Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विजेच्या लपंडावाने पुणेकर त्रस्त

$
0
0

पुणे : पावसाच्या फटक्याने शहराच्या विविध भागांमध्ये अजूनही विजेचा लपंडाव सुरूच आहे. शहराच्या काही भागांमध्ये मंगळवारी खंडित झालेला वीजपुरवठा बुधवारीही सुरळीत झाला नव्हता. कोथरूड परिसरातील खंडित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर शिवसेनेने महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला.

गेल्या चार दिवसांत शहर, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये ओव्हरहेड वीजवाहिन्यांवर झाडे आणि फांद्या कोसळून वीजवाहिन्या तुटल्या. तसेच भूमिगत वीजवाहिन्यांमध्येही पाणी शिरले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. दरम्यान, एकाच वेळी अनेक ठिकाणांहून वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी आल्याने दुरूस्तीची कामे करताना महावितरणच्या पथकांचीही धावपळ उडत आहे.

कोंढव्यात एनआयबीएम-उंड्री रोड परिसरातील दोराबजी पॅराडाइज या वसाहतीचा वीजपुरवठा मंगळवारी खंडित झाला. बुधवारी सकाळपर्यंत तो पूर्ववत झाला नव्हता. दरम्यान, पहाटे या परिसरात पर्यायी मार्गाने वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आणि बुधवारी सकाळी भूमिगत वाहिनीची दुरूस्ती पूर्ण केल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. तसेच, कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रोड, पद्मावती व अन्य भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या. काही भागातील मोठे बिघाड वगळता, वैयक्तिक बिघाडाच्या तक्रारींची संख्या मोठी असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेवर तक्रारींचा वर्षाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरात झालेल्या संततधार पावसामुळे अनेक भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले असून, जागोजागी पाणी साचल्याच्या दोन दिवसांतच पंचवीसहून अधिक तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची नोंद घेऊन उपाययोजना केल्या जात असल्याचे महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

गेल्या आठवड्यात शहरात झालेल्या संततधार पावसामुळे अनेक भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. जागोजागी पाणी साचल्याने याचे जोरदार पडसाद पालिकेत उमटले होते. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पथ विभागाच्या कामाचे वाभाडे काढून नाराजी व्यक्त केली होती. नागरिकांच्या तक्रारी येऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सभासदांनी केला होता. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या हेल्पलाइनवर गेल्या दोन दिवसांत पंचवीसपेक्षा अधिक तक्रार नोंदविल्याचे पथ विभागाने स्पष्ट केले आहे.

शिवाजीनगर, बिबवेवाडी, इंदिरानगर, कोंढवा, सॅलिसबरी पार्क, सिंहगड रोड, कात्रज, इंदिरानगर, संगमवाडी, खराडी आदी भागांतील नाग‌रिकांच्या तक्रारींचा यामध्ये समावेश आहे. पाण्याची लाइन टाकण्यासाठी खोदलेला रस्ता अद्याप दुरूस्त करण्यात आलेला नाही, रस्त्याची उंची वाढल्याने पावसाचे पाणी सोसायटीमध्ये घुसले आहे, रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत अशा तक्रारींचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निवारण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पथ विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील काही दिवसांतच या सर्व तक्रारींचे निवारण करून शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कट् ऑफ ९० टक्क्यांपुढे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहावीच्या निकालामध्ये नव्वदीच्या घरात असलेल्या विक्रमी विद्यार्थिसंख्येचा परिणाम अकरावीच्या प्रवेशांवर झाला असून, कट् ऑफ मार्क्समध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड ते दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. सायन्सच्या प्रवेशांसाठी जवळपास सर्वच प्रमुख कॉलेजांचे कटऑफ नव्वद टक्क्यांच्या वर गेले आहेत. आर्ट़्स आणि कॉमर्सचे प्रवेशही याला अपवाद नाहीत. १२,२११ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेला नाही. दुसऱ्या वा तिसऱ्या फेरीत त्यांना प्रवेश मिळेल, असे प्रवेश समितीने स्पष्ट केले आहे.

शहरातील अकरावीच्या केंद्रीय प्रवेशांसाठीची पहिली गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली. अकरावीसाठी एकूण ७५,३१४ विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाइन प्रवेश अर्ज अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीकडे सादर केले होते. या विद्यार्थ्यांपैकी ५५,०२० विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीमधून कॉलेज निश्चित करून दिल्याचे समितीचे अध्यक्ष आणि पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना गुरुवारपासून संबंधित कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे. त्यासाठी केवळ ५० रुपये फी भरून प्रवेशाची पावती घेणे गरजेचे आहे. प्रवेश निश्चितीसाठी विद्यार्थ्यांना येत्या शनिवारी सायंकाळी ४ वाजल्यापर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

प्रवेश यादी

http://pune.fyjc.org.in वर उपलब्ध

बहुतेक कॉलेजांचे कट् ऑफ ९० टक्क्यांवर

१२,२११ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश नाही

पहिल्या फेरीतील कॉलेजमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक

प्रवेशासाठी शनिवारपर्यंत मुदत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराची माहिती ‘एसएमएस’ने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मिळकतीला करआकारणी लागू झाल्यापासून ते मिळकतकरातील नावबदलाच्या नोंदीपर्यंत आणि कराचा भरणा केल्यापासून ते थकबाकी भरण्यापर्यंतची सर्व माहिती शहरातील नागरिकांना 'एसएमएस'द्वारे मोबाइल क्रमांकावर उपलब्ध होणार आहे. शहरातील सुमारे साडेतीन लाख मिळकतींना पालिकेतर्फे एसएमएस पाठविण्यात येणार असून, उर्वरित मिळकतकरदारांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. एसएमएस यंत्रणेचे उद‍्घाटन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या हस्ते बुधवारी झाले.
नव्याने करआकारणी झालेल्या मिळकतींपासून ते थकबाकीदार मिळकती आणि चेक परत गेल्यापासून ते दरमहा लावण्यात येणाऱ्या दंडापर्यंतची सर्व माहिती एसएमएस यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांना दिली जाणार आहे. पालिकेच्या यंत्रणेत अद्याप मोबाइल क्रमांकाची नोंद न करणाऱ्या नागरिकांनी पालिकेच्या वेबसाइटवरून नोंदणी करावी, असे आवाहन करआकारणी व करसंकलन प्रमुख सुहास मापारी यांनी केले. पालिकेच्या मुख्य इमारतीत आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्येही मिळकतीचा क्रमांक देऊन नोंदणी करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच प्रकरणातील फरारी आरोपी हजर

$
0
0

प्रदीप धुमाळ, रवींद्र चौधरींना कोठडी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शिक्षक बदलीसाठी दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी फरारी असलेले आरोपी प्रदीप धुमाळ आणि रवींद्र चौधरी यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. चौधरींनी गुरुवारी 'पत्नीच्या उपचारासाठी अमेरिकेला जायचे असून, कोर्टाने आपल्याला परवानगी द्यावी,' अशी मागणी केली. मात्र, कोर्टाने त्या संदर्भातील कागदपत्रांची पाहणी करून त्यांची मागणी नाकारली; तसेच धुमाळ आणि चौधरी यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करणाऱ्या एका शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. संबंधित शिक्षकाची पत्नी पुणे शिक्षण मंडळाच्या एका शाळेत शिक्षिका आहे. त्यामुळे या शिक्षकाने पुण्यात बदली मागितली होती. बदलीच्या ऑर्डरसाठी तक्रारदारांकडे दोन लाखांची मागणी केली जात होती. या प्रकरणी त्याने तक्रार केल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रदीप धुमाळ आणि रवींद्र चौधरी फरारी होते.

बदलीच्या ठरावात तीन नावे बदलली

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक जे. डी. कळसकर यांनी कोर्टात सांगितले, की शिक्षण मंडळाच्या २०१३ मध्ये झालेल्या बैठकीत शिक्षक बदलीसाठी २८ जणांची नावे ठरली होती. त्यापैकी तीन जणांची नावे आरोपींनी बदलल्याचे तपासात समोर आले आहे. शिक्षक बदलीत आरोपींनी भ्रष्टाचार केला असून, त्यांच्या बँक लॉकर्सची तपासणी केली जात आहे. प्रदीप धुमाळ यांनी बाजू मांडताना सांगितले, की शिक्षण मंडळाच्या बैठकीत शिक्षक बदलीची कार्यवाही प्रशासकीय यंत्रणा करते. त्यात आमचा हस्तक्षेप नाही. कोणत्याही प्रकारे आम्ही पैशाची मागणी केली नसून, जो प्रकार घडला तेव्हा आम्ही तिथे हजर नव्हतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बेकायदा बांधकामांच्या सर्व्हेसाठी अधिकारी नेमा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोहगाव विमानतळाशेजारी झालेल्या बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण करण्यासाठी हवाई दलाने तातडीने अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असे पत्र महापालिका प्रशासनाने हवाई दलाला दिले आहे. या अधिकाऱ्याची नेमणूक झाल्यानंतर या भागातील बेकायदा बांधकामांचे सर्वेक्षण करण्यासाठी पालिकेचे अधिकारी नेमले जाणार असून, त्यानंतर हे सर्वेक्षण केले जाणार आहे. विमानतळाच्या बाह्य सीमारेषेपासून शंभर मीटर, तर शस्त्रागारापासून नऊशे मीटर अंतरापर्यंत असलेली २००३ नंतरची सर्व बांधकामे पाडण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, यातून मार्ग काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे. या भागातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी गेल्या आठवड्यात याबाबत पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याशी चर्चा करून पालिकेने यात पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली होती. ही बेकायदा बांधकामे पाडण्यापूर्वी हवाई दल आणि महापालिकेचे अधिकारी संयुक्तपणे या बांधकामाचे सर्वेक्षण करणार आहेत.

सहा महिन्यांत पूर्ण करा

एका महिन्यात सर्वेक्षणास सुरुवात करून सहा महिन्यांत ते पूर्ण करण्याचा आदेश हायकोर्टाने दिला आहे. त्यामुळे हवाई दलाने तातडीने आपल्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे पत्र पालिकेने दिले आहे. या सर्वेक्षणानंतर या भागातील २००३ नंतर झालेल्या बांधकामाबाबत नक्की कोणता निर्णय घ्यायचा, याचा निर्णय घेण्यात येणार आहे.









मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिरिक्त खोदाईचा ‘महावितरण’ला दणका

$
0
0

पालिकेने ठोठावला ६७ लाखांचा दंड

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पालिकेने दिलेल्या परवानगीपेक्षा अधिकची खोदाई करणे 'महावितरण'ला महागात पडणार असून, महर्षीनगरमधील अतिरिक्त खोदाईपायी ६७ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड भरण्यास टाळाटाळ केल्यास महावितरणच्या यापुढील परवानग्या थांबविण्यात येणार आहेत.
महर्षीनगर परिसरात झांजले पथाजवळ पालिकेची परवानगी घेऊन महावितरणतर्फे खोदाईचे काम सुरू होते. पालिकेने दिलेल्या परवानगीपेक्षा अधिकची खोदाई केल्याकडे स्थानिक कार्यकर्ते भरत सुराणा यांनी लक्ष वेधले. त्याबाबतची तक्रार पथ विभागाकडे करण्यात आली. पथ विभागाने केलेल्या पाहणीनुसार सुमारे चारशे मीटरची अधिकची खोदाई करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार अतिरिक्त खोदाईचा स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महावितरणला देण्यात आल्या. महावितरणने पालिकेच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली असून, वारंवार पाठपुरावा करूनही जादा खोदाईचा प्रस्ताव सादर केलेला नाही. महावितरणकडून दाद मिळत नसल्याने अखेर पथ विभागाने महावितरणला दंडाची नोटीसच पाठविली आहे.

अतिरिक्त खोदाईसाठीचे शुल्क आणि दंड मिळून ६७ लाख रुपये ५० हजार रुपये तातडीने भरावेत, अशी नोटीस बजाविण्यात आली आहे. विनापरवाना खोदाई केल्याप्रकरणी रिलायन्स जिओपाठोपाठ सरकारची कंपनी असलेल्या महावितरणलाही झटका बसला आहे. हा दंड वेळेत न भरल्यास यापुढील खोदाईच्या परवानग्यांना स्थगिती देण्यात येईल, अशी तंबीच पालिकेने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डेंगी’साठी सोसायटीला दंड

$
0
0

पावसाळ्यात सोसायट्यांच्या आवारात साठलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. त्या दृष्टीने खबरदारी घेण्याची गरज आहे.

म. टा. प्रतिनिधी, पुणे
पावसाळ्यात घर, सोसायटी, बागा, रस्ते, भंगार साहित्य या ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये डेंगीच्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शहरातील सोसायट्यांनो, सावधान...! सोसायटीमध्ये डेंगीच्या डासांची उत्पत्ती आढळल्यास तुम्हाला पालिकेच्या आरोग्य विभागाच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आतापर्यत शहरातील दोन हजारांहून अधिक सोसायट्यांना याबाबत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्याशिवाय पाचशेहून अधिक बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा पाठवून त्यांना दक्षता घेण्याचे आदेश बजावले आहेत.
गेल्या वर्षी डेंगीच्या 'एडिस इजिप्ती' नावाच्या विषाणूंनी पुणेकरांसह राज्यातील जनतेला चांगलाच डंख मारला होता. डेंगीच्या विषाणूचे बदलले स्वरूप सामान्य पेशंटच्याच काय तर डॉक्टरांच्याही लक्षात आले नाहीत. डेंगीचा उद्रेक वाढत असताना त्याचे गांभीर्य वाढले. पालिकेच्या झोपलेल्या प्रशासनाने त्या वेळी तत्काळ उपाययोजना हाती घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली. शहराच्या मध्यवर्ती भागांप्रमाणेच भवानी पेठ, सहकारनगर, बिबवेवाडी, हडपसर, स्वारगेट, औंध, बाणेर, पाषाण, नगर रस्ता यासारख्या शहराच्या बाहेरील भागांमध्ये डेंगीने चांगलेच डोके वर काढले होते. घरांसह सोसायट्यांच्या आवारात कचरा कुंडीपासून ते भंगार साहित्यांमध्ये पावसाचे पाणी साचून डेंगीच्या डासांची उत्पत्ती झाल्याचे आढळून आले. पुण्यात साडेतीन हजारांपेक्षा अधिक जणांना डेंगीची लागण झाली होती. साधा ताप आला तरी जनरल प्रॅक्टिशनर्सकडून डेंगीचा पेशंट म्हणून नोंद केली जात होती. डेंगीवर साध्या 'क्रोसिन'च्या औषधांशिवाय फारसे अन्य काही उपचार नव्हते. मात्र, डेंगीच्या पेशंटमध्ये 'प्लेटलेट' कमी झाल्याने त्या पेशंटचा जीव धोक्यात येत होता. त्यामुळे रक्तदात्यांसह रक्तपेढ्यांची देखील पळापळ झाली याचा उल्लेख करावा लागेल. हे सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, गेल्या वर्षी प्रशासनासह राज्याच्या आरोग्य विभागाची उडालेली धांदल उडू नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाने मे महिन्यापासूनच शहरातील ७१ हजार झोपडपट्ट्यांमध्ये औषध फवारणी करण्यात आली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी सोसायट्यांमध्ये देखील औषध फवारणी आणि डेंगीच्या डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्यासाठी जात असतात. मात्र, शहरातील सोसायट्यातील रहिवाशी कर्मचाऱ्यांना सोसायटीत प्रवेश करू देत नाहीत. त्यांना चोर अथवा तोतया समजून सोसायटीच्या गेटच्या बाहेरून पाठवितात. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या हेतूने आलेल्या कर्मचाऱ्यांना रहिवाशांनी मदत करण्याची अपेक्षा आहे, याची जाणीव आता सोसायट्यांनी ठेवली पाहिजे. प्रत्येक वेळी पालिकेच्या आरोग्य विभागाला दोष देणे हे योग्य राहणार नाही. यात आता सामान्य पुणेकरांची देखील जबाबदारी वाढली आहे. वैयक्तिक ते घरापासून आणि सोसायट्यांपासून ते शहराच्या प्रत्येक भागात स्वच्छता राखण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी आता सोसायट्याच्या पदाधिकाऱ्यांपासून ते प्रत्येक रहिवाशांनी याबाबत पावसाळ्यात डेंगी किंवा अन्य आजाराच्या साथी येण्याची वाट न पाहता उपाययोजना करायला हव्यात.
यंदाच्या वर्षी पालिकेच्या आरोग्य विभागाने झोपडपट्टीसह शहरातील सोसायट्यांमध्ये कर्मचारी औषध फवारणीसाठी पाठविले होते. मात्र, कर्मचाऱ्यांना पुन्हा हात हलवित परत माघारी फिरावे लागले. रहिवाशांनी त्यांना कामच करू न दिल्याचा अनुभव आहे. तरीही आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोसायट्यांना डेंगीच्या डासांची उत्पत्ती होऊ नये याबाबत दक्षता घ्यावी यासाठी सोसायट्यांना नोटिसा देऊ केल्या आहेत. यंदाही शहरातील प्रत्येक भागातील सोसायट्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्याशिवाय औंध, बाणेर, पाषाण, कोथरूड, हडपसर, मुंढवा, कात्रज कोंढवा, वानवडी, धनकवडी, सहकारनगर, बिबवेवाडी, सिंहगड रोड सारख्या भागांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा मानस पालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. या भागात स्वच्छतेचा अभाव, बांधकामांचे वाढते प्रमाण यामुळे पावसात पाणी साचण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे डासांची निर्मिती या भागात अधिक होत असल्याचे निरीक्षण गेल्या वर्षी नोंदविण्यात आले होते. त्यामुळे सोसायट्यांमध्ये जागृती करण्यासाठी आपार्यंत अडीच हजार सोसायट्यांपेक्षा अधिकांना आरोग्य विभागाने नोटिसा दिल्या आहेत. या कारवाईपेक्षा तुम्हीच तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दोन पावले पुढे आला तर तुम्हाला लागणाऱ्या आरोग्याच्या सोयी सुविधा पालिका देण्यास तयार आहे. त्यासाठी सोसायटीतील बागांमध्ये, कुंड्यासह कचरा, भंगाराच्या साहित्यात पावसाचे पाणी साचू न देता त्यांमध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तरच यंदाच्या वर्षी सोसायट्यांमधून डेंगी हद्दपार होईल अन्यथा तुमच्या पैकी कोणाच्याही सोसायटीतील रहिवाशांना डासांची लागण झाल्याशिवाय राहणार नाही याचे गांभीर्य ओळखणे गरजेचे आहे.













मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुर्वेदाला ‘अच्छे दिन’?

$
0
0

तावडेंच्या घोषणांमुळे तज्ज्ञांमध्ये संमिश्र भावना

मुस्तफा आतार, पुणे

आयुर्वेद तज्ज्ञांची मेडिकल रजिस्टरमध्ये नोंदणी, आयुर्वेद डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र 'आरटीओ'त ग्राह्य धरणार, आयुर्वेदाच्या संशोधन, शिक्षणासह प्रचारासासाठी आयुर्वेदाच्या स्वतंत्र विद्यापीठाची निर्मिती...यासारख्या घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात नुकत्याच केल्या. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना आता भाजप सरकारकडून दाद दिली गेल्याने आयुर्वेदाचार्यांनी आता 'नमो नमः'चा राग आळविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच आयुर्वेदाला आता खऱ्या अर्थाने 'अच्छे दिन' येण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. मात्र, दुसरीकडे राज्यातील सर्व आयुर्वेद तज्ज्ञांनी अन्य प्रकारातील प्रॅक्टिस सोडून केवळ आयुर्वेदाची प्रॅक्टिस करावी असा तोंडी फतवा वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी काढला. त्यामुळे आयुर्वेद तज्ज्ञांमध्ये 'कभी खुशी, कभी गम' अशी स्थिती आहे.

अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल रजिस्टरमध्ये नोंदणी करण्याची आवश्यकता असते. होमिओपॅथीबरोबर आयुर्वेदाच्या डॉक्टरांना नोंदणीची गरज आहे. कारण होमिओपॅथीसह आयुर्वेदाच्या डॉक्टरांकडून सध्या अॅलोपॅथीची प्रॅक्टिस केली जात आहे. त्यासाठी मेडिकल रजिस्टर नोंदणीच्या सुरक्षेचे कवच मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून आयुर्वेद तज्ज्ञांकडून मागणी केली जात होती. मात्र, त्या मागणीला सरकार दरबाराकडून फारशी दाद दिली जात नव्हती. त्याशिवाय कित्येक वर्षांपासून राज्य परिवहन विभागाकडे परवाना काढताना आयुर्वेद तज्ज्ञांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात नव्हते. त्यावर विनोद तावडे यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडविला. त्यामुळे येत्या काळात आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांनी परवान्यासाठी दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. परिणामी, आयुर्वेद डॉक्टरांची प्रॅक्टिस चालण्यासाठी आणखी एक मार्ग तावडे यांनी मोकळा करून दिल्याचे वैद्यकविश्वात मानले जाते.

सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनच्या (सीसीआयएम) नुकत्याच निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये राज्यातून पाच ते सहा उमेदवार केंद्रीय परिषदेवर पाठविले जातात. 'सीसीआयएम'वर आतापर्यंत अर्थात गेल्या साठ सत्तर वर्षांपासून 'नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन' (निमा) या संघटनेचे वर्चस्व होते. त्यामुळे अन्य कोणत्याही संघटनेला स्थान मिळत नव्हते. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा कृपाशिर्वाद लाभल्याने आयुर्वेद डॉक्टरांच्या वैद्यकीय विकास मंच आघाडीचा जन्म झाला. या संघटनेला बळ देत आणि राज्यातील आयुर्वेदाला 'अच्छे दिन' आणण्याचा वादा करीत निवडणुका लढविण्यात आल्या. त्यात वैद्यकीय विकास मंच आघाडीचे सहा उमेदवार निवडून आले. या सदस्यांमुळे सत्तर वर्षांपासून अस्तित्व असलेल्या 'निमा'च्या गडाला खिंडार पडले. एकमुखी वर्चस्व, इतरांना संधी न देण्याची पद्धत यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी अखेर वैद्यकीय विकास मंचाचे दरवाजे ठोठावले. यामुळेच निमाला पहिल्यांदा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पुढील पाच वर्षे राज्यातील आयुर्वेदांचे प्रश्न सोडविण्यासाठी वैद्यकीय विकास मंचच पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट झाले. त्याचाच भाग म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी केलेल्या घोषणामुळे आयुर्वेदाला 'अच्छे दिन' येण्याची आशा निर्माण झाली आहे.


आयुर्वेदासाठी स्वतंत्र विद्यापीठ

आयुर्वेदाला कधी तरी चांगले दिवस येतील, लोकाश्रयासह राजाश्रय मिळेल अशी अपेक्षा अनेक वर्षांपासून आयुर्वेद तज्ज्ञांना होती. मात्र, आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसारासाठी कोणतेही प्रयत्न न केल्याने आयुर्वेदाला राजाश्रय मिळू शकला नाही. ही कबुलीच काही आयुर्वेद तज्ज्ञ देत आहेत. राज्यात आयुर्वेदाचा वैद्यकीय प्रचार, प्रसार, शिक्षण व संशोधन करण्यासाठी राज्यात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या धर्तीवर स्वतंत्र आयुर्वेद विद्यापीठ स्थापन करण्यात येईल अशीही घोषणा तावडे यांनी केली. आयुर्वेदाच्या प्रचारासाठी, संशोधनासाठी आयुर्वेद डॉक्टरांनी इतर पॅथीची प्रॅक्टिस सोडून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करावी, असे आवाहन त्यांनी यांनी केले. तावडे यांच्या घोषणेमुळे आयुर्वेद तज्ज्ञांमध्ये पसरलेल्या आनंदावर कार्यक्रमातच थोडेसे पाणी पडले. आयुर्वेदाच्या प्रॅक्टिसमध्ये मर्यादा येतात म्हणूनच आम्हाला अॅलोपॅथी, होमिओपॅथीची प्रॅक्टिस करावी लागते. त्यात शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेमुळे आयुर्वेद विद्यापीठ नव्याने स्थापल्याने काय फायदा होणार आहे,' अशा शब्दांत आयुर्वेद तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली. आयुर्वेदाच्या प्रचारासाठी आयुर्वेद तज्ज्ञ अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करणे सोडून देतील का, यासारख्या प्रश्नांची उत्तरे आयुर्वेद तज्ज्ञ देतील का हा खरा प्रश्न आहे. प्रामुख्याने या प्रश्नांची उत्तरे 'नाही' अशीच आहेत.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हडपसरमध्ये कोसळलेपन्नास वर्षांचे जुने झाड

$
0
0

म . टा. प्रतिनिधी , हडपसर

कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीच्या शेजारील रस्त्याकडेचे जुने बाभळीचे झाड पार्क केलेल्या एका कारवर पडले. अपघातात पार्किंग केलेल्या कारचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. झाड पडत असल्याचे पाहून नागरिकांनी पळ काढला. यामुळे मोठा अपघात टळला. झाड पन्नास वर्षे जुने असल्याने त्याच्या लांब फांद्या जर्मन बेकरीच्या बाजूच्या पलीकडे असलेल्या गल्लीमधील इमारतींवरही पडल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी हे झाड कापून बाजूला केले. झाड पडल्याने सुमारे एक तास रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टपाल खात्याला ग्राहकाचा दणका

$
0
0

नुकसान भरपाईसाठी पुणेकर ग्राहकाचा १२ वर्षे लढा

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अस्सल पुणेरी माणूस हा न्याय हक्कासाठी वाट्टेल ते करायला तयार असतो. मग सुप्रीम कोर्टाची पायरी चढायलाही तो मागे-पुढे पाहत नाही. अशाच एका पुणेकराला टपाल खात्याच्या चुकीचा आर्थिक फटका असल्याने त्यांनी कन्झ्युमर कोर्टापासून ते थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. अखेर १२ वर्षांनी न्याय मिळाल्याने टपाल खात्यावर व्याजासह नुकसानभरपाई देण्याची नामुष्की ओढवली. एवढ्यावरच प्रकरण थांबले नसून एक चूक टपाल खात्याला किती महागात पडली, याचा उलगडा करण्यासाठी याच पुणेकराने टपाल खात्याचा पिच्छा पुरविला आहे. मात्र, हिशेबाची जुळवाजुळव करताना टपाल खात्याची भंबेरी उडाली आहे.

हे पुणेकर आहेत मदनलाल कांकरिया! टपाल खात्याच्या गुंतवणूक योजनेवर नागरिकांचा विश्वास असल्याने कांकरिया यांनीही चिंचवड टपाल कार्यालयात ३० लाख रुपयांच्या मुदत ठेवी ठेवल्या. या रकमेचे चेक २५ आणि २६ फेब्रुवारी २००३ रोजी टपाल कार्यालयाकडे दिले. या कार्यालयाने त्याच दिवशी चेक हे बँकेमध्ये भरणे अपेक्षित होते. मात्र, या कार्यालयाने हलगर्जीपणा केला. या कालावधीत केंद्र सरकारने बजेट सादर केले. त्या बजेटमध्ये मुदत ठेवीवरील व्याजदर नऊ टक्क्यांहून आठ टक्के करण्यात आला. टपाल कार्यालयाने तीन मार्च २००३ रोजी त्यांचे चेक बँकेत जमा केले. त्याचा आर्थिक फटका त्यांना बसला. टपाल खात्याने त्यांच्या मुदत ठेवीवर आठ टक्के व्याजदर आकारला.

ही चूक टपाल खात्याची असल्याने त्यांनी टपाल खात्याला जाब विचारला; पण खात्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांनी कन्झ्युमर कोर्टात धाव घेतली. कन्झ्युमर कोर्टाने कांकरिया यांच्या बाजूने निकाल दिला. चिंचवड टपाल कार्यालयाने आठ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश कोर्टाने दिला. मात्र, ही नुकसान भरपाई मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा कमी होती. त्यामुळे त्यांनी मुंबई हायकोर्टात अपील केले. हायकोर्टानेही त्यांच्या बाजूने निकाल देऊन दीड लाख रुपये आणि पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. मात्र, या निकालाविरोधात टपाल खात्याने सुप्रीम कोर्टात अपील केले. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल ग्राह्य धरून २०१३ मध्ये कांकरिया यांच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे टपाल खात्याला नुकसान भरपाई द्यावी लागली.

कन्झ्युमर कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत तब्बल दहा वर्षे लढा देताना आलेल्या अनुभवाबाबत कांकरिया म्हणाले, 'सतत दहा वर्षे निराश न होता, मनस्ताप सहन करून आणि स्वतःच्या खिशातून खर्च करून लढा दिला. कोर्टाने न्याय दिल्याने या लढ्याला यश लाभले. टपाल खात्याच्या एका चुकीमुळे ही वेळ आली. आता हा लढा संपला नसून, नागरिकांच्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या टपाल खात्याचा पर्दाफाश करण्यासाठी या खटल्यात टपाल खात्याला किती खर्च आला, याची माहिती गेली दोन वर्षे मागवित आहे. मात्र, टपाल खाते अजूनही जागे झालेले नाही. अर्धवट आणि उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.' या खटल्यासाठी विधी सल्लागारांचे मानधन, प्रवास खर्च, प्रशासकीय खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन आदी खर्चाबाबतची माहिती देताना टपाल खात्याची भंबेरी उडाली आहे. याबाबतची सविस्तर माहिती टपाल खाते हे गेल्या दोन वर्षांत देऊ शकलेले नाही. त्यामुळे एक चूक टपाल खात्याला किती महागात पडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळावर पोलिसांची नजर

$
0
0

सीसीटीव्ही फुटेज पोलिस आयुक्तालयाला जोडणार; दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आखाती देशांतील विमानतळे दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात येणार असल्याचे 'इनपुट' गुप्तचर यंत्रणांना मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे आणि मुंबईतील विमानतळांवर खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर, लोहगाव विमानतळावरील 'सीसीटीव्ही' कॅमेऱ्यांचे फुटेज पुणे पोलिस आयुक्तालयातील 'सीसीटीव्हीं'च्या नियंत्रण कक्षात जोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आखाती, विशेषत: इराक आणि इराण या देशांतील विमानतळांवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचे 'इनपुट' गुप्तचर यंत्रणांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय गुप्तचर यंत्रणेने भारतातीलही सर्व विमानतळांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यास संबंधित यंत्रणांना सांगितले आहे. त्यानुसार लोहगाव विमानतळाच्या सुरक्षेचा आढावाही घेण्यात आला आहे.

पोलिस आयुक्तालयात सुरक्षिततेविषयक समन्वय बैठकीत विमानतळाच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीसाठी पोलिस सहआयुक्त सुनिल रामानंद, केंद्रीय गुप्तचर यंत्रणाचे, दहशतवाद विरोधी पथक, राज्य गुप्तचर यंत्रणा, ग्रामीण पोलिस तसेच लष्करी गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. लोहगाव विमानतळ हे लष्करी विमानतळ असल्याने येथील सुरक्षेबाबात ​अधिकत सर्तकता बाळगली जाते. लोहगाव विमानतळावर एअरपोर्ट अॅथॉरिटीकडून 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात 'लिंक' करण्यात येणार आहे. त्यानुसार हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. विमानतळावर कुठलीही आक्षेपार्ह घटना घडली, तर त्याची पोलिसांना लगेचच माहिती मिळू शकेल. या माहितीच्या आधारे वस्तुस्थिती समोर आल्यावर खबरदारीच्या उपाययोजना घेण्यात येऊ शकतील, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वटवाघळांचा शोध सुरू

$
0
0

इंडियन बॅट कॉन्झर्व्हेशन रिसर्च युनिट करणार 'मॅपिंग'

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील रिकाम्या जागांवरील झाडीत, जुन्या वाड्यात, किल्ल्याच्या कपारींमध्ये राहणाऱ्या वटवाघळांचे अस्तित्व वेगवेगळ्या कारणांमुळे धोक्यात आले आहे. वटवाघळांच्या संवर्धनासाठी त्यांची सद्यस्थिती जाणून घेण्याच्या उद्देशाने इंडियन बॅट कॉन्झर्व्हेशन रिसर्च युनिटतर्फे वटवाघळांच्या वसतिस्थानांचे मॅपिंग करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली असून पुढील महिन्यापासून सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागातून पुण्यातील वटवाघळांची वसतिस्थाने शोधण्यात येणार आहेत.

किसळवाणी, काहीशी भीतीदायक वाटणाऱ्या वटवाघळे आत्तापर्यंत वन्यप्राणी अभ्यासकांकडूनही दुर्लक्षित राहिली आहेत. ब्रिटिशांनी भारतातील वटवाघळांवर सखोल संसोधन केले होते. त्यानंतर आजपर्यंत वटवाघळांच्या सद्यस्थितीवर सर्वसमावेशक राज्यव्यापी अभ्यास कोणी केलेला नाही. निसर्ग संवर्धनामध्ये वटवाघळे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. जंगलातील प्रमुख बीजप्रसारक आणि शेतातील कीटकनाशके म्हणूनही त्यांची ओळख आहे. पण विकासकामे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे वाटवाघळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वंकष डॉक्युमेंटेशन करण्याच्या उद्देशाने आम्ही बॅट मॅपिंगचा प्रकल्प सुरू केला आहे, अशी माहिती इंडियन बॅट कॉन्झर्व्हेशन रिसर्च युनिटचे प्रकल्प समन्वयक राहुल प्रभूखानोलकर यांनी दिली. भारतामध्ये साधारणतः ११९ प्रकारची वटवाघळे आढळतात.

महाराष्ट्रात यातील ५० प्रकारातील वटवाघळे वास्तव्यास आहेत. गुजरात, कर्नाटक, गोव्यातही त्यांचे प्रमाण उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रात मुख्यतः किल्ले, लेण्या, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, जुने वाड्यांमध्ये त्यांच्या वसाहती आहेत. यात फळे आणि कीटक खाणाऱ्या वटवाघळांचे प्रमाण अधिक आहे. मात्र गेल्या काही वर्षांत शहरांच्या बाहेरील बाजूस सर्रास होणारी वृक्षोतड, जुन्या वाड्यांच्या जागेवर आलेल्या इमारतींमुळे शहरातील वसतिस्थाने धोक्यात आली आहेत. ग्रामीण भागात मुख्यतः शेतात कीटनाशकांचा वापर वाढल्याने वाटवाघळांना अन्नाचा तुटवडा निर्माण झाला आहे. संकटात सापडलेल्या या सस्तन प्राण्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रभूखानोलकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँटोन्मेंट बोर्डाकडे गेल्या दोन वर्षांपासून निधी नसल्याने रस्ते दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडण्याची शक्यता ​निर्माण झाली असल्याने त्यावर उपाय म्हणून बोर्डाने खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली आहे.

बोर्डाची आर्थिक स्थिती कमकुवत झाली असल्याने गेल्या दोन वर्षांत नवीन रस्ते तयार करण्यात आलेले नाहीत. त्याऐवजी जुन्या रस्त्यांची डागडुजी करण्यावर बोर्डाने भर दिला आहे. दोन वर्षांत रस्त्यांवर डांबर टाकण्यात आलेले नसल्याने या पावसाळ्यात खड्डे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बोर्डाने खड्डे बुजविण्याच्या कामासाठी कंत्राटदार नेमला आहे. कंत्राटदाराकडे खड्डे बुजविण्यासाठी एक पथक कायम तयार असणार आहे. तसेच इंजिनियरिंग खातेअंतर्गत कर्मचारी नेमले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे ताबडतोब बुजविले जाणार असल्याचे बोर्डाचे कार्यकारी अभियंता के. व्ही. शिरोडकर यांनी सांगितले. बोर्डाच्या परिसरात सुमारे ४८ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. या रस्त्यांपैकी नागरी परिसर असलेले रस्ते खराब झाले आहेत. त्यामध्ये न्यू मोदी खाना, चार बावडी, बाबाजान चौक, घोरपडी गाव या परिसराचा समावेश आहे. तसेच महात्मा गांधी रस्ता, बच्चू अड्डा, वानवडी बाजार, शिवाजी मार्केट या परिसरात नेहमी पाणी साचण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. पाणी साचल्यास ड्रेनेजलाइन साफ करण्याच्या कामासाठीही कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीत नाटकाला राजाश्रय हवा

$
0
0

ज्येष्ठ गायिका अभिनेत्री डॉ. क्षमा वैद्य यांना आज (२६ जून) सायंकाळी पाच वाजता बालगंधर्व रंगमंदिरात प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्ताने चिन्मय पाटणकर यांनी डॉ. वैद्य यांच्याशी साधलेला संवाद...

 महापालिकेच्या वतीने तुम्हाला बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. काय भावना आहे?

जाहीर झाल्याचे कळल्यावर आनंद झाला. मात्र, त्याच क्षणी आई-वडिलांचे स्मरण झाले. सर्वांत प्रथम त्यांना ही वार्ता सांगितली. हा पुरस्कार मिळणे हा त्यांचा गौरव आहे असे मला वाटते. कारण १९७७मध्ये एखाद्या मुलीने रंगभूमी काम करणे हे काही भूषणावह मानले जात नव्हते. तरीही, माझ्यातील गायन, अभिनयाचे गुण ओळखून मला नाटकात काम करण्यास परवानगी दिली. त्यांच्यामुळेच माझी या क्षेत्रातील वाटचाल सुकर झाली. तसेच मला घडवणाऱ्या सर्व संगीत गुरूंनाही पुरस्काराचे श्रेय जाते.

 आताची पिढी संगीत नाटकात करत असलेले प्रयोग तुम्हाला समाधानकारक वाटतात का?

मुळात नव्या पिढीला कोणत्या ना कोणत्या प्रकारे संगीत नाटक करावेसे वाटते हेच मला मोठे वाटते. काळानुरुप परिस्थितीत होणारे बदल अपरिहार्य असतात. त्यानुसार आताची पिढी गद्य आणि संगीत यांचा चांगला मेळ घालते. कमी वेळात चांगले संगीत नाटक देण्याचा प्रयत्न करते. हे करताना मूळ परिणामाला धक्का लागत नाही हे जास्त महत्त्वाचे आहे.

 तुम्ही स्वतः संगीत नाटकांची निर्मिती केलेली आहे. आताच्या काळात संगीत नाटकाची निर्मिती करणे हेच सर्वांत मोठे आव्हान आहे असे वाटते का?

छोटा गंधर्व, शिलेदार कुटुंबीयांनंतर संगीत नाटक हा व्यवसाय राहिला नाही. आताच्या काळात राजाश्रयाशिवाय संगीत नाटक करणेच शक्य होणार नाही. मी संगीत नाटकांची निर्मिती करताना परंपरा टिकवण्याच्या उद्देशाने केली होती. त्यात व्यावसायिक उद्देश नव्हता. तरीही संगीत नाटकाची निर्मिती हे आव्हानात्मकच काम आहे. संगीत नाटकाच्या जोरावर व्यवसाय करताच येणार नाही.

 परंपरा टिकवताना जुनीच संगीत नाटके का केली जातात? नवनिर्मितीतून परंपरा टिकवली जाणार नाही का?

नवनिर्मितीसाठी सकस लेखन मिळणे फार महत्त्वाचे आहे. संगीत सौभद्र शंभर वर्षे सादर होत आहे. त्यात दर्जेदार लेखन महत्त्वाचे आहे. जुन्या लोकांची जीवन बैठकच वेगळी होती. त्यांनी नाटक करण्यापूर्वीच एकूण नाटकाचा विचार केला असावा असे मला वाटते. चार गाणी नाटकात घेतली म्हणजे ते संगीत नाटक होत नाही. नवनिर्मिती ही संगीत नाटकाचीच समस्या आहे असे नाही. महत्त्वाची गोष्ट, मूळ टिकवल्याशिवाय नवनिर्मिती कशी होणार? त्यामुळे आपली पारंपरिक नाटक केली पाहिजेतच. ब्रॉडवेचे जतन करण्याचा जो विचार आहे, तसा आपल्याकडे हवा.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


न्यायासाठी ग्राहकच मांडतात बाजू

$
0
0

वंदना घोडेकर, पुणे

ग्राहक देवो भवः असे म्हटले जात असले तरी ग्राहकांची फसवणूक होतेच. त्यामुळे ग्राहकांचे नुकसान होते. ग्राहकाला जलद गतीने न्याय मिळावा म्हणून ग्राहक संरक्षण कायदा आहे. या कायद्यानुसार ग्राहक वकील न नेमता स्वतः आपली बाजू ग्राहक मंचापुढे मांडू शकतो. पुण्यातील ग्राहक स्वतः आपली बाजू ग्राहक मंचापुढे मांडून न्याय मिळवत आहेत. ग्राहक न्यायालयापुढे बाजू मांडताना कायदेशीर प्रक्रिया कोर्टाच्या कामकाजासारखी किचकट नाही. त्यामुळे ग्राहक म्हणून फसवणूक झाली असल्यास आपण स्वतःच बाजू मांडू शकता. कर्वेनगर येथील शरद लघाटे यांनी एक टूर्स कंपनीकडून फसवणूक झाल्यानंतर स्वतः आपली बाजू मंचापुढे मांडली. मंचाने संबंधित कंपनीला लघाटे यांनी मागितलेली रक्कम परत करण्याचा आदेश दिला. ग्राहक न्यायमंचाकडे या प्रकरणी तक्रारदार शरद शंकर लघाटे (रा, अनुरेखा सोसायटी, ताथवडे उद्यानाजवळ, कर्वेनगर) यांनी मंदार किराणे मे. आराधना टूर्स प्रा. लि.​विनर्स विंडो, डेक्कन जिमखाना यांच्या विरुद्ध दावा दाखल केला होता.

लघाटे आणि त्यांची पत्नी तसेच त्यांचे स्नेही आणि त्यांची पत्नी असे चौघांच्या सहलीसाठी त्यांनी प्रत्येकी दहा हजार रुपये याप्राणे ४० हजार रुपये चेकने दिले होते. त्यापैकी वीस हजार रुपये तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीसाठी भरण्यात आले होते. चेक दिल्यानंतर दोन दिवसांनी तक्रारांदाराची पत्नी (वय ७१) या जिन्यावरुन पडल्यामुळे त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. त्यांचे घोट्याचे ऑपरेशन करावे लागेल असे समजल्यानंतर तक्रारदार यांनी फोन करून त्या दोघांना सदर सहल करणे शक्य होणार नसल्याचे कळविले. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात भेटून परिस्थिती सांगितली आणि तक्रारदाराने दिलेला चेक वटवू नये असे सांगितले. तसेच चेक वटविला असल्यास तक्रारदारांचे वीस हजार रुपये परत करावे अशी विनंती केली. कंपनीने त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्रासह अर्ज केल्यास वीस हजार रुपये परत देण्यात येतील असे सांगितले. त्यानंतर लघाटे यांनी अर्ज​ दिला. दरम्यान लघाटे यांच्या खात्यातून चेकची रक्कम कंपनीच्या खात्यामध्ये जमा झालेली होती. त्यामुळे त्यांना रक्कम परत करणे शक्य होते. मात्र त्यांना फोन करून चेक घेऊन जाण्यास सांगितले. त्यांना फक्त १५ हजार रुपयांचा चेक माहीम, मुंबई शाखेचा देण्यात आला. इतका उशीर करून पाच हजार रुपये कमी का देण्यात आले याचा खुलासा करण्यात आला नाही. तक्रारदार यांनी चेक बँकेत भरला मात्र अपुऱ्या निधीच्या कारणाने जमा झाला नाही. त्यानंतर त्यांना ऑफिसमध्ये येऊन रोख १५ हजार रुपये घेऊन जावे, असे फोन द्वारे कळविण्यात आले.

तक्रारदार यांनी नोटीस पाठवून बेकायदा कापून घेतलेली रक्कम पाच हजार रुपये आणि त्यावरील व्याज नुकसानभरपाईसह देण्यात यावे असे कळविले. मात्र त्यांना कोणतीही दाद देण्यात आली नाही. या प्रकरणी त्यांनी ग्राहक मंचाकडे ​तक्रार दाखल केली. मंचाने तक्रारदार यांना पाच हजार रुपये सहा आठवड्यांच्या आत परत करण्यात यावेत. तसेच शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी एक हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रुपये देण्यात यावेत, असा आदेश दिला. मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य क्षितिजा कुलकर्णी, मोहन पाटणकर यांनी हा निकाल दिला. अनुभव आला कामी...

लघाटे हे निवृत्त उपसंचालक आहेत. ते औरंगाबाद येथे कार्यरत होते. प्रशासकीय सेवेचा अनुभव असल्यामुळे आपल्याला कायद्याची माहिती आहे. तसेच नोटीसा, त्यांना उत्तर कसे द्यायचे याची माहिती आहे. प्रॉपर्टीसंदर्भातील अनेक केसेस सेवेत असताना आपण हाताळल्या आहेत. त्यामुळे कायद्याची माहिती आहे. त्यामुळे ग्राहक मंचासमोर स्वतः केस चालविण्याचा आपण निर्णय घेतला. आपला जावई वकील असल्यामुळे त्यांनीही तुम्ही स्वतःच केस चालवा असे सांगितले होते. ग्र्राहक मंचापुढे आपण स्वतः अर्ज दाखल करून बाजू मांडली. ग्राहक मंचाच्या कार्यालयात असलेल्या कर्मचारी चांगले असून त्यांना आपल्याला चांगले मार्गदर्शन केले, अशी प्रतिक्रिया लघाटे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागांपेक्षा प्रवेशअर्ज कमीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या रिक्त जागांचा सिलसिला यंदाही कायम राहणार आहे. राज्यात इंजिनीअरिंगच्या सुमारे एक लाख ६० हजार जागा उपलब्ध असताना, प्रवेशासाठी मात्र १ लाख ७ हजार १४७ विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली आहे. परिणामी, ५० हजारांहून अधिक जागा शिल्लक राहणार आहेत.
इंजिनीअरिंगसाठी तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत (डीटीई) प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. यंदा त्यासाठी नोंदणी करण्याकरता ६ ते २२ जून इतका कालावधी देण्यात आला होता. 'या कालावधीत १ लाख ७ हजार १४७ विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली आहे,' अशी माहिती तंत्रशिक्षण संचालक डॉ. एस. के. महाजन यांनी दिली. राज्यात बारावी बोर्डाच्या निकालाने विक्रम केल्यामुळे इंजिनीअरिंगला सुगीचे दिवस येतील, अशी आशा होती. मात्र, कॉलेजांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक संस्थांमध्ये रिक्त राहणाऱ्या जागा वाढत असल्याचे बोलले जात आहे. यंदा आलेल्या १ लाख ७ हजार १४७ अर्जांमध्ये ७६ हजार ७५८ अर्ज मुलग्यांचे, तर ३० हजार ३८९ मुलींचे अर्ज आहेत. गेल्या वर्षी १ लाख ५६ हजार जागा उपलब्ध होत्या. मात्र, केवळ ८८ हजार ८८३ विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतले होते.

दृष्टिक्षेपात प्रवेशप्रक्रिया

प्रवेशांसाठी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. अंतिम गुणवत्ता यादी : २६ जून ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरुवात; कॅप-१ : २६ जून 'कॅप-१'साठी ऑनलाइन ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी २६ ते २८ जून सायंकाळी पाच वाजेपर्यंतचा कालावधी आहे. 'कॅप-१'साठी तात्पुरती अॅलॉटमेंट : ३० जून अॅलॉटमेंटनुसार प्रत्यक्ष कॉलेजात जाऊन प्रवेश निश्चिती : १ ते ४ जुलैदरम्यान.

१,६०,०००

१,६०,००० उपलब्ध जागा १,०७,१४७ आलेले प्रवेशअर्ज ७६,७५८ मुलग्यांचे अर्ज ३०,३८९ मुलींचे अर्ज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘करिअर कॉर्नर’तर्फे उद्या मार्गदर्शन सत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यास मदत व्हावी, यासाठी 'करिअर कॉर्नर' या संस्थेतर्फे शनिवारी (२७ जून) विनामूल्य करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे (सीओईपी) येथील मिनी सेमिनार हॉलमध्ये हे सेमिनार होणार आहे.
आयआयटी, आयआयएम आणि नागरी सेवांमधील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. हे सत्र पूर्ण एक दिवस चालेल. पुण्याचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या हस्ते सत्राचे उद‍्घाटन होईल. करिअर कॉर्नरचे मुख्य कार्यकारी अधिकारी हृषीकेश हुंबे यांनी संयोजन केले आहे.

स. १० : उद‍्घाटन; हस्ते सुधीर हिरेमठ, आयपीएस

स. १० : उद‍्घाटन; हस्ते सुधीर हिरेमठ, आयपीएस स. ११ : दहावी-बारावीनंतरची करिअर; वक्ते - हृषीकेश हुंबे दु. १२ : हॉटेल मॅनेजमेंटमधील करिअर; वक्ते - रवी कपिला, इकोल हॉटेलिएर लवासाचे शैक्षणिक अधिष्ठाता दु. १.३० : चित्रपट, टीव्ही आणि प्रसारमाध्यमांतील करिअर; वक्ते - समर नखाते दु. २.३० : पदवीनंतरची करिअर; वक्ते - हृषीकेश हुंबे दु. ३.३० : नागरी सेवांमधील करिअर; वक्ते - अमोल शिंदे, आयसीएलएस रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, पुणे आणि संतोष अजमेरा, उपसंचालक, एनएफएआय, पुणे नोंदणी : enlight असे टाइप करून स्पेस देऊन तुमचे नाव लिहा आणि ९२४६३५६७६५ या मोबाइल फोन क्रमांकावर एसएमएस करा किंवा www.careercorner.in/enlight2015 या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोवीस कोटींचे दौंडमध्ये ‘पाणी’

$
0
0

नरेंद्र जगताप, दौंड

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात राबविण्यात आलेल्या पाणी योजनांच्या दर्जाबाबत टीकेचा सूर लावण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर 'मटा'च्या बातमीदारांनी पाणी योजनांचा तालुकानिहाय घेतलेला हा आढावा...

दौंड तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे आठ पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या. १९९८ ते २००३ या कालावधीमध्ये ३२ गावे व १४१ वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या योजना राबविण्यात आल्या. या योजनांचा एकत्रित खर्च २४ ‌कोटींच्या आसपास आला. सध्या यातील एकही योजना सुरू नाही. वासुंदे पाणीपुरवठा योजना गेली बारा वर्षे बंद आहे. या योजनेतील पाटस या गावासाठी आवश्यक दुरुस्त्या करून नव्याने पाणीपुरवठा करण्यासाचे काम सध्या सुरू आहे. 'शुद्धीकरण व भूमिगत जलवाहिन्यांच्या चाचण्या झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात पाणी पुरवठा सुरू होईल,' अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे इंदापूर व दौंड विभागाचे उपअभियंता एस. एस. सप्रे यांनी दिली. दौंडमधील आठ गावांसाठी, स्वामी चिंचोलमधील आठ गावे व ३१ वाड्यांसाठी, वासुंदेतील २४ वाड्यांसाठी योजना सुरू करण्यात आल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हडपसरमधील वकिलांचा आंदोलनाला पाठिंबा

$
0
0

हडपसरमधील वकिलांनी खंडपीठाच्या मागणीसाठी आंदोलन केले.

म . टा. प्रतिनिधी ,हडपसर

हडपसर कन्व्हेंसिंग प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने पुण्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ झालेच पाहिजे, या मागणीला पाठिंबा दिला आहे. हडपसर हवेली दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक सहा येथे सर्व सभासद वकिलांनी धरणे आंदोलन केले. दस्त नोंदणीच्या कामकाजावर बहिष्कार टाकून गुरुवारी काम बंद ठेवण्यात आले.
या वेळी हडपसर कन्व्हेंसिंग प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. के. टी. आरू, पुणे जिल्हा वकील संघटनेचे उपाध्यक्ष संतोष खामकर, सचिव राहुल झेंडे, नंदकिशोर तिखे, मधुकर कोकणे, दिलीप जगताप, विलास बारवरकर, संदेश जाईभाई, संदीप शेवाळे, राजेंद्र शिंदे, संतोष मोटे, प्रकाश गायकवाड, सूर्यकांत तिखे, राजेंद्र गोसावी, गणेश नवले, वैभव धायगुडे, जवाहर शितोळे, विजय डावरे या वकिलांसह परिसरातील वकील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images