Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

डबल कनेक्शन होणार सिंगल

$
0
0
शहर आणि ग्रामीण भागात एकाच घरात एकसारखी नावे आणि पत्त्यांवर सुमारे ४ हजार डबल गॅस कनेक्शन असल्याचे उघडकीस आले आहे. एका घरात केवळ एकच गॅस कनेक्शन ठेवण्याच्या कंपन्यांच्या सूचनेकडे पाठ फिरविलेल्यांना आता दुस-या कनेक्शनचे सिलिंडर भरून न देण्याचा इशारा गॅस कंपन्यांनी दिला आहे. प्रसंगी ते कनेक्शन तोडले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

‘पॉलिग्राफ टेस्ट’ला कोर्टाची मंजुरी

$
0
0
गेल्या वर्षी वानवडी येथील जांभूळकर मळा येथून २६ वर्षीय कम्प्युटर इंजिनीअर हार्दिक मुकेश मखवाना गायब झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी त्याच्या सहका-याची ‘पॉलिग्राफ टेस्ट’ करण्यासाठी कोर्टात दाखल केलेल्या अर्जाला मंगळवारी कोर्टाने मंजूरी दिली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. ए. कोटणीस यांनी हा आदेश दिला.

नर्स फेडरेशनची राज्यव्यापी परिषद

$
0
0
हॉस्पिटलमधील दैनंदिन कामकाजात भेडसावणारे अडथ‍ळे, रुग्णांचे नातेवाइक आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून टार्गेट केले जाणे यासह सामाजिक, व्यावसायिक आणि प्रशासकीय अडचणींविरोधात आवाज उठविण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशनतर्फे १६ व्या राज्यव्यापी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

इलेक्शन ड्युटी शिक्षणाच्या मूळावर

$
0
0
शाळेतील बहुसंख्य शिक्षक इलेक्शन ड्युटीला जुंपल्याने शिक्षण हक्क कायद्याचा भंग होत आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनालाही त्यामुळे खीळ बसणार आहे. बदली शिक्षक वारंवार वर्गावर दिल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही अपूर्ण राहत आहे.

मंत्र्यांच्या दारात महापंचायत

$
0
0
भटक्या विमुक्तांच्या विविध मागण्या आणि समस्यांकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने भटक्या विमुक्त जमाती संघटना आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांच्या गावी महापंचायत भरविणार आहे. येत्या १४ ऑक्टोबरला काष्टी (ता. श्रीगोंदे, जि. नगर) येथे ही महापंचायत होणार आहे.

डिझेल, एलपीजी अनुदान बंदच व्हावे!

$
0
0
‘वित्तीय तूट घटण्यासाठी डिझेल व एलपीजी यांच्यावरील अनुदान अनुक्रमे पुढील दोन व तीन वर्षांत बंद होण्याची गरज आहे. वित्तीय दृढीकरणासाठी (फिक्सल कन्सॉलिडेशन) केलेल्या शिफारशींची अमलबजावणी झाल्यास तीन वर्षांत पुन्हा आठ ते नऊ टक्के विकासाचा दर गाठता येऊ शकतो,’ असा विश्वास १३ व्या वित्तीय आयोगाचे अध्यक्ष विजय केळकर यांनी पुण्यात एका कार्यक्रमात व्यक्त केला.

‘पीएफसी’चा सलग दुसरा विजय

$
0
0
पुणे फुटबॉल क्लबने (पीएफसी) गुरुवारी २०१२-१३ आय-लीग फुटबॉल स्पर्धेत मुंबई फुटबॉल क्लबवर ३-२ ने मात करत आपला धडाका कायम ठेवला. पीएफसीचा हा सलग दुसरा विजय ठरला.

ऑप्शन ऑफ फिरोज’मध्ये अडीच महिने रुटीन काम...

$
0
0
जंगली महाराज रस्त्यावरील स्फोटाला आता अडीच महिना होत आला, तरी कॅम्प परिसरातील फिरोजच्या ‘ऑप्शन ऑफ फिरोज’ या टेल‌रिंगच्या दुकानातील ‘रुटीन’ सुरूच होते.

कासारवाडीतील षड्‍यंत्राबाबत पुणे पोलिस अंधारातच!

$
0
0
पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी कासारवाडी येथे नक्की कोठे राहत होते, त्याची नक्की माहिती अद्यापही हाती आलेली नाही. त्याबाबत कोणतीही विचारणा वरिष्ठ पातळीवरून अद्यापही झालेली नाही, अशी माहिती पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली.

दिल्लीतील कामे आटोपली, लवकरच येतो...

$
0
0
चारच दिवसांपूर्वी फोन झाला. दिल्लीतील कामे आटोपली आहेत. आता दोन दिवसात पुण्यात येतो म्हणाला होता. फिरोज आलाच नाही. मात्र, चारच्या सुमारास दार ठोठावून पोलिस घरात आले.

दयानंद पाटीलचे काय झाले?

$
0
0
जंगली महाराज रस्त्यावरील स्फोटांत जखमी झालेल्या दयानंद पाटील याचा या साखळी बॉम्बस्फोटांशी काहीही संबंध नसल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. परंतु, दयानंद पाटील सध्या आहे कोठे, याचा थांगपत्ता मात्र पोलिसांनाही नाही. किंबहुना, असला, तरी त्याबाबत कोणतीही माहिती देण्यास ते तयार नाहीत.

ती’ सायंकाळ... दहशत व भीतीची!

$
0
0
‘ती’ सायंकाळ १ ऑगस्टची... जंगली महाराज रस्ता नेहमीप्रमाणे गतिमान वाहनांनी धावत होता... मॅकडीच्या बाहेर युवकांच्या गप्पा रंगलेल्या... डेक्कनचा बसस्टॉपही गजबजलेला... देना बँकेलगतचा मार्गही पादचाऱ्यांच्या गर्दीने भरलेला...

सरकारी कंत्राटदार स्फोटातील आरोपी

$
0
0
...नांदेडमधील बुऱ्हाणनगरच्या सलेहिंद मशिदीजवळ राहणाऱ्या इम्रान खान या ३१ वर्षीय तरूणाचा हा प्रवास. नांदेडच्या यशवंत कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत होता. परंतु, बारावीनंतर उच्चशिक्षणाच्या वाटेला जाणे त्याला जमले नाही.

येरवडा जेलचे सिक्युरिटी ऑडिट पूर्ण

$
0
0
मध्यवर्ती कारागृह म्हणून ख्यातकीर्त असलेले ‘येरवडा जेल’देखील दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची भीती असल्याने पुणे पोलिस आणि जेलच्या अधिकाऱ्यांनी जेलचे ‘सिक्युरिटी ऑडिट’ पूर्ण केले आहे. या ऑडिटमधून समोर आलेल्या त्रुटी दूर करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

सीमेपलीकडून... ‘खोडसाळपणा’!

$
0
0
दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या तिघा दहशतवाद्यांना अटक करून जंगली महाराज रोडवरील स्फोट हा ‘खोडसाळपणा’ नसून सीमेपलीकडून शिजलेला कट होता, हे आता अधिकृतरीत्या निष्पन्न झाले आहे.

मुंबईतही त्यांनी रेकी केली होती

$
0
0
जर्मन बेकरी स्फोट प्रकरणातील इंडियन मुजाहिदीनचा (आयएम) दहशतवादी कातिल सिद्दिकीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पुण्यात साखळी स्फोट घडवून आणलेल्या फिरोज सय्यद, असद खान व इम्रान खान यांनी मुंबईतही रेकी केली होती, अशी माहिती उघड झाली आहे.

‘बॉम्ब फॅक्टरी’चा पत्ता अखेर पोलिसांना मिळाला

$
0
0
पुण्यात साखळी स्फोट घडविण्यासाठीच्या बॉम्बची जुळणी कासारवाडीतील रेल्वे स्टेशन फाटकाजवळील शेख यांच्या दुमजली इमारतीतील फ्लॅटमध्ये झाल्याचे शुक्रवारी रात्री उघडकीस आले. इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी या फ्लॅटमध्ये आसरा घेत, तब्बल दोन आठवडे बॉम्बची जुळणी केली होती.

‘माझ्या अभिनयातून समाजाच्या अव्यक्त भावना’

$
0
0
‘समाजघटकांच्या अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी मी अभिनयाचा वापर करतो. ज्या व्यक्तींच्या भावना व्यक्त करण्यासाठी माध्यमे उपलब्ध नाहीत, अशांसाठी मी अभिनय करतो,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

माजी सैनिकांसाठी नवे पॉलिक्लिनिक

$
0
0
माजी सैनिक आरोग्य योजनेअंतर्गत लोहगाव येथील हवाई दलाच्या आकाशनगरमध्ये नवे पॉलिक्लिनिक सुरू करण्यात आले आहे. या क्लिनिकचे उद्घाटन नुकतेच माजी हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक यांच्या हस्ते झाले.

...तरी बेकायदा इमारत पाडणारच

$
0
0
बेकायदा इमारतीत कुटुंबे राहत असल्यास कारवाई करण्यात येत नसल्याने त्याचा गैरफायदा घेतला जाऊ लागला आहे. त्यामुळे आता बेकायदा इमारतीत नागरिक राहत असले, तरी कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पुढील आठवड्यापासून अशा इमारतींवरदेखील हातोडा पडणार असल्याचे समजते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images