Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

यंत्रणेची डोळेझाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रजच्या नवीन बोगद्यापासून किवळे फाट्यापर्यंतच्या ३४ किलोमीटर रस्त्यावर गेल्या साडेचार वर्षांतील अपघातांत १५७ जणांचा बळी जाऊनही उपाययोजना करण्यात संबंधित यंत्रणांना अपयश आले आहे. या रस्त्यावरील अपघातप्रवण ठिकाणांची यादी वाहतूक पोलिस शाखेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) यापूर्वीच पाठविली असली, तरी त्यानंतर कोणतेही पाऊल उचलले गेले नाही.

नऱ्हे येथे गुरुवारी झालेल्या भीषण अपघातानंतर कात्रज- देहूरोड बायपासवरील अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या रस्त्याकडे झालेल्या कमालीच्या दुर्लक्षामुळेच अपघातांची मालिका कायम असल्याचे याबाबतच्या पाहणीतून अधोरेखित झाले आहे. या रस्त्यावर एकूण वीस अपघातप्रवण क्षेत्र असून, त्यांची यादी वाहतूक पोलिसांनी तयार केली आहे. विश्वास पांढरे हे वाहतूक शाखेचे उपायुक्त असताना ही यादी केली गेली; तसेच त्यांबाबतच्या काही उपायोजना द्विसदस्यीय समितीने सुचविल्या आहेत. याबाबतचा प्रस्ताव 'एनएएचआय'कडे पाठविण्यात आला आहे. मात्र, त्यावर कोणतेही उत्तर आलेले नसल्याचे पोलिसांनी 'मटा'ला सांगितले.

कात्रज नवीन बोगद्यापासून मुंबईच्या दिशेला असलेल्या किवळे फाट्यापर्यंत ३४ किलोमीटर अंतर आहे. प्रामुख्याने खेड शिवापूरहून पुण्याच्या दिशेला येताना कात्रज नवीन बोगद्यातून बाहेर आल्यानंतर वडगाव बुद्रुकपर्यंत तीव्र उताराचा रस्ता आहे. त्यामुळे जड वाहतूक करणाऱ्या कंटेनरचे या ठिकाणी अपघात होतात, असा अनुभव आहे.

गर्दीच्या नियमनासाठी पोलिस

गुरुवारच्या अपघातानंतर पुणे वाहतूक पोलिसांनी नऱ्हे येथील अपघातप्रवण परिसरामध्ये वाहतूक पोलिस नेमण्याचा निर्णय घेतला आहे. 'सकाळी गर्दीच्या वेळी या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढलेली असते; तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही. यासाठी या परिसरात वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे,' अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.

अपघात प्रवण क्षेत्रे

कात्रज बोगदा बाह्यवळण, दरी पूल, आंबेगाव (बु.), नऱ्हेगाव, वडगाव पूल, मुठानदी पूल, वारजे पूल, डुक्कर खिंड, चांदणी चौक, बांदल इस्टेट, एचईएमआरएल, सूस रस्ता ते सुतारवाडी, किलोस्कर कंपनीसमोर, बालेवाडी, मुळा नदीलगत, वाकड पूल, इंदिरा कॉलेजसमोर, साई पेट्रोल पंपासमोर, हॉटेल गोकुळ आणि राजमुद्रासमोर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रसिक असल्याचा मला गर्व : पुरंदरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मी रसिक आहे, आणि मला त्याचा गर्व आहे. कोणी काहीही म्हणो, माझी रसिकता निर्विवाद आहे,' असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रविवारी सांगितले.

थर्ड बेल एंटरटेनमेंटतर्फे देण्यात येणाऱ्या कलातीर्थ पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. प्रसिध्द नृत्यांगना सोनिया परचुरे, अश्विनी एकबोटे, प्राजक्ता माळी, शर्वरी जमेनीस, दिपाली विचारे, मयूर वैद्य, सुभाष नकाशे, परिमल फडके, रॉकी पूनावाला, मेघा घाडगे आणि शांभवी दांडेकर यांना कलातीर्थ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर नृत्य आणि मनोरंजन क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या काही कलाकारांचा, तंत्रज्ञांचा, पत्रकार व व्यवस्थापकांचाही सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

पुरस्कार वितरणाआधी बाबासाहेबांचा सत्कार करण्यात आला. त्याचा धागा पकडून बाबासाहेबांनी 'मी रसिक आहे, म्हणून मला पुरस्कार दिला, असे मी समजतो,' असे वक्तव्य केले. तसेच इतिहासकालीन नर्तिका मस्तानीवर नृत्य नाटिका निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. संस्थेचे संस्थापक स्वप्नील रास्ते यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्राह्मणांचा राष्ट्रवाद रोखण्यासाठीच ‘मराठा’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सध्या मराठा आरक्षणावरून वाद सुरू आहे. मात्र, शंभर वर्षांपूर्वी मराठा अशी स्वतंत्र जात अस्तित्त्वातच नव्हती. सर्व कुणबी शेतकरीच होते. ब्राह्मणांचा राष्ट्रवाद कमी करण्यासाठी ब्रिटीशांनी राजकारण करून मराठा जात तयार केली. संत तुकाराम, शिवाजी महाराज स्वतःला मराठा म्हणत नव्हते. नव्या पिढीने जातीची भुते आणली. पुढे कुणबी-मराठा संघर्ष त्यामुळेच निर्माण झाला,' अशा शब्दांत ज्ञानपीठप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मराठा आरक्षणावर सूचक भाष्य केले.

स. प. महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षाची रविवारी सुरुवात झाली. त्यानिमित्त आयोजित व्याख्यानात नेमाडे बोलत होते. प्राचार्य डॉ. दिलीप सेठ, शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेचे अॅड. जयंत शाळिग्राम आदी या वेळी उपस्थित होते. नेमाडे यांनी आपल्या भाषणात मराठी साहित्य, जातीव्यवस्था, इंग्रजी भाषा, परंपरा अशा विविध मुद्द्यांवर परखड भूमिका मांडली.

नेमाडे म्हणाले, 'मराठी साहित्य जगातील सर्वांत समृद्ध साहित्यांपैकी एक आहे. गेल्या शंभर वर्षांत आपला समाज चिंताग्रस्त झाला. सुखी समाजाची लक्षणे आपल्या समाजात दिसत नाहीत. न सुटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधत राहणे हिंदू समाजाचे लक्षण आहे. शंभर वर्षांपूर्वी जातीचे अवडंबर, स्त्रियांवर अत्याचार होत नव्हते. आता कोणत्याही क्षणी दंगे सुरू होतील, अशी स्थिती आहे.' मराठी माणसांची बौद्धिक उंची जितकी वाढली, तितकी मराठी साहित्याची उंची वाढली नाही, असेही मत त्यांनी मांडले.

'जागतिक होण्याची व्याख्या बदला'

जागतिक होण्यासाठी साहित्याचा इंग्रजीत अनुवाद होणे आवश्यक आहे, असे मानले जाते. मात्र, तसे काही नसते. आता जागतिक होण्याची व्याख्या बदलली पाहिजे. लेखकांना जागतिक होण्याचे व्यसन लागते आहे. आपल्या मनाला भावते ते जागतिक असा विचार केला पाहिजे, असे नेमाडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवनियुक्त अध्यक्ष चर्चेसाठी तयार

$
0
0

विद्यार्थ्यांचा निष्कारण विरोध - चौहान यांची भूमिका

म. टा. प्रतिनिधी, पुणे

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदावरून विद्यार्थ्यांनी संप पुकारलेला असताना नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी विद्यार्थ्यांची चर्चा करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. 'कोणताही प्रश्न चर्चेतूनच सुटतो. त्यासाठी संवाद व्हायला हवा. केवळ विरोध करून, बंद पुकारून काही होत नाही. काम करण्याची मला संधी तर द्या,' असे आवाहन त्यांनी केले.

चौहान यांची नियुक्ती माहिती व प्रसारण मंत्रालयाने तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी बेमुदत संप पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर, 'मटा'ने थेट चौहान यांच्याशी संवाद साधून या प्रकरणी त्यांची भूमिका जाणून घेतली.

'मुळात या पदासाठी सरकारनेच माझी निवड केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून मला सहकार्याची अपेक्षा आहे. कोणताही माणूस जन्मापासून मोठा होत नाही. मलाही मोठे होण्याचा प्रवास करायचा आहे. छोट्या माणसाला छोटाच ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहिले, तर तो मोठा कसा होणार? आतापर्यंत माझ्यावर सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. माझे काम परिणामकारक आहे. आता अध्यक्ष म्हणून तसेच काम करण्याची इच्छा आहे. त्यासाठी मला संधी मिळाली पाहिजे. या पदाला नक्कीच योग्य तो न्याय देण्याची माझी क्षमा आहे,' असा विश्वासही चौहान यांनी व्यक्त केला.

'माझ्या कामात काही चुका झाल्या, तर विद्यार्थ्यांना विरोध करण्याचा निश्चित अधिकार आहे. अद्याप मी पदाची सूत्रेही स्वीकारलेली नाहीत. त्यापूर्वीच विद्यार्थ्यांकडून होत असलेला विरोध निष्कारण आहे,' असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची तयारी आहे. विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आतापर्यंत फिल्म इन्स्टिट्यूटने नेहमीच क्रिएटिव्ह एक्स्प्रेशन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे. आपणही कलावंत असल्याने त्याला पाठिंबा असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.

नवनियुक्त समितीतील अनघा घैसास व शैलेश गुप्ता या दोन सदस्यांचा चित्रपटाशी काही संबंध नसताना त्यांना समितीवर का घेतले, या विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरही चौहान मोकळेपणाने बोलले. 'हे दोघंही चित्रपटसृष्टीशी संबंधितच आहेत. मुळात, वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसे एकत्र आल्यावर विचारांची देवा‍णघेवाण होते. त्याचा फायदा संस्थेचे काम अधिक चांगल्या रितीने करण्यासाठी होतो. विद्यार्थ्यांच्या मुद्दा विचारात घेतल्यास क्रिकेट बोर्डावर क्रिकेटपटूच असले पाहिजेत,' याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
.......................

अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यावर विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यालाच प्राधान्य आहे. संस्थेतील तंत्रज्ञानाचे अपग्रेडेशन, पाच वर्षांचा बॅगलॉग भरून काढणे ही मोठी आव्हाने आहेत. त्यासाठी वेगवान काम करावे लागणार आहे. या पदाचा कार्यकाल तीन वर्षांचा आहे. मात्र, त्या काळात पाच वर्षांचे काम करावे लागणार आहे.
- गजेंद्र चौहान, नवनियुक्त अध्यक्ष, एफटीआयआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंड प्रकाश चव्हाणच्या भावाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण यांच्या भावाने आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (१४ जून) सकाळी ही घटना उघडकीस आली. विशाल लक्ष्मण चव्हाण (वय ३०, रा. निर्मल मार्केट, चिखली) असे त्याचे नाव आहे.

डिसेंबर २०१४ मध्ये प्रकाश चव्हाण याचा खून झाला आहे. निगडीचे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय नाईक-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण यांचा भाऊ विशाल चव्हाण याला त्वचेचा आजार होता. मागील काही वर्षांपासून तो या आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. विशाल याला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आल्यानंतर त्याने शनिवारी मध्यरात्री त्याच्या खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रकाश चव्हाण याच्या माथाडी संघटनेत विशाल काम करत होता. मात्र, त्वचारोगाच्या गंभीर आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केली. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरवड्यात खुनाचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

पूर्ववैमनस्यातून एकाने कोयत्याने तरुणाच्या डोक्यात वार करून खुनाचा प्रयत्न केला. जखमी तरुणाच्या डोक्याला बारा टाके पडले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी येरवड्यातील सेवक चौकात घडली. दिवसाढवळ्या ही घटना घडल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.

सरफराज शेख (२२, रा. सेवक चौक) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शाहरुख शरीफ सय्यद (२६, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी सय्यदवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरफराजचा भाऊ शाहनवाज आणि शाहरुख सय्यद यांचे सहा महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून शाहरुखने शनिवारी सरफराजच्या दुकानावर जाऊन शाहनवाजला बोलावण्यास सांगितले. सरफराज भावाला बोलवण्यासाठी जात असतानाच शाहरुखने मागून त्याच्या डोक्यात धारदार कोयत्याने डोक्यात प्रहार केला. त्यामुळे सरफराज रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. शाहरुखने पुन्हा त्याच्यावर वार केला असता, त्याने तो चुकवून शेजारील दुकानात पळ काढल्याने तो बचावला. काही वेळातच नागरिकांची गर्दी जमू लागल्यावर शाहरुख पळून गेला. स्थानिक नागरिकांनी तातडीने सरफराजला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्या डोक्याला बारा टाके पडले असून, प्रकृती गंभीर पण स्थिर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायोमेट्रिक प्रणालीचे बारामतीत तीन-तेरा

$
0
0

>> संतराम घुमटकर, बारामती

सरकारी धोरणाप्रमाणे मागील शैक्षणिक वर्षापासून शाळेत येताना शिक्षकांना बायोमेट्रिक प्रणालीवर उपस्थिती नोंदवावी लागणार होती; मात्र बारामती तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २८४ शाळापैकी फक्त बारा शाळांमध्येच बायोमेट्रिक प्रणाली बसवण्यात आली आहे. तसेच, त्यापैकी एकाही शाळेतील यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांना यामधील पुरेसे ज्ञान नसल्यामुळे, तर कुठे वीज नसल्याने यंत्रणा बंद पडल्याची माहिती आहे. त्यामुळे ही यंत्रणा बसवल्यापासूनच सपशेल नापास झाल्याचे चित्र आहे. यंदाच्या वर्षात तरी त्या प्रणालीचे भाग्य उजळणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बारामती पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे या प्रणालीसंदर्भात कोणतेच नियोजन नसल्यानेदेखील काही शिक्षकांना दांडी मारण्यासाठी एक प्रकारे दुर्लक्ष करून सवलतच दिली जात असल्याचा आरोप होत आहे. संबंधित शाळेतील शिक्षकांचा पगार सर्व्हिस बुक पाहूनच काढला जातो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीच्या मशीनचा वापर होणार असल्याने मनापासून काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये उत्सुकता होती. तसेच मनमानी करणाऱ्या शिक्षकांवर वचक राहील, असे वाटले होते; मात्र झाले उलटेच. सध्या काही शाळांमध्ये ही प्रणाली एक शोभेची वस्तू बनून पडली आहे. या मशीनचा वापर कसा करावा, यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणदेखील देण्यात आले होते; मात्र देखभाल करणारी यंत्रणा कोणती, याचा ठावठिकाणा प्रशासनाला नाही. ही प्रणाली चालवायची असेल, तर ग्रामीण भागातील शाळांना सतत वीजपुरवठा असणे गरजेचे आहे. भारनियमनाच्या काळात काय करायचे हा मुख्य प्रश्न आहे.

बायोमेट्रिक मशीन बसवलेल्या जि. प. शाळा

मळद, डोर्लेवाडी, झारगडवाडी, ढवाणवस्ती, वाणेवाडी, जायपत्रेवाडी, वडगाव नं. २, माळेगाव नं. १, माळेगाव खु., खंडोबाची वाडी, मेडद, माळेगाव नं. २
........

हा पथदर्शी प्रकल्प आहे. बंद पडलेली बायोमेट्रिक प्रणाली लवकरात लवकर सुरू करण्यात येईल.
एन . डी . वणवे,
गटशिक्षणाधिकारी, पं. स. बारामती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी खासदार उतरले रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अवैध प्रवासी वाहतूक आणि बाजारपेठेतील बेशिस्त वाहतूक याकडे वाहतूक पोलिसांचे हेतूपुरस्कृत दुर्लक्ष होताना दिसते. त्याचा फटका अनेकदा अॅब्युलन्स असो वा व्हिआयपींना बसला आहे. त्यामुळे रविवारी (१४ जून) खुद्द खासदार श्रीरंग बारणे यांनी आमदार गौतम चाबुकस्वार व शिवसेनेच्या पदाधिकारी-व्यापाऱ्यांसह पिंपरी कॅम्पात भेट देऊन पाहणी केली. 'मटा'ने कॅम्पातील कोंडीबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते.

नगरसेवक डब्बू आसवानी, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. मुदीराज, वाहतूक विभागाच्या सहायक निरीक्षक अलका सरग तसेच व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले,पिंपरीतील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे. यासाठी येत्या बुधवारी (१७ जून) यासाठी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्यासोबत लोकप्रतिनिधी, वाहतूक पोलिस व व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीमध्ये या परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीकोनातून सर्व बाजूंनी चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने वाहतूक कोंडीमध्ये भर पडते तसेच बेशिस्त व दुहेरी पार्किंगमुळे नागरिक व व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. या वाहनचालकांवर वाहतूक पोलिस योग्य कारवाई करत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. तसेच पिंपरी पुलाखाली उपलब्ध असलेल्या रिकाम्या जागेत 'पे अँड पार्क' सुविधा सुरू करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. तर स्थानिक नगरसेवक डब्बू असवानी यांनी सध्या वादग्रस्त ठरलेल्या कत्तलखान्याची जागा पे अँड पार्कसाठी देण्याची मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, यापूर्वी जेव्हा-जेव्हा कारवाई करण्यात आली आहे. तेव्हा व्यापाऱ्यांनीच या कारवाईला विरोध केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांच्या संपाला चित्रकर्मींचा पाठिंबा?

$
0
0

चौहानांच्या नियुक्तीला विरोध योग्यच

म. टा. प्रतिनिधी, पुणे

चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीवर शक्तीमान, फिल्म इन्स्टिट्यूटवर युधिष्ठिरला आणून बसवले आहे. आता कृष्ण वगैरेच मंडळी यायची बाकी आहेत, असा उपरोधिक टोला ज्येष्ठ माहितीपट दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांनी केंद्र सरकारला लगावला. चौहान यांच्या नियुक्तीला विद्यार्थ्यांनी केलेला विरोध योग्यच आहे, अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांच्या संपाला पाठिंबा दिला.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदी अभिनेते आणि महाभारत मालिकेतील युधिष्ठिर फेम गजेंद्र चौहान यांची नियुक्ती झाल्याने संस्थेच्या विद्यार्थ्यांनी संप पुकारला आहे. विद्यार्थ्यांची बाजू समजून घेण्यासाठी पटवर्धन रविवारी पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर आता सर्वच क्षेत्रात धक्के बसू लागले आहेत. त्यामुळे फिल्म इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदी सॉफ्ट पॉर्न चित्रपटांत भूमिका केलेल्या गजेंद्र चौहान यांची नियुक्ती धक्कादायक वाटत नसल्याचेही स्पष्ट मत त्यांनी मांडले.

चित्रपटांत काहीच योगदान नसलेल्या चौहान यांच्या नियुक्तीला विद्यार्थ्यांनी विरोध करणे स्वाभाविक आहे. ही नियुक्ती अपारदर्शी आणि राजकीय आहे. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक जहानू बरूआ, राजकुमार हिरानी यांची नावे चर्चेत होती. मग, मध्येच चौहान यांची नियुक्ती कशी झाली, त्यांची निवड करण्याची प्रक्रिया कशी राबवली गेली, त्यासाठी कोणाचा सल्ला घेतला गेला,' असे प्रश्नही त्यांनी उपस्थित होते.

सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी पहलाज निहलानीसारखा माणूस बसवल्याचा मूर्खपणा सरकारने या पूर्वीच केला आहे. त्यापाठोपाठ हा अजून एक प्रकार समोर येणे हा चित्रपटसृष्टीच्या भगवीकरणाचाच भाग आहे. या विरोधात विद्यार्थी स्वतःहून आवाज उठवत आहेत ही नक्कीच महत्त्वाची गोष्ट आहे. आता विद्यार्थी माघार घेणार नाहीत, याचा विश्वास वाटतो, असेही त्यांनी सांगितले.

शत्रुघ्न सिन्हा का नाहीत?

गजेंद्र चौहान भाजपशी निगडित आहेत म्हणून त्यांना विरोध आहे, असे नाही. मात्र, त्यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान दखलपात्र नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भाजपसंबंधित व्यक्ती अध्यक्षपदी असण्याला विरोध नाही. मात्र, ती लायक असायला हवी. ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे भाजपचेच आहेत. मग, त्यांची नियुक्ती का करण्यात आली नाही, असाही सवाल त्यांनी विचारला. ते स्वतः फिल्म इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी असल्याने त्यांना येथील कामाबाबतची जाण आहे. त्यांची नेमणूक झाली असती, तर विरोध झाला नसता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उलगडले ‘सायन्स’चे ‘गणित’

$
0
0

मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांचा अनुभव; 'स्कील टू करिअर', 'मटा'तर्फे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावी सायन्सला प्रवेश घेताना नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार करायचा... दहावीनंतर अकरावीच्या टप्प्यावर अभ्यास करण्याच्या सवयींमध्ये करावे लागणारे नेमके बदल कोणते... सायन्सला गेल्यानंतर पुढे करिअरसाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत... अशा विविध प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना शनिवारी मिळाली. निमित्त होते, अकरावी सायन्सविषयक मार्गदर्शनपर व्याख्यानाचे.

'स्कूल टू करिअर' संस्थेतर्फे उद्यानप्रसाद कार्यालयात अकरावी सायन्सला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र टाइम्स या उपक्रमाचे मीडिया पार्टनर होते. करिअर कौन्सेलर डॉ. श्रीराम गीत यांनी या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचीही त्यांनी या वेळी उत्तरे दिली. संस्थेच्या संचालिका श्वेता देशपांडे या वेळी उपस्थित होत्या.

डॉ. गीत यांच्या सूचना -

- निसर्गातल्या प्रत्येक घडामोडींबाबत 'हे असेच का होते,' असा प्रश्न ज्याच्या मनात येतो ते विद्यार्थी सायन्सला प्रवेश घेण्याच्या पात्रतेचे आहेत. सायन्सला आल्यावर विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले पाहिजे.

- विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी सायन्समध्ये प्रवेश घेताना, सायन्सलाच का प्रवेश घेत आहोत याचे नेमके कारण विचारात घ्यायला हवे. त्यानुसार इतर गोष्टींचे नियोजन करणे सोपे जाते.

- कॉलेजमध्ये सर्व तासांना बसणे आवश्यक असते. त्यामुळे कॉलेज म्हणजे निवांतपणा असे विद्यार्थ्यांनी समजू नये.

- राज्य बोर्डाच्या पाठ्यपुस्तकांबरोबरीने सीबीएसई बोर्डाच्या पाठ्यपुस्तकांचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपली समज वाढण्यास मदत होते, आपल्याला सायन्समधील किती येते हे समजते.

- विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाची सवय लावावी.

- स्वतः नोट्स काढण्याची सवयही विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरते.

- इंजिनीअरिंगला प्रवेश घ्यायचा झाल्यास, कोणत्या क्षेत्रात जास्त संधी उपलब्ध आहेत याचा विचार करून त्या शाखेला प्रवेश घ्यावा.

- प्रवेश परीक्षांचा अत्यंत बाराकाईने अभ्यास करावा.

- बायफोकलचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला जास्त वेळ देण्याची आवश्यकता आहे.

- मूलभूत विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर करिअर संधी उपलब्ध आहेत. त्यासाठीच्या शिक्षणासाठीही जास्त कालावधी द्यावा लागतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालक संपावर ठाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रिक्षाचालकांच्या विविध प्रलबिंत मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आता माघार घेणार नाही, अशी भूमिका शरद राव प्रणित अ‍ॅटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने घेतली आहे. समितीतर्फे येत्या १७ जून रोजी (बुधवारी) एक दिवसीय राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. त्यानंतरही सरकारला जाग न आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांवर कारवाई व्हावी, कल्याकारी मंडळांची स्थापना करावी, परवाने नूतनीकरणाचा प्रश्न, मध्यरात्रीच्या भाड्यात ५० टक्के वाढ करावी, अशा विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक लढा देत आहेत. मागण्या मान्य करण्याएेवजी सरकारने रिक्षा चालकांसाठी अनुकूल असलेली हकीम समितीच बरखास्त करण्याचा निर्णय घेऊन रिक्षा चालकांचा अपेक्षाभंग केला आहे. त्यामुळे आता ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नाही, असा निर्णय रविवारी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या रिक्षा स्टँड प्रमुखांच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत सर्व सलग्न संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यभरातील १५ लाख रिक्षाचालक १७ जूनच्या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे समितीने सांगितले.

बंदच्या दिवसी कृती समितीतर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही करण्यात येणार आहे, अशी माहिती कृती समितीचे राज्य सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरड कोसळून बसमधील २ ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

दरडींसाठी अत्यंत धोकादायक घाट म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये अडचणीचा ठरत असलेल्या माळशेज घाटात प्रवासी बसवर रविवारी दरड कोसळून दोन ठार, तर पाच जण जखमी झाले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. या घाटात ९ किमी अंतरातील अवघड वळणे असून, अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. मुंबई आय.आय.टी.च्या तज्ज्ञांनीदेखील हा घाट प्रवासी वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल गेल्याच वर्षी दिला आहे.

साई गणेश टॅव्हल्सची ही बस घाटातून जात असताना अचानक दरड कोसळली. त्यात एकाच सीटवर बसलेल्या प्रवाशांच्या अंगावर दरडीचा मोठा भाग आदळल्याने दोघे ठार झाले. मृतांची नावे समजू शकली नाहीत. पाच जण जखमी झाले आहेत. त्यातील काहींना आळेफाटा येथील रुग्णालयात, तर काहींना कल्याण येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. गेल्या वर्षीदेखील घाटात दरड कोसळून एक टेम्पो दरडीखाली गाडला गेला होता. त्यात चालकाचा मृत्यू झाला होता. घाटातील दरड कोसळण्याच्या संभाव्य घटना ध्यानात घेऊन प्रशासनाकडून पुरेसे सुरक्षेचे उपाय योजण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीकेंडला लोणावळा हाऊस फुल्ल

$
0
0

मान्सूनच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्याने शालेय सुट्ट्यांमधील शेवटच्या रविवारी (१४ जून) लोणावळा गर्दीने फुलून गेला होता. मुंबईसह पुण्यातील अनेकांनी लोणावळ्यात रविवारच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी हजेरी लावली. दरम्यान, ठिकठिकाणी पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीपुढे लोणावळा शहरातील रस्ते अपुरे पडल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे बराच वेळे येथे वाहतूक कोंडी झाली होती.

मान्सून शुक्रवारी पुणे परिसरात दाखल झाल्यानंतर रविवारी सकाळ पासूनच घाटमाथ्यावरील ठिकाण असलेल्या लोणावळा व खंडाळा परिसरात प्रचंड धुके व पावसाने हजेरी लावली होती. या मनमोहक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी होऊ नये या करिता वाहतूक पोलिस शर्थीचे पयत्न करत
होते. मात्र, पोलिसांचे हे प्रयत्न कमी पडत होते. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या भुशी धरणाचे पाणी अद्याप तळाशी आहे. तरी देखील पर्यटक मोठ्या संख्येने धरण परिसरात गेले होते. लायन्स पॉइंट, धुबड तलाव, शिवलिंग पॉइंट, टायगर पॉइंट, पवनानगर, राजमाची पॉइंट, तसेच लोहगड, विसापूर किल्ले, कार्ला-
भाजे लेणी येथे पर्यटकांनी तोबा गर्दी केली होती.

शहरातील बहुतांश लहान व मोठी हॉटेल पर्यटकांनी भरली होती. तसेच चिक्की व अन्य पदार्थ खरेदीसाठी देखील पर्यटकांनी गर्दी केल्याने व्यावसायक देखील सुखावून गेले होते. पहिल्या पावसानंतर लोणावळा- खंडाळ्याशिवाय मावळातील पवन, आंदर व नाणे या तीन मावळ प्रांतातही अनेक प्रेक्षणीय स्थळांना पर्यटकांनी भेट दिली. फॅमिली टूरसाठी आलेल्यांनी पहिल्या पावसाची दृष्य कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेतली.
हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांना पोलिसांनी या वेळी हटकले. पावसाचा आनंद लुटताना स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या जीवावर बेतेल असे कोणतेही कृत्य करू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे. येत्या काळात पर्यटकांची वाढणारी गर्दी लक्षात घेता लोणावळा आणि खंडाळा परिसरात पोलिसांनी गस्त वाढविली आहे. बहुतेक पर्यटक खरेदी करताना वाहने दुकानांसमोर उभी करीत असल्याने कोंडीत भर पडत होती. त्यामुळे
अन्य पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला.

वाहने अलिकडेच थांबवणार

हॉटेलमध्ये थांबणाऱ्या पर्यटकांना पुरेशी पार्किंग व्यवस्था नव्हती. त्यामुळे त्यांनी वाहने रस्त्यावरच लावली होती. त्यामुळे स्थानिकांना त्याचा त्रास झाल्याचे जाणवत होते. त्यामुळे येत्याकाळात काही पॉइंटकडे जाताना वाहने ठरावीक अंतर अलिकडेच थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोणावळा मुख्य चौकात वाहतूक कोंडी झाल्याने त्याचा फटका राष्ट्रीय महामार्ग व एक्स्प्रेस-वे ला फटका बसत होता.

सात ते आठ वाहनांची खंडाळ्यात धडक

लोणावळाः पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील बोगद्यामध्ये सात ते आठ वाहने एकमेकांवर धडकून रविवारी सायंकाळी अपघात झाला. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. एका कारने अचानक ब्रेक लावला. त्यातच रस्ता निसरडा झाल्याने त्यामागून येणारी ७-८ वाहने एकमेकांवर आदळली. यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र वाहनांचे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेशोत्सवासाठी शाळा सज्ज

$
0
0

विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांसोबतच खाऊ आणि गुलाबपुष्पही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुलांमधील शाळेविषयीची भीती कमी करून, आनंददायी आणि उत्साहाची भावना निर्माण करण्यासाठी शहरातील शाळांमध्ये आज (१५ जून) प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या जोडीने पालिकेच्या सर्वच शाळांमध्ये त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये शाळा आणि शिक्षकांविषयी ओढ निर्माण व्हावी, शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबावी आणि त्यातूनच राज्यातील शालाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून शालेय प्रवेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. शहरातील काही शाळांमधून त्याही आधीपासूनच शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची प्रथा रूढ झाली आहे. राज्यासोबतच शहरातील शाळांनीही सोमवारी, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे.

पेरूगेट भावे स्कूलमध्ये सोमवारी सकाळी सव्वासात वाजता विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात येणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक के. एन. अर्नाळे यांनी रविवारी दिली. शाळेमध्ये दर वर्षी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची परंपरा आहे. यंदा त्यामध्ये विद्यार्थी संकल्प दिनाचाही समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कटारिया हायस्कूलमध्ये नव्याने प्रवेशित होणाऱ्या पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. एम. भुजबळ यांनी दिली. स्वागत समारंभाच्याच जोडीने विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत पाठ्यपुस्तकांचे वाटपही केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये सकाळी १० वाजता पाचवीच्या विद्यार्थिनींसाठी स्वागत समारंभ होणार आहे. विद्यार्थिनींना शाळेची आणि शिक्षकांची ओळख करून देण्यात येणार असून, छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमही होणार असल्याचे मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवटचा वीकएंड पिकनिकचा

$
0
0

सुटी संपताना पर्यटकांची सिंहगड-लोणावळ्यात झुंबड

म. टा. प्रतिनिधी, पुणे/पिंपरी

शाळा-कॉलेजांच्या सुटीचा अखेरचा वीकएंड आणि कडक उन्हाळ्यानंतर लागलेली पावसाळ्याच्या गारव्याची चाहूल असा दुहेरी योग साधून शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची पावले रविवारी सिंहगड आणि लोणावळा-खंडाळ्याकडे वळली. शहराजवळच्या या पर्यटनस्थळांवर नागरिकांची त्यामुळे प्रचंड गर्दी झाली होती. परिणामी वाहतुकीसह पायाभूत सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला.

उन्हाळ्याच्या सुटीनंतर शहर व परिसरातील शाळा-कॉलेजेस आजपासून (सोमवार) सुरू होत आहेत. या सुटीच्या अखेरच्या दिवसाचे औचित्य साधून अनेक पुणेकरांनी रविवारी पिकनिकचे बेत आखले होते. सिंहगड; तसेच लोणावळा-खंडाळा अशा ठिकाणी सकाळपासूनच पर्यटकांची गर्दी सुरू झाली होती. पावसाळ्याच्या गारव्याचा आनंद लुटताना पर्यटकांनी सिंहगडावर गरमागरम कांदाभजी आणि पिठले-भाकरीचाही आस्वाद घेतला.

दरम्यान, पावसाळ्याची चाहूल लागल्याने लोणावळ्याचा परिसरही गर्दीने फुलून गेला होता. मुंबईसह पुण्यातील अनेकांनी लोणावळ्यात रविवारची सुटी एन्जॉय करण्यासाठी हजेरी लावली. पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीपुढे लोणावळा शहरातील रस्ते अपुरे पडल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे येथे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर लोणावळा आणि खंडाळ्यात रविवारी सकाळपासूनच धुके दाटले होते. या धुक्याच्या दुलईतून पावसानेही हजेरी लावली. या रम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी प्रचंड संख्येने आलेल्या पर्यटकांमुळे हायवे आणि अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पर्यटनासाठी प्रसिद्ध भुशी धरणात अद्याप पाणी साठलेले नाही, तरीही उत्साही पर्यटकांनी तेथे भेट दिली; तसेच लायन्स पॉइंट, धुबड तलाव, शिवलिंग पॉइंट, टायगर पॉइंट, पवनानगर, राजमाची पॉईंट; तसेच लोहगड, विसापूर किल्ले, कार्ला-भाजे लेणी येथे पर्यटकांनी तोबा गर्दी केली होती.

विक्रमी उपद्रवशुल्क

सिंहगड वनपरिक्षेत्राच्या हद्दीत वन व्यवस्थापन समितीकडे पर्यटकांकडून विक्रमी उपद्रवशुल्क वसूल करण्यात आले. दुचाकींसाठी प्रत्येकी २० रु., तर चारचाकीसाठी ५० रुपये शुल्क आकारण्याची तरतूद आहे. रविवारी दिवसभरात सिंहगडावर २३४५ दुचाकी आणि ७२९ कारमधून पर्यटक दाखल झाले. विक्रमी संख्येने गडावर आलेल्या पर्यटकांकडून सुमारे सव्वा लाख रुपये उत्पन्न वनखात्यास मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरक्षणाचे नियम धाब्यावर

$
0
0

पालकांचा आरोप; आरक्षण थांबविण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आरक्षणाचे नियम धाब्यावर बसवून प्रवेश प्रक्रिया राबविली जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्याविषयी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांना पत्रव्यवहारही करण्यात आला असून, चुकीच्या पद्धतीने लागू झालेले आरक्षण थांबविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

डॉ. महेश देशपांडे यांनी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांना त्या विषयीचे पत्र लिहिले आहे. त्यानुसार, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सध्या एकूण ५२ टक्के सामाजिक आरक्षण लागू केले जाते. सुप्रिम कोर्ट आणि हायकोर्टाच्या विविध खटल्यांमधील निकालांनुसार हे आरक्षण ५० टक्क्यांपर्यंतच असणे अपेक्षित आहे. अकरावीसाठीचा 'इनहाऊस कोटा' हा विशेष आरक्षणांमध्ये मोडतो. मात्र, हे आरक्षण देताना त्यासाठी केवळ खुल्या गटातील विद्यार्थ्यांचाच विचार केला जातो. इनहाउस कोट्यासाठी पात्र ठरणाऱ्या आरक्षित गटांमधील विद्यार्थ्यांसाठी ही बाब अन्यायकारक आहे. ही बाब चुकीची असून, त्यासाठी आरक्षित गटांमधील विद्यार्थ्यांचा विचार होणे गरजेचे आहे, अशी मागणीही या पत्रामध्ये करण्यात आली आहे. अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीने नेमके कोणते मुद्दे विचारात घेऊन केवळ खुल्या गटामधील विद्यार्थ्यांना इनहाउस कोट्यासाठी पात्र ठरविले, असा प्रश्नही या पत्रामध्ये उपस्थित करण्यात आला आहे. याविषयी योग्य ती स्पष्टता करत, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणीही या पत्रामध्ये करण्यात आली आहे.

या विषयी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना विचारले असता, यंदाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी आणि सर्व नियमांचे पालन करूनच राबविली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जाधव म्हणाले, 'गेल्या वर्षीच्या प्रक्रियेतील सर्व बाबी यंदा जशाच्या तशा लागू करून, पूर्ण ऑनलाइन प्रक्रिया राबविली जात आहे. आरक्षणाचे नियमही तंतोतंत पाळले जात आहेत. तरीही पालकांच्या तक्रारी असल्यास, त्या विषयी कार्यालय सकारात्मक विचार करून, निर्णय घेईल.' या पत्रालाही सविस्तर माहिती घेऊन उत्तर दिले जाणार असल्याचे त्यांनी रविवारी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कट-ऑफ’बाबत पालक पोलिसांकडे

$
0
0

>> योगेश बोराटे, पुणे

अकरावीच्या माहितीपुस्तिकेमधून कटऑफची खोटी माहिती देणाऱ्या अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीविरोधात पालकांनी रविवारी पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्यासोबतच कॉलेजांमध्ये अकरावीच्या बेकायदा तुकड्या चालविणाऱ्या कॉलेजांना अभय देणाऱ्या या समितीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही पालकांनी पोलिसांकडे केली.

अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीने यंदाच्या माहितीपुस्तिकेमध्ये कट-ऑफची माहिती देताना गेल्या वर्षीच्या ऑनलाइन प्रवेशांचाच विचार केल्याची बाब 'मटा'ने नुकतीच उघड केली. यंदा कॉलेजांच्या कट-ऑफसाठी गेल्या वर्षीच्या कॉलेज पातळीवरील ऑफलाइन प्रवेशांचा विचारच न झाल्याने, यंदाचे कटऑफचे आकडे फुगवलेल्या गुणवत्तेचेच प्रतीक असल्याचेही त्यातून स्पष्ट झाले. अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीनेही ही बाब मान्य केली असून, गेल्या वर्षीच्या ऑफलाइन प्रवेशांचा विचार करून, कॉलेजांचे कट-ऑफचे आकडे पुन्हा एकदा जाहीर करणार असल्याचे शनिवारी स्पष्ट केले. मात्र, या दरम्यानच्या काळात विद्यार्थी आणि पालकांचा झालेला गोंधळ आणि त्यामुळे झालेला मनस्ताप विचारात घेत राजेंद्र धारणकर यांनी डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये रविवारी तक्रार अर्ज दाखल केला.

शहरातील एका कॉलेजमध्ये बेकायदेशीर पद्धतीने अकरावी-बारावी विज्ञानाच्या तुकड्या चालविल्या जात आहेत. या तुकड्यांना अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातूनच प्रवेशही दिले जात आहेत. त्या विषयी सातत्याने तक्रार करून आणि या कॉलेजवर कडक कारवाई करण्याची मागणी करूनदेखील अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीने संबंधित कॉलेजवर अद्याप कारवाई केली नाही;l तसेच यंदाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी या कॉलेजमधील बेकायदा तुकड्यांचे प्रवेश रोखून धरण्याचे आश्वासन दिल्यानंतरही माहितीपुस्तिकेतून त्या बेकायदा तुकड्यांची माहिती देण्यात आल्याचा आरोप धारणकर यांनी या तक्रार अर्जामध्ये केला आहे.

कटऑफचा घोळ काय ?

अकरावीच्या केंद्रीय माहिती पुस्तिकेमध्ये कट-ऑफविषयीची माहिती देताना केंद्रीय प्रवेश समितीनेच त्याची व्याख्या केली आहे. पुस्तिकेतील पान क्रमांक ११ वरील सूचनांमधील ५.१४ मध्ये या मुद्द्याचा समावेश आहे. त्यानुसार 'एखाद्या कॉलेजचा कट-ऑफ हा गेल्या वर्षी त्याच कॉलेजमध्ये संबंधित शाखेमध्ये आणि त्या त्या संवर्गामध्ये प्रवेश मिळालेल्या शेवटच्या विद्यार्थ्याचे गुण आहेत. हे गुण पुढील वर्षीच्या प्रवेशांसाठी केवळ मार्गदर्शक आहेत.' यामध्ये समितीनेच ऑनलाइन किंवा ऑफलाइन असा भेद केलेला नाही. त्यामुळे गेल्या वर्षी गुणवत्तेनुसार सर्वांत कमी टक्केवारीचे गुण हे त्या त्या कॉलेजचे यंदाचे कट-ऑफ ठरणार आहेत. अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीने माहितीपुस्तिकेत हेच गुण देणे अपेक्षित असताना, समितीने केवळ ऑनलाइन गुणांचाच विचार केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्सूनचा ‘कात्रजचा घाट’!

$
0
0

कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मान्सून सक्रीय

म. टा. प्रतिनिधी, पुणे

संपूर्ण राज्यात दाखल झालेला मान्सून रविवारी केवळ कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सक्रिय होता. त्यामुळे या भागात जोरदार पाऊस झाला असला, तरी पुण्यासह पश्चिम मध्य महाराष्ट्रात मात्र किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला. सायंकाळी साडेआठपर्यंत शहरात ०.३ मिलिमीटर पावसाचीच नोंद झाली. सोमवारी शहरात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रविवारी मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापले. तरी रविवारी केवळ कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मान्सून सक्रीय होता. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्यत्र पावसाने जोरदार हजेरी लावली. तर पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. रविवारी मान्सूनची आगेकूच होऊन मान्सूनने राज्याचा उर्वरित भाग व्यापला. मान्सून रविवारी राज्याच्या उर्वरित भागासोबतच अरबी समुद्राचा उत्तर भाग, गुजरात, छत्तीसगड, ओडिशाचा दक्षिण भाग व बंगालच्या उपसागराच्या काही भागात दाखल झाला.
रविवारी मान्सून मध्य प्रदेशचा पश्चिम भाग, छत्तीसगड आणि तेलंगणा या भागात सर्वाधिक सक्रीय होता. तर ईशान्य भारताचा काही भाग, मध्य प्रदेशाचा पूर्व भाग, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीच्या भागात सक्रीय होता.

गुजरातची दक्षिण किनारपट्टी ते केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात किनारपट्टी भागात जोरदार पाऊस होत आहे. मराठवाडा आणि विदर्भातही रविवारी मान्सून सक्रीय असल्याने या परिसरातील काही भागात जोरदार पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला, तरी येथील मान्सून सध्या सक्रीय नसल्याने या परिसरात पावसाचा केवळ हलका शिडकावा झाला. पुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरात ०.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तापमानात काहीशी घट झाल्याने हवेत गारवा जाणवत होता.

रविवारी राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद मुंबईत (८४ मिलिमीटर) झाली. सांताक्रूझ येथे ४१ मिमी, डहाणू येथे २५ मिमी, औरंगाबाद येथे ३६ मिमी, कोल्हापूर येथे ०.७ मिमी तर महाबळेश्वर येथे १० मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुण्यात सोमवारी हलक्या पावसाच्या काही सरींची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात पावसाचा हलका शिडकावा

$
0
0

पुढचे चार दिवस कोरडेच जाण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मान्सून दाखल होऊन सलग चार दिवस उलटल्यानंतरही शहर आणि परिसरात केवळ हलका शिडकावा झाला. मध्यवर्ती भागासह पश्चिम व दक्षिण उपनगरात केवळ शिडकावा झाला. तर पूर्वेकडील उपनगरात ०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील चार दिवसांतही शहरात हलक्या पावसाचीच शक्यता असल्याने पुढील चार दिवसही कोरडेच जाण्याची शक्यता आहे.

शहरात गेल्या शुक्रवारी (१२ जून) मान्सून दाखल झाला. परंतु, त्यानंतर शहरात दमदार पाऊस झालेला नाही. गुजरात ते केरळ दरम्यान असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या किनारपट्टी भागात तसेच विदर्भातही अनुकूल परिस्थिती असल्याने या भागात मान्सून सक्रीय आहे. मध्य व पश्चिम महाराष्ट्रात मान्सून सक्रिय नसल्याने या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे.

सोमवारी शहरात अंशतः ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास हलका पाऊस झाला. लोहगाव, नगररोड भागात पावसाला किंचित जोर होता. अन्यत्र, हलका पाऊस झाला. तसेच शहरात ३०.४ अंश सेल्सियस इतके कमाल तर २२.७ अंश सेल्सियस इतके किमान तापमान नोंदले गेले. हवामान अंशतः ढगाळ असल्याने हवेत काहीसा गारवा जाणवत होता. पुढील चार दिवसात शहरात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, सोमवारी मान्सूनची आगेकूच झाली नाही. राज्यात सर्वाधिक पाऊस डहाणू येथे (५१ मिमी) नोंदला गेला. मुंबई येथे ३०, अलिबाग येथे १९, रत्नागिरी येथे १५, वर्धा येथे १७ तर नागपूर येथे ३ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत राज्यात कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारत पेट्रोलियमचे शहरात १४ पंप बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मुंबईतील वडाळा येथे भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल वाहिनीतील गळतीमुळे शनिवारी आग लागली होती; त्यामुळे इंधनाचा पुरेसा पुरवठा न झाल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील भारत पेट्रोलियमचे १४ पंप सोमवारी बंद ठेवण्याची वेळ आली. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलसाठी अन्य कंपन्यांच्या पंपावर मोठ्या रांगा लागल्या होत्या.

शिवडी परिसरातील कॅस्ट्रॉल कंपनीच्या ऑइल डेपोमधून ही पाइपलाइन जाते. तिथेच ही आग लागली होती. तेव्हापासून इंधनाचा नियमित पुरवठा होत नव्हता. वडाळा येथील दोन टँकमध्ये जवळपास एक कोटी लिटर पेट्रोल साठविण्यात आले होते. सोमवारी संपूर्ण साठा संपल्याने १४ पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. नागरिकांना पूर्वकल्पना नसल्यामुळे अनेक नागरिकांना पंपावरून फिरून जावे लागत होते. बंद पंप पाहून पेट्रोल टंचाईच्या भितीने नागरिकांनी रांगेत थांबून जास्त पेट्रोल भरले. त्यामुळेही अन्य पंपावरील साठा झपाट्याने खाली आला. फक्त भारत पेट्रोलिअमचे पंप बंद आहेत, अन्य कंपन्यांची सेवा सुरूच राहणार असल्याचे कळाल्यावर पंपावरील गर्दी काहीशी कमी होत गेली.

हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइलच्या पंपामध्ये पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांना चिंता करू नये. भारत पेट्रोलियमचा साठा मंगळवारी सुरळीत होण्याची शक्यता आहे, असे ऑल इंडिया पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images