Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चौहानांसाठी ’अभाविप’ची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'मधील (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे इतर विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचा आंदोलन करण्याचा अधिकार मान्य करीत त्यांनी लगेच संप मागे घ्यावा आणि त्वरित वर्ग सुरू करावेत, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने आपले म्हणे मांडावे, असा सल्लाही परिषदेतर्फे देण्यात आला आहे.

एका आठवड्यात प्रशासनाने वर्ग सुरू केले नाहीत, तर परिषदेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. संस्थेमध्ये गेल्या ४५ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी परिषदेतर्फे शनिवारी सकाळी निदर्शने करण्यात आली. संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. संस्थेच्या नियामक मंडळाच्या नवनिर्वाचित अध्यक्षांना विरोध करण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आवक वाढल्याने पालेभाज्या स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फळभाज्यांसह पालेभाज्यांची मार्केट यार्डात रविवारी आवक वाढल्याने कांदा, भुईमूग, कोबी वगळता सर्व फळभाज्या स्वस्त झाल्या आहेत. आवक थंडावल्याने कांदा महाग झाला आहे. तर गेल्या आठवड्यातील महागलेल्या पालेभाज्यांपैकी कोथिंबीर, मेथीचे दर उतरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मार्केट यार्डात रविवारी १८० ते १९० गाड्यांची आवक झाली आहे. परराज्यातून बेळगाव, हुबळी, धारवाड येथून मटारची एक हजार गोणींची आवक झाली आहे. त्याशिवाय कर्नाटकातून ६ ते ७ ट्रक कोबी, इंदुरहून ५ ते ६ टेम्पो गाजर तसेच कर्नाटक, मध्य प्रदेशातून१० ते १२ टेम्पो हिरवी मिरचीची आवक झाली. तसेच आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून ४ ते ५ टेम्पो शेवग्याची आवक झाली आहे. रताळ्यासह मटारची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात फळभाज्या आल्याचे दिसत आहे. त्याचा फायदा अन्य फळभाज्यांच्या दरावर झाला आहे. पारनेरहून मटारची दीडशे गोणींची आवक झाली.

सातारी आल्याची ४५० पोती तर बेंगळुरुहून १५० पोत्यांची आवक झाली. टोमॅटोची साडेपाच हजार क्रेट तसेच फ्लॉवर, कोबीची आवक झाली. कोबीची या आठवड्यात कमी आवक झाली. कांद्याची गेल्या काही आठवड्यापासून आवक थंडावली आहे. त्यामुळे दरावर परिणाम झाला आहे. ७० ते ८० ट्रक एवढीच आवक झाली आहे. तसेच बटाट्याची गुजरात, आंध्र प्रदेश, इंदुरहून ३० ते ४० ट्रक तर लसणाची साडेतीन हजार पोत्यांची आवक झाली.

कोथिंबीरची दोन लाख जुडींची आवक झाली आहे. गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात वीस ते तीस रुपयांनी एक गड्डी मिळत होती. मात्र दर उतरल्याने २००ते ६०० रुपये शेकडा दर झाले आहेत. त्यामुळे आता बाजारात दहा रुपयांनी एक गड्डी मिळत आहे. तसेच मेथीचे दरही ४०० ते ७०० रुपये शेकडा झाले आहेत. एक लाख जुडींची आवक झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचा ‘अॅक्शन प्लॅन’ कुठंय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात शनिवारी दिवसा आणि रात्री सोनसाखळी आणि पर्स हिसकावण्याच्या चार घटना घडल्या असून त्यात साडेतीन लाख रुपयांचा ऐवज हिसकावण्यात आला आहे. त्यातील एक घटना ही मध्यरात्री पावणे तीनच्या दरम्यान घडली. पोलिसांकडून सोनसाखळी चोरांना रोखण्यासाठी 'अॅक्शन प्लॅन' तयार झाला असला तरी त्याची अंमलबजावणीची वेळ आली आहे.

जंगली महाराज रोडवर डफळे हॉस्पिटलसमोर पायी चाललेल्या तरुणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावण्यात आली. सिंहगड रोडवर राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. डेक्कन पोलिसांनी दुचाकीवरील दोघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुणी ही पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघा आरोपींनी तिच्या गळ्यातील २६ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावली आणि पळ काढला. फौजदार एस एन तुळवे अधिक तपास करत आहेत.

दुसऱ्या घटनेत, एंरडवणा येथील ६० वर्षांच्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. एंरडवणा येथील मंजेश्वर सोसायटीसमोरून पायी चालेलल्या महिलेच्या हातातील पर्स हिसकावण्यात आली. या पर्समध्ये रोख रक्कम, महत्वाची कागदपत्रे तसेच मोबाइल हँडसेट असा एक लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात अआली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास घडली. फौजदार ए. एस. देशमुख अधिक तपास करत आहेत.

तिसऱ्या घटनेत, प्रभात रोडवर शामली अपार्टमेंट समोरून पायी चाललेल्या ३४ वर्षांच्या महिलेच्या गळ्यातून सुमारे दीड लाख रुपयांची सोन्याची साखळी हिसकावण्यात आली. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला ही पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली. चौथ्या घटनेत, सांगवी येथे शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. या प्रकरणी दुचाकीवरील दोघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला ही नवी मुंबई येथील राहणारी आहे. नवी सांगवी येथील समर्थ विहार सोसायटीसमोर घडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नगर रोडवर कोटक महिंद्रा बँकेसमोर दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार झाला. उपचारादरम्यान या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. येरवडा पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. दुचाकीस्वाराविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात गेल्या आठवड्यात सोमवारी दुपारी घडला होता. सूर्यकांत रामचंद्र बोरूळ (वय ७०, रा. रामवाडी) असे अपघातात ठार झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. बोरूळ हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला,अशी माहिती येरवडा पोलिसांनी दिली. या गुन्ह्याचा तपास फौजदार डी. आर. हेमाडे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेची भूमिका दुटप्पी स्वरूपाची

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

'शिवसेना सरकारमध्ये सहभागी असली तरी टीका करून विरोधक असल्याप्रमाणे दुटप्पी भूमिका बजावत आहे. स्वतः सेनेनी आधी भूमिका स्पष्ट करावी आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करावे. शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही,' असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

'निवडणुकांनंतर विरोधी पक्ष तर महिनाभरातच सहयोगी पक्ष या दोन्ही भूमिका वठवणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. तर राष्ट्रवादीची नाळ सर्वसामान्यांपर्यंत रुजली आहे. अजित पवार हे शक्तिशाली नेतृत्व बनत आहेत. भाजपने नो-बॉल, स्टंप आउट, रन आउट, त्रिफळा अथवा तिसऱ्या पंचाने यापैकी कशाने शिवसेनेला आउट केले त्यांनाच ठाऊक नाही. विधिमंडळात शेतकऱ्यांसाठी लढा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार आहे,' असे तटकरेंनी स्पष्ट केले. भाजप सरकारला आरक्षणाचा विसर पडला आहे, अशी टीका तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बीआरटी’चे काउंटडाउन सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या संगमवाडी ते विश्रांतवाडी (आळंदी रोड) मार्गावरील बीआरटीची वाहतूक सेवा एक ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे संकेत पालिकेकडून देण्यात येत आहे. मात्र, बीआरटी मार्गावर धावणाऱ्या बससाठी पालिकेकडून तात्पुरत्या स्वरुपात विमानतळ रस्त्यावर टर्मिनल उभारण्यात येणार असल्याने विश्रांतवाडी चौकात अपघाताच्या घटना आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. बीआरटी मार्ग आणि बस थांब्याचे टर्मिनल वेगवेगळ्या रस्त्यांवर असल्याने प्रवाशांची देखील तारांबळ होऊ शकते.

अनेक महिन्यांपासून आळंदी आणि नगर रोड बीआरटी मार्ग खुले करण्यासाठी वारंवार 'डेडलाइन' हुकल्याने पालिकेला नागरिकांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. आळंदी रोड मार्गावरील बहुतांश कामे पूर्ण झाली असल्याने तो एक ऑगस्टला खुला करण्याचे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पालिका आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाला(पीएमपी) दिले होते. त्यानुसार पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पथ विभाग, पीएमपी तसेच वाहतूक अधिकाऱ्यांशी मागील काही दिवसांपासून बीआरटी मार्गावरील कामांची पाहणी करीत आहे. बीआरटी बस स्थानकांवर प्रवाशांना बसची माहिती समजण्यासाठीची इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मनेजमेंट सिस्टीम यंत्रणा (आयटीएमएस) बसविणे आवश्यक आहे. ही यंत्रणा बसविल्यानंतर बीआरटी मार्ग खुला करण्यात येईल. त्यादृष्टीने पालिका आणि पीएमपीची यंत्रणांकडून अहोरात्र कामे चालू आहेत. तसेच आठवड्याभरात 'ट्रायल रन'घेण्याची शक्यता आहे.

संगमवाडी ते विश्रांतवाडी रस्त्यावरील जलद वाहतूक सेवा (बीआरटी) एक ऑगस्टपासून खळे करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. पण मार्गावर धावणाऱ्या बसेस अखेरच्या बसथांब्याच्या ठिकाणी (कळस रस्त्यावर) नियोजित टर्मिनल उभारणे आवशयक आहे. मात्र या ठिकाणाची जागा अद्याप ताब्यात न आल्याने पालिकेने विमानतळ रस्त्यावर टर्मिनल उभारणीचे काम सुरू केले आहे. बीआरटी मार्गवरील बसेस विश्रांतवाडी रस्त्यावर धावणार तर बसचा थांबा (टर्मिनल ) विमानतळ रस्त्यावर उभारल्याने परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

याबाबत नगरसेवक सिद्धार्थ धेंडे म्हणाले, 'आळंदी आणि नगर रोड बीआरटी मार्ग बंद असल्याने परिसरात सतत वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे हे मार्ग लवकरात लवकर सुरू करावे, अशी आग्रही मागणी सतत करीत आहे. आळंदी रोड बीआरटी मार्ग सुरू होण्याआधी मार्गावरील वाहतूक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे. आळंदी रोड बीआरटी मार्गावर धावणाऱ्या बसकरिता कळस रस्त्यावर बस टर्मिनल उभारण्याकरिता जागा प्रस्तावित आहे. मात्र ती जागा मिळत नसल्याने पालिकेकडून विमानतळकडे (जय गणेश विश्व समोर) जाणाऱ्या रस्त्यावर टर्मिनल उभारणीचे काम सुरू आहे.

आळंदी रोड मार्ग खुला करण्यापूर्वी पादचारी आणि वाहनचालकांसाठी सुरक्षेची उपाय योजना करावी लागणार आहे. या मार्गावरील धोकादायक शांतीनगर आणि प्रतिक नगर चौकातील रस्ता बंद करण्याची सूचना वाहतूक अधिकाऱ्यांनी केली.

टर्मिनलचे काम संथगतीने

संगमवाडी ते विश्रांतवाडी (आळंदी रोड) रस्त्यावरील बीआरटी येत्या १ ऑगस्ट पासून खुले करण्याचे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पालिकेला दिले आहेत. खुद्द पालिका आयुक्त कुणाल कुमार यावर लक्ष ठेवून आहेत. मात्र या मार्गावर धावणाऱ्या बसकरिता विमानतळ रस्त्यावर टर्मिनल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पण काम संथगतीने होत असल्याने १ ऑगस्टपूर्वी टर्मिनल उभारणी होणार का अशी शंका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मोठ्या उद्योगांसाठी एलबीटी नको’

$
0
0

पिंपरी : मोठ्या उद्योगांना एलबीटी लागू असल्यामुळे या कंपन्या स्थलांतराचे निर्णय घेत आहेत. स्थलांतरामुळे या कंपन्यांवर अवलंबून असणाऱ्या छोट्या उद्योजकांचे आणि सरकारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. सरकारने मोठ्या उद्योजकांवरची एलबीटी रद्द करावी अशी मागणी पिंपरी -चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत संघटनेचे सचिव दीपक फल्ले यांनी निवेदनात म्हटले आहे, 'ज्या उद्योजकांची उलाढाल ५० कोटीच्या आत आहे, त्यांना येत्या एक ऑगस्टपासून एलबीटी रद्द केला. पाच हजारांपेक्षा अधिक लघुउद्योजकांना याचा फायदा होणार आहे. ज्या उद्योगांची ५० कोटीपेक्षा जास्त उलाढाल आहे, त्यांना एलबीटी लागू होणार आहे. या कंपन्या स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे सरकारचे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने मोठ्या उद्योजकांची एलबीटी रद्द करावी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आळंदी रोड बीआरटीची ‘नगरविकास’कडून पाहणी

$
0
0

पुणे : महापालिकेच्या वतीने आळंदी रोडवरील संगमवाडी ते विश्रांतवाडी दरम्यान उभारण्यात आलेल्या बीआरटी मार्गाची केंद्र सरकारच्या नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पाहणी करून कामाचा आढावा घेतला. रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या बीआरटी मार्गाचे कौतुक या अधिकाऱ्यांनी केले. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बीआरटीमध्ये सुरू असलेल्या कामाची माहिती या अधिकाऱ्यांना दिली.

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याबरोबरच नागरिकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कमीत कमी वेळेत जाता यावे, यासाठी पालिकेच्या वतीने संगमवाडी ते विश्रांतवाडी दरम्यान बीआरटी मार्ग तयार करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेतून मिळालेल्या निधीतून हा मार्ग तयार करण्यात आला असून, येत्या १ ऑगस्टपासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या नगरविकास खात्याचे सचिव दुर्गाप्रसाद मिश्रा, एम. के. सिन्हा, आर. के. स‌िंग यांनी बीआरटीला भेट देऊन त्याची पाहणी केली.

काम पूर्ण करण्यास दोन दिवसांची मुदत

आळंदी रोडवरील बीआरटीची पाहणी केल्यावर रेंगाळलेली कामे तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे. येत्या दोन दिवसात बीआरटी मार्गावरील राहिलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त कुमार यांनी पुणे महापालिका प्रशासनाला दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उच्चपदस्थांकडून बीआरटीचा आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

केंद्र सरकारच्या नगरविकास विभाग व वर्ल्ड बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी (२६ जुलै) पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी प्रकल्पाच्या कामांची पाहणी केली. बीआरटी बससेवा सुरू करण्यापूर्वी या प्रकल्पांची पाहणी करून विविध सूचना त्यांनी संबधितांना केल्या आहेत. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबविण्यात आलेली घरकुल योजना या प्रकल्पाची पाहणी केली. पिंपरी-चिंचवड शहरात सांगवी-किवळे या मार्गावर कोणत्याही परिस्थितीत १५ ऑगस्टपासून पूर्ण क्षमतेने रेनबो बीआरटी बससेवा सुरू करण्याची तयारी चालू आहे. त्यापाठोपाठ नाशिक फाटा-वाकड मार्गही सुरू केला जाणार आहे. यानंतर आणखी दोन बीआरटी मार्ग लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

शहरात सुरू असणाऱ्या बीआरटीची प्रकल्पाची पाहणी रविवारी सकाळी केंद्र सरकार व वर्ल्ड बँकेच्या पथकाने केली. या वेळी केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाचे संचालक आर. के. सिंह, अतिरिक्त सचिव सी. एस. मिश्रा, सहसचिव एम. के. सिन्हा यांच्यासह वर्ल्ड बँकेचे टीम लिडर, सल्लागार, वाहतूक तज्ज्ञ, महापालिका आयुक्त राजीव जाधव, सहशहर अभियंता राजन पाटील, पीएमपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मयुरा शिंदेकर आणि पीएमपीएमएल व बीआरटीएसचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यानंतर आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेच्या प्रकल्पाची पाहणी पथकाने केली.

'काम लवकर पूर्ण करण्याची सूचना'

सांगवी-किवळे मार्गावरील सांगवी पुलाचे कामकाज, तसेच जिल्हा रुग्णालया समोरील बस स्थानक, वाकड जंक्शन येथील अंडर पास, ताथवडे चौक येथील बीआरटी बस व्यवस्था, मुकाई चौक येथील बीआरटीएस बस टर्मिनल, भोसरी येथील बस टर्मिनल, नेहरुनगर येथील पीएमपी बस डोपो, पुणे-मुंबई महामार्गावरील गॅमन इंडिया ब्रीज या बीआरटी संबधित प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना उर्वरित कामकाज पूर्ण करुन बीआरटी बस सेवा सुरू करण्याबाबत विविध सूचना या अधिकाऱ्यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायसोनी पतसंस्था संचालकांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

गुंतवणुकीची मुदत उलटूनही पैसे परत न दिल्याने भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतसंस्थेच्या बारा संचालकांना निगडी पोलिसांनी शनिवारी (२५ जुलै) अटक केली. कोर्टाने सर्व संचालकांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

प्रमोदकुमार भाईचंद रायसोनी (५४, रा. बळिराम पेठ, जळगाव), शेख रमझान शेख अब्दुल नबी (५५), राजाराम काशिनाथ कोळी (४७), सूरजमल बभुतमल जैन (५०), दादा रामचंद्र पाटील (६६), मोतीलाल ओंकार गिरी (४६), हितेंद्र यशवंत महाजन (५२), इंद्रकुमार आत्माराम ललवाणी (४१), यशवंत ओंकार गिरी (६०), दिलीप कांतिलाल चोरडिया (५१), भागवत संपत माळी (६३), भगवान हिरामण वाघ (६०, सर्व रा. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

या सर्वांवर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय इतर २१ जणांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 'बीएचआर'बाबत राज्यातील विविध ५२ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेट्रोचा प्रस्ताव नाहीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

'भूमिगत मेट्रोसाठी अव्वाच्या सव्वा खर्च होईल. गरजेनुसार भूमिगत करण्यास हरकत नाही. पण त्यासाठी तिकिटाचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागेल. राज्य-केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी तसा प्रस्ताव तयार करून राज्य सरकराने तो मंजूर करून, केंद्राकडे पाठवणे आवश्यक आहे. अद्यापही तसा प्रस्ताव अद्याप झालेला नाही,' अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (२६ जुलै) पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेच्या वेळी पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे, स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी अजित पवार म्हणाले, केंद्र व राज्यातील नवीन सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र, मागील सरकारकडून राबविल्या गेलेल्या योजना नवे नाव देऊन आणण्याचा धडाका सध्याच्या सरकारने लावला आहे. मात्र, महापालिकांची सत्ता असूनही आम्ही लोकांच्या हितासाठी त्यांच्या योजनांमध्ये सहभागी होतो आहेत. स्मार्ट सिटीबाबत नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये विविध मते होती. त्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत कोणतेही राजकारण न झाल्यास केवळ मार्कांच्या आधारे पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटी योजनेसाठी शंभर टक्के निवड होईल.'

'केवळ नाव बदलून केंद्र व राज्य सरकार योजना राबवत आहे,' अशी टीकाही त्यांनी केली. त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियान, वैयक्तिक शौचालय योजना, सर्वांसाठी घर योजनेत देखील महापालिका सहभागी झालेली आहे. 'स्वस्त घरकुल' योजनेपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना नवीन घर योजनेतून प्रथम लाभ देण्याचाही निर्णय आम्ही घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका सभेत 'वायसीएम'चे तत्कालीन अधीक्षक डॉ. आनंद जगदाळे यांच्याबाबत महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. कायद्याप्रमाणे तसा अधिकार लोकप्रतिनिधींना व सभागृहाला असल्यामुळे तो चुकीचा नसल्याचे सांगून अजित पवार यांनी या प्रकरणात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची सरळ पाठराखण केली.

अजित पवार म्हणतात...

मेट्रो-रिंगरोडचे काम एकहाती सत्ता नसल्याने राहिले.

दोन्ही व्यासपीठांवर असणारे भोसरीचे आमदार कोणाचे हे मला माहिती नाही.

शेतकरी-कामगार, सामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणार.

अच्छे दिन ही केवळ फसवणूक.

अधिवेशनानंतर राष्ट्रवादीची शहर कार्यकारिणी निवडणार.

पवना बंद जलवाहिनी गोळीबार प्रकरणाचे लोकांनी राजकारण केले.

स्वीकृत सदस्य निवडीत सर्वांचा विचार घेणार.

याकूब मेमनचा विषय न्यायालयाने संपवला आहे. त्यावर आता होणारे राजकारण दुर्दैवी.

राष्ट्रवादीत गटबाजी आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाऊन, गटबाजी सोडविण्यास प्रयत्न करणार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिक धोरण कधी?

$
0
0

चिन्मय पाटणकर, पुणे

महाराष्ट्रातील साहित्य-सांस्कृतिक चळवळीला ठोस दिशा देण्यासाठी २०१० मध्ये तयार केलेले सांस्कृतिक धोरण अद्यापही खितपत पडले आहे. परंपरा जतन, संस्कृती संवर्धचा डंका पिटणाऱ्या महायुती सरकारनेही या धोरणाच्या अंमलबजावणीची कार्यवाही केलेली नाही.

धोरणात नमूद करण्यात आल्याप्रमाणे दर पाच वर्षांनी या धोरणाचा आढावा घेण्याची वेळ आली असून, विद्यमान 'घोषणाबाज' सरकार या पावसाळी अधिवेशनात सांस्कृतिक धोरणाकडे गांभीर्याने पाहून अंमलबजावणीच्या आदेशाचा मुहूर्त साधणार का, असा सवाल साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातून उपस्थित करण्यात येत आहे.

राज्याच्या सुवर्ण महोत्सवाचा मुहूर्त साधून सांस्कृतिक धोरण तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यासाठी ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. त्यात ज्येष्ठ नाटककार दत्ता भगत, शफाअत खान, वि. वि. करमरकर, तत्कालिन आमदार उल्हास पवार, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, डॉ. अरुण टिकेकर, गिरीश गांधी, सांस्कृतिक विभागाचे तत्कालिन सचिव अजय अंबेकर यांचा समावेश होता. या समितीने जानेवारी २०१० मध्ये सर्वसमावेशक अशा सांस्कृतिक धोरणाचा मसुदा तयार करून सरकार दरबारी सादर केला. त्यात भाषा आणि साहित्य, प्राच्यविद्या, प्रयोगात्मक-दृश्यात्मक कला, स्मारके व पुरस्कार, महिलाविषयक दृष्टिकोन, क्रीडा संस्कृतीबाबत गांभीर्याने विचार करून त्याचा मसुदा तयार केला होता. तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मे २०१० मध्ये या धोरणाला मान्यताही दिली. मात्र, या धोरणातील काही सुचनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्यात आलेली नाही.

धोरणात नमूद केलेला राज्य सांस्कृतिक निधी स्थापन करण्यात आला आहे. मात्र, त्यात साहित्य संमेलनही होऊ शकणार नाही, इतका तो तुटपुंजा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. समितीने या धोरणात स्पष्ट केलेल्या काही कल्पक योजना अडकून पडल्या आहेत. त्यात इंडॉलॉजीच्या धर्तीवर महाराष्ट्राचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र प्रगत अध्ययन केंद्र, मराठी बोली अकादमी, प्रत्येक महसुली विभागत एक कलासंकुल, महाराष्ट्र ललित कला अकादमीची स्थापना, संतपीठ, सांस्कृतिक समन्वय समिती, प्रमाण भाषा कोश, परदेशात अध्यासने आदींचा समावेश आहे. प्रयोगात्म कलांच्या परवान्यांसाठी एक खिडकी योजनेचा प्रस्ताव लालफितीच्या कारभारात अडकला आहे. लोकसाहित्य समिती गेली कित्येक वर्षे पुरेसा निधी, मनुष्यबळ व कार्यालयाविना आहे.

जुन्या व दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटलायझेशन, भाषा सल्लागार समिती, मराठी भाषाविषयक धोरण, राज्यातील व बृहन्महाराष्ट्रातील सांस्कृतिक संस्थांना अनुदान, युनिकोड फॉन्टची निर्मिती व वापर, गडकोटांची जोपासना अशा धोरणात नमूद केलेल्या काही योजनांची अंमलबजावणी झाली. मात्र, त्याला गती आणि सुसूत्रता नाही.

उत्साहाला हवी धोरणाची जोड

परदेशातील स्ट्रीट आर्टच्या धर्तीवर कलांगण, मालगुंड येथे पुस्तकांचे गाव, सरस्वती फाळके यांच्या नावाने मराठी चित्रपट संग्रहालय उभारण्याची घोषणा करणारे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांचा सांस्कृतिक क्षेत्रासाठीचा उत्साह दांगडा आहे. मात्र, या दांडग्या उत्साहाला काहीतरी ठोस धोरणाची जोड मिळणेही तितकेच आवश्यक आहे. त्या दृष्टीने तावडे यांनी तातडीने या धोरणाला मान्यता देऊन त्याची अंमलबजावणी सुरू करण्याची अपेक्षा साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजामुळेच मेळघाटात काम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'वैद्यकीय सेवेचा व्यवसाय आणि या व्यवसायाचे व्यापारीकरण झालेला हा काळ आहे. या काळात समाजातील हितचिंतकांनी केलेल्या मदतीनेच मेळघाटामध्ये आदिवासींसाठी वैद्यकीय सोयी-सुविधा पुरविणे शक्य झाले आहे,' अशी कृतार्थ भावना डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांनी रविवारी व्यक्त केली. या पुढील काळातही आपल्या प्रयत्नांना अशीच मदत मिळावी, अशी अपेक्षाही डॉ. कोल्हे दाम्पत्याने बोलून दाखविली.

'सर फाउंडेशन' आणि 'तुम्ही आम्ही पालक' मासिकातर्फे डॉ. कोल्हे दाम्पत्याला तिसऱ्या महापालक सन्मानाने गौरविण्यात आले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी डॉ. भाल ठणगे, रामभाऊ इंगोले, फाउंडेशनचे संस्थापक हरीश बुटले या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत मासिकाच्या तिसऱ्या वर्षातील पहिल्या अंकाचेही प्रकाशन करण्यात आले. या वेळी पुरस्काराला उत्तर देताना डॉ. कोल्हे दाम्पत्याने आपल्या वाटचालीचा आढावा घेत, आपल्या पालकांचे संस्कार आणि समाजातील समविचारी मित्र-मंडळींच्या मदतीशिवाय हे शक्यच होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले.

'आई-वडिलांनी केलेल्या संस्कारांच्या बळावर आयुष्याला दिशा मिळाली. मेडिकलच्या शिक्षणानंतर समाजसेवेचे व्रत स्वीकारण्याच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या मित्रांमुळेच खऱ्या अर्थाने समाजसेवा करू शकलो,' असे डॉ. रवींद्र कोल्हे यांनी सांगितले. काम करण्याचा निर्णय ठामपणे टिकून राहिल्यानेच आदिवासींसाठी काम करणे शक्य झाल्याचे डॉ. स्मिता कोल्हे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदी पर्यटनाचाही विचार व्हावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'नदीसुधार प्रकल्पात केवळ शुद्धीकरण व स्वच्छताच नव्हे, तर पर्यटनाचाही विचार व्हावा. या आराखड्यात वॉटर स्पोर्टस, रिक्रिएशन सेंटरचाही समावेश असायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केली.

भारतीय जनता पक्षातर्फे नदीसुधार प्रकल्पाला केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा डॉ. माशेलकर यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष व खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

'विकास हा पर्यावरणपूरक असला पाहिजे. त्याच धर्तीवर जावडेकर काम करत आहेत. स्वच्छ भारत, स्मार्ट सिटी सारख्या प्रकल्पांसाठी प्रशासनाबरोबरच सामाजिक संस्था व सर्वांनीच एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे,' असेही डॉ. माशेलकर म्हणाले.

'देशभरात ७० टक्क्यांहून अधिक मैलापाणी, एक तृतीयांश औद्योगिक प्रदूषण प्रक्रिया न करताच थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे नद्या प्रदूषित होत आहेत. म्हणूनच, केंद्र सरकारने देशभरातील नदीसुधार प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे,' असे जावडेकर यांनी सांगितले.

'मुळा-मुठेच्या शुद्धीकरण, सुशोभीकरणाबाबत मीच गेल्या ६० वर्षापासून ऐकतो आहे. पण आजही या नद्यांची अवस्था गटारासारखी आहे. पुणे माझे शहर असल्याने या शहरासाठी गंगेनंतरचा पहिला सर्वात मोठा शुद्धीकरण प्रकल्प आणण्यात यशस्वी ठरल्याचा मला आनंद आहे. या प्रकल्पाअंतर्गत ११ मैलाशुद्धीकरण प्रकल्प उभारले जाणार असून, त्यामध्ये ४० कोटी लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असेल. शहरात ११३ किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकली जाईल,' असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

विरोधकांवर टीका

दृष्टिहीन नेतृत्व मिळाल्यानंतर शहराची कशी वाट लागते, हे पुण्याकडे पाहून कळते, अशा शब्दात भाजपचे शहराध्यक्ष व खासदार अनिल शिरोळे यांनी माजी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले. 'पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल चुकला, रिंगरोड बारगळला, मेट्रो प्रकल्प रेंगाळला,' असे सहज बोलून दाखविण्याचा करंटेपणाही ते दाखवतात. पंधरा वर्षात त्यांनी काहीच केले नाही, आणि आता विनाकारण नको ते मुद्दे ओढून काढण्याचा प्रयत्न करत आहेत,' अशी टीका त्यांनी केली.

'जावडेकर सर्वोत्तम'

जावडेकर हे देशाला लाभलेले सर्वोत्तम पर्यावरणमंत्री आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिकट वाट हीच वहिवाट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पतीची साथ नसताना मुलांना वाढविण्यासाठी बिकट वाट हीच वहिवाट समजून ती कष्टाने अन् जिद्दीने तुडविणाऱ्या महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य खालावत असल्याचे निरीक्षण आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने काही वर्षांपूर्वी नोंदविले होते. पाश्चिमात्य देशांतील एकट्या महिला पालकांबाबतचे हे निरीक्षण भारतालाही लागू पडत असल्याचे महिला चळवळीतील अभ्यासकांचे म्हणणे आहे.

'आर्थिक घडी बसविण्याची चिंता, नातेवाइकांचा असहकार, समाजाच्या प्रश्नार्थक नजरा, अन् मुलांकडून असलेल्या अपेक्षा.. अशा अनेक समस्यांना सामोरे जात असलेल्या या महिलांना सतत एकटेपणाची जाणीव होत असते. अपेक्षांच्या ओझातून त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य खचते. इतर महिलाच्या तुलनेत त्या इतरांच्या तुलनेत अकाली वयातच अनेक आजारांना सामोऱ्या जातात,' असे 'जर्नल ऑफ एपि़डिओमॉलॉजिकल अँड कम्युनिटी हेल्थ'मधील अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिका, ब्रिटन, डेन्मार्क, स्वीडन या देशांतील एकट्या महिला पालकांच्या आरोग आणि समस्यांबाबत पाहणी करून तो मांडण्यात आला होता.

या पाहणीदररम्यान अमेरिकेत प्रत्येक तीनमागे एक महिला ही एकटी महिला पालक आढळून आली. या सर्व महिलांचे वय पन्नास पेक्षा कमी होते. इंग्लड आणि पश्चिम युरोपीय देशांमध्ये दर पाच मागे एक महिला तर डेन्मार्क आणि स्वीडनमध्ये दहा मागे चार महिला या एकट्या पालक आहेत. दक्षिण युरोपध्ये परिस्थिती तुलनेने चांगली असून, तेथे दहा मागे एक महिला एकटी पालक आढळून आली. धक्कायदायक बाब म्हणजे वीस वर्षापेक्षा कमी वयात आई झालेल्या महिलांचे प्रमाण उल्लेखनीय आहे. घटस्फोट झालेल्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या सर्व महिलांना वेगवेगवळ्या व्याधी सुरू झाल्या आहेत. एकट्या पालकत्वामुळे महिलांना स्वतःचे करिअरवर मर्यादा येतात, अनेकींची स्वप्ने पुसली जातात. पर्यायाने त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम जाणतात, असा निष्कर्ष यातून पुढे आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. अनंत साठे यांचे निधन

$
0
0

पुणे : फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या पुणे विभागाचे संस्थापक व वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अनंत गोपाळ साठे यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. डेक्कन येथील साठे हॉस्पिटलचे ते संस्थापक होते. १९८० साली डॉ. साठे यांनी वैद्यकीय व्यवसाय सोडून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले होते. राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक डॉ. शांता साठे यांचे ते पती होत; तर ज्येष्ठ नाटककार मकरंद साठे, तसेच ललित कला केंद्राचे संचालक शारंगधर साठे हे त्यांचे पुत्र होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटाळ्यात राष्ट्रवादीचे नेते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. महामंडळाच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांप्रकरणी अखेर महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार रमेश कदम यांच्यासह काही जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याचा अंतरिम अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. हा अहवाल बुधवारपर्यंत विधीमंडळात मांडला जाईल. त्यामध्ये राष्ट्रावादी काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांची नावे समोर येतील, असे कांबळे यांनी सांगितले.

महामंडळाच्या पैशातून महागड्या आलिशान गाड्यांची खरेदी करण्यात आली. तत्कालीन अध्यक्षांनी स्वतःच्या नावे महामंडळातून कोट्यवधी रुपये काढले. निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पैसा पुरविण्यात आला, असे कांबळे यांनी सांगितले. आतापर्यंत महामंडळातील १६ अधिकारी व कर्मचारी यांना या घोटाळ्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे; तसेच अंतिम चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशन नव्वदीत; प्रशासन अनभिज्ञच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे रेल्वे स्टेशनची ऐतिहासिक इमारत सोमवारी ९१ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. ब्रिटीश काळात उभारलेली ही वास्तू आजही मोठ्या दिमाखात उभी असताना रेल्वे प्रशासनाला मात्र त्याचा विसर पडला आहे. प्रशासनाने या विशेष दिनाच्या पार्श्वभूमीवर एकाही कार्यक्रमाचे आयोजन केलेले नाही.

पुणे रेल्वे स्टेशनच्या इमारतीचा आराखडा १९१५ मध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष कामास प्रारंभ १९२२ मध्ये झाला. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे १९२५ साली स्टेशनचे काम पूर्ण झाले. मुंबईचे तत्कालीन गर्व्हनर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत २७ जुलै १९२५ रोजी पुणे रेल्वे स्टेशनचे उद् घाटन करण्यात आले होते. त्यासाठी मुंबईहून एक विशेष रेल्वेगाडी पुण्यात आणण्यात आली होती. त्या घटनेला सोमवारी ९० वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, पुणे रेल्वे प्रशासनाला त्याचा विसर पडला आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी औपचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही.

गरजेनुसार या स्टेशनचा वेळोवेळी विस्तार करण्यात आला; पंरतु मूळ आराखडा ब्रिटिशकालीनच आहे. पुणे स्टेशन आणि लाहोर जंक्शनचे डिझाइन एकसारखे आहे. रेल्वे बोर्डाने १३ वर्षांपूर्वी पुणे स्टेशनला मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून गौरविले आहे. सुपर फास्ट, गरीब रथ, एक्स्प्रेस, मेल, पॅसेंजर, लोकल यासारख्या २३० गाड्या दररोज पुणे स्थानकावरून धावत असून दरोरज चार ते पाच लाख प्रवासी प्रवास करतात. स्थानकात सध्या सात साधारण आणि दोन व्हीआयपी असे एकूण नऊ प्लॅटफॉर्म आहेत.

साधी विद्युत रोषणाईही नाही...

देशभरातील बहुतांश रेल्वे स्टेशनवर स्थापनादिनाच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा केला जातो. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्टेशनच्या इमारतीला विद्युत रोषणाई केली जाते. मात्र, पुण्यासारख्या शहरातील ऐतिहासिक रेल्वे स्टेशनच्या स्थापनादिनानिमित्त विद्युत रोषणाईदेखील केली जात नाही, अशी खंत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकारी नियुक्ती मान्यतेविना

$
0
0

सुनीत भावे, पुणे

महापालिकेत राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर नेमणूक केल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत नियमांची पायमल्ली होत असून, नगरविकास विभागाच्या मान्यतेविनाच अधिकाऱ्यांना पालिकेत रुजू करून घेतले जात आहे. पालिकेत उपायुक्तपदी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांची संख्या वाढत असून, पालिकेतील अधिकाऱ्यांना मात्र बढतीसाठी वर्षोनुवर्षे 'वेटिंग'वरच राहावे लागत आहे.

राज्य सरकारने मंजूर केलेल्या पालिकेच्या नव्या सेवा प्रवेश नियमावलीनुसार १८ उपायुक्त दर्जाची पदे निर्माण झाली आहेत. त्यापैकी निम्मी पदे प्रतिनियुक्तीने, तर निम्मी पालिकेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने भरण्यात यावी, असा नियम आहे. राज्य सरकारच्या इतर विभागांतून पालिकेत प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यापूर्वी नगरविकास विभागाची पूर्वसंमती आवश्यक असली, तरी त्याकडे सर्रास डोळेझाक केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरविकास विभागाच्या मान्यतेविना परस्पर अधिकाऱ्यांना रुजू करून घेत असल्याबद्दल आक्षेप नोंदवून त्याबाबत आयुक्तांकडून खुलासाही मागविण्यात आला आहे. तरीही पूर्वसंमतीविना अधिकाऱ्यांच्या नेमणुका सुरूच असून, त्यांची मुदत संपल्यानंतरही संबंधित अधिकारी कार्यरत असल्याने त्यांनी घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी कोण घेणार, अशी विचारणा केली जात आहे. तसेच, प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना रुजू करून घेण्यापूर्वी सर्वसाधारण सभेची मान्यता आवश्यक असतानाही, त्याला फाटा दिला जात आहे.

पालिकेतील अधिकाऱ्यांची बढतीद्वारे उपायुक्तपदी होणाऱ्या नेमणुकाही गेल्या तीन वर्षांपासून रोखण्यात आल्या आहेत. सहाय्यक आयुक्त पदावरून उपायुक्त पदावर बढतीने नेमणुका होणे अपेक्षित असतानाही, त्यासाठी आवश्यक सेवाज्येष्ठता यादीही अद्याप पालिकेने तयार केलेली नाही, असा आक्षेप घेण्यात येत आहे.

उपायुक्त दर्जाची पदे बढतीने भरा

राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांकडे मिळकतकर, सामान्य प्रशासन, दक्षता, मालमत्ता व व्यवस्थापन, सामान्य प्रशासन यासारख्या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी दिली जात असल्याबद्दल महापालिका अधिकारी संघाने आक्षेप नोंदविला आहे; तसेच पालिकेतील रिक्त असलेली उपायुक्त दर्जाची पदे बढतीने तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा ४० रुपये

$
0
0

पुणेः गुलटेकडी मार्केट यार्डात येणाऱ्या कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. घाऊक बाजारात ३० रुपये किलो दर असलेला कांदा मात्र किरकोळ विक्रेत्यांकडून ४० रुपये किलो दराने विकला जात आहे. परिणामी, ग्राहकांच्या डोळ्यात कांदा पाणी आणणार आहे. पुण्याच्या बाजारात कांद्याची पुणे विभागातून होणारी आवक दोन महिन्यांपासून घटली आहे. कांद्याचे दर २० रुपयांवरून २५ रुपये किलो दराने घाऊक बाजारात विक्री झाली. आता हेच दर चांगलेच गगनाला भिडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या विविध भागातील किरकोळ बाजारात ३५, ३८, ४० रुपये किलो अशा दराने कांद्याची विक्री होत आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशावर चांगला भुर्दंड पडणार आहे. 'पावसाळी वातावरणात कांदे खराब होतात. तसेच त्याला काजळी लागते. कांदा खराब होण्याची भीतीमुळे शेतकऱ्यांनी रविवारी कांदा बाजारात विक्रीसाठी आणला होता,' अशी माहिती कांद्याचे मार्केट यार्डातील घाऊक व्यापारी विलास रायकर यांनी 'मटा'ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images