Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चौतीस गावांचा समावेश कधी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याची प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्यास मुहूर्त मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. येत्या ऑगस्टअखेरपर्यंत प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यापूर्वी, म्हणजे आजपासून (सोमवार) सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात गावांच्या समावेशाची घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. त्याबाबत प्राथमिक निर्णय घेतल्यानंतर त्यावर हरकती-सूचना मागविण्यात आल्या. माजी विभागीय आयुक्त विकास देशमुख यांच्या समितीने त्यावर सुनावणीची प्रक्रिया पार पाडून आपला अहवाल सरकारला सादर केला असून गावांच्या समावेशाचा चेंडू आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात आहे. दुसरीकडे येत्या दीड वर्षात महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.

निवडणुका होत असलेल्या महापालिकांना आयोगाने पत्र पाठविले आहे. यापूर्वीच्या निर्णयानुसार निवडणुकीपूर्वी सहा महिने हद्दीत बदल करता येणार नाही. त्यानुसार सप्टेंबर २०१६ नंतर महापालिकेच्या हद्दीत बदल करता येणार नाहीत. हे गृहित धरून या प्रभागरचनेची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असे या पत्रात म्हटले आहे.

प्रभागरचना रखडली

गावांच्या समावेशाचा निर्णय प्रलंबित असल्यामुळे अंतिम आदेश येईपर्यंत जुन्या हद्दीनुसारच प्रभागरचना तयार करण्याची प्रक्रिया करणे प्रशासनास भाग पडणार आहे. जुन्या हद्दीनुसार प्रभाग रचना तयार झाली आणि त्यानंतर समावेशाचा निर्णय झाला, तर लोकसंख्येचे निकष बदलून पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागेल, असे चित्र आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच गावांच्या समावेशाबाबत निर्णय झाला, तर प्रभागरचना योग्य पद्धतीने होऊ शकेल, असे मत प्रशासनातून व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विश्व संमेलनासाठी ‘पॅकेज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सुवर्णमहोत्सवी स्मृतीवर्षात अंदमान येथे होत असलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनासह पर्यटनाचा आनंद साहित्यप्रेमींना घेता येणार आहे. संमेलनासाठी चार खास पॅकेज आयोजकांनी तयार केली असून, त्यासाठीची नावनोंदणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे चौथे विश्व साहित्य संमेलन अंदमान येथे ५ व ६ सप्टेंबर रोजी होणार आहे. ऑफबीट डेस्टिनेशन व पोर्ट ब्लेअरचे महाराष्ट्र मंडळ यांच्यातर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. घुमान येथे झालेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी साहित्यप्रेमींसाठी पॅकेज तयार केली होती. त्याच धर्तीवर अंदमानसाठीही चार वेगवेगळी पॅकेज तयार करण्यात आली आहेत. या पॅकेजविषयीची घोषणा साहित्य महामंडळ व आयोजकांकडून करण्यात येणार आहे.

ऑफबीट डेस्टिनेशनचे नितीन शास्त्री यांनी या पॅकेजविषयी 'मटा'ला माहिती दिली. 'रेल्वे आणि विमान प्रवासाचा ताळमेळ घालत चार पॅकेज तयार करण्यात आली आहेत. त्यात तीन, चार, पाच व सहा दिवस अशा चार पॅकेजचा समावेश आहे. ३३ हजार रुपयांपासून ही पॅकेज उपलब्ध आहेत. सहा दिवसांच्या पॅकेजमध्ये मुंबई ते मुंबई विमानप्रवास असल्याने ते ५१ हजारांचे आहे. अंदमान प्रवास अधिक स्वस्त करण्यासाठी चेन्नईहून जहाजाचा प्रयत्न होता. मात्र, मेरिटाइम बोर्डाकडे सप्टेंबर महिन्यातील नियोजनच तयार नाही. त्यामुळे ती कल्पना रद्द केली,' असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक पॅकेजनुसार पर्यटनस्थळांची संख्या कमी-जास्त आहे. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सुवर्णमहोत्सवी स्मृतीवर्षात हे संमेलन होत असल्याने साहित्य संमेलनाला येणाऱ्या साहित्यप्रेमींना सेल्यूलर जेल व लाइट अँड साउंड शो दाखवला जाणार आहे. जुलै आणि ऑगस्ट या दरम्यान नावनोंदणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अंदमानमध्ये मराठी समाज अल्प असल्याने साहित्यप्रेमींची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने भोजन व्यवस्थेवर खास लक्ष दिले जाणार आहे. संमेलनातील भोजन व्यवस्थेसाठी आचारी आणि इतर साहित्य पुण्यातूनच नेणार असल्याचे शास्त्री यांनी सांगितले.

स्वनियोजनाने येणाऱ्यांचेही स्वागतच

आयोजकांचे पॅकेज न घेता संमेलनाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांचेही स्वागतच असल्याचे शास्त्री यांनी स्पष्ट केले. मात्र, स्वनियोजनाने संमेलनाला येणाऱ्यांना कार्यक्रमस्थळी नोंदणी करावी लागेल. त्यासाठी किती शुल्क ठेवायचे, हे साहित्य महामंडळाकडून ठरवले जाईल. स्वनियोजनाने सुमारे एक हजार साहित्यप्रेमी संमेलनाला येतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिवहन कायद्याला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्याच्या प्रस्तावित नवीन महाराष्ट्र परिवहन कायद्याला पुण्यातील विविध संस्था, संघटनांनी विरोध दर्शविला आहे. हा कायदा म्हणजे सार्वजनिक वाहतुकीच्या खासगीकरणाचा घाट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिक्षा, एसटीसह स्थानिक स्तरावरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जगली पाहिजे, या दृष्टिकोनातून निर्णय घेण्याचे आवाहन राज्य सरकारला करण्यात आले आहे.

राज्याच्या परिवहन विभागाने १५ जुलै रोजी विभागाच्या वेबसाइटवर प्रस्तावित कायद्याचा मसुदा प्रसिद्ध केला. या कायद्यावर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. राज्यभरातील विविध संस्थांनी हरकती व सूचना नोंदविल्याही आहेत. आता पावसाळी अधिवेशनात हा कायदा सभागृहात मांडला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसरकाने सामान्य जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा, असे आवाहन संघटनांनी केले आहे.

या कायद्यात रिक्षा चालकांना सार्वजनिक सेवकाचा दर्जा द्यावा, या मागणीचा समावेश करावा आणि ओला, उबेर, विंग यासारख्या रेडिओ कॅबला कायदेशीर करण्यासाठी 'अॅग्रीगेटर'ला मान्यता देण्यास तीव्र विरोध असल्याचे राज्य कृती समिती व रिक्षा पंचायतीने आक्षेप नोंदविला आहे. अॅग्रीगेटरमुळे एसटी, शहरी बस वाहतूक, रिक्षा आणि टॅक्सी या सारख्या सार्वजनिक प्रवासी सेवा देणाऱ्यांची अवस्था बिकट होईल. सध्या परवानगी नसतानाही या कॅबमार्फत प्रवाशांची पळवापळवी सुरू आहे, असे रिक्षा पंचायतीने म्हटले आहे.

खासगी वाहनांना 'जीपीएस' लावण्याची सक्ती केल्यास ते यंत्र बसविण्याचा खर्च संबंधित वाहनधारकांवर टाकला जाईल. त्यामुळे या महागाईच्या जगात त्यांच्यावर आणखी बोजा टाकू नये. रिक्षा हे सार्वजनिक वाहन आहे, पण त्यांना कोणत्याही प्रकारची सूट दिली जात नाही, असा आक्षेप रिक्षा फेडरेशनने नोंदविला आहे.

ड्रायव्हिंग स्कूल चालकांवरही अवास्तव बंधने घालण्याचा प्रयत्न या कायद्यातून केला आहे. ड्रायव्हिंग स्कूलची जागा निश्चिती, वाहनांची संख्या यावर बंधने घालण्याला काही अर्थ नाही. मूळातच केंद्राचा परिवहन कायदा प्रस्तावित असताना राज्याने नवीन कायदा करण्याची गरज नव्हती, असे राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे मत आहे.

कायद्याचा मसुदा मराठीत उपलब्ध करण्याची मागणी

आपल्या राज्याची राजभाषा मराठी असून मराठीतून शासकीय कामकाज करण्यास प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण आहे. तसेच, परिवहनमंत्री शिवसेनेचा असूनही या कायद्याचा प्रस्ताव इंग्रजीमध्ये सादर करण्यात आला आहे. या कायद्याचा भाग असलेले रिक्षा चालक, एसटी चालक, वाहक, कर्मचारी, इतर वाहन चालक, परवाना धारक यांची इंग्रजी ही मातृभाषा नसल्याने त्यांना कायदा समजणे अवघड आहे. त्यामुळे त्या विषयी ते हरकती सूचना नोंदवू शकणार नाही. त्यामुळे कायद्याचा मसुदा मराठीत उपलब्ध करून द्यावा आणि हरकती व सूचना नोंदविण्यासाठी मुदत वाढ द्यावी, अशी मागणी रिक्षा पंचायतीने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामशेतजवळ अपघात; २ ठार; २ जखमी

$
0
0

लोणावळा : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर कामशेत येथील जयमल्हार हॉटेल समोर कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात शनिवारी सकाळी साडेसहा वाजता झाला.

सुनील फ्रान्सिस डिसुझा (वय २६), सागर विष्णू गावडे (२१) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे असून, जखमी परेश महादेव वाभिया (३१), प्रज्ञेश बाबू कारोपोरा (२९, सर्व रा. नवीमुंबई, वाशी) यांचा समावेश आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व मित्र त्यांच्या आयटेन कारने मुंबईहून पुण्याकडे जात होते. कामशेत येथील घाटातील उतारावरील वळणावर कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार मार्गामधील दुभाजकावर जोरात आदळली. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कामशेत येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास कामशेत पोलिस करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीत ‘ISMT’ ला टाळे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

बारामती मधील सर्वांत जुनी कंपनी म्हटले तर आयएसएमटी. मात्र रविवारी मध्यरात्रीनंतर व्यापारी मंदीचे कारण पुढे करून कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनी बंद केली असल्यामुळे कंपनीमधील चारशे दहा कामगारांचे भवितव्य अंधारात आले आहे. मात्र कंपनीच्या विरोधात शांततेच्या मार्गाने दाद मागणार असल्याचे कामगारांनी सांगितले. आयएसएमटी (इंडियन सीमलेस मेटल ट्यूब) कंपनी ट्यूबलेस टायरचे उत्पादन करते. चीनचा माल प्रचंड प्रमाणात बाजारात आयात करून साठवला जात आहे. चीनच्या मालाची विक्री किमत कमी असल्याने ही कंपनी त्या मालाबरोबर स्पर्धा करू शकत नाही. ऑर्डर कंपनीच्या हातात नसल्याचे कंपनी व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. मात्र कंपनीने हा निर्णय घेताना कामगारांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना अथवा लेखी नोटीस दिले नसल्याचे कामगार युनियनचे अध्यक्ष नाना भगत यांनी 'मटा'ला सांगितले.

कंपनी कामगारांनी सोमवारी गेटवर ठिय्या केला होता. मात्र कोणत्याही प्रकारचा गोंधळ अथवा नारेबाजी कामगारांनी केली नाही. कामगारांनी कामगार आयुक्तांना याबाबत लेखी निवेदन दिले असल्याचे भगत यांनी सांगितले. कंपनी बंद केल्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने कामगार आयुक्त प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केली.

कामगारांस स्थायी आदेश कलम १९ प्रमाणे त्यांची रजा शिल्लक असल्यास व त्यांनी रजेची मागणी केल्यास पगारी रजा देण्यात येईल. कंपनीची परिस्थिती सुधारल्यास पुन्हा कंपनी सुरू करण्यात येईल. मात्र, याबाबतचा कालावधी निश्चित सांगणे सध्या अशक्य आहे.

- बलराम आगरवाल, व्यवस्थापन उपाध्यक्ष, आयएसएमटी

आयएसएमटी कंपनी लॉक ऑफ बाबत कोणतीही लेखी माहिती आली नाही. मात्र मी कामगार अधिकारी चौकशीसाठी पाठविले आहेत.- आर. आर. हेंद्रे, कामगार आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाई न करता पिंपरीत फक्त चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

अधिकाऱ्यांच्या कारभारात चौकशीमध्ये त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे उघड असतानाही अधिकाऱ्यांची पाठराखण करून भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचे आरोप यापूर्वी झाले. असे असताना आता पुन्हा वैद्यकीय विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांशी संबधित विषय पुन्हा महापालिकेच्या अजेंड्यावर आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सभागृहात भ्रष्टाचाराच्या एकाच विषयांवर पुन्हा चर्चा होणार असून, आता ही तिसरी चर्चा असल्याने कारवाई न करता केवळ चर्चेवर भर अशी टिका होऊ लागली आहे.

महापालिकेने क्षयरोग तपासणीसाठी मशिन खरेदी केले होते. त्यामध्ये खरेदी निविदा प्रकरणात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याचे समोर आले. त्या प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालामध्ये निवृत्त वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर, निवृत्त वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. शामराव गायकवाड यांच्याबाबत पुढील कार्यवाही करण्यासाठी आयुक्तांना मंजुरी देण्याचा व वायसीएमएचचे निवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद जगदाळे यांच्या निवृत्ती वेतनातील २० टक्के रक्कम पाच वर्षे राखून ठेवण्याचा विषय सोमवारी (१८ जुलै) होणाऱ्या महापालिका सभेपुढे मंजुरीसाठी पुन्हा एकदा ठेवण्यात आला आहे.

यापूर्वी याच विषयांवरून महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी उघडपणे घोटाळेबाज अधिकाऱ्यांची पाठराखण केल्याचे आरोप झाले. या घोटाळ्याच्या चौकशी अहवालात संबधित अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला असल्याचे उघड झाले होते. मात्र, तरी देखील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांची तळी उचलत त्यांच्या बचावाचा प्रयत्न केल्याचे देखील आरोप होत आहेत. या विषयांवरून उघडपणे भ्रष्टाचाराचे समर्थन सत्ताधारी पक्षाच्या बड्या पदाधिकाऱ्यांनी केल्यामुळे सत्ताधारी भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

'आणखी किती दिवस चर्चा'

चौकशीमध्ये अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचे माहित असताना हे विषय मंजूर केले जात नाही. त्यावर नुसतीच चर्चा करून ते तहकूब किंवा दप्तरी दाखल करून त्याचं भिजत घोगडं तसंच ठेवले जाते. हे तीन विषय पुन्हा महापालिकेच्या सभेपुढे मंजुरीसाठी आले आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या त्याच विषयांवर पुन्हा तीच चर्चा महापालिकेच्या सभागृहात होणार, सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा अधिकाऱ्यांची पाठराखण व भ्रष्टाचाराला खतपाणी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी संरक्षण दलच ‘असुरक्षित’!

$
0
0

संदीप भातकर, येरवडा

आपत्कालीन परिस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नागरी संरक्षण दलात पुण्या-मुंबईसह पालघर आणि रायगड या शहरातील कार्यालयांत अनेक वर्षांपासून पूर्ण वेळ उपनियंत्रक पद भरण्यात आलेले नाही. परिणामी, हे दल निव्वळ नावापुरतेच मर्यादित राहिले आहे.

शत्रूंच्या हल्ल्यापासून, तसेच भूकंप, पूर, दहशतवादी हल्ला, आग आणि स्फोट यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांचे, मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी नागरी संरक्षण कायदा १९६८नुसार नागरी संरक्षण दलाची स्थापना करण्यात आली. समाजाच्या विविध स्तरांतील लोकांना नागरी संरक्षणविषयक प्रशिक्षण देऊन स्वयंसेवक म्हणून भरती करून घेण्यात येते.

चाळीस वर्षांपूर्वी नागरिकांच्या हितासाठी स्थापन झालेल्या नागरी संरक्षण दलाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने दलाला मोठ्या प्रमाणवर मनुष्यबळाची कमतरता भासू लागली आहे. राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर आणि रायगड या सहा शहरांत नागरी संरक्षण दलाच्या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक शहरात स्थापन केलेल्या कार्यालयाची जबाबदारी उपनियंत्रक अधिकाऱ्यांवर सोपवलेली आहे. पण यापैकी केवळ ठाणे आणि नाशिक या ठिकाणी उपनियंत्रकपद भरण्यात आले आहे. पुणे, पालघर, रायगड या तीन शहरांत मुंबईच्या चारपैकी दोन ठिकाणी उपनियंत्रकपद प्रभारी अधिकारी सांभाळत आहे. नागरी संरक्षण दलाकडून महत्त्वाचे निर्णय आणि समाजात पुरेशी जनजागृती होत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून हे दल केवळ नावालाच उरले आहे. त्यामुळे एखाद्या शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पुरेसे स्वयंसेवक मिळणेदेखील कठीण होऊन जाते.

पुणे नागरी संरक्षण दलाचे प्रभारी उपनियंत्रक दिलीप कांबळे म्हणाले, '२००९पासून पुणे कार्यालयाला कायमस्वरूपी उपनियंत्रक अधिकारी मिळालेले नाहीत. गेल्या सहा वर्षांपासून या महत्त्वाच्या पदावर अतिरिक्त आणि प्रभारी अधिकारी हे पद सांभाळत आहे. शहराच्या कार्यालयात मंजूर जागांपैकी निम्मे जागा रिक्त असल्याने दलाकडून नागरिकांना पुरेसे प्रशिक्षण देण्यात अडचणी निर्माण होतात.'

'आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितपणे मदत करता यावी, या हेतूने नागरी संरक्षण दलाकडून समाजातील नागरिकांना, शाळेतील विद्यार्थांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते. या कालावधीत प्रत्येकाला पंचेचाळीस रुपयांचे मानधन आणि प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र दिले जाते. तसेच दर महिन्यातून दोनदा प्रशिक्षितांना एकत्र बोलावून उजळणी घेतली जाते. वर्षाला दीड स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाते. नागरी संरक्षण दलासोबतच होमगार्ड संघटनादेखील आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करते,' अशी माहिती कांबळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफआरपी अशक्य : पवार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

'साखर आणि ऊसदराच्या तफावतीमुळे कारखानदारी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपी (रास्त आणि किफायतशीर भावा) देणे आता अशक्य आहे. 'एफआरपी'ची उर्वरित रक्कम केंद्र, राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात द्यावी. अन्यथा वेळ पडल्यास महाराष्ट्रातील सर्व कारखाने सरकारी कारवाईविरुद्ध एकजूट करतील,' असा इशारा वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) उपाध्यक्ष रोहित पवार यांनी दिला.

'ऑक्टोबर २०१४मध्ये गळीत हंगाम सुरू करताना साखरेचा दर २७५० रुपये प्रति क्विंटल होता. आज हाच दर १८०० रुपयांवर आला आहे. गेल्या पाच वर्षांत देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर साखरेच्या उत्पादनात वाढ झाली. परिणामी दर ४० टक्क्यांनी कोसळले. दुसरीकडे केंद्र सरकारने उसाच्या एफआरपी दरात ७० टक्क्यांनी वाढ केली. साखर आणि ऊसदराच्या तफावतीमुळे कारखानदारी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपी देणे आता अशक्य आहे,' असे पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषदेत सांगितले.

'कारखान्यांची हीच परिस्थिती राहिल्यास साखर कारखान्यांचे गाळप सुरू करणे अशक्य आहे. सर्वच कारखान्यांचे कर्जखाते थकीत आहे. या आर्थिक संकटात कोणतीही बँक कर्जपुरवठा करणार नाही. त्यासाठी आगामी एफआरपी दर व सी. रंगराजन समितीच्या सूत्रानुसार एकूण उत्पन्नाच्या ७० ते ७५ टक्के ऊसदर यातील फरक साखर किंमत स्थिरीकरण निधीतून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात द्यावा. पहिला हप्ता मालतारण खात्यावर मंजूर होणाऱ्या रकमेएवढा देण्यास केंद्र व राज्य सरकारने मंजुरी द्यावी. उर्वरित ऊस रक्कम साखर विक्रीतून हप्त्याने देण्यास मान्यता द्यावी. 'एफआरपी'तील फरक केंद्र सरकारने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर गळीत हंगाम बंद होताच वर्ग करावा. या मागण्या १५ ऑगस्टपूर्वी मान्य कराव्यात. त्यानंतरच कारखाने सुरू करणे शक्य आहे,' असे पवार म्हणाले.

''एफआरपी'प्रमाणे थकीत ऊसबिल देण्यासाठी केंद्र सरकारने सहा हजार कोटी १० टक्के व्याजदराने देण्याचे जाहीर केले आहे; मात्र जाचक अटी असल्यामुळे कोणतेही कारखाने पात्र ठरत नाहीत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या दोन हजार कोटींसंदर्भात काहीही कार्यवाही नाही. अशा दोन्ही कर्जांच्या स्वरूपातील आर्थिक मदत स्वीकारू नये. त्याऐवजी अनुदान स्वरूपात द्यावी. केंद्र सरकारने सहा हजार कोटी अन्न महामंडळाकडे द्यावेत. त्यातून २०१४-१५च्या उत्पादित साखरेच्या १० टक्के साखर थेट खरेदी करावी,' अशी मागणी सरकारकडे केल्याचे पवार यांनी सांगितले.

साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी २० टक्के साखर निर्यात करण्याकरिता दीर्घकालीन धोरण सरकारने ठरवावे. अन्यथा साखर कारखाने आर्थिक संकटामुळे बंद राहतील. ऊस शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. त्यासाठी राज्य व केंद्र सरकार जबाबदार राहील.

- रोहित पवार, उपाध्यक्ष, 'विस्मा'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजगुरुनगरात ‘टग्यां’वर कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर

राजगुरुनगर शहरात असलेले अरुंद रस्ते आणि शाळा व कॉलेजच्या परिसरात 'टगेगिरी' करून बेफाम 'धूम स्टाइल' गाड्या चालवणाऱ्या दुचाकीस्वारांवर खेड पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून संबंधितांना चांगलाच ब्रेक लावला आहे. यामध्ये कॉलेज तरुणांची संख्या मोठी आहे.

गाडीची कागदपत्रे जवळ न बाळगणे, विनापरवाना गाड्या चालवणे, नंबर प्लेट नसणे, तसेच नंबर प्लेटवर गाडीचा नंबर न टाकता इतर नावे व चिन्हे लावणे, असे गुन्हे करणाऱ्या वाहनचालकांवरदेखील कारवाई करण्यात आली. राजगुरुनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के, पोलिस उपनिरीक्षक डी. एस. महाडिक, मुख्तार शेख, चेतन माने व पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

मुळातच राजगुरुनगर शहरात सर्रास वाहतुकीचे सर्व नियम पायदळी तुडवून वाहने चालवली जातात. रस्त्याच्या कडेला चुकीच्या पद्धतीने वाहने लावली जातात. यामध्ये दुचाकीस्वारांबरोबरच चारचाकी वाहनचालकदेखील सहभागी असतात. शाळा-कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत तर अनेक तरुण रस्त्याने काहीही कारण नसताना मोठ्याने कर्कश हॉर्न वाजवून वेगात गाड्या चालवतात. राजगुरुनगर बसस्थानकाच्या आवारातदेखील चार-पाच वाजण्याच्या सुमारास अनेक जण वेगाने दुचाक्या चालवून आपली 'कला' दाखवत असतात. विशेषतः रस्त्याने पायी जाणारे वृद्ध, महिला व शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना संबंधित दुचाकीस्वारांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. वाडा रस्त्याने जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. त्यातच पंचायत समिती, तहसील कार्यालय परिसर, राजगुरुनगर-वाडा रस्ता, बसस्थानक परिसर, कोर्ट परिसर, पुणे-नाशिक महामार्गाच्या दुतर्फा अधिक संख्येने व बेशिस्तपणे चारचाकी व दुचाकी गाड्या लावल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. शहराच्या अंतर्गत भागातील बाजारपेठेत बहुतांश दुकानांपुढे सातत्याने भुसार मालाची अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

वाहन तपासणी मोहीम सातत्याने केली जाणार असून, वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत व संबंधित गाडीची कागदपत्रे जवळ बाळगावीत. गाडी चालवताना रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता वाहनचालकांनी घेणे जरुरीचे आहे.

- संतोष गिरीगोसावी, पोलिस निरीक्षक, राजगुरुनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

इंदापूरमधील भिमाई आश्रमशाळेतील ४५० मुलांनी पाण्याच्या मागणीसाठी रविवारी इंदापूरच्या तहसील कचेरीवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.

गेल्या काही दिवसांपासून आश्रमशाळेला पाण्याची टंचाई भासत होती. संस्थेचे संस्थापक व अध्यक्षांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात तक्रारी केल्या होत्या; मात्र कसल्याही प्रकारे मदत न झाल्याने अखेर या शाळेतील विद्यार्थ्यांना आंदोलनाचे हत्यार उपसण्याची वेळ आली. 'जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी पाहिजे, असे सरकारी उत्तर तहसीलदारांनी दिल्याने ही वेळ आली,' असे अध्यक्षांनी सांगितले. सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असून, शेतकऱ्यांबरोबर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनाही पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढल्याचे आश्रमशाळा प्रशासनाने सांगितले. दिवसभराच्या ठिय्या आंदोलनानंतर काही तासांनी शासकीय टँकरने पाणी देण्यात आले; मात्र विहिरींना पाणी येत नाही, तोपर्यंत शासकीय टँकरने पाणी मिळावे, अशी माफक अपेक्षा या मुलांनी व्यक्त केली आहे. याबाबत विचारणा केली असता इंदापूर तहसीलदारांनी कानावर हात ठेवले.

आश्रमशाळेसाठी दोन विहिरी आणि चार विंधण विहिरी आहेत; मात्र पाणी आटल्याने येथील विद्यार्थ्यांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी येथे राहतात. या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. स्थानिक प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने आम्ही आंदोलनाचे हत्यार उगारले आहे.

- रत्नाकर मखरे, अधक्ष, भिमाई आश्रमशाळा

गेले आठ-पंधरा दिवस पाणी नसल्याने तहानही पुरेशी भागवता येत नसल्याची स्थिती आहे. दिवसाला जेमतेम एक तांब्याभर पाणीच मिळते. ही स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने विचार करावा, ही आमची मागणी आहे.

- यशवंत निंबाळकर, आश्रमातील विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४ तासांत चार साखळी चोऱ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात गेल्या चोवीस तासांत सोनसाखळी हिसकावण्याच्या चार घटना घडल्या आहेत. त्यामध्ये तीन घटनांमध्ये दुचाकीस्वार चोरट्यांचा समावेश आहे; तर एका घटनेत पालखीचे दर्शन घेऊन घरी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले आहे.

पतीसह दुचाकीवर चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याचा प्रकार कर्वेनगर येथील अलंकार सोसायटीजवळ शनिवारी रात्री घडला. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे येथील ३२ वर्षांच्या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अर्धवटस्थितीत ओढून नेण्यात आले आहे.

दुसऱ्या घटनेत, ​सिटी प्राइड व बिग बाजार मॉलसमोरून शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि सोनसाखळी असा ३५ हजार रुपयांचा ऐवज हिसकावण्यात आला. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तिसऱ्या घटनेत, नगररोडवर एका ५६ वर्षांच्या महिलेच्या गळ्यातील ४२ हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले आहे. ही ​महिला मुळची बुलढाणा येथील असून मुलाच्या उपचारासाठी पुण्यात आली आहे. नगर रोड चौकाच्या दरम्यान श्रीकृष्ण हॉटेल समोर शनिवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली.

चौथ्या घटनेत, भोलनाथ गवारी (३०, रा. आंबेगाव खुर्द) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शंकरशेठ रोडवर सेव्हन लव्हज चौकादरम्यान पालखीचे दर्शन घेवून निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले आहे. गवारी यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री बाराच्या दरम्यान घडली.

संरक्षणमंत्र्यांशी विविध समस्यांवर चर्चा

पुणे ः नॅशनल डिफेन्स ग्रुप बी गॅझेटेड ऑफिसर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. ग्रुप बी गॅझेटेड ऑफिसर्सच्या विविध समस्याही संरक्षणमंत्र्यांच्या कानावर घालण्यात आल्या. या अधिकाऱ्यांच्या समस्यांविषयी उच्चाधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याचे आदेश पर्रीकर यांनी या वेळी दिले.

असोसिएशनच्या केंद्रीय कार्यकारिणीचे महासचिव जयगोपाल सिंग, संयुक्त महासचिव प्रदीप केंजळे, बी. एम. बारीक, एस. एम. तिवारी यांनी पर्रीकर यांची भेट घेतली. 'दारुगोळा कारखान्यातील ग्रुप बी गॅझेटेड ऑफिसर्स व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील दुवा आहे. परंतु, पदोन्नती आणि अनुदानांपासून वंचित ठेवल्याने तसेच कमी दर्जाचे अधिकारी व सामान्य कामगारांपेक्षाही कमी वेतन मिळत असल्याने त्यांच्यात मानसिक वैफल्य निर्माण होत आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे,' अशी माहिती या शिष्टमंडळाने पर्रीकर यांना दिली. त्यावर पर्रीकर यांनी उच्चाधिकाऱ्यांची समिती स्थापण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, 'संरक्षण उत्पादनातील वाढ आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धात्मक उत्पादन क्षमता यावर दारूगोळा आणि आयुध निर्माण विभागांनी लक्ष केंद्रित करावे. लक्ष्यपूर्तीसाठी व्यवस्थापन जबाबदार असेल. त्यासाठी जबाबदारी निश्चित करून वेळप्रसंगी कठोर निर्णय घेण्यात येतील,' असेही पर्रीकर यांनी या शिष्टमंडळाला सांगितल्याचे पत्रकात नमूद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोटा दाखला दिल्याने पेशंटवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

धर्मादाय हॉस्पिटलमधील उपचारात ५० टक्के सवलतीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी निवृत्त सरकारी नोकर असूनही उत्पन्नाचा खोटा दाखला देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या संदर्भात पेशंटसह तहसीलदाराविरुद्ध धर्मादाय आयुक्तांनी फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे.

जळगाव जिल्ह्यातील या सदाशिव पाडळे (नाव बदलले) असे पेशंटचे नाव आहे. सह्याद्री हॉस्पिटलने पेशंटविरोधात धर्मादाय आयुक्तालयात तक्रार दाखल केली होती. पाडळे हे वीज महामंडळातील सरकारी निवृत्त नोकर आहेत. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर अॅँजिओप्लास्टी करण्यात आली. त्या करिता ३ लाख ४० हजार रुपयांचा खर्च आला. उपचारात ५० टक्के सवलत मिळावी या करिता त्यांनी हॉस्पिटलकडे जामनेर येथील तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला हॉस्पिटलला दिला.

हॉस्पिटलला कागदपत्रावरून पेशंटच्या दाखल्याविषयी शंका आली. त्यांनी परस्पर पेशंटची माहिती गोळा केली. त्यानुसार पाडळे हे निवृत्त सरकारी अधिकारी असून त्यांना पेन्शन सुरू आहे. त्याशिवाय त्यांच्या मुलीचा बावधन येथे फ्लॅट आहे. तसेच, निकषांपेक्षा अधिक उत्पन्न असल्याचा पुरावा हॉस्पिटलला मिळाला. ही बाब सह्याद्री हॉस्पिटलच्या प्रशासनाने धर्मादाय सहआयुक्तांच्या समितीच्या निदर्शनास आणून दिली. त्या वेळी पाडळे यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यत आला. परंतु, प्रत्येक वेळी पुढील तारखेस येत असल्याचे कारण त्यांनी दिले. हॉस्पिटलने बावधन येथे असलेल्या फ्लॅटसह खोटा उत्पन्नाचा दाखला दिल्याचा पुरावा समितीपुढे ठेवले. तहसीलदारांनी पाडळे यांच्या उत्पन्नाची शहानिशा देखील केला नसल्याने नोटीस जारी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकोबांची पालखी यवतला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पाचव्या मुक्कामी यवत येथे श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावली. शहरी भागातला आपला प्रवासपूर्ण करून रखरखत्या उन्हाची पर्वा न करता पालखी सोहळा ग्रामीण भागात आला. पालखी आज, मंगळवारी वरवंडकडे प्रस्थान करणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर ज्ञानोबा- तुकोबाच्या जय घोषात पावले टाकत भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या पालखी सोहळ्यातील वारकरी एका रेषेत स्वयंशिस्तीने पुढे पुढे येताना लाटांमागून लाटा आल्याचा भास होत होता.

वारकऱ्यांनी आकाशाच्या दिशेने धरलेल्या भगव्या पताका, डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला आणि टाळ मृदुंगाच्या साथीने अभंग म्हणत जाणारे वारकरी पहिले की ब्रह्मानंदी टाळी लागणे म्हणजे काय याची जाणीव होते. 'या संतांचे मानू उपकार, मज निरंतर जागविती,' या तुकारामांच्या अभंगाप्रमाणे वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करताना जणू सरिता सागराच्या ओढीने निघाल्या प्रमाणे भासत होते.

यवत येथे परंपरेप्रमाणे लाख भाकरी व दहा कढया पिठलं तयार करण्यात आले होते. यवत गाव व पंचक्रोशीतील प्रत्येक घरातून आपल्या भाकऱ्या थापून श्री काळभैरवनाथ मंदिरात पोहोचविण्यासाठी दिवसभर महिला वर्गाची वाड्यावस्त्यांवर लगबग चालली होती. अगदी मुस्लिम बांधवसुद्धा पालखी तळावर भाकऱ्या आणून देतात. रोजे सुरू असताना सुद्धा या बांधवांनी आपल्या अनेकवर्षांच्या वारकरी सेवेत खंड पडून दिला नाही. येथील प्रत्येक घरातून पाच भाकऱ्यांपासून एक हजार भाकऱ्या दिल्या जातात. या सेवेसाठी सगळ्या जातीधर्माचे लोक स्वयंस्फूर्तीने सेवा देतात. दुपारी चारच्या सुमारास पालखीने तीन दिवसांच्या प्रवासासाठी दौंड तालुक्याच्या हद्दीत बोरीभडक येथे प्रवेश केला.

या वेळी विद्यमान आमदार अॅड. राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार उत्तम दिघे, गट विकास अधिकारी संतोष हराळे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटकांसाठी शनिवारी ‘एक दिवसाची वारी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वेगवेगळ्या राज्यातून तसेच परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्राची परंपरा असलेली वारी अनुभवण्याची संधी मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने 'एक दिवसाची वारी' हा उपक्रम आयोजित केला आहे. येत्या १८ जुलैला होणाऱ्या या कार्यक्रमात पर्यटकांना लोणंद ते तरडगाव या मार्गावर वारीमध्ये सहभागी होण्याची तसेच रिंगण बघण्याची संधी मिळणार आहे.

पर्यटकांना आपल्याकडील पालखी सोहळा आणि वारीबद्दल खूप कुतूहल आहे. या वर्षी त्यांना प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होऊन ते भक्तिमय वातावरण, विठूनामाच्या गजरामध्ये रममाण झालेल्या वारकऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही वारी हा एक दिवसाचा उपक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती महामंडळाच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक वैशाली चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या शनिवारी सकाळी पुण्यातून आमची बस निघणार असून शिरवळ मार्गे ती थेट लोणंदला जाणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी २६१२६८६७, २६१२८१६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माउलींची पालखी आज जेजुरीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सासवड

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिवे घाटाचा अवघड आणि वारीतील खडतर टप्पा चढून आला अन झेंडेवाडी- काळेवाडी-दिवे -पवारवाडी या मार्गावरील स्वागत स्वीकारून रात्री पावणेनऊला सासवड मुक्कामी विसावला. ३२ किलोमीटर अंतर आणि दिवे घाटाची अवघड वाट चढून आलेले वारकरी उपवास असल्याने थकून गेले होते. त्यामुळे पालखी तळावरील समाज आरती व कीर्तन झाल्यानंतर फराळ करून आपल्या दिंडीत - राहुट्यांत भजन - कीर्तनात दंग होऊन अनेकांनी विश्रांती घेणेच पसंत केले.

सोमवारचा सासवड येथील आठवडे बाजार रद्द झाल्याने शहरात चौकाचौकांत जेवणावळी ठेवण्यात आल्या होत्या. तसेच सकाळी उपवास सोडण्यासाठी नोंदणीकृत दिंड्यामध्ये मिष्टान्न जेवणाचे बेत आखण्यात आलेले होते. त्यासाठी स्वयंपाकाची लगबग सुरू होती. दिवसभर कीर्तन भजन आणि व्याख्याने आणि स्वयंसेवी संस्थांच्या विविध उपक्रमांनी गजबजून गेला.

पोलिसांच्या आडमुठेपणा!

पुण्यातून हा सोहळा सासवडकडे मार्गस्थ होत असताना नवख्या पोलिस अधिकारी आणि महिला पोलिसांनी काही दिंड्या आणि त्यांचे साहित्य असलेले ट्रक अडवून ठेवले. त्यामुळे दिवसभर या लोकांना उपाशी राहावे लागले. हे ट्रक सासवडला येण्यास ३ ते ४ तास उशीर झाला. तसेच दिवे घाटात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाल्याचे संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी 'मटा' शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तुकोबांच्या पालखीला हाय टेन्शन वायरचा धोका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

बारामती-पाटस मार्गावरील रोटी गावात उच्च क्षमतेच्या विद्युत वाहिन्या कमी उंचीवर असल्याने जाता येता नागरिकांना विजेचा सौम्य धक्का बसत असल्याच्या तक्रारी होत आहेत. याच रस्त्यावरून १५ जुलैला तुकोबांची पालखी जाणार असल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.

रोटी गावा जवळ हाय टेन्शन वायरचे जमिनीपासूनचे अंतर कमी आहे. त्यामुळे त्या वायरच्या खालून जाताना वारकऱ्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबतक त्वरित पावले उचलून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रोटी गावातून कमी उंची असणारी वाहिनी ७६५ केव्हीची असल्याचे प्रशासनाला सांगितले आहे. मात्र, याबाबत काही तांत्रिक त्रुटी आहेत. त्या लवकरात लवकर सुधारण्यात येतील. १४ तारखेपासून पालखी जाईपर्यंत या वाहिनीचा विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार आहे.

- आर. आर. यादव, मुख्य अभियंता, महापारेषण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकोबांची पालखी गुरुवारी बारामतीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी बारामती नगरी सज्ज झाली आहे. बारामती नगरपालिका व प्रशासन याच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. संत तुकाराम महाराज पालखीचे गुरुवारी (१५ जुलै) दुपारी चार वाजता शहरात आगमन होणार आहे. या सोहळ्याचे बारामती शहराचे प्रथम नागरिक म्हणून बारामतीचे नगराध्यक्ष सुभाष सोमाणी स्वागत करणार आहे. पालखीच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे.

'पालखीच्या स्वागतासाठी सरकारचे सर्व विभाग आपापल्या परीने व नियोजनबद्ध काम करणार आहेत,' असे उपविभागीय अधिकारी संतोष जाधव यांनी मटाला सांगितले. त्यासाठी पाटस टोल नाक्याजवळ स्वागतकक्ष उभारण्यात आला आहे. सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी लाखो भाविक पालखी मार्गावर चालत आहेत.

मोफत वैद्यकीय सुविधा

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानापासून वाखरीपर्यंत अग्निशामक वाहन व कर्मचाऱ्यांची सोय करण्यात आली आहे. शहरामध्ये पालखी मार्गावर ठिकठिकाणी वैद्यकीय पथकासह रुग्णवाहिकेची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पालखी सोहळ्याच्या कालावधीत वारकऱ्यांना २४ तास मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे. पालखी मार्ग, विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशी स्वच्छता ठेवण्याची दक्षताही प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. जंतुनाशक फवारणी, फिरते स्वच्छतागृह आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी आगमन व मुक्कामाच्या कालावधीत पुरेशी सुरक्षाविषयक खबरदारी घेतली जाणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. विसाव्याच्या ठिकाणी समन्वय कक्ष उभारण्यात आले आहेत. त्याशिवाय एसआरपी जवानांचे पथक, डॉग स्क्वॉड, बॉम्बशोध पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे.

- राजेंद्र मोरे, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोपानदेवांच्या पालखीचे प्रस्थान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सासवड

'माझ्या वडिलांची मिरासी गा देवा! तुझी चरणसेवा पांडुरंगा !' या अभंगाच्या तालावर 'माउली, माउली, ज्ञानोबा माउली-तुकाराम,' असा नामाचा जयघोष करीत टाळमृदंगाच्या तालावर ठेका धरून सोपानदेवांच्या पालखीने सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान केले.

सोपानदेवांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी रविवारी दुपारपासून सासवडला गर्दी केली होती. भाविकांनी रांगा लावून पालखीचे दर्शन घेतले. सोमवारी प्रस्थान सोहळा असल्याने पहाटे समाधी मंदिरात काकड आरती करून सकाळी सहा वाजता सोपानदेवांची महापूजा करण्यात आली. देवस्थानचे मुख्य विश्वस्त गोपाळ गोसावी आणि सोहळा प्रमुख श्रीकांत गोसावी यांच्या कुटुंबीयांमधील पाच सुवासिनींनी पादुकांची विधिवत पूजा करून औक्षण केले. ज्ञानेश्वर केंजळे यांनी देवघरातून पादुका आणल्या. त्यानंतर समाधी मंडपात कीर्तन झाले. सोपानदेवांची पालखी आकर्षक फुलांनी सजविण्यात आली होती. परंपरेनुसार ठरलेले भजन आणि अभंग सकाळी अकराला झाले आणि सोपानदेवांच्या पालखीप्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली.

नामदेव महाराज यांचे वंशज ह. भ. प. केशव नामदास यांनी समाधी वर्णनाचे सुश्राव्य कीर्तन करून भाविकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर देवस्थानतर्फे सर्व दिंडीप्रमुख आणि विणेकरी यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बांधकाम व्यावसायिक विठ्ठल सदाशिव झेंडे यांनी पालखीचे चोपदार हरीश शिंदे यांना चांदीचा राजदंड, सोहळ्याच्या अश्वाला चांदीचे बाशिंग, चोपदार बिल्ला भेट दिला. नगराध्यक्षा आनंदी जगताप, उपनगराध्यक्ष सुहास लांडगे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी पालिकेच्या वतीने तर संजय जगताप यांनी संत सोपानकाका सहकारी बँकेच्या वतीने सोहळ्यातील दिंडीप्रमुख व सेवेकऱ्यांचा श्रीफळ, शाल व पुष्पहार देऊन सत्कार केला. त्यानंतर पालखी मार्गस्थ झाली. जेजुरी नाका येथे दर्शनासाठी १० मिनिटे विसावण्यात आला. सायंकाळी निष्णाई देवी मंदिर पांगारे येथे पहिला मुक्काम आहे. माउलींची पालखी सासवड मुक्कामी असल्याने वारकऱ्यांची मोठी गर्दी सासवडमध्ये झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विद्यापीठातही ‘डिजिटल’धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

देशभर 'डिजिटल इंडिया'चा नारा दिला जात असतानाच विविध रोगांचे निदान करण्याचे धडे देणाऱ्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने देखील आता त्यात उडी घेतली आहे. डॉक्टरांसह इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना 'डिजिटल इंडिया'चे धडे देणारा अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू केला आहे.

'देशात डिजिटल इंडिया उपक्रम राबविण्याचा सरकारचा उद्देश आहे. वैद्यकीय क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेल्या मनुष्यबळाची भविष्यात गरज भासणार आहे. त्या करिता वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. प्रत्येकी एक वर्षाचे असे तीन अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहेत. आरोग्य माहिती तंत्रज्ञान, क्लिनिकल इंजिनीअरिंग तसेच इमेजिंग टेक्नॉलॉजिंग या विषयाच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांचा समावेश आहे,' अशी माहिती डॉ. राजीव जोशी यांनी दिली.

वैद्यक क्षेत्रात संगणकाचा केला जाणारा वापर, माहितीचे संकलन तसेच पृथ्थकरणासाठी त्याचा फायदा होणार आहे. त्याशिवाय क्लिनिकल इंजिनीअरिंगमध्ये इसीजी, स्ट्रेस टेस्ट, इलेक्ट्रिक साहित्य, रोबो या तंत्रज्ञानांचा निदान व उपचारात फायदा होतो. शिवाय इमेजिंग टेक्नॉलॉजिंगमध्ये सोनोग्राफी, एक्स रे, सीटी स्कॅन, एमआरआय अशा विविध रोगनिदान तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी इमेजिंग टेक्नॉलॉजीविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

आरोग्य विषयी माहिती देणारे मनुष्यबळ या अभ्यासक्रमातून तयार होतील. एमबीबीएस, बीएचएमएस, बीएएमएस बरोबर अन्य वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर व पदव्युत्तर पदविका घेतलेल्यांना हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. अभियांत्रिंकीसह वैद्यकतज्ज्ञांना प्रवेश घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी आरोग्य विद्यापीठाच्या वेबसाइटवर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश निश्चित झालेल्या बालकांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाईचा इशारा राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सोमवारी दिला. अशा शाळांची माहिती कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असेही संचालनालयाने स्पष्ट केले.

मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानुसार राज्यात २९ एप्रिलपूर्वी या कायद्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीने सुरू होती, त्याच पद्धतीने ती सुरू ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. २९ एप्रिलपूर्वी राज्यात २१ जानेवारीच्या सरकारी आदेशानुसार या कायद्याची अंमलबजावणी सुरू होती. त्यामुळे त्याच सरकारी आदेशाचा विचार करून प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू केल्याचे राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयातून सांगण्यात आले.

शिक्षण हक्क कायद्याबाबत कोर्टात केस दाखल होण्यापूर्वी शहरात सुरू असलेल्या २५ टक्क्यांच्या ऑनलाइन प्रक्रियेमधील जवळपास आठ हजारांवर विद्यार्थी अद्याप प्रवेशाविनाच आहेत. त्यामध्ये पहिलीला प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या ४ हजारांवर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना येत्या काही दिवसांमध्ये ऑनलाइन सिस्टीमच्या माध्यमातून निश्चित प्रवेश दिले जातील. त्या विषयी विद्यार्थ्यांच्या पालकांनी नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकांवरूनही माहिती दिली जाणार असल्याचे संचालनालयातून सांगण्यात आले.

'२५ टक्क्यांचे प्रवेश त्वरित द्या'

आरटीईविषयीच्या खटल्यावर सुनावणी झाल्यानंतरही शिक्षण खात्याने २५ टक्क्यांच्या प्रवेशांबाबत कोणतीही हालचाल न केल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सोमवारी खात्यातील अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवला. तसेच, २५ टक्क्यांच्या प्रक्रियेत समाविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रक्रियेतून त्वरित प्रवेश मिळवून देण्याची मागणीही केली. प्रक्रियेत सहभागी शेवटच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळेपर्यंत संघटना पाठपुरावा करणार आहे. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासही मागेपुढे पाहणार नसल्याचे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अजय शिंदे यांनी सोमवारी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images