Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अतिक्रमणविरोधी कारवाईचे देखावे

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामाविरोधात चालू केलेल्या कारवाईचे प्रतिबिंब सार्वजनिक मंडळाच्या देखाव्यात प्रकर्षाने उमटले आहे.

गणेशोत्सवासाठी सक्तीची 'वर्गणी'

0
0
पुण्यातील गणेश मंडळांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत पारितोषिकांची रक्कम दुप्पट करतानाच दुसऱ्या बाजूने मात्र मंडळांकडूनच सक्तीची ‘वर्गणी’ वसूल करण्याचा उद्योग महापालिकेने केल्याचे उघडकीस आले आहे.

१५ सप्टेंबरपासूनचे सिलिंडर मोजणार

0
0
केंद्र सरकारने सवलतीच्या दरात दिल्या जाणाऱ्या घरगुती सिलिंडरच्या संख्येत कपात केल्याने नागरिकांना वर्षाला केवळ सहाच सिलिंडर सवलतीच्या दरात मिळणार आहे.

ऐन दिवाळीत महाग सिलिंडर?

0
0
केंद्र सरकारने सवलतीच्या दरात दिल्या जाणाऱ्या घरगुती सिलिंडरच्या संख्येत कपात केल्याने नागरिकांना वर्षाला केवळ सहाच सिलिंडर सवलतीच्या दरात मिळणार आहे.

पुण्यात पावसाचा शिडकावा

0
0
गणेशोत्सवात सुरुवातीपासून भाविकांवर कृपादृष्टी दाखवित दडून बसलेल्या पावसाने गुरुवारी रात्री काही ठिकाणी तुरळक स्वरूपात, तर काही ठिकाणी जोरदार सरींसह जलाभिषेक केला.

‘भामा-आसखेड’चा विसर्ग बंद

0
0
भामा-आसखेड धरणाच्या सांडव्यातून नदीत सोडण्यात येणारे पाणी अखेर शुक्रवारी सकाळी थांबविण्यात आले. पाणी सोडल्यामुळे घटलेली धरणाची पातळी पूर्ववत होण्यास आता पावसाची वाट पाहावी लागणार आहे.

देणे समाजाचे प्रदर्शनाला सुरुवात

0
0
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजाच्या विविध स्तरातील लोकांसाठी, अपंगत्वावर मात करू इच्छिणा-या मुलांसाठी तसेच पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी काम करणा-या विविध संस्थांना एकाच छताखाली आणणारे ‘देणे समाजाचे’ हे अनोखे प्रदर्शन सध्या कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉलमध्ये भरविण्यात आले आहे.

मुंबईच्या डबेवाल्यांना भावी इंजिनीअर्सचा सलाम

0
0
पाच हजार कर्मचारी, त्यातील साडेतीन हजार अशिक्षित... सायकल, लोकल.. डोक्याचा कम्प्युटर आणि ग्राहकालाच देव मानणारे मनुष्यबळ हे भांडवल... या भांडवलाच्या जोरावर मुंबईच्या गर्दीत न चुकता रोज पोहोचवले जाणारे दोन लाख डबे आणि वर्षाचा ५०- ५५ कोटींचा व्यवसाय...

किष्किंधानगर जाळपोळ : २ जणांना पोलिस कोठडी

0
0
कोथरूड भागातील किष्किंधानगर येथे वाहनांची तोडफोड आणि गाड्या जाळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना शुक्रवारी कोर्टाने नऊ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

विनोदोत्तम करंडकावर ‘३०१ प्रॉडक्शन’चे नाव

0
0
गेले चार दिवस हास्याच्या खळखळाटात बुडलेले भरत नाट्यमंदिर टाळ्या, शिट्ट्या आणि आरोळ्यांनी घुमत होते. तरुणाईचा उत्साह, पारितोषिक घेण्यासाठीची लगबग आणि त्यानंतर केलेल्या जल्लोषाने भरत नाट्य मंदिराचा परिसर पुन्हा एकदा तरुणाईने फुलून गेला होता. ३०१ प्रॉडक्शन या संस्थेच्या ‘ढिन्चॅक् ढिचॅक्.. अर्थात धंदा कर्तव्य आहे!’ या एकांकिकेने विनोदोत्तम करंडकावर नाव कोरले.

पालिकेत शिपाई व्हायचेय? मग १०वी नापास व्हा!

0
0
महापालिकेत शिपाई किंवा बिगारी म्हणून काम करायचे असेल, तर यापुढे दहावी नापास व्हावे लागेल; कारण महापालिकेने मान्य केलेल्या सेवा नियमावलीत ही अट घातली आहे.

२ कोटींसाठी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव

0
0
व्यवसायात झालेल्या तोटा भरून काढण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचाच बनाव रचून वडिलांकडे दोन कोटी रुपयांची (साडेतीन लाख डॉलर) खंडणी मागण्याचा प्रकार निगडी येथे गुरुवारी घडला. व्यावसायिकाच्या मुलाचा हा बनाव पोलिसांसमोर उघड झाला असून त्याला मदत करणा-या तीन मित्रांचा शोध सुरू आहे.

तोरण मिरवणुकांवरील बंदी योग्यच

0
0
तोरणाच्या नावाखाली निघणा-या मिरवणुकांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी, दोन गटांतील मारामा-या, डीजेवर बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई असे प्रकार पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षांत तोरण मिरवणुकांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन नवरात्र उत्सवात काढण्यात येणा-या तोरण मिरवणुकांवर पोलिसांनी घातलेली बंदी योग्य आहे, असे मत अनेक राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले आणि यंदाच्या वर्षी पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले.

शहरातील सिलिंडर वितरक एजन्सी बंद करण्याच्या मार्गावर

0
0
सवलतीच्या दरानंतर घरगुती ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सिलिंडरची मोजणी कशा पद्धतीने करायची याबाबतच्या कोणत्याही स्पष्ट सूचना ऑइल कंपन्यांनी गॅस वितरकांना दिलेल्या नाहीत. यामुळे सिलिंडरच्या दरावरून ग्राहक आणि वितरकांमध्ये ‘तू तू- मैं मैं’ होत आहे. गॅस कंपनी आणि ग्राहकांच्या त्रासाने हैराण झालेले वितरक गॅस एजन्सी बंद करण्याचा विचारात आहेत.

पाणीपुरी विक्रेता खून : आणखी १ आरोपी अटकेत

0
0
पाणीपुरी विक्रेत्याचा गळा चिरून झालेला खून हा अनैतिक संबंधांच्या कारणावरून झाला असून, या गुन्ह्यात पाच आरोपी असल्याचे चतुः‍श्रृंगी पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, १५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

महिलेची पर्स प‍ळविली

0
0
जंगली महाराज रोडवरील शिवसागर हॉटेल समोरून पायी चाललेल्या महिलेच्या हातातील पर्स हिसकावण्याचा प्रकार बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. या प्रकरणी विजया संजय खडके (वय ४१, रा. अप्पा बळवंत चौक) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध डेक्क्न पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोगस जात प्रमाणपत्रांच्या ‘घुसखोरी’ला आता लगाम

0
0
जात पडताळणी समितीकडून देण्यात येणा-या ‘कास्ट सर्टिफिकेट’मध्ये नोटांप्रमाणे सुरक्षित कोडिंग, चिन्ह, वॉटरमार्कचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र देऊन हजारो रुपयांची लूट करणा-या दलालांच्या ‘घुसखोरी’ला आता लगाम बसणार आहे.

२ स्वतंत्र अपघातात २ ठार

0
0
वडगाव शेरी क्षेत्रिय कार्यालयाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत गुरुवारी दुपारी एक पादचारी ठार झाला. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तिहेरी खुनाचे धागेदोरे घरातच?

0
0
घोरपडी येथील तिहेरी खून प्रकरण चोरटे, दरोडेखोरांना केले नसून घरातील परिचित व्यक्तीनेच खून केल्याच्या निष्कर्षापर्यंत वानवडी पोलिस पोचले आहेत. आई-पत्नी आणि दीड वर्षांच्या मुलीच्या खूनप्रकरणी विश्वजित केरबा मसळकर याच्याकडेच चौकशी सुरू करण्यात आहे.

पालकमंत्रिपदी बेनकेंची वर्णी?

0
0
अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी जुन्नरचे आमदार वल्लभ बेनके यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. जयंत पाटील, बबनराव पाचपुते, राजेश टोपे यांचे आव्हान मागे टाकून बेनके सरशी साधणार का, असा सवाल आता जिल्ह्यातून उपस्थित करण्यात येत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images