Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दुरुस्तीमुळे एक्स्प्रेस वेवर प्रवाशांचे हाल सुरूच

$
0
0

पुणेः पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेच्या दुरुस्तीच्या कामामुळे सलग सहाव्या दिवशीही वाहतूक कोंडी कायम होती. त्यामुळे गेल्या गुरुवारपासून सुरू झालेले एसटी प्रवाशांचे हाल मंगळवारीही सुरूच होते. दरम्यान, माल वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला असून या मार्गावरून जाणारी केवळ ३० टक्के वाहनेच सध्या कार्यरत आहेत.

एसटी बसला सकाळी व सायंकाळनंतर नेहमीप्रमाणे प्रवासी मिळत आहेत. मात्र, दुपारच्यावेळेतील प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. मंगळवारी देखील एसटी बसेस एक ते दीड तास उशिराने धावत होत्या. एक्स्प्रेस वेच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी, वाहनांना इच्छितस्थळी पोहचण्यास वेळ लागत असल्याने रस्ते वाहतूक नकोच, असे म्हणत रेल्वेच्या पर्यायाचा वापर केला जात आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारच्या गाड्यांना होणारा उशीर कमी झाल्याची माहिती एसटीच्या स्वारगेट आगारातील अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, एक्स्प्रेस वेच्या दुरुस्तीनंतरच प्रवासी संख्या पूर्ववत होईल, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑनलाइन सातबारा शनिवारपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्ह्यातील इंदापूर वगळता अन्य बारा तालुक्यांत सातबारा व फेरफार उतारे एक ऑगस्टपासून ऑनलाइन देण्याची तयारी करण्यात आली आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यावर फेरफार व सातबारा उताऱ्यांसाठी होणारी नागरिकांची ससेहोलपट थांबणार आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीच्या खरेदी-विक्री दस्ताची नोंदणी झाल्यानंतर तत्काळ फेरफार उतारा आणि त्यानंतर पंधरा दिवसांत सातबारा उतारे देण्यासाठी ई-फेरफार ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. वास्तविक ही योजना १ मे पासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न होता. परंतु, सातबारा उताऱ्यांवरील कब्जेदार, खाते रजिस्टरमधील नावे, फेरफार नसलेल्या कब्जेदारांची नावे यात फरक आढळल्याने त्यातील त्रुटी दुरूस्त करण्यासाठी आणखी कालावधी घेण्यात आला.

या त्रुटी दुरुस्त करून अचूक सातबारा देण्यासाठी एक मेपासून ही योजना सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. पुणे जिल्ह्यात मुळशी व भोर तालुक्यात ही ऑनलाइन सेवा यापूर्वी सुरू करण्यात आली. कब्जेदार, खाते रजिस्टरमधील नावांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर खेड, जुन्नर, आंबेगाव, मावळ, शिरूर, दौंड, बारामती व वेल्हा तालुक्याची डेटा एन्ट्रीची सीडी राज्य सरकारकडे मान्यतेसाठी नुकतीच पाठविण्यात आली. त्यावर आता जमाबंदी आयुक्तांनी हिरवा कंदील दिल्यावर प्रत्यक्ष ऑनलाइनचे काम सुरू केले जाणार आहे.

हवेली, पुरंदर व इंदापूर तालुक्यातील ऑनलाइनच्या कामाला विलंब झाला आहे. त्यातही हवेली व पुरंदरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या सर्व बारा तालुक्यांतील साडेसोळा लाख सातबारा उताऱ्यांची व साडेतीन लाख फेरफार उताऱ्यांची डेटा एन्ट्री पूर्ण झाली आहे. त्यामुळे एक ऑगस्टपासून फेरफार व सातबारे ऑनलाइन देता येऊ शकतील, असे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.

त्रुटींच्या निराकरणासाठी १४ उपजिल्हाधिकरी

पुणे जिल्ह्यात सातबारा उताऱ्यावरील एकूण कब्जेदार व गाव नमूना १ ते ७ मधील कब्जेदारांच्या नावांत फरक असलेली एक लाख ११ हजार ९६८ प्रकरणे तपासणीवर होती. या त्रुटींचे निराकरण केल्याशिवाय सातबारा ऑनलाइन देणे शक्य नव्हते. या करण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे १४ उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत त्रुटी दूर करून आता सातबारा व फेरफार ऑनलाइन देण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग्य वयात पुरस्कार देणे महत्त्वाचे : फैयाज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'कलावंताला योग्य वयात पुरस्कार देणे अतिशय महत्त्वाचे आहे. वयाच्या ८० व्या वर्षानंतर दिलेले पुरस्कार काय कामाचे? त्या व्यक्तीला स्वतः त्या पुरस्काराचा आनंद उपभोगता आला पाहिजे. त्यामुळेच मोहन जोशींचा सन्मान योग्य वयात होतो आहे,' असे मत ज्येष्ठ अभिनेत्री, गायिका फैयाज यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या 'नट-खट' आत्मचरित्रास पुणे नगर वाचन मंदिरातर्फे दिला जाणारा 'इंदिरा भालचंद्र पुरस्कार' फैयाज यांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात रविवारी संध्याकाळी हा सोहळा पार पडला. या वेळी ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे, पुणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष प्रा. माधव सोमण, मॅजेस्टिक प्रकाशनाचे अशोक कोठावळे, प्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे, साधना बेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

'मी स्वतःबद्दल लिहावे आणि लोकांनी ते वाचावे असे कधी मला वाटले नव्हते; पण माझा मित्र जयंत बेंद्रे आणि पत्नी ज्योती यांच्या पाठपुराव्यामुळे आत्मचरित्र लिहिण्यास मी प्रवृत्त झालो. माझ्या जीवनातील अनेक चढ-उतार, लहानपणापासूनचे प्रसंग यात प्रांजळपणे नमूद केले आहेत,' असे मत मोहन जोशी यांनी व्यक्त केले. या आत्मचरित्राचे शब्दांकन करणारे जयंत बेंद्रे यांचे नुकतेच निधन झाले. त्याबाबत जोशी म्हणाले, 'मी सांगत गेलो आणि दीड तासाची एक याप्रमाणे तब्बल ६७ कॅसेट जयंतने रेकॉर्ड केल्या होत्या. त्यानंतर त्याने त्याचे शब्दांकन आणि अनेकदा पुनर्लेखन केले. या पुरस्कारात त्याचा मोठा वाटा आहे.'

माझा मित्र जयंत बेंद्रे आणि पत्नी ज्योती यांच्या पाठपुराव्यामुळे आत्मचरित्र लिहिण्यास मी प्रवृत्त झालो. माझ्या जीवनातील अनेक चढ-उतार, लहानपणापासूनचे प्रसंग यात प्रांजळपणे नमूद केले आहेत.

- मोहन जोशी, अभिनेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक दरडींचा शोध सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

एक्स्प्रेस वेवरील बोरघाटात दरडी पडण्याबरोबरच आता भूगर्भ स्कॅनरच्या माध्यमातून ठिसूळ भागातील तसेच धोकादायक दरडींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवरील खंडाळा व आडोशी बोगद्याजवळ अनुक्रमे २२ जून व १९ जुलैला मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्या होत्या. या घटनेनंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने धोकादायक दरडी हटविण्याच्या कामाला २४ जुलैला सुरुवात केली आहे. खंडाळा घाटातील (बोरघाट) खंडाळा एक्झिट ते खोपोली एक्झिट या परिसरातील आठ ठिकाणी धोकादायक दरडी असल्याचे निश्चित करून त्याठिकाणच्या दरडी हटविण्याचे कामाला सुरुवात झाली आहे. हे काम आंध्र प्रदेशातील मेटाफेरी या कंपनीला देण्यात आले असून, त्यांचे १५ ते २० जणांचे विशेष पथक धोकादायक दरडी व सैल झालेले दगड काढण्याचे काम युद्धपातळीवर करत असून, आता त्यांच्या तिसऱ्या पथकाच्या सहाय्याने आडोशी बोगद्याजवळील दुसऱ्या ठिकाणी दरडी हटविण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबीचे वरिष्ठ अधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित आहेत.

भूगर्भ स्कॅनरच्या मशिनचा वापर

खंडाळा एक्झिट ते खोपोली एक्झिट परिसरात अनेक ठिकाणी अत्यंत धोकादायक दरडी असून, हा परिसर घाटमाथा व डोंगरराळ आहे. या परिसरातील धोकादायक दरडी काढण्याची रस्ते विकास महामंडळाने मोहीम हाती घेतली आहे. या दरडी हटविताना पुन्हा दरडींचा धोका उत्पन्न होवू नये याकरिता त्यांनी नवीन तंत्राचा वापर केला आहे. त्यामध्ये जमिनीतील (डोंगराळ) भागातील सुट्टे, ढिसूळ, सैल झालेल्या दरडी, खडक, माती, व मुरुमाचा शोध घेण्यासाठी स्कॅनर मशिनचा वापरण्यात येत आहे. मशिनद्वारे धोकादायक दरडींचा शोध घेवून, त्याची स्कॅनर मशिनने तपासणी करून पुन्हा धोकादायक दरडी हटविण्यात येत आहे.

पुण्याहून एक्स्प्रेस वे वरून मुंबईमार्गे विविध ठिकाणी, परराज्यात माल वाहतुकीच्या गाड्या जातात. माल वाहतुकीमध्ये वेळेचे बंधन पाळणे गरजेचे असते. दुरुस्तीच्या कामामुळे तसेच दरडी कोसळल्याच्या घटनेनंतर गेल्या गुरुवारपासून या महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. गेल्या शनिवारी या मार्गावर महाकोंडी झाली होती. त्यामुळे वाहनमालक वाहनांमध्ये माल भरण्यास नकार देत आहेत. परिणामी, या मार्गावरील नियमित वाहनांपैकी ७० टक्के वाहने सध्या धावत नाहीत.

- बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र माल व प्रवासी वाहतूकदार संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधार’ला प्रतीक्षा चार महिन्यांची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गॅस सबसिडीसाठी बँकेत..., मतदानासाठी मतदार यादीशी... आणि विद्यार्थ्यांचे शाळेत जोडणीसाठी... आधार कार्डची मागणी केली जात असली, तरी पुणेकरांना त्यासाठी तब्बल चार महिने 'वेटिंग'वर राहावे लागत आहे. पालिकेतर्फे शहरात सध्या केवळ तीनच ठिकाणी आधार कार्ड काढण्याची सुविधा पुरविण्यात आली असून, अनेक नागरिकांना थेट नोव्हेंबरअखेरची 'अपॉइंटमेंट' मिळाली आहे.

केंद्र सरकारच्या विविध सेवा-सुविधांचे लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आधार योजना सुरू झाली. गॅस सबसिडी प्राप्त करण्यासाठी बहुतेक नागरिकांनी आधार बँकेशी लिंक केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मतदारयादीशी आधार जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे; तसेच अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांचे आधार सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील तब्बल ८४ टक्के नागरिकांना आधार कार्ड मिळाले असले, तरी उर्वरित नागरिकांना मात्र ते मिळविण्यासाठी अनेक खटाटोप करावे लागत आहेत.

पालिकेतर्फे सध्या अवघ्या तीनच ठिकाणी आधारसाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. वारजे-कर्वेनगर आणि टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयात; तसेच घोले रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत फर्ग्युसन कॉलेज समोरील इमारतीत आधारची नोंदणी सुरू आहे. परंतु, या सर्व ठिकाणी एकच मशीन असल्याने नोंदणीसाठी गेलेल्या नागरिकांना पुढची अपॉइंटमेंट दिली जात आहे. या अपॉइंटमेंटसाठी नागरिकांना तब्बल महिना-दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागत असून, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात आधार नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना नोव्हेंबरची वेळ दिली जात आहे.

दरम्यान, पालिकेने वारंवार मागणी करूनही जिल्हाधिकाऱ्यांतर्फे जादा मशीन उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. त्याचा ताण सध्याच्या व्यवस्थेवर येत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त प्रकाश बोरसे यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात मतदारयाद्या आधारशी जोडण्याचे काम सुरू असल्याने जादा मशीन देण्यात असमर्थतता दर्शविण्यात आली आहे. जादा मशीन मिळताच, नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिली जातील.

- प्रकाश बोरसे, उपायुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहगड घाटात अपघात, वाहतूक बंद

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

सिंहगड घाट रस्त्यात बुधवारी पहाटे झालेल्या कंटेनरच्या अपघातानंतर डोणजे बाजूने घाट रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

वन विभागातील अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास कंटनेर एका कठड्याला धडकला. तेथील सिमेंटचे कट्टे तुटले. कंटेनर वळणावर अडकल्याने संपूर्ण रस्ता वाहतूकीस बंद झाला आहे. मात्र सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केवळ स्तुती नको; कृतीची जोड हवी

$
0
0

सुनील लांडगे, पिंपरी

शाश्वत विकासाकडे वाटचाल, पर्यावरण पूरक शहर निर्मिती, पायाभूत सुविधा, कार्यप्रवणता निर्देशांकात वाढ असे कौतुक करीत पिंपरी-चिंचवड महापालिकेने पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल तयार केला आहे. मात्र, त्यातील माहितीचा गांभीर्याने विचार केल्यास येथे स्तुतीची नव्हे तर, कृतीची गरज आहे, असे सांगण्याची वेळ आली आहे.

कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना दरवर्षी ३१ जुलैपूर्वी वार्षिक पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल प्रकाशित करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये शहराला चालना देणारे घटक (ड्रायव्हींग फोर्स), पर्यावरणातील विविध घटकांवर येणारा ताण (प्रेशर), पर्यावरणविषयक विविध परिक्षणांचा अहवाल व त्यावरून सद्यःस्थितीचे आकलन (स्टेटस्), पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे आणि घटक प्रदूषित झाल्यास होणारे परिणाम (इम्पॅक्ट) आणि पर्यावरणाच्या संरक्षण व विकासासाठी पालिकेतर्फे केलेले उपक्रम, नियोजित कृती आराखडा (रिस्पॉन्स) या मार्गदर्शक तत्त्वांचा वापर अभ्यासासाठी होणे आवश्यक आहे. परंतु, पालिका प्रशासनाने कृतीपेक्षा स्तुतीलाच महत्त्व दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाने टिपण्णी करणारा दुर्दशा अहवाल प्रसिद्ध करून त्रुटी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा राजकीय विरोध हा मुद्दा दुर्लक्षित केल्यास अहवालाची दुसरी बाजूदेखील लक्षात घेणे गरजेचे असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

या शहराची पार्श्वभूमी लक्षात घेता गेल्या दहा वर्षांत लोकसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. नागरीकरणाचा वेग सर्वाधिक आहे. त्या तुलनेत पर्यावरण संवर्धन कृती आराखड्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, असे दिसून येते. शहराचा विस्तार वाढतो आहे. प्रशस्त रस्ते तयार करीत आहोत. पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहोत, असे सांगून कौतुकाने स्वतःची पाठ थोपटवून घेण्याची गरज वाटत नाही. त्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर दिल्यास नागरिक प्रतिसाद देऊन पर्यावरण संवर्धनाच्या कामात हिरिरीने पुढाकार घेतल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु, प्रशासन कागदावर चित्र रेखाटण्यात दंग आहे. त्यात लोकप्रतिनिधी रंग भरत आहेत. नागरिकांचा मात्र अपेक्षाभंगच होत आहे.

शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्यादृष्टीने महापालिकेने भाटनगर, अजंठानगर, वेताळनगर, मिलिंदनगर, सेक्टर क्रमांक २२, विठ्ठलनगर येथे पुनर्वसन प्रकल्प राबविले. मात्र, शहरात झोपडपट्ट्यांची संख्या ७१ असून त्यातील रहिवाशांची संख्या सुमारे दीड लाख आहे. त्यामध्ये वाढ होतच आहे. त्यामुळे पुनर्वसन प्रकल्पांची गती आणि त्यातील भ्रष्टाचार पाहता शहर झोपडपट्टीमुक्त होणार आहे का? याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. केवळ प्रकल्प राबविण्याऐवजी अन्य पर्यायांचा विचार व्हायला हवा. अन्यथा, झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे जागेची कमतरता भासून शुद्ध पाण्याची कमतरता, सांडपाण्याचे वाढलेले प्रमाण, मूलभूत सुविधांवर पडणारा ताण, सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा, आरोग्य अशा समस्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत.

नदी प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी शुद्धीकरण हे प्रश्नही दिवसेंदिवस जटील आणि गंभीर होत आहेत. त्यावर सातत्याने चर्चा होते. प्रकल्प अहवाल तयार केले जातात. ते मान्यतेसाठी राज्य किंवा केंद्र सरकारकडे पाठविले जातात. मात्र, कार्यवाही होईपर्यंत त्यात कित्येक पटीने भर पडलेली असते. त्यामुळे शहराचे संतुलन सुधारण्याऐवजी बिघडतच जाते. त्यामुळे पर्यावरण अहवालातील कृती आराखड्यावर सर्वाधिक लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा, कॉपी टू पेस्टच्या माध्यमातून दरवर्षी रंगीत पानांचा आकर्षक अहवाल तयार होईल. कार्यवाहीच्या बाबतीत साधे प्रयत्नदेखील नाहीत, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, हीच अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसामुळे मावळात जनजीवन विस्कळित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

गेल्या दोन दिवसांपासून लोणावळ्यासह मावळात पावसाची संततधार सुरूच असून, बुधवारी मावळाला मुसळधार पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळित झाले होते. मावळातील अनेक नद्या नाल्यांना पूर आले होते. लोणावळ्यात बुधवारी दिवसभरात ९० मिमी. तर पवनाधरण क्षेत्रात ७० मिमी. पावसाची नोंद झाली आहे. मावळातील धरणांच्या साठ्यात प्रचंड वाढ झाली असून, मावळातील प्रमुख पवना धरण ६० टक्के भरले टक्के भरले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मावळ व विशेषतः पावसासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्याला मुसळधार झोडपले आहे. बुधवारी दिवसभर लोणावळा व परिसराला मुसळधार पावसाने झोडपले. लोणावळ्यात बुधवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या आठ तासांत ९० मिमी. पाऊस नोंदला गेला आहे. चोवीस तासांत १६० मिमी. पावसाची नोंद झाली आहे. या वर्षी आजअखेर पर्यंत २२७६ मिमी. पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी आज अखेरपर्यंत १८३८ मिमी. पावसाची नोंद झाली होती. तर पवनाधरण क्षेत्रात यावर्षी आजअखेर ११३६ मिमी. पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी आजअखेर पर्यंत ९१७ मिमी. झाली होती.

मुसळधार पावसामुळे लोणावळा, परिसर व मावळात अनेक घरांत, सोसायटी, चाळी व गल्लीतील घरांत पाणी घुसले होते. पावसामुळे मावळातील बहुतांश रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून, अनेक रस्ते निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या महिन्यातच चालण्याच्या दर्जाचे राहिले नाही. मावळातील पवना, इंद्रायणी, सुधा, कुंडलिका या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाल्याने त्यांना पूर आले आहे. मावळातील पवना धरण ६० टक्के भरले असून, ४.९१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिंपरीत ५०० कोटींचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुली एक ऑगस्टपासून बंद होणार आणि पर्यायी उत्पन्नाबाबत राज्य सरकारकडून स्पष्टता नसल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकासकामांबाबत चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे चालू आर्थिक वर्षअखेर सुमारे पाचशे कोटी रुपयांचा फटका बसण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

एक एप्रिल २०१६ पासून जीएसटी लागू करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच एक ऑगस्ट २०१५ पासून एलबीटी बंद होणार आहे. परंतु, ऑगस्ट २०१५ ते एप्रिल २०१६ कालावधीतील पालिकेच्या उत्पन्नाबाबतचे धोरण राज्य सरकारकडून स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे बजेटनुसार विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रशासनावर चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. त्याबाबत राज्य सरकारकडून पुढील दोन दिवसांत योग्य निर्णय अपेक्षित आहे, अशी अपेक्षा बाळगण्यात येत आहे.

राज्य सरकारने ५० कोटी रुपयांच्यावर उलाढाल असणाऱ्या व्यापारी संस्थांकडून एलबीटी वसुल करण्यासंदर्भात हरकती सूचना मागविल्या आहेत. त्यावर एलबीटी पूर्ण रद्द व्हावा, या संदर्भात व्यापाऱ्यांकडून दबाव येत आहे. त्याला अनुसरून एलबीटी हद्दपार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि जीएसटी लागू होईपर्यंतच्या कालावधीतील बुडणाऱ्या उत्पन्नाबाबत काय करायचे? असे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य सरकारच्या विक्रीकर विभागाकडील माहितीनुसार ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील व्यापाऱ्यांची संख्या ४८५ आहे. परंतु, खरेदीवर लावण्यात येणाऱ्या एलबीटीच्या उत्पन्नानुसार केवळ ६४ व्यापारी आहेत. त्यांच्याकडून २०१४-१५ आर्थिक वर्षांत ४५४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे पालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका कर्मचारी होणार पंच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पंच फितूर झाल्यामुळे अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपींचे दोषारोप सिद्ध होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे यापुढील काळात सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होत असलेल्या गुन्ह्यांमध्ये पंच म्हणून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. पालिका हद्दीतील पोलिस स्टेशनमधून गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी पंच म्हणून कर्मचाऱ्याची मागणी केल्यास त्यांना तातडीने कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावे, असे आदेश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी प्रशसनाला दिले आहेत.

गेल्या काही वर्षात अनेक गुन्ह्यांमध्ये पंच फितूर झाल्याने दोषारोप सिद्ध करण्याचे प्रमाण घटत आहे. गुन्ह्यांमध्ये गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्यसरकारने सात वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये सरकारी कर्मचारी पंच म्हणून घेणेबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार, पोलिस आयुक्तालय कार्यालयाकडून पालिका प्रशासनाकडे याबाबत वारंवार मागणी केली जात आहे. पोलिसांनी मागणी केल्यानंतर कर्मचारी तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेश जगताप यांनी दिले आहेत.

ज्या परिसरात खटला सुरू आहे. त्याच परिसरात राहत असलेल्या कर्मचाऱ्याला पंच म्हणून नेमण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. तसेच, एकाच कर्मचाऱ्याला पंच म्हणून वारंवार घेण्यात येऊ नये, संबंधित कर्मचाऱ्याच्या चारित्र्याच्या संशयाबाबत मौखिक स्वरूपात तपासणीची खातरजमा केलेली असावी, गुन्ह्यातील फिर्यादी तसेच आरोपीच्या नातेवाइकास पंच म्हणून घेऊ नये, अशा सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.

शहरातील महापालिकेच्या मालकीच्या ५१ आणि सरकारी कार्यालयांच्या ५० इमारतींचे फायर ऑडिट झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या व राज्य सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये विविध कामांनिमित्त सामान्य नागरिकांची दररोज ये-जा सुरू असते. त्यामुळे या कार्यालयांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा आहे किंवा नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.

पंच फितूर झाल्याने कर्मचाऱ्यांना नेमणार

पंच फितूर झाल्याने दोषारोप सिद्ध होण्याचे प्रमाण घटत असल्याने सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होत असलेल्या गुन्ह्यांमध्ये पंच म्हणून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. पोलिसांनी मागणी केल्यानंतर कर्मचारी तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेश पालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीपीएस यंत्रणेद्वारे वृक्षगणनेचा आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शहरातील वृक्षगणना करताना जीपीएस अॅप्लिकेशनची मदत घ्यावी, तसेच प्रत्येक झाडाला स्वतंत्र ओळखक्रमांक द्यावा, अन्यथा वृक्षतोड करण्यावर बंदी घातली जाईल,' असा दम हायकोर्टाने पुणे महापालिकेला दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयावर येत्या १२ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.

पुणे शहरात महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या वृक्षतोडी संदर्भात आणि वृक्ष प्राधिकरण समितीच्या नेमणुकीच्या विरोधात नंदकुमार गोसावी यांनी कोर्टात अवमान याचिका दाखल केली आहे. यावर कोर्टात नुकतीच सुनावणी झाली, त्या वेळी कोर्टाने पालिकेला काही सूचना केल्या. शहरातील वृक्षगणना करताना खास सर्व्हेअरची नियुक्ती करावी, अधिकृत अॅँड्राइड अॅप्लिकेशनद्वारे झाडांची माहिती संकलीत करावी.वृक्षगणना करताना प्रत्येक झाडाला ओळख क्रमांक देऊन इंटरनेटशिवाय त्या वृक्षाची महिती उपलब्ध होऊ शकेल, असे हे तंत्रज्ञाना विकसित करावे. वृक्षाचे मॅपिंग हे जीपीएस लोकेशन तंत्रज्ञानानेच करण्यात यावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. याबाबतची पुढील सुनावणी ही १२ ऑगस्टला रोजी न्या. अभय ओक आणि रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठापुढे होणार आहे, असे गोसावी यांनी सांगितले.

७०० वृक्षतोडीचे प्रस्ताव

हायकोर्टाने एकाबाजुला जीपीएस प्रणालीने वृक्षगणना करण्याचे आदेश दिलेले असताना पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीसमोर ७०० वृक्षतोडीचे प्रस्ताव आले आहेत. यावर ३१ जुलै रोजी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. वृक्षाधिकारी मोहन ढेरे यांचा अतिरिक्त कार्यभार अशोक घोरपडे यांच्याकडे देण्यात आला; परंतु त्यांचे पद हे सहाय्यक आयुक्त दर्जाचे नसल्याने घोरपडे यांना वृक्षतोड करण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवण्याचा अधिकार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्हालाही द्या गावठाण दर्जा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भिलारेवाडीला गावठाणाचा दर्जा देतानाच गावठाणासभोवतीच्या दोनशे मीटर अंतरापर्यंतचा 'डोंगर माथा व डोंगर उतार' झोन बदलण्यासारखी सरकारी 'कृपादृष्टी' कात्रजलगतच्या अन्य गावांवरही होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. भिलारेवाडीमधील डोंगर माथा व उतार हा झोन बदलून 'शेती व ना विकास' झोनमध्ये बदलण्यात आला आहे. या झोन बदलामुळे भिलारेवाडीमध्ये डोंगरावर जमीन वापरात बदल करून निवासी बांधकामे करण्यास अधिकृत परवानगी मिळणार आहे. तसेच शेती ना विकास झोनमध्ये गोदामे, वसतीगृहासारखी मंजूर असलेली बांधकामे करता येणार आहेत.

कात्रजमधील भिलारेवाडीला मिळालेले हे लाभ लगतच्या चार-पाच गावांना मिळणार का, असा सवाल केला जात आहे. कात्रजलगतच्या जांभुळवाडी, गुजरवाडी, मांगडेवाडी, कोळेवाडी या शिवकालापासून अस्तित्वात असलेल्या गावांचे गावठाण जाहीर झालेले नाही. गावठाण जाहीर नसल्याने या गावांना गावठाण क्षेत्राचे कोणतेही लाभ मिळत नाहीत. यासंदर्भात चारही गावांच्या ग्रामस्थांनी खासदारांपासून आमदार आणि जिल्हाधिकारी ते नगर विकास विभागाला पत्र दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात या गावांना गावठाणाचा दर्जा देण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींसमवेत चर्चा झाली. त्यानंतर गावाची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाला सूचना देण्यात आल्या. सूचना दिल्यानंतरही गेल्या दोन वर्षांत त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. गावठाण निवासी क्षेत्रवाढीसंदर्भात नगर विकास विभागाने मागविलेल्या हरकती व सूचनांच्या वेळी या गावांनी आपले म्हणणे मांडले. पण, त्यावरही अद्याप निर्णय झालेला नाही.भिलारेवाडी गावावर सरकारी कृपादृष्टी आहे. या गावातील मोठी जमीन एका खासगी व्यक्तीने घेतली आहे. या गावाला गावठाणाचा दर्जा देण्यासाठी त्यानेच जिल्हाधिकारी कार्यालयापासून मुंबईपर्यंत फायली हलविल्या. आता या गावाचा डोंगर माथा व डोंगर उतार झोनही बदलण्यात आला आहे. १९९७ मध्ये झालेल्या प्रादेशिक आराखड्यानंतर नव्या आराखड्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. पण झोन बदल करताना एका गावावर कृपादृष्टी झाल्याचे दिसते.

अधिकृत इमारती उभारणार

प्रादेशिक योजना मंजूर असलेल्या भागात डोंगर माथा व उतारावर बांधकाम परवानगी नाही. परंतु, आता भिलारेवाडीत डोंगरावर अधिकृत इमारती उभ्या राहू शकणार आहेत. प्रादेशिक विकास आराखड्यातील झोन विशिष्ट काळानंतर बदलणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांना द्या मिळकतकरात सूट

$
0
0

काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मूठभर व्यापाऱ्यांच्या हितासाठी स्थानिक संस्था करात (एलबीटी) सवलत देत, पालिकांच्या उत्पन्नावर गदा आणणाऱ्या राज्य सरकारने शहरातील नागरिकांचे हित जपण्यासाठी सदनिकाधारकांना मिळकतकरातून सूट द्यावी, अशी मागणी काँग्रेसने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. व्यापाऱ्यांसाठी दाखविली जाणारी तत्परता सर्वसामान्यांच्याबाबत सरकार कधी दाखविणार, अशी विचारणा त्यांनी केली.

सरकारच्या नव्या निर्णयामुळे एलबीटीच्या उत्पन्नातून मिळणाऱ्या महसूलावर पालिकांना पाणी सोडावे लागणार आहे. राज्यातील सुमारे तीन ते साडेतीन कोटी जनता या पालिकांमध्ये राहात असून, त्यांच्यासाठी केल्या जाणाऱ्या विकासकामांना फटका बसण्याची चिन्हे आहेत. मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांचे उत्पन्न स्रोत बंद करणाऱ्या राज्य सरकारने मुंबईच्या धर्तीवर पाचशे स्क्वेअर फुटांपर्यंतचे घर असणाऱ्या नागरिकांना मिळकतकर रद्द करावा; अथवा त्यात सूट द्यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे चिटणीस संजय बालगुडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

एलबीटीतील बदलांमुळे पालिकांना वारंवार राज्य सरकारकडे हात पसरावे लागणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनेने दिलेल्या अधिकारांवरच सरकार टाच आणत आहे, असा आरोप बालगुडे यांनी केला. व्यापाऱ्यांसाठी दाखविली जाणारी तत्परता पाहता, हे सरकार व्यापारीधार्जिणे असून, सर्वसामान्यांवर अन्याय करणारे आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूग, उडीद, कापूस पावसामुळे अडचणीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाने ओढ दिल्यामुळे यंदा राज्यात मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात काही भागांत पडलेल्या पावसाने कोकण आणि विदर्भातील भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर गेल्या वर्षीप्रमाणेच राज्याच्या विविध भागांमध्ये पुन्हा पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे चिंता उभी राहिली आहे. राज्यात नांदेड, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलडाणा आणि यवतमाळ या दहा जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे; तर ११ जिल्ह्यांमध्ये ५० ते ७५ टक्के आणि १३ जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. प्रारंभी पडलेल्या पावसानंतर अनेक भागांमध्ये पेरण्या करण्यात आल्या. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने या पेरण्या अडचणीत आल्या असून काही भागांत दुबार पेरण्यांची वेळ येण्याची भीती आहे. मात्र, येत्या एक ऑगस्टपर्यंत पाऊस न झाल्यास मूग, मूग, उडीद आणि कापसाचे पीक अडचणीत येणार असून त्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. एक ऑगस्टनंतर पाऊस झाल्यास प्रामुख्याने बाजरी, तूर आणि मक्याची पेरणी करावी, अशी शिफारस कृषी विभागाने केल्याची माहिती राज्याचे कृषिआयुक्त विकास देशमुख यांनी दिली. सुमारे २५ लाख हेक्टर परिसरात दुबार पेरणीची वेळ आल्यास त्यासाठी पर्यायी योजना, बियाणे, खते व कीटकनाशके उपलब्ध करून देण्याची तयारी असून पुरेसा साठा असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात खरिपाच्या क्षेत्रापैकी ८० टक्के भागांत पेरण्या झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे कोकण, ठाणे, पालघरसह नंदुरबार आणि विदर्भात भंडारा-गोंदिया या जिल्ह्यांमध्ये भाताच्या लावण्या गतीने सुरू झाल्या आहेत. या पावसाने राज्यात सुमारे साठ टक्के भागांत भातलावणी पूर्ण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटी विरोधात कोर्टात दाद मागणार

$
0
0

पुणे : महापालिकेचा स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला पालिकेतील कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. सरकारने घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात पीएमसी एम्प्लॉय युनियनने हायकोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा निषेध करण्यासाठी दोन दिवसांचे काम बंद आंदोलन संघटनेकडून केले जाणार आहे.

राज्याची राजधानी असलेली मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांमधील ५० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांचा एलबीटी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतची अधिसूचनाही नुकतीच काढली आहे. एक ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेताना सरकार महापालिकांना नक्की किती अनुदान देणार याबाबतची स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. सरकारच्या या निर्णयामुळे पालिकेच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होण्याची भीती आहे. यामुळे कामगार संघटनांनी एलबीटी बंद करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात संघटनेच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. सरकारने काढलेल्या अधिसूचनेबाबत तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेण्याचे काम सुरू असून दोन दिवसांत ही याचिका दाखल केली जाणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष बापू पवार यांनी सांगितले.

कामबंद आंदोलन

महाराष्ट्र राज्य महापालिका आणि नगरपालिका फेडरेशनकडूनही कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. एलबीटी रद्द करण्याच्या शासन निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी ४८ तासांचे कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एलबीटी’ फायद्याची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँटोन्मेंट बोर्डात स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यानंतर व्यापाऱ्यांचा विरोध असतानाही पहिल्याच महिन्यात बोर्ड फायद्यात आले आहे. बोर्डाने २० जुलैपर्यंत 'एलबीटी' भरण्याची मुदत दिल्यानंतर सुमारे तीन कोटी ८० लाख रुपये तिजोरीत जमा झाले आहेत.

जकात पद्धत असताना पुणे महापालिकेकडून बोर्डाला महिन्याला सुमारे दीड कोटी रुपये जकात मिळत होती. बोर्डाच्या हद्दीत 'एलबीटी' लागू करण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर प्रति​साद मिळेल का, या बाबत साशंकता होती. मात्र, २० जुलैपर्यंत सुमारे तीन कोटी ८० लाख रुपये जमा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. केंद्र सरकारने चार जून रोजी बोर्डाच्या हद्दीत 'एलबीटी' लागू केल्याचा आदेश काढला. त्यानंतर 'एलबीटी' भरण्यासाठी बोर्डाने स्वतंत्र बँक खाते उघडले. पहिल्या महिन्यात २० जुलैपर्यंत 'एलबीटी' भरण्याची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत तीन कोटी ८० लाख रुपये गोळा झाल्याने 'एलबीटी'मुळे बोर्डाला फायदा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

'एलबीटी' वसूल करण्यास परवानगी मिळालेले पुणे हे देशातील एकमेव कँटोन्मेंट बोर्ड आहे. राज्य सरकार एक ऑगस्टपासून महापालिकांतील 'एलबीटी' रद्द करणार की नाही, याबाबत उत्सुकता असताना कँटोन्मेंटमध्ये 'एलबीटी' लागू झाला आहे. पुणे महापालिका आणि बोर्ड या दोन्ही ठिकाणी 'एलबीटी' भरावा लागणार असल्याने व्यापाऱ्यांनी विरोधी भूमिका घेतली आहे. 'एलबीटी'विरोधात पुणे कॅम्प मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने २३ जून रोजी दुकानबंद आंदोलनही करण्यात आले होते. तसेच, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी व्यापाऱ्यांनी भेट घेऊन 'एलबीटी' रद्द करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, पुणे कॅम्प मर्चंट्स असोसिएशनच्यावतीने 'एलबीटी'बाबत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीला खासदार अनिल शिरोळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, बोर्डाच्या उपाध्यक्षा डॉ. किरण मंत्री, पोपटलाल ओस्तवाल, सूर्यकांत पाठक, महेंद्र पितळीया, हेमंत शहा, राजू सुराणा, आनंद कोच्चर, पराग शहा आदी उपस्थित होते. कँटोन्मेंटमधील 'एलबीटी'बाबत पर्रीकर यांच्या संपर्कात असल्याचे खासदार शिरोळे यांनी सांगितले.

देशातील एकमेव कँटोन्मेंट

'एलबीटी' वसूल करण्यास परवानगी मिळालेले पुणे हे देशातील एकमेव कँटोन्मेंट बोर्ड आहे. राज्य सरकार एक ऑगस्टपासून महापालिकांतील 'एलबीटी' रद्द करणार की नाही, याबाबत उत्सुकता असताना कँटोन्मेंटमध्ये 'एलबीटी' लागू झाला आहे.

बोर्डाच्या हद्दीत एलबीटी लागू करण्यास काही तांत्रिक मुद्‍यांवर मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना एलबीटी भरण्यास मुदतवाढ मिळाली पाहिजे.

- डॉ. किरण मंत्री, उपाध्यक्षा, कँटोन्मेंट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौहानांच्या नियुक्तीमागे राजकारणः इंगळे

$
0
0

पुणे : 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळ अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती हा देशातील शिक्षण व्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्या नियुक्तीमागे सरकारची साम्राज्यवादी भूमिका व व्यापक राजकारण आहे,' असे मत प्रा. देवेंद्र इंगळे यांनी व्यक्त केले.

एफटीआयआय विद्यार्थी आंदोलन समर्थन समितीच्या वतीने 'आजची शिक्षणव्यवस्था विद्यार्थ्यांना न्याय देते का?' या विषयावरील व्याख्यानात प्रा. इंगळे बोलत होते. महापालिका कामगार युनियनच्या मुक्ता मनोहर, युवक क्रांती दलाचे संदीप बर्वे आदी या वेळी उपस्थित होते. 'आपल्या देशात राज्यघटना आणि कायदे नसलेली परंपरापगत व्यवस्था असे दोन प्रकारचे कायदे चालतात. शिक्षणाचा गळा घोटणे हा बाह्मणवादाचा इतिहास आहे. त्यात परंपरेतून गजेंद्र चौहान यांची निवड झाली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर या संस्थेतील शिक्षण आधुनिक, परंपरावादी की विषमतेवर आधारित असेल हा प्रश्न आहे' असेही इंगळे म्हणाले.

आज आंदोलन

एफटीआयआय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काही डाव्या चळवळीतील पक्ष, संघटनांनी एकत्र येत पुणेकर नागरिक समर्थन समितीची स्थापना केली आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य या समितीचे संयोजक आहेत. केंद्र सरकारने नियुक्त केलेले नियामक मंडळ बरखास्त करून नवीन पात्र सदस्यांच्या मंडळाची नेमणूक करावी, विद्यार्थी व संस्थेतील कर्मचारी चांदेकर यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत या मागण्या समितीने केल्या आहेत. यासाठी आज सायंकाळी सहा वाजता संस्थेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रधान सरांचा वाडा काळाच्या पडद्याआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत व 'साधना'चे माजी संपादक प्रा. ग. प्र. प्रधान यांचा सदाशिव पेठेतील वाडा (९२६, गाडगीळ रोड, नागनाथ पाराजवळ) काळाच्या पडद्याआड जाणार आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या या वाड्याच्या जागेवर नवी इमारत उभारली जाणार आहे. साधना ट्रस्टने त्याबाबतचा निर्णय घेतला आहे.

प्रधान सर १९३५मध्ये पुण्यात आल्यावर मंगळवार पेठेतील विश्वेश्वराच्या मंदिराजवळ राहायचे. पुढे १९३८मध्ये प्रधान सरांच्या वडिलांनी सदाशिव पेठेत हा वाडा घेतला. त्यानंतर हे प्रधान कुटुंबीय या वाड्यात राहू लागले. प्रधान सरांनी पत्नीच्या निधनानंतर सदाशिव पेठेतील आपला वाडा २००८मध्ये 'साधना ट्रस्ट'ला दिला. त्यानंतर प्रधान सर हडपसरच्या साने गुरुजी रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत राहिले. त्यानंतर काही दिवसांनी प्रधान सर स्वातंत्र्यसैनिक रामभाऊ तुपे या त्यांच्या जुन्या मित्राच्या घरी राहायला गेले होते. ग. प्र. प्रधान सरांच्या शिक्षणापासून त्यांचा स्वातंत्र्य चळवळीतला सहभाग, सेवा दल-समाजवादी पक्षातील योगदान, सामाजिक न्यायाच्या चळवळीतील पुढाकार, आमदार-विरोधी पक्षनेतेपद अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा हा वाडा साक्षीदार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साधना’ पुन्हा शनिवार पेठेत

$
0
0

पुणे : 'साधना'चे २००८पासून सदाशिव पेठेतील या वाड्यात कार्यालय सुरू आहे. त्यापूर्वी शनिवार पेठेतील साधना मीडिया सेंटरच्या इमारतीत कार्यालय होते. आता ते पुन्हा सदाशिव पेठेतून शनिवार पेठेत टप्प्याटप्प्याने हलवले जाणार आहे. त्यासाठी शनिवार पेठेतील 'साधना'च्या इमारतीतील सांस्कृतिक सभागृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या निम्म्या जागेत 'साधना'चे नवे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. सभागृहाच्या उर्वरित जागेत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू ठेवली जाणार आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या या वाड्याच्या जागेवर नवी इमारत उभारली जाणार आहे. साधना ट्रस्टने त्याबाबतचा निर्णय घेतला आहे. टप्प्याटप्प्याने साधना कार्यालयाचे स्थलांतर होणार आहे. शनिवारपेठेतील अभ्यासिका पूर्ववत सुरू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुस्तक खरेदीत घोटाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारच्या वतीने केल्या जाणाऱ्या पुस्तक खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहे. या गैरव्यवहारात सरकारी यंत्रणाच सहभागी असल्याचा संशय मराठी प्रकाशक परिषदेने व्यक्त केला आहे. त्याबाबत चौकशी करण्याची परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे पत्रान्वये केली आहे.

मराठी प्रकाशक परिषदेची नुकतीच बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास या गोष्टी आणण्यासाठी पत्र देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार फडणवीस व तावडे यांना पत्र पाठवण्यात आले असून, त्यांच्याकडे विविध मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी वेळ मागण्यात आली आहे. प्रकाशक परिषदेचे कार्यवाह अनिल कुलकर्णी यांनी याविषयी माहिती दिली.

राज्य सरकारकडून पूर्वी विविध योजना राबवल्या जात होत्या. त्यात प्राथमिक शाळांसाठी खडू फळा योजना, माध्यमिक शाळांसाठी विज्ञान पुस्तक खरेदी योजना, प्रौढ साक्षरता योजना आदींचा त्यात समावेश होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या योजना बंद झाल्याने शाळा पुस्तकांची खरेदीच करत नाहीत. वेतनेतर अनुदानही बंद झाले आहे. त्याचप्रमाणे शालेय ग्रंथालये जवळपास बंद पडण्याच्या स्थितीत आली आहे. याचा फटक प्रकाशन व्यवसाय, विद्यार्थ्यांना होत आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळांमधील ग्रंथालये समृद्ध केली जात नाहीत,' असे त्यांनी सांगितले.ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या पुस्तक खरेदीत गैरव्यवहार होतो. त्यामुळे त्या निवड समितीत लेखक, प्रकाशक, चित्रकार, मुद्रक अशा सर्व घटकांचा समावेश असायला हवा. आताच्या गैरव्यवहारात यंत्रणाच सहभागी असल्याचा संशय आहे. सरकारी अनास्था, गैरव्यवहारामुळे वाचनसंस्कृती धोक्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीच्या विविध सरकारी योजना पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images