Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चोरांची माहिती ‘व्हॉट्सअॅप’वर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिस दलांतील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सोनसाखळी चोरांविरुद्ध मोहीम उघडली आहे. या अधिकाऱ्यांनी 'व्हॉट्सअॅप' ग्रुप तयार करून सोनसाखळी संदर्भातील माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. यातून मिळालेली सोनसाखळी चोरीची घटना, आरोपी, 'सीसीटीव्ही' फुटेज आदी प्राथमिक माहिती तत्काळ शेअर करण्यात येत आहे.

सोनसाखळीचोरांना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी पुढाकार घेऊन बुधवारी विविध पोलिस दलांची आंतरराज्य बैठक आयोजित केली होती. कर्नाटक, पुणे शहर, पुणे ग्रामीण, नगर, रायगड, बीड, नागपूर ग्रामीण, कोल्हापूर, जळगाव आदी ठिकाणचे पोलिस अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. या पोलिस दलांच्या हद्दीत इराणी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. या वस्त्यांमधील संशयितांकडून देशभरातील विविध शहरांत सोनसाखळी चोरीचे गुन्हे करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना रोखण्यासाठी पोलिस दलांमध्ये समन्वय असावा, या साठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांनी सांगितले.

बैठकीसाठी आलेले बहुतांश अधिकारी गुन्हे शाखेतील होते. सोनसाखळी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी ते आपापल्या भागात प्रयत्न करत आहेत. त्यांना त्यांच्याकडील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेऊन बैठकीसाठी बोलवण्यात आले होते. सर्वांनी आपापल्या हद्दीतील गुन्हेगारांची माहिती आणल्याने सोनसाखळी चोरट्यांचा मोठ्या प्रमाणात डाटा तयार झाला आहे. फरार आरोपींचे नाव, पत्ते तसेच फोटोही शेअर करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हद्दीबाहेरील अंधांना पासमध्ये सवलत?

$
0
0

पुणे : पुणे महापालिका हद्दीबाहेरील अंध व्यक्तींना पीएमपीएमएलचा प्रवासी पास देताना त्यांच्याकडून २५ टक्के रक्कम घेऊन उर्वरित ७५ टक्के महापालिकेने भरण्याचा प्रस्ताव बुधवारी महिला बाल कल्याण समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पालिकेच्या मुख्यसभेसमोर ठेवण्यात आला असून मुख्य सभेच्या मंजुरीनंतर पालिका हद्दीबाहेर राहत असलेल्या अंध व्यक्तींना याचा फायदा मिळणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अंध, अपंग व्यक्तींना महापालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या वतीने पीएमपीएमएलचा मोफत प्रवासी पास दिला जातो. मात्र यंदा पहिल्यांदाच महापालिकेच्या हद्दीबाहेर राहणाऱ्या आणि पीएमपीएमएल जात असलेल्या भागातील अंध, व्यक्तींना पालिकेने पीएमपीचा मोफत पास द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय दृष्टिहीन संघाने काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांकडे केली होती. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी हा प्रस्ताव मंजुरीसाठी महिला बाल कल्याण समितीसमोर ठेवला होता. या समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे समितीच्या अध्यक्षा अर्चना कांबळे यांनी सांगितले.

प्रथमच मिळणार हद्दीबाहेरील अंधांना लाभ

पालिका हद्दीतील अंध, अपंग, गतिमंद व्यक्तींना पीएमपीएमएलकडून मोफत पास दिला जातो. ही पासची रक्कम महापालिकेच्या वतीने दर वर्षी पीएमपीला दिली जाते. चालू वर्षात शहरातील अंध, अपंग व्यक्तींची संख्या ५२० इतकी असण्याची शक्यता पीएमपीएमएलने महापालिकेला कळविली होती; तर दृष्टिहीन संघाने पालिका आयुक्तांकडे केलेल्या मागणीनुसार हद्दीबाहेर राहत असलेल्या अंध व्यक्तींची संख्या सर्वसाधारण २०० असल्याने त्यासाठी प्रत्येक महिना १२०० रुपये याप्रमाणे २८ लाख ८० हजार रुपये खर्च येणार आहे. ही मागणी मान्य झाल्यास प्रथमच हद्दीबाहेरील अंधांना बसच्या पाससाठी लाभ मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांच्या श्वसनविकारांचे सर्वेक्षण करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाढत्या प्रदूषणामुळे मुलांच्या श्वसन प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे आढळून आले असून त्यासंदर्भातील उपाययोजनांसाठी आरोग्य विभाग, पर्यावरण, बालरोगतज्ज्ञ, अलर्जी तज्ज्ञांची समिती स्थापण्यात येईल. तसेच, त्यांच्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येईल.

हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे मुंबई तसेच पुण्यासह राज्यातील मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्याबाबत विधान परिषदेचे सदस्य अनंत गाडगीळ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी उत्तर दिले. मुंबईतील मुलांचे यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये १३ टक्के मुलांमध्ये फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी व १४ टक्के मुलांमध्ये फुफ्फुसाची कार्यक्षमता अत्यंत कमी असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे या समस्येचे गांभीर्य वाढले आहे.

राज्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ६ ते १८ वयोगटातील एक कोटी ३६ हजार १२८ शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी एक लाख १५ हजार ०५३ विद्यार्थी श्वसन संस्थेच्या विकाराने आजारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या मुलांवर उपचार करण्यात आले आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून बाल आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येईल. तसेच, त्याद्वारे बालकांची तपासणी करण्यात येईल. बाधित मुलांची अलर्जीची चाचणी करून त्यासंदर्भात पालकांना माहिती देण्यात येईल, असेही डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हडपसर ‘बीआरटी’त पादचाऱ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, हडपसर

स्वारगेट- हडपसर बीआरटी मार्गात वैदुवाडी येथे रस्ता ओलांडताना खासगी बसने धडक दिल्याने अज्ञात वृद्ध पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातानंतर बसचालकाने झाल्याप्रकाराची दखल न घेता तेथून पळ काढला. वैदुवाडी येथे संध्याकाळच्या वेळी बीआरटी मार्गात एक अज्ञात वृद्ध रस्ता ओलांडत असताना स्वारगेटकडून हडपसरच्या दिशेला जाणाऱ्या एका खासगी बसने वृद्धाला धडक दिली. या धडकेमुळे वृद्धाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामळे त्यांचा चेहरा ओळखता न आल्याने शुक्रवारी सायंकाळपर्यंत त्यांची ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. पळून गेलेली स्टार नावाची बसचा क्र. एमएच १२ एफ झेड १८६५ असा असून पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहेत. अपघातामुळे या भागात एक तास वाहतूक कोंडी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाराष्ट्रभूषण पुरस्कार रद्द करा’

$
0
0

पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर केलेला महाराष्ट्रभूषण पुरस्कार रद्द करावा, या मागणीचा संभाजी ब्रिगेडने पुनरुच्चार केला. ब्रिगेडतर्फे शुक्रवारी अनेक मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. संतोष शिंदे, सम्राट थोरात, जोतिबा नरवडे, सागर आल्हाट, बाळासाहेब शिंदे, प्रशांत धुमाळ, अमोल पडवळ, हर्षवर्धन मगदुम, विजय वरखडे, संतोष हगवणे उपस्थित होते. महाराष्ट्रभूषण पुरस्कार रद्द करण्याबरोबरच ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना जिलेटिनची स्फोटके व धमकीचे पत्र आल्याप्रकरणी दोषींना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुरुंग प्रशिक्षणासाठी नवे कॉलेज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

राज्यातील कारागृहाच्या सेवेत दाखल होणाऱ्या तुरुंग अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाकरिता लवकरच नवीन प्रशिक्षण महाविद्यालय निर्माण करण्यात येणार आहे. तसेच, पुढील काळात कारागृह शिपायांचे प्रशिक्षण एका महिन्याने वाढविण्यात येणार असल्याचे अप्पर पोलिस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी सांगितले.

येरवड्यातील दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात १०५ व्या तुकडीचा दीक्षान्त समारंभ कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. १०५ व्या तुकडीतून ८० कारागृह शिपायांनी प्रशिक्षण पूर्ण केले. मुख्यालयाचे उपमहानिरीक्षक शहाजी सोळुंके, पश्चिम विभागाचे स्वाती साठे, प्राचार्य रमेश कांबळे, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे यू. टी. पवार यांच्यासह अनेक अधिकारी या वेळी उपस्थित होते.

दौलतराव जाधव प्रशिक्षण महाविद्यालात अधिकारी, कर्मचारी तसेच लिपिक यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याने महाविद्यालयावर ताण पडतो. भविष्यात कारागृहात नव्याने सेवेत दाखल होणाऱ्या अधिकार्यांसाठी नवीन प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या संस्थेतून आजपर्यंत २९ उप अधीक्षक, ८०९ तुरुंगाधिकारी आणि ७२०५ शिपाई यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्राचार्य कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन वरिष्ठ तुरुंगाधिकारी दिलीप वासनिक यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेचा एक हजार कोटी रुपयांचा महसूल बुडाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेल्वेच्या भोपाळ विभागातील इटारसी जंक्शन येथे गेल्या महिन्यात सिग्नल चॅनेल जळून खाक झाले. या घटनेच्या रेल्वे प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर झळा बसल्या आहेत. या सिग्नल चॅनेलची पुनर्उभारणी होईपर्यंतच्या ३४ दिवसांच्या काळात या मार्गावरून जाणाऱ्या दोन हजार ४०४ गाड्या रद्द कराव्या लागल्या आणि रेल्वेचा एक हजार कोटी रुपयांचा महसूल बुडाला.

इटारसी येथील सिग्नल चॅनेलला (इंटर लॉकिंग सिस्टिम) १७ जून रोजी आग लागली होती. त्यामध्ये यंत्रणा पूर्णपणे जळून खाक झाली होती. तेव्हा हाती घेतलेले सिग्नल चॅनेल उभारणीचे काम बुधवारी संपुष्टात आले. या ३४ दिवसांमध्ये इटारसी येथून पाच हजार गाड्या धावणे अपेक्षित होते. मात्र, त्यापैकी दोन हजार ४०४ गाड्या रद्द करण्यात आल्या. तर, २५९ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले होते. पुण्याहून जाणाऱ्या १०० ते १५० गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्याबरोबर इटारसी मार्गे जाणाऱ्या रेल्वेच्या अन्य विभागांच्या गाड्यांवरही त्याचा परिणाम झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वालाखाच्या बोगस नोटा जप्त

$
0
0

जुन्नर : बेल्ह्यातील सायली हॉटेलमध्ये एक जण बोगस नोटा घेऊन आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तातडीने कारवाई करून एक लाख ३१ हजार रुपयांच्या बोगस नोटा एका तरुणाकडून जप्त केल्या. या नोटांमध्ये १००० रुपयांच्या ९१ तर ५०० रुपयांच्या ८० बोगस नोटांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत काकडे (रा. चिखलठाण, जि. अहमदनगर) हा बोगस नोटा घेऊन बेल्ह्यात आल्याची माहिती पोलिसांना ‌मिळाली होती. या माहितीनंतर आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडून बोगस नोटा जप्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वसुलीसाठी ३१ अधिकारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील मराठा सहकारी बँक, सीकेपी को-ऑप बँक, पंजाब व महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेची सुमारे दोनशेहून अधिक कर्ज प्रकरणे थकली असून या थकित कर्जांच्या वसुलीसाठी कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी ३१ अधिकाऱ्यांची सहकार खात्याकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

या बँकांमधून विविध ठेवीदार व सभासदांनी कर्ज घेतले आहे. या कर्जापोटी संबंधितांकडून तारण घेण्यात आले आहे. मात्र, कर्ज घेतल्यानंतर या ठेवीदारांनी कर्जाच्या रकमा भरलेल्या नाहीत. परिणामी, त्यांची कर्ज खाती ही थकबाकीमध्ये गेली आहेत. बँकांची कर्ज खाती थकबाकीमध्ये गेल्यावर अनुत्पादित कर्जामध्ये (एनपीए) वाढ होते. त्याचा परिणाम बँकेच्या आर्थिक ताळेबंदावर होऊ शकतो.

थकित कर्जाच्या वसुलीसाठी बँकेकडून प्रयत्न झाल्यानंतरही संबंधित कर्जदार ते भरण्यास असमर्थ ठरल्यास त्याच्याकडून वसुली करण्यात येते. ही वसुली करण्यासाठी सहकार कायद्याच्या कलम १०१ नुसार अंमलबजावणी करण्यात येते. या बँकांची सुमारे दोनशे कर्ज प्रकरणे थकली आहेत. त्यात पंजाब व महाराष्ट्र को-ऑप बँकेच्या १६३; तर दी सीकेपी को-ऑप बँकेच्या २६ कर्ज प्रकरणांचा समावेश आहे. मराठा सहकारी बँकेची बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही कर्ज प्रकरणे एनपीएमध्ये गेली आहेत.

सहकार खात्याचे विशेष निबंधक सुनील पवार यांनी या बँकांच्या थकित कर्जांच्या वसुलीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पंजाब व महाराष्ट्र को-ऑप बँकेच्या थकित कर्जांच्या वसुलीसाठी सात अधिकरी नियुक्त करण्यात आले आहेत.

वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणीचे अधिकार

सहकार कायद्याच्या १०१ अन्वये त्यांना वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांनी सरचार्जची गणना करून ते कोषागारात जमा करावे अशी सूचना देण्यात आली आहे. दी सीकेपी बँकेसाठी दहा अधिकारी; तर मराठा सहकारी बँकेसाठी १४ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दळवीनगरात महिलेचा मृतदेह

$
0
0

पिंपरीः चिंचवड येथील दळवीनगर परिसरात शुक्रवारी (२४ जुलै) सकाळी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृतदेहावर जखमा असल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वे पोलिस आणि चिंचवड शहर पोलिस यांच्यातील हद्दीच्या वादामुळे बराच वेळ मृतदेह रेल्वे ट्रॅकच्या बाजूलाच पडून होता. पोलिसांना दळवीनगर येथील रेल्वे ट्रॅकजवळ एक महिला मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी चिंचवड पोलिस, तसेच रेल्वे पोलिस दाखल झाले. मृतदेह रेल्वे रूळाजवळील झाडाझुडपात तीन ते चार दिवसांपासून पडल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांविरुद्ध खुनाचा गुन्हा

$
0
0

पिंपरीः उपचारदरम्यान तरुणीचा मृत्यू झाल्याने तीन खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड येथील एका खासगी हॉस्पिटलात २४ फेबुवारी २०१४ रोजी हा प्रकार घडला. दरम्यान, कोर्टाच्या आदेशानुसार पिंपरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदन अहवालानुसार तरुणीचा मृत्यू काविळीने झाल्याचे समोर आले.

जजबीर कौर (रा. काळेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिची आई रंजीत कौर चंचलसिंग सबरवाल यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नदीफ अत्तार, नीलिमा गायकवाड, डॉ. संदीप कचारे (धनश्री हॉस्पिटल), डॉ. अभय शिंगपे (अंजली हॉस्पिटल) आणि डॉ. अजित यादव (निरामय हॉस्पिटल) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जजबीर आजारी असल्याने तिने वेदनाशामक गोळ्या खाल्या होत्या. त्यामुळे तिला त्रास झाला. त्यानुसार तिला धनश्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिचा मित्र नदीफ अत्तार याने उपचार सुरू न ठेवता तिला घरी आणले. घरी आणताच तिला जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर जजबीरला अंजली हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे तिला कावीळ झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिला लोणावळा येथे नेण्यात आले. तेथे तिच्यावर आयुर्वेद‌िक उपचार करण्यात आले. मात्र, तेथेही प्रकृतीमध्ये फरक न पडल्याने तिला चिंचवड येथील निरामय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना २४ फेबुवारी २०१४ला जजबीरचा मृत्यू झाला. दरम्यान, तिच्या आईने डॉक्टरांनी उपचारांमध्ये हलगर्जीपणा केल्याच आरोप करून कोर्टात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशानुसार पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता. फौजदार हरीश माने तपास करीत आहेत.

बलात्कारप्रकरणी सक्तमजुरी

पुणेः अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करुन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला सात वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या कोर्टाने निकाल दिला.

सोहेल फैयाज अहमद पटेल (२२, रा. बेळगाव) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी १७ वर्षीय मुलीने चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. संबंधित मुलगी बारावीचे शिक्षण घेत असताना कंपनीत ट्रेनी इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या सोहेलबरोबर तिची ओळख झाली. त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने तिला लग्नाचे अामिष दाखविले. २३ डिसेंबर २०१२ ते १५ जानेवारी २०१३ या कालावधीत सोहेलने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याच्या घरच्या लोकांचा फोन आला. त्यांनी सोहेलचा लग्नाला विरोध असल्याचे सांगितले. सोहेलने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीने फिर्याद दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन कचरा डेपोसाठी प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रस्तावित घनकचरा डेपोसाठी वनजमीन ताब्यात घेण्याबरोबरच केंद्र सरकारकडे वेगाने पाठपुरावा करण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. त्यासाठी वन विभागाने जागेच्या मोबदल्यात मागणी केलेली फरकाची रक्कम अदा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

पुनावळ्यातील सर्व्हे क्रमांक २४ येथील २२.८ हेक्टर वनजमिनीवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रस्तावित आहे. ही जागा ३० वर्षांकरिता घेण्यात येणार असून, त्या मोबदल्यात पिंपरी पौड येथील गट नंबर ३०१ मधील क्षेत्र वन विभागास पर्यायी वनेत्तर म्हणून देण्यात येणार आहे. त्यापूर्वी वृक्षलागवडीचा खर्च म्हणून दोन कोटी ६३ लाख रुपये आणि वृक्षतोडीचा खर्च म्हणून ८१ हजार रुपये असे एकूण दोन कोटी ६४ लाख रुपये यापूर्वीच देण्यात आले आहेत.

पिंपरी पौड येथील शासकीय जमीन हस्तांतर करण्यासंदर्भात सरकारी पातळीवर कार्यवाही चालू आहे. त्यासाठी विभागीय आयुक्तांमार्फत मार्च २०१४ मध्ये मंत्रालयात प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु, उपवनसंरक्षक पुणे विभागाने पर्यायी वनीकरणांतर्गत २०१०-११ ते २०१४-१५ या वर्षांतील रक्कम रेडिनेकरनुसार मागितली होती. ती देखील एप्रिल २०१५ मध्ये देण्यात आली. मात्र, फरकाची साडेआठ लाख रुपयांची रक्कम `आरटीजीएस`द्वारे भरणा केल्याशिवाय सदरचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, असे वन विभागाने कळविले आहे. त्यामुळे पालिकेच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण झाला आहे. वन विभागाच्या मागणीनुसार फरकाची रक्कम देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून, तो मंजुरीसाठी स्थायी समितीच्या मंगळवारी (२८ जुलै) होणाऱ्या बैठकीत ठेवण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. सुब्बय्या अरुणन यांना लोकमान्य टिळक पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भारतीय अवकाश संशोधन संस्थेमधील (इस्रो) ज्येष्ठ संशोधक आणि मंगळयान मोहिमेचे प्रकल्प संचालक डॉ. सुब्बय्या अरुणन यांना यंदाचा लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. टिळक पुण्यतिथीदिनी म्हणजे येत्या एक ऑगस्टला टिळक स्मारक मंदिरामध्ये त्यांना तो समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी शुक्रवारी या पुरस्काराची घोषणा केली. ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक या वेळी उपस्थित होते. सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. डॉ. अरुणन यांचे चांद्रयान मोहिमेत भरीव योगदान विचारात घेत, त्यांना हा पुरस्कार दिला जाणार असल्याचे डॉ. दीपक टिळक यांनी नमूद केले. यंदा हे पुरस्काराचे ३३ वे वर्ष आहे.

१ ऑगस्टला होणाऱ्या समारंभात डॉ. टिळक यांच्या हस्ते या पारितोषिकाचे वितरण होईल. ट्रस्टचे विश्वस्त व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे या वेळी उपस्थित राहणार आहेत. तसेच, या वेळी 'लोकांचे लोकमान्य' आणि 'चित्ररूप लोकमान्य टिळक' या पुस्तकांचे प्रकाशनही होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रकल्पांसाठी पालिका मेहेरबान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील कचऱ्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी नवनवे उपाय शोधणाऱ्या महापालिकेने कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वीच बिले अदा केली असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. अजिंक्य आणि दिशा या दोन्ही प्रकल्पांमध्ये कचऱ्यावरील प्रक्रिया सुरू होण्याआधी ५७ लाख रुपये देण्यात आल्याचा आक्षेप पालिकेच्याच मुख्य लेखापरीक्षकांनी नोंदविला आहे. घनकचऱ्याच्या सद्यस्थितीचा सविस्तर अहवालातून अनेक त्रुटींवर बोट ठेवण्यात आले असून, संबंधित कंपन्यांकडून ही रक्कम वसूल करून घेण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिका आयुक्तांकडे केली आहे. मनसेचे नगरसेवक बाळा शेडगे आणि पुष्पा कनोजिया यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. दोन्ही प्रकल्पांची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याचे शेडगे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या वेशात सराफांची फसवणूक

$
0
0

पुणेः पुण्यातील तीन, तर जळगावमधील एक अशा चार सराफांचे लाखो रुपयांचे दागिने फसवून लांबवणाऱ्या तोतया पोलिस निरीक्षकाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन कार आणि चारही घटनांमधील सोन्याचे दागिने असा २५ लाख ३३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रवींद्र महादू पवार (वय ३७, रा. वेसुगाव, सुरत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने आणखी काही गुन्हे केले असल्याची शक्यता असल्याने त्याच्याकडे तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांनी दिली. गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. पवारने पुण्यात खडकी येथील संघवी आभूषण ज्वेलर्स, हडपसर येथील सिद्धी ज्वेलर्स, भोसरी येथील केतन मोरे आणि जळगाव येथील दागिना कॉर्नर ज्वेलर्स या सराफांना पोलिस असल्याच्या बहाण्याने फसवले आहे.

गुन्ह्याची पद्धत काय?

पत्नीसाठी दागिने खरेदीच्या बहाण्याने दुकानात प्रवेश. दागिने पसंत करून पत्नीला दा​खविण्याची सबब पुढे करून सराफाला बाहेर नेणे. तेथे गुंगारा देऊन पसार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुवर्णमध्यासाठी पालिकेचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सार्वजनिक उत्सवाच्या काळात मांडव टाकताना मंडळांना त्रास होईल, अशा अटींचा समावेश पालिकेच्या वतीने तयार केल्या जाणाऱ्या धोरणात केला जाणार नाही. पालिकेने उत्सवांसाठी यापूर्वी तयार केलेल्या धोरणातील अटींचाच समावेश नवीन धोरणात असेल, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांन‌ी सांगितले.

मांडवाबाबत हायकोर्टाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी पालिकेने तयार केलेल्या धोरणाची अंमलबजावणी करताना मंडळांना सहकार्य करण्याची भूमिका पोलिस खात्याची राहील, असे पोलिस आयुक्त के. के. पाठक यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक उत्सवांसाठी मांडव टाकताना नागरिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना हायकोर्टाने दिल्या आहेत. त्यासाठी आवश्यक ते धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करणे कोर्टाने पालिकेला बंधनकारक केले आहे. या धोरणाबाबत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी शुक्रवारी शहरातील प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. पालिका आयुक्तांसह धर्मादाय आयुक्त अनिलकुमार दिघे, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, पालिकेतील गटनेते, कसबा, केसरीवाडा तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंडळ, अखिल मंडई मंडळाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या काळात मंडळांनी कोणती काळजी घ्यावी, या साठी पालिकेने तयार केलेल्या धोरणाचे सादरीकरण उपायुक्त माधव जगताप यांनी केले.

मंडप धोरणातील प्रमुख तरतुदी

रस्त्याच्या एकूण रुंदीच्या एक चतुर्थांश जागेत मंडप घालता येणार.

जागेच्या आकारमानानुसार पालिकेकडे शुल्क भरावे लागणार.

काँक्रिटच्या रस्त्यावर खोदाई करण्यास मनाई.

पीएमपीसाठी किमान १२ फूट रस्ता खुला ठेवण्याचे बंधन.

आठ फुटांपेक्षा लहान रस्त्यांवर मंडपाला परवानगी नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मंडळ अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षकाकडून बदलीसाठी लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. यासाठी खास सभा घ्यावी, असे पत्र मंडळातील भाजपच्या सदस्यांनी दिले आहे. भाजपचे सदस्य रघुनाथ गौडा, मंजुश्री खर्डेकर, किरण कांबळे यांनी हे पत्र दिले आहे. शिक्षणमंडळाचे अध्यक्ष असलेल्या धुमाळ यांना भाजपच्या सभासदांनी ४ जुलैला नोटीस पाठविली होती. त्याबाबत धुमाळ यांनी केलेला खुलासा मान्य नसल्याने अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी सभेचे आयोजन करावे, असे या पत्रात म्हटले आहे. शिक्षणमंडळात १५ सदस्य आहेत. अविश्वास ठराव आणण्यासाठी एक तृतीयांश म्हणजे ५ सदस्यांच्या स्वाक्षरीने ठराव मांडणे गरजेचे आहे. मंडळात भाजपचे ३, शिवसेनाचा १ तर मनसेचे ३ सभासद आहेत. सेना आणि मनसेच्या सभासदांनी भाजपच्या ठरावावर स्वाक्षरी केल्यास ठराव दाखल करण्यात कुठलीही अडचण येणार नाही. यावर मतदान झाल्यास भ्रष्टाचाराच्या प्रकरणात धुमाळ यांना अटक केल्याने काँग्रेस यावर नक्की कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांना मिळणार नवी गाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराचे प्रथम नागरिक असलेले महापौर तसेच उपमहापौर सध्या वापर असलेल्या गाड्या सुस्थितीत असतानाही त्यांच्यासाठी नवीन गाड्या खरेदी करण्याच्या २३ लाख रुपयांच्या प्रस्तावाला शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापौरांसाठी १५ लाख रुपयांची टोयोटा कंपनीची करोला अल्टीस तर उपमहापौरांसाठी पावणे आठ लाख रुपयांची मारुती सुझुकी कंपनीची सिऍझ गाडी खरेदी करण्यासाठी २३ लाख रुपयांचा प्रस्ताव मान्य करण्यात आल्याचे स्थायीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सांगितले. महापौर, उपमहापौरांच्या सध्याच्या गाड्या सुस्थितीत असताना पुणेकरांकडून कर रुपाने घेतल्या जाणाऱ्या पैशांवर लाखो रुपयांची उधळण का केली जात आहे? यावरून राजकीय वादंग माजला होता. त्यामुळे गेले काही‌दिवसांपासून हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात येत होता. शुक्रवारी त्याला मान्यता देण्यात आली.

स्थायी समितीत सुरुवातीच्या काळात हा प्रस्ताव मान्यतेसाठी आलेला असताना उपमहापौरांना देखील महापौरांसारखीच गाडी खरेदी करण्यात यावी अशी उपसूचना स्थायी समितीतील काँग्रेसचे सदस्य मुकारी अलगुडे, अविनाश बागवे आणि चंदू कदम यांनी दिली होती. त्यामुळे गाडी खरेदीला नवे वळण मिळाले होते. त्या प्रस्तावानंतर वाद निर्माण झाल्यानंतर महापौरांची गाडी ही हंजर कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या मालकाकडून खरेदी केली असल्याची माहिती उघड झाली होती.

महापौरांसाठी १५ लाख रुपयांची टोयोटा कंपनीची करोला अल्टीस तर उपमहापौरांसाठी पावणे आठ लाख रुपयांची मारुती सुझुकी कंपनीची सिऍझ गाडी खरेदी करण्यासाठी २३ लाख रुपयांचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

- अश्विनी कदम, अध्यक्षा, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे महापालिका जाणार कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्थानिक संस्था कराची (एलबीटी) मर्यादा वाढवून त्यातून बहुतेक व्यापाऱ्यांना सूट देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे पालिकेचे ७५ टक्के उत्पन्न बुडण्याची चिन्हे आहेत. 'स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी घातक ठरणाऱ्या सरकारच्या या धोरणामुळे विकासकामांवर गंभीर परिणाम होतील', असा इशारा देत त्याविरोधात कोर्टात दाद मागण्यात येईल, असे स्पष्ट संकेत महापौरांनी शुक्रवारी दिले.

एलबीटी रद्द करण्यासाठी व्यापाऱ्यांनी आणलेल्या दबावापुढे अखेर राज्य सरकारने शरणागती पत्करली असून, कायद्यातील उलाढालीची रक्कम वाढवण्याचा निर्णय केवळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केला. सरकारच्या धोरणामुळे शहरातील विकासकामांना खीळ बसणार असून, हे सरकार नक्की काय करते आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यातील सरकारने व्यापाऱ्यांचा विचार करताना, स्थानिक संस्था आणि नागरिकांचाही विचार करण्याची गरज असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

प्रस्तावाला विरोध

एलबीटी हद्दपार करण्याचा सरकारचा विचार असल्याने तो रद्द करू नये; अथवा पूर्वीप्रमाणे जकात सुरू करावी, अशी मागणी उपमहापौर आबा बागूल यांनी केली होती. अन्यथा, सरकारविरोधात कोर्टात जाण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. शुक्रवारी स्थायी समितीत या प्रस्तावाला भाजप-शिवसेनेने विरोध केला. त्यामुळे, त्यावर मतदान घेण्यात आले. १२ विरुद्ध ३ असा बहुमताने हा प्रस्ताव मान्य करण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सांगितले.

आश्वासन पाळा : पाठक

राज्य सरकारने एलबीटी मर्यादा वाढवून व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी नव्या बदलांमुळे व्यापाऱ्यांमध्ये दोन गट पडतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान महाराष्ट्र एलबीटीमुक्त करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, अशी मागणी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

हा कांगावा : टिळक

एलबीटी रद्द झाल्यास पालिका आर्थिक संकटात सापडेल, असा बागुलबुवा उभा केला जात असल्याची टीका भाजपच्या स्थायी समिती सदस्या मुक्ता टिळक यांनी केला. उत्पन्न स्रोत मर्यादित राहणार असल्याची भीती निराधार असल्याने प्रस्तावाला विरोध केल्याचे टिळक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीच्या गाड्यांना उशीर

$
0
0

पुणे : एक्स्प्रेस वे दुरुस्तीच्या कामामुळे एसटीच्या सेवेवर परिणाम झाला आहे. दुपारी १२ ते सायंकाळी चार या दरम्यानच्या काही गाड्यांना शुक्रवारी उशीर झाला. स्वारगेट स्थानकावर दुपारच्या वेळेत येणाऱ्या पाच ते सहा गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिरा आल्या. उशिरा आलेल्या गाड्या उशिराने सोडण्यात आल्याने या गाड्या मुंबईला पोहोचण्यासही उशीर होईल, असे एसटी महामंडळाने कळविले. एसटीच्या पुणे - मुंबई दरम्यान एकूण ३५० फेऱ्या होतात. त्या पैकी ७२ फेऱ्या शिवनेरीच्या तर १२५ फेऱ्या एशियाड गाड्यांच्या होतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>