Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्रवाशांना मारहाण; चौघे अटकेत

$
0
0

पुणे : पुणे ते लोणावळा लोकलमध्ये मध्यरात्री प्रवाशांना मारहाण करून जखमी करणाऱ्यांना चौघांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. यात एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहदेव अभिमान सरोदे (२३, रा. चिंचवड), साई विठ्ठल शिंदे (२७ रा. चिंचवड), सलीम उर्फ बादशहा बाबू तांबोळी (२५, रा. शांतीनगर येरवडा) आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ७५० रुपयांचा माल जप्त केला. रेल्वे पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, पोलिस निरीक्षक अरुण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लुईस मकासरे, नानाभाऊ मापारी, पोलिस कर्मचारी संजय सोनावणे, भानुदास पवळे, उमेश बागली, धनंजय दुगाने यांच्या पथकाने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिबट्याची सुखरूप सुटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जुन्नर

जुन्नर तालुक्यातील बोरी येथील जाधववाडी शिवारातील विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाने सुखरूप सुटका केली. गेल्या महिन्याभरात बिबट्या विहिरीत पडण्याची ही तिसरी घटना आहे. गावातील दत्तात्रय घोलप यांच्या विहिरीत शुक्रवारी मध्यरात्री बिबट्या पडला. विहिरीतील पाइपला धरून तो बसला होता. घोलप यांना सकाळी बिबट्या दिसल्यावर त्यांनी लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एन.बनसोडे यांना माहिती दिली. माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राचे रेस्क्यू पथक आणि वनकर्मचाऱ्यांनी विहिरीत लाकडी फळी सोडून बिबट्याला बसण्याचा आधार दिला. थोड्या वेळात एक पिंजरा विहिरीत सोडला. बिबट्या पिंजऱ्यात जाताच वनमजूर धोंडू कोकणे यांनी पिंजऱ्याच्या दरवाजाची दोरी ओढली. त्यामुळे तो जेरबंद झाला. डॉ. अजय देशमुख, महेंद्र ढोरे, वनरक्षक कोकाटे यांच्या पथकाने बिबट्याची सुटका केली. हा बिबट्या पाच वर्षे वयाचा नर आहे. त्याला माणिकडोहच्या निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. निवारा केंद्रातील बिबट्यांची संख्या आता ३५ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदापुरात दलित कुटुंबावर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बारामती

इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे शेतजमीन व रस्त्याच्या जुन्या वादातून एका दलित कुटुंबावर शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात विलास भिंगारदिवे यांच्या कुटुंबातील महिला व मुलांसह ११ जण जखमी झाले असून, त्यापैकी तीन जण गंभीर आहेत. या प्रकरणी आरोपींवर अॅट्रॉसिटीसह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विलास रघुनाथ भिंगारदिवे (वय ५०), जानकी विलास भिंगारदिवे (४५), रघुनाथ दादा भिंगारदिवे (७०), दिलीप विलास भिंगारदिवे (१९), प्रदीप विलास भिंगारदिवे (२९), जया समाधान कांबळे (३५), समाधान मल्हारी कांबळे (४०), पुष्पा प्रदीप भिंगारदिवे (२५) तसेच तीन मुलेही जखमी झाली आहेत. त्यांच्यावर बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत आहेत. प्रदीप, दिलीप आणि समाधान यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना इंदापूर जिल्हा उपरुग्णालयाध्ये दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी विलास भिंगारदिवे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून, राजेंद्र उर्फ राजू बाळकृष्ण शिंगाडे, संजय बाळकृष्ण शिंगाडे, किरण दीपक खुरंगे, महादेव पांडुरंग खुरंगे, विलास पांडुरंग खुरंगे यांच्यासह १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्यापपर्यंत एकाला अटक करण्यात आली असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मोरे यांनी सांगितले.

या गुन्ह्यात आरोपींनी लोखंडी खिळे ठोकलेली लाकडी दांडकी, लोखंडी पाईप तसेच गजाचा मारहाणीसाठी वापर केला. गुन्ह्यात वापरलेले साहित्य पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले आहे. भिंगारदिवे कुटुंब बावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असतानाच संशयित आरोपींनी त्यांच्या घरालगतची स्वयंपाकाची झोपडी पेटवून दिली.

भिंगारदिवे वस्तीनजिक असलेल्या जमिनीत काही धनदांडग्यांनी अतिक्रमण केल्याच्या तसेच रहदारीचा रस्ता अडविल्याच्या कारणावरून विलास भिंगारदिवे यांचा किरण खुरंगे व शिंगाडे यांच्यामध्ये वाद होता. त्यातूनच हा प्रकार घडला. या घटनेच्या निषेर्धाथ लाखेवाडी येथे बंद पाळण्यात आला, तर इंदापूर पोलीस ठाण्यासमोर पुणे-सोलापूर महामार्गा वर आंदोलकांनी 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. बावडा पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक निरीक्षक प्रशांत काळे यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करून निलंबित करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

नेमका प्रकार काय?

भिंगारदिवे वस्तीनजिक असलेल्या जमिनीत काही धनदांडग्यांनी अतिक्रमण केल्याच्या तसेच रहदारीचा रस्ता अडविल्याच्या कारणावरून विलास भिंगारदिवे यांचा किरण खुरंगे व शिंगाडे यांच्यामध्ये वाद होता. त्यातूनच हा प्रकार घडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सराफांनी एलबीटी बुडविला नाही’

$
0
0

पुणे : शहरातील पन्नास सराफ व्यावसायिकांनी स्थानिक संस्था कर (एलबीटी) बुडविल्याचा आरोप पालिकेसह आ​णि प्रदेश काँग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी केल्याने 'सराफ असोसिएशन' आणि पालिकेत वादाची ठिणगी पडली आहे. जूनपर्यंत आम्ही सर्वांनी 'एलबीटी' भरला असून, आमच्याविरोधात षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप सराफ असोसिएशनने केला आहे.

कॉँग्रेसचे संजय बालगुडे यांनी शहरातील सराफांनी एलबीटी बुडविल्याचा आरोप शुक्रवारी​ पत्रकार परिषदेत केला होता. त्यावेळी ५० सराफांची नावे जाहीर करून दुकानांसमोर बँड वाजविण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. या संदर्भात असोसिएशनने शनिवारी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. या वेळी फत्तेचंद रांका यांनी सराफांनी भरलेली 'एलबीटी'ची चलने दाखवली.

'शहरातील ५० पैकी ३१ हे सराफ असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यांनी एलबीटी भरला आहे. २०१२-१३ मध्ये सोन्यावर शेकडा तीन रुपये प्रमाणे जकात होती. त्यानुसार २५ कोटी रुपये रक्कम जमा झाली होती; परंतु २०१३-१४ मध्ये बुलियन सोन्यावर प्रति शेकडा १० पैसै आणि सोन्याच्या दागिन्यांवर प्रति शेकडा ५० पैसे लावण्यात आला होता. त्यामुळे ६ कोटी रुपये कर जमा झाला. एलबीटी प्रमुखांनी महापालिका तसेच आयुक्तांना चुकीची माहिती दिली आहे. व्यापाऱ्यांनी भाजपाला पाठिंबा दिल्यामुळेच आमच्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले आहे,' असेही रांका यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रमात येणार?

$
0
0

पुणे : आपत्ती व्यवस्थापन हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा राज्य सरकारचा विचार असून, त्यासाठी स्वतंत्र दहा गुण देण्याचा प्रस्ताव आहे. या संदर्भात लवकरच शालेय शिक्षण विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय परिषदेत ही माहिती दिली. राज्यात कधी व कोणती नैसर्गिक आपत्ती येईल याची कल्पना देता येत नाही. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपली संपर्क यंत्रणा आणि मदतनीसांची फौज तयार ठेवावी, अशीही सूचना त्यांनी या वेळी केली.

पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात माळीण येथे भूस्खलनाची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे दरड कोसळण्याच्या धोका असलेल्या भागांचा अभ्यास करण्यात यावा. मुंबई उपनगर परिसरातील अशी धोकादायक ठिकाणे तपासून त्याबाबत काळजी घेण्यात यावी. मुंबई व उपनगरांतील टेकड्यांवर बांधकामे झाली आहेत. तेथे राहणाऱ्या नागरिकांचा जीव वाचवणे महत्त्वाचे असल्याने त्या संदर्भात उपाययोजना करण्यात याव्यात, असेही महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे सेवा अद्याप विस्कळितच

$
0
0

पुणे : इटारसी येथे रेल्वेच्या सिग्नल चॅनेलच्या दुरुस्तीच्या कामामुळे गाड्या रद्द होण्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय सुरू आहे. येत्या रविवारपासून शुक्रवारपर्यंत वसई मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिग्नल चॅनेलला लागलेली आग, जोरदार पावसामुळे ट्रॅकवर साचलेले पाणी आणि ट्रॅकवर झाड पडल्याच्या घटनांमुळे रेल्वे सेवा वारंवार विस्कळित होत आहे. त्यामुळे प्रवाशांसह प्रशासनाही हैराण झाले आहे. वसई मार्गावरील गाड्यांच्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे गाड्यांची चौकशी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहकांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सध्याचा कमी झालेला इंधन आकार गृहित धरण्याऐवजी राज्य वीज नियामक आयोगाने एप्रिलमधील वाढीव आकार गृहित धरल्याने वीज दरवाढीच्या आदेशात आकड्यांचा खेळ करून फसवणूक झाल्याची टीका ग्राहक प्रतिनिधींनी शनिवारी केली. त्यामुळे सध्या ही दरवाढ किरकोळ दिसत असली, तरी नवी वीजबिले आल्यावर खरी दरवाढ ग्राहकांसमोर येईल, असे या प्रतिनिधींनी म्हटले आहे.

महावितरणने सादर केलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावावर आयोगाने शनिवारी आदेश काढला. यामध्ये गृहित धरलेला इंधनाचा आकार यंदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशा प्रकारे महावितरण किंवा राजकीय पुढाऱ्यांनी आकड्यांचे खेळ करून खरी दरवाढ लपविल्यास समजण्यासारखे आहे; पण आयोगासारख्या निःपक्षपाती संस्थेने त्यामध्ये सहभागी का व्हावे, असा सवाल सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केला. दरम्यान, आयोगाने चुकीच्या आकड्यांवर आधारीत आदेश काढल्याने वीजबिले आल्यावरच ग्राहकांसमोर सत्य उजेडात येईल, असे महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी म्हटले आहे. वीज नियामक आयोग आणि ग्राहक प्रतिनिधींच्या या उलटसुलट दाव्यांमुळे संभ्रम वाढला असून, नवी बिले आल्यावरच नेमका फरक समोर येणार आहे.

दरम्यान, महावितरणने या याचिकेमध्ये चार हजार ७१७ कोटी रुपयांची संचित महसुली तूट दाखविली होती. मात्र, आयोगाने हा आकडा फेटाळला असून उलट तीन हजार ३७६ कोटी रुपयांची महसुली शिल्लक दाखविली आहे. तसेच, वीजखरेदीवरील सव्वापाच हजार कोटी रुपयांचा खर्च आयोगाने मान्य केलेला नाही. तसेच विविध कारणांसाठी महावितरणला विलंब आकार द्यावे लागल्याचा भुर्दंड ग्राहकांवर लादल्याबाबत आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मर्कट तस्कराची गाडी जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वरंधा घाटात निर्दयपणे माकडाचे अपहरण करणाऱ्या तस्कराचे धागेदोरे सासवड आणि पुण्यापर्यंत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या तस्कराचे टोपणनाव दादा असून, तो सासवडजवळच्या भिवडी (ता. पुरंदर) इथला रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. भोर पोलिसांनी 'एमएच १२, १७७७' या क्रमांकाची त्याची गाडी जप्त केली आहे.

वरंधा घाटातून निर्दयपणे माकडाच्या हाताला तार बांधून त्याला फरपटत गाडीत कोंबणारा हा तस्कर आणि त्याच्या सहकाऱ्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर आल्याने खळबळ माजली. चार ते पाच दिवसांतच सुमारे दहा हजार लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर वनविभाग आणि भोर पोलिसांनी कसून या तस्कराचा शोध सुरू केला.

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तस्कराची माहिती मिळाल्यावर सासवड परिसरात शोध घेत असताना त्याची गाडी भिवडी गावाजवळच्या ढाब्यावर आढळून आली. तो तिथलाच रहिवासी असल्याचेही कळले. पोलिस येत असल्याचे कळताच त्याने पळ काढला. या ढाब्यावर त्याने विविध प्रकारचे वन्यजीव अनधिकृत पद्धतीने ठेवलेले आहेत. वरंध्यातून पकडून आणलेले माकडही इथेच डांबून ठेवलेले आढळले. त्याची गाडी जप्त केली असल्याचे पोलिस इन्स्पेक्टर खोत यांनी सांगितले.

भोर वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यातील कलम नऊनुसार या तस्करावर वन्यजीवांची तस्करी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती भोरचे उपविभागीय वनाधिकारी राजेश्वर सातेलीकर यांनी दिली. वरंध्यातून माकडाचे अपहरण करणारा तस्कर हा स्वयंघोषित सर्पमित्र असल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. विविध वन्यजीव त्याने त्याच्या ढाब्यावर हौस म्हणून पाळल्याची माहिती पोलिस देत आहेत.

धनकवडे नावाने गाडी रजिस्टर

वरंध्यातून माकडाची फरपट करणाऱ्या तस्कराने वापरलेली एमएच १२, १७७७, ही पांढऱ्या रंगाची आय २० गाडीचे रजिस्ट्रेशन पुण्यातले असून ती धनकवडे नावाने रजिस्टर असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस आणि वनविभाग अशा दोघांनाही आरोपीचे धागेदोरे मिळाले असले तरी, ही कारवाई संयुक्तपणे होणार की कशी, याबबत अद्याप संभ्रम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१३ हजार विद्यार्थी नॉट रिपोर्टेड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील अकरावी प्रवेशाच्या पहिल्याच टप्प्यामधून १२,९३३ विद्यार्थी प्रक्रियेच्या बाहेर गेल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. या विद्यार्थ्यांनी कॉलेज पातळीवर प्रवेशासाठी नोंदणीच न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचवेळी अनेक विद्यार्थ्यांनी ऑफलाइन प्रवेश घेतल्यानेही 'नॉट रिपोर्टेड' राहणे पसंत केल्याची धक्कादायक माहिती प्रवेश समितीकडून मिळाली आहे.

अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीतून मिळालेले प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना शनिवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पहिल्या यादीतून कॉलेज निश्चित झालेल्या एकूण ५५,०२० विद्यार्थ्यांपैकी ४१,८०५ विद्यार्थ्यांनीच या मुदतीच्या दरम्यान मिळालेल्या कॉलेजमध्ये तात्पुरते प्रवेश घेतले. अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीने या पूर्वीच जाहीर केलेल्या धोरणानुसार या विद्यार्थ्यांनाच आता बेटरमेंटचाही लाभ मिळणार आहे. समितीच्याच धोरणानुसार, या मुदतीत कॉलेजमध्ये प्रवेश न घेता 'नॉट रिपोर्टेड' राहिलेले एकूण १२,९३३ विद्यार्थी मात्र आता प्रवेशाच्या बाहेर फेकले गेले आहेत. समितीने शनिवारी सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली. प्रक्रियेच्या बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अकरावी सायन्ससाठी प्रवेश अर्ज भरलेल्या ५२६० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कॉमर्सला (इंग्रजी माध्यम) प्रवेश घेऊ इच्छिणारे २९९७ विद्यार्थीही नॉट रिपोर्टेड राहिल्याने प्रक्रियेच्या बाहेर गेले.

ऑफलाइन प्रवेशांचा घोळ कायमच

नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येविषयी अकरावी प्रवेश समितीकडे विचारणा केली असता, अनेक विद्यार्थ्यांनी कॉलेज पातळीवर ऑफलाइन प्रवेश घेतल्याची माहिती मिळाली. विद्यार्थ्यांच्या फोन कॉल्समधूनच ही माहिती समितीला मिळाली. हव्या त्या कॉलेजला प्रवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रक्रियेतून अंग काढून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज दरवाढीचा झटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सर्वसामान्य घरगुती ग्राहकांना दोन ते आठ टक्क्यांपर्यंतची वीज दरवाढ करण्याचा आदेश राज्य वीज नियामक आयोगाने शनिवारी दिला; तसेच उद्योगक्षेत्रालाही वीज दरवाढीतून दिलासा देण्यात आला आहे. मात्र, हा आदेश देताना आयोगाने एप्रिलमधील वाढीव इंधन आकार गृहित धरला आहे. त्यामुळे कागदोपत्री अत्यंत किरकोळ दरवाढ दिसत असली, तरी प्रत्यक्षात सध्याच्या बिलाच्या तुलनेत वीजग्राहकांना सुमारे पंधरा टक्के दरवाढीचा फटका बसेल, असा आरोप ग्राहक संघटनांकडून करण्यात आला आहे. एक जूनपासून सुधारीत वीजदर लागू करण्यात येणार आहेत.

महावितरणने सादर केलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावावर राज्य वीज नियामक आयोगाने शनिवारी आदेश दिला. त्यामध्ये घरगुती ग्राहकांना स्थिर आकारात वाढ करण्यात आली आहे, तर तीनशे युनिटपर्यंत दरमहा वीजवापर असलेल्या ग्राहकांच्या इंधन आकारात कपात करण्यात आली आहे; तसेच व्यावसायिक, औद्योगिक अशा सर्व घटकांमधील ग्राहकांच्या स्थिर आकारात वाढ करण्यात आली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत उद्योगांचे वीजदर अधिक असल्याने उद्योग राज्याबाहेर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.

त्या पार्श्वभूमीवर उद्योगांच्या वीजदरातील उर्जा आकारात ४० पैसे ते एक रुपया २१ पैशांनी कपात करण्यात आली आहे. मात्र, उद्योगांना रात्रीच्या वीजवापरावर देण्यात येणारी सवलत दुसरीकडे घटविण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, रेल्वे सेवाक्षेत्र आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला वीजदरांत दिलासा दिला आहे. मात्र, आयोगाचा हा आदेश वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वीज दरवाढीबाबत निर्णय देताना आयोगाने एप्रिलमधील इंधनाचा आकार गृहित धरून ही वाढ दिली आहे. एप्रिलमध्ये इंधनाचा आकार अधिक होता, त्यामुळे वाढीव आकड्यांवर दिलेली वाढ किरकोळ भासत असली, तरी सध्या इंधनाचा आकार कमी झाला आहे, त्यामुळे या तुलनेत ही वाढ प्रत्यक्षात पंधरा टक्क्यांपर्यंत जाईल, अशी टीका ग्राहक संघटनांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा भाडेदरात एक रुपयाने वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील रिक्षांच्या भाडेदरात एक जुलैपासून एक रुपयाने वाढ करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतला असून, आता पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी प्रवाशांना अठरा रुपये मोजावे लागणार आहेत.

पहिल्या दीड किलोमीटरनंतर पुढच्या प्रत्येक किलोमीटर अंतरासाठी ६६ पैशांची दरवाढही मंजूर करण्यात आली आहे. यापूर्वी त्यासाठी ११ रुपये ६५ पैसे आकारण्यात येत होते. आता १२ रुपये ३१ पैसे या दराने मीटर भाडे आकारले जाणार आहे. रात्रीच्या प्रवासासाठी आकारल्या जाणाऱ्या मूळ भाड्याच्या २५ टक्के अतिरिक्त भाडे आकारण्याच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच वेटिंग चार्जेसमध्येही बदल करण्यात आलेला नाही.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात ही भाडेवाढ १ जुलैपासून लागू होणार असली, तरी रिक्षाचालकांनी मीटरचे पुनर्प्रमाणीकरण (री-कॅलिब्रेशन) केल्याशिवाय हे सुधारित भाडे आकारता येणार नाही. रिक्षा मीटरचे पुनर्प्रमाणीकरण करण्यासाठी रिक्षाचालकांना ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. याचाच अर्थ १ जुलै ते १४ ऑगस्टपर्यंत रिक्षा मीटरचे पुनर्प्रमाणीकरण करता येणार आहे. त्यानंतर रिक्षाचालकांना दररोज ५० रुपये दंड केला जाणार आहे.

मुंबईत रिक्षा व टॅक्सीची दरवाढ झाली. त्याच धर्तीवर पुण्यात दरवाढीची मागणी करण्यात आली होती. भाडेदरात वाढ करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सौरव राव व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा भाडेदरात एक रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात जळीतकांड, ८४ वाहने खाक

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पुणे

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात ८० हून अधिक मोटरसायकली आणि ४ चारचाकी वाहने अनोळखी व्यक्तींनी जाळल्याची घटना घडली आहे. आज पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

पहाटे ३.५७ वाजताच्या सुमारास सिंहगड रोड, डोमिनोज पिझ्झाजवळ अंदाजे २९ गाड्या, ४ वाजून १० मिनिटांनी निर्मल टाऊनशिप, सूर्यनगरी, सनसिटी येथे १४ गाड्या, स्वामीनारायण सोसायटी सनसिटी येथील १८ ते २० गाड्या, अक्षय ग्लोरी सोसायटीतील ६ ते ८ गाड्या आणि अवधूत सोसायटीतील १० ते १२ गाड्या अनोळखी व्यक्तींनी जाळल्या.

या घटनेने पुण्यातील नागरिकांमध्ये दहशत आहे. यापूर्वीही पुण्यात गाड्या जाळल्याच्या घटना घडल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकच करतात विद्यार्थ्यांचा खर्च!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याची चर्चा सुरू असताना मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची गळती थोपवण्यासाठी शिक्षकांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत आहे. पुण्यातील शनिवार पेठेतील आयडिअल इंग्लिश स्कूल या मराठी शाळेतील शिक्षक गेल्या काही वर्षांपासून वर्गणी काढून विद्यार्थ्यांच्या वाहतूक व शैक्षणिक साहित्याचा खर्च करतात.

आयडिअल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ही शाळा चालवली जाते. पुण्यातील जुन्या शाळांपैकी ही एक आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांच्यासारखे विद्यार्थी याच शाळेतून घडले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. या शाळेत मुख्यतः कामगार पुतळा, पाटील इस्टेट, राजीव गांधी नगर या परिसरातील अल्प उत्पन्न गटांतील विद्यार्थी शिकतात. विद्यार्थी संख्या टिकवण्यासाठी शिक्षक एप्रिल-मे महिन्यात घरोघरी फिरून विद्यार्थ्यांची जमवाजमव करावी लागते. मुलांच्या अडचणी समजून घ्याव्या लागतात. त्यांना दप्तर, गणवेश असे साहित्य उपलब्ध करतो. काही विद्यार्थ्यांना येण्या-जाण्याचा खर्च परवडत नाही. त्यांना त्या मुलांची वाहतूक व्यवस्था केली जाते. काहींकडे भरण्यासाठी शुल्क नसते. त्यांचे शुल्क भरले जाते. हे सगळे शिक्षकांच्या वर्गणीतूनच होते, अशी माहिती प्रशालेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा काकडे व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सुरेश मुळूक यांनी 'मटा'ला माहिती दिली.

शाळेत तेरा शिक्षक कार्यरत आहेत. मागील वर्षी सर्वांनी मिळून वर्षभरासाठी सुमारे पंधरा हजार वर्गणी काढली होती. यंदा गरजू विद्यार्थ्यांची संख्या ८०च्या घरात असल्याने प्रत्येकाला सुमारे दहा हजार रुपये वर्गणी द्यावी लागणार आहे. संस्थेकडूनही पूर्ण सहकार्य मिळते. मात्र, तरीही शिक्षकांना प्रयत्न करावेच लागतात. काही सेवाभावी संस्थांनी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. सरकारी पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न सुटला आहे, असेही त्यांनी सांगितले. सेमी इंग्लिशमुळे मराठी माध्यमाच्या शाळांची स्थिती कठीण होत आहे. या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करतानाच शिक्षक अधिकचे वर्गही घेतात. त्यामुळे शाळेचा दहावीचा निकालही नेहमी चांगला असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सरविरोधात सर्व पॅथींनी एकत्र यावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'पॅथींमध्ये भेदभाव न ठेवता पेशंट हा केंद्रबिंदू मानून डॉक्टरांनी उपचार करावेत. कॅन्सरसारख्या असाध्य आजाराविरोधात लढा देण्यासाठी सर्व पॅथीच्या डॉक्टरांनी एकत्र येऊन उपचार करावेत,' असे आवाहन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केले.

मल्टी डिसीप्लीनरी अॅप्रोचतर्फे कर्करोगावरील निदान आणि उपचार पद्धती याविषयावर सर्व पॅथीतील तज्ज्ञांसाठी राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, उषा काकडे, डॉ. राजेंद्र खेडेकर, डॉ. जे. डी.पाटील, डॉ.अनंत बागुल, डॉ.संजय गव्हाणे, डॉ.धर्मेंद शहा आदी या वेळी उपस्थित होते.

'पेशंट हा केंद्रबिंदू असावा. कोणतीही पॅथी केंद्रबिंदू नसावी. कोणत्याही पॅथीने आजारावर उपचार होत असतील तर ती पॅथी चांगली. त्यामुळे सर्वच पॅथींचे उपचार दिल्यावर आजार बरे होतात असे अनुभव आहेत. त्यामुळे सर्व पॅथींचा एकत्रित विचार करायला हवा. डॉक्टरांना आपले स्वार्थ, अहंकार बाजूला ठेऊन पेशंटच्या हितासाठी एकत्र आले पाहिजे. सर्व पॅथींची पुण्यात परिषद झाली त्या प्रमाणे आयुष मंत्रालयाने अशी परिषद देश आणि राज्यपातळीवर घ्यावी. तसेच केंद्रात आयुष मंत्रालयाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही स्वतंत्र आयुष विभाग स्थापन करावा', अशी अपेक्षा माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केली.

केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, 'कॅन्सरसारख्या आजारावर आयुर्वेदाचे उपचार मिळत आहेत. आयुर्वेदातील पंचकर्म, रसायनचिकित्सा यांचा संशोधनासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. आयुर्वेदातील सदाफुली, अश्वगंधा, सीताफळ, नील पुष्पीसारखी काही औषधे कॅन्सरवर उपयुक्त आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीपच्या धडकेत दोन बहिणींचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

वडगाव मावळ येथे रस्ता ओलांडताना हंटर जीपची धडक बसून दोन बहिणींचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजता वडगाव येथील महादजी शिंदे स्मारकाजवळ घडली. आरती सोमनाथ पवार (वय १३) व करीना सोमनाथ पवार (८, दोघी रा. वडगाव मावळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोहार समाजातील पवार कुटुंब वडगाव येथे जुन्या मुंबई- पुणे राष्ट्रीय मार्गा लगत असलेल्या महादजी शिंदे स्मारकाजवळ रहात आहे.

आरती आणि करीना रविवारी सकाळी काही कामानिमित्त रस्ता ओलांडत असताना एका जीपची त्यांना धडक बसली. या धडकेत करीनाचा जागीच तर आरतीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेत दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाल्यामुळे वडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी जीपच्या चालकाला ताब्यात घेतले असून, या घटनेचा पुढील तपास वडगाव पोलिस करीत आहे. दरम्यान, या बहिणींना ठोकरणारा वाहन चालक सैयद मुर्तजा अलिहुसेन (सध्या रा. लोणावळा, मूळ हैदराबाद) याला पोलिसांनी अटक केली आहे.

भुशी डॅममध्ये बुडून पर्यटकाचा मृत्यू

लोणावळाः लोणावळ्यात मित्रांसमवेत वर्षाविहार व पर्यटनासाठी आलेल्या उल्हासनगर येथील युवक पर्यटकाचा भुशी डॅममध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजता घडली आहे. या वर्षीच्या पावसाळा मोसमातील भुशी डॅममधील पहिली तर दहा वर्षांतील ५८ वी घटना आहे. अमोल अनिल चव्हाण (२२, रा. विठ्ठलवाडी, उल्हासनगर, ठाणे) असे भुशी डॅममध्ये बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो उल्हासनगर येथील एका खासगी कंपनीत कामाला होता.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल आणि त्याची चार ते पाच मित्र सकाळी लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आले होते. ते दुपारी भुशी डॅम येथील पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेत होते. या वेळी अमोल पोहता येत नसतानाही भुशी डॅमच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला. पोहताना त्याला दम लागल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या ठिकाणी असलेले जीवरक्षक साहेबराव चव्हाण व राजू मराठे यांनी त्याला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो खोल पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी चव्हाण व मराठे यांच्या मदतीने अमोलचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलिस करीत आहे.

वाकडमध्ये खाणीत दोन मुले बुडाल्याची भीती

वाकडमधील ममता जकात नाका येथील दगडाच्या खाणीमध्ये रविवारी (२८ जुन) दुपारी दोन मुले बुडाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खाणीबाहेर मिळालेल्या कपड्यांवरून ही शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस आणि अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून शोधकार्य सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वाकड काळाखडक येथील ममता जकात नाक्याजवळ एक दगडाची खाण आहे. पावसामुळे ती खाण पूर्णपणे पाण्याने भरल्याने अनेकजण त्या ठिकाणी पोहण्यासाठी येतात.

रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास काही महिलांना खाणीबाहेर दोन मुलांचे कपडे दिसले. तसेच काही वेळापूर्वी खाणीच्या खड्ड्यात काहीतरी पडल्याचा आवाज या महिलांनी ऐकलेला होता. त्यामुळे खाणीमध्ये मुलांनी उडी मारली असल्याची शंका महिलांना आली. य घटनेबाबत महिलांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर या प्रकणी वाकड पोलिस व रहाटणी अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशीरापर्यंत या मुलांचा शोध घेण्याो काम युद्धपातळीवर सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

जमिनीच्या कारणावरून झालेल्या वादातून आठ जणांनी मिळुन एकावर धारदार शस्त्राने वार करत खून केला. पिंपळे गुरव गावठाणामध्ये शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. इनायतुल्ला शेख (४६, रा. पिंपळे गुरव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी शब्बीर शेख, कयूम शेख, कौसीफ शेख, शोयेब जावेद, बबलू शेख, जावेद शेख, शमुशुद्दीन शेख आणि सलमान शेख (सर्व रा. दापोडी) या आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनायतुल्ला व आरोपींमध्ये पिंपळेगुरवमधील तीन गुंठ्याच्या एका प्लॉटवरून वाद होता. या कारणामुळे त्यांच्यात यापूर्वीसुद्धा वाद झाले होते. शब्बीर शेख याने बनावट खरेदी खत तयार केले असल्याचा गुन्हा भोसरी पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, शुक्रवारी शब्बीर शेख व त्याचे साथीदार इनायतुल्ला याच्या मागावर होते. रात्री साडेदहाच्या सुमारास पिंपळेगुरव गावठाणातील शालिमार हेअर ड्रेसर्स या सलूनमध्ये इनायतुल्ला आला असता, आरोपींनी त्याला तेथेच गाठले. तेथे धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात, छातीवर, हातावर वार करण्यात आले. जखमी अवस्थेतील इनायतुल्ला याला प्रथम कासारवाडीतील एका खासगी रुग्णालयात व तेथून पिंपरी महापालिकेच्या वायसीएमएचमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्त वाहनांवर चिंचवडला कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन परिसरात असलेल्या नो- पार्किंग झोनमध्ये रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या वाहनांवर चिंचवड पोलिसांनी शनिवारी (२७ जुन) रात्री आठच्या सुमारास कारवाई केली. यामध्ये अनेक गाड्यांना जॅमर लावण्यात आला. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशन परिसरात पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या जयहिंद शोरूम व विजय सेल्ससमोरच रस्त्याच्याकडेला असलेल्या नो पार्किंग झोनमध्ये बेशिस्तपणे अनेक चारचाकी वाहने लावण्यात येतात. त्यांच्यावर वारंवार कारवाईसुद्धा केली जाते. या गाड्यांमुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.

याबाबत 'मटा'ने फोटोसहत बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत वाहतूक शाखेने शनिवारी रात्री कारवाई केली. तेव्हासुद्धा अनेक वाहनचालकांनी या ठिकाणी चारचाकी आणि दुचाकी गाड्या उभ्या केल्या होत्या. त्यामुळे वाहतूकीला अडथळा होत होता. चिंचवड वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजया कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या वेळी काही वाहनचालकांकडून दंड आकारण्यात आला, तर काही वाहनांच्या चाकातील हवा सोडण्यात आली. काही गाड्यांना जामर लावण्यात आले. यापूर्वीसुद्धा अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, यापुढे ती अधिक तीव्र करण्यात येणार आहे. कोणत्याही मॉल, हॉटेल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये जाताना नागरिकांनी तेथील वाहनतळाचा वापर करावा, असे आवाहन कारंडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार लिंकिंगकडे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मतदार ओळखपत्रे आणि आधार क्रमांकांची जोडणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विशेष मोहिमेला रविवारीही नागरिकांनी पुरेसा प्रतिसाद दिला नाही. या मोहिमेत शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील साडेसात हजार मतदान केंद्रांवर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते, परंतु, अनेक केंद्रांमध्ये मतदारांनीच याकडे पाठ फिरविली, तर काही केंद्रांवर जोडणीच्या कामासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.

मतदारयादीतील दुरुस्ती आणि त्यातील नोंदीशी आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी यांची जोडणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने देशबरात दिले आहेत. त्यासाठी मार्च ते जुलै या तीन महिन्याच्या कालावधीत राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रम (एनईआरपीएपी) मोहीम हाती घेण्यात आली आहे.यामध्ये जोडणीसह दुबार मतदार कमी करणे व यादीत दुरुस्ती करण्याचेही काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी रविवारी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील सात हजार ४७५ मतदान केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच सर्व विधानसभा मतदारसंघांची मतदार नोंदणी कार्यालये, पुणे व पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेची सर्व क्षेत्रिय कार्यालये, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, नगरपालिका येथील सर्व नागरी सुविध केंद्रांवर हे कामकाज सुरू होते. मात्र, या मोहिमेला नागरिकांचा संमिश्र प्रतिदास मिळाला. ही मोहीम येत्या ३१ जुलै रोजी समाप्त होणार आहे, त्या कालावधीत जिल्हा प्रशासन काय पावले उचलणार, याबाबत उत्सुकता आहे.

अपेक्षित उद्दिष्ट अपूर्णच

निवडणूक आयोगाने ३० जून पर्यंत मतदारयादी आणि आधार क्रमांक यांची ८० टक्के जोडणी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात जवळपास ७० लाख मतदार आहेत.यापैकी फक्त दोन लाख मतदरांनी आतापर्यंत ही जोडणी केली आहे. यासाठी प्रशासनाने जाहिरातींमधून आवाहन विशेष मोहिमांचे आयोजन अशी पावले टाकली आहेत, तरीही मतदारांनी या मोहिमेकडे पाठ फिरवली. यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या उद्दिष्टाच्या जवळपासही ही संख्या गेलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झुलत्या पुलाविषयी प्रश्नचिन्ह

$
0
0

राजगुरुनगरः भीमाशंकर अभयारण्यातील कोंढवळ धबधब्याच्या वेगवान वाहत्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या तरुणामुळे या ठिकाणी बांधण्यात आलेल्या झुलत्या पुलाच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नव्यानेच बांधलेल्या या झुलत्या पुलाचे उद ्घाटन व्हायच्या आधीच ही दुर्घटना घडल्यामुळे पर्यटकांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या धबधब्याच्या पाण्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वन्यजीव विभागाने कोणत्याही सुरक्षा उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे हा झुलता पूल पर्यटकांसाठी जीवघेणा ठरू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दर वर्षी पावसाळ्यात भीमाशंकर येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. कोंढवळ धबधबा हा पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. कितीही मज्जाव केला, तरी अतिसाहस दाखवणारे पर्यटक या झुलत्या पुलाचा वापर केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे घटनेचे गांभीर्य पाहता वन्यजीव विभागाने हा धोकादायक झुलता पूल तातडीने बंद करावा, अशी मागणी काही पर्यटकांनी केली आहे.

साहसी पर्यटनाला चालना मिळावी, या हेतूने वन्यजीव विभागाच्या माध्यमातून गेल्या वर्षी अभयारण्यातील विविध स्थळांचा विकास करण्याचे नियोजित करण्यात आले होते. याअंतर्गत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध कोंढवळ धबधब्याच्या खालील भागात मध्यभागी पाण्याच्या मुख्य प्रवाहावर झुलत्या पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. दोरखंड आणि लोखंडाचा वापर करून हा झुलता पूल बांधण्यात आला आहे. हा झुलता पूल बांधताना वन्यजीव विभागाने दूरदृष्टीचा व पर्यटकांच्या सुरक्षेचा कोणताच विचार केल्याचे दिसत नाही.

पर्यटकांना पुलावरून चालण्यासाठी पुलाच्या खालच्या बाजूला अखंड व भक्कम लाकडी फळ्यांचा आधार देण्याची गरज होती. मात्र, लाकडी फळ्यांऐवजी अतिशय कमी रुंदीच्या लोखंडी आयताकृती ट्युबचा वापर करण्यात आला आहे. दोन ट्यूबमधील अंतर साधारण एक फूट इतके आहे. दोन ट्यूब मध्ये कशाचाही आधार नाही. त्यामुळे पुलाच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला चालत जाताना पर्यटकांना जीव मुठीत घेऊनच चालत जावे लागते. प्रचंड पाऊस, दाट धुके, वेगाने वाहणारे वारे यामुळे या झुलत्या पुलावरून चालणे अतिशय धोक्याचे आहे.

महिला व लहान मुलांच्या चालण्याच्या योग्यतेचा हा झुलता पूल नक्कीच नाही. त्यातच पावसाच्या पाण्यामुळे पुलाला बांधण्यात आलेल्या लोखंडी ट्यूब निमुळत्या व निसरड्या होऊ शकतात. यदाकदाचित पुलावरून चालताना एखाद्या पर्यटकाचा पाय घसरला तर तो थेट वाहत्या पाण्यात पडेल. खालच्या बाजूला तीव्र उतारावर मोठा डोह आहे. त्यामुळे हा अपघात पर्यटकांसाठी जीवघेणा ठरू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीत डॉक्टरांची नेमकी संख्या किती?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

बारामतीत निश्चित किती डॉक्टर प्रॅक्टिस करतात याची नोंद बारामती नगरपालिकेच्या दप्तरी नाही, अशी आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे. या माहितीच्या संकलनासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात येत नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागानेही ही माहिती संकलित करण्यासाठी आणि अधिकृत डॉक्टरांची संख्या मोजण्यासाठी कोणताही पुढाकार घेतलेला नाही. आरोग्य विभागाकडे डॉक्टरांचे नाव, त्यांची पदवी, नोंदणी क्रमांक, संपर्कासाठी मोबाइल क्रमांक आणि ई-मेल असणे गरजेचे आहे. मात्र यापैकी कोणतीही माहिती पालिकेकडे नाही. बारामतीत सुमारे तीनशे डॉक्टर रुग्णसेवा करत असल्याची माहिती बारामतीतील डॉक्टर सुनील शहा यांनी दिली. सोनोग्राफी केंद्र, प्रयोगशाळा, नर्सिंग होम यांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. पण डॉक्टरांची नोंदणी सक्तीची झाली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images