Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आदिवासी साहित्य दुर्लक्षितच

$
0
0
वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या आदिवासींचे साहित्य अजूनही दुर्लक्षित राहिल्याची खंत ज्येष्ठ आदिवासी कादंबरीकार नजुबाई गावित यांनी रविवारी पुण्यात व्यक्त केली. साहित्याच्या क्षेत्रात नवनवे पॅटर्न उदयास आले असून, मात्र त्यातूनही फारसे साध्य होत नसल्याचेही त्या या वेळी बोलताना म्हणाल्या.

उपायुक्त शिंदे यांना पुरस्कार

$
0
0
पुणे पोलिस दलातील पोलिस उपायुक्त डॉ संजय शिंदे यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसन मुक्ती सेवा पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. राज्य सरकारतर्फे पुणे विभागात उल्लेखनीय काम करणा-या शासकीय अधिका-यांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो.

अर्जात भटक्या जाती जमातीला वगळले ?

$
0
0
वैद्यकीय शाखेचे पदवीचे धडे घेतलेल्या विद्यार्थ्यांना एमएस, एमडीची पदव्युत्तर पदवी संपादन करण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षेच्या (नीट) अर्जातून भटक्या जाती (एनटी), भटक्या जमातीच्या वर्गाला वगळण्यात आल्याचे बाब समोर आली आहे. त्यामुळे ‘बीजे’सह अनेक वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

‘गॅस्ट्रीक सर्जरी’मुळे मधुमेहावर प्रभावी नियंत्रण

$
0
0
मधुमेहासह लठ्ठपणा, किडनी, डोळ्यांची दृष्टी कमकुवत होणे सारख्या विविध आजारांनी त्रासलेल्या पेशंटला आता नव्या संशोधनातून दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मधुमेह झालेल्यांचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी जठराची रचना बदलणारी ‘गॅस्ट्रीक सर्जरी’ केल्यास मधुमेहासह अन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी संशोधन केले जात आहे.

आरोग्य विद्यापीठाचे वर्षातून दोनदा पदवी प्रदान

$
0
0
पदवी प्रदान समारंभापूर्वी वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप पूर्ण होत नसल्याने वर्षातून दोनदा पदवी देण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नुकताच घेतला. मात्र, दुसऱ्या टप्प्यात पदवी घेणाऱ्यांना पोस्टाद्वारे सन्मान स्वीकारण्यावर समाधान मानावे लागेल.

ठेकेदाराकडून ‘टेक महिंद्रा’ची फसवणूक

$
0
0
कर्मचा-यांची वाहतूक करण्यासाठी वाहने पुरविणा-या ठेकेदाराने बनावट बिले सादर करून कंपनीची २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार कंपनीच्या व्यवस्थापनाने हिंजवडी पोलिसांमध्ये दिली आहे. साजिद शेख (सूरज हौसिंग सोसायटी, कोंढवा), राघवेंद्र नागप्पा हाडपड, संजीव यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरीत पाणी मीटरचे फोटो बील

$
0
0
पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी मीटर ग्राहकांना मीटर रिडिंगच्या फोटोसह बील देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी नियुक्त केलेल्या क प्रभागात संगणक टॅबचे वितरण महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते झाले.

विरोधी पक्षनेत्यांचे स्टिंग ऑपरेशन

$
0
0
जकात चुकवून शहरात माल आणत असलेले चार ट्रक महापालिकेचे विरोधी पक्षनेते वसंत मोरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी पहाटे पकडून दिले. हे चारही ट्रक जकात खात्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

कंडक्टरच्या सावधगिरीमुळे जीवदान

$
0
0
एशियाड बसच्या चालकाच्या हृदयात गाडी चालवत असतानाच अचानक कळ येते आणि हार्टफेल होऊन स्टेअरिंगवरच त्याचा मृत्यू होतो. मग गाडी वेडीवाकडी वळणे घेत डिव्हायडरवर धडकण्याच्या बेतात असते. मात्र, प्रसंगावधान राखून कंडक्टर गाडीवर नियंत्रण मिळवितो आणि ३५ जणांचा जीव वाचवतो.

कृष्णा कधी येणार हो अंगणी?

$
0
0
कधी युती शासनाला दूषणे, तर कधी अनुशेषाच्या नावाने ठणाणा करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या अनाकलनीय धोरणांमुळे कृष्णा-भीमेच्या विपुल पाण्याच्या खोऱ्यातील बहुतांश धरणे आणि कालव्यांची कामे गेले दीड दशक संथ गतीने सुरू आहेत. कोट्यवधी रुपयांचा खजिना रिता करूनही प्रत्यक्ष ‘कृष्णा’ कोणाच्याही अंगणी पोहोचलेली नाही. मात्र, शेतकऱ्यांना हिरव्या वैभवाची स्वप्ने दाखविणाऱ्यांनी ‘समृद्धी’चे कालवे आपल्या घराकडे वळवून नेले.

ग्रामीण भागात घर... आता लाखाची गोष्ट

$
0
0
ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी होणारा अवाढव्य खर्च आणि महिनोंमहिने सुरू राहणारे बांधकाम टाळण्यासाठी पुण्याच्या सायन्स टेक्नोलॉजी पार्कने कंबर कसली आहे. कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेमध्ये घर बांधण्यासाठी संस्थेतर्फे संशोधन करण्यात आले आहे. त्यातूनच बांबू रिइन्फोर्स्ड सिमेंट आणि ‘अर्थ स्टॅबिलायझर ब्रिक्स’चा वापर करून एक लाखामध्ये घर बांधण्याची अभिनव पद्धत पार्कने शोधून काढली आहे.

‘पीएफसी’ची विजयी सलामी आय-लीग फुटबॉल

$
0
0
पुणे फुटबॉल क्लबने (पीएफसी) सोमवारी २०१२-१३ आय-लीग फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. पीएफसीने मोसमातील आपल्या पहिल्याच सामन्यात ओएनजीसीवर ३-२ ने मात केली.

शालेय कामात ‘इलेक्शन ड्युटी’चा अडथळा

$
0
0
शिक्षकांच्या इलेक्शन ड्युटीमुळे शिक्षण हक्क कायदा आणि सातत्यपूर्ण सर्वंकक्ष मूल्यमापनाच्या प्रक्रियेस येत असलेला अडथळा लक्षात घेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिक्षकांना ‘इलेक्शन ड्युटी’मधून सूट देण्याची मागणी शासनाकडे केली आहे. त्याविषयीचे मागणीपत्र पक्षाचे शहर उपाध्यक्ष अजय शिंदे यांनी सोमवारी शिक्षण संचालक श्रीधर साळुंखे यांना दिले.

अधिका-यांना निलंबित करण्याची मागणी

$
0
0
महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थ्यांना मिळणा-या सुविधा, शाळांची स्वच्छता आदी बाबींविषयी ‘शिक्षण हक्क मंचा’ने टीका केली आहे. त्याचप्रमाणे शाळांच्या गलथान कारभाराला जबाबदार असणा-या पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील अधिका-यांना निलंबित करण्याची मागणीही मंचातर्फे सोमवारी करण्यात आली.

कुशल मनुष्यबळाची जिल्हावार पडताळणी

$
0
0
कौशल्य विकास कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हावार कुशल मनुष्यबळाच्या मागणी आणि पुरवठ्यामधील तफावतीची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित जिल्ह्यात आवश्यक ते अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत.

सखोल ज्ञानाजर्नातूनच माहितीचा केंद्रबिंदू

$
0
0
पुणे शहराचा इतिहास, वैशिष्ट्ये, अप्रकाशित माहिती संकलित स्वरूपात वाचकांसमोर आणण्यासाठी सातत्याने कार्यरत राहिलेले संशोधक, जयकर ग्रंथालयाचे माजी गंथ्रपाल डॉ. शां. ग. महाजन मंगळवारी (९ ऑक्टोबर) ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. संशोधनाद्वारे विपुल ग्रंथसंपदा निर्माण केलेल्या डॉ. महाजन यांचे लेखनकार्य अद्याप सुरूच आहे.

बसस्टॉपवर लावणार वेळापत्रकाचे बोर्ड

$
0
0
शहर, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील पीएमपीच्या चार हजार बसस्टॉपवर बसमार्गांची माहिती आणि वेळापत्रक दर्शविणारे बोर्ड लवकरच लावण्यात येणार आहेत. आमदार मोहन जोशी यांनी सोमवारी ही माहिती दिली.

साबरमती जेलमधून दिली साक्ष

$
0
0
सागर सहानी या २२ वर्षीय तरुणाचे खंडणीसाठी अपहरण करून त्याचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पुणे जिल्हा कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत रविवारी गुजरातमधील साबरमती जेलमधून एटीएसच्या दोन तत्कालीन अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे साक्ष नोंदविण्यात आली.

कंत्राटदाराबद्दल पिळवणुकीची तक्रार

$
0
0
महापालिकेच्या जकात विभागाच्या कम्प्युटरायझेशनचे काम घेतलेल्या कंत्राटदाराकडून पिळवणूक होत असल्याची तक्रार त्या संस्थेतील ऑपरेटर्सनी केली आहे. महापालिकेकडून अधिक पैसे घेऊन प्रत्यक्षात ऑपरेटरना कमी वेतन देण्यात येत असल्याची तक्रार त्यांनी महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांच्याकडे केली.

‘COP- मेकॅनिकल’च्या शतकपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम

$
0
0
‘कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे’च्या (सीओईपी) मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त येत्या वर्षभरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images