Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वीज हवीय? खांबही तुमचेच

$
0
0

जितेंद्र अष्टेकर, पुणे

प्रत्येक नवे वीज कनेक्शन घेताना त्यासाठी आवश्यक विजेचे खांब, वीजवाहिन्या किंवा ट्रान्स्फॉर्मर अशा पायाभूत सुविधांचा खर्च ग्राहकानेच करावा, अशी अजब तरतूद नव्या विद्युत पुरवठा संहितेमध्ये (इलेक्ट्रिसिटी सप्लाय कोड) प्रस्तावित करण्यात आली आहे. ही तरतूद लागू झाली, तर राज्यातील हजारो वीजग्राहकांना वीजपुरवठा मिळवण्यासाठी लाखो रुपयांचा भुर्दंड बसण्याची भीती आहे.

वीज कायद्यानुसार ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी विद्युत पुरवठा संहितेत लागू केलेल्या नियमांचा आधार घेतला जातो. त्यानुसार राज्य वीज नियामक आयोगाने नव्या पुरवठा संहितेचे प्रारूप प्रसिद्ध केले असून त्यामधील काही तरतुदी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक नव्या ग्राहकाला वीजपुरवठा करताना त्यासाठी आवश्यक खांब, वाहिन्या किंवा ट्रान्स्फॉर्मर अशा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी येणाऱ्या खर्चाची वसुली त्या ग्राहकाकडून करावी, असे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे नव्या ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसण्याची भीती आहे.

दरम्यान, वीजग्राहक संघटनांनी या तरतुदींना तीव्र आक्षेप घेतला आहे. लघू दाब ग्राहकास त्याच्या पुरवठा ठिकाणापर्यंत, म्हणजे मीटरपर्यंत सर्व पायाभूत सुविधा देणे आणि उच्च दाब ग्राहकास त्याच्या पुरवठा ठिकाणापर्यंत, म्हणजे ट्रान्सफॉर्मरपर्यंत सर्व पायाभूत सुविधा देणे, ही वितरण परवानाधारकाची (लायसेन्सी) जबाबदारी आहे, असे महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी म्हटले आहे. तसेच या पायाभूत सुविधा नवे कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकाव्यतिरिक्त अन्य अनेक ग्राहकांसाठी वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे एकाच ग्राहकाडून त्याच्या खर्चाची वसुली करता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. त्याबरोबरच पायाभूत सुविधांचा खर्च हा वीजदरांच्या प्रस्तावामध्ये (एआरआर) समाविष्ट करण्यास वीज नियामक आयोगाने वेळोवेळी मान्यता दिली आहे. त्यामुळे वितरण परवानाधारकांचे कोणतेही नुकसान होत नाही.

त्यामुळे ही सर्व तत्त्वे कायद्याने प्रस्थापित झालेली असताना प्रत्येक नव्या ग्राहकावर अतिरिक्त खर्च लादण्याची तरतूद प्रस्तावित करणे, ही वीज कायद्याशी फारकत असून वीज ग्राहकांची फसवणूक आहे, असे सांगून वीजग्राहक संघटनांनी या तरतुदींना आक्षेप घेतला आहे. तसेच अशा कायदेशीर तरतुदींचा भंग करणारे नियम आयोगाने प्रारूप म्हणून कसे प्रसिद्ध केले, असाही आक्षेप घेण्यात आला आहे. अशा तरतुदी प्रसिद्ध करण्यापूर्वी सर्व कायद्याच्या कसोट्यांवर योग्य आहेत की नाहीत, याची तपासणी करणे आवश्यक होते, अशीही टीका करण्यात आली आहे.

वेगळ्या भागांसाठी वेगळ्या तरतुदींची मागणी

वीजपुरवठ्याच्या कृती मानकांप्रमाणे (एसओपी) विद्युत पुरवठा संहितेमध्येही राज्याच्या वेगवेगळ्या भागांसाठी वेगळ्या तरतुदी कराव्यात, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली आहे. अ वर्ग शहरे, अन्य शहरे आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र तरतुदी कराव्यात, तसेच येथे ट्रान्स्फॉर्मरच्या जागांसाठी प्रति चौरस फूट दर निश्चित करावा, आणि त्यानुसार भाडेकरार करावेत. त्यामुळे वाद होणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मार्ट सेवा केंद्रे बंद करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सुरू असलेली स्मार्ट सेवा केंद्रे तातडीने बंद करा, असा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) नुकतेच दिले आहेत. त्यामुळे प्लंबरपासून ते इलेक्ट्रिशियनपर्यंत आणि गवंड्यापासून ते पेंटरपर्यंत एका फोनवर उपलब्ध होत असलेल्या सुविधा बंद होणार आहेत.

सहजानंद गृहरचना संस्थेबाबत सुरू असलेल्या एका खटल्यादरम्यान न्यायाधिकरणाने हा निकाल दिला. 'शहरातील या स्मार्ट सेवा केंद्रांना पालिकेची परवानगी नाही. त्यांची जबाबदारी स्वीकारत नसल्याचे पालिकेने शपथपत्राद्वारे स्पष्ट केले आहे. त्यामुळेच या सेवा केंद्रांना व्यवसाय करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे,' असा आदेश न्या. विकास किनगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने दिला आहे.

'स्मार्ट सेवा केंद्रांसमवेत पालिकेचा कोणताही करार नाही; अथवा त्यांना पालिकेतर्फे कोणतेही काम दिले जात नाही,' असे प्रतिज्ञापत्र पालिकेतर्फे न्यायाधिकरणासमोर सादर करण्यात आले होते. त्यानुसार, या स्मार्ट सेवा केंद्रांनी यापुढे अशा स्वरूपाचे कोणतेही काम घेऊ नये, असा आदेश देण्यात आला. या स्वरूपाचे काम केल्याची पावती पुरावा म्हणून सादर केली गेली, तर न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याचे सिद्ध होईल, अशी तंबीही स्मार्ट सेवा केंद्राच्या व्यवस्थापकांना देण्यात आली आहे.

पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतील काही जागा संबंधित केंद्राच्या प्रतिनिधींना देण्यात आली असली, तरी त्यांचा आणि पालिकेचा थेट संबंध नाही. त्या-त्या परिसरातील नागरिक एखाद्या सेवेसाठी थेट स्मार्ट सेवा केंद्राच्या प्रतिनिधींची संपर्क साधतात. मात्र, ही केंद्रेच बंद करण्याचा आदेश न्यायाधिकरणाने दिले असल्याने अशा ठिकाणी काम करणाऱ्या अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.

'एनजीटी'चे अन्य महत्त्वाचे निर्णय

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने स्थापनेपासून पुण्यातील दैनंदिन व्यवहाराबरोबरच पर्यावरण व नागरी जीवन या संदर्भात महत्वाचे निर्णय दिले आहेत. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे...

नदीपात्रातील रस्ता उखडून टाका

नदी पुनरुज्जीवन निधी बिल्डरांकडून वसूल करा

बँडबाजासह लग्न-समारंभाच्या प्रदूषणकारी मिरवणुकांवर बंदी

उरण येथील मच्छिमारांना कोट्यवधींची नुकसानभरपाई देण्याचा आदेश

सागरी पट्ट्यावरही शेती व भूप्रदेशाप्रमाणे मच्छिमारांचा हक्क

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्य मंडळाचा इतिहास शब्दबद्ध

$
0
0

प्रा. कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडे जबाबदारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा इतिहास प्रथमच शब्दबद्ध केला जाणार आहे. साहित्य महामंडळाच्या वेबसाइटसाठी हा इतिहास लिहिला जात असून, महामंडळाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य प्रा. कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडे हे काम सोपवण्यात आले आहे.

सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला असताना साहित्य महामंडळ मात्र, पत्रव्यवहाराच्या जगात असल्याने टीका केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर, महामंडळ स्वतंत्र वेबसाइट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या वेबसाइटवर आतापर्यंत झालेली संमेलने, संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष, संमेलनाध्यक्षांची भाषणे, महामंडळाच्या घटक, संलग्न व समाविष्ट संस्थांची माहिती आणि महामंडळाचा इतिहास दिला जाणार आहे. साहित्य महामंडळ स्थापन होऊन पन्नास वर्षे उलटून गेली आहेत. त्यामुळे हा इतिहास संकलित करण्यात येत आहे.

महामंडळाचा इतिहास प्रथमच लिहिला जात असल्याची माहिती प्रा. ठाले पाटील यांनी दिली. 'साहित्य महामंडळाच्या स्थापनेपासूनची सर्व माहिती माझ्याकडे आहे. काही वर्षांपूर्वी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वार्षिकांकासाठी महामंडळाविषयीचा एक लेख लिहिला होता. मात्र, आतापर्यंतचा सर्व इतिहास लिहिण्यासाठी अजून माहिती मिळवणे आवश्यक आहे. त्याचे काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत महामंडळाने काय कामे केली, विविध टप्प्यांवर झालेले बदल, त्याची कारणमीमांसा अशा पद्धतीने त्याचे लेखन करण्याचा मनोदय आहे,' असे त्यांनी सांगितले.

'पुढच्या पिढ्यांसाठी महामंडळाचा इतिहास लिहिणे आवश्यक आहे. राज्यातील साहित्य क्षेत्रातील घडामोडी, विकास कशा पद्धतीने झाला, हे त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

माहिती गोळा करण्याचे आव्हान

महामंडळाचा इतिहास अचूक असावा, त्याचे योग्य संदर्भ असावेत असा प्रयत्न आहे. महामंडळाचे कार्यालय दर तीन वर्षांनी बदलत असते. त्यामुळे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ या चारही संस्थांकडे महामंडळाविषयीची माहिती आहे. त्यांना पत्र पाठवून त्यांच्याकडे असलेली माहिती देण्याचे आवाहन करणार आहे, असेही प्रा. ठाले पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोलकरणीविरोधात गुन्हा दाखल

$
0
0

हडपसर : छेडछाड केल्याचे कारण दाखवत पोलिसांत तक्रार देऊन बदनामी करणार, असे धमकावत पन्नास हजारांची मागणी करणाऱ्या मोलकरीण व महिला कार्यकर्त्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सहजीवन सोसायटी पापडे वस्ती फुरसुंगी येथे झाली. या बाबत हडपसर पोलिसांनी दोघींना अटक केली आहे.

मोलकरीण प्रिया पाटोळे (वय २८, रा . भेकराई नगर,फुरसुंगी) महिला कार्यकर्त्या सुनीता गायकवाड (३४, रा. सहजीवन सोसायटी, फुरसुंगी) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. याबाबत लताबाई रामचंद्र गाडेकर (५३, रा. सहजीवन सोसायटी,

फुरसुंगी ) यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक १५ मे रोजी रामचंद्र गाडेकर यांनी आत्महत्या केली होती. गाडेकर यांनी माझी छेडछाड केली, असे पापडे वस्ती येथील महिला कार्यकर्त्या सुनीता गायकवाड यांना मोलकरीण पाटोळे सांगितले. यावर पाटोळे व गायकवाड यांनी पन्नास हजार दिले नाही तर, पोलिसांत तक्रार देवून बदनामी करू अशी धमकी गाडेकर यांना दिली होती.त्यातून त्यांनी आत्महत्या केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंगप्रकरणी आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औंध

बालेवाडी येथील मोझे इंजीनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीचा उपप्राचार्यांनी विनयभंग केल्याप्रकरणी भाजपच्यावतीने मोझे कॉलेज समोर आंदोलन करण्यात आले. संस्थेने या उपप्राचार्यांचे त्वरित निलंबन करावे तसेच कॉलेजमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी काटेकोरपणे उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी उपप्राचार्यांच्या पुतळ्याचे दहन केले.या वेळी भाजपचे अमोल बालवडकर, मोरेश्वर बालवडकर, अमोल पाडाळे, शशिकांत बालवडकर, संतोष बालवडकर, किरण बालवडकर, विक्रम साखरे, विशाल बालवडकर उपस्थित होते.

शैक्षणिक शुल्क वेळेवर न भरल्याच्या कारणावरून उपप्राचार्य पी. के. सिंग या विद्यार्थिनीशी लगट करण्याचा प्रयत्न करत होते. केबीनमध्ये तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विद्यार्थिनीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. कॉलेजने अद्याप या उपप्राचार्यांवर कारवाई केली नाही. यामुळे संस्थेने उपप्राचार्यांना निलंबित करावे अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोपटे यांचा अर्ज वैध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज दूध) संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या छाननीमध्ये भोर सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार दिलीप थोपटे यांचा अर्ज वैध ठरला असून खेड गटातील उमेदवार अरुण चांभारे यांचा अर्ज अवैध ठरल्याने चंद्रशेखर शेटे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या निवडणुकीसाठी ६३ उमेदवार रिंगणात आहेत.

कात्रज दूध संघाच्या निवडणुकीत आता रंगत भरू लागली आहे. भोरमधील उमेदवार व विद्यमान संचालक दिलीपनाना थोपटे यांच्या उमेदवारी अर्जावर अशोक उर्फ बाळासाहेब थोपटे यांनी छाननीमध्ये आक्षेप घेतला होता. त्यामुळे या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय राठोड यांनी बाळासाहेब थोपटे यांचा आक्षेप फेटाळून लावला. त्यामुळे थोपटे विरूद्ध थोपटे अशी निवडणूक रंगणार आहे. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे बाळासाहेब हे चुलत बंधू असले तरी आमदारांनी दिलीपनाना थोपटे यांना पाठिंबा दिला आहे.

खेड सर्वसाधारण गटात शेटे व चांभारे असे दोनच अर्ज होते. चांभारे यांच्या उमेदवारी अर्जाच्या वैधतेबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार ग्राह्य धरून चांभारे यांची उमेदवारी रद्द ठरविण्यात आली. त्यामुळे शेटे यांचा बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात थोपटे व चांभारे हायकोर्टात जाणार असल्याचे समजते.

नऊ जूनपर्यंत माघार घेण्याची मुदत

शिरूर मतदारसंघात बाळासाहेब ढमढेरे व रेखा बांदल असे दोन उमेदवार रिंगणात आहेत. बांदल या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता असल्याने ढमढेरे बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. जुन्नरमध्येही बाळासाहेब खिलारी व विलास दांगट असे लढतीचे चित्र आहे. आंबेगाव गटातून आठ उमेदवार, दौंडमधून सहा, विमुक्त जाती प्रवर्गातून चार, इतर मागास प्रवर्गामधून आठ, अनुसूचित जाती गटातून पाच व महिला गटामधून सोळा उमेदवार रिंगणात उतरले आहेत. हवेली गटातून गोपाळ म्हस्के, मावळमधून बाळासाहेब नेवाळेपुरंदरमधून संदिप जगदाळे, वेल्ह्यातून भगवान पासलकर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या निवडणुकीतून माघार घेण्याची मुदत ९ जूनपर्यंत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्फोटाने बंधारा फोडला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बारामती

बारामती तालुक्यातील नीरा नदीवरील कांबळेश्वर बंधारा स्फोटकांनी उडवल्याचा प्रकार उघडकीस आला. सोमवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा स्फोट करण्यात आला. या स्फोटानंतर परिसरात मोठा आवाज झाला. वाळू माफियांनी हे कृत्य केल्याचा संशय स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या स्फोटामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या सिंचनाखालील तीन हजार एकर शेती क्षेत्रामधील पिके धोक्यात आली आहेत. पाणी आडवण्यात प्रशासनाला दुपारी चार वाजेपर्यत यश आले नव्हते.

बारामती तालुक्यातील कांबळेश्वर, शिरषने तर फलटण तालुक्यातील कांबळेश्वर, खुंटे या चार गावांना बंधारा वरदान आहे. मात्र सध्या हा बंधारा वाळू माफियाच्या हिट लिस्टवर आहे. पंधरा दिवसांपूर्वीच याच बंधाऱ्याच्या दराफ अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची तक्रार जलसंपदा विभागाने बारामती तालुक्यातील वडगाव पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. मात्र, बारामती व फलटण या दोन्ही तालुक्यातील महसूल विभाग आपल्या अर्थपूर्ण संबधांमुळेच वाळू माफियांवर कारवाई करत नाही, असे शेतकऱ्यांनी 'मटा'ला सांगितले.

नीरा नदीवरून दिवस रात्र कोणताही लिलाव झाला नसतानाही सहा ते सात ठिकाणी बेकायदा वाळू उपसा सुरूच असतो. मात्र या वाळू माफियांवर कारवाई न केल्यास व्यसनमुक्ती संघटना प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन उभारणार असल्याचे भैया शिंदे यांनी सांगितले. फलटण तालुक्यात एकही लिलाव झाला नसल्याचे तहसीलदार विवेक जाधव यांनी स्पष्ट केले.

पाणी योजना बंद

बंधारा स्फोटाने उडविण्यात आल्यामुळे याच बंधाऱ्यावर शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या भिवाई, कळबराज, धावजी पाणीपुरवठा योजना बंद झाल्या आहेत.

वाळू माफियांची दहशत

गावातील शेतकरी वाळू बाबत ब्र शब्द बोलत नव्हते. आजुबाजूला पाहूनच माहिती दिली जात होती. 'आमची पोर - बाळं आहेत, म्हणूनच भीती वाटते,' अशा प्रत्येकाच्या भावना होत्या. त्यातूनच वाळू माफियांनी किती दहशत निर्माण केली आहे, याचा प्रत्यय आला.

वाळू माफियांनी वाळू काढण्यासाठी हे कृत्य केले आहे. शेतीला पुरेसे पाणी न मिळाल्यास शेतकरी कर्जबाजारी होणार आहे. फक्त मूठभर लोकांच्या हितासाठी प्रशासन सुस्त आहे

- भैया शिंदे, व्यसनमुक्ती युवक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येरवड्यातही फेरीवाल्यांची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

येरवडा, विश्रांतवाडी आणि नगर रोड परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी अनधिकृत विक्रेते व फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पालिकेकडून परिसरातील अनेक विक्रेते आणि फेरीवाल्यांची बायोमेट्रिक नोंदणी केली आहे; परंतु पालिकेच्या उदासीनतेमुळे कारवाई होत नसल्याने विक्रेत्यांच्या संख्येत वाढ होताना दिसते.

तुळशीबाग मार्केटमध्ये स्टोल लावण्यावरून हाणामारीचे प्रसंग उद् भवल्यानंतर पालिकेने शहरातील अनधिकृत विक्रेत्यांविरोधात अतिक्रमणाची कारवाई तीव्र केली आहे. पालिकेकडून शहरात अतिक्रमण कारवाई सुरू असताना येरवडा आणि नगर रोड क्षेत्रीय कार्यालयांकडून अपेक्षित कारवाई होताना दिसत नाही.

येरवड्यातील गाडीतळ चौकात महत्त्वाच्या नगर रोड महामार्गावर परिसरातील अनेक अनधिकृत विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला हातगाडी लावून व्यवसाय करीत आहे. हाकेच्या अंतरावर पालिकेचे कार्यालय असूनही अतिक्रमण अधिकाऱ्यांकडून कुठलीही कारवाई होत नाही. विश्रांतवाडीच्या मुख्य चौकात अनेक फेरीवाले आणि हातगाडीवाले फुटपाथवर दुकान थाटून व्यवसाय करतात.

नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून विमान नगर चौकात काही दिवसांपूर्वी अनधिकृत विक्रेत्यांवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती. पण, कारवाईत सातत्य नसल्याने काही दिवसांनतर पुन्हा जैसे थे चित्र पाहायला मिळत आहे. चंदननगर, वडगाव शेरी भागात ठिकठिकाणी झाडाच्या सावलीखाली हातगाड्या आणि दुकाने थाटून व्यवसाय करताना आढळून येते.

दर दिवसाला दोनशे रुपये भाडे

येरवडा, विमान नगर, विश्रांतवाडी, वडगाव शेरी भागात ज्या ठिकाणी लहान-मोठे भाजी मार्केट आहेत. त्या ठिकाणी अनेक नेते, कार्यकर्ते आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी व्यवसायाच्या जागा दहशतीने बळकावल्या आहेत. अशा ठिकाणी पाणीपुरी, भाजीवाले, चायनीज पदार्थांच्या गाड्या लावण्यासाठी दररोज दोनशे ते तीनशे रुपये भाडे घेत असल्याची माहिती एका विक्रेत्याने दिली. अनेकवेळा भांडणाचे प्रकार उद्‍भवल्यास स्थानिक पोलिस चौकीतील पोलिसांना हाताशी धरून प्रकरण दाबले जाते. त्यामुळे अधिकृत विक्रेते देखील काही माहिती देण्यास पुढे येत नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमणांनी पदपथ गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख रस्ते, चौक अतिक्रमणांमुळे अरुंद झाले असून, नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी तर अतिक्रमणांनी पदपथच गायब झाल्याचे दिसून येत आहे.

शहरात विशेषतः चापेकर चौक (चिंचवड), छत्रपती शिवाजी महाराज चौक, गव्हाणे वस्ती (भोसरी), डांगे चौक, १६ नंबर बसस्टॉप (थेरगाव), निगडी चौक, भक्ती-शक्ती चौक या ठिकाणी पथारी, हातगाडी, टपरी आणि स्टॉलधारकांची मोठी गर्दी दिसून येते. त्यातून वाट काढणे वृद्ध, महिला, शालेय विद्यार्थी यांच्यादृष्टीने तर अतिशय अवघड बाब बनली आहे. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे अतिक्रमणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.

दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन मिळू नये, गंभीर अपघात टाळावेत यादृष्टीने सुप्रीम कोर्टाने २०१३ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रमुख चौक, प्रार्थनास्थळे यापासून शंभर ते दिडशे मीटर परिसरात फेरीवाले, पथारी यांना मज्जाव करावा, असे नमूद केले आहे. तसेच, या सर्वांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे, असे नमूद केले आहे. त्यानुसार महापालिकेने धोरण तयार केले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. त्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा चालू असल्याचे फेरीवाला संघटनेचे म्हणणे आहे.

गेल्या एक-दोन वर्षांत चायनीज पदार्थ विक्री करणारे स्टॉल्स आणि सीडी, डिव्हीडी विक्री करणाऱ्यांमुळे गैरप्रकार वाढले आहेत. शिवाय अनेक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स उभारल्यामुळे अडथळ्यांच्या शर्यतीत भरच पडली आहे. या दोन्हींच्या बाबतीत प्रशासनाचे लागेबांधे असल्यामुळे गैरप्रकारांना खतपाणी मिळत असल्याचा आरोपही काही फेरीवाले करीत आहेत. काही ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या आशिर्वादाने चायनीज विक्रेत्यांना ऊत आला आहे. त्यामुळे गर्दीची ठिकाणे पायी चालणाऱ्यांसाठी आहेत कि नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नॉनव्हेज विक्री करणाऱ्या काही हातगाड्या तर दारू पिण्याचे अड्डे बनल्या आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवडमधील पथारी, हातगाडी, टपरी आणि स्टॉलधारकांची संख्या सुमारे १५ हजार आहे. त्यापैकी सुमारे साडेदहा हजार जणांनी महापालिकेकडे नोंदणी केली आहे. या सर्वांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरात २४६ जागा निश्चित करण्यास शहर फेरीवाला समितीने मान्यता दिली आहे. त्यासंदर्भातील अंमलबजावणीची प्रतिक्षा आहे.

- काशिनाथ नखाते, अध्यक्ष, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माननीयांमुळेच कारवाईला ‘खो’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

वाढत्या अतिक्रमणांवर कारवाई होत नाही म्हणून पालिकेतील नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली असली, तरी अनेकदा त्यांच्याच दबावामुळे अतिक्रमण विभागाच्या कारवाईवर मर्यादा येतात, अशी चर्चाही पालिका वर्तुळात सुरू आहे. तसेच, अनेकदा कारवाईसाठी आवश्यक फौजफाटा आणि पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने प्रभावी कारवाई करता येत नसल्याचे गाऱ्हाणे मांडले जात आहे.

शहरातील एखाद्या रस्त्यावर, चौकात अथवा फूटपाथवर अतिक्रमणांमध्ये वाढ होत असल्याचे लक्षात येताच, नागरिकांकडून त्याबद्दल तक्रार केली जाते. काही वेळा स्थानिक लोकप्रतिनिधीदेखील ही बाब पालिकेतील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देतात. अशावेळी संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाची कारवाई पूर्ण होण्यापूर्वीच 'राजकीय' वदरहस्तामुळे कारवाई अर्धवट ठेवावी लागल्याची अनेक उदाहरणे आहेत, अशी माहिती पालिकेतीलच काही अधिकाऱ्यांनी दिली.

पालिकेमध्ये सध्या प्रभाग व्यवस्था असल्याने एका प्रभागाचे प्रतिनिधित्व दोन नगरसेवक करतात. एका नगरसेवकाने अतिक्रमण हटविण्याची भूमिका घेतली; तर अनेकदा दुसरा नगरसेवक कारवाई न करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांना देतो, याकडेही लक्ष वेधण्यात आले. प्रभागातील दोन माननीयांच्या समन्वयाअभावी कारवाईत खंड पडतो आणि अतिक्रमणे वाढत जातात. मात्र, कारवाई होत नसल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाते, असे गाऱ्हाणे मांडण्यात आले.

अतिक्रमणांवरील कारवाईसाठी आवश्यक असणारी साधनसाम्रगी आणि मनुष्यबळ याबाबतही काही कमतरता असल्याने कारवाईत सातत्य राखता येत नाही. तसेच, काही संवेदनशील भागातील कारवाईसाठी पोलिसांचा बंदोबस्त आवश्यक असतो; पण अनेकदा तोही वेळेवर उपलब्ध होतोच असे नाही, अशी वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्यात आली.

हे आहेत शहरातील महत्त्वाचे 'नो हॉकर्स झोन'

लक्ष्मीरोड वरील नाना पेठ ते टिळक चौक

फर्ग्युसन कॉलेज रोडवरील गरवारे पूल ते न. ता. वाडी चौक

इंजिनीअरिंग कॉलेज चौक ते दांडेकर पूल दरम्यानचा शास्त्र‌ीरोड आणि जंगली महाराज रोड

धोबी घाट ते टिळक चौक शंकरशेठरोड ते टिळकरोड

डेक्कन जिमखाना ते चांदणी चौक कर्वेरोड, पौड फाटा

विमानतळ ते राजभवन (व्हीआयपी रोड)

शनिवारवाडा, लालमहाल, फडके हौद, नरपतगीर चौक, ससूनमार्गे स्टेशनपर्यंतचा रोड

कोथरूड बसस्टँड ते पुणे-मुंबई बायपासपर्यंत कर्वेनगर रोड

बंडगार्डन पोलिस स्टेशन ते मनपा हद्दीपर्यंत आंबेडकर रोड

विधानभवन मार्गावरील दोराबजी, आयनॉक्स, वाडिया कॉलेज चौक

सदाशिव पेठ, कुमठेकर रोडवरील टिळक चौक ते टिळक पुतळा चौक

प्रभातरोडवरील कर्वे रोड जंक्शन ते लॉ कॉलेज रोड

कोरेगाव पार्क, मुंढवा येथील कोरेगाव पार्क, नॉर्थ मेन रोड, साऊथ मेन रोड, बी. टी. कवडे रोड

सिंहगड रोडवरील सारसाबाग, पर्वती ओव्हर ब्रिजखालून ते राजाराम पुलापर्यंत

शिवाजीनगर भागातील महापालिका मुख्य इमारतीजवळील परिसर, डेंगळे पूल ते झाशीची राणी चौक

येरवडा भागातील पर्णकुटी, आळंदी रोड, फुलेनगर, आरटीओ ते कळसपर्यंतचा रस्ता

औंध भागातील परिहार चौक ते बाणेर फाटा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणमुक्त रस्ते दाखवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'अतिक्रमण नसलेला रस्ता अथवा फूटपाथ दाखवा आणि माझ्याकडून एक लाख रुपये जिंका,' असे खुले आव्हान सभागृहनेते बंडू केमसे यांनी दिले असल्याने अतिक्रमणांचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. तसेच, अतिक्रमणांवर कारवाई करण्याच्या खात्याच्या भूमिकेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने सध्या सुरू असणारी कारवाई, ही केवळ मलमपट्टी ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गेल्या आठवड्यातील सर्वसाधारण सभेत अतिक्रमणांवरून सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. अतिक्रमणांवरून राजकीय पक्ष विरुद्ध प्रशासन असा सामना रंगला असला, तरी शहरातील एकही रस्ता अतिक्रमणांपासून मुक्त नाही, हे देखील वास्तव आहे. शहरातील प्रमुख ४५ रस्ते आणि दीडशेहून अधिक चौक अतिक्रमणमुक्त करण्याची ग्वाही गेल्यावर्षी देण्यात आली असली, तरी त्याबाबत ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. अतिक्रमण पथकाची गाडी कारवाई करायला येण्यापूर्वीच संबंधित व्यावसायिकांना माहिती मिळत असते; तसेच अतिक्रमणांची गाडी पुढे गेल्यावर लगेच पुन्हा व्यवसायाला सुरुवात होते, यासारख्या गोष्टींकडेही सभागृहनेत्यांनी लक्ष वेधले होते. या सद्यस्थितीकडे प्रशासनाकडून पुन्हा डोळेझाक केली जात असल्याने अतिक्रमणांवरील कारवाई हा निव्वळ 'फार्स' ठरत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.

गेल्या काही दिवसांत तर प्रशासनाकडून सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षामुळे अतिक्रमणांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र शहरात जागोजागी दिसून येते. महिना-दोन महिन्यांपूर्वी जेथे एखाद-दुसरीच हातगाडी असायची, तेथे आता किमान पाच ते सहा गाड्या लागलेल्या दिसतात. तर एखाद्या शंभर मीटरच्या फूटपाथवर पूर्वी आठ ते दहा पथारीवाले, विक्रेते व्यवसाय करत असताना, आता ही संख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. यातील निम्म्याहून अधिक व्यावसायिकांकडे पालिकेचा परवाना नाही; परंतु तरीही त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही.

रस्ते, फूटपाथवर पुणेकरांचा हक्क

शहरातील अनेक रस्त्यांवर आणि फूटपाथवर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याने त्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. व्यावसायिकांनी व्यवसाय करू नये, अशी आमची भूमिका नाही; पण शहरातील रस्त्यांवर आणि फूटपाथवरून चालण्याचा अधिकार पुणेकरांनाही आहे. त्यांच्या हक्कांचेही रक्षण करण्याची गरज आहे. त्यामुळे, नियमांमध्ये व्यवसाय करणाऱ्यांव्यतिरिक्त इतर सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका बंडू केमसे यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समिती कायदा बदलण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'बाजार समितीचा १९६३चा कायदा कालबाह्य झाला आहे. त्या कायद्यात आता खऱ्या अर्थाने बदल करण्याची आवश्यकता असून, या संदर्भात राज्य सरकारने कायद्यात तातडीने दुरुस्ती करावी,' अशी मागणी द पूना मर्चंट्स चेंबरने केली आहे.बाजार समितीचा कायदा १९६३ साली अस्तित्वात आला. त्यावेळची आणि आताच्या परिस्थितीत अमूलाग्र बदल झाला आहे. त्यामुळे या कायद्यात सध्याच्या काळानुसार बदल करणे अपेक्षित आहेत. मार्केट यार्डात किरकोळ व्यापार करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. मात्र, पूर्वीप्रमाणे ५० ते १०० किलो धान्य घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. परिणामी १ ते ५ किलो अथवा १० किलोपर्यंतचे धान्याचे पॅकिंग करणे आवश्यक ठरत आहे. मार्केट यार्डात पाच ते ३० किलोच्या पॅकिंगमध्ये अन्न धान्य, गूळ विकला जातो. या वजनातील वस्तूची विक्री ही किरकोळ विक्री म्हणून गणली गेल्यास मार्केट यार्डातील व्यवहारावर परिणाम होईल. परिणामी तेथील व्यापार बंद पडण्याची भीती, चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी व्यक्त केली.

राज्यातील संपूर्ण बाजार पेठांची माहिती घेऊन कालबाह्य झालेल्या बाजार समिती कायद्यात योग्य ते बदल करणे तसेच बाजार चांगल्या पद्धतीने कसा चालविता येईल या संदर्भात राज्य सरकारने पावले उचलावीत अशी मागणीही त्यांनी केली. केंद्र सरकारने किरकोळ व्यापारामध्ये परदेशी गुंतवणूक ५१ टक्के करण्यास परवानगी दिली आहे. त्याचाही या व्यवसायावर परिणाम होणार आहे. देशातील लाखो व्यापारी त्याच्यावर अवलंबून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेटला कात्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या बजेटला 'प्रिन्सिपल डायरेक्टर ऑफ डिफेन्स इस्टेट' विभागाने (पीडीडीई) कात्री लावली आहे. बजेटमध्ये देखभाल आणि दुरुस्तीवर होणाऱ्या खर्चावर मर्यादा घालण्यात आली असून, कार्यालयीन खर्चातही मोठी कपात सुचविण्यात आली आहे. शिवाय, पाणीपुरवठा, रस्ते आणि ड्रेनेज दुरुस्तीवरील खर्चातही कपात झाल्याने येत्या पावसाळ्यातील नागरी समस्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बोर्डाचे बजेट सुमारे ९० कोटी रुपयांचे आहे. दर सप्टेंबर महिन्यामध्ये बजेट तयार करण्यात येते. त्यास 'पीडीडीई'कडून मान्यता घ्यावी लागते. त्यानंतर बजेटची अंमलबजावणी केली जाते. बोर्डाची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन 'पीडीडीई'ने बजेटला कात्री लावली आहे. देखभाल आणि दुरुस्तीवर होणाऱ्या खर्चावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. देखभाल आणि दुरुस्तीमध्ये रस्ते, ड्रेनेज लाइन, पाणीपुरवठा, शाळा आणि हॉस्पिटलच्या इमारती आदींचा समावेश आहे. त्यापैकी पाणीपुरवठ्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे ३३ लाख रुपयांची तरतूद होती. त्यात घट करून ती १५ लाखांवर आणण्यात आली आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पाण्याच्या लाइन नादुरस्त झाल्यास बोर्डाला काटकसरीने दुरुस्तीवर खर्च करावा लागणार आहे.

रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मूळ बजेटमध्ये सुमारे सहा कोटी रुपये दाखविण्यात आले होते. ही तरतूदही कमी करण्यात आली​ आहे. त्यामुळे आगामी सप्टेंबर महिन्यात नव्याने बजेट तयार होईपर्यंत सुमारे पाच कोटी १८ लाख रुपयेच रस्तेदुरुस्तीवर खर्च करता येणार आहेत. ड्रेनेज लाइनच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या दोन कोटी रुपयांच्या तरतुदींमध्ये सुमारे २५ लाख रुपयांची कपात झाली आहे.

भांडार विभागासाठी असलेल्या ५० लाख रुपयांच्या तरतुदीला कात्री लागल्याने हा खर्च आता ४० लाख रुपयांपर्यंतच करण्याची वेळ आली आहे. बोर्डाच्या विविध कार्यालयांसाठी स्टेशनरी, छपाई, टपाल खर्च, दूरध्वनी बिल आदी कार्यालयीन खर्च करावे लागतात. त्यासाठी बजेटमध्ये ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या रकमेत आता दहा लाख रुपयांची घट करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयीन खर्च करताना हाताला आवर घालावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समर्थांच्या उर्दू पदावल्यांचे पुस्तक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक अशा श्रेष्ठ रचना करणाऱ्या समर्थ रामदास यांनी दखनी उर्दू भाषेत केलेल्या पदावल्या प्रथमच पुस्तकरूपाने उपलब्ध झाल्या आहेत. दहा वर्षे अभ्यास करून मनीषा बाठे यांनी समर्थ रामदासकृत दखनी उर्दू पदावल्या हा ग्रंथ सिद्ध केला असून, समर्थ रामदासांनी देशभरात केलेली भ्रमंती, त्यांना असलेले अनेक भाषांचे ज्ञान आदी पैलूही त्यांनी या ग्रंथाद्वारे समाजापुढे आणले आहेत.

समर्थ मीडिया सेंटर या स्वतःच्याच संस्थेच्या माध्यमातून बाठे यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. बाठे यांना मराठी, इंग्रजी आणि हिंदीसह संस्कृत, गुजराती, उर्दू, कन्नड, बंगाली आदी अकरा भारतीय भाषा अवगत आहेत. व्यावसायिक गरजेतून त्यांनी या भाषांचे शिक्षण घेतले. मात्र, त्याचा उपयोग त्या संशोधनासाठीही करत आहेत. इसवी सन १६३२ ते १६४४ या काळात समर्थांनी लिहिलेल्या ३०० दखनी उर्दू पदावल्या या ग्रंथात अर्थासह देण्यात आल्या आहेत. या ग्रंथातून समर्थांचे दखनी भाषेवरील प्रभुत्त्व स्पष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. लेखिका मनीषा बाठे यांनी या ग्रंथाविषयीची माहिती 'मटा'ला दिली. समर्थ रामदास हे बहुभाषिक होते हे फार

थोड्या लोकांना माहीत आहे. मुसलमानी अष्टक हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्याकडे कोणाचे लक्ष गेलेले नाही. त्यांच्या या ग्रंथातील ९९ पदावल्या हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठीच्या आहेत. समर्थांच्या दखनी उर्दू भाषेत एकूण १८ बोली भाषांचा समावेश होता. त्यातील १३ भाषांशैलीत समर्थांनी पदावल्या लिहिल्या. समर्थांनी भारतभ्रमण केले होते.

अमराठी युवकांसाठी त्यांनी समाज परिवर्तनाची स्फूर्तिगीते लिहिली होती. देशभरात त्यांनी मठ स्थापन केले होते. त्यांची आणि हरगोविंदसिंग यांची भेट झाली होती. त्याबाबतचे पुरावे आजही मिळतात. मात्र, हे पैलू लोकांना माहीत नाही. या ग्रंथातून समर्थांचे समाजशिक्षक, समाज संघटक असे व्यक्तिमत्त्व उलगडले आहे, असे त्यांनी सांगितले. समर्थांविषयी समाजात असलेला दृष्टिकोन बदलण्यासाठी हा ग्रंथ महत्त्वाचा असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

ग्रंथाची वैशिष्ट्ये

समर्थ रामदास यांनी देशभरात अकराशे मठ स्थापन केले होते. त्याचा नकाशाच त्यांनी ग्रंथात समाविष्ट केला आहे.

समर्थांच्या हस्तलिखिताचा फोटो

२१ मठाधिपतींचे चित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोंगरफोडीसाठी १५ लाखांचा दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोणावळा येथील टेकडी फोडून रिसॉर्टचे बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकाला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पंधरा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या व्यावसायिकाने 'नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड' या संस्थेला नुकसानभरपाईपोटी दहा लाख, तर लोणावळा नगरपालिकेला पाच लाख रुपये द्यावेत, असे आदेशात म्हटले आहे. राष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या 'नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड' या संस्थेच्या वतीने अॅड. असीम सरोदे यांनी न्यायाधिकरणापुढे दाद मागितली होती. न्यायमूर्ती विकास किनगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.

माजी आमदार आणि कुमार रिसॉर्टचे मालक कुमार अलानी, तसेच त्यांच्या भागीदारांविरुद्ध सरोदे यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. खंडाळ्यामध्ये डोंगरमाथ्यालगत ही संस्था आहे. या संस्थेजवळ असलेली टेकडी फोडण्यात येत होती. तसेच या संस्थेच्या दिशेने दगड घरंगळत येत होते. या विरोधात संस्थेने लोणावळा पोलिस, तसेच नगरपालिकेकडे तक्रार केली होती; मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने न्यायाधिकरणाकडे दाद मागण्यात आल्याचे सरोदे म्हणाले.

अलानी यांनी डोंगर उत्खनन करताना निघणारा मुरूम विकण्याची परवानगी घेतली होती; मात्र डोंगर उत्खनन करण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घेण्याची गरज असते. ती घेण्यात आली नव्हती. ही बाब न्यायाधिकरणाच्या निर्दशनास आणून देण्यात आली. न्यायाधिकरणाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर संस्थेला १० लाख रुपये देण्याचे, तसेच लोणावळा पालिकेला पाच लाखांची रक्कम चार आठवड्यांच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. नगरपालिकेने ही रक्कम पर्यावरण संवर्धनासाठी वापरावी, असे निकालात म्हटल्याचे सरोदे यांनी सांगितले.

'डोंगरफोडीसाठी परवानगी नको'

राज्यात कोल्हापूर, साताऱ्यासह अनेक ठिकाणी डोंगरफोड सुरू आहे. त्यावर निर्बंध आणण्यात यावेत, तसेच डोंगर फोडणे, तेथे बांधकाम करणे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देऊ नये, असे स्पष्ट आदेश न्यायाधिकरणाने या निकालाद्वारे दिले आहेत. न्यायाधिकरणाच्या या आदेशामुळे डोंगरांना एक प्रकारे संरक्षण मिळाले आहे. पर्यावरण संरक्षण करताना अनेकदा डोंगर हा दुर्ल​क्षित घटक होता, अशी प्रतिक्रिया सरोदे यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावकारकी करणाऱ्या तीन जणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

उपचारांसाठी व्याजाने दिलेल्या १५ हजार रुपयांच्या बदल्यात हजारो रुपये उकळल्यानंतरही एक लाख रुपयांसाठी तगादा लावल्याचा धक्कादायक प्रकार डायस प्लॉटमध्ये उघडकीस आला आहे. स्वारगेट पोलिसांनी सावकारकीचा व्यवसाय करणाऱ्या तिघांना अटक केली आहे.

या आरोपींनी व्याजापोटी काही जणांची घरे आणि सोन्याचे दागिनेही बळकावल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे, अशी माहिती स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी दिली. अनिता अभिजीत चोटीले (वय ३०), अभिजीत मनोहर चोटीले (वय ३०), पद्मा मसू साठे (वय ५०, तिघेही रा. ढोले मळा, डायस प्लॉट) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अनसूया अशोक देवकुळे (वय ५५, रा. ढोले मळा, डायस प्लॉट) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

देवकुळे यांना तीन वर्षांपूर्वी अपघात झाला होता. उपचारासाठी त्यांनी आरोपींकडून १५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. गेली तीन वर्ष आरोपींनी त्यांच्याकडून दरमहा चार हजार रुपये घेतले आहेत. त्याशिवाय एकरकमी ६५ हजार रुपयेही घेतले आहे. असे असतानाही आरोपींनी त्यांच्याकडे एक लाख तीन हजार रुपयांचा तगादा लावला होता. देवकुळे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेत निकम यांना झालेला प्रकार सांगितला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत बालिकेचा मृत्यू

$
0
0

पुणेः खराडीहून मुंढव्याकडे पायी जात असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडून पाच वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास खराडी मुंढवा रस्त्यावर घडली. संबंधित ट्रकचालक पळून गेला असून, अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. अर्चना अर्जुन शर्मा (वय ५, रा. मुंढवा, मूळ बिहार) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत अर्जुन शर्मा (रा. मुंढवा, मूळ रा. बिहार) याने मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेज शिक्षकांच्या पगारात अडचणी

$
0
0

पुणेः ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांच्या पगारामध्ये सातत्याने अडचणी येत असल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. त्यामुळेच एरव्ही महिन्याच्या पहिल्याच तारखेला खात्यात जमा होणारे पगार गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने उशिरानेच जमा होत असल्याचे निरीक्षण पुण्यातील शिक्षकांनी नोंदवले.

गेल्या काही महिन्यांपासून शिक्षकांच्या पगारांमध्ये नानाविध अडचणी येत आहेत. केवळ ज्युनिअर कॉलेजच नव्हे, तर शालेय शिक्षकांच्या पगारांबाबतही अडचणी येत असल्याने, पगारांची यंत्रणा सांभाळणाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ऑनलाइन यंत्रणेच्या आधारे होणारे शिक्षकांचे पगार तांत्रिक अडचणींमुळेच अडकून पडल्याचा आरोपही या निमित्ताने पुढे येत आहे. या आरोपांचे खंडन करत, कॉलेजांमधील कर्मचाऱ्यांकडून पगाराविषयीची ऑनलाइन माहिती मिळण्यात आणि योग्य त्या माहितीची वेळेत पूर्तता करण्यात चालढकल होत असल्याने, केवळ संबंधित कॉलेजांचेच पगार उशिराने दिले जात असल्याचे शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ज्या कॉलेजांनी आपली माहिती वेळेत सादर केली, त्यांचे पगार वेळेतच झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावीचा निकाल आज

$
0
0

बारावीचा निकाल पहा 'मटा ऑनलाइन' वर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, बुधवारी जाहीर होणार आहे. त्यासाठी बोर्डाने चार वेगवेगळ्या वेबसाइटवरून अधिकृत निकाल पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच www.mahresult.nic.in या वेबसाइटवर निकालाशिवाय इतर सांख्यिकी माहितीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चार जूनपासून कॉलेजांना छापील गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. त्याच दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना छापील निकालपत्राचे वाटप केले जाईल.

निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी आणि पुनर्मूल्यांकनाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते. विद्यार्थी छापील गुणपत्रिका मिळाल्यानंतर गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित विभागीय मंडळांकडे सादर करू शकतात. त्यासाठी १५ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. गुणपडताळणीच्या अर्जासोबत विद्यार्थ्यांना मूळ छापील गुणपत्रिकेची फोटोकॉपी जोडावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मिळण्याची संधीही बोर्डाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना २७ मे ते १५ जून या काळात योग्य ते शुल्क भरून आपले अर्ज संबंधित मंडळांकडे सादर करता येतील. उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी घेणे बंधनकारक असेल. फोटोकॉपी मिळाल्यानंतर विद्यार्थी पुढील पाच दिवसांमध्ये पुनर्मूल्यांकनाचे अर्ज योग्य त्या शुल्कासह संबंधित विभागीय मंडळाकडे सादर करू शकतील.

पुणे विभागीय मंडळामार्फत हेल्पलाइन

पुणे विभागीय बोर्डाने बारावी परीक्षेच्या निकालासाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. (०२०) ६५२९२३१७ या नंबरवर ही हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध असेल. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेल्या किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना या माध्यमातून समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी बोर्डाने समुपदेशकांचीही नियुक्ती केली आहे. समुपदेशनाचा लाभ घेण्यासाठी गरजूंनी प्रा. बी. डी. गरुड, पुणे (८६००५२५९०८), प्रा. एस. एल. कानडे, नगर (९०२८०२७३५३), सुधीर खाडे, सोलापूर (९४२०५४२६५४) यांच्याशी संपर्क साधावा. ही सुविधा २७ मे ते एक जून २०१५ या कालावधीत उपलब्ध असेल. परीक्षेच्या निकालाबाबतची अधिक तपशीलवार माहिती, गुणपडताळणी, श्रेणीसुधार योजना, पुनर्मूल्यांकन आदी बाबींशी संबंधित माहिती मंडळाच्या www.sscboardpune.in या वेबसाइटवरही उपलब्ध करून देण्यात आल्याचे मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे.

एमएस-सीआयटी केंद्रांवर निकाल मोफत

राज्यातील पाच हजारांहून अधिक एमएस- सीआयटी केंद्रांवरून बुधवारी बारावीचा निकाल मोफत पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या सोयीच्या एमएस-सीआयटी केंद्रावरून दुपारी एक वाजल्यानंतर आपला निकाल जाणून घेता येईल. तसेच, या निकालाची प्रिंटही मोफत घेता येईल. निकाल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाचा सीट नंबर आणि आपल्या आईचे नाव एमएस-सीआयटी केंद्रावर नोंदवण्याचे आवाहन 'एमकेसीएल'ने मंगळवारी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालकांच्या चौकशीत चालढकल

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील चौदाशे कोटी रुपयांच्या तोट्यासाठी दोषी ठरवलेल्या संचालकांच्या चौकशीबाबत बँकेकडूनच चालढकल सुरू आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी संचालकांवर ठेवलेल्या अकरा दोषारोपांची कागदपत्रे संबंधितांना देण्यात बँकेकडून टाळाटाळ केली जात आहे. परिणामी, दोषी संचालकांवर तोट्याची वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्यास विलंब होत आहे.

दोषारोपांची कागदपत्रे दोषी संचालकांना मिळाल्याशिवाय ते आपले म्हणणे चौकशी अधिकाऱ्यांसमोर मांडू शकत नाहीत. ही दोषारोपांची कागदपत्रे राज्य बँकेचे अधिकारी देत नसल्याचे कारण सांगून, संचालक ही चौकशी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. या संचालकांना दोषारोपाशी संबंधित कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून द्यावीत, अशी स्मरणपत्रे चौकशी अधिकारी शिवाजी पहिनकर यांनी बँकेला दिली आहेत; मात्र या पत्रांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे दिसते.

संचालकांच्या बेफिकीर कारभारामुळे राज्य बँकेला चौदाशे कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. या तोट्याची सहकार कायद्याच्या कलम ८३अन्वये चौकशी करण्यात आली. या चौकशीत बँकेचे तत्कालीन संचालक व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, दिलीपराव देशमुख, आनंदराव अडसूळ, पांडुरंग फुंडकर, अमरसिंह पंडित, यशवंतराव गडाख, ईश्वरचंद जैन यांच्यासह ६५ संचालकांना दोषी धरण्यात आले.

या चौकशी अहवालाधारे बँकेच्या तोट्याची संचालकांवरील वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्यासाठी कलम ८८प्रमाणे २२ मे २०१४पासून चौकशी सुरू करण्यात आली. ही चौकशी एका वर्षात पूर्ण करावी, अशी सूचना चौकशी अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. परंतु वेगवेगळ्या कारणांस्तव संचालकांनी सुनावणीच्या तारखा पुढे ढकलल्या. शेवटी २१ मे रोजी आपले अंतिम म्हणणे मांडण्याची संधी चौकशी अधिकारी पहिनकर यांनी संचालकांना दिली; मात्र त्यातही संचालकांनी दोषारोपासंदर्भातील कागदपत्रे बँकेकडून मिळत नसल्याचे कारण काढून ही चौकशी पुढे ढकलण्यास भाग पाडले आहे. आता संचालकांना आपली बाजू मांडण्यास ३० मे ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

संचालकांवरील दोषारोप

संचित तोटा असणाऱ्या आठ साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जात बँकेला २९७ कोटींचा तोटा

केन अॅग्रो एनर्जी (इंडिया) कारखान्याकडील कर्जाच्या वसुलीतील दिरंगाईने ५४ कोटींचा तोटा

चौदा कारखान्यांची थकित कर्जांची वसुली न केल्याने ४८७ कोटी रुपयांचे नुकसान

१७ साखर कारखान्यांच्या तारण मालमत्ता विक्रीत अनियमितता झाल्याने ५८५ कोटी रुपयांचे नुकसान

चार संस्थांना असुरक्षित कर्जपुरवठा केल्याने एक कोटी ७७ लाखांचे नुकसान

सहा सूतगिरण्यांच्या विक्रीत ८४ कोटी रुपयांचा तोटा

विक्री निविदांमध्ये गोंधळ केल्यामुळे बँकेला ३६ कोटी रुपयांचा फटका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images