Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सोनसाखळी चोरांचा पुन्हा धुमाकूळ

$
0
0
जंगली महाराज रस्त्यावरील साखळी स्फोटानंतर थंडावलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटना पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे. बुधवारी दिवसभरात सोन साखळी चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडसाठी नवे तहसील कार्यालय

$
0
0
हवेली तालुक्याचे विभाजन करून पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र तहसील कार्यालय सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मंत्रालयात या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर येत्या काही दिवसांत हे कार्यालय सुरू होण्याची शक्यता आहे.

७० कोटींचे पुरवणी बजेट मंजूर

$
0
0
जिल्हा परिषदेच्या सुमारे ७० कोटी रुपयांच्या पुरवणी बजेटला गुरुवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. इमारती आणि रस्त्यांसाठी या बजेटमध्ये भरीव तरतूद केली असून ,महिला व बालकल्याण, समाज कल्याण विभागाला भरघोस निधी देण्यात आला आहे. पुरवणी बजेटमधून आता नवीन योजना राबविता येणार आहेत.

गुरुवारी रात्री बारापर्यंत स्पीकर

$
0
0
राज्य सरकारने दिलेल्या अधिकाराचा वापर करून गणेशोत्सवातील आठवा दिवस असलेल्या गुरूवारी (२७) रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिली. यामुळे रविवारी (२३) आणि गुरूवारी (२७) ला शहरातील गणेश मंडळाचे देखावे रात्री बारा वाजेपर्यंत भाविकांना बघता येणार आहेत.

एक्स्प्रेस वेवरील अपघातात ७ जण जखमी

$
0
0
पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर देवले गावच्या हद्दीत इनोव्हा कारच्या अपघातात एक महिलेचा मृत्यू झाला असून, सातजण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात गुरुवारी (२० सप्टेंबर) पहाटे पावणेसहाच्या सुमारास झाला.

कोथरूडमध्ये डेंगीचे संशयित पेशंट

$
0
0
सर्दी, ताप, खोकल्याने निम्मे पुणे आजारी पडले असतानाच गेल्या आठ महिन्यांत उलट्याने बेजार झालेल्या पुणेकरांच्या मागे आता डेंगीच्या तापाचे दुखणे लागले आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने कोथरूडमध्ये डेंगीचे संशयित डेंगीचे पेशंट आढळल्याने शहरभर धूरफवारणीसारख्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

डॉक्टरवर गुन्हा दाखल करा

$
0
0
लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी एका युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी सांगवी येथील डॉ. मोझेस जॉर्ज डायस आणि त्याला मदत केल्याप्रकरणी त्याची पत्नी मंजुळा या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. एम. पिंगळे यांनी हा आदेश दिला.

महिला सुरक्षेबाबत एसटी उदासीन

$
0
0
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वतंत्र महिला मदत केंद्रे सुरू करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. मात्र, एसटी महामंडळाचे प्रशासन त्या बाबत उदासीन असून, सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे चित्र आहे.

किरकोळ भांडणातून ५ जणांवर वार

$
0
0
किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणामध्ये एका सराईत गुन्हेगाराने पाच जणांवर वार करून त्यांना जखमी केले. गुरुवारी दुपारी सव्वाबारा वाजता सांगवी येथे ही घटना घडली. जखमी पैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पालिकेत रंगले मनसे-युती द्वंद्व

$
0
0
ढोलेपाटील रोड परिसरातील महापालिकेच्या शाळेतील हॉल माजी आमदार कमल ढोले पाटील यांच्या संस्थेला भाड्याने देण्याच्या मुद्यावर मनसे विरूद्ध अन्य सर्व पक्षांनी गुरूवारी मतदान केले. यावरून संतापलेले मनसे आणि भाजप-सेना यांच्यातच सामना रंगला आणि ‘यापुढे भाजप-सेनेला त्यांची जागा दाखवून देऊ,’ असा इशारा मनसेच्या सदस्यांनी दिला.

सीसीटीव्हीसाठी २.५ कोटी

$
0
0
पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख चौक आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुणे पोलिसांना अडीच कोटी रुपये देण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने गुरुवारी (२० सप्टेंबर) मंजुरी दिली. याव्यतिरिक्त महापालिकेच्या प्रमुख इमारतींसाठी अंतर्गत स्वतंत्ररित्या सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

२८ सप्टेंबरला ‘इम्पा’ची निवडणूक

$
0
0
इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन (इम्पा)ची निवडणूक २८ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. या निवडणुकीसाठी टी. पी. आगरवाल आणि राजदीप सिंग यांच्या अध्यक्षतेखाली दोन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत. अंधेरीच्या कॉलेजमधील एका सभागृहात चिठ्ठी टाकून हे मतदान केले जाणार आहे.

कविता, गझलांनी वातावरण भारले

$
0
0
पुण्याच्या उपनगरी भागात सांस्कृतिक चळवळ वाढीस लागण्यासाठी साहित्य आणि कला क्षेत्रातील संस्थांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार विश्रांतवाडीतील फुलेनगरमध्ये कविसंमेलन भरविण्यात आले. तब्बल ४५ कवींच्या कवितांनी हे संमेलन रंगले.

जात प्रमाणपत्रासाठी विशेष मोहिमेचे आयोजन

$
0
0
जात पडताळणीसाठी विभागीय जात प्रमाणपत्रासाठी समिती क्रमांक ३, पुणे कडे आलेले अर्ज निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या समितीने वैध ठरविलेल्या अर्जांची माहिती वेबसाइटवर देण्यात येणार आहे. याबाबत अर्जदारांनी ३० सप्टेंबर पर्यंत समितीच्या कार्यालयात संपर्क साधू नये, असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले आहे.

संशयित बॅग ठेवणा-या व्यक्तीची चित्रफित सादर

$
0
0
कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत बॉम्बस्फोटापूर्वी दोन संशयितांनी बॅग घेऊन प्रवेश केला. त्यानंतर त्यातील एकच जण बॅग घेऊन परतली. त्यातील एका संशयिताची चित्रफित कोर्टात सादर करण्यात आली. चित्रफितीत दिसणा-या एका तरुणाने शुक्रवारी कोर्टात साक्ष दिली.

‘कमला नेहरू’च्या खासगीकरणास विरोध

$
0
0
कमला नेहरू रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा घाट महापालिका प्रशासनाने घातला असून, खाजगीकरण केल्यास त्याविरूद्ध आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे नगरसेवक अजय तायडे यांनी दिला आहे.

‘प्रायोगिक रंगभूमीला दाद मिळाल्याने आनंद द्विगुणित’

$
0
0
‘वैयक्तिक स्वरूपातील पुरस्काराचा आनंद असला, तरी प्रायोगिक रंगभूमीला दाद मिळाली, यामुळे हा आनंद द्विगुणित झाला आहे’, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी शुक्रवारी भावना व्यक्त केल्या.

कलमाडींनी पुण्याचे नाव जगभर नेले

$
0
0
‘खासदार सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलच्या रूपाने पुण्याचे नाव जगात सुप्रसिद्ध केले,’ अशा शब्दात भाजपाचे संसदेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी कलमाडी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. दरम्यान, भाजपमधील गडकरी गटाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी फेस्टिव्हलच्या उद्घाटन कार्यक्रमावर अघोषित बहिष्कार घातला.

वरिष्ठ वेतनश्रेणीचा मार्ग मोकळा

$
0
0
राज्यातील सुमारे ५० हजार माध्यमिक शिक्षकांचा वरिष्ठ वेतनश्रेणी मिळण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षणसेवक पदाचा कालावधी ग्राह्य धरण्याचा आदेश राज्याचे माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण संचालक डॉ. श्रीधर साळुंखे यांनी शुक्रवारी दिल्याने या शिक्षकांना हा दिलासा मिळणार आहे.

‘एनएसयूआय’चे आंदोलन

$
0
0
कॉलेजमधील विद्यार्थ्यांना कॉलेजच्या आवारात मोफत पार्किंग उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयुआय) तर्फे आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images