Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गुन्हे शाखेकडून सात पिस्तुले जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गुन्हे शाखेने चार ठिकाणी स्वतंत्र कारवायांद्वारे सात पिस्तुले आणि १९ काडतुसे जप्त केली. शहरात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्यांत १९ पिस्तुले आणि ३५ काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती पो​लिस आयुक्त के. के. पाठक यांनी दिली.
शहरात पिस्तुलांच्या तस्करीत ३०० गुन्हेगार आढळले आहेत. या गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही पाठक यांनी स्पष्ट केले. या वेळी सहआयुक्त सुनील रामानंद, अप्पर आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त राजेंद्र जोशी उपस्थित होते. 'बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्यांची गय केली जाणार नाही. उत्तरेतून ही शस्त्रे आणण्यात येत असून वेळप्रसंगी त्या-त्या राज्यात जाऊन धडक कारवाई करू,' अशी ठोस भूमिकाही पाठक यांनी बोलून दाखवली. गेल्या सहा महिन्यांत ४४ पिस्तुले आणि ७५ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यापैकी २६ पिस्तुले एकट्या गुन्हे शाखेने पकडली आहेत, असे पाटील म्हणाले. गेल्या दोन महिन्यांत पिस्तुलांची तस्करी करणाऱ्या १३ आरोपींवर कारवाई केली आहे. लवकरच ल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पिस्तुलांबाबतच्या गुन्ह्यांसाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अजिनोमोटो वापरावर बंदीची मागणी

0
0

आमदार मुळीक यांचे एफडीएला पत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चवीसाठी हॉटेल तसेच चायनीज पदार्थांच्या विक्रेत्यांकडून अॅजिनोमोटो या रासायनिक घटकाचा सर्रास वापर होत असल्याने त्याच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आमदार जगदीश मुळीक यांनी केली.

या संदर्भात मुळीक यांनी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) खात्याचे मंत्री गिरीश बापट यांच्याकडे पत्र दिले आहे. अजिनोमोटो रासायनिक घटकाचा चवीसाठी हॉटेल तसेच चायनीजच्या पदार्थांमध्ये वापर करण्यात येतो. घटकाच्या सेवनामुळे कॅन्सर, मूत्रपिंडाचे विकार तसेच हाडांमध्ये ठिसूळपणा येतो. तसेच, मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतो. मॅगीसारख्या नूडल्समध्ये या रासायनिक घटकाच्या निकषांपेक्षा अधिक प्रमाण वापरल्याचे आढळून आले होते. त्यामुळे मॅगीवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले.

चायनीज पदार्थांच्या सेवनातून अजिनोमोटो रासायनिक पदार्थ हे शरीरात जातात. त्यामुळे विविध विकार होण्याचा धोका आहे. त्यामुळे या घटकाच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आमदार जगदीश मुळीक यांनी गिरीश बापट यांच्याकडे केली. त्या संदर्भात मुंबईत त्यांना निवेदन दिले. सामान्य नागरिक रस्त्यावरील अन्न हॉटेल, मॉल, चायनीज सेंटर याठिकाणी खाद्यपदार्थ सेवन करतात. अजिनोमोटो पदार्थाबाबत व त्याच्या परिणामाबाबत सामान्य नागरिकांमध्ये फारशी जनजागृती नाही. त्या करिता बंदी घालण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येत्या दोन दिवसांत तुरळक पाऊस

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहर आणि परिसरात गुरुवारी तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. रात्री साडेआठपर्यंत शहरात ०.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवसांत शहरात पावसाच्या काही सरींची शक्यता असून राज्यात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

शहर आणि परिसरात गुरुवारी तुरळक स्वरूपाच्या सरींनी हजेरी लावली. काही उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. लोहगाव येथे दोन मिमी पावसाची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वर येथे (२६ मिमी) झाली. कोल्हापूर येथे दोन मिमी, सांगली, सातारा, मुंबई, सांताक्रूझ, अलिबाग येथे प्रत्येकी एक मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम राजस्थान व लगतच्या परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र असून त्याची तीव्रता कमी झाली आहे; तर बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागावर असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर आता 'कोमेन' या चक्रीवादळात झाले आहे. पुढील दोन दिवसांत पुण्यात पावसाच्या काही सरींची हजेरी लागण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तुरळक ठिकाणी जोरदार; तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंत्रमंत्रांद्वारे पुत्रप्राप्तीचे उपाय पडले महागात

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

तंत्रमंत्राचा वापर केल्यास पुत्रप्राप्ती कशी होऊ शकते किंवा कोणते उपाय केल्यास मुलगा कसा होऊ शकतो या विषयीच्या पुस्तकांच्या आठ लेखकांसह प्रकाशकांविरोधात गर्भलिंग निदान आणि प्रसूतीपूर्व निदान (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार खटले दाखल करण्यात आले आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत असलेल्या 'पीसीपीएनडीटी' कक्षामार्फत गेल्या दीड महिन्यांत कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. सिद्धयंत्र चिंतामणी, मुलगाच कसा होईल, मंत्र-तंत्र तोडगे भाग एक, दोन, तीन, मंत्र-तंत्र-यंत्र आणि प्रभावी तोडगे, ५५५ तोडगे अशा विविध पुस्तकांच्या लेखकांसह प्रकाशकांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत. एका प्रकाशकाने पुत्रप्राप्तीसंदर्भातील पुस्तके विक्रीस उपलब्ध केल्याचे उघडकीस आल्याची माहिती कक्षाच्या प्रमुख सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी दिली.

'कलम २२ मध्ये कोणत्याही व्यक्तीला अथवा संस्था, क्लिनिक, प्रयोगशाळा तसेच सोनोग्राफी मशिन, पुस्तके अथवा इंटरनेटद्वारे पुत्रप्राप्तीसंदर्भात किंवा लिंगनिदानाची माहिती देता येत नाही. असा कोणी प्रयत्न केल्यास त्याच्याकडून कायद्याचा भंग झाल्याचे समजण्यात येते. त्यानुसार आठ लेखकांनी पुत्रप्राप्तीसंदर्भात लिहिलेल्या पुस्तकांमध्ये विविध उपाय सांगितले आहेत. असे साहित्य लिहिणे, प्रकाशित करणे हा देखील कायद्यान्वये गुन्हाच आहे. एका सोनोग्राफी मशिन सेंटरकडे रेकॉर्ड नसल्याने तसेच, मशिनची नोंदणी नसल्याने त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ पाहणीसाठी केंद्राचे पथक

0
0

अहवाल सादरीकरणानंतर मदतीचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाने ओढ दिल्याने राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक औरंगाबाद विभागात भेट देणार आहे. या पथकाचा अहवाल सादर झाल्यानंतर राज्याला मदत देण्यासंदर्भात केंद्र सरकार निर्णय घेणार आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटकाचा काही भाग, तेलंगण, गुजरातच्या काही भागांत पावसाने ओढ दिल्याने टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी विभागाचे सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी दौऱ्यावर आहेत. नुकतीच त्यांनी कर्नाटकला भेट दिली. त्यानंतर मुंबईत राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

राज्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे निर्माण झालेली स्थिती, पावसाचे प्रमाण, पेरण्यांची स्थिती आणि दुबार पेरण्यांची शक्यता, तयारी या संदर्भात राज्य सरकारच्या वतीने कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी सादरीकरण केले. या पथकाचे सदस्य येत्या काही दिवसांतच टंचाईग्रस्त भागात भेट देऊन पाहणी करणार आहेत. यंदा मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्या पार्श्वभूमीवर हे पथक औरंगाबाद विभागात भेट देणार आहे.

जुलै महिना संपत आला तरी, अद्याप राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण पन्नास टक्क्यांहून कमी आहे. अकरा जिल्ह्यांमध्ये पन्नास ते ७५ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला असून, केवळ तेरा तालुक्यांमध्ये ७५ ते शंभर टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे. या परिस्थितीमुळे अनेक भागांमध्ये झालेल्या पेरण्या अडचणीत आल्या आहेत. काही भागांत दुबार पेरण्यांची वेळ आली आहे.

धरणांतील पाणीसाठा

धरण पाऊस उपयुक्त साठा

(मिलीमीटर) टीएमसी टक्केवारी

टेमघर २३ १.०२ २७.४६

पानशेत ११ ६.०३ ५६.६६

वरसगाव ११ ४.९८ ३८.८१

खडकवासला ०२ ०.८१ ४१.०१

एकूण ४७ १२.८४ ४४.०४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्लीज गिव्ह द अॅडमिशन’

0
0

दस्तुरखुद्द शिक्षण उपसंचालकांचाच ऑफलाइनवर भर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थळ : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या कार्यालयातील अँटि चेंबर. वेळ : दुपारी ३ नंतर.

गर्दीमधील एक जण : साहेब एमएमसीसीला अॅडमिशन पाहिजे..

साहेब : अरे बाबा, त्यांनी कोटा सरेंडर केला आहे. तिथे नाही होणार...

अर्जदार : साहेब, ते नाही तर मग किमान कलमाडीला तरी पाहिजे..

साहेब : अरे बाबा, कलमाडी साहेब ओरडायला लागलेत माझ्यावर, किती अर्ज पाठवतो म्हणून... असं म्हणत म्हणतंच साहेब प्रवेश अर्जावर शेरा मारतात, 'प्लीज गिव्ह द अॅडमिशन...'



अकरावीची प्रवेश प्रक्रिया अगदी १०० टक्के ऑनलाइन करण्याची प्रतिज्ञा घेतलेल्या पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अँटि चेंबरचे हे दृष्य यंदाही ऑफलाइन प्रवेश होणारच याची खात्री देणारे ठरले आहेत. विशेष म्हणजे 'साहेब' स्वतःच अशा अर्जदारांच्या अर्जांवर शेरे मारून संबंधित कॉलेजांकडे पाठवित असल्याने, कॉलेजांनाही हे प्रवेश नाकारणे आता जड जाऊ लागले आहे. मात्र, अशा प्रकारांमुळे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या आणि एकूणच उपसंचालक कार्यालयाच्या 'व्यवहारां'विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

अकरावीच्या ऑनलाइन प्रक्रियेतील पाचव्या टप्प्यातील प्रवेशांची यादी आज, शुक्रवारी जाहीर होत आहे. त्यापूर्वीच गेल्या काही दिवसांपासून शहरातील मध्यस्थांच्या माध्यमातून उपसंचालक कार्यालयाकडे ऑफलाइन प्रवेशांसाठीची सेटिंग लावली जात होती. अकरावीच्या अधिकृत ऑनलाइन प्रवेशांमुळे ऑफलाइन प्रवेशांसाठीची ही सेटिंग काहीही कामाची नसल्याची बाब गेल्या काही दिवसांपासून समोर येत होती. मात्र, या प्रक्रियेचे टप्पे संपुष्टात येताच, हव्या त्या कॉलेजांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि पालक आता अशा मध्यस्थांद्वारे उपसंचालकांपर्यंत पोहोचले आहेत. ऑफलाइन प्रवेश देणाऱ्या कॉलेजांवर कारवाया करण्याच्या घोषणा करणारे उपसंचालकच कॉलेजांच्या प्राचार्यांसाठी प्रवेश देण्याचे निर्देश देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांनो द्या जेनेर‌िक औषधे

0
0

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा 'आयएमए'ला आदेश

म.टा. प्रतिनिधी, पुणे

उपचाराचा खर्च परवडत नसतानाही डॉक्टरांकडून पेशंटांना महागडी अन् ब्रँडेड कंपन्यांची औषधे लिहून दिली जातात. या प्रकारांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चाप लावण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टरांनी आता केवळ जेनेर‌िक औषधेच प्रिस्क्रिप्शनवर लिहून द्यावीत, असा आदेशच जारी करण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव अली रिझवी यांनी पत्राद्वारे 'इंडियन मेडिकल असोसिएशन'ला (आयएमए) वरीलप्रमाणे सूचना दिली आहे. या संदर्भात देशभरातील नागरिकांसह आरोग्यविषयक काम करणाऱ्या संस्थांकडून १७ ऑगस्टपर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत.

सरकारी आरोग्यसेवा कुचकामी ठरत असल्याने नागरिकांना नाइलाजास्तव खासगी तसेच महागड्या उपचारांवर अवलंबून राहावे लागत आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टरांपासून ते अतिदक्षता विभागापर्यंत, तसेच नर्सेसपासून ते ऑपरेशन थिएटर आदींसारख्या सेवांचे बिल पेशंटच्या हातात ठेवले जाते. त्यात भरीस भर म्हणून डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शनवर लिहून दिल्या जाणाऱ्या महागड्या आणि ब्रँडेड कंपन्यांच्या औषधांच्या खर्चाचा बोजा पडतो. ब्रँडेड कंपन्यांची औषधे लिहिणाऱ्या डॉक्टरला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अनेक फायदे मिळतात. त्यावर 'मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया'ने देखील अनेक वेळा कारवाईचे इंजेक्शन दिले आहेत. विविध आरोग्य सेवा-संस्थांकडून जेनेर‌िक औषधांचा वापर वाढण्यासाठी प्रयत्न कऱण्यात येत आहेत. जेनेर‌िक औषधांचा पेशंटना फारसा गुण येत नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. मात्र, ही औषधे स्वस्त आणि गुणकारी असल्याचे अनेक वैद्यकतज्ज्ञांसह केमिस्टांचे मत आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटा-बुटात दुचाकींची चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

सुटा-बुटात वावरणाऱ्या आणि फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या दोघा चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी गेल्या दोन वर्षांत तब्बल २० दुचाकी चोरल्या असून त्याच्यासाह्याने चोरट्यांनी १२ सोनसाखळी चोरीचे गुन्हेही केल्याचे उघड झाले. दुचाकी चोरण्यासाठी 'जस्ट डायल'चा वापर करत, जवळचा 'की-मेकर' शोधून, त्याच्याकडूनच ड्युप्लिकेट चावी बनवण्याचा 'पराक्रम'ही त्यांनी केला.

गिरीश रामदास नायक (वय ५०, रा. गंगाधाम बिल्डिंग) आणि विजयन शिवनकुमार (४१, रा. धानोरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्वतःच्या चैनीसाठी चोऱ्या केल्याची कबुली या दोघांनी दिली आहे. हायफाय राहणीमुळे त्यांचा हा उद्योग सहसा कोणाच्या लक्षात आला नसल्याने त्यांचे फावले होते, अशी माहिती पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.

लुल्लानगर परिसरात अॅक्टिव्हावरील नंबर प्लेटमुळे गिरीशला ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्याने गेल्या दोन वर्षांपासून दुचाकी चोरत असल्याची कबुली दिली होती. गिरीशचा साथीदार विजयन असल्याचे लक्षात आल्यावर त्यालाही अटक करण्यात आली. कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी या दोघांकडे कसून चौकशी सुरू केली होती. या आरोपींनी गेल्या दोन वर्षांत २० दुचाकी चोरल्या आणि विकल्याची कबुली दिली. या सर्व दुचाकी जप्त करत त्यांच्या मालकांचा शोध सुरू करण्यात आला आहे. गिरीश हा मॅकनिक होता तसेच त्याने कॉलसेंटरमध्येही नोकरी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आझम कॅम्पसला नोटीस

0
0

सिंचन कपातीपोटी ५१ लाख रुपये वसूल करणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र कॉस्मोपोलिटीन एज्युकेशन सोसायटीच्या (एमसीई) आझम कॅम्पसला गेल्या सहा वर्षांची पाणीपट्टी थकविल्याबद्दल खडकवासला पाटबंधारे विभागाने नोटीस बजावली आहे. पाणीपट्टीसह त्यावरील सव्वापट दंड आकारणी आणि सिंचन कपातीपोटी ५१ लाख रुपये या संस्थेकडून वसूल करण्यात येणार आहेत.

खडकवासला धरणाच्या मुठा उजवा कालव्यातून पाणी मिळण्यासाठी एमसीई सोसायटीने सन २००९ मध्ये परवाना मागितला होता. कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर या संस्थेला बारा हेक्टर क्षेत्रासाठी पाणी परवाना मंजूर करण्यात आला. ही मंजुरी देताना सिंचन कपातीपोटी १२ लाख रुपये भरण्यास संस्थेला लेखी कळविण्यात आले. मात्र, संस्थेकडून ही रक्कम पाटबंधारे विभागाकडे भरली गेली नाही.

पाटबंधारे विभागाने दिलेल्या पाणी परवान्याच्या आधारे संस्थेने पाणीवापर सुरू केला. हा पाणीवापर होताना पुढील दोन वर्षांत संस्थेकडून पाणीपट्टी भरली गेली नाही. त्यामुळे सन २०११ मध्ये संस्थेचा पाणी परवाना रद्द करण्याचा निर्णय खडकवासला पाटबंधारे विभागाने घेतला आणि तशी नोटीस संस्थेला बजावली. त्यानंतरही संस्थेने पाणीवापर सुरूच ठेवला. संस्थेला यापूर्वीही थकबाकी भरण्यासंदर्भात कळविण्यात आले. तथापि, गेल्या सहा वर्षांत संस्थेने पाणीपट्टी व सिंचन कपातीची रक्कम न भरल्याने त्यांना थकबाकी वसुलीची नोटीस बजावण्यात आल्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता एन. डी. गायकवाड यांनी 'मटा'ला सांगितले.

संस्थेकडून गेल्या सहा वर्षांत झालेल्या पाणीवापराची पाणीपट्टी, परवाना रद्द झाल्यानंतरही वापर सुरू राहिल्याने सव्वापट दंड आकारणीचे ३९ लाख रुपये तसेच सिंचन कपातीचे थकित १२ लाख रुपये असे ५१ लाख रुपये भरण्यास नोटिशीद्वारे कळविण्यात आले आहे. या नोटिशीनंतर संस्थेने थकबाकी भरणे अपेक्षित आहे. तथापि, ही थकबाकी न भरल्यास संस्थेचे पाणी तोडण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राहुल गांधींची आज पदाधिकाऱ्यांशी चर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज (शुक्रवारी) ३१ जुलैला पुणे दौऱ्यावर येत असून काँग्रेस भवनला भेट देऊन गांधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच गांधी शहरात येत असल्याने ते नक्की काय बोलणार याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

शुक्रवारी सकाळी‌ साडेदहाच्या सुमारास लोहगाव विमानतळावरून गांधी थेट काँग्रेस भवन येथे जाणार आहे. शहरातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, पालिकेतील नगरसेवक यांच्यासह काही ज्येष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करून कामाचा आढावा घेणार आहे. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत शहरात काँग्रेसच्या उमेदवारांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. लोकसभेच्या निवडणुकीत तर तब्बल तीन लाखांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. या पराभवानंतर शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही उत्साह दिसून येत नव्हता. केंद्रात सध्या सत्तेवर असलेल्या भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेसने देशभरात जोरदार आंदोलन केले होते. त्याला शहरातही प्रतिसाद मिळाला होता. या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह पुन्हा एकदा पहायला मिळाला होता.

दोन वर्षानंतर होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष गांधी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्की कोणत्या सूचना काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांना देणार आहेत. तसेच, या भेटीमध्ये पक्षाचे पदाधिकारी राहुल गांधी यांच्यासमोर कोणती भूमिका मांडणार आहेत, तसेच शुक्रवारच्या संवादात ते भविष्यातील नवीन योजना काय सांगणार आहेत, याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्व-मूल्यांकनात पुणे दुसरे

0
0

स्मार्ट सिटी स्पर्धेतील १० शहरांची यादी आज जाहीर होणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' योजनेतील सहभागासाठीच्या राज्य स्तरावरील स्पर्धेत पुणे महापालिका दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्राच्या निकषांनुसारच्या स्व-मूल्यांकनात ठाण्याने अव्वल स्थान प्राप्त केले असून, या स्पर्धेचा सविस्तर निकाल आज, शुक्रवारी मुख्यमंत्र्यांतर्फे जाहीर केला जाणार असून, त्यात राज्यातील दहा शहरांची निवड घोषित केली जाईल.

केंद्राच्या स्मार्ट सिटीतील सहभागासाठी राज्याला १० शहरांची शिफारस करता येणार आहे. त्या अंतर्गत शहरांची निवड करण्यासाठी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारने निश्चित केलेल्या निकषांनुसार प्रत्येक शहराला स्व-मूल्यांकन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, सांगली, नवी मुंबई, कोल्हापूर अशा प्रमुख शहरांसह एक लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या इतर शहरे या स्पर्धेत सहभागी झाली होती.

लोकसंख्येच्या प्रमाणात स्वच्छतागृहांची उपलब्धता, ऑनलाइन तक्रार निवारण व्यवस्था, ई-न्यूजलेटर, पालिकेच्या बजेटची माहिती, कर्मचाऱ्यांचे वेतन, ऑडिट, पाणीपुरवठा विभागाचा देखभाल-दुरुस्तीवरील खर्च, भांडवली कामांची माहिती आणि जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत पूर्ण केलेल्या प्रकल्पांचा आढावा, अशा निकषांवर प्रत्येक शहराला स्व-मूल्यांकनाद्वारे गुणांकन निश्चित करायचे होते. त्यावर, आधारित स्वतंत्र सादरीकरणाची संधी देण्यात आली होती. राज्यातील विविध शहरांतर्फे केल्या गेलेल्या स्व-मूल्यांकनात ठाण्याने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ, दुसरे स्थान पुण्याने पटकाविले असून, नागपूर आणि पिंपरी-चिंचवड महापालिका संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. मार्च २०१२ पर्यंत जेएनएनयूआरएम अंतर्गत ८० टक्के प्रकल्प पूर्ण करण्यात पुणे पालिकेने यश प्राप्त केले होते. यामध्ये, १० पैकी पाचच गुण पालिकेला प्राप्त झाल्याने पुण्याला अव्वल स्थानापासून वंचित राहावे लागले आहे.





सूट मिळण्यासंदर्भात कागदपत्रांची मागणी

खडकवासला पाटबंधारे विभागाने संस्थेला पाणीपरवाना दिला आहे. हा परवाना देताना बारा लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले होते. आमच्या गरीब शैक्षणिक संस्थेला एवढी रक्कम भरणे शक्य नसल्याने त्यात सूट देण्याबाबत सांगितले होते; पण त्यावर पाटबंधारे विभागाने काहीही केले नाही. त्यासंदर्भातील काही कागदपत्रे आपण पाटबंधारे विभागाकडून मागविली आहेत. ही कागदपत्रे आल्यावर आपण या विषयावर बोलू, असे स्पष्टीकरण एमसीई सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी दिले आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'RSS चे विचार विद्यार्थ्यांवर लादले जाताहेत'

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

'देशातील सर्वच प्रमुख शिक्षण संस्थांमध्ये सरकारची ढवळाढवळ वाढली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार या संस्थांवर लादले जात आहेत', असा घणाघाती आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला.

एफटीआयआय (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) अध्यक्षपदी झालेल्या गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध आहे. गेल्या ५० दिवसांपासून हे विद्यार्थी संपावर आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांची आज भेट घेऊन राहुल यांनी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला. यावेळी विद्यार्थ्यांचे गाऱ्हाणे ऐकल्यानंतर राहुल यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. 'तुमचा आवाज ऐकला जात नाही म्हणून मी इथे आलो आहे. तुमच्या पाठिशी मी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही आता मागे हटू नका. ठाम राहा. हा आंदोलनाचा छोटा टप्पा आहे. तुमचं आंदोलन व्यापक बनवा. दिल्लीतही हे आंदोलन पोहोचू द्या', अशा शब्दांत राहुल यांनी विद्यार्थ्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला.

आंदोलक विद्यार्थ्यांना नक्षलवादी, हिंदूविरोधी म्हणणाऱ्या भाजप नेत्यांचाही राहुल यांनी समाचार घेतला. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठीच अशाप्रकारची मानहानी केली जात आहे. एखादं आंदोलन केंद्राला रुचलं नाही तर ते चिरडण्याची वृत्ती वाढत चालली आहे, असा गंभीर आरोप राहुल यांनी केला. २५० विद्यार्थांचा विरोध असताना एखादी व्यक्ती प्रमुखपदावर कशी काय बसू शकते?, असा सवालही राहुल यांनी उपस्थित केला. सध्या पंतप्रधान मोदी यांचाच आदेश प्रमाण आहे. तेच जर चौहान यांच्यासाठी आग्रही असतील तर त्यांचा आदेश डावलण्याची हिम्मत भाजपमध्ये कुणातही नाही, असा टोलाही राहुल यांनी लगावला.

आरएसएसच्या विचारसरणीची पेरणी सगळ्या शैक्षणिक संस्थामध्ये केली जात असली तरी अशाप्रकारे जबरदस्तीने दुसऱ्यांवर आपले विचार लादणे योग्य नाही. हा सगळा शिक्षणाचा खेळखंडोबा चालला आहे, अशी तीव्र नाराजीही राहुल यांनी व्यक्त केली. एफटीआयआयचा अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थी प्रतिनिधीही असला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. यावेळी राहुल यांच्यासोबत राज बब्बर आणि चिरंजीवी हे सुद्धा होते.

दरम्यान, ३ ऑगस्ट रोजी दिल्लीत धरणं आंदोलन करण्याची घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी केली.

भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने

राहुल गांधी यांना भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून आपला निषेध नोंदवला. राहुलविरोधी घोषणा देत या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. त्याचवेळी खासदार परेश रावल यांनीही राहुल यांच्यावर पलटवार केला आहे. 'गजेंद्र चौहान यांच्यामध्ये जर तुम्हाला भाजप कार्यकर्ता दिसत असेल तर राहुल गांधी काय चित्रपट निर्माते आहेत का?, असा सवाल रावल यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खूनप्र्रकरणी दोघांवर ‘मोका’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून केल्यानंतर पसार झालेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना अटक करून, त्यांच्यावर मोका (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांना अकरा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

महेश किरण डोंगरे (वय २८, रा. धावडेवस्ती, भोसरी) आणि श्रावण बाळासाहेब देशमुख (वय २४, रा. धावडेवस्ती) अशी दोघा सराईतांची नावे आहेत. त्यांच्या अन्य तीन साथीदारांचा पोलिस शोध घेत असून, यापूर्वी अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व महेश डोंगरे टोळीतील सदस्य आहेत. या सर्वांवर भोसरी पोलिस आणि विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सहायक पोलिस आयुक्त मोहन विधाते यांच्या विशेष पथकाने गुरुवारी (३० जुलै) रात्री चाकण येथील चिंबळी फाटा येथून दोघांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कारातील गुन्हेगार जितू पुजारी याने पॅरोलवर सुटल्यावर महेश डोंगरे याच्यावर बंदूकीतून गोळीबार केला होता. त्यामुळे त्याने साथीदारांच्या मदतीने पुजारी याचा मित्र गणेश वाघमारे याचा मार्च महिन्यात खून केला होता. पंधरा जणांनी हा खून केल्यावर सर्वजण फरारी होते. अकरा जणांना काही दिवसानंतर भोसरी पोलिसांनी अटक केली होती. तर पाच जण अद्याप फरारी होते. त्यातून डोंगरे व देशमुख या दोघांना सहायक आयुक्त मोहन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गजानन कडाळे,

फौजदार देवीदास दिघे, शरद काळे, कर्मचारी हजरत पठाण, सागर शेडगे, विवेक श्रीसुंदर, राजेंद्र टाकळकर, सुनील जाधव, दिनकर गावडे, आनंदा नांगरे, गणेश टिळेकर आदींसह पथकाने ही कारवाई केली.

डोंगरे यांच्यावर भोसरी आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खून, हाणामारी, जीवघेणा हल्ला असे गंभीर गुन्हे दाखल आहेत; तसेच देशमुख यांच्यावरही पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोघांना मोका न्यायालयाने १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

टपरीचालकाला लुटल्याप्रकरणी गुन्हा

पुणे : सिंहगड रोडवर ब्रह्मा हॉटेलजवळील पानटपरी चालकाने ग्राहकाकडे सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून, त्याला चाकूच्या धाकाने लुटल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष शुक्ला (वय ३५, रा. सिंहगड रोड) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी संतोष, राहुल, सतीश यांच्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्ला हे पान टपरीचा व्यवसाय करतात. आरोपी हे गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास टपरीवर सिगारेट पिण्यासाठी आले होते. या वेळी शुक्ला यांनी आरोपींकडे सिगारेटचे पैसे मा​गितले होते. पैसे मागितल्याचा राग आल्याने आरोपींनी चाकूच्या धाकाने टपरी चालकाला मारहाण केली; तसेच त्याच्या गल्ल्यातील ५०० रुपये हिसकावून नेले. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिंहगड रोडवरील दादागिरी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रस्त्यावर भाईगिरी करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपचाराअभावी महिलेचा मृत्यू

0
0

पिंपरी : हृदयविकाराचा झटका आलेल्या वृद्धेवर वेळेवर उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नगरसेविका सुजाता पालांडे आणि वृद्धेच्या नातेवाइकांनी केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये बुधवारी हा प्रकार घडला. आशा ज्ञानेश्वर अडपवार (वय ६१) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. 'आशा अडपवार यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना प्रथम ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्यांनी पिंपरी येथील वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविले. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु तेथे वेळेवर उपचार केले नाहीत,' असा आरोप नातेवाइकांनी आणि पालांडे यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीच्या प्रयत्नांना यश

0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' योजनेसाठी पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहराचे नामांकन झाल्याने महापालिकेच्या स्मार्ट प्रयत्नांना अखेर यश आले आहे. 'जेएनएनयूआरएम'प्रमाणेच याही योजनेत समावेश होण्याच्या शक्यतेमुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्र सरकारने देशातील प्रमुख शहरांच्या विकासासाठी 'स्मार्ट सिटी' योजना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी केंद्र सरकार ५० टक्के, राज्य सरकार २५ टक्के आणि महापालिकेकडून २५ टक्के रक्कम उभारून विकासकामे करण्यात येणार आहेत. यामध्ये शहराला पुरेसा पाणीपुरवठा, खात्रीशीर वीजपुरवठा, शहर स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, कार्यक्षम शहरी दळणवळण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, शहरी गरीबांसाठी परवडणारी घरे, सक्षम इंटरनेट सुविधा, आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था, ई-गव्हर्नन्स व नागरिकांचा सहभाग, शाश्वत पर्यावरण, नागरिकांची सुरक्षा आणि संरक्षण या घटकांचा समावेश आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी १०० गुणांचे निकष निश्चित केले होते. वैयक्तिक शौचालये उपलब्ध करणे, ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीमार्फत कार्यवाहीची माहिती, मासिक ई-वार्तापत्र प्रसिद्ध करणे, महापालिकेचे गेल्या दोन वर्षांचे प्रकल्पनिहाय बजेट वेबसाइटवर प्रसिद्ध करणे, निर्धारीत वेळेपेक्षा सेवा देण्यास जास्त कालावधी झाल्यास दंडात्मक कारवाई करणे, २०१२ ते २०१५ आर्थिक वर्षांतील आंतरिक उत्पन्न वसुली आणि वाढ, मागील महिन्यापर्यंत पालिका कर्मचार्यांची पगार अदायगी, २०१२-१३ अखेरचे पूर्ण झालेले लेखापरिक्षण, उत्पन्नातील योगदान टक्केवारी, पाणीपुरवठा अस्थापना आणि देखभाल खर्चाची टक्केवारी, महापालिकेच्या उत्पन्न स्त्रोतातून भांडवली कामाकरिता वापरलेली खर्चाची टक्केवारी यांचा समावेश होता. त्यासाठी पालिका प्रशासनाने भरपूर तयारी केली होती. सादरीकरणाच्यावेळी पुरावे दिले नसल्यामुळे एकदा माघारीदेखील पाठविण्यात आले होते. अखेर योजनेत समावेश होण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. योजनेतील सहभागाविषयी लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतरच बोलणे उचित ठरेल, अशी प्रतिक्रिया आयुक्त राजीव जाधव आणि समन्वयक निळकंठ पोमण यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अहिरे गाव रिकामे करा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) हद्दीतील अहिरे गावाचे पुनर्वसन करण्यात आले असून, या गावात बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या ग्रामस्थांना तातडीने हलविण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरव राव यांनी शुक्रवारी दिले. लष्कराच्या हद्दीत झालेली खासगी अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत, अशीही सूचना त्यांनी केली. लष्कराशी निगडित विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी राव यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, डिफेन्स इस्टेट विभागाचे व्यवस्थापक डी. एन. यादव, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव तसेच एनडीए, खडकी अॅम्युनेशन फॅक्टरी, देडूरोड व खडकी कँटोन्मेंट बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.

एनडीएसाठी अहिरे या गावातील जमीन ६२ वर्षांपूर्वी संपादित करण्यात आली. त्यानंतर या गावचे टप्प्याटप्प्याने शिवणे गावाजवळील सरकारी जागेत पुनर्वसन करण्यात आले. गावातील जवळपास सर्व कुटुंबांचे पुनर्वसन झाले आहे. तथापि, काही कुटुंबे जादा प्लॉटच्या मागणीसाठी अडून बसली आहेत. त्यांनी गावांतील घरे सोडली नसल्याने ती तातडीने रिकामी करण्याची मागणी एनडीएच्या अधिकाऱ्यांनी केली. या मागणीची दखल घेऊन गावात बेकायदा राहणाऱ्या कुटुंबांना तातडीने हलविण्याचे आदेश जिल्हाधिकारी राव यांनी बैठकीत दिले.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत विकसित केल्या जाणाऱ्या रस्त्यांवर लष्कराकडून निर्बंध घातले जातात. या रस्त्यांच्या विकासाचे प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाला पाठविण्यात आले आहेत. त्या संदर्भात व्यापक चर्चा व मार्ग काढण्यासाठी तयारी करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. बोपखेल गावात जिल्हा परिषदेच्या शाळेने लष्कराच्या जागेत अतिक्रमण केल्याचा मुद्दा लष्करी अधिकाऱ्यांनी मांडला. मात्र, ही शाळा आता पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे वर्ग केली असून, त्याचे शुल्क भरले जात असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. तेव्हा याबाबतची कागदपत्रे लष्कराला द्यावीत, अशीही सूचना राव यांनी केली.

लष्कराच्या कोरेगाव पार्कमधील जागेवर जनता जनार्दन शिक्षण संस्थेने अतिक्रमण केल्याचे बैठकीत निदर्शनास आणण्यात आले. त्यावर, ही जागा रिकामी करण्यासाठी संबंधित संस्थेला नोटीस बजावली असून ऑगस्टअखेर कारवाई करण्याचे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी जाधव यांनी बैठकीत दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अप्पा लोंढेच्या साथीदाराचाही खून

0
0

पुणेः वाळू माफिया अप्पा लोंढेचा निकटवर्तीय असलेल्या अल्ताफ अब्दुल जब्बार शेख (वय ४७, रा. लोणी काळभोर) याचा लोणी काळभोरजवळ धारदार शस्त्रांनी हत्यारांनी वार करून खून करण्यात आला. लोंढे याचा मे महिन्यांत खून झाला होता. त्यानंतर ही घटना घडली आहे.

अल्ताफ हा लोंढेचा साथीदार होता. तो शुक्रवारी पहाटे कदमाकवस्ती ग्रामपंचायत कार्यालयासमोर आला असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. पूर्ववैमनस्य, तसेच स्थानिक वर्चस्वातून हा हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्ताफने गुरुवारी सकाळी दर्गा येथे जात असल्याचे आपल्या पत्नीला सांगितले होते. तो रात्री दहापर्यंत घरी न परतल्याने त्याच्या पत्नीने त्याला फोन केला होता. त्या वेळी त्याने मित्रांसोबत असून घरी येण्यासाठी आणखी दोन तास लागतील असे सांगितले होते. दरम्यान, कदमाकवस्ती येथील स्थानिकांना रक्ताच्या थारोळ्यात एक मृतदेह सापडला होता. याच वेळी अल्ताफचा मुलगा पोलिस ठाण्यात अल्ताफ हरवला असल्याची तक्रार देण्यासाठी गेला होता, अशी माहिती लोणीकाळभोर पोलिसांनी दिली.

लोंढे खून प्रकरणातील मुख्य आरोपी गोरख बबन कानकाटे याच्यासह लोणी काळभोर, सासवड आणि जेजुरी परिसरातील तीन गुन्हेगारी टोळ्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्यार्तंगत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. या तीन टोळ्यांमधील ४२ गुन्हेगारांवर कारवाई झाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक राम जाधव यांनी ही कारवाई केली असून तिन्ही 'मोक्कां'ना परवानगी मिळाली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक जय जाधव यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

बेकायदा दोन पिस्तुले जप्त

शहरात बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हे शाखेने मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसांपूर्वीच सात पिस्तुल जप्त केले असतानाच पुन्हा नव्याने आणखी दोघांवर कारवाई करत दोन पिस्तुल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. वारजे येथील जुन्या जकात नाक्याजवळ दोघे जण पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून हर्षल ज्ञानेश्वर गोंड पाटील (वय २६, रा. वारजे माळवाडी), भरत बबन मारणे (वय ३६, रा. वारजे माळवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कॉलरशिपसाठी आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या इतर मागासवर्गीस, विमुक्त जाती- भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिली जाणारी स्कॉलरशिप व फ्रीशिपची सवलत काढून घेण्याच्या निर्णयाच्या विरोधात लोकायत व सोशलिस्ट पार्टीने (इंडिया) समाजकल्याण संचालनालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन केले. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व फ्रीशिप मिळालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पूर्वीपासून देण्यात येणारी स्कॉलरशिप व फी सवलत रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच, समाजकल्याण विभागाने गेल्या शैक्षणिक वर्षातील स्कॉलरशिप दिलेली नाही. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न कॉलेज व विद्यापीठातील विविध विभागांकडून विद्यार्थ्यांना मागील वर्षासह चालू वर्षाची संपूर्ण फी भरण्यास सांगितले आहे. या धोरणाविरोधात समाजकल्याण संचलनालयासमोर निदर्शने करण्यात आली; तर आयुक्त रणजितसिंह देओल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 'लोकायत'चे नीरज जैन, सोशलिस्ट पार्टीच्या वर्षा गुप्ते, प्रा. डॉ. प्रकाश जावडेकर आदी यावेळी उपस्थित होते.

'शिक्षणाचे बाजारीकरण बंद करा', 'गरिबांच्या मुलांनी शिकायचे की नाही', 'विद्यार्थ्यांचे बुरे दिन', 'मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फ्रीशिप रद्द' असे फलक हाती घेऊन घोषणा देत संचलनालयाचा परिसर दणाणून सोडला होता.

'नकळत दिली स्कॉलरशिप'

पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे यंदा स्कॉलरशिप व फ्रीशिपचे अर्ज स्वीकारले जात नाहीत. त्याबाबत विद्यार्थ्यांनी समाजकल्याण विभागाकडे चौकशी केल्यावर, 'या कोर्सेससाठी ती सुविधा नाही. गेल्या वर्षी तुम्हाला नकळतपणे स्कॉलरशिप दिली गेली,' असे उत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे या वर्षी संपूर्ण फी भरून, गेल्या वर्षी दिलेली स्कॉलरशिपची रक्कमही परत करण्यास सांगितले जात असल्याचे नीरज जैन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातपडताळणी महिनाभरात?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील १५ विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांपैकी १० समित्यांना पूर्णवेळ अध्यक्ष नाही. गेल्या वर्षभरापासून जिल्हावार समित्या स्थापन करण्याचा विषय प्रलंबित आहे. सद्यापरिस्थितीत जात पडताळणीची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत. असे असतानाही राज्याच्या सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे दाखल झाल्यापासून महिनाभरात निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे महिनाभरात प्रकरणे निकाली कशी काढणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विधान परिषद सदस्य स्मिता वाघ यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी जात पडताळणीची प्रकरणे तीस दिवसांत निकाली काढण्यात येतील, असे सांगितले होते. राज्यातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे मिळून एकूण ८५ हजारांपेक्षा अधिक प्रलंबित अर्ज आहेत. तसेच दररोज नव्याने शेकडो प्रकरणे दाखल होत आहेत.

येत्या महिनाभरात जिल्हावार जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यान्वित होतील, असे आश्वासन कांबळे यांनी पाच जुलै रोजी पुण्यात माध्यम प्रतिनिधींना दिले होते. त्या वेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमाल बडोले हेदेखील उपस्थित होते. यासंबंधी महसूल विभागाशी बोलणे झाले असून हा प्रश्न मार्गी लागेल, असे कांबळे यांनी सांगितले होते. महिनाभरात जिल्हावार समित्या कार्यान्वित होतील, असे कांबळे यांनी सांगितलेल्या गोष्टीला आता महिना होईल. मात्र, अद्याप समित्यांच्या स्थापनेबाबत प्रशासकीय पातळीवर काही बोलले जात नसून त्या लगेच कार्यान्वित होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

दरम्यान, जिल्हावार समित्या नाहीत. दहा विभागीय समित्यांना अध्यक्ष नाहीत. अशा परिस्थितीत महिनाभरात प्रकरणे निकाली काढण्यासाठी काही विशेष उपाययोजना केली जाणार आहे का, याची माहिती घेण्यासाठी कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क झाला नाही.

पूर्ण वेळ अध्यक्ष नाही

सध्या राज्यात १५ विभागीय समित्यांमार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीचे काम केले जात आहे. या १५ समित्यांपैकी १० समित्यांवर पूर्णवेळ अध्यक्ष नाही. उर्वरित पाच समित्यांच्या अध्यक्षांकडे या समित्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे जात पडताळणीचे प्रकरण दाखल झाल्यानंतर महिनाभरात निकाल देण्याचे आश्वासनही इतर आश्वासनांप्रमाणे हवेत विरणार नाही, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एलबीटी’चा फायदा ग्राहकांना कधी?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात गेल्या दोन वर्षांपासून लागू असलेल्या स्थानिक संस्था कराची (एलबीटी) मर्यादा वाढविण्यात आल्याने आजपासून, शहरातील बहुतेक व्यापाऱ्यांना त्यातून दिलासा मिळणार आहे. व्यापाऱ्यांना मिळालेला दिलासा सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वस्तूंच्या किमती कमी केल्या जाणार का, अशी विचारणा केली जात आहे.

राज्य सरकारने एक ऑगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, गेल्या आठवड्यात सरकारने त्या संदर्भातील अधिसूचना जारी करून उलाढालीची मर्यादा पाच लाख रुपयांवरून ५० कोटींवर नेली. साहजिकच, बहुतेक व्यापाऱ्यांना एलबीटीपासून मुक्तता मिळणार आहे. सातत्याने एलबीटी मुक्तीची मागणी लावून धरणाऱ्या व्यापाऱ्यांना ऑगस्टपासून एलबीटी भरावा लागणार नाही. कर भरण्यातून मुक्त झालेल्या व्यापाऱ्यांनी एलबीटीतून ग्राहकांनाही सूट द्यावी, असा आग्रह धरण्यात येत आहे.

पालिका हद्दीत बहुतेक वस्तूंवर सर्वसाधारणतः दोन ते तीन टक्क्यांदरम्यान एलबीटी आहे. काही वस्तूंवर त्यापेक्षा कमी कर आकारला जात असून, चैनीच्या वस्तूंवर मात्र त्यापेक्षा अधिक कर आकारला जातो. त्यामुळे, महागाईने भरडल्या जाणाऱ्या नागरिकांना काही अंशी दिलासा देण्यासाठी व्यापारी वर्ग पुढाकार घेणार का, असा सवाल ग्राहक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. ग्राहकांकडूनच कर वसूल करून तो राज्याच्या तिजोरीत भरणाऱ्या व्यापाऱ्यांना एलबीटीपासून मुक्तता मिळाली असल्याने त्याचा फायदा ग्राहकांनाही व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images