Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कचऱ्याची तक्रार करा फोनवरून

$
0
0
शहरात कचरा साठला असेल, तर त्याची तक्रार फोनवरून किंवा एसएमएसद्वारे देण्याची सेवा महापालिकेकडून सुरू करण्यात येणार असून, कचऱ्याच्या कंटेनर्सवर त्याबाबतचे फोन नंबर छापण्यात येणार असल्याचे महापौर वैशाली बनकर यांनी सांगितले.

मागासवर्गीयांच्या कल्याणाकडे पालिकेचे दुर्लक्ष

$
0
0
पुणे महापालिकेने मागावर्गीय कल्याणकारी निधीचा योग्य प्रकारे वापर केला नसून, मागासवर्गीयांना वैयक्तिक नळजोड, वीजजोड आणि वैयक्तिक शौचालय देणे, तसेच झोपडी दुरुस्ती करण्यासाठी एक पैसाही खर्च केला नसल्याची कबुली प्रशासनाने राज्याच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीकडे दिली आहे.

नवा अभ्यासक्रम मसुदा चर्चेविनाच पुढे रेटणार?

$
0
0
येत्या शैक्षणक वर्षापासून राज्यात पहिली ते आठवी या इयत्तांसाठी लागू होणाऱ्या नव्या अभ्यासक्रमाचा मसुदा पुरेशी चर्चा आणि तज्ज्ञांच्या अभिप्रायाशिवाय पुढे रेटण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती आहे.

इंजिनीअरिंग प्रवेशासाठी ‘पीसीएम’ ग्रुपलाच महत्त्व

$
0
0
राज्यातील इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सन २०१४-१५ मध्ये बारावीच्या मार्कांना ५० टक्के महत्त्व देताना, केवळ फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणितातील (पीसीएम ग्रुप) मार्कांचाच विचार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना या तिन्ही विषयांत मिळून ५० टक्के किंवा अधिक मार्क्स मिळवणे आवश्यक ठरणार आहे.

विद्यापीठाने उचलले कॉलेजविरुद्ध कडक पाऊल

$
0
0
पायाभूत सुविधा आणि इतर शैक्षणिक माहिती विद्यापीठाकडे सादर न करणाऱ्या कॉलेजांचे आता संलग्नीकरणच धोक्यात येऊ शकते. वार्षिक अहवालासाठी आवश्यक असलेली ही माहिती सादर न केल्याचा परिणाम थेट विद्यापीठाच्या रँकिंगवर होत असल्याचे लक्षात आल्याने विद्यापीठाने हे पाऊल उचलले आहे.

आता ‘एसटी’ दरवाढीची कुऱ्हाड

$
0
0
महागाई आणि इंधन दरवाढीने होरपळलेल्या सामान्यांना आता राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे. एसटीच्या प्रवासदरात जवळपास सहा टक्क्यांनी वाढ झाली असून, गुरुवारपासून (२७ सप्टेंबर) ती लागू होईल.

आधीचा करार तोट्याचा

$
0
0
तासगाव पलूस तालुका सहकारी साखर कारखान्याचा भाडे करार येत्या तीस सप्टेंबरला संपत आहे. भाडे करार संपताच सध्या हा कारखाना ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी थांबू नये. तासगाव पलूस कारखान्याचे चांगले दिवस सुरु होतील. भाडे करारानंतर कारखाना चांगला चालेल. आधीच करार तोट्याचा झाला आहे. अशी टीका ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी केली.

ढोलपथकांची धमाल!

$
0
0
पुण्याचा गणेशोत्सव वेगळा ठरतो, तो त्यात सहभागी होणाऱ्या ढोलपथकांमुळे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध शाळांमधील आजी आणि माजी विद्यार्थ्यांची ढोलपथके या मिरवणुकीची रंगत आणि उत्साह वाढवत आहेत.

‘सावधान, बागुलबुवा आलाय’

$
0
0
लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी तसेच समाजप्रबोधनाच्य़ा हेतूने ६१५, बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टने यंदा ‘सावधान, बागुलबुवा आलाय’ हा देखावा केला आहे.

देखाव्यांतून करा सफर पुराणकाळापासून विज्ञानयुगापर्यंत

$
0
0
पौराणिक, सामाजिक तसेच ऐतिहासिक देखाव्यांची गुंफण कसबा पेठ परिसरातील मंडळांनी केली आहे. काही मंडळांनी हलते देखावे तर काही मंडळांनी जिवंत देखावेही सादर केले आहेत.

कासवाची तस्करी करणाऱ्यांना अटक

$
0
0
कासवांची तस्करी करणाऱ्या तिघांना देहूरोड पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून चार कासवे जप्त केली आहेत. त्यामुळे मावळ तालुक्यातील कासवांच्या तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

टपरीधारकांचा पालिकेवर मोर्चा

$
0
0
विविध मागण्यांसाठी टपरी, हातगाडीधारकांच्या नॅशनल हॉकर्स फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेवर मंगळवारी (२५ सप्टेंबर) मोर्चा काढण्यात आला.

‘दादां’च्या धक्कातंत्राने पुण्यात खळबळ

$
0
0
सिंचन घोटाळ्यातील आरोपांमुळे व्यथित झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर पुणे शहर व जिल्ह्यात खळबळ उडाली. दादांबरोबर अन्य मंत्री बाहेर पडणार का, दादांचा राजीनामा स्वीकारणार का इथपासून राज्यातील सरकार पडण्यापर्यंत चर्चांना उधाण आले आहे.

हद्दीलगतच्या गावातही गणपतीनंतर कारवाई

$
0
0
तळजाई पठारावरील बेकायदा इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेची दखल घेऊन महापालिका हद्दीलगतच्या गावांतील बेकायदा बांधकामांवर गणपतीनंतर हातोडा घालण्याची तयारी जिल्हाधिकारी प्रशासनाने चालविली आहे.

भारतातील पोषण गुणवत्ता दुर्बल

$
0
0
विकासाच्या देशाने वेगाने कूच करीत असलेल्या भारताची पोषण गुणवत्तेची स्थिती दुर्बल असल्याची धक्कादायक माहिती सेव्ह द चिल्ड्रन संस्थेच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राच्या शहरी भागात ३४.८ टक्के कुपोषणाचे प्रमाण असून, पुढारलेल्या मुंबईत चाळीस टक्के कुपोषित वास्तव्यास असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले आहे.

कास पठारावर आता 'होम स्टे'

$
0
0
जैवविविध्याने नटलेल्या कास पठारावरील केवळ दुर्मिळ फुलेच नव्हे तर वन्यजीवनही पर्यटकांना अनुभवयाला मिळावे, यासाठी कासचे गावकरी आता ‘होम स्टे’ची सुविधा देणार आहेत. निसर्गाच्या कुशीत राहणे, गावरान जेवण आणि गाइडसह भटकंती असे पॅकेज संयुक्त वनव्यवस्थापन समिती उपलब्ध करणार आहे.

नगरसेवक सनी निम्हणला जामीन

$
0
0
जेसीबी लावून जबरदस्तीने बांधकाम पाडल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या दोन गुन्ह्यामध्ये नगरसेवक सनी विनायक निम्हणची कोर्टात जामिनावर सुटका करण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती के. पिंगळे यांच्या कोर्टात सनी निम्हणला हजर करण्यात आले होते.

पुणेकरांचा PMP प्रवास महागणार

$
0
0
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपी) तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला मंगळवारी मान्यता दिल्यामुळे पुणेकरांचा पीएमपी बसप्रवास दोन किलोमीटरमागे एका रुपयांनी वाढणार आहे. ही तिकीट दरवाढ गुरुवारपासून लागू होणार आहे. पीएमपीच्या तिकीट दरवाढीच्या प्रस्तावावर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत चर्चा झाली.

दादांच्या बालेकिल्ल्याला धक्का

$
0
0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी खळबळ उडाली. दादांच्या निर्णयाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गणेशाआधी गौरीला पूजणारा कन्नड समाज

$
0
0
महाराष्ट्राप्रमाणेच कन्नड समाजातही गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होतो. प्रत्येकाच्याच घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. तसेच काही ठिकाणी सार्वजनिक गणपतीही बसविण्यात येतो. एरंडवण्यातील कर्नाटक हायस्कूलमध्ये दर वर्षी गणपती बसविण्यात येतो. आमच्यापैकी अनेक जण काही वर्षांपूर्वीच इथे स्थायिक झाल्याने त्यांच्याकडे इथल्या पद्धतीनुसारच गणपतीची पूजा केली जाते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images