Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

योगेश राऊत दोषी

$
0
0

नयना पुजारी खून प्रकरणी कोर्टाचा निर्णय; शनिवारी शिक्षेची सुनावणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सॉफ्टवेअर इंजिनीअर नयना पुजारी खून प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राऊत ससून हॉस्पिटलमधून पळून गेल्याप्रकरणी कोर्टाने त्याला दोषी धरले आहे. त्याच्या शिक्षेची सुनावणी शनिवारी होणार आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. निमसे यांच्या कोर्टात ही सुनावणी होणार आहे.

नयना पुजारी खूनप्रकरणाची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असताना राऊत फरार झाला होता. तो फरार झाल्यानंतर दीड वर्षांनी त्याला पकडण्यात यश आले होते. राऊतला पळून ​जाण्यासाठी मदत केल्याच्या प्रकरणातून त्याचा भाऊ मनोज अशोक राऊत (२५, रा. गोलेगाव, खेड), सतीश अशोक पाडेकर (२८, रा. सावरगाव घुले, संगमनेर) यांची सबळ पुराव्याअभावी कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.

सागर सहानी अपहरण व खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नितीन शांतीलाल मोढा (३३, मूळ रा. मोकर, पोरबंदर) याने राऊतला पळून जाण्यास मदत केल्याच्या कारणावरुन त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. मात्र, त्याला या गुन्ह्यातून वगळण्यात आले. तसेच पोलिस कर्मचारी सुमेरसिंह सूरसिंग पाटील (रा. विश्रांतवाडी पोलिस वसाहत) यांच्यावरील खटला वेगळा चालविला जाणार आहे.

योगेश राऊत अंगाला खाज सुटत असल्याचा बहाणा करून ससून हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. तेथून तो १७ सप्टेंबर २०११ पळून गेला होता. त्याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी त्याचा भाऊ मनोज आणि त्याचा मित्र सतीश यांना अटक करण्यात आली होती. राऊत फरारी झाल्याच्या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक सतीश गोवेकर यांनी केला. राऊतला ३१ मे २०१३ रोजी शिर्डी येथून अटक करण्यात आली होती.

या खटल्यात सरकारी वकील सुचित्रा नरोटे यांनी अकरा साक्षीदार तपासले. राऊतला उपचारासाठी येरवडा जेलमधून सुमेरसिंह पाटील यांच्या हवाली केले होते. त्या कारागृह पोलिस कर्मचारी निवृत्ती चव्हाण, यांची साक्ष खटल्यात महत्त्वाची ठरली. वाकडमधील दुर्गा हॉटेलमध्ये राऊत रवीकुमार रावत या नावाने राहिला होता. या हॉटेलचे व्यवस्थापक नितीन शेट्टी यांनीही साक्षी दरम्यान राऊतला ओळखले. साक्षीदार पंच अविनाश शेळके यांच्या समोर ३१ मे २०१३ रोजी त्याला शिर्डी येथून अटक करण्यात आली होती. ही साक्षही खटल्यात महत्वाची ठरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिधोकादायक इमारती खाली करा

$
0
0

शहरातील ३३ वाड्यांना येत्या १५ दिवसांची मुदत; महापौरांचा आदेश

म. टा. प्रत‌िनिधी, पुणे

शहरातील विविध भागात अतिधोकादायक असलेले ३३ वाडे आणि इमारती पुढील पंधरा दिवसात रिकाम्या कराव्यात, अशा सूचना पालिका प्रशासनाला देण्यात आल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी शुक्रवारी सांगितले. हे धोकादायक वाडे रिकामे करण्यासाठी पोलिस फोर्सची मदत घेऊन याची तातडीने अंमलबजावणी केली जाणार असल्याचे धनकवडे यांनी स्पष्ट केले.

शहरातील सुमारे ९९१ वाडे, इमारती धोकादायक असल्याची माहिती महापालिकेने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमधून समोर आली आहे. यातील दोनशे इमारतींवर हातोडा मारावा लागण्याची शिफारस स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये करूनही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील धोकादायक इमारतीमध्ये अनेक नागरिक राहत असून यामुळे आजूबाजुच्या नागरिकांना धोका निर्माण झाल्याचे वृत्त 'मटा' ने प्रसिद्ध करून याला वाचा फोडली होती. या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने धोकादायक झालेल्या इमारती आणि वाड्यांच्या संबधित जागा मालकांना नोटीस बजावून तातडीने दुरुस्त‌ करून घेण्याच्या नोटिसा बजाविल्या आहेत. शहरात ३३ इमारती आणि वाडे अतिधोकादायक झाले असून, येत्या पंधरा दिवसात पालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई करून या इमारती मोकळ्या कराव्यात, अशा सूचना पालिकेच्या बांधकाम विभागाला देण्यात आल्याचे महापौर धनकवडे यांनी सांगितले.

गेल्या वर्षी महापालिकेने शहरातील अतिधोकादायक झालेल्या वाड्यांना, इमारतींना नोटीस बजावून गेले वर्षभरात ४५ वाडे, इमारतींवर कारवाई केल्याची माहिती उपअभियंता राजेंद्र मेदनकर यांनी दिली.
मालक-भाडेकरू यांच्यात असलेल्या वादामुळे जी प्रकरणे कोर्टात प्रलंबित आहेत, अशा मिळकतींवर पालिकेला कारवाई करता येत नाही. त्यामुळे या धोकादायक इमारतीमध्ये काही अपघात घडल्यास त्याची जबाबदारी तेथे राहणाऱ्या नागरिकांवर असल्याची नोटीस देखील संबधित भाडेकरूंना बजाविली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
....

अतिधोकादायक झालेल्या इमारतींमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यक तो पोलिस फोर्स घेऊन हे धोकादायक वाडे येत्या १५ दिवसांमध्ये मोकळे करावेत.
दत्तात्रय धनकवडे, महापौर, पुणे महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. पठारे यांना ‘मसाप सन्मान’

$
0
0

साहित्य परिषदेचे अन्य पुरस्कारही जाहीर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात येणारा 'मसाप सन्मान पुरस्कार' ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रंगनाथ पठारे यांना, तर डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार वाई येथील मधू नेने यांना जाहीर झाला.

विशेष ग्रंथकार, वार्षिक ग्रंथ पारितोषिके, मसाप सन्मान पुरस्कार आणि डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारांची घोषणा परिषदेच्या कार्यवाह नंदा सुर्वे यांनी केली. कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन या वेळी उपस्थित होते. ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कार वितरण ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते २६ मे रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. वर्धापनदिन कार्यक्रमात मसाप सन्मान, कार्यकर्ता पुरस्कार माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते २७ मे रोजी सायंकाळी सहा वाजता नव्या पेठेतील निवारा सभागृहात प्रदान करण्यात येणार आहेत.

विशेष ग्रंथकार पुरस्कार अभय टिळक, शैला दातार, संगीता जोशी, अशोक बागवे, डॉ. संजय ढोले, प्रा. चंद्रकांत पाटील, इरावती कर्णिक, डॉ. संगीता बर्वे, डॉ. विजया वाड, भानू काळे यांना देण्यात येणार आहे. वार्षिक पारितोषिकप्राप्त साहित्यिकांमध्ये ल. सि. जाधव, प्रभाकर बागले, डॉ. शिवाजीराव मोहिते, विशाखा पाटील, सुधीर फडके, प्रा. रायभान दवंगे, आनंद अंतरकर, राजहंस प्रकाशन, धोंडुजा इंगोले, प्रा. खासेपाव शितोळे, डॉ. विजया फडणीस, मुग्धा गोडबोले, श्रीधर नांदेडकर, रामकृष्ण अघोर, नयना राजे, लक्ष्मीकांत देशमुख, कलापिनी कोमकली, डॉ. रेखा इनामदार-साने, सहदेव चव्हाण, डॉ. उपेंद्र किंजवडेकर, राजीव साने, अमृता सुभाष, प्रभा गणोरकर, डॉ. अरुणा ढेरे यांचा समावेश आहे.

उत्कृष्ट मसाप शाखा फिरता करंडक सासवड शाखेला, मसाप कार्यकर्ता पुरस्कार इस्लामपूरचे श्यामराव पाटील व सोलापूरचे पद्माकर कुलकर्णी यांना दिला जाणार आहे. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमापूर्वी दीपक करंदीकर यांच्या रचनांवर आधारित 'अधरधुनी अक्षयधुनी' ही मैफल राजेश दातार, गोपाळराव लिमये, राहुल घोरपडे व सहकारी सादर करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शनिवारवाड्यासाठी हवा तेवढा निधी

$
0
0

पालकमंत्री गिरीश बापट यांची ग्वाही; प्रकाश योजनेचे काम दोन महिन्यांत

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'शहराच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या शनिवारवाड्याच्या संवर्धन आणि विकासासाठी जिल्हा विकास योजनेच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल,' अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिली, तर 'शनिवारवाड्याचे सुशोभीकरण करण्याबरोबरच तेथे अद्ययावत साउंड सिस्टिम आणि लाइटच्या उभारणीचे काम दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होईल,' असे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी स्पष्ट केले.

शनिवारवाडा परिसराचे नूतनीकरण करण्याबरोबरच येथे उभारण्यात येत असलेल्या 'लाइट अँड साउंड सिस्टिम'ची माहिती घेऊन त्याचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी महापालिकेत पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये जिल्हा विकास योजनेच्या माध्यमातून निधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली. महापौर दत्तात्रय धनकवडे, पालिका आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्यासह अनेक अधिकारी या वेळी उपस्थित होते.
पुण्यात पर्यटनासाठी आलेले पर्यटक आवर्जून शनिवारवाड्याला भेट देतात. सध्या शनिवारवाड्याची अवस्था अतिशय खराब झालेली असल्याने अनेकदा पर्यटकांचा हिरमोड होतो. शनिवारवाड्याची जबाबदारी पुरातत्व विभागाकडे असल्याने त्यामध्ये दुरुस्ती करताना अनेकदा अडचणी ये‌तात. शनिवारवाड्याच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले. शनिवारवाड्यात अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर धनकवडे यांनी सांगितले. यासाठी तब्बल साडेचार कोटी रुपयांच्या टेंडरला मान्यता देण्यात आली असून, शनिवारवाड्याचा इतिहास सांगणारी ३५ मिनिटांची शॉर्ट फिल्म तयार करून ती पर्यटकांना दाखविली जाणार आहे. ज्या ठेकेदाराला हे काम दिले आहे, त्यांच्यावर पुढील तीन वर्षे त्याची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी टाकण्यात आली आहे. शॉर्टफिल्मसाठी आवश्यक असलेल्या स्क्रिप्टचे काम पूर्ण झाले असून, पुढील दोन ते तीन महिन्यांत संपूर्ण काम पूर्ण होईल, असा विश्वास धनकवडे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बालभारती’तील शब्द-चित्राचा कॉपीराईट

$
0
0

खासगी प्रकाशक, गाईड्समधून होणारे वाङ्मयचौर्य रोखण्यासाठी खबरदारी

>> योगेश बोराटे, पुणे

'बालभारती'मधील ज्ञानभांडाराच्या जिवावर थाटण्यात येणाऱ्या गाइडच्या 'दुकानां'ना चाप लावण्यासाठी आता प्रकाशित केल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक शब्द-चित्राचा कॉपीराइट संपादन करण्यात येणार आहे. खासगी प्रकाशकांच्या लॉबीशी दोन हात करीत राज्य सरकारने त्यासाठी गांभीर्याने पावले उचलली आहेत.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) राज्यभरातील क्रमिक पाठ्यपुस्तके तयार करते. आजमितीस त्या पुस्तकाचा कॉपीराइट आहे. मात्र, त्यामधील प्रत्येक मजकूर-चित्रांचे हक्क राखून ठेवण्यात आलेले नाहीत. याच तांत्रिकतेचा लाभ उठवून खासगी प्रकाशनसंस्था पाठ्यपुस्तकांमधून काही भाग 'कॉपी-पेस्ट' करून गाइडचा धंदा चालवित होते. इतकेच नव्हे, तर 'बालभारती'शी संलग्न प्रकाशकांकडूनच हा मजकूर गाइडच्या निर्मितीसाठी पुरविला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच मंत्रालयात 'बालभारती'ची झाडाझडती घेणारी बैठक आयोजित केली होती. 'बालभारती'च्या कारभारासंदर्भात संबंधित घटकांशी गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये विचारविनिमय करण्यात आला होता. त्यामध्ये कॉपीराइटचा मुद्दा आग्रहाने मांडण्यात आला. राज्यातील शिक्षणतज्ज्ञांची मेहनत आणि 'बालभारती'चे प्रकाशनहक्क अबाधित राखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, त्यासाठी सरकारला खासगी प्रकाशक लॉबीच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे, याचीही जाणीव करून देण्यात आली. 'मटा'नेही सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून 'बालभारती'मधील वाङ्मयचौर्याचा प्रकार शिक्षणमंत्र्यांच्या नजरेस आणून दिला होता. प्रकाशक लॉबीचा विरोध पत्करून 'बालभारती' आणि राज्यातील शैक्षणिक क्रमिक पाठ्यपुस्तकांचे हक्क जपण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी 'मटा'ला दिली.

हक्काच्या निधीचीही गळती

'बालभारती'ची पाठ्यपुस्तके बाजारामध्ये उपलब्ध असताना, त्यामधील मजकूराच्या आधारे खासगी प्रकाशकांकडून विविध पूरक साहित्य आणि गाइडची निर्मिती केली जाते. त्यासाठी संस्थेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता प्रकाशक हे काम करतात. त्यामुळे कॉपीराइट्सच्या बळावर मिळू शकणारा संस्थेचा कोट्यवधींचा निधी गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेकडे आलेलाच नाही. हे प्रकार थांबविण्यासाठी काही महिन्यांपूर्वी संस्थेने बाजारात उपलब्ध गाइड्सची तपासणी करून, त्यामध्ये कॉपीराइटचा भंग करणारा मजकूर आहे का याची तपासणी करण्याची मोहीम हाती घेत असल्याचेही जाहीर केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माओवाद्यांच्या कोठडीत वाढ

$
0
0

बंदी घातलेल्या संघटनेचे साहित्य जप्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेल्या दोन माओवाद्यांकडे सरकारने बंदी केलेल्या सीपीआय (एम) या संघटनेच्या प्रचार आणि प्रसारासाठीचे साहित्य, लॅपटॉप, मोबाइल, पेनड्राइव्हमध्ये दडवून ठेवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. शुक्रवारी या दोघांची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. पोलिसांच्या विनंतीवरून त्यांच्या कोठडीत २१ मे पर्यंत वाढ करण्यात आली. विशेष न्यायाधीश एस. व्ही. माने यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

या प्रकरणी के. मुरलीधरन उर्फ अजित उर्फ थॉमस जोसेफ (वय ६२, रा. लोटस व्हिला प्लॉट नं. ७, तुकारामनगर, तळेगाव दाभाडे, मूळ राहणार इरिम्पनेम, केरळ) आणि इस्माइल हमजा सीपी (चिरगपल्ली) उर्फ प्रवीण उर्फ जेम्स मॅथ्यू (२९, रा. वालॉरड, जि. मलप्पुरम, केरळ) या दोघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे येथून जोसेफ आणि मॅथ्यू यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम ४१९, ४६७,४६८,४७१, ३४ सह यूपीए कलमा १०,१३,२०,३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरलीधरन देशातील प्रमुख नक्षलवादी नेत्यांच्या संपर्कात असून, गेली अनेक वर्षे तो नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे. अनेक राज्यातील पोलिस त्याच्या मागावर आहेत. या आरोपींनी देशविघातक, चिथावणी देणारे लेखन आणि साहित्य, तसेच इतर आक्षेपार्ह वस्तू स्वत:जवळ बाळगल्या होत्या. संघटनेसाठी सदस्य मिळविण्यासाठी बनावट नावांनी आधारकार्ड, पॅनकार्ड तया करून बेकायदा वास्तव्य करीत होते. या दोघांची पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. मुरलीधरन हा भारतातील प्रमुख नक्षलवाद्यांच्या संपर्कात असून त्यांच्या ठावठिकाण्याबाबत माहिती घ्यायची आहे. मोबाइल कंपन्यांचे पाच सिमकार्ड जप्त करण्यात आले असून, त्यांचा तपास करायचा आहे. आरोपींकडून लॅपटॉप, सीपीयू, पेनड्राइव्ह, हार्डडिस्क आदी ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांचा अभ्यास करण्यासाठी पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकारी वकील विकास शहा यांनी केली. त्यांचा युक्तिवाद कोर्टाने ग्राह्य मानून आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या तिजोरीत २८० कोटी

$
0
0

गेल्या वर्षीच्या तुलनेत मिळकतकरात ८० कोटींची वाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

मिळकतकराच्या माध्यमातून आर्थिक वर्षाच्या पहिल्या दीड महिन्यातच पालिकेच्या तिजोरीत २८० कोटी रुपये जमा झाले आहेत. मिळकतकरातून गेल्यावर्षीच्या तुलनेत पालिकेला ८० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल प्राप्त झाला असून, पाच ते दहा टक्के सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी मे अखेरपर्यंत कर भरावा, असे आवाहन मिळकतकर विभागाने केले आहे.

पालिकेच्या मिळकतकर विभागातर्फे पहिल्या दोन महिन्यांत कर भरणाऱ्यांना नागरिकांना सर्वसाधारण करात पाच चे दहा टक्के सवलत दिली जाते. पालिकेच्या हद्दीत सुमारे आठ लाख मिळकती असून, त्यांच्यापर्यंत कराची बिले वेळेत पोहोचविण्याचे मोठे आव्हान पालिकसमोर असते. दर वर्षी बिले वेळेवर मिळत नसल्याची तक्रार होत असल्याने पालिकेने यंदा पोस्टाद्वारे बिले पाठवली. त्यामुळे, बहुतांश नागरिकांना बिले वेळेत मिळाल्याने कराचा भरणाही वाढला आहे.

एप्रिलमध्ये सुमारे १८० कोटी रुपये मिळकत कराच्या माध्यमातून मिळविणाऱ्या पालिकेने मेच्या पहिल्या पंधरवड्यातच त्यात आणखी शंभर कोटी रुपयांची भर घातली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत मिळकतकरातून पालिकेला २८१ कोटी ५१ लाख रुपये प्राप्त झाले होते. गेल्या वर्षी, १५ मे पर्यंत पालिकेच्या तिजोरीत २०३ कोटी रुपये जमा झाले होते. अखेरच्या काही दिवसांमध्ये कर भरणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून, आगामी १५ दिवसांत पालिकेला मिळकतकरातून भरघोस वाढ अपेक्षित आहे. ऑनलाइन स्वरूपात कर भरणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाल्याने पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांत; तसेच मुख्य इमारतीमध्ये होणारी गर्दी यंदा कमी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद मोहोळ टोळीवर मोक्का

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गँगस्टर शरद मोहोळ टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्यानुसार (मोक्का) पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे.या टोळीने नुकतेच गुरुवार पेठेतील एका व्यावयायिकाकडे खंडणी मागितली होती. या गुन्ह्याला 'मोक्का' लावण्यात आला आहे.

शरद हिरामण माहोळ, अक्षय शिवाजी भालेराव, सुशील गणेश मंडल आणि सचिन उर्फ गोट्या तानाजी शिळीमकर यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांत ही कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त अरविंद पाटील हे करत आहेत. पोलिसांनी मोहोळ टोळीविरुद्ध 'मोक्का'खाली कारवाई सुरू केली असून, त्यात इतर सदस्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

इंडियन मुजाहिदीनचा संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकी याचा येरवडा जेलमध्ये खून केल्यानंतर मोहोळची रवानगी तळोजा जेलमध्ये करण्यात आली आहे. पुण्यात त्याच्यावर कोथरूड, डेक्कन, दत्तवाडी, वानवडी, येरवडा आणि खडकी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर खुनाचे तीन, दरोड्याचा एक आणि दुखापतीचे दोन, त्याशिवाय शस्त्र बाळगल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत.

मंगळवार पेठेतील कपडे धुण्याचा कारखाना चालवणारे व्यावसायिक योगेश सहदेव पारडे (वय ३२, रा. ७१५, गुरुवार पेठ) यांच्याकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणी अक्षय शिवाजी भालेराव (वय २३, रा. तुपे कॉलनी), सुशील गणेश मंडल (वय २३, रा. भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवनेरी पुन्हा सेवेत रूजू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन 'शिवनेरी' बस दाखल झाल्याने संपूर्ण वातानूकुलित सेवा पूर्ववत झाली आहे. सुटीचा हंगाम संपण्यापूर्वीच या बस उपलब्ध झाल्याने नागरिकांची गैरसोय टळणार आहे.

ठेकेदारांच्या नऊ शिवनेरी बसचा करार संपल्यामुळे शिवनेरी बसची संख्या घटली होती. त्यातच उन्हाळी सुट्यांमुळे पुणे-दादर 'एसी' शिवनेरी बसला मोठ्या प्रमाणावर मागणी होती; मात्र त्या तुलनेत बसची संख्या कमी होती. त्यामुळे अन्य मार्गांवरील बस या मार्गावर वळविण्यात आल्या होत्या. त्यामुळे अन्य मार्गावरील प्रवाशांची गैरसोय झाली. तसेच, दोन बसमधील वेळेच अंतरही वाढले होते. आता पुणे आणि परळला नवीन शिवनेरी उपलब्ध झाल्याने या सेवेवरील ताण कमी होणार आहे.

एसटीने ४० शिवनेरी बसेस भाडेतत्त्वार घेतल्या आहेत. त्यापैकी नऊ बसचा करार संपला होता. तो करार न वाढविता एसटीने स्वतः शिवनेरी सेवेसाठी वातानुकूलित बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात बेंगळुरू येथून एकूण १२ बसची खरेदी करण्यात आली. त्यातील नऊ बस पुण्यासाठी आणि तीन बस परळसाठी वापरण्यात येणार आहेत. पुण्याच्या नऊपैकी सात बस सेवेत रूजू झाल्या आहेत. या गाड्यांचा करार संपेल त्याप्रमाणे स्व-मालकीच्या नवीन गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत, असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यात वळवाचा पाऊस मुक्कामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुणे आणि परिसरामध्ये वळवाचा पाऊस मुक्कामाला आला आहे. शनिवारी आणि रविवारी दोन्ही दिवस दिवसभर हवामान ढगाळ राहणार असून, सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधेशाळेने वर्तविली आहे. पुण्यातील सर्व भागांमध्ये शुक्रवारी दुपारनंतर तीन मिमी पावसाची नोंद झाली.

शहरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी सकाळपासून हवामान ढगाळ होते. दुपारी चारनंतर ढग दाटून आले आणि पाच वाजल्यानंतर मुसळधार पावसाने पुन्हा एकदा शहर आणि परिसराला झोडपून काढले. शहराच्या विविध भागात दीड ते दोन तास सलग पाऊस कोसळत होता. संध्याकाळनंतर पाऊस थांबला पण आकाश ढगाळ होते. दिवसभरात कमाल ३२. ९ तर किमान २३.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.

वळवाच्या पावसाने सध्या पुण्यात मुक्काम ठोकला असून, पुढील दोन दिवसात दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच येत्या २१ मेपर्यंत शहराच्या काही भागात पाऊस पडणार असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे.

संपूर्ण मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट तर मराठवाडा आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात शुक्रवारी सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. पुढील दोन दिवसात काही शहरांमध्ये तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नैऋत्य मौसमी पावसाचे आगमन पुढील दोन ते तीन दिवसात होण्यासाठी निकोबार द्वीपसमूह आणि लगतच्या समुद्रावर अनुकूल स्थिती कायम असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे.

१३७. १ मिमी पाऊस जास्त

गेल्या वर्षी उन्हाळा सुरू झाल्यावर अर्थात मार्च ते मे महिन्याच्या अखेरपर्यंत ६२ मिमी पाऊस पडला होता. या वर्षी मार्च ते मे पंधरावडा या काळात १६३. १ मिमी पाऊस पडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उन्हाळ्यात यंदा १३७. १ मिमी. पाऊस जास्त पडल्याची माहिती पुणे वेधशाळेतर्फे देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे महापालिका फेसबुकवर

$
0
0

नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी वापर

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती व्यापक पद्धतीने नाग‌रिकांपर्यंत पोहचविण्यासाठी महापालिका प्रशासनाने सोशल मीडियाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने स्वतंत्र फेसबुक खाते उघडले असून, त्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणींचे निवारण करण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. याबरोबरच पालिकेकडून 'ई-न्यूज लेटर' देखील प्रकाशित केले जाणार आहे.

गेल्या काही वर्षात प्रत्येक गोष्टीमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषत: फेसबुक आणि व्हॉटस्अप चा वापर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचा फायदा घेत महापालिकेने एक पाऊल पुढे टाकून फेसबुक खाते काढण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाशी कनेक्ट असलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी पालिका प्रशासनाने 'पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन' या नावाने खाते सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून महापालिकेचे नवीन प्रकल्प, नवीन उपक्रम, योजना तसेच प्रस्तावित धोरणांची माहिती दिली जाणार आहे. महापालिकेच्या विविध विभागांमार्फत शहरात सुरू असलेल्या कामांची, उपक्रमांची माहिती देखील फेसबुकच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाणार आहे. पालिकेच्या कम्प्युटर आणि सांख्यिकी विभागाच्या वतीने हे काम पाहिले जाणार आहे.

पालिकेच्या कामाबद्दलच्या तक्रारी तसेच पालिकेबाबतचे आपले मत नागरिकांना या खात्याच्या माध्यमातून थेट नोंदविता येणार आहे. यामुळे पालिकेशी संपर्क साधण्यासाठी शहरातील नागरिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. फेसबुकवर करण्यात आलेल्या तक्रारी संबधित विभागांना पाठविण्यात येणार असल्याने तातडीने त्याची दखल घेतली जाणार आहे. पालिकेशी संबधित बातम्या आणि महत्त्वाचे निर्णय न्यूज लेटरच्या माध्यमातून नागरिकांना वाचता येणार आहे.

हेल्पलाइन, टोल फ्री क्रमांकानंतर आता फेसबुक

नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाने यापूर्वी टोल फ्री क्रमांक, तसेच अनेक हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. मात्र प्रत्येक वेळी या हेल्पलाइनवर करण्यात आलेल्या तक्रारींची अनेकदा दखल घेतली जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. सोशल ‌मीडियाचा वापर करून पालिकेने फेसबुक खाते सुरू असले, तरी त्यावर करण्यात आलेल्या तक्रारींची दखल न घेता त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास त्याचा काहीही उपयोग होणार नसल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दूरसंचार शोधांचे व्यावसायिकरण व्हावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'दूरसंचार क्षेत्रातील नवीन शोध लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या शोधांचे व्यावसायिकीकरण करणे गरजेचे आहे,' असे मत सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे उपसरसंचालक कमोडोर जे.जेना (निवृत्त) यांनी नुकतेच व्यक्त केले.

एमआयटी स्कूल ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंटतर्फे (मिटसॉट) जागतिक दूरसंचार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जेना बोलत होते. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनचे (आयटीयू) सरसचिव अनिल प्रकाश,डेलॉइट इंडियाचे भागीदार हेमंत जोशी, मिटसॉटचे प्रकल्प संचालक

डॉ. मिलिंद पांडे, प्रा. ऋषी कप्पाल, ब्लॅकबेरीचे विपणन संचालक हितेश शहा आदी उपस्थित होते. याप्रसंगी दूरसंचार दिनानिमित्त तिरूबा टेक्नोलॉजीज्, पेटीएम, इंग्राम मायक्रो, सोनी इंडिया, अॅक्टिव्ह टेलिकॉम इन्फ्रा, अमेरिकन टॉवर्स, टाटा टेली सर्व्हिसेस, मार्व्हल्स सेमीकंडक्टर्स टेक्नोलॉजी या कंपन्यांना टेलिकॉम एक्सलन्स पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

'इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी कंपन्यांसोबत काम करून भागीदारी करून आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पना व्यावसायिक स्वरूपात पुढे आणाव्यात. डिजिटल इंडिया व स्मार्ट सिटी या संकल्पनांमुळे दूरसंचार क्षेत्रातील अभिनवतेला मोठी चालना मिळणार आहे,' असे जेना म्हणाले. 'युरोप अमेरिकासारख्या देशांमध्ये उद्योग आणि शिक्षणसंस्थामध्ये सहयोग असल्याने तेथील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो, भारतात अशा सहकार्याची गरज आहे,' असे अनिल प्रकाश यांनी सांगितले. 'बँकिंग, आरोग्य सेवा, ऊर्जा, शेती, होम मॅनेजमेंट अशा अनेक क्षेत्रात दूरसंचार निर्णायक भूमिका बजावेल,' असे हेमंत जोशी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२ अपघातांमध्ये ३ ठार; ४ जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे आणि जुन्या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन ठार, तर चार गंभीर जखमी झाले आहेत. चांद बिगवन (वय ४५, रा. गुलबर्गा, कर्नाटक) असे पहिल्या अपघातात मृत्यू पडलेल्याचे नाव असून, एकाची अद्याप ओळख पटलेली नाही. जखमींमध्ये लक्ष्मीपती नामक इसमाचा समावेश आहे. दुसऱ्या अपघातात रामचंद्र विलास चव्हाण (वय ३६,रा. चिखलगाव, खानापूर, सांगली ) यांचा मृत्यू झाला. जखमींमध्ये विजय शंकर चव्हाण (वय ३२), सारिका विजय चव्हाण (वय ३०), विकास शंकर चव्हाण (वय २९, तिघेही रा. चिखलगाव, खानापूर, सांगली, सध्या रा. नवी मुंबई) यांचा समावेश आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सोमाटणे फाट्याजवळीर इंडियन ऑइलच्या पेट्रोलपंपावरून ऑइलची वाहतूक करणारा कंटेनर (एनएल ०१ एल १६१५) हा पुण्याकडे येत होता. दरम्यान पुण्याहून मुंबईकडे नारळ घेऊन जाणारा ट्रक (केए ०५ एडी २७८६) कंटेनरवर वेगाने आदळला. या धडकेमुळे ऑइलच्या कॅनची वाहतूक करणारा कंटेनर भरकटत गेला. दरम्यान मुंबईहून पुण्याला चारचाकी वाहनांची वाहतूक करणारा कंटेनर ऑइलच्या कॅनची वाहतूक करणाऱ्या कंटेनरच्या केबिनवर आदळला. या विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास सोमाटणे फाटा येथे झाला. या घटनेचा पुढील तपास तळेगावचे एस. बी. जठार हे करीत आहे.

खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चव्हाण परिवारातील सदस्य हे एक्सप्रेस वेवरून त्यांच्या स्विफ्ट कारने (एमएच ४३ एक्स २३०५) मूळगावी गेले होते. रात्री ते परत मुंबईला जाताना लोणावळ्यातील तुंगार्ली गावानजीक त्यांची कार पुढे जाणाऱ्या कंटेनरवर (एमएच ४६ एच ५६४४) मागून जोरात आदळून कंटेनरखाली घुसली. या घटनेत रामचंद्र यांचा जागीच मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलग १८ तास ‘बिग बीं’ची गाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'देखा ना हाय रे सोचा ना', 'ओ साथी रे तेरे बिना भी क्या जिना', 'इम्तहां हो गई इंतजार की', 'परदेसिया', 'खैके पान बनारसवाला', 'देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए', 'मै हू डॉन', 'जहा तेरी ये नजर है' इथपासून ते 'कजरारे कजरारे' पर्यंतची महानायक अमिताभ बच्चन यांची गाणी रसिकांनी शनिवारी जल्लोषपूर्ण वातावरणात अनुभवली.

निमित्त होते 'सिलसिला अमिताभ का' या कार्यक्रमाचे. विशेष म्हणजे बालगंधर्व रंगमंदिर येथे शनिवारी सकाळी सहा वाजता सुरू झालेल्या या मैफलीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बच्चन यांच्यावर चित्रित झालेली १५१ गाणी सलग १८ तास सादर करण्यात आली.

ऑटिझम या आजाराबाबत जागरूकतेसाठी पुण्यातल्या गायक-वादक कलाकारांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. चाळीसहून अधिक गायक-वादक त्यात सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे उद् घाटन बालकलाकार पार्थ भालेराव आणि प्रसन्न ऑटिझम शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री आमदार गिरीश बापट यांनीही कार्यक्रमाला भेट दिली. अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी काही गाण्यांवर नृत्य सादर केले. गाण्यांच्या सादरीकरणासह सुरू असणाऱ्या 'लाइव्ह पेंटिग्ज'ने कार्यक्रमात रंगत आणली. या चित्रांच्या लिलावातून जमा झालेली रक्कम ऑटिझमग्रस्त मुलांच्या शाळेला देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या पालिकेचा प्रस्ताव विधी समितीसमोरही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराच्या पूर्व भागासाठी 'हडपसर-हवेली' अशी नवी महापालिका स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसप्रमाणेच विधी समितीसमोर सादर करण्यात आला आहे. येत्या सोमवारी (१८ मे) विधी समितीत या प्रस्तावावर निर्णय अपेक्षित आहे.

शहराचा काही भाग आणि हवेलीतील गावांचा समावेश करून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्याबद्दल मागणी केली होती. त्याशिवाय, हडपसरचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांनीही नुकत्याच संपलेल्या विधिमंडळ अधिवेशनात वेगळ्या महापालिकेचा विषय लावून धरला होता. अखेर, सरकारनेही त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या असून, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला त्याबाबतचा निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.

नव्या पालिकेसाठीचा प्रस्ताव आयुक्तांनी विधी समितीसमोर मांडला असून, येत्या सोमवारी होणाऱ्या विधी समितीच्या बैठकीतही त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. महापालिकेत नव्याने समाविष्ट

होणाऱ्या ३४ गावांमुळे पालिकेच्या मूलभूत सेवा-सुविधांवर ताण येण्याची शक्यता असल्याने वेगळ्या महापालिकेला बहुतेक पक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे, पालिका त्याबाबत नेमकी काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खंडपीठासाठी पाठपुरावा करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्यात व्हावे या वकिलांच्या मागणीला आपला पाठिंबा असून, त्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. खंडपीठासाठी लागणारी जागा आपण उपलब्ध करून देऊ,' असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी दिले.

मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच पुण्यात व्हावे यासाठी मंत्रिमंडळात शिफारस केल्याप्रकरणी शनिवारी पुणे बार असोसिएशनतर्फे जिल्हा कोर्टातील अशोक हॉल येथे बापट यांचा सत्कार करण्यात

आला. प्रसिद्ध विधीज्ञ अॅड. एस. के. जैन अध्यक्षस्थानी उपस्थित होते. जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश शेडगे, उपाध्यक्ष अॅड. हेरंब गानू, अॅड. योगेश पवार, सचिव राहुल झेंडे, अॅड. सुहास फराडे आदी या वेळी उपस्थित होते.

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ मिळावे म्हणून पुणे आणि कोल्हापूरकडून मागणी करण्यात येत होती. कोल्हापूरला सर्किट बेंच देण्याचा ठराव मंत्रिमंडळात करण्यात आला. पुण्याला खंडपीठ मिळावे यासाठी पाठपुरावा करणार असून, त्यासाठी लागणारी जागा उपलब्ध करून देणार असल्याचेही बापट म्हणाले. पुणे जिल्हा कोर्टातील प्रश्न आपल्याकडे मांडण्यात आले असून, ते मार्गी लावण्यासाठी लागेल

ती मदत करू असेही बापट म्हणाले. कोर्टाजवळील शासकीय गोदामाची जागा देण्याची मागणी, जिल्हा कोर्टाच्या इमारतीची देखभाल, कोर्टातील ग्रंथालय या प्रश्नाकडे आपण लक्ष देणार असल्याचे बापट यांनी नमूद केले. कोर्टातील लॉकअपची आपण पाहणी केली असून, कोर्टात आणण्यात येणाऱ्या आरोपींना नातेवाइकांना न भेटू देण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात येणार आहेत, असेही बापट म्हणाले. या वेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अॅड. हर्षद निंबाळकर आणि अॅड. विजय सावंत यांनी खंडपीठाच्या मागणीसंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले.

सरकारी वकिलांनी केलेल्या मागण्या

शिवाजीनगर जिल्हा कोर्टात सरकारी वकिलांच्या कार्यालयासाठी अधिकृत वास्तू नाही. सध्याचे कार्यालय लोहगाव एअरपोर्ट रोड येथे बंगला नंबर सहा येथे आहे. तिथे येणे जाणे गैरसोयीचे होते. कोर्टात अधिकृत बैठक व्यवस्था नाही ती उपलब्ध करुन देण्यात यावी. सरकारी वकिलांना कायद्याची पुस्तके आणि कामकाजाची कागदपत्रे ठेवण्यासाठी जागा द्यावी. महिला तक्रार निवारण समितीची बैठक प्रत्येक महिन्यामध्ये घेणे बंधनकारक आहे. त्याचा वार्षिक अहवाल सादर करावा लागतो. समितीची बैठक घेण्यासाठी कोर्टात जागा नाही. या समितीत पुणे जिल्ह्यातील ३० महिला सदस्या आहेत. त्यासाठी जागा मिळावी. सरकारी वकिलांना स्वतंत्र प्रसाधनगृह उपलब्ध करुन देण्यात यावे, शासकीय निवासस्थानाची सुविधा त्वरित पुरविण्याचा आदेश देण्यात यावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवी सहा पोलिस ठाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, त्या प्रमाणात पोलिस स्टेशनची संख्याही वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत सहा पोलिस स्टेशन लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शनिवारी दिले.

पाटील यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली, पोलिस आयुक्त के. के. पाठक, सहपोलिस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रकाश मुत्याळ, शहाजी सोळुंके आदी यावेळी उपस्थित होते. पुणे आणि पिंपरी - चिंचवड शहराची लोकसंख्या वाढत असताना त्या प्रमाणात पोलिसांची संख्या वाढविणे आवश्यक आहे, असे सांगून सहा नवी पोलिस स्टेशन्स सुरू करण्याचा प्रस्ताव आयुक्तालयाच्यावतीने ठेवण्यात आला, तेव्हा त्याबाबत तातडीने प्रयत्न करू, असे पाटील म्हणाले. मुंबईची लोकसंख्या एक कोटी ४० लाख असून, तेथे एकच आयुक्तालय आहे. तर पुण्याची लोकसंख्या ७० लाख आहे. त्यामुळे आणखी एका आयुक्तालयाची गरज आहे का, याचा विचार केला पाहिजे, असेही तेम्हणाले.

दरम्यान, येरवडा तुरुंगात सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाइल जॅमर आदी अत्याधुनिक तंत्रांच्या वापराबरोबरच कम्प्युटरायझेशनवर भर देण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. येरवडा तुरुंगाला भेट देऊन त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह अधीक्षक यू. टी. पवार, तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश कांबळे उपस्थित होते.

वाकोल्याची घटना वेगळी

रजा न मिळाल्याच्या मुद्द्यावरून मुंबईतील वाकोला पोलिस स्टेशनमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याने वरिष्ठांवर गोळीबार करून त्यांचा खून केला. मात्र, ही घटना वैयक्तिक असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांच्या ताणाशी त्याचा संबंध नाही, असे गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले.

शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सुरू असून ही यंत्रणा लवकर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाय संघटनेकडून लवकरच एक हजार सीसीटीव्ही देण्यात येणार आहेत.

- डॉ. रणजीत पाटील, गृहराज्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगेश राऊतला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

सॉफ्टेवअर इंजिनीअर नयना पुजारी खून प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राऊतला ससून हॉस्पिटलमधून फरारी झाल्याप्रकरणी कोर्टाने सहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. निमसे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांना तीन वर्षापर्यंतची शिक्षा सुनावण्याचा अधिकार असतो. मात्र, काही अपवादात्मक गुन्ह्यांमध्ये तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा सुनावण्यात येऊ शकते. राऊतच्या गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन त्याला तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा सुनावण्यात येत असल्याचे कोर्टाने सांगितले. शिवाजीनगर जिल्हा कोर्टात अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण निकाल प्रथमच देण्यात आला आहे. सरकारी वकील सुचित्रा नरोटे यांनी या खटल्यामध्ये अकरा साक्षीदार तपासले.

राऊतला पोलिस कस्टडीतून पळून गेल्याप्रकरणी दोन वर्षे, बनावट नाव धारण केल्याप्रकरणी एक वर्ष, बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी दोन वर्षे आणि एक हजार रुपये दंड, बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा कोर्टाने सुनावली. सीआरपीसी कलम ३१नुसार या सर्व शिक्षा आरोपीने एका पाठोपाठ एक भोगाव्यात, असे कोर्टाने आदेशात नमूद केले. नयना पुजारी हिच्यावरील सामूहिक बलात्कार व खूनप्रकरणी राऊतसह महेश ठाकूर, राजेश चौधरी, विश्वास कदम या चौघांना अटक करण्यात आली होती. चौघेही येरवडा जेलमध्ये होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा कोर्टात प्रलंबित असताना अंगाला खाज सुटत असल्याचा बहाणा करून राऊत ससूनमध्ये दाखल झाला. लघवी करायला जाण्याच्या बहाणा करून १७ सप्टेंबर २०११ रोजी त्याने ससूनमधून पोबारा केला होता.

पावणे दोन वर्षे तो फरारी होता.दरम्यान रविकुमार नावाने तो वावरत होता. त्याच्याकडून रवी अशोक भल्ला नावाचे बनावट पॅन कार्ड आणि लायसन्सही मिळाले आहे. तत्कालीन पोलिस निरीक्षक सतीश गोवेकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. पोलिस कस्टडीतून पळूण जाणे, बनावट नाव धारण करणे, बनावट कागदपत्रांचा वापर करणे, बनावट कागदपत्र तयार करणे या प्रकरणी दोषी धरण्यात आले.

'कोर्ट, पोलिसांचा वेळ वाया गेला'

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीकांत निमसे यांनी राऊतला शिक्षा सुनावताना, त्याच्यामुळे कोर्ट आणि पोलिसांचा वेळ वाया गेल्याचे सांगतिले. नयना पुजारी सामूहिक बलात्कार व खून प्रकरण प्रलंबित असताना राऊत पळून गेला. या मुळे सत्र न्यायालयातील सुनावणीवर परिणाम होऊन न्यायालयाचा बहुमोल वेळ खर्च झाला. आरोपीच्या अटकेसाठी अनेक पोलिस पथके कार्यरत होती. पोलिस पथकाचा बहुमोल वेळ व अनेक मानवी तास आरोपीच्या शोधासाठी खर्च झाले. खून व बलात्काराच्या खटला प्रलंबित असताना आरोपीने कायदेशीर रखवालीतून पळून जाणे, बनावट नावाने वावरणे, त्याकरिता बनावट कागदपत्रे तयार करणे हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे त्याला दया दाखवणे योग्य होणार नाही. अन्यथा चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा देणे आवश्यक असल्याचे निमसे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक तरतुदींमुळे नफ्यावर परिणाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये साडेबाराशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, त्यासाठी कराव्या लागलेल्या आर्थिक तरतुदीमुळे बँकेला यंदा ४५० कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्यावर समाधान मानावे लागले. हा नफा मिळाला असला तरी बँकेतील 'चालक से मालक' योजनेसह अन्य काही गैरव्यवहारांची बँकेचे कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता यांनी अप्रत्यक्ष कबुली दिली आहे.

'नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बँक ऑफ महाराष्ट्रकडून काही चुका झाल्या. या चुकांसाठी तरतुदी (प्रोव्हिजन) कराव्या लागल्या. त्यामुळे बँकेच्या निव्वळ नफ्यावर परिणाम झाला आहे. बँकेने एक हजार कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याचे लक्ष्य ठेवले होते. परंतु, या तरतुदींमुळे बँकेचा निव्वळ नफा ४५० कोटी रुपयांपर्यंत कमी झाला,' असे गुप्ता यांनी जाहीर कार्यक्रमात स्पष्ट केले. बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशनच्या (बोमो) १८ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद् घाटन सत्रात ते बोलत होते. महाराष्ट्र बँकेच्या 'चालक से मालक' योजनेतील ६५८ कोटी रुपयांचा महाघोटाळा 'मटा' ने उघडकीस आणला होता. या घोटाळ्यासाठी बँकेला निव्वळ नफ्यातून तरतूद (प्रोव्हिजन) करणे आवश्यक बनले होते. या घोटाळ्यासह अन्य काही घोटाळ्यांसाठी बँकेने २०१४-१५ या आर्थिक वर्षात तब्बल ८८५.९५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळेच बँकेच्या निव्वळ नफ्यावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर गुप्ता यांनी कार्यक्रमात जाहीरपणे केलेल्या या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच, बँकेच्या वार्षिक ताळेबंद अहवालात या गैरव्यवहारांचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला असल्याने बँकेतील घोटाळ्यांवर शिक्कामोर्तब झाले आहे.

गुप्ता म्हणाले, 'बँकेने २०१४-१५ या आर्थिक वर्षात ४५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. यात गतवर्षीच्या तुलनेत १७ टक्के वाढ झाली असून, अन्य सार्वजनिक बँकांच्या तुलनेत ही वाढ उल्लेखनीय आहे. प्रत्यक्षात बँकेने एक हजार कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याचे लक्ष्य ठेवले होते. परंतु, काही चुकांसाठी तरतूद करावी लागल्याचा परिणाम निव्वळ नफ्यावर झाला आहे. आता सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षासाठी एक हजार कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे,'.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे नगरसेवकांचा वाद चव्हाट्यावर

$
0
0

म .टा. प्रतिनिधी, खडकी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा आणि नगरसेविका अर्चना कांबळे यांना जातीवाचक शिवी देऊन मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मनसेचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश ढोरे यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बोपोडी चौकीशेजारील महानगरपालिकेच्या कोठीमध्ये अर्चना कांबळे यांचे वडील रमेश कांबळे आणि प्रकाश ढोरे यांच्यामध्ये वाद झाला. त्यावेळी ढोरे यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार कांबळे यांनी बोपोडी पोलिस चौकीमध्ये केली. त्यानंतर प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकाराबद्दल पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. दरम्यान, दुपारी बाराच्या सुमारास ढोरे माझ्या घरी आले आणि त्यांनी मला जातीवाचक शिविगाळ केली. तसेच मारण्याची धमकीही दिल्याची अर्चना कांबळे यांनी बोपोडी पोलिसांमध्ये दाखल केली.

महापालिकेच्या निवडणुकीत बोपोडी प्रभाग सहामधून कांबळे आणि ढोरे निवडून आले होते. लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्येही वाद पक्षाध्यक्ष राज ठाकरेंपर्यंत गेला होता. शनिवारी झालेल्या प्रकाराची तक्रार कांबळे यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे.

'बदनामीसाठीच षडयंत्र'

मी असे काहीही केलेले नाही. माझ्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकार मला बदनाम करण्यासाठी रचलेले एक षडयंत्र आहे. हा सर्व प्रकार खोटा आहे. माझी वर्तणूक बोपोडीतील सर्वांना माहीत आहे, असे स्पष्टीकरण ढोरे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images