Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सातारा रोडवरील उड्डाणपुलाचा उतार घातक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे- सातारा रोडवरील श्री शंकर महाराज उड्डाणपुलावर दुचाकी, जीप आणि टेम्पोमध्ये झालेल्या विचित्र अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झाला. स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. दुचाकी घसरल्याने दुचाकीस्वार रस्त्याच्याकडेला पडला. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या जीपने दुचाकीला चिरडले; तर जीपच्या पाठीमागून आलेल्या टेम्पोने जीपला जोराची धडक दिली.

सातारा रोडवरील बालाजीनगर आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी श्री शंकर महाराज उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या पुलावर स्वारगेटच्या दिशेने जाताना उतारावर हा अपघात झाला. पाऊस असल्याने दुचाकीस्वार घसरून रस्ताच्याकडेला पडला होता. त्याचवेळी त्याच्या पाठीमागून एक जीप येत होती. जीपचालकाने अपघात वेग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जीपखाली दुचाकी सापडली.

हा अपघात उड्डाणपुलाच्या उतारावर झाला असल्याने वाहनांना वेग होता. जीप पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने जीपला पाठीमागून जोराची धडक दिली. कॅश घेऊन जाणाऱ्या या जीपच्या पाठीमागील दरवाज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उड्डाणपुलावरील एक लेन बंद पडल्याने काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र, सहकारनगर पोलिसांनी लगेचच वाहने बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली. या उड्डाणपुलाचा उतार हा यशवंतराव चव्हाण कमानीसमोरील चौकापर्यंत आलेला आहे. त्यामुळे पुलावरून येणारी वाहने या चौकात वेगात येतात. या उड्डाण पुलावरील वाहतूक सुरू केल्यानंतर या चौकातील किरकोळ अपघातांमध्ये वाढ झाली आहे.

उड्डाणपुलामुळे सातारारोडवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र, स्वारगेटच्या दिशेने पुलाचा उतार हा चौकात येत असल्याने त्या ठिकाणी किरकोळ अपघात झाले आहेत. महापालिकेने आता स्पीडब्रेकर टाकत पुलावरून येणाऱ्या वाहनांचा वेग नियंत्रित केला आहे. मात्र, भविष्यात या ठिकाणी खबरदारी घ्यावी लागेल. उड्डाणपुलावर झालेला हा अपघात उतारावर झाला आहे.

- नंदकिशोर कव्हेळे, पोलिस कर्मचारी, सहकारनगर पोलिस ठाणे

या उड्डाणपुलाचा फायदा हा भारती विद्यापीठ, कात्रजकडे जाणाऱ्या तसेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना झाला आहे. स्वारगेटच्या दिशेने जाणारी वाहने उड्डाणपुलावरून वेगात येत असल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. यशवंतराव चव्हाण कमानीसमोर हा पूल संपवण्यात आला आहे. या पुलाचा शेवट आणखी पुढे करण्यात आला असता तर त्याचा अधिक फायदा झाला असता.

- गौरव घोरपडे, नागरिक, बालाजीनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेची जागा खासगी बिल्डरला देण्याचा घाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेने स्वतःच एसआरए प्रकल्प राबविण्याबाबत घेतलेल्या निर्णयाकडे पाठ फिरवून कोथरूड येथील ११७ गुंठ्यांपाठोपाठ महापालिकेच्या मालकीची शुक्रवार पेठेतील २९ गुंठे जागा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी (एसआरए) खासगी बिल्डरला देण्याचा घाट नगरसेवकांनी घातला आहे. सर्वसाधारण सभेच्या निर्णयाचा फेरविचार करून खासगी बिल्डरला या जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तो मान्य झाल्यास कोट्यवधी रुपयांच्या जागेवर पाणी सोडण्याची वेळ पालिकेवर येणार आहे.

उद्या (गुरुवारी) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मान्यतेसाठी येणार आहे. शुक्रवार पेठेतील हिराबाग चौकात सिटी सर्व्हे नं १०७७ येथील भूखंड क्रमांक ४७ अ ही २८ हजार ७३० चौरसफूट पालिकेच्या मालकीच्या जागेवर झोपडपट्टी झाल्याने पुनर्वसन प्रकल्प राबविण्यासाठी संजीवनी शेल्टर यांनी एसआरएकडे प्रस्ताव दाखल केला. तसेच, कोथरूड भागात श्रावणधारा वसाहत येथील टीडीआर देऊन पालिकेने ताब्यात घेतलेल्या एक लाख ६० हजार चौरसफूट जागेवर एसआरए प्रकल्प राबविण्यासाठी किर्तिवर्धन डेव्हलपर्स यांनी प्रस्ताव दिला होता. या दोन्ही जागांबाबत ना हरकत प्रमाणपत्र मिळावे, असा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत आणला होता. या जागा दिल्यानंतर बिल्डरने प्रकल्प उभारण्यासाठी भरलेल्या २५ टक्के रकमेपैकी ९० टक्के म्हाडाला; तर उर्वरित १० टक्के रक्कम एसआरएला मिळणार आहे. मालकीच्या जागा असूनही पालिकेला यामधून काहीही रक्कम मिळणार नाही. उलट या प्रकल्पांसाठी टीडीआर द्यावा लागणार असल्याने पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्यासाठी काँग्रेसचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कांद्याचे गगनाला भिडलेले भाव, डाळींचे वाढलेले दर तसेच जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मंडई येथील टिळक पुतळ्याजवळ मंगळवारी आंदोलन करण्यात आले. मोदी व फडणवीस सरकार यांच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरवाढीचा फटका बसत आहे. त्यामुळे सत्तेत बसलेल्या भाजपच्या नेत्यांना सर्वसामान्य नागरिकांनी जागा दाखवावी, असे आवाहन करीत शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांनी सरकारवर टीका केली. याप्रसंगी पालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, रोहित टिळक, संजय बालगुडे , नीता रजपूत, बाळासाहेब मारणे, बाळासाहेब दाभेकर, सुधीर काळे, नगरसेवक मिलिंद काची आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्या शहराच्या पूर्व भागात पाणी बंद

$
0
0

पुणेः येत्या गुरुवारी (२७ ऑगस्ट) महावितरणच्या रावेत येथील केंद्रात विद्युतविषयक तातडीची कामे करण्यात येणार असल्याने शहराच्या पूर्व भागांतील काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महावितरणच्या दुरुस्तीविषयक कामांमुळे दुपारी एक ते सायंकाळी पेच या वेळेत पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. सायंकाळी पाचनंतर उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल, असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणेः कळस, धानोरी, विश्रांतवाडी, संजय पार्क, टिंगरेनगर, लोहगाव, खराडी, विमाननगर, चंदननगर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक लाख १४ हजार बोगस मतदार वगळले

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या मतदारयादीतील एक लाख १४ हजार 'बोगस' मतदारांच्या नावावर अखेरची फुली मारण्यात आली असून, यामध्ये प्रामुख्याने दुबार व स्थलांतरित मतदारांचा समावेश आहे. ही नावे मतदारयादीतून वगळल्यामुळे त्यांना आता मतदानाचा हक्क राहणार नाही.

यादीमधून नाव वगळलेल्या या मतदारांना काही आक्षेप असल्यास एक ते ३१ ऑक्टोबरदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हरकत नोंदविता येणार आहे. या काळात हरकती आल्यावर त्यावर सुनावणी घेऊन पुरावे तपासल्यानंतर संबंधितांचे नाव पुन्हा मतदारयादीत नोंदविले जाणार आहे.

पुणे शहर व जिल्ह्याची मतदारयादी बोगस मतदारांच्या नावांमुळे फुगली असल्यावर 'मटा'ने सातत्याने प्रकाश टाकला आहे. फुगलेल्या मतदारयादीमुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होत असल्याचेही दिसून आले आहे. 'मटा'च्या वृत्तांची दखल घेऊन निवडणूक आयोगाने बोगस मतदारांचा शोध घेऊन मतदारयादी अद्ययावत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा निवडणूक प्रशासनाने बोगस मतदारांची नावे वगळण्याची कारवाई सुरू केली आहे.

मतदारयादीत साधारणतः पावणेपाच लाख बोगस नावे असण्याची शक्यता आहे. या नावांची खात्री करण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने संबंधित मतदारांना नोटीस पाठविली; तसेच बीएलओंमार्फत घरोघरी सर्वेक्षणही करण्यात आले. या नोटिसा बजावल्यानंतर निवडणूक प्रशासनाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या नावांवर फुली मारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एक लाख १४ हजार बोगस मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यात भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक ४० हजार मतदारांचा समावेश असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकार-गोकुळे यांनी दिली.



'नावाची खात्री करा'

मतदारयादीतील बोगस नावे कमी करण्याचे काम २५ सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार आहेत. नाव वगळल्यानंतर एक ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांनी आपल्या नावाची खात्री करावी आणि नाव वगळले असल्यास एक ते ३१ ऑक्टोबरदरम्यान त्यावर हरकत नोंदवावी, असेही उपजिल्हा निवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकार-गोकुळे यांनी आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

FTII च्या संपात फूट?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (एफटीआयआय) सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या संपात फूट पडली आहे. संस्थेतील टेलिव्हिजन विभागाचे प्राध्यापक व काही विद्यार्थ्यांचा संपाला पाठिंबा नसल्याची चर्चा आहे. मात्र, संपकरी विद्यार्थ्यांच्या दडपणामुळे संपाविरोधात बोलण्यास कोणी धजावत नाही.

गेल्या ७५ दिवसांपासून एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांचा संप सुरू आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाची त्रिसदस्यीय समितीने संस्थेला भेट देऊन या संपाचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान समितीने संपकरी विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला होता. या दरम्यान, टीव्ही विभागाच्या प्राध्यापकांनी समितीची स्वतंत्रपणे भेट घेतल्याची माहिती संस्थेतील सूत्रांनी 'मटा'ला दिली. संपकरी विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी फिल्म विभागाचेच आहेत.

संस्थेत असलेल्या बॅकलॉग, डिप्लोमा फिल्म मूल्यमापनासारख्या अडचणी या फिल्म विभागाच्या आहेत. त्याचा टीव्ही विभागाशी काहीही संबंध नाही. टीव्ही विभागात एकही बॅगलॉग नाही. विद्यार्थी वेळेतच अभ्यासक्रम पूर्ण करतात. सगळ्याच बाबींची वेळेवर पूर्तता होत असल्याचे विभागात काहीच अडचण नाही. विद्यार्थ्यांच्या आठमुठ्या संपाला टीव्ही विभागाचा विरोध असल्याचे प्राध्यापकांनी या समितीला स्पष्टपणे सांगितले असल्याचेही सूत्रांनी सांगितले. टीव्ही विभागातील प्राध्यापकांसह काही विद्यार्थीही संपाच्या विरोधात आहेत. मात्र, संपकरी विद्यार्थ्यांच्या दडपणामुळे त्याबाबत बोलण्यासाठी कोणीच पुढे येत नाही, असे टीव्ही विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. याबाबत जाणून घेण्यासाठी टीव्ही विभागाच्या प्राध्यापकांशी संवाद साधला असता, त्यांनी त्याबाबत बोलण्यास असमर्थता दर्शवली.

ऑस्करची प्रक्रिया सुरू नाही

ऑस्करसाठी भारतीय चित्रपटाची निवडणाऱ्या समितीच्या अध्यक्षपदी पालेकर यांची निवड करण्यात आली. माध्यमांनी त्यांना विचारले असता, अद्याप ऑस्करसाठी चित्रपट निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 'ऑस्करसाठी दर वर्षीच समिती निवडली जाते. भारतीय क्रिकेट संघाची निवड करणाऱ्या समितीसारखीच ही समिती असते. त्यात काही विशेष नाही. त्या समितीला भारतीय संघ किती मॅच जिंकेल हे सांगता येत नाही; तसेच ऑस्करसाठी कोणता चित्रपट निवडला जाणार हेही सांगता येत नाही,' असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा दहा रुपयांनी स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इजिप्तहून आयात केलेला कांदा मुंबईच्या बाजारात दाखल झाला असून साठेबाजीतील कांद्याची देखील बाजारात येऊ लागल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. मार्केट यार्डातील दोन दिवसांत आवक वाढल्याने कांद्याच्या दरात किलोमागे १० ते १२ रुपयांनी घट झाल्याने कांदा स्वस्त झाला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कांदा किलोसाठी ५० ते ५५ रुपये दर झाला असला तरी किरकोळ विक्रेते मात्र चढ्या दरानेच विक्री करीत असल्याचे दिसून आले.

'मार्केट यार्डात मंगळवारी ३० ट्रक कांद्याची आवक झाली. काल शंभराहून अधिक ट्रक कांद्याची आवक झाली होती. त्यामुळे मार्केट यार्डात आवक वाढली. परिणामी, घाऊक बाजारात कांद्याचे किलोमागे मंगळवारी ५० ते ५५ रुपये असे दर निघाले. घाऊक बाजारात ६५ ते ७० रुपये किलो दराने रविवारी विक्री सुरू होती. दरात घसरण झाल्याने १० ते १२ रुपयांनी कांदा किलोमागे स्वस्त झाला आहे,' अशी माहिती कांद्याचे व्यापारी विलास रायकर यांनी दिली.

कांद्याची आवक वाढल्याने दर उतरले आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात क्विंटलसाठी ५००ते ५६० रुपये दर झाला आहे. नाशिक येथील साठेबाजांवर कारवाई करण्यात आली. तेथील कांदा स्थानिक बाजारपेठेत आला असला तरी अद्याप पुण्याच्या बाजारात आला नाही. कर्नाटकामधून लाल कांद्याची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी कांद्याला ६०० ते ६५० रुपये क्विंटलमागे दर मिळाला होता. दर खाली आले असले तरी किरकोळ विक्रेते मात्र कांदा ७० ते ७५ रुपये किलो दराने कांदा विक्री करीत आहेत, असे कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.

साठेबाजांवरील कारवाईने कांदा बाजारात येऊ लागला आहे. त्याशिवाय कर्नाटकाहून नवीन कांदा बाजारात येत असल्याने आवकही वाढत आहे. आवक वाढल्यामुळेच दर खाली आले आहेत. त्यामुळे कांद्याला किलोमागे ५० ते ५५ रुपये दर मिळाल्याने १०ते १२ रुपयांनी कांदा स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. येत्या दोन दिवसांत इजिप्तचा कांदाही बाजारात आल्यास त्यामुळे आणखी दर खाली येतील.

- विलास भुजबळ, व्यापारी मार्केट यार्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याच्या नासाडीवर निर्बंध

$
0
0

बांधकामे, स्विमिंग टँक, वॉशिंग सेंटरवर कारवाई होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा घटल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी बुधवारपासून शहरातील बांधकामे, स्विमिंग टँक आणि गाड्या धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरण्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शहरात पिण्याचे पाणी नक्क‌ी कशासाठी वापरतात याचा सर्वेक्षण करून चुकीच्या कामासाठी हे पाणी वापरले जात असल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करून प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मंगळवारी पालिका प्रशासनाला दिले.

पावसाने मारलेल्या दडीमुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. पुढील काही दिवस पाऊस न पडण्याची‌ शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी अधिकाधिक दिवस कसे पुरविता येईल, याचे नियोजन करण्यासाठी महपौर धनकवडे यांनी पालिकेतील सर्वपक्षांचे गटनेते, पालिका आयुक्त, अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत पाणी बचतीच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली. सुरुवातीच्या काळात वॉशिंग सेंटर, स्विमिंग टँक तसेच बांधकामासाठी सुरू असलेला पिण्याचा पाण्याचा वापर तातडीने थांबवावा, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

पालिका प्रशासनाने शहरातील विविध भागात भेटी देऊन पिण्याच्या पाण्याचा वापर नक्की कशासाठी केला जातो, याची पाहणी करावी. चुकीच्या कामासाठी पाण्याचा वापर होत असेल तर नळ कनेक्शन तोडून संबधितांवर दंडात्मक कारवाइ करावी. वेळ पडल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश धनकवडे यांनी दिले. महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पाणीपुरवठा विभाग प्रमुख व्ही.जी कुलकर्णी, विरोधीपक्षनेते अरविंद शिंदे, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, मनसेचे गटनेते बाबू वागसकर, यांच्यासह महापालिकेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

निर्णयामुळे पाणी बचत होणार

महापौरांनी दिलेल्या आदेशानुसार बुधवारपासून क्षेत्रीय कार्यालय तसेच पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून शहरात सुरू असलेली बांधकामे, स्विमिंग टँक, वॉशिंग सेंटर याची तपासणी सुरू केली जाणार आहे. या कामांसाठी पाण्याचा वापर होत असल्यास त्यावर कारवाइ करून नळ कनेक्शन तोडण्यात येणार आहेत. शहरात दर वर्षी सर्वसाधारण चार हजार नवीन बांधकामांना परवानगी दिली जाते. तर शहरात सुमारे ३०० स्विमिंग टँक असल्याने पालिकेच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बचत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्वच्छ’च्या कर्मचाऱ्यांना ५० रुपये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या 'स्वच्छ' संस्थेच्या कर्मचाऱ्यांना प्रति घर तीस रुपयांऐवजी पन्नास रुपये देण्याच्या प्रस्तावाला पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी मंजुरी देण्यात आली. सर्वसाधारण सभेने दिलेल्या मंजुरीमुळे पुणेकरांना प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून पालिकेला देत असलेल्या स्वच्छता कराव्यतिरिक्त वर्षाला वाढीव ६०० रुपये मोजावे लागणार आहेत, तर कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी स्वच्छ संस्थेला तीन कोटी रुपये पालिकेला मोजावे लागणार आहेत. दर वर्षी या शुल्कात पाच रुपये वाढ केली जाणार असून, पुढील पाच वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे.

शहरात 'स्वच्छ'च्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम केले जाते. दारोदारी जाऊन कचरा गोळा करण्याच्या बदल्यात प्रत्येक घरामागे तीस रुपये घेण्याचा करार या पूर्वी पालिकेने 'स्वच्छ'बरोबर केला होता. २०१३ मध्ये करार संपल्यानंतर गेले दोन वर्षे मुदतवाढ देण्याबाबत चर्चा सुरू होती. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शक्य होत नसल्याने 'स्वच्छ'ची मदत घेतली जाते.

पुन्हा या संस्थेबरोबर पाच वर्षांचा करार करण्याचा प्रस्ताव स्थायी समि‌तीने मान्य केला होता. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सोमवारी सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता.

शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कचरावेचक घरोघरी जाऊन कचरा गोळा करतात. त्यामुळे कचरावेचकांना प्रत्येक घरामागे तीस रुपयांऐवजी पन्नास रुपये घेण्याची मान्यता देण्यात आली, तर झोपडपट्टी भागात प्रति झोपडीमागे दरमहा ३० रुपये वसूल केले जाणार असून, पालिकेच्या वतीने प्रत्येक झोपडीमागे कचरावेचकाला १० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांचा कचरा गोळा करण्यासाठी महिन्याला १०० रुपये घेण्यासही सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. कचरावेचक आणि महापालिका यांच्यात समन्वय साधून कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे काम स्वच्छ संस्थेला देण्यात आले असून, प्रत्येक वर्षी या संस्थेला तीन कोटी रुपये शुल्क देऊन पाच वर्षांसाठी १८ कोटी रुपये देण्यास मान्यता देण्यात आली.

विरोध नसल्याने प्रस्ताव मान्य

स्वच्छ संस्थेचे कचरा गोळा करणारे सेवक मनमानी कारभार करतात, त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नसते. अनेकदा नागरिकांना वेठीस धरून या कामगारांकडून जादा शुल्क घेतले जाते. कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी काम दिलेली स्वच्छ संस्था कर्मचारी; तसेच पालिकेकडून कोट्यवधी रुपये घेणार आहे. ही उधळपट्टी करू नये, अशा भावना सभागृहात सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी व्यक्त करत हा करार करू नये, अशी भूमिका मांडली. मात्र, प्रत्यक्षात या प्रस्त‌ावावर कोणत्याही सभासदाने एकही उपसूचना न देता विरोध न केल्याने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात घरफोडी करणाऱ्यांचा उच्छाद

$
0
0

पुणे : शहरामध्ये सोनसाखळी चोरट्यांसोबतच आता घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनीही उच्छाद मांडला आहे. गेल्या चोवीस तासांत शहराच्या विविध भागांमध्ये सहा घरफोड्या झाल्या आहेत. यामध्ये पंधरा लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कसबा पेठ, चंदननगर, सहकारनगर, पिंपरी, आणि भोसरी एमआयडीसी परिसरात या घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. कसबा पेठ येथे झालेल्या घरफोडीत संजय पांडुरंग जाधव (वय ४५) यांच्या घरामधून चोरट्यांनी दहा ते बारा तोळे सोने आणि एक लाख रुपयांची रोकड लंपास केली, तर चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नंदन सोसायटीच्या मागे असलेल्या साळुंखे हॉस्पिटलसमोरील विल्स अपार्टमेंटमधील सदनिका चोरट्यांनी फोडली आहे. या ठिकाणाहून चोरट्यांनी बारा तोळे सोन्यासह आठ हजारांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यात लिंबराज बळीराम वाकळे (वय ३७, रा. विघ्नहर्ता सोसायटी, मोहननगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्याची आत्महत्या

$
0
0

पुणे : रुबी हॉल रुग्णालयातील कर्मचाऱ्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयात चोरीचा खोटा आरोप केल्यामुळेच आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

मोहन प्रकाश सोनवणे (वय ३५, रा. ताडीवाला रोड) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन रुबी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो दडपणाखाली होता. मंगळवारी पहाटे त्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. रुग्णालयातील कामगार संघटनेच्या एका सदस्याचे दोन लाख रुपये लॉकरमधून गहाळ झाले होते. ते मोहननेच चोरल्याचा आळ त्यावर आला होता. चौकशीच्या नावाखाली त्याला सतत त्रास दिला जात होता. नंतर हे पैसे मिळाले होते. त्याची माहिती रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली होती. सोमवारी दुपारी मोहन त्याच्या पत्नीला तपासणीसाठी घेऊन आला होता. त्या वेळी सुरक्षारक्षकाने त्याला आतमध्ये न सोडता चोर म्हणून अपमान केला. त्यामुळेच मोहनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्ला करणाऱ्या टेलरला सहा वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भिशीचे पैसे परत मागितल्याच्या कारणावरून तरुणावर खुनी हल्ला करणाऱ्या टेलरला कोर्टाने सहा वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश आर. एच. मोहंमद यांनी हा आदेश दिला. कॅम्प भागातील क्लोव्हर सेंटरमध्ये एप्रिल २०१० मध्ये ही घटना घडली होती.

रमेश जयराम परदेशी (वय २५, रा. जाधव वस्ती, घोरपडी गाव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या घटनेत जखमी मंगेश रामअजोरे परदेशी (वय ३०, रा. घोरपडी गाव) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. कॅम्प भागातील क्लोव्हर सेंटरमध्ये रमेश व मंगेश टेलरिंगचे काम करीत होते. त्यांची टेलरिंगची दुकाने शेजारी-शेजारी होती. या दोघांनी भिशी लावली होती. मंगेशने भिशीसाठी रमेशकडे साडेबारा हजार रुपये दिले होते; पण ते पैसे मंगेशने परत मागितले. सारखे पैसे परत मागतो, म्हणून चिडलेला रमेश १० एप्रिल २०१० ला मंगेश काम करतो त्या दुनाकात आला. दुकानातील कपडे कापण्याच्या कात्रीने त्याने मंगेशवर अकरा वार केले. यामध्ये मंगेश गंभीर जखमी होता. या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून रमेशला अटक केली होती. कोर्टात रमेशवर खटला चालला. त्यात सरकारी वकील सुनील मोरे यांनी दहा साक्षीदार तपासले. दुकानातील कर्मचारी तरुणीची साक्ष महत्वाची ठरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळासाठी आणखी तीन जागा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या नव्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी खेड आणि चाकण या जागांना पर्यायांची चाचपणी आता गतीने सुरू झाली आहे. एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया आणि इंडियन एअरफोर्सने अशा तीन पर्यायी जागांना भेटी देऊन तपासणी केली आहे. येत्या चार दिवसांत या जागांबाबत तांत्रिक अहवाल सादर करण्यात येणार आहे.

पुण्यासाठी नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याबाबत गेली काही वर्षे चर्चा सुरू आहे. प्रारंभी खेड आणि चाकण येथील जागा त्यासाठी निवडण्यात आल्या होत्या. तेथे विमानतळ होऊ शकते, असे अहवालही सादर झाले होते. मात्र, विविध कारणांमुळे त्या प्रस्तावाला ब्रेक लागला. त्यातून मार्ग न निघाल्याने आता राज्य सरकारने पर्यायांचा विचार सुरू केला आहे. खेड आणि चाकण वगळता अशा तीन पर्यायी जागा समोर आल्या असून, एअरपोर्ट अॅथॉरिटी आणि एअरफोर्स यांच्या वतीने तेथे भेटी देऊन पाहणीही करण्यात आली आहे. याबाबतचा तांत्रिक अहवाल येत्या ३० ऑगस्टपर्यंत सादर करण्यात येईल. त्यानंतर या संदर्भात नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक होऊन पुढील पावले टाकण्यात येणार आहेत. नव्या विमानतळासाठी जागा निश्चित करताना काही निकषांचे पालन करावे लागणार आहे. नव्या विमानतळासाठी किमान बाराशे हेक्टर (तीन हजार एकर) जागेची आवश्यकता आहे; तसेच लोहगाव येथील विमानतळाचा रनवे पूर्व-पश्चिम असल्याने नव्या विमानतळाचा रनवेही त्याच दिशेने निश्चित करावा लागणार आहे. त्यासाठी सहा किलोमीटर लांब आणि दोन किलोमीटर रुंद जागेची आवश्यकता असून, त्यापुढे सुमारे वीस किलोमीटर अंतरावर 'टेकऑफ झोन' निश्चित करण्यात येणार आहे. त्या परिसरात उंच अडथळे येणार नाहीत, याचीही खातरजमा करून घेण्यात येणार आहे.

या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून काही जागांची पाहणी करण्यात आली असून, तेथील तपासणीचा अहवाल आल्यानंतर या प्रकल्पाची पुढची पावले टाकण्यात येणार आहेत; तसेच नियोजित जागांमध्ये कमीतकमी लोकवस्ती किंवा गावठाणे असावीत, तसेच बागायती जमिनींचे प्रमाणही कमीतकमी असावे, या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे भूसंपादनही कमीतकमी आणि योग्य मार्गाने होणार असल्याने विमानतळ गतीने उभा राहू शकतो, असे सांगण्यात येत आहे.

पुणे हे गुंतवणुकीचे नवे केंद्र म्हणून उदयास येत आहे. फॉक्सकॉनसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि मोठी गुंतवणूक येथे येत आहे. त्यामुळे येथे स्वतंत्र विमानतळाची गरज असल्याचे राज्य सरकारचेही मत आहे. त्यामुळे पुणे विमानतळाबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत असून, सर्व पर्यायांची तपासणी करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.

- सौरव राव, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात वाळूचा २२ लाख ब्रास साठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्ह्यातील नद्यांमध्ये केवळ दीड लाख ब्रास वाळूसाठा गृहित धरून त्याचे लिलाव केले जात होते. पण हा साठा दीड लाख नव्हे, तर तब्बल २२ लाख ब्रास असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे यापूर्वी किती वाळू बेकायदेशीर उपसली जात होती, हे स्पष्ट झाले आहे.

जिल्हाधिकारी सौरव राव यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. पुणे शहरात दर वर्षी साधारणतः किती वाळू लागते, याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात शहरात २८ ते ३० लाख ब्रास वाळूची गरज भासते, असे दिसून दिले. ही वाळू नेमकी कोठून येते याचाही तपास करण्यात आला. त्यात पुणे जिल्ह्याशिवाय सातारा, सांगली, सोलापूरमधून वाळू आणली जाते. पण त्याचे प्रमाण तुलनेने फारच कमी असल्याचे निदर्शनास आले. उर्वरित वाळू ही पुण्यातील नद्यांमधीलच असल्याने त्या दृष्टीने माहिती घेण्यात आली.

नद्यांमधील वाळू साठ्यांची इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशनद्वारे (ईटीएस) मोजणी करण्यात आली. त्यात वाळूचे साठे अधिक असल्याचे लक्षात आले. यापूर्वी वाळू ठिकाणांमध्ये दीड लाख ब्रास वाळू असल्याची माहिती कळविली जात होती व त्याआधारे लिलाव केले जात होते. ईटीएस मशिनने मोजणी केल्यावर हा साठा वीस पट अधिक म्हणजे २२ लाख ब्रास आसपास असल्याचे दिसून आले, असेही राव यांनी सांगितले.

या वाळूच्या साठ्यांची माहिती राज्य सरकारला कळविण्यात आली आहे. तसेच पर्यावरणाची ना हरकत गेण्याबाबतही प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. हे वाळूसाठे वाढल्याने महसुली उत्पन्नातही फरक पडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बेकायदा वाळू वाहतुकीवर कडक कारवाई करण्यात येणार असून या वाहनांवरील दंडाच्या रकमेतही सुसूत्रता आणण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाच पट म्हणजे किमान ५५ हजार रुपये दंड करण्यात येत आहे; तसेच बेकायदा वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात येत आहे. या जप्त केलेल्या वाहनांची विल्हेवाट लावण्याचे अधिकार संबंधित प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी राव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृत्रिम पावसाने दुष्काळावर मात अशक्य’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुष्काळावर मात करण्यासाठी पुण्यासह राज्याच्या विविध भागांत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे, मात्र या प्रयोगाबाबत हवामानतज्ज्ञांनी शंका व्यक्त केल्या आहेत. छोट्या प्रमाणावर असे प्रयोग करून दुष्काळावर मात करता येणार नाही, असे मत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. रंजन केळकर यांनी सोमवारी व्यक्त केले.

राज्याच्या विविध भागांत यंदा दुष्काळाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचेही सरकारने ठरविले आहे. पुणे शहर, जिल्हा व परिसरात असा प्रयोग करण्यात येईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी नुकतेच जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामानशास्त्रज्ञांनी या प्रयोगाबाबत साशंकता व्यक्त केली आहे. कृत्रिम पावसाचे विज्ञान प्राथमिक असून ढगांमधील बाष्पाचे द्रवीभवन वाढविण्यासाठी त्याला केंद्रक पुरविण्याचे हे तंत्र आहे. मात्र, ते प्रायोगिक स्तरावर असून मान्यता पावलेले विज्ञान नाही, त्यामुळे हे प्रयोग नेहमीच यशस्वी होतील, याची खात्री देता येत नाही, असे डॉ. केळकर यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालापामध्ये सांगितले.

कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी योग्य ढग असणे, ही महत्त्वाची गरज आहे. परंतु, प्रत्येक वेळी हा प्रयोग करण्यायोग्य ढग असतीलच, याची शाश्वती देता येत नाही, असे ते म्हणाले. छोट्या प्रमाणावर असा प्रयोग करून भयंकर अशा दुष्काळावर मात करता येणार नाही, असे मत डॉ. केळकर यांनी व्यक्त केले. तसेच मोठ्या प्रमाणात असे प्रयोग करायचे झाल्यास त्यांच्या नैतिक, राजकीय आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

एखाद्या गावात असा प्रयोग केला, तर आसपासच्या गावांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो, तसेच एखाद्या राज्यात किंवा देशात प्रयोग केला, तर अन्य प्रश्न उपस्थित होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. यापूर्वीही राज्यात असे प्रयोग करण्यात आले होते, मात्र त्याला यश मिळाल्याचे समोर आलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर यंदा अशा प्रयोगास यश येण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली आहे.

ढगांमधील बाष्पाचे द्रवीभवन वाढविण्यासाठी त्याला केंद्रक पुरविण्याचे हे तंत्र आहे. मात्र, ते प्रायोगिक स्तरावर असून मान्यता पावलेले विज्ञान नाही, त्यामुळे हे प्रयोग नेहमीच यशस्वी होतील, याची खात्री देता येत नाही.

- डॉ. रंजन केळकर, हवामानतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिला डॉक्टर, कर्मचाऱ्यांना अखेर प्रसूती रजा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारकडून निधीच न आल्याचे कारण पुढे करीत सरकारी महिला डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा नाकारण्याचा आदेश काढणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाने (एनआरएचएम) अखेर माघार घेतली. प्रसूतीसाठी महिलांना रजा मंजूर करण्याचे आदेश अभियानाने अखेर जारी केले असल्याने त्याबाबत महिला डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

या संदर्भात 'एनआरएचएम'ने प्रसूती रजा मंजूर करण्याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. २०१५-१६ या वर्षाचा वार्षिक प्रकल्प अंमलबजावणी आराखडा केंद्र सरकारकडून मंजूर झाला आहे. त्यामुळे पूर्वी काढलेल्या परिपत्रकानुसार २० जून रोजी 'एनआरएचएम'मधील सरकारी कंत्राटी तत्त्वावरील महिला डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना ९० दिवस पूर्ण मानधन रजेस तात्परत्या स्वरूपात स्थगिती उठविण्यात येत असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा देता येणार नसल्याबाबत आयुक्त आय. ए. कुंदन यांनी आदेश काढले होते. हा आदेश एक एप्रिलपासून लागू करण्यात आला होता. आयुक्तांच्या आदेशाची जिल्हा हॉस्पिटलमध्ये अंमलबजावणी करण्यात आली. आदेशापूर्वीच रजेवर गेलेल्या महिलांनादेखील रजा नामंजूर करण्यात आल्याचे हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. या प्रकारामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच प्रसूतीच्या रजेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांनाही रजा मंजूर करण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी बजावले होते. त्यामुळे रजेवर जायचे की नाही याबाबत महिला कर्मचारी, डॉक्टरांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात 'मटा'ने वृत्त प्रसिद्ध केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगची बाके रिकामीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशभरात यंदा इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या सुमारे पावणेसात लाख जागा रिक्त राहण्याचा अंदाज आहे. कमी झालेल्या रोजगार संधी आणि जागांमध्ये गरजेपेक्षा जास्त झालेली वाढ यामुळे रिक्त जागांची डोकेदुखी वाढत आहे. देशभरात यंदा इंजिनीअरिंगच्या सुमारे १६ लाख ८० हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. देशभरातील जवळपास सर्व प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आजघडीला यातील ४० टक्के जागा रिक्त असल्याची माहिती अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी 'मटा'ला दिली.

'देशभरात गेल्या काही वर्षांत इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या जागांत भरमसाठ वाढ झाली आहे. ही वाढ काही ठिकाणी गरजेपेक्षाही जास्त आहे. काही ठिकाणी सायन्स शाखेतून (पीसीएम ग्रुप घेऊन) बारावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंजिनीअरिंगच्या उपलब्ध जागांच्या संख्येपेक्षाही कमी आहे. त्यात सर्वच जण इंजिनीअरिंगला जात नाहीत. साहजिकच इंजिनीअरिंगच्या जागा रिक्त राहत आहेत. त्याचप्रमाणे इंजिनीअरिंग शाखेसाठी उपलब्ध रोजगारसंधीही अलीकडच्या काळात कमी झाल्याने त्याचाही परिणाम जाणवतो आहे,' असे त्यांनी नमूद केले. मॅनेजमेंट अभ्यासक्रमांचीही जवळपास अशीच गत असून, या अभ्यासक्रमांच्याही सुमारे ४० टक्के जागा यंदा रिक्त राहतील, असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

नव्या संस्था आणि नव्या अभ्यासक्रमांची मान्यता प्रक्रिया 'एआयसीटीई' अधिक सुलभ करत असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, 'सध्याची जी प्रक्रिया आहे, त्यामध्ये ऑनलाइन अर्ज भरण्यात कोणत्या समस्या येतात, 'एआयसीटीई'च्या निकषांची माहिती समजून घेण्याबाबत येणाऱ्या अडचणी, मान्यता प्रक्रियेत अपेक्षित बदल आदी बाबींसंदर्भात संस्थांनी सूचना द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.' 'या सूचनांचा सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाच्या मान्यता प्रक्रियेमध्ये विचार करण्यात येईल,' असे सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉइश-विद्यार्थ्यांची वाढती चॉइस!

$
0
0

सिद्धार्थ केळकर, पुणे

उच्च शिक्षणासाठी जर्मनीचा पर्याय शोधणाऱ्या पुणेकर विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यंदा पुण्यातून दीडशेहून अधिक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जर्मनीला जात असून, जर्मनीतील उच्च शिक्षण संधींविषयी यंदा सहा हजार ७८८ विद्यार्थ्यांनी प्राथमिक चौकशी केल्याची नोंद झाली आहे.

'जर्मन अॅकॅडमिक एक्स्चेंज सर्व्हिस' अर्थात 'डाड' या जर्मनीच्या शिक्षण विभागाच्या संस्थेतर्फे जर्मनीतील उच्च शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले जाते. या संस्थेचे पुण्यातही माहिती केंद्र असून, संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत जर्मनीला उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या पुणेकर विद्यार्थ्यांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढते आहे.

'पुण्यामध्ये सात वर्षांपूर्वी 'डाड'चे माहिती केंद्र सुरू झाले. विद्यार्थ्यांना जर्मनीतील विविध शिक्षणसंधींची माहिती या माध्यमातून दिली जाते. केंद्रामध्ये प्रत्यक्ष येऊन; तसेच ई-मेलद्वारे अनेक विद्यार्थी जर्मनीतील विविध अभ्यासक्रमांची चौकशी करतात. पुण्यातील अनेक विद्यार्थी सध्या परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी उत्सुक आहेत. जर्मनी हेही त्यातील एक 'डेस्टिनेशन' आहे. यंदा सह हजार ७८८ विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांबाबत चौकशी केली आहे,' अशी माहिती 'डाड'च्या पुणे केंद्राच्या माहिती अधिकारी गिरीजा जोशी यांनी दिली.

'डाड'ने दिलेल्या आकडेवारीनुसार, 'सन २०११मध्ये पुण्यातून ४० विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेले. टप्प्याटप्प्याने ही संख्या वाढत जाऊन यंदा १५५ विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी जर्मनीला जात आहेत.' ही आकडेवारी 'डाड'कडे प्री-डिपार्चर सत्रासाठी झालेल्या नोंदीनुसार असल्याने, या सत्राला न आलेल्या किंवा येऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, एकूण विद्यार्थीसंख्या यापेक्षाही अधिक असू शकते, असेही 'डाड'ने स्पष्ट केले आहे.

९६१९ विद्यार्थ्यांचे डेस्टिनेशन जर्मनी

उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या जर्मनीला जाणाऱ्या एकूण भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली असून, सन २००८ ते २०१४ या कालावधीत तब्बल १७३.६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. सन २००८-०९ या शैक्षणिक वर्षात ३५१६ भारतीय विद्यार्थी जर्मनीला गेले, तर सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात ही संख्या ९६१९वर पोहोचली आहे. जर्मनीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांनाच सर्वाधिक पसंती असल्याचे निरीक्षण 'डाड'ने नोंदवले आहे. इंग्रजी भाषेत उपलब्ध होऊ लागलेले अभ्यासक्रम, सरकारी संस्थांत शैक्षणिक फी माफ, शिक्षण संपल्यावर नोकरी शोधण्यासाठी थांबण्याची मुभा देणारी ब्लू कार्ड योजना, करिअरच्या संधी आदी कारणांमुळे विद्यार्थ्यांचा जर्मनीकडे ओढा वाढत आहे.

'मी सन २०१२ मध्ये प्रॉडक्शन इंजिनीअरिंग केले आणि नंतर दोन वर्षे नोकरी केली. मी जर्मन भाषा शिकलेलो असल्याने जर्मनीविषयी आकर्षण होते. त्यामुळे मी मास्टर्स इन मटेरियल सायन्स अँड इंजिनीअरिंग हा कोर्स करण्यासाठी जर्मनीतील किल विद्यापीठाची निवड केली. माझा कोर्स इंग्रजीमध्ये आहे. त्याचप्रमाणे ट्यूशन फी माफ असल्याने येणारा खर्च (सुमारे १५ लाख रुपये) अमेरिकेच्या तुलनेत (सुमारे सुमारे ४५ लाख रुपये) खूपच कमी आहे. माझ्या विद्यापीठात १७ भारतीय विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, मी सप्टेंबर अखेरीस जर्मनीत जाणार आहे.'

- राजस गोलटकर, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलन मॉरिशसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीने दर वर्षी आयोजित करण्यात येणारे 'स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व साहित्य संमेलन' यंदा मॉरिशस येथे ५ सप्टेबर रोजी भरणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांची तर स्वागताध्यक्षपदी मॉरिशसचे सांस्कृतिक मंत्री सांताराम बाबू यांची निवड झाली आहे. अंदमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विश्व साहित्य संमेलन शिवसंघ प्रतिष्ठानच्या मदतीने आयोजित करण्याची चर्चा फिस्कटल्यानंतर हे संमेलन मॉरिशस येथे होत आहे. दरम्यान याच काळात अंदमान येथे विश्व साहित्य संमेलन रंगणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण माजी संमेलनाध्यक्ष व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते बुधवारी झाले. या संमेलनाबाबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश गायकवाड यांनी पत्रकारांना सांगितले, 'यापूर्वी अंदमान, कोलंबो, काठमांडू व थायलंड या ठिकाणी संमेलने झाली असून, यंदाच्या संमेलनाचे पाचवे वर्ष आहे. ४०० जणांनी नोंदणी केली असून एक हजार सावरकर प्रेमी या संमेलनाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.'

सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून, त्यानंतर उद‍्घाटन सोहळा होणार आहे. डॉ. भास्कर गिरीधरी, डॉ. प्रभाकर शिरपूरकर, प्रा. सतीश पोरे, आशा टकले व संध्या गर्गे यांची 'सावरकरांच्या साहित्य' यावर भाषणे होणार आहेत. 'मराठी साहित्यातील राष्ट्रभक्तीचा स्फुल्लिंग आणि सावरकरांचे साहित्य' या विषयावर परिसंवाद होणार असून त्यामध्ये कलावती सुर्वे, प्रसाद पिंपळखरे, सुनंदा आपटे व केशव वझे सहभागी होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर संमेलनाचा समारोप होईल.

स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व साहित्य संमेलन अंदमान, कोलंबो, काठमांडू व थायलंड या ठिकाणी संमेलने झाली असून, यंदाच्या संमेलनाचे पाचवे वर्ष आहे. ४०० जणांनी नोंदणी केली असून एक हजार सावरकर प्रेमी या संमेलनाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.'

- नीलेश गायकवाड, अध्यक्ष, शिवसंघ प्रतिष्ठान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनामधील बळीच्या कुटुंबाला आधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कुटुंबातील एकमेव कमावता असलेल्या व्यक्तीचा खून झाला अन् कुटुंब रस्त्यावर आले. आई, पत्नी व दोन मुले या चौघांचा आधार संपल्याने त्यांच्यापुढे अंधार निर्माण झाला. मुलांचे शिक्षण व इतर गोष्टी कशा भागवाव्यात, असा प्रश्न खून झालेल्या व्यक्तीच्या पत्नीला पडला. पण, केंद्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या 'बळी पडलेल्या व्यक्तीच्या नुकसानभरपाई योजने'मुळे (व्हिक्टीम कॉम्पेन्सेशन स्कीम) पेंटरच्या कुटुंबीयांच्या आयुष्यात मिणमिणता प्रकाश पेटला आहे. या योजनेअंतर्गत या कुटुंबाला दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. या कायद्यांतर्गत नुकसानभरपाई मिळालेला राज्यातील हा पहिला दावा ठरला.

बोपोडीतील सुनीता प्रकाश सूर्यवंशी (रा. बोपोडी) यांनी नुकसानभरपाई मिळण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज केला होता. सुनीता यांचे पती प्रकाश मच्छिंद्र सूर्यवंशी (वय ३६, रा. बोपोडी) यांचा १८ मे २०१४ रोजी बोपोडी रेल्वेस्थानकाजवळ डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून याचा खटला सत्र न्यायालयात सुरू आहे.

प्रकाश हे पेंटर म्हणून काम करीत होते. त्यांचा खून झाल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले. त्यांच्यामागे आई, पत्नी एक मुलगा व मुलगी आहे. या योजनेअंतर्गत चौघांच्या नावाने नुकसानभरपाई मिळावी म्हणून अर्ज करण्यात आला. त्यानुसार जिल्हा मुख्य न्यायाधीश भोजराज पाटील, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव महेश जाधव आणि अॅड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनेलने या चौघांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये आणि दोन हजार रुपये अंत्यविधीचा खर्च म्हणून देण्याचे आदेश दिले. ही रक्कम चेकने दिली जाणार आहे. या योजनेमध्ये नुकसान भरपाई मिळणारा हा पहिला दावा ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images