Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भीमा नदीत तरुण बुडाला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दौंड

सिद्धटेक येथे देवदर्शनाला आलेल्या कुटुंबातील तरुणाचा भीमा नदीत बुडून मृत्यू झाला. योगेश भावसार असे या तरुणाचे नाव असून, तो दौंड येथील स्टेट बँकेच्या शाखेत कार्यरत होता. योगेश आणि त्यांची पत्नी रेना, मुलगा प्रक्षल याच्यासोबत योगेश सिद्धटेकला गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर भीमा नदीच्या किनाऱ्यावर योगेश आणि त्यांचा मुलगा प्रक्षल हे दोघे खेळत असताना तोल जाऊन दोघेही वाहत्या पाण्यात पडले. पाण्याला वेग असल्याने दोघेही बुडू लागले. तेव्हा आशिष पाचपुते यांनी पाण्यात उडी मारून प्रक्षलला वाचविले. मात्र, पाण्याचा वेग जास्त असल्याने योगेश वाहून गेला. त्याचवेळी काही तरुणांनी त्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत त्यांना शोधण्याचे काम पोलिस व महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात येत होते. मात्र, खूप उशीर झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौहान यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा : मिश्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'एफटीआयआयसारख्या संस्थेच्या नियामक मंडळ गजेंद्र चौहान यांच्यासारख्या व्यक्तीची निवड अयोग्यच आहे. विद्यार्थ्यांचा इतका तीव्र विरोध झाल्यानंतर चौहान यांनी स्वत:हूनच राजीनामा द्यायला हवा,' असे स्पष्ट मत अभिनेता लेखक पियूष मिश्रा यांनी मांडले. मिश्रा यांनी पुण्यात येऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. तसेच, संगीत मैफलीत सहभागी होऊन काही गाण्यांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होऊन १८ दिवस झाले आहेत.

चुकीच्या व्यक्तीची निवड झाल्यावर असे आंदोलन होणे स्वाभाविकच असल्याचे सांगून मिश्रा म्हणाले, 'चौहान यांच्याशी व्यक्तिशः काही संबंध नाही. मात्र, अशा नियुक्त्या सर्वत्रच होऊ लागल्या आहेत. चौहान हे काही एफटीआयआयच्या अध्यक्षपदी लायक नाहीत. त्यांचा केवळ राजकीय संबंध आहे, म्हणून नियुक्ती करण्यात काहीही अर्थ नाही.' विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलनातून त्यांचा विरोध स्पष्ट केला आहे. या पार्श्वभूमीवर, 'चौहान यांनी स्वतःहून या पदाचा राजीनामा देणे संयुक्तिक ठरेल,' असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना कानपिचक्या

'आंदोलनात सगळी शक्ती वाया घालवू नका. तसेच, जास्त गुर्मीत न राहता आता थेट गजेंद्र चौहान यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना दिला. तसेच, या चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांना चित्रपट क्षेत्रासंबंधी प्रश्न विचारून त्यांचे ज्ञान तपासून खात्री करून घ्यावी. जे बरोबर असेल ते स्वीकारावे मात्र हे सगळे एका 'स्टिंग' ऑपरेशनच्या माध्यमातून करण्याचा अजब कानमंत्र मिश्रा यांनी दिला. मात्र, जर चर्चाच करणार नसाल तर तुमच्या सारखे मुर्ख तुम्हीच,' अशा शब्दांत त्यांनी त्यांनी विद्यार्थ्यांचे कान टोचले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नॉन रिपोर्टेड’ही ऑनलाइनच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात 'नॉट रिपोर्टेड' राहिलेल्या जवळपास तेरा हजार विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश घेता येईल. ऑनलाइन अर्ज सबमिट करू न शकणारे आणि प्रक्रियेमध्ये अर्जच करता न आलेल्या विद्यार्थ्यांनाही रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार ऑनलाइन प्रवेश घेता येईल.

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश समितीचे अध्यक्ष आणि पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी सोमवारी पत्रकारांना ही माहिती दिली. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यामध्ये मिळालेल्या कॉलेजवर प्रवेशासाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. प्रवेशाची नोंदच न केल्याने हे विद्यार्थी समितीच्या नियमानुसार थेट प्रक्रियेच्या बाहेर फेकले गेले आहेत. त्यातच अनेक विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज सबमिट केले नव्हते, तर अनेकांना प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची इच्छा असूनही सहभागी होता आले नव्हते. अशा सर्वच विद्यार्थ्यांचा विचार करून, हा निर्णय घेतल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची सोय करण्यासाठी केंद्रीय प्रवेश समिती तिसऱ्या फेरीनंतर कॉलजनिहाय रिक्त जागांची आकडेवारी जाहीर करणार आहे. त्यासाठी आरक्षित जागांच्या आकडेवारीचाही विचार केला जाईल. नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीनंतर या रिक्त जागांचा विचार करून कॉलेज निवड करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल. अर्ज सबमिट न करता आलेल्या विद्यार्थ्यांनाही रिक्त जागांचा विचार करून, कॉलेज निवडून अर्ज सबमिट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

अर्जच न भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी अगदी माहितीपुस्तिकेच्या उपलब्धतेपासून सर्व बाबींची सुविधा पुरविली जाईल. अशा सर्व विद्यार्थ्यांनी सादर केलेले ऑनलाइन अर्ज विचारात घेऊन, सर्वांना गुणवत्तेनुसार रिक्त जागांवर प्रवेश दिले जातील. त्यासाठीचा सविस्तर कार्यक्रम प्रवेश समिती लवकरच जाहीर करेल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

निर्णयामुळे निर्माण झालेले काही प्रश्न...

अनेक विद्यार्थी हे त्यांना हवे असलेले वा किमान सोयीचे असणारे कॉलेज न मिळाल्याने 'नॉट रिपोर्टेड' राहून शेवटी हव्या त्या कॉलेजला प्रवेश घेतात. यंदा पहिल्या फेरीनंतरच समितीने अशा नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांना शेवटी प्रवेश देण्याचे धोरण जाहीर केल्याने, आता उर्वरित दोन्ही फेऱ्यांमधील नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास, त्याची जबाबदारी कोणाची ?

पहिल्या फेरीतून सोयीचे कॉलेज न मिळाल्याने 'नॉट रिपोर्टेड' राहिलेल्या आणि नंतर सोयीच्या कॉलेजसाठी पुन्हा प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या 'स्पेशल' वागणुकीमुळे, पहिल्या फेरीत गैरसोयीच्या कॉलेजवर का होईना, पण नियमानुसार रिपोर्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का होणार ?

नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांना प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी रिक्त जागांवर प्रवेश देण्याचे समितीचे धोरण तिसऱ्या फेरीनंतर जाहीर केले असते, तर उर्वरीत दोन फेऱ्यांमध्ये रिपोर्टेड विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यात समिती यशस्वी ठरली असती. मात्र आता 'सोयीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर नॉट रिपोर्टेड राहिले तरी चालते,' ही जाणीव विद्यार्थी- पालकांमध्ये निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची ?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवानगी नसताना अकरावीचे प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आंबेगाव तालुक्यातील गोहे येथील शासकीय आश्रम शाळेत अकरावीसाठी सायन्स शाखा सुरू करण्याला मान्यता मिळण्याअगोदरच शाळेने त्याची जाहिरात करून इच्छुक विद्यार्थ्यांची नावे नोंदवून घेतली. मात्र, सायन्स शाखेला परवानगी न मिळाल्याने यंदा ही तुकडी सुरू होणार नसल्याचे शाळा प्रशासनाने सांगून एेनवेळी विद्यार्थ्यांना दुसरीकडे सोय करण्यास सांगितल्याचा प्रकार घडला.

गोहे आश्रमशाळेत अकरावी, बारावीसाठी आर्ट्‍स शाखेचे शिक्षण दिले जाते. यावर्षापासून सायन्स शाखाही सुरू केली जाणार होती. दहावीचा निकाल लागल्यानंतर त्यासंबंधीचे फलक डिंभे, घोडेगाव येथे आश्रमशाळा प्रशासनाने लावले होते. त्याप्रमाणे १५ ते २० विद्यार्थ्यांनी ११ वी प्रवेशासाठी शाळेकडे नावे नोंदवली होती. त्यानंतर हे विद्यार्थी दररोज वर्ग कधी सुरू होणार, याची चौकशी करत होते. मात्र, सायन्स शाखेस परवानगी मिळाला नाही, त्यामुळे यावर्षी ११ वी सायन्स शाखा सुरू होऊ शकत नाही, असे शाळेकडून त्यांना सांगण्यात आले. सद्य परिस्थिती विद्यार्थ्यांना घोडेगाव किंवा मंचर येथील कॉलेजात प्रवेश घ्यावा लागणार आहे. मात्र, आश्रमशाळेवर विसंबून राहिल्याने या कॉलेजातील प्रवेश प्रक्रियेपासून ते विद्यार्थी वंचित राहिले आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी त्यांना आता कसरत करावी लागणार आहे.

गोहे बुद्रुक येथील आश्रमशाळेत याच वर्षी ११ वी सायन्स ज्युनिअर कॉलेज सुरू करावे किंवा विद्यार्थ्यांना प्रलोभने दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी आदिवासी समाज कृती समितीचे अध्यक्ष सीताराम जोशी यांनी केली आहे.

शाखा पुढच्या वर्षी

आदिवासी मुलांना सायन्स शाखेचे शिक्षण घेता यावे, त्यांना चांगल्या शैक्षणिक संधी मिळाव्यात, यासाठी गोहे येथे सायन्स शाखा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, १५ जूनपूर्वी अप्पर आयुक्त कार्यालयाकडून या शाखेसाठी आवश्यक असलेला आठ शिक्षकांचा स्टाफ उपलब्ध झाला नाही. त्यामुळे गोहे आश्रमशाळेत यावर्षापासून सायन्स शाखा सुरू करता आली नाही. पुढच्या वर्षी ही शाखा येथे सुरू केली जाईल, असे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ. तुकाराम पिचड यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौणखनिज उत्खनन; तलाठी ‘टार्गेट’ नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गौणखनिजाचे बेकायदा उत्खनन होत असल्यास तलाठ्यांना जबाबदार धरण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर तलाठ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गौणखनिजाच्या वसुलीपोटी राज्य सरकारने वाढवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तलाठ्यांना 'टार्गेट' करणे योग्य नसल्याचेही मत व्यक्त करण्यात येत आहे.

गौणखजिन उत्खननातून राज्याच्या तिजरीत १७५ कोटी रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दीष्ट पुणे जिल्ह्याला देण्यात आले आहे. गतवर्षीपेक्षा हे उद्दिष्ट थेट १०० कोटी रुपयांनी वाढविण्यात आले आहे. या उद्दीष्टपूर्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने आतापासूनच पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. त्याची पहिली कुऱ्हाड दगड खाणींवर पडणार आहे.

पुणे जिल्ह्यात सुमारे ४६५ दगड खाणी आहेत. या दगड खाणींमधून नेमके किती उत्खनन करण्यात आले आहे याची तपासणी १० जुलैपर्यंत करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन (ईटीएस) मशिन्सद्वारे या खाणींमधील उत्खननाची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडून इटीएस मशिन घेण्यात येणार आहेत. या दगड खाणींमध्ये परवानगी व मर्यादेपेक्षा अधिक उत्खनन केल्याचे आढळल्यावर संबंधित खाणमालकांकडून पाच पट दंड वसूल केला जाणार आहे.

वाळू ठेक्यांच्या लिलावातूनही मोठा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वाळूचे ३० सप्टेंबरपर्यंत लिलाव केले जाणार आहेत. त्यासाठी २४५ वाळू ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. हे लिलाव वेळेत होण्यासाठी १५ जुलैपर्यंत ग्रामसभांचे ठराव व १ ऑगस्टपर्यंत पर्यावरण समितीची मान्यता घेण्याचा महसूल खात्याचा प्रयत्न राहणार आहे.

लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

गौण खनिजांमधून महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बेकायदा उत्खननावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. बेकायदा उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यासाठी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. त्यांनी अशा उत्खननाबद्दल माहिती देणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, बेकायदा उत्खननासाठी तलाठ्यांना जबाबदार धरणे अयोग्य असल्याचे तलाठ्यांचे मत आहे. या संदर्भात संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील घनकचरा व्यवस्थापनात त्रुटी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या नीती आयोगासमोर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे सादरीकरण पालिका आयुक्तांनी केले असले, तरी त्यात अनेक त्रुटी असून, त्या आयोगापासून दडविण्यात आल्याचा आरोप नागरिक चेतना मंचाने केला आहे. नीती आयोगासमोर झालेले सादरीकरण आणि प्रत्यक्षातील शहरातील परिस्थिती याचा सविस्तर अहवालच मंचाने निती आयोगाला पाठविला असून, पालिकेच्या दाव्यातील फोलपणा उघड केला आहे.

शून्य कचऱ्याअंतर्गत पुणे शहराने राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत केंद्र सरकारच्या नीती आयोगाने नुकतीच पालिकेला भेट दिली. त्यानंतर, गेल्या आठवड्यात पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिल्लीला आयोगासमोर सादरीकरण केले. घनकचरा व्यवस्थापनाबाबत पालिकेने केलेले सर्व दावे फसवे असून, शहरातील कचऱ्याची समस्या कायमच आहे, असे पत्र नागरिक चेतना मंचाच्या मेजर जनरल (निवृत्त) सुधीर जठार यांनी नीती आयोगाच्या उपाध्यक्षांना पाठविले आहे.

हंजरचा प्रकल्प पूर्ण बंद असून, रोकेम प्रकल्पातून अद्याप एक मेगावॅट वीज निर्मितीही होऊ शकलेली नाही. तरीही, पालिकेने या दोन्ही प्रकल्पांकडून आजपर्यंत कोणताही दंड वसूल केलेला नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. तसेच, पालिकेने उभारलेले बायोगॅस प्रकल्प हे केवळ नागरिकांच्या पैशांचा अपव्यय आहेत. सविस्तर प्रकल्प आराखडा तयार न करता हे प्रकल्प उभारण्यात आल्याने त्यावर खर्चच अधिक होत असल्याची टीका जठार यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किमान वेतन थेट बँक खात्यात

$
0
0

पुणेः महापालिकेतील विविध खात्यात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना जुलैपासून किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यासह ते थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे, या कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून पालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न चर्चेत आहे. पालिका आयुक्तांनी त्याबाबत धोरण ठरविण्यासाठी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. उपमहापौर आबा बागूल यांनी सोमवारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या प्रश्नाबाबत सविस्तर बैठक घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणांच्या ताब्यासाठी दिरंगाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या विकास आराखड्यातील रस्ते, हॉस्पिटल, उद्याने, स्मशानभूमी, पक्षी अभयारण्य अशा विविध सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित ५५ मिळकतींचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आगाऊ ताबा मिळविण्यासाठी महापालिकेकडूनच दिरंगाई होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगाऊ ताब्यासाठी मोजणी नकाशांसह मिळकत उतारे, राखीव वनांचे शेरे आणि अंतिम मंजूर विकास आराखड्यातील आरक्षणांचे प्रस्ताव सादर न झाल्याने ही कार्यवाही धीम्या गतीने होत आहे.

विकास आराखड्यातील ५५ आरक्षित मिळकतींचा आगाऊ ताबा जिल्हाधिकारी कार्यालयाने द्यावा, अशी मागणी महापालिकेने केली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनीही नोव्हेंबर महिन्यात बैठक घेतली. तसेच आगाऊ ताब्याचे काम त्वरित करावे अशा सूचना संबंधितांना दिल्या; परंतु त्यात गेल्या सहा महिन्यांत फारशी प्रगती झालेली नाही. त्यामुळे आगाऊ ताबे देण्याचे काम रखडले आहे.

आगाऊ ताबा हवा असलेल्या मिळकतींची महापालिकेने 'अ', 'ब', 'क' व 'ड' अशी वर्गवारी करून प्रस्ताव सादर करावा. आरक्षणातील प्राधान्यक्रमाने हव्या असलेल्या मिळकतींची महापालिका आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी संयुक्त मोजणी करावी. तसेच, आरक्षित मिळकतींपैकी मोकळ्या व अतिक्रमण असलेल्या जागांची पाहणी करून त्यातील मोकळ्या जागांचा प्रस्ताव महापालिकेने सादर करावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेला मे महिन्यात कळविले. जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिल्यानंतर एखाद-दुसरा प्रस्ताव वगळता महापालिकेकडून कोणतीही पूर्तता झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जवान होणार अधिकारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भोरमधील नांद या गावचा किरण ज्ञानोबा गोळे या युवकाची इंडियन मिलिटरी अॅकॅडमीसाठी (आयएमए) निवड झाली आहे. सध्या जवान म्हणून लष्करात कार्यरत असलेल्या किरणने मोठ्या जिद्दीने अधिकारी बनण्यासाठीचा हा टप्पा गाठला आहे.

किरण मूळचा भोरपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या नांद या गावचा आहे. एक हजार लोकवस्तीच्या त्याच्या गावात २०-२२ लोक लष्करात आहेत; पण अधिकारी पदावर पोहोचणारा किरण हा गावातील पहिलाच ठरणार आहे. 'आयएमए'मधील निवडीसाठी द्याव्या लागणाऱ्या एसएसबी मुलाखतीची तयारी त्याने अपेक्स करिअर्सचे लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

ब्राह्मणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'किरणची निवड आर्मी कॅडेट कॉलेज (एसीसी) विंग, आयएमएसाठी झाली असून, तो एसीसी प्रवेश योजनेंतर्गत होणाऱ्या निवडीत अखिल भारतीय स्तरावर सातव्या स्थानावर आला आहे. देशभरातून एकूण ४२ जवानांची या अंतर्गत निवड झाली आहे. किरण आता तीन वर्षे एसीसी विंगमध्ये प्रशिक्षण घेईल. त्यानंतर 'आयएमए'मध्ये एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो लेफ्टनंट बनेल.'

'किरण लहान असतानाच, त्याच्या वडलांचे निधन झाले. त्यानंतर तो आणि त्याच्या दोन लहान बहिणींची जबाबदारी त्याची आई लता गोळे यांनी समर्थपणे पेलली. बीएस्सीच्या अखेरच्या वर्षाला असताना त्याला लष्करात जवान होण्याची संधी मिळाल्याने तो लष्करात भरती झाला. त्याच्या दोन बहिणी सध्या शिकत आहेत,' असे ब्राह्मणकर यांनी सांगितले.

ते म्हणाले, 'किरण हा बॉम्बे इंजिनीअर ग्रुपच्या युनिटमध्ये कार्यरत असून, रेजिमेंटल सर्वेअर टेक्निशियन हा त्याचा ट्रेड आहे. आर्मीमध्ये कार्यरत असताना 'एसीसी'विषयी त्याला माहिती मिळाली. या स्कीमअंतर्गत अधिकारी बनण्यासाठी त्याने प्रयत्न करायचे ठरवले. त्यासाठी युनिटमधील अधिकाऱ्यांनीही त्याला प्रोत्साहन दिले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चालक से मालक’ने गाजली महाबँकेची सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बँक ऑफ महाराष्ट्रची सोमवारी झालेली वार्षिक सर्वसाधारण सभा अभूतपूर्व गोंधळामुळे वादळी ठरली. बँकेमधील ६५८ कोटी रुपयांचा महाघोटाळा, वाढते अनुत्पादित कर्ज, संचालकांची उधळपट्टी, मराठीतून कामकाज आदी प्रश्नांवरून बँकेच्या समभागधारकांनी संचालक मंडळाला धारेवर धरले. या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न देताच संचालक मंडळाने ही सभा गुंडाळली.

बँकेतील ६५८ कोटी रूपयांचा 'चालक से मालक' महाघोटाळा 'मटा'ने उघडकीस आणला होता. तेव्हापासून बँकिंगविश्वामध्ये त्याबाबत चर्चा सुरू आहे. याच वृत्तमालिकेचे दाखले सर्वसाधारण सभेत देण्यात आले. भागधारक सुहास वैद्य यांनी संचालक मंडळाला धारेवर धरले. माहिती अधिकाराअंतर्गत त्यांनी याबाबतची माहिती मागवली होती; परंतु ती वार्षिक सर्वसाधारण सभेत ही माहिती देऊ, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार बँकेच्या वरिष्ठांचाही या घोटाळ्यात सहभाग आहे का, वरिष्ठांनीही या घोटाळ्याकडे दुर्लक्ष कसे केले, असे प्रश्न वैद्य यांनी उपस्थित केले. यावर या प्रकरणाचा तपास 'सीबीआय'कडे देण्यात आला आहे, असे मोघम उत्तर बँकेचे अध्यक्ष सुशील मुनहोत यांनी दिले.

माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर, रवींद्र देशपांडे, दिनेश कुलकर्णी, विनायक बेहरे, शरद पारखी, एस. एल. कुलकर्णी, रमाकांत गोडबोले, बी. जी. बर्वे आदींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना संचालक मंडळाला कसरत करावी लागली. बँकेच्या लोकमंगल या मुख्यालयात पार पडलेल्या या सभेला बँकेचे अध्यक्ष सुशील मुनहोत, कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता व आर. आत्माराम, इतर संचालक व सरव्यवस्थापक उपस्थित होते.

पोलिसांचा पाचारण

बँकेने सभेच्या ठिकाणी प्रवेशद्वारावरच पोलिसांना बोलवल्याने सुरुवातीलाच वाद निर्माण झाला. समभागधारकांनी पोलिसांना सभेच्या ठिकाणावरून बाहेर जाण्यास भाग पाडले. मराठीतून कामकाज करण्याबाबत सभासदांनी सभेपूर्वी मागणी करूनही सर्व कामकाज इंग्रजीतूनच करण्यात आले. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही सभागृहातून बाहेर काढण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमए’चा अर्ज भरायचा कसा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बीएच्या शेवटच्या वर्षातील छापील गुणपत्रिका हाती न मिळाल्याने, पदव्युत्तर वर्गांचे प्रवेशेच्छुक विद्यार्थी अडचणीत आले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपल्या अनेक विभागांमध्ये प्रवेशांसाठी ३० जूनची अखेरची मुदत दिली आहे. तसे असतानाही छापील निकाल उपलब्ध करून दिले नाहीत, तर प्रवेश अर्ज भरायचा तरी कसा, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत.

विद्यापीठाच्या विविध विभागांच्या प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाल्या आहेत. विद्यापीठाने त्यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्जही मागवून घेतले आहेत. हे अर्ज भरताना पदवीच्या तिसऱ्या वर्षामध्ये मिळालेल्या गुणांची माहिती विद्यार्थ्यांनी सादर करणे अपेक्षित आहे. तसेच, अर्ज विद्यापीठाकडे सादर करताना, छापील गुणपत्रिकेच्या फोटोकॉपीसोबत इतर आवश्यक ती कागदपत्रेही जोडणे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक केले आहे. विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर विभागांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ३० जून ही अखेरची मुदत देण्यात आली आहे. असे नियोजन असतानाही तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या छापील गुणपत्रिकांचे वाटपच न झाल्याने ही अडचण निर्माण झाली आहे.

'...विद्यापीठाकडे चौकशी करा'

'आमचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला आहे. त्यानुसार आम्ही आता विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तयारीही केली आहे. मात्र आमच्या हाती छापील गुणपत्रिकाच नाहीत. त्यामुळेच मग आम्हाला अर्जही सादर करता येत नाही. छापील गुणपत्रिका मिळाव्यात म्हणून आम्ही कॉलेजकडे विचारणा केली, तर त्यांनी विद्यापीठाकडे चौकशी करायला सांगितले. विद्यापीठाकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला, तर उडवाउडवीची उत्तरेच मिळत आहेत,' अशी माहिती विद्यार्थ्यांनी 'मटा'ला दिली. गुणपत्रिकांचे वेळेत वाटप होणार नसेल, तर विद्यापीठाने प्रवेशाची मुदत तरी वाढवून द्यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक दरडींचे मॅपिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

घाट रस्त्यांवर आजूबाजूच्या डोंगर उताराला एका विशिष्ट कोनातून छेद देणे गरजेचे असतानाही तो दिला जात नसल्याने राज्यातील घाट रस्त्यांसोबतच कोकण रेल्वेच्या विविध टप्प्यांमध्येही दरडी कोसळण्याचे प्रकार सातत्याने अनुभवायला मिळत असल्याची माहिती आता प्रकाशात येत आहे. दरडी कोसळण्याचे प्रकार रोखण्यासाठी सध्या अशा ठिकाणांवर वापरले जाणारे पर्यायी उपायही तोकडे पडत असल्याचेही याच निमित्ताने स्पष्ट होत आहे.

दरडी कोसळण्याच्या प्रकारांमधील धोका टाळण्यासाठी 'जिऑलॉजिक सर्व्हे'तर्फे धोकादायक ठिकाणांचे मॅपिंग करण्याचे काम सुरू आहे. याच निमित्ताने प्रशासकीय यंत्रणांनाही अशा ठिकाणांविषयी सावध केले जात आहे. राज्यात पावसाळ्यामध्ये सातत्याने दरडी कोसळण्याचे प्रकार अनुभवायला मिळतात. गेल्या वर्षी माळीण गावामध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे दरडी कोसळण्याच्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर हे प्रकार रोखण्यासाठीही पर्यायी यंत्रणा उभारण्याची गरज स्पष्ट झाली आहे. त्यातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र विभागातील संशोधकांनी केलेल्या संशोधनातून घाट रस्त्यांबाबत समोर आलेले हे वास्तव ही गरज अधोरेखितच करत आहे. विद्यापीठाचे पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एन. आर. करमळकर यांनी या विषयी 'मटा'ला माहिती दिली.

दरडी कोसळण्याच्या प्रकारांची कारणमीमांसा करण्यासाठी विभागाच्या संशोधकांनी गोव्यामधील मडगाव ते महाडपर्यंतच्या एकूण साडेचारशे किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये ८७ ठिकाणांचा अभ्यास केला. यापैकी बहुतांश ठिकाणी जांभ्या खडक आढळून आला. सच्छिद्र जांभ्या खडकातून पाणी मातीच्या थरापर्यंत गेल्याने, आजूबाजूचा भाग ठिसूळ झाल्याने, अशा ठिकाणांवर दरडी कोसळल्याचे दिसून आले. बेसॉल्टच्या खडकाच्या बाबतीतही असाच प्रकार अनुभवायला मिळाला, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

दरडी कोसळण्याचे प्रकार रोखण्यासाठी रस्ते वा लोहमार्ग करण्यापूर्वी आजूबाजूच्या डोंगराला विशिष्ट कोनातून छेद देऊन डोंगरउतार करणे गरजेचे असते. मात्र, दरडी कोसळलेल्या बहुतांश ठिकाणी असा विशिष्ट कोनातील उतार नसून, थेट उभी चढणच आढळून आली आहे.

- डॉ. एन. आर. करमळकर, पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख, विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रक्कम वसुलीचा आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित चित्रपट करण्यासाठी राज्य सरकारकडून ५० लाखांचा निधी घेणाऱ्या विनय धुमाळे यांना राज्य सरकारने वसुली नोटीस बजावली आहे. धुमाळे यांनी सादर केलेली चित्रपटाची सीडी पाहून परीक्षण समितीने स्पष्ट शब्दांत असमाधान व्यक्त केले आहे.

पुण्यातील माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते विष्णू रामचंद्र कमळापूरकर यांनी माहिती अधिकारातून या चित्रपटाचा विषय समोर आणला होता. धुमाळे यांनी लोकमान्य टिळकांवरील चित्रपटासाठी केंद्र सरकारकडून अडीच कोटी रुपयांचे व राज्य सरकारकडून १९९८मध्ये ५० लाख रुपयांचे अनुदान घेतले होते. मात्र, गेल्या सतरा वर्षांत हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकलेला नाही. याबाबतच्या 'महाराष्ट्र टाइम्स'ने दिलेल्या वृत्ताची दखल घेऊन राज्य सरकारने धुमाळे यांना नोटीस बजावली.

सांस्कृतिक कार्य सचिवांकडे याबाबत नुकतीच सुनावणी झाली. त्यापूर्वी सरकारच्या चित्रपट परीक्षण समितीने धुमाळे यांनी सरकारकडे सादर केलेली सीडी पाहिली. धुमाळे यांनी केलेले काम दर्जेदार नसल्याचे समितीचे म्हणणे आहे. परीक्षण समितीला चित्रपट आवडला नसल्यास सादर केलेल्या चित्रपटावरच नव्याने संस्कार करून, तो नीटनेटका करून देण्यास किंवा नव्याने चित्रपट तयार करून देण्याची तयारी धुमाळे यांनी दर्शवली आहे. त्यासाठी त्यांनी सहा महिन्यांची मुदत मागितली असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले.

'इंदिरा गांधी'चा निधी परत

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित चित्रपट करण्यासाठी सरकारने तत्कालीन खासदार उत्तम राठोड यांच्या संस्थेला २००३-०४मध्ये एकरकमी ३५ लाख रुपये देण्यात आले होते. हिंदी चित्रपट अभिनेत्री मनीषा कोईराला त्या चित्रपटात इंदिरा गांधीची भूमिका करणार असल्याची चर्चा होती. या चित्रपटाच्या प्रगतीबाबतची विचारणा सरकारकडून सातत्याने संस्थेला करण्यात येत होती. मात्र, संस्थेकडून चित्रपटाची निर्मिती होऊ शकलेली नव्हती. परिणामी, चित्रपट करणे शक्य होत नसल्याचे कारण देऊन या संस्थेने अनुदानाची पूर्ण रक्कम सरकारला परत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक संशयित ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सिंहगड रोडवरील वेगवेगळ्या सहा ठिकाणी वाहने पेटवणाऱ्या संशयिताला सिंहगड पोलिस आणि गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. विनोद शिवाजी जमदाडे (वय २७, रा. वडगाव बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. जमदाडेने रविवारी दुपारी सिंहगड कॉलेज कॅम्पस रोडवर एकाचा खून केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्याने अद्यापपर्यंत गाड्या पेटवल्याची कबुली दिलेली नाही.

सिंहगड रोड, सनसिटी आणि नऱ्हे परिसरात सहा ठिकाणी रविवारी पहाटे ९२ वाहने पेटवण्यात आली होती. या घटनेनंतर शहरात दहशतीचे वातावरण तयार झाले होते. पोलिसांकडून पंचनामे सुरू असतानाच सिंहगड कॉलेज कॅम्पस रोडवरील एका हॉटेलवर खून झाल्याची घटना घडली होती. सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खुनाच्या घटनेची माहिती घेतली असता जमदाडेचे नाव पुढे आले होते. त्यानंतर रात्री उशिरा याला ताब्यात घेण्यात आले. जमदाडेची शरीरयष्टी ही वाहने जाळण्यात आलेल्या 'सीसीटीव्ही' फुटेजमधील व्यक्तीशी मिळतीजुळती आहे, अशी माहिती सहआयुक्त सुनील रामानंद यांनी दिली.

खंडणीचा गुन्हा दाखल होणार

जमदाडे हा बंटी पवार टोळीशी संबंधित आहे. पोलिसांकडून जळितकांडाचा तपास करण्यात येत असताना एका व्यावसायिकाने पोलिसांशी संपर्क साधला आहे. बंटी पवार आणि जमदाडे यांनी या व्यावसा​यिकाकडे खंडणीची मागणी केली होती. त्यासाठी या व्यावसायिकाच्या कारखान्यात घुसून कामगारांना मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार 'सीसीटीव्ही' फुटेजमध्ये कैद झाला आहे. हे फुटेज पोलिसांना मिळाले असून, त्याआधारे सोमवारी रात्री उशिरा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येत होता. या टोळीने आणखी कोणाकडे खंडणीची मागणी केली असल्यास त्यांनी गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त राजेंद्र जोशी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी करणाऱ्या चोराला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

विश्रांतवाडी परिसरात बंद घरे फोडून धुमाकूळ घालणाऱ्या एका टोळीच्या आरोपीला पाठलाग करून स्थानिक पोलिसांनी जेरबंद केले. अंधाराचा फायदा घेत टोळीतील तीन आरोपी पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

सुनील ऊर्फ बापू ऊर्फ सोनाबा रामदास पवार (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याचे इतर तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. या प्रकरणी पोलिस कर्मचारी प्रदीप परीट यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे पोलिस निरीक्षक नारायण साबळे रविवारी रात्री परिसरात गस्त घालत होते. या दरम्यान शांतिनगर भागात राहुल अपार्टमेंटमधील घरात चोर शिरले असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून विश्रांतवाडी पोलिस स्टेशनला देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी राहुल अपार्टमेंटला घेराव घातला. पोलिस कर्मचारी तिसऱ्या मजल्यावर आरोपींना पकडण्यासाठी गेले असता, सुनील याने पोलिसांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला.पोलिसांना पाहताच टोळीतील तीन जण अंधाराचा फायदा घेऊन सोसायटीच्या भिंतीवरून उडी मारून निसटले. सुनील पळून जात असता, त्याला पकडण्यात आले.

सुनील आणि त्याचे तीन साथीदार रविवारी परिसरातील चार बंद घरफोड्या करून राहुल अपार्टमेंटमध्ये आले होते. आधीच्या घरफोड्यांमध्ये किमती माल न मिळाल्याने त्यांनी राहुल अपार्टमेंटमध्ये घरफोडी केली होती, अशी माहिती साबळे यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून त्यांनी केलेल्या विविध गुन्ह्यांबाबत अधिक चौकशी करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीडितांना आर्थिक मदत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

इंदापूरमधील लाखेवाडीत झालेल्या हल्ल्यातील पीडितांची सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. त्यानंतर कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. लाखेवाडीत झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडित कुटुंबाला कांबळे यांनी एक लाख २० हजार रुपयांची मदत तातडीने जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे इंदिरा आवास योजनेतू एक घर बांधून देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शेतातील ज्या रस्त्यावरून वाद झाला आहे, तो रस्ता देखील सामाजिक न्याय विभागाकडून डांबरीकरण करून देणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी जाहीर केले आहे. या वेळी दलित संघटनेतील कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्र्यांच्या भेटीमुळे व्हीआयपी ट्रीटमेंट

लाखेवाडीतील दलित कुटुंबावर झालेल्या हल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळत व्यक्त असतानाच इंदापूरमधील उपजिल्हा हॉस्पिटलने जखमेवर मीठ चोळण्याचेच काम केले आहे. इंदापूरच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर या पीडितांना चार दिवस रक्ताने माखलेल्या कपड्यांवरच ठेवण्यात आले होते. मात्र, कांबळे यांच्या भेटीचे वृत्त समजताच पीडित कुटुंबाला व्हीआयपी ट्रीटमेंट देणे सुरू केले. त्यापूर्वी साधे पांघरूण देण्याचे सौजन्यही हॉस्पिटलने दाखवले नसल्याचा आरोप जखमींनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी भटकंती; देशी दारू जागोजागी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

बारामती शहर व संपूर्ण तालुका परिसरात अवैध दारूधंदे बोकाळले आहेत. या परिसरात पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे आणि देशी, गावठी दारू मात्र अगद सहज उपलब्ध आहे असा संतापजनक चित्र दिसून येते आहे.

ठिकठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीखाली, भंगाराची दुकाने, लहान-मोठी हॉटेल्स, पानाच्या टपऱ्या इत्यादी ठिकाणी हा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. पोलिसांच्या कारवाईचा कोणताही धाक या अवैध दारूविक्रेत्यांना राहिलेला नाही. बारामती शहरांत सार्वजनिक स्वच्छतागृहातून पडणाऱ्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच दिसून येतो आहे.

मध्यंतरी पोलिसांनी विविध ठिकाणी छापा टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, उत्पादन शुल्क आणि पोलिस यांच्यात समावेश नसल्याने संयुक्त कारवाई अशक्य झाली आहे.

बारामती परिसरातील अवैध दारू व्यवसायाचे खऱ्या अर्थाने उच्चाटन करायचे असल्यास उत्पादन शुल्क आणि पोलिसांनी मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यासाठी स्वतंत्र मोहीम आखून बेकायदा दारूच्या बेकायदा पुरवठादारांना अटक करण्याची गरज आहे. त्याशिवाय दारूविरोधी जनजागृती करण्याची आवश्यकताही दिसून येत आहे. मुंबईत गावठी दारूने शंभर बळी घेतल्याची घटनेच्या पार्श्वभूमीवर देशी आणि गावठी दारू विक्री आणि उत्पादनाची अवैध केंद्रे बंद करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली.

अवैध दारू धंद्याविरोधात धडक मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. या कारवाईत कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.

- राजेद्र मोरे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेल्ह्यात अपुरे आरोग्य कर्मचारी

$
0
0

भोर : वेल्हे ग्रामीण हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे ग्रामीण भागात मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या रांगा लावून उपचारांसाठी ताटकळत राहण्याची वेळ रुग्णांवर ओढवली आहे. वैद्यकीय अधिकारी वेळेत हजर नसल्यामुळे मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून आले.

सध्या विविध १५ पदे रिक्त आहेत आणि येथे काम करणारे एक डॉक्टर दीर्घ मुदतीच्या रजेवर आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेकडे ग्रामपंचायतीतर्फे सातत्याने पत्रव्यवहार केला जात आहे. मात्र, त्याबाबत जिल्हा परिषदेकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याचे समोर आले.

वेल्ह्यातील ग्रामस्थांना आरोग्यसेवेसाठी तासच्या तास वाट पाहायला लागत आहे. या ठिकाणी असणारे डॉक्टर वेळेवर हजर राहत नाहीत, तसेच या आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा भासत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. रुग्णांसाठी निवारा केंद्र उभारावे अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘१०८’ अॅम्ब्युलन्स पालखी मार्गावरही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्ह्यातील पालखी महामार्गावर वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी यंदाच्या वर्षीही तातडीच्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या १०८ च्या अॅम्ब्युलन्स रस्त्यावर धावणार आहेत. जिल्ह्यात सुमारे ६० पेक्षा अधिक अॅम्ब्युलन्सची सेवा तैनात करण्यात येणार आहे. त्याशिवाय आजपासून (बुधवारी) पालखी मार्गावरील सर्व हॉटेल, पाणीसाठ्याची तपासणी करण्यात येणार आहे.

देहू आणि आळंदी येथून पंढरीच्या विठुरायाच्या भेटीला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या बरोबर 'गोल्डन अवर्स'मध्ये तातडीचे उपचार देणारी राज्याच्या आरोग्य विभागाच्या 'इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस' अर्थात १०८ ची अॅम्ब्युलन्स देखील देहू, आळंदी येथून थेट पंढरपूरपर्यंत धावणार आहे. या मार्गावर सुमारे ६० ते ६५ अॅम्ब्युलन्स कार्यरत राहणार आहेत. 'पालखी सोहळ्याच्या पहिल्या दिवसापासून देहू आणि आळंदी या दोन्ही मार्गांवर स्वतंत्रपणे अॅम्ब्युलन्स सेवा देणार आहेत,' अशी माहिती या सेवेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक विनय यादव यांनी 'मटा'ला दिली.

देहू, आळंदी येथे तसेच पुण्यात मुक्कामी पालखी असताना सात ते आठ अॅम्ब्युलन्स सेवेत असणार आहेत. त्याशिवाय पुणे ते पंढरपूर मार्गावर ज्या ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम असेल, त्या ठिकाणी काही अॅम्ब्युलन्स सेवेत राहणार आहेत. प्रत्येक अॅम्ब्युलन्समध्ये एक डॉक्टरासह वैद्यकीय कर्मचारी सेवेला असणार आहेत. पंढरपूर पालखी सोहळ्यात काही दिवस १० ते ११ अॅम्ब्युलन्स सेवेत राहणार आहेत. पालखी दरम्यान कोणत्याही वारकऱ्याला त्रास झाल्यास तातडीने उपचार केले जातील. हॉस्पिटलमध्ये दाखल करणे गरजेचे असल्यास नजीकच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

पालखी मार्गावर सात ते आठ अॅम्ब्युलन्स तैनात.

प्रत्येक अॅम्ब्युलन्समध्ये एक डॉक्टरासह वैद्यकीय कर्मचारी

सर्व हॉटेल, पाणी साठ्यांचे शुद्धीकरण यांची तपासणी.

वारकऱ्यांवर उपचाराकरिता ८४ आरोग्य पथके तैनात.

पथकात डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, फार्मसिस्ट अशा चार जणांचा समावेश असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारीचा मार्ग झाला मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , हडपसर

हडपसर-सासवड पालखीच्या या मार्गावरील अतिक्रमणांवर बांधकाम विभागाने कारवाई केली. रस्त्यांचे रुंदीकरण झाले असले, तरी या सर्व रस्त्यांवर अतिक्रमण झाले होते. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत होती. या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमण कारवाईमुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. अतिक्रमणे हटवताना कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तुकाई दर्शन, सत्यपुरम सोसायटी ते फुरसुंगी मंतरवाडी चौकादम्यान रस्त्याच्या कडेला असणारी चायनीज दुकाने, फळ विक्रते, खाद्यपदार्थांच्या टपऱ्या, हातगाड्या, होर्डिंग्ज आदी ३५० अतिक्रमणांवर बांधकाम विभागातर्फे कारवाई करण्यात आली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय ठुबे व अधिकारी, हडपसर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक भूषण पवार व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images