल्स अशा ठिकाणांपासून शंभर मीटर अंतरात कोणत्या बागा आहेत, याचीही माहिती घ्यावी,' असाही मुद्दा या सुनावणीत पुढे आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्हॉट्सअॅप’द्वारे केली महिलेची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'व्हॉट्सअॅप'द्वारे कोण कोणाला कसे फसवेल याचा भरवसा नाही. असाच एक अनुभव आंबेगाव बुद्रुक येथील एका महिलेला आला. नोकरी लावण्याच्या बहाण्याने त्या महिलेला मनी ट्रान्स्फरद्वारे एक हजार रुपये भरण्यास लावून तिची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी आंबेगाव बुद्रुक येथील २२ वर्षांच्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी श्रवण आणि चंदनकुमार या दोघा संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपींनी तक्रारदार महिलेला फोन केला होता. तिला नोकरीचे आमिष दाखवत एक हजार रुपये अकाउंटमध्ये भरण्यास सांगितले. त्यासाठी महिलेला 'व्हॉट्सअॅप'वर माहिती पाठवण्यात आली. महिलेने एक हजार रुपये भरल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘किशोर’ गाठतोय एक लाखाचा टप्पा

$
0
0

chinmay.patankar@timesgroup.com

पुणेः बालकुमारांच्या आवडीच्या असलेल्या 'किशोर' मासिकाचा दिवाळी अंक यंदा बराच मोठा पल्ला गाठत आहे. या दिवाळी अंकाच्या यंदा विक्रमी एक लाख प्रती छापण्यात आल्या असून, एवढ्या प्रतींची प्रथमच छपाई करण्यात आली आहे.

दिवाळी अंकांच्या परंपरेत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या वतीने प्रकाशित केला जाणाऱ्या 'किशोर'चे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. १९७१पासून या मासिकात मान्यवर लेखकांनी लेखन केल्याने त्याचा लौकिक निर्माण झाला. सकस बालसाहित्याचे खाद्य या मासिकातून किशोरवयीन शालेय विद्यार्थ्यांना मिळते. यंदाच्या अंकात ज्येष्ठ कवी प्रा. फ. मुं. शिंदे, प्रवीण दवणे, अरुण म्हात्रे, बाबाराव मुसळे, डॉ. बाळ फोंडके, बाबा भांड, डॉ. संगीता बर्वे, राजा शिरगुप्पे, इंद्रजित भालेराव, संजय भास्कर जोशी, राजन खान अशा मान्यवरांनी लेखन केले आहे. १३२ पानांचा हा अंक आहे.

अंकाच्या एक लाखाच्या टप्प्याविषयी कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांनी 'मटा'ला माहिती दिली. 'दरवर्षी सुमारे ७० ते ७५ हजार प्रती छापल्या जातात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अंकाचा प्रतिसाद वाढला असल्याने विक्रमी एक लाख प्रती छापण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शाळांव्यतिरिक्त बालवाचकांनाही साहित्याची मेजवानी उपलब्ध होऊ शकेल,' असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images