Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पातेल्यात पडून मुलगा जखमी

0
0

पिंपरी : भाजी तयार करण्यासाठी गरम केलेल्या पातेल्यामध्ये पडल्याने नऊ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (१ ऑगस्ट). अविनाश विकास दुनघव (रा. लांडेवाडी) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. लांडेवाडीतील विठ्ठलनगर झोपड़पट्टीमध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अन्नदानाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. दरम्यान, स्टेजजवळ खेळणाऱ्या अविनाशचा तोल गेला आणि तो भाजीच्या गरम पातेल्यात पडला. यामध्ये तो सुमारे ७० टक्के भाजला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरासरीपेक्षा पाऊस कमीच

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाचे पहिले दोन महिने उलटून गेल्यानंतरही राज्यातील पावसाचे प्रमाण कमीच आहे. राज्यात जुलैअखेरच्या सरासरीपेक्षा ३१ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. राज्याच्या चारही उपविभागात अपुरा (डेफिसियंट) पाऊस झाला आहे; तर पुण्यात सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. सुरुवातीला देशात सरासरीच्या ९३ टक्के; तर त्यानंतर सुधारित अंदाजात सरासरीच्या ८८ टक्के पाऊस होईल, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले होते. मान्सूनवर प्रतिकूल परिणाम करणारा 'एल निनो' हा घटक संपूर्ण मान्सून दरम्यान सक्रिय राहण्याची शक्यता असल्याने हा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यातले पहिले दोन महिने उलटल्यानंतरही राज्यातल्या पावसाच्या प्रमाणात फारशी वाढ झालेली नाही.

हवामान विभागाने राज्याचे कोकण व गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा असे चार उपविभाग केले आहेत. या सर्व चारही उपविभागांमध्ये जून व जुलै महिन्यात मिळून अपुऱ्या पावसाची नोंद झाली आहे. जुलैअखेर कोकण गोव्यात सरासरीपेक्षा २५ टक्के कमी, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी, मराठवाड्यात सर्वाधिक म्हणजे ५६ टक्के कमी; तर विदर्भात सरासरीपेक्षा २० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. पुण्यात जुलैअखेरपर्यंत सरासरी ३२१.७ मिमी पावसाची नोंद होते. यंदा जुलैअखेरपर्यंत २७४ मिमी म्हणजेच सरासरीच्या ८५.१७ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात पावसाचे प्रमाण कमी असताना देशात मात्र सरासरीच्या केवळ पाच टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा पावसाच्या पहिल्या दोन महिन्यांत (जून व जुलै) पावसासाठी आवश्यक कमी दाबाची क्षेत्र तयार होण्याचे प्रमाण कमी होते. त्यातही ही कमी दाबाची क्षेत्रे उत्तरेकडे अधिक प्रमाणात तयार झाली. त्यामुळे गंगेच्या खोऱ्यासहित उत्तरेकडे चांगला पाऊस झाला. परंतु, आंध्र आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे प्रमाण कमी असल्याने राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. अजून ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन पावसाचे महिने शिल्लक असले, तरी खऱ्या अर्थाने ऑगस्ट हा एकच पावसाचा महिना शिल्लक आहे. त्यामुळे या महिन्यात पाऊस सरासरीतली पिछाडी भरून काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरात हलक्या पावसाची शक्यता

पुणे : शहर आणि परिसरात शनिवारी पावसाने विश्रांती घेतली. शहराच्या काही उपनगरात अत्यंत किरकोळ स्वरूपाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. पुढील दोन दिवसांत शहरात पावसाच्या काही सरींची शक्यता असून कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य पाकिस्तान आणि लगतच्या पश्चिम राजस्थानच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. शनिवारी राज्यात मराठवाडा आणि विदर्भ वगळता अन्यत्र काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वर येथे (पाच मिमी) झाली. रत्नागिरी येथे ३ मिमी; तर नाशिक व कोल्हापूर येथे एक मिमी पावसाची नोंद झाली. दोन दिवसांत कोकणात बहुतांश, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही तर मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्धेची साखळी हिसकावली

0
0

पुणेः दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पायी चाललेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून तोडून नेल्याच्या दोन घटना शुक्रवारी रात्री शहरात घडल्या. या घटनांमध्ये एकूण एक लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचा एेवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी अलंकार पोलिस स्टेशन व सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये पीडित महिलांनी फिर्याद दाखल केली आहे.

पहिली घटना धनकवडी येथील पोस्ट ऑफिसच्या परिसरात घडली. एक ७५ वर्षीय महिला पोस्ट ऑफिस जवळील शिवशांती गॅस समोरून पायी जात असताना दुचाकीवरून दोन अनोळखी इसम त्यांच्या जवळ आले. त्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी व बारीक मण्यांची माळ असा एकूण ८७ हजार ५०० रुपयांचा एेवज हिसकावून तोडून नेला. तर, दुसरी घटनेत कोथरूड येथील सिटी प्राइड थिएटरजवळ घडली. पीडित महिला घरी जाण्यासाठी रिक्षा स्टॅण्डकडे पायी जात असताना दुचकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हेटरिनरी डॉक्टरांचे दिल्लीत आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पशूवैद्यकीय व्यक्तींना कायदेशीररित्या मोकळेपणाने ग्रामीण भागात काम करता यावे, यासाठी कायद्याची अवाजवी बंधने आणि अडचणी दूर कराव्यात, तसेच व्यावसायिक शिक्षण आणि व्यावसायिक मुभा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणात तातडीने अमूलाग्र बदल झाले पाहिजेत, या मागणीसाठी व्हेटरिनरी सर्व्हिसेस फेडरेशन ऑफ इंडिया येत्या १० ऑगस्टला पशुवैद्यकीय व्यावसायिकांचा दिल्ली येथील जंतर-मंतर रोडवर लक्ष्यवेध धरणे सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे.

देशामध्ये सध्या २ लाख ५० हजार पशुवैद्यकीय व्यक्ती सुमारे ६ लाख ८० हजार खेड्यात काम करीत आहेत. आतापर्यंत १ अब्ज ५० हजार पशुपक्ष्यांना प्रतिबंधात्मक आणि औषधोपचाराचे संरक्षण कवच प्रभावीपणे देत आहेत. मात्र, या प्रक्रियेत कालानुरूप सुयोग्य, व्यावसायिक शिक्षणात सुधारणा, दुरस्थ शिक्षण पद्धतीचा वापर, राष्ट्रीय पशुधन विकास परिषदेची स्थापना होणे आवश्यक आहे. त्याची कुशलता आणि कार्यक्षेत्राचा स्तर सतत उंचाविणे आवश्यक आहे. या बदलांसाठी संस्थेने केंद्र सरकारच्या संबंधित संघटनांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे; मात्र या प्रकरणी योग्य कार्यवाही झालेली नाही. म्हणून आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. नारायण जोशी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलाचा प्रश्न मार्गी लागणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'घोरपडी येथील नागरिकांच्या सोयीसाठी उड्डाणपुलाचा प्रश्न येत्या तीन ते चार महिन्यांत सोडविला जाईल,' असे आश्वासन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले आहे. 'घोरपडी आणि लुल्लानगर येथील दोन्ही पुलांबाबतचा अभ्यास केला असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल,' अशी ग्वाही त्यांनी दिली.

शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पर्रीकर यांची भेट घेऊन घोरपडी आणि लुल्लागनर येथील उड्डाणपुलांबाबत निर्णय घेण्याचे निवेदन दिले होते. या परिसरातील नागरिकांना सध्या दैनंदिन स्वरूपात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून पुलाबाबत चर्चा सुरू आहे; पण प्रत्यक्षात त्यातून नागरिकांच्या सोयीचा मार्ग निघालेला नाही, याकडे आढळराव यांनी लक्ष वेधले. काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या दौऱ्यावर असताना पर्रीकर यांनी दोन्ही ठिकाणांची जागा पाहणी करून काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार, महापालिकेने घोरपडी उड्डाणपुलासाठीचा सुधारित प्रस्ताव संरक्षण विभागाला सादर केल्याचा दावा आढळराव यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीआरटी’ची चाचणी यशस्वी

0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

संगमवाडी-विश्रांतवाडी मार्गावरील (आळंदी रोड) बहुप्रतीक्षित जलद बस वाहतूक सेवेला (बीआरटी) अखेर शनिवारी मुहूर्त मिळाला. 'ट्रायल रन'च्या निमित्ताने 'रेनबो बीआरटी'च्या या सात किलोमीटरच्या मार्गावर पीएमपीची बस धावली आणि पुणेकरांना अत्याधुनिक, अद्ययावत सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पहिली चाचणी यशस्वी ठरली!

पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह पालिका आणि पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी 'ट्रायल रन'मध्ये सहभागी होऊन संपूर्ण बीआरटी मार्गाचा आढावा घेतला. पुढील काही दिवस लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, अधिकारी-कर्मचारी यांचे बीआरटी मार्गावर दौरे होणार आहेत. या दरम्यान आळंदी रोडवरील अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील आठ ते दहा दिवस ट्रायल रन घेण्यात येणार असून, त्यानंतर प्रवाशांसाठी हा मार्ग खुला केला जाणार असल्याचा पुनरूच्चार कुणाल कुमार यांनी केला.

कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला संगमवाडी-विश्रांतवाडी बीआरटी मार्ग विविध कारणास्तव धूळ खात पडला होता. अनेक महिन्यानंतरही मार्ग खुला न केल्याने पालिकेला विविध पक्ष आणि नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर एक ऑगस्टपासून बीआरटी सुरू करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. पालिकेकडून अधिकृतपणे बीआरटी मार्गाची 'ट्रायल रन' सुरू होणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी स्थानिक पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. संगमवाडी बस थांब्यापासून ट्रायल रनला सुरुवात झाल्यानंतर विश्रांतवाडी येथील प्रतीकनगर चौकात त्याची अखेर झाली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याचे निवेदन आयुक्तांना दिले.

आळंदी रोडवरील बीआरटी मार्गावर पुढील आठ दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत दहा बस सतत फेऱ्या मारणार आहेत. त्यामुळे या मार्गावर बसचालकांचा सराव होण्यास मदत होईल. प्रवाशांना बसची माहिती समजण्यासाठी बस थांब्यांवर आयटीएमएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

- मयुरा शिंदेकर, सीईओ,पीएमपीएमएल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात डेंगीचे पेशंट वाढले!

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाळा सुरू झाला असतानाही, कधी संततधार पाऊस तर कधी कडक उन्हात या विचित हवेमुळे डेंगीच्या डासांच्या अंड्यांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दिवसाला ६ ते ८ नागरिकांना डेंगीची बाधा होते आहे. घरामध्ये साठवलेल्या पाण्यामुळेच डासांची संख्या वाढत असल्याची माहिती पुढे आली आहे.

पावसाळ्याची सुरुवात झाली, की डेंगीच्या डासांची पैदास वाढत असून गेल्या तीन वर्षात डेंग्यू झालेल्या पेशंचे प्रमाण वाढते आहे. या वर्षी देखील पेशंटची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या महिनाभरापर्यंत दिवसाला ३ ते ४ पेशंटची संख्या होती, आता दिवसाला ६ ते ८ डेंगीच्या पेशंटची नोंद होते आहे. या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोसायट्यांमध्ये धडक मोहिमा सुरू केल्या आहेत. यामध्ये सोसायट्यांचे बगीचे, टेरेसवर ठेवलेल्या वस्तू, कुंड्यांमध्ये पावसाचे पाणी साठत असून त्यात डासांची अंडी सापडत आहेत, अशी माहिती पालिकेचे आरोग्यप्रमुख एस. टी. परदेशी यांनी दिली.

दरम्यान, 'कोथरूडमधील शांतीबन सोसायटी परिसरात गेल्या आठ दिवसात डेंगी झालेल्या पेशंटचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय या भागातील काही सोसाट्यांमध्ये डेंगीच्या डासाची अंडीही सापडली आहेत. आमचे वैद्यकीय कर्मचारी ठिकठिकाणी फवारणीसाठी जात आहेत,' असे परदेशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’वरून राजकारण

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा एकत्रित समावेश करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी निषेध केला आहे. यामुळे, दोन्ही शहरांच्या विकासाच्या योजनांना खीळ बसण्याची शक्यता असून, राजकीय हेतूसाठी घेण्यात आलेला हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी केली गेली आहे.

राज्य सरकारने शुक्रवारी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी दहा शहरांची निवड जाहीर केली. यामध्ये राज्यातील इतर नऊ शहरांचा स्वतंत्र समावेश करण्यात आला असताना, पुणे-पिंपरी चिंचवड मात्र एकच शहर दाखविण्यात आले आहे. त्यावरून पालिकेतील राजकारण तापले असून, सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेससह शिवसेनेनेही निर्णयाचा विरोध केला आहे.

'केंद्र आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून मेट्रोपाठोपाठ स्मार्ट सिटीमध्येची दुजाभाव करण्यात आला आहे. राजकारणाच्या माध्यमातून पुण्याच्या प्रगतीत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी शहराला पुढे नेण्याची क्षमता राष्ट्रवादीमध्ये आहे', अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी भाजपवर टीका केली.

सरकारने जाणीवपूर्वक दोन्ही शहरांना एकत्र करण्याची खेळी केली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी जास्तीत जास्त शहरे स्मार्ट सिटीत घेण्याच्या उद्देशाने सरकारने राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांनी केला.

शिवसेनेचाही घरचा आहेर

स्मार्ट सिटीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा एकत्र समावेश केल्याने दोन्ही शहरांना मिळणाऱ्या अनुदानात कपात होऊ शकते. त्यामुळे दोन्ही शहरांना स्वतंत्र दर्जा देऊन त्यांचा समावेश केला जावा, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन शहरप्रमुख विनायक निम्हण आणि संघटक श्याम देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'एक्स्प्रेस वे'वर पुन्हा दरडसंकट

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे वरील धोकादायक दरडी काढण्याचे काम पूर्णत्वास येत असतानाच शनिवारी (१ ऑगस्ट) दुपारी साडेतीनच्या सुमारास खंडाळा बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली आहे. ही वाहतूक जुन्या महामार्गाने वळविण्यात आली आहे.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे वरील दरडी काढण्याचे काम २३ जुलैपासून हाती घेण्यात आले होते. ते शुक्रवारी (३१ जुलै) पूर्ण झाले आणि मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे वाहतूक पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा होती. परंतु, दुपारी पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळित झाली.

दरड कोसळल्याने प्रवाशांना प्राण गमवावा लागल्यामुळे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले होते. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबी कंपनीने संयुक्तरित्या प्रयत्नही केले. २३ जुलैपासून हाती घेतलेले काम चार ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. धोकादायक दगडी हटविण्याचे काम मेटाफेरी कंपनीचे विशेष पथक कार्यरत होते. पाऊस, जोरदार वारे आणि धुके यामुळे कामात अडथळेही निर्माण झाले; परंतु कंपनीचे चार अभियंते आणि १५ कर्मचाऱ्यांनी नऊ दिवसांत धोकादायक दरडी काढल्या.

वाहतूक जुन्या घाटा‌तून

रस्त्यावर काम सुरू असताना संभाव्य धोके टाळण्यासाठी एक्स्प्रेस-वे वरील वाहतूक बंद ठेवत हलकी आणि प्रवासी वाहने राष्ट्रीय महामार्गावरुन लोणावळा, खंडाळा, खोपोलीमार्गे जुन्या बोरघाटातून वळविण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागला. काम पूर्ण झाल्यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. आता पुन्हा दरड कोसळल्यामुळे आणि धोका कायम असल्यामुळे खडसे यांच्या पुढील दोन दिवसांच्या भेटीत स्पायडर नेट बसविण्याबाबत चर्चा आणि नियोजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दगड खाणींचेही होणार ‘ऑडिट’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्ह्यातील दगड खाणींमधून होणारे उत्खनन, प्रत्यक्ष झालेले उत्खनन व भरलेली रॉयल्टी आणि कागदोपत्री बंद असलेल्या दगडखाणींची माहिती घेण्याची सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी केली आहे.

दगड खाणींना सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी उत्खनन करण्याची परवानगी आहे. तथापि, महापालिका हद्दीलगतच्या नांदोशी, कात्रज, जांभुळवाडी तसेच भावडी परिसरातील काही खाणींमध्ये अहोरात्र उत्खनन चालते. यासंदर्भात आलेल्या तक्रारीवरून संबंधित खाणींची तपासणी करण्याचे आदेशही पाटील यांनी दिले आहेत.

गौणखजिनाच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीत १७५ कोटी रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दीष्ट पुणे जिल्ह्याला यंदा देण्यात आले आहे. गतवर्षीपेक्षा हे उद्दीष्ट थेट १०० कोटी रुपयांनी वाढविण्यात आले आहे. या उद्दीष्टपूर्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. दगड खाणींमधून होणारे उत्खनन व त्यांच्याकडून सरकारला भरली जाणारी रॉयल्टी यामध्ये तफावत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या खाणींच्या उत्खननाची माहिती घेण्यात येणार आहे.

'इटीएस' द्वारे तपासणी

पुणे जिल्ह्यात ४६५ दगड खाणी आहेत. या दगड खाणींमधून नेमके किती उत्खनन करण्यात आले आहे याची तपासणी इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन (इटीएस) मशिनद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी ही मशीन भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. तसेच या तपासणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडून इटीएस मशीन घेण्यात येणार आहेत. या दगड खाणींमध्ये परवानगी व मर्यादेपेक्षा अधिक उत्खनन केल्याचे आढळल्यावर संबंधित खाणमालकांकडून पाच पट दंड वसूल केला जाणार आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अमूल’च्या लढाईत दूध संघांत यादवी

0
0

धनंजय जाधव, पुणे

'अमूल'ने केलेला शिरकाव आणि दुधाला देण्यात येणारा जादा भाव हा महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) व जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांमध्ये यादवी निर्माण करणारा ठरला आहे. 'अमूल'ने मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये बस्तान बसविण्यास सुरूवात केल्याने 'महानंद'च्या नाकर्तेपणावर जिल्हा संघांनी प्रथमच थेट बोट ठेवले आहे.

'महानंद'ची निर्मिती, कर्तव्ये आणि प्रत्यक्ष कारभार याचा विचार केला तर 'अमूल'सारख्या नामांकीत ब्रँडने बाजारपेठ काबिज का केली याची उत्तरे मिळू शकतात. 'महानंद'चा कारभार कसा चालला आहे हे गेल्या काही वर्षांत दिसले आहे. स्थापनेनंतर गेल्या ४८ वर्षांत महानंद हा अमूलसारखा एकही ब्रँड देशभर सोडच पण राज्यभर सुद्धा विकू शकलेला नाही हे त्याच्या कारभाराचे द्योतक आहे.

महानंदच्या अध्यक्षांनी दौऱ्यासाठी ९० हजार रुपये आगाऊ घेण्यापासून बँकांमधील ठेवी, लाखोंच्या अग्रीम रकमा, थकीत येणी, प्रवास भत्ता, आर्थिकस्थिती नसताना जाहिरातींवर उधळपट्टी, निवासी इमारतींचे नुतनीकरण, सुगंधी दूध पुरवठ्याची साडेआठ कोटींची थकबाकी आणि वसुलीचा अभाव हे महानंदच्या कारभाराचे आणखी काही नमूने आहेत. महानंदची स्थापना करताना मुंबईमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री आणि जिल्हा दूध संघांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य, दुधाच्या भावासाठी लढाई अशी अनेक उद्दीष्टे ठेवण्यात आली. पण त्यातील कशाचीही पूर्तता होत नसल्याने 'अमूल'च्या निमित्ताने महानंदचे वाभाडे काढण्यात आले आहे.

अमूलने शेतकऱ्यांच्या दुधाला जादा भाव देऊन संकलन सुरू केल्याने जिल्हा दूध उत्पादक संघ आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यासंदर्भात जिल्हा दूध संघांची बैठक कात्रज येथे झाली. त्यात महानंदपासून फारकत घेण्यापर्यंत जिल्हा संघांनी भूमिका घेतली. इतकेच नव्हे तर महानंद बंद करून अमूललाच जिल्हा संघांनी दूध देण्याची तयारी केली. महानंदच्या कारभाराबाबत जिल्हा संघांमध्ये असलेली खदखद प्रथमच बाहेर आली. अमूलचा शिरकाव होण्यापूर्वी महानंद जिल्हा संघांकडून दूध संकलन करीत होती. पण जिल्हा संघांचे सर्व दूध घेण्याची हमी कधीही महानंदने घेतली नाही. उलट संघांकडून घेण्यात येणाऱ्या तीस टक्के दुधाची मनमानी पद्धतीने जादा दराने विक्री केली जात होती.

एकेकाळी दूध विक्रीचा सुवर्णकाळ पाहणारी महानंद ही संस्था कालानुरूप न बदलण्याने आर्थिक गोत्यात आली आहे. महानंदच्या बोटचेपेपणामुळे गोकुळसारख्या खासगी दूध विक्रेत्यांनी मुंबईत बाजारपेठ मिळविली. याचाच राग जिल्हा संघाच्या मनात आहे. अमूलमुळे जिल्हा संघांची डोकेदुखी वाढणार आहे. काही जिल्हा दूध संघ बंद करण्यापर्यंतची वेळ येणार आहे. पण महानंदपेक्षा अमूल परवडले असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर का आली याचे आत्मपरीक्षणही होण्याची गरज आहे. जिल्हा संघांचा कारभारही धुतल्या तांदळासारखा स्वच्छ नाही. गैरव्यवहार, भ्रष्टाचाराने जिल्हा व तालुका संघही बरबटले आहेत. मध्यंतरी दुधातील भेसळही गाजली. त्यात काही दुधमहर्षींचा सहभाग असल्याने भेसळप्रकरण दाबले गेले. त्यामुळे सहकारी दूध संघ व महानंदकडे पाहण्याचा सरकारचाही दृष्टीकोन फारसा चांगला राहिलेला नाही.

'अमूल'ला रेडकार्पेट

अमूलने आता बाजारपेठेवर वर्चस्व मिळविण्यास सुरूवात केल्याने त्याची धस्ती जिल्हा संघांना वाटत आहे. स्पर्धेच्या युगात या सहकारी दूध संघांनीही चांगले व स्वस्त दराने दूध द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांनाही त्यांना अमूलप्रमाणेच चांगला दर द्यावा लागणार आहे. केवळ अमूलच्या नावाने बोटे मोडून व अमूलला राज्यबंदी घालून काहीही होणार नाही. अमूल या ब्रँडची निर्मिती ही गुजरातमधील इतर ब्रँड एकत्र करून झाली. त्याचधर्तीवर महाराष्ट्रात प्रमुख ब्रँड एकत्रित आल्यास अमूलशी स्पर्धा करणे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीमाशंकरला सुविधांची वानवा

0
0

अतुल काळे, राजगुरुनगर

हजारो भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे वर्षभर भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी असते. श्रावण महिन्यात तर ही संख्या प्रचंड प्रमाणात वाढते. देणग्या व इतर रूपाने देवस्थानला दरवर्षी लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळते. अनेक श्रीमंत भाविक ज्योतिर्लिंगाला महागड्या अशा सोन्याचांदीच्या विविध वस्तू व हजारो रुपये अर्पण करतात. आजमितीला देवस्थानच्या खात्यात कोट्यावधींचा निधी पडून आहे. अधिक उत्पन्न वाढावे, यासाठी देवस्थानच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्या तुलनेत येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देवस्थान समितीच्या माध्यमातून नेमक्या कोणत्या व काय काय सुविधा मिळतात? हा खरा प्रश्न आहे.

दुसरीकडे देशातील एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असलेले श्री भीमाशंकर मंदिर व भाविकांची सुरक्षा वाऱ्यावरच दिसते. दुर्गम भागात असूनही या मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने आजपर्यंत दीर्घकालीन अशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. याकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. दरवर्षी श्रावण महिना आणि महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान व विविध शासकीय विभागांच्या सयुंक्त माध्यमातून भाविकांना सुविधा देण्याबाबत युद्धपातळीवर नियोजन आखले जाते. परंतु ते कागदोपत्रीच राहते. पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण होते.

दरम्यान, नाशिक येथील कुंभमेळ्यामुळे भीमाशंकर येथे यंदा मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाला भाविकांना सुविधा पुरविताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. भीमाशंकर येथे आजही अनेक प्राथमिक सुविधांची वानवा असून प्रामुख्याने यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, महिला व पुरुषांना वेगवेगळी स्नानगृहांची निर्मिती, जेष्ठ भाविकांना विश्रांतीसाठी पुरेशी जागा, कायमस्वरूपी छोटेखानी हॉस्पिटल, श्रावण महिन्यात विविध शासकीय कर्मचाऱ्यांना विश्रांती गृह आदि महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. कोकणकडा व बसस्थानकाजवळ दोन स्वच्छतागृहे बांधण्यात आली असली तरी ती भाविकांच्या लवकर निदर्शनास येत नाहीत. त्यामुळे या स्वच्छतागृहांचा वापर अधिक प्रमाणात होत नाही. मंदिराच्या खालील बाजूला गेल्यावर्षीपासून एका स्वच्छतागृहाचे काम कासव गतीने सुरू असून ते लवकर पूर्ण करण्याची गरज आहे. ही स्वच्छतागृहे सोडली तर भाविकांच्या सोयीसाठी इतर काहीही सुविधा नाहीत. मंदिराच्या परिसरात भाविकांना अजून स्वच्छतागृहांची आवश्यकता असून त्या दृष्टीने मंदिर प्रशासन समितीने पावले उचलण्याची गरज आहे. पाणी देखील येथील एक प्रमुख समस्या आहे. त्यामुळे पिण्यासाठी भाविकांना प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागतात.

दुसरीकडे मंदिराच्या पाठीमागे बांधण्यात आलेली अर्धवर्तुळाकार इमारतीची दुरवस्था झाली असून दर पावसाळ्यात ती मोठ्या प्रमाणात गळते. पावसाळ्यात या ठिकाणी बसणे अवघड असते. या इमारतीच्या वरच्या बाजूला भाविकांना बसण्यासाठी खेळाच्या स्टेडियमसारखी रचना केलेली आहे. परंतु पावसाळ्यात या ठिकाणी बसण्यास जागा नसते. सर्वत्र पावसाचे पाणी असते. तसेच इमारतीच्या वरच्या भागात असलेला आच्छादनाचा पत्रा अनेक ठिकाणी उखडला गेलेला असून जोरदार हवेमुळे तो लांब उडून भाविकांच्या जीवाला घातक ठरू शकतो. त्यामुळे इमारतीवरील सर्व पत्रे काढून टाकण्याची गरज असल्याचे भाविकांनी सांगितले. ही इमारत पाडून या जागेत एखादी सुसज्ज इमारत बांधून या ठिकाणी भाविकांना काही प्राथमिक सुखसुविधा देण्यात आल्या, तर मंदिर परिसरातच भाविकांना मोठी सोय उपलब्ध होऊ शकते.

या ठिकाणी प्रशासकीय कार्यालय, भाविकांसाठी स्नानगृहे, विश्रांतीगृहे, हॉस्पिटल, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी तात्पुरते विश्रांतीगृह आदि करणे शक्य आहे. आजही मंदिर परिसरात एखादी अतिमहत्त्वाची व्यक्ती आल्यास त्या व्यक्तीला वापरण्यासाठी या ठिकाणी साधे स्वच्छतागृह देखील नाही. ही वस्तुस्थिती आहे. या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना स्थानिक ग्रामस्थांच्या घरी जाणे हाच एकमेव पर्याय आहे. अनेक भाविक दर्शनापूर्वी स्नान करणे पसंत करतात. या ठिकाणी स्नानासाठी बंदिस्त सोय नसल्यामुळे भाविकांना मंदिराच्या मागे असलेला हातपंप व मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या मोक्ष कुंड हेच दोन पर्याय उपलब्ध आहेत. तसेच स्नान झाल्यानंतर भाविकांना उघड्यावरच कपडे बदलावे लागतात. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्केट यार्डाच्या पार्किंग शुल्कात वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बाजार समितीच्या मार्केट यार्डाबाहेरील वादग्रस्त पार्किंगचा ठेका पुन्हा एकदा खासगी ठेकेदारास देण्यात आला आहे. पार्किंग सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी दुचाकीच्या शुल्कात दोन रुपयांनी, तर मोठ्या वाहनांच्या दरात ५ ते २० रुपयांनी वाढ केल्याने वाहनचालकांना धक्का बसला आहे.

आठवडाभर मार्केट यार्डातील पार्किंगमध्ये वाहने लावणाऱ्या ग्राहकांसह व्यापाऱ्यांना एका रात्रीत पार्किंग शुल्कात दरवाढ झाल्याचे आढळल्याने वाहन चालकांनी संताप व्यक्त केला. त्याशिवाय वाहन चालकांची आणि ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांशी पैसे घेण्यावरून वादावादही झाली.

काही महिन्यांपूर्वी पार्किंग चालविण्याचा मुद्दा बाजार समितीत चांगलाच वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे खासगी ठेकेदाराला देण्याऐवजी अखेर बाजार समितीने स्वतःच पार्किंगचे नियमन करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. सहा ते सात महिन्यांपासून पार्किंगचा व्यवहार सुरळीत सुरू होता. प्रशासनाकडून दुचाकीसाठी तीन रुपये, तर विविध प्रकारच्या कार, जीपसाठी ५ ते १० रुपये शुल्क आकारले जात होते. अवजड वाहनांसाठी २० रुपये आकारण्यात येत होते. मात्र, अचानकपणे बाजार समितीने स्वतःवरील ही जबाबदारी खासगी ठेकेदार संस्थेला देण्याचा निर्णय घेतला. गगनगिरी इंटरप्रायझेसकडून दुचाकीसाठी ५ रुपये, जीप, कारसाठी २० रुपये, तर अवजड वाहनांसाठी ३० रुपये शुल्क उकळण्यास सुरुवात झाली. ठेकेदार संस्थेच्या ठेक्याच्या पहिल्याच दिवशी शुल्कात वाढ केल्याचा फटका वाहनचालकांना शनिवारी, तसेच रविवारी सकाळी बसला. कालपर्यंत शुल्क परवडणारे होते. त्यामुळे एका रात्रीत अचानक वाढ झाल्याने वाहन चालक आणि ठेकेदार संस्थेच्या कर्मचाऱ्यांशी वादावाद सुरू झाली.

पार्किंगच्या मुख्य प्रवेशद्वारावर 'प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समिती वाहन तळ' असे बॅनर लावण्यात आले आहे. वाहनचालकांना मात्र गगनगिरी इंटरप्रायझेस नावाची पावती देण्यात येत होती. त्यामुळे बॅनर बाजार समितीच्या नावाचे असले, तरी ठेका मात्र खासगी संस्थेचा असल्याचे त्यावरून स्पष्ट झाले. पूर्वीप्रमाणे दुचाकीसाठी तीन रुपये देण्यात येत होते. मात्र ठेकेदार संस्थेकडून पाच रुपयांची आकारणी केली जात असल्याने त्यावरून वादावादी झाल्याने हा ठेकेदार बदलाचा प्रकार समोर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेंगदाण्यासह तूरडाळ तेजीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शेंगदाण्याला मागणी वाढल्याने, तसेच तुटवडा निर्माण होऊ लागल्याने शेंगदाण्याचे भाव वाढले आहेत. त्याशिवाय तूरडाळ, खोबरेल तेल्याच्या दरातही वाढ झाली आहे.

शेंगदाण्याची निर्यात वाढली असल्याने अंतर्गत बाजारात त्याची उपलब्धता कमी झाली आहे. परिणामी तुटवडा निर्माण झाली आहे. सध्या बाजारात जुना साठा येत असून तो देखील अपुरा पडला आहे. सध्या शेंगदाण्याची मागणी वाढली आहे. शेंगदाण्याची नवीन आवक होण्यास तीन महिन्यांचा कालावधी आहे. परिणामी आणखी भाववाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली. खाद्यतेल, तांदूळ, साखर, गूळ, गहू, ज्वारी, बाजरी, कडधान्ये, साबुदाणा, पोहा, मिरचीचे भाव स्थिर राहिले.

खोबरेल तेलाच्या दरातही १५ किलोमागे १०० रुपयांची वाढ झाली आहे, तर अन्य डाळींचे दर स्थिर असले तरी तूरडाळीच्या दरात थोडीशी वाढ झाली आहे. क्विंटलमागे तूरडाळीला ११ हजार ५०० रुपये असा दर मिळाला आहे. त्यात वाढ होईल, असे व्यापारी सांगत आहेत.

मराठवाडा, विदर्भात पाऊस नाही. त्यामुळे पेरणीचे प्रमाण घटले. गेल्या वर्षीदेखील दुष्काळसदृश स्थिती होती. त्यामुळे त्याचा फटका डाळींना बसला आहे. यंदा डाळींचे दर कमी जास्त होण्यास पाऊसच कारणीभूत आहे. एकीकडे सरकारने डाळी आयात करणार असल्याचे जाहीर केले. मात्र, अद्याप आयात केली नाही. त्याबाबत हालचाली झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे जोरदार पाऊस होत नाही, तोपर्यंत डाळींचे भाव गगनाला भिडलेलेच राहतील, अशी शक्यता डाळींचे व्यापारी नितीन नहार यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मक्याच्या कणसाला ‘भाव’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संततधार पडणाऱ्या पावसात निसर्गाच्या हिरवळीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक बच्चेकंपनीसह बाहेर पडताना दिसत आहेत. त्याचवेळी कांद्याचे दर गगनाला भिडल्याने कांदाभजीऐवजी काही तरी गरम खाण्याची इच्छा होते. त्यामुळे भाजलेल्या मक्याच्या कणसाला अथवा स्वीटकॉर्न खायला मिळाले तर..!

पावसाळ्याच्या वातावरणामुळे शहरात खडकवासल्यापासून ते सिंहगडापर्यंत मक्याच्या कणसाला आता चांगली पसंती मिळू लागली आहे. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात सुमारे दोन हजार पोती मक्याच्या कणसाची आवक झाली. घाऊक बाजारात १० ते १३ रुपये असा प्रतिकिलोसाठी दर होता. सध्या खेड, मंचर नारायणगाव, बारामती, नाशिक या भागातून कणसाची आवक होत आहे. शहरात सध्या संततधार पावसाला काही दिवसांपासून सुरुवात झाली. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनासाठी पुणेकर घराबाहेर पडू लागले आहे. ठिकठिकाणी मक्याच्या कणसाच्या विक्रेत्यांनी भाजलेली कणसे विकायला ठेवल्याचे दिसून येत आहे. परिणामी, पर्यटन ठिकाणी स्वीटकॉर्न, भाजलेल्या कणसांना मागणी वाढली आहे.

मक्याच्या कणसाला मागणी वाढल्याने बाजारात, तसेच किरकोळ ग्राहकांकडून मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. येत्या आठवड्यात त्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्तवित आहेत. पुणे शहराबरोबर जिल्ह्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडला, तर त्याला आणखी मागणी वाढेल. किरकोळ बाजारात सध्या भाजलेल्या कणसाला २० ते २५ रुपये द्यावे लागत आहेत.

पर्यटनस्थळी विक्रेत्यांकडून मक्याच्या कणसाची मोठी विक्री होते. ग्राहकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांची चांदी होत आहे. एका कणसाला अपेक्षेपेक्षा अधिक भाव आकारला जात आहे.

- पांडुरंग सुपेकर, व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फ्लॉवर, काकडी, कोबी महाग

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मध्यंतरी पावसाने दिलेली ओढ, तर काही ठिकाणी पावसामुळे वाया गेलेली पिके यामुळे मार्केट यार्डात रविवारी आवक घटली आहे. परिणामी, कांद्याचे भाव गगनाला भिडत असताना आता लसूण, काकडी, फ्लॉवर, कोबी, भुईमूग शेंगाच्या दरात वाढ झाली आहे. त्या तुलनेत पालेभाज्या मात्र सामान्यांच्या आवाक्यात आल्याचे घाऊक, तसेच किरकोळ बाजारात पाहायला मिळाले.

मार्केट यार्डात १६० ते १७० ट्रक फळभाज्यांची रविवारी आवक झाली. पावसाने गेल्या जून-जुलै महिन्यात मोठी ओढ दिली. त्यामुळे पेरणी केलेल्या पिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही. जुलै अखेरीस थोड्याबहुत झालेल्या पावसामुळे त्यांना जीवदान मिळाले. पण काही ठिकाणी जोरदार झालेल्या पावसाने काही पिके खराब झाली. त्याचा परिणाम म्हणून बाजारात आवक घटली.

परराज्यातून बेळगाव, धारवाड येथून ४ ते ५ टेम्पो कोबी, मटारची आवक झाली. कर्नाटकाहून ७ ते ८ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून शेवग्याची ५ ते ६ टेम्पो, मध्य प्रदेश, कर्नाटकातून हिरवी मिरचीची १० ते १२ टेम्पो, इंदूरहून गाजरची सहा टम्पो आवक झाली. बंगळुरूनहून आल्याची अडीचशे पोती, तर साताऱ्याहून ५५० पोत्यांची आवक झाली.

स्थानिक भागातून फ्लॉवर, कोबीची आवक घटली आहे. त्यामुळे फ्लॉवरचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत दुप्पट झाले आहेत. लसणाने देखील कांद्याप्रमाणे उचल खालली आहे. त्यामुळे लसणाच्या दहा किलोसाठी ४०० ते ९०० रुपये मोजावे लागणार आहेत. तोंडली, शेवग्याच्या दरात आवक घटल्याने वाढ झाली आहे. घेवड्याची आवक घटल्याने त्याच्या दरात वाढ झाली असून दहा किलोसाठी ३०० ते ४०० रुपये द्यावे लागणार आहेत. भुईमूग शेंगाची १५० ते १७५ टेम्पोची आवक झाली असून आवक घटल्याने एका किलोसाठी ५० रुपये दर द्यावा लागत आहे, तर दहा किलोसाठी ४५० ते ५०० रुपये दर झाला आहे.

पारनेरहून २ ते ३ टेम्पो मटारची, तर पावट्याची ४ ते ५ टेम्पोची आवक झाली. तांबडा भोपळ्याची ७ ते ८ टेम्पो एवढी आवक झाली. कांद्याची गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी आवक झाली असून यापुढे आवक घटणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे. ४० ते ५० ट्रक एवढीच कांद्याची आवक झाली. इंदूर, आग्रा, नाशिक येथून बटाट्याची ७० ट्रक, तर लसणाची मध्य प्रदेशातून साडेतीन हजार गोणींची आवक झाली. कोथिंबीरची दीड लाख जुडीची, तर मेथीची एक लाख जुडीची आवक झाली. पालेभाज्या आता सामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत.

मासळीची आवक कमी

आषाढ महिना सुरू असला, तरी मासळीची आवक वाढायला अपेक्षित असताना आवक होत नाही. हावडा, आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील मासळी बंद झाली आहे. परिणामी, तेथून होणारी मासळीची आवक कमी झाली आहे. त्यात गुजरातहून गेल्या आठवड्यात मासळीची आवक तुरळक स्वरूपात झाली होती. परंतु, ती सुद्धा या आठवड्यात झाली नसल्याने आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने सर्वच मासळीच्या दरात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारामध्ये खोल समुद्रातील मासळीची चार टन, खाडीच्या मासळीची दोनशे ते अडीचशे किलो, नदीच्या मासळीची चारशे ते पाचशे किलो, तर आंध्रच्या रहू, कतला मासळीची १५ टन आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. आषाढ महिना सुरू झाल्याने अंड्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे इंग्लिश अंड्याच्या भावामध्ये शेकड्यामागे वीस रुपयांची वाढ झाली असून गावरान अंड्याच्या भावामध्ये शेकड्यामागे वीस रुपयांनी घट झाली आहे. चिकनचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे अंड्याचे व्यापारी रूपेश परदेशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ मराठीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्वाधिक लोकप्रिय कादंबऱ्यांपैकी एक असलेली 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' ही महाकादंबरी आता मराठी वाचकांच्या भेटीला आली आहे. डायमंड पब्लिकेशनने ही कादंबरी 'स्वामी मुद्रिकांचा' या नावाने तीन खंडांत प्रकाशित केली आहे.

जे. आर. आर. टॉल्कीन यांनी लिहिलेली 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' ही कादंबरी १९५४मध्ये प्रकाशित झाली. अद्भूतरम्य, काल्पनिक कथानक असलेली ही कादंबरी जगभरातील वाचकांनी डोक्यावर घेतली. १५ कोटींहून अधिक प्रतींची विक्री, ३८ भाषांमध्ये अनुवाद असे विक्रम या कादंबरीच्या नावावर आहेत. मुग्धा कर्णिक यांनी या कादंबरीचा अनुवाद करण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. मुद्रिकेचे साथीदार, ते दोन मनोरे व राजाचे पुनरागमन या तीन खंडांत त्यांनी हा अनुवाद केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ऑस्कर पुरस्कार विजेते चित्रकार अॅलन ली यांनी चितारलेली मूळ चित्रेही कादंबरीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

प्रकाशक नीलेश पाष्टे यांनी या विषयी माहिती दिली. 'रोचक-रंजक, अद्भूतरम्य असे साहित्य मराठीत फार कमी आहे. या पार्श्वभूमीवर, लॉर्ड ऑफ द रिंग्ज मराठीत प्रकाशित करणे हा प्रकल्प महत्त्वाचा आणि भव्य होता. फार मोठा पट असलेले आणि आख्यायिकांच्या माध्यमातून उलगडणारे साहसपूर्ण कथानक मराठी वाचकांना अनुभवता यावे, या विचाराने ही कादंबरी प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला,' असे त्यांनी सांगितले.

चित्रपटही गाजले...

लॉर्ड ऑफ द रिंग्ज याच कादंबरीवर आधारित पीटर जॅक्सन यांनी दिग्दर्शित केलेले तीन चित्रपटही बरेच गाजले होते. द फेलोशिप ऑफ द रिंग, द टू टॉवर्स आणि द रिटर्न ऑफ द किंग या नावाने ते प्रदर्शित झाले होते. इंग्रजी चित्रपटांच्या इतिहासात सर्वाधिक व्यवसाय करणाऱ्या चित्रपटांत त्यांचा समावेश होतो; तसेच या तीन चित्रपटांनी मिळून सतरा ऑस्कर पुरस्कारही पटकावले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षारक्षकांच्या वेतनासाठी उपोषण

0
0

पुणे : बँक ऑफ इंडिया एटीएममधील (एफआयएस) नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांना सहा महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही. वारंवार निवेदन देऊनही संबंधित अधिकारी चर्चेसाठी उपस्थित राहात नाहीत. या प्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनतर्फे ११ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. बँकेच्या सर्व एटीएममध्ये मंडळाकडील नोंदणीकृत रक्षकांची नेमणूक करावी, थकित वेतन फरकासहित द्यावे, मासिक पगार सात तारखेच्या आत द्यावा आदी मागण्या युनियनतर्फे करण्यात आल्या आहेत, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष डॉ. गणेश आंबिके, कार्याध्यक्ष वृद्धेश्वर गवळी, सरचिटणीस संदीप भोसले आदींनी पत्रकाद्वारे दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्हॉटस‍्अॅप’मुळे कोमेजली फुले...

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे मैत्री दिन. मैत्रीचे प्रतीक असलेले पिवळे गुलाब फूल देऊन मैत्रीचे टिकविण्याचा आणि वाढविण्याचा हा खरा दिवस! पण मोबाइलवरील व्हॉटस्अॅपसारख्या प्रगतिशील तंत्रक्रांतीमुळे; तसेच सोशल मीडियामुळे पिवळ्या रंगाच्या फुलांना रविवारी फारसा भाव मिळालाच नाही. व्हॉटस्अॅपवरून कृत्रिम फुलांसोबत मैत्रीचे गोडवे गात मैत्री दिन साजरा करण्यात आल्याने मार्केट यार्डातील फुले कोमजून गेली.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी पिवळे गुलाबाचे फूल देऊन मैत्री अबाधित असल्याचा संदेश देण्याची प्रथा आजपर्यंत चालत आली आहे. परंतु सोशल मीडियामुळे या प्रथेला काही प्रमाणात फाटा मिळत गेल्याचे निरीक्षण मार्केट यार्डातील फुलविक्रेते सागर भोसले यांनी नोंदविले. पिवळ्या रंगाच्या २० फुलांच्या एका गड्डीला १०० ते १५० रुपये असा भाव मिळाला. पुण्यासह तळेगाव दाभाडे, जातेगाव, जयसिंगपूर येथून पिवळ्या रंगाच्या फुलांची आवक झाली, अशी माहिती भोसले यांनी दिली.

पोलिसांसह फ्रेंडशिप डे

युवा स्पंदन परिवार व वंदे मातरम् संघटनेच्या युवा वाद्य पथकाच्या वतीने चतुःश्रुंगी व सांगवी पोलिस स्टेशन येथे फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण सावंत यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे चेतन धोत्रे, स्वप्नील काळे, सौरभ धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

'शिवबंधन डे'

शिवसेनेच्या मुंढवा-केशवनगर शाखेच्या वतीने शिवबंधन बांधून फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला. विभागप्रमुख विक्रम लोणकर, पुणे कँटोन्मेंट बँकेचे संचालक देवेंद्र भाट, प्रभाग प्रमुख विजय दरेकर, उपविभाग प्रमुख राहुल शिंदे, अमृता जामले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वटवाघळे झाली बेघर

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वटवाघळांची शहरातील सर्वांत मोठी कॉलनी अशी ओळख असलेला मृत्युंजयेश्वर मंदिर परिसरातील सुरूचे बन जमीनदोस्त केल्याने वटवाघळे आता बेघर झाली आहे. याच परिसरातील इतर झाडांवर सध्या त्यांनी आश्रय घेतला असून लवकरच वटवाघळांची ही कॉलनीदेखील शहराकडे पाठ फिरवणार आहे.

शहरातील ऐतिहासिक मंदिरे आणि जुन्या वाड्यांमध्ये पूर्वी वटवाघळे मोठ्या संख्येने वास्तव्यास होती. मध्यवर्ती पुण्यातही गेल्या दोन दशकांपर्यंत वटवाघळांच्या वस्त्या होत्या. पण वाड्यांच्या जागांवर इमारती उभारल्या आणि हळूहळू वटवाघळे मध्यवर्ती पुण्यातून हद्दपार झाली. कोथरूड परिसरातील मृत्युंजयेश्वर मंदिरासमोर शहरातील सर्वात मोठी वस्ती आत्तापर्यंत टिकून होती. मंदिरासमोर असलेल्या एका खासगी कंपनीच्या जागेत सुरूच्या झाडांचे बन असल्यामुळे हजारांच्या संख्येत वटवाघळे येथे वास्तव्यास होती. मात्र, काही दिवसांपूर्वी जागामालकांनी टप्प्याटप्याने येथील झाडे कमी केली आहेत. गेल्या आठवडाभरात सगळी झाडे तोडली असून हा परिसर बोडका झाला आहे. त्यामुळे या झाडांवर राहणारी वटवाघळे सध्या याच परिसरातील इतर झाडांवर, जवळच्या बंगल्यांना लागून असलेल्या वृक्षाच्छादित प्रदेशात आश्रयाला गेली आहेत. वटवाघळे राहण्यासाठी मुख्यतः उंच आणि मोठ्या झाडांची निवड करतात. मृत्युंजयेश्वर मंदिर परिसरातील त्याचे वसतिस्थान नष्ट झाले असेल तर ही वटवाघळे

सुरुवातीला पांगतील, त्याच भागात पुन्हा वस्ती करण्यास योग्य जागा मिळाल्यास ते तिथे थांबतील; अन्यथा नवीन जागा शोधतील, अशी माहिती वटवाघळांचे अभ्यासक राहुल प्रभूखानोलकर यांनी सांगितले. सुरूची झाडे तोडण्यासाठी जागा मालकांनी उद्यान विभागाकडे अर्ज केला होता. दर काही दिवासांनी एकेक झाड कोसळत होते. त्यामुळे आम्ही वृक्षतोडीस परवानी दिली, अशी माहिती उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images