Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पीएमपी जादा ४०बस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सोमवारपासून विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष बसेसमध्ये वाढ केली आहे. मागील वर्षी विद्यार्थ्यांसाठी खास ४० बस सोडल्या जात होत्या. त्यामध्ये आता आणखी आठ बसेसची भर पडली असून त्यामुळे १६ फेऱ्या वाढणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या खासगी वाहतुकीपेक्षा पीएमपीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर असलेली गर्दी आणि बसला लटकलेले विद्यार्थी असे चित्र नेहमीच पाहायला मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पीएमपी प्रशासनाने बस वाढविण्याचा निर्णय घेतला. पीएमपीने पालिकेच्या २६ शाळांसह १४ खासगी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे एकूण ५५ बस दिल्या आहेत. येथून पुढे शाळांच्या वेळेत फक्त विद्यार्थ्यांसाठी ४८ बस सोडल्या जाणार आहेत. या बसमध्ये पास असलेले किंवा तिकीट काढून प्रवास करणारे विद्यार्थी प्रवास करू शकतात, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले.
.......

टिळक रस्ता, बाजीराव रोड, शिवाजी रोड, हडपसर, सिंहगड रोड, कर्वे रस्ता आणि अन्य काही मार्गांवर सकाळी व सायंकाळी बसस्थानकांवर विद्यार्थ्यांंची गर्दी होते. पीएमपीतर्फे गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी जादा बस सोडल्या जातात. मात्र, मागील वर्षीपर्यंंत ही संख्या अपुरी होती. या वर्षी या बसेसमध्ये वाढ करण्यात आली आहे.
-अनंत वाघमारे, पीएमपी वाहतूक व्यवस्थापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भारत पेट्रोल पंप पुरवठ्याअभावी बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,पुणे

पुण्यातील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपांना हिंदुस्थान पेट्रोलियमकडून केला जाणारा पेट्रोलचा पुरवठा थांबविण्यात आल्याने भारत पेट्रोलियमला पेट्रोलचा तुटवडा भासत असल्यामुळे काही पंप चालकांना पंप बंद ठेवण्याची वेळ आली, असे भारत पेट्रोलियमच्या मुंबई येथील प्रशासनाने स्पष्ट केले.

भारत पेट्रोलियमचे पुण्यातील १४ पंप सोमवारी अचानक बंद करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. मुंबईतील वडाळा येथे भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल वाहिनीतील गळतीमुळे शनिवारी आग लागली होती; त्यामुळे इंधनाचा पुरेसा पुरवठा होऊ शकला नाही, अशी माहिती मिळाली होती. मात्र, मुंबईहून पुण्यात केवळ २० टक्के पुरवठा केला जातो. तर, या हिंदुस्थान पेट्रोलिअम व भारत पेट्रोलिअम यांच्यातील करारानुसार ८० टक्के पुरवठा हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पुण्यातील स्टोअरेजमधून केला जातो. त्यांच्याकडून पुरवठा सुरळीत झाल्यानंतरच पुण्यातील पेट्रोल पंपांची सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती भारत पेट्रोलिमच्या प्रवक्त्यांनी दिली.

दरम्यान, मंगळवारी शहरातील काही भागांत पाहणी केली असता, भारत पेट्रोलियमचे सोमवारी बंद असलेले पेट्रोल पंप सुरू असल्याचे पाहायला मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपूर्ण शहरात गुरुवारी पाणी बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या सर्व जलकेंद्रांमध्ये पंपिंग, विद्युत आणि स्थापत्यविषयक देखभाल-दुरुस्तीची तातडीची कामे करायची असल्याने येत्या गुरुवारी (१८ जून) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (१९ जून) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे :

पर्वती जलकेंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड, एसएनडीटी परिसर, एरंडवणे कोथरूड, डहाणूकर कॉलनी, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबनगर, सर्व्हे नं. ४२, ४६ (कोंढवा खुर्द), पर्वती व पद्मावती टँकर भरणा केंद्र.

चतुःशृंगी/एसएनडीटी/वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःशृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी व उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरुगणेशनगर, पुणे विद्यापीठ, वारजे हायवे, वारजे-माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धिकरणाचा परिसर, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड.

वडगाव जलकेंद्रः हिंगणे, आनंदनगर, वडगाव धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज,
भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक.

नवीन होळकर पंपिंग स्टेशन : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बालभारती’वर बहिष्कार?

$
0
0

पाठ्यपुस्तक विक्रेत्यांचा इशारा;तक्रारींची दखल घेत नसल्याचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहरातील पाठ्यपुस्तक विक्रेत्यांना 'बालभारती' सहकार्य करत नसल्याची तक्रार पुणे पुस्तक विक्रेता संघाने मंगळवारी केली. सर्व शिक्षा अभियानाची पाठ्यपुस्तके वेळेत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणारे 'बालभारती'चे प्रशासन पुस्तक विक्रेत्यांच्या तक्रारींची दखल घेत नसेल, तर 'बालभारती'वर बहिष्कार टाकण्याचा इशाराही संघाने दिला.

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आ‍वश्यक पाठ्यपुस्तके तयार करून, ती वितरित करण्याची महत्त्वाची भूमिका 'बालभारती' पार पाडते. 'बालभारती'च्या पुण्यातील मुख्य कार्यालयातून पुण्यासह नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठीची पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. गेल्या काही दिवसांपासून 'बालभारती'मध्ये त्यासाठीचे कामही युद्ध पातळीवर सुरू होते. त्यामुळेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत जवळपास सर्व पाठ्यपुस्तकांचे वितरण झाल्याची माहिती 'बालभारती'कडून नुकतीच देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील पाठ्यपुस्तक विक्रेत्यांची ही तक्रार शहरातील खासगी आणि विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांच्या उपलब्धतेबाबतची अडचणच स्पष्ट करणारी ठरली आहे.

रस्त्याच्या कामामुळे अडथळा

पाठ्यपुस्तक वितरणाच्या 'बालभारती'मध्ये ऐन मौसमामध्ये रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील पाठ्यपुस्तक विक्रेत्यांची छोटी वाहने, रिक्षा पर्यायी मार्गाने डेपोपर्यंत पोहोचण्यात अडचणी आहेत. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे डेपोमधून पाठ्यपुस्तके काढून ती गाड्यांमध्ये भरण्यासाठीही 'बालभारती'ची मदत मिळत नाही. त्यामुळे विक्रेत्यांना वेळप्रसंगी स्वतः पाठ्यपुस्तके भरावी लागत आहेत. त्यामुळे दुकानांमधून क्रमिक पुस्तके उपलब्ध करून देण्यातही अडचणी येत असल्याचे संघाच्या सदस्यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांसाठी ‘इगो’ बाजूला

$
0
0

घटस्फोटानंतरही पॅरेन्टिंग प्लॅननुसार मुलांसाठी आले एकत्र

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ते दोघेही आयटी कंपनीतील...ओळखीचे रुपांतर लग्नात झाले...लग्नानंतर मात्र एकमेकांचा 'इगो' आडवा येत असल्यामुळे शेवटी त्यांचा घटस्फोट झाला...मात्र, त्यांच्या दोन मुलांच्या ताब्यावरून वाद सुरू झाले... मुलांचे संगोपन, शिक्षणाची जबाबदारी घेताना मात्र त्यांनी समजूतदारपणा दाखविला...हायकोर्टाच्या पॅरेन्टिंग प्लॅननुसार त्यांनी मुलांची जबाबदारी वाटून घेतली... पुणे विधी सेवा प्राधिकरणातर्फे नुकतीच समुपदेशनाद्वारे ही केस निकाली काढण्यात आली.

अविनाश आणि सरिता (दोघांची नावे बदलली आहेत) हे दोघेही आयटी कंपनीत कामाला आहेत. एकाच कंपनीत कामाला असल्यामुळे त्यांच्या ओळखीचे रुपांतर लग्नात झाले. दोघेही मोठ्या पदावर कार्यरत आहेत. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली.

अविनाश आणि सरिता या दोघांमध्ये कायम वाद होत असत. त्यांच्यातील वाद शेवटी विकोपाला गेले. त्यांच्या नातेवाइकांनीही त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही त्यांनी दाद दिली नाही. त्यांच्यातील वादाचे कारण एकमेकांमधील 'इगो' होता. मात्र, दोघेही माघार घेण्यासाठी तयार नव्हते. शेवटी त्यांचा वाद घटस्फोटापर्यंत जाऊन पोहचला. त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. मात्र, मुलांच्या ताब्यावरून प्रश्न निर्माण झाला. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे अविनाश आणि सरिताची केस समुपदेशनासाठी आली होती. मुलांच्या ताब्यावरून भांडण्यापेक्षा दोघांनी मिळून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घ्यावी तसेच सुट्ट्यांमध्ये कोण कोणाकडे राहणार याचे नियोजन करावे असे त्यांना सुचविण्यात आले. त्या दोघांनीही आपल्यातील वाद बाजूला ठेवला. मुलांच्या ताब्यावरून भांडण्यापेक्षा त्यांना आई-वडिलांचे प्रेम मिळणे महत्त्वाचे हे लक्षात घेऊन हायकोर्टाच्या पॅरे​​न्टिंग प्लॅननुसार नियोजन केले. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दोघा मुलांना एकत्र येता यावे म्हणून सर्वांनी बरोबर राहून सुट्टीचा आनंद लुटला. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव महेश जाधव यांनी या केसमध्ये दोघांचे समुपदेशन केले. या दोघांचा घटस्फोट झाला असला तरी पॅ​रेन्टिंग प्लॅनचे महत्त्व सांगून त्यांच्यातील वाद बाजूला ठेवून मुलांसाठी त्यांना एकत्र आणण्यात यश आले, अशी माहिती जाधव यांनी दिली.

सुनावणीचा वेळ वाचण्यास मदत

पॅरेन्टिंग प्लॅननुसार दोघे पालक आपला मुलांचा ताबा कोणाकडे असेल, त्यांचे शिक्षण, आरोग्य, विमा, सुट्ट्यांच्या कालावधीत मुले कोणाकडे राहतील याचा निर्णय परस्परसंमतीने घेऊन त्यासंदर्भातचे नियोजन कोर्टापुढे सादर करू शकतात. कोर्टाकडून देण्यात आलेल्या अर्जानुसार माहिती भरून कोर्टात दाखल करण्यात आल्यानंतर कोर्टाकडून त्याला मंजुरी देण्यात येते. या प्रक्रियेमुळे कोर्टातील केसेसच्या सुनावणीचा वेळ वाचण्यास मदत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यातील ऐश्वर्याचीही झाली मोजदाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांचा लोणावळा येथील ६५ एकरातील बंगला; तसेच संगमवाडी येथील फ्लॅटवर मंगळवारी छापा घातला. पाण्याचा बंधारा, हेलिपॅड, इम्पोर्टेड लायटिंग याशिवाय दुर्मिळ वस्तूंनी सजलेल्या बंगल्यातील 'ऐश्वर्य' मोजण्यास सुरूवात झाली आहे.

पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे दोन पोलिस उपअधीक्षक, चार पोलिस निरीक्षक आणि २० कर्मचाऱ्यांची फौज छापा घालण्यासाठी सोमवारीच तैनात करण्यात आली होती. लोणावळ्यापासून १४ किलोमीटर अंतरावर जांभुळणे-देवधर येथे हा बंगला आहे. या बंगल्यावर मंगळवारी सकाळीच छापा घालण्यात आला. या बंगल्याला; तसेच कंपाउंडला लाल रंग देण्यात आला आहे. स्थानिकांमध्ये या बंगल्याची ओळख 'भुजबळांचा लाल बंगला' अशीच असल्याची माहिती छापा घालणाऱ्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

'भुजबळ यांच्या बंगल्यांवर छापा घालण्यात आला असून, येथील विविध वस्तुंची मोजदाद सुरू आहे. ती संपल्यानंतरच येथील मालमत्तेची एकूण किंमत लक्षात येईल,' अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर अधीक्षक अर्जुन सकुंडे यांनी दिली.

या बंगल्यामध्ये सहा बेडरूम आहे. याशिवाय स्विमिंग पूल, एअर कंडिशनर्स, हेलिपॅड, इम्पोर्टेड लायटिंग, आकर्षक लाकडी वस्तू याशिवाय दुर्मिळ वस्तुंनी हा बंगला सजला आहे. या बंगल्याचे व्यवस्थापन पाहणारे व्यवस्थापक, माळी यांना स्वतंत्र कॉटेज बांधण्यात आले आहेत. या ठिकाणी महावितरण कंपनीकडून विजेसाठी स्वतंत्र डीपी बसवण्यात आली आहे. याशिवाय एक मोठा जनरेटरही बसवण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या सर्व गोष्टींची मोजदाद करण्यात येत आहे. त्यानंतर सर्व वस्तुंचे मूल्यांकन केल्यानंतर एकूण किंमत किती हे ठरणार आहे. भुजबळ यांच्या शेतात २५ लाख लिटर क्षमता असलेला बंधारा बांधण्यात आला आहे. त्याद्वारे या ठिकाणी ठिबक सिंचन करण्यात आले आहे. फुले; तसेच फळबागाही या ठिबक ​सिंचनाद्वारे फुलल्या आहेत.

रुबी हॉस्पिटलजवळील 'ग्राफिकॉन आर्केट' या इमारतीत समीर भुजबळ यांच्या नावे असलेला एक फ्लॅट आहे. हा फ्लॅट गेली दोन वर्ष बंद अवस्थेत आहेत. येथील सोसायटीचा मेंटेनन्सही देण्यात आलेला नाही. हा फ्लॅट १९९४ मध्ये सरकारी कोट्यातून घेण्यात आला आहे. तो काही काळ एका शैक्षणिक संस्थेसाठी भाड्याने देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे काही कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकांचा बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी शरद राव प्रणित रिक्षा चालक-मालक संयुक्त कृती समितीने आज, बुधवारी राज्यव्यापी बंद पुकारला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील १८ संघटनांशी संबंधित रिक्षाचालक यामध्ये सहभागी होणार आहेत. मात्र, रिक्षा पंचायत आणि त्यांच्याशी संलग्न संघटना बंदमध्ये सहभागी होणार नाहीत. कृती समितीतरर्फे पिंपरी चौकात निदर्शने केली जाणार आहेत, तर पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता रिक्षा चालक आंदोलन करणार आहेत, अशी माहिती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणांत २.५ टीएमसी पाणीसाठा

$
0
0

जुलैअखेर पुरेल एवढा पाणी शिल्लक

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी तुरळक पाऊस झाला. या पावसामुळे धरणसाठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही. दरम्यान, खडकवासला प्रकल्पात शहराला जुलैअखेर पुरेल एवढा म्हणजे अडीच अब्ज घनफूट एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा केवळ शहरासाठी राखीव असल्याने पुणेकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.

खडकवासला प्रकल्पातून ग्रामीण भागातील शेतीसाठी कालव्यातून सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन बंद करण्यात आले आहे. शहराला पाण्याची गरज असल्याने शेतीचे ४५ दिवसांचे आवर्तन ३० दिवसांपर्यंत कमी करण्यात आले. त्यामुळे शेतीच्या पाण्यात बचत झाल्याने धरणांत बऱ्यापैकी पाणी शिल्लक राहिले आहे. खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या चार धरणांत सद्यस्थितीत ८.३० टक्के म्हणजे २.४२ टीएमसी पाणीसाठा आहे. पानशेत धरणात १.६६ टीएमसी, वरसगाव धरणात ०.१२ टीएमसी व खडकवासला धरणात ०.६४ टीएमसी पाणी आहे. हा संपूर्ण पाणीसाठा आता पुणे शहरासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. शहराला दरमहा सव्वा टीएमसी पाण्याची गरज भासते. धरणांतील हा पाणीसाठा शहराला किमान दीड ते दोन महिने पुरेल एवढा आहे.

धरणात गतवर्षीपेक्षा जादा पाणी असल्याने शहरात पाणीकपात केली जाणार नसल्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले होते. परंतु, शेतीचे उन्हाळी आवर्तन दिल्यानंतर जूनमध्ये पाऊस न पडल्यास शहरात पाण्याची काटकसर करण्याचे सूतोवाच त्यांनी दिले होते. जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी शेतीच्या पाण्याचे नियोजन करताना आवर्तनाचा कालावधी कमी केला. त्यामुळे शेतीच्या पाण्यात मोठी बचत झाली. तसेच ग्रामीण भागात झालेल्या पावसाने आवर्तनाची गरज उरली नाही. या बचतीमुळे खडकवासला प्रकल्पात जादा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या साठ्यामुळे शहरात पाणीकपात होणार नाही. गतवर्षी याचकाळात खडकवासला प्रकल्पात २.२० टीएमसी पाणीसाठा होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१२१ तास स्केटिंग

$
0
0

पिंपरीः पिंपळे सौदागर येथील ड्रीम्झ स्केटिंग क्लबच्या नऊ विद्यार्थ्यांनी बेळगाव येथे आयोजित स्पर्धेत सलग १२१ तास स्केटिंग (रिले पद्धतीने) करून विश्वविक्रम नोंदवला. ओमनगरच्या शिवगंगा स्केटिंग क्लबने या उपक्रमाचे आयोजन केले होते.

विश्वविक्रम करणाऱ्यांमध्ये वरद पवार, ओम शानबाग, आयुष चौहान, अथर्व चिखलीकर, जय बोंडे, सिद्धेश भुजबळ, निहांशू हिरे, सार्थक ढवळे, वेदान्त मोटे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. स्केटरनी २९ मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्केटिंगला सुरुवात केली. सलग १२१ तास स्केटिंग करून तीन जूनला सायंकाळी सव्वासहा वाजता विश्वविक्रम केला. या स्केटिंगमध्ये देशातून ३१५ स्केटर सहभागी झाले होते. स्केटरनी ३१५०.६ किलोमीटर अंतर कापले. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक बुक ऑफ रेकॉर्ड, इंडियन अचिव्हर्स बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. चीनमधील गॉसोच्या क्लबने प्रस्थापित केलेल्या ७२.४५ तासांच्या स्केटिंगचा विक्रम या स्केटरनी मोडला. क्लबचे संचालक राहुल बिळगी व वैभव बिळगी यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅसिड उडाले; दोघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

कोथरूड येथे विद्यार्थ्यांच्या अंगावर अॅसिड उडाल्यामुळे जखमी झाल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी राम चनप्पा निंबुळे (७३, रा. जय भवानीनगर), वीरेंद्र विनोद लोमटे (३५ रा. अविश सोसायटी, रामबाग) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी सुखदेव सपकाळ (१९,रा. कोथरूड) याने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी हा त्याचा भाऊ विशाल याचा दहावीचा निकाल आणण्यासाठी गेला होता. त्या वेळी अविनाश सोसायटीमधून फेकण्यात आलेल्या एका कॅनमधील अॅसिड विशाल आणि त्याच्या मित्रांच्या अंगावर उडाले. यात ते जखमी झाले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६ लाख चोरणारे २४ तासांत गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

बँक खात्यातून सहा लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या अकाउंटंटच्या हातून त्या पैशांची चोरी करणाऱ्या चोरांच्या अख्ख्या टोळीला पोलिसांनी चोवीस तासांच्या आत अटक करून रक्कम हस्तगत केली.

संत तुकारामनगर येथील 'एसबीआय'मधून पैसे काढून बाहेर पडलेल्या अकाउंटंटच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून त्याला लुटण्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. त्या टोळीतील स्वप्नील ऊर्फ बाळू नामदेव शेलार (२३, रा. रामनगर, मोहननगर, चिंचवड) याला नागरिकांनी पाठलाग करून पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. अविनाश रोहिदास मोहिते (रा. रामनगर), सुनील गंगाराम कुसाळकर, अनिल गंगाराम कुसाळकर (दोघेही रा. जाधववाडी, चिखली), चेतन कदम (रा. खराळवाडी) अशी पोलिसांनी अटक केलेल्या साथीदारांची नावे आहेत. या प्रकरणी बाळकृष्ण अप्पाजी फरांदे (५४, रा. पिंपळे सौदागर) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

अप्पर पोलिस आयुक्त प्रकाश मुत्याळ यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी पकडून दिलेल्या शेलारला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने त्याच्या इतर साथीदारांबद्दल माहिती दिली. त्यानुसार निगडी पोलिस व गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने संयुक्त कारवाई करून रात्री उशिरा इतर चौघांना अटक केली. त्यांच्याकडून लुटलेली ५ लाख ९४ हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली. उपायुक्त डॉ. बसवराज तेली व सहायक पोलिस आयुक्त मोहन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली. आरोपींकडून अशा प्रकारचे इतर गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. भोसरी पोलिस पुढील तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा बंद यशस्वी झाल्याचा दावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी झालेले आंदोलन पूर्णतः यशस्वी झाल्याचा दावा रिक्षा संघटनांनी केला आहे; मात्र, या आंदोलनात सहभागी न होणाऱ्या रिक्षाचालकांना दमदाटी करून, धमकावून रिक्षा बंद करायला भाग पाडल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत.

ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीतर्फे त्यांच्या विविध मागण्यांसाठी शहरात बुधवारी सकाळपासून रिक्षा बंद आंदोलन करण्यात आले. रिक्षाचालक-मालक व संघटनांच्या प्रतिनिधींनी बुधवारी सकाळी अकरा वाजता पिंपरी चौकात एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले. या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. कामगार नेते बाबा आढाव यांच्या संघटनेचा या बंदला विरोध असल्याने त्यांच्या संघटनेचे सभासद या बंदमध्ये सहभागी झाले नव्हते. पिंपरी पोलिस ठाण्यात या संदर्भात एक अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काशिनाथ शेलार नावाच्या एका रिक्षाचालकाने सोमनाथ कलाटे (रा. डांगे चौक, थेरगाव) व त्याच्या तीन साथीदारांविरोधात तक्रार दिली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये शंभर टक्के बंद यशस्वी झाला. बाबा आढाव यांच्या संघटनेने विरोध करूनदेखील बंद यशस्वी झाला. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने काही तक्रारी केल्या जात आहेत.

- बाबा कांबळे, सरचिटणीस, ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदोन्नतीत चुकीची पालिकेकडून पुनरावृत्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागात डिप्लोमाधारक ज्युनिअर इंजिनीअरच्या पदोन्नतीबाबत प्रशासनाकडून सातत्याने चुकीची पुनरावृत्ती होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच शासकीय आदेशाची पायमल्ली होत असल्याचा आरोपही केला जात आहे.

महापालिकेत डिग्रीधारक ज्युनिअर इंजिनीअरची संख्या ६० असून, त्यापेक्षा दुप्पट डिप्लोमाधारक इंजिनीअर आहेत. त्यांना पदोन्नती देताना केवळ डिग्रीधारकाचांच विचार केला जातो. त्यामुळे डिप्लोमाधारकांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. वास्तविक, सरळ सेवेने नियुक्त झालेले पदवीधर आणि पदविकाधारक यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत दोन वेगवेगळ्या ज्येष्ठता याद्या तयार करण्याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाहीत, असे शासनाने महापालिकेला कळवले आहे.

परंतु, या आदेशाकडे दुर्लक्ष करत महापालिका स्तरावर पदोन्नती देताना सेवाज्येष्ठतेचा निकष डावलून केवळ डिग्रीधारकाचांच विचार होतो. त्यांना १७ ते १८ वर्षांत तीन-तीन पदोन्नत्या मिळतात. एवढा काळ काम केलेल्या डिप्लोमाधरक इंजिनीअरवर त्याच पदावर निवृत्त होण्याची वेळ येते. वास्तविक, या सर्व इंजिनीअरची नियुक्ती सरळ सेवेने एकच लेखी आणि तोंडी परीक्षा घेऊन त्यामधील गुणवत्तेनुसार गुणानुक्रमे झालेली आहे. तसेच शासकीय निर्णयानुसार सर्व इंजिनीअरची एकत्रित सेवाज्येष्ठता सूची तयार करून यापूर्वी दिलेल्या पदोन्नत्या पुनर्रचित करणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनाचे अधिकार

या संदर्भात शहर अभियंता एम. टी. कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही बाब प्रशासनाशी संबंधित असल्याचे सांगितले. तसेच याबाबत आयुक्त राजीव जाधव हेच निर्णय घेतील, असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन आणि श्रवणयंत्रांची योग्य दराने खरेदी होत असल्याचा निर्वाळा देणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना महिला कार्यकर्त्यांनी बुधवारी घेराव घातला. श्रवणयंत्रे खरेदीची फेरनिविदा, तसेच सोनोग्राफी मशीन खरेदीची कार्यवाही दक्षता व नियंत्रण पथकाचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

बाजारात दहा ते बारा लाख रुपयांना मिळणारे अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन २२ लाख रुपयांना आणि प्रत्येकी सात हजार रुपयांना मिळणारे श्रवणयंत्र मशीन १३ हजार रुपयांना खरेदी करण्याच्या प्रस्तावांना नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे आणि शारदा बाबर यांनी विरोध केला होता. महापालिकेच्या बायोमेडिकल अभियंत्यांनी दिलेला अभिप्राय डावलून आणि निविदेतील अटी-शर्तींचे पालन न करणाऱ्या पुरवठादार ठेकेदारांच्या निविदा पात्र ठरवून होणारी साहित्य खरेदी रद्द करावी. तसेच या साहित्यांच्या खरेदीसाठी पुन्हा निविदा मागवावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.

परंतु, दक्षता व नियंत्रण पथकाने अहवाल दिला नसताना डॉ. रॉय यांनी सोनोग्राफी मशीनसह श्रवणयंत्रांची खरेदी योग्य किमतीलाच होत असल्याची माहिती स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत दिली. त्यानंतर प्रस्ताव मंजूर झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या या नगरसेविकांनी महिला कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन रॉय यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तसेच मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत डॉ. रॉय यांच्या कार्यालयातून न हलण्याचा निर्णय घेतला. अखेर डॉ. रॉय यांनी श्रवणयंत्रे खरेदीसाठी फेरनिविदा मागवण्यात येणार असल्याचे आणि दक्षता व नियंत्रण पथकाचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतरच अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन खरेदीबाबत पुढील कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन आंदोलक महिलांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात नगरसेविकांसह शोभा भराडे, छाया पाटील, सारिका पवार, मंगल बुधनेट, नीता कुशारे, साक्षी काटकर आदींनी भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पातील वाहतूक सुधारणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी कॅम्प येथील वाहतूक सुधारण्यासाठी महापालिका व वाहतूक पोलिस यांच्याकडून २२ जूननंतर संयुक्तपणे कार्यवाही करण्यात येणार आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे व 'नो पार्किंग'मध्ये लावल्या जाणाऱ्या वाहनांवर संयुक्तपणे कारवाई करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या कारवाईसाठी महापालिका व पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांच्या वतीने देण्यात आले. तसेच येथे बहुमजली वाहनतळ उभारण्याची सूचनाही महापालिकेला करण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागणार की अजूनच जटील होणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.

महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्या कक्षात झालेल्या या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे, माजी उपमहापौर डब्बू आसवानी, नगरसेवक अरुण टाक, सुनीता वाघेरे, वाहतूक शाखेचे

पोलिस उपायुक्त सारंग आवाड, सहायक आयुक्त पोलिस महेंद्र रोकडे, व्यापारी प्रतिनिधी धनराज आसवानी, महेश मोटवानी, पिंपरीचे पोलिस अधिकारी, महापालिका अधिकारी उपस्थित होते.

शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. 'पिंपरी कॅम्पातील 'नो पार्किंग'बाबत वाहनांवर कारवाई करताना व्यापाऱ्यांकडून प्रचंड विरोध होतो. त्यामुळे पोलिसांना कारवाई करता येत नाही,' असे पोलिस उपायुक्त आवाड यांनी सांगितले. त्यावर चर्चेनंतर व्यापाऱ्यांनी कारवाईसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे महापालिका व वाहतूक पोलिस यांच्याकडून २२ जूननंतर रस्त्यावरील अतिक्रमणे व 'नो पार्किंग'मध्ये लावल्या जाणाऱ्या वाहनांवर संयुक्तरीत्या कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वाहतुकीत सुरळीत करण्यासाठी सम-विषम पार्किंग करण्याचे नियोजन सुरू असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच खासदार बारणे यांनी पिंपरी मार्केटजवळील पार्किंगच्या मोकळ्या जागेत बहुमजली वाहनतळ उभारण्याची सूचना माहिपालिकेला केली. 'या संदर्भात चर्चा करून नियोजन केले जाईल,' असे महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी सांगितले.

पिंपरी कॅम्पातील व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये माल घेऊन येणारी मोठी वाहने दिवसा आल्यामुळेदेखील वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होतो. त्यामुळे पोलिसांच्या आवाहनानुसार पिंपरीमधील व्यापाऱ्यांनी मालवाहतूक रात्री दहानंतरच करण्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी शाळांबाहेर लावल्या जाणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. या बेशिस्त शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत वाहतूक पोलिसांकडून घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेन्शन वाढीसाठी आंदोलनाचा इशारा

$
0
0

पुणेः इंडियन बँक्स असोसिएशनच्या (आयबीए) बँक निवृत्तांच्या पेन्शनमध्ये वाढ न करण्याच्या निर्णयाचा बँक निवृत्तांच्या सभेत निषेध करण्यात आला. या निर्णयाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन व निदर्शनांचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णयही घेण्यात आला. रिझाइन्ड बँक एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशनतर्फे नुकतीच बँक निवृत्तांची सभा घेण्यात आली. अध्यक्ष आर. के. पाठक, एस. रामचंद्रन, प्रकाश पत्की, वसंत जोशी आदींनी या वेळी मार्गदर्शन केले.

'आयबीए'ने निवृत्तांचे बँकांच्या वेतनकराराशी कायदेशीर नातेच नाही, असे वक्तव्य केले आहे. महागाई वाढत असताना पेन्शनमध्ये गेल्या वीस वर्षात कोणतीही वाढ झालेली नाही. २० वर्षांपूर्वी निवृत्त महाव्यवस्थापकाची पेन्शन आता निवृत्त होणाऱ्या शिपायापेक्षाही कमी आहे. हा निवृत्तांवरचा घोर अन्याय आहे,' असे या वेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेडमध्ये वृक्षांची राजरोस कत्तल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राजगुरुनगर

खेड तालुक्यातील विऱ्हाम गावाच्या हद्दीतील तांबडेवाडी येथे मठ आणि अवैध रस्त्याच्या बांधकामासाठी घनदाट वृक्षराजीची कत्तल सुरू आहे. ही वृक्षतोड दहशतीच्या जोरावर सुरू आहे. या ठिकाणी करण्यात येत असलेल्या बेकायदा रस्त्याची पाहणी करून अवैध कामांचा आणि उत्खननाचा पंचनामा करण्याचे आदेश खेडचे तहसीलदार प्रशांत आवटे यांनी दिले आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तहसीलदार आवटे यांनी तांबडेवाडी येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. संबंधित जमिनीत बांधण्यात आलेला अवैध मठ आणि विनापरवाना सुरू असणारी कामांची पाहणी केली. या वेळी संबंधित मठातील बाबा व त्याच्या समर्थकांकडून अडथळा होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तांबडेवाडी येथे पुण्यातील एका बड्या व्यावसायिकाकडून कोकणकड्यावर बारा ज्योतिर्लिंग मंदिरांचा प्रकल्प बांधण्याच्या नावाखाली बेकायदा उत्खनन सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासंबंधी 'मटा'ने वृत्त दिले होते. दरम्यान महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांनी अद्यापपर्यंत झालेले उत्खनन व तेथील रस्त्याचा दोन वेळा पंचनामा केलेला आहे. आत्ता करण्यात येणारा पंचनामा तिसऱ्यांदा होणार आहे.

मठातील बाबा आणि तहसीलदारांचा वाद

महसूल आणि वनविभागाला न जुमानता मठातील धनेश पुरी बाबा आणि त्याचे अनुयायी झाडांची बेकायदा कत्तल करत आहेत. तिसऱ्यांदा होणाऱ्या पंचनाम्यामुळे चिडून जाऊन धनेश पुरी बाबा व त्याच्या समर्थकांनी पोलिसांच्या देखत तहसीलदार आवटे व उपस्थित काही जणांशी जोरदार वाद घातले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजूनही पुणे जिल्ह्यात ४१ टँकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी प्रमाणात पाणी टंचाई भासत आहे. आजअखेर संपूर्ण जिल्ह्यातील ४१ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, गेल्या वर्षी १६ जून रोजी ६३ गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. या वर्षी टँकरची संख्या १० ने कमी झाली आहे.

या वर्षी ४७ टँकरने ४१ गावे व २६६ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील ८३ हजार ८०९ लोकसंख्या त्याचा उपभोग घेत आहे. प्रशासनाने आतापर्यंत दोन बोअर व २४ खासगी विहिरी सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी अधिग्रहित केले आहेत. गेल्या वर्षी ५७ टँकरने ६३ गावे व ३०७ वाड्यांतील ९६ हजार १४३ गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. त्यामध्ये २८ शासकीय टँकर व २९ खासगी टँकर होते. तसेच, २७ विहिरी व बोअर अधिग्रहित करण्यात आले होते. त्यामध्ये बारामती, भोर, खेड, हवेली आणि पुरंदर या तालुक्यातील सर्वाधिक टँकर होते. या वर्षातही बारामती, भोर, खेड आणि पुरंदर या तालुक्यात पाणी टंचाई होती. मात्र, हवेलीमध्ये टँकरची संख्या कमी होती.

गेल्या जूनमध्ये सरासरीच्या केवळ २५ ते ३० टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे सुरूवातीला पाणी टंचाईचे प्रमाण अधिक होते. मात्र, नंतर वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने या उन्हाळ्याच्या सुरूवातीपासून पाणी टंचाई भासण्याचे प्रमाण कमी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौंडमध्ये आढळली दुर्मिळ ‘लेपर्ड गेको’

$
0
0

दौंडः दौंड शहराजवळील मेरगळवाडी गावच्या हद्दीतील राखीव वनक्षेत्रात लेपर्ड गेको ही दुर्मिळ पाल आढळून आली आहे. 'वाइल्ड, अ बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व्हेशन सेंटरचे प्रल्हाद जाधव, नचिकेत अवधानी, करणसिंग नगरे, अक्षय बोराटे, गणेश सांगळे यांना ही पाल आढळून आली. ही पाल साधारणपणे पाच ते सात इंच लांब असते. बिबट्यासारखे रंग व पट्टे या पालीच्या अंगावर असल्यामुळेया पालीचे नाव 'लेपर्ड गेको' असे पडले आहे. इतर पाली सरपटत जातात तशी ही पाल जात नाही. या पालीच सरपटणे मगरी सारखे असते. दौंड परिसरात पहिल्यांदाच ही पाल आढळून आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहसंचालकांकडून मेंटल हॉस्पिटलची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,येरवडा

काही दिवसांपूर्वीच दूषित पाण्यामुळे येरवडा मेंटल हॉस्पिटलमधील पस्तीस पेशंटना उलट्या, जुलाबांच्या (गॅस्ट्रो) त्रासाने ग्रासले होते. मागील आठवड्यात पुन्हा सत्तावीस पेशंटना दूषित पाणी पिण्याने उलट्या-जुलाबांचा त्रास झाला होता. याबाबतची माहिती आरोग्य विभागाला कळविण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आरोग्य सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी सोमवारी हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली.

पिण्याच्या पाइपलाइनमधून दूषित पाणी पुरवठा झाल्याने वॉर्ड क्रमांक दोन आणि तीनमधील पस्तीसपेक्षा अधिक पेशंटना गॅस्ट्रोची लागण झाली होती. त्यातील तीन जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. त्याचप्रमाणे हा आजार पसरू नये, यासाठी इतर पेशंटना प्रतिबंधात्मक गोळ्या देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्यात 'मेडिक्लोर' टाकण्यात आले. वेळीच करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे साथ आटोक्यात आली. मात्र, गेल्या आठवड्यात पुन्हा अठरा जणांना दूषित पाणी प्यायलामुळे उलट्या जुलाबांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर आरोग्य सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी येरवडा मेंटल हॉस्पिटलची पाहणी केली.

'पाण्यामध्ये मेडिक्लोर टाकण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात यावी. त्याचप्रमाणे पाण्याची पाइपलाइन तातडीने बदलण्यात यावी, अशा सूचना दिल्या आहेत. पेशंटवर केल्या जाणाऱ्या उपचार आणि उपाय योजनांची माहिती आरोग्य संचालकांना सादर केली आहे,' अशी माहिती आरोग्य सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images