Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मंडपाला आकाराचे बंधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील रस्ते उत्सव मंडपांमुळे आणखी अरुंद होऊ नयेत, यासाठी रस्त्याच्या एकूण रुंदीच्या एक चतुर्थांश भागांतच मंडप घालण्यास मंडळांना परवानगी देण्याचा पालिकेचा विचार आहे. तसेच, परवानगीपेक्षा अधिक आकाराचा मंडप घालणाऱ्या मंडळांकडून दंड वसूल केला जाणार असून, उत्सवानंतर दोन दिवसांत मंडप काढून टाकण्याचे बंधनही घालण्यात आले आहे.

विविध सण-उत्सवांमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये, यादृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने नुकतेच दिले होते. हायकोर्टाच्या निर्णयामुळे उत्सवावर बंधने येत असल्याने त्याला गणेश मंडळांनी विरोध केला आहे. मंडपांसाठी धोरण निश्चित करण्याची जबाबदारी पालिकेवर असल्याने कोर्टाच्या निर्देशांनुसार त्यासाठीचा विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे. यात मंडपांसाठी मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली असून, त्यानुसारच परवानगी देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एक महिना आधी परवानगीसाठी अर्ज करण्याचे बंधन मंडळांवर घालण्यात आले असून, सर्व नियमांचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र भरून घेतले जाणार आहे. हे धोरण सर्वसाधारण सभेसमोर सादर करण्यात येणार असून, त्यावर चर्चा करून त्याला मान्यता दिली जाणार आहे.

शहरातील निम्म्यापेक्षा अधिक रस्ते मंडपांमुळे व्यापले जात असल्याने वाहतुकीची कोंडी होते. अॅम्ब्युलन्स, अग्निशामक दलाचा बंब किंवा इतर अत्यावश्यक सेवांच्या रहदारीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे, मंडपाला परवानगी देतानाचे निकष निश्चित करण्याची जबाबदारी पालिकांवर सोपविण्यात आली होती. पालिकेने तयार केलेल्या निकषांबाबत पोलिस आयुक्तांसह इतर संबंधितांशी चर्चा करण्यात येणार आहे. पुढील महिन्यापासून मंडळांतर्फे गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात होण्याची शक्यता असल्याने या धोरणाला तत्पूर्वी मंजुरी घ्यावी लागणार आहे.

मंडप धोरणाती काही प्रमुख बाबी

रस्त्याच्या एकूण रुंदीच्या एक चतुर्थांश जागेत मंडप घालता येणार.

जागेच्या आकारमानानुसार पालिकेकडे शुल्क भरावे लागणार.

काँक्रिटच्या रस्त्यावर खोदाई करण्यास मनाई.

पीएमपीसाठी किमान १२ फूट रस्ता खुला ठेवण्याचे बंधन.

आठ फूटांपेक्षा लहान रस्त्यांवर मंडपाला परवानगी नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इशाऱ्यानंतरही संप सुरूच

$
0
0

मटा प्रतिनिधी, पुणे

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (एफटीआयआय) संचालकांनी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतरही, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत तेथील विद्यार्थ्यांनी संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीचा निषेध करण्यासाठी गेल्या ३५ दिवसांपासून संपावर असलेल्या या विद्यार्थ्यांनी प्रसंगी जेलमध्ये जाण्याची तयारी गुरुवारी दाखवली.

फिल्म इन्स्टिट्यूट स्टुडंट्स असोसिएशनचे विकास उर्स यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राकेश शुक्ला, रणजित नायर, यशस्वी मिश्रा आदी उपस्थित होते. गजेंद्र चौहान आणि संचालक मंडळातील इतर चार सदस्यांची नियुक्ती कोणत्या निकषावर केली आणि त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया काय होती, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नॉनव्हेज शिक्षणाच्या सक्तीविरोधात चळवळ

$
0
0

उत्तमकुमार इंदोरे, पुणे

हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात मांसाहारी (नॉनव्हेज) पदार्थांच्या प्रशिक्षणाच्या सक्तीविरोधात देशभर होत असलेल्या चळवळीला प्रारंभ झाला आहे, तो एका पुणेकरामुळे! चंद्रशेखर लुणिया हे त्यांचे नाव. पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या लुणिया यांनी त्यासाठी 'चेंज डॉट ओआरजी' या वेबसाइटवर चळवळ सुरू केली असून, सर्व खासदार, मंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत यासाठी पत्रव्यवहार केला आहे.

देशभरातील इतर सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांत पर्याय (ऑप्शन) असतात. हॉटेल मॅनेजमेंट शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मात्र तशी सोय नाही. त्याला फक्त शाकाहारी पदार्थ बनवायला शिकायचे असेल, तरी तसे करता येत नाही. त्याला मांसाहारी भोजनही शिकावे लागते. याबाबत लुणियांनी सर्वप्रथम काही नामांकित हॉटेल मॅनेजमेंट संस्थांशी संवाद साधला; मात्र त्यांनी 'डाळ शिजू' दिली नाही. त्यामुळे या सक्तीविरोधात चळवळ उभी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

सर्व खासदार, केंद्रीय मंत्री आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही त्यांनी पत्रव्यवहार करून ही सक्ती हटविण्याबाबत विनंती केली आहे. मात्र, काही खासदारांचा अपवाद वगळता कुणीही गांभीर्याने घेतले नाही. अखेर त्यांनी change.org या वेबसाइटमार्फत ही चळवळ सुरू केली असून, त्यावर रोज समर्थनाच्या शेकडो प्रतिक्रिया येत आहेत. या चळवळीनंतर वस्त्रोद्योगमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या कार्यालयातून लुणिया यांच्याशी संवाद साधला गेला. गंगवार यांनी मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी आणि पर्यटनमंत्री महेश शर्मा यांच्याशी याबाबत पत्रव्यवहार केला. नॉनव्हेज कुकिंग बंधनकारक असू नये, अशी शाकाहारी विद्यार्थ्यांची मागणी असल्याने तिचा विचार करावा, अशी मागणी करणारे पत्र गंगवार यांच्यासह लालकृष्ण अडवाणी, अनुराग ठाकूर आदी अनेकांनी इराणी आणि शर्मा यांना लिहिले आहे.

'माझा मांसाहाराला आणि त्याचे प्रशिक्षण देण्याला विरोध नाही. या प्रशिक्षणात मांसाहारी पदार्थांच्या शिक्षणाची सक्ती नको, एवढीच मागणी आहे. या सक्तीमुळे शुद्ध शाकाहारी विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट शिकण्याच्या इच्छेपासून दूर जाऊ नये, अशी भूमिका आहे,' असे लुणिया यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजितदादांची खुली चौकशी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील चौदाशे कोटी रुपयांच्या तोट्याला संचालकांना जबाबदार धरण्याच्या विरोधात करण्यात आलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्याने माजी उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन संचालक अजित पवार यांच्यासह ७८ संचालक आणि चार अधिकाऱ्यांवर तोट्याची वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणाऱ्या चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे.

बँकेच्या तोट्यासाठी कारणीभूत ठरलेल्या या संचालकांना आता चौकशी अधिकारी शिवाजी पहिनकर यांच्यासमोर सुनावणीसाठी यावे लागणार आहे. त्यावेळी प्रत्येक संचालकांवर तोट्याची वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि नंतर तोट्याची रक्कम संबंधित संचालकांकडून वसूल करण्याची कारवाई केली जाणार आहे.

राज्य सहकारी बँकेच्या गैरकारभाराविषयी ११ एप्रिल २०११ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेला सहकार खात्याने अहवाल पाठविला होता. त्याच्या आधारे राज्य बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले. प्रशासकांच्या नियुक्तीनंतर राज्य बँकेला झालेल्या तोट्याची सहकार कायद्याच्या कलम ८३ अन्वये चौकशी करण्यात आली. त्यात बँकेच्या चौदाशे कोटी रुपयांच्या तोट्यासाठी बँकेचे तत्कालीन संचालक अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, पांडुरंग फुंडकर, ईश्वरचंद जैन, आनंदराव आडसूळ, यशवंतराव गडाख यांच्यासह ७८ संचालक व चार अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात आले.

तोट्याची संचालकांवरील वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्यासाठी सहकार कायद्याच्या कलम ८८ अन्वये चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन सहकार आयुक्त दिनेश ओऊळकर यांनी २२ मे २०१४ रोजी दिले होते; तसेच त्यासाठी पहिनकर यांची नियुक्ती केली. मात्र, संचालकांनी वेगवेगळी कारणे देत चौकशी पुढे ढकलली. अखेर या संचालकांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. याच दरम्यान एका माजी संचालकांनी कलम ८३ व कलम ८८ च्या चौकशीवर आक्षेप घेत त्यावर हायकोर्टात धाव घेतली. त्यावर हायकोर्टाचे न्या. ए. ए. सय्यद यांनी ही याचिका फेटाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'एफटीआयआय'च्या संचालकपदी पाठराबे

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पुण्यातील 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'च्या संचालकपदी प्रशांत पाठराबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 'एफटीआयआय'चे संचालक डी.जे.नरेन यांच्या जागा पाठराबे घेतील. त्यांच्याकडे संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. पाठराबे यांच्याकडे नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडियाच्या संचालकपदाची देखील जबाबदारी आहे.

डी.जे.नरेन शुक्रवारी निवृत्त झाले. 'एफटीआयआय'चे संचालक म्हणून नरेन यांनी चार वर्ष काम पाहिले. २०१४मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला होता. मात्र त्यानंतर त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती.

केंद्र सरकारने FTIIच्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतरही यावर तोडगा निघू शकला नाही. या पार्श्वभूमीवर संचालकपदी पाठराबे यांची नियुक्ती झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठाची तहान ‘सर्किट बेंच’वर?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे या मागणीसाठी पुण्यातील वकिलांनी आंदोलन केले; मात्र प्रत्यक्षात हायकोर्टापुढे बाजू मांडताना शुक्रवारी सर्किट बेंच देण्यात यावे अशी मागणी केली. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्याकडे ही मागणी करण्यात आली. पुण्यातील वकिलांच्या शिष्टमंडळाबरोबर शुक्रवारी हायकोर्टात यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला मिळावे, अशी मागणी पुण्यातील वकिलांकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येते आहे. १९७८ मध्ये पुण्याला खंडपीठ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. खंडपीठाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी पुण्यातील वकिलांकडून करण्यात येत होती. त्यासाठी आंदोलनही करण्यात आले होते. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा, न्या. विद्यासागर कानडे, शालिनी फणसाळकर जोशी, नरेश पाटील यांच्यासमोर म्हणणे मांडले. तसेच मागणीसंदर्भात लेखी निवेदन दिले.

या वेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश शेडगे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अॅड. हर्षद निंबाळकर, सदस्य अॅड. अहमदखान पठाण, अॅड. अविनाश आव्हाड, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. एस. के. जैन, अॅड. के.एम. इराणी, अॅड. विनायक अभ्यंकर, अॅड. नंदू फडके यांनी बाजू मांडली. या वेळी पुणे बार असोसिएशनची कार्यकारिणी, माजी अध्यक्ष, तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष असे मिळून पुण्यातील ५० जणांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्फोटके असलेले आणखी एक पार्सल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संभाजी ब्रिगेडशी संबंधित उद्योजक सतीश चव्हाण यांच्या कॅम्पमधील ऑफिसमध्ये स्फोटके असलेले पार्सल पाठवण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. यापूर्वीही अशाच प्रकारचे पार्सल संभाजी ब्रिगेडच्या जिजाऊ प्रकाशनच्या कार्यालयात पाठवण्यात आले होते. दरम्यान, या घटनांचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.

अरोरा टॉवर इमारतीतील पहिल्या मजल्यावर चव्हाण यांचे ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये १३ जुलै रोजी पार्सल पाठवण्यात आले होते. चव्हाण यांच्या नावाचे पार्सल असल्याने कर्मचाऱ्यांनी ते उघडले नव्हते. चव्हाण यांनी शुक्रवारी ते उघडले असता त्यामध्ये एका दैनिकाची कात्रणे, बंदुकीची उडालेली पुंगळी, दोन वायर आणि पिवळसर रंगाची केमिकल पावडर असल्याचे आढळले. ती जिलेटिन पावडर असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चव्हाण यांनी या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. उपायुक्त सुधाकर पठारे यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ते पार्सल जप्त केले असून रासायनिक प्रयोगशाळेत ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

या घटनेचा तपास गुन्हे शाखेच्या दहशतवाद विरोधी सेलचे पोलिस निरीक्षक धनंजय धुमाळ यांच्याकडे देण्यात आला आहे. यापूर्वी जिजाऊ प्रकाशनच्या ऑफिसमध्येही अशाच प्रकारचे पार्सल पाठवण्यात आले असून या घटनेचा तपास सुरू आहे. ते पार्सल एस. पी. कॉलेज समोरून पोस्ट करण्यात आले होते. हे पार्सलही त्याच ठिकाणाहून पोस्ट करण्यात आल्याचा संशय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुणे मॉडेल’वर केंद्राची मोहोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अवघ्या तीन दिवसांत तब्बल अडीच लाखांहून अधिक हिट्स आणि तीन हजारांहून अधिक सूचना... या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील सहभागासाठी पालिकेने पुणेकरांच्या सहभागासाठी आयोजित केलेल्या 'ऑनलाइन स्पर्धे'ला लाभलेल्या भरभरून प्रतिसादाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. नागरिकांच्या सहभागाचे हे 'पुणे मॉडेल' देशांतील सर्व शहरांत राबविण्याचे संकेत केंद्राने दिले असून, त्याचा आढावा घेण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी येत्या सोमवारी (२० जुलै) पुण्यात येणार आहेत.

स्मार्ट सिटी प्रकल्पातील सहभागासाठी राज्य सरकारकडे प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत सोमवारपर्यंत आहे. स्मार्ट सिटी कशी असावी, याबद्दल नागरिकांच्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्याचे बंधन केंद्र सरकारने घातले होते. त्यानुसार, नागरिकांसाठी 'माझे स्वप्न, स्मार्ट पुणे' अशी स्पर्धा पालिकेने आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी पालिकेने स्वतंत्र वेबसाइट तयार केली असून, पुणेकरांना ऑनलाइन स्वरूपातच स्मार्ट सिटीबद्दलच्या सूचना मांडण्याची सुविधा देण्यात आली आहे. गेल्या मंगळवारी सुरू केलेल्या या वेबसाइटला तीन दिवसांत तब्बल दोन लाख नागरिकांनी भेट दिली आहे; तर तीन हजारांहून अधिक सूचना पालिकेला प्राप्त झाल्या आहेत.

'नागरी सहभागांतर्गत पुणे महापालिकेला मिळालेल्या या अभूतपूर्व प्रतिसादाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. स्मार्ट सिटीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इतर शहरांसाठी नागरी सहभागाचे हे 'पुणे मॉडेल' पथदर्शी ठरण्याची शक्यता असून, त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचे पथक सोमवारी येणार आहे', अशी माहिती पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.

सोमवारी होणार विस्तृत सादरीकरण

स्मार्ट सिटी प्रकल्पाविषयी, त्यातील अटी-शर्तींबाबत आणि त्याच्या अंमलबजावणीचे स्वरूप, याविषयी सर्व लोकप्रतिनिधींना सविस्तर माहिती देण्यासाठी येत्या सोमवारी (२० जुलै) पालिकेतर्फे सविस्तर सादरीकरण करण्यात येणार आहे. 'यशदा' येथे होणाऱ्या या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सहसचिव समीर शर्मा, माय जीओव्ही वेबसाइटचे तज्ज्ञ पॅनेल आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती आयुक्त कुमार यांनी दिली.

महापालिकेकडे प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचा 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स'तर्फे विश्लेषण केले जाणार आहे. तसेच, केंद्र सरकारच्या www.mygov.in या वेबसाइटवर त्यातील सर्वोत्तम सूचनांना स्थान देण्यात येणार असून, त्यावर आधारित ऑनलाइन पोल घेतला जाण्याची शक्यता आहे.

- कुणाल कुमार, पालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोबाइल टॉवर पालिकेने केला बंद

$
0
0

पिंपरीः पिंपळे सौदागर येथील साई मारिगोल्ड व लक्ष्मी वृंदावन हाउसिंग सोसायटीजवळील राधिका इमारतीवर उभारण्यात आलेला मोबाइल टॉवर पालिकेने बंद केला. या टॉवरच्या लहरीमुळे व किरणांमुळे आरोग्यावर घातक परिणाम होण्याच्या शक्यतेने तो काढण्याची मागणी नागरिकांनी केली होती.

नागरिकांच्या मागणीनुसार माजी नगरसेवक नाना काटे यांनी राधिका इमारतीवरील मोबाइल टॉवर काढण्यासाठी आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे पाठपुरावा केला. आयुक्तांनी बांधकाम परवाना विभागाचे उपशहर अभियंता अयुबखान पठाण यांना संबंधित इमारत उभारलेल्या बिल्डरला मोबाइल टॉवर काढून घेण्याचे आदेश देण्याची सूचना केली होती. त्यानुसार बिल्डरला आदेश बजावण्यात आले होते. मात्र बिल्डरने टॉवर न हटविल्यामुळे आयुक्त जाधव यांनी मोबाइल टॉवर बंद करण्याचे आदेश दिले.त्यानुसार महापालिकेचा स्थापत्य विभाग,विद्युत विभाग, बांधकाम परवाना विभाग, अतिक्रमण विभाग यांच्या संयुक्त पथकाने मोबाइल टॉवरची सेवा बंद केली. महावितरण कंपनीने त्या टॉवरचा विद्युत पुरवठा खंडित केला. तसेच इतर सुविधाही बंद करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दिव्याखालच्या पाखरां’चा संग्रह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पावसाळ्यामध्ये घरातील भिंतींवर दिव्याखाली येणाऱ्या पाखरांचे सध्या 'डॉक्युमेंटेशन' सुरू झाले आहे. त्यामुळे भिंतीवर बसणाऱ्या या किड्यांना अर्थात पतंगांना हाकलण्यापेक्षा त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला पाठवा, असे आवाहन केंद्रीय जैवविविधता मंडळाने केले आहे. विशेष म्हणजे वर्षभरात नागरिक आणि अभ्यासकांनी पाठविलेल्या तब्बल दहा हजार फोटोंचा संग्रह मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आला आहे.

पतंग हा निसर्गाच्या परिसंस्थेतील सर्वात मोठ्या संख्येने आढळणारा घटक आहे. मात्र त्यांच्या संशोधनामध्ये भारतासह बहुतांश देश मागे आहेत. अनेक देशांमध्ये आपल्याकडे सरासरी किती प्रकारचे, जातींचे पतंग आढळतात, त्याचे जंगल, गवताळ प्रदेश आणि मानवी वस्ती अशा विविध अधिवासांनुसार आढळणारे प्रकार याची सखोल माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे ग्लोबल सिटिझन सायन्सतर्फे पतंगाविषयी जनजागृती करण्यासाठी, त्यांच्याविषयी संशोधन वाढावे, या उद्देशाने येत्या १८ ते २६ जुलै दरम्यान राष्ट्रीय पतंग (मॉथ) आठवडा साजरा करण्यात येणार आहे.

भारतानेही यात गेल्या वर्षीपासूनच पुढाकार घेतला आहे. यासाठी केंद्रीय जैवविविधता मंडळाने 'भारतीय पतंग' हे स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. यासाठी लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी, घरात, बागेमध्ये अथवा भटकंती दरम्यान पतंगांचे फोटो काढा, असे आवाहन मंडळाने केले होते. विशेष म्हणजे पहिल्या वर्षीच पोर्टलवर अडीच हजार फोटो जमा झाले. यातून साडे तीन हजार प्रकारच्या प्रजातींची प्राथमिक माहिती झाली आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी http://indiabiodiversity.org/group/indianmoths/show?pos=2 या वेबसाइवर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रुपी’ कर्जदारांवरील कारवाई पुढे ढकलली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

कागदपत्रांची योग्य पूर्तता न झाल्याने रुपी बँकेच्या कर्जदारांवर करण्यात येणारी कारवाई तात्पुरती पुढे ढकलावी लागली. त्यामुळे खातेदार शुक्रवारी (१७ जुलै) चांगलेच संतप्त झाले. पूर्वीच्या थकीत कर्जांची वसुली अपेक्षेप्रमाणे नसल्याचे कारण सांगून रिझर्व्ह बँकेने बँकिंग नियंत्रण कायद्याच्या कलम '३५ अ' नुसार रुपी बँकेवर आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे बँकेचे भोसरी शाखेचे बाराशे खातेदार आर्थिक संकटात सापडले आहेत.

शुक्रवारी नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजल्यापासून बँकेच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी तीन कर्जदारांच्या मालमत्तेवर जप्ती करण्यात येणार होती. मात्र तहसीलदार कार्यालयातून काही कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे कारवाई तूर्तास टळली. यामुळे बँकेचे खातेदार चांगलेच संतप्त झाले. भोसरी शाखेचे व्यवस्थापक धनंजय नायडू यांना पुणेकर नागरी कृती समितीच्या सभासदांनी व ५० ते ६० खातेदारांनी घेराव घातला. या वेळी त्यांच्यात शाब्दीक चकमकही उडाली.

थकीत कर्जदार व बँक व्यवस्थापन यांचे लागेबांधे असल्यामुळेच जाणुनबुजून कारवाई करण्याचे टाळले जात असल्याचा आरोप पुणेकर नागरी कृती समितीचे दत्ता घुले यांनी केला. या दिरंगाई विरोधात सोमवारी (२० जुलै) रुपी बँकेच्या मुख्य शाखेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसावर हल्ला; आरोपी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोथरूड डेपोजवळ कार चालकाने पेट्रोलिंगदरम्यान एका पोलिस शिपायाच्या अंगावर गाडी घालत वॉकीटॉकी पळवून नेल्याचा प्रकार नुकताच घडला होता. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी कार चालकासह तिघांना अटक केली आहे. तसेच पळवून नेण्यात आलेला वॉकीटॉकीही जप्त केला आहे. या कारच्या शोधासाठी पोलिसांनी मारुती कंपनीच्या ६१७ 'रिटझ्' कार तपासल्या आहेत.

सुजितकुमार वसंत चोपडे (वय २७, रा. शिवनगरी, कोथरूड), योगेश पुरुषोत्तम पाटील (२९, रा. फुरसुंगी) आणि मंगेश माणिकराव वसू (२८, रा. यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत, अशी माहिती कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले-पाटील यांनी दिली.

कोथरूड पोलिसांकडून पेट्रोलिंग सुरू होते. संशयित वाहनांची तपासणी करत असताना एका चार चाकी चालकाने पोलिस कर्मचारी आशिष निमसे यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस निरीक्षक भोसले पाटील यांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीत त्यांच्या हातातील वॉकीटॉकी कारमध्ये पडली होती. कार चालक त्या अवस्थेत घटनास्थळावरून पसार झाले होते.

वॉकीटॉकी गेल्याने पोलिसांनी आरोपींच्या शोध सुरू केला होता. रस्त्यावरून जाणारी-येणारी वाहने तपासण्यासाठी तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. रस्त्यावरील वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज तपासून कारचा रंग आणि मेक शोधण्यात आला. मात्र, ही घटना घडल्यापासून आरोपींनी कारचा उपयोग करण्याचे बंद केले होते.

प्रवासी पास अपहार; महिला कर्मचारी अटकेत

पुणे ः पुणे परिवहन महमंडळाच्या (पीएमपीएमएल) पास केंद्रावर प्रवासी पासची विक्री करून आलेल्या दोन लाख ६८,६७५ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कर्मचारी महिलेला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सीमा विजय भवर (वय ३८, रा. मु.पो.कोंढापुरी, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट तपासणी विभागाचे अधिकारी भास्कर मकासरे (वय ५४) यांनी फिर्याद दिली आहे.

३१ मार्च ते २८ जून या कालवधीत सिंहगड रोडवरील आनंदनगर पास केंद्र येथे हा प्रकार घडला. महिला कर्मचारी भवर आनंदनगर केंद्रावर प्रवासी पास विक्री करण्याचे काम करत होत्या. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी तिला अटक करून कोर्टात हजर केले. गुन्हातील रक्कम हस्तगत करण्यासाठी, त्यामध्ये तिचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याबाबत तपास करण्यासाठी तिची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट’ अहवाल सरकारकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' योजनेत समाविष्ट होण्यासाठी सर्वच शहरांमध्ये चढाओढ लागली आहे. सर्वांना याची उत्सुकता असून, पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तयार केलेला स्मार्ट सिटीचा अहवाल शुक्रवारी (१७ जुलै) महापालिकेने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठविला. मात्र, यामध्ये नागरिकांकडून सूचनांसाठी प्रतिसाद कमी मिळाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा केंद्र सरकारच्या अमृत योजनेतील सहभाग निश्चित मानला जात आहे. महाराष्ट्रातील १० शहरांचा स्मार्ट सिटी योजनेत सहभाग केला जाणार असल्याने महापालिकेकडून बरेच प्रयत्न करण्यात आले. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषांपैकी ८० टक्के तयारी पिंपरी-चिंचवड महापालिकेची असल्याचे महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी स्पष्ट केले होते. तर उर्वरित निकष पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने देखील मेहनत घेतली आहे.

महापालिकेने सरकारकडे सादर केलेल्या अहवालामध्ये केंद्र सरकारने ठरविलेल्या निकषांपैकी किती निकषांमध्ये महापालिकेचा सहभाग आहे, याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय हे निकष पूर्ण करत असल्याचे पुरावे देखील या प्रस्तावासोबत जोडण्यात आले आहेत. या प्रस्तावासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मंत्रालयातील एका बैठकीला महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. मात्र, काही कारणास्तव अहवाल सादर करण्यात आला नव्हता. तो अहवाल महापालिकेकडून शुक्रवारी सादर करण्यात आला.

दरम्यान, स्मार्ट सिटीबाबत नागरिकांचे अभिप्राय घेण्याच्या सूचना केंद्र सरकारतर्फे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने ६ ते ९ जुलै दरम्यान प्रभागनिहाय सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांमध्ये विविध विषयांवर ६०० सूचना प्राप्त झाल्या आहेत. या अभियानामध्ये नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग होण्याच्या दृष्टीने नागरिकांनी आपल्या सूचना महापालिकेच्या संकेतस्थळावर अथवा लेखी स्वरुपात ई-गव्हर्नन्स विभागाकडे पाठवाव्यात असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. मात्र, सोशल साइट व ऑनलाइन पद्धतीचा वापर न केल्यामुळे महापालिकेला कमी सूचना मिळाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार, दुचाकीतून १२ लाख लंपास

$
0
0

पुणेः फर्ग्युसन रोड, कोथरूड येथे अनुक्रमे कार आणि दुचाकीमधील बॅग चोरून बारा लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून, आरोपींचा शोध सुरू आहे. दोन्हीही घटनांमध्ये आरोपींनी बँकेतून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींचा माग काढून पैसे चोरल्याचा अंदाज आहे.

फर्ग्युसन रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर पार्क केलेल्या इनोव्हा गाडीतून बॅग चोरण्यात आल्याची घटना गुरुवारी दुपारी बाराच्या दरम्यान घडली. या बॅगेमध्ये साडेचार लाख रुपये आणि सोन्याच्या दोन अंगठ्या असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी संजय देशपांडे (वय ४६, रा. एरंडवणे) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या कारमध्ये एक तपकिरी रंगाची बॅग ठेवण्यात आली होती. त्यात बॅगेत साडेचार लाख रुपये आणि सोन्याच्या दोन अंगठ्या असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज होता. कारचा चालक पाणी पिण्यासाठी खाली उतरला असता, अज्ञात आरोपीने ती बॅग चोरली.

दुसरी घटना कोथरूडमध्ये घडली. या प्रकरणी आर्किटेक्ट तपन विवेक सिन्नरकर (वय ३१) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नरकर यांनी कामगारांचे पगार करण्यासाठी बँकेतून सात लाख रुपये काढले होते. ती रक्कम अॅक्टिव्हाच्या डिकीमध्ये ठेवून ते निघाले होते. थोडे अंतर गेल्यावर त्यांची दुचाकी पंक्चर झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तेथील एक पंक्चरचे दुकान गाठले. पंक्चर काढणाऱ्या व्यक्तीने दुचाकीचा टायर दुकानात नेला. तो पाहण्यासाठी सिन्नरकरही दुकानात गेले. दुकानाबाहेरील दुचाकीला चावी तशीच होती. चोरट्याने ती चावी वापरून डिकी उघडली आणि पैसे घेऊन पळ काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्रीशिप मर्यादेविषयी संभ्रम

$
0
0

पुणेः फ्रीशिपच्या लाभासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा साडेचार लाख रुपयांवरून सहा लाख रुपये करण्याची सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केलेली घोषणा कागदावरच राहिली आहे. अद्याप या विषयीचा सरकारी निर्णय न काढल्याने फ्रीशिप योजनेसाठी अर्ज भरताना सध्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाख रुपयेच ग्राह्य धरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

नॉन क्रिमिलेअरच्या प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपये करण्यात आली आहे. मात्र, फ्रीशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न मर्यादा साडेचार लाख रुपये आहे. त्यामुळे नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र असूनही अनेक विद्यार्थ्यांना फ्रीशिपपासून वंचित राहण्याची वेळ गेल्या वर्षी आली होती. त्यावर राज्यभरात विविध संस्था, संघटनांनी आंदोलने केली. त्यानंतर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुण्यात जनता दरबारात उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपये करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर बडोले यांनी हिवाळी अधिवेशनात फ्रीशिपसाठी उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपये करण्याती घोषणा केली होती. मात्र, अद्याप त्याविषयीचा निर्णय झालेला नाही.

स्थानिक पातळीवर स्कॉलरशिप व फ्रीशिपसंदर्भात कार्यवाही करणाऱ्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे विद्यार्थी आणि पालकांनी या बाबत विचारणा सुरू केली आहे. त्यामुळे शासन निर्णयाअभावी सध्या तरी स्कॉलरशिपच्या वेबसाइटवर उत्पन्नाची मर्यादा साडेचार लाख रुपयेच दाखविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तुकोबांच्या पालखीसाठी धोतराच्या पायघड्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' म्हणत मजल दरमजल करत बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात दाखल झाला. त्यानंतर परंपरेनुसार परीट समाजाने पालखीचे धोतराच्या पायघड्या घालून स्वागत केले. गेल्या १३५ वर्षांपासून ही प्रथा सुरू असून, संत गाडगेबाबांच्या शिकवणुकीतून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगण्यात येते.

काटेवाडी गावात सुनेत्रा पवार, गैरी शीतल काटे (सरपंच) यांनी पालखीचे स्वागत केले. काटेवाडी गावाच्या वेशीजवळ आल्यानंतर पालखी खांद्यावर घेण्यात आली. त्यानंतर परंपरेनुसार ग्रामस्थ व परीट समाज पायघड्या घालून पालखीचे स्वागत केले. घराघरांबाहेरही रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या. गावाच्या मुख्य टिकाणी फाट्यावर ग्रामस्थांच्या दर्शनासाठी पालखी ठेवण्यात आली आहे. गावातील नागरिकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.

पहिले मेंढ्यांचे रिंगण

'जनाई मुक्ताई, सोबत माऊली,नामा तुकोबाची जोड, डोई तुळस ठेवली,भाळी चंदनाचा टिळा, माळ गळ्यात घातली केला विठूचा कल्लोळ, दिंडी पंढरी चालली . .' असे अभंग म्हणत तुकोबारायांची पालखी काटेवाडी येथे मेंढ्याच्या पहिल्या गोल रिंगण सोहळ्यासाठी पोहोचली. रिंगणाच्या वेळी टाळ-मृदंगाचा गजर, तुकोबा-माउलींचा नामघोष आणि अश्वाच्या दौडीवर खिळलेल्या वैष्णवांच्या नजरा असे वातावरण होते. भाविकांच्या उत्स्फूर्त जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात काटेवाडीतील मेंढ्यांचे पहिले गोल रिंगण पार पडले.

काटेवाडी परिसरातील भाविकांनी काटेवाडी बस स्थानकाजवळ पालखीचे स्वागत केल्यानंतर गावातील मैदानावर पालखी नेण्यात आली. या वेळी पालखीभोवती वारकऱ्यांनी रिंगण केले; आणि सुरू झाला डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा.

या रिंगणात सर्वप्रथम अश्व धावला आणि त्यानंतर मेंढ्या धावल्या. त्यांच्या पाठोपाठ पताकावाले, तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला वारकरी, वीणेकरी, पखवाजवाले आणि टाळकरी धावले. रिंगण सोहळा आटोपल्यानंतर पालखीच्या रथाने सणसर मुक्कमी प्रस्थान केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाहुबलीचा टॅक्सही ‘बहु’

$
0
0

पुणे : हिंदी चित्रपटसृष्टीच्या बॉक्स ऑफिसवर तिकीट विक्रीचे नवे रेकॉर्ड प्रस्थापित करणाऱ्या बाहुबली सिनेमामुळे करमणूक कर विभागाचीही तिजोरी भरली आहे. हा सिनेमा पुण्यात प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत करमणूक कराच्या माध्यमातून सरकारने ७८ लाख रुपयांची 'कमाई' केली आहे. बाहुबली या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा असून या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत देशभरात २५० कोटी रुपयांहून अधिक गल्ला कमविला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. पुणे शहरातील दहा मल्टीप्लेक्स, दहा मल्टीस्क्रिन आणि ४२ चित्रपटगृहांत बाहुबलीचे खेळ होत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मागणी होत असल्याने काही मल्टीप्लेक्सचालकांनी त्याचे खेळ आणि तिकीट दरही वाढविले आहेत.

पुण्यातील मल्टीप्लेक्स व चित्रपटगृहांत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या माध्यमातून चार ते पाच कोटी रुपयांचा कर जमा होतो. एकट्या बाहुबली चित्रपटाने पाऊणकोटींचा करमणूक कर केवळ पाच दिवसांत दिला आहे. पुढील दोन महिन्यांत चांगला करमणूक कर मिळेल, असे करमणूक कर अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारसा स्थळांचे पालिका करणार ब्रँडिंग

$
0
0

पुणे : ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्याचे महत्त्व देश आणि जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपक्रमांचे आणि वारसा स्थळांचे ब्रँडिंग केले जाणार आहे. ब्रोशर्स, व्हिडिओ फिल्मस् आणि होर्डिंगच्या माध्यमातून हे ब्रँडिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ ग्राफिक डिझायनरच्या पॅनेलची नियुक्ती करण्यास स्थायी समितीने गुरुवारी मान्यता दिल्याची माहिती स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी दिली.

या डिझायनर पॅनेलवर आठ जणांची नियुक्ती केली जाणार आहे. शहराचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा सर्वांपर्यंत पोहोचविण्यासह नव्या युगात शहराने मिळवलेली आयटी इंडस्ट्री, स्पोर्ट्स आणि ऑटो हब आणि औद्योगिक वाढ याचा विचार करून पर्यटनाच्या दृष्टीने ब्रँडिंग करण्याचा पालिकेचा प्रयत्न राहणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी टूरिस्ट हब म्हणूनही विविध ऐतिहासिक ठिकाणांचा विकास केला जात आहे, अशी माहिती अश्विनी कदम यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीचे दागिने विकताना महिलेला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रविवार पेठेतील सराफ बाजारात सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी आलेल्या महिलेला खडक पोलिसांनी अटक केली. सिंहगड रोडवर घरकाम करताना एक हिरेजडीत सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची अंगठी आणि कर्ण फुले असा सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

खडक पोलिस ठाण्याचे अशोक माने यांना मिळालेल्या माहितीनुसार, रविवार पेठ सराफ बाजारातून राजश्री गोविंद मोरे (वय ५५, रा. लक्ष्मीनारायण थिएटरजवळ) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मोरे​कडे सव्वा दोन लाख रुपयांचे दागिने मिळाले होते. या दागिन्यांच्या अनुषंगाने तपास केला असता ते चोरल्याची कबुली मोरेने तपासादरम्यान दिली आहे, अशी माहिती खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी दिली.

मोरे ही सिंहगड रोडवरील अंजली दिनकर दातार यांच्याकडे गेली दोन महिने घरकामास होती. दातार यांच्या आजारपणाचा फायदा घेत तिने घरातील सोन्याचे दागिने चोरले आणि पळ काढला. या प्रकरणी दातार यांच्या मुलीने सिंहगड पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. खडक पोलिसांनी मोरेला अटक करत सिंहगड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे, असे जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीला ५०० कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एकूण उत्पन्नावर आकारल्या जाणाऱ्या प्रवासी करातील १० टक्के रक्कम एसटीच्या पायाभूत विकासासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पायाभूत विकास आणि नवीन बस खरेदी करण्यासाठी एसटीला दर वर्षी अंदाजे ५०० कोटी रुपये मिळणार आहेत.

प्रत्येक वर्षी प्रवासी कर म्हणून राज्य सरकारला एसटीच्या उत्पन्नातून १७.५ टक्के रक्कम दिली जाते. एसटीची आर्थिक स्थिती लक्षात घेता राज्य सरकारकडे पायाभूत विकासासाठी निधीची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे एसटी, सार्वजनिक वाहतूक बळकट करण्यासाठी राज्य सरकारने प्रवासी करातून एसटीला निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. एसटीकडून आकारल्या जाणाऱ्या १७.५ टक्क्यांतील केवळ ७.५ टक्के रक्कम सरकार दरबारी जमा केली जाईल; तर १० टक्के रक्कम पायाभूत विकास, बस स्टँड, आगार व इतर सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी खर्च केली जाणार आहे.

एसटीचे सध्याचे वार्षिक एकूण उत्पन्न सात ते आठ हजार कोटी रुपये आहे. वर्ष २०१३-१४ मध्ये ते सहा हजार ७२३ कोटी ५४ लाख रुपये होते. त्यावर ८५२ कोटी ९३ लाख रुपये प्रवासी कर देण्यात आला होता. गेल्या वर्षी २०१४-१५ मध्ये एकूण उत्पन्न सात हजार ६९२ कोटी रुपये होते आणि प्रवासी कर ९८६ कोटी कोटी रुपये दिला होता. एसटी वर्षाला पाचशे ते सहाशे कोटी रुपये मिळतील. राज्य सरकारकडे निधीचा तुटवडा असल्याने अर्थसंकल्पात तरतूद न करता प्रवासी करात सूट देण्याचा हा निर्णय घेतल्याचे एसटी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

तिकीट दर कमी करण्याची मागणी

खासगी बस व्यवसाय आणि इतर राज्यांच्या सरकारी वाहतूक सेवा याचा एसटीच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. अन्य राज्यांच्या बसेस आणि गर्दीचा हंगाम वगळता खासगी प्रवासी बसचे तिकीट दर एसटीच्या तुलनेत कमी आहे. परिणामी, प्रवासी अन्य पर्यायांचा विचार करतात. त्यामुळे प्रवासी कर कमी झाल्याने तिकीट दर १० ते १२ टक्क्यांनी कमी करावेत. त्यामुळे प्रवासी संख्या वाढून उत्पन्न निश्चितच वाढेल, असे मागणीचे पत्र महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी राज्य सरकारला पाठविले असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images