Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘एफटीआयआय’च्या संचालकपदी पाठराबे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सध्या देशभरात चर्चेत असलेल्या 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'च्या (एफटीआयआय) संचालकपदी प्रशांत पाठराबे यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. गेला महिनाभर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत नवनियुक्त संचालक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

गेली चार वर्षे संचालकपदी असलेल्या डी. जे. नारायण यांचा कार्यकाळ शुक्रवारी संपला. नारायण यांनी शुक्रवारी दुपारी संचालकपदाची सूत्रे पाठराबे यांच्याकडे सोपवली. पाठराबे सध्या पत्रसूचना कार्यालयाचे (पीआयबी) संचालक आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक (अतिरिक्त कार्यभार) म्हणूनही काम केले आहे.

नारायण यांचा कार्यकाल संपत असल्याने 'एफटीआयआय'च्या संचालकपदी कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता होती. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने या पदासाठी जाहिरातही दिली होती. सहा जणांच्या मुलाखती होणार असल्याची माहिती होती; मात्र विद्यार्थ्यांचा संप सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर, मंत्रालयाने या मुलाखती पुढे ढकलल्या.

'विद्यार्थ्यांच्या संपाची कल्पना आहे; मात्र नेमकी परिस्थिती समजावून घेण्यासाठी विद्यार्थ्यांशी बोलणार आहे. शक्य तितक्या लवकरच हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे. आताच कोणत्याही गोष्टीवर भाष्य करणे योग्य होणार नाही,' असे पाठराबे म्हणाले.

बऱ्याच वर्षांनी मराठी संचालक

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे १९९७ ते २००२ या काळात संस्थेचे संचालक होते. त्यानंतर या पदावर एकाही मराठी अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नाही. पाठराबे यांच्या रूपाने बऱ्याच वर्षांनी 'एफटीआयआय'ला मराठी संचालक लाभला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंदोलन गरजेचेच, मात्र वर्गातही बसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'व्यक्तीविरोधापेक्षा कृतीविरोधात आवाज उठवणारे आंदोलन महत्त्वाचे असते. अहिंसेच्या मार्गाने सुरू असलेले हे आंदोलन देशपातळीवर महत्त्वाचे आहे; मात्र संपावर जाऊन शैक्षणिक नुकसान करून घेण्यापेक्षा काळी फीत दंडावर बांधून वर्गात बसून आंदोलन सुरूच ठेवा,' असा सल्ला ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ डॉ. गणेश देवी यांनी 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी दिला.

'वारी आनंदयात्रा' या कार्यक्रमासाठी डॉ. देवी पुण्यात आले होते. त्यासह त्यांनी 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'मध्ये (एफटीआयआय) संपकरी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. देवी यांनी विद्यार्थ्यांचे संयमित आंदोलन, सामाजिक परिस्थिती, सरकारी कारभार आदी मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.

डॉ. देवी म्हणाले, 'राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी), भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषद (आयसीएसएसआर), ललित कला अकादमी अशा महत्त्वाच्या केंद्रीय संस्थांमध्ये केंद्र सरकार निर्गुंतवणुकीचे धोरण स्वीकारत आहे. या संस्थांचा कारभारही योग्य रीतीने सुरू नाही. त्यामुळे या संस्थांमध्येही अशाच आंदोलनांची आवश्यकता आहे.'

'तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, तरी हरकत नाही. तुमचे आंदोलन आदर्श आहे. कारण, ते व्यक्तीविरोधात नाही, तर कृतीविरोधात आहे. त्यामुळे तुमच्या कृतीवर विश्वास ठेवा. तत्काळ यश मिळण्याची अपेक्षा करू नका. कदाचित हे आंदोलन चिरडलेही जाईल; मात्र ते अपयश मानू नका. आज लाखो तरुण गप्प आहेत. त्यामुळे तुमचे आंदोलन महत्त्वाचे आहे. तुमची आता प्रश्नचिन्हासह झालेली मैत्री तोडू नका. शक्य असेल, त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करा,' असेही देवी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीनाला मारहाण; दोघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सातवर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना २४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

या प्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. अटक आरोपी आणि ताब्यात घेण्यात आलेले अल्पवयीन आरोपी या पाचजणांनी पीडित मुलाचा अमानुष छळ केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नितीन व्यंकटेश भंडारी (वय २१) आणि रवी माणिक पवार (वय २० ,दोघेही राहणार डहाणूकर कॉलनी, कोथरुड) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध अपहरण, अनैसर्गिक कृत्य आणि जीवे मारण्याचा प्रयत्न, बाललैंगिक अत्याचाराच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने फिर्याद दाखल केली होती. पीडित मुलगा आणि त्याची आई बुधवारी रात्री आठच्या सुमारास घराजवळील गणपती मंदिरात आरतीसाठी गेले होते. आरती संपल्यानंतर पीडित मुलगा वस्तीतील मुलांसोबत खेळत होता. तो घरी आला नाही म्हणून आई-वडिलांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. साडेनऊ वाजेपर्यंत त्याचा शोध लागला नाही. त्यानंतर दुचाकीवरील दोन व्यक्तींनी त्याला आणून सोडले. त्याच्या चेहऱ्यावर कानावर आणि छातीवर मारहाण केल्यामुळे जखमा झालेल्या दिसून आल्या. प्रकृती गंभीर असल्याने तत्काळ खासगी रुग्णालयात त्याला दाखल केले. डॉक्टरांनी मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी-चिन्मय स्कॉलरशिपमध्ये पहिले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या निधी वैद्य आणि चिन्मय पिंपळखरे अनुक्रमे चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत शहरात प्रथम आले आहेत. निधीने चौथीच्या परीक्षेत राज्यात दुसरे, तर चिन्मयने सातवीच्या परीक्षेत राज्यात आठवे स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या अंतिम निकालाचा तपशील शुक्रवारी जाहीर केला. चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत राज्यात अनुक्रमे ५८.४६ आणि ४२.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. चौथीसाठी राज्यभरातून १६,६८३, तर सातवीसाठी १६,१५६ विद्यार्थी स्कॉलरशिप मिळविण्यासाठी पात्र ठरल्याचेही या निमित्ताने परिषदेने जाहीर केले.

अंतिम निकाल जाहीर करण्यापूर्वी परिषदेने विद्यार्थ्यांच्या गुणपडताळणीसाठी आलेल्या अर्जांचा विचार करून योग्य ती कार्यवाही पूर्ण करूनच हा निकाल जाहीर केला आहे. परिषदेने जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीवर आक्षेप असल्यास इच्छुकांनी अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत परिषदेकडे आपले आक्षेप नोंदवावेत. त्यासाठी आवश्यक माहिती आणि पुराव्यासह mscepune@gmail.com या ई-मेलवर पाठविता येतील. २४ जुलैनंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, असेही परिषदेने शुक्रवारी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असा निरोप नको होता...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'गेल्या चार वर्षांत संचालक म्हणून खूप आनंदाचे, कसोटीचे क्षण अनुभवण्याची संधी मिळाली; मात्र 'एफटीआयआय'कडून अशा पद्धतीने निरोप नको होता,' अशी भावना मावळते संचालक डी. जे. नारायण यांनी व्यक्त केली. नारायण यांनी २०११मध्ये पंकज राग यांच्याकडून संचालकपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या संचालकपदाचा कार्यकाल शुक्रवारी संपला. त्या पार्श्वभूमीवर, त्यांनी गेल्या चार वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. नवीन हॉस्टेल, क्लासरूम, चित्रपटगृह, आर्ट वर्कशॉप, नॉलेज सेंटर बांधण्यास मंजुरी मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.

'पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम बदलणे, बॅकलॉग दूर करणे आदी कामे विद्यार्थी, प्राध्यापक व सहकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. एफटीआयआय संस्था आता एका मोठ्या वळणावर आली आहे. संस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञान येऊ घातले आहे. त्यात डिजिटल पोस्ट प्रॉडक्शन सेटअप, डीआय सेटअप, ६० टेराबाइटची सर्व्हर स्पेस आदी गोष्टी तयार होत आहेत. ही सगळी कामे माझ्या कार्यकाळात शक्य झाली याचा आनंद वाटतो,' असे त्यांनी सांगितले. 'संस्थेत काम करणे हा खूपच फलदायी अनुभव होता; मात्र त्याचा शेवट अशा पद्धतीने होणे दुर्दैवाचे आहे,' असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसची निदर्शने

अभिनेता गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षतेखालील नवीन संचालक मंडळाची नियुक्ती, संचालक डी. जे. नारायण यांनी संपकरी विद्यार्थांवर कारवाई करण्याबाबत दिलेली नोटीस या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने 'एफटीआयआय'च्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. सरकार आणि संचालकांचा या वेळी निषेध करण्यात आला. अमित बागूल, रमेश धर्मावत, राकेश नामेकर, विनय ढेरे, विक्रम खन्ना, राधिका मखामले, कल्पना उगावणे आदी या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंटी पवारच्या विरोधात मोक्का

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिंहगड रोड परिसरात गुन्हेगारीची दहशत पसरवत व्यावसायिंकडून खंडणी उकळणाऱ्या बंटी पवार टोळीविरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यार्तंगत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पवार आणि इतर आरोही हे वेगवेगळ्या खंडणी आणि दरोड्याच्या गुन्ह्यात जेलमध्ये आहेत. पुढील काही महिन्यांत शहरातील संघटित गुन्हेगारी मोडून काढली जाईल, असा पुनरूच्चार पोलिस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी केला आहे.

महेश उर्फ बंटी प्रकाश पवार (वय २५, रा. वडगाव बुद्रुक), मिलिंद हिरामण राजगुरू ( वय २४, रा. वडगाव बुद्रुक), स्वप्नील प्रभाकर तुरडे (वय २७, रा. हिंगणे खुर्द) आणि विनोद शिवाजी जमधारे (वय २५, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) यांच्यावर 'मोक्का'र्तंगत कारवाई करण्यात आली आहे. पवार याच्याविरुद्ध १४ गुन्हे दाखल आहेत. एका व्यापाऱ्याच्या कार्यालयात घुसून त्याच्या कामगारांना मारहाण केल्याच्या गुन्ह्यात पवारला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध तक्रारींचा पाऊस पडला होता. पवारच्या गुन्हेगारी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर 'मोक्का'खाली कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती उपायुक्त पी. आर. पाटील

यांनी दिली. पवार विरुद्ध आलेल्या तक्रारींच्या तपासाअंती सहआयुक्त सुनील रामानंद, गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त सी.एच. वाकडे, उपायुक्त पाटील आाणि सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांनी या टोळीवर 'मोक्का' लावण्यासाठी हालचाली केल्या. खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांच्याकडे सुरू असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याला 'मोक्का' लावण्यात आला आहे.

पाच टोळ्यांना मोक्का, ४५ गजाआड

गेल्या दोन महिन्यांत शहरातील पाच गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध 'मोक्का'खाली कारवाई करण्यात आली आहे. या पाच टोळ्यांतील ४५ गुन्हेगार गजाआड आहेत. यामध्ये शहरातील बहुतांश गँगस्टर आणि त्यांच्या साथीदारांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुढील काही​ महिन्यांत शहरातील सं​घटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. अन्य टोळ्यांच्या म्होरक्यांवरही पोलिसांचे लक्ष असल्याचे सहआयुक्त रामानंद यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण खात्याचा ‘हक्कभंग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित गटांमधील बालकांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी धोरणे आखणाऱ्या शिक्षण खात्यानेच आता विद्यार्थ्यांचे हक्क काढून घेण्याची भाषा सुरू केली आहे. २५ टक्क्यांच्या ऑनलाइन प्रक्रियेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी येत्या २१ जुलैपर्यंत आपल्याला मिळालेल्या शाळेमध्ये प्रवेश न घेतल्यास, त्यांचा प्रवेशाचा अधिकार काढून घेणार असल्याचे मेसेज शिक्षण खात्याने पालकांना पाठविले आहेत. त्यामुळे आधीच गोंधळलेल्या पालकांच्या गोंधळात आणखी भर पडली आहे.

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत शाळांमधील २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशांसाठी राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली आहे. या प्रक्रियेवर आक्षेप घेत शिक्षण संस्था चालकांनी सरकारच्या विरोधात हायकोर्टात खटला दाखल केला होता. हा खटला सुरू असल्याने, संचालनालयाने प्रवेश प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून बंद ठेवली होती. हायकोर्टाने २९ एप्रिलपूर्वीच्या परिस्थितीनुसार ही प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. मात्र ही प्रक्रिया सुरू होताच पालकांना असे एसएमएस आल्याने प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

'आम्ही जवळपास तीन महिन्यांपासून आमच्या मुलांच्या प्रवेशासाठी या प्रक्रियेच्या भरोसे थांबलो आहोत. प्रवेशासाठी शाळांकडे गेल्यावर शाळा आम्हाला अक्षरशः धक्के मारून बाहेर काढत आहेत. हा अनुभव एकीकडे घेत असतानाच, आता ज्या प्रक्रियेतून आम्हाला मदतीची अपेक्षा होती, तिच प्रक्रिया आता २१ जुलैपर्यंत प्रवेश झाले नाहीत, तर तुम्हाला तुमचा हक्क मिळणार नाही, असे सांगते आहे. हा आम्हाला धोक्यात टाकण्याचाच प्रकार आहे.' अशी प्रतिक्रिया या निमित्ताने एका पालकाने नोंदविली.

शिक्षणहक्क कायदा काय सांगतो...

शिक्षणहक्क कायद्यानुसार, शाळांमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा आरक्षित आहेत. या जागा भरण्यासाठी तशी कोणतीही मुदत कायद्यामध्ये दिलेली नाही. त्यामुळे शिक्षण खाते पालकांना अशी सक्ती का करत आहे, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

अल्पसंख्य शाळांची पटपडताळणी करा

पुणेः धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्याची (आरटीई) अंमलबजावणी होत नाही. वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्क्यांमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे अल्पसंख्याक शाळांची पटपडताळणी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अजय शिंदे यांनी केली आहे. अनुदानित शाळांमधून २५ टक्के वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सक्ती आहे. मात्र, कॉन्व्हेंट शाळांमध्ये ही सक्ती नाही. २५ टक्के कोट्यातून देण्यात येणाऱ्या प्रवेशांचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. सरकारकडून संबंधित विद्यार्थ्यांचे शुल्क देण्यात येत नसल्याचे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निखिल जकातदार ‘फोर्ब्ज’च्या कव्हरवर

$
0
0

सिद्धार्थ केळकर, पुणे

मूळचा पुण्यातील आणि सध्या अमेरिकेत एक यशस्वी उद्योजक असलेला निखिल जकातदार फोर्ब्ज नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर झळकला आहे. त्याच्या 'व्ह्यूक्लिप' या कंपनीबद्दलचा एक सविस्तर लेख फोर्ब्जच्या जुलै महिन्याच्या 'मिडल ईस्ट' आवृत्तीमध्ये देण्यात आला आहे. 'फोर्ब्ज' हे प्रसिद्ध अमेरिकन बिझनेस नियतकालिक आहे. जगभरातील उद्योग क्षेत्रात या नियतकालिकाने घेतलेली दखल उल्लेखनीय समजली जाते. या नियतकालिकाने एका पुणेकराच्या उद्योजकतेच्या प्रवासाची मुखपृष्ठकथा करणे म्हणूनच विशेष आहे. 'रिसाइझिंग द सिल्व्हर स्क्रीन' अशा शीर्षकाचा लेख यामध्ये असून, निखिलच्या 'व्ह्यूक्लिप' या कंपनीची आणि त्याच्या नवकल्पनेची माहिती यामध्ये मांडण्यात आली आहे.

निखिल हा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचा (सीओईपी) विद्यार्थी असून, त्याने अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि कम्प्युटर सायन्स या विषयांत पीएचडी केली आहे. पीएचडी प्रबंधाचेच एका उद्योजकीय कल्पनेत रूपांतर करून त्याने उद्योजकतेचा प्रवास सुरू केला. त्यातूनच साकारलेल्या योजनेला बर्कले हास बिझनेस स्कूलतर्फे आयोजिण्यात येणाऱ्या 'बर्कले बिझनेस प्लॅन' स्पर्धेत पारितोषिक मिळाले होते. तेथेच एका व्हेन्चर कॅपिटलिस्टने निखिल आणि त्याच्या सहकाऱ्याच्या 'स्टार्ट अप'साठी भांडवल घालण्याचे मान्य केले होते.

निखिलने त्यानंतर उद्योजकतेची गाडी पकडली आणि त्यातून त्याच्या करिअरचा प्रवास वेगाने होत राहिला. सातत्याने वेगळे काही तरी करत राहण्याची आणि दर वेळेस अधिकाधिक सुधारणा करण्याची ऊर्मी असेल, तर उद्योजकतेचे क्षितिज कसे विस्तारत जाते, याचे निखिल हे एक उत्तम उदाहरण आहे. निखिलने आतापर्यंत स्वतः सुरू केलेल्या तीन कंपन्या कोट्यवधी रुपयांना विकल्या आहेत आणि सध्या तो चौथी 'व्ह्यूक्लिप' नावाची कंपनी चालवतो आहे.

निखिलची ही व्ह्यूक्लिप कंपनी काय करते, याचे अगदी साधे उत्तर द्यायचे, तर ती कोणत्याही मोबाइल हँडसेटवर तुम्हाला उत्तम दर्जाचा व्हिडिओ पाहायची मुभा देते. त्यासाठी इंटरनेट कनेक्शन ही प्राथमिक अट आहे.

विज्ञान, गोल्फची आवड

निखिल हा पुण्यातील लॉयला हायस्कूलचा विद्यार्थी. शालेय जीवनापासूनच विज्ञान हा त्याचा आवडीचा विषय होता. त्याचे वडीलही उद्योजक आहेत. 'सीओईपी'तून इंजिनीअरिंग केल्यानंतर त्याने अमेरिकेत मास्टर्स केले. वयाच्या चाळिशीतच त्याने उज्ज्वल यश मिळवले आहे. गोल्फ हा त्याचा आवडीचा खेळ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेकायदा सिलिंडरविक्री उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धनकवडीमधील शंकरानंद हाउसिंग सोसायटीच्या पार्किंगमध्ये बेकायदा साठवणूक केलेले २२ सिलिंडर शहर पुरवठा कार्यालयाच्या पथकाने छापा मारून जप्त केले. सोसायटीचा रखवालदार सिलिंडरची बेकायदा विक्री करीत असल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी दत्तु नागनाथ देवकाते याच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनकवडीमधील चैतन्यनगर येथील शंकरानंद सोसायटीमध्ये सिलिंडरची बेकायदा विक्री होत असल्याची तक्रार पुरवठा कार्यालयाकडे आली होती. या तक्रारीच्या आधारे पुरवठा खात्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोसायटीत छापा मारला. छाप्यामध्ये भारत पेट्रोलियमचे ११ सिलिंडर, हिंदुस्थान पेट्रोलियमचे दहा आणि खासगी कंपनीचा सिलिंडर आढळून आला. त्यातील २० सिलिंडर भरलेले, तर दोन रिकामे होते. बेकायदा सिलिंडर साठ्यामुळे सोसायटीला धोका निर्माण झाला होता. या प्रकाराची पुरवठा खात्याच्या पथकाने चौकशी केली असता, देवकाते सिलिंडरची विक्री करीत असल्याचे स्पष्ट झाले. देवकाते हा काळ्याबाजाराने म्हणजे ७०० रुपयांना सिलिंडरची विक्री करीत असल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येत असल्याचे पुरवठा अधिकारी नीलिमा धायगुडे आणि तहसीलदार रणजीत भोसले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जिल्हानिहाय आराखडे करा’

$
0
0

पुणेः 'जिल्हानिहाय पीकनियोजन आराखडा तयार करणे, ही काळाची गरज आहे. असे आराखडे तयार केल्यास राज्य शेती क्षेत्रात देशात आघाडीवर राहील,' असा विश्वास माजी सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

नाबार्डच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरंगी यांनी शेतीच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. एनआयबीएमचे संचालक डॉ. अचेतन भट्टाचार्य, पी. ए. पाठक, नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक डॉ. यू. एस. सहा आदी या वेळी उपस्थित होते. 'आपल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची वेगळी रचना आहे. तेथील अडचणी वेगळ्या आहेत. त्यांचा विचार न करता एकाच प्रकाराचा आराखडा तयार करणे संयुक्तिक होणार नाही. स्थानिक पातळीवरील गरज आणि त्या भागांतील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अॅक्शन प्लॅन करण्याची गरज आहे,' असे सरंगी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेलवाडीत रंगला रिंगण सोहळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबामाऊली-तुकारामच्या जयघोषात पंढरीच्या ओढीने निघालेला वैष्णवांचा मेळा शनिवारी बेलवाडी (ता. इंदापूर) येथे विसावला. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण येथे पार पडले. नेत्रदीपक रिंगणसोहळ्याने लाखो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण बेलवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले.

तुकोबारायांच्या पालखीचे स्वागत बेलवाडीच्या सरपंच शोभा गणगे, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे आणि ग्रामस्थांनी केले. त्यानंतर काही वेळातच रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वाऱ्याच्या वेगाने परिक्रमा पूर्ण करीत होत्या. त्यांच्यापाठोपाठ मानाचे विणेकरी, झेंडेवाले धावले. हरिदासांनी प्रदक्षिणा पूर्ण करून रिंगण सोहळ्यास चैतन्य प्राप्त करून दिले. यानंतर रिंगणात मानाच्या अश्वांचे आगमन होताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

पालखी सोहळ्यांसोबत चालणाऱ्या मानाच्या अश्वांनी डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच गोल रिंगण पूर्ण करून तुकोबारायांच्या पालखीला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर दुसऱ्या अश्वाने परिक्रमा घातली. या नयनरम्य सोहळ्याने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर पालखी सोहळा दुपारच्या विश्रांतीसाठी गावातील मारुती मंदिरात विसावला. दुपारची न्याहरी घेऊन सोहळा लासुर्णे, जंक्शनमार्गे अंथुर्णे गावी मुक्कामासाठी दाखल झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५४ लाखांचा अपहार; २ कर्मचारी अटकेत

$
0
0

पुणे : एटीएम मशिनमध्ये रक्कम भरणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी ५४,१२,३०० रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी प्रशांत जयवंत पवार (वय २४, शिवणे) आणि कुणाल राजेंद्र मोरे (रा. रविवार पेठ) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याविरुद्ध महेश स्वामी (२७ रा. शिवणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी हे सायंटिफिक सिक्युरिटी मॅनेजमेंट सर्व्हिसमध्ये ब्रँच मॅनेजर आहेत. पवार आणि मोरे हे त्यांचे कर्मचारी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या लुल्लानगर चौक येथील एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी या दोघांकडे होती. १६ सप्टेंबर २०१४ ते १२ जानेवारी २०१५ या कालावधीत हा प्रकार घडला. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये भरण्यात येणाऱ्या रकमेत आरोपींनी ५४ लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीसंकट निवारणाचे अल्लाला साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रिमझिम बरसणाऱ्या सरींमध्ये सामूहिक नमाजपठण करून मुस्लिम बांधवांनी शनिवारी उत्साहात रमजान ईद साजरी केली. अल्लाहविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त करून राज्यातील पाणीसंकट दूर व्हावे, राष्ट्रीय ऐक्य कायम राहावे, या साठी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली. शनिवारी सकाळपासूनच आबालवृद्धांनी ईदगाह आणि मशिदींचा परिसर फुलून गेला होता.

सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाण्याचा थेंबही न घेता महिनाभर केलेल्या कडक उपवासानंतर मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईदचा आनंद लुटला. पावसाच्या सरी बरसत असतानाही कॅम्प येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईद-उल फित्रची विशेष नमाज अदा केल्यावर त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ईदनिमित्त मशिदींवर रोषणाई करण्यात आली होती. मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील नागरिकांनी या कार्यक्रमासाठी गर्दी केली होती. शहरातील लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक क्षेत्रासह पोलिस व प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.

ईदगाह मैदानाबरोबरच शहरातील विविध मशिदींमध्ये विशेष नमाज पठण करण्यात आले. सकाळी ऊन-पावसाचा खेळ सुरू असतानाही मशिदींमध्ये बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमाजसाठी मुस्लिम कुटुंबीय नवीन पोषाख, आकर्षक टोप्या परिधान करून मुलांसह मशिदींमध्ये सकाळीच दाखल झाले होते. नमाज झाल्यावर एकमेकांना अलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या. या निमित्त शहराच्या विविध भागात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आले होते. बांधवांनी बिर्याणी, शिरखुर्मा यांसह विविध गोड पदार्थांवर ताव मारून ईदचा आनंद लुटला.

ईदनिमित्त रविवार पेठेतील तांबोळी मशिदीमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद समाज सेवा मंडळातर्फे बांधवांना गुलाबपुष्प देण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष रशीद हसन खान, बाबर शेख, अफजल खान यांनी संयोजन केले. लोहियानगरमधील अजिंक्य मित्र मंडळानेही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

मंडळाचे मधुकर चांदणे आणि रमेश चांदणे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. बज्मे बशीर मंडळातर्फे मुस्लिम बांधवांना फराळ, शिरकुर्मा देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मंडळाच्या अध्यक्षा शकिला कासम शेख, प्रज्ञा वाघमारे, तरन्नुम शेख यांनी संयोजन केले. वारजे माळवाडी येथील मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. वारजाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणपत पिंगळे, नगरसेवक सचिन दोडके, दिलीप बराटे तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी नवाज खाँ, रफिक शेख आदींनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, विविध संस्था-संघटनांतर्फे मोमीनपुरा, शंकरशेट रोड, गणेश पेठ, कॅम्प आणि येरवडा भागातील मशिंदीबाहेर बांधवांना गुलाबपुष्प आणि शिरकुर्म्याचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई कामगारांना जुलैअखेर गणवेश

$
0
0

पुणे : पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत झाडकाम, सफाई काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना जुलैअखेरपर्यंत गणवेश आणि इतर सर्व साहित्य पुरविण्याचे आदेश पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले. तसेच, वितरित करण्यात आलेल्या गणवेश व सुरक्षा साहित्याचे प्रमाणपत्र सादर करावे, अशा सूचना सर्व सहायक आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. सफाई कर्मचारी आणि झाडकाम करणाऱ्या पुरुष सेवकांना पालिकेतर्फे खाकी गणवेश, चप्पलजोड, रेनसूट दिला जातो. हे साहित्य कर्मचाऱ्यांना वेळेत मिळत नसल्याची तक्रार केली जात असल्याने जुलैअखेरपर्यंत सर्व साहित्य वितरित केले जावे, असे आदेश कुमार यांनी दिले. कर्मचाऱ्यांची एकूण संख्या याचे प्रमाणपत्रही सादर करण्याचे बंधन आयुक्तांनी घातले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी लक्झरी बसच्या थांब्यांना ‘थांबा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खासगी लक्झरी बसचालकांसाठी शहरात थांबे देण्याचा निर्णय वर्षभर प्रलंबित ठेवून बसचालकांकडून नाहक दंडवसुली करण्याचा प्रकार वाहतूक पोलिसांनी आरंभला आहे. खासगी बसकडून टप्पा पद्धतीने दंड घेण्याची कृती नियमबाह्य असल्याने ती तातडीने थांबविण्याची मागणी खासगी बस असोसिएशनने केली आहे.

पुणे शहरात येणाऱ्या खासगी लक्झरी बसवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत १७१ बसचालकांकडून सुमारे साठ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या उलट शहरातून बाहेरगावी जाणाऱ्या बसचालकांना अडवून कारवाई केली जात असल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. तसेच, निगडीतून निघालेल्या बसकडून निगडी, खडकी, हडपसर या ठिकाणांवर अशा टप्पा पद्धतीने दंड आकारला जात आहे. ही कारवाई चुकीची असल्याचेही असोसिएशनचे म्हणणे आहे.

खासगी लक्झरी बसला प्रवाशांची ने-आण करण्यासाठी शहरात थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महापालिका, वाहतूक पोलिस आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून थांब्यासाठी ठिकाणेही निश्चित केली होती. कोणत्या थांब्यावर एकावेळी किती बस उभ्या राहतील याचा अहवाल सादर करण्यात आला. मात्र, त्यासाठी महापालिका आयुक्त वा सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेण्याची आवश्यकता असल्याने त्यावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. खासगी लक्झरी बसना थांब्यांची सोय केली नसल्याने ठरावीक ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी पिकअप-ड्रॉपची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु त्यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. खासगी लक्झरी बससाठी थांब्यांची व्यवस्था करून द्यावी, असा अध्यादेश नगर विकास खात्याने सात वर्षांपूर्वी काढला आहे. पण त्याचीही पूर्तता झालेली नाही.

शहरात जड वाहतूक व कॉन्ट्रॅक्ट कॅरेज वाहनांना बंदी आहे; लक्झरी बसना नाही. सार्वजनिक परिवहन सेवा म्हणूनच खासगी बसची नोंदणी होते. त्यामुळे थांब्याच्या नावाखाली लक्झरी बसवर कारवाई करू नये अशी असोसिएशनची मागणी आहे.

'मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार'

खासगी लक्झरी बसवर विनाकारण दंडात्मक कारवाई होत असल्याने परिवहन मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्यात येणार असल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात आले. राज्य सरकारचे सर्व टॅक्स, नियमित परमीट अशी सर्व कायदेशीर पूर्तता करून लक्झरी बसला टार्गेट केले जात आहे. त्यासंबंधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुंतवणुकीतून रेल्वेचा विकास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'गेल्या ६० वर्षांत भारतीय रेल्वेमध्ये फारशी गुंतवणूकच झालेली नाही. गुंतवणुकीशिवाय रेल्वे सेवेचे आधुनिकीकरण होणार नाही. पुरेशी गुंतवणूक झाल्यास देश दहापटीने अधिक श्रीमंत होऊ शकेल. त्यासाठी रेल्वेमध्ये सरकारतर्फे पाच वर्षांत साडेआठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.,' असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी सांगितले. शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प प्रभू यांनी गुंफले. 'भारतीय रेल्वे आणि भारतीय अर्थव्यवस्था' या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. शि.प्र. च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय दाढे, अॅड. जयंत शाळिग्राम, कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ या वेळी उपस्थित होते.

'रेल्वेसाठी गुंतवणूक नसल्याने रेल्वेचे जाळे तेवढेच राहिले. परंतु, प्रवाशांची संख्या कैकपटीने वाढली. त्यामुळे सध्या रेल्वेच्या जाळ्याच्या क्षमतेपेक्षा १५० टक्के अधिक वाहतूक होत आहे. त्याचा परिणाम रेल्वेगाड्यांना उशीर होणे, सेवेवर परिणाम होणे या स्वरूपात दिसून येतो. मागील सरकारने रेल्वेसाठी गुंतवणूक न केल्याने आर्थिक तरतुदीअभावी रेल्वेचे आठ ते १२ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प नुसतेच अडकून पडले आहेत. त्यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे,' असे प्रभू यांनी स्पष्ट केले. 'आतापर्यंतच्या रेल्वे बजेटमध्ये नुसतेच नेत्यांच्या मतदारसंघात गाड्यांचे वाटप केले जात होते. त्यामुळे काही भागांचा विकास झाला, तर काही दुर्लक्षित राहिले. यंदा पहिल्यांदाच रेल्वेसाठी पाच वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी साडेआठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. चीनने १९९० पासून रेल्वेमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक केली, त्याचा त्यांना मोठा फायदा झाला,' असेही प्रभू यांनी स्पष्ट केले.

'पाणीवापराचेही ऑडिट'

'रेल्वे बोर्ड एनर्जी ऑडिट करत आहे. तसेच, पाणीवापराचेही ऑडिट करण्यात येत आहे. सौरऊर्जेचा वापर आणि पाणीबचत करून वर्षाकाठी अडीच ते तीन हजार कोटी रुपयांची बचत करण्याचे उद्दिष्ट आहे.रेल्वे अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामधील संवाद वाढविण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहे,'असेही प्रभू यांनी स्पष्ट केले.

रेल्वे प्रवासी संघटनांचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन

पुणे : विविध रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा यांनीही निवेदन दिले. 'प्रभू यांनी प्रवाशांकरता कोणतीही महत्त्वपूर्ण घोषणा केली नाही. पूर्वी केलेल्या घोषणांचाच पुर्नउच्चार करत त्यांनी प्रवाशांना ठेंगाच दाखवला,' अशा शब्दात प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली निराशा व्यक्त केली.प्रवाशांना सातत्याने ताजे अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या साठी रेल्वेतर्फे प्रत्येक विभागात बेस किचन तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दर दोन तासांनी ताजे, गरम पदार्थ उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे रेल्वेतर्फे पुरविण्यात येणाऱ्या चादरी, ब्लँकेट्स स्वच्छ असावीत, यासाठी प्रत्येक विभागात मेकनाइज्ड लॉँड्री सुरू करण्यात येणार आहे, असे प्रभू म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणक्षेत्रात कोसळल्या हलक्या सरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांत शनिवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही. दरम्यान, या चारही धरणांत सद्यस्थितीत ६.९६ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा आहे. खडकवासला प्रकल्पातून पुणे शहराला दररोज साडेबाराशे एमएलडी पाणी तर, शेतीसाठी चौदाशे क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. साधारणतः तेवढेच पाणी पाणलोट क्षेत्रातून धरणात वाहत येत आहे. त्यामुळे पाण्याची रोजची हातमिळवणी होत आहे. धरणात चांगला पाणीसाठा होण्यासाठी आणखी जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

खडकवासला प्रकल्पात सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. टेमघर धरणाच्या परिसरात सकाळी १५ मिलिमीटर, पानशेतमध्ये १२ मिमी, वरसगाव धरणात १५ मिमी आणि खडकवासला धरणाच्या पाणलोटात १ मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळी पाचपर्यंत या चारही धरणांत एक ते आठ मिमी पाऊस पडला. गत वर्षी याच काळात धरणात जोरदार पावसाला सुरूवात झाली होती. त्यामुळे धरणांचा पाणीसाठा झपाट्याने वाढून शहराची पाणीकपात रद्द करण्यात आली होती. यंदा या धरणांमध्ये ६.९६ टीएमसी (२३ टक्के) पाणीसाठा आहे. खडकवासला प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा २९.१५ टीएमसी एवढा आहे. हा साठा वाढण्यासाठी आणखी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परकीय चलनाच्या बहाण्याने फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

परकीय चलन विकत घेण्याच्या बहाण्याने एका कंपनीची १,८०,६०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भामट्याविरुद्ध लष्कर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी रुबी टूर सर्व्हिसेस प्रा. लि. चे राहुल तिवारी (वय २६ रा. कोंढवा) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवारी यांच्या कार्यालयात अशोक नावाचा व्यक्ती शुक्रवारी आला होता. त्याने अमेरिकन डॉलरचा भारतीय चलनातील भाव विचारला. आपल्याला २८०० यूएस डॉलर पाहिजे असे सांगितले.

आम्ही अरोरा टॉवर हॉटेल येथे उतरलो आहोत. तिथे आमची बैठक सुरू आहे. तुमचा माणूस डॉलर घेऊन हॉटेलमध्ये पाठवा, असे सांगितले. त्यानंतर तिवारी यांचा कर्मचारी राजेश चंद्रीगर याला २८०० डॉलर घेऊन त्यांनी हॉटेलमध्ये पाठविले. त्यावेळी अशोक नावाच्या व्यक्तीने राजेशकडून २८०० डॉलर घेतले. दहा मिनिटात येतो असे सांगून तो निघून गेला.

दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

भरधाव वेगाने जात असलेल्या दुचाकीची धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. औंध बोपोडी रोड येथे स्पायसर कॉलेज येथे गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. संबंधित नागरिकाची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणी हितेश सुरेश सोनवणे (वय २४, रा. उदय सोसायटी, एरंडवणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पसार

ससून हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणीसाठी आणलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. १४ जुलै रोजी सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. जसमिंदरसिंग भजनसिंग (वय २२ रा. गणेशनगर, बोपखेल) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई साबळे यांनी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पसार झालेला आरोपी भजनसिंगला शिवाजीनगर पोलिसांनी त्याला एका गुन्ह्यात अटक केली होती.

नोकरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

सदर्न कमांडमध्ये शिपायाची नोकरी लावून देण्याच्या अमिषाने महिलेची फसवणूक करणाऱ्याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी जालिंदर उर्फ भाऊ दामू पाखरे (वय ५० रा. होले वस्ती, उंड्री) याला अटक करण्यात आली आहे. उज्ज्वला कांबळे (वय ३४ रा. येरवडा) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे यांनी कैलास कन्स्लटंट सर्व्हिसेस गाईडन्स सेंटर फॉर एम्प्लॉईज यांच्याकडे फोन करुन नोकरीबाबत चौकशी केली होती. त्यावेळी पाखरेने त्यांना सदर्न कमांडमध्ये शिपाई पदावर नोकरी लावण्याचे अमिष दाखवले. त्यांच्याकडून वेळोवेळी दोन लाख रुपये घतले. मात्र नोकरी लावून दिली नाही. याप्रकरणी पाखरेला अटक करण्यात आली आहे. पाखरे याने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’त पुणे नव्वदीपार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पासाठी राज्य सरकारकडे पाठविण्याच्या प्रवेशिकेतील गुणांकनात पालिकेने 'नव्वदी' पार केली आहे. केंद्राच्या बहुतेक सर्व निकषांची पूर्तता करण्यात पालिकेला यश आल्याने राज्य सरकारमार्फत केंद्राला पाठविल्या जाणाऱ्या शहरांच्या यादीत पुण्याला स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. पालिकेने केलेल्या या स्व-मूल्यांकनासह येत्या गुरुवारी (२३ जुलै) पालिका आयुक्त राज्य सरकारच्या समितीसमोर सविस्तर सादरीकरण करणार आहेत.

स्मार्ट सिटीतील सहभागासाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने पहिल्या टप्प्यात शंभर गुणांची प्रवेशिका राज्य सरकारकडे पाठविणे बंधनकारक करण्यात आले होते. या प्रवेशिकेत केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषांनुसार पालिकेने स्व-मूल्यांकन करून पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, पालिकेने राज्य सरकारकडे सादर केलेल्या प्रवेशिकेत बहुतांश निकषांची पूर्तता केल्याचा दावा करून ९० गुणांच्या पुढे मजल मारली आहे.

शहरातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत स्वच्छतागृहांची टक्केवारी, ऑनलाइन तक्रार निवारण यंत्रणा, बजेटमधील प्रकल्पांची वेबसाइटवर माहिती, प्रकल्प पाठविण्यासाठी सर्वसाधारण सभेची मान्यता, ई-न्यूजलेटर, क्षेत्रीय स्तरावर बैठका, गेल्या तीन वर्षांचे लेखापरीक्षण, महसुली वसुलीचे विवरण यासारख्या अनेक गोष्टींची पूर्तता पालिकेने केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने सर्व शहरांकडून प्रवेशिका मागवून घेतल्या असल्या, तरी त्या संदर्भात शहराच्या सविस्तर सादरीकरणासाठी स्वतंत्र वेळ दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी (२३ जुलै) पालिका आयुक्त कुणाल कुमार राज्य सरकारच्या स्मार्ट सिटी समितीसमोर सादरीकरण करणार आहेत.

गुणतालिकेत पुणेच अव्वल?

पालिकेत नागरिकांची सनद कार्यान्वित असली आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी नुकतीच सुरू झाली असली, तरी अद्याप दंडात्मक कारवाई अधिकाऱ्यांवर करण्यात आलेली नाही. त्यामुळे, या निकषांतच पालिकेला गुण गमवावे लागले आहेत. तरीही, एकूण शंभर गुणांच्या प्रवेशिकेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या महापालिकांमध्ये पुणे अग्रभागी असण्याची दाट शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओएसडी निवडीचा फार्सच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पुणे मेट्रो'ची अंतिम मान्यता अद्याप प्रलंबित असताना, त्यासाठी आवश्यक बाबींच्या पूर्ततेसाठी विशेष कार्याधिकारी (ओएसडी) नेमण्याच्या राज्य सरकारच्या आदेशांना पालिकेने केराची टोपली दाखविल्याचे उजेडात आले आहे. गेल्या सव्वा वर्षांपासून ओएसडी (मेट्रो) हे पद रिक्त असून, त्यासाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीही निव्वळ फार्सच ठरल्या आहेत.

मेट्रोचे तत्कालीन ओएसडी शशिकांत लिमये यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पदभार सोडला. त्यानंतर, नव्याने मुलाखती घेऊन हे पद भरण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले होते. त्यानुसार, पालिकेने जाहिरात देऊन संभाव्य इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यालाही आता वर्ष उलटून गेले असून, अद्याप 'ओएसडी' पदासाठी पालिकेला लायक उमेदवार मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. मेट्रोसाठी स्वतंत्र कंपनी (स्पेशल पर्पज व्हेइकल-एसपीव्ही) स्थापन होईपर्यंत त्याविषयीच्या सर्व कामांसाठी तीन ते चार वर्षांकरिता 'ओएसडी' पद सहा-सहा महिन्यांच्या कराराने भरण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने नोव्हेंबर २०१२ मध्येच पालिकेला दिले होते. पालिकेने केवळ वर्षभर ओएसडींची नेमणूक करून सरकारच्या या निर्देशांकडे पूर्णतः डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षीपासून पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी मार्गाबाबत सातत्याने वाद सुरू आहे. एलिव्हेटेडऐवजी हा मार्ग भुयारी करून तो लक्ष्मी रस्त्याने नेण्यात यावा, असा आग्रह धरला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने सादर केलेला अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये केंद्र, राज्य सरकारशी समन्वय साधण्याचे काम मेट्रोच्या ओएसडींमार्फत झाले असते; पण हे पदच भरण्यात न आल्याने पालिका आयुक्तांनाच त्यासाठी वारंवार वेळ द्यावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images