Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘डाळींची आयात हाच पर्याय’

$
0
0

पुणेः गेल्या वर्षीच्या तुलनेत डाळींच्या भावात प्रचंड वाढ झाली असून, भाववाढ नियंत्रित करण्यासाठी डाळी आयात करणे हाच पर्याय असल्याचे मत पूना मर्चंट चेंबरने मांडले आहे. त्यामुळे सरकारने डाळींचे भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही चेंबरने केली आहे.

सध्या तूरडाळीचा एक किलोचा भाव १३५ ते १५५ रुपये झाला आहे. त्या तुलनेत हरभरा, मटकी, मसूर या डाळींचे भाव कमी आहेत. मात्र, त्यातही दुपटीने वाढ झाली आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये घाऊक बाजारात तुरडाळीचा भाव ६० ते ७० रुपये किलो, हरभरा डाळ ३० ते ३५ रुपये आणि उडीद डाळीचा भाव ८० रुपये किलो होता. हे भाव या वर्षी एप्रिल व मे महिन्यापर्यंत कायम होते. त्यानंतर सर्व डाळींच्या भावात दुपटीने वाढ झाली आहे.बहुराष्ट्रीय कंपन्या डाळीच्या व्यापारात उतरल्या असून, त्यांच्यावर साठवणुकीची मर्यादा नाही. त्यामुळे साठेबाजीचा प्रकार वाढला आहे; तसेच अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने पिकांवरही त्याचा परिणाम झाला असून डाळींचे उत्पादन पन्नास टक्क्यांनी घटले आहे. केंद्र सरकारने पाच हजार क्विंटल तुरडाळीची आयात केली; पण ती पुरेशी ठरली नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आळंदी रोड बीआरटी झाली ‘ओव्हरफुल्ल’

$
0
0

Suneet.Bhave@timesgroup.com

पुणे : गेल्या अनेक महिन्यांपासून मोकळ्याच असलेल्या स्वतंत्र मार्गिकेतून बस धावण्यास सुरुवात झाली अन् रिकाम्या, दुर्लक्षित बसथांब्यांवर प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. दैनंदिन प्रवासी संख्येत दुपटीने, तर मासिक प्रवासी संख्येतही लक्षणीय वाढ नोंदवून बीआरटीने महिन्याभरातच आळंदी रोडवासीयांना आपलेसे केले आहे.

संगमवाडी-विश्रांतवाडी रोडवर (आळंदी रोड) 'रेनबो बीआरटी' सुरू होऊन आज, बुधवारी (३० सप्टेंबर) एक महिना पूर्ण होत आहे. कात्रज-हडपसर रस्त्यावरील पथदर्शी बीआरटीला प्रचंड विरोध करणाऱ्या पुणेकरांनीच नव्या अवतारातील बीआरटीला आपलेसे केल्याचे संकेत मिळत असून, सार्वजनिक वाहतुकीच्या या प्रयोगाचे टप्प्या-टप्प्याने विस्तारीकरण करण्याची अपेक्षाही आता प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

आळंदी रोडवर पायाभूत सुविधांची निर्मिती झाल्यानंतरही 'आयटीएमएस' यंत्रणेअभावी बीआरटी सुरू होण्यास विलंब झाला. अखेर, गेल्या महिन्यात ३० तारखेपासून बीआरटी प्रवाशांसाठी रुजू झाली. सुरुवातीच्या टप्प्यात प्रवाशांना महिनाभर मोफत प्रवास दिला जाणार होता; पण पालिकेने ही मर्यादा दहा दिवसांपर्यंत मर्यादित ठेवली. तरीही, बीआरटीची सेवा प्रवाशांना फायदेशीर ठरत असल्याचे पीएमपीच्या आकडेवारीतून स्पष्ट होत असून, दैनंदिन प्रवासी संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सरासरी प्रवासी संख्येमध्येही वाढ झाली असून, मोफत प्रवासाचे १० दिवस वगळले, तरीही या सेवेला प्रवाशांकडून पसंती मिळत आहे.

'बीआरटीला प्रवाशांकडून मिळालेला प्रारंभिक प्रतिसाद पीएमपीसाठी उत्साहवर्धक आहे. सक्षम सार्वजनिक व्यवस्थेमुळे वेळेत बचत होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे,' असे निरीक्षण पीएमपीच्या सीईओ मयूरा शिंदेकर यांनी नोंदविले.

पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनामुळे सुरुवातीच्या काही दिवसांत जाणवलेल्या समस्या आता दूर झाल्या आहेत. बसची फ्रिक्वेन्सी कायम असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद दिवसागणिक वाढत आहे. बीआरटीमुळे रस्त्यावरील अपघातांच्या संख्येतही घट झाली आहे.

- अभिषेक कृष्णा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिळकांवरील चित्रपटासाठीचा निधी भोवणार

$
0
0

धुमाळेंकडून अनुदानवसुली होणार

Parag.karandikar @timesgroup.com

पुणे : केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडून लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यासाठी घेण्यात आलेला निधी निर्माते विनय धुमाळे यांच्या चांगलाच अंगाशी आला आहे. अनुदान घेतल्यानंतरही तब्बल १६ वर्षे हा चित्रपट अपेक्षेनुसार बनविण्यात धुमाळे यांना अपयश आल्याचा निष्कर्ष राज्याच्या सांस्कृतिक विभागाने काढला असून या अनुदानाची व्याजासकट वसुली करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.

विनय धुमाळे यांनी संबंधित चित्रपटासाठी १९९८मध्ये केंद्र सरकारकडून अडीच कोटी, तर राज्य सरकारकडून ५० लाख रुपये अनुदान घेतले होते. त्यानंतर सोळा वर्षे हा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्याबद्दल पुण्यातील विष्णू रामचंद्र कमळापूरकर यांनी माहिती अधिकाराचा वापर करून पाठपुरावा केला होता. त्याचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रसिद्ध केले होते. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयाने त्याची दखल घेऊन धुमाळे यांना १७ मे व १९ मे २०१४ रोजी पत्र पाठवून याबाबतची माहिती मागविली होती. त्याला धुमाळे यांनी ३ जून २०१४ रोजी पत्र पाठवून उत्तर दिले व सोबत अडीच तास कालावधीच्या चित्रपटाची डीव्हीडीही त्यांनी राज्य सरकारकडे सोपविली. मात्र हा चित्रपट प्रदर्शित करण्यात त्यांना यश आलेले नाही. त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर २ जून २०१५ रोजी पत्र पाठवून चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत आपली काय भूमिका आहे, हे स्पष्ट करण्याचा अंतिम इशारा सरकारने दिला होता. त्यानंतर धुमाळे यांनी राज्याच्या सांस्कृतिक संचालकांची व सचिवांची भेटही घेऊन आपण या बाबत प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते. मात्र त्या घटनेनंतरही तीन महिन्यांमध्ये त्यांच्याकडून काहीच हालचाल न झाल्याने आता त्यांच्याकडून राज्य सरकारने पन्नास लाख रूपयांचे अनुदान व्याजासह वसूल करण्याची कारवाई सुरू केली आहे. या बाबतचे पत्र धुमाळे यांना दोन दिवसांपूर्वी पाठविण्यात आले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

चित्रपट नव्हे, सुमार माहितीपट

विनय धुमाळे यांनी शासकीय अर्थसहाय्यातून निर्माण केलेला 'लोकमान्य' चित्रपट (डीव्हीडी स्वरूपातील) हा अतिशय सुमार दर्जाचा असून राष्ट्रपुरुषांवर चित्रपट बनविण्याचा उद्देश या चित्रपटातून सफल झालेला नाही, असे स्पष्ट मत राज्य सरकारच्या चित्रपट परीक्षण समितीने नोंदविले आहे. या समितीमध्ये संजीव कोलते, भक्ती मायाळू, प्रकाश जाधव, बाळासाहेब गोरे, विजय कोंडके, मधु कांबीकर, ललिता ताम्हाणे, महेश लिमये व सदस्य सचिव म्हणून मंगेश मोहिते यांचा समावेश होता. या चित्रपटाच्या सर्वच अंगांची समितीने चिरफाड केली आहे. हा चित्रपट नसून अडीच तासांचा माहितीपट असल्याचे समितीने नमूद केले असून सरकारचा या बाबतचा हेतू सफल झालेला नसल्याचेही त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त’ची कामे वरदानचः शिवतारे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सासवड

'प्रायोगिक तत्त्वावर पुरंदर तालुक्यात सुरु केलेली जलयुक्त शिवार अभियान योजना राज्यासाठी वरदान ठरत आहे. उशिरा आलेल्या परतीच्या पावसामुळे जलयुक्त शिवार अभियान दीर्घकाळासाठी टिकावू असल्याची प्रचिती सर्वांना आली,' असे जलसंपदा व जलसंधारण राज्य मंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.

तालुक्यातील विविध कामांची पाहणी करून शिवतारे यांनी जलपूजन केले. त्यावेळी ते बोलत होते. दौंडज येथील बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याची त्यांनी पाहणी केली. नजीकच्या काळात कऱ्हा नदीच्या उजव्या बाजूकडील भागांना गुंजवनीचे हक्काचे पाणी बंद पाइपमधून देण्याच्या कामाला सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 'आधीच्या राज्यकर्त्यांनी या खात्याचे काम कशा पद्धतीने केले ते सर्वांसमोर आहे. कोट्यावधी रुपये हडपण्याचा उद्योग करणाऱ्यांना जनता आणि न्यायदेवता माफ करणार नाही,' अशी टीका शिवतारे यांनी केली.

'मोठ्या धरणांच्या मागे लागण्यापेक्षा स्थानिक ठिकाणी पाणी जिरवून भूजल पातळी वाढवणे, तसेच हे पाणी पुढील जून-जुलैपर्यंत पुरवणे हे उद्दिष्ट साध्य होणार आहे. श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, साईबाबा देवस्थान यांनी या कामास प्रत्येक जिल्ह्यास एक कोटी मदत दिली आहे,' अशी माहिती शिवतारे यांनी दिली.

या पाहणी दौऱ्यात शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप यादव, उमेश गायकवाड उपस्थित होते. सोनोरी, पानवडी, दिवे, साकुर्डे, वाल्हे, गुळुंचे, तक्रारवाडी, वाळूंज शिवरी,पांडेश्वर, एखतपूर, मुंजवाडी, नावळी, काळदरी, परिंचे, सटलवाडी, टेकवडी, पिंगोरी या गावांमध्ये शिवतारे यांनी पाहणी केली. तालुक्यात या कामांवर आठ कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे १,६९४ दशलक्ष घनमीटर (टीएमसी) पाणी साठवण क्षमतानिर्माण झाली आहे, तसेच ३०९ पैकी १९० कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहितीही देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालेवाडीत शाळेजवळ दारूविक्रीचे दुकान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औंध

बालेवाडी येथे शाळेजवळ सुरू करण्यात आलेले दारूविक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांकडे केली आहे. बालेवाडी येथे भारती विद्यापीठ, खंडेराय प्रतिष्ठानचा शैक्षणिक कॅम्पस आहे; तसेच डी. एड, बी. एड. व एमबीए कॉलेज आहे. या परिसरातच साई सिलीकॉन व्हॅली सोसायटीला लागून असलेल्या गाळ्यामध्ये दारू विक्रीचे दुकान सुरू करण्यात आले आहे. या दुकानाला सोसायटीने ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. मात्र, शैक्षणिक संस्था समोर असतानाही दारूविक्रीच्या दुकानाला परवानगी देण्यात आल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शाळेपासून अवघ्या २५ मीटर अंतरावर दारू विक्रीचा व्यवसाय सुरू झाल्याने सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे या दुकानाच्या कागदपत्रांची चौकशी करावी, तसेच तातडीने हे दुकान बंद करावे, अशी मागणी अमोल बालवडकर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरण विरोधात राष्ट्रवादीचा ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

गेल्या काही महिन्यांपासून खराडी-चंदननगर भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दहा तासांपेक्षा अधिक काळ उलटूनही वीज पुरवठा सुरळीत होत नाही. त्या संदर्भातील तक्रारीवर अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे महावितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी ठिय्या आंदोलन केले.

खराडीतील इऑन आयटी पार्क शेजारील महावितरणच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले. या वेळी नगरसेवक महेंद्र पठारे, महादेव पठारे, अर्जुन टोपे, नगरसेविका संजिला पठारे, सुमनताई पठारे, नाना नलावडे, बाळासाहेब पठारे, संतोष बोराटे, आत्माराम पठारे, खंडू खांदवे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

खराडीतील प्रभाग क्रमांक २, १९मधील खराडीगाव, थिटेवस्ती, आपले घर, चंदननगर, दिनकर पठारे वस्ती, श्रीरामनगर, तुळजाभवानीनगर, एकनाथ पठारे वस्ती, सातव वस्ती या भागातील वीजपुरवठा गेल्या चार महिन्यांपासून वारंवार खंडित होत आहे. वीज गेल्यानंतर सुमारे दहा ते पंधरा येत नाही. याबाबत तक्रार करणाऱ्या नागरिकांचे फोन उचलले जात नाहीत. ग्राहकांना वाढीव दराने वीज बिल भरावे लागत असून बिलासंदर्भात एकही अधिकारी नागरिकांना प्रतिसाद देत नाही. या समस्या सोडविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. महावितरणचे कार्यकारी अभियंता गुलाब कडाळे व सहायक अभियंता विजय जाधव यांना या वेळी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली; तसेच भविष्यात पुन्हा समस्या निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आश्वासन दिले.

खराडी-चंदननगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत महावितरणकडे वारंवार तक्रार करूनही समस्या सुटत नसल्याने ठिय्या अंदोलन करण्यात आले.

- महेंद्र पठारे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा डेपो होणार हद्दपार

$
0
0

बारामतीत घन कचरा प्रकल्प; हरित कोळशाचेही उत्पादन

म. टा. वृत्तसेवा, बारामती

बारामती शहराची वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उंचावलेले राहणीमान,प्लास्टिकचा वाढता वापर यांमुळे तयार होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. कचरा जाळल्याने पर्यावरणावर परिणाम होतो, तसेच अशास्त्रीय पद्धतीने पुरल्याने हवा, भूजल आणि माती दूषित होते. त्यामुळे बारामतीत आधुनिक तंत्र प्रणालीचा वापर करून दुर्गंध विरहित घन कचरा प्रकल्प सुरू होणार आहे. या प्रकल्पातून हरित कोळशाचे उत्पादनही होणार आहे.

बारामतीपासून मोरगावमार्गे कऱ्हावागजपासून पाच किमी अंतरावर ढाकळे गावाच्या हद्दीत खासगी जमिनीवर दुर्गंध विरहित घन कचरा प्रकल्प सुरू होणार आहे. बारामतीची लोकसंख्या सव्वा लाख, तसेच तरंगती लोकसंख्या वीस हजार असल्याने रोज ३० टन कचरा निर्माण होतो. यात ओला कचरा १८ टन, तर सुका कचरा १२ टन जमा केला जातो. त्यापैकी सध्या पाच टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दीड एकर जागेवर १५ टन क्षमतेचा दुर्गंधी विरहित घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण होणार आहे. त्यासाठी १५ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे कचरा डेपोच्या जागेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागून कचऱ्याच्या समस्येतून पालिकेला सुटका मिळणार आहे. शाळा, विविध संस्था, तसेच संघटनांच्या मदतीने घन कचऱ्याच्या वर्गीकरणाबद्दलची जागरुकतेसाठी उपक्रम राबवणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू पिऊन झालेल्या वादात डोक्यात दगड घालून खून

$
0
0

पुणे : नऱ्हे येथे अर्धवट बांधलेल्या इमारतीच्या पोटमाळ्यावर एका व्यक्तीचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळला. या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू पिऊन झालेल्या वादामुळेच हा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सदाप्पा गणपत चव्हाण (वय ५८, रा. हगवणे वस्ती, वडगाव बुद्रुक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण यांचा पेपर एजन्सीचा व्यवसाय आहे. त्यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे घराबाहेर गेले की ते दोन ते तीन दिवस परत येत नव्हते. सोमवारी सकाळी बँकेत पैसे भरतो म्हणून चव्हाण गेल्यानंतर परतले नव्हते. बुधवारी सकाळी नऱ्हे येथील नवले हॉस्पिटलच्या पाठीमागील अर्धवट बांधकाम झालेल्या आशीर्वाद इमारतीच्या पोटमाळ्यावर एका नागरिकाला त्यांचा मृतदेह आढळला. त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.

नऱ्हे पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक एम. एन. नागरगोजे व त्याचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या मृतदेहाची पाहणी केली. त्या वेळी मृतदेहाच्या शेजारी चव्हाण यांच्या नावाचे बँकेचे पासबुक आढळले. त्यावरून त्यांची ओळख पटविण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांना बोलविले असता हा मृतदेह चव्हाण यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे.

पुरंदर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

सासवड : पुरंदर तालुक्यात चोरट्यांनी घरे फोडण्याची मोहीम पुन्हा सुरू केली आहे. सासवड येथे एकाच दिवशी चोरट्यांनी तीन घरे फोडली, तर वीर येथे एका किराणा दुकानासह इतर पाच घरे फोडली. यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून, पोलिसही चक्रावले आहेत. संपतराव गोपाळराव कांचन (वय ७१, रा. वीर, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. कांचन यांचे वीर येथील महाराष्ट्र बँकेजवळ संदीप जनरल स्टोअर्स नावाने किराणा दुकान आहे. मंगळवारी पहाटे चोरट्याने किराणा दुकानाचे शटर उचकटून दुकानातील गल्ल्यात ठेवलेले रोख ४० हजार आणि स्टीलच्या डब्यात ठेवलेल्या सोन्याच्या अंगठ्या असे ५७ हजार १० रुपये लांबवले. त्यांच्याशेजारी राहणारे राजेंद्र दत्तात्रय वाघ, बाळासाहेब आनंदराव धुमाळ, ताराबाई पांडुरंग कुदळे आणि विनोद सदाशिव मोरे यांची बंद घरे फोडून चोऱ्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लघुशंका केल्याचा राग; तरुणाला रॉडने मारहाण

$
0
0

पुणे : घराजवळ लघुशंका केल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या त्याच्या नातेवाइकालाही मारहाण करण्यात आली. डेक्कनच्या पीएमपी बसस्थानकाजवळ मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता ‘स्मार्ट कँटोन्मेंट’

$
0
0

देशभरातील बोर्डांसाठी संकल्पना

पुणे : देशात 'स्मार्ट सिटी'ची संकल्पना राबविण्यात येत असताना, दुर्लक्षित असलेल्या देशभरातील कँटोन्मेंट बोर्डांसाठी 'स्मार्ट कँटोन्मेंट' ही संकल्पना राबविण्याचा विचार संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. त्यानुसार कँटोन्मेंट बोर्डांचा विकास हा जाचक आणि जुन्या नियमांमुळे थांबला असल्याने त्या नियमांमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पार्लमेंटरी कन्सल्टिंग कमिटीची बैठक नुकतीच नवी दिल्ली येथे झाली. त्यामध्ये केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नवीन नियम करण्याबाबतचे सुतोवाच केल्याचे पुणे कँटोन्मेंट बोर्डातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

देशातील विविध १९ राज्यांमध्ये ६२ कँटोन्मेंट बोर्ड आहेत. त्यामध्ये सुमारे २० लाखांपेक्षा अधिक नागरिक राहात आहेत. कँटोन्मेंट बोर्डांच्या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या परिसरासाठी असलेल्या जुन्या नियमांमुळे विकासाला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या नियमांमध्ये बदल करण्याचा विचार संरक्षण मंत्रालयाकडून सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. राज्यात असलेल्या कँटोन्मेंट बोर्डांमध्ये पुणे, देहूरोड, खडकी, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिकमध्ये देवळाली, नागपूरमध्ये कामाठी यांचा समावेश आहे.

प्रमुख अडथळे

बोर्डाच्या नागरिकांसमोर असलेल्या अडथळ्यांपैकी चटई क्षेत्र​ निर्देशांकाचा (एफएसआय) मोठा अडथळा आहे. सध्या बोर्डाच्या हद्दीत एकच 'एफएसआय' असल्याने ​समस्या निर्माण होत आहे. 'एफएसआय'मध्ये वाढ करण्याची नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी आहे.

नव्याने बांधकामांना परवानगी मिळत नसल्याची मोठी अडचण आहे. बोर्डांकडून जुन्या आणि पडायला आलेल्या इमारती दुरुस्तीला परवानगी दिली जाते.

मालमत्ता नावावर करण्यासाठी वारसदारांना हेलपाटे मारावे लागतात.

लष्कराचा वरचष्मा असल्याने अनेक रस्ते बंद केले जातात. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपरीत झोपड्यांसाठी अडीच ‘एफएसआय’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात शहरी गरिबांना मूलभूत सुविधा पुरविणे (बीएसयूपी) आणि एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमासाठी (आयएचएसडीपी) अडीच चटईक्षेत्र मंजूर करण्यात आले आहे. हे चटईक्षेत्र फक्त या योजनांसाठीच वापरण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे.

एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम; तसेच शहरी गरिबांना मूलभूत सेवा पुरविण्याच्या योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी अडीच चटईक्षेत्र (एफएसआय) मंजूर करण्याची तरतूद महापालिकांमध्ये करण्यात आली आहे. त्यासाठीची कलम ३७ अन्वये फेरबदलाची कारवाई पू्र्ण होईपर्यंतही मुभा देण्यात आली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा समावेश नव्हता. ही तरतूद आता पिंपरी-चिंचवड प्राधिकरणालाही लागू करण्याचा निर्णय नगर विकास विभागाने घेतला आहे.

एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यकर्म, बीएसयूपी, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (एडब्ल्यूएस), अल्प उत्पन्न गट व संक्रमण गाळे या शहरी गरिबांसाठी असलेल्या गृहनिर्माण योजनांसाठी ही तरतूद अमलात येणार आहे; तसेच २४ डिसेंबर २००८ या पूर्वलक्ष्यी प्रभावाने ती अमलात आणण्याचे आदेशही नगर विकास विभागाने दिले आहेत.

या योजनांसाटी मंजूर झालेले चटईक्षेत्र अन्यत्र कोठेही वापरता येणार नाही. ते फक्त या योजनांसाठीच वापरण्याचे बंधन घालण्यात आले आहे. अडीच चटई क्षेत्राच्या कमाल विक्री घटकामुळे १५ टक्के चटई क्षेत्र हे विक्रीसाठी उपलब्ध करता येणार आहे; तसेच १५ टक्के मर्यादेत एकात्मिक झोपडपट्टी विकास व बीएसयूपी योजना सुसाध्य होऊ शकत नसतील, तर म्हाडाच्या छाननीअंती आणखी दहा टक्के चटईक्षेत्र विक्रीसाठी अनुज्ञेय करण्याचीही सूचना करण्यात आली आहे.

कार्यवाही प्राधिकरणाकडे

या योजनांना अडीच चटईक्षेत्र मंजूर करताना खुल्या जागा (ओपन स्पेस) व बाजूच्या मोकळ्या जागा (साइड मार्जीन) आवश्यकतेप्रमाणे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेनुसार (एसआरए) सवलत देण्याची कार्यवाही प्राधिकरणाच्या सीईओ यांनी करावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात घुसून तरुणास मारहाण

$
0
0

पुणे : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला घरात घुसून मारहाण केल्याची घटना उत्तमनगरमधील चांदेकर चाळीत रविवारी रात्री घडली. या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत १९ वर्षीय विवाहित महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार टिपू सय्यद (रा. उत्तमनगर) व त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मिहलेचा भाऊ व आरोपीत भांडण सुरू होते. या वेळी त्यांच्या पतीसह त्या ठिकाणी भांडण सोडविण्यासाठी गेल्या होत्या. आरोपी व त्याच्या साथीदारांनी तक्रारदार महिलेच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली; तसेच त्यांच्या घरात घुसून भांड्यावर दगड मारला. त्यांच्या हातातील सोन्याची अंगठीही जबरदस्तीने काढून नेली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक पी. वाय. ताटे अधिक तपास करीत आहेत.

कर्वेनगरमध्ये मंगळसूत्र हिसकावले

कर्वेनगर येथे पायी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील साठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४३ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून मोटारसायकलवरील दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला रस्त्याने पायी घरी जात होत्या. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावले व आरोपी ताथवडे उद्यानाच्या दिशेने पळून गेले. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिसाळ हे अधिक तपास करीत आहेत.

तरुणाच्या खूनप्रकरणी जन्मठेप

तरुणाचा गोळी झाडून खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. पांडे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला. विजय रघुनाथ निकम (वय ३२) याच्या खूनप्रकरणी नितीन ऊर्फ गणपत शिवाजी कोळी (वय ३२, रा. बाटे चाळ, वारजे जकातनाका) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. अजय रघुनाथ निकम (वय २८, रा. वारजे जकातनाका) यांनी फिर्याद दिली होती. १७ ते १८ फेब्रुवारी​ २००८ या कालावधीत वारजे परिसरातील कॅनॉल रोडलगत ही घटना घडली. नितीन आणि विजय यांच्यात २००७ मध्ये दहीहंडीच्या फ्लेक्सवर फोटो न छापल्याने वाद झाले होते. त्यानंतर विजय पुन्हा नितीनला जाब विचारण्यासाठी गेले होते. त्या वेळी चिडून नितीनने पिस्तूलातून विजयच्या उजव्या डोळ्यावर गोळी झाडली. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या केसमध्ये सरकारी वकील सुनिल हांडे यांनी आठ साक्षीदार तपासले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृतीयपंथीय, वेश्यांचीही होणार मतदारनोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तृतीयपंथीय, तसेच वेश्या व्यवसायातील महिलांची मतदारनोंदणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर टाकण्यात आली आहे. पोलिसांना घाबरून या महिला सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन नावनोंदणी करत नाहीत. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पोलिसांनी ही मतदारनोंदणी करून घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. सामाजिक सुरक्षा विभाग, तसेच वेश्यावस्ती असलेल्या संबंधित पोलिस ठाण्यांना या बाबतीतील सूचना देण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव, तसेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली होती. त्यामध्ये शासकीय, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, तसेच तृतीयपंथीय आणि वेश्या व्यवसायातील महिलांचे प्रतिनिधी होते. वेश्या व्यवसायातील महिलांना पोलिस कारवाईची भीती वाटत असल्याने त्या सरकारी कार्यालयामध्ये जाण्यास घाबरतात. त्यामुळे मतदारयादीमध्ये त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.

पोलिस कोणावरही विनाकारण कारवाई करत नाहीत. त्यामुळे वेश्या व्यवसायातील महिलांचा पोलिसांबद्दलचा समज गैरसमजुतीतून झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. यावर तोडगा म्हणून वेश्या व्यवसायातील महिलांमध्ये मतदार नोंदणीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाकडून पुढील महिन्याच्या आठ तारखेपासून मतदार नावनोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये तृतीयपंथीय, तसेच वेश्या व्यवसायातील महिलांची मतदारनोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही जागृती करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. या स्वयंसेवी संस्थांना पोलिसांनी मदत करण्याचे आदेश आयोगाकडून देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीआयएटी’विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खडकवासला येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नोलॉजीच्या (डीआयएटी) विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात पुकारलेले आंदोलन सुरूच ठेवले आहे. संस्थेने आपल्या हक्काच्या पाठ्यवृत्तींचे नियमानुसार वितरण केल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्याचा निर्धार संस्थेतील संशोधक विद्यार्थ्यांनी बुधवारी व्यक्त केला.

संशोधकांसाठीच्या पाठ्यवृत्तीच्या वितरणात अनियमितता होत असल्याचा आरोप या विद्यार्थी संशोधकांनी केला आहे. 'डीआयएटी'च्या माध्यमातून पीएचडीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गेल्या काही महिन्यांपासून पाठ्यवृत्ती मिळण्यात सातत्याने अडचणी भेडसावत होत्या. त्या विषयी संस्थेकडे पाठपुरावा केल्यानंतरही विद्यार्थ्यांना नियमानुसार आणि अपेक्षित वेळेवर पाठ्यवृत्ती मिळत नसल्याने, विद्यार्थी अखेर आंदोलनाच्या टप्प्यावर पोहोचल्याचे या विद्यार्थ्यांनी 'मटा'ला सांगितले.

'आम्ही जवळपास गेल्या तीन आठवड्यांपासून आंदोलन करत आहोत. सुरुवातीच्या काळात पूर्णवेळ आंदोलन केल्यानंतर, प्रशासन आमचा सकारात्मक विचार करताना दिसले. त्यामुळे सध्या आम्ही सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी दोन तास आंदोलन करत आहोत. उर्वरित वेळेत नियमित अभ्यासक्रम पूर्ण करणे सुरू आहे,' अशी माहिती या विद्यार्थ्यांनी बुधवारी दिली.

'सिव्हिलियन' म्हणूनच हा अन्याय का?

'संरक्षण खात्याच्या अखत्यारित असलेल्या इतर सर्व संशोधन संस्थांमध्ये संशोधकांना नव्या नियमांनुसार पाठ्यवृत्ती लागू झाल्या आहेत. त्या ठिकाणी कार्यरत संशोधक हे संरक्षण खात्यातील अधिकारी वा पूर्णवेळ कर्मचारी आहेत. डीआयएटीमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी हे संरक्षण खात्याच्या दृष्टीने 'सिव्हिलियन'च आहेत. त्यामुळेच या संस्थेमधील विद्यार्थ्यांवर हा अन्याय होत आहे का,' असा सवालही या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मासेमारी करताना बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

चिखलीमध्ये इंद्रायणी नदीत मंगळवारी (२९ सप्टेंबर) सायंकाळी बुडालेल्या एका नागरिकाचा मृतदेह बुधवारी (३० सप्टेंबर) सकाळी आढळून आला आहे. नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

अशोक भानुदास सरोदे (वय ५०, रा. चिखली) असे बुडून मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखलीमध्ये नदीपात्रात एक जण बुडाल्याची माहिती मंगळवारी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नदीत शोधकार्य केले असता काहीच आढळून आले नव्हते. त्यानंतर बुधवारी सकाळी नागरिकांना नदीत अशोक सरोदे यांचा मृतदेह आढळून आला. अशोक सरोदे या ठिकाणी पाण्यात मासेमारी करायचे. मासेमारी करीत असताना ते नदीत बुडाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

पिस्तुल विक्री करणाऱ्या दोन जणांना अटक

निगडी प्राधिकरण परिसरात देशी बनावटीची पिस्तुल विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनीट चारच्या पथकाने अटक केली. दोघांकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल, जादा मॅक्झिन आणि तीन ज‌िवंत काडतुसे असा ५३ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.

अजयकुमार विजेंद्रप्रसाद सिंग (३२, रा. निगडी गावठाण) आणि शैलेश नलावडे (३७, यमुनानगर, निगडी) या दोघांना अटक केली आहे. युनीट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मण बोराटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील दुर्गानगर चौकात एक जण पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी विवेकानंद सपकाळे यांना खबऱ्यांमार्फत मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला होता. त्यानुसार दुर्गानगरभागात संशायवरून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल, एक जादा मॅक्झिन, तीन जिवंत काडतुसे असा एकून ५३ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला. त्यानुसार या दोघांना अटक केली. त्या पिस्तुलाचा वापर दोघेजण कशासाठी करणार होते. त्याचा तपास गुन्हे शाखा करीत आहेत सहायक निरीक्षक नितीन भोयर, फौजदार विलास पालांडे, सहायक फौजदार धनंजय चव्हाण, कर्मचारी संतोष बर्गे, सजंय गवारे, गणेश काळे, हेमंत खरात, अमित गायकवाड, प्रमोद लांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू

स्वाइन फ्लूमुळे ताथवडे येथील ४३ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान वायसीएम हॉस्पिटलमध्ये बुधवारी (३० सप्टेंबर) मृत्यू झाला आहे. संबंधित व्यक्तीला १९ सप्टेंबर रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. २२ सप्टेंबर रोजी त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले. पहिल्या दिवसापासूनच त्यांच्यावर स्वाइन फ्लूरोधक उपचार सुरू करण्यात येत होते. बुधवारी त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकी घसरून पडलेल्या तरुणाचा मृत्यू

$
0
0

पुणे : वाळूवरून दुचाकी घसरून पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री मृत्यू झाला. वारजे येथील सेल पेट्रोलपंपासमोर गेल्या गुरुवारी रात्री हा अपघात झाला होता. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश शिवाजी शिंदे (३०, रा. संगमनेर, ता. घुलेवाडी, अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक एच. व्ही.चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हा गुरुवारी रात्री मुंबई- बेंगळुरू मार्गाने चांदणी चौकाकडून वारजे चौकाकडे जात होता. सेल पेट्रोल पंपासमोर भरधाव दुचाकी वळूवरून घसरून शिंदे रस्त्यावर पडला. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी हालविण्यात आले. मात्र, शनिवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

महिलेची फसवणूक

पुणे : प्रसारभारतीच्या डी. डी. किसान चॅनेलमध्ये पत्रकार म्हणून नोकरीच्या बहाण्याने एका तरुणीची ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमृता गायकवाड (वय २५, रा. वडगाव बुद्रुक) हिने तक्रार दिली आहे. त्यावरून राजेश कुमार व अनिता वर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ऑगस्ट महिन्यात गायकवाड यांना मोबाइल फोन आला. प्रसार भारतीच्या डी. डी. किसान चॅनेलमध्ये पत्रकार म्हणून निवड झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांचा विश्वास संपादन करून नोकरी व इतर कारणासाठी त्यांना बँकेच्या खात्यावर वेळोवेळी ३८ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार वेळोवेळी पैसे भरले. पैसे भरल्यानंतरही त्यांना कोणतीच नोकरी न मिळाल्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठ हजारांची रोकड लांबवली

$
0
0

पुणे : बँकेतून पैसे काढून घरी निघालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला पैसे पडल्याचे सांगून त्यांची साठ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून नेली. टिळक रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्र समोर मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पांडुरंग चौरे (वय ६१, रा. सिंहगड रोड) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौरे हे मंगळवारी सकाळी टिळक रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पैसे काढण्यासाठी सायकलवरून आले होते. त्यानुसार त्यांनी बँकेतून साठ हजार रुपये काढले आणि एका बॅगेत भरून पार्किंगमध्ये लावलेली सायकल काढण्यासाठी गेले होते. त्यांनी त्याच्या हातातील पैशाची बॅग ही सायकलच्या हॅन्डलला अडकवली. त्या वेळी चौरे यांच्याजवळ एक व्यक्ती आली. त्याने दहा-दहा रुपयांच्या नोटा रोडवर टाकून चौरे यांना तुमचे पैसे पडले आहेत, असे सांगितले. दहाच्या नोटा दिसल्यामुळे चौरे हे पडलेले पैसे घेण्यासाठी गेले असता त्या चोरट्यांनी सायकलला लावलेली पैशाची बॅग चोरून पळून गेला. चौरे यांनी आरडा-ओरडा केला. मात्र, आरोपी तोपर्यंत पसार झाला होता. दत्तवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपायुक्त राजपूत हे तपास करीत आहेत.

दोन वीजचोऱ्या उघड

पुणे : वाकड आणि भोसरी या भागात सव्वाबारा लाख रुपयांच्या दोन वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. दोन्ही प्रकारांमध्ये सुमारे ७० हजार युनिट्सची चोरी झाल्याचे आढळून आले आहे. दोन्ही प्रकारांबाबत महावितरणकडून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

वाकड येथे वीजमीटरमध्ये फेरफार करून ४० हजार युनिट्स, म्हणजे ८ लाख ५६ हजार रुपयांची वीजचोरी झाल्याप्रकरणी महावितरणच्या रास्ता पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सांगवी उपविभाग अंतर्गत वाकड येथील व्यावसायिक वीजग्राहक अनिल सुदाम भूमकर यांच्या वीजमीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी होत असल्याचे तपासणीत निदर्शनात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपातीचा नागरिकांना फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

यंदा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात सरासरी कमी पाऊस झाल्याने पालिकेने १५ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला. पाणीकपातीमुळे पूर्व भागाला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने येरवडा, विश्रांतवाडी, धानोरी, मुंजाबा वस्ती, लोहगांव तसेच नगर रोडवरील चंदन नगर, खराडी, वडगांव शेरी, गणेश नगर आणि बोराटे वस्ती परिसराला पाणीकपातीचा अधिक त्रास सहन करावा लागतो आहे. पूर्व भागातील बराचसा भाग हा उंचीवर असल्याने पाणीकपातीमुळे अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे तक्रार स्थानिक नागरिक करू लागले आहेत.

शहरातील सर्व भागांत एकसमान पाणीपुरवठा होण्यासाठी पालिकेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत; परंतु अद्याप त्यास यश आल्याचे दिसत नाही. धानोरी भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने नुकत्याच एका नगरसेवकाने पालिका आयुक्तांची परिसरात बोलावून परिस्थितीची जाणीव करून दिली होती.

एक दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पूर्व भागात दोन तासांसाठी पाणी येत असल्याने नागरिकांना आवश्यक पाणी मिळत नाही. तसेच, पाण्याचा दाब कमी असल्याने खूप अडचण होऊ लागली आहे. पालिकेने पूर्व भागाला एक दिवसाआड ऐवजी दररोज एक तास पाणीपुरवठा करावा, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच वडगांव शेरी भागाला पुरेसे पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेचे नगरसेवक सचिन भगत यांनी सर्वसाधारण सभेत वारंवार पालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

टँकरमाफियांकडून पाण्याचे दर दुप्पट

धानोरी, विमाननगर, वडगाव शेरी आणि खराडीसारख्या परिसरात सोसायट्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. या परिसरातील प्रत्येक सोसायटीला पाणी वापरासाठी खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यंदाच्या वर्षी कमी पाऊस झाल्याने सोसायट्यांकडून टँकरला मागणी वाढत असल्याने अनेक टँकरमाफियांनी पाण्याचे दर दुप्पट केल्याचे नागरिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवर्धनाला तंत्रज्ञानाचे कनेक्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सरकारी कामकाज अधिकाधिक सुटसुटीत करण्याचे प्रयत्न सुरू असताना वन विभागानेही आता पुढाकार घेतला आहे. अपुऱ्या मनुष्यबळाचे गाऱ्हाणे मांडण्याऐवजी तंत्रज्ञानाच्या वापरातून वन्यप्राणी संवर्धनाचा नवा फंडा वन विभागाने स्वीकारला आहे. केवळ वाघांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी लांडगा, बिबट्या, गिधाड, माळढोक अशा विविध वन्यजीवांच्या संवर्धनासाठी वनाधिकाऱ्यांनी कॅमेरा ट्रॅपिंग, टॅगिंग, ट्रान्समीटर अशा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर असलेले प्रकल्प हाती घेतली आहेत.

अभयारण्यातील वन्यजीवांवर केवळ गस्त घालून लक्ष ठेवणे, दर काही महिन्यांनी त्यांची पारंपरिक मोजणी करणे, असाच साचेबद्ध कार्यक्रम वर्षानुवर्षे सुरू होता. मात्र अभ्यारण्यातील अतिक्रमण आणि शिकारींमुळे आता वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या पुढील काळात खात्यातील अपुऱ्या मनुष्यबळावर वन्यजीव संरक्षण शक्य नसल्याने वन विभागाने लोकसहभाग आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याचा निर्णय स्वीकारला आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत मागे असलेला महाराष्ट्र सध्या तंत्रज्ञान, वन्यजीव क्राइम सेल यामुळे इतरांसाठी आदर्श ठरतो आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत वनाधिकारी त्यांच्या पद्धतीने, तर अभ्यासक वैयक्तिक पातळीवर संशोधन करीत होते. पण गेल्या दोन वर्षांत ही दरी कमी झाली आहे. वन खात्याने वन्यजीव संवर्धनासाठी व्यापक दृष्टिकोन स्वीकारल्याने वनाधिकारी आणि संशोधकांचे एकत्रित काम सुरू झाले आहे. नव्याने तयार केलेल्या नियमावलींमुळे अनेक अचडणी दूर झाल्या आहेत, असे केंद्रीय वन्यजीव मंडळाचे सल्लागार व्ही. बी. सावरकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलावरील संशयातून वडिलांचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आपल्या पत्नीशी एका तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन, एका व्यक्तीने त्या तरुणाच्या वडिलांना मारहाण केली. या मारहाणीत तरुणाच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना केळेवाडी येथे बुधवारी सकाळी घडली. आरोपींकडून मुलाची आई व दोन बहिणींनाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बापू देवकुळे (वय ४५, रा. वसंतनगर, केळेवाडी झोपडपट्टी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मुलगा दत्ता; तसेच पत्नी आणि दोन मुलींनाही मारहाण झाली आहे. या प्रकरणी गणेश मोघे, विजय मोघे, राजू मोघे, नाना मोघे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'देवकुळे यांच्या मुलाचे व आरोपींपैकी एकाच्या पत्नीचे अनैतिक संबध असल्याचा आरोपींना संशय होता. त्यामुळे मोघे आणि देवकुळे यांच्यात भांडण होत असे. या भांडणांमुळे देवकुळे यांचा मुलगा भीतीने घरातून निघून गेला होता. त्याला शोधण्यासाठी देवकुळे आणि त्यांची पत्नी; तसेच मुली बुधवारी सकाळी स्वारगेट येथे गेले होते. तेथून ते घरी परतल्यानंतर आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी देवकुळे यांच्या पत्नीला आणि मुलींनाही मारहाण केली. देवकुळे यांनाही फरफटत नेत जबर मारहाण केली.

नागरिकांनी या घटनेची माहिती कोथरूड पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी देवकुळे यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images