Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ज्येष्ठ समालोचक बाळ पंडित यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ समालोचक बाळ ज. पंडित (वय ८६) यांचे गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पूना हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे आणि दोन मुली असा परिवार आहे. रात्री ११ च्या सुमारास त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

क्रीडा समीक्षक बाळ पंडित यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषविले होते. पंडित यांनी चाळीसहून अधिक वर्षे विविध भूमिकेतून क्रीडा सेवा केली. ज्या काळात दूरदर्शन नव्हते आणि आकाशवाणी हे एकमेव माध्यम होते, त्या काळात पंडित यांनी क्रिकेटच्या सामन्यांचे मराठीतून धावते समालोचन करण्याचा प्रघात सुरू केला. 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' याचीच अनुभूती जणू त्यांच्या समालोचनातून मिळत असे. चाळीसहून अधिक वर्षे त्यांनी क्रिकेटचे धावते समालोचन केले. 'लिम्का बुक ऑफ रेकार्ड'नेही याची दखल घेतली. क्रीडा समीक्षक म्हणून जवळजवळ ५० वर्षे त्यांनी वृत्तपत्रांतून लिखाण केले. त्यांची क्रिकेटवर ३५हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांच्या 'पराक्रमी दौरा' आणि 'दी लिटल मास्टर' या पुस्तकांना राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाले.

बाळ पंडित एमए, एलएलबी होते. एलएलबीच्या परीक्षेत ते पुणे विद्यापीठात तिसरे आले होते. केवळ क्रीडा क्षेत्रच नव्हे, तर इतर क्षेत्रांतही पंडित यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी आळंदीच्या श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त म्हणून अनेक वर्षे सेवा केली. याशिवाय शिक्षण प्रसारक मंडळींसारख्या नामवंत शिक्षण संस्थांचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

बाळासाहेबांबद्दल मला फार आदर आहे. त्यांच्या निधनाने आपण क्रिकेटचा मराठी शब्दकोशच गमावला. क्रिकेटमध्ये मराठीमध्ये समालोचन त्यांच्यापासून झाले. त्यांनी मराठीत क्रिकेटमधील वेगवेगळे शब्द शोधून काढले आणि क्रिकेटप्रेमींपर्यंत पोहचविले. त्यामुळे चाहत्यांना क्रिकेट समजण्यास सोपे गेले. क्रिकेटमध्ये आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्येही त्यांचे योगदान राहिले आहे.

- चंदू बोर्डे, माजी कसोटीपटू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनोरुग्ण वेटरच्या हल्ल्यात १ ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्याच्या मालधक्का परिसरातील कुबेरा रेस्टॉरंटमध्ये भारत नेपाळी नावाच्या वेटरने सहाका-यांवर केलेल्या चाकू हल्ल्यात एका वेटरचा मृत्यू झाला आणि सहा वेटर जखमी झाले. चाकू हल्ल्यात बीदान घोष या वेटरचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या सहा वेटरवर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, चाकू हल्ला करणा-या भारत नेपाळीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरु आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता तिरळेपणा होईल दूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तिरळेपणाचा दुर्मिळ प्रकार मानला जाणाऱ्या 'व्हर्टिकल स्क्विंट' या प्रकारातील पेशंटच्या डोळ्यातील तिरक्या स्नायूंवर ऑपरेशन करण्यात येते. त्या ऑपरेशनदरम्यान डोळ्यातील तिरके स्नायू (इन्फेरियर ऑब्लिक) कापून टाकण्याबरोबरच ते गुंडाळून ठेवण्याच्या नव्या तंत्रामुळे पेशंटचा तिरळेपणा कायमचा दूर होत आहे. तसेच, लहान वयात तिरळेपणावर ऑपरेशन करणे मुलांच्या हिताचे ठरत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले.

'मायोएक्टमी' या तंत्रामुळे तिरळेपणा पुन्हा येण्याचे प्रमाण ५० टक्क्यांवरून अवघ्या दोन टक्क्यांवर आले. यामुळेच 'मिडल इस्ट एशियन जर्नल ऑफ ऑप्थॉमॉलॉजी' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने नुकतीच एनआयओ हॉस्पिटलच्या नेत्रतज्ज्ञांच्या संशोधनाची दखल घेतली. एनआयओचे नेत्रतज्ज्ञ डॉ. जाई केळकर, डॉ. आदित्य केळकर, डॉ. आभा कानडे, डॉ. सुप्रिया आगाशे तसेच राजीव खांडेकर यांनी हे संशोधन केले. तीन वर्षांदरम्यान ५१ पेशंटवर तिरळेपणा दूर कऱण्यासाठी ऑपरेशन करण्यात आले.

'डोळ्याच्या तिरळेपणाचा उभा आणि आडवा असे दोन प्रकार आहेत. डोळा आत किंवा बाहेर जात असल्याचे भासते अशा व्यक्तीमध्ये तिरळेपणाचा दोष असल्याचे मानले जाते. तिरळेपणा असलेल्यांमध्ये काहींचा एक डोळा वरच्या बाजूला तर एक डोळा खालच्या बाजूला असल्याचे आढळते. या प्रकाराला 'व्हर्टिकल स्क्विंट' असे म्हणतात. या प्रकारच्या पेशंटच्या डोळ्यात तिरक्या स्नायूंमध्ये दोष असतात. त्यामुळे तिरळेपणा आढळतो. पूर्वीच्या ऑपरेशन पद्धतीत तिरके स्नायू कापण्यात येत होते. कापल्यानंतर उरलेले स्नायू डोळ्याच्या अन्य भागात चिकटतात. त्यामुळे कायमचा तिरळेपणा दूर होत नसे. परंतु, नव्या पद्धतीत तिरके स्नायू कापण्याबरोबरच गुंडाळल्याने कायमचा तिरळेपणा दूर होतो,' अशी माहिती एनआयओच्या लहान मुलांच्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. जाई केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लहान मुलांच्या तिरळेपणाबाबत पालकांमध्ये गैरसमज आहेत. डोळ्याचे देण्यात येणारे व्यायाम लहान मुले सहज करू शकतात. प्रौढांना डोळ्याची व्यायाम करणे शक्य होत नाही. त्यामुळे सात वर्षापर्यंतच्या लहान वयातच मुलांच्या तिरळेपणावर ऑपरेशन करणे फायद्याचे असते.

- डॉ. जाई केळकर, नेत्रतज्ज्ञ एनआयओ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कॉय वॉकच्या लिफ्टमधून मुलाची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

विश्रांतवाडीतील मुकुंद आंबेडकर चौकात उभारण्यात आलेल्या स्काय वॉकच्या लिफ्टमध्ये शुक्रवारी दुपारी तन्वीर काशीद जमादार हा शाळकरी मुलगा अडकल्याची घटना घडली. लिफ्ट अडकल्याने तन्वीरने आरडाओरड केल्यानंतर लिफ्टमनने या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. काही वेळातच अग्निशमन दल आणि स्काय वॉकच्या कंत्राटदार कर्मचाऱ्यांनी मुलाला सुखरूप लिफ्टमधून बाहेर काढले.

तन्वीर हा विश्रांतवाडीतील सेंट फ्रान्सिस शाळेत सातवीला शिकतो. नेहमीप्रमाणे दुपारी बाराच्या सुमारास शाळेला जाण्यासाठी निघाला होता. विश्रांतवाडी चौकात वाहनांची रहदारी वाढल्याने तन्वीर आणि त्याचे काही मित्र स्काय वॉकवरून रस्ता ओलांडण्यासाठी निघाले होते. काही मित्र पुढे गेल्याने ते स्काय वॉकवर पोहचले; तर अन्वर स्काय वॉकवर जाण्यासाठी एकटाच लिफ्टमध्ये गेला. लिफ्ट पहिल्या मजल्यावर जात असतानाच अचानक मध्येच बंद पडली. त्यामुळे घाबरलेल्या तन्वीरने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तन्वीरचा आवाज ऐकून लिफ्टच्या सुरक्षा रक्षकाने याची माहिती शेजारील आळंदी रोड पोलिस चौकीला दिल्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला ही माहिती दिली. तसेच, स्काय वॉकच्या लिफ्टचे देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही दिली.

काही वेळातच येरवडा अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तन्वीरला लिफ्टमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, लिफ्ट देखभालीचे कर्मचारी दाखल झाल्यानंतर त्यांनी अडकलेली लिफ्ट मशीनच्या साह्याने सुरू करून तळ मजल्यावर आणण्यात आली. त्यानंतर लिफ्टचे दार उघडून तन्वीरला सुखरूप बाहेर काढण्यात आले, अशी माहिती अग्निशमन दलाचे सहायक विभागीय अधिकारी रमेश गागड यांनी दिली .

लिफ्टची वेळेवर सर्व्हिसिंग होत नसल्याने लिफ्ट बंद पडल्यामुळे स्काय वॉकच्या कंत्राटदराने सर्व्हिसिंग केल्याशिवाय लिफ्टचा वापर सुरू करू नये, असे गागड यांनी सांगितले.

लिफ्टमन उपलब्ध होत नसल्याने मागील वर्षभरापासून स्काय वॉकची लिफ्ट बंद अवस्थेत होती. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील लिफ्ट बंद असल्याने पादचारी, ज्येष्ठ आणि शाळकरी मुलांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत होता. याबाबतचे वृत्त सातत्याने प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर पालिकेकडून तीनपैकी दोन लिफ्ट पादचाऱ्यांसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या; पण लिफ्ट सुरू करण्यापूर्वी स्काय वॉकची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराकडून सर्व्हिसिंग न केल्यानेच लिफ्ट बंद पडल्याचा निष्कर्ष अग्निशमन दलाने काढला आहे. नियमानुसार लिफ्टची सर्व्हिसिंग करणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून कंत्राटदाराकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप स्थानिक शिवसेना उपविभाग अधिकारी शशिकांत साटोटे यांनी केला आहे. याबाबत पालिका आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पगार द्या; अन्यथा विसर्जन नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

हिंदुस्थान अॅँटिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या कामगारांचे १२ महिन्यांचे वेतन रखडले आहे. कामगारांनी थकित पगार मिळेपर्यंत प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निवेदन कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

एचए कंपनी कामगारांनी शुक्रवारी (१८ सप्टेंबर) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, एचए कंपनीच्या कामगारांचे तब्बल १२ महिन्यांचे वेतन रखडलेले आहे. कामगार वर्ग कर्जबाजारी झाला असून कुटुंब उद‍्धवस्त झाले आहेत. जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावर गाठी, भेटी, आंदोलने केली, तरीही तोडगा निघालेला नाही. केंद्रीय मंत्र्यांकडून पुनरुज्जीवन करण्याचे आश्वासन दिले गेले परंतु तरीही तोडगा काहीच निघाला नाही. सरकारने निर्णय न घेतल्यास धार्मिक असंतोषाची भीती आहे. त्यामुळे सरकारने गणेशोत्सवापूर्वी कामगारांना वेतन द्यावे, अन्यथा एच. ए. कंपनीचे कामगारगणपतीचे विसर्जन करणार नाहीत. त्यामुळे निर्माण होणाऱ्या असंतोषाला संपूर्णपणे शासन जबाबदार राहील, असा इशारा एचए मजदूरसंघाचे सरचिटणीस सुनील पाटसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे दिला आहे. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक सदगुरू कदम, स्वीकृत नगरसेवक अरूण बोऱ्हाडे आदी या वेळी उपस्थित होते.

कामगारांच्या मागण्या

१२ महिन्यांचे थकित वेतन मिळावे.

पुनरुज्जीवनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी.

स्थापन केलेल्या समितीत तीन कामगार प्रतिनिधी घ्यावेत.

उत्पादन पूर्ववत चालू करा.

कामगारांची थकित देणी मिळावी.

पुर्नवसन योजना त्वरित मंजूर करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’ने एकाचा मृत्यू

$
0
0

पिंपरी : स्वाइन फ्लूमुळे शुक्रवारी (१८ सप्टेंबर) दिघीतील ४० वर्षीय इसमाचा वायसीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याला सोमवारी (१४ सप्टेंबर) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

शहरात स्वाइन फ्लूमुळे झालेल्या मृतांची संख्या ४८ झाली आहे. आतापर्यंत ४७७ पेशंट सदोष आढळले असून त्यापैकी ६५ पेशंट व्हेंटिलेटरवर आहेत. स्वाइन फ्लूच्या आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता महापालिकेने नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. पाणी साठू देऊ नका, बाहेर फिरताना मास्कचा वापर करा, असे अवाहन पालिकेतर्फे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यावसायिकाला रेल्वेतून फेकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पुणे-लोणावळा लोकल प्रवासादरम्यान व्यावसायिक सूर्यकांत माटे (वय ४०, रा. उस्मानाबाद) यांना चार चोरट्यांनी लुटून चालत्या लोकल रेल्वेमधून फेकून दिले. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर अद्यापपर्यंत आरोपींना पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आलेले नाही.

वडगाव मावळ-कान्हेफाटा सोमवारी (१४ सप्टेंबर) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यावेळी माटे झोपलेले होते. चोरट्यांनी मोबाइल फोन आणि रोख असा २७ हजार पाचशे रुपयांचा ऐवज माटे यांना मारहाण करून लुटला. त्यानंतर देखील माटे चोरट्यांना प्रतिकार करत असल्याने चौघांनी माटे यांना उचलून चालत्या लोकलमधून खाली टाकून दिले. गणपतीसाठी दागिने खरेदी करण्यासाठी कल्याण येथे माटे जायचे होते. मात्र, त्यांना वेळेवर रेल्वे न मिळाल्याने ते लोणावळ्यापर्यंत लोकलने प्रवास करीत होते. ही घटना घडली तेव्हा माटे हे एकटेच रेल्वेडब्यात होते. त्यामुळे त्यांना मदत मिळाली नाही. माटे यांना टाकून दिल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. माटे यांच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर तळेगाव येथील जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेत घडणा-या चो-या, लुटमार या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी घडलेल्या घटनांचा देखील तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

रेल्वे पोलिस आणि स्थानिक गुन्हेशाखेला याचा तपास करण्यात यश येत नसल्याचे स्पष्ट होत आहे. माटे यांना लुटमार करणा-यांचा माग काढण्यासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, रेल्वे पोलिसांची गुन्हे शाखा समांतर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किसन परदेशीसह साथीदारांना अटक

$
0
0

कार्बाइन मशीनगनसह ३० जिवंत काडतुसे जप्त

म. टा. प्रतिनधी, पुणे

जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगार किसन परदेशी याला, पत्नी, मेहुणी व इतर चार साथीदारांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून कार्बाइन मशीनगन, ३० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. परदेशीने त्याच्याच दोन साथीदारांचा खून केल्याचे समोर आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी दिली.

किसन नथू परदेशी (वय ४९), त्याची पत्नी शारदा (४२, दोघेही. रा. लोणावळा), मेहुणी यास्मिन लतीफ शेख (रा. कामशेत), अश्विन चंद्रकांत शिंदे (रा. भांगरवाडी, लोणावळा), अजय कृष्णन केसी (२२, रा. पंचशीलनगर कामशेत), गोग्या उर्फ विकास सुरेश गायकवाड (२४, रा. साते, ता. मावळ) व सुनील बाबू पटेकर (४५, रा. टिंगरेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, राजेश भरत पिंपळे (२९) व अक्षय श्रीपाल गायकवाड (२८, दोघेही रा. लोणावळा) असे खून झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही सराईत गुन्हेगार परदेशीचे साथीदार होते.

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी लोणावळा येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर गुरुवारी पोलिस गस्त घालत असताना परदेशी लोणावळ्याकडे येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक आय. एस. पाटील यांना मिळाली. त्यानुसार पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राम जाधव यांनी सुरू केलेल्या वाहनांच्या तपासणीत परदेशी एका कारमध्ये सापडला. त्याला ताब्यात घेऊन कारची तपासणी केली असता कार्बाइन मशीनगन, ३० जिवंत काडतुसे मिळाली. चौकशीमध्ये त्याने दोघांचाही खून करून मृतदेह सातारा परिसरात टाकल्याची कबुली दिली.

त्याच्यावर लोणावळा पोलिस ठाण्यात खून, मारामारी, शस्त्र जवळ बाळगणे, गांजा विक्री व अपहरण, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईबद्दल लोणावळा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेला प्रत्येकी १५ हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

प्रचंड दहशत...

लोणावळा परिसरात किसन परदेशी याची मोठी दहशत असून, त्याला खतरनाक गुन्हेगार म्हणून ओळखले जाते. त्याच्यावर एकूण २२ गुन्हे दाखल आहेत. तो मोक्का आणि इतर गुन्ह्यात २००१ ते २०१३ अशी बारा वर्षे शिक्षा भोगून आला आहे. मयत राजेश पिंपळे आणि अक्षय गायकवाड हे दोघेही किसन परदेशीचे साथीदार होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रुसलेला जोरदार बरसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड, लोणावळा आणि परिसरात शुक्रवारी (१८ सप्टेंबर) मुसळधार पाऊस झाला. पवना धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवाबरोबरच वरुणराजाचे दमदार पुनरागमन झाल्यामुळे आनंद द्विगुणित झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. परंतु, गणरायाच्या आगमनाबरोबरच परतीचा पाऊस बरसला. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे, अशीच शहरवासीयांची भावना आहे. विशेष म्हणजे, पवना धरण परिसरातही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मावळ भागातील नद्यांना पाणी आले आहे. ओढे खळाळू लागले आहेत. भातखाचरांमध्ये पाणी साचून पिके तरारली आहेत.

पावसाच्या सरींमुळेच शहरवासीयांना पहाटे जाग आली. कधी हलक्या सरी; तर कधी जोराच्या जलधारा बरसत होत्या. सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे दिवसभर जनजीवन काहीसे विस्कळित झाले होते. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कामगार यांची तारांबळ उडाली. परंतु, त्याबाबत जराही कुरबूर न करता पावसाच्या पुनरागमनाविषयी समाधान व्यक्त केले.

ऋषिपंचमीचा आनंद द्विगुणित

ऋषिपंचमीनिमित्त चिंचवड येथील मंगलमूर्ती वाड्यात संस्कृती संवर्धन व विकास महासंघ यांच्यावतीने सामुदायिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. त्याअंतर्गत वाड्यात सकाळी सात वाजता गणेश अथर्वशीर्षकांची २१ आवर्तने करण्यात आली. गणेशयाग करण्यात आला. त्यापूर्वीच पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे वाड्यात भाविकांना बसण्यासाठी विशेष सोय करण्यात आली. या सर्वांनी पावसासाठी गणरायाला साकडे घातले.

या उपक्रमांतर्गत सर्वधर्मीय नागरिकांनी गणपती अथर्वशीर्षाचे सामुदायिक पठण करून सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन घडविले. त्यामध्ये तरुण-तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. एकसुरात, तालात अथर्वशीर्षाचा मंत्रोच्चार झाल्यामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

मावळातही मुसळधार

मावळ भागात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने या भागाला नदीचे स्वरूप आले आहे. कामशेत ते वडगाव परिसरापर्यंतचा सुमारे आठ किलोमीटरचा मार्ग पाण्याखाली गेला असून, यामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच, कामशेत ते वडगाव दरम्यान लोहमार्गाचा ट्रॅक पाण्याखाली गेल्याने दोन्ही मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळित झाली आहे. पवनाधरण ७६ टक्के भरले आहे. नद्यांना पूर आल्याने पूल पाण्याखाली गेले असून, अनेक गावांचा जनसंपर्क तुटला आहे. मावळातील लोणावळा, खंडाळा, कार्ला, कामशेत, वडगाव व तळेगाव परिसरासह पवन, आंदर आणि मावळात पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनाच्या ‘शंभरी’ने विक्रम मोडीत

$
0
0

अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरोधात नेहमीच लढ्याचे हत्यार

पुणे : 'एफटीआयआय'च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची झालेली नियुक्ती रद्द व्हावी, या साठी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाने शंभरी गाठून सारे विक्रम मोडीत काढले आहेत. काम बंद ठेवून आंदोलन करण्याची 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांची ही पहिलीच वेळ आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत जे खटकणारे आहे त्याचा नेहमीच येथील विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. संस्थेचे माजी विद्यार्थी व पुढे अध्यक्ष, अभिनेते, दिग्दर्शक म्हणून ख्यातनाम झालेले सईद मिर्झा, राजकुमार हिरानी, श्रीराम राघवन, जया भादुरी, नसिरुद्दीन शहा यांची ही आंदोलक विद्यार्थी म्हणून ओळख जुनी आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या विरोधाचा इतिहास संस्थेला तितकासा नवीन नाही.

विशेष म्हणजे प्रत्येक अभ्यासक्रमाला केवळ १२ विद्यार्थी असतानाही देखील अडीचशे, तीनशे विद्यार्थ्यांनी केलेली आंदोलने ही नेहमीच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजली आहेत आणि तो चर्चेचा विषय ठरली आहेत. या पूर्वी 'एफटीआयआय'ला 'सेंटर ऑफ एक्सलन्स' चा दर्जा मिळावा, अभ्यासक्रमामध्ये बदल व्हावा आणि संस्थेच्या नियामक मंडळावर चित्रपटाचे ज्ञान आणि दृष्टी असलेल्या व्यक्तींची नियुक्ती व्हावी, या मागण्यांसाठी येथील विद्यार्थ्यांनी आंदोलने केली आहेत.

२००० मध्ये अभिनेते मोहन आगाशे संचालक असताना 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील बदलाविषयी मोठे आंदोलन करून डॉ. आगाशे यांना राजीनामा द्यायला भाग पाडले होते. तसेच, 'एफटीआयआय'च्या संचालकपदी पंकज राग असताना २०१० मध्ये त्यांनी संस्थेच्या खासगीकरणाचा घातलेला घाटही विद्यार्थ्यांनी हाणून पाडला होता. हे आंदोलन सहा महिने चालले होते. संस्थेच्या इतिहासातील हे सर्वांत अधिक काळ चाललेले आंदोलन होते. मात्र, तेंव्हा वर्ग सुरू होते त्यामुळे सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचे महत्व कित्येकपटींनी वाढते कारण की संस्थेचे काम जवळपास ठप्पच आहे.

दरम्यान, यू. आर. अनंतमूर्ती यांच्याही मतांना विरोध दर्शवत काही दिवस विद्यार्थ्यींनी आंदोलन केले होते. आतापर्यंतच्या ६० वर्षांच्या काळात जवळपास ३९ आंदोलन विद्यार्थ्यांनी केली आहेत. त्यातील ९० टक्के आंदोलन ही अभ्यासक्रमासंदर्भात होती. तर उर्वरीत ही प्रशासकीय नियुक्त्या, सोयीसुविधा याविषयावर आधारित होती. मात्र, यंदा चौहान यांच्या विरोधातील आंदोलन म्हणजे प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. कारण यात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयालाच थेट आव्हान देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोडगा निघणार की आंदोलन चिघळणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणाऱ्या 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'तील (एफटीआयआय) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आज, शनिवारी शंभर दिवस पूर्ण होत आहेत. संस्थेच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे आंदोलन ठरले आहे. आता या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी घडामोडींना वेग आला असून, चर्चेची दारे खुली झाली आहेत. केंद्र सरकार आणि विद्यार्थ्यांच्या पातळीवर यासाठी प्रयत्न होत असून तोडगा निघणार, की आंदोलन आणखी चिघळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीविरोधात विद्यार्थ्यांचे ९९ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्यामुळे संस्थेतील कामकाज ठप्प आहे. आंदोलनाने शंभरी गाठली असून, त्यानिमित्त प्रश्न सोडविण्यासाठी सुरू झालेली चर्चा तोडगा काढणार की पूर्वीप्रमाणेच चर्चेचे गुऱ्हाळ होऊन फार्स ठरणार याबाबत 'एफटीआयआय'मध्ये तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

आंदोलनाची दखल न घेतल्याने केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात उपोषणाचे हत्यार उपसणाऱ्या 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांसमोर केंद्र सरकारचे माहिती व प्रसारणमंत्रालय अखेर झुकले आहे. विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा करण्याची तयारी दाखवित त्याबाबतचे अधिकृत पत्र विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. त्याचवेळी आता विद्यार्थ्यांनी सरकारच्या हाकेला प्रतिसाद देत पत्र पाठवले आहे. आठवड्यापेक्षाही जास्त काळापासून विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू आहे. उपोषणामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करावे लागत आहे.

दोन्ही बाजूंची चर्चेची तयारी

केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याच्या सहसचिवांनी हरीशंकर नच्चिमुथ्थू या आंदोलक विद्यार्थ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. चर्चेबाबत त्याच्याशी बोलणी झाली असून, याबाबत विद्यार्थ्यांना अधिकृतपणे पत्र देण्यात आले आहे. त्यानंतर आता विद्यार्थ्यांनीही पत्रास उत्तर म्हणून एक पत्र पाठवले आहे. आम्ही सरकारच्या प्रस्तावाचे स्वागत करत असून चर्चेसाठी तयार आहोत. पण कोणत्याही अटी लादण्यात येऊ नयेत, असे पत्रात म्हटले आहे. या घडामोडीतून प्रश्न सुटणार की नाही हे आत्ताच सांगता येत नसले तरी प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकार व विद्यार्थ्यांनी एक पाऊल नक्की पुढे टाकले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाच्या खूनप्रकरणी जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश आर. पी. पांडे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

या प्रकरणी अनिल राजू किरतकुडवे ( वय २२ रा. ओंकारनगर, बिबवेवाडी) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुलभा शहाजी भिसे (रा. कुंजीरवाडी ) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. त्यांचा मुलगा किरण (वय १९) मित्र तुषार दरखडे, सूरज माने, सिद्धार्थ काबदुले यांच्यासह ओंकारनगर येथून जात होता. किरण याचे या भागात राहत असलेल्या एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा आरोपी अनिल याला राग होता. आरोपीने किरण याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. किरणच्या पाठीवर पोटावर त्याने वार करून त्याचा खून केला. दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्याला अटक केली होती.

अतिरिक्त सरकारी वकील सुनील हांडे यांनी या केसचे कामकाज पाहिले. त्यांनी या केसमध्ये दहाजणांची साक्ष नोंदविली. हा खून आरोपीने केलाच नाही, त्या मुलीच्या मामाने खून केल्याचा युक्तिवाद आरोपीने बचावात केला होता. आरोपीच्या अंगावर घटनेच्यावेळी असलेल्या कपड्यांवर किरणचे रक्ताचे डाग आढळून आले होते, पोलिसांनी आरोपीकडून जप्त केलेल्या चाकूनेच खून झाला होता अशी साक्ष डॉक्टरांनी कोर्टात दिली. घटनेचे प्रत्यक्षदर्शी, डॉक्टरांची साक्ष, पोलिसांनी केलेला पंचनामा, जप्त केलेला चाकू या परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली. पोलिस निरीक्षक मनोज खंडागळे यांनी तपास अधिकारी म्हणून या केसमध्ये कामकाज पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरच्या घरात घुसून खंडणीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कात्रज येथील बांधकाम व्यवसायिकाच्या घरी पेपरचे बिल मागण्याच्या बहाण्याने आलेल्या टोळक्याने सत्तर लाख रुपयांची मागणी करून सामानाची तोडफोड केली. या बाबत पोलिस नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. बांधकाम व्यावसायिकाने महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले आहे.

या बाबत संबंधित बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवीराज सुभाष डोंगरे (वय २९, रा. चव्हाणनगर, धनकवडी), सुनील भगतसिंग चव्हाण (वय २४, रा. शिवसाई कॉलनी, आंबेगाव), निरव रवींद्र शिर्के (वय २३, रा. बालाजीनगर, धनकवडी) यांना अटक करण्यात आली आहे. तर, सुरेश पवार आ​िण त्यांचे चार साथीदार पळून गेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बांधकाम व्यवसायिक आहेत. २००९ मध्ये त्यांच्या एका बांधकाम साइटवर विजेचे कनेक्शन घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी महावितरणकडे अर्जही केला होता. पण, त्यासाठी त्यांच्याकडे लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीने दोघांना अटक केली होती.

तक्रारदाराला लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यासाठी यातील आरोपी सुरेश पवार यांनी सांगितले होते. तसेच याप्रकरणात आणखी एका अभियंत्याचे नाव देऊ नये म्हणून सांगितले होते. तक्रारदाराने नाव न दिल्यामुळे त्या अधिकाऱ्यांने तक्रारदार यांना सत्तर लाख रुपये दिले आहेत. असे आरोपीला वाटत होते. त्यामुळे त्यातील काही रक्कम आरोपी पवार हा मागत होता. तक्रारदार यांनी नकार दिल्यामुळे पवार चिडून होता. मंगळवारी सकाळी आठला पेपर बिल मागण्याच्या बहाण्याने सात ते आठ जणाच्या टोळक्याने तक्रारदार यांच्या घरात प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाद्यपदार्थाचा ट्रक भस्मसात

$
0
0

हडपसर : दिवेघाटाच्या पायथ्याला वडकीनाला येथे वेपर्सच्या कंटेनरची वायर शॉर्टसर्किट होऊन कंटेनरला आग लागली. आगीत वेपर्स आणि खाद्य पदार्थाची पाकिटे जळून खाक झाली. वडकी ग्रामस्थ आणि अग्निशामक दलाच्या गाड्यांनी आग नियंत्रणात आणली. शुक्रवारी सकाळी राजस्थानहून वेपर्स आणि खाद्यपदार्थांनी भरलेला कंटनेर वडकीनाला येथे आला. दुपारी कंटेनरमधील माल खाली करत असताना गाडीतून मोठ्या प्रमाणत धूर येत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. ते पाहून चालकाने कंटेनरला सासवड रस्त्यावर बाहेर आणून उभा केल्याने दुर्घटना टळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा सेनाध्यक्षाच्या खुनात ​‘हिंदुराष्ट्रसेने’चा सहभाग

$
0
0

दहा जणांना अटक; दोघे आरोपी फरारी

पुणेः वडकी येथील युवा सेनाध्यक्ष हेमंत प्रकाश गायकवाड (वय ३२) यांचा खून हिंदुराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुपारी घेऊन केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यातील दोघे आरोपी फरारी झाले आहेत. वडकी परिसरातील खडीक्रशर चालकांकडून ही सुपारी देण्यात आल्याचे उघडकीस आले असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी अनिल दत्तात्रय गायकवाड (वय ३३), उत्तम बबन गायकवाड (वय ४५), सागर दशरथ गायकवाड (वय २५), दशरथ किसन गायकवाड (वय ४८), सुदाम बबन गायकवाड (वय ४१), गणेश बबन गायकवाड (वय ३२), सागर म्हस्कू मोडक (वय १९), अमोल काळुराम मोडक (वय २२), मंगेश विलास मोडक (वय २५) आणि किरण ऊर्फ दादा दत्तात्रय झेंडे (वय २१) आदींना अटक करण्यात आले आहे. तुषार हंबीर आणि किरण पवार हे सराईत गुन्हेगार फरारी झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. मोडक, हंबीर, पवार हिंदूराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते असून, त्यांना सुदाम गायकवाड यांने सुपारी दिली होती, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम जाधव यांनी दिली.

हेमंत आणि आरोपी गायकवाड यांच्यात वाद होते. हेमंत यांनी केलेल्या तक्रारीवरून गायकवाड बंधूंना तहसीलदारांनी खडीक्रशर प्रकरणी तीन कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच फेब्रुवारीमध्ये हेमंत गायकवाड यांच्यावर गायकवाड यांनी प्राणघातक हल्लाही केला होता. या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होवून आरोपी गजाआड झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुणपत्रिकांची पडताळणी करता येणार ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणपत्रिकांची पडताळणी करण्यासाठी लवकरच ऑनलाइन सुविधा उपलब्ध होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तसेच, परदेशी विद्यापीठांमधील प्रवेशांदरम्यान गुणपत्रिकांची पडताळणी गरजेची असणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ होणार आहे.

परीक्षा विभागाच्या ऑटोमेशनसाठी विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातूनच परीक्षा विभागामधील विविध प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याच्याच पुढील टप्प्यामध्ये गुणपत्रिकांच्या ऑनलाइन पडताळणीची ही सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिली. देशांतर्गत पातळीवर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली गुणपत्रिका खरी आहे की खोटी, असा प्रश्न उपस्थित होणाऱ्या यंत्रणांसाठीही या उपक्रमाचा लाभ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पूर्वी विद्यार्थ्यांना याच प्रक्रियेसाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे अर्ज सादर करावा लागत होता. या पुढील काळात वेबसाइटवर अशा पडताळणीसाठी विद्यापीठाकडून उपलब्ध होणाऱ्या लॉगिन आयडी आणि पासवर्डच्या आधारे विद्यार्थी एका दिवसाच्या आत अशी पडताळणी करू शकतील, असा विश्वास डॉ. गाडे यांनी व्यक्त केला. गुणपत्रिकांच्या डिजिटायझेशनसाठी विद्यापीठाने सुरू केलेल्या प्रयत्नांच्या आधारे हे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्री निषेधाचा ठराव पालिकेत मंजूर

$
0
0

सत्ताधाऱ्यांची सरशी; भाजप सदस्यांचा विरोध

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालकमंत्री गिरीश बापट यांनी गेल्या आठवड्यात जाहीर कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचा विरोध करून पालिकेतील सत्ताधारी पक्षाने शुक्रवारी गिरीश बापट यांच्या निषेधाचा ठराव सर्वसाधारण सभेत मान्य केला. तसेच, सभाही तहकूब केली. बापट यांच्या निषेधाचा ठराव सभागृहात मांडला जावू नये, अशी भूमिका घेऊन भाजपच्या सभासदांनी विरोध केला. मात्र, पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मतदान घेऊन बहुमताने निषेधाचा ठराव मान्य केला.

गेल्या आठवड्यात बालगंधर्व रंगमंदिरात विद्यार्थी संघटनेच्या जाहीर कार्यक्रमात बापट यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून आक्षेपार्ह विधान केले होते. बापट यांच्या वक्तव्यावर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली होती. पालकमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी बापट यांच्या निषेधाचे फलक झळकवून निदर्शने केली. 'चावट बापट हाय हाय,' 'बापट यांनी राजीनामा द्यावा' अशा घोषणा दिल्या. या आंदोलनावर आक्षेप घेऊन भाजपच्या सभासदांनी हा विषय सभागृहाशी संबंधित नाही, त्यावर चर्चा करू नये, अशी मागणी केली. मात्र, या पूर्वी अनेक विषयांवर सभागृहात चर्चा झाल्याचे सांगून पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या अनेक सभासदांनी निषेध केला.

सुमारे तासभर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये जोरदार गोंधळ सुरू होता. भाषणातून माघार घेऊन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभागृहात भाजपच्या मदतीने अनेक विषय मान्य करून घेतले. सभा तहकुबी मांडताना 'शहराच्या सांस्कृतिक वारशाला काळिमा फासणाऱ्या बापट यांच्या वक्तव्याचा निषेध करून सभा तहकूब करावी' अशी सूचना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मांडली. त्याला काँग्रेसने अनुमोदन दिले. या तहकुबीला भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केल्याने मतदान घेऊन बापट यांच्या निषेधाचा ठराव बहुमताने मान्य करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बापटांनी घेतले ‘पालकत्व’

$
0
0

पुणे फेस्टिव्हलसाठी ३० वर्षे मदतीचे कलमाडींना आश्वासन
म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे फेस्टिव्हलला येणार असल्याने विविध चर्चांना उधाण आले असतानाच, मुख्यमंत्र्यांनी फेस्टिव्हलकडे पाठ फिरवली. मात्र, पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्यांची उणीव भरून काढताना या सोहळ्याला पुढील तीस वर्षे मदत करण्याचा शब्द दिला. या पार्श्वभूमीवर माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेस्टिव्हलसाठी पाठविलेल्या शुभेच्छा वाचून दाखविण्याची संधीही साधली.

फेस्टिव्हलच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री​ प्रकाश जावडेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या दोघांसह महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी देघ्खील देखील अनुपस्थिती लावली. मात्र, बापट यांनी आवर्जून हजेरी लावली. 'कलमाडी यांच्या फेस्टिव्हलला आम्ही पंधरा १५ वर्षे मदत केली. आता भाजपने मदत करावी अन्यथा पुन्हा आम्हालाच मदत करावी लागेल,' असे विधान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात केले. त्याचा दाखला देऊन बापट म्हणाले, 'पुण्याच्या सांस्कृतिक चळवळीत पुणे फेस्टिव्हलचा मोठा वाटा आहे. कलमाडी यांना १५ वर्षे मदत मिळाली. आता आम्ही फेस्टिव्हलला पुढील तीस वर्षे मदत करू. या उपक्रमाला राजकारणाच्या पलीकडे जाऊन मदत केली जाईल.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठविलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखवल्यानंतर कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलतर्फे मुख्यमंत्री दुष्काळनिधीसाठी पाच लाख रुपयांची मदतही सुपूर्द केली.

ड्रीमगर्लची कृष्णवंदना

ढोल-ताशांचा गजर, हेमामालिनी यांनी सादर केलेली मनमोहक कृष्णवंदना, चित्तथरारक योग आणि मल्लखांबाची प्रात्यक्षिके, मराठी सिनेकलावंतांची ठेका धरायला लावणारी लावणी, भांगडा आणि गोंधळ अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी पुणे फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी रंगला. हेमामालिनी यांनी २७ वर्षांच्या फेस्टिव्हलमध्ये २५ वेळा गणेशवंदना सादर केली आहे. यंदा त्यांनी 'श्रीकृष्णवंदना' हा कृष्णभक्तीवर आधारित नृत्याविष्कार सादर करून पुणेकरांची मने जिंकली. 'गणपत्ती बाप्पा मोरया'च्या नामघोषात झालेल्या या दिमाखदार सोहळ्यामध्ये संगीतापासून नृत्य, कला आणि संस्कृतीचा मनोहारी संगम पुणेकरांनी अनुभवला.

अजय-अतुलना 'अॅवॉर्ड'

अभिनेत्री बिंदू, अभिनेते जॅकी श्रॉफ, संगीतकार अजय-अतुल, डॉ. उमा गणेश नटराजन आणि आबेदा इनामदार यांना 'पुणे फेस्टिव्हल अॅवॉर्ड' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर आणि प्रेम चोप्रा यांना 'जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आव्हाळवाडीत दिसलेला बिबट्या अखेर जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

वाघोलीतील आव्हाळवाडी परिसरात मागील महिन्याभरापासून वास्तव्यास असलेल्या नर जातीचा बिबट्या शुक्रवारी पहाटे पिंजऱ्यात जेरबंद झाला. पिंजऱ्यात शेळी ठेवल्यानंतर काही तासातच बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश मिळाले. पकडण्यात आलेल्या बिबट्याला जुन्नर येथे नेऊन काही दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

गेल्या महिनाभरापासून आव्हाळ वाडी परिसरात बिबट्या आणि तिची दोन पिल्ले वास्तव्य करीत होते. गेल्या शनिवारी (१२ सप्टेंबर) काम करून घरी परतणाऱ्या एका मजुरावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न बिबट्याच्या पिल्लाने केला होता. परिसरात बिबट्या असल्याचे पुरावे वन विभागला सापडून आल्यानंतर दहा दिवसापूर्वीच पिंजरा लावण्यात आला होता. पण पिंजऱ्यात शेळी ठेवण्याची परवानगी न मिळाल्याने बिबट्याने पिंजर्याकडे पाठ फिरवली होती. गुरुवारी दुपारनंतर पिंजऱ्यात शेळी ठेवल्यानंतर काही तासांतच बिबट्या जेरबंद झाला.

बिबट्या पिंजऱ्यात पडल्यानंतर वन विभागाने त्याला जुन्नरला हलविण्यात आले असून काही दिवस त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती वन रक्षक विलास निकम यांनी दिली. पुढील काळात आव्हाळ वाडी परिसरात बिबट्या दिसून आल्यास वन विभागाकडून पुन्हा पिंजरा लावण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांडव धोरणाला पालिकेची मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उत्सवाच्या काळात रस्त्यावर टाकण्यात येणाऱ्या मांडवाच्या तसेच कमानींच्या धोरणाला शुक्रवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर महापालिकेने हे धोरण बनविले आहे. रस्त्यावर खड्डा खोदल्यास प्रत्येक खड्ड्यासाठी दोन हजार रुपये दंड, पोलिसामध्ये तक्रार तसेच बेकायदा जाहिरात फलक उभारल्यास पोलिस कारवाई करण्याचा समावेश या धोरणात करण्यात आला आहे.

उत्सवाच्या काळात सार्वजनिक मंडळांच्या वतीने रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या मांडवांचे धोरण पालिकेने तयार केले होते. हायकोर्टाने दिलेल्या सूचनेनुसार हे धोरण तयार करण्यात आले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी मुंबई पालिकेप्रमाणे मंडपाचे धोरण तयार करावे, असे आदेश मुख्य सभेने दिले होते. यासाठी सर्वपक्षीय सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने तयार केलेल्या धोरणाला सर्वसाधारण सभेने एकमताने मान्यता दिली. पालिकेने तयार केलेल्या धोरणानुसार मंडळांना रस्त्यावर खड्डे घेता येणार नाहीत, याकडे दुर्लक्ष करून खड्डे घेतल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक खड्ड्यासाठी दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.

उत्सवाच्या काळात जाहिरात कमानी उभारण्यासाठी मंडळांना पालिकेकडे पाचशे रुपये भरून रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे. प्रशासनाकडून प्रत्येक मंडळाला केवळ पन्नास मीटर अंतरावर जाहिरात कमान उभारण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. तसेच या अंतरात एकापेक्षा जास्त मंडळ असल्यास प्रत्येकाला समान कमानींचे वाटप केले जाणार आहे. पूर्वीच्या धोरणात रस्त्यांवर मंडपासाठी रस्त्यांच्या एक तृतीयांश जागेचा समावेश होता. या धोरणात प्रत्यक्ष जागेवरील स्थिती लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांच्या परवानगीनंतर पालिकेकडून रीतसर अर्जानंतर परवानगी दिली जाणार असल्याचे या धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images