Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पीएमपीला २.५ एफएसआय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताब्यातील अस्तित्वातील जागांच्या पुनर्विकासासाठी अडीच एफएसआय देण्याबाबतचा फेरप्रस्ताव पुणे महापालिकेने नुकताच पुन्हा राज्य सरकारकडे पाठविला आहे, तर पिंपरी-चिंचवडचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

पीएमपीच्या डेपोच्या जागा विकसित करण्यासाठी अडीच एफएसआय देण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वीच राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. सर्वसाधारण सभेने त्याला वेळेत मान्यता न दिल्याने तत्कालीन आयुक्त महेश पाठक यांनी त्यांच्या अधिकारात हा विषय मंजूर करून सरकारच्या अंतिम मंजुरीकरिता पाठवविला होता. पुणे महापालिकेच्या प्रस्तावाबाबत सरकारने काही शंका उपस्थित करून त्याबाबत सविस्तर खुलासा मागविला होता. पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी नुकताच त्याबाबतचा सुधारित प्रस्ताव पुन्हा सरकारच्या मान्यतेसाठी पाठविला आहे. 'अडीच एफएसआयमुळे नक्की किती जागा उपलब्ध होऊ शकेल, त्यातून कसा फायदा होणार आहे, त्यापैकी व्यावसायिक वापरासाठी किती जागा देण्यात येईल, याबाबत सरकारकडून विचारणा करण्यात आली होती. त्याचे सविस्तर उत्तर पाठविण्यात आले आहे', अशी माहिती पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.

पीएमपीला अडीच एफएसआय मिळाल्यास जागा विकसनातून कार्यशाळा, बस पार्किंग, पीएमपीसह इतर कार्यालयांना जागा उपलब्ध होऊ शकणार आहे. वाढीव जागा भाडेतत्त्वावर देऊन पीएमपीला त्याद्वारे उत्पन्नही प्राप्त होऊ शकणार आहे. त्यामुळे, पीएमपीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार असल्याने अडीच एफएसआय तातडीने दिला जावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती.

पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही पीएमपीच्या जागांसाठीचा प्रस्ताव मान्य करून सरकारला पाठविला होता. या प्रस्तावावर हरकती-सूचनांची सुनावणी घेण्यात आली असून, आता पुन्हा सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.

'देशात सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या इतरांशी तुलना करता पीएमपीकडे उपलब्ध असलेली जागा तुटपुंजी आहे. त्यामुळे, अडीच एफएसआयपेक्षाही पाच एफएसआय देण्याची गरज आहे.'

- अभिषेक कृष्णा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्याचा खून करून जाळले

$
0
0

शिरूर तालुक्यातील सविंदणेतील घटना

पुणेः शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात एका शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला; तसेच त्याचा मृतदेह खाटेवर ठेऊन तो जाळण्याचा प्रयत्न झाला. या शेतकऱ्याची दोन्ही मुले पोलिस खात्यात असून नाशिक येथे कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी तैनात होती. हा प्रकार जमिनीच्या वादातून झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

सुरेश सोमा मोटे (वय ४९, रा. पूर्व नरवडे मळा, सविंदणे, ता. शिरुर, जि. पुणे) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा अभिमन्यू सुरेश मोटे (वय २३) यांनी तक्रार दाखल केली आहे. मोटे यांचा अर्धवट जळालेला मृतदेह पोलिसांना घरासमोरच मिळाला. अभिमन्यू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा प्रकार जमिनीच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. मोटे यांचा मुलगा आणि मुलगी हे पोलिस दलात नोकरी करतात. ते नाशिक येथील कुंभमेळ्यात पोलिस कर्तव्य बजावत होते. त्यांची आई त्यांच्यासमवेत नाशिक येथे होती, तर मोटे घरी एकटेच होते.

मोटे रविवारी रात्री नरवडे वस्ती येथील आपल्या घरी झोपलेले असताना अज्ञात आरोपींनी त्यांच्या डोक्यावर आणि अंगावर वार केले. त्यांचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. ओळख पटू नये म्हणून मृतदेहाच्या अंगावर गोधडी टाकून जाळण्यात आल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली.

अभिमन्यू यांनी वडिलांचे सख्खे बंधू नाथा मोटे यांच्यासह सात जणांवर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी सुरेश आणि नाथा यांच्यात जमिनीवरून वाद झाले होते, असे पोलिसांनी सांगितले.

'या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे. सात ते आठ संशयितांविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. त्या दृष्टीने इतर आरोपींचा शोध सुरू आहे,' अशी माहिती शिरूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वारांवर संक्रांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या दोन दिवसांमध्ये शहरात विविध ठिकाणी झालेल्या पाच अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात अपघातामध्ये मृत्यू होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांपैकी २१४ जण हे दुचाकीवरील व्यक्ती होत्या. अपघातामध्ये दुचाकीवरील व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. तसेच, दुचाकीस्वरांबरोबरच अपघातामध्ये पादचाऱ्यांच्या मृत्यूची संख्या मोठी असल्याचे समोर आले आहे.

पुणे शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाहनांमध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. दुचाकीवरील अपघातात मृत्यू झालेल्या एकाही व्यक्तीने हेल्मेट घातले नसल्याचे समोर आले आहे. शहरात दिवसाला किमान एक ते दोन व्यक्ती अपघातामध्ये मृत्युमुखी पडत आहेत. दुचाकीस्वारासोबत

पाठीमागे बसलेल्या व्यक्तींचा अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरात हिंजवडी, भारती विद्यापीठ, येरवडा व हडपसर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात होत असल्याचे वाहतूक विभागाच्या पाहणीत समोर आले आहे. एकूण अपघातात मृत्यू झालेल्या वयाची पाहणी केली असता कमावत्या वयोगटातच सर्वाधिक व्यक्ती अपघातात मृरण पावत असल्याची माहिती समोर आली आहे. २०१४ मध्ये १८ ते ४४ वयोगटातील २२९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे; तर या वर्षी ऑगस्टपर्यंत याच वयोगटातील १४७ व्यक्ती अपघातांत मरण पावल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोवीस तासांत सहा ठार

$
0
0

मृतांमध्ये पादचारी, दुचाकीस्वारांचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दोन दिवसांमध्ये शहरात झालेल्या पाच अपघातांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचा समावेश आहे. रविवारी रात्री हडपसर येथे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला.

हडपसर येथील मगरपट्टा रोडवर रविवारी मध्यरात्री दुचाकीवरून निघालेल्या दोन तरुणांना भरधाव ट्रकने उडविले. या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पियुष वासुदेव पटेल (वय २४, रा. हडपसर, मूळ गाव भोपाळ मध्यप्रदेश), अनुप प्रभाकर फडणीस (वय २६, रा. हडपसर) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही मगरपट्टा सिटीमध्ये एका खासगी कंपनीत नोकरीला होते. रविवारी रात्री काम संपल्यानंतर दुचाकीवरून दोघे निघाले असता ट्रकने त्यांना धडक दिली. या प्रकरणी अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक ए. एस. गवळी अधिक तपास करीत आहेत.

वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

धायरी ते नऱ्हे रस्त्यावरील चाटे कोचिंग क्लासजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी दोन ते चार दरम्यान हा अपघात झाला असून, सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय सदाशिव फडतरे (वय ४५, रा. गोसावी वस्ती, धायरी) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक मुजावर अधिक तपास करीत आहेत.

पीएमपी धडकेत तरुणीचा मृत्यू

टिळक रोडवरील काका हलवाई दुकानासमोर पीएमपीच्या खाली सापडल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणीचा मृत्यू झाला. मिस्बा जहीर मिर्झा (वय २२, रा. एमएनईआरसी हॉस्टेल, आझम कॅम्पस) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. या अपघातात मिस्बाचा मित्र अदनान खान (वय २६, रा. अकोला) हा जखमी झाला आहे. या प्रकरणी पीएमपी चालक विनोद लक्ष्मण वावळे (वय २५, रा. जगताप चाळ, कात्रज) याला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप पालांडे अधिक तपास करीत आहेत.

दुचाकीस्वार ठार

येरवडा येथील होळकर पुलाजवळ रस्तादुभाजकाला धडकून भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. गणेश दत्तात्रय बनसोडे (वय ३७, रा. बोपखेल) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. बनसोडे होळकर पुलाकडून येरवड्याकडे भरधाव वेगात येत होते. त्यावेळी त्यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटून ती दुभाजकाला धडकली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून, बी. एस. अंतरकर अधिक तपास करीत आहेत.

कंटेनरच्या धडकेत पादचारी ठार

मुंबई-बेंगळुरू महामार्गावर बावधन येथे भरधाव कंटेनरने पादचाऱ्याला उडविल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात उभारणार स्वतंत्र ‘हेल्प डेस्क’

$
0
0

विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यावर भर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यापीठाचे अर्ज डाउनलोड का होत नाहीत... यूजीसीच्या फेलोशिपसाठी पाठपुरावा कसा करू.... सीएसआयआरशी संपर्क करता येत नाही, तर काय करू... विद्यार्थ्यांच्या अशा नानाविध तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वतंत्र 'हेल्प डेस्क' सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची धावाधाव कमी करण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न विद्यापीठाने सुरू केले आहेत.

विद्यापीठाच्या आवारातील विविध विभागांमध्ये पदव्युत्तर वर्गांचे शिक्षण घेणाऱ्या, तसेच संशोधनाच्या निमित्ताने विद्यापीठामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना नानाविध अडचणींना तोंड द्यावे लागते. या सर्व अडचणी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांची भेट घेतली. विद्यापीठाचा पदव्युत्तर विभाग, शिष्यवृत्ती विभाग, वित्त आणि लेखा विभाग, होस्टेल अशा सर्वच विभागांशी निगडीत आपल्या तक्रारी या विद्यार्थ्यांनी डॉ. गाडे यांच्यासमोर मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत या अडचणींवर मार्ग काढण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क उभारण्याचा निर्णयही या वेळी घेतल्याचे डॉ. गाडे यांनी सांगितले.

डॉ. गाडे म्हणाले, 'विद्यापीठाच्या आवारात राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा डेस्क काम करेल. त्यासाठी दोन कर्मचाऱ्याची पूर्णवेळ नियुक्ती केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी हा डेस्क काम करेल. या विषयी संबंधित अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.' विद्यार्थ्यांच्या पाठ्यवृत्तीच्या वितरणामधील विविध तांत्रिक अडचणींचाही या वेळी आढावा घेण्यात आला. या अडचणी कमी करण्यासाठीही अधिकाऱ्यांना सूचना केल्याचे डॉ. गाडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस नावांवर फुलीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बोगस मतदारांमुळे फुगलेल्या पुणे शहर, जिल्ह्यातील मतदारयादीतून दुबार, मृत आणि स्थलांतरीत अशा सुमारे तीन लाख मतदारांच्या नावांवर अखेरची फुली मारण्यात आली आहे. या मतदारांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला असून, या संदर्भातील आक्षेप नोंदविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागणार आहे.

बोगस मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया २५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अद्ययावत मतदारयादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी तपासून ज्यांची नावे वगळली गेली आहेत, त्यांना हरकत नोंदविता येणार आहे. हरकत नोंदविण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर आहे. शहर, जिल्ह्याची मतदारयादी बोगस नावांमुळे फुगल्याने निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होत असल्याकडे 'मटा'ने सर्वप्रथम लक्ष वेधले होते. 'मटा'च्या यासंबंधीच्या वृत्तांची दखल घेऊन निवडणूक आयोगाने बोगस मतदारांचा शोध घेऊन मतदारयादी अद्ययावत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा निवडणूक प्रशासनाने बोगस मतदारांची नावे वगळण्याची कारवाई सुरू केली.

मतदारयादीत साधारणतः पावणेपाच लाख बोगस नावे असल्याचा अंदाज आहे. या नावांची खात्री करण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने संबंधित मतदारांना नोटीस पाठविली; तसेच बीएलओंमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले. या नोटिसा बजावल्यानंतर निवडणूक प्रशासनाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही नावे मतदारयादीतून वगळण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार गेल्या महिन्याभरात बोगस ठरलेल्या तीन लाख दुबार, मृत व स्थलांतरीत नावांवर कायमची फुली मारण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुपी ‘व्हीआरएस’ला अखेर हिरवा कंदील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अडचणीत आलेल्या रुपी बँकेतील कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्यास रिझर्व्ह बँकेने मान्यता दिली आहे. त्यामुळे रुपी बँकेच्या खर्चात बचत होणार असून, बँकेच्या विलीनीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल पडल्याचे सांगण्यात येत आहे.

बँकेचे मुख्य प्रशासक डॉ. मुकुंद अभ्यंकर यांनी सोमवारी ही माहिती दिली. सहकार आयुक्तांच्या मान्यतेने ही योजना लागू करावी, असे रिझर्व्ह बँकेने पत्रात म्हटले असून आयुक्तांची मान्यताही मिळाल्याचे त्यांनी सांगितले. व्हीआरएसला मान्यता मिळाल्यामुळे बँकेवरील आर्थिक भार कमी होणार आहे. त्यामुळे बँक विलीनीकरणासाठी पात्र (मर्जेबल) ठरण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे. त्यामध्ये बँकेच्या कर्मचारीवृंदाची संख्या पाचशेपर्यंत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी बँकेचे दरमहा सव्वादोन कोटी रुपये खर्च होतात. बँकेत सध्या ७७३ अधिकारी कर्मचारी असून, त्यापैकी २३८ जणांनी व्हीआरएससाठी अर्ज केले आहेत. मात्र, बँकेच्या दैनंदिन कामामध्ये ज्या कर्मचारी-अधिकाऱ्यांचा सहभाग घेणे आवश्यक आहे, त्यांना व्हीआरएस लागू करण्यात येणार नाही, असेही अभ्यंकर यांनी स्पष्ट केले आहे.

बँकेवरील निर्बंधांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. या काळासाठी वेतनावरील दायित्व साडेचौदा कोटी रुपयांचे आहे. बँकेला साडेसहाशे कोटी रुपयांचा एकूण तोटा आहे. ओटीएसमधील वसुलीपाठोपाठ व्हीआरएस लागू झाल्याने तोटा कमी होण्यास मदत होणार आहे. आर्थिक अडचणीत आल्यामुळे रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेवर अडीच वर्षांपूर्वी आर्थिक निर्बंध लागू केले. त्यामुळे बँकेचे काही लाख ठेवीदार-खातेदार अडचणीत आले आहेत. त्यानंतर सहकार खात्याने बँकेच्या विलीनीकरणासाठी काही पावले टाकली होती. मात्र, रुपी बँकेच्या तोट्याचे प्रमाण मोठे असल्याने विलीनीकरणात अडचणी आल्या. त्यानंतर बँकेच्या वतीने तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. थकीत कर्जांच्या वसुलीसाठी एकरकमी फेड योजना (ओटीएस) आणि कर्मचाऱ्यांना व्हीआरएस देण्याचे प्रस्ताव समोर होते. त्यापैकी ओटीएसला पूर्वीच मान्यता मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात घुसून लुटणाऱ्याला शेजाऱ्यांनी दिले ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनधी, पुणे

पौड फाट्याजवळील भगत चाळीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. चोरट्यासोबत झटापट करीत आरडा-ओरडा केल्यामुळे शेजारील नागरिकांनी चोरट्याला पकडून कोथरूड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

अजय शुल्लुघम चेट्टियार (वय २२, रा. केळेवाडी, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी विकास भगत (२५, रा. भगत चाळ, कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगत व त्यांचे काका हे शनिवारी रात्री घरात जेवण करीत होते. त्या वेळी चेट्टीयार त्यांच्या घरात घुसला. त्याने भगत व त्यांच्या काकाला चाकूचा धाक दाखवून पैशाची मागणी केली. त्यांच्याजवळील मोबाइल जबरदस्तीने हिसकविला. त्या वेळी भगत यांनी आरोपीसोबत झटापट करून आरडा-ओरडा केला असता शेजारील व्यक्ती धावत आल्या आणि त्यांनी आरोपीला पकडले. तसेच, तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच कोथरूड पोलिस घटनास्थळी पोहचले आणि आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी एस. एस. पांढरे हे अधिक तपास करीत आहेत.

कोथरूडमध्ये महिलेची सोनसाखळी हिसकवली

कोथरूडमधील राहूनगर येथे रस्त्याने पायी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून नेल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका ६१ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून मोटार सायकलवरील दोन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला या रविवारी सायंकाळी पायी जात होत्या. त्या वेळी समोरून आलेल्या मोटारसायकलवरील दोन व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावून नेली. या प्रकरणी पोलिस निरिक्षक गौतम पातारे (गुन्हे) हे अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खंडपीठासाठी सह्यांची मोहीम

$
0
0

एक लाख एक हजार सह्यांचे निवेदन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे, या मागणीसाठी पुणेकर खंडपीठ कृती समिती आणि पुणे जिल्हा बार असोसिएशनतर्फे अखिल भारतीय मराठा ​शिक्षण परिषदेचे यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय आणि शाहूमंदिर कला व वाणिज्य महाविद्यालय येथे सोमवारी सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला.

पुणे शहरातील आणि पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात जाऊन खंडपीठाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. एक लाख एक हजार सह्यांचे निवेदन सरकारला आणि पंतप्रधानांना पाठविण्यात येणार आहे.

शाहू कॉलेजच्या प्राचार्य डॉ. शुभदा घोलप तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सोपान निवरे, राहुल बिबवे, रवींद्र वाकडे, नितीन चलवादी, वैशाली जाधव, विद्यार्थी प्रतिनिधी उमेश तारे, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश शेडगे, उपाध्यक्ष अॅड. योगेश पवार, हेरंब गानू, सचिव राहुल झेंडे, सुहास फराडे, साधना बोरकर, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड मिलिंद पवार, अॅड श्रीकांत अगस्ते, अॅड. रमेश धर्मावत, अॅड. सचिन हिंगणेकर, अॅड. नेहा ताकवले, अॅड. करुणा पवार, अॅड. सतीश कंधारे, अॅड. मंगेश लेंडघर आदी या वेळी उपस्थित होते. प्रा. राहुल बिबवे यांनी खंडपीठासाठी देण्यात येत असलेल्या लढ्याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे, असे विचार व्यक्त केले.

सरकारचे लक्ष वेधणार

या उपक्रमात एक हजार सह्या खंडपीठाच्या मागणीसाठी करण्यात आल्या. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय आणि मराठवाडा मित्र मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालयात सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच या उपक्रमातून सरकारचे लक्ष वेधणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वाराला दिली सहा महिन्यांची शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चुकीच्या दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिल्यामुळे एकाला अंधत्व आल्याप्रकरणी दुचाकीस्वाराला सहा महिन्यांची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. के. नंदनवार यांनी हा निकाल दिला.

विनोद सुगंध वायदंडे (२५, रा. अर्मामेंट कॉलनी, गणेश खिंड)याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी साहेबराव शंकर दावणे (४२, रा. गणेशखिंड रोड) यांनी चतुश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. अमोल विलास कांबळे (२५) यांचा अपघात झाला होता. अमोल कांबळे दुचाकीवर जात असताना गोल मार्केट येथे ही घटना घडली. विनोदची दुचाकी चुकीच्या दिशेने भरधाव वेगात येऊन अमोलच्या दुचाकीला जोरदार धडकली. डोक्याला गंभीर मार लागल्याने अमोलला त्याला अंधत्व आले. आरोपीने केलेला बचाव सरकारी पक्षाचे वकील मिलिंद दातरंगे यांनी खोडून काढला आणि या धडकेमुळे अमोलला अंधत्व आल्याचे सिद्ध केले. सात साक्षीदारांपैकी फिर्यादी, प्रत्यक्षदर्शींची साक्ष महत्वाची ठरली. गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार ए. आर. बनसोडे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईत गुन्हेगारांचा ताम्हिणी घाटात खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

लोणावळ्यातील दोन गुन्हेगारांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली असून, दोघांच्या मृतदेहांचे अवशेष ताम्हिणी घाटातील दरीत सापडले आहेत. पैकी एकाची ओळख पटली असून, दुसऱ्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती लोणावळा पोलिसांनी दिली.

राजेश भारत पिंपळे (वय २९) आणि अक्षय श्रीपाल गायकवाड (वय २२, दोघेही रा. लोणावळा) अशी खून करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार किसन नथू परदेशी (वय ४९, रा. लोणावळा) याच्यासह सात जणांच्या टोळक्याच्या विरोधात लोणावळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना २५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

लोणावळा शहर पोलिस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे आणि गायकवाड हे परदेशीचे साथीदार आहेत. त्यांच्यात अंतर्गत खटके उडाले होते. त्या कारणावरून परदेशीने साथीदारांच्या मदतीने पिंपळे, गायकवाड यांचे अपहरण करून त्यांना कामशेत येथे नेले. तेथे त्यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी परदेशीने दोन्ही मृतदेह ताम्हिणी घाटातील दरीत फेकून दिले. पोलिस चौकशीत आरोपींनी दोघांचा खून करून मृतदेह ताम्हिणी घाटात फेकल्याची कबुली दिली. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी पुरावे गोळा करण्यासाठी सोमवारी लोणावळा शहर पोलिसांनी परदेशी आणि त्याच्या साथीदारांना ताम्हिणी घाटात नेले.

आरोपींनी दाखवलेल्या जागी पोलिसांना दोघांच्या मृतदेहाचे सांगाडे दरीत सुमारे अडीच हजार फुटांवर सापडले. त्यापैकी अक्षयची कपड्यावरून ओळख पटली आहे. गुरुवारी रात्री लोणावळा येथील वलवण येथे नाकाबंदीच्या वेळी किसन परदेशी याच्या गाडीची झडती घेतली असता त्याच्या गाडीत कार्बाईन स्टेन मशिन गन आणि ३० जिवंत काडतुसे आढळली.

लोणावळा नगराध्यक्षाच्या हत्येचा कट उघड

परदेशीने लोणावळ्याचे विद्यमान नगराध्यक्ष अमित गवळी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवी आणि कामशेत मधील दोन व्यापाऱ्यांच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. गवळी आणि साळवी यांची हत्या गणपती उत्सवाच्या कालावधीत करण्यात येणार होती. परदेशी आणि त्याचा साथीदार सादिक बंगाली यांनी हा कट रचला. बंगाली रवी पुजारी टोळीचा हस्तक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भांडारकर रोडवर चोरट्यांचा धिंगाणा

$
0
0

फ्लॅट फोडले; चार लाखांचा ऐवज चोरीला

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भांडारकर रस्त्यावरील दोन सोसायट्यांमधील चार बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. एका सोसायटीतील सोन्याचे दागिने आणि हिऱ्याचा हार असा एकूण चार लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. या सोसायट्यांना सुरक्षारक्षक असतानाही चोरी झाली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडारकर रस्त्यावरील गल्ली क्रमांक सोळामध्ये असलेल्या श्रद्धा अपार्टमेंटमध्ये घरफोडी झाल्याची माहिती सोमवारी सकाळी डेक्कन पोलिसांना मिळाली. त्यानुसार डेक्कन पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक उमाकांत पुणेकर आणि त्यांचे पथक घटनास्थळी गेले. त्यांनी फ्लॅटची पाहणी केली असता कपाटाचे कुलूप तोडून ऐवज चोरल्याचे दिसून आले. रुपा अरुण खारकर यांचा हा फ्लॅट आहे. कामाच्या निमित्ताने त्या दिल्लीला गेल्या आहेत. त्यांच्या फ्लॅटमधील साधारणतः दहा ते बारा तोळे सोन्याचे दागिने आणि हिऱ्याचा हार असा चार लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. या बाबत खारकर यांना फोनवरून कळविण्यात आले आहे. त्या आल्यानंतरच चोरीच्या ऐवजाबाबत कळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

चोरट्यांनी श्रद्धा अपार्टमेंटच्या शेजारी असलेल्या ओम रेसिडेन्सीमधील पहिल्या मजल्यावरील उमेश दशराथे आणि राम खडके यांचेही फ्लॅट फोडले आहेत. हे दोन्ही फ्लॅट बंद असून, या ठिकाणी कोणीच राहत नव्हते. त्यामुळे या फ्लॅटमध्ये चोरट्यांना काहीच हाती लागले नाही. तसेच, शेजारच्या सोसायटीतील हेमंत गोखले यांचा बंद फ्लॅटही चोरट्यांनी फोडला. त्यामध्येही काहीच चोरट्यांच्या हाती लागले नाही. फ्लॅट फोडल्याची माहिती मिळताच डेक्कन पोलिस, तसेच, युनिट एकचे पोलिस निरीक्षर रघुनाथ फुगे यांनी घटनास्थळी भेट दिली.

चोरट्यांनी घेतला अंधाराचा फायदा

भांडारकर रस्त्यावरील सोळा क्रमांकाच्या गल्लीत घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. या गल्लीतील रस्त्यावर अंधार आहे. त्याचाच फायदा चोरट्यांनी घेतला असण्याची शक्यता आहे. तसेच, श्रद्धा सोसायटीला सुरक्षारक्षक होता. तो रात्री झोपल्यामुळे चोरटे आल्याचे कळलेही नाही. तसेच, सोसायटीच्या परिससरात सीसीटीव्ही नसल्याचे आढळून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४३ मंडळांना नोटिसा

$
0
0

पुणे : गणेशोत्सवासाठी मांडव उभारताना महापालिका तसेच वाहतूक शाखेची परवानगी न घेता बेकायदा पद्धत‌ीने मांडव आणि कमानी उभारणाऱ्या गणेश मंडळांना नोटिसा देण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. अनधिकृत मांडव उभारणाऱ्या शहरातील ४३ मंडळांना; तर ४० कमानींना पालिकेने नोटिसा बजाविल्या आहेत.

शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने मांडव उभारण्यात यावेत, मांडव उभारताना वाहतूक शाखेचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी)घ्यावे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यानुसार शहरातील विविध भागांतील एक हजार ७३४ मंडळांना मांडव उभारण्याची पालिकेने परवानगी दिली आहे. तसेच, १३६ मंडळांना कमानींची मान्यता दिली आहे. या व्यतिरिक्त अनेक मंडळांनी महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता सर्रास मांडव तसेच कमानी उभारल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. यापुढेही परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या कमानींना, मांडव उभारणाऱ्या मंडळांना नोटीस देऊन कारवाई करणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

स्टॉलवर कारवाईचा बडगा

परवानगी न घेता रस्त्यांवर बसून गणेशमूर्तीची विक्री करणाऱ्यांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा स्टॉल्सधारकांकडून अनामत रक्कम, स्टॉल भाडे याबरोबरच बेकायदा पद्धतीने उभारण्यात आलेल्या २८ स्टॉल्सवर दंडात्मक कारवाई करत पालिकेने त्यांच्याकडून चार लाख रुपयांचा महसूल वसूल केला आहे. परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या स्टॉल्सचालकांकडून दीड ते पावणेदोन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

गणेश मंडळे नाराज

महापालिकेकडून गणेशोत्सव मंडळांवर एकापाठोपाठ एक बंधने लादण्यात येऊ लागली आहेत. अनेक मंडळांनी परवानगी घेऊन रनिंग मंडप उभारले, त्यावरील जाहिरातींद्वारे मंडळाला खर्च भागविण्यासाठी निधी मिळतो. मात्र, या जाहिरातींसाठीही आकाशचिन्ह विभागाची परवानगी बंधनकारक केली असून आता या जाहिराती उभारल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचे पाऊल उचलण्यात येत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या बंधनांमुळे उत्सव साजरा करणे अडचणीचे ठरू लागले आहे, अशी टीका भाजपचे शहर चिटणीस सुनील पांडे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटी बंद होऊनही पालिकेच्या तिजोरीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारने एक ऑगस्टपासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) शिथिल केला असला, तरी पालिकेला चालू वर्षात याच महिन्यातून सर्वाधिक १४४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पालिकेला ऑगस्टमध्ये ४२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

सरकारने एलबीटी उलाढालीची मर्यादा वाढविल्याने पालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर विपरित परिणाम होण्याची भीती वर्तविली जात होती. एलबीटी सुरू असताना पालिकेला दर महिन्याला सुमारे शंभर कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. उलाढालीची मर्यादा वाढविल्याने एलबीटी भरणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या दीडशेपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता होती. परिणामी, एलबीटीच्या उत्पन्नात मोठी घट अपेक्षित धरली जात होती. त्यामुळे, पालिकांवर आर्थिक संकट ओढवू नये, यासाठी राज्य सरकारने तातडीने सहाय्यक अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, पालिकेला ८१ कोटी सरकारकडून प्राप्त होणार आहेत.

सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त ५० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पालिकेला ऑगस्टच्या एलबीटीपोटी ४२ कोटी रुपये मिळाले आहेत. त्याशिवाय, मुद्रांक शुल्कावरील एक टक्का अधिभाराचे २१ कोटी ८३ लाख पालिकेला प्राप्त होणार आहेत.

शहराच्या हद्दीमध्ये ५० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या सव्वाशेच्या दरम्यानच असल्याचे सांगण्यात येत होते. वास्तविक, ऑगस्टमध्ये २३७ व्यापाऱ्यांनी पालिकेकडे कर जमा केला आहे. पालिकेला ऑगस्टमध्ये मिळालेल्या उत्पन्नात काही थकित रक्कम जमा झाल्याची शक्यता आहे. तपासणीनंतरच नेमका आकडा सांगता येईल.

- विलास कानडे, एलबीटीप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएमपीचे वेळापत्रक होणार लवचिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वर्षाचे ३६५ दिवस ठरावीक वेळापत्रकानुसारच धावणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सेवेत आता लवकरच बदल होणार आहे. शाळा-कॉलेज आणि कार्यालयांच्या सुट्ट्या आणि ऋतुचक्रानुसार पीएमपीचे वेळापत्रक बदलत जाणार आहे. प्रायोगिक स्वरूपात शनिवार-रविवारच्या 'वीकएन्ड'च्या बससेवेत सध्या बदल करण्यात आला असून, आगामी काळात उन्हाळा-पावसाळा-हिवाळा यानुसारही नियोजनात बदल केले जाणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पीएमपीमध्ये सुधारणा करण्यासाठी काही वेगळे प्रयोग राबविले जात आहेत. त्याअंतर्गत, बसचे वेळापत्रकही लवचिक करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी सोमवारी दिली. पीएमपीतर्फे प्रथमच अशा स्वरूपातील अभिनव कल्पना राबविण्यात येणार आहे.

शनिवार आणि रविवारी अनेक कार्यालये, शाळा-कॉलेजला सुट्टी असल्यामुळे बसला तुलनेने गर्दी कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, शनिवार-रविवारच्या वेळापत्रकात बदल केले गेले आहेत. दर आठवड्याला त्याचा आढावा घेतला जात असून, पुढील टप्प्यात ऋतुंनुसार वेळापत्रकात बदल केले जातील, असे पीएमपीचे सरव्यवस्थापक टी. एस. धारूरकर यांनी दिली. सोमवार आणि गुरुवार जादा गर्दी असल्याने या दिवशी अधिक बस रस्त्यावर आणल्या जातील; तर शनिवार-रविवारी त्याची संख्या कमी केली जाईल.

वेळापत्रकासाठी अल्टिमेटम

पुणे आणि पिंपरी-चिंचवड मिळून पीएमपीचे सुमारे दोन हजार आठशे बसथांबे आहेत. परंतु, त्यापैकी केवळ एक हजार २८० ठिकाणीच प्रवाशांना ऊन-वारा-पाऊस यापासून संरक्षण देणारे 'शेल्टर्स' आहेत. त्यातही, अनेक ठिकाणी बसचे वेळापत्रक लावण्यात आलेले नाही, याबाबत विचारणा केली असता, २८० लोखंडी थांब्यांवर वेळापत्रक लावण्यासाठी संबंधित ठेकेदाराला सप्टेंबर अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली असल्याचे पीएमपीतर्फे स्पष्ट करण्यात आले. या कालावधीत बसथांब्यांवर वेळापत्रक लावण्यात आले नाही, तर त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित स्टीलच्या थांब्यांवर वेळापत्रक लावण्याची कार्यवाही सुरू आहे.

प्रोत्साहन भत्त्यामुळे वाढले उत्पन्न

पीएमपीच्या काही मार्गांचे उत्पन्न अतिशय तुटपुंजे आहे. या मार्गांवरील पीएमपीच्या उत्पन्नात वाढ केल्यास कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस देण्याची योजना जाहीर केली गेली. त्याचा फायदा झाल्याचे दिसून येत असून, अशा ५० मार्गांवरील एकूण उत्पन्नात २५ ते ३० लाख रुपयांची वाढ झाली आहे. उत्पन्नात वाढ करणाऱ्या तब्बल १६० सेवकांना त्यासाठी प्रोत्साहन भत्ताही देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्राप्तिकर विभागाचे दोघे लाच घेताना अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्राप्तिकर विभागाच्या (इन्कम टॅक्स) दोघा अधिकाऱ्यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. नगर येथील एका व्यापाऱ्याकडून प्राप्तिकरामध्ये तडजोड करण्यासाठी लाचेची मागणी केली होती.

सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अतुल फुलझेले यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुशील शर्मा आणि सचिन कुमार असे अटक करण्यात आलेल्या प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांना पकडण्यात आल्यानंतर त्यांच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली.

नगर येथील सुधाकर पवार या व्यावसायिकाने सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. पवार यांचा क्रेनचा व्यवसाय आहे. त्यांनी व्यवसायासाठी २० लाख रुपयांना एक मशिन विकत घेतले होते. काही कारणास्तव ते मशिन त्यांनी १३ लाख रुपयांना विकले. ती रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाली होती. एवढी मोठी रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाल्याने याचा तपास प्राप्तिकर विभागाच्या तपास पथकाकडून सुरू झाला. शर्मा आणि कुमार यांनी या प्रकरणी पवार यांना त्यांच्या कार्यालयात बोलावले. अचानक जमा झालेल्या रकमेचा प्राप्तिकर तसेच दंड असे आठ लाख रुपये त्यांनी भरण्यास सांगितले. दरम्यान, तडजोड करण्यासाठी कुमार यांनी पवार यांच्याकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यांच्यात दोन-तीन वेळा बैठका झाल्यानंतर कुमार यांनी ५० हजार रुपयांवर तडजोड केली.

दरम्यान, पवार यांनी 'सीबीआय'शी संपर्क साधत तक्रार दाखल केली होती. 'सीबीआय'ने सापळा रचला तेव्हा शर्मा यांनी पवार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारली होती. या प्रकरणी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले तर त्यांच्या घराची झडती सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रान्स्पोर्ट वाहनांना ‘स्पीड गव्हर्नर’ सक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ट्रक, टुरिस्ट बस, ट्रेलर, डंपर यासारख्या ट्रान्स्पोर्ट वाहनांना स्पीड गव्हर्नर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार राज्याच्या परिवहन आयुक्तांनी त्याबाबतचा आदेश काढला आहे. त्यामुळे यापुढे ट्रान्सपोर्ट वाहने ताशी जास्तीतजास्त ८० किमी वगाने चालविण्याचे बंधन राहणार आहे.
रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन केंद्रीय परिवहन खात्याच्या परिपत्रकानुसार ट्रक, टुरिस्ट बस, ट्रेलर, डंपर आदींना स्पीड गव्हर्नर बंधनकारक असणार आहे. तर, दुचाकी, तीन चाकी वाहने, प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी गाड्या (प्रवासी क्षमता आठ), अॅम्ब्युलन्स, पोलिस, फायरब्रिगेडची वाहने या बंधनातून वगळण्यात आली आहेत.

नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांना स्पीड गव्हर्नन्स बसवले गेले, नसेल तर त्यांची प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी होणार नाही. या निर्णयाची अंमलबजावणी एक ऑक्टोबरपासून करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटी; एक शब्द, तीन वाक्ये?

$
0
0

महापालिकेच्या अर्जात नागरिकांची थट्टा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी काय करावे, याचे उत्तर केवळ 'एक शब्द' आणि 'तीन वाक्यात' देण्याची 'परीक्षा' घेण्यास पुणे महापालिकेने सुरुवात केली आहे. सद्यस्थितीला शहरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असतानाच केवळ एका शब्दात नागरिकांनी स्मार्ट सिटीचे स्वप्न रंगवावे, अशी अपेक्षा पालिका प्रशासनाने ठेवणे ही पुणेकरांची थट्टा करण्याचा प्रकार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु झाली आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेसाठी शहरातील नागरिकांचा सहभाग हा महत्त्वपूर्ण विषय आहे. स्मार्ट सिटीच्या या अभियानात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी महापालिकेने अर्ज तयार करून तो नागरिकांकडून भरून घेण्याचा निर्धार केला आहे. मात्र, हा अर्ज तयार करताना पालिकेने अत्यंत कमी जागा ठेवत स्मार्ट सिटीबद्दल केवळ एका शब्दात; तर शहरात जाणवणाऱ्या तीन मोठ्या आणि महत्त्वाच्या समस्यांबद्दल प्रत्येकी एका वाक्यात माहिती देण्यास सांगितले आहे. पालिकेने तयार केलेला हा फॉर्म पाहता पालिकेचा उपक्रम केवळ नावापुरताच आहे की खरोखरच महापालिकेला स्मार्ट सिटीच्या अभियानात नागरिकांना समाविष्ट करून त्यांची मते घेऊन पुढे जायचे आहे, याबाबत काहीही स्पष्ट होत नसल्याची तक्रार केली जात आहे.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेने फेसबुक तसेच वेबसाइटच्या माध्यमातून राबविलेल्या उपक्रमाला पुणेकरांना मोठा प्रतिसाद दिला. हजारोंच्या संख्येने नागरिकांनी यामध्ये सूचना केल्या. हाच प्रतिसाद दुसऱ्या टप्प्यातही मिळावा, यासाठी महापालिका अशा पद्धतीचे अर्ज तयार करून हे भरून घेण्याचा अट्टहास तर करत नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.

आवाहन

शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. महापालिकेने यासाठी तयार केलेला अर्ज हा अत्यंत कमी शब्दात भरून देण्याची सक्ती पालिका प्रशासनाने केली असल्याने नागरिकांनी हा अर्ज पालिकेकडे भरून द्यावा. मात्र, स्मार्ट सिटी होण्यासाठी नक्की कोणत्या प्रयत्नांची गरज आहे, याची सविस्तर माहिती महाराष्ट्र टाइम्सकडे punemata1@gmail.com या पत्त्यावर पाठवावी. या माहितीला आम्ही आवश्यकतेनुसार प्रसिद्धी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कर्मचाऱ्याचे ‘तोडपाणी’ CCTV त!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी; तसेच वाहतूक सुरळीत होण्यासाठी शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हींच्या कॅमेऱ्यात चक्क वाहतूक पोलिसच एका दुचाकीस्वाराकडून 'तोडपाणी' करताना आढळला. 'सीसीटीव्ही' कमांड सेंटरमधून वाहतुकीचे नियमन करणाऱ्या वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांच्यासमोरच ही घटना घडली. आपल्याच कर्मचाऱ्याचा प्रताप 'लाइव्ह' पाहिलेल्या उपायुक्तांनी त्याचे निलंबनाचे आदेश काढले आहेत.

फरासखाना वाहतूक विभागातील पोलिस कर्मचाऱ्यावर ही निलबंनाची कारवाई झाली आहे. २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या सुमारास पोलिस आयुक्तालयातील 'सीसीटीव्ही'च्या 'कमांड सेंटर'मधून वाहतूक नियमन करत होते. कॅमेऱ्यांच्या साह्याने कर्मचारी तपास करत असताना वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या बुधवार चौकात कॅमेरा झूम झाला होता. या वेळी एका पोलिस कर्मचाऱ्याने पल्सर क्रमांक एमएच ३१ डीटी ४३६३ यावरील चालकाला दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले.

तो कर्मचारी रस्त्यावरच चालकाशी थोड्या वेळ बोलला. त्यानंतर चालकाने दुचाकी पार्क केली आणि त्या कर्मचाऱ्यापाठोपाठ रस्ता ओलांडून पत्र्याच्या शेडमध्ये गेला. थोड्या वेळाने दुचाकीस्वार एकटाच शेडमधून बाहेर पडला आणि आपला दुचाकी घेऊन निघून गेल्याचे 'सीसीटीव्ही'तून दिसले.

हा प्रकार आवाड 'सीसीटीव्ही'त पाहत होते. याबाबत कर्मचाऱ्याकडे खुलासा विचारण्यात आला. पाऊस आला होता, असे उत्तर त्या कर्मचाऱ्याने दिले; तसेच १०० ते १५० ​महिलांना घेऊन तीन टेम्पो तेथे आले होते. ते कोपऱ्यात उभे राहिले असल्याने वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे चालकाला घेऊन शेडमध्ये गेल्याचा बचाव केला. मात्र, 'सीसीटीव्ही'मध्ये कुठेही पाऊस आल्याचे; तसेच तेथे टेम्पो आल्याचे दिसले नसल्याचे आवाड यांनी निलंबन आदेशात म्हटले आहे.

संशयास्पद वर्तन

पल्सर दुचाकी ही नागपूर पासिंगची होती. तिच्या कागदपत्रांची; तसेच तिच्या कागदपत्रांची खातरजमा करणे अपेक्षित होते. त्यासाठी त्या चालकाला फरासखाना वाहतूक विभागाच्या निरीक्षकांसमोर हजर करणे आवश्यक होते. मात्र, असे काहीही न करता पोलिस कर्मचाऱ्याने त्या दुचाकीस्वाराला सोडून दिले. पोलिस कर्मचाऱ्याचे वागणे संशयास्पद आणि निष्काळजीपणाचे होते. हा प्रकार पोलिसांची प्रतिमा मलीन करणारा असल्याने निलंबन करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हौसेचे मोल फक्त सव्वादोन लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) वाहन नोंदणीसाठी सुरू झालेल्या चॉइस नंबरच्या लिलावातून आतापर्यंत केवळ ४६८ नंबरसाठी ५० लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. अद्यापही या सिरिजमधील काही चॉइस नंबरचा लिलाव होणे बाकी असल्याने महसुलाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या सिरिजमधील 'एमएच -१२, एमएच-१२' या नंबरसाठी सर्वाधिक बोली लागली होती. तो नंबर दोन लाख २२ हजार ५२२ रुपयांना विकला गेला.

गेल्या काही वर्षांपासून पुण्यासह ग्रामीण भागातही वाहनांसाठी चॉइस नंबर मिळविण्याचा ट्रेंड रुजला आहे. त्यामुळे एकाच नंबरमध्ये दोनवेळा 'एमएच' येणार असल्याने या सिरिजमध्ये वाहन नोंदणी करण्यास पसंती देत आहेत. एका सिरिजमध्ये नऊ हजार ९९९ नंबर असतात. त्यामुळे यामध्ये आपलाही क्रमांक लागावा यासाठी इच्छुकांची धडपड सुरू असल्याचे आरटीओमध्ये पाहायला मिळाले.

चॉइस नंबरसाठी वाढलेली मागणी पाहता आरटीओने या नंबरच्या विक्रीसाठी लिलाव पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली. आरटीओने चॉइस नंबरसाठी काही नंबर ठरविले आहेत. त्या नंबरच्या किंमतही निश्चित केली आहे. एका नंबरसाठी अनेकांनी अर्ज केल्यास त्याचा लिलाव केला जातो. दुचाकीचा नंबर चारचाकी गाडीसाठी घ्यावयाचा असल्यास तिप्पट रक्कम आकारली जाते. या योजनेअंतर्गत आरटीओला वर्ष २००७ पासून आजतागायत ७८ कोटी ७५ लाख आठ हजार ३९१ रुपये महसूल प्राप्त झाला आहे. त्यापूर्वी हे कामकाज मॅन्युअली चालत होते. त्यामुळे तेव्हाचे उत्पन्नाचे आकडे आरटीओकडून उपलब्ध होऊ शकले नाहीत. अन्यथा, उत्पन्नाचा आकडा आणखी वाढला असता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images