Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एक लाख बनावट मोबाइल अॅक्सेसरीज सील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर सॅमसंग कंपनीचे बनावट अथवा ग्रे-मार्केटमधील मोबाइल आणि अॅक्सेसरीज विक्री करणाऱ्या पिंपरी कॅम्पमधील अकरा दुकानांवर छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये सुमारे एक लाख मोबाइल अॅक्सेसरीज सील करण्यात आल्या असून, यामध्ये २० मोबाइल सेटचा समावेश आहे.

हायकोर्टाने गठीत केलेल्या आठ 'हायकोर्ट कमिशनर' आणि शंभर पोलिसांच्या फौजफाट्यासह पिंपरी कॅम्प आणि पुण्यातील बुधवारपेठ तसेच शिवाजीनगर परिसरात बुधवारी (१४ ऑक्टोबर) हे छापासत्र राबविण्यात आले. विशेष म्हणजे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ज्यावेळेस छापासत्र सुरू होते. तेव्हाच दिल्ली येथील काही भागात देखील ही कारवाई सुरू होती.

सॅमसंग कंपनीने भारतभरात कंपनीच्या नावाने मोबाइल आणि अॅक्सेसरीजची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू केल्याबाबत दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने नेमलेल्या एका विशेष पथकाने भारतभरात छुप्या पद्धतीने पाहणी करून एक अहवाल कोर्टात सादर केला होता. यामध्ये पिंपरी कॅम्प परिसरातील अकरा दुकानांची नावे-पत्ता होते. तसेच, पुण्यासह दिल्लीतील देखील दुकानांचा नाव-पत्ते होते. कारवाईसाठी हायकोर्टाने आठ कोर्ट कमिश्नरची नेमणूक केली.

बुधवारी सकाळी मुख्य हायकोर्ट कमिश्नर अॅड. सचिन पुरी यांच्यासह त्यांचे सात सहकारी कमिश्नर पुण्यात दाखल झाले. त्यांनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली. एकाचवेळेस कारवाई करायची असल्याने फौजफाट्याची मागणी केली. त्यानंतर तत्काळ पोलिस आयुक्तांनी आठ पोलिस निरीक्षक आणि ९२ अधिकारी-कर्मचाऱ्यांची टीम कारवाईसाठी नेमली. त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एकाच वेळेस कारवाईला सुरुवात झाली. या वेळई सुरुवातीच्या दहा दुकानांमधील हॅण्डसफ्री, चार्जर, कव्हर, बंपर आदी स्वरूपाचे सुमारे एक लाख अॅक्सेसरीज सील केल्या. त्यानंतर अकराव्या दुकानात या पथकाने २० मोबाइल सील केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेना झगडतेय शेतकऱ्यांसाठीः कदम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'राज्य सरकारमध्ये सहभागी असलो तरी शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, या मुद्यावर शिवसेना झगडत आहे,' असे राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.

पंधरा गाव कोकण विकास सेवा ट्रस्टने यमुनानगर येथे आयोजित केलेल्या कोकणवासीयांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, सल्लागार मधुकर बाबर, शहरप्रमुख राहुल कलाटे, खेड पंचायत समितीचे सभापती चंद्रकांत कदम, एकनाथ कदम, धनंजय आल्हाट, सचिन जरे, ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत सकपाळ, प्रदीप सकपाळ या वेळी उपस्थित होते. टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष गजानन मोरे यांना 'कोकणभूषण' पुरस्कार देण्यात आला. तसेच, दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

कदम म्हणाले, 'कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच कोकण असे समीकरणच झाले आहे. हिंदुत्वाचे विचार शिवसेनाप्रमुखांमुळे सातासमुद्रापलीकडे पोहोचले. आताही सरकारमध्ये शिवसेना सहभागी असली तरी प्रथम शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, या मुद्यावर आम्ही झगडत आहोत. मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना शिवसेनेतर्फे मदतीचा हात दिला जात आहे.'

टेकू काढण्याचा इशारा

इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हा भाजपचा वैयक्तिक पक्ष कार्यक्रम नाही; तर इतर पक्षांनाही सन्मान आहे. अशा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बाकीच्या राजकीय पक्षांना बाजूला ठेवण्याचे कोणतेही सबळ कारण नाही. महाराष्ट्र हा छत्रपतींचा, भगव्या झेंड्याचा आणि शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा आहे. त्यामुळे शिवसेनेला विचारात न घेतल्यास दिलेला टेकू काढून घेऊ,' असा इशारा रामदास कदम यांनी या वेळी दिला. पंधरा गावच्या सरपंच रेश्मा उत्तेकर, विक्रम उत्तेकर, संतोष उत्तेकर, रमेश उत्तेकर, रवींद्र पालांडे, विष्णू कदम यांचाही सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकणमध्ये कचराकोंडी

$
0
0

कचरा टाकण्यास बिरदवडी, खराबवाडी ग्रामस्थांचा विरोध

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर

बिरदवडी व खराबवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींनी आपल्या हद्दीत कचरा टाकण्यास चाकण नगर परिषदेला मज्जाव केला आहे. बुधवारी सकाळी बिरदवडीच्या ग्रामस्थांनी चाकण नगर परिषदेच्या कचऱ्याच्या गाड्या अडवून कामगारांना कचरा टाकू दिला नाही. त्यामुळे चाकण शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

गेल्या आठ दिवसांपासून चाकणमधील कचरा उचलला जात नसल्यामुळे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यापूर्वी अनेकवेळा ग्रामस्थांनी संबंधित ठिकाणी कचरा टाकण्यास विरोध करून वेळप्रसंगी कचऱ्याच्या गाड्या अडविल्या होत्या. दुसरीकडे शहरातील नागरिक व दुकानदार सर्रास चौकात व रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात. कचऱ्यामुळे गावातील ओढे देखील तुंबले गेले आहेत.

रोज जमा होणारा कचरा टाकण्यास चाकण नगर परिषदेकडे स्वतःच्या मालकीची जागा नाही. तसेच अन्य पर्याय देखील उपलब्ध नसल्याने हा कचरा बिरदवडी आणि खराबवाडी हद्दीतील गायरान जमिनीवरील दगडाच्या खाणीत टाकला जातो. पूर्वी चाकण ग्रामपंचायत अस्तित्वात असताना याच खाणीत कचरा टाकला जात होता. राजगुरुनगर नगर परिषदेचा कचरा देखील याच खाणीत टाकण्यात येतो. दुसरीकडे औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्या त्यांचा कचरा या ठिकाणी गुपचूप टाकतात. प्रचंड प्रमाणातील कचऱ्यामुळे खाण बुजली आहे. नगर परिषदेचे सफाई कामगार अनेकदा खाणीच्या बाहेरच कचरा टाकतात. हवेमुळे प्लास्टिकचा कचरा खालील भागात गावाच्या दिशेने पसरला जातो. या खाणीच्या खालील भागात उतारावर बिरदवडी गाव आहे.

दरम्यान, शास्त्रीय पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे, असे चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटल टेंडर अखेर रद्द

$
0
0

पुणे ः महापालिकेच्या बोपोडी येथील हॉस्पिटलच्या इमारतीत डोळ्यांचे स्पेशालिटी हॉस्पिटल करण्यासाठी अंतिम टप्प्यात आलेले टेंडर पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी अखेरच्या क्षणी रद्द केले. 'ना नफा ना तोटा' तत्वावर पालिकेच्या सर्व अटींना अधीन राहून हॉस्पिटल चालविण्याची तयारी एका चॅरिटेबल संस्थेने दाखविलेली असतानाही आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादातील दबावामुळे आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा पालिकेत सुरू असून, यामध्ये नुकसान मात्र सर्वसामान्यांचे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेकडे हॉस्पिटल चालविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही; तसेच नवीन पदे भरायची झाल्यास त्यासाठी मोठा कालावधी जात असल्याने पालिकेच्या मालकीची हॉस्पिटल खासगी संस्थांना काही अटींवर चालविण्यासाठी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यापूर्वी शहरातील तीन ते चार हॉस्पिटल अशा पद्धतीने पालिकेने चालविण्यासाठी दिलेली असून, यामधून पालिकेचा मोठा फायदा होत आहे. या प्रमाणेच बोपोडी येथील सर्व्हे नंबर ४२/१,२,३ भाऊ पाटील रोडवरील हॉस्पिटलची इमारत ३० वर्षांच्या कराराने नेत्र चिकित्सा व उपचार करण्यासाठी पालिकेने जाहीर प्रकटन देऊन प्रस्ताव मागविले होते. या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत 'व्हिजन नेक्स्ट' या संस्थेने हॉस्पिटलसाठी लागणारी सर्व उपकरणे, डॉक्टर व अन्य स्टाफचे वेतन, पालिकेच्या शहरी गरीब योजनेतील पेशंट, महापालिकेचे सर्व कर्मचारी, नगरसेवक व त्यांचे कुटुंबीय; तसेच अल्प उत्पन्न गटातील नागरिकांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या पेशंटवर ना नफा ना तोटा तत्वावर उपचार करण्याची तयारी दाखविली होती.

आयुक्तांच्या भूमिकेवर आश्चर्य

व्हिजन नेक्स्ट संस्थेचा प्रस्ताव अधिक चांगला असल्याने या संस्थेला हॉस्पिटल चालविण्यास मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात होता. महापालिका आयुक्त कुणाल कुमारदेखील गेली अनेक महिने यासाठी सकारात्मक होते. गेल्या आठ दिवसांत अचानक चक्रे फिरली आणि आयुक्तांनी हा प्रस्ताव रद्द करून फेरटेंडर काढण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिल्याने आयुक्तांच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जा‌त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विमानतळावर सोनेतस्कर अटकेत

$
0
0

पुणेः सोने वितळवून पावडरच्या डब्याला आतू​न मुलामा देत तस्करी करण्याचा डाव सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हाणून पाडला. दुबईवरून आलेल्या स्पाइस जेटच्या विमानातील प्रवाशाला २३ लाख रुपयांच्या सोन्यासह अटक करण्यात आली आहे. या प्रवाशाकडील पावडरच्या डब्यात वितळवलेले ८८२ ग्रॅम सोने सापडले आहे.

इमामुद्दीन मोतीमियॉ कादरी असे अटक करण्यात आलेल्या सोने तस्कराचे नाव आहे. कादरी हा बुधवारी स्पाइस जेटच्या विमानाने दुबईवरून पुण्यात येत होता. विमानतळावरील त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे करण्यात आलेल्या तपासणीत एक पावडरचा डबा मिळाला होता. त्याचे वजन जादा वाटल्याने तो फोडण्यात आला. या डब्यात वितळवलेले ८८२. २९ ग्रॅम सोने मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्पायसर’कडून नियमबाह्य प्रवेश

$
0
0

sujit.tambade@timesgroup.com

पुणेः 'स्पायसर अॅडवेंटिस्ट विद्यापीठ' स्थापन करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असली, तरी राज्याच्या सचिवीय समितीने पाहणी केल्यानंतर या विद्यापीठाला अंतिम मान्यता मिळणार आहे. मात्र, समितीकडून पाहणी होण्यापूर्वीच विद्यापीठाने विद्यार्थ्यांना नियमबाह्य प्रवेश दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संबंधित विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्य सरकारने या विद्यापीठाच्या स्थापनेबाबत प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात काही अटी नमूद केल्या आहेत. त्यामध्ये विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी सचिवीय समिती स्थापन करण्याची अट आहे. त्या समितीकडून सरकारला सकारात्मक अहवाल सादर झाला, तरच सरकारकडून अंतिम मान्यता मिळाल्याची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र, समितीकडून पाहणी झाली नसतानाच​ या विद्यापीठाने विद्यार्थ्यांना प्रवेश दिले असल्याचा प्रकार या संस्थेतील कर्मचारी आर. जॉन्सन यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळविलेल्या माहितीवरून निदर्शनास आले आहे.

विद्यापीठ स्थापन होण्यापूर्वी 'स्पायसर मेमोरियल कॉलेज' हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित होते. पुणे विद्यापीठाचे अभ्यासक्रम या कॉलेजमध्ये राबविण्यात येत होते. मात्र, खासगी विद्यापीठ करण्याच्या अट्टाहासापोटी विद्यापीठाला अंतिम मान्यता मिळण्यापूर्वीच प्रवेशप्रकिया राबविली गेल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या विद्यापीठामध्ये अन्य विद्यापीठांप्रमाणे पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम आहेत. गेल्यावर्षीच या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. त्यानुसार वर्गदेखील सुरू झाले आहेत. विद्यापीठाला अंतिम मान्यता मिळण्यापूर्वीच दिलेल्या प्रवेशामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे जॉन्सन यांनी सांगितले.

दरम्यान, या विद्यापीठाच्या घोटाळ्यामुळे विद्यापीठातील उच्चपदस्थांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 'स्पायसर उच्च माध्यमिक स्कूल'च्या खात्यात जमा असलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क आणि देणगींची उधळपट्टी झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालकांनीही शाळेच्या प्रशासनाकडे प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, विद्यापीठाकडून समाधानकारक उत्तरे मिळू शकली नसल्याचे पालकवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

समिती आज पुण्यात

'सेव्हन्थ डे अॅडवेंटिस्ट' संस्थेच्या या 'स्पायसर अॅडवेंटिस्ट विद्यापीठा'ने जमीन आणि आर्थिक घोटाळे केल्याचे 'महाराष्ट्र टाइम्स' ने उघडकीस आणले. त्याची गंभीर दखल घेऊन विद्यापीठाची पाहणी करण्यासाठी १४ ऑक्टोबर रोजी समिती येणार आहे. या समितीमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, वित्त विभाग आणि नियोजन विभाग यांचे सचिव यांचा समावेश असणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल टॉवरवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आपटे रस्त्यावरील हिंदू म्युनिसिपल सर्व्हंट्स को-ऑप. हौसिंग सोसायटी येथील दोन अनधिकृत मोबाइल टॉवरवर महापालिकेने नुकतीच कारवाई केली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती.

या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मोबाइल टॉवरला सोसायटीने कोणतीही संमती दिली नव्हती. मोबाइल टॉवरसाठी महावितरणकडून वीज जोड घेतानाही चुकीची माहिती देण्यात आली. या अनधिकृत मोबाइल टॉवरबाबत आक्षेप घेऊन, ते काढून टाकण्याबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. तसेच, मोबाइल टॉवर हटविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर, पालिकेने मंगळवारी या दोन्ही टॉवरवर कारवाई करून ते काढून टाकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोपखेलकरांना दिलासा

$
0
0

रस्ता सुरूच ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बोपखेलमधील रहिवाशांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेला पूल हायकोर्टाच्या अंतिम निकालापर्यंत काढला जाणार नाही. मात्र, दुरुस्तीसाठी आवश्यकता भासल्यास एक दिवसासाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे बोपखेलच्या रहिवाशांना हायकोर्टाच्या निकालापर्यंत दिलासा मिळाला आहे.

बोपखेलच्या वादग्रस्त रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली सीएमई, अॅम्युनिशन फॅक्टरी, सदर्न कमांडचे अधिकारी, महापालिकेचे पदाधिकारी, महसूल खात्याचे अधिकारी आणि बोपखेलवासियांची बैठक झाली. या बैठकीत सहमतीने हा निर्णय घेण्यात आला.

बोपखेल गावातून पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारा रस्ता सीएमईने बंद केला आहे. त्यावरून मध्यंतरी मोठा वाद झाला. बोपखेलवासियांनी या विरोधात आंदोलन केले. पर्यायी रस्ता मिळेपर्यंत बोपखेलवासियांसाठी बोपखेल ते खडकीतील ५१२ डेपो असा तरंगता पूल उभारण्यात आला. त्याला सीएमईने मान्यता दिली होती.

दरम्यान, सीएमईने दोन दिवसांपूर्वी हा पूल लष्कराच्या नेहमीच्या वापरातील पूल असून सरावासह इतर मोहिमांमध्येही त्याचा वापर होतो; तसेच त्याच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ कार्यरत आहे. लष्कराला प्रशिक्षण व अन्य मोहिमांसाठी या पुलाची गरज असल्याने तो काढून घेण्यात येईल, असे कोर्टात सुनावणीच्या वेळी सांगितले होते. त्यावर कोर्टाने जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने पर्यायी रस्त्याचा आराखडा सादर करावा, असे निर्देश दिले होते.

हायकोर्टाचा अंतिम निर्णय होत नाही, तोवर तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेला पूल सीएमईने काढू नये. सुरक्षिततेच्या दृष्टीने या पुलाच्या दुरुस्तीची गरज भासल्यास पूल एक दिवस बंद ठेवता येईल; परंतु त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात यावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कोर्टाने पर्यायी रस्त्यांबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने पूर्ण अभ्यासाअंती पर्यायी रस्ते सुचविले आहेत. हे पर्यायी रस्ते पुन्हा हायकोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहेत.

- सौरभ राव, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑक्टोबरमध्ये अधिक पाऊस

$
0
0

पुणेः यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असली, तरी पुण्यात ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यातच ऑगस्टपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. पुण्यात संपूर्ण ऑगस्ट महिन्यात केवळ २४.७ मिलिमीटर पावसाचीच नोंद झाली होती, तर ऑक्टोबर महिन्यात १३ ऑक्टोबरपर्यंतच ७६.६ मिलिमीटर नोंद झाली आहे.

सर्वाधिक पावसाच्या महिन्यांपैकी एक असलेल्या ऑगस्ट महिन्यात पुण्यात केवळ २४.७ मिलिमीटर पाऊस होऊन सरासरीच्या २२ टक्केच पावसाची नोंद झाली होती. हा पाऊस गेल्या अकरा वर्षांतला ऑगस्टमधील सर्वात नीचांकी होता. यापूर्वी सर्वांत भीषण दुष्काळ असलेल्या १९७२ साली पुण्यात १२.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. संपूर्ण महिन्यात क्वचितच पावसाने हजेरी लावली होती.

ऑक्टोबर महिन्यात पुण्यात परतीच्या मान्सूनमुळे पाऊस होतो. यंदाही परतीच्या पावसाने पुण्यात जोरदार हजेरी लावली. दोन ऑक्टोबरला २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर रविवारी सायंकाळी २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ऑक्टोबर महिन्यात पुण्यात सरासरी ४८.९ मिमी पाऊस होतो. यंदा १३ ऑक्टोबरपर्यंतच पावसाने ही सरासरी ओलांडली असून पुण्यात आतापर्यंत ७६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मी, सरस्वती, कालीचे एकाच मंदिरात दर्शन

$
0
0

>> मंदार लवाटे

गणेशभक्तीच्या उत्सवानंतर आता पुणेकर सज्ज झाले आहेत, ते नवरात्रौत्सवासाठी. परिसरातील देवीच्या मंदिरांची माहिती, इतिहास आणि परंपरांची माहिती 'मटा'च्या वाचकांसाठी...

लक्ष्मी, सरस्वती आणि काली यांचे जिथे एकत्रित दर्शन होते, असे सारसबागेसमोरील मंदिर फार जुने नाही. परंतु, काही वर्षांत हे मंदिर प्रसिद्ध व भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. असे मंदिर उभारले जावे ही बन्सीलाल अग्रवाल यांची इच्छा व कल्पना. त्यासाठीच त्यांनी ही जागा विकत घेतली व १९७२ साली येथे मंदिराचे काम सुरू केले.

राजस्थानी कारागीर येथे १२ वर्षे काम करत होते. १९८४ साली २८ फूट लांब व ५४ फूट रुंद व ५५ फूट उंच शिखर असलेले हे मंदिर तयार झाले व त्याच वर्षी १५ फेब्रुवारीला तिन्ही देवतांची येथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मूर्ती राजस्थानात तयार करण्यात आल्या आहेत. गंगाधर सोमपुरा हे या मंदिराचे शिल्पकार. देवींच्या तिन्ही मूर्ती सहा फूट उंच व चार हातांच्या आहेत.

​नवरात्रीचे नवरंग... येथे क्लिक करा, फोटो अपलोड करा आणि जिंका भरघोस बक्षिसं!

लक्ष्मी बसलेली, तर सरस्वती व काली उभ्या आहेत. सरस्वतीच्या हातात वीणा माळ व पोथी आहे. लक्ष्मीच्या दोन हातात कमळे, तर दोन हात अभयवरद मुद्रेत आहेत. कालीचे रूपही पारंपरिक असून त्रिशूल, मुंड, पात्र व विळा आहे. पायाखाली महादेव आहे. तिन्ही मूर्ती सुरेख व नुसत्या दर्शनाने सुद्धा आनंद देणाऱ्या आहेत. संपूर्ण मंदिर संगमरवरी आहे. प्रदक्षिणा मार्गावर तेरा विविध संताच्या मूर्ती बसविलेल्या आहेत. येथे दिवसभर शास्त्रानुसार पूजापाठ केले जातात. नवरात्र, दिवाळी, लक्ष्मीनारायण विवाह सोहळा, ब्रह्मोत्सव, रामनवमी, कृष्णाष्टमी आदी उत्सव दरवर्षी साजरे केले जातात. सरस्वती, लक्ष्मी व काली यांच्या मूर्ती पुण्यात मोजक्याच आहेत व त्या जिथे एकत्रित आहेत असे हे पुण्यातील गेल्या दोनशे वर्षांतील पहिलेच मंदिर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सून परत फिरणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील पावसाचा जोर ओसरला असून, येत्या एक ते दोन दिवसांत मान्सून राज्यातून माघारी परतण्याची शक्यता आहे. मान्सून राज्यातून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली. दरम्यान, शहरात ऑक्टोबर हिट मोठ्या प्रमाणावर जाणवत असून, पारा ३३.२ अंशांवर पोहोचला आहे.

गेल्या आठवड्यापासूनच मान्सून परतण्यास सुरुवात झाली होती. विदर्भाच्या काही भागांसह जळगावपर्यंतच्या भागातून मान्सूनने माघार घेतली होती. त्यानंतर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या न्यून दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण व पश्चिम व मध्य महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली. हे क्षेत्र विरून गेल्यानंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर ओसरला. पुढील दोन दिवसांतही कोकण वगळता अन्यत्र पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

एक ऑक्टोबरनंतर राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. त्यानंतर सलग पाच दिवस पाऊस न झाल्यास व हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सलग घट झाल्यास त्या भागातून मान्सून परतल्याचे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात येते. सध्या राज्यातील बहुतांश भागांमध्ये अशीच परिस्थिती आहे. पुण्यातही मागील दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावलेली नाही. तापमानातही वाढ होत आहे.

उकाडा वाढला

ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा संपत आला असताना शहरातील उकाड्यात वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी शहरातील पारा ३३. २ अंशांवर पोहोचला आहे. हे तापमान सरासरीपेक्षा एक अंश अधिक होते. पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात आणखी वाढ होऊन तापमान ३५ अंशांवर पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ससूनमधील मार्डचे डॉक्टर संपावर

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

ससून रुग्णालयातील निवासी डॉक्टराला पोलिस कॉन्स्टेबलने मारहाण केल्याच्या निषेधार्थ मार्डच्या डॉक्टरांनी संप सुरु केला आहे. संबंधित पोलिस कॉन्स्टेबलला निलंबित केल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचे मार्डच्या डॉक्टरांनी म्हटले आहे.

ससून रुग्णालयातील एका डॉक्टरला पोलिस कॉन्स्टेबलकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर मार्डच्या डॉक्टरांनी रुग्णालयाचे डीन यांना पत्र लिहून संपावर जात असल्याची जाहिर केले. डॉक्टरांनी सकाळी १० वाजल्यापासून संप पुकारला आहे. संबंधित पोलिस कॉन्स्टेबलला अटक करुन त्याला निलंबित करण्याची मागणी मार्डच्या डॉक्टरांनी केली आहे.

रुग्णालयातील डॉक्टर दुपारी १२ वाजता आंदोलन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत वायसीएम हॉस्पिटलला आग

$
0
0



मटा ऑनलाइन वृत्त । पिंपरी

पिंपरीतील तुकाराम नगरमधील यशवंतराव चव्हाण मेमोरिअल सरकारी हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील रुबी ऑलकेअरच्या अती विशेष ह्रदयविकार सेवा विभागाला आज (गुरुवारी) सकाळी आग लागली. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि पोलिस पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

आगीमुळे हॉस्पिटलच्या इमारतीचे तापमान एकदम वाढले आहे. इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर झाला आहे. अग्निशमन दलाने सुरक्षेचा उपाय म्हणून हॉस्पिटल रिकामे केले आहे. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तसेच डॉक्टर, हॉस्पिटलचे अधिकारी आणि कर्मचारी यांना इमारतीपासून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. काही रुग्णांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांढरगडला जाताना अपघात; एक ठार

$
0
0

शिरूर : देवदर्शनासाठी मांढरगड येथे जाण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या बोलेरो गाडीची आणि ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक होऊन न्हावरा (ता. शिरूर ) येथे झालेल्या अपघातात एक जण ठार; तर १२ जण जखमी झाले आहेत.

मृतामध्ये नगर जिल्ह्यातील सोमनाथ शंकर गाडेकर (वय २२, रा. दाढबुद्रूक, ता. राहता, जि. नगर) हा भाविक जागीच ठार झाला; तर १२ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात १३ आक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास शिरूर चौफुला रोड वरील घोडगंगा साखर कारखान्याजवळ झाला. नगर जिल्ह्यातील हे भाविक बोलेरो गाडी (एमएच.१७ ऐजी ७५६५) मधून शिरूर बाजूकडून चौफुलाच्या दिशेने चालले असताना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर आणि त्याची ट्राली (एमएच 12 जेएन.५४)बरोबर धडक झाली. धडकेत गाडेकर जागीच मरण पावले. तसेच,१२ जण जखमी झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार शंकर येळे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरवड्याची कुलस्वामिनी

$
0
0

संदीप भातकर, येरवडा

येरवडा गावची कुलस्वामिनी, नवसाला पावणारी आणि जागृत म्हणून प्रसिद्ध असणारी देवीची दर वर्षी प्रमाणे मोठ्या भक्तिभावात प्रतिष्ठापना करण्यात आली.

हनुमान मित्र मंडळ हे येरवड्यातील सर्वात जुने देवीचे मंडळ म्हणून ओळखले जाते. मंडळाची स्थापना १९६७ साली झाली असून यंदा मंडळ ४८ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. येरवडा परिसरातील नवसाला पावणारी आणि जागृत देवी म्हणून नावलौकिक आहे.

गावातील भाविक आणि व्यापाऱ्यांच्या वर्गणीतून मंडळ दर वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. देवीची भव्य आणि विलोभनीय मूर्ती आहे. पुढील नऊ दिवस देवीच्या मूर्तीसमोर मंडपात विविध धार्मिक भजन-कीर्तन आणि भारुड असे कार्यक्रम आयोजित केले जातात. येरवड्यात हनुमान मित्र मंडळाच्या देवीची प्रतिष्ठापना आणि कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी मध्यरात्री परिसरातील सर्वाधिक भव्य मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीत सहभागी भक्तांना नागरिकांकडून ठिकठिकाणी फळाचे आणि केशर दुधाचे वाटप केले जाते. मिरवणुकीच्या मार्गावर फटके वाजवून आणि रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात.

या काळात भक्तांकडून देवीला अर्पण करण्यात आलेल्या साड्यांचा दसऱ्याच्या मुहूर्तावर जाहीर लिलाव केला जातो; तर नारळाची होलसेल विक्री केली जाते. साडीच्या विक्रीतून सरासरी दोन लाख आणि नारळाच्या विक्रीतून चाळीस हजार रुपयांचे उत्पन्न मंडळाला येते, अशी माहिती मंडळाचे सचिव रामचंद्र जगताप यांनी दिली. यंदा मंडळातर्फे दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांना धान्यरुपात मदत करण्यात येणार आहे. संजय शिर्के मंडळाचे अध्यक्ष; तर शाम राजगुरू उपाध्यक्ष आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनोरुग्णांना थंड पाण्याची शिक्षा

$
0
0

येरवडा मेंटल हॉस्पिटलमधील सोलर यंत्रणा, वॉशिंग मशिनही बंद

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

मागील काही दिवसांपासून येरवडा मेंटल हॉस्पिटलमधील तीन सोलर यंत्रणेसह महिनाभरापासून कपडे धुण्याचे वॉशिंग मशिनदेखील बंद पडल्याने मनोरुग्णांना थंड पाण्याने अंघोळ करावी लागत आहे. शिवाय स्वतःचे कपडेही स्वतः धुवावे लागत आहे. यंदा मेंटल हॉस्पिटल शताब्दीत पदार्पण करीत असले तरी मनोरुग्णांच्या समस्या सोडविण्यात मात्र अपयशी ठरले आहे.

येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये सोळाशेहून अधिक मनोरुग्ण उपचार घेत असून पुरुष आणि महिला मनोरुग्णांना रोज सकाळी गरम पाण्याने अंघोळ करता यावी, यासाठी काही वर्षांपूर्वी हॉस्पिटलच्या आवारात विविध ठिकाणी २४ सोलर यंत्रे बसविण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमधील २४ पैकी ३ सोलर यंत्रणा बंद पडल्या आहेत. पुरुषांच्या वॉर्ड क्रमांक १, २ आणि महिलांच्या सबला ऐश्वर्या वॉर्डमधील सोलर यंत्रणेत बिघाड निर्माण झाला असल्यामुळे शेकडो पुरुष आणि महिलांना थंड पाण्याने अंघोळ करण्याची शिक्षा भोगावी लागत आहे. हॉस्पिटलच्या आवारातील केवळ ३ सोलर यंत्रणा बंद असल्याची अधिकृत माहिती दिली जात असली तरी प्रत्यक्षात त्याहून अधिक सोलर बंद असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. थंड पाण्यामुळे अनेक महिला रुग्ण अंघोळ करण्यास टाळाटाळ करीत आहेत; तर अनेक महिलांना त्वचेचे आजार झाल्याची माहिती समोर आली आहे.

मागील वर्षीदेखील ऐन थंडीच्या कालावधीत २४ पैकी १९ सोलर यंत्रणा बंद असल्याने जवळपास सर्वच मनोरुग्णांना थंड पाण्याने अंघोळ करण्याची शिक्षा भोगावी लागली होती. दर चार-पाच महिन्यांत आवारातील सोलर यंत्रणेत वारंवार बिघाड होत असूनही वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने अनेक पेशंटना त्रास सहन करावा लागत आहे.

हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या सोळाशेहून अधिक मनोरुग्णांचे रोज कपडे धुण्यासाठी ३०० किलो वजनाच्या क्षमतेचे काही वर्षांपूर्वीच वॉशिंग मशिन खरेदी करण्यात आले. लाखो रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेले वॉशिंग मशिन गेल्या महिभरापासून बंद अवस्थेत असल्याने मनोरुग्णांना स्वतःचे कपडे स्वतःला धुवावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवरात्र फेस्टिव्हल आजपासून

$
0
0

पिंपरी ः पिंपरी-चिंचवडमधील जाणीव फाउंडेशनतर्फे १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड नवरात्र फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे. फेस्टिव्हलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, दांडिया, स्पर्धा घेण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजक अमर कापसे यांनी दिली.फेस्टिव्हलचे उद्‌घाटन शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) सायंकाळी सात वाजता होणार आहे. त्यानंतर 'चैत्रालीचा नाद करायचा नाय' लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजता 'संतवाणी' भावगीत आणि भक्तिगीतांची मैफल होणार आहे. रहाटणीतील धर्मवीर संभाजी उद्यानातील हॉलमध्ये दुपारी चार ते सात या वेळेत पाककला स्पर्धा होणार आहे. रविवारी नवमहाराष्ट्र विद्यालयात चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षा अधिकाऱ्यामुळे विद्यापीठात तणाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्यानेच विद्यापीठ प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रकार गुरुवारी घडला. पदोन्नतीच्या प्रक्रियेवरून झालेल्या गोंधळाने विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या परिसरातच तणाव निर्माण झाला होता.

विद्यापीठाच्या अधिकारी वर्गासाठीची पदोन्नतीची प्रक्रिया नुकतीच झाली. या प्रक्रियेत आपल्याला डावलण्यात आल्याचा आरोप सुरक्षा अधिकारी म. सु. केदारी यांनी गुरुवारी सकाळी केला. त्याच्या निषेधार्थ कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कार्यालयात घुसून केदारी यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी त्यांची समजूत काढून त्यांना शांत केले.

दरम्यानच्या काळात या इमारतीच्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या विषयी केदारी यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत, तर डॉ. गाडे यांच्या उपस्थितीत या विषयीची पुढील कारवाई करण्याचे संकेत डॉ. कडू यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर निश्चित, देय मात्र अनिश्चित

$
0
0

स्वस्त धान्य वाहतुकीच्या दराचा प्रस्ताव प्रलंबित

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

भारतीय खाद्य निगम यांच्याकडून स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणाऱ्या वाहतूक खर्चाबाबतचे दर निश्चित झाले असताना ते देण्याबाबत राज्य सरकारकडून कार्यवाही होत नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील स्वस्त धान्य दुकानदार हतबल झाले असून, त्याचा परिणाम गरजूंच्या धान्य वितरणावर होत आहे.

पुणे शहरातील भारतीय खाद्य निगम गोदाम ते शिवाजीनगर धान्य गोदाम तसेच शिवाजीनगर ते स्वस्त धान्य दुकान या दरम्यानही धान्य वाहतूक स्वतःकडील वाहनांमार्फत करण्याची परवानगी ऑक्टोबर २०१० पासून दुकानदारांना मिळाली आहे. त्यानुसार पुणे शहरातील स्वस्त धान्य दुकानदार धान्याची वाहतूक त्यांच्याकडील वाहनांद्वारे करीत आहेत. त्यासाठी त्यांना स्वतंत्रपणे कोणताही वाहतूक खर्च दिला जात नाही. मात्र, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग यांच्या निर्णयानुसार रिबेट स्वरूपात प्रति क्विंटल आठ रुपये ४३ पैसे दिले जाते.

सप्टेंबर २०१३ पासून भारतीय खाद्य निगम यांच्याकडून शहरासाठी कोरेगाव पार्क येथील धान्य फुरसुंगी गोदामातून देणे सुरू झाले आहे. त्यामुळे पुणे शहरात समावेश असलेल्या पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, देहूरोड या भागातील स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वाहतूक करणे लांब पडते. त्या भागातील स्वतः धान्य वाहतूक करण्यास नकार देत आहेत. नऊ मेट्रीक टन क्षमतेच्या ट्रकचे वाहतूक भाडे शासन आधारभूत दरानुसार दोन हजार २४६ इतके होते.

जिल्हाधिकारी यांनी परिवहन अधिकारी यांच्याकडून प्रस्तावित दर मागविले. त्यानंतर एप्रिल २०१५ रोजी वाटाघाटी करून दर निश्चित केले. तात्पुरत्या स्वरूपाची पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी यांना वाहतूक ठेकेदाराची नियुक्ती करण्यास मान्यता दिली. त्यावरून फुरसुंगी गोदाम ते शिवाजीनगर गोदाम या १८ किलोमीटर अंतरासाठी दर निश्चित करण्यात आले. डिझेलचा दर प्रति लिटर ५५ रुपये गृहित धरण्यात आला. परंतु, दर निश्चित झाला तरी तो मिळालेला नाही. याबाबतचा प्रस्ताव अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी गेल्याच महिन्यात अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाकडे पाठविला आहे. परंतु, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वायसीएम’मधील रुबीला आग

$
0
0

पिंपरी-चिंचवडमधील हॉस्पिटलचे मोठे नुकसान; जीवितहानी टळली

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरीतील संत तुकारामनगर येथे असलेल्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमधील (वायसीएम) पहिल्या मजल्यावर असलेल्या रुबी एलकेअरच्या हृदयरोग सेवा विभागाला गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीमध्ये कोणीतीही जीवितहानी झाली नसून, हॉस्पिटलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 'वायसीएम'मधील रुबी एलकेअरमध्ये घडलेली आगीची ही चौथी घटना आहे.

विभागाला लागेलल्या आगीने काही क्षणातच रूद्र रूप धारण केले. त्यामुळे सगळीकडे धुराचे लोट निर्माण झाले होते. आग लागली त्या वेळी रुबी एलकेअरमधील अतिदक्षताविभागामध्ये १४ रुग्ण उपचार घेत होते. तर ५८ कर्मचारी कामावर होते. आगीची माहिती कळताच अतिदक्षता विबागातील रुग्णांना तातडीने वायसीएम हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले. तर कर्मचाऱ्यांना बाहेरील मोकळ्या मैदानात पाठविण्यात आले.

महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या चार गाड्यांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे वृत्त कळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर शकुंतला धराडे, आमदार गौतम चाबूकस्वार, स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे, नगरसेविका सुजाता पालांडे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अग्निशामक अधिकारी किरण गावडे, सहशहर अभियंता अशोक सुरगुडे यांनी वायसीएम हॉस्पिटलला भेट दिली.

'येत्या दोन दिवसात या आगीच्या कारणाचा अहवाल येईल. पंधरा दिवसात बाह्य रुग्णालयाचे काम सुरू होऊ शकेल. तर, येत्या दीड महिन्यात रुबी एलकेअरच्या शस्त्रक्रिया विभागाचे काम सुरू करण्यात येईल,' अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी दिली. यापूर्वीसुद्धा याच विभागामध्ये आगीच्या घटना घडल्या होत्या. मात्र, त्यातून कोणताही बोध घेतला गेला नसल्याचे किंवा ठोस उपाय योजना न केल्याचे या घटनेमुळे समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images