Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘तटस्थपणे केलेल्या अभ्यासाचा सन्मान’

$
0
0

पुणेः 'विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे ही घटना आनंददायीच आहे. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचार व साहित्याचा तर्कशुद्धपणे व तटस्थपणे केलेल्या अभ्यासाचा हा सन्मान आहे,' अशी भावना नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. शेषराव मोरे यांनी व्यक्त केली.

अंदमान येथे विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. देशासाठी मोठा त्याग केलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांत विश्व मराठी साहित्य संमेलन अंदमान येथे आयोजित होत असल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.

'सावरकरांचे विचार आज देशाला आवश्यक आहेत. त्यांनी धर्मनिरपेक्ष, अंधश्रद्धा विरोधी, भाषा शुद्धी, सामाजिक विकास आदी विषयांवर मौलिक विचार मांडले आहेत. मात्र, सावरकर समाजाला कळलेच नाहीत. त्यांचे विचार कालबाह्य झालेले नाहीत,' असेही मोरे यांनी सांगितले. कविवर्य ना. धों. महानोर यांनी राज्यात दुष्काळ असल्याने संमेलनाध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचे महामंडळाला सांगितले होते. त्याबाबत मोरे म्हणाले, 'जीवनात दुःखाची नेहमीच कारणे असतात. मग, आनंद साजरा करायचाच नाही का? दुःखी असतानाही वारकरी पंढरीची वारी करतातच. त्यामुळे दुष्काळाचे दुःख विसरण्यासाठी अंदमानच्या संमेलनात सहभागी व्हायचे. अंदमान ही साहित्याची पंढरीच आहे.'

'रुढार्थाने मी साहित्यिक नाही'

'संमेलनाध्यक्षपदासाठी माझे नाव पुढे आल्यावर महामंडळाला मी रुढार्थाने साहित्यिक नसल्याचे कळवले होते. आजपर्यंत मी कथा, कविता, कादंबरी, ललित लेख असे साहित्य लिहिलेले नाही. मात्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, कायदा हे साहित्याचे विषय नाहीत का, की कथा, कविता, कादंबरी हेच साहित्य आहे?,' असा सवाल विश्व मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. शेषराव मोरे यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नदीसुधार’साठी सल्लागार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नदीपात्रातील अस्वच्छता, पात्राच्या आसपास साठणारा कचरा-राडारोडा, नदीतील पाण्याची दुर्गंधी, अशा समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधून शहरातील नद्यांमध्ये सुधारणा घडविण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत; तसेच, वेळप्रसंगी स्वतंत्र कंपनीच्या माध्यमातून नदीसुधारणा प्रत्यक्षात आणण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.

पुण्यातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत सल्लागार नियुक्तीसाठी सहमती दर्शविण्यात आली. महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालय, पिंपरी-चिंचवड महापालिका, पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. नदीच्या संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाशी चर्चा करण्याची तयारी दर्शविण्यात आली असून, सर्वानुमते तयार झालेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल-एसपीव्ही) स्थापन करण्याचा विचार मांडण्यात आला.

नदी सुधारणेच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यास सहमती दर्शविण्यात आली. सल्लागारामार्फत स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था; तसेच सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधून सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला जाऊ शकतो, असे सुचविण्यात आले. नदी सुधारणेचा हा प्रकल्प वेळेत मार्गी लागल्यास त्याद्वारे पर्यटनाला चालना मिळू शकते, अशी अपेक्षा वर्तविण्यात आली.

महापौरांसह पालिका आयुक्त कुणाल कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला, मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सतीश कुलकर्णी, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे जे. एस. साळुंके, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपअभियंता संजय कुलकर्णी आणि खडकी कॅन्टोन्मेंटचे सुहास संत उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तरंगी वनस्पती संपूर्ण औषधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मधुमेहावर औषध म्हणून वापरल्या जाणाऱ्या सप्तरंगीच्या मुळांबरोबरच खोड आणि पाना-फुलांतही औषधी गुणधर्म सापडले आहेत. त्यामुळे शेतीच्या बांधावर, फार्महाउसच्या मोकळ्या जागांवर शेतकऱ्यांना सप्तरंगी या वनस्पतीची शेती करता येणार आहे. सप्तरंगीवर सुरू असलेल्या संशोधनातून ही माहिती पुढे आली आहे. पुणे परिसरातील काही रोपवाटिकांमध्ये सप्तरंगीची रोपे तयार करण्यात अभ्यासकांना यश आले आहे.

आबासाहेब गरवारे कॉलेजच्या जैवविविधता विभागाचे प्रमुख डॉ. अंकुर पटवर्धन, मकरंद पिंपुटकर आणि राधिका जोशी यांनी पश्चिम घाटातील सप्तरंगी या वनस्पतीवरील संशोधन नुकतेच पूर्ण केले आहे. 'बायोडायव्हर्सिटी बायोस्पेक्टिंग अँड डेव्हलपमेंट' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. सप्तरंगी वनस्पतीतील मधुमेहावर नियंत्रण ठेवणारी गुणसूत्रे आणि गुणधर्म हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.

'सप्तरंगी ही वनस्पती दुर्मिळ असून, ती पश्चिम घाटातच आढळून येते. झुडूप वर्गातील या औषधी वनस्पतीच्या मुळांमध्ये मधुमेहावर नियंत्रण ठेवणारे गुणधर्म आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक, आदिवासी सप्तरंगी तोडून तिच्या मुळांचा काढा करून पितात. आतापर्यंत तिचा व्यावसायिक वापर होत नव्हता; मात्र अलीकडील वर्षांत काही कंपन्यांनी औषधांमध्ये तिचा वापर सुरू केला आहे. पर्यायाने वेगवेगळ्या स्तरांतून सप्तरंगी मोठ्या प्रमाणात तोडली जात आहे,' अशी माहिती पिंपुटकर यांनी दिली.

'यापुढील काळात तिची मागणी वाढत जाणार असल्याने आतापासूनच तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. या धर्तीवर संशोधनामध्ये आम्ही सप्तरंगीचे खोड, पाने, बिया आणि फळांचा अभ्यास केला. विशेष म्हणजे मुळांमध्ये आढळणारे सर्व गुणधर्म खोडातही आढळून आले आहेत. त्यामुळे आता झाड न तोडता ते छाटून खोडाचा वापर करता येणार आहे. काही दिवसांनी परत त्याला फांद्या येतील. पानांमध्ये आणि बियांमध्येही गुणधर्म आहेत; पण प्रमाण कमी आहे. या संशोधनामुळे सप्तरंगीची कत्तल थांबण्याबरोबरच शेतकऱ्यांना एक उत्पन्नाचे नवीन साधन मिळाले आहे,' असे पिंपुटकर यांनी सांगितले.

शाश्वत शेती या संकल्पनेअंतर्गत शेताच्या बांधावर लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना सप्तरंगी वनस्पती हा एक चांगला पर्याय आहे. पुणे परिसरातील भोर, वेल्हा, सासवड, नीरा, मावळ या भागात आम्ही सप्तरंगीची लागवड केली असून, रोपे वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- मकरंद पिंपुटकर, जैवविविधता विभाग, गरवारे कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाउनशिपना सवलत

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे

राज्यातील अगोदरच्या आघाडी सरकारने स्पेशल टाउनशिपना अतिरिक्त चटईक्षेत्राची खिरापत वाटण्याचा खटाटोप केला असताना आता सत्तारूढ भाजप-शिवसेना युती सरकारने टाउनशिपना विकास शुल्कातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील मंजूर प्रादेशिक विकास आराखड्यामधील स्पेशल टाउनशिपच्या उभारणीसाठी आता पन्नास टक्केच विकास शुल्क आकारणी केली जाणार आहे.

आघाडी सरकारच्या बिल्डरधार्जिण्या धोरणांविरोधात ओरड करणाऱ्या आताच्या सत्तारूढ पक्षानेही त्यांच्याच कारभाराची री ओढली आहे. टाउनशिपना प्राधान्य देण्याच्या नावाखाली खासगी बिल्डरांना विकास शुल्कातून सूट देऊन त्यांचे खिसे भरण्यात आले आहेत.

'शेती व ना विकास' विभागामध्ये औद्योगिक वापराच्या इमारती, शैक्षणिक संस्था, तसेच खासगी हॉस्पिटलना वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) नुकताच मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी बिगरशेती दराच्या जमिनीच्या ३० टक्के अधिमूल्य आकारून राज्याच्या तिजोरीत महसुलाची भर टाकली जात आहे. एकीकडे महसूल वाढवून तिजोरी फुगवण्याचे प्रयत्न केले जात असताना, दुसरीकडे टाउनशिपना मात्र विकास शुल्कातून सवलत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६मधील कलम १२४ (फ)च्या उपकलम तीननुसार विकास शुल्कातून सूट देण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. नगरपालिका व महापालिका क्षेत्रातील स्पेशल टाउनशिपला यापूर्वी आघाडी सरकारकडून अशी सूट देण्यात आली आहे. त्याचाच आधार घेत नव्या सरकारने मंजूर प्रादेशिक आराखड्यातील (आरपी) टाउनशिपवर ही खैरात केली आहे.

महापालिकांच्या हद्दीत शंभर एकराच्या टाउनशिपसाठी जमीन उरलेली नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये महापालिका क्षेत्राबाहेरील प्रादेशिक आराखडा मंजूर असलेल्या क्षेत्रात टाउनशिप उभारणीला गती मिळाली आहे. टाउनशिप विकसनाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडे विकास शुल्क (डेव्हलपमेंट चार्ज) भरावे लागते. मंजूर प्रादेशिक आराखड्याच्या क्षेत्रात आता टाउनशिप विकसन व सुधारित प्लॅन दाखल झाल्यानंतर त्यासाठी शंभर टक्के विकास शुल्क न आकारता ५० टक्केच शुल्क आकारले जाणार आहे. त्यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

२५ हेक्टरवरच्या भूखंडावर टाउनशिप अपेक्षित

'शेती ना विकास' व 'सार्वजनिक-निमसार्वजनिक' झोनमधील जमीन 'रहिवास' झोनमध्ये बदलण्याच्या प्रक्रियेत २५ हेक्टरवरील भूखंडावर टाउनशिप उभारण्यास राज्य सरकारकडून प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे १० ते २५ हेक्टरपर्यंतच्या भूखंडांच्या झोन बदलापर्यंतच विभागीय आयुक्त स्तरावरील समितीचे अधिकार सीमित करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडसे यांनी खोडले अमित शहांचे वक्तव्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना युती करूनच लढवली जाईल, असे राज्याचे कृषिमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पुण्यात स्पष्ट केले. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईत पालिका निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर खडसे यांचे वक्तव्य पक्षनेतृत्वाच्या भूमिकेलाच थेट आव्हान देणारे ठरते आहे.

मुंबई महापालिका निवडणूक युतीतर्फे लढविली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितले आहे, असे नमूद करून खडसे यांनी या वादात मुख्यमंत्र्यांनादेखील खेचले. 'कोणत्याही पक्षाला स्वत:चे बळ आजमावून पाहावेसे वाटते. त्यामध्ये काहीही गैर नाही,' असे सांगत शाह यांच्या वक्तव्याचे खडसे यांनी समर्थन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृषी तंत्रज्ञान’ मराठीतूनही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन कृषी तंत्रज्ञान हा तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम दोन वर्षांचा करण्याचे ४५ संस्थांचे प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत. त्यामुळे या संस्थांमध्ये आता संबंधित विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण घेता येणार आहे. तसेच, हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर थेट बीएस्सी अॅग्रीकल्चरच्या द्वितीय वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी सांगितले.

महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची ९१ वी बैठक पुण्यात झाली. परिषदेला कृषी आयुक्त विकास देशमुख, उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, शिक्षण विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत काकडे आणि प्रशासन विभागाच्या सहसंचालक शुभांगी माने आदी उपस्थित होते.

शेतकी शाळांमध्ये दोन वर्षांचा शेती पदविका आणि कृषी तंत्रनिकेतनमध्ये तीन वर्षांचा कृषी तंत्रज्ञान हा पदविका अभ्यासक्रम आहे. दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम मराठी माध्यमातून शिकविण्यात येतो. मात्र, तीन वर्षांचा अभ्यासक्रम सेमी इंग्रजी माध्यमातून शिकविला जातो. तीन वर्षांचे अभ्यासक्रम दोन वर्षांचे करून ते मराठी माध्यमातून शिकविण्याचे ४५ संस्थांचे प्रस्ताव मान्य झाल्याचे खडसे यांनी सांगितले.

सेंद्रिय भाजीपाला उत्पादनावर भविष्यात भर देण्यात येणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जमिनीवर ढोबळी आणि लसूण यांसारखी पिके घेण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुबार पेरणीसाठी अनुदान

पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. येत्या आठ दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. मात्र, किती ठिकाणी दुबार पेरणी करावी लागेल, याचा अंदाज घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तीन कृषी महाविद्यालये

गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम येथे तीन नवीन कृषी महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विनाअनुदानित तत्त्वावर ही महाविद्यालये असणार आहेत. कृषी महाविद्यालयांचा पुढील २५ वर्षांचा बृहत आराखडा तयार करण्याच्या सूचना महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला दिल्या असल्याचे खडसे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजियन्सना विशेष पास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील कॉलेजवयीन युवकांमधील टू-व्हीलर क्रेझ कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पुढाकार घेतला आहे. पेट्रोलवर महिन्याला हजारो रुपये खर्च करण्याऐवजी शहरात कोठेही आणि कितीही वेळा प्रवास करण्याची मुभा विशेष पासच्या माध्यमातून 'पीएमपी'तर्फे कॉलेजियन्ससाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कॉलेजमधील युवक-युवतींसाठी सुरू केल्या जाणाऱ्या विशेष पास योजनेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, या हेतूने शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल अडीचशे कॉलेजांना 'पीएमपी'तर्फे पत्र पाठवण्यात आले आहे. तसेच, या योजनेची माहिती देण्यासाठी आणि पासच्या वितरणासाठीही 'पीएमपी'चे अधिकारी कॉलेजमध्ये येण्यास तयार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अकरावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणारे कॉलेजमधील सर्व विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील, अशी माहिती 'पीएमपी'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी 'मटा'ला दिली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मोफत पासची सुविधा उपलब्ध आहे. कॉलेजमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी मात्र बसऐवजी खासगी दुचाकीला प्राधान्य देतात. त्यातून, शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, प्रदूषणाच्या पातळीतही वाढ झाली आहे. त्यासाठी, पेट्रोलवरही बराच खर्च केला जातो. या सर्व गोष्टींत बचत करण्यासह सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कॉलेज युवक-युवतींसाठी ही योजना सुरू केली गेली आहे. त्याच, कॉलेजियन्सचा सहभाग वाढवण्यासाठी सर्व कॉलेजांपर्यंत योजनेची सविस्तर माहिती पोहोचवण्यात आली आहे. तसेच, विद्यार्थ्यांना समक्ष माहिती देण्यासाठी 'पीएमपी'चे अधिकारी कॉलेजमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली जाईल, असे संकेत कृष्णा यांनी दिले.

अशी असेल योजना

कॉलेज विद्यार्थ्यांच्या विशेष पास योजनेत मासिक सहाशे, तर त्रैमासिक अठराशे रुपयांत पास उपलब्ध होऊ शकणार आहे. या पासवर प्रवास किंवा वेळेचे कोणतेही बंधन नसून, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोठेही आणि कितीही वेळा प्रवास करण्याची मुभा विद्यार्थ्यांना असेल. पालिकेच्या हद्दीबाहेरील विद्यार्थ्यांनाही पासची सुविधा देण्यात येणार असून, त्यांच्याकडून मासिक पाससाठी ७५०, तर त्रैमासिक पाससाठी २२५० रुपये आकारण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बालभारती’च्या सूचना @ मोबाइलवर!

$
0
0

योगेश बोराटे, पुणे

'बालभारती'च्या पाठ्यपुस्तकांमधील धडे- कवितांना मोबाइल तंत्रज्ञानाची जोड देत रणजितसिंह डिसले या प्राथमिक शिक्षकाने पालकांसाठी 'ट्युटर मॉडेल' विकसित केले आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये चिकटवलेल्या क्यूआर कोडच्या आधारे विकसित या ट्युटरच्या माध्यमातून कवितांच्या चाली, धड्यांवरचा स्वाध्याय, अभ्यास करण्यासाठीच्या सूचना आदी बाबी थेट मोबाईलवरच उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मुला-मुलींचा अभ्यास घेण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने पालकांच्या हातात आली आहे.

पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सहज सोपे व्हावे आणि मोबाइल फोनच्या प्रभावी वापरातून विद्यार्थी- पालक- शिक्षक हे नाते अधिक चांगल्या पद्धतीने विकसित व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून डिसले यांनी हे तंत्र विकसित केले आहे. डिसले सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक असून, विद्यार्थी आणि पालकांची नेमकी गरज लक्षात घेत हे तंत्र विकसित केल्याचे त्यांनी शुक्रवारी 'मटा'ला सांगितले.

'शाळेतून घरी आलेल्या आपल्या पाल्याचा अभ्यास पालकांना सहजतेने घेता यावा, यासाठी हे तंत्र विकसित केले आहे. त्यासाठी प्रत्येक धड्यासाठी एक विशिष्ट क्यूआर कोड स्टिकर चिकटवला आहे. पालकांनी आपल्या स्मार्टफोनवरून हा कोड स्कॅन केला, की त्या पाठाशी वा कवितेशी संबंधित माहिती त्यांच्या मोबाइलवर उपलब्ध होते. कवितेचा अभ्यास घेण्यासाठी कवितेची चाल, चित्ररूप धडा असल्यास तो धडा आणि त्यातून अपेक्षित असलेला संदेश देणारा व्हिडिओ, कविता आणि धड्यांशी निगडित स्वाध्याय, ऑनलाइन प्रश्नपत्रिका अशी सर्व माहिती या तंत्राद्वारे पालकांना मोबाइलवर उपलब्ध करून दिली जात आहे,' असे डिसले यांनी सांगितले.

सध्या या तंत्राच्या आधारे पहिलीच्या अभ्यासक्रमावर आधारित स्वाध्याय उपलब्ध झाले आहे. तसेच, येत्या काही दिवसात पहिली ते चौथीच्या सर्व विषयांसाठी असे स्वाध्याय उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. धोरणात्मक पातळीवर या तंत्राचा विचार झाल्यास राज्यभरात सर्वत्र विद्यार्थ्यांना हे तंत्र वापरणे शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

'झेडपी'च्या विद्यार्थ्यांना लाभ

मुळात एमए, एमएड असलेल्या आणि तंत्रशिक्षणाची तशी कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या डिसले यांनी हे तंत्र विकसित करण्यासाठी गुगल ड्राइव्ह आणि गुगल फॉर्म वापरून डेटाबेस तयार केला आहे. सध्या परितेवाडी, अकुंभे, वरवडे, वेणेगाव आणि होळे या गावांमधील पाच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी हे तंत्र उपलब्ध करून दिले आहे. या शाळांमधील २४४ विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे तंत्र वापरत आहे. या तंत्राद्वारे आपल्या पाल्याची ऑनलाइन परीक्षा घेणे आणि त्यांचे लगेच मूल्यमापन करणेही शक्य झाल्याने पालकांकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे डिसले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुणेकरांनी केले भाविकांचे आदरातिथ्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या जयघोषात तल्लीन झालेले हजारो वारकरी पुणे मुक्कामी आले आहेत. निरपेक्ष वृत्तीने सहभागी होणारे वारकरी म्हणजे सामाजिक समरसता आणि अध्यात्माचे जणू समीकरणच.. मग त्यांची सेवा-शुश्रुषा करण्यात पुणेकर मागे कसे राहतील... वारकऱ्यांचे आदरातिथ्य़ करण्यासाठी शहर आणि परिसरातील संस्था-संघटनांनी शनिवारी दिवसभर विविध उपक्रम राबविले. वारकऱ्यांची वैद्यकीय सेवा, चहा, नाश्ता, जेवण, पावसाळी साहित्य, खाऊ आदींचे मोफत वाटप करण्यात आले. या संस्थांच्या उपक्रमांचा घेतलेला हा वेध...

मोफत आरोग्य तपासणी

तिवारी मित्र परिवारातर्फे वारकऱ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी आणि औषधांचे वाटप करण्यात आले. उपक्रमाचे यंदा ९ वे वर्ष आहे. या सेवेचा ४१० वारकऱ्यांनी लाभ घेतला. डॉ. अधीर तांदळे, डॉ. सुभाष गुंदेचा, डॉ. ज्योती शाळिग्राम, डॉ. अभिजित बोरा यांनी तपासणी केली. साईनाथ मेडिकलने औषधे उपलब्ध करून दिली.

दिंडीला टाळ भेट

हिमराज प्रतिष्ठानने विद्यावर्धिनी शाळेत मुक्कामाला आलेल्या जय हनुमान प्रासादिक दिंडी मंडळ या दिंडीतील वारकऱ्यांचे आदरातिथ्य केले. शाळेच्या मुख्याध्यापिका शैलजा जगताप यांच्या उपस्थितीत आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम माने यांच्या हस्ते दिंडीप्रमुख एकनाथ म्हस्के यांना दहा टाळ भेट देण्यात आले. राजेश धोत्रे, संजय माने, विक्रांत खिलारे, सुनील राठी आदी संस्थेचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी पालखीपथावर स्वच्छता मोहीम राबवून आणि पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश देत विठ्ठलचरणी अनोखी सेवा रुजू केली. या उपक्रमात आबासाहेब गरवारे कॉलेज, विमलाबाई प्रशाला, मएसो मुलींची शाळा, रेणुकास्वरूप प्रशाला, बालशिक्षण मंदिर इंग्रजी आणि मराठी आदी शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र वंजारवाडकर यांच्या हस्ते उपक्रमाचे उदघाटन झाले. वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणीही विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून पथनाट्य सादर केली. पुढील दोन दिवस विद्यार्थी पालखी मार्गावर स्वच्छता करणार आहेत.

वारकऱ्यांना फळवाटप

भारिप बहुजन महासंघ युवा आघाडीच्यावतीने वारकऱ्यांना फळवाटप करण्यात आले. महासंघाचे युवक शहराध्यक्ष उमेश चव्हाण यांनी विश्रांतवाडीतील मुकुंदराज आंबेकर चौकात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. समर्थ व्यायाम मंडळात रामभाऊ गणपुले यांनी विसाव्याला आलेल्या तीनशे वारकऱ्यांना भोजन दिले.

चहा, अल्पोपहाराची सोय

शिवाजी युवा फाउंडेशन आणि शिवसेना व्हाइट हाऊस शाळेतर्फे वारकऱ्यांसाठी चहा आणि अल्पोपहार आयोजित करण्यात आला होता. राजगड प्रतिष्ठानतर्फे परमेश्वर भोसले महाराज आणि तीनशे वारकऱ्यांसाठी भोजन समारंभ आयोजित केला होता. वारकऱ्यांच्या चप्पल दुरुस्ती करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वाडकर, शिवादी मैद, योगेश धरपाळे, नाना खामकर आदी उपस्थित होते.

भक्तिगीतांचा कार्यक्रम

श्री रोकडोबा देवस्थान आणि सद्गुरू प्रतिष्ठानतर्फे वारकऱ्यांसाठी भक्तिगीतांचा कार्यक्रम, मोफत दूरध्वनी सेवा, शैक्षणिक विषयावरील भारूड आणि आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. अडीचशेहून अधिक वारकऱ्यांची याचा लाभ घेतला. देवस्थानचे अध्यक्ष अविनाश बहिरट (पाटील) यांनी संयोजन केले.

प्रवचन, कीर्तनाचे आयोजन

कस्तुरे चौक तरुण मंडळाने वारकऱ्यांबरोबर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था, तसेच आरोग्य शिबिरही घेण्यात आले. शुक्रवारी संध्याकाळी चंद्रकांत वांजळे यांचे प्रवचन आणि कीर्तनही आयोजित करण्यात आले होते. वारकऱ्यांना अडीच हजार ताट आणि ग्लास वाटण्यात आले. अनिल अगावणे संचालित पुणे महापालिकेच्या सार्वजनिक वाचनालयतार्फे खंडोजी बाबा मंदिर येथील वारकऱ्यांना वृत्तपत्र आणि अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहसी उपक्रमांनी रंगले शस्त्ररिंगण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मैदानाच्या मधोमध असलेली शिवरायांची पालखी...त्याभोवती सादर होणारी चित्तथरारक ढाल तलवार, लाठीकाठी, दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके... ज्ञानोबा तुकाराम, शिवराय तुकाराम, शंभूराय तुकारामाचा गजर करत भोवती रिंगणात उभे असलेले विद्यार्थी आणि नागरिक...अशा भक्ती शक्तीच्या संगमात शनिवारी पुण्यात पहिले शस्त्ररिंगण रंगले.

राज्यातील भक्ती-शक्ती परंपरेला पुन्हा उजाळा देण्यासाठी विविध शिवप्रेमी आणि वारकरी युवकांनी रायगड ते पंढरपूर या श्रीमन्नृपशिवछत्रपती पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा पालखी सोहळा भूगावमार्गे शनिवारी पुण्यात दाखल झाला. यानिमित्ताने पेरूगेट भावे हायस्कूलच्या मैदानावर शस्त्ररिंगणाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या संयोजन समितीतील गणेश माने, नरेंद्र लाड, डॉ. संदीप महिंद आदी या वेळी उपस्थित होते.

मैदानात विद्यार्थी रिंगण करून उभे होते. चिंचवड येथील शिवयोद्धा मर्दानी आखाड्याच्या पथकाने व स्वरूपवर्धिनीच्या पथकाने ढाल तलवार, लाठीकाठीची प्रात्यक्षिके मानवी मनोऱ्यांसह सादर केली. त्यातीलच काहींनी तलवारी सहकाऱ्याच्या हाताखालील टोमॅटो, लिंबू आणि हातातील नारळ फोडण्याचे प्रात्यक्षिकही सादर केले. पालखीतील धारकऱ्यांच्या दांडपट्टा आणि जोर बैठकांच्या प्रात्यक्षिकांनंतर रिंगणाची सांगता झाली. रिंगणानंतर पालखी घोरपडी येथील मुक्कामी रवाना झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वारकऱ्यांनी द्यावा पर्यावरणाचा संदेश’

$
0
0

पुणे : निसर्ग आणि पर्यावरणाचे नाते वैश्विक आहे. पर्यावरणरक्षणाचा संदेश वारीत सहभागी वारकऱ्यांनी राज्यभर पोहोचवावा, असे आवाहन पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांनी शनिवारी केले.

राज्याचा पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित 'पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' कार्यक्रमात श्रीमती शंकर बोलत होत्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव पी. एन. अन्बल्गन, महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशंवत पाठक, पर्यावरणाचे अभ्यासक प्रा. एन. एच. देसरडा, ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे आदी उपस्थित होते.

'समाजप्रबोधन आणि अध्यात्मिक प्रबोधनाद्वारे पर्यावरण संतुलित जीवनाचा संदेश राज्यातील लाखो वारकरी पंढरीच्या वारीत देत आहेत. या वारीद्वारे पर्यावरण विभाग आधिक लेाकाभिमुख होत आहे,' असे शंकर म्हणाल्या. पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वदूर पोहोचविण्यात पर्यावरणाची वारी महत्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास अनबल्गन यांनी व्यक्त केला. कुणाल कुमार यांनी महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्तिरंगी रंगले पुणेकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मध्यवर्ती पुण्याच्या वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये विखुरलेल्या दिंड्या... वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्वयंसेवी संस्थांनी ठिकठिकाणी मांडलेले स्टॉल्स अन् सतत कानावर पडणारी भक्तिगीते आणि टाळ-चिपळीचा गजरामुळे शनिवारी दिवसभर शहरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.

विठूनामाचा गजर करीत मुक्कामासाठी आलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी विसाव्याचे क्षण अनुभवले असले, तरी विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेल्या वारकऱ्यांना क्षणाचीही उसंत नव्हती. रात्री उशिरापर्यंत भजन-कीर्तनाचे कार्यक्रम रंगल्यानंतरही पहाटे उठून पुन्हा विठ्ठलाच्या गजरातमध्ये ते तल्लीन झाले होते.

पंढरपूरच्या प्रवासाला निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांचे शुक्रवारी शहरात जल्लोषात स्वागत झाले. दुपारपासूनच पुणेकरांनी पालखी मार्गावर स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. संध्याकाळी पालखी दाखल झाल्यानंतर दिंड्यामधील वारकऱ्यांसाठी अनेक संस्थांनी राहण्याची, जेवणाची सोय केली होती. मध्यवर्ती पुण्यासह शहराच्या वेगवेगळ्या भागात या दिंड्या विसावल्या. शहरातील नामांकित कीर्तनकारांनी वारकऱ्यांसाठी रात्री भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले असल्याने रात्री जेवण आटोपल्यानंतर ठिकठिकाणी भजन-कीर्तनाच्या मैफली रंगल्या.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत आणि शनिवारी पहाटेपासूनच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी तसेच पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आबालवदृद्ध पुणेकरांनी पालखी विठोबा मंदिर आणि निवडुंगा विठ्ठल मंदिर येथे गर्दी केली होती. शनिवार अनेकांचा सुटीचा दिवस असल्याने अनेक जण कुटुंबीयांसमवेतच दर्शनासाठी आले होते. पोलिस व दोन्ही मंदिराच्या व्यवस्थापनाने चांगली व्यवस्था ठेवली होती.

आज (रविवार) विठू नामाचा जप करत दाखल झालेला लाखो वैष्णवांचा महामेळा रविवारी पुण्यनगरीचा निरोप घेऊन पंढरीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. सकाळी सहा वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि सात वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान करणार आहे. पालखी विठोबा मंदिरातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर वानवडी येथील शिंदे छत्री येथे आरती होईल. सकाळचा विसावा हडपसर येथे, तर दुपार नैवेद्य उरुळी कांचन, वडकीनाला येथे होईल आणि झेंडेवाडी येथे विसावा घेतला जाणार आहे. त्यानंतर दिवे घाटमार्गे पालखी सायंकाळपर्यंत पालखी सासवड मुक्कामी पोहोचेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय साहित्यासाठी जुलैअखेरचा मुहूर्त

$
0
0

पुणे : शिक्षण मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना येत्या महिनाअखेरपर्यंत शालेय साहित्याचे आणि गणवेशाचे वाटप केले जाईल, अशी ग्वाही देण्यात आली. शाळा सुरू होऊन एक महिना होत आला, तरीदेखील शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले नसल्याने विविध पक्षांकडून टीका होत आहे. तसेच, खरेदीच्या प्रक्रियेला विलंब का झाला, अशी विचारणाही होत आहे. लाच प्रकरणात अटक झालेल्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या मंडळातील प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे, अध्यक्षांच्या अनुपस्थितीत झालेल्या सभेत अनेक सदस्यांनी विद्यार्थ्यांना अद्याप शालेय साहित्य का मिळाले नाही, याचा जाब विचारला. तसेच, किती विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप झाले आणि उर्वरित विद्यार्थ्यांना कधी साहित्य मिळणार, या बाबत विचारणा केली. त्यावेळी, खरेदीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती देण्यात आली. आतापर्यंत एक लाख ६० हजार वह्यांचे वाटप पूर्ण झाले असून, ८० हजार गणवेशांचे वाटपही अंतिम टप्प्यात असल्याचा दावा शिक्षण मंडळ प्रशासनाने केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थे'च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्याच्या निषेधार्थ संस्थेच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या संपाला एक महिना पूर्ण झाला आहे. अजूनही या समस्येवर तोडगा न निघाल्याने मंडळाने घेतलेला कोणताही निर्णय मान्य करणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.

केंद्र सरकारने नेमलेल्या नियामक मंडळाला तात्पुरती स्थगिती द्यावी, त्याचबरोबर तज्ज्ञांच्या समितीमार्फत नियामक मंडळाच्या नियुक्तीसाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात यावीत, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून ही प्रक्रिया सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मंडळाने घेतलेला कोणताही निर्णय मान्य करणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. चौहान यांच्यासोबतच अनघा घैसास, डॉ. नरेंद्र पाठक, राहुल सोलापूरकर, शैलेश गुप्ता यांच्या नियुक्तीलाही आमचा आक्षेप असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान,' एफटीआयआय'च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांना हटविण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खासदार रामदास आठवले यांनी केली आहे. या बाबत मंत्र्यांची भेट घेऊ, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच पक्षाच्या चित्रपट विभागातर्फे राखी सावंत, सलमा आगा, हेमंत बिर्जे याबाबत आंदोलन करतील, असेही आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिमला ऑफिस ते सीओईपीपर्यंत रस्ताबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संचेती पुलालगत रेल्वेच्या नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे १३ ते १७ जुलैदरम्यान दुपारच्या वेळेत लोकल सेवा बंद राहणार आहे. तसेच, सिमला ऑफिस ते इंजिनीअरींग कॉलेजपर्यंतच्या रस्ते वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. पुणे-लोणावळा लोकल खडकीपर्यंतच धावणार आहे.

संचेती हॉस्पिटलजवळ रेल्वे उड्डाणपुलाचे गर्डर्स टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे सिमला ऑफिस चौकातून संचेती चौकामार्गे पुणे-मुंबई रस्ता व इंजिनीअरींग कॉलेजकडे जाणारी वाहतूक पाच दिवस दुपारी १२ ते सायंकाळी चार या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली. या कामामुळे सकाळी साडेअकरा वाजता लोणावळ्याहून सुटणारी लोणावळा-पुणे लोकल खडकी रेल्वे स्टेशनपर्यंत धावणार आहे. दुपारी एक वाजता पुणे रेल्वे स्टेशनवरून सुटणारी पुणे-लोणावळा लोकल खडकी रेल्वेस्थानकावरून सुटेल, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.

पर्यायी मार्ग !

जुन्या पुणे-मुंबई हायवेला जाण्यासाठी विद्यापीठ रोडने येणाऱ्या वाहनचालकांनी रेंजहिल्स कॉर्नरमार्गे जावे. तसेच, आरटीओकडे जाणाऱ्या वाहनांना सिमला ऑफिस चौकातून संचेती हॉस्पिटलसमोरील ग्रेड सेपरेटरमधून जूना बाजार चौक येथून आरटीओकडे जाता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपंगांच्या मागण्या मंत्रिमंडळात मांडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शासनाकडून अपंगांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात नाही. त्यांच्या मागण्यांसंदर्भातील काही प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहेत, तर काही प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे मांडले जातील, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवारी दिली. तसेच, अपंग कल्याण आयुक्तालयाबाबतच्या तक्रारी प्राधान्याने सोडविल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'यशदा' येथे आयोजित सामाजिक न्याय विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचे उदघाटन बडोले यांच्या हस्ते झाले. त्यानंतर 'मटा' प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. शुक्रवारी प्रहार संघटनेने अपंग कल्याण आयुक्तांना दिवसभर डांबून ठेवले होते. त्यावेळी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बडोले यांच्याशी फोनवरून संवाद साधून अपंग कल्याण आयुक्तालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या बाबत बडोले यांना विचारला असता ते म्हणाले,की ' संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अपंगांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. घरकुल योजनेत अपंगांना तीन टक्के राखीव कोटा द्यावा, याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे.'

सरकारी नोकरभरतीमध्ये अपंगांना तीन टक्के जागा राखीव ठेवण्याचा अध्यादेश यापूर्वीच काढण्यात आला आहे. मात्र, शासनाच्या विविध स्तरावरून ही भरती केली जाते. त्यामध्ये काही ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नसल्याचे दिसून येते, असे बडोले यांनी सांगितले. तसेच, अपंग आयुक्तालयात कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त असल्याने त्याचाही परिणाम आयुक्तालयाच्या कामगिरीवर होत असल्याचे बडोले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक दिवस शेतीसाठी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आपल्याच परिसरातील शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी समाज शिक्षण मंडळाने मदतीचा हात देऊ केला असून, शहरातील तरुणाईला एक दिवस शेतीसाठी अन् शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याची साद घातली आहे.

पुणे जिल्ह्यातील पश्चिम भाग हा भरपूर पावसाचा आणि त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते. अगदी भोर, वेल्हा, मुळशी, पश्चिम हवेली पासून मावळापर्यंत सगळ्याच भागात आजही मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते. दिवसेंदिवस ही शेती करणे अवघड होत आहे. कारण भातशेतीची ठरावीक कामे पाऊस पडल्यानंतर लगेचच करावी लागतात. त्यासाठी या भागामध्ये पुरेसे मनुष्यबळ मिळत नाही. त्याचा थेट परिणाम शेती पडीक राहण्यापासून ते चांगले उत्पन्न न मिळण्यापर्यंत होतो. या सगळ्यातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी विंझरच्या संस्थेने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

'यंदा उपक्रमाचे चौथे वर्ष असून, तो २० जुलैपर्यंत तो चालणार आहे. यामध्ये पुणे शहरातील तरुणांनी त्यांचा एक दिवस या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जाणे अपेक्षित आहे. पुण्यातील अनेक शिक्षण संस्थांनी उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला असून, यंदा किमान दहा हजार विद्यार्थी व युवक या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत,' अशी माहिती मुख्य संयोजक अॅड. नंदू फडके यांनी दिली.

आपण दररोज जो भात खातो, तो तयार करण्यासाठी किती कष्ट पडतात याची जाणीव व्हावी, हा या उपक्रमाचा हेतू आहेच; त्याचबरोबर दिवसेंदिवस अवघड होत असलेल्या या व्यवसायाला संजीवनी देण्याचाही प्रयत्न असल्याचे फडके यांनी सांगितले. वेळेवर भातलावणी झाल्यामुळे सुमारे तीस टक्के अतिरिक्त उत्पन्न मिळते, असा अनुभव आल्याचेही फडके म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सी प्लेन सेवेला तात्पुरता ब्रेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-नाशिक विमानसेवा सुरू होऊन काहीच दिवस झाले असताना तांत्रिक अडचणीमुळे सायंकाळच्या वेळेतील फ्लाइट रद्द करण्याची वेळ आली आहे. प्रवाशांना रिटर्न प्रवास करणे शक्य होत नाही. परिणामी, एकूणच सेवेला थंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, ओझर विमानतळ प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळेपर्यंत सायंकाळच्या फ्लाइट रद्दच राहतील, असे कंपनीने स्पष्ट केले.

'मेरीटाइम एनर्जी हेलिएअर सर्व्हिसेस लि' (मेहेर) या कंपनीतर्फे सहा जुलैपासून नाशिक ते पुणे ही विमानसेवा (सी-प्लेन) सुरू करण्यात आली. सध्या नाशिकच्या ओझर विमानतळाहून पुणे येथील लोहगाव विमानतळावर हे विमान उड्डाण घेत आहे. सुरुवातीला सहा ते ३१ जुलैदरम्यान नाशिक ते पुणे सेवेसाठी सहा हजार रुपये तिकीट आणि पहिल्या आठवड्यानंतर रिटर्न तिीकटासाठी ८९९९ रुपये आकारण्याचे कंपनीने ठरवले होते. त्यानुसार आता तिकीट दर आकारलेही जात आहेत.

सध्या ही सेवा सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी दिली जात आहे. मात्र, ओझरच्या विमानतळावर काही तांत्रिक अडचणीमुळे सायंकाळच्या वेळेतील फ्लाइट रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ सकाळी ही सेवा चालू असेल, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, ही विमानसेवा प्रतिसादाअभावी बंद झाल्याची चर्चा होती. मात्र, अशी कोणतीही परिस्थिती नसल्याचे कंपनीने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिका, वेळ घालवू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थे'च्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी आंदोलन करून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये. आंदोलनासाठी शिकण्यातील वेळ वाया घालवू नये,' असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी शनिवारी दिला. आम्हाला कधीच मास्तर निवडण्याची मुभा नव्हती. कुठल्याही परिस्थितीत शिकण्याची भावना विद्यार्थ्यांनी ठेवावी, असेही ते म्हणाले.

पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने पाटेकर पुण्यात आले होते. 'एफटीआयआय'च्या आंदोलनाविषयी विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे मत व्यक्त केले. 'मला गजेंद्र चौहान यांचे काम माहिती नाही. तसेच, त्यांची नियुक्ती ज्या पदासाठी होते आहे त्यासाठी नेमके काय अपेक्षित असते, हेही माहिती नाही. या नियुक्त्या कोणत्या निकषांवर होतात याची आपल्याला कल्पना नाही,' असेही पाटेकर यांनी स्पष्ट केले. चौहान यांच्याबाबत विद्यार्थ्यांना असणाऱ्या आक्षेपाविषयी विचारले असता, पाटेकर म्हणाले,' कोण, कसा आणि काय आहे याविषयी बोलण्याचा मला अधिकार नाही. पण माझ्यामते आपण कोणाला नको असू, तर आपण स्वतःहून तेथून बाजूला व्हायला हवे. मी विद्यार्थ्यांना नको असतो, तर मी बाजूला झालो असतो,' असे नाना म्हणाले.

'लवकरच नवे नाटक'

अभिनेते नाना पाटेकर लवकरच पुन्हा रंगमंचावर दिसणार आहेत. त्याबाबत माहिती देताना नाना म्हणाले, 'खूप हसवणारे नाटक करतोय. अनेक वर्षांनी रंगमंचावर येणे ही आनंदाची गोष्ट आहे. राजन ताम्हाणे यांनी नुकतीच त्याची संहिता ऐकवली. मला १५ ते २० वर्षांनी पुन्हा नाटक करायला मिळतेय, खूप छान नाटक आहे.' 'पुरूष' या नाटकाबाबत विचारले असता, पिढी बदलल्याने प्रश्न बदलले आहेत त्यामुळे हे नाटक पुन्हा करणार नाही, असेही पाटेकर यांनी सांगितले.

मी अभिनयाच्या शाळेत गेलो नाही. पण, एफटीआयआय या संस्थेतून खूप छान मंडळी बाहेर पडली आहेत. मी कोणत्याही पक्षाचा नाही. पण, विद्यार्थ्यांनी शिकण्यातील वेळ घालवू नये.

- नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेते

एफटीआयच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या कदापिही मान्य केल्या जाणार नाहीत. संस्थेमध्ये आंदोलन करणारे विद्यार्थी नक्षलवादीच आहेत.

- सुब्रमण्यम स्वामी, ज्येष्ठ भाजप नेते (दिल्लीमध्ये दिलेली प्रतिक्रिया)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शांतता राखण्यात युती अपयशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पुण्यासारख्या शांत आणि सुसंस्कृत शहरामध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती पूर्ण ढासळली आहे. शहरात हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या, नागरिकांची वाहने जाळली गेली, तरीही आरोपी अद्याप फरार आहेत. शहरातील शांतता टिकविण्यासाठी सरकार काय करणार?', असा सवाल उपस्थित करून त्याचा जाब विधिमंडळ अधिवेशनात सरकारला विचारणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सूचित केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत-महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त 'कृतज्ञता गौरव' उपक्रमांतर्गत सर्व पत्रकारांच्या वतीने पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर यांचा प्रातिनिधीक सत्कार पवार यांच्या हस्ते झाला. या वेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्यातील सरकारच्या ध्येय-धोरणांवर टीका केली. तसेच, येत्या अधिवेशनात काँग्रेसला सोबत घेऊन सरकारला धारेवर धरणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

'सरकार नवीन असल्याने सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या कालावधीत पक्ष म्हणून राष्ट्रवादीने नरमाईची भूमिका स्वीकारली होती. केंद्र सरकारला एक वर्ष, तर राज्यातील सरकारला सात महिने उलटल्यानंतरही अच्छे दिनच्या आश्वासनापलीकडे शेतकऱ्यांच्या हातात काहीही पडलेले नाही. राज्यातील ऊस, कापूस, धान्य, दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली असून, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे', अशी टीका पवार यांनी केली. महापौर दत्तात्रय धनकवडे, शहराध्यक्षा वंदना चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड या वेळी उपस्थित होते.

आम्ही सत्तेत अन् सत्ताधारी विरोधात

राज्यात १५ वर्षांनंतर सत्ताबदल झाला असला, तरी तो अद्याप अनेकांच्या पचनी पडलेला नाही. त्यामुळे, सत्तेत असलेले अजूनही विरोधकांसारखेच वागत आहेत, तर आम्ही विरोधक असलो, तरी सत्तेत असल्याच्या आविर्भावात आहोत, अशी मार्मिक टिप्पणी पवार यांनी केली.

अजित पवार म्हणतात...

देश पातळीवर, राज्य पातळीवर अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. हेच का 'अच्छे दिन'?

सर्वसधर्मसमभाव या विचारांऐवजी 'छुपा अजेंडा' राबविला जात आहे.

राज्यातील दुष्काळ, गारपीटग्रस्तांना मदतीची आश्वासने; पण अद्याप निधी त्यांच्यापासून दूरच..

देशातील सद्यस्थितीवर 'मन की बात'मधून भाष्य का होत नाही.

व्यापमं घोटाळ्यात होणाऱ्या आत्महत्या हे कशाचे लक्षण?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images