Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

'स्वाइन फ्लू'मुळे आणखी एकाचा मृत्यू

$
0
0
‘स्वाइन फ्लू’च्या आजाराने बारामती तालुक्यातील जळोची येथील माधुरी संभाजी पाटील यांचा हडपसरच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये पहाटे सव्वातीनच्या सुमारास मृत्यू झाला. आतापर्यंत पुण्यात सतरा जणांचा बळी गेला आहे.

तोच खेळ नव्या तिकिटावर...

$
0
0
चार वर्षांपूर्वी पीएमपीने महिलांसाठी खास बससेवा सुरू केली होती. मात्र, महिलांनी या बसेसकडे पाठ फिरवल्यामुळे अवघ्या दीड महिन्याच्या अवधीत हा उपक्रम बंद झाला होता. महिलांसाठी १०० बसेस सुरु करण्याचे उद्दिष्ट यशस्वी करण्यासाठी पीएमपी प्रशासनाला कंबर कसावी लागणार आहे.

२ वर्षांच्या मुलीसह २ महिलांचा खून

$
0
0
घोरपडी येथील बी. टी. कवडे रोडवरील चंपारत्न सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये दोन वर्षांच्या मुलीसह दोन महिलांचा खून झाल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. हल्लेखोरांनी एका ज्येष्ठ नागरिकावरही हल्ला केला असून, त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बेकायदा बांधकामे अहवाल लवकरच

$
0
0
पुण्यासह राज्यातील मोठी शहरे आणि शहराभोवती झालेल्या बेकायदा बांधकामांविषयी नेमके काय करायचे याच्या शिफारशी करणारा अहवाल या महिनाअखेरीस राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना स्वतंत्र यंत्रणा देण्याबरोबर त्यांच्या अधिकार कक्षेत वाढ केली जाणार आहे.

वानवडीः तिहेरी खुनाचा उलगडा

$
0
0
प्रेयसीबरोबर लग्न करता यावे म्हणून आई, पत्नी आणि लहान मुलीचा निर्दयतेने खून करणाऱ्या; तसेच शेजाऱ्याला जखमी करणाऱ्या विश्वजित मसलकरला अटक करण्यात आली आहे. घरात चोरी झाली असून, आपल्या कुटुंबीयांना मारहाण झाली आहे, अशी खोटी तक्रार त्याने पोलिसांकडे केली होती.

पुण्यात बॉम्बसदृश वस्तू आढळली

$
0
0
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरात रविवारी सकाळी बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाताचे बॉम्बस्कॉडसह वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झाले आहेत. या वस्तूला टायमर लावल्याची शक्यताही वर्तण्यात आली आहे, मात्र पोलिसांनी यावृत्ताला अद्याप दुजोरा दिलेली नाही.

लाफितीतून मुक्त व्हावे कलादालन!

$
0
0
बालगंधर्व रंगमंदिराचे नवे कलादालन प्रसन्न आणि अधिक सुसज्ज झाले असले, तरी दुरुस्तीसाठीच्या सात महिन्यांच्या ‘ब्रेक’मधून काही धडा घेतला जाणार काय, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो आहे. या ‘दीर्घकालीन ब्रेक’नंतर नवे कलादालन प्रशासन-व्यवस्थापनाच्या मर्जीच्या कलेनुसार चालते, की कलाप्रेमींना कलात्मक मेजवानी मिळते, यावर या सात महिन्यांच्या परिश्रमांचे यश अवलंबून आहे.

‘पीएमपी’कडे ५१ जणांच्या तक्रारी

$
0
0
प्रवाशांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी पीएमपीने सुरू केलेल्या प्रवासी दिनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या प्रवासी दिनाच्या दिवशी ५१ जणांनी आपल्या तक्रारींची नोंद पीएमपीकडे केली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या वेळी तक्रारींचा आकडा १६ ने वाढला आहे.

वाहतूक पोलिसांकडे ५० हरकती-सूचना

$
0
0
गर्दीच्या वेळेत कर्वे रोडवर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कर्वे पुतळा ते स्वातंत्र्य चौक दरम्यानच्या सुधारित पार्किंग योजनेवर नागरिकांनी हरकती नोंदविल्या आहेत. परिणामी, येत्या एक-दोन दिवसांमध्ये या भागाची पाहाणी करून वाहतूक हा तिढा सोडवणार आहेत.

कालवा सल्लागार समितीत अध्यक्षपदी कोण?

$
0
0
शहर आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाठीसाठ्याचे वार्षिक नियोजन करण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक उद्या (सोमवारी) ८ ऑक्टोबरला होणार आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पाहणाऱ्या अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे ही बैठक नक्की कोणाच्या अध्यक्षतेखाली होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘हेरिटेज वॉक’चे पाऊल पहिल्या माळेला!

$
0
0
पुणे महापालिका आणि जनवाणी यांच्यातर्फे राबविण्यात येणा-या महत्त्वाकांक्षी ‘हेरिटेज वॉक’ या उपक्रमाचा प्रारंभ अखेर घटस्थापनेला होणार असल्याचे निश्चित झाले आहे. शहराचा वारसा पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पालिकेतर्फे प्रथमच ‘हेरिटेज वॉक’चा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

पुण्याच्या उपनगरात पावसाचा दणका

$
0
0
कात्रज, सुखसागरनगर, जांभूळवाडी, संतोषनगर या भागामध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने शनिवारी रात्री दाणादाण उडाली. यामुळे परिसरातील रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. गेल्या काही दिवसांतील वादळी पावसाने विजेचा लंपडावही येथे सुरू आहे.

गॅस कंपनीविरोधी आंदोलन करूःभाजप

$
0
0
गॅस कंपन्यांनी ‘एक सोसायटी एक ग्राहक’ असा न्याय लावला आहे. गॅस कंपनीने घेतलेली भूमिका अन्यायकारक असून याबाबत येणाऱ्या काळात जिल्हा प्रशासनाने योग्य ती भूमिका न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.

धरणे भरली ९५ टक्के

$
0
0
शहर आणि परिसरासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा २७.८५ टीएमसीवर पोहोचला आहे. चारही धरणांत मिळून एकूण क्षमतेच्या ९५ टक्के साठा झाला असल्याने पुणेकरांवरील पाणीकपातीची टांगती तलवार दूर होण्याची शक्यता आहे.

वनमंत्र्यांनी अधिका-यांवर साधला निशाणा

$
0
0
‘वनक्षेत्रात होणा-या चो-यांमध्ये वन अधिकारी कर्मचारी यांची मिलीभगत आहे. याबाबतची माहिती माझ्यापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे अधिका-यांनी यापुढे अधिक लक्ष देऊन काम करावे,’ अशी तंबी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी वनाधिका-यांना दिली.

रेसकोर्सवर कलमाडी यांची हुर्यो

$
0
0
खासदार सुरेश कलमाडी यांच्या उपस्थितीत रेसकोर्सवर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात काही जणांनी रविवारी कलमाडी यांची हुर्यो उडवित त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

‘इट कॅन बी बॉम्ब...’

$
0
0
बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर ‘इट कॅन बी बॉम्ब’ अशा आशयाची पोस्टर्स शहरभर लावण्यात आली आहेत. या पोस्टर्सवर दाखविलेला ‘बॉम्ब’ एका खोडसाळ व्यक्तीने तयार करून कोरेगाव पार्क येथील मंगलदास रोडवरील रेलिंगवर ठेवला.

दादा-ताईंच्या हाकेला आबांची साद

$
0
0
शहरातील तरुणींमध्ये वाढत्या असुरक्षिततेबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर हे प्रश्न सोडविण्यासाठी गृहमंत्री आर. आर. पाटील हे सोमवारी (८ ऑक्टोबर) पुण्यात बैठक घेणार आहेत.

माहिती कायद्यात बदल नको

$
0
0
केंद्र सरकारने केलेल्या माहितीचा अधिकार कायद्यात बदल करण्याची तयारी केली आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी करण्यात आलेल्या या कायद्यात बदल होऊ नये, यासाठी समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव वाढविला पाहिजे, अशी अपेक्षा माहितीचा अधिकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

गॅसच्या ‘चटक्याची’ झळ

$
0
0
स्वयंपाकाच्या गॅस महागणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर यावर सामान्य पुणेकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘सामान्यांना भरडण्याचा जणू सपाटाच सरकारने लावला असल्याचे सांगत दिवस कसा काढायचा’, असा प्रश्न पुणेकरांनी उप‌स्थित केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images