Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अध्यक्षांच्या अनास्थेमुळे अभ्यास मंडळे बैठकीविना

0
0
पुणे विद्यापीठात सन २०११-१२ मध्ये तब्बल २४ अभ्यास मंडळांची एकही बैठक झाली नाही. बहुतेक बैठका अध्यक्षांनी आयोजित न केल्याने झालेल्या नाहीत. पुणे विद्यापीठाच्या येत्या १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अधिसभेसाठी विचारलेल्या एका लेखी प्रश्नाच्या उत्तरातून ही बाब समोर आली आहे.

मुलांना बोलते करा, अन् वेळही द्या...

0
0
नोकरीनिमित्ताने दिवसभर बाहेर राहावे लागत असल्याने आणि विभक्त कुटुंबपद्धती असली तरी मुलांना बोलते करा, घरी आल्यानंतर त्यांना भरपूर वेळ द्या... त्यांच्याशी मनमोकळा संवादही साधा...

पहिल्या सहामाहीत मोठी वाढ

0
0
पोस्टाच्या पुणे विभागाच्या कामगिरीत सुधारणा झाली असून, गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदा महसुलात ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ सुमारे ३५.२३ कोटी रुपयांची आहे. पोस्टाच्या सेवांबरोबरच सेव्हिंग अकाउंट्स आणि पोस्टल विमा योजनाधारकांच्या संख्येत वाढ झाल्याने महसूल वाढला आहे.

कौतुकाच्या थापेचे टपाल ‘पोस्ट’

0
0
पत्रांच्या गठ्ठ्यातून ‘सॉर्टिंग’चे त्यांचे काम नेहमीसारखे सुरू झाले होते..., बटवड्यावर शिक्का मारण्याची हातघाई सुरू होतीच..., कोणत्या भागातील वाटप न्यायचे त्याचाही ‘गठ्ठा’ तयार होता... हा रोजचा शिरस्ता नियमाने पाळत अचूक पत्त्यावर नेमका संदेश पोहोचविणा-या ‘त्या’ हातांत मंगळवारी कौतुकाच्या थापेचे गुलाबपुष्प विसावले!

५०० चौ. फुटांच्या प्लॉटवरही रीतसर बांधकाम शक्य

0
0
किमान पाचशे चौरस फुटांच्या प्लॉटवरही शहरात रीतसर घर बांधण्यास लवकरच परवानगी मिळणार आहे. त्याची नियमावली तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी पुणे महापालिकेने घेतला.

ग्राहकांच्या खात्यामध्ये सबसिडी जमा करा

0
0
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार घरगुती सिलिंडर ग्राहकांना वर्षाकाठी सहाऐवजी नऊ सिलिंडर देण्याची ‘तसदी’ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार घेत नसल्यामुळे राज्यातील वितरक संघटनेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. घरगुती सिलिंडरसाठी एकच दर आकारून सबसिडीची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा करण्याचा प्रस्ताव वितरकांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिला आहे.

पोस्ट स्टँपवर झळकण्याची संधी

0
0
पोस्टाच्या स्टँपवर आपली प्रतिमा झळकविण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. राष्ट्रीय पोस्टल सप्ताहानिमित्त पोस्टाच्या पुणे विभागातर्फे पुणेकरांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर विविध उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

‘MBA’ अभ्यासक्रमाचे कालानुरूप ‘मॅनेजमेंट’

0
0
‘एमबीए’चा अभ्यासक्रम ठराविक सहा ‘स्पेशलायझेशन्स’मध्ये अडकवून न ठेवता अधिक व्यापक करण्याचे धोरण पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट विद्याशाखेने स्वीकारले आहे. त्यामुळे मॅनेजमेंट संस्थांना पुढील शैक्षणिक वर्षापासून (२०१३-१४) विद्यार्थ्यांच्या गरजांनुसार ‘एमबीए’ अभ्यासक्रम राबविण्याची मुभा मिळणार आहे.

दुरुस्तीच्या नावाखाली उद्या पाणीपुरवठा नाही

0
0
शहरात गेल्या आठवडाभरात पावसाने दिलासा दिला असला, तरी पुणेकरांची पाणीकपातीतून सुटका झालेली नाही. येत्या गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.

अभ्यास मंडळे बैठकीविना

0
0
पुणे विद्यापीठात सन २०११-१२ मध्ये तब्बल २४ अभ्यास मंडळांची एकही बैठक झाली नाही. बहुतेक बैठका अध्यक्षांनी आयोजित न केल्याने झालेल्या नाहीत. पुणे विद्यापीठाच्या येत्या १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अधिसभेसाठी विचारलेल्या एका लेखी प्रश्नाच्या उत्तरातून ही बाब समोर आली आहे.

सहामाही आली तरी गणवेश गायब

0
0
शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आता सहामाही परीक्षा आली तरी, पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या शाळांमधील निम्म्या विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळालेला नाही. आतापर्यंत गणवेश मिळत नसतील तर, पुढच्या वर्षात गणवेश देणार का, असा प्रश्न उपस्थित करत बोर्डाच्या कारभारावर सदस्यांनी टीका केली आहे.

उसाच्या लागवडीची भानगड

0
0
धरणे भरल्यावरही शहराची पाणीकपात कायम ठेवण्याचा वाद पेटलेला असतानाच जिल्हाधिकारी आणि कृषि विभागाने दिलेल्या उसाच्या लागवडीच्या माहितीमध्ये प्रचंड तफावत आढळल्याने हा विषय आणखी भडकला आहे. माहितीच्या अधिकारात चुकीची माहिती दिल्याबाबत चौकशी करण्याची मागणी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.

एसटीच्या मेगाभरतीला प्रचंड प्रतिसाद

0
0
एसटीतील मेगाभरतीसाठी राज्यभरातून पाच लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. कंडक्टर वगळता अन्य पदांसाठीची लेखी परीक्षा येत्या १४ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

‘आवडता’ प्रवासही महागला

0
0
प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीकडून राबवण्यात येणा-या ‘आवडेल तेथे प्रवास’ पासाचे दर वाढवण्यात आले आहेत. एसटीकडून प्रवासी भाड्यात वाढ करण्यात आल्यानंतर पासचे दर आणि नैमित्तिक कराराच्या दरांमध्ये वाढ करण्यात आल्याचे एसटीकडून कळवण्यात आले आहे. नवीन दर ११ ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहेत.

१३३ कोटींचे भूसंपादन निवाडे कागदोपत्री

0
0
नागरी सुविधांसाठी संपादित करण्यात येणा-या जमिनींच्या भरपाईची रक्कम मंजूर नसल्यामुळे ३ हजार ४१७ जमीन मालकांनी त्याविरोधात कोर्टात दाद मागितली आहे. या भूसंपादनापोटी मान्य केलेले १३३ कोटी रुपयांचे निवाडे त्यामुळे कागदोपत्रीच राहिले आहेत. निवाडा रकमांना कोर्टात आव्हान दिल्याने रस्त्यांपासून विविध योजनांची कामे गेली पाच ते सात वर्षे रखडली आहेत.

IPR चोरीची दखल घेणार कोण?

0
0
कात्रज येथील ‘ब्लू मून डायरेक्ट’ या कंपनीतील कम्प्युटर चोरीला गेल्याची दखल पोलिसांनी घेतली असली, तरी त्यातील बौद्धिक स्वामित्त्व हक्कांतर्गत (आयपीआर) येणाऱ्या संगीत रचनांच्या चोरीची दखल कोण घेणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

उपचाराअभावी पादचारी मृत्युमुखी

0
0
रिक्षाचालकाने अपघातानंतर पादचा-याला रस्त्यात टाकून पळ काढल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी रिक्षा चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू केला आहे.

पतीने केला पत्नीचा खून

0
0
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार गो-हे बुद्रूक येथे सोमवारी मध्यरात्री घडला. हॉटेलमध्ये आचारी काम करणा-या नेपाळी तरुणाला हवेली पोलिसांनी अटक केली आहे.

थ्री-जी टॉवर्सची संख्या वाढणार

0
0
भविष्यात ‘व्हॉइस कॉल’पेक्षा ‘डेटा युसेज’ची मागणी वाढणार असल्याने ‘बीएसएनएल’तर्फे आगामी काळात थ्री-जी टॉवर्सची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात ‘बीएसएनएल’चे टॉवर्स एक हजाराचा टप्पा गाठतील.

एम्स हॉस्पिटलवरून घुमजाव

0
0
पुणे महापालिकेने ‘बीओटी’ तत्त्वावर चालविण्यास दिलेले हॉस्पिटल्सचे करार तपासून घेण्याचा निर्णय झाला होता. तरी देखील ‘एम्स’ या संस्थेतर्फे औंधमध्ये उभारण्यात येत असलेल्या हॉस्पिटल्सवरून स्थायी समितीने मंगळवारी घुमजाव केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images